Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘शेतकरी संघाच्या संचालकांवर फौजदारी करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी संघाच्या संचालक मंडळाने भाड्याने घेतलेल्या जागा मूळ मालकांना परत करून संघाचे मोठे आर्थिकनुकसान केले आहे. जागा सोडण्यात गैरव्यवहार झाले असून दोषी संचालक मंडळ बरखास्त करुन संबधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी संचालक सुरेश देसाई आणि सुनील पाटील यांनी केली जिल्हा उपनिबंधकांकडे आहे.

निवेदनात म्हटले आहे , संघाने सभासद, शेतकरी आणि ग्राहकांच्या सोयीसाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावर जागा घेतल्या आहेत. या जागा संघाच्या ताब्यात असताना काही संचालकांनी मूळ जागा मालकाबरोबर आर्थिक हितसंबध जोडून मोक्याच्या जागा परत केल्या आहेत. मलकापूर येथील मोक्याची जागा विकसित करून संघाच्या ताब्यात देण्याचा करार होता. पण ती जागा मूळ मालकाला परत केली आहे. लक्ष्मीपुरी जागेबाबत मूळ मालक आणि शेतकरी संघामध्ये दिवाणी कोर्टात खटल्याचा निकाल संघाच्या बाजूला लागला आहे. संघाचा कूळ हक्क कायम ठेऊन ती जागा संघाला दिली आहे. तरीही ही जागा आर्थिक हित साधून परत मालकाला दिली आहे.

कणेरीवाडी येथील जागा संघाच्या स्वमालकीची आहे. ही जागा भाड्याने दिली असून भाडेकरूने कायमस्वरुपी बांधकाम केले आहे. राजारामपुरी सहाव्या गल्लीतील बसस्टॉपजवळील जागा ६० वर्षांच्या भाडेतत्वावर संघाच्या ताब्यात आहे. पण ही जागाही मूळ मालकाला परत केली आहे. मूळ मालक ही जागा विकसित करणार आहे. जागा सोडताना दुकानगाळ्याएवढी जागा संघाला घेण्याचा करार करण्याची गरज असताना मूळ मालकास फायदा होण्यासाठी संचालक मंडळाने ठराव केला आहे. हा ठराव रद्द करता येतो. संघाने ठराव रद्द न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फडणवीसांच्या गाठीभेटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रविवारी सायंकाळी एका विवाहसोहळ्याच्या निमित्ताने कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही त्यांच्याशी चर्चा केली. राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व आमदार विनय कोरे यांनी भेट घेतली.

फडणवीस हे पुण्याहून रात्री कोल्हापुरात पोहचले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, मकरंद देशपांडे आदींनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर फडणवीस हे एका विवाहसोहळ्याला उपस्थित राहिले. रात्री सव्वानऊनंतर त्यांचे शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. त्यावेळी खासदार संभाजीराजे, सांगलीचे खासदार संजय पाटील, माजी आमदार अमल महाडिक, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदींनी त्यांची भेट घेतली. दरम्यान प्रदेशाध्यक्ष पाटील आणि सांगलीचे खासदार संजय पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली.

शाहू कारखान्याचे चेअरमन समरजित घाटगे यांनीही स्वागत केले. भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विश्रामगृहावर गर्दी केली होती. फडणवीस यांनी काही वेळ पदाधिकाऱ्यांसोबत गप्पा मारल्या. जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, नगरसेवक विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, विजय खाडे, सांगलीचे विठ्ठल पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

जनसुराज्य भाजपसोबतच

फडणवीस आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांच्यात अँटी चेंबरमध्ये चर्चा झाली. यासंदर्भात विचारणा केल्यावर कोरे म्हणाले, 'राज्यातील विविध प्रश्न आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भातील स्थिती यासंदर्भात चर्चा झाली. ही औपचारिक भेट होती, जिल्ह्यातील राजकीय स्थितीविषयी कोणतीही चर्चा झाली नाही. जनसुराज्य शक्ती पक्ष हा सध्या भाजपसोबत आहे. जिल्हा परिषदेत आम्ही पाच वर्षे त्यांच्यासोबत आहेत. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही जनसुराज्य शक्ती पक्ष हा भाजपसोबतच राहील.'

स्थानिक नेत्यासोबत चर्चा

सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्हा परिषदेत भाजप आघाडीची सत्ता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप आघाडीची सत्ता कायम ठेवण्यासंदर्भात त्यांनी स्थानिक नेत्यासोबत चर्चा केल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात भूकंपाचे धक्के, कोणतीही हानी नाही

0
0

सातारा: सातारा जिल्ह्यात कोयना परिसरात आज सकाळी ६ वाजून ४३ मिनिटांच्या सुमाराला सुमाराला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी होती. कायना परिसरासह हे धक्के कोकण किनारपट्टी परिसरातही जाणवले. कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवायला सुरुवात झाल्याबरोबर लोक तातडीने प्रसंगावधान राखत घराबाहेर आले. त्यानंतर बराच काळ लोक रस्त्यांवर उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या पूर्वी २० जून रोजी सकाळी ७.४७ मिनिटांनी सातापा भूकंपाने हादरला होता. त्यावेळी कंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ एवढी नोंदली गेली, अशी माहिती जिल्हा हवामान विभागाने दिली होती. यात कोणतीही जीवित व वित्त हानी झालेली नव्हती.

शिवाय, २० डिसेंबर या दिवशी दिल्ली-एनआरसीसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के बसले. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हरयाणा, पंजाब, काश्मीर आणि दिल्ली एनआरसीसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता होती ६.८ रिश्टर स्केल. भूकंपाचा केंद्रबिंदू होता अफगाणिस्तानातीलह हिंदकुश हा भाग.

Live झारखंड निकाल: भाजप-झामुमोमध्ये जोरदार चुरस


२० डिसेंबरच्या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंदकुश

भूकंपाबाबत सूत्रांनी दिलेली माहितीनुसार २० डिसेंबर या दिवशी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगानिस्‍तानातील हिंदुकुशमध्ये होता. या भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. २० डिसेंबरला झालेल्या भूकंपामध्ये दिल्ली-एनसीआर, जम्मू आणि काश्मीर. चंडीगड, हिमाचल प्रदेश, हिमाचल प्रदेशातील चंबा,डलहौसी, उत्तर भारतातील नोएडा, गाझियाबाद, मथुरा आणि मेरठमध्ये धक्के जाणवले होते.

दिल्लीत पुन्हा आगीचे तांडव, ९ जणांचा मृत्यू

या बरोबरच अफगाणिस्तानातील हिंदकुशमध्ये भूकंपाचे केंद्र असल्याने अफगाणिस्तान, उजबेकिस्तान आणि पाकिस्तानात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेकांच्या घरातील भांडी आणि इतर वस्तू अस्ताव्यस्त झाल्या.

पाद्रींकडून १७५ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण

भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानात असल्यामुळे त्या भूकंपाचा भारतावर विशेष परिणाम झाला नाही. मात्र, भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लोकांमध्ये घबराट पसरल्याने दिल्लीतील बहुतांश लोक आपल्या घराबाहेर आले. जम्मू-काश्मीरच्या पुंछ आणि श्रीनगरमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी पाहिलेले उद्धव ठाकरे 'हे' नाहीत; फडणवीस यांची टीका

0
0

कोल्हापूर: शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर राज्यात सत्ता आणेल, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिला होता का? असा शब्द बाळासाहेबांना दिला असता तर त्यांनी हा शब्द खपवून घेतला नसता, असं सांगतानाच मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही केवळ औपचारिकता असून या कर्जमाफीने शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही. ज्यांना गरज आहे, त्यांना तर या कर्जमाफीचा अजिबात फायदा होणार नाही, असं सांगतानाच विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्ज माफी; राज्य सरकारची मोठी घोषणा

शेतकऱ्यांचं दीड लाखांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता. या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. सातबारा सोडा या सरकारने केवळ पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्याला पाने पुसली आहेत. अतिवृष्टीमुळे पीडित झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये भरपाई देण्याचं आश्वासनही दिलं होतं. ही आश्वासनं फडणवीस सरकारने पूर्ण करावीत, असा टोलाही फडणवीस यांनी हाणला.

यापुढं महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात CMO

यावेळी त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून अफवा पसरविल्या जात असल्याने त्यापासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केलं. CAAवरून ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यांचा निषेध करत कोणत्याच नागरिकाची नागरिकता परत घेण्याची तरतूद या कायद्यात नाही. हा नागरिकत्व देणारा कायदा आहे, नागरिकत्व काढून घेणारा कायदा नव्हे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मी पूर्वीपासून शरद पवारांचा समर्थक: रामदास आठवले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदू जनजागृती समितीची निदर्शने

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करून देशाची अखंडता आणि शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

केंद्र सरकारने 'नागरिकत्व सुधारणा विधेयक' संमत केले आहे. पण या विधेयकांच्या विरोधात दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल येथे हिंसक आंदोलन चालू केली आहेत. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी होत असून आणि आंदोलक पोलिसांवरही आक्रमण करत आहेत. विधेयकाच्या विरोधात आंदोलन करून देशाची अखंडता आणि शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे गुजरात, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे समन्वयक मनोज खाडये यांनी केली. समितीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे शरद माळी, अधिवक्ता प्रकाश खोंद्रे आणि हिंदु जनजागृती समितीचे किरण दुसे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, हिंदु महासभेचे नंदकुमार घोरपडे, विश्‍व हिंदू परिषदेचे अशोक रामचंदानी, रामभाऊ मेथे, भाजपचे आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, विजय शेटे, श्रीराम सेनेचे सागर श्रीखंडे, शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नागरिकांना अर्थव्यवस्थेचा अभ्यास आवश्यक’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'देशातील आर्थिक साक्षरतेचा वेग विचारात घेता देशातील प्रत्येक नागरिकांना अर्थव्यवस्थेचा अभ्यास असणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेचा अभ्यास नसल्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात. विकासात्मक वाटचालीत आर्थिक साक्षरता महत्वाची आहे' असे मत शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डी. जी. कणसे यांनी व्यक्त केले. शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनचे ३०वे वार्षिक अधिवेशन सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे झाले. शिक्षण प्रसारक संस्थेच्या संपतराव माने महाविद्यालयात दोन दिवसीय अधिवेशन आयोजित केले होते. प्राचार्य कणसे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

अधिवेशनाचे अध्यक्षपद डॉ. पी. एस. कांबळे यांनी भूषविले. संस्थेचे अध्यक्ष राजकुमार माने, सचिव अॅड. विराज माने यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रा. सुभाष दगडे, प्रा. संजय ठिगळे व डॉ. अर्जुन येरगे यांनी संपादित केलेलय 'शिवार्थ' या वार्षिक अंकाचे प्रकाशन झाले.

डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, 'देशातील अर्थव्यवस्थेत आर्थिक मंदीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देशातील अराजक परिस्थितीला नागरिकत्व सुधारणा कायद्यातील बदल जबाबदार आहे. सरकारने देशभरात होत असलेल्या असंतोषाचा विचार करुन नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घ्यावे.'

अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. पी. एस. कांबळे 'भारतातील ग्रामीण विकास खरा ग्रामीण विकास आहे काय?' या विषयावर बोलताना म्हणाले की, 'ग्रामीण भागातील बेरोजगारी, दारिद्र्य, आर्थिक विषमता, रस्ते, पिण्याचे पाणी, निवास व्यवस्थेचा अपुरा विकास झाला आहे. यासाठी सरकारने या बाबीवर अधिक खर्च करणे गरजेचे आहे.'

प्राचार्य डॉ. अर्जुन पाटील यांनी स्वाग्त केले. डॉ. संतोष यादव यांनी अहवाल वाचन केले. असोसिएशनचे कार्यवाह प्रा. एम. जी. पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्टॅग नव्हे स्लोटॅग

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

टोल नाक्यांवरील प्रवास गतिमान करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सुरू केलेल्या फास्टॅग यंत्रणेला वाहनधारकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. एकूण वाहनांपैकी ३५ टक्के वाहनांनीही फास्टॅग घेतले नसल्याने टोल नाक्यांवर अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. फास्टॅग लेनवरही विनाफास्टॅग वाहनांचा शिरकाव होत असल्याने फास्टॅगच्या प्रवासाला अजूनही गती आलेली नाही.

टोल वसुलीत पारदर्शकता येण्यासह वाहनधारकांचा प्रवास गतिमान होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक केले आहे. १५ डिसेंबरपासून याची सर्वत्र अंमलबजावणी सुरू होणार होती. मात्र, एकूण वाहनांपैकी केवळ ३० टक्के वाहनधारकांनीच फास्टॅग घेतल्याने याला १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, सर्वच टोल नाक्यांवर फास्टॅग वाहनांसाठी स्वतंत्र लेनची अंमलबजावणी सुरू केली आहे. फास्टॅगसाठी एक किंवा दोन लेन राखीव ठेवल्या आहेत. मात्र, वाहनधारकांचे प्रबोधन नसल्याने अनेक विनाफास्टॅग वाहनधारक फास्टॅगच्या लेनमध्ये जातात. जादा टोल द्यावा लागणार याची माहिती ऐनवेळी मिळाल्यानंतर ते पुन्हा दुसऱ्या लेनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे फास्टॅग असलेल्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. फास्टॅग घेऊनही टोल नाक्यांवर थांबावे लागत असल्याने वाहनधारकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. फास्टॅगने प्रवास गतिमान होण्याऐवजी अडथळेच वाढल्याच्या भावना वाहनधारक व्यक्त करीत आहेत. फास्टॅगच्या अंमलबजावणीतही अनेक त्रुटी आहेत.

टोल नाक्यावर टॅग स्कॅन केल्यानंतर तातडीने रक्कम वजा झाल्याचा मेसेज वाहनधारकाच्या मोबाइलवर येणे गरजेचे आहे. अनेकदा काही किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर मेसेज येतो. टोलच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम वजा झाल्याच्याही तक्रारी आहेत. याबाबत टोल नाक्यावर विचारपूस केली असता, कोणतेही समर्पक उत्तर मिळत नाही. उलट टोल नाक्यांवरील कर्मचारी वाहनधारकांशी वाद घालतात, असे अनुभव आहेत. कोल्हापूर ते कराड मार्गावर प्रवास करताना किणी टोल नाक्यावर फास्टॅगद्वारे जादा रक्कम वसूल झाल्याचे प्रकार घडले आहेत. बँकेच्या खात्याशी फास्टॅगचे वॉलेट जोडले असल्याने बँक खात्याच्या सुरक्षेबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. फास्टॅग वापराबाबत पारदर्शकता आणि सुलभता न आल्यास फास्टॅग घेण्याचे प्रमाण वाढणार नाही, असे वाहनधारकांना वाटते.

तक्रारी करा १०३३ क्रमांकावर

फास्टॅगबाबत कोणतीही तक्रार असल्यास १०३३ हा टोल फ्री क्रमांक तक्रारींसाठी दिला आहे. वाहनधारकांनी टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रारी द्याव्यात. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या बेसबाइटवरही तक्रार कशी आणि कुठे करावी याची सविस्तर माहिती दिली आहे. वाहनधारकांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रारी द्याव्यात, असे आवाहन महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

किणी, तासवडेला रिटर्न सवलत मिळावी

फास्टॅग असलेल्या वाहनांना २४ तासात त्याच टोल नाक्यावरून परतीचा प्रवास केल्यास टोलच्या रकमेत ५० टक्के सवलतीची तरतूद केली आहे. किणी आणि तासवडे टोल नाक्यांवर मात्र रिटर्न टोलची सोय प्राधिकरणने दिलेली नाही. यामुळे फास्टॅग असले तरी २४ तासातील रिटर्न सवलतीचा फायदा या दोन टोल नाक्यांवर मिळत नाही. रिटर्नची सोय या दोन्ही टोल नाक्यांवर सुरू करावी, अशी आग्रही मागणी वाहनधारकांकडून सुरू आहे.

जास्तीतजास्त वाहनधारकांनी फास्टॅग घ्यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किणी, तासवडे टोल नाक्यांसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी फास्टॅग विक्री सुरू आहे. वाहनधारकांनी फास्टॅग घेऊन स्वत:चा प्रवास गतिमान करावा. फास्टॅग नसताना फास्टॅगच्या लेनमधून गेल्यास दुप्पट टोल आकारणी केली जात आहे. १५ जानेवारीपासून याची अंमलबजावणी आणखी काटेकोर होईल.

- बी. एस. साळुंखे, संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

- ग्राहकांकडून फास्टॅग घेऊन रिचार्ज नाही

- ग्राहकांमध्ये वापराविषयी प्रबोधनाची गरज

- १५ जानेवारीपासून होणार काटेकोर अंमलबजावणी

जिल्ह्यातील वाहन संख्या

१,२६,१३६

कार

२४,६६७

जिप, ओम्नी

२०,३६१

टेम्पो

१३७०

ट्रॅव्हल्स

१७२०

मिनीबस

९६७

टँकर

६५१

स्कूलबस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पंचगंगे’चा कृती आराखडा केंद्राकडे

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन आणि तात्पुरत्या उपाययोजना करण्यासंबंधीचा सविस्तर कृती आराखडा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवण्यात आला आहे. आराखडा निधीसाठी

केंद्रीय पर्यावरण विभागाकडे दिला जाणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या पातळीवरून नदीचे प्रदूषण रोखण्यासाठीच्या योजनांसाठी भरीव निधी मिळण्यासाठी आराखडा उपयोगी ठरणार आहे.

केंद्रीय हरीत लवादाने दिलेल्या सूचनेनुसार देशातील ३५१ प्रदूषित पट्टे निश्चित करण्यात आले आहेत. यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिलेल्या अहवालांचा आधार घेण्यात आला आहे. प्रदूषित पट्ट्यात पंचगंगा नदीसह राज्यातील अन्य ५३ प्रदूषित नद्यांचा समावेश आहे. प्रदूषणाचे प्रमाण किती आहे हे तपासून पाच प्राधान्यगट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या प्राधान्य गटात ९, दुसऱ्या गटात ६, तिसऱ्या गटात १४, चौथ्या गटात १० आणि पाचव्या गटात १४ प्रदूषित नद्यांचा समावेश आहे.

नद्यांच्या एकूण लांबीपैकी प्रदूषित पट्टे अधोरेखित करण्यात आले आहेत. त्यात पाचव्या गटात पंचगंगा नदीचा समावेश असून तिचा क्रमांक पाचव्या स्थानी आहे. पहिल्या ते चौथ्या गटातील नद्यांच्या तुलनेत पंचगंगा नदीतील प्रदूषणाचे प्रमाण कमी असल्याचा दावा येथील प्रदूषण नियंत्रण विभागाने केला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे वर्गवारीनंतर नदीनिहाय प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

निधीचा अभाव

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वी अनेकवेळा कोट्यवधीच्या रक्कमांचा प्रस्ताव तयार करून राज्य, केंद्र सरकारकडे पाठविला. मात्र, त्यासाठी भरीव निधी मिळाला नाही. परिणामी उपलब्ध निधीवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून उपाययोजना केली जात आहे. प्रदूषण भरपूर आणि उपाययोजना तुटपुंज्या अशी सद्यस्थिती आहे. त्यामुळे रोज मोठ्या प्रमाणत प्रदूषित पाणी नदीत मिसळते. पावसाळा संपल्याने आता प्रदूषणाची तीव्रता वाढली आहे. अलिकडे जयंती नाल्यातील सांडपाणी थेट नदीत मोठ्या प्रमाणात मिसळत आहे.

हायकोर्टाच्या आदेशाने

१९९७ मध्ये हायकोर्टाने आदेश देऊनही प्रदूषण रोखण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना अपयश आले. २०१०मध्ये पुन्हा सामाजिक संस्थांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या सुनावणीत कोर्टाने कायम आणि तात्पुरत्या स्वरुपातील उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात सरकारी यंत्रणा प्रदूषण रोखण्यासंबंधी सतर्कता दाखवताना दिसतात.

दररोज १०९ एमएलडी सांडपाणी नदीत

पंचगंगेच्या नदीकाठावरील गावांत दररोज २३ एमएलडी सांडपाणी तयार होते. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणताही प्रकल्प कार्यान्वीत नाही. अनेक ठिकाणी सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. याशिवाय कोल्हापूर शहरात दररोज ९६ एमएलडी सांडपाणी निर्माण होते. त्यापैकी ७२ एमएलडी सांडपाणी थेट नदीत जाते. इचलकरंजी शहरात ३८ एमएलडी सांडपाणी रोज तयार होते. त्यापैकी १४ एमएलडी सांडपाणी प्रक्रियेविना नदीत मिसळते. कोल्हापूर महानगरपालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प मार्च २०२०पर्यंत तर इचलकरंजी नगरपालिकेने डिसेंबर २०१९पर्यंत सांडपाण्यावर प्रक्रिया करणार असल्याची हमी कृती आराखड्यात दिली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, इचलकरंजी नगरपालिकेसह विविध विभागांकडून प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कधीपर्यंत राबविल्या जातील याची माहिती घेऊन सविस्तर अहवाल तयार केला आहे. याआधारे कृती आराखडा केंद्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवण्यात आला आहे. आराखड्यानुसार कार्यवाही केली जात आहे.

- प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

प्रदूषणास जबाबदार घटक, शहरे

३१

पंचगंगा नदीकाठावरील गावे

१०५

पंचगंगा खोऱ्यातील उद्योग

साखर कारखाने

शहरे

(कोल्हापूर आणि इचलकरंजी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉलेजांकडून ‘नॅक’साठी तयारी सुरू

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करणाऱ्या नॅक अर्थात नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडिशन कौन्सिल या राष्ट्रीय संस्थेच्या मूल्यांकनासाठी आगामी आगामी दीड वर्षात सामोरे जाणाऱ्या महाविद्यालयांमध्ये 'नॅक'च्या परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. शिवाजी विद्यापीठासह दहा कॉलेज नॅकच्या मूल्यांकन प्रक्रियेतून जाणार आहेत. तर २०२१ मध्येही मूल्यांकनाला सामोरे जाणाऱ्या महाविद्यालयांकडून प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे.

दर पाच वर्षांनी 'नॅक'द्वारे महाविद्यालयांतील शैक्षणिक सुविधा, गुणवत्ता व दर्जा या स्तरावर मूल्यांकन करण्यात येते. शिवाजी विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या २९३ कॉलेजांपैकी ज्यांना अद्याप 'ब' दर्जा मिळाला आहे, त्या सर्व कॉलेजांच्या प्रशासनाने टप्प्याटप्प्याने 'अ' दर्जासाठी नॅकच्या निकषपूर्ती कक्षेत येण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यापीठाशी संलग्न तसेच मान्यताप्राप्त महाविद्यालयांनी 'नॅक'कडून मूल्यांकन व फेर मूल्यांकन करून घेतले आहे. सद्यस्थितीत 'ए प्लस प्लस' दर्जा मिळालेले एकही कॉलेज नाही. तर 'ए प्लस' दर्जा मिळवणाऱ्या कॉलेजांची संख्या सहा आहे. पहिल्या फेरीत २०, दुसऱ्या फेरीत २० तर तिसऱ्या फेरीत १४ कॉलेजांना 'ए' मानांकन मिळाले आहे. 'बी प्लसप्लस' या मानांकनाच्या कक्षेत २४ महाविद्यालयांचा समावेश आहे, तर 'बी प्लस' मानांकन मिळवणारी ४४ महाविद्यालये आहेत. ३३ महाविद्यालयांना 'सी प्लसप्लस', १२ महाविद्यालयांना 'सी प्लस' तर २० महाविद्यालयांना 'सी' मानांकन मिळाले आहे.

नॅक मूल्यांकनास पात्र असलेल्या महाविद्यालयांमध्ये सरकारी स्तरावरील दोन महाविद्यालये तर अनुदानित ५१ व विनाअनुदानित ११३ महाविद्यालयांचा समावेश आहे. मूल्यांकनाच्या पाच वर्षांनंतर पुनर्मुल्यांकनासाठी प्रस्ताव देण्याची तरतूद असल्याने महाविद्यालयांनी 'अ' मानांकन मिळण्यासाठी तर 'अ' मानांकन असलेल्या महाविद्यालयांकडन 'अ प्लसप्लस' मानांकन मिळवण्यासाठी निकषपूर्तीवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा, त्यांची गुणवत्ता, दर्जा तसेच ग्रंथालय संपदा, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांनी नोकरीची उपलब्धता देणारी यंत्रणा, त्याबाबत प्रशासनाचे सातत्य या सर्व निकषांवर महाविद्यालयांच्या गुणवत्ता मानांकनाचा आलेख निश्चित केला जात असतो. या निकषांची पूर्ती करणे तसेच आवश्यक सुविधा व गुणवत्तेच्या अनुषंगाने प्रगती करण्यासाठी सध्या महाविद्यालयांमध्ये नॅक मूल्यांकनाच्या तयारीला वेग आला आहे.

नॅक समितीच्या मूल्यांकनाची रचना आता बदलली आहे. ही प्रक्रिया आता अधिक नेमकी आणि गुणवत्तेची कसून तपासणी करणारी बनली आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थीकेंद्री असणे व त्यांच्या रोजगारनिर्मिती व संधी यासाठी काम करणाऱ्या शैक्षणिक संस्था, कॉलेजीस, विद्यापीठे यांना नॅकसाठी सखोल तयारी करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शिवाजी विद्यापीठाची तयारीही जोरात सुरू आहे.

- डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मागील पाच वर्षांत कॅबिनेटमध्ये झालेले निर्णय एकमताने झाले. त्या निर्णयांना आता स्थगिती देणे चुकीचे आहे. नुसत्या बोलण्याने आक्रमकता येत नाही. मी पाहिलेले उद्धव ठाकरे आता उरले नाहीत. विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या या सरकारने कर्जमाफीतही शेतकऱ्यांचा विश्वासघात केला' असा आरोप माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'महापूर आणि अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. त्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार मदत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले होते. पण अजून एक पैही मदत दिली नाही. शेतकऱ्यांना आता पैशाची गरज असताना त्यांना मदत न करता त्यांचा विश्वासघात केला आहे. सत्तेवर येताना सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात केवळ दोन लाखापर्यंत पीक कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला.'

अवकाळीग्रस्तांना फायदा नाही

ते म्हणाले, 'अवकाळीच्या दणक्याने कर्ज परत करण्याची क्षमता नसलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता होती. पण या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. ही केवळ उधारीची घोषणा आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर याचा काहीच फायदा होणार नाही. अवकाळीने ९५ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. याकडे सरकारने फारसे गांभीर्याने पाहिले नाही. जे आश्वासन दिले होते त्याची तरी पूर्तता करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू. एक निर्णय वगळता पाच वर्षांत मंत्रिमंडळाने घेतलेले सर्व निर्णय एकमताने घेतले. तेव्हा विरोध नोंदवला नाही. आता ते त्याला विरोध करतात याचेच आश्चर्य वाटते. चांगल्या निर्णयाचे श्रेय घ्यायचे आणि अंगलट आले की भूमिका बदलायची हे बरोबर नाही.'

नागरिकत्व कायद्याबाबत अफवा

नव्या नागरिकत्व कायद्याबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करताना ते म्हणाले, 'राजकीय हेतून प्रेरित होऊन हा प्रकार सुरू आहे. हा कायदा कोणत्याही धर्माविरोधात नाही. नागरिकत्व देणारा कायदा आहे, तो काढून घेणारा नाही. जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत धार्मक तणाव निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. राज्याची आर्थिक स्थिती अतिशय चांगली आहे. राज्याला कर्ज घेण्याची अजूनही भरपूर मुभा आहे.'

राज्यात निर्वासित तपासणी छावणी असल्याचा खुलासाही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, हिंदूराव शेळके, माणिक पाटील चुयेकर उपस्थित होते.

.. ..

राहुल-सम्राट महाडिकांचा प्रवेश

सांगली जिल्ह्यातील राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे ते पदाधिकारी होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा प्रवेश झाला.

.. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकत्व कायद्याविरोधात गडहिंग्लजमध्ये मोर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात गडहिंग्लज येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी विरोध करत मोर्चा काढला. यावेळी प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

नागरिकत्व कायद्याअंतर्गत झालेली दुरुस्ती देशाला फाळणीकडे नेणारी असून, राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली संपूर्ण भारत हिंदू व्होट बँक करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार अनेक वक्त्यांनी केला.

लक्ष्मी मंडप येथून मोर्चाला सुरुवात झाली. भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी यांचाही जोरदार निषेध करीत, नागरिकत्व कायदा मागे घ्या... अशा घोषणा देत मोर्चा प्रांत कार्यालयासमोर आल्यानंतर जोरदार निदर्शने केली.

प्रांत कार्यालयाचे शिरस्तेदार शशिकांत किल्लेदार यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी जनता दलाचे श्रीपतराव शिंदे, नगराध्यक्षा स्वाती कोरी, बाळेश नाईक, प्रा. पी. डी. पाटील, सुभाष कोरे, आशपक मकानदार आदींची भाषणे झाली. राष्ट्रवादीच्या शारदा आजरी, उज्ज्वला दळवी, वसुंधरा सावंत, अरुणा शिंदे, यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ श्री स्पर्धेत पाटील, मगदूम प्रथम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 'गोकुळ श्री' स्पर्धेत शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील सीताराम पाटील यांच्या म्हशीने जास्त दुधाची नोंद करत प्रथम क्रमांक पटकावत गोकुळ श्री चा बहुमान मिळवला. गाय गटात माणगांवच्या (ता. हातकणंगले) येथील अमोल मगदूम यांच्या गायीने प्रथम क्रमांक मिळवला.

गोकुळशी संलग्न असणाऱ्या सर्व प्राथमिक दूध संस्थांच्या सभासदांकरिता प्रत्येक वर्षी स्पर्धा घेण्यात येते. दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्ये दूध उत्पादन क्षमता वाढविणे, तरुण पिढीला या व्यवसायाकडे आकर्षित करून दुग्ध व्यवसाय वाढविणे हा स्पर्धेचा मुख्य हेतू होता. ही स्पर्धा गेल्या २७ वर्षांपासून कार्यरत आहे.

गोकुळ श्री स्पर्धा गाय व म्हैस अशा दोन गटामध्ये घेतल्या जातात. यावर्षी घेतलेल्या गोकुळ श्री स्पर्धेमध्ये शिरोली दुमाला येथील शाहू दूध संस्थेचे सभासद सीताराम पाटील यांच्या म्हशीच्या दुधाची दिवसाला १८ लिटर ८६० मिली नोंद झाली. गायीमध्ये माणगाव येथील माणगाव दूध संस्थेचे सभासद अमोल मगदूम यांच्या गायीच्या दुधाची दिवसाला ३५ लिटर ७१० मिली नोंद झाली.

पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी गोकुळ श्री स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन चेअरमन रवींद्र आपटे यांनी केले. दूध उत्पादकांचा या स्पर्धेतील वाढता सहभाग पाहता गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक आपल्या जनावरांतील उत्पादन क्षमता वाढीसाठी प्रयत्नशील आहे, असे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी यावेळी नमूद केले.

स्पर्धेचा निकाल असा

म्हैस गटातील विजेते

संस्थेचे नाव गाव स्पर्धकाचे नाव दिवसा एकूण दूध

शाहू शिरोली दुमाला सीताराम पाटील १८.६६ लि.

गोवर्धन कसबा तारळे श्रद्धा साबळे १६.८९

कामधेनू लिंगनूर विजय दळवी १६.८१

गाय गटातील विजेते

माणगाव माणगाव अमोल मगदूम ३५.७१

किसनराव मोरे सरवडे शांताराम साठे ३१.४२

यशोधन कसबा सांगाव तानाजी पाटील ३०.९२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्राधिकरण’बाबतचा फैसला नव्या वर्षात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'प्राधिकरण स्थापन होवून दोन वर्षे उलटली तरी सरकार दरबारी निधीसह अन्य कामे का प्रलंबित राहिली याची अगोदर माहिती घेऊ. आणि याप्रश्नी पंधरा दिवसानंतर मंत्रालयात या विभागाशी निगडीत सगळ्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाईल,'अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

मुंबईतील शिवसेना भवन येथे सोमवारी शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीच्या निमित्ताने पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील मुंबईला गेले होते. पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यावर शिवसेना भवनमध्येच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना प्राधिकरण रद्द करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी खासदार संजय राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील यांनी प्राधिकरणची सद्यस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. पाटील यांनी, 'प्राधिकरण स्थापन होऊन दोन वर्षे झाली. प्राधिकरणात शहरालगतच्या ४२ गावांचा समावेश आहे. मात्र गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत या गावांच्या विकासासाठी कसलाही निधी उपलब्ध झाला नाही. प्राधिकरणचे काम ठप्प असल्याचे चित्र आहे. गावागावात बांधकाम परवान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राधिकरणने दोन वर्षात केवळ १४९ नागरिकांना बांधकाम परवाने मिळाले. यामुळे ग्रामीण भागातील गृहनिर्माण प्रक्रिया थंडावल्यासारखी स्थिती आहे. याचा ग्रामीण भागाच्या विकासावरही परिणाम झाला आहे. तेव्हा सरकारने प्राधिकरण रद्द करावे आणि बांधकाम परवानगीचे अधिकार पूर्वीप्रमाणे तहसीलदारांना द्यावेत,'असे म्हणणे मांडले. ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना प्राधिकरणचे कामकाज का रखडले, निधी का मिळाला नाही याविषयी माहिती घेऊन संयुक्त बैठक घेऊ. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ'अशी ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेशन पॅकेज

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नाताळच्या तयारीच्या लगबगीसोबतच शहरात नव्या वर्षाच्या स्वागताचा माहोल तयार होऊ लागला आहे. सरत्या वर्षाला निरोपासह नव वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू झाले आहे. शहरातील मोठमोठ्या हॉटेलमध्ये 'थर्टी फर्स्ट'साठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे बेत आखले जात आहेत. गीत, संगीत व नृत्याच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विधायक पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सरसावत आहे. हॉटेल व्यावसायिकांकडून खवय्यांसाठी ऑफर्स जाहीर करण्यात येणार आहेत. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी पॅकेजच्या घोषणाही होत आहेत. यामध्ये भोजन, गीतसंगीताच्या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिकांकडून आतापासून नववर्ष स्वागताची तयारी सुरू आहे. हॉटेलची सजावट, विद्युत रोषणाईचा झगमगाट, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची जाहिरात करुन खवय्यांना आकर्षित करण्याचे फंडे योजले जात आहेत. गेल्या काही वर्षात थर्टी फर्स्टला सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित केली जात आहे. यावर्षीही हा ट्रेंड पाहावयास मिळत आहे. गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिकही एकत्र येऊन थर्टी फर्स्टचा आनंद लुटतात.

दरम्यान, मुंबई, पुण्यासह अन्य शहरांतून येणारा पर्यटक व भाविक हे दोन, तीन दिवस कोल्हापुरात मुक्कामाला राहावेत यासाठी हॉटेल व्यावसायिक प्रयत्नशील आहेत. शहरालगतच्या ऐतिहासिक व धार्मिक वास्तूस्थळी सहली, जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटीचे नियोजन करण्यात येत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. गर्दी कॅश करण्यासाठी व खवय्यांना आकर्षित करुन घेण्यासाठी हॉटेल व्यावसायिक प्रयत्नशील आहेत.

'२५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मोठ्या संख्येने पर्यटक कोल्हापुरात येतात. काही शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या जातात. सध्या सर्वत्र ख्रिसमसची लगबग सुरू आहे. नाताळ सण साजरा झाला की, नवीन वर्षाच्या स्वागताच्या धामधुमीला सुरुवात होते. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत एकत्रितपणे साजरे करण्याची पद्धत रुढ होत आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या दर्शनासाठी भाविक येतात. हॉटेलमध्ये सहकुटुंब भोजनाचा आस्वाद घेतात. नागरिकांची होणारी गर्दी विचारात घेऊन हॉटेल व्यावसायिकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे,'अशी माहिती हॉटेल व्यावसायिक उत्तम पाटील यांनी दिली.

....

ड्रंक अँड ड्राइव्हवर

पोलिसांचा 'वॉच'

३१ डिसेंबर रोजी विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. काहीजण मद्यप्राशन करुन बेदरकारपणे वाहन चालवितात. यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ३१ डिसेंबर रोजी विशेष मोहिम राबविली जाणार आहे. 'ड्रंक अँड ड्राइव्ह'वर कारवाईसाठी शहरातील विविध मार्गांवर ५० हून अधिक वाहतूक पोलिस तैनात असणार आहेत. शहरातील प्रमुख चौक, गजबजलेल्या रस्त्यांवर पोलिस तैनात केले जाणार आहेत. मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

....

ठिकठिकाणी तपासणी नाके

पोलिस प्रशासनाकडूनही अवैध व चोरटी मद्य वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. गोवा आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणात चोरटी मद्य वाहतूक होते. या वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची सात भरारी पथके तैनात असणार आहेत. ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीकडून सदस्यांना व्हीप

0
0

जि.प. लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही स्वरुपाचा दगाफटका होऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना पक्षाकडून सोमवारी व्हीप लागू करण्यात आला. तर काँग्रेसच्या सदस्यांना मंगळवारी व्हीप लागू होणार असल्याचे वृत्त आहे. शिवाय काँग्रेस आघाडीच्या सदस्यांना बुधवारी (ता. २५) संध्याकाळी किंवा गुरुवारी सहलीवर पाठविण्याचे नियोजन सुरू आहे. दरम्यान 'जि.प.मध्ये दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना मिळून महाविकास आघाडीची सत्ता येईल. बहुमताची मॅजिक फिगर आघाडीकडे आहे. हे संख्याबळ ४७ सदस्यापर्यंत वाढेल. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजून उलाढाली होतील,' असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला. तसेच भाजपचेची नेते मंडळी खोट्या वल्गना करुन हवा करण्यात पटाईत आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला.

ए. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येथील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी दुपारी दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांनी एकसंध राहण्याचा शब्द दिला. पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल त्याच्यासोबत प्रामाणिक राहण्याचा व जि.प.मध्ये सत्ता काबीज करण्याचा निर्धार बैठकीत झाला. बैठकीत सदस्यांच्या सह्या घेण्यात आल्या.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, 'राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी एकत्रित आहेत. आमदार मुश्रीफ हे पाठिंब्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह अन्य आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. जनसुराज्यचे नेते आमदार विनय कोरे यांच्याशीही चर्चा सुरू आहे.'

...

बैठकीला पाच सदस्यांची दांडी

जि.प.मध्ये काँग्रेसचे चौदा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ मिळून २५ सदस्य आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीकडे पाच सदस्यांनी पाठ फिरवली. यामध्ये काँग्रेसचे सदस्य सचिन बल्लाळ, अरुण सुतार आणि सदस्या रश्मी राहुल देसाई या अनुपस्थित होत्या. शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या परवीन पटेल आणि कागल तालुक्यातील सदस्या शिल्पा खोत या गैरहजर होत्या. दरम्यान पटेल आणि खोत यांनी बैठकीला काही कारणास्तव येऊ शकत नसल्याचे पक्ष नेत्यांना कळविले असल्याचे सांगण्यात आले. अपक्ष सदस्या रसिका पाटील यांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यांचे पती अमर हे बैठकीवेळी उपस्थित होते.

...

मंडलिक दोन दिवसात

शिवसेनेची बैठक घेणार

जि.प.मध्ये शिवसेनेची सदस्य संख्या दहा आहे. त्यापैकी माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील सरुडकर, सुजित मिणचेकर, संजय घाटगे गटाचे मिळून सात सदस्य गेली अडीच वर्षे भाजप आघाडीसोबत होते तर खासदार संजय मंडलिक, माजी आमदार उल्हास पाटील गटाचे मिळून तीन सदस्य काँग्रेस आघाडीसोबत राहिले. दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर कोल्हापुरातही महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू आहेत. खासदार मंडलिक यांनी शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या दोन दिवसात मंडलिक हे शिवसेनेच्या नेत्यांची संयुक्त बैठक घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीर जाधव ठरला सर्वोत्कृष्ट तबलावादक

‘महाविकास आघाडीची ’ची केवळ गर्जनाच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व मित्रपक्ष आघाडीचा विजय होणार आहे. दोन्ही काँग्रेसनी महाविकास आघाडीची सत्ता आणण्याच्या कितीही गर्जना केल्या तरी अध्यक्ष भाजपचाच होणार आहे. त्यामुळे काँग्रेसवाल्यांची महाविकास आघाडीची सत्ता येणार ही केवळ गर्जनाच ठरणार आहे,'असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

दोन्ही काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांच्या बैठका सुरू आहेत. दुसरीकडे भाजपनेही मित्र पक्ष आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन सत्ता कायम राखण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, सरचिटणीस सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे आदींवर सत्तेसाठी संख्याबळ जमविण्याची जबाबदारी सोपविली आहे.

प्रदेशाध्यक्ष पाटील हे रविवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. भाजपकडून अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या काही सदस्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांची सर्किट हाऊस येथे भेट घेतली. या साऱ्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता कायम राहणार आहे. गेली अडीच वर्षे भाजपसोबत असलेले सगळे घटक पक्ष यापुढील काळातही साथ देणार आहेत. घटक पक्षातील कोणीही नाराज नाही. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आघाडी विजयी होईल. महाविकास आघाडीच्या सत्ता आणण्याच्या कितीही गर्जना केल्या तरी, अध्यक्ष भाजपचाच होणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’साठी पहिल्या दिवशी एकच ठराव

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी पक्की मतदार यादी तयार करण्यात येत असून त्यासाठी ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी एक ठराव दुग्ध सहाय्यक निबंधक कार्यालयात जमा झाला.

राधानगरी तालुक्यातील नरतवडे गावच्या हनुमान सहकारी संस्थेच्या फत्तेसिंग रामसिंग भोसले पाटील यांनी त्यांच्या नावे ठराव दिला आहे. ठराव देण्यासाठी ते स्वत: आले होते. २२ जानेवारी २०२० ठराव देण्याची अंतिम तारीख आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी (ता.१६) निवडणुकीतल ३६५९ क्रियाशील मतदार असलेल्या संस्थांना ठरावाचा फॉर्म निवडणूक अधिकारी सहाय्यक दुग्ध निबंधक गजेंद्रसिंह देशमुख यांनी पाठवले आहेत. ठराव देण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत ठरावधारकांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकत्व कायद्याबाबत जनतेचे प्रबोधन करावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नागरिकत्व संशोधन कायद्याबाबत भाजप कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करावे', असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. सोमवारी त्यांनी बिंदू चौकातील भाजप जिल्हा कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांशी नागरिकत्व संशोधन कायद्याबाबत संवाद साधला.

सीएए कायद्याबाबत विरोधक गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप करुन प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, 'हा कायदा कोणत्याही धर्माविरुद्ध नसून हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे. या कायद्याद्वारे कोणाचे नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही. या कायद्याचे महत्व, व्यापकता, कायदा नेमका कोणासाठी राबवणार याचे स्पष्टीकरण सोप्या भाषेत लोकांच्या समोर मांडले पाहिजे. कायद्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी माहितीपत्रकाच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे. कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधून, लोकांच्या मनातील शंका, गैरसमज दूर करून जनजागृती करावी.'

यावेळी अक्षय निरोखेकर आणि विद्या म्हमाणे-पाटील यांनी या कायद्याबाबतची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस विजय जाधव यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, दिलीप मेत्राणी, महानगरपालिका गटनेते विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक आर.डी.पाटील, अॅड. संपतराव पवार, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, अजित ठाणेकर, आशिष ढवळे, किरण नकाते, गीता गुरव, गणेश देसाई, सुनिता सूर्यवंशी, रजनी भुर्के, गायत्री राऊत, स्वाती कदम, आसावरी जुगदार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाळांच्या विकासात लोकसहभाग वाढला’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जे. पी. नाईक माझी शाळा-समृद्ध शाळा या अभियानामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा चेहरामोहरा बदलला असून शाळांच्या विकासात लोकांचा सहभाग वाढला आहे. लोकसहभागातून सुमारे १६ कोटी रुपयांची शैक्षणिक कामे झाली आहेत,'असे प्रतिपादन शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात कार्यशाळा झाली. यावेळी जिल्ह्यातील यशस्वी शाळांच्या यशोगाथेच्या चित्रफिती दाखविण्यात आल्या

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी घाटगे म्हणाले, 'शिक्षकांनी वैयक्तिक संकल्पना राबवून अभियानात मोठे योगदान दिले. त्यामुळेच शाळांची व शिक्षकांची गुणवत्ता वाढली. संपूर्ण राज्यात हे काम कौतुकास्पद आहे.'मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, 'जिल्हा परिषदेतर्फे समृद्ध शाळा अभियान यापुढेही तितक्याच प्रभावीपणे चालू राहील. शिक्षकांनी शंभर टक्के वर्ग डिजीटल करावेत. उच्च प्राथमिक शाळेत प्रयोगशाळांची उभारणी करावी. मुले शिक्षकांचे अनुकरण करतात. त्यामुळे शिक्षकांचा पेहराव, आचरण आदर्श असावे.'

शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी स्वागत केले. उपशिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी आभार मानले. विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार, जे. टी. पाटील, जयश्री जाधव, एम. आय. सुतार यांनी कार्यशाळेचे नियोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images