Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

न्यू कॉलेजने साकारले 'ग्रीन ग्रंथालय'

$
0
0

Appasaheb.mali @timesgroup.com Tweet : Appasaheb_MT कोल्हापूर : अधिकाधिक विद्यार्थ्यांची ग्रंथालयाकडे पावले वळावीत, अभ्यासक्रमाशी निगडीत संदर्भग्रंपासून थोरामोठ्यांच्या चरित्रांचा अभ्यास करावा, स्पर्धा परीक्षेशी निगडीत मटेरिअलपासून प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांवर आधारित पुस्तके वाचावीत यासाठी न्यू कॉलेजने ग्रंथालयात आमूलाग्र बदल केले आहेत. कॉलेजने 'ग्रीन ग्रंथालय' संकल्पना राबविली आहे. ग्रंथालयात विविध जातीच्या रोपांच्या ६० कुंड्या ठेवून नैसर्गिक हिरवाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भरपूर नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहावी यादृष्टीने इमारतीची रचना हे या ग्रंथालयचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कॉलेजमधील एच. टी. अपराध ग्रंथालय इतर कॉलेजांतील ग्रंथालयांपेक्षा हटके ठरले आहे. ग्रंथालयाची १६५६० चौरस फूट बांधकाम केलेली तीन मजली स्वतंत्र इमारत आहे. विविध दालने, ओपॅक, देवघेव, माहिती सेवा, क्रमिक पुस्तक, संदर्भ व विशेष संदर्भ विभाग, इंटरनेट विभाग, डिजिटल लायब्ररी विभाग, प्रतिलिपी सेवा विभागांचा समावेश आहे. मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका आहेत. ग्रंथालयातील वातावरण प्रसन्न आणि प्रकाश, हवायुक्त राहावी. नैसर्गिक वातावरणाची अनुभूती मिळावी म्हणून विविध जातीच्या रोपांच्या कुंड्या ठेवल्या आहेत. ग्रंथालयाच्या इमारतीची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. नैसर्गिक प्रकाश व खेळती हवा यामुळे इमारतीत विद्युत दिवे व पंख्यांचा कमी वापर होतो. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग संकल्पना राबवली आहे. संस्थेचे चेअरमन दिवंगत डी. बी. पाटील यांनी नेहमीच ग्रंथालयातील सोयी सुविधांना प्राधान्यक्रम दिले. सध्याचे चेअरमन आर. डी. पाटील-वडगावकर व प्राचार्य व्ही. एम. पाटील यांनी सर्वसुविधांयुक्त ग्रंथालय धोरणाला प्रोत्साहित केले. संस्थेने नुकताच, दहा किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे सोळा विभागांना विद्युत पुरवठा होतो. यातून ग्रंथालयाच्या दरमहा लाखो रुपयांच्या वीज बिलाची बचत झाली आहे. दुर्मिळ साहित्याचे डिजिटायझेशन ग्रंथालयात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील दुर्मिळ साहित्याचा खजाना आहे. सहा हजारांहून अधिक संदर्भग्रंथ आहेत. एन्सायक्लोपेडिया ऑफ ब्रिटानिका, मराठी विश्वकोष व भारतीय संस्कृतीकोश, मराठी नियतकालिकांची सूची, भारतीय सरिताकोशचा यात समावेश आहे. ग्रंथालयात दुर्मिळ साहित्य, कॉलेजशी निगडीत कागदपत्रांचे डिजिटायझेशन केले जात आहे. कॉलेज स्थापनेपासून प्रकाशित होणाऱ्या 'क्षितिज'चे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झेडपीत महाविकास आघाडीची सत्ता आणणार

$
0
0

फोटो अर्जुन...

............

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुन्हा सत्ता आणण्याचा निर्धार काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखविला. जि.प.च्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांशी संवाद साधला. 'राज्यामध्ये दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना झाली. राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न जिल्हा परिषदेत आकाराला येईल. शिवसेनेचे दहा सदस्य दोन्ही काँग्रेस आघाडीसोबत येतील,' असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात बैठक झाली. सदस्यांना भेटण्याअगोदर मुश्रीफ व पाटील यांची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर त्यांनी सदस्यांशी संवाद साधला.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही काँग्रेसची सत्ता येण्यासाठी आवश्यक जुळणी नेत्यांनी केली आहे. बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू आहे. आघाडीची शंभर टक्के सत्ता येणार हे निश्चित आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सदस्याने खबरदारी बाळगावी. भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांच्या संपर्कात जास्त राहू नये. गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत मैत्री झाली असली तरी निवडणुकीच्या कालावधीत लांब राहणे योग्य आहे. कोणाला शंका घ्यायला वाव देऊ नका.'

बैठक संपल्यानंतर मुश्रीफ व पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना जिल्हा परिषदेत सत्ता आणण्याचा संकल्प केल्याचे सांगितले. 'राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण झाल्यामुळे शिवसेना जिल्हा परिषद निवडणुकीत सोबत येऊ शकते. दहा सदस्य काँग्रेस आघाडीसोबत येतील. अजून त्यांच्याशी चर्चा करायची आहे. इतर घटकांशी बोलणी व्हायची आहेत. पण जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्याचे ठरल्याचे पी. एन. पाटील यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, भैय्या माने, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, अनिल साळोखे आदी उपस्थित होते.

....

विनय कोरेंशी संपर्क नाही

जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हा परिषदेत सहा सदस्य आहेत. जि.प. मध्ये जनसुराज्य शक्ती व भाजपची आघाडी आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाठिंब्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांच्याशी संपर्क झाला का, या प्रश्नावर आमदार मुश्रीफ यांनी, 'कोरे आणि आपल्यामध्ये कसलीही चर्चा झाली नाही. त्यांच्याशी संपर्कही साधला नसल्याचे स्पष्ट केले.

.....

चार सदस्य अनुपस्थित

दोन्ही काँग्रेसचे मिळून सद्यस्थितीत २४ सदस्य आहेत. त्यापैकी चार सदस्य बैठकीला अनुपस्थित होते. गगनबावडा तालुक्यातील सदस्य बजरंग पाटील हे मतदारसंघातील दत्त जयंतीनिमित्त बैठकीला येऊ शकले नाहीत. चंदगड तालुक्यातील काँग्रेसचे सदस्य अरुण सुतार, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील गटाचे सदस्य सचिन बल्लाळ हे गैरहजर होते. नगरपंचायतीची निवडणूक असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत असा खुलासा काँग्रेसकडून झाला. भुदरगड तालुक्यातील सदस्या रश्मी देसाई या गैरहजर होत्या. त्यांचे पती व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई हे भाजपात आहेत.

...

इच्छुकांची लगबग

काँग्रेसकडून पांडूरंग भांदिगरे, सविता चौगुले, सरिता खोत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून जयवंत शिंपी, सतिश पाटील, युवराज पाटील, परवीन पटेल यांच्या नावाचा समावेश आहे. बैठकीदरम्यान इच्छुकांपैकी काहींची लगबग सुरू होती.

..............

फोटो ओळी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांच्या बैठकीत आमदार हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. सोबत आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटेरियल सायन्स’ ची संशोधनात विज्ञानभरारी

$
0
0

फाइल फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संशोधनामध्ये शिवाजी विद्यापीठाला अव्वलस्थानी आणण्यात मटेरियल सायन्सअंतर्गत येणाऱ्या विभागांनी गेल्या दोन दशकांतील कामगिरीने विज्ञानभरारी घेतली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बेस्ट ग्लोबल युनिव्हर्सिटी रँकिंगअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या मटेरियल सायन्स विभागाचा देशात दहावा क्रमांक घोषित केला आहे. दोन वर्षांपूर्वी करंट सायन्सच्या यादीतही मटेरियल सायन्समधील संशोधनांनी बाजी मारली होती. भाभा सेंटरसोबत मटेरियल सायन्स विभागाचे काम सुरू असून त्यातूनही संशोधनात शिवाजी विद्यापीठाची आगेकूच करण्यासाठी मटेरियल सायन्स आपले योगदान देत आहे.

उच्च शिक्षणाचा प्रवाह संशोधनाकडे गेल्यास त्यातून भविष्यातील संशोधक घडतील या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाने गेल्या दहा वर्षात संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भरीव योजना सुरू केल्या आहेत. पदार्थविज्ञान या विभागांतर्गत व विभागप्रमुख डॉ. पी.एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अभियांत्रिकी, पदार्थविज्ञान व खगोल, संगणकशास्त्र, मटेरिअल सायन्स, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, रासायनिक अभियांत्रिकी, ऊर्जा, फार्माकोलॉजी, टॉक्सिकॉलॉजी ॲन्ड फार्मास्युटिक्स, कृषी व जैवविज्ञान, बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स ॲन्ड मॉलेक्युलर बायोलॉजी, पर्यावरणशास्त्र, भूशास्त्र, इम्युनॉलॉजी व सूक्ष्मजीवशास्त्र, कला व मानव्यविद्या, आरोग्यविज्ञान, न्युरोसायन्स, नर्सिंग, मानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्रे यांच्या माध्यमातून संशोधनाचा वेगळा आलेख उंचावण्याचे काम सुरू आहे.

देशातील आघाडीच्या ७० संशोधन संस्थांच्या यादीत १९ वे, तर अकृषी विद्यापीठांत देशात सहावे स्थान प्राप्त करण्यात शिवाजी विद्यापीठातील मटेरियल सायन्स या विषयातील संशोधनाचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे मटेरियल सायन्सच्या संशोधनात आघाडीच्या २५ संस्थांमध्ये चौथे, तर अकृषी विद्यापीठांत अग्रस्थान प्राप्त केले आहे. संशोधनाच्या बाबतीतही शिवाजी विद्यापीठाचे राज्यातील अग्रस्थान या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 'करन्ट सायन्स' या जागतिक आघाडीच्या विज्ञान पत्रिकेत ही क्रमवारी जाहीर झाली आहे. मटेरियल सायन्समध्ये होणारे संशोधन हे समाजोपयोगी असल्याचा फायदा विद्यापीठाला क्रमवारीत अव्वल स्थान देण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

'करन्ट सायन्स' च्या १० ऑगस्ट २०१६ च्या अंकात 'मॅपिंग एक्सलन्स ॲन्ड डायव्हर्सिटी ऑफ रिसर्च परफॉर्मन्स इन इंडिया' हा विशेष लेख प्रकाशित झाला आहे. ज्या संशोधन संस्थांमधून २२ महत्त्वाच्या विषयांचे ५०० हून अधिक शोधनिबंध, रिव्ह्यू अथवा कॉन्फरन्स पेपर प्रकाशित झाले आहेत, अशा संस्थांचा विचार या क्रमवारीसाठी करण्यात आला. या २२ विषयांमध्ये शिवाजी विद्यापीठातील मटेरियल सायन्स संशोधनासाठी सहभाग दिलेल्या विभागांचा समावेश आहे.

मटेरियल सायन्समधील संशोधनांच्या आधारे कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या तीन संस्थांनी या क्रमवारीत अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले आहेत. या यादीत स्थान मिळविणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. विद्यापीठाने या विषयातील ५६८ शोधनिबंध प्रकाशित केले असून विद्यापीठाचा बेस्ट पेपर रेट २२.५ इतका सर्वोच्च आहे.

......

कोट

'मटेरियल सायन्स या विभागातील सर्वच संशोधनांची नाळ समाजातील दैनंदिन जीवनातील समस्यांच्या निराकरणाशी जोडलेली आहे. संशोधन हे समाजाला उपयुक्त असले पाहिजे हे संशोधनाचे पहिले तत्व आहे. शिवाजी विद्यापीठाने संशोधनाची संख्या व गुणवत्ता या दोन्ही बाबतीत संतुलन सांभाळल्यामुळेच विद्यापीठाला हा सन्मान मिळाला आहे.

डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू

....

'शिवाजी विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व इतर अधिविभागांनी केलेल्या संशोधनास या रँकद्वारे जागतिक मान्यता मिळाल्याचा आनंद आहेच पण ही एक प्रेरणा आहे. आजपर्यंत सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणे, ऊर्जा साठवणूक करण्यासाठी लागणारी यंत्रणा, विषारी वायूंचे प्रमाण तपासण्यासाठी आवश्यक घटक, नॅनो मटेरियल व नॅनो कोटींग या विषयांचा संशोधनात समावेश केला आहे.

डॉ. पी. एस. पाटील, विभागप्रमुख, पदार्थविज्ञान विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात दत्तजयंती उत्साहात

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरात दत्त जयंती धार्मिक पद्धतीने व पारंपरिक वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. दुपारी बारा वाजता जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरांची आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत मंदिरांमध्ये भजन, प्रवचन, कीर्तनाचे आयोजन केले होते.

आझाद चौकातील भिक्षालिंग दत्त मंदिर येथे सकाळी सहा वाजता अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी बारा वाजता दत्त जयंती उत्सवास प्रारंभ झाला. पाने व फुलांच्या आकर्षक सजावटीने गाभाऱ्यातील दत्तमूर्तीचे पूजन करण्यात आले. भक्तांना केळी, खिचडी वाटप करण्यात आले. सायंकाळी येथे दत्तजयंतीसाठी जमलेल्या भाविकांनी गुरूचरित्र श्रवणाचा लाभ घेतला.

अंबाबाई मंदिरातील दत्त मंदिरात सकाळी अभिषेक करण्यात आला. दुपारी १२ वाजता काही भाविकांनी प्रसाद वाटप केले. अंबाबाई देवस्थानच्यावतीने आरती करण्यात आली. तर दिवसभर गुरूचरित्राचे पारायण करण्यात आले.

फुलेवाडी येथील दत्त मंदिरात गेल्या सात दिवसांपासून दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त जयंतीच्या मुख्यदिवशी अभिषेक, पूजा, आरती व प्रसाद वाटप अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंदिरासमोर भव्य मंडप उभारणी करण्यात आली असून विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने मंदिर सजवण्यात आले आहे.

जाधववाडी, आर. के. नगर येथील दत्तमंदिरमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून अभिषेक व पूजा करण्यात आली. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. शाहूपुरीतील दत्तमंदिरात सकाळी अभिषेक करण्यात आला. फुलांनी केलेली मूर्ती व मंदिराची सजावट प्रसन्न करणारी होती. मौजे तामगाव येथील दत्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी भाकरी व पिठल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला.

भाविकांची गर्दी

दत्त दर्शनासाठी सर्वच मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली. जन्मकाळ सोहळ्यावेळी दत्तांच्या आरतीने मंदिर परिसर गजबजून गेला. स्वामी समर्थमंदिरांतही दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली. दरम्यान, सामाजिक संस्था, तरुण मंडळे यांच्यावतीने भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. इस्लामपूर येथील महादेववाडी येथील दत्तमंदिराकडे कोल्हापुरातील काही भाविकांनी पायीदिंडी काढली. रात्री दत्तपालखी मिरवणूक काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निष्कर्ष येण्यापूर्वीच मशीन बंद

$
0
0

पृथ्वी रक्षक लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा (लाइन बाजार) येथील घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याने पेट घेतल्याने सुमारे सहा ते सात किमी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वायू उत्सर्जनामुळे विविध आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पस्थळी मशीन बसवले. मशीनमधून निष्कर्ष बाहेर येण्यापूर्वीच ते बंद पडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसेच मशीनला केंद्रीय प्रूदषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही मानांकन प्राप्त नाही, असा आरोप पर्यावरणप्रेमींकडून होऊ लागला आहे.

महापालिकेला दैनंदिन कचरा डंप करण्यासाठी अन्य जागेचा पर्याय नसल्याने वर्षानुवर्षे कसबा बावडा येथील घनकचरा प्रकल्पावर टाकला जात आहे. त्यामुळे प्रकल्पस्थळी कचऱ्याचा डोंगर निर्माण झाला आहे. कचरा कुजण्याच्या स्थितीमुळे मिथेन वायू निर्माण होऊन ४० अंश से. पुढे तापमान गेल्यास तो पेट घेतो. १७ नोव्हेंबर रोजी अशा पद्धतीने कचऱ्याने पेट घेतल्यानंततर प्रकल्पस्थळापासून नागाळा पार्क, ताराबाई पार्क ते दसरा चौकांपर्यंत धुराचे लोट पसरले. धुरासोबत प्रचंड दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसन व घशाचा त्रास जाणवू लागला. प्रथम महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच कचरा पेटला नसल्याचाही दावा केला. पण वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर फायर फायटरद्वारे आग विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

कचऱ्याने घेतलेला पेट आणि कुजण्याच्या प्रक्रियेमुळे शरीराला हानीकारक असे वायूउत्सर्जन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याने पर्यावरणप्रेमी संघटनांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केले. कॉमन संघटनेने तर सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन डाय ऑक्साईड, पार्टिक्युलेट मॅटर, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, लेड सारखा घातक वायू बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याचे गंभीर परिणाम विशेषत: गर्भवती महिलांवर होत असल्याचे स्पष्ट केले. त्याची तपासणी करुन अहवाल देण्याची मागणी केली. मात्र असे मशीन प्रदूषण मंडळाडे नसल्याने विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागामार्फत बसवण्यात आले. त्याचे निष्कर्ष नोंदवण्याची जबाबदारी एका विद्यार्थ्याकडे दिली. कोणतेही मानांकन नसलेले मशीन अवघ्या दोन दिवसांत बंद पडले. त्यानंतर पाच डिसेंबर रोजी अॅड. इंदुलकर यांनी प्रदूषण मंडळाला पत्रव्यवहार करुन केंद्रीय प्रदूषण मंडळाचे मानांकन प्राप्त असलेल्या मशीनद्वारेच नमुने घेण्याची मागणी केली. पण तत्पूर्वीच मशीनद्वारे घेतलेले नमुने दोन दिवसांत मिळणार असल्याचा दावा प्रदूषण मंडळाच्या कार्यालयाच्यावतीने केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार अहवाल प्राप्त झाल्यास त्याची तपासणी चिपळूण येथील प्रयोगशाळेत करुन अहवाल प्राप्त होण्यास किमान पंधरा दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत कचरा प्रकल्प परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा खेळखंडोबा सुरुच राहणार आहे.

.................

कोट

'केंद्रीय प्रदूषण मंडळाचे कोणतेही मानांकन नसलेले मशीन बसवले आहे. नमुने घेण्यापूर्वीच एका दिवसात ते बंद पडले. त्याबाबतची माहिती प्रदूषण मंडळाली दिली. पण त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. प्रदूषण मंडळाला नागरिकांच्या आरोग्याची काळजी नसून केवळ डबडे बसवून स्वत:ची पाठ थोपटवून घेत आहेत.

अॅड. बाबा इंदूलकर

....

'प्रकल्पस्थळी बसवण्यात आलेल्या मशीनमधून वायू उत्सर्जनाचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन ते तीन दिवसांत याबाबतचा अहवाल प्राप्त होईल. मशीन बसवल्यानंतर येथील काही संघटनांनी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे.

प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टपऱ्यांसह अनधिकृत केबिन जमीनदोस्त

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या आठवड्यात फसलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम बुधवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात यशस्वी झाली. तावडे हॉटेल ते व्हिनस कॉर्नरपर्यंत राबवलेल्या मोहिमेमध्ये पथकाने ३५ झोपडपट्ट्या जमिनदोस्त करत ४६ टपऱ्या काढून टाकल्या. तर स्टँड परिसरातील ३५ अनधिकृत केबिन काढून टाकल्या. स्टँड परिसरात काही फेरीवाल्यांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला. कारवाईदरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

शहर विद्रुपीकरण आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याचे आदेश महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर व स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार बुधवारी अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाच्यावतीने संयुक्त मोहीम राबवण्यात आली. सकाळी तावडे हॉटेल परिसरात मोहीम राबवण्यात आली. हॉटेल ते जुना टोल नाक्यापर्यंतच्या अनधिकृत ३५ झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यानंतर ताराराणी चौक ते व्हिनस कॉर्नरपर्यंतच्या ४६ टपऱ्या काढून टाकल्या. अचानक झालेल्या कारवाईमुळे झोपडपट्टीधारकांची चांगलीच पळापळ उडाली. पथक कारवाईवर ठाम राहिल्याने काहींनी स्वत:हून साहित्य काढून घेण्यास सुरुवात केली.

त्यानंतर सायंकाळी तीन वाजता पथकाने स्टँड परिसरात कारवाईस सुरुवात केली. बसस्थाकाच्या इन-आउट प्रवेशद्वारादरम्यानच्या अनधिकृत ३५ केबिन हटवण्यात आल्या. या परिसरातील केबिन आणि फेरीवाल्यांमुळे येथील केएमटी बसस्टॉपवर प्रवाशांना उभा राहणेही मुश्कील बनले होते. तासाभराच्या या कारवाईत संपूर्ण परिसर मोकळा झाला. त्यानंतर स्टँड ते ब्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुकानदारांनी दुकानाबाहेर सुमारे दोन ते अडीच फूट लोखंडी छप्पर मारले होते. तसेच येथील गटरही फरशी टाकून बंदिस्त केले होते. पथकाने जेसीबी मशिनच्या सहाय्याने सर्व दुकानदारांची छप्पर उचकटून काढून टाकली. यावेळी काहींनी पथकातील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. तुंबलेली गटर दाखवत महापालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. अधिकाऱ्यांनी मात्र गटर बंदिस्त केल्यामुळे स्वच्छतेला अडथळा निर्माण होत असल्याचे स्पष्ट केल्यानंतर फेरीवाले शांत झाले. स्टँड परिसरात अचानक झालेल्या कारवाईमुळे अनेकांची धावपळ उडाली. पथकातील कर्मचारी दिसताच अनेकजणांनी आपल्या हातगाडीसह पलायन केले. यावेळी अधिकाऱ्यांनी बायोमेट्रिक कार्डधारकांना वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने व्यवसाय केल्यास कारवाई केली जाईल, अशा इशारा दिला. अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार यांच्यासह ४५ कर्मचारी मोहिमेमध्ये सहभागी झाले.

......

चौकट

बांधकाम विभागाची कारवाई

बुधवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने गांधीनगर मेन रोडवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या पानाच्या टपऱ्या, चहाचे स्टॉल व रस्त्यावरील वाढीव बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमणे काढून घेण्यासाठी बांधकाम विभागाने संबंधितांना नोटिसा दिल्या होत्या. पण तरीही अतिक्रमणे न काढल्याने कारवाई करण्यात आली. मोहिमेमध्ये बांधकाम विभागासह उचगाव, गांधीनगर, वळीवडे ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले होते. गांधीनगर शाखा अभियंता शिवाजी इंगवले, सी. एन. भोसले-पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर, ए. ए. आव्हाड आदी अधिकारी उपस्थित होते. मोहीम आणखी दोन दिवस चालणार आहे.

.....

वरिष्ठ अधिकाऱ्यांची हजेरी

सोमवारी (ता.२) स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची माहिती अगोदरच मिळाल्याने फेरीवाले नेते विरोध करण्यासाठी जमा झाले. दरम्यान, कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी फिरकले नाहीत. तब्बल तास ते दीड तास त्यांची प्रतीक्षा केल्यानंतर पथक रिकाम्या हाताने परतले. बुधवारच्या कारवाईवेळी मात्र उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, इस्टेट अधिकारी प्रमोद बराले उपस्थित होते. त्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी विरोध मोडीत काढत कारवाईचा दणका दिला.

....

डंपर

जेसीबी

४५

अतिक्रमण व पवडी कर्मचारी

३५

झोपडपट्ट्या जमीनदोस्त

३५

केबिनवर हातोडा

४६

टपऱ्या काढून टाकल्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदतवाढ न मिळाल्यास सीईओ प्रशासक

$
0
0

जिल्हा परिषद लोगो वापरावा..

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाचा २१ डिसेंबरचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला आहे. सरकारने विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत या पदाधिकाऱ्यांना दिलेली १२० दिवसांची मुदतवाढ २० डिसेंबरला संपत आहे. पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत सरकारकडून तात्पुरत्या कालावधीसाठी या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ दिली तर ते काळजीवाहू म्हणून काम पाहू शकतात. जर सरकारकडून मुदतवाढ मिळाली नाही तर २१ डिसेंबरपासून नवीन अध्यक्ष निवड होईपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे प्रशासक म्हणून काम पाहू शकतात.

त्यामुळे आपोआपच अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य समिती सभापतींच्या सोयी सुविधा रद्द होऊ शकतात. पंचायत समिती स्तरावरही हीच प्रक्रिया राहणार आहे. सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक लागू होणाऱ्या पंचायत समितीतील विद्यमान पदाधिकाऱ्यांना वीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ न मिळाल्यास गटविकास अधिकारी प्रशासक म्हणून काम करु शकतात. वाढीव मुदत संपण्यास अजून नऊ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. यामुळे प्रशासन, ग्राम विकास विभागाच्या नव्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. सरकार, विद्यमान पदाधिकाऱ्यांना आणखी काही दिवस मुदतवाढ देणार की पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपुष्टात आणणार यावर पुढील घडामोडी अवलंबून आहेत. राज्यात बहुतांश जिल्हा परिषदेत भाजपचे अध्यक्ष आहेत. आता राज्यामध्ये शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचे सरकार आहे, याकडेही अनेकजण लक्ष वेधत आहेत. भाजपवर कुरघोडी करण्यासाठी मुदतवाढीविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समझोता प्रस्तावावर एकमत होईना

$
0
0

शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यातून एकच उमेदवार असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमदारकीसाठी इच्छुक शिक्षक नेत्यांमध्ये एकाच्या नावावर एकमत होत नाही. यावर एका आमदाराने, प्रत्येक शिक्षक नेत्याने दहा-दहा समर्थकांचा गट तयार करावा. त्या गटासोबत चर्चा करायची. कोणाला कुठे संधी द्यायची, शिक्षकांशी निगडित संस्था कोणी सांभाळायच्या याविषयी मंत्रिमंडळ विस्तारानंतर निर्णय घेऊ असे सांगितले. मात्र, समझोत्याचा हा प्रस्ताव शिक्षक व संस्थांच्या सभासदांना रुचणारा नाही याकडेही काही जणांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक बँक निवडणुकीचे पडघम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांत सध्या दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. प्राथमिक शिक्षकांचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र, ७२००च्या आसपास सभासद, मुख्यालयाव्यतिरिक्त ११ शाखांतून जिल्हाभर कार्यक्षेत्र विस्तारलेल्या शिक्षक बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. समविचारी गट एकत्र येऊन नवीन आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. सद्यस्थितीवरुन बँकेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील गटाची बँकेत २००९ पासून सत्ता आहे. पहिली सहा वर्षे वरुटे चेअरमन होते. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत पॅनेलच्या विजयाची हॅटट्रिक करत बँकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी वरुटे गट व शिक्षक संघ प्रयत्नशील आहे. गेल्या निवडणुकीत गटाने १७ पैकी बारा जागा जिंकल्या. तर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने एकत्रित निवडणूक लढविली. दोन्ही गटाचे पाच उमेदवार निवडून आले. दरम्यान निवडणुकीनंतर दीड वर्षांत पुरोगामी शिक्षक संघटनेचे संचालक अरुण पाटील हे सत्ताधारी वरुटे गटात सामील झाले. विद्यमान संचालकांची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपत आहे. सहकार विभागाने बँक व्यवस्थापनला प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू असताना संघटनांच्या पातळीवर मोर्चेबांधणी वेगावली आहे. सत्ताधारी व विरोधी गटांनी बैठकांना सुरुवात केली आहे. गेल्यावेळी पुरोगामी संघटना आणि शिक्षक समितीने आघाडी केली. आगामी निवडणुकीसाठी शिक्षक समिती आणि थोरात गट एकत्र येण्याच्या घडामोडी सुरू आहेत. तर पुरोगामी शिक्षक संघटनेच्या बैठकीत सत्ता आणण्याचा निर्धार केला. सत्ताधारी वरुटे गट पूर्ण ताकतिनिशी उतरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: १६ खासगी सावकारांच्या घरावर छापे

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापूरमधील १६ खासगी सावकारांच्या घरावर गुरुवारी सकाळी सहकार विभागाने पोलीस बंदोबस्तात छापे टाकले. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली असून सावकारांचे धाबे दणाणले आहेत. पुढील तीन दिवस सावकारांवरील कारवाई सुरू राहणार असल्याची चर्चा आहे.

शहरातील राजारामपुरी बारावी गल्ली आणि उद्यमनगरातील नारायण जाधव आणि त्यांचा मुलगा तुळशीदास जाधव यांच्या घरावर छापे टाकला. यावेळी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घरातील कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये बँक पासबुक, कराराची कागदपत्रे, संपत्तीचे दस्त अधिकाऱ्यांना मिळाले आहेत. त्याशिवाय कोरे स्टँपेपर आणि सह्या केलेले चेक मिळाल्याची चर्चा आहे.

शरद पवार यांनी मला पुनर्जन्म दिला: भुजबळ

दरम्यान, खासगी सावकारांविरोधात पोलीस प्रशासनाकडून कारवाई सुरू असली तरी सहकार खात्याकडून कारवाई व्हावी, अशी मागणी पुढे येत होते. सावकारीखाली दबलेल्या नागरिकांनी पोलीस, सहकार विभागासह राज्य सरकारकडे तक्रारी केल्यानंतर आज कारवाई करण्यात आली. सकाळच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील जिल्हा निबंधक कार्यालयाजवळ १००हून अधिक पोलिस जमा झाले होते. सावकार घरातून बाहेर पडण्यापूर्वी पोलिसांच्या सरंक्षणाखाली सहकार खात्याने सावकारांच्या घरावर छापे टाकले.

विराटने तोडला युवराजचा १२ वर्षापूर्वींचा विक्रम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञान प्रदर्शनातून मुलांचा स्वच्छतेचा नारा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'शहर स्वच्छता व आरोग्यासाठी आवश्यक उपाययोजना, कचरा व्यवस्थापनसाठी उपयुक्त मॉडेल, कचरा कोंडाळामुक्त शहराची संकल्पना अशा विविध विषयावरील उपकरणातून महापालिका शाळा व खासगी शाळेतील मुलांनी स्वच्छ व सुंदर कोल्हापूरचा नारा दिला. शहर परिसरातील ७३ शाळांमधील १२५ मुलांनी वेगवेगळ्या विषयावरील वैज्ञानिक प्रकल्पांची मांडणी करत सामाजिक स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाची नाळ घट्ट केली.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे आयोजित ४५ व्या शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी झाले. दोन दिवसीय प्रदर्शन प्रतिभानगरातील वि. स. खांडेकर विद्यामंदिरात सुरू झाले. महापौर सूरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. महापौर व उपमहापौरांनी मुलांनी मांडलेल्या उपकरणाचे कौतुक केले. प्रदर्शनात इयत्ता पहिली ती चौथीच्या वयोगटात दहा शाळेतील मुलांनी सहभाग घेतला आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी शाळेतील मिळून ६३ उपकरणे आहेत. मुलांनी शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान या सूत्राला अनुसरून विविध उपकरणांची निर्मिती केली आहे.

महापालिकेतर्फे सध्या शहरात स्वच्छता अभियान आणि कचरा व्यवस्थापन मोहिम सुरू आहे. महापालिका व खासगी शाळेतील मुलांनी स्वच्छता अभियानला चालना देणारी उपकरणे प्रदर्शनात मांडली आहेत. विद्यार्थ्यांनी, सोलर पॅनेल, सोलर पाइप, वायर, मोटर, स्वीच, पाइप्स व मातीचा वापर करुन 'बहुगुणी घर'हे मॉडेल तयार केले आहे. तसेच प्लास्टिक डबा, तांब्यांची पट्टी,बॅटरी, बल्बचा वापर करुन 'वॉटर लेवल इंडिकेटर'ची निर्मिती केली आहे. शिवाय नैसर्गिक फिल्टर, कचरा कंटेनर बॉक्स फूल अलर्ट सिस्टीम, पर्यावरणपूरक गाव,कचऱ्याचे विघटन आणि व्यवस्थापन, हवेवर आधारित बहुउद्देशीय यंत्र, वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण, कमी खर्चातील कृषिपंप,आगसूचक यंत्रांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी, कापड व दोरीचा वापर करुन पारंपरिक स्कूलबॅगला पर्याय म्हणून स्कूल जॅकेट बनविले आहे. कमी खर्चाचे व वजनाने हलके असे जॅकेट आहे. कचरा व्यवस्थापनचे मॉडेल लक्षवेधी आहे. नेहरुनगर विद्यामंदिर, ज्योतिर्लिंग विद्यामंदिर, अण्णासाहेब शिंदे विद्यालय, सानेगुरुजी वसाहत विद्यालय, प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर कदमवाडी, दत्ताबाळ विद्यामंदिर, नूतन मराठी विद्यालय, वीर कक्कय विद्यालय, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर राजेंद्रनगर, प्रिन्स शिवाजी विद्यालय कसबा बावडा, महात्मा फुले विद्यालय, जीवनकल्याण विद्यामंदिर, उर्दू मराठी स्कूल सदरबाजारमधील विद्यार्थ्यांची उपकरणे आकर्षण ठरली.

शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी प्रास्ताविक केले. शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई, लेखापाल बाबा साळोखे, प्रतिभानगर विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका शामला पोवार उपस्थित होते. दरम्यान शुक्रवारी (ता. १३) दुपारी तीन वाजता बक्षीस समारंभ व प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. याप्रसंगी विज्ञान प्रदर्शनातील उत्कृष्ट उपकरण व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथपालांची कार्यशाळा

$
0
0

कोल्हापूर : न्यू कॉलेजचा ग्रंथालय विभाग, शिवाजी विद्यापीठ व महाविद्यालयीन ग्रंथपाल संघटनेच्यावतीने आधुनिक ग्रंथालयापुढीलआव्हाने व ग्रंथपालांचा एपीआय या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. २० डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता बोर्डिंगचे चेअरमन डी. जी. किल्लेदार यांच्याहस्ते कार्यशाळेचे उदघाटन होणार आहे. कार्यशाळेत वाचन चळवळ, ग्रंथालयांचे बदलते स्वरूप, शासकीय धोरण या विषयावर चर्चा होणार आहे. विद्यापीठाच्या ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांचे मुख्य भाषण असून डॉ. बी. एस. पडवळ, प्रा. पी. एस. कल्लोळी, प्रा. बाळा मांद्रेकर, डॉ. बी. राघवेंद्र यांचे मार्गदर्शन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्लब’च्या नावावर जुगारअड्डे

$
0
0

शहरात अनेक ठिकाणी कला व क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली जुगार क्लब चालविला जातो. यासाठी काही क्लब प्रसिद्ध असून पोलिसांकडून त्यांच्यावर केवळ कागदोपत्र कारवाई केली जाते. भरवस्तीतील या क्लबचा त्रास रहिवाशांना होतो. स्थानिक पोलिसांकडे तक्रार करुनही अनेकदा कारवाई केली जात नाही. नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतरच कारवाई होते असा अनुभव आहे. जुगार अड्ड्यांच्या स्थितीची पोलखोल.

Sachin.Yadav@timesgroup.com

Tweet : sachinyadavMT

कोल्हापूर : शहरात कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळांच्या नावाखाली बहुतांश क्लबमध्ये जुगार अड्डे सुरू आहेत. या ठिकाणीच मटक्यासह अन्य अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. स्थानिक नागरिकांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली तरच पोलिसांकडून कारवाई केली जाते. जिल्ह्यातही क्लबच्या नावावर राजरोस जुगार सुरू आहे. पोलिस, क्लबचे मालक आणि गुन्हेगारी यंत्रणेतील घटकांचे रॅकेट या अवैध व्यवसायांना सूट देण्यासाठी कार्यरत आहे. लाखो रुपयांच्या उलाढालीत यंत्रणेचे वाटेकरी ठरलेले आहेत. त्यातून शहरात जुगार व्यवसाय फोफावला आहे.

गंगावेशीतील लक्ष्मी गल्लीतील एका इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये न्यू सम्राट क्रीडा व सांस्कृतिक मंडळ क्लब आहे. ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री पोलिसांनी येथे छापा टाकून २५ जणांना अटक केली. कला व क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली येथे जुगार अड्डा चालवला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या. येथील कारवाईत पत्त्यांचे सेट, प्लास्टिक कॅन, रोख ६० हजार रुपये, १६ मोबाइल, डीव्हीआर असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या फ्लॅटमध्ये गेली कित्येक वर्षे हा अड्डा सुरू आहे. येथील कारवाईने क्लबच्या नावाखाली जुगार अड्डे सुरू असल्याचे पुन्हा उघड झाले.

शहरातील व्हीनस टॉकीज व उमा टॉकीज परिसरातील जुगार क्लब फेमस आहेत. याशिवाय, राजाराम चौक, संभाजीनगर पेट्रोलपंप परिसर, कळंबा, लक्षतीर्थ वसाहत, शाहूपुरी आणि राजारामपुरीत जुगार अड्ड्यांवर पत्याची पिसणी सुरू असते. सद्यस्थितीत शहर-जिल्ह्यात कला, क्रीडा, सांस्कृतिक क्लबच्या नावाखाली ९० क्लबची नोंदणी आहे. या क्लबना रमी खेळण्यासाठी परवानगी आहे. मात्र 'पैसे लावून रमी खेळणे' हा प्रकार जुगारात मोडला जातो. रमीच्या नावाखाली तीन पानी जुगार, बल्लारी (अंदर-बाहर) या नावाने जुगार खेळला जातो. रमी क्लबवर सीसीटीव्ही लावणे बंधनकारक असल्याचा नियम असला तरीही क्लबमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत अॅडजेस्टमेंट केली जाते. व्हीनस टॉकीज, उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी परिसरात अनेकदा कारवाई करुनही अनेक सांस्कृतिक क्लब सुरुच राहिले. संभाजीनगर आणि राजाराम चौकात तर जुगार अड्डे सुरू आहेत. काही नगरसेवक, सराईत गुंडांना मिळालेला राजकीय वरदहस्त आणि पोलिसांचा आशीर्वाद यामुळे हे क्लब सुरू राहीले आहेत.

'वसुली' हीच ड्यूटी!

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी व करवीर पोलिस ठाण्यांत 'कलेक्टर' कार्यरत आहेत. ते पोलिस निरीक्षकांच्या अवती-भोवतीच फिरतात. त्यांना कुठली 'ड्यूटी' किंवा जबाबदारी नाही. त्यांनी फक्त 'वसुली'ची ड्युटी दिली गेली आहे. 'साहेबां'ची मर्जी सांभाळत 'अर्थ'पूर्ण कामागिरी बजाविण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे.

क्लबच्या नावाखालील अड्ड्यांची ठिकाणे

जुना राजवाडा : मंगळवार पेठ दूध कट्टा, उभा मारुती चौक, गांधी मैदान, रंकाळा स्टॅँडमागे, साकोली कॉर्नर, रंकाळा उद्यान, फुलेवाडी पहिला स्टॉप, क्रशर चौक, संभाजीनगर, पाण्याचा खजिना, वारे वसाहत, हॉकी स्टेडियम.

लक्ष्मीपुरी : गंगावेश येथील अर्बन बँकेच्या पिछाडी व परिसर, पंचगंगा तालीम, तोरस्कर चौक, टाऊन हॉल, करवीर पंचायत समितीचा परिसर, सीपीआर, तहसील कार्यालय, शिवाजी चौक मार्केट, पद्मा चौक, धान्य व्यापार लाईन, मटण-मार्केट रोड, फुलेवाडी पहिला स्टॉप, खांडसरी, लक्षतीर्थ वसाहत.

शाहूपुरी : रेल्वे स्टेशनसमोरील रिक्षा स्टॉप, मध्यवर्ती बसस्थानक, परिख पूल, बागल चौक, विचारेमाळ, सदर बाजार, कावळा नाका, कनाननगर, कदमवाडी, जाधववाडी, मार्केट यार्ड, महावीर कॉलेज परिसर, विवेकानंद कॉलेजसमोर, प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसर, कसबा बावडा, भगवा चौक, पोस्ट कार्यालय.

राजारामपुरी : राजारामपुरी मेनरोड, सायबर चौक, माउली पुतळा, यादवनगर, जवाहरनगर, राजेंद्रनगर, शाहू मिल.

करवीर तालुका : गांधीनगर, गोकुळ शिरगाव, शिरोली एमआयडीसी, पाचगाव, आर. के. नगर, मोरेवाडी, कळंबा, वाशी नाका, पुईखडी, आंबेवाडी फाटा, वडणगे, केर्ली, बालिंगा, कुडित्रे-सांगरूळ फाटा, सांगरूळ बाजारवाडा, कसबा बीड, इस्पुर्ली फाटा.

जिल्हा : इचलकरंजी, जयसिंगपूर, हातकणंगले, पेठवडगाव, हुपरी, पन्हाळा, कोडोली, कोतोली, बाजारभोगाव, कळे, गगनबावडा, शाहूवाडी, मलकापूर, कागल, गडहिंग्लज, गारगोटी.

(पूर्वार्ध)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोल्हापूर कॉमिक कॉन’चे आयोजन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'युनिक्स कंपनी' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत 'फ्रूस्टार कोल्हापूर कॉमिक कॉन'चे आयोजन केले आहे. कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉल येथे हा तीन दिवसीय कार्यक्रम होणार आहे. यामध्ये कॉमिकचे बुक स्टॉल, कॉमिक टॉइज (खेळणी) स्टॉल, कॉमिक मर्चंडाइज स्टॉल, पोस्टर्स व स्टिकर्स स्टॉलचा समावेश आहे. सोशल मीडिया व युवावर्गात 'कोल्हापूर कॉमिक कॉन' याविषयी आकर्षण आहे. ख्रिसमसनिमित्त तिन्ही दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे.

कोल्हापुरात 'कॉमिक कॉन'चे पहिल्यांदाच होत आहे. हा कार्यक्रम जगभरातील ५० हून अधिक देशांमध्ये २० वर्षांपासून होत आहे. भारतात आजवर 'कॉमिक कॉन'हा कार्यक्रम दिल्ली, मुंबई, बेंगलोर यासारख्या मेट्रो शहरात आयोजन केले जाते. कोल्हापूरकरांना पहिल्यांदाच या निमित्ताने वेगळ्या कार्यक्रमाचा आनंद लुटता येणार आहे. या कार्यक्रमासाठी संजय घोडावत ग्रुप प्रमुख प्रायोजक आहेत. तर के. आर. मोटर्स, हॉट व्हिल्स, फॅशनिस्टा, रग्गेडियन, बॉनबेक आणि क्रिएशन मल्टिमीडिया हे सहप्रायोजक आहेत.

तीन दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमासह प्रश्नमंजुषा अशा स्पर्धासह वैविध्यपूर्ण मनोरंजनाची मेजवानी चाखायला मिळेल. शिवाय 'कोल्हापूर कॉमिक कॉन'मध्ये नागरिकांना आकर्षित करणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना, खेळांचा समावेश आहे. यामध्ये 'सेल्फी बूथ, ए.आर.व व्ही.आर फोटो बूथ, खेळाचे विविध प्रकार असतील. या कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये कॉसप्ले (फॅन्सी ड्रेस) ही स्पर्धा सर्ववयोगटासाठी खुले असणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना ११००० रुपयांची बक्षीसे देऊन गौरविले जाईल. स्ट्रीट रॅपर्स (गायन स्पर्धा) स्पर्धा हे वेगळे आकर्षण असणार आहे.

महिलांसाठी 'वन मिनिट टँलेट शो' होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना २१००० रुपयांचे गिफ्ट हँपर दिले जाणार आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑनलाइन गेम टूर्नामेंट होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकांच्या विजेत्याला ५१००० रुपयांचे बक्षीस आहे. लहान मुलांसाठी मोफत आर्ट वर्कशॉप होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाविषयी व खेळाविषयीची माहिती 'www.kolhapurcomiccon.com' या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहिती व स्टॉल बुकिंगसाठी ९८२२९०११६६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बँक निवडणुकीचे पडघम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांत सध्या दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. प्राथमिक शिक्षकांचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र, ७२००च्या आसपास सभासद, मुख्यालयाव्यतिरिक्त ११ शाखांतून जिल्हाभर कार्यक्षेत्र विस्तारलेल्या शिक्षक बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. समविचारी गट एकत्र येऊन नवीन आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. सद्यस्थितीवरुन बँकेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील गटाची बँकेत २००९ पासून सत्ता आहे. पहिली सहा वर्षे वरुटे चेअरमन होते. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत पॅनेलच्या विजयाची हॅटट्रिक करत बँकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी वरुटे गट व शिक्षक संघ प्रयत्नशील आहे. गेल्या निवडणुकीत गटाने १७ पैकी बारा जागा जिंकल्या. तर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने एकत्रित निवडणूक लढविली. दोन्ही गटाचे पाच उमेदवार निवडून आले. दरम्यान निवडणुकीनंतर दीड वर्षांत पुरोगामी शिक्षक संघटनेचे संचालक अरुण पाटील हे सत्ताधारी वरुटे गटात सामील झाले. विद्यमान संचालकांची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपत आहे. सहकार विभागाने बँक व्यवस्थापनला प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू असताना संघटनांच्या पातळीवर मोर्चेबांधणी वेगावली आहे. सत्ताधारी व विरोधी गटांनी बैठकांना सुरुवात केली आहे. गेल्यावेळी पुरोगामी संघटना आणि शिक्षक समितीने आघाडी केली. आगामी निवडणुकीसाठी शिक्षक समिती आणि थोरात गट एकत्र येण्याच्या घडामोडी सुरू आहेत. तर पुरोगामी शिक्षक संघटनेच्या बैठकीत सत्ता आणण्याचा निर्धार केला. सत्ताधारी वरुटे गट पूर्ण ताकतिनिशी उतरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोट्यवधींचा ऑनलाइन गंडा

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

Tweet : sachinyadavMT

कोल्हापूर : 'हॅलो, मी बँकेतून बोलतोय, तुमचे बँक खाते डिअ‍ॅक्टिवेट झाले आहे, तुमच्या मोबाइलवरील लिंक तातडीने क्लिक करा, ओटीपी द्या, 'तुम्हाला लॉटरी लागली आहे''तुमच्या खात्यात एक लाख रुपये जमा झाले आहेत, त्यासाठी मोबाइलवर पाठविलेला ओटीपी क्रमांक द्या. तुमच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे वर्ग होत आहेत तातडीने बँक डिटेल्स, डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती द्यावा'अशा भूलथापा मारून हॅकर्सकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. त्यामध्ये उच्चशिक्षितांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने बळी पडत आहेत.

मंगळवारी सकाळी हॅकर्सने देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स तसेच नाइट कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य एस. बी. उर्फ शिवगोंडा भीमगोंडा पाटील (वय ६०, रा. हनुमाननगर, उजळाईवाडी) यांना २३ लाख, ४८ हजार रुपयांचा गंडा घातला. ओटीपी क्रमांक विचारून त्यांच्या खात्यावरील ही रक्कम परस्पर काढून घेतली. गेल्या चार महिन्यांपूर्वी एका शिक्षकेला लॉटरी लागल्याचे सांगून त्यांच्या खात्यावरील एक लाख रुपयाची रक्कम काढून घेतली. कसबा बावडा आणि शिवाजी पेठेतील तरुणाला मोबाइलवरुन आलेला ओटीपी क्रमांक विचारुन ३० आणि ५० हजारांची रक्कमेला गंडा घातला. फसवणुकीच्या या घटनांत सातत्याने वाढ होत असून त्या रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. लॉटरी लागल्याचे सांगून कार, लॅपटॉप, मोबाइल, टीव्ही, फ्रीज या प्रकारच्या वस्तू सोडविण्यासाठी टॅक्स भरावा लागेल वगैरे असे कारणे दाखवून पैसे लुटले जात आहेत.

फसवणुकीचे प्रकार

सैन्य किंवा निमलष्करी दलाचा जवान असल्याचे सांगून सायबर गुन्ह्यांना अनेक जण बळी पडतात. सायबर गुन्हेगार ओएलएक्सवर सायकल, कार, मोबाइल, घरगुती उपयोगाच्या वस्तूची विक्री करायची आहे. सैनिक असल्याने बदली तत्काळ कमी किंमतीत विक्री करावयाची आहे. त्यासाठी सैन्यात असल्याचे बनावट आयडी कार्ड, व्हॉटसअॅपवर पाठवून ग्राहकांचा विश्वास संपादन केला जातो.

खोटी जाहिरात

सायकल, कार किंवा अन्य कोणतीही वस्तू विक्रीची जाहिरात करण्यासाठी मूळ मालक असल्याचा पुरावा मागण्यासाठी व्हॉटसअॅवर महत्त्वाची कागदपत्रे सायबर गुन्हेगार मागवितात. त्याद्वारे तुमच्या नावाने खोटी जाहिरात करुन फसवणूक केली जाते.

रिक्वेट मनीची लिंक

वस्तू खरेदीसाठी ई-वॉलेट किंवा यूपीआय, पेटीएम यासारख्या ई-वॉलेट माध्यमातून पेमेंट करताना अडचणी निर्माण होत असल्याचे सांगून रिक्वेस्ट मनीची लिंक पाठविली जाते. त्यावर यूपीआय पिन टाका म्हणजे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील, अशी थाप मारली जाते. मात्र रिक्वेस्ट मनी लिंकशी जोडल्याने तुमच्या खात्यातील पैसे सायबर गुन्हेगाराच्या खात्यात काही सेकंदात वर्ग केले जातात.

फसवे फोन कॉल

आपले कार्ड ब्लॉक झाले आहे

अकाउंट डिअॅक्टिव्हेट झाले आहे

खात्याचे व्हेरिफिकेशन

खात्यातील रक्कम अन्य खात्यात वर्ग होत आहे

हा व्यवहार थांबविण्यासाठी सर्व माहिती मागतात

काय माहिती मागितली जाते

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक

कार्डवरील तीन अंकी सीव्हीही क्रमांक

कार्ड वैधता महिना वर्ष

मोबाइलवर मिळणारा ओटीपी एसएमएस

सायबर गुन्ह्याचे प्रकार

फिशींग

हॅकिंग

नायजेरियन फ्रॉड

सायबर बुलिंग

डेटा थेप्ट

क्रिप्टोग्राफी

सॉफ्टवेअर पायरसी

सायबर स्टॉकिंग

पोर्नोग्राफी

काय काळजी घ्याल

नामांकित कंपनीच्या वस्तू कधीही कमी किंमतीत विकल्या जाऊ शकत नाहीत. फसवणूक करणारी व्यक्ती या वस्तू कमी किंमतीत विक्री करत असल्यास तो फसवणूक करत असल्याचे स्पष्ट होते. ओएलएक्स किंवा तत्सम वेबसाइटवरुन खरेदी करताना व्हॉटस् अॅप चॅटवर पाठविलेले आयडी प्रुफ किंवा मेसेज यावर विश्वास ठेवून ऑनलाइन पैसे भरू नका.

कुरिअर स्लिप तपासा

विक्रेत्याने साहित्य पाठविले आहे, असे सांगून कुरिअर स्लिप पाठवली असल्यास त्याची पडताळणी करून घ्या. त्या स्लिपवरील फोनवरुन फोन करुन ती कंपनी अस्तित्वात आहे का किंवा पूर्वी सेंड झालेली कुरिअर पावती असल्याची खात्री करा.

रिक्वेस्ट मनी लिंकची विनंती नकोच

ओएलक्सवर वस्तू खरेदीसाठी ई-वॉलेट किंवा यूपीआय, पेटीएम ई वॉलेटवर पे सेंड मनी पर्यायावर क्लिक करु नका.

नेहमी विश्वसनी वेबसाईटवरुनच खरेदी करा. वेबसाइटची विश्वसनीयता जाणून घेण्यासाठी त्या वेबसाइटचे पब्लिक रिव्हीव तपासा. ज्या वेबसाइट वर http:// असेल त्याच वेबसाइटवरुन शक्यतो खरेदी विक्री करावी.

समोर भेटल्यावर पैसे द्या

ओएलएक्स किंवा तत्सम वेबसाइटवरुन खरेदी करताना सार्वजनिक ठिकाणी भेटून व व्यवहार करणाऱ्या व्यक्तिची पडताळणी करूनच पैसे द्या.

सायबर गुन्हा घडल्यानंतर काय कराल

सर्वप्रथम जवळच्या पोलिस ठाण्यासोबत संपर्क साधा

ही तक्रार पोलिस स्टेशनकडून सायबरकडे पाठवा

बँक फ्रॉड तक्रारीसाठी बँकेचे स्टेटमेंट गरजेचे

डेबिट, क्रेडीट कार्डची झेरॉक्स अर्जासोबत जोडा

फेसबुक संदर्भातील तक्रार आक्षेपार्ह प्रोफाइलची यूआरएलसह प्रिन्ट, स्क्रिनशॉट जोडा

उपाययोजना

डेटा सुरक्षित करण्यासाठी अद्यावत अॅन्टिव्हायरस वापरा

सातत्याने पासवर्ड बदलत रहा

ऑनलाइन व्यवहारासाठी एकच पासवर्ड वापरू नका

मोबाइल स्मार्टफोनला पासवर्ड ठेवा

बँकेची महत्त्वाची माहिती मोबाइलमध्ये नको

क्रेडिट, डेबिटवरील १६ अंकी नंबर, पासवर्ड कोणालाही देऊ नका

पॅनकार्ड, आधारकार्ड, ओटीपीची माहिती दूरध्वनी, मोबाइलवरून देऊ नका

फसवे फोन कॉल आणि फसवे कारण सांगून अनेकांची फसवणूक होऊ शकते. फोनवर विचारणाऱ्या व्यक्तीला काहीही माहिती देऊ नका. जवळच्या बँक शाखेत तत्काळ संपर्क साधा.

संजय मोरे, पोलिस निरीक्षक, सायबर शाखा

भूमिका

दक्ष रहा...

आयुष्यभर कष्टाने कमविलेली रक्कम सायबर गुन्हेगारांकडून हातोहात लंपास केली जात आहे. काही ज्येष्ठ नागरिकांना डेबिट, क्रेडिट, मोबाइलमधील टेक्निकल माहिती नसल्याचा फायदा घेवून सायबर चोरांचा सुळसुळाट झाला आहे. काही कॉलेजचे तरुणही याला बळी पडत आहेत. हे रोखण्यासाठी बँक, सायबर शाखेने प्रबोधन वर्ग घेण्याची गरज आहे. फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांच्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा घेण्याची गरज आहे. फसवणुक टाळण्यासाठी ग्राहकांनी दक्ष राहण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती-नगरसेवकांना विज्ञान प्रदर्शनाचे वावडे

$
0
0

Appsaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर

महापालिकेत एखाद्या ठरावाला मान्यता असो की महत्वाच्या प्रकल्पाच्या मंजुरीसाठीची आढावा, नगरसेवकांची शंभर टक्के उपस्थिती असते. नगरसेवक काही कामानिमित्त बाहेरगावी असले तरी त्यांचे नातेवाईक जागा भरुन काढतात. नेत्यांचा कार्यक्रम असला तर नगरसेवकांचा फौजफाटा दिमतीला असतो. मात्र पालिकेच्याच शिक्षण समितीतर्फे भरविलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे नगरसेवकांना वावडे आहे की काय अशी स्थिती गुरुवारी पाहावयास मिळाली. शिक्षण समितीचा कार्यक्रम असूनही सभापती श्रावण फडतारे आणि उपसभापती सचिन पाटील यांनी उपस्थित राहण्याची तसदी घेतली नाही. शिक्षण समितीच्या नऊ सदस्यांनीही प्रदर्शनाकडे पाठ फिरवली. शिक्षण समितीनेही संयोजनात कंजुषीपणा दाखवत एका वर्गात उद्घाटनाचा कार्यक्रम उरकला.

पालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे ४५ वे शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविले होते. प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर विद्यामंदिरात दोन दिवसीय प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनसाठी महापालिकेचे सगळे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. मात्र महापौर सूरमंजिरी लाटकर आणि उपमहापौर संजय मोहिते वगळता अन्य लोकप्रतिनिधींच्या ध्यानीमनी हा विषय नसावा अशी स्थिती होती. महापौर लाटकर व उपमहापौर मोहिते यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सहभागी मुलांशी संवाद साधला. त्यांनी निर्माण केलेल्या उपकरणांचे कौतुक केले. कार्यक्रम सुरू असताना नगरसेविका छाया पोवार प्रदर्शनस्थळी आल्या.

मात्र ज्या शिक्षण समितीचा हा कार्यक्रम आहे, त्या समितीचे सभापती फडतारे, उपसभापती पाटील हे उद्घाटन सोहळ्यापासून लांब राहिले. शिक्षण समितीमध्ये नगरसेवक सुनील पाटील, प्रताप जाधव, दिपा मगदूम, अर्चना पागर, विजय खाडे आणि मनीषा कुंभार यांचा समावेश आहे. सभापती, उपसभापतीसह अन्य सदस्यांना, इतर समिती सभापतींना शिक्षण विभागाने रितसर निमंत्रण दिले होते. मात्र विज्ञान प्रदर्शनाला उपस्थित राहण्याचे, मुलांचे कौतुक करण्याचे सौजन्य नगरसेवकांना दाखविता आले नाही.

वास्तविक महापालिकेच्या शाळेतील शिक्षक हे खासगी शाळेच्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जात पटसंख्या वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. शैक्षणिक गुणवत्तेला शैक्षणिक उपक्रमांची जोड देत महापालिका शाळेकडे मुलांना आकर्षित करत आहेत. काही नगरसेवकांनी शाळांच्या या प्रयत्नांना साथ दिली आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला सभापती, उपसभापती व नगरसेवकांनी उपस्थिती दर्शवून शिक्षक व मुलांच्या प्रयत्नांना दाद दिली असती तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. शिक्षण विभागाने उद्घाटनाचा कार्यक्रम एखाद्या वर्गात आयोजित न करता मैदानात दिमाखात केला असता तर मुलांनाही ते नक्कीच आवडले असते. भविष्यात मुलांचा सहभाग वाढीस नक्कीच पोषक वातावरण निर्मिती झाली असती अशा भावना पालकवर्गातून व्यक्त होत आहेत.

....

अधिकारी वर्गाला सवड नाही

महापालिका व खासगी शाळेतील मुलांनी विज्ञान उपकरणाद्वारे शहर स्वच्छता, कचरा व्यवस्थापनसंबंधी लहान स्वरुपात वेगवेगळे प्रयोग केले आहेत. या प्रदर्शनासाठी आयुक्तांपासून अन्य अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना आमंत्रित केले होते. मात्र अधिकारी वर्गाला सवड मिळाली नाही. त्यांनी सवड काढून विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली असती तर मुलांच्या प्रयोगशीलतेची कल्पना आली असती, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकाराच्या घरी सापडले घबाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहकार विभागाने खासगी सावकारांविरोधात दंड थोपटले असून पोलिस बंदोबस्तात गुरुवारी जिल्ह्यातील बारा खासगी सावकारांच्या १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत मोठे घबाड मिळाले असून रोख २५ लाख रुपये, सोन्याचांदीचे दागिने, कार, कोरे चेक आणि स्टँप, खरेदी पत्रे, संचकार पत्रे मिळाली. कोरे चेक आणि स्टँप पेपरवर असलेल्या सह्यांची खातरजमा करुन आणि खरेदीपत्रे, संचकार पत्रांची तपासणी करुन संशयितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

सावकरांविरोधात तक्रार आल्यानंतर सहकार खात्याच्या १६ पथकांनी छापे टाकले. सहाय्यक निबंधक, अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथके सकाळी नऊ वाजता सावकारांच्या घरी पोचली. पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक पथकात दोन पुरुष आणि एका महिला कर्मचारी सहभागी होती. कारवाईत सहकार आणि पोलिस खात्याचे प्रत्येकी ५२ कर्मचारी सहभागी झाले.

शहरातील नारायणराव गणपतराव जाधव याच्या उद्यमनगर, कळंबा या ठिकाणी छापे टाकण्यात आले. उद्यमनगरातील त्याच्या घरी रोख २५ लाख रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने, खरेदी खत सापडले. अधिकाऱ्यांनी प्राप्तीकर खात्याशी संपर्क साधून रोख रक्कमेची कल्पना दिली. त्यांनी पुण्यातील मुख्यालयाशी संपर्क साधून रोख रक्कमेबाबत मार्गदर्शन मागितले आहे. त्यानंतर रोख रक्कमेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जप्त केलेली रक्कम, दागिने, कार आणि कागदपत्रांचा सरकारी पंचांसमोर पंचनामा करण्यात आला. जाधव याचा मुलगा तुळशीदास, नातू अभिजीत यांचा राजारामपुरीतील बंगला, पाच बंगल्याजवळील यश टायर्स, कळंबा,अंबप येथे छापे टाकण्यात आले. त्यांच्या बंगल्यात आठ कोरे चेक, दोन चेकवर रक्कम, कोरे स्टँप सापडले. अभिजीतच्या टायर शोरुममध्ये १७ खरेदीखते मिळाली.

लोणार गल्लीतील राहुल अवधूतच्या घरी एक कोरा धनादेश आणि एक स्टँपपेपर सापडला. राधानगरी येथील सावकार आनंदा शामराव चिंबरे यांच्या घरी कोरे स्टँप मिळाले. चिंबरे स्वत: स्टँप व्हेंडर असले तरी जुने तारखेचे स्टँप सापडल्याने त्यांच्यावर संशय बळावला आहे. चिमगांवच्या (ता. कागल) अरविंद एकल याच्या घरी सहा खरेदी दस्त आणि आठ संचकार पत्रे सापडली आहेत. मुरगूडच्या (ता. कागल) संजीवकुमार सूर्यवंशी याच्या घरी तक्रारदाराचा खरेदीदस्त मिळाला आहे. कूरच्या (ता. भुदरगड) विजय नामदेव पाटील यांच्या घरी दोन कोरे चेक मिळाले आहेत. मुधाळतिट्टाच्या (ता. कागल) तानाजी कृष्णा पाटील याच्या घरी तक्रारदारांची कार मिळाली असून कारची कागदपत्रेही अधिकाऱ्यांना मिळून आली. अनिल चव्हाण, मारुती जाधव, बबन घुंगरे, दगडू शेणवी यांच्या घरी काहीच मिळून आले नाही.

महाराष्ट्र सावकारी कायदा अधिनियम २०१४ कलम १६ आणि १७ नुसार अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांविरोधात छापा टाकून कागदपत्रांची तपासणी, चौकशी करुन फौजदारी करण्याचा अधिकार असल्याचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी सांगितले.

........

सावकार असलेल्या फुटबॉलपटूवरही कारवाई

टेंबे रोडवरील किशोर आणि रुपेश सुर्वे यांच्या घरी १७ कोरे चेक आणि तीन कोरे स्टँप मिळाले आहेत. रुपेश सुर्वे हा फुटबॉल खेळाडू असून तो पाटाकडील तालीम मंडळाकडून खेळतो. यापूर्वी सुर्वे पितापुत्रांवर फौजदारी गुन्हाही नोंद झाला आहे.

....

तक्रारदाराच्या नावाबाबत गुप्तता

तक्रारदाराने सहकार विभाग, पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारकडे अर्ज दाखल केला आहे. तक्रारदाराने राजारामपुरी पोलिस ठाण्यातही तक्रार दिली आहे. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात आले असून सहकार खात्याने धडक कारवाई केली.

........

जिल्ह्यात २५५ अधिकृत सावकार

सहकार खात्याने जिल्ह्यातील २५५ सावकारांना कायद्यानुसार परवाना दिला आहे. पण गुरूवारी धाड टाकलेल्या एकाही सावकाराने परवाना घेतलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर खासगी सावकार कायद्यानुसार गुन्हा नोंद होणार आहे. सावकारांच्याविरोधात सहकार खात्याकडे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

....

सावकाराचे नाव जप्त केलेला मुद्देमाल

नारायण जाधव २५ लाख रुपये, दागिने

तुळशीदास आणि अभिजीत जाधव दोन कोरे चेक, नऊ कोरे बाँड, १७ खरेदी खत

किशोर आणि रुपेश सुर्वे १७ कोरे चेक, तीन बाँड

राहुल अवधूत एक कोरा चेक, एक बाँड

आनंदा चिंबरे ३० जुने स्टँप

अरविंद एकल सहा खरेदी खत, आठ संचकार पत्रे

संजीवकुमार सूर्यवंशी तक्रारदाराचे खरेदी दस्त

विजय पाटील दोन कोरे चेक

तानाजी कृष्णा पाटील तक्रारदाराची कार आणि कागदपत्रे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवारांच्या वाढदिनानिमित्त उपक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमत्त पक्षाच्या शहर व जिल्हा शाखेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. पक्षातर्फे स्वाभिमान सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जिल्हा राष्ट्रवादीतर्फे पवार यांच्या जीवनकार्यावरील ८० पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गडमुडशिंगी येथील विठ्ठल मंदिरात केक कापण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्यावतीने १०१ गरीब व गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आले. यावेळी आप्पासाहेब धनवडे, नंदकुमार गोंधळी, सचिन पाटील, संतोष कांबळे, माधुरी कांबळे, रावसाहेब पाटील, राजू ठमके आदी उपस्थित होते. तसेच साळोखे यांच्यावतीने हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्डमध्ये खाऊ वाटप करण्यात आले. मुडशिंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलमधील गरीब मुलांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरित करून वृक्षारोपणाचा कार्यक्रमही झाला.

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षातर्फे १२ ते १९ डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहातंर्गत ग्लोबल वार्मिंगविरोधात लोकांमध्ये जनजागृती, पर्यावरणाचे महत्व, वृक्षारोपण, आरोग्य आणि खेळांना चालना असे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष साळोखे यांनी सांगितले. दरम्यान, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अंधशाळा येथे भोजन वाटप झाले. महापौर सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते भोजन वाटप झाले. यावेळी शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजेश लाटकर, आदिल फरास, संग्राम साळोखे, सुहास साळोखे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा जहिदा मुजावर आदी उपस्थित होते. जयकुमार शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ खासगी सावकारांवर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गरजूंना व्याजाने दिलेल्या पैशावर अव्वाच्या सव्वा व्याज आकारून सर्वसामान्यांची नाडणाऱ्या खासगी सावकारांविरोधात सहकार खात्याने कडक पाऊल उचलले आहे. कारवाईचा पहिला टप्पा म्हणून जिल्ह्यातील १२ खासगी सावकारांवर गुरुवारी पोलिस बंदोबस्तात छापे टाकण्यात आले. कोल्हापूर शहर, राधानगरी, मुरगुड, कूर, मुधाळतिट्टा, गारगोटी, गंगापूर, चिमगाव आदी १६ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. या कारवाईत रोख २७ लाख रुपये, सोन्याचांदीचे दागिने, कार, कोरे चेक, कोरे स्टँप पेपर आणि संचकार पत्रे अशी कागदपत्रे मोठ्या प्रमाणात सापडली. या कारवाईमुळे सावकारांचे धाबे दणाणले आहेत. पुढील तीन दिवस ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

नारायण गणपतराव जाधव (रा. शिवाजी उद्यमनगर) त्यांचा मुलगा तुळशीदास जाधव, नातू अभिजीत जाधव (दोघे, १२ वी गल्ली, राजारामपुरी), किशोर बाबूराव सुर्वे, रुपेश किशोर सुर्वे (दोघे, रा. टेंबे रोड, शिवाजी स्टेडियमजवळ) राहुल रमेश अवधूत (लोणार गल्ली, शनिवार पेठ), आनंदा शामराव चिबडे (राधानगरी), बबलू उर्फ बबन घुंगरे पाटील, दगडू शेणवी, संजीवकुमार बाजीराव सूर्यवंशी (तिघे, मुरगूड, ता. कागल), अरविंद शिवाजी एकल (चिमगाव ता. कागल), विजय नामदेव पाटील (कूर, ता. भुदरगड), तानाजी कृष्णा पाटील (मुधाळतिट्टा, ता. भुदरगड), अनिल चव्हाण (गारगोटी), मारुती जाधव (रा. गंगापूर, ता. भुदरगड) अशी कारवाई झालेल्या संशयित सावकारांची नावे आहेत.

पोलिस, सहकार विभागासह राज्य सरकारकडे या खासगी सावकारांविरोधात एका तक्रारदाराने तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार गुरुवारी कारवाई करण्यात आली. सकाळी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील जिल्हा निबंधक कार्यालयजवळ पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ४८ पोलिस दाखल झाले. कारवाईचे स्वरूप ठरवण्यात आले. त्यानंतर संबंधित सावकार घरातून बाहेर पडण्यापूर्वी तातडीने पोलिस सरंक्षणात सहकार खात्याने सावकारांच्या घरावर छापे टाकले. राजारामपुरी बारावी गल्ली आणि उद्यमनगरातील नारायण जाधव आणि त्यांचा मुलगा तुळशीदास जाधव यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. तानाजी कृष्णा पाटीलच्या घरी तक्रारदारांची कार आणि कारची कागदपत्रे मिळाली. पाटीलने कर्ज न दिल्याने तक्रारदारांची कार ओढून आणली आहे.

.. .. .

एकाच सावकाराकडे २७ लाखाची रोकड

नारायण जाधव यांच्या घरी रोख २७ लाख रुपये आणि सोन्याचांदीचे दागिने, खरेदी खत सापडले. त्यांचा मुलगा तुळशीदास आणि नातू अभिजीत यांचा घरी आठ कोरे चेक, स्टँप सापडले. अभिजीतचे पाच बंगला येथे टायर विक्रीचे शोरुम आहे. त्या ठिकाणी १७ खरेदी खत मिळाली. अनिल चव्हाण, मारुती जाधव आणि बबन घुंगरे यांच्यासह अन्य सावकारांच्या घरात कोरे चेक, कोरे स्टँप, खरेदी खत आणि संचकार पत्रे मिळाली.

००००००

सहकार खात्याकडून सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. रोख रकमेबाबत प्राप्तिकर विभागाला कळवले आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचनेनुसार पुढील कारवाई होणार आहे. संशयित सावकारांचे जबाब घेऊन ते दोषी आढळल्यावर त्यांच्यावर सावकारकी कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक

. .. .. . .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images