Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कुलगुरुंच्या राजीनाम्यासाठी ‘सुटा’चे उपोषण

$
0
0

फोटो अमित

कोल्हापूर टाइम्स टीम

'कुलगुरूंच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी झाली पाहिजे, विद्यापीठाच्या इतिवृत्तांमध्ये फेरफार करणाऱ्या प्राचार्यांना पुरस्कार देणाऱ्या कुलगुरुंचा धिक्कार असो'असा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे (सुटा) मंगळवारी आंदोलन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत लाक्षणिक उपोषण केले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडून विद्यापीठ कायदा धाब्यावर बसवत बेकायदेशीर कारभार सुरू आहे, त्यांनी कुलगुरुपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी 'सुटा'ने केली आहे.

' कुलगुरू शिंदे यांनी विद्यापीठाचा कारभार कायद्यानुसार व नियमांनुसार करावा यासाठी 'सुटा'तर्फे गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या कामकाजाशी निगडीत १२९ प्रमादांची लिखित यादी त्यांना कळविली आहे. मात्र त्यांच्या कारभारामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यांच्या कारभाराच्या विरोधात पुन्हा एकदा संघटनेतर्फे आंदोलन सुरू केल्याचे 'सुटा'चे सहकार्यवाह प्रा. सुभाष जाधव यांनी सांगितले. 'सुटा'चे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण पाटील, उपाध्यक्ष प्रा. भास्कर आवटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

'पदवीदान समारंभासाठी प्रमाणपत्राची दुबार छपाईचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. या दुबार छपाई प्रकरणामध्ये कुलगुरू शिंदे हेच दोषी असून त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारावी. विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीकडे प्राध्यापकांच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. जयसिंगपूर येथील जे. जे. मगदूम अभियांत्रिकी कॉलेजमधील प्राचार्यांची कायदा धाब्यावर बसवून सहयोगी अधिष्ठातापदी निवड केली आहे. त्यांना अधिष्ठातापदावरून हटवावे. सातारा जिल्ह्यातील मेढा येथील१८ वर्षे बंद झालेल्या कॉलेजला विद्यापीठ कायद्यातील तरतुदींना बगल देऊन संलग्नीकरणाचे नुतनीकरण दिले आहे.' अशा विविध तक्रारींचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाकडे देऊनही काही कार्यवाही झाली नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनात डॉ. डी. आर. भोसले, प्रा. एच. डी. पाटील, प्रा. पी. एस. कांबळे, प्रा. जालिंदर पाटील (सांगली), प्रा. शरदचंद्र खरात, प्रा. डॉ. आर. टी. पाटील (मिरज) आणि सातारा जिल्ह्यातील डॉ. डी. एस. काळे, डॉ. डी. बी. गायकवाड आदींनी सहभाग घेतला.

२१ जानेवारीला राजभवनसमोर धरणे

कुलगुरूंच्या कामकाजाविरोधात संघटनेतर्फे वेगवेगळ्या टप्प्यावर आंदोलन होणार आहे. येत्या सात जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवाजी विद्यापीठासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. तर २१ जानेवारीला राजभवन येथे दुपारी बारा ते सायंकाळी चार या वेळेत धरणे आंदोलन होणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चर्चबेलचा निनाद अन् शांती संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नाताळच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध चर्चमध्ये भक्तिमय व उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. ख्रिश्चन बांधवांचा घरातही तयारीला वेग आला असून फराळाचे पदार्थ, चॉकलेट, गोड पदार्थ बनवण्याचे नियोजन सुरू आहे. घरातल्या लहान मुलांसाठी खरेदीची, भेटवस्तू आणण्यासाठी लगबग सुरू आहे. शहरातील शतकोत्तर परंपरा लाभलेल्या जुन्या चर्चना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. चर्चमधील प्रशस्त भिंती, सुबक काम केलेल्या खिडक्या आणि पारंपरिक वस्तूंचा ठेवा लक्ष वेधून घेत आहे. चर्चबेलचा निनाद, गायली जाणारी सुमधुर कॅरल्स व शांती संदेश यामुळे भक्तिमय वातावरण तयार झाले आहे.

घराघरांतून लोक प्रभूजन्माच्या तयारीला लागले आहेत. घरातही देखावे साकारताना कुटुंबीयांकडून अधिकाधिक कल्पकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ख्रिस्त जन्माची कथा देखाव्याद्वारे समजावून सांगण्यावर अधिक भर दिला जात आहे. येशू बाळ, त्याची आई मेरी, वडील जोसेफ, गुरांचा गोठा, जवळपास असलेले गुराखी असा देखावा तयार करून लहानग्यांना ख्रिस्त जन्माची माहिती दिली जात आहे. देखावा साकारताना पर्यावरणपूरक व्हावा यासाठी अधिक प्रयत्न केले जात आहेत. सजावटीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यात येत आहे. खास पद्धतीने ख्रिसमस ट्रीची सजावट केली जात आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला आकर्षक गिफ्ट देण्यासाठी धावपळ सुरू आहे. पालकांनीही लहानग्यासाठी सांताक्लॉज बनून भेटवस्तू देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. याशिवाय गृह सजावटीला अत्यंत महत्त्व दिले जात असून झुरमुळ्या, सांताक्लॉजचे कटाउट लावण्यात येत आहेत. दिवसभरात विविध चर्चमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन केले गेले. यानिमित्ताने न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्च, नागाळा पार्क येथील ख्राईस्ट चर्च, रेसिडेन्सी क्लब येथील ऑल सेंट्स चर्च, होली क्रॉस चर्च, विक्रम नगर येथील चर्च व ब्रह्मपुरी येथील पवित्र उपासना मंदिरात प्रार्थना सभा घेण्यात आल्या.

...

सोशल मीडियावर शुभेच्छा

नाताळच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देण्याची लगबग सुरू असून सोशल मीडियावरील व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून वेगवेगळे शुभेच्छा संदेश पाठवले जात आहेत. यासाठी खास ईमोजी व स्टीकर तयार करण्यात आले आहेत. सांताक्लॉजची इमोजी सर्वाधिक फॉरवर्ड करण्यात येत आहे. इतर धर्मियांनी बंधूभाव जोपासत ख्रिश्चन मित्रांना शुभेच्छा देत नाताळ सणात सहभाग दर्शविला आहे.

...

आज होणारे कार्यक्रम

सकाळी ८ वा. इंग्रजी उपासना

सकाळी ९ वा. कळंबा कारागृह येथे ख्रिस्त जन्मोत्सव उपासना

सकाळी ९.४५ वा. मराठी उपासना

सकाळी ११.१५ वा. दुसरी मराठी उपासना

दुपारी १२.३० वा. तिसरी मराठी उपासना

सायं. ६ वा. सिटीचर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव उपासना

दुपारी २ ते रात्री १० वा. सुवार्ता प्रसार

सायं. ९ ते १२ गीते व भजन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्ल्स गुंतवणूकदार सुप्रीम कोर्टात जाणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सेबीकडे ऑनलाईन अर्ज करुनही ठेवीदारांची रक्कम परत मिळत नसल्याने अखिल भारतीय पर्ल्स गुंतवणूकदार संघटनेच्यावतीने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजर्षी शाहू स्मारक भवन येथील गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. पुढील बैठक पाच जानेवारी २०२० रोजी टाऊन हॉल उद्यानात होणार आहे.

गुंतवणूकदार संघटनेचे सचिव कॉ. शंकर पुजारी यांनी गुंतवणूकादारांची रक्कम परत मिळण्याबाबत कोणते प्रयत्न सुरू आहेत याची माहिती दिली. ऑनलाईन अर्ज केलेल्या ज्या गुंतवणूकदारांची अडीच हजारपेक्षा कमी रक्कम होती अशा चार लाख ७२ हजार गुंतवणूकदारांना परत रक्कम मिळाली आहे. परंतु त्यातील दोन कोटी गुंतवणूकदारांना रक्कम मिळालेली नाही. पाच हजारापर्यंत गुंतवणूक केलेल्या चार लाख ७७ गुंतवणूकदारांना रक्कम परत मिळाली आहे, असे सेबीने जाहीर केले आहे. ऑनलाईन अर्ज केलेल्या दोन कोटी गुंतवणूकदारांच्या अर्जात त्रुटी असल्याचे सेबीने जाहीर केले आहे. पण त्या कोणत्या त्रुटी आहेत हे सांगितलेले नाही. तसेच थेट सेबीकडे अर्ज केलेल्या गुंतवणुकदारांबाबतही कोणताही निर्णय घेतलेला नाही. पर्ल्स गुंतवणूकदारांची रक्कम परत देण्याबाबत अन्याय होत असल्याने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला.

सध्या सुप्रीम कोर्टात पर्ल्स कंपनीविरोधात सुनावणी सुरू असून संघटना या खटल्यात पक्षकार होणार आहे. त्यासाठी दिल्लीतील एका तज्ज्ञ वकिलांशी चर्चा सुरू आहे. टाऊन हॉल उद्यानात होणाऱ्या बैठकीत पुढील व्यूहरचना ठरणार आहे. मेळाव्याला सुभाष जगदाळे, शंकरराव आमने, डॉ. बाहुबली शेळके, मधुकर घोडके उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या सत्तेसाठी रणनिती

$
0
0

जि.प. लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राजकीय हालचाली वेगावल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी माजी आमदार महादेवराव महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत बैठक घेऊन भाजपचा अध्यक्ष करण्यासाठी रणनिती निश्चित केल्याचे वृत्त आहे. येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास या प्रमुख नेते मंडळीच्या बैठकीत भाजप व मित्र पक्ष आघाडीची सत्ता कायम राखण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच या नेते मंडळींवर विशेष जबाबदारी सोपविल्याचे वृत्त आहे.

सत्ताधारी भाजप आघाडीसोबतच्या सर्व सदस्यांना सहलीवर पाठविण्याचे नियोजन झाले आहे. दोन जानेवारी रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थतीमध्ये भाजपकडून जिल्हा परिषद ताब्यात घ्यायची यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जि.प.तील विविध घटकांशी त्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेला सोबत घेऊन राज्याप्रमाणे कोल्हापुरातही महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी जिल्हा परिषदेतील पक्षाची सत्ता राखणे हे प्रतिष्ठेचे बनले आहे. अडीच वर्षापूर्वीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. त्यांच्यासह जनसुराज्यचे नेते विनय कोरे व अन्य आघाडीच्या नेत्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्याची व्यूहरचना मंगळवारच्या बैठकीत आखण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी महाडिक, कोरे यांची संयुक्त बैठक घेत गेली अडीच वर्षे भाजपसोबत असलेल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन पुढील काळातही सत्ता कायम राखण्याचा निर्धार केला. दोन्ही काँग्रेसचे आव्हान रोखण्याचेही बैठकीत ठरले.

...

संघटनसह अन्य प्रश्नावरही चर्चा

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सकाळी साडेअकरा वाजता भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बांधणी व अन्य विषयासंदर्भात चर्चा केली. प्रदेश उपाध्यक्ष महाडिक, सरचिटणीस सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, भाजपचे महापालिकेतील गटनेते विजय सुर्यवंशी, नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे यांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष व महानगरअध्यक्ष निवडीबाबत जानेवारीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

........

कोट

'भाजप, जनसुराज्य शक्ती पक्ष व मित्र पक्षांची आघाडी जिल्हा परिषदेत कायम आहे. आगामी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष आघाडी बाजी मारणार आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत सध्याच्या स्थितीविषयी व निवडणुकीच्या संदर्भाने चर्चा झाली. सगळे घटक पक्ष सोबत आहेत.

धनंजय महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

....

राष्ट्रवादीच्या जीवन पाटील

यांचा आज मेळावा

राष्ट्रवादीचे सदस्य जीवन पाटील यांनी टिक्केवाडी येथे आज, बुधवारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी सदस्यांना व्हीप लागू केला. मात्र पाटील यांनी हा व्हीप स्वीकारला नाही. पाटील हे राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली होती.

....

शिवसेनेची बैठक लांबणीवर

शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जि.प.तील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या अनुषंगाने आज, बुधवारी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक होणार होती. मात्र संपर्कप्रमुख दुधवडकर यांचा बुधवारचा कोल्हापूर दौरा काही कारणास्तव पुढे गेला आहे. यामुळे शिवसेनेची बैठकही आणखी काही दिवस लांबणीवर पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल विक्री दुकानात कामगारांकडूनच डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोबाइल शॉपीमध्ये काम करणाऱ्या तीन कामगारांनी दुकान शिफ्टिंग करताना मोबाइल आणि रोख रक्कमेवर डल्ला मारला. त्यांच्याविरोधात मोबाइल, रोख रक्कम, अॅक्सेसिरीज असा दोन लाख ८० हजार रुपयांचा माल चोरल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मयूर रामचंद्र पाटील (रा. कनाननगर),संजय आनंद करपे (रा. कसबा बावडा) या दोघा संशयितांना अटक केली असून अक्षय संजय हवालदार (रा.नागाव, ता. हातकणंगले) हा पसार झाला आहे. सेलेक्ट गॅझेट एलएलपी शॉपीचे व्यवस्थापक वसिम आक्रम खान (रा. औरंगाबाद ) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, न्यू शाहूपुरीतील सेलेक्ट गॅझेट एलएलपी शॉपीमध्ये २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या काळात हा चोरीचा प्रकार घडला. शॉपीमध्ये मयूर पाटील, अक्षय हावलदार व संजय करपे हे तिघे कामगार म्हणून काम करत होते. कंपनीची नवीन शॉपी रंकाळा परिसरात सुरू करण्यात आली असून शिफ्टिंगचे काम सुरू असताना या तिघा कामगारांनी संगनमत करुन शॉपीतील मोबाइल विक्रीतून जमा झालेले एक लाख ३५ हजार रुपये, पाच मोबाइल आणि इतर अक्सेसिरीज असा सुमारे दोन लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या प्रकरणी एलएलपी कंपनीचे सेल्स मॅनेजर खान यांनी या तिघांविरोधात चोरीची फिर्याद दिली. मयूर पाटील व संजय करपे या दोघांना कोर्टात हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवतीच्या विनयभंगप्रकरणी तबलावादक अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नृत्य शिकण्यासाठी आलेल्या युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित शिरीष बंडोपंत कुलकर्णी (वय ५७, रा. आर. के. नगर) या तबला वादकाला जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. महाद्वार रोडवरील एक नृत्यकला मंदिरात ही घटना घडली.

जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले की, पीडित युवती संशयित कुलकर्णी यांच्या पत्नीकडे भारतनाट्यम् आणि कथ्थक नृत्य शिकते. या नृत्यशाळेत संशयित कुलकर्णी तबलजीचे काम करतो. कुलकर्णी यांची पत्नी परगावी गेल्याने तो नृत्य शिकवितो. पीडित युवती नृत्य शिकण्यास आली असता सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोणी घरात नसल्याचे पाहून तिला एकटीला थांबवून घेतले. त्यानंतर तिच्याशी लज्जा होईल, असे वर्तन केले. त्यानंतर पीडितेने नातलगांना याबाबत माहिती दिली. पीडितेने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात कुलकर्णी याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्याला अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुवर्णकार कारागीर संघासाठी २१ उमेदवार रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर बंगाली सुवर्णकार कारागीर संघांची निवडणूक १७ जानेवारी रोजी होणार आहे. संघाच्या १४ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. कारागीर संघाचे ९१९ सभासद आहेत. अध्यक्षपदासाठी दोन तर १२ संचालक पदांसाठी १९ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

गुजरी सराफ बाजार येथे कारागीर संघांची स्थापना झाली आहे. कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड हे या कारागीर संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कारागीर संघांची पदाधिकारी निवड १७ जानेवारीला होणार असून सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूक अधिकारी कांतिलाल ओसवाल, जवाहर गांधी, उमेश जामसांडेकर आणि कांतिलाल ओसवाल यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गेल्या आठवड्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आज, बुधवारपर्यंत आहे. याचदिवशी सायंकाळी साडेपाच वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. १८ जानेवारीला सकाळी आठ वाजता मतमोजणी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस आघाडीतील घडामोडी वेगावणार

$
0
0

कोल्हापूर

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे बुधवारी (ता. २५) कोल्हापुरात येणार आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या हालचाली वेगावण्याची शक्यता आहे. दोन्ही काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्यांना सहलीवर पाठविण्याचे नियोजन आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुक सदस्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शिवाय दोन्ही काँग्रेस व शिवसेना एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व काँग्रेस आघाडीचे नेते यांची दोन दिवसांत बैठक होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फास्टॅग नव्हे स्लोटॅग

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

टोल नाक्यांवरील प्रवास गतिमान करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सुरू केलेल्या फास्टॅग यंत्रणेला वाहनधारकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. एकूण वाहनांपैकी ३५ टक्के वाहनांनीही फास्टॅग घेतले नसल्याने टोल नाक्यांवर अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. फास्टॅग लेनवरही विनाफास्टॅग वाहनांचा शिरकाव होत असल्याने फास्टॅगच्या प्रवासाला अजूनही गती आलेली नाही.

टोल वसुलीत पारदर्शकता येण्यासह वाहनधारकांचा प्रवास गतिमान होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक केले आहे. १५ डिसेंबरपासून याची सर्वत्र अंमलबजावणी सुरू होणार होती. मात्र, एकूण वाहनांपैकी केवळ ३० टक्के वाहनधारकांनीच फास्टॅग घेतल्याने याला १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, सर्वच टोल नाक्यांवर फास्टॅग वाहनांसाठी स्वतंत्र लेनची अंमलबजावणी सुरू केली आहे. फास्टॅगसाठी एक किंवा दोन लेन राखीव ठेवल्या आहेत. मात्र, वाहनधारकांचे प्रबोधन नसल्याने अनेक विनाफास्टॅग वाहनधारक फास्टॅगच्या लेनमध्ये जातात. जादा टोल द्यावा लागणार याची माहिती ऐनवेळी मिळाल्यानंतर ते पुन्हा दुसऱ्या लेनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे फास्टॅग असलेल्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. फास्टॅग घेऊनही टोल नाक्यांवर थांबावे लागत असल्याने वाहनधारकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. फास्टॅगने प्रवास गतिमान होण्याऐवजी अडथळेच वाढल्याच्या भावना वाहनधारक व्यक्त करीत आहेत. फास्टॅगच्या अंमलबजावणीतही अनेक त्रुटी आहेत.

टोल नाक्यावर टॅग स्कॅन केल्यानंतर तातडीने रक्कम वजा झाल्याचा मेसेज वाहनधारकाच्या मोबाइलवर येणे गरजेचे आहे. अनेकदा काही किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर मेसेज येतो. टोलच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम वजा झाल्याच्याही तक्रारी आहेत. याबाबत टोल नाक्यावर विचारपूस केली असता, कोणतेही समर्पक उत्तर मिळत नाही. उलट टोल नाक्यांवरील कर्मचारी वाहनधारकांशी वाद घालतात, असे अनुभव आहेत. कोल्हापूर ते कराड मार्गावर प्रवास करताना किणी टोल नाक्यावर फास्टॅगद्वारे जादा रक्कम वसूल झाल्याचे प्रकार घडले आहेत. बँकेच्या खात्याशी फास्टॅगचे वॉलेट जोडले असल्याने बँक खात्याच्या सुरक्षेबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. फास्टॅग वापराबाबत पारदर्शकता आणि सुलभता न आल्यास फास्टॅग घेण्याचे प्रमाण वाढणार नाही, असे वाहनधारकांना वाटते.

तक्रारी करा १०३३ क्रमांकावर

फास्टॅगबाबत कोणतीही तक्रार असल्यास १०३३ हा टोल फ्री क्रमांक तक्रारींसाठी दिला आहे. वाहनधारकांनी टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रारी द्याव्यात. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या बेसबाइटवरही तक्रार कशी आणि कुठे करावी याची सविस्तर माहिती दिली आहे. वाहनधारकांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रारी द्याव्यात, असे आवाहन महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

किणी, तासवडेला रिटर्न सवलत मिळावी

फास्टॅग असलेल्या वाहनांना २४ तासात त्याच टोल नाक्यावरून परतीचा प्रवास केल्यास टोलच्या रकमेत ५० टक्के सवलतीची तरतूद केली आहे. किणी आणि तासवडे टोल नाक्यांवर मात्र रिटर्न टोलची सोय प्राधिकरणने दिलेली नाही. यामुळे फास्टॅग असले तरी २४ तासातील रिटर्न सवलतीचा फायदा या दोन टोल नाक्यांवर मिळत नाही. रिटर्नची सोय या दोन्ही टोल नाक्यांवर सुरू करावी, अशी आग्रही मागणी वाहनधारकांकडून सुरू आहे.

जास्तीतजास्त वाहनधारकांनी फास्टॅग घ्यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किणी, तासवडे टोल नाक्यांसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी फास्टॅग विक्री सुरू आहे. वाहनधारकांनी फास्टॅग घेऊन स्वत:चा प्रवास गतिमान करावा. फास्टॅग नसताना फास्टॅगच्या लेनमधून गेल्यास दुप्पट टोल आकारणी केली जात आहे. १५ जानेवारीपासून याची अंमलबजावणी आणखी काटेकोर होईल.

- बी. एस. साळुंखे, संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

- ग्राहकांकडून फास्टॅग घेऊन रिचार्ज नाही

- ग्राहकांमध्ये वापराविषयी प्रबोधनाची गरज

- १५ जानेवारीपासून होणार काटेकोर अंमलबजावणी

जिल्ह्यातील वाहन संख्या

१,२६,१३६

कार

२४,६६७

जिप, ओम्नी

२०,३६१

टेम्पो

१३७०

ट्रॅव्हल्स

१७२०

मिनीबस

९६७

टँकर

६५१

स्कूलबस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'राष्ट्रीयत्वा'वर हिंदू नपुंसक होतात : संभाजी भिडे

$
0
0

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जेव्हा राष्ट्रीयत्वाचा मुद्दा येतो, तेव्हा हिंदू समाज नपुंसक होऊन जातो, असं ते म्हणाले. शिवाय त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं (सीएए) समर्थनही केलं. मुस्लिमांकडून राष्ट्रीयत्वाची अपेक्षा करणं हा मूर्खपणा असल्याचंही ते म्हणाले. जगभरात सीएए कायदा आहे, मग भारतातच का नको? भारतीयांना जोडणाऱ्या या कायद्याबाबत विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत, असा आरोपही संभाजी भिडे यांनी केला.

संभाजी भिडे, एकबोटे यांना पुणे जिल्हाबंदी

‘जगभरातील १८७ देशांमध्ये सीएएसारखा कायदा अस्तित्वात आहे. मग भारतातच हा कायदा का चालत नाही? माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यापासून ते ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत सर्वांनी या कायद्याची मागणी केली होती. पण आता विरोध केला जात आहे. सीएएविषयी हिंदू जास्त उत्सुक दिसत नाहीत. जे मुस्लीम अगोदर हिंदू होते, तेच आता सीएएला विरोध करत आहेत. भारतीय आत्मकेंद्रित आहेत. देशाचं हित त्यांच्या लक्षात येत नाही. हा कायदा आपल्या देशासाठी अत्यंत योग्य आहे’, असं ते म्हणाले.

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन काही लोक या कायद्याविरोधात संभ्रम निर्माण करत आहेत. हा विरोध स्वार्थासाठी आहे. सध्याच्या घडीला स्वतःला जी लोक शिक्षित म्हणवून घेतात, तेच या कायद्याला विरोध करत आहेत. मुस्लीम समाजही आपल्या देशाचा नागरिक आहे. मात्र त्यांच्यातही राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे. मुळात हिंदूंमध्येच राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे, तर मुस्लिमांकडून काय अपेक्षा ठेवायची?’ असंही ते म्हणाले.

नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही: संभाजी भिडे

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आहेत, असं वक्तव्य नुकतंच संभाजी भिडे यांनी केलं होतं. ‘या कायद्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येक भारतीयाला आनंद झाला पाहिजे. पण आपला देश माणसांचा असला तरी देशभक्तांचा नाही हे दुर्दैवं आहे. स्वार्थ हाच धर्म असणारे लोक कायद्याला विरोध करत आहेत’, असं म्हणत त्यांनी भाष्य केलं होतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. दाभोळे यांच्या पुस्तकाला पुरस्कार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. ज.रा. दाभोळे यांच्या 'प्रतीत्यसमुत्पाद' या पुस्तकाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा 'डॉ. सूर्यकांत घुगरे ग्रंथ पुरस्कार' नुकताच प्रदान करण्यात आला. डॉ. दाभोळे यांनी 'प्रतीत्यसमुत्पाद' या बौद्ध तत्त्वज्ञानातील सिद्धांताबद्दल संशोधनपर ग्रंथ लिहीला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या ३६ व्या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. डॉ. दाभोळे या समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे तत्त्वज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सुधीर पिटके यांनी डॉ. दाभोळे यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी येऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. रोख २५०० रुपये, प्रशस्तिपत्रक, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायदंडाधिकारीपदी महाडिक

$
0
0

कोल्हापूर: राज्य लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदासाठीच्या परीक्षेत सांगली जिल्ह्यातील इटकरे येथील मधुसूदन दिनकर महाडिक यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. इटकरेसारख्या ग्रामीण भागात राहून, कोणत्याही खासगी क्लासची शिकवणी न लावता त्यांनी या परीक्षेत बाजी मारली. महाडिक यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिराळा तालुक्यातील वारणावती येथे झाले. येथील विवेकानंद कॉलेजमध्ये त्यांनी इंग्रजी विषयातून पदवी तर शहाजी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली.

पदवी शिक्षणादरम्यान ते येथील सारस्वत विद्यार्थी वसतिगृह येथे राहावयास होते. कायद्याची पदवी व मुंबई गोवा बार असोसिएशनची सनद प्राप्त केल्यानंतर सध्या ते इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करत आहेत. कॉलेज जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू होती. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीपदासाठी एप्रिल २०१९ मध्ये पूर्वपरीक्षा तर सप्टेंबर २०१९ मध्ये मुख्य परीक्षा झाली होती. नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात मुलाखत झाली. २१ डिसेंबर रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महाडिक यांनी यश मिळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीत सत्तापरिवर्तन निश्चित

$
0
0

जि.प लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्हा परिषदेच्या राजकारणातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांची कधीच एक्झीट झाली आहे, तेव्हा एक्झीट झालेल्यांची पुन्हा एंट्री कशी होईल,'अशी जोरदार टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केली. 'राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेची मिळून महाविकास आघाडीची सत्ता येईल. जिल्हा परिषदेत नक्कीच सत्तापरिवर्तन होईल' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमदार पाटील यांनी बुधवारी सर्किट हाऊस येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांसोबत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबत चर्चा केली. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन्ही काँग्रेसचे मिळून १९ सदस्य सहलीवर रवाना झाले. काही सदस्य गोवा तर काही जण म्हैसूरची सफर करणार आहेत. राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसच्या सदस्यांनाही व्हीप लागू केला आहे. यासंदर्भात आमदार पाटील म्हणाले, 'गेल्या वेळी काही सदस्यांनी व्हीप डावलला. आता मात्र काँग्रेस आघाडीचा कोणताही सदस्य व्हीप डावलणार नाही. सगळे सदस्य आघाडीसोबत असतील. पक्षाच्या विरोधात कोणी जाणार नाही.'

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी दोन जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. जि.प.मधील सत्ता वर्चस्ववादावरुन सत्ताधारी भाजप व मित्रपक्ष आघाडी व विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काँटे की टक्कर पाहावयास मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी माजी आमदार महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे, माजी खासदार धनंजय महाडिक, प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांच्यासोबत चर्चा करुन जि.प. तील भाजप आघाडीची सत्ता कायम ठेवण्यासाठी व्यूहरचना आखली. भाजपला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी दोन्ही काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत. आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांची बैठक घेतली. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबत सदस्यांशी व्यक्तीगत चर्चा केली.

बैठकीनंतर आमदार पाटील म्हणाले, 'सध्या काँग्रेस आघाडीकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ आहे. गेल्यावेळी थोडक्यात सत्ता हातातून निसटली. आता काँग्रेस, राष्ट्रवादी , शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच अपक्ष या सर्वांना एकत्र आणून जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करु. जिल्हा परिषदेत नक्कीच बदल घडेल.'

.......

स्वाभिमानी संघटना

काँग्रेस आघाडीसोबत

जि.प.मध्ये गेली अडीच वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्ताधारी भाजप आघाडीसोबत आहे. सत्तेच्या फॉर्म्युलानुसार स्वाभिमानीने सव्वा वर्षे महिला व बालकल्याण समिती सभापतिपद भूषविले. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीपासून स्वाभिमानी आणि भाजपातील अंतर वाढले आहे. स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी सध्या काँग्रेस आघाडीसोबत आहेत. जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीत स्वाभिमानीने काँग्रेस आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. सदस्या पद्माराणी पाटील यांचे पती राजेश व सदस्या शुभांगी शिंदे यांचे पती रामचंद शिंदे यांनी सर्किट हाऊस येथे आमदार पाटील यांची भेट घेतली. स्वाभिमानीला पद देण्याविषयी मागणी केली. याप्रसंगी आमदार पाटील यांनी स्वाभिमानीचे नेते शेट्टी यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेऊ'असे सांगितले. अपक्ष सदस्या रसिका पाटील यांचे पती अमर हे आघाडीसोबत आहेत.

....

आवाडेंना साथ देण्याचे आवाहन

सतेज पाटील म्हणाले, 'राज्याप्रमाणे जि.प.तही महाविकास आघाडीची सत्ता येईल. सध्या भाजपसोबत जे शिवसेना सदस्य आहेत ते नक्कीच काँग्रेस आघाडीसोबत राहतील. शिवसेनेचे सदस्य वेगळी भूमिका घेणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे गुरुवारी (ता.२६) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. महाविकास आघाडीला पाठिंब्याबाबतचा निर्णय होईल. जि.प.त विविध घटक पक्ष आमच्यासोबत आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांच्या गटानेही साथ द्यावी.'

.............

सदस्य सहलीवर, कारभारी कोल्हापुरात

काँग्रेसचे १४ तर राष्ट्रवादीचे ११ सदस्य आहेत. एका अपक्ष सदस्यासह संख्या २६ पर्यंत पोहचते. बुधवारी दुपारी सुमारे १९ सदस्य सहलीवर रवाना झाले. दोन्ही काँग्रेसचे सगळे सदस्य एकसंध असल्याचा दावा आघाडीतर्फे करण्यात आला. माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सदस्य उमेश आपटे, सतीश पाटील, अमर पाटील हे कोल्हापुरात असून नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार सूत्रे हलवित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसूती गुंतागुंतीची वाढती समस्या

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर

स्त्री पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी वैद्यकीय उपचारात स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला जातो. जिल्ह्यातील गर्भवती स्त्रियांच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून प्रसूतीवेळी गुंतागुंत निर्माण होण्याच्या प्रकारांत वाढ होत आहे. त्यामुळे स्त्रीसह बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यंदा एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत ५.९ टक्के महिलांमध्ये प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण झाली होती. तर मागील वर्षी हे प्रमाण २.६ टक्के एवढे होते. तर ४९.१ टक्के महिलांना प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासली होती.

कुटुंबात गर्भवती स्त्रीच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने गर्भारपणात स्त्रियांना समस्यांना सामोरे जावे लागते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील महिलांच्या आहाराकडे दुर्लक्ष होते. नैसर्गिक पद्धतीने बाळाचा जन्म झाल्यास त्याला नॉर्मल डिलिव्हरी म्हटले जाते. सद्यस्थितीत जिल्ह्यात नॉर्मल प्रसूती होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून गुंतागुंत वाढल्यामुळे सिझेरियनचेही प्रमाण वाढत आहे. त्याचा आईच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता उदभवते. प्रसूतीवेळी अतिरक्तस्त्राव झाल्याने जीव गमवावा लागणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. आजही जिल्ह्यातील दुर्गम वाड्यावस्त्यांवर महिलांना प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागते. प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर मुख्य रस्त्यापर्यंत पोहचायला वेळ लागतो अशी परिस्थिती जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात आरोग्यविषयक प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव असल्याने सुरक्षित मातृत्वापासून जिल्ह्यातील गर्भवती महिला वंचित असल्याचे दिसून येते. गर्भधारणेच्या काळात स्त्रीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. मात्र, गरोदर मातांच्या अशक्तपणामुळे दरवर्षी शेकडो मृत बाळांचा जन्म होतो. आईच्या कुपोषणामुळे बऱ्याचदा बाळाला संसर्ग होतो, अपंगत्व येते. मात्र, इतकी भयावह परिस्थिती असतानाही सुरक्षित मातृत्वासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात सरकारी यंत्रणा कमी पडत आहेत.

सुरक्षित मातृत्वाच्या त्रिसूत्रीबद्दल स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. करिष्मा गोरे सांगतात, 'निरोगी प्रजननासाठी सुरक्षित मातृत्व महत्त्वाचा घटक ठरणार आहे. यासाठी आईच्या शारीरिक क्षमतेकडे लक्ष दिले जावे. याची सुरुवात गर्भधारणेपूर्वी व्हायला हवी. कुटुंबीयांनी मातेच्या आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. मातेचे पोषण, तिची जीवनशैली आणि बाळ जन्मापूर्वी घेतलेली योग्य काळजी सुरक्षित मातृत्वासाठी महत्त्वाची ठरते. बदलत्या जीवनशैलीत कुटुंबीयांनी गर्भवती स्त्रीच्या संपूर्ण आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.'

...

कोट

'गर्भधारणेआधीपासून महिलांनी निसर्गनियमानुसार आहार घ्यावा. जंकफूड व व्यसने टाळावीत. गरोदर महिलांमध्ये शारीरिक कष्टाचा अभाव असतो. त्यामुळे योग्य तो व्यायाम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा. वाढत्या वजनामुळे गर्भवती महिलांना उच्च रक्तदाबाच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी शारीरिक क्षमता पाहूनच मातृत्वाचा निर्णय घ्यावा. तसेच वेळोवेळी योग्य त्या तपासण्या कराव्यात.

डॉ. उज्वला पत्की, स्त्री रोग तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहर परीट समाज व कोल्हापूर महानगरपालिका यांच्यावतीने संत गाडगेबाबा यांच्या ६३ व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (ता.२९) स्वच्छता अभियान, कापडी पिशव्यांचे वाटप आणि नागरिकांना झुणका भाकर प्रसाद वितरण असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष प्रकाश भालकर व उपाध्यक्ष संदीप भालकर यांनी दिली.

अंबाबाई मंदिरनजीकच्य श्री संत गाडगे महाराज चौक येथे सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या वेळेत कार्यक्रम होणार आहे. महापौर सूरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते आणि आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यानंतर पुतळा परिसरात स्वच्छता व जनजागृती मोहिम काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. पर्यावरण संवर्धनाची हाक देत १००० कापडी पिशव्यांचे वाटप होणार आहे. कार्यक्रमाला माजी महापौर बाबू फरास, नगरसेविका सविता भालकर, नगरसेवक ईश्वर परमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.'

संचालक सविता भालकर म्हणाल्या, 'संघटनेतर्फे समाजातील गरीब व हुशार मुलांना शैक्षणिक मदत केली जाते. महापुराच्या आपत्तीप्रसंगी १०० हून अधिक पूरग्रस्तांना एक महिना पुरेल इतके अन्नधान्य दिले.' पत्रकार परिषदेला संचालक वसंतराव वठारकर, गजानन लिंगम, दशरथ लोखंडे, सीमा निकम, कीर्ती शिंदे, रंजना भोसले,उमेश बुधले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाताळच्या सुट्ट्यांमुळेपंढरीत चार लाख पर्यटक

$
0
0

नाताळच्या सुट्ट्यांमुळे

पंढरीत चार लाख पर्यटक

पंढरपूर

नाताळाच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये मोठी गर्दी झाली आहे. या दहा दिवसांत मंदिर समितीने ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केल्याने देशभरातून आलेल्या पर्यटकांना विठूरायाच्या सुखकर दर्शनाचा आनंद घेता येत आहे. नाताळाच्या सुट्ट्यांमध्ये ८ ते १० दिवस पंढरपूरमध्ये दरवर्षी गर्दी होत असते.

दरम्यान गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने गोपाळपूरपर्यंत तात्पुरती दर्शन रांग उभी केली आहे. या दर्शन रांगेत भाविकांना पिण्याच्या पाण्यासह सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या सुट्ट्यात येणारे बहुतांश पर्यटक शहरी भागातून येतात. सध्याच्या प्रचंड गर्दीमुळे दहा दिवस ऑनलाइन दर्शन सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. या सोबत दर्शनासाठी घुसखोरी करणाऱ्या तथाकथित व्हीआयपींना देखील रांगेतून दर्शन घ्यावे लागत असल्याने पर्यटकातून समाधान व्यक्त होत आहे.

पंढरपुरात यात्रे सारखी गर्दी झाली आहे. पंजाब, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातसह देशाच्या विविध भागांतून जवळपास ४ लाख पर्यटक दाखल झाले आहेत. उद्या सूर्यग्रहण असल्याने विठूरायाच्या नित्योपचारात बदल झाले असले तरी याचा पर्यटकांच्या संख्येवर कोणताही परिणाम झालेला नाही. सध्या विठ्ठल दर्शनाची रांग थेट चंद्रभागा घाटापर्यंत पोचली असून, देवाच्या पायावरील दर्शनाला ५ ते ६ तासांचा वेळ लागत आहे. शहरात प्रशासनाने उभारलेले सर्व वाहनतळ वाहनांनी भरून गेले आहेत. अशीच अवस्था शहरातील हॉटेल आणि लॉजमध्ये झाली आहे.

पोलिसांना 'मर्दानी २' चे सरप्राईज

गर्दीच्या काळात पोलिस सर्वाधिक ताणवाखाली असतात. बारा महिने विविध प्रकारचे बंदोबस्त आणि वेळीअवेळी ड्युट्या बजावताना त्याचे व त्याच्या कुटुंबाचे मानसिक संतुलन हरवून गेलेले असते. यातच तो पंढरपूरमध्ये सेवेत असेल तर कामाचा ताण अतिरिक्त ताण त्याला सहन करावा लागतो. चार यात्रा, वर्षभर येणारे बेसुमार व्हीआयपी आणि विठूरायामुळे विविध संघटनांचे येथे होत असलेले मेळावे, आंदोलन यामुळे या कर्मचाऱ्याला मान वर करायला फुरसत नसते. पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी बुधवारी चक्क पोलिस कर्मचाऱ्यांना सरप्राईज दिले. पोलिस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताची ड्युटी देण्याऐवजी 'मर्दानी २' या पोलिसांच्या जीवनावरील आधारित चित्रपटाची तिकिटे दिली. कर्मचाऱ्यांना हा सुखद धक्का होता. पोलिसांच्या या खास शो साठी चित्रपटगृहाच्या मालकाने ही सर्व सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे यांच्याकडून मातृत्वाचा घोर अपमान

$
0
0

वक्तव्यावरून महिला वर्गातून संतप्त प्रतिक्रिया

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महिलांबाबत काढलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन महिलावर्गाने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. भिडे यांच्या 'वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते' या विधानावरुन समाजातील सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भिडे यांच्याकडून मातृत्वाचा घोर अपमान झाला असून त्याचा जाहीर निषेध करत असल्याच्या भावना महिला प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशाराही संघटनांनी दिला आहे. विविध पक्ष, सामाजिक संघटनांनी त्या वादग्रस्त विधानावरुन भिडे यांचा शेलक्या शब्दात उद्धारही केला. सोशल मीडियाने त्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. 'महिलांविषयी अपशब्द वापरताना शरम कशी वाटली नाही' अशा शब्दांत खडेबोलही सुनावले.

.........

कोट

' भिडे यांची मानसिकता पुरुषसत्ताक प्रवृत्तीची असल्याचे यावरुन दिसून येते. एका बाजूला ते स्त्रियांचा, स्त्रीत्वाचा अपमान करतात आणि दुसऱ्या बाजूला भाजप सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन करण्यासाठी हीच पुरुषसत्ताक प्रवृत्ती हिंदू समाजाला चेथावणी देण्यासाठी वापरतात. या प्रकाराचा मी तीव्र निषेध करत आहे. त्यांना स्त्रीत्व, पुरुषत्व आणि माणुसकी या संकल्पना शिकण्याची गरज आहे. भिडे यांनी महिलांविषयक अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल आणि समाजात वेगवेगळ्या जातीधर्मात विद्वेष पसरवणारी विधाने केल्याबद्दल सरकारने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा.'

डॉ. मेघा पानसरे, सामाजिक कार्यकर्त्या

....

'देशामध्ये सध्या बेरोजगोरी, आर्थिक मंदी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, सामाजिक सुव्यवस्थेचे सगळे प्रश्न आ वासून उभे आहेत. या सगळ्या प्रश्नांपासून समाजाचे लक्ष विचलित करण्यासाठी असल्या अतिशहाण्यांना बाहुले करुन नाचविले जाते. त्यामुळे अशा वाचाळ प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करणे हेच शहाणपणाचे लक्षण ठरेल.'

सीमा पाटील,अंधश्रद्धा निर्मूलन समिती

....

काँग्रेसच्या कार्यकर्त्या चंदा बेलेकर म्हणाल्या, 'भिडे यांचे वक्तव्य हे अतिशय चुकीचे आहे. वास्तविक प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्व असते. आई झाली म्हणजे माता असते असे काही नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तर प्रत्येक महिलेचा आदर करण्याची, परस्त्रीला मातेसमान मानण्याचे आदर्शवत उदाहरण घालून दिले आहे.' मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलेजा भोसले म्हणाल्या, ' भिडे यांनी एका आईचा, मातृत्वाचा अपमान केला आहे. असे वक्तव्य करताना त्यांना शरम कशी वाटली नाही? ते कोणत्या युगात वावरत आहेत. त्यांच्या विधानाचा समस्त महिला वर्गाकडून निषेध करत आहोत.'

ताराराणी महिला बचत गटाच्या संजीवनी चौगुले यांनी 'भिडे यांनी आपल्या वयाचा विचार करावा. महिला वर्गाविषयी, स्त्रीत्वाविषयी अशी चुकीची विधाने त्यांना शोभत नाहीत. मुळात आई होणे हे महिलाइतकेच पुरुषांवरही अवलंबून असते. भिडे यांचे वक्तत्व लाजिरवाणे आहे.' 'साद' पालक संघटनेच्या अध्यक्षा संगीता राणे यांनी म्हणाल्या, 'जेव्हा मुलगी जन्मते तेव्हा तिच्यामध्ये आपसूकच मातृत्व आलेले असते. तिच्यामध्ये आईसारखे प्रेम, जिव्हाळा, ममता ओतप्रोत भरलेली असते. असे असताना ती आई न होणे असे म्हणणे अतिशय निंदनीय आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.'

डॉ. विद्या साळोखे म्हणाल्या,'भिडे यांनी महिलावर्गाबद्दल काढलेले वक्तव्य हे मानवी मूल्यांचे अवमूल्यन करणारे आहे. समाजातील काही लोक अजूनही मध्ययुगीय कालखंडातील बुरसटलेल्या विचारांचे वाहक आहेत हे सिद्ध होते. त्यांच्या विधानाचा मी निषेध करते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरबाधित २३ हजार हेक्टरवरील ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : महापूर आलेल्या शेतातील ऊस प्राधान्याने तोडण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला होता. मात्र या आदेशाकडे कारखानदारांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी पूरबाधीत २७ हजार ६६१ हेक्टरपैकी केवळ ४ हजार ३०७ हेक्टर उसाचेच गाळप झाले आहे. उर्वरित २३ हजार ३५४ हेक्टरवरील (५७ हजार पाचशे एकर) तोडणीच झालेली नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. ऊस पुराच्या पाण्यात बुडाल्याने उत्पादन घटले आहेत. त्यातून वाचलेला ऊसही कारखानदार लवकर नेत नसल्याने हाती काहीच लागणार नाही, अशी भीती या शेतकऱ्यांमध्ये आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत १५ जानेवारीपर्यंत पूरबाधीत सर्व उसाचे गाळप न करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

महापुरात ऊस बुडाल्याने प्रचंड नुकसान झाले. तो लवकर गाळप न झाल्यास संबंधित शेतकऱ्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हंगाम सुरू झाल्यानंतर सर्व कारखान्यांना कार्यक्षेत्रातील ऊसतोड करताना पूरबाधीत भागातील ७० टक्के आणि उर्वरित ३० टक्के ऊसतोड करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी कारखानदारांकडून होत नसल्याचे दिसत आहे. दत्त-शिरोळ, जवाहर, गुरूदत्त या तीनच कारखान्यांनी ७०-३० चे सूत्र पाळले आहे. उर्वरित सर्व कारखानदार या उसाची रिकव्हरी कमी येत असल्याचे कारण पुढे करून त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

ऊस गाळपासाठी पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना कारखाना व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या हातापाया पडावे लागत आहे. हा ऊस तातडीने गाळप न झाल्यास वजनात घट येणार आहे. उशीर झाल्यास ऊस आणखी पोकळ होऊन उताऱ्यावरही परिणाम होणार आहे. साहजिकच शेतकऱ्याला त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भरच पडणार आहे. कारखानदारांकडून दुर्लक्ष झालेले असताना तोडणी कामगारही बुडालेला ऊस तोडण्यासाठी मनमानी पद्धतीने पैसे मागतात. निसर्गाच्या तडाख्याने कोलमडून पडलेल्या या शेतकऱ्याला कुणी वालीच नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

त्याला दिलासा देण्यासाठी पुरातील उसाची तोड तातडीने करा ही मागणी ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा. एन. डी. पाटील आणि माजी आमदार उल्हास पाटील हे सद्यस्थितीत करताना दिसत आहे. उर्वरित लोकप्रतिनिधी, कारखानदार आमदार सोयीस्करपणे पूरग्रस्त ऊस उत्पादकांच्या वेदना बेदखल करीत असल्याचे उघड झाले आहे.

.. ..

कारखान्यांवर कारवाई

कोणत्या कारखान्यांनी महापुरातील किती ऊसतोड केली, याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाने घेतली. मात्र वेळोवेळी संपर्क साधूनही कोरे (वारणानगर), दौलत, इको केन (चंदगड), आजरा कारखान्यांनी माहितीच दिली नाही. प्रशासनालाही हे कारखाने दाद देत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. या तीनसह आणखी काही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाच्या बैठकीकडेही पाठ फिरवली. त्याची गंभीर नोंद जिल्हाधिकारी देसाई यांनी घेतली आहे. त्यांना कारवाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

.. .. .. ..

साखर कारखाने पूरबाधीत ऊस प्राधान्याने तोडत नाहीत हे वास्तव आहे. संबंधित शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तक्रार करावी. त्या कारखान्यांविरोधात संघटना तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

.... ... ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू महोत्सव भव्य स्वरुपात साजरा करणार

$
0
0

.............

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे तीन ते सहा जानेवारी या कालावधीत आयोजित राजर्षी शाहू महोत्सव भव्य स्वरुपात आयोजित करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली येथील शाहू स्मारक भवन येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक झाली.

मुळीक म्हणाले, 'सामाजिक, विधायक स्वरुपाची जोड देऊन शाहूमय वातावरणात महोत्सव पार पाडू. या महोत्सवात समाजातील वेगवेगळ्या घटकांना सामावून घेऊ. हा महोत्सव कोल्हापूरला साजेशा पद्धतीने करू. समाजाला दिशा देणारा हा महोत्सव ठरेल. ' चंद्रकांत चव्हाण यांनी महोत्सव कालावधीत कवी संमेलन घेण्याची सूचना केली. शैलजा भोसले यांनी महोत्सवात महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी सी. एम. गायकवाड, प्रकाश पाटील, दिलीप सासने, संजय जाधव, नीता लाड यांनी मनोगत व्यक्त केले. महोत्सव कालावधीत शाहिरी, मर्दानी खेळ, युवा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कलास्पर्धा, पाककला, वेशभूषा स्पर्धाही होणार आहेत. चर्चेत अवधूत पाटील, स्वप्नील जाधव, अमित आडसुळे, एकनाथ जगदाळे, अजित चव्हाण, केदार गायकवाड, ऋतुराज माने आदींनी सहभाग घेतला. शशिकांत पाटील यांनी महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. हा महोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित करू असे सांगितले. उत्तम जाधव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिक्रिया

$
0
0

'संभाजी भिडे यांचे विधान पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. स्त्रीला मुले न होण्यामागे अनेकदा पुरुष जबाबदार असतात. यामुळे महिलांबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणे अतिशय चुकीचे आहे. हा समस्त स्त्री वर्गाचा अपमान आहे. एकीकडे महिलांना देवीचे स्थान द्यायचे आणि दुसरीकडे त्यांना अपमानास्पद वागणूक द्यायची हे कुठल्या संस्कृतीचे द्योतक आहे ? त्यांनी आपले विधान मागे घ्यावे.

अनुराधा भोसले, अध्यक्षा, 'एकटी' संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images