Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

युवा संगीतकारांसाठीशिष्यवृत्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस एनसीपीए आणि सिटी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संगीतकारांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा केली आहे. हिंदुस्थानी संगीताच्या गायकी, ख्याल, द्रुपद, मेलडी, सतार, सरोद, व्हायोलिन, बासरी, हार्मोनियमच्या अद्ययावत प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. १८ ते ३५ वर्षे वयोगटातील कलाकार यासाठी अर्ज करू शकतात.

३१ डिसेंबर, २०१९ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा १० हजार रुपये आहे. शिष्यवृत्तीचा कालावधी हा एप्रिल २०२० ते मार्च २०२१ असा आहे. इच्छुकांनी आपली माहिती ncpascholarships@gmail.com ईमेलवर किंवा सिटी एनसीपीए स्कॉलरशिप फॉर यंग म्युझिशियन्स २०२०-२१ हिंदुस्थानी संगीत असे पाकिटावर नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस, एनसीपीए मार्ग नरिमन पॉईंट मुंबई ४०००२१ या पत्त्यावर पाठवावे. अर्जात उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, पत्ता, संपर्क क्रमांक, व्यावसायिक पात्रता, मेल आयडी, संगीत शिक्षक, आतापर्यंतची कामगिरी, पारितोषिके याबाबतची माहिती द्यावी, असे संस्थेने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवाजी मार्केटमधील लिफ्ट अखेर सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एक वर्षापासून महापालिकेच्या शिवाजी मार्केटमधील बंद असलेली लिफ्ट अखेर बुधवारी सुरू झाली. नुतनीकरण करण्यात आलेल्या लिफ्टचे उद्घाटन महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर व उपमहापौर संजय मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयात दुसऱ्या मजल्यापासून चौथ्या मजल्यापर्यंत महापालिकेची विविध कार्यालये आहेत. कार्यालयीन कामांसाठी दररोज अभ्यागतांचा राबता सुरू असतो. कार्यालयात प्रवेश करण्यासाठी यापूर्वी अभ्यागतांना लिफ्टची सुविधा देण्यात आली होती. पण त्यानंतर जुलै २०१८ मध्ये लिफ्ट बंद पडली. बंद लिफ्टमुळे विविध कार्यालयीन कामासाठी पोहोचताना अभ्यागतांची चांगलीच दमछाक होत होती. ज्येष्ठ नागरिकांना तर प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. लिफ्ट सुरू करण्यासाठी तब्बल सहावेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली. पण निविदेला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर १७ लाख २५ हजार रकमेच्या क्रिस्टल कंपनीची निविदा मंजूर झाली. आणि तब्बल दीड वर्षानंतर लिफ्टचे काम पूर्ण झाले.

बुधवारी नवीन लिफ्टचे उद्घाटन महापौर, उपमहापौरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका उमा बनसोडे, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, कनिष्ठ अभियंता निवास पोवार, विद्युत रोहन डावखर, क्रिस्टल कंपनीचे महेश सूर्यवंशी, सागर भगत, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतेज कृषी प्रदर्शन उद्यापासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कृषी विश्वातील नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना एकाच छताखाली देण्यासाठी ६ ते ९ डिसेंबर दरम्यान तपोवन मैदान येथे 'सतेज कृषी २०१९' प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी चार वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या व्याख्यानांबरोबर पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे,' अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

आमदार पाटील म्हणाले, 'प्रदर्शनाचे तिसरे वर्ष असून, शेतकऱ्यांचा नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञानयुक्त माहितीमुळे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, २२५ पेक्षा अधिक कृषी कंपन्या आणि २०० पेक्षा जास्त पशुपक्ष्यांचा समावेश करण्यात आला आहे. शेती अवजारे, बी-बियाणे, खते, फुलांचे प्रदर्शन व विक्रीचा समावेश केला आहे. त्याचबरोबर महिला बचत गटांसाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्कही उभारण्यात आला आहे.'

'पशुपक्षी व जनावरांचे दालन उभारण्यात आले आहे. गाय, म्हैस, घोडा, कोंबड्या, आदींच्या विविध प्रजातींच्या जनावरांचा प्रदर्शनात समावेश केला आहे. त्याचवेळी कृषिपूरक व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेदहा वाजता सुरेश माने-पाटील 'एकरी १२५ टन ऊस शेती'च्या तंत्राची माहिती देणार आहेत. त्याचदिवसी गोविंदे हांडे गटशेतीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी (ता. ८) सकाळी साडेदहा वाजता नवनाथ कसपरे 'आर्थिकदृष्ट्या किफायतशीर सीताफळ लागवड', त्यानंतर डॉ. राजेंद्र हासुरे 'पूरबुडित उसाचे नियोजन' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत,' असे आमदार पाटील यांनी सांगितले.

पत्रकार बैठकीस आमदार ऋतुराज पाटील, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, बाजार समिती संचालक दशरथ माने, विलास साठे, करवीर पंचायत समितीचे उपसभापती संदीप पाटील, बाबासाहेब चौगुले, शशिकांत खोत, प्रा. जयवंत जगताप यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

००००

पीक उत्पादन स्पर्धेचे आयोजन

प्रदर्शनात भाजीपाला, फळे, ऊस आदी पीक उत्पादनाच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ३,००१, २,५०१ व २,००१ रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. ऊस पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व साखर कारखान्यांना उत्पादकांची यादी देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. गेल्यावर्षीच्या प्रदर्शनात ग्राहक ते शेतकरी या माध्यमातून घेतलेल्या तांदूळ महोत्सवातून ३० टन विक्री झाली होती. यावर्षी ४० टन तांदूळ विक्रीसाठी ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवारी बैठक

$
0
0

कोल्हापूर: जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे. या समितीअंतर्गत लोक जैव विविधता नोंदवही तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने तांत्रिक गटाची स्थापना करण्यासाठी मंगळवारी (ता. १०) पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांची जिल्हा परिषदेत बैठक होणार आह. जि. प. मधील 'स्वर्गीय वसंतराव नाइंर्क सभागृह' येथे दुपारी चार वाजता बैठक आयोजित केली आहे. कृषीशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पशुवैद्यशास्त्र, वन, वन्यजीव, पर्यावरण व जैवविविधतेशी संबंधित तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी व्यक्तीगत माहितीसह (बायोडाटा) उपस्थित राहावे. जैव विविधता नोंदवही तयार करण्यासाठी जिल्ह्यातील ज्या स्वयंसेवी संस्थेकडे मनुष्यबळ आहे अशा संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात. ते बैठकीत आजवर केलेल्या कामाचे सादरीकरण करू शकतात. अधिक माहितीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग, उपवनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग यांचे कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट ग्राम’साठी योगदान देणाऱ्यांचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हातकणंगले तालुक्यातील माणगाव हे 'स्मार्ट ग्राम' ठरले आहे. गावाला 'स्मार्ट ग्राम'बनविण्यासाठी आपआपल्या परीने योगदान देणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते सत्कार झाला. गावच्या विकासात सक्रिय सहभाग घेणाऱ्यांना आभारपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

ग्रामपंचायत, विविध संस्था व नागरिकांच्या सहाय्यातून माणगावमध्ये वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली आहे. माणगाव फाटा ते वडाप थांबापर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजूला वीस फुट उंचीची ३५० रोपांची लागवड केली आहे. या सर्व रोपांना ट्री गार्ड बसविण्यासाठी माणगाव नागरी सहकारी पतसंस्थेने जवळपास दहा लाख रुपये खर्च केले आहेत. याबद्दल पतसंस्थेचे प्रमुख मार्गदर्शक जे. आर. पाटील, चेअरमन अप्पासाहेब व्हनवाडे, व्हाइस चेअरमन संजय जोग यांचा पदाधिकाऱ्यांचा सीईओंच्या हस्ते सत्कार झाला. याप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम, जि. प. सदस्य राहुल आवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, माजी उपसरपंच राजू मगदूम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत घरफाळाप्रश्नीदोन दुकानगाळे सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर्थिक वर्षातील वसुलीचे उद्दिष्ट पार करण्यासाठी महापालिकेच्या घरफाळा विभागाने वसुली मोहीम तीव्र केली आहे. बुध‌वारी या मोहिमेतंर्गत एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेले दोन दुकानगाळे सील करण्यात आले. दत्तात्रय महादेव हेर्लेकर व प्रदीप रामचंद्र देशिंगे यांच्यावर पथकांने थकीत घरफाळाप्रश्नी कारवाई केली. तसेच एक लाख ६४ हजाराचा घरफाळा वसूल केला.

महापालिकेच्या सर्वच विभागाची वसुली असमाधानकारक असल्याने थकीत रक्कमेप्रश्नी कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले आहेत. त्यानुसार घरफाळा व पाणीपुरवठा विभागाने वसुली मोहीम तीव्र करताना मिळकती सील अथवा पाणी कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई सुरू केली आहे. बुधवारी कोटी शाळा येथील हेर्लेकर यांच्याकडे एक लाख सहा हजार व कपीलतीर्थ मार्केट येथील देशिंगे यांच्याकडे एक लाख चार हजार थकबाकी असल्याने दोन्ही दुकानगाळे घरफाळा विभागाच्या पथकाने सील केले. तसेच अनंत इस्टेट, गणेश बिल्डर्स, प्रदीप देशिंगे, बापू साळी व अशोक माने यांच्याकडून एक लाख ६४ हजाराचा थकीत घरफाळा वसूल केला. कर अधीक्षक विशाल सुगते, क्लार्क रमेश गायकवाड, सुभाष ढोबळे, श्रीकांत चव्हाण, गणेश भोसले यांच्या पथकांने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटणाचा दर ५४० रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मटण व्यावसायिकांनी कोल्हापूरच्या नागरिकांचा विचार करून व कृती समितीच्या सदस्यांचा मान ठेवून मटणाचा दर प्रतिकिलो ५६० वरून ५४० रुपये करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती खाटीक समाजाचे अध्यक्ष शिवाजी घोटणे व चिटणीस बाळासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मटण दरवाढीवर मार्ग काढण्यासाठी नेमलेल्या समन्वय समितीत सहभागी होण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली.

खाटीक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मटण दरवाढीमागील कारणे सांगितली. ते म्हणाले, 'कोल्हापूरचे नागरिक व मटण विक्रेते यांचे नाते खूप जुने आहे. कोणताही मटण व्यावसायिक मनात आले म्हणून मटणाचे दर वाढवित नाही. ही दरवाढ कृत्रीम नाही. हा व्यवसाय पूर्णपणे नैसर्गिक उत्पादनांवर अवलंबून आहे. दरम्यान यंदाची अतिवृष्टी, महापुरामुळे बकऱ्यांची उपलब्धता कमी झाली आहे. बकऱ्याची खरेदी करताना वजन अंदाजावर ठरते. दुसऱ्या जिल्ह्यातून बकरी आणताना प्रत्येक नगामागे साधारण २०० रुपये खर्च होतो. इचलकरंजी, जयसिंगपूर, शाहूवाडी कागल येथे मटणाचा दर प्रतिकिलो ५६० इतका आहे.'

दरम्यान मटण दरवाढ विरोधी कृती समितीचे अॅड. बाबा इंदूलकर यांनी मटण व्यावसायिकांनी समन्वय समितीला डावलून एकतर्फी निर्णय करणे चुकीचा असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात शुक्रवारी (ता. ६)पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींची पुन्हा बैठक होणार असल्याचे कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापक महासंघाचे ७ रोजी अधिवेशन

$
0
0

कोल्हापूर: अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाचे ३० वे वैधानिक अधिवेशन भुवनेश्वर येथे ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या अधिवेशनात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व भारतीय उच्च शिक्षण या विषयावर चर्चासत्र होणार आहे. अधिवेशनासाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे डॉ. आर. एच. पाटील, डॉ. डी. एन. पाटील, डॉ. सुभाष जाधव, डॉ. अरुण पाटील, गजानन चव्हाण, डॉ. शंकर पवार, डॉ. आर. जी. कोरबू, ए. बी. पाटील, युवराज पाटील, यू. ए. वाघमारे, प्रकाश कुंभार, डॉ. एस. ए. बोजगर, डॉ. अशोक कोरडे, एस. जी. पाटील आदी सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाहेरच्या चपलांची आवक थांबणार कधी?

$
0
0

मालिका भाग ३ - 'कोल्हापुरी'ला घरघर

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : 'जीआय' मानांकन मिळूनही कोल्हापूरबाहेर तयार होणाऱ्या बनावट कोल्हापुरी चपलांवर आक्षेप घेतले जात नाहीत. जोपर्यंत बाहेरून येणारी चपलांची आवक थांबत नाही, तोपर्यंत स्थानिक व्यावसायिकांवर परिणाम सुरूच राहणार आहेत. बनावट चप्पल विक्री रोखण्यासह कोल्हापुरातील व्यावसायिकांना बाजारातील नव्या तंत्रांचा स्वीकार करावा लागणार आहे. अन्यथा घरघर लागलेला चप्पल व्यवसाय लयाला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोल्हापुरी चपलांनी 'जीआय' मानांकन मिळवले ही नक्कीच कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, कोल्हापूरसह कर्नाटकनेही कोल्हापुरी चपलाचे जीआय मानांकन मिळवले. कोल्हापूरबाहेर चपलाचे जीआय मानांकन देणे म्हणजे कोल्हापुरीसाठी अधिकृत स्पर्धा तयार करण्याचाच भाग आहे. कर्नाटकला जीआय मानांकन जाहीर झाल्यानंतर गेल्या वर्षभरात महाराष्ट्र सरकारने किंवा एकाही चप्पल व्यावसायिकाने कोर्टात धाव घेतली नाही. विरोध होत नसल्याने बाहेरच्या राज्यातून येणारी चपलांची आवक दिवसेंदिवस वाढतच आहे. जोपर्यंत जिल्ह्याबाहेर कोल्हापुरी चपलांची निर्मिती सुरू राहील, तोपर्यंत स्पर्धा कायम राहणार आहे. विशेष म्हणजे या चपला कुठेही तयार झाल्या तरी याची बाजारपेठ कोल्हापुरातच आहे. कोल्हापूर हेच विक्रीचे प्रमुख केंद्र असल्याने कर्नाटकसह राजस्थानातील चपलांची कोल्हापुरात आवक वाढत आहे. बाहेरून रोज सुमारे दीड हजार जोड कोल्हापुरात येतात. यातून रोज पाच ते सात लाखांची उलाढाल होते.

अवैध विक्रीला आळा घालण्याचे काम महापालिकेकडूनही होऊ शकते. विना परवाना दुकाने आणि फूटपाथवरील अवैध विक्री रोखली तरी स्थानिक व्यावसायिक आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, यासाठी महापालिका प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव जाणवतो. अतिक्रमण निर्मूलन विभागाने काही दिवस कारवाई केल्यास बनावट चप्पल विक्रीस आळा बसू शकतो. महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग विकास महामंडळ म्हणजेच लिडकॉमने या कामासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कर्नाटकने मिळवलेल्या जीआय मानांकनावर हायकोर्टात आक्षेप घेतल्यास त्याच्या अवैध निर्मितीलाच लगाम लागू शकतो. यातून बनावटगिरी रोखण्यासह स्थानिक चपलांना बाजारपेठ मिळणार आहे. फूटवेअर ओसिएशनसह, लिडकॉम आणि कोल्हापूरच्या नागरिकांनाही यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. अन्यथा येणाऱ्या काळात स्थानिकांचा कोल्हापुरी चप्पल व्यवसाय इतिहास जमा होण्याची भीती वर्तवली जात आहे.

नव्या तंत्रांचा वापर गरजेचा

ग्राहकांना कोल्हापुरी चपलांचे आकर्षण आहे. देश-विदेशातील ग्राहक कोल्हापुरी चपलांच्या खरेदीसाठी उत्सुक आहे. मात्र, या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यावसायिक आणि विक्रेत्यांना नवीन तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करावा लागणार आहे. पुणे, मुंबईसह कोल्हापुरातील काही तरुणांनी ऑनलाइन मार्केटचे प्रयोग यशस्वी करून दाखवले आहेत. ग्राहकांची आवड आणि मागणी ओळखून मार्केटिंगच्या तंत्रात काळानुसार बदल केल्यास चप्पल विक्री व्यवसायातही भविष्य आहे. मात्र, यासाठी वेळीच नव्या तंत्रांचा स्वीकार करावा लागेल.

लिडकॉमकडून चप्पल व्यावसायिकांना प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. बाहेरच्या राज्यातील कोल्हापुरी चपलांची आवक थांबवण्यासाठी सरकारी पातळीवर धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. व्यावसायिकांच्या सूचना आणि अपेक्षा आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवू.

- एन. एम. पवार, व्यवस्थापक, लिडकॉम, कोल्हापूर

कोल्हापुरी चप्पल व्यवसाय टिकवणे आणि वाढवण्यासाठी विविध पातळ्यांवर काम करण्याची गरज आहे. यात लिडकॉमची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी तातडीने कर्नाटकच्या जीआय मानांकनावर आक्षेप घ्यावा. जोपर्यंत बाहेरच्या राज्यातील चप्पल निर्मिती थांबणार नाही, तोपर्यंत आ‌वक सुरूच राहील.

- भूपाल शेटे, चप्पल व्यावसायिक, माजी महापौर

(समाप्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमला कॉलेजच्या ‘स्वायत्तते’साठी प्रयत्न

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ताराराणी विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थिनींच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन १६ फेब्रुवारी २०२० रोजी केले असून संस्थेच्या स्थापनेपासून १९४५ पासूनच्या सर्व बॅचच्या एक हजारांहून अधिक विद्यार्थिनी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. कोणत्याही संस्थेच्या माजी विद्यार्थिनीने मेळाव्यात सहभागासाठी https://forms.gle/1LNw7xvSsmcHi1tPA या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, कमला कॉलेजच्या स्वायत्ततेसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, 'ताराराणी विद्यापीठाची स्थापना १९४५ साली झाली. यंदा संस्था अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा घेऊन विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात येणार आहे. वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. संस्थेच्या कमला कॉलेज, उषाराजे हायस्कूल, डीएड कॉलेज, कडगाव येथील कुमार भवन, प्रिन्स शिवाजी विद्यालय येथील विद्यार्थिनींना एकत्र येण्याची पर्वणी मेळाव्यामुळे मिळणार आहे.'

'येत्या वर्षात संस्थेतर्फे काही संकल्प करण्यात आले आहेत. यामध्ये साडेतीन कोटी रुपये खर्च करून विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. हे वसतिगृह सौरऊर्जेवर अद्ययावत करण्यात येणार आहे. कमला कॉलेज स्वायत्त करण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये वाढ करण्यात येणार असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेची उभारणी करण्यात येणार आहे.'

पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष एस. एम. पवार, अशोकराव पर्वते-पाटील, मुख्याध्यापिका यू. एस. साठे, प्रभारी प्राचार्य तेजस्विनी मुडेकर, मुख्याध्यापिका विद्या यादव, डॉ. सुजय पाटील, प्रा. अनिल घस्ते, प्रा. एस. ए. साळोखे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायोमायनिंग प्रकल्प मार्चपासून

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'कचरा समस्येवर बायोमायनिंग प्रकल्प ही कायमस्वरुपी उपाययोजना आहे. निविदा प्रक्रिया पार पाडून डिसेंबरअखेर वर्कऑर्डर दिली जाईल. साधारणपणे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मशिनरी उपलब्ध होऊन मार्च महिन्यात प्रकल्प कार्यान्वित होईल. दीड-दोन वर्षांत कसबा बावडा रोडवरील साडेपाच ते सहा टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन हा परिसर कचरामुक्त होईल,' अशी ग्वाही महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

शहरातील कचऱ्याची समस्या, कसबा बावडा रोडवरील कचऱ्याच्या डोंगरामुळे निर्माण झालेली आरोग्य समस्या आणि शहरातील प्लास्टिक बंदी यांप्रश्नी शिवसेनेचे पदाधिकारी, महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी, 'कसबा बावडा रोडवरील कचऱ्याचे डोंगर, कचऱ्याने सातत्याने पेट घेतल्यामुळे परिसरात पसरणारी दुर्गंधी आरोग्यासाठी घातक आहे. स्फोटकासारखी स्थिती निर्माण झाली असून माणसे दगावण्यास सुरुवात झाल्यावर प्रशासन उपाययोजना करणार का?' असा सवाल अधिकाऱ्यांना केला.

याबाबत, केंद्र सरकारकडून 'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत महापालिकेला निधी उपलब्ध झाला आहे असे सांगत आयुक्त कलशेट्टी व आरोग्य अधिकारी दिलीप पाटील यांनी बायोमायनिंगची माहिती दिली. 'बायोमायनिंग प्रकल्प हा १९ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे संपूर्ण कचऱ्याची चाळण होईल. तीन विभागांत विभाजन होईल. यामध्ये शेतीसाठी खत निर्मिती, प्लास्टिक बाजूला करून आरडीएफ प्लान्टकडे वर्ग व शिल्लक इनर्ट मटेरियल महापालिकेने विकसित केलेल्या प्रकल्पात टाकला जाईल. बायोमायनिंग प्रकल्पामुळे संपूर्ण परिसर कचरामुक्त होईल. भविष्यकाळात कचरा संकलनासाठी शहरात चार केंद्रे निश्चित केली जाणार आहे,' असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवसेनेचे पदाधिकारी शिवाजी जाधव, अवधूत साळोखे, दत्ता टिपुगडे आदीनी चर्चेत सहभाग घेतला.

इतर अधिकारी लागणार कामाला

शहरातील अनेक भागात प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर होत असल्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणले. त्यावर आयुक्तांनी, 'प्लास्टिकविरोधी मोहिमेत मी स्वत: उतरणार आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्लास्टिक विरोधी मोहिमेत सहभागी होण्याच्या सूचना केल्या आहेत. कारवाई आणखी तीव्र केली जाईल,' असे सांगितले. उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे यांनी महापालिकेतील इतर अधिकाऱ्यांची शहराप्रती काही जबाबदारी आहे की नाही? नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हे अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन काम करत नाहीत. मोहिमेत सहभागी होत नाहीत' अशी तक्रार केली.

प्लास्टिक पिशव्यांचा गांधीनगर डेपो

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांना प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईबाबत विचारणा केली. याबाबत गायकवाड म्हणाले, 'गडमुडशिंगी येथील दोन कंपन्या सील केल्या आहेत. सीमाभागातून प्लास्टिकची मोठी उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे. गांधीनगर तर प्लास्टिक पिशव्यांचा डेपो आहे. जिल्हा परिषद, प्रांत कार्यालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत संयुक्त कारवाई गरजेची आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना पत्रे दिली आहेत.'

त्यावर संजय पवार यांनी, 'अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करावी, अन्यथा शिवसेना प्लास्टिक विरोधात आंदोलन सुरू करेल. जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद मार्गावर मानवी साखळी आंदोलन करू,' असा इशारा दिला.

फोटो ओळी, शहरातील कचऱ्याचा प्रश्न आणि प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईत धरसोडपणा याप्रश्नी शिवसेनेच्या शिष्टमंडळांनी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, आरोग्यधिकारी दिलीप पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्यासोबत चर्चा केली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, अवधूत साळोखे, दत्ता टिपुगडे, हर्षल सुर्वे आदींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओला दुष्काळ जाहीर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मागील सरकारने काय केले हे आम्ही विचारणार नाही. तुम्ही सत्तेवर आला आहात. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी पेलली पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांना केव्हा मदत करणार आहात?' असा सवाल प्रा. एन. डी. पाटील यांनी राज्य सरकारला गुरुवारी केला. महापूर, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात येणार आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शिरोळ येथे १२ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय शेतकरी मेळावा, आयोजित केला आहे, अशी माहिती प्रा. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने शिरोळ येथे सर्वपक्षीय शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्याची माहिती देताना प्रा. पाटील म्हणाले, 'शेतकऱ्याला अपुरी मदत मिळाली असल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे सरकार शेतकऱ्यांचे आहे, असे सांगतात. शेतकऱ्याला अग्रहक्क देणार असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी आपले विधान कृतीत आणले पाहिजे. महाविकास आघाडीने सरकार बनवले असून मंत्रिमंडळही निवडले आहे. त्यांना थोडा वेळ मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या हातात लवकरात लवकर कसे पैसे पडतील हे सरकारने पाहिजे पाहिजे.'

सरकार मदत देईल म्हणून आम्हाला स्वस्थ बसून चालणार नाही, असे सांगून प्रा. पाटील म्हणाले, 'सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी शिरोळ येथे सर्वपक्षीय मेळावा घेणार आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, पाणीपट्टी रद्द करावी, अशी आमची प्रमुख मागणी राहणार आहे. महावितरण कंपनीने अनेक ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर, तुटलेल्या वायर, पडलेले विद्युत पोल आणि विद्युत साहित्याची दुरुस्ती केलेली नाही. या सर्व प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकरी मेळाव्याला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.' पत्रकार परिषदेला विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, आर. जी. तांबे, चंद्रकांत पाटील, सुभाष शहापुरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारी मेळावा

$
0
0

कोल्हापूर: सारस्वत विकास मंडळ, कोल्हापूरतर्फे रविवारी (ता. ८) सारस्वत वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. दसरा चौक येथील सारस्वत बोर्डिंगच्या सभागृहात दुपारी एक वाजता मेळाव्याला सुरुवात होईल. नावनोंदणी त्याच दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. इच्छुक वधूवरांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असेही पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडचणीत आलेला ‘सहकार’ वाचवा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारकडून सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याची भावना या क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. आता नव्याने सत्तारुढ झालेल्या महाविकास आघाडीकडून सहकारातील बँका, पतसंस्था, साखर कारखाने, दूध संघ, बाजार समित्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अडचणीत आलेल्या सहकारी संस्थांना नवीन सरकार नक्कीच मदत करेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

धोरणांमध्ये लवचिकता आणा

गेली तीन वर्षे साखरेचे दर कोसळल्याने साखर उद्योग प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे साखर उद्योगाचे जाणकार आहेत. कारखान्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करतील. कर्जांची पुनर्रचना करून कारखान्यांना सवलती देण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांत कारखान्यांवर मोठी बंधने आणली गेली. त्यातून नुकसान झाले. या सरकारकडून धोरणात लवचिकता आणली जाईल, असा विश्वास वाटतो.

- नेताजी पाटील, कार्यकारी संचालक, मंडलिक कारखाना

दूध संघांमध्ये हस्तक्षेप नको

सहकारी दूध संघांत राजकीय हस्तक्षेप होऊ नये असे वाटते. गेल्या दोन वर्षांत दूध भुकटीचे दर उतरल्याने संघांचे मोठे आर्थिक नुकान झाले आहे. महायुती सरकारच्या काळातील यासंदर्भातील अनुदान थकले आहे. हे अनुदान लवकर मिळावे. दुभती जनावरे खरेदीसाठी विशेष घटकांना अनुदान दिले जाते. शिवाय, खुल्या गटातील घटकांना नाबार्डकडूनही अनुदान मिळते. पण ते पुरेसे ठरत नाही. दहा ते वीस गुंठे शेती असलेल्या शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदीसाठी सरकारने अनुदान द्यावे.

- बाळासाहेब खाडे, संचालक गोकुळ

सहकारी बँकिंगला पाठबळ द्या

राष्ट्रीयिकृत बँकांपेक्षा सर्वसामान्य नागरिक आणि ग्राहकांचा सहकारी आणि नागरी बँकावर विश्वास आहे. तरीही सरकारकडून सहकारी बँकांना सापत्नभावाची वागणूक दिली जाते. राष्ट्रीय बँकांवर जसा सवलतीचा वर्षाव होतो, तशा सवलती सहकारी बँकांना मिळाल्या पाहिजेत. सहकारी बँका सर्व प्रकारचे कर भरतात. आयकर भरून सरकारला सहकार्य करीत असतात. पण, केंद्र आणि राज्य सरकाची सहकार बँकांविषयीची अढी कायम असून ती कमी करून बँकांना सवलती देण्यासाठी नवीन सरकारने पुढाकार घ्यावा.

- राजेंद्र डकरे, अध्यक्ष, कमर्शिअल बँक

बाजार समित्यांवर विश्वास ठेवा

शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या सर्व शेती मालाला सरकारने हमीभाव ठरवून द्यावा. सध्या बाजार समित्यांवर मोठी बंधने आणली जात आहेत. बाजार समिती हा व्यापारी आणि शेतकरी यांच्यातील दुवा आहे. शेतकऱ्याला त्याच्या मालाची योग्य रक्कम मिळावी यासाठी बाजार समिती बांधील असते. त्यामुळे सरकारने बाजार समितीवर विश्वास दाखवून त्यांना मदत केली पाहिजे. सध्या केंद्र सरकारने ई नाम पद्धत सुरू केली आहे. पण त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करायला पाहिजे.

- मोहन सालपे, सचिव बाजार समिती

पतसंस्थांतील कर्जांकडेही पहा

राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता असून या योजनेमध्ये पतसंस्थांतील कर्जांचाही समावेश व्हायला पाहिजे. पतसंस्थांत ठेवलेल्या एक लाख रुपयांवरील ठेवींवर विमा उतरवला पाहिजे. राज्य सरकारने ठेवीदारांना 'अ' वर्ग सभासद करण्याची अट घातली आहे. त्यामुळे ठेवीदार संस्थांकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. सरकारने ही अट काढून टाकली पाहिजे. बंद पडलेल्या बँकामध्ये पतसंस्थांच्या अडकलेल्या ठेवी परत देण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत.

- अनिल पाटील, कार्याध्यक्ष पतसंस्था फेडरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटण विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मटणाचा दर प्रतिकिलो ५६० रुपयांवरून ५४० रुपये करण्याचा निर्णय खाटीक संघाने जाहीर केल्यानंतर कृती समितीने आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत. मटण विक्रेत्यांचे परवाने तपासण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली जाणार आहे. तसेच मटण विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

मटण दराबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी समिती नियुक्त केली आहे. समितीचे अध्यक्ष महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक असून समितीत मटण विक्रेते आणि कृती समितीचे प्रत्येकी पाच सदस्य आहेत. समितीकडून शहर आणि ग्रामीण भागातील मटण दराबाबत माहिती घेतली जात आहे. समितीचे काम सुरू असतानाच खाटीक समाजाने मटणाचा दर ५४० रुपये जाहीर केला आहे. यावर कृती समितीने आक्षेप घेतला आहे. कृती समितीने यापूर्वीच प्रतिकिलो ४५० रुपये मटणाचा दर असावा, अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल प्राप्त होईपर्यंत कृती समितीने वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. मटण दर कमी करण्यास खाटीक समाजाने नकार दिल्यास बेकायदशीर मटण विक्रीविरोधात कृती समितीकडून आंदोलन छेडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मटण दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण, प्रत्यक्ष बकरी किती कापली जातात आणि महानगरपालिकेला किती महसूल जमा होतो यांची माहिती कृती समितीकडून जमा केली जात आहे.

दुसरीकडे मटण विक्रीसाठी पर्यायी यंत्रणा उभी करण्याच्या हालचाली सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील विक्रेत्यांनी कोल्हापुरात येऊन तालमी आणि मंडळ परिसरात मटण विक्रीची तयारीही दर्शवली आहे. त्यामुळे मटण विक्रीवरून पुन्हा संघर्ष सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भागातील मटण दराचे शंकानिरसण करण्याचे खाटीक समाजाने प्रयत्न सुरू केले आहेत. पण मटणाचा दर अचानक वाढल्याने हॉटेल व्यवसायावर परिणाम होण्याची भीती वाढली आहे. मटण दरावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी पुढे येत आहे. ऐन सणासदीच्या काळात मटण दरात वाढ करण्याचे धोरण बंद झाले पाहिजे, या मागणीला ग्राहकांकडून कृती समितीला पाठिंबा वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फिरता फिरता वेचला प्लास्टिक कचरा

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

प्लास्टिक वापराचे दु:ष्परिणाम समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये त्याविषयी जाणीवजागृती होऊ लागली आहे. त्यातूनच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी अनेकजण पुढे येऊ लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून महावीर गार्डनमध्ये फिरायला येणारे मार्निंग ग्रुपचे सदस्य दररोज कचरा गोळा करुन डस्टबीनमध्ये टाकत आहेत.

महापालिकेच्यावतीने शहरात गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेमध्ये शहरवासीयांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकही पुढे येत आहेत. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करताना डस्टबीनची सुविधा दिली आहे. त्यामध्ये स्वत:च नागरिक कचरा टाकत आहेत. महावीर गार्डनमध्ये फिरायला येणारे नागरिक दररोज गार्डनमध्ये पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करतात प्लास्टिक निर्मुलनाला हातभार लावण्यासाठी सर्व मंडळी प्रथम प्लास्टिक, कचरा एकत्र करून नंतर नेहमीप्रमाणे फिरायला सुरुवात करतात. वसुंधरेला प्लास्टिकमुक्त करण्याचा ध्यास घेत हे कार्यकर्ते नित्यनियमाने कचरा डस्टबीनमध्ये टाकत आहेत. यामध्ये शिरीष कुलकर्णी, गजानन पेडणेकर, मामा भुसारी, शाम कागले, डॉ किरण भिंगार्डे यांच्यासह अनेकजण सहभागी होत आहेत.

000

फिरता फिरता वेचला प्लास्टिक कचरा

महावीर गार्डनमधील मॉर्निंग वॉक ग्रुपचा उपक्रम

कोल्हापूर टाइम्स टीम

प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये सजगता निर्माण होऊ लागली आहे. यातूनच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी अनेकजण पुढे येवू लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून महावीर गार्डन येथे फिरायला येणारे मार्निंग ग्रुपचे सदस्य दररोज कचरा गोळा करुन डस्टबीनमध्ये टाकत आहेत.

महापालिकेच्यावतीने गेल्या काही महिन्यापासून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेमध्ये शहरवासियांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: प्लास्टिकमूक्तीसाठी नागरिकही पुढे येत आहेत. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करताना डस्टबीनची सुविधा दिली आहे. त्यामध्ये स्वत:च नागरिक कचरा टाकत आहेत. यामध्ये महावीर गार्डनमध्ये फिरायला येणारे नागरिक दररोज गार्डनमध्ये पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करत आहेत. प्लास्टिक निर्मूलनाला हातभार लावण्यासाठी सर्व मंडळी प्रथम प्लास्टिक एकत्र करुन नंतर फिरायला सुरुवात करतात. वसुंधरेला प्लास्टिकमूक्त करण्याचा ध्यास घेत हे कार्यकर्ते नित्यनियमाने कचरा डस्टबीनमध्ये टाकत आहेत. यामध्ये शिरीष कुलकर्णी, गजानन पेडणेकर,मामा भुसारी, शाम कागले, डॉ किरण भिंगार्डे यांच्यासह अनेकजण सहभागी होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा कल्चर क्लबतर्फे रविवारी सिझलर्स वर्कशॉप

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लब आणि हॉटेल केट्री यांच्यावतीने शेफस नॉलेज बँक ग्लोबल वर्ल्ड या उपक्रमांतर्गत रविवारी, ८ डिसेंबर रोजी सिझलर्स वर्कशॉपचे आयोजन केले आहे. शिवाजी पार्क येथील हॉटेल के ट्री येथे दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत हे वर्कशॉप होणार आहे. कोणत्याही हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्ये सिझलर्सचा एक कॉलम असतो. या चवीची उत्सुकता खवय्यांना नक्कीच असते. अगदी घरच्या घरीही चविष्ट व विविध प्रकारचे सिझलर्स बनवण्याची संधी वर्कशॉपच्या निमित्ताने 'मटा'च्या वाचकांना मिळणार आहे. मेक्सिकॉनसोबत थाई, चायनीज, कॉन्टीनेंटल, इंडियन सिझलर्समध्ये विविध प्रकार आहेत. चटपटीत सिझलर्स लहान मुलांपासून मोठ्यांनाही आवडतात. यामध्ये भरपूर भाज्या, सॉस, भात, नूडल्सचा वापर केला असल्याने एकाच पदार्थातून शरीरात अनेक पदार्थ जातात. हा पदार्थ आरोग्यदायी असल्याने चव आणि आरोग्य हे दोन्ही गुण सिझलर्समध्ये आहेत. हॉटेलमधील शेफकडून सिझलर्सच्या कृती व टिप्स या कार्यशाळेत देण्यात येणार आहेत. या कार्यशाळेत व्हेज पेरीपेरी सिझलर्स, पनीर, व्हेज बार्बेक्यू, व्हेज स्पॅगेटी, व्हेज मेक्सीकॉन या प्रकारातील सिझलर्स शिकवण्यात येणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी कविता कडेकर (९०११९६९०९९), सुहानी पिसे (९३७१४८५३७१) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे यश

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसच्या शतकमहोत्सवी वर्षात संस्थेच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय यश संपादन केले. फेस्टिव्हल ऑफ आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाइन या संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या 'एक्स्प्रेशन' या स्पर्धेत राज्यस्तरीय डायमंड व प्लॅटिनम या दोन्ही ट्रॉफी विद्यार्थ्यांनी जिंकल्या. शंतनू पाटील, प्रज्ञासूर्या कारंजकर, प्रणव कुलकर्णी, रोहन कुलकर्णी, विशाखा किल्लेदार, ईश्वरी शिंदे, यशराज खराडे, ओंकार कदम, श्रुतिका माळी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सलग चौथ्या वर्षी कॉलेजने हे यश मिळवले आहे. मुंबईत २१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दोन स्तरावर ही स्पर्धा झाली. पहिल्या टप्प्यात डिझाइन मागवण्यात आल्या होत्या. यातून ५० डिझाइन्समधून निवडण्यात आलेल्या ८ डिझाइन्समध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या डिझाइन्सची निवड झाली. यासाठी विद्यार्थ्यांनी ३० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाऊगल्लीतील खोकी हटविली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरी जनता बझार चौकलगतच्या खाऊगल्लीमध्ये फेरीवाल्यांनी गुरुवारी दुपारी पुन्हा हातगाड्या लावण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथक व इस्टेट विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ हालचाली करून कारवाई सुरू केली. फेरीवाल्यांनी कारवाईला विरोध करत अधिकाऱ्यांशी वाद घातला. अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी मोहिमेत अडथळा आणणाऱ्या फेरीवाल्यांना समज दिली.

खाऊगल्लीतील फेरीवाल्यांचे अन्यत्र पुनवर्सन केले जाणार आहे. जागा निश्चिती झाल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगताच फेरीवाल्यांनी स्वत:हून गाड्या हटविल्या.

राजारामपुरी पहिल्या गल्लीतील खाऊगल्ली येथे गेल्या महिन्यात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली होती. महापालिकेचा परवाना न घेता अनधिकृतपणे हातगाड्या, केबिन लावण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. महापालिकेने येथील ५५ हून अधिक हातगाड्या हटवल्या. तसेच अन्यत्र पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तीन ते चार पर्यायी जागा पाहिल्या आहेत. इस्टेट विभागाकडून प्रस्ताव तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. ही प्रक्रिया सुरू असताना गुरुवारी दुपारी अनेकांनी खाऊचे स्टॉल, हातगाड्या याठिकाणी लावल्या. महापालिका अधिकाऱ्यांना कसलीही कल्पना न देता, परवानगी न घेता हा प्रकार घडल्याचे समोर आले.

इस्टेट विभाग व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी व कर्मचारी सायंकाळी पहिल्या गल्लीत पोहचले. इस्टेट विभागाचे अधिकारी प्रमोद बराले यांनी प्रशासकीय पातळीवर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मात्र फेरीवाल्यांनी आम्ही याच ठिकाणी व्यवसाय करणार अशी भूमिका घेतली. याच दरम्यान अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख पंडित पोवार हे घटनास्थळी पोहचले. अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यावसायिक हातगाड्या लावण्यावर ठाम होते. त्यामुळे कारवाईला सुरुवात केली. यावेळी हातगाडीचालकांनी कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होऊन वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांचा हस्तक्षेप व अधिकाऱ्यांनी पुनर्वसनासाठी जागा पाहणी सुरू असल्याचे स्पष्ट केल्यावर फेरीवाल्यांनी स्वत:हून गाड्या परत नेल्या.

दंगा घातला तर चर्चा नाही

वातावरण तणावपूर्ण बनल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. कारवाईला विरोध करत वादावादी करणाऱ्या स्टॉलधारकांना पोलिसांनी योग्य भाषेत समज दिली. 'कारवाईला विरोध म्हणून दंगा, गोंधळ घातला तर चर्चा होणार नाही. आणि कुठलाही तोडगा निघणार नाही'असे समजावले. पोलिसांनी कडक भूमिका घेतल्यामुळे खोकीधारक नरमले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्केट यार्डमध्ये कांद्याला १३० रुपये दर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मार्केट यार्डमधील शेती उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिकिलो १३० रुपये दर मिळाला. तर कमी प्रतीच्या कांद्याला २० रुपये तर सरासरी कांद्याचा दर ४५ रुपये होता. कांद्याची आवक घटली असून चांगल्या कांद्याला मोठी मागणी वाढली आहे. काल बुधवारी (ता.४) बाजार समितीत चांगल्या प्रतिच्या कांद्याला ११० रुपये दर मिळाला होता. आज त्यामध्ये २० रुपयांनी वाढ झाली आहे. ५० किलो वजनाची १५ पोती प्रतिकिलो १३० रुपयांनी विकली गेली. स्थानिक भाजी मंडईत मात्र लहान आकाराचा कांदा विक्रीस ठेवण्यात आला आहे. प्रतिकिलो ५० ते ७० रुपये दराने विक्री केली जात आहे.

३१ ऑक्टोबरला कांद्याचा सरासरी दर ३२ रुपये होता. तर २९ नोव्हेंबर रोजी कांद्याचा सरासरी दर प्रतिकिलो ३५ रुपये होता. यादिवशी चांगल्या प्रतीच्या कांद्याच्या ७५ रुपये दर मिळाला होता. अवघ्या पाच दिवसांत चांगल्या प्रतीचा कांदा ७५ रुपयांवरून १३० रुपयांवर पोचला आहे. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत काद्यांची दरवाढ कायम राहील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>