Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिक्षणात संत साहित्याचा समावेश हवा

$
0
0

(आठव्या वारकरी संत साहित्य संमेलनात विशेष विठ्ठल पुरस्कारांने महिला कीर्तनकार उषाताई कांबळे यांचा सन्मान करताना मंत्री सुभाष देसाई व महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर. सोबत डावीकडून विठ्ठल पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, संमेलनाध्यक्ष अमृतमहाराज जोशी. संमेलनाला राज्यभरातील वारकऱ्यांची झालेली गर्दी.)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नितीमूल्यावर आधारित असलेल्या संत साहित्याचा आजच्या शिक्षणाला स्पर्श झाल्यास भावी पिढी सावरण्यास मदत होईल. संत वाङ्मयाच्या शिक्षणाने त्यांचा माया मजबूत होईल. त्यासाठी शिक्षण पद्धतीमध्ये थोडासा बदल करुन त्यामध्ये संत साहित्याचा समावेश करण्याची आवश्यकता आहे,' असे मत उद्योग व सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. वारकरी साहित्य परिषदेच्या ८ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते वीणा व संत साहित्याचे पूजन करण्यात आले.

शिवाजी पेठेतील गांधी मैदान येथे शनिवारपासून सुरू झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अमृतमहाराज जोशी होते. मराठी ही भक्तीची आणि शक्तीची भाषा आहे. शालेय शिक्षणातील मूल्य शिक्षणात संत वाङ्मयाचा समावेश करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, अशी ग्वाही देताना मंत्री देसाई म्हणाले, 'करवीरनगरीत होत असलेले संत संमेलन राज्याला मार्गदर्शक ठरेल. संतांच्या परंपरेत जात, धर्म, वर्ण, लहान, मोठा असा भेदभाव न करता ज्यांनी पांडुरंगाचा जयजयकार केला, त्याला महाराष्ट्राने मस्तकी धरले आहे. संतांनी समाजातील विषमतेवर भारुड, कीर्तन व अभंगांतून जोरदार प्रहार केले. महाराष्ट्राने साहित्याच्या अभ्यासकांनाही सन्मान दिला आहे. वृद्ध कलाकारांना मानधन देण्याची तरतूद हा कीर्तनकार, भजनकारांचा सन्मानच आहे.'

ते पुढे म्हणाले, 'राज्यातील प्रत्येकाला मराठी भाषा आली पाहिजे. मराठीचा सन्मान कदापिही कमी होवू देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तत्काळ मिळावा, अशी मागणी प्रधानमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे, ती निश्चित मान्य होईल.'

अमृतमहाराज जोशी म्हणाले, 'वारकऱ्यांनी कीर्तन, भारुड, अभंग, ओवीतून क्रांतीचे विचार विज्ञान युगापर्यंत पोहचविले. शेख महंमद आणि माणकोजी महाराजांचे वाङ्मय संशोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत यायला हवे. जुन्या आणि नव्याचा संगम करताना परिवर्तनवादी होण्याची आवश्यकता आहे.' करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनीही यावेळी आशीर्वचन दिले. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांच्यासह राज्यातून आलेल्या फडांचे प्रमुख व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्वागत केले. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविक केले. भानुदास यादव महाराज यांनी आभार मानले. कीर्तनकार उषाताई कांबळे यांच्या पसायदानानंतर उद्घाटन सत्राची सांगता झाली.

...

चौकट

विशेष विठ्ठल पुरस्काराने सन्मान

संमेलनाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर निवृत्तीमहाराज नामदास, प्रभाकर बोधले महाराज, भानुदास महाराज व उषाताई कांबळे यांना विशेष विठ्ठल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

....

जमला वैष्णवांचा मेळा

संमेलनाला सुरुवात होण्यापूर्वी मिरजकर तिकटी येथून भव्य दिंडी काढण्यात आली. सजवलेली पालखी, खांद्यावर भगवी पताका घेवून वारकऱ्यांनी मिरजकर तिकटी ते संमेलस्थळांपर्यंत दिंडी काढली. दिंडी मार्गावर फुलांची रांगोळी रेखाटण्यात आली होती. विठ्ठल-रुक्मिणी व विविध संतांच्या वेशभुषा करुन बाल वारकरी दिंडीत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव

सीमाप्रश्नी शांततेने लढा सुरू असताना मए समितीच्या नेते-कार्यकर्त्यांना गोळ्या घालण्याची गरळ ओकणाऱ्याविरोधात तीव्र निदर्शने आणि निषेध व्यक्त होत असताना कन्नडिगांनी शनिवारी पुन्हा मराठी माणसांविरोधात आगळिक करण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शनिवारी आंदोलन केल्याची बातमी समजताच येथील कन्नड संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. सर्किट हाऊस परिसरात हे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांनी कन्नड ध्वज आणि कर्नाटक नवनिर्माण सेनेचा स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्याची प्रतिक्रिया म्हणून कन्नडिंगांनी हे आंदोलन केले.

दरम्यान, बेळगाव दौऱ्यावर आलेले निजद नेते आणि माजी मंत्री बसवराज होरट्टी यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरे यांचा उल्लेख त्यांनी 'उपद्व्यापी ठाकरे' असा केला.

सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, असेही होरट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

बेळगावात म्हादइबाबत आंदोलन करण्यासाठी सभा घेण्यासाठी बेळगावात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. बेळगावचे खासदार स्वतःच्या स्वार्थासाठी सीमाप्रश्नाबाबत बोलत नाहीत. म्हादइ असो किंवा सीमाप्रश्नाबाबत राज्याच्या हितासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. सीमाप्रश्नाबाबत दोन मंत्री नेमून सरकारने योग्य ती पावले उचलायला हवी. मी भाजपात जाणार म्हणून चार वर्षे झाली चर्चा सुरू आहे. येडीयुरप्पा यांनी दोनदा भाजपात येण्याचे आमंत्रण दिले होते. पण मी निजद सोडून कुठे जाणार नाही, असेही होरट्टी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव न्यारी कोल्हापुरी

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूरला ऐतिहासिक, पारंपरिक वारशासोबत समृद्ध खाद्यसंस्कृतीचं देणं लाभलं आहे. इथला रांगडेपणा जसा जगभरात पोहोचला अगदी त्याचप्रमाणे गेल्या दशकभरात कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीने बाळसे पकडत 'लोकल टू ग्लोबल' प्रवास केला. कुस्तीच्या अभ्यासासाठी फ्रान्सहून आलेला अॅन्ड्रीओही मिसळ खाण्याचा आग्रह धरतो. परदेशी पाहुण्याने चटकदार मिसळ चाखल्यावर त्याच्या तोंडून 'वाव नाईस' असे शब्द आपसूक बाहेर पडतात. यावरूनच इथल्या खाद्यपदार्थांची महती सातासमुद्रापार गेल्याची प्रचिती येते. गेल्या दहा वर्षांत व्यावसायिकतेच्या अंगाने कोल्हापुरी खाद्यसंकृतीचा अनुभव देणारी बाजारपेठ वसविण्यात काहीसे यश आले आहे. मात्र, येणाऱ्या काळात बदलत्या प्रवाहानुसार कोल्हापुरी पदार्थांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय खाद्य मानांकनानुसार काम करावे लागणार आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरामुळे राज्यभरातून पर्यटकांचा ओढा कोल्हापूरला असतो. कोल्हापूरला लागून असलेला पन्हाळा, विशाळगड, गगनबावडा, खिद्रापूर, दाजीपूर, राधानगरी आदी ठिकाणी भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटला जातो. त्याचबरोबर तेथील खाद्यपदार्थांची चवही आवर्जून चाखली जाते. कोल्हापूरची खाद्यसंस्कृती ओळख केवळ तांबडा रस्सा-पांढरा रस्सा एवढी मर्यादित न राहता वेगवेगळ्या पदार्थांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. कोल्हापूरी खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे 'झणझणीतपणा' आहे. इथल्या माणसांचा प्रेमळ करारीपणा पदार्थातही उतरला आहे. इथल्या पाण्यामुळे जेवणाला वेगळी चव असल्याचे जुनी जाणती माणस आवर्जून सांगतात. कुस्ती आणि खवय्येगिरी इथल्या रक्तात भिनली आहे. कुठं वेगळं काही चाखायला मिळणार म्हटल्यावर पदरमोड करून त्या पदार्थाची चव चाखून त्याची चांगली-वाईट माऊथ पब्लिसिटी हमखास केली जाते. इथला प्रत्येक पदार्थ नावीन्यपूर्ण असतो. पूर्वी तमाशा आणि लवंगी मिरची या दोन शब्दांचा कोल्हापूरशी संबंध जोडला जायचा. मात्र, आता तांबडा-पांढरा रस्सा म्हटलं की, राज्यातील कोणत्याही खाद्यप्रेमींच्या डोळ्यासमोर आपोआप कोल्हापूर येते. इथल्या प्रत्येक पदार्थाचे स्वतःचे एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या अस्सल खवय्यांचे स्थानिक खाद्यपदार्थांशी वेगळेच नाते निर्माण होते. गेल्या दहा वर्षात जागतिकीकरणानंतर खाद्यसंस्कृती वेगाने बदलत चालली आहे. नव्या पिढीच्या तरुणांना पाश्चिमात्य पदार्थांची भुरळ पडत आहे. यासाठी परदेशी पदार्थांचे आउटलेटही उघडले गेले. इटालियन, चायनीज पदार्थ चाखणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, परदेशी खाद्यपदार्थांच्या भाऊगर्दीत कोल्हापूरच्या पदार्थांनी स्वतःचे वेगळेपण जपून स्वतंत्र ओळख कायम ठेवली आहे.

समृद्ध खाद्यसंस्कृती जपण्यात कोल्हापूरच्या माणसाच्या रोजच्या सवयी कारणीभूत आहेत. इथला माणूस वरून कमालीचा तिखट वाटत असला तरी त्याच्या स्वभावातून तो गुळाच्या गोडव्यासारखा असतो. रोजचं जेवण जरी साधं असलं तरी त्याला आमटीत तवंग लागतोच. वरण वगैरे प्रकार आजारी माणसांसाठी राखीव ठेवला जातो. आवडीनिवडीनुसार खाण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी आमटी मात्र भुरकन प्यायली जाते. मेट्रो सिटीतल्या जेवणातला नाजूकपणा कोल्हापुरी जेवणात दिसत नाही. तांबड्या-पांढऱ्या रश्श्याशिवाय कोल्हापूरची खाद्यपरंपरा समजून येत नाही. तांबडा-पांढरा रस्सा, खमंग मटण, खिमा, मटणाचं लोणचं, रक्ती-मुंडी, खांडोळी आणि जोडीला गरमागरम कडक भाकरी खाण्याची पर्वणी वेगळीच असते. चवदार जेवणामुळे कोल्हापूरकडे पर्यटकांचा ओढा जास्त आहे. मोठ्या हॉटेलसोबत घरगुती खानावळींतूनही मटणाचे जेवण पुरवले जाते. खास चुलीवरच्या जेवणाचा ट्रेंड सेट झाला आहे. शहरातील गल्ल्यांत 'घरगुती जेवण' असे फलक आढळतात. त्यासाठी खास भारतीय बैठकीची तजवीज असते. प्रसिद्ध ठिकाणी वेटिंग करून जेवायला प्राधान्य दिले जाते. मांसाहारी जेवणातला फरक खडानखडा खाणाऱ्याला. मांसाहारी जेवणातील भेसळ कटाक्षाने ओळखली जाईल इतपत चव इथल्या खाणाऱ्याच्या जिभेवर आहे.

०००

शाकाहारी जेवणातही आघाडी

कोल्हापूरच्या हॉटेल व्यावसायिकांनी मांसाहारी जेवणासह शाकाहारी पदार्थांतही आघाडी घेतली आहे. मिसळ, कटवडा, बटाटा वडा रोजच्या खाण्याचा भाग बनला आहे. अनेक ठिकाणी मिळणारी मिसळ खवय्यांचा 'वीक पॉइंट' आहे. यासाठी मिसळीचे स्टेशन सुरू झाले आहेत. दररोज नाश्त्याला मिसळ खाणारे आवर्जून भेटतात. त्यात तवंग अधोरेखित करण्याचा भाग असतो. त्यासाठी खास चटणी तयार करून घेतली जाते. कांदा, आले, लसूण, कोथिंबीर, गरम मसाला आणि मिरची पूड याच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या चटणीचा वापर मिसळीला व आमटीला तवंग आणण्यासाठी केला जातो. यासाठी शहराच्या गल्लीगल्लीत मसाल्याचे डंग आढळतात. अर्थात पदार्थाला येणाऱ्या चवीमागे चटणीचा हातभार असतो. त्याचबरोबर दक्षिणेतील दावणगिरी लोणी डोसा, इडली, उताप्पा या पदार्थांनीही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. रोजच्या जेवणात झुणका भाकर तर आवर्जून दिसते. झुणका पातळ करून भातासोबतही खाल्ला जातो. सोबत ठेचा असतोच. अलीकडे अख्खा मसूरची स्पेशालिटी सांगणारी छोटी-मोठी हॉटेल्स उभी राहिली आहेत. तर दूध वांग आणि भाकरी ताटात स्थान मिळवू लागली आहे. तर अनलिमीटेड शाकाहारी थाळीचा प्रयोग यशस्वी ठरतो आहे.

०००

रस्सा मंडळातून सोशल कनेक्टिविटी

रस्सा मंडळ ही एक कोल्हापूरची ओळख आहे. जगभरात रस्सा मंडळ फक्त आपल्याकडेच आहे असे अभिमानाने सांगितले जाते. आठ-दहा लोकांनी एकत्र येऊन रस्सा मंडळ स्थापन केले जाते. सुट्टीच्या दिवशी निवांत ठिकाणी तांबडा-पांढरा रस्सा तयार केला जातो. यासाठी खास प्रत्येकाच्या घरातून मसाला, तेल आणले जाते. रस्सा मंडळासाठी वेगवेगळी नावेही ठरवली जातात. सलग ३० ते ३५ वर्षे नियमितपणे रस्सा मंडळ चालवणारेही आहेत. रस्सा मंडळातील प्रत्येक सदस्य आपापल्या घरातून चपाती, भाकरी, भात व ताटवाटी घेऊन जेवणाच्या ठिकाणी उपस्थित असतो. भुरका मारून रस्सा पिण्यासाठी आवर्जून रस्सा मंडळात आग्रह होताना दिसतो. रस्सा मंडळाचे नियोजन काटेकोरपणे केले जाते. बदलत्या खाद्यसंस्कृतीतही रस्सा मंडळांनी आपले वेगळे स्थान टिकवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तांत्रिक कारणांमुळे खंडित झालेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २० दिवसांनंतर पुन्हा सुरू झाली. शनिवारी मुंबईहून ६० प्रवासी कोल्हापूरला आले, तर कोल्हापुरातून ५५ प्रवासी मुंबईला गेले. प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असलेली मुंबई विमानसेवा यापुढे नियमित सुरू राहावी, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली.

उडान योजनेंतर्गत ट्रू जेट कंपनीने सप्टेंबर महिन्यापासून मुंबई-कोल्हापूर मार्गावर विमानसेवा सुरू केली होती. प्रवाशांनी वारंवार मागणी केल्यानंतर अखेर या विमानसेवेला मुहूर्त मिळाला होता. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यात तब्बल आठ हजार प्रवाशांनी या मार्गावर विमान प्रवास केला. मात्र, मुंबई विमानतळावर सुरू असलेले धावपट्टीचे काम आणि तांत्रिक अडचणीमुळे ७ डिसेंबरपासून ट्रू जेटने विमानसेवा स्थगित केली. २० दिवसांसाठीच ही विमानसेवा स्थगित असेल असे कंपनीने सुरुवातीला स्पष्ट केले होते. मात्र, ट्रू जेटच्या वेबसाइटवर बुकिंगमध्ये अनियमितता दिसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था वाढली होती. प्रवाशांचा वाढता दबाव आणि लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने अखेर २८ डिसेंबरपासून विमानसेवा पूर्ववत सुरू करीत असल्याचे ट्रू जेटने जाहीर केले. यानुसार शनिवारपासून मुंबई-कोल्हापूर विमानसेवा पूर्ववत सुरू झाली.

हैदराबाद, बेंगलोर विमानसेवा नियमित

अलाएन्स एअरकडून हैद्राबाद आणि बेंगलोरसाठी विमानसेवा सुरू आहे. इंडिगो कंपनीकडून बेंगलोर आणि तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू आहे. चारही शहरांसाठी रोज विमानांचे उड्डाण होते. ढगाळ हवामानामुळे आलेल्या तांत्रिक अडचणींचा अपवाद वगळता कोल्हापुरातून चारही शहरांसाठी नियमित विमानसेवा सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात या मार्गांवर ८० हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.

तिरुपती विमान रद्द
ढगाळ हवामानामुळे शनिवारी इंडिगो कंपनीचे तिरुपती-कोल्हापूर विमान येऊ शकले नाही. यामुळे कोल्हापुरातून तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. विमानतळ प्राधिकरण आणि इंडिगो कंपनीने प्रवाशांसाठी पर्यायी वाहनाची व्यवस्था केली. अलाएन्स एअरची हैदराबाद आणि बेंगलोर ही दोन्ही विमाने आली आणि वेळेत परत गेली.

आठवड्यातील पाच दिवस विमानसेवा

मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील पाच दिवस कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू आहे. विमानाची वेळ दुपारची असूनही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सकाळच्या वेळेत विमानसेवा सुरू झाल्यास आणखी मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विमानसेवेचे वेळापत्रक

शहर उड्डाणशहर लँडिंग
मुंबई १२.४५ कोल्हापूर १.५०
कोल्हापूर २.१० मुंबई ३.२०

तिकीट दर २१८२ रुपयांपासून सात हजारांवर
कोल्हापूर ते मुंबई या विमान प्रवासासाठी दोन महिने ते १५ दिवस आधीच बुकिंग केल्यास २१८२ रुपये तिकीट दर आहे. १५ दिवसातील बुकिंगसाठी मात्र पाच हजारांपासून ते ७१७० रुपयांपर्यंत तिकीट दर आहेत. ट्रू जेटच्या वेबसाइटवर तिकिटांचे दर दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५ हजारांसाठी मित्रांनी केला तरुणाचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

किरकोळ वादानंतर दारूच्या नशेत असलेल्या दोघा मित्रांनीच दगडाने ठेचून मित्राचा खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री विक्रमनगर परिसरात घडली. हैदर शहानूर कलावंत (वय २४, रा. गणेशनगर) असे त्याचे नाव आहे. खून केल्यानंतर हैदरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मोटारसायकलवरून घेऊन जात असताना ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी गणेश नारायण इंगळे (वय २३, रा. गौरीशंकरनगर, खोतवाडी) आणि योगेश हणमंत शिंदे (वय २३, रा. गणेशनगर) यांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : हैदर कलावंत यंत्रमाग कामगार असून, गणेश इंगळे व योगेश शिंदे हे त्याचे मित्र आहेत. या तिघांनाही दारूचे व्यसन होते. काही दिवसांपूर्वी हैदरचा मोबाइल त्याच्या कामाच्या ठिकाणावरून चोरीस गेला होता. याप्रकरणी हैदरचा एकावर संशय होता. मोबाइल चोरीतील संशयित युवकास मारहाण करण्यासाठी हैदरने गणेश व योगेश यांना सांगितले होते. त्या मोबदल्यात त्यांना दारू आणि पाच हजार रुपये देतो, असे हैदरने सांगितले होते.

शुक्रवारी सायंकाळी गणेश व योगेश मोबाइल चोरीचा संशय असलेल्या तरुणाला मारहाण करण्यासाठी गेले होते. परंतु त्यावेळी त्या भागातील नागरिकांनीच त्यांना पकडून चोप दिल्याने ते रिकाम्या हाताने परत आले होते. मात्र, संशयित चोरट्याला अद्दल घडविल्याने शुक्रवारी रात्री गणेश व योगेश यांनी हैदरकडे दारू व पैशाची मागणी केली. ठरल्यानुसार हैदरने त्यांना मद्यमान करण्यासाठी आरगे मळ्यातील मैदानात नेले. मद्यपान सुरू असतानाच गणेश व योगेश यांनी हैदरकडे पाच हजारांची मागणी केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी गणेश व योगेशने दगडाने हैदरवर हल्ला चढविला. त्यात तो गंभीर जखमी झाला.

हैदरचा मृत्यू झाल्याचे समजून त्यांनी पोलिसांच्या भीतीने त्याला अन्यत्र ठिकाणी टाकण्यासाठी मोटारसायकलवर बसवले. आरगे भवन परिसरातून ते राजवाडा चौकमार्गे बोरगावच्या दिशेने निघाले होते. मोटारसायकलीवर तिघे जण असल्याने गस्तीवर असलेल्या पोलिसाने त्यांना थांबविले. मात्र, मित्र जखमी असून त्याला रुग्णालयात घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. तेथून पुढे ते जुना चंदूर रोड परिसरात गेले. तेथे गृहरक्षक दलाचा जवान व काही नागरिकांनी दुर्गामाता परिसरात त्यांना संशयावरून अडविले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी हैदरला उपचारासाठी आयजीएममध्ये दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांत आकस्मित मृत्यूची अशी नोंद करण्यात आली. पण चौकशीत खुनाची घटना उघडकीस आली.

दरम्यान, गणेश व योगेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरगे मळा घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड तसेच मृताचे चप्पल पडले होते. मृत हैदर अविवाहित असून, त्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
दरम्यान, गणेश व योगेश संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी मृत हैदरच्या नातेवाइकांसह भागातील नागरिकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळगावात मराठी फलक तोडले, कोल्हापुरात पडसाद

$
0
0

कोल्हापूर: कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बेळगावमधील मराठी भाषिक आणि शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यानंतर शिवसैनिकांनी भीमाशंकर यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढल्यानंतर संतप्त झालेल्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील दुकानांवर असलेले मराठी फलक तोडून टाकले. परिणामी आज सकाळपासून महाराष्ट्रातून एकही बस कर्नाटकात गेली नसून, कर्नाटकातूनही एकही बस राज्यात दाखल झालेली नाही. प्रवाशांना या आंदोलनाचा फटका बसू नये यासाठी दोन्ही बाजूंकडून बस सेवा स्थिगित ठेवण्यात आली आहे.

देशभरात १५० खासगी रेल्वे धावणार, मुंबईतून २६

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषिकांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू असतानाच कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर जावून गोळ्या घाला असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर मराठी भाषिक आणि शिवसेना आक्रमक झाली. संतप्त शिवसैनिकांनी भीमाशंकर पाटील याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत आंदोलन केलं. शिवसैनिकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शनिवारी आंदोलन केल्याची बातमी समजताच येथील कन्नड संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. सर्किट हाऊस परिसरात हे आंदोलन करण्यात आले होते.बेळगावात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळल्यानंतर त्याचे पडसाद राज्यातही उमटू लागले आहेत. कोल्हापुरात आयोजित आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते या कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळणार आहेत.

धक्कादायक! देशातील ५४ टक्के पदवीधर नोकरीस अपात्र


या घटनेचे सांगलीतही पडसाद उमटले असून सांगलीत कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येत आहे. सांगलीतील मिरज येथे कर्नाटकात जाणाऱ्या बसेस रोखून धरण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे म्हैसाळ नाका येथे कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येत आहे. शिवाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भीमाशंकर पाटील यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

५ हजार रुपयांसाठी मित्रांनी केला तरुणाचा खून

बेळगाव दौऱ्यावर आलेले निजद नेते आणि माजी मंत्री बसवराज होरट्टी यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे यांचा उल्लेख त्यांनी 'उपद्व्यापी ठाकरे' असा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड सिनेमाचे शो शिवसैनिकांनी बंद पाडले

$
0
0

कोल्हापूर: ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या नेत्यांबद्दल कर्नाटक नवनिर्माण सेनेचे नेते भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सीमावाद पुन्हा एकदा पेटला असून सांगली, कोल्हापूरमध्ये याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. सीमावासियावरील अन्यायाच्या विरोधात शिवसेनेतर्फे कोल्हापुरात आज निषेध फेरी काढण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मंडळी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेना व कन्नड रक्षक वेदिकेचा त्यांनी निषेध केला.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील दाभोळकर चौक इथं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचं दहनही केलं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील एका थिएटरमधील कन्नड सिनेमाचे शो बंद पाडले. कोल्हापूर एसटी आगारातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत.

वाचा: बेळगावात मराठी फलक तोडले, कोल्हापुरात पडसाद
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषिकांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू असतानाच कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर जावून गोळ्या घाला असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर मराठी भाषिक आणि शिवसेना आक्रमक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोसावी कलानिकेतनच्या ५८ विद्यार्थ्यांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य कलासंचालनालयतर्फे होणाऱ्या ६० व्या कला प्रदर्शन विद्यार्थी विभागात कोल्हापुरातील कलामंदिर महाविद्यालय व रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना पारितोषिकेही मिळाली आहेत.

रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या एकूण ५८ कलाकृतींची निवड झाली आहे. उपयोजित कला विभागामध्ये तृतीय पारितोषिक मिळाले आहे. तर एका विद्यार्थ्याला गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे. उपयोजित कला विभागात श्रृती वाघ व तेजस्विनी पाटील यांनी पारितोषिक पटकावले. अनिकेत घाटगेकर हा विद्यार्थी गुणवत्ता प्रमाणपत्र विजेता ठरला. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा व प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांचे प्राचार्य एस. बी. पोतदार यांनी अभिनंदन केले. २३ जानेवारी ते २९ जानेवारी २०२० या कालावधीत यशवंत कलामहाविद्यालय औरंगाबाद येथे प्रदर्शन होणार आहे.

कलामंदिर महाविद्यालयातील शिल्पकला विभागातील विद्यार्थी सुनील चौधरी यांच्या शिल्पकृतीस चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. कलामंदिर महाविद्यालयातील ओंकार मसूरकर, केवल सावंत, सिद्धेश सुतार, विकास हर्मलकर, मंगेश कानेकर, प्रशांत सुतार यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. तसेच फाऊंडेशन विभागातील ऋतुजा वंग, सोनाली मुधोळकर, श्रीधर कुंभार यांची चित्रे आहेत. या विद्यार्थ्यांना प्राचार्य जी. एस. माजगांवकर, शिल्पकला विभागप्रमुख किशोर पुरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष मारुतराव कातवरे व संचालकांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटीमधून पैशासह दागिन्यांची पर्स लंपास

$
0
0

कोल्हापूर : रंकाळा एसटी स्टँडवरून रंकाळा ते पडसाळे मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमधून ६० हजार रुपये किमतीचे दागिने व रोख ४,६०० रुपये असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली. याबाबतची फिर्याद आफसाना महमंद पन्हाळकर (वय २८, रा. ८७४, ई, वॉर्ड, शाहूपुरी ६ वी गल्ली) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. पन्हाळकर रंकाळा ते पडसाळी दरम्यान एसटीमधून प्रवास करण्यासाठी जात होत्या. प्रवाशांची गर्दी असल्याने त्यांनी जागा पकडण्यासाठी आपली पर्स रिकाम्या सीटवर खिडकीमधून ठेवली. गर्दीतून एसटीमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्यांच्या पर्समधील छोटी पर्स अज्ञान चोरट्यांनी लंपास केली. पर्समध्ये ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, २० ग्रॅमचा राणी हार व पाच ग्रॅमची कर्णफुले असा ६० हजार किमतीचा ऐवज व रोख ४,६०० रुपये लंपास केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेला मारहाण; तिघांवर गुन्हा

$
0
0

कोल्हापूर: पूर्ववैमनस्यातून मेघोली (ता. भुदरगड) येथील नीता संतोष देसाई या विवाहितेला तिघांनी काठीने मारहाण केली. संशयिय आरोपी मोहन काका देसाई, उज्ज्वला मोहन देसाई व काका बाळा देसाई (सर्व रा. मेघोली) यांनी अश्लील शिवीगाळ करुन मारहाण केल्याची फिर्याद नीता देसाई यांनी भुदरगड पोलिस ठाण्यात दिली आहे. तिघेही संशयित नेहमी घरासमोर व रस्त्यावर येता-जाता शिवीगाळ करत असल्याने फिर्यादीमध्ये म्हटले आहे. संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांनी शहर हाउसफुल

$
0
0

फोटो आहेत

कोल्हापूर टाइम्स टीम

सलग दोन दिवसांची सुटी,थर्टी फर्स्ट, पर्यटनांचा आनंद घेण्यासाठी रविवारी आलेल्या पर्यटकांमुळे शहर हाउसफुल्ल झाले होते. सहकुटुंब, मित्र आप्तेष्टांसह पर्यटनांचा आनंद घेत करवीर निवासिनी अंबाबाई दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. मंदिरापासून तुळजाभवानी मंदिरापर्यंत भाविकांची रांगा लागल्या होत्या. वाढलेली पर्यटकांची संख्या आणि अपुऱ्या वाहनतळामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. दिवसभरात सुमारे दोन लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. कोल्हापूरसह जोतिबा, नृसिंहवाडी, खिद्रापूर आणि पन्हाळ्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती.

बुधवारी झालेल्या ख्रिसमसपासून पर्यटकांचा राबता शहरात वाढला आहे. सलग सुट्यांचे नियोजन करून पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. शहरात दाखल झाल्यानंतर प्रथम अंबाबाई देवीच्या दर्शनाने सुरुवात केली जाते. रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा, बेळगावसह अन्य राज्यामधून पर्यटक कोल्हापुरात दाखल झाले. त्यामुळे गर्दीने शहर दिवसभर हाउसफुल्ल झाले होते. अंबाबाई मंदिरात पहाटेपासून सुरू झालेली गर्दी रात्री उशीरापर्यंत कायम होती. मंदिराच्या दक्षिण दरवाजापासून भवानी मंडप, तुळजाभवानी मंदिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सरलष्कर भवन समोरील प्रवेशद्वाराच्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा बॅरिकेट्स लावले होते.

देवीच्या दर्शनानंतर रंकाळा, न्यू पॅलेस, टाऊन हॉल, कणेरी मठ, खिद्रापूर, जोतिबा व पन्हाळ्याकडे रवाना होत होते. रंकाळा चौपाटी व उद्यानामध्ये पर्यटकांसोबत स्थानिक नागरिकांनीही गर्दी केली होती. रंकाळा चौपाटीवर अनेकांनी घोडेस्वारीचा आनंद घेतला. टाऊन हॉल येथील संग्राहल व न्यू पॅलेस येथील राजर्षी शाहू महाराज यांचे वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी गर्दी केली होती. शहरात पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर अनेकजणांना नृसिंहवाडी, खिद्रापूर व कणेरी मठाला पसंती दिली. दिवसभर पर्यटकांचा राबता असल्याने शहराच्या अनेक मार्गावर वाहतुकीचा ताण दिसून आला. वाहतूक पोलिसांसह होमगार्ड वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र वाहनतळांची संख्या अपुरी असल्याने विशेषत: बिंदू चौक, शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोडवर सातत्याने वाहतूक कोंडी होत होती.

जोतिबा डोंगर फुलला

श्री क्षेत्र जोतिबा दर्शनासाठी दर रविवारी नेहमीच गर्दी असते. नेहमीच्या गर्दीसोबत पर्यटकांच्या गर्दीमुळे जोतिबा डोंगर फुलून गेला होता. जोतिबा जाण्यासाठी अनेकांनी केएमटीचा आधार घेतला. दर रविवारी जोतिबा दर्शन सुविधा देणाऱ्या केएमटी बसला प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला. स्टँडपासूनच बसमध्ये उभा राहण्यासह जागा मिळत नव्हती. केएमटीबरोबर येथील रिक्षाचलकांचाही चांगला व्यवसाय झाला.

लॉज, यात्री निवास फुल्ल

शहरात नोंदणीकृत १२०० लॉज व यात्री निवास असले, तरी ही संख्या त्यापेक्षाही जास्त आहे. तरीही अनेक पर्यटकांना राहण्यासाठी रुम्स उपलब्ध होत नसल्याचे चित्र पहावयास मिळत होते. अनेक पर्यटक राहण्यासाठी जागेचा शोध घेत होते. वाढत्या गर्दीमुळे मात्र अनेकांनी जादा शुल्क लावल्याच्या तक्रारी पर्यटक करत होते. त्यामुळे अनेकांनी कोकण व गोव्याला मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागोवा: क्रीडाक्षेत्र २०१९

$
0
0

Sachin.patil1 @timesgroup.com Tweet : sachinpMT कोल्हापूर : जिल्ह्यातील नवोदित होतकरू खेळाडूंना सेवासुविधांच्या अभावी सरावासाठी पुणे, मुंबई गाठावे लागत आहे. शहराच्या क्रीडा विकासाकडे स्थानिक स्वराज्य संस्था, क्रीडा संघटना, लोकप्रतिनिधी व क्रीडा खात्याने दुर्लक्षच केल्याचे आढळते. तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कोल्हापूरच्या खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत नाव उंचावले आहे. गेल्या वर्षभरात शहरातील मैदानांच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकूनही त्याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कटके यांना पीएचडी

$
0
0

कोल्हापूर येथील शिवानी ढेरे-कटके यांना शिवाजी विद्यापीठाने संगीत विषयातील पीएचडी जाहीर केले आहे. त्यांनी सादर केलेल्या 'उपशास्त्रीय संगीत विविध गीतप्रकारांचा निवडक दहा गायिकांच्या आधारे केलेला अभ्यास' या विषयावरील प्रबंधाला पीएचडी मिळाली. त्यांना डॉ. अंजली निगवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. शिवानी यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण केएमसी कॉलेजमधून घेतले आहे. तर पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाट्यशास्त्र विभागातून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र : विजय जाधव

$
0
0

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र : विजय जाधव

०००

सामाजिक न्यायाची पहाट !

०००००

देशभर 'नागरिकत्वा'च्या प्रश्नावरून वादळ उठले असताना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तब्बल ६० हजार शेतकऱ्यांना त्यांचा जमिनीवरील हक्क कायदेशीर करण्याचा क्रांतिकारी निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. 'हेरे सरंजाम' खालसा करण्यात आले. प्रशासन, महसूल आणि जमीन सुधारणेच्या इतिहासात याची निश्चितच स्वतंत्र नोंद होईल. काय आहे प्रकरण?

००००

पाणी, जंगल, जमीन यांसारख्या राष्ट्रीय साधन-संपत्तीवर समान अधिकाराच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वानुसार समाजातील शेवटच्या आणि तळातल्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोहोचवणे, त्यातून मिळणाऱ्या हक्काने त्याला परिपूर्ण करणे हे लोककल्याणकारी राज्याचे अंतिम ध्येय असते. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर अजूनही ते पूर्ण अर्थाने साध्य झालेले नाही, असे आजच्या भयकारी सामाजिक अस्वस्थतेने दाखवून दिले आहे. या न्याय्य हक्कासाठीचे लढे आजही जागोजागी सुरूच आहेत. मग तो समान पाणीवाटपाचा असो, भूमिहीन, शेतमजुरांचा लढा असो. यापैकी अनेक जण घटनेने न्याय आणि हक्क मिळूनही तिच्या अंमलबजावणीपासून कोसोदूर असल्याचे दिसून येते. अनेक पिढ्या या मातीत मिसळून गेल्या तरी स्वातंत्र्याचा खरा हक्क न मिळाल्याने सर्वसामान्यांचा हा लढा दशकानुदशके सुरूच आहे. हक्क आणि अधिकारांसोबत या मातीशी असणारे त्यांचे नाते त्यांना हवे आहे, ते हिरावण्याचा आणि त्याला भूमिहीन करत उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न व्यवस्थेकडून होत आला आहे. स्वातंत्र्यानंतर राजेरजवाडे आणि संस्थाने एकाच समान देशाच्या झेंड्याखाली आणि घटनेखाली आली. स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून सर्वांना एक कायदा लागू झाला. मात्र, घटनेने स्वीकारलेल्या सर्वच बाबी तंतोतंत लागू झाल्या नाहीत. राजेरजवाड्यांनी आपल्या सरंजामदार, सरदारांना आणि सेवकांना बहाल केलेली सरंजामे, वतने, जहागिऱ्याही यासोबतच संपल्या. त्यांची जमीन सरकारजमा झाली. त्यावर राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या, वहिवाटदार, कुळांच्या मालकीची झाली. ती प्रत्यक्ष त्यांच्या नावावर होण्यात नंतर मोठ्या अडचणी आल्या आणि आजही येत आहेत.

हेरे सरंजाम मुक्त

प्रशासनाने मनावर घेतले, सर्व दबाव आणि मोह झुगारून निव्वळ कायद्याचेच संरक्षण करायचे, त्यातून अडलेल्या नाडवलेल्या माणसाचे भले करायचे ठरवले तर आणि तरच समाजातील उपेक्षितांना न्यायाची दारे सहजपणे खुली होऊ शकतात. व्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास वाढतो. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हेरे सरंजामातील ४७ गावांतील ५५ हजार एकर जमीन सुमारे ६० हजार वहीवाटदारांच्या नावे मालकीहक्काने करण्याचा क्रांतिकारी निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नुकताच घेतला. निम्मा चंदगड तालुका हेरे सरंजामातून खऱ्या अर्थाने मुक्त झाला. महसूल खात्याच्या रेकॉर्डवरून हे हेरे सरंजामच खालसा केले गेले! या पिढ्यानपिढ्याच्या भोगवटादारांना मोठा न्याय आणि दिलासा मिळाला. उपेक्षितपणाचा, परकेपणाचा शिक्का कायमचा पुसला गेला. या सरकारी सुलभीकरणाच्या आणि अधिकाराविरोधात असणाऱ्या बलाढ्य शक्तींना थोपवत ६० हजार लोकांना एकाचवेळी लाभ मिळवून देण्याचा हा निर्णय मोठा परिवर्तन घडविणारा, महसूल सुधारणांमध्ये वेगळा ठसा उठवणारा म्हणावा लागेल.

१९५२ मध्ये देशातील अन्य संस्थानांप्रमाणे हेरे सरंजाम संस्थान खालसा झाले. मात्र, महसूल प्रशासनाच्या दिरंगाई कामकाजामुळे स्वातंत्र्योत्तर सुमारे ५० वर्षे झाल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी चंदगडच्या हेरे परिसरातील ४७ गावांतील ६० हजार शेतकऱ्यांच्या सातबारावर 'सरकारी हक्क' अशी नोंद व्हायची. शेतकरी केवळ नावाचे मालक ठरले. शेतीसंबंधीच्या विविध कामांसाठी परवानगी मिळवताना त्यांना प्रचंड त्रास व्हायचा. तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांतांकडे, प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागायचे. यातूनच दलाल, मध्यस्थांचे फावले होते. शेतकऱ्यांची लूट सुरू होती. याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. चंदगडचे तत्कालीन आमदार दिवंगत नरसिंगराव पाटील यांनी २००१ मध्ये विधानसभेत प्रश्न उपस्थित करून याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. सरंजाम खालसा करण्यासंबंधी सरकारी निर्णय करून घेतला. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. प्रशासनाने हा विषय वेळोवेळी लोंबकळत ठेवला. ही बाब जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या निदर्शनास आली. त्यांनी हा प्रश्न सामाजिक जाणिवेने आणि संवेदनशीलपणे हाताळला. राजकीय निर्णयाची, हस्तक्षेपाची वा कोणाच्या मानापमानाची वाट बघितली नाही. 'हेरे सरंजाम' खालसा करण्याचा आदेश देत त्या शेतकऱ्यांच्या सातबारावरील सरकारी हक्क नोंद कमी करून जमीन वर्ग भोगवटादार म्हणून नाव लावण्याचा आदेश त्यांनी दिला. या प्रक्रियेतही पारदर्शकता राहण्याची विशेष काळजी घेतली.

लुबाडणूक थांबली

येत्या २६ जानेवारीपूर्वी ही मालकी हक्काची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सातबारावरील सरकारी हक्क संपुष्टात येणार असल्याने जमिनीची वाटणी, पोटहिस्सा, कर्ज, तारणगहाण, हस्तांतरणासाठी आता सरकारच्या परवानगीची आवश्यकता भासणार नाही. यापूर्वी झालेले सर्व विनापरवाना हस्तांतरण, शर्तभंग या निर्णयानुसार नियमित होतील. दोनशेपट शेतसारा भरल्यानंतर अर्ज मागणी न करता गावातील सर्व जमिनी एकाच आदेशाने सरकारी बंधनातून मुक्त होणार आहेत. आता यासाठी खातेदार शेतकऱ्यांना तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागणार नाही. या कामासाठी महसूल प्रशासनात होणारी सामान्य शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक थांबणार आहे.

या हजारो पीडित आणि लालफितीच्या कारभारात अडकलेल्या भूमिपुत्रांसाठी सामाजिक न्यायाची पहाट होईल. प्रजासत्ताकदिनापूर्वीच घटनेतील त्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वाची अंमलबजावणी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या या तालुक्यात होईल. जिल्हाधिकारी देसाई यांनी घेतलेला निर्णय प्रशासनातील सामाजिक सेवेचा, धडाडीचा गौरव करणारा आहे. हा प्रश्न एकट्या चंदगड तालुक्यापुरता मर्यादित नाही. संपूर्ण राज्यभर अशा प्रकारच्या जमिनी वेगवेगळ्या कायद्यांच्या आणि नियमांच्या कचाट्यात अडकल्या आहेत. यापैकी सरंजाम इनाम जमिनीचा विषय राज्यात केवळ कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात प्रलंबित होता. कोल्हापूरचा प्रश्न अखेर मार्गी लागला.

शेतकरी जगला तर देश जगेल. यासाठी या लाखोंच्या पोशिंद्याला सर्व प्रकारच्या मदतीचे भक्कम पाठबळ उभे करण्यावाचून पर्याय नाही. शाश्वत विकासासाठी जमीन सुधारणांचे भिजत घोंगडे एकदाचे मार्गी लावले पाहिजे. हा विषय थेट देशाच्या विकासाशी जसा संबंधित आहे, त्याहून अधिक स्वतंत्र भारतात नाकारल्याची भावना झालेल्या असंख्य भूमिहीन, शेतकरी आणि शेतमजुरांच्या सामाजिक उत्थानाशी आहे. तो उशिरा का असेना मार्गी लागला आणि हेरे सरंजाममुक्तीचा लढा यशस्वी झाला, त्या आंदोलनकर्ते बाधित शेतकऱ्यांचे, त्यांच्या हक्काला न्याय मिळवून देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन! ही नवभारतातील 'सरंजाम मुक्ती' आशादायी आहे, ते महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या लढ्याचे यश आहे. आता सरकार आणि प्रशासनातील सरंजामी वृत्तीच्या विळख्यातून सामान्य माणूस कधी मुक्त होणार, हा प्रश्न आहे!

००००

फोटो : जिल्हाधिकारी दौलत देसाई

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार मद्यपी वाहनचालक अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मद्यप्राशन करून वाहन चालवत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी, गोकुळ शिरगाव व करवीर पोलिसांनी चौघांवर कारवाई केली. चारही जणांना गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासणी करून मद्यपींना चाप लावण्यास सुरुवात केली आहे.

डंक अँड ड्राइव्हप्रकरणी शाहूपुरी पोलिसांना मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दीपक धोंडिराम लोहार (वय २३, रा. चव्हाण गल्ली, बेळगाव) याच्यावर कारवाई केली. त्याची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. गोकुळ शिरगाव पोलिसांनी शिवाजी जोती वारके (वय ३५, रा. वारके गल्ली, कणेरीवाडी) तसेच कडाप्पा साताप्पा मोकाशी (वय ५४, रा. गोकाक, सध्या कणेरीवाडी) यांना दोघांवर कारवाई केली. तर करवीर पोलिसांनी रमेश विष्णू बराले (वय ७० रा. इंदिरानगर, वडणगे) यांच्यावर पाचगाव येथे कारवाई केली. सर्वांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उत्सवाची नगरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये सरत्या वर्षाला निरोप देतानाच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध हॉटेल्स, धार्मिक, सामाजिक संघटना यासह युवकांचे ग्रुप स्वागताची तयारी करत आहेत. त्यामुळे शहरवासियांना सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचे आदरातिथ्य करण्यासाठी पंचतारांकित हॉटेलसह अन्य छोटी-मोठी हॉटेल्स विद्युत रोषणाईने उजाळून गेली आहेत. पन्हाळा, आंबा, विशाळगड, राधानगरी परिसरातील चांगल्या सुविधा देणाऱ्या कृषीपर्यटन केंद्रे आणि हॉटेल्सना तरुणाई विशेष पसंती देत आहेत.

शहरातील हॉटेल्स, क्लबसह परिसरातील अनेक व्यावसायिकांनी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन पॅकेजची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसह भोजन व विविध प्रकारच्या कार्यक्रमाचा समावेश केला आहे. ग्रुप करून अशा कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. अनेक हॉटेलचालकांनी नेहमीच्या डायनिंग हॉलसोबत टेरेसवर ग्राहकांना पार्टी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही सोसायटीमधील ग्रुपनी सेलिब्रेशनचे आयोजन केले आहे. शहरासह शहराबाहेर मोठ-मोठे धाबे, हॉटेल्स संख्या वाढली आहे. निसर्गच्या सानिध्यात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अशा हॉटेल्समध्ये आगाऊ बुकिंग केले जात आहे. पन्हाळा, आंबा, विशाळगड, राधानगरी, तिलारी, गगनबावडा, भुदरगड, चांदोली, गिरोली, जोतिबा परिसरातील चांगल्या सुविधा देणाऱ्या कृषीपर्यटन केंद्रामध्येही थर्टी फर्स्टचे जल्लोषी स्वागत केले जाणार आहे.

कोल्हापूरमध्ये कृषीपर्यटन केंद्रासह नामांकित हॉटेल्समध्ये नववर्षाच्या मेजवान्या रंगत असल्या तरी, येथील तरुणाई शहराबाहेर आनंदोत्सव साजरा करण्याची प्रचंड हौस असते. त्यामुळे अनेकजणांनी कोकण, गोव्यासह केरळच्या सहलींचे नियोजन केले आहे. नववर्षाच्या स्वागताबरोबर वर्षापर्यटनाची सांगता करण्याचा बेत अनेकांना घातला आहे. त्याचबरोबर समाजभान जपणाऱ्या अनेक ग्रुपनी गडकोटांची स्वच्छता मोहीम व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या आनंदोत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे. मद्यतस्करी रोखण्याबरोबर ओपन बारवर त्यांची करडी नजर असणार आहे. निर्भया पथकही थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमिवर तैनात ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुंड्यासाठी पत्नीला मारहाण; पतीवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माहेरहून पाच लाख रुपये आणावेत यासाठी पत्नीचा छळ करून अमानुष मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यामध्ये पतीविरोधात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी विवाहिता स्मृती रॉय खिस्तोफर (वय ३०, रा. न्यू शाहूपुरी) यांनी पती रॉय विन्सेट खिस्तोफर (वय ३५, रा. शाहू मिल चौक, सध्या मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध तक्रार दिली. हुंड्यासाठी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लॅपटॉपच्या वायरने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मध्यप्रदेशमध्ये असताना स्मृती यांनी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत यासाठी रॉय याने २१ ऑक्टोबर ते २८ डिसेंबर, २०१९ या कालावधीत तगादा लावला होता. माहेरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या रॉय याने त्यांना सातत्याने शिवीगाळ करत मारहाण केली. अनेकवेळा त्याने लॅपटॉपच्या वायरनेही मारहाण केली. याबाबत कोठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही तो देत होता. सततच्या मारहाणीला व मानसिक त्रासाला कंटाळून अखेर स्मृती माहेरी गेल्या. त्यांच्या पाठोपाठ रॉयही कोल्हापुरात दाखल झाला. पत्नीला 'सासरी का येत नाही' अशी विचारणा करत कुटुंबीयांसमोरच मारहाण केली. तसेच 'मुलीला सतत माहेरी आणल्यास माझ्या जीवाचे बरे-वाईट करून घेणार', अशी धमकी सासऱ्यांना दिली. त्यानंतर स्मृती यांनी पतीविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामानंदनगरात युवकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रामानंदनगर येथील सलून व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकाश यशवंतराव माने (वय ४०) असे त्यांचे नाव आहे. रविवारी सकाळी घरी कोणीही नसताना त्यांनी नॉयलॉनची दोरी तुळईला बांधून गळफास लावून घेतला. त्यांना उपचारांसाठी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले, पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, सलून व्यावसायिक असलेल्या प्रकाश यांची पत्नी आपल्या मुलासह माहेरी गेल्या होत्या. शनिवारी रात्री ते जेवण करून नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत झोपण्यास गेले. रविवारी सकाळी दहा वाजता नातेवाईकांनी त्यांना बाहेरून हाका मारल्या. पण त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी प्रकाशने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात आई, मुलगा, पत्नी, तीन भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळा दहन, बससेवा बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीमावासीयावरील अन्यायाच्या विरोधात आणि कन्नड संघटनांविरोधात शिवसेनेतर्फे शहरात रविवारी निषेध फेरी काढण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मंडळी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेना व कन्नड रक्षक वेदिकेचा निषेध केला. मध्यवर्ती बसस्थानकनजीकच्या दाभोळकर चौक येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहनही केले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील एका थिएटरमधील कन्नड सिनेमाचे शो बंद पाडले. कोल्हापूर एसटी आगारातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत.

'सीमावासीयांच्या केसालाही धक्का लागला तरी शिवसेनेशी गाठ आहे.' असा इशाराही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनादरम्यान दिला. कर्नाटक नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे वादग्रस्त विधान केले होते. त्या पाठोपाठ कन्नड रक्षक वेदिके या संघटनेकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करण्याच्या प्रकारामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप होता. याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते रविवारी रस्त्यावर उतरले. खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, विजय देवणे, माजी आमदार सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, शिवाजीराव पाटील, महिला आघाडीच्या शुभांगी पोवार, स्मिता सावंत आदींच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती बसस्थानक चौक येथून फेरीला सुरुवात झाली.'कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, कन्नड रक्षक वेदिकेचा निषेध असो,'अशा घोषणा देत दाभोळकर चौकपर्यंत निषेध फेरी काढण्यात आली.

दाभोळकर चौक येथे प्रचंड घोषणाबाजीत कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी पुतळ्याला जोडे मार आंदोलन केले. शिवसेनेतर्फे पुकारलेल्या आंदोलनात मूळच्या कर्नाटकमधील व सध्या कोल्हापुरात वास्तव्यास असलेल्या महिलांनी सहभाग घेतला. आंदोलनात देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव, तालुकाप्रमुख विराज पाटील, राजू यादव, तानाजी आंग्रे, सतीश मलमे, युवा सेना विस्तारक हर्षल सुर्वे, जि. प. चे माजी सदस्य महेश चव्हाण, शशिकांत बीडकर, अवधूत साळोखे आदींचा समावेश होता. दाभोळकर चौक येथे आंदोलनादरम्यान काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलनादरम्यान पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून पोलिस प्रयत्नशील होते.

सीमावासीयांना त्रास देण्याचा प्रकार थांबला पाहिजे. सीमावासीयांच्या केसाला जरी धक्का लागला तरी शिवसेनेशी गाठ आहे, असे कन्नड रक्षक वेदिके आणि कर्नाटक नवनिर्माण सेनेने लक्षात ठेवावे. वादग्रस्त विधाने करणाऱ्यांना कर्नाटक सरकारने जेरबंद करावे. शिवसेना सीमाभागातील नागरिकांसोबत कायम आहे.

खासदार धैर्यशील माने

कन्नड सिनेमाचा शो बंद पाडला

निषेध फेरीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील कन्नड सिनेमाचा शो बंद पाडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे काही कार्यकर्ते अप्सरा टॉकीज येथे पोहचले. त्यांनी सिनेमाचा फलक उतरविण्यास व सिनेमा बंद ठेवण्याविषयी सांगितले. थिटएर व्यवस्थापनने दुपारी बाराचा शो बंद ठेवत प्रेक्षकांचे पैसे परत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात वृद्ध जखमी

$
0
0

कोल्हापूर: तासगाव मार्गावर झालेल्या अपघातात शिवाजी कृष्णा तडाके(वय ६० रा. मांगले, ता. शिराळा) जखमी झाले. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. त्यांना उपचारांसाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>