Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गळती, ड्रेनेज दुरुस्ती दहा दिवसात करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'फुलेवाडी रिंगरोड ते कळंबा साईमंदिर रिंगरोड या रस्त्यावरील पाण्याच्या गळतीची व ड्रेनेज लाइनची कामे पाणी पुरवठा, ड्रेनेज विभाग व नगररचना विभागाने दहा दिवसांत पूर्ण कराव्यात. गेल्या दहा वर्षांपासून हा रस्ता रखडला आहे. या रस्त्यावरील अडचणी आता दूर करा. वारंवार समस्या उद्भवल्यास रस्ता पूर्ण करणे अडचणीचे होईल. लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. दूरदृष्टी ठेवून कामाचे नियोजन करा,' अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या. तसेच रिंगरोडच्या दोन्ही बाजूला दहा ते पंधरा फूट उंचीच्या रोपांची लागवड करण्याची सूचनाही निर्माण कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली.

दरम्यान ठेकेदार व निर्माण कन्स्ट्रक्शनच्या अरुण पाटील यांनी, बरीचशी कामे अद्याप अपूर्ण असल्याने रस्ता पूर्ण करण्यात अडचणी उद्भवत आहेत. साधारणपणे पाच किलोमीटरपैकी साडेतीन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यासाठी ताबा दिल्याचे सांगितले. उर्वरित रस्त्यावरील पिण्याच्या पाइपलाइनची गळती, ड्रेनेज लाइनची कामे व खासगी मिळकत ताब्यात घेण्याची कार्यवाही अद्याप अपुरी आहे, असे सांगितले.

कनिष्ठ अभियंता आर. के. पाटील यांनी 'नवीन वाशीनाका ते क्रांतिसिंह नाना पाटीलनगर रिंगरोडला जोडणाऱ्या मधल्या डीपी रस्त्यावर नवीन वाशी नाका पंपिंग स्टेशनमध्ये १५ मीटर रस्ता येत आहे. या ठिकाणची उपलब्ध खुली जागा दिली जाईल,' असे सांगितले. स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, परिवहन समिती सभापती अभिजित चव्हाण, नगरसेविका रिना कांबळे, वनिता देठे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, इंद्रजित बोंद्रे, जीवन प्राधिकारणचे अधिकारी पी. डी. माने, जीकेसी कंपनीचे राजेंद्र माळी आदी उपस्थित होते. यावेळी रस्त्याच्याकडेला रोपांची लागवड केली.

चार दिवसांत गळतीची कामे दुरुस्त

उपजल अभियंता भास्कर कुंभार यांनी चार ते पाच ठिकाणी पाइपलाइनला गळती आहे. येत्या चार दिवसांत गळती दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल.नवीन वाशी नाका परिसरातील दुरुस्तीचे काम दोन दिवसांत पूर्ण होईल असे सांगितले. उपशहर रचनाकार एन. एस. पाटील यांनी कणेरकरनगर रिंगरोड येथील रिसनं १०४२/क/४ व ५/१३ या मिळकतीचे ४० मीटर जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. शुक्रवारी मिळकतधारकांना नोटीस लागू केली जाईल असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरोळेंच्या खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव

$
0
0

कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. लता सरोळे यांची खातेनिहाय चौकशी करावी तसेच त्यांची अन्य जिल्ह्यात बदली करावी, असा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाने राज्याच्या आरोग्य विभागाकडे केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या स्वाक्षरीनंतर हा प्रस्ताव राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्यसचिव प्रदीपकुमार व्यास यांच्याकडे पाठविला आहे. सरोळे यांनी एकाच कालावधीत दोन सरकारी आस्थापनांकडून एकाच वेळी पगार घेतल्याची तक्रार काँग्रेसचे कार्यकर्ते संजय पाटील यांनी केली होती. त्यांच्या विरोधातील तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. ही चौकशी सुरू असताना त्यांनी अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सेविकेला कार्यमुक्त केले. तसेच त्या सेविकेला आरोग्य सेवा संचालनालय मुंबई कार्यालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. याविषयी संबंधित आरोग्य सेविकेने जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा सोमवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. ९) रोजी आचार्य जगदीशचंद्र बोस जयंतीनिमित्त आपत्ती व्यवस्थापनातील अमॅच्युअर रेडिओचा सहभाग या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सकाळी साडेसात ते साडेनऊ व सायंकाळी चार ते सहा यावेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

यामध्ये अमॅच्युअर रेडिओच्या सहाय्याने संदेशवहन, आपत्ती व्यवस्थापनासाठी त्याचा उपयोग याबाबतची प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. आचार्य जगदीशचंद्र बोस यांचे कार्य, अमॅच्युअर रेडिओ व आपत्ती व्यवस्थापन या विषयावरील सादरीकरणे होणार आहे. दत्ता देवगावकर, डॉ. प्रमोद वासंबेकर, डॉ. डी. के. गायकवाड आणि अविनाश गुंडाळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाचे नाटक करून सहा लाखाचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एका उच्चशिक्षित तरुणीबरोबर लग्न लावण्याचे नाटक करत, बनावट पालक व खोटी कागदपत्रे तयार करून सातजणांच्या टोळीने येथील एका कापड व्यापाऱ्याची सोने, चांदी व रोख रकमेसह सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी कापड व्यापारी भैरूलाल शांतिलाल भंडारी (वय ३५, आझाद चौक) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात सातजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी म्हणून प्रकाश लोढा (वय ५८ , रा. बेंगळूर), दीपक जैन ऊर्फ दीपक शेळके (वय ३६, रा. श्रीरामपूर), मुलीचे वडील अंकित गुंदेशा म्हणून हजर असलेल्या व्यक्तीचे नाव सत्यजित (वय ४९, अहमदनगर), जितेंद्र गुंदेशा ऊर्फ सचिन ब्राह्मणे (वय ३६, श्रीरामपूर), पूनम गुंदेशा ऊर्फ पूनम साळवे (वय २७, श्रीरामपूर), कल्याणी गुंदेशा ऊर्फ कल्याणी साठे (वय २६, श्रीरामपूर) व प्रियंका जैन (वय २७, रोहा ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून विश्वास मिळवायचा आणि एकाच मुलीची तीन-तीन लग्ने करून होणाऱ्या नवऱ्याकडून लाखो रुपयांची मागणी करायची. त्याच्याबरोबर चार-पाच महिने राहून भांडण काढून तेथून निघून जाऊन त्या मुलीचे दुसरे लग्न करून भावी नवऱ्याची फसवणूक करण्याचा कट रचणे अशी गुन्ह्याची पद्धत आहे.

याबाबत भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कल्याणी गुंदेशाचे पहिले लग्न अंकित गुंदेशाबरोबर झाले होते. या टोळीतील प्रकाश लोढा हा लग्न जमवणारा एजंट आहे. त्याने, कल्याणी गुंदेशाचे स्थळ चांगले असल्याचे सांगत व अंकित गुंदेशा हे तिचे वडील असल्याचे खोटे पॅन कार्ड तयार केले. विवाहाची यादी बनविण्याची संधी न देता दोन दिवसात लग्नाची गळ घातली. लग्नाचा खर्च व सोन्याचे दागिने बनविण्यासाठी माझ्याकडून सहा लाख रुपये घेतले. आळंदी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात घाईगडबडीने लग्न करण्याची परिस्थिती निर्माण केली. लग्नानंतर पत्नी कल्याणी माझ्याकडे सहा महिनेच राहिली. यानंतर वडील आजारी असल्याचे सांगत व कागदपत्रे बनवून आणते असे सांगून माहेरी गेली. मी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी ती इकडे आली नसल्याचे सांगत पुन्हा फोन केल्यास पोलिसांत तक्रार करू असे धमकावले. त्यानंतर काही दिवसांनी कल्याणीशी संपर्क झाल्यावर गोड बोलून, स्टॅम्पवर सही घेऊन बनावट सोडपत्र तयार केले. पुन्हा खोटे आधारकार्ड तयार करुन मुंबई येथील तरुणांशी तिसरे लग्न केले. त्या लग्नाचे टिकटॉकवर व्हिडीओ पाहिल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतिपदी जयसिंग घोरपडे

$
0
0

कोल्हापूर: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्यातील सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सभापतिपदी प्रतापसिंह घोरपडे व उपसभापतिपदी सुहास राजे यांची एकमताने निवड झाली. शहर उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी श्रीमती वाघ यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची बैठक झाली. संस्थेचे संचालक एस. पी. हिंदुळे, संचालक डी. पी. साळोखे, एस. एच. सुतार, टी. के. मिठारी, डी. ए. सरनाईक, श्रीमती एम. यु. माने, व्ही. व्ही. कुलकर्णी व संस्थेचे सचिव एन. बी. जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन जत्राटकर

$
0
0

पदाबाई जत्राटकर

कोल्हापूर: निपाणी येथील अर्जुननगर परिसरातील पदाबाई दत्तू जत्राटकर (वय १०२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. देवचंद महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. एन. डी. जत्राटकर यांच्या त्या मातोश्री व शिवाजी विद्यापीठातील जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर व दिग्दर्शक, लेखक अनुप जत्राटकर यांच्या त्या आजी होत. जलदान विधी रविवारी (ता. ८) �जत्राट येथे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताराबाई रोडला अतिक्रमणांचा विळखा

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईनंतरही महाद्वार चौक आणि ताराबाई रोड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. फेरीवाल्यांनी फुटपाथसह रस्त्यावर मांडलेले ठाण आणि रिक्षा स्टॉपमुळे प्रचंड गर्दी होत आहे. गर्दीतून वाहन चालविताना त्यांना कसरत करावी लागत असताना पादचाऱ्यांना तर जीव मुठीत घेऊनच वाट काढावी लागत आहे. महापालिकेपासून हाकेच्या अंतरावरील रस्त्यावर झालेली अतिक्रमणे प्रशासनाला दिसत नाहीत का? असा सवाल संपप्त पादचारी करू लागले आहेत.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामुळे तसेच सोन्या-चांदीच्या व्यापारपेठेमुळे येथे हजारो पर्यटक, स्थानिक नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. या गर्दीतच कोपऱ्या-कोपऱ्यावर उभ्या असलेल्या रिक्षा आणि फेरीवाल्यांमुळे महाद्वार रोड असो अथवा ताराबाई रोडवरून चालणेही मुश्किल बनले आहे. रस्त्यावर अशी गर्दी असताना ताराबाई रोडवरील फुटपाथही गायब झाले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथ नाही आणि वाहनधारकांना वाहन चालविण्यासाठी रस्ता नाही, अशी स्थिती येथे दररोज दिसून येते. देवीच्या दर्शनानंतर भाविक रंकाळा पाहण्यासाठी ताराबाई रोडचा वापर करतात. पण हा संपूर्ण रस्ताच अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. स्थानिक फेरीवाल्यांपासून परप्रांतीय फेरीवाल्यांपर्यंत सर्वांनीच नियम धाब्यावर बसवून विनापरवाना व्यवसाय सुरू केला. याकडे परवाना आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

महाद्वार किंवा ताराबाई रोडवर अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली जाते. शेकडोवेळा अशी कारवाई होते. पण कारवाईनंतर पुन्हा हे फेरीवाले कोणाच्या आशीर्वादाने ठाण मांडतात, याची उकल अद्यापही शहरवासीयांना झालेली नाही. व्यवसाय परवाना नाही. वीज अथवा पाणीपट्टी नाही. जागेचे भाडे द्यावे लागत नाही. असा सर्व अनागोंदी कारभार येथे दिसून येतो. कारवाईनंतर महापालिका प्रशासनाने अनेकवेळा फेरीवाल्यांना पट्टे मारून दिले. पट्ट्याबाहेर व्यवसाय थाटलेले असताना त्यांचा उद्दामपणाही दिवसेंदिवस वाढत आहे. सरस्वती चित्रमंदिर ते कपिलतीर्थ मार्केटच्या बाहेर असलेले सर्व फुटपाथ गायब झाले आहेत. कापड, फळे, गॉगल, घड्याळ यासह अनेक प्रकारच्या खेळण्यांचे स्टॉल फुटपाथवर मांडले आहेत. यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागतो, तर वाहनधारकांनाही गर्दीतून वाट काढताना कसरत करावी लागते. तरीही महापालिका प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे दिसून येते.

००००

चौकट

महापालिकेचा रस्ता व्यापाऱ्यांकडून भाड्याने

शहरातील अनेक रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांना तेथील दुकानदार कारणीभूत ठरत असल्याची चर्चा आहे. बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी आणि महाद्वार चौक ते साकोली कॉर्नरपर्यंतच्या अनेक दुकानमालकांनी आपल्या दुकानासमोरील जागा चक्क फेरीवाल्यांना मासिक भाड्यावर दिल्याची चर्चा आहे. रस्ता महापालिकेचा आणि तो व्यापारी भाड्याने देत असल्याचा प्रताप शहरात घडत आहे. दुकानदारांच्या या कृतीमुळे त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांनाही वाहन पार्किंगसाठी जागा मिळत नाही. ते रस्त्यावरच गाडी उभा करत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. कोंडीतून शहरवासीय मात्र दिनवाणा चेहरा करून कसाबसा मार्ग काढत असतात.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील आंतरराष्ट्रीय परिषद मंगळवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त १० ते १२ डिसेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. 'समाज : पुनर्रचना, प्रतिक्रिया आणि जबाबदारी', या मध्यवर्ती विषयावर ही परिषद होणार आहे. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट हॉलमध्ये सकाळी साडेदहा वाजता ज्येष्ठ संशोधक आणि मानवी हक्क कार्यकर्त्या प्रा. गेल ऑम्वेट यांच्याहस्ते परिषदेचे उदघाटन होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि भारतीय सामाजिक शास्त्रे संशोधन संस्थेचे (आयसीएसएसआर) माजी अध्यक्ष प्रा. डॉ. सुखदेव थोरात यांचे बीजभाषण होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. जगन कराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रशियन सोसायटी ऑफ सोशिओलॉजिस्ट, साऊथ आफ्रिकन सोशिओलॉजिकल असोसिएशन, इंटरनॅशनल सोशिओलॉजिकल असोसिएशन, ब्रीक्स नेटवर्क्स ऑफ सोशिओलॉजी, एशियन क्लायमेट चेंज एज्युकेशन सेंटर, साऊथ कोरीया आणि इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागाने ही परिषद होत आहे. या परिषदेत १५ ते १६ देशांतील समाजशास्त्रविषयक अभ्यासक, प्राध्यापक, संशोधक विचार मांडणार आहेत. तीन दिवसांत १८ सत्रांमध्ये होणाऱ्या परिषदेत भारतासह १५ देशांतील विविध विद्यापीठांतील ७० तज्ज्ञ आणि विविध विद्यापीठांचे ८ माजी कुलगुरू सहभागी होणार आहेत. यामध्ये माजी कुलगुरु प्रा. डॉ. विद्युत जोशी, हेमिक्सा राव, हरी बाबू, के. एल. शर्मा, जोगन शंकर, बी. सी. बारिक, अरविंद अग्रवाल आणि समीता मन्ना यांचा समावेश आहे.

परिषदेदरम्यान ९० पेक्षा अधिक शोधनिबंधांचे सादरीकरण, चर्चा व सामाजिक प्रवाहांशी निगडीत ३४ पैलूंची मांडणी या परिषदेत होणार आहे. विशेषत: 'प्रा. डॉ. विलास संगवे स्मृती व्याख्यान', भारतीय समाजशास्त्राच्या अध्ययन आणि अध्यापनास यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 'भारतीय समाजशास्त्राचा शंभर वर्षांचा प्रवास', यावर विशेष व्याख्याने आणि परिषदेस काही कारणांनी ज्यांना उपस्थित राहता येत नाही, त्यांच्यासाठी विद्यापीठात पहिल्यांदाच ईसेशनही होणार असून, यामध्ये परदेशी समाजशास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोग, भारतीय सामाजिक शास्त्रे संशोधन संस्थेचे आर्थिक सहकार्य परिषदेला लाभले आहे. परिषदेचा समारोप १२ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता बिहारमधील मोतिहारी येथील महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. अरविंद अग्रवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. भारतीय सामाजिक शास्त्रे संशोधन संस्थेचे(आयसीएसएसआर) संचालक प्रा. उपेंद्र चौधरी, प्रा. अजय गुप्ता हे उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेस प्रकुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आदी उपस्थित होते.

.. .. . .

सुवर्णमहोत्सवीवर्ष साजरे करणारा देशातील दुसरा समाजशास्त्रविभाग

देशातील विद्यापीठांमध्ये सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या समाजशास्त्र अधिविभागांत केरळ विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ ही दोनच विद्यापीठे आहेत. केरळ विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागानेही विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील प्रवाहांबाबत अभ्यासू मांडणी केली आहे. याच धर्तीवर शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाने पहिल्या बॅचमधून उत्तीर्ण झालेल्या सत्तरीतील दहा विद्यार्थ्यांचा सत्कार केला. देशाच्या कानाकोपऱ्यात स्थायिक असलेल्या माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून विभागाचा सुवर्णमहोत्सव साजरा केला जाणार आहे.

.. .. .. .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाडीअड्डा वाहनतळाचीमहापौरांकडून पाहणी

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत उभारण्यात येणाऱ्या व्हीनस कॉर्नर येथील गाडीअड्डा वाहनतळाची महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी शुक्रवारी सायंकाळी पदाधिकाऱ्यांसह पाहणी केली. पाहणीदरम्यान बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या क्रिडाईच्यावतीने वाहनतळाचा आराखडा सादर केला.

शहर वाहतूक विकास आराखड्यांबाबत पुढील महासभेत होणार आहे. तत्पुर्वी गाडीअड्ड्यातील वाहतळ खुला करण्यासाठी महापौर लाटकर यांनी पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी मुरुम टाकून सपाटीकरणाचे काम सुरू झाले आहे. या कामाची पाहणी उपमहापौर संजय मोहिते, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासमवेत त्यांनी केली.

पाहणीदरम्यान क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी वाहनतळाचा आराखडा सादर केला. यावेळी महापौर अॅड. लाटकर यांनी शहर अभियंत्यांना सूचना केल्या, 'वाहनतळाचा विकास करण्यासाठी क्रिडाईची मदत घेतली जाणार आहे. परिरसरातील इतर वाहने पूर्णपणे हटवून सपाटीकरण करावे. तसेच व्हीनस कॉर्नर येथून प्रवेश दिल्यानंतर टायटन शोरुमच्या मागील बाजूने वाहने बाहेर जाण्यास मार्ग तयार करा.' उपमहापौर संजय मोहिते यांनी पर्यटकांना माहिती देण्यासाठी कावळा नाका येथून पार्किंगचे फलक लावावेत. पर्यटकांनी वाहने पार्किंग केल्यानंतर येथून अंबाबाई मंदिरापर्यंत जाण्यासाठी केएमटी बसची व्यवस्था करावी, अशी सूचना केली. यावेळी केएमटीचे प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतेज कृषी प्रदर्शनाचे दालन खुले

$
0
0

फोटो आहे :

तपोवन मैदान येथील सतेज कृषी प्रदर्शनाची पाहणी करताना आयोजक आमदार सतेज पाटील. सोबत प्रतिमा पाटील, महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते, आमदार ऋतुराज पाटील, सुशील पाटील-कौलवकर, आदी.

फोटो : अर्जुन टाकळकर

०००

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कृषी विश्वातील नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना एकाच छताखाली देणाऱ्या तपोवन मैदानावरील 'सतेज कृषी २०१९' प्रदर्शनाचे दालन शुक्रवारी खुले झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाले. चार लाखांच्या खिलार खोंडासह तीन लाख रुपये किमतीची मुऱ्हा म्हैस प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे.

प्रदर्शनाला सकाळपासून सुरुवात झाली. औपचारिक उद्घाटन सायंकाळी महापौर अॅड. लाटकर यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी प्रदर्शन पाहण्यास सकाळपासून शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. 'प्रदर्शनात कृषी क्षेत्राशी संबंधित २०० हून अधिक नामवंत कंपन्यांचे स्टॉल लावले आहेत. शेतीसाठी लागणारे अद्ययावत तंत्रज्ञान, नवनवीन अवजारे, पशुपक्ष्यांच्या जाती, संकरित बियाणे आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक माहिती देण्यासाठी प्रदर्शन भरविल्याचे आयोजक आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. उद्घाटनानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध स्टॉलना भेट दिली.

प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी महोत्सवांतर्गत आजरा घनसाळ तांदळाची मोठ्याप्रमाणात विक्री झाली. शनिवारी (ता. ७) सकाळी साडेदहा वाजता सुरेश माने-पाटील 'एकरी १२५ टन ऊस शेती'च्या तंत्राची माहिती देणार आहेत. दीड वाजता गोविंदे हांडे गटशेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विविध जिल्ह्यांतील जातिवंत जनावरे प्रदर्शनात सहभागी झाली आहेत. खिलार खोंड, मुऱ्हा म्हैस, दररोज ३० लिटर दूध देणारी गाय प्रदर्शनातील आकर्षण ठरत आहे.

उद्घाटनप्रसंगी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे, 'आत्मा'च्या सुनंदा कुऱ्हाडे, प्रतिमा पाटील, कृषी विभागाचे अशोक पिसाळ, सत्यजित भोसले, जालिंदर पांगिरे, पशुधन अधिकारी सुनील काटकर, करवीर पंचायत समितीचे उपसभापती संदीप पाटील, शशिकांत खोत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व शेतकरी उपस्थित होते. उद्घाटनानंतर आमदार चंद्रकांत जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी प्रदर्शनास भेट दिली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याला १५० रुपये दर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मार्केट यार्ड शेती उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी चांगल्या प्रतिच्या कांद्याला प्रतिकिलो १५० रुपये दर मिळाला. आठ दिवसांत चांगल्या प्रतिच्या कांद्याच्या दरात ७० रुपयांची वाढ झाली आहे. चांगल्या प्रतिच्या कांद्याला प्रतिक्विंटल १५०० रुपये दर मिळाला. लहान आकाराच्या कांद्याला सर्वात कमी प्रतिक्विंटल २०० रुपये दर होता. यार्डात ३६०६ पोत्यांची आवक झाली. सरासरी कांद्याचा दर प्रतिकिलो ५५ रुपये असल्याने कांद्याचा दर वाढण्याची शक्यता आहे.

काल गुरुवारी (ता.५) चांगल्या प्रतिच्या कांद्याचा दर १३० रुपये तर बुधवारी (ता.४) प्रतिकिलो ११० रुपये होता. स्थानिक भाजी मंडयांत लहान आकाराचा कांदा विक्रीस ठेवला असून त्याचा दर प्रतिकिलो ५० ते ७० रुपये इतका आहे. चांगला प्रतिचा महाग कांदा ग्राहकांकडून खरेदी केला जात नसल्याने लहान आकाराचा कांदा विक्रीस ठेवण्यात आला आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संघ कर्मचाऱ्यांची भ्रष्टाचाराविरोधात निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोक्याच्या जागा मूळ मालकांना देऊन शेतकरी संघाचे नुकसान करणाऱ्या भ्रष्ट संचालक आणि अधिकाऱ्यांविरोधात शुक्रवारी संघाच्या कर्मचाऱ्यांनी भवानी मंडपातील मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शने केली. यापुढे संचालकांचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही यावेळी संचालकांना दिला.

संघातील संचालकांनी राजारामपुरीसह अन्य ठिकाणाच्या मोक्याच्या जागा मूळ मालकांना परत दिल्या आहेत. त्यामुळे संघाच्या व्यापार व नफ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे त्याचा फटका कर्मचाऱ्यांवर होणार असल्याने संतापाची लाट उसळली आहे. शुक्रवारी संघाच्या शाखेच्या व्यवस्थापकांची बैठक होती. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी संतापाला मोकळी वाट करून दिली. त्यांनी काम बंद आंदोलन करून भ्रष्ट कारभाराचा निषेध केला. संघाची जागा परत देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या संचालक आणि अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, या मागणीच्या घोषणाही दिल्या.

कर्मचाऱ्यांची एक कोटी २८ लाख रुपये ग्रॅच्युईटीची रक्कम आणि ४८ लाख रुपये प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम जमा केली नसल्याने मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ आणि संचालकांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन केल्याने संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने आणि संचालकांनी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी मोक्याच्या जागा परत का केल्या? अशा प्रश्नांची सरबत्ती केली. यापुढे ठराव घुसडून जागा परत करण्याची घटना खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व दीपक निंबाळकर, अनंत देसाई, राजू पाटील, एस. सी. अत्तार, बी. एस. पाटील, अनिल बारड, दीपक देसाई, रमेश शिंदे, अशोक पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटण दराची चर्चा फिस्कटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मटणाचा दर ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविण्यात आलेल्या बैठकीकडे मटण विक्रेत्यांनी पाठ फिरवल्याने दराची चर्चा फिस्कटली. विक्रेते प्रतिकिलो ५४० रुपये मटणाचा दर कायम राहील या निर्णयावर ठाम असून कृती समितीने दरवाढीविरोधात ४७ तालमी आंदोलनात उतरतील, असा इशारा दिला आहे.

विक्रेत्यांनी मटणाचा दर प्रतिकिलो ५६० रुपये केल्याने ग्राहकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दरवाढीला विरोध करताना तटाकडील तालीम मंडळ, राजारामपुरी मित्र मंडळाने प्रतिकिलो ४५० रुपये दराने विक्री केली. मटणदरवाढीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आणि महानगरपालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी शहर आणि ग्रामीण भागातील मटण दराचा अहवाल देण्याची सूचना केली आहे.

दरम्यान यासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून कृती समिती आणि मटण विक्रेत्यांना निरोप दिले होते. पण या बैठकीकडे विक्रेत्यांनी पाठ फिरवली. महानगरपालिका आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील, अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मोहन केंबळकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. समितीने उचगाव, आंबेवाडी, गिरगाव, बिद्री येथील मटण दराची माहिती दिली. ग्रामीण भागात ४२५ ते ४७० रुपये मटणाचा दर असल्याचे सांगितले. शहरातील शंभर ते सव्वाशे विक्रेते आडमुठे धोरण स्वीकारत असून पाच लाखाहून अधिक नागरिकांना वेठीस धरत आहेत, असा आरोप बैठकीत करण्यात आला. यावेळी माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, दुर्गेश लिंग्रस, माजी नगरसेवक अशोक भंडारी, सुजित चव्हाण, मयूर पाटील उपस्थित होते.

'४५० रुपयांचा आग्रह करू नका'

खाटीक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थिती न लावता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात डॉ. पाटील यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार मटण विक्रेत्यांनी प्रतिकिलो २० रुपये दर कमी केला आहे. मटण विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणी संदर्भात आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. आमचे म्हणणे त्यांनी शांतपणे समजून घ्यावे. पण आम्हाला प्रतिकिलो ४५० रुपये दराने मटण विक्रीस आग्रह करू नये. ग्रामीण भागात मटणाचा दर कमी का आहे याची जाहीर चर्चा करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. अस्सल मटण खाणारे ग्राहक आमच्याकडे मटण खरेदी करतील, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

मटणाची टंचाई

बाजारात बकरी नसल्याने मटण मार्केटमध्ये मटणाची टंचाई जाणवली. आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी मटण मार्केटमध्ये येऊन पाहणी केली. यावेळी दोन दुकाने उघडी होती तर अन्य दुकाने बंद होती. दोन दुकानात प्रतिकिलो ५४० रुपयांनी मटण विक्री सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७० वॅटच्या दिव्यांचा तुटवडा

$
0
0

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात बसविण्यात येत असलेल्या एलईडी दिव्यांच्या प्रकाशावरून शुक्रवारी स्थायी समिती सभेत प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले. अपुऱ्या प्रकाशाचे दिवे बसविल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर कंपनीकडे ७० वॅटचे दिवे नसल्याचा अजब खुलासाही प्रशासनाने केला. खुलाशामुळे सदस्यांनी पुन्हा विद्युत विभागावर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच सर्वच जलशुद्धिकरण केंद्रातून पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते.

'एलईडी दिवे बसविण्यास शहरात सुरुवात झाल्यापासून कंपनीच्या कामाविषयी तक्रारी वाढत आहेत. या तक्रारींचा पाढा शुक्रवारच्या सभेतही सदस्यांनी पुन्हा वाचला. प्रभागातील एका गल्लीत दिवे बसविले असताना दुसऱ्या गल्लीत बसविलेले नाहीत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर साहित्याचा पुरवठा होत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये गैरसमजाचे वातावरण निर्माण होत आहे. ७० वॅटच्या दिव्यांची आवश्यकता असताना ३५ वॅटचे दिवे बसवले असून अपुरा प्रकाश पडत आहे,' असा आरोप सदस्यांनी केली. 'कंपनीकडे ७० वॅटचे दिवे नाहीत. पुण्यामध्ये आलेल्या दिव्यांची तपासणी सुरू आहे,' असा खुलासा प्रशासनाने केला.

'शाहूपुरी, कसबा बावडा, पुईखडी व बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. तसेच पाण्यावर तेलासारखा तवंग येत आहे. येथे जलशुद्धिकरण प्रक्रिया योग्य प्रकारे होत नाही का?' असा प्रश्न सभापती देशमुख, दीपा मगदूम, पूजा नाइकनवरे उपस्थित केला. तसेच सोमवारी (ता. ९) पाहणी करणार असल्याचे स्पष्ट केले. 'जलशुद्धिकरण केंद्र दुरुस्तीसाठी ४४ लाखांचा आराखडा तयार केला आहे,' असे पाणीपुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

माधुरी लाड म्हणाल्या, 'थकीत पाणीपट्टीप्रश्नी पाणी कनेक्शन खंडित केले जात आहे. कनेक्शन गटारीकडील बाजूला तोडले जात आहे. पाणीपुरवठा व्यवस्थित बंद होत नसल्याने पाणी गटारीद्वारे वाहून जात आहे. तसेच थकबाकीदार पुन्हा परस्पर नळ जोडून घेत आहेत.'

'शहराच्या सर्वच प्रवेशद्वारांवर अतिक्रमणे वाढली आहेत. तसेच आयआरबी कंपनीने केलेले काँक्रिट व डांबरीकरण रस्त्यामध्ये भेगा अथवा उंचवटा निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे,' असे सदस्यांनी शहर अभियंता विभागास निदर्शनास आणून दिले.

००००

चौकट...

'बीओटी'वर उद्यान विकसित करा

शहरात येणाऱ्या पर्यटकांना फिरण्यासाठी सुस्थितीत उद्याने असावीत, त्यासाठी काही उद्याने बीओटी तत्त्वावर विकसित करा. त्याचा उपयोग पर्यटकांना होईल. त्याद्वारे पर्यटनवृद्धी होईल, असा विश्वास सविता भालकर व सभापतींनी व्यक्त केला. महावीर, रंकाळा व हुतात्मा गार्डन महापालिका स्वत: देखभाल दुरुस्ती करत आहे. हुतात्मा गार्डनचा प्रस्ताव द्या,' असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुमजली पार्किंगचीनिविदा मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सरस्वती चित्रमंदिराजवळील बहुमजली पार्किंग इमारतीसाठी मागवण्यात आलेल्या निविदेला शुक्रवारी स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली. व्ही. के. पाटील यांनी ६.३० टक्के कमी दराने भरलेल्या निविदा स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आली. बहुचर्चित करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिली निविदा १८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. दर्शन मंडपाच्या जागेवरून निर्माण झालेला वाद कायम असताना मिळालेला निधी सरस्वती चित्रमंदिर परिसरात बहुमजली पार्किंगसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सात कोटी ८६ लाखांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यामध्ये प्री बीट बैठक घेण्यात आली. बैठकीला सहा ठेकेदारांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर वाढीव रकमेचा त्यामध्ये समावेश करून निविदेची रक्कम वाढवण्यात आली. वाढीव रकमेनुसार चार ठेकेदारांनी निविदा दाखल केली होती. त्यापैकी पाटील यांच्या ६.३० टक्के कमी दराच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.

तीन मजली इमारतीमध्ये १६४ कार, १५९ मोटारसायकल पार्किंगची आणि चालकांसाठी रेस्ट रूमची सुविधा दिली जाणार आहे. बहुमजली पार्किंग इमारतीसाठी ऑक्टोबरमध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. सभापती शारंगधर देशमुख, पूजा नाइकनवरे, दीपा मगदूम, माधुरी लाड, सविता भालकर, छाया पोवार, सचिन पाटील, संदीप कवाळे आदींनी चर्चेत भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कमला कॉलेजच्या ‘स्वायत्तते’साठी प्रयत्न

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ताराराणी विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थिनींच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन १६ फेब्रुवारी २०२० रोजी केले असून संस्थेच्या स्थापनेपासून १९४५ पासूनच्या सर्व बॅचच्या एक हजारांहून अधिक विद्यार्थिनी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. कोणत्याही संस्थेच्या माजी विद्यार्थिनीने मेळाव्यात सहभागासाठी https://forms.gle/1LNw7xvSsmcHi1tPA या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, कमला कॉलेजच्या स्वायत्ततेसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, 'ताराराणी विद्यापीठाची स्थापना १९४५ साली झाली. यंदा संस्था अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा घेऊन विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात येणार आहे. वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. संस्थेच्या कमला कॉलेज, उषाराजे हायस्कूल, डीएड कॉलेज, कडगाव येथील कुमार भवन, प्रिन्स शिवाजी विद्यालय येथील विद्यार्थिनींना एकत्र येण्याची पर्वणी मेळाव्यामुळे मिळणार आहे.'

'येत्या वर्षात संस्थेतर्फे काही संकल्प करण्यात आले आहेत. यामध्ये साडेतीन कोटी रुपये खर्च करून विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. हे वसतिगृह सौरऊर्जेवर अद्ययावत करण्यात येणार आहे. कमला कॉलेज स्वायत्त करण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये वाढ करण्यात येणार असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेची उभारणी करण्यात येणार आहे.'

पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष एस. एम. पवार, अशोकराव पर्वते-पाटील, मुख्याध्यापिका यू. एस. साठे, प्रभारी प्राचार्य तेजस्विनी मुडेकर, मुख्याध्यापिका विद्या यादव, डॉ. सुजय पाटील, प्रा. अनिल घस्ते, प्रा. एस. ए. साळोखे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बँक निवडणुकीचे पडघम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांत सध्या दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. प्राथमिक शिक्षकांचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र, ७२००च्या आसपास सभासद, मुख्यालयाव्यतिरिक्त ११ शाखांतून जिल्हाभर कार्यक्षेत्र विस्तारलेल्या शिक्षक बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. समविचारी गट एकत्र येऊन नवीन आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. सद्यस्थितीवरुन बँकेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील गटाची बँकेत २००९ पासून सत्ता आहे. पहिली सहा वर्षे वरुटे चेअरमन होते. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत पॅनेलच्या विजयाची हॅटट्रिक करत बँकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी वरुटे गट व शिक्षक संघ प्रयत्नशील आहे. गेल्या निवडणुकीत गटाने १७ पैकी बारा जागा जिंकल्या. तर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने एकत्रित निवडणूक लढविली. दोन्ही गटाचे पाच उमेदवार निवडून आले. दरम्यान निवडणुकीनंतर दीड वर्षांत पुरोगामी शिक्षक संघटनेचे संचालक अरुण पाटील हे सत्ताधारी वरुटे गटात सामील झाले.

विद्यमान संचालकांची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपत आहे. सहकार विभागाने बँक व्यवस्थापनला प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू असताना संघटनांच्या पातळीवर मोर्चेबांधणी वेगावली आहे. सत्ताधारी व विरोधी गटांनी बैठकांना सुरुवात केली आहे. गेल्यावेळी पुरोगामी संघटना आणि शिक्षक समितीने आघाडी केली. आगामी निवडणुकीसाठी शिक्षक समिती आणि थोरात गट एकत्र येण्याच्या घडामोडी सुरू आहेत. तर पुरोगामी शिक्षक संघटनेच्या बैठकीत सत्ता आणण्याचा निर्धार केला. सत्ताधारी वरुटे गट पूर्ण ताकतिनिशी उतरणार आहे.

गेल्या दहा वर्षात बँकेत सभासदाभिमुख कारभार केला. सभासदांना न्यायाची भूमिका कायम ठेवली. कर्जमर्यादा २८ लाखांपर्यंत वाढवली आहे. कर्जासाठी ११.५० टक्के व्याजदर आहे. एखादा सभासद मृत झाल्यास संपूर्ण कर्ज माफ होते. सभासदांच्या हिताला प्राधान्यक्रम दिल्याने बँकेने सभासदांचा विश्वास मिळवला आहे.

- राजाराम वरुटे, सत्ताधारी गटाचे प्रमुख

निवडणुकीच्या रणनितीबाबत संघटनेची नुकतीच बैठक झाली. आघाडी करण्यासाठी प्राथमिक शिक्षक समिती आणि थोरात गटाशी बोलणी सुरू आहे. गेली पाच वर्षे बँकेत सभासदांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवला. सत्ताधाऱ्यांना सभासद हिताचा कारभार करण्यास भाग पाडले.

- प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना

प्राथमिक शिक्षक समिती स्वबळावर निवडणुकीची तयारी करीत आहे. मात्र आमच्या विचारांशी जुळणारे मित्रपक्ष तयार झाले, योग्य जागा वाटप झाल्यास आघाडीसाठी तयार आहे. सध्या समितीचे दोन संचालक आहेत. गेल्या निवडणुकीत अनेक उमेदवार कमी मतांनी पराभूत झाले. यंदा तसे होणार नाही.

- अर्जुन पाटील, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

दृष्टिक्षेपात बँक

११

शाखा

७२००

सभासद

१७

संचालक

१३

सत्ताधारी गटाचे संचालक (राजाराम वरुटेंच्या नेतृत्वाखाली)

संचालक (महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना)

संचालक (प्राथमिक शिक्षक समिती)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षातून विद्यार्थी वाहतुकीवर कारवाईच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मुंबई हायकोर्टाने असुरक्षित विद्यार्थी वाहतूक रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात ऑटोरिक्षातून विद्यार्थी वाहतूक करता येणार नाही,' असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी विद्यार्थी वाहतूक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले. हायकोर्टात विद्यार्थी वाहतूकीसंबधी सुनावणी असून कारवाईचा अहवाल कोर्टाला सादर केला जाणार आहे. कारवाई सुरुच राहील याचा त्यांनी पुनरुच्चारही केला.

पोलिस अधीक्षक कार्यालयात वाहतूक नियोजनासंदर्भात बैठक झाली. यावेळई विद्यार्थी वाहतूकीसंबधी चर्चा झाली. प्रादेशिक परिवहन अधिकारी एस. टी. अल्वारिस यांनी असुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसंबधी कोर्टाच्या आदेशाची माहिती दिली. 'ऑटोरिक्षातील विद्यार्थी वाहतूक असुरक्षित आहे. त्यातून मोठी हानी होऊ शकते. कोर्टाच्या आदेशानुसार आरटीओने कारवाई सुरू केली आहे,' असे अल्वारिस यांनी स्पष्ट केले. आजअखेर ७६ रिक्षांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली.

विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी भूमिका मांडली. 'शहरातील सुमारे ७०० व्यावसायिक रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करतात. सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात चांगल्या पद्धतीने व्यवसाय केला जातो. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सुरक्षिततेचे सर्व उपाय योजून वाहतूक केली जाते. पालक आणि विद्यार्थीही वाहतुकीबाबत समाधानी आहेत.'

'राज्य सरकारने २०१४ मध्ये ऑटो रिक्षातून काही अटींवर विद्यार्थी वाहतूकीस परवानगी दिली आहे. तुम्ही आरटीओंकडे परवानगी मागितली आहे का?' असा प्रश्न अधीक्षक देशमुख यांनी केला. कोर्टाचा आदेश आम्हाला समजला नाही आणि परवानगीचे महत्व लक्षात आले नसल्याने जिल्ह्यातील एकाही रिक्षाचालकाने परवानगी घेतली नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

राज्य आणि जिल्हा संघटनेने कोर्टात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची भूमिका मांडली नसल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिस प्रशासनाने कोर्टाचा निर्णय होईपर्यंत प्रत्येकी दहा विद्यार्थांची वाहतूक रिक्षातून करण्याची परवानगी मागितली. मात्र, देशमुख यांनी,

याप्रकरणी पुढील सुनावणी १७ डिसेंबरला होणार असल्याने कारवाई सुरू राहील असे स्पष्ट केले.

बैठकीला शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक वसंत बाबर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

एका रिक्षात २२ विद्यार्थी कसे ?

एका रिक्षातून २२ विद्यार्थांची वाहतूक कशी करता? असा सवाल अधीक्षक देशमुख यांनी केल्यावर संघटनेचे पदाधिकारी निरुत्तर झाले. यापुढे जादा विद्यार्थांची वाहतूक होणार नाही याची काळजी घेऊ असे त्यांनी सांगितले. त्यावर रिक्षातून विद्यार्थी वाहतूक कशी सुरक्षित असते याची माहिती कोर्टात सादर करण्याची सूचनाही यावेळी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

फोटो : अर्जुन टाकळकर

००००

(मूळ कॉपी)

रिक्षातून विदयार्थी वाहतूकीस पोलिसांचा नकार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

असुरक्षित विद्यार्थी वाहतूक रोखण्याचे मुंबई हायकोर्टाने आदेश दिल्याने शहरासह जिल्ह्यात अॅटो रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करता येणार नाही, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी विद्यार्थी वाहतूक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले. हायकोर्टात विद्यार्थी वाहतूकीसंबधी सुनावणी असून कारवाईचा अहवाल कोर्टाला सादर करायचा असल्याने यापुढे कारवाई सुरुच राहिल याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

पोलिस अधीक्षक कार्यालयात आज शनिवारी वाहतूक नियोजनासंदर्भात बैठक झाली.बैठकीत सर्वप्रथम विद्यार्थी वाहतूकीसंबधी चर्चा झाली. प्रादेशिक परिवहन अधिकारी एस.टी अल्वारिस यांनी असुरक्षित विद्यार्थी वाहतूकीसंबधी कोर्टाने दिलेल्या आदेशाची माहिती दिली. अॅटो रिक्षातील विद्यार्थी वाहतूक असुरक्षित असून मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार आरटीओने कारवाई सुरू केली आहे, असे अल्वारिस यांनी स्पष्ट केले. आजअखेर ७६ रिक्षावर कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली.

विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी आपली भूमिका मांडली. शहरातील ६०० ते ७०० रिक्षा विद्यार्थी वाहतूक करतात. सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात चांगल्या पद्धतीने व्यवसाय केला जात असून कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सुरक्षिततेचे सर्व उपाय योजून वाहतूक केली जाते. पालक आणि विद्यार्थीही वाहतूकीबाबत समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने २०१४ मध्ये अॅटो रिक्षातून काही अटीवर विद्यार्थी वाहतूकीस परवानगी दिली आहे. तुम्ही आरटीओकडे परवानगी मागितली आहे का? असा प्रश्न पोलिस अधीक्षक देशमुख यांनी केला. कोर्टाचा आदेश आम्हाला कळाला नाही आणि परवानगीचे महत्व लक्षात आले नसल्याने जिल्ह्यातील एकाही रिक्षाचालकाने परवानगी घेतली नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. राज्य आणि जिल्हा संघटनेने कोर्टात विद्यार्थी वाहतूक रिक्षासंबधी भूमिका मांडली नसल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिस प्रशासनाने कोर्टाचा निर्णय होईपर्यंत दहा विद्यार्थांची वाहतूक रिक्षातून करण्याची परवानगी मागितली. त्यावर देशमुख यांनी १७ डिसेंबरला सुनावणी असल्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. बैठकीला शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक वसंत बाबर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

०००००

एका रिक्षात २२ विद्यार्थी कसे

एका रिक्षातून २२ विद्यार्थांची वाहतूक कशी करता असा सवाल अधीक्षक देशमुख यांनी केल्यावर संघटनेचे पदाधिकारी निरुत्तर झाले. यापुढे जादा विद्यार्थांची वाहतूक होणार नाही याची काळजी घेऊ असे सांगितले. त्यावर अॅटो रिक्षातून विद्यार्थी वाहतूक कशी सुरक्षित असते याची माहिती कोर्टात सादर करण्याची सूचनाही यावेळी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

फोटो अर्जुन टाकळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. डॉ. अरुण शिंदे यांच्या ग्रंथास पुरस्कार

$
0
0

कोल्हापूर : वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्था व डॉ. भा. ल. भोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा भोळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कार येथील नाइट कॉलेजमधील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अरुण शिंदे यांच्या 'सत्यशोधकीय नियतकालिके' या ग्रंथाला जाहीर झाला आहे. रोख दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. भोळे यांच्या स्मृतिदिनी, २४ डिसेंबर रोजी पुणे येथे पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे. संत्य साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीटभट्टी मालकाच्या खूनप्रकरणी कामगाराला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील गायरानात वीटभट्टी मालकाचा खून केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने कामगार उमेश सुरेश सोनवणे (वय ३५, रा. आरंडोल, जि. जळगाव) याला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा कोर्टाने ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. नागलकर यांनी शनिवारी हा आदेश दिला.

या खटल्याची माहिती अशी, निवास यशवंत मोहिते (४०, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) यांचा वीटभट्टीचा व्यवसाय होता. या वीटभट्टीवर आरोपी उमेश सोनवणे हा कामगार होता. ११ जानेवारी २०१५ रोजी पगाराच्या कारणावरुन मालक मोहिते आणि कामगार सोनवणे यांच्यात वाद झाला. संतापलेल्या सोनवणेने वीटभट्टीच्या ठिकाणीच मोहिते यांचा गळा दाबून उचलून आपटून ठार मारले. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह त्यांच्या कारमध्ये ठेवला. ही कार दावणगिरी तालुक्यातील कोगन्नूर गावच्या हद्दीत महामार्गालगत १०० फुटांवरून दरीत सोडून दिली.

या प्रकरणाचा तपास शिरोली एमआयडीसी पोलिसांनी केला. तपासात खून सोनावणेने केल्याचे उघड झाले. खटल्याचे काम जिल्हा व सत्र न्यायाधीश नागलकर यांच्यासमोर चालले. तत्कालीन सरकारी वकील एस. एम. पाटील, विशेष सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी काम पाहिले. सहायक सरकारी वकील अमित महाडेश्वर यांचा युक्तिवाद, परिस्थितीजन्य पुराव्यामधून आरोपी सोनवणेने मोहिते यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कोर्टाने आरोपीला शिक्षा ठोठावली. अ‍ॅड. झेबा पठाण, गजानन कोरे, बी. डी. सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक संदीप अबिटकर, अशोक माने यांचे खटल्यासाठी सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images