Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पुढील वर्षी सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा

$
0
0

Satish.ghatage.timesgroup.com

Tweet.satishgMT

कोल्हापूर

विधानसभा रणसंग्राम नुकताच संपला असून पुढील वर्षी २०२० मध्ये जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. एक हजारहून अधिक छोट्यामोठ्या सहकारी संस्थांची निवडणूक पुढच्या वर्षी होणार असून जिल्ह्याचे आर्थिक केंद्र असलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ), कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी), राजाराम, शरद, वारणा, कुंभी या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणूका होणार आहेत. गोकुळ आणि जिल्हा बँकची निवडणूक मे २०१९ मध्ये होण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षी मे महिन्यात गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपणार आहे. गोकुळवर सध्या आमदार पी.एन. पाटील आणि माजी आमदार महादेराव महाडिक यांची सत्ता आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाडिक गटाचा पराभव केल्यानंतर आमदार सतेज पाटील गतवेळच्या निवडणुकीप्रमाणे यंदाही पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्यामुळे गोकुळची निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेवर आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. गतवेळी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात मुश्रीफांना यश आले होते. पण यंदा सत्ताधारी संचालकांविरोधात भाजप शिवसेना पूर्ण ताकदीने रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मे महिन्यात या दोन्ही संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

शरद सहकारी साखर कारखाना नरंदे आणि डी.वाय. पाटील साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत मार्च २०२० मध्ये संपणार आहे. दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे. कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्याची निवडणूक एप्रिलमध्ये होणार असून या निवडणुकीतही गतवेळेप्रमाणे महाडिक आणि पाटील या पारंपरिक गटात लढत होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात तात्यासो कोरे वारणा कारखान्याची तर डिसेंबर महिन्यात कुंभी कारखान्याची निवडणूक होणार आहे. 'वारणे' त आमदार विनय कोरे आणि 'कुंभी' त माजी आमदार चंद्रदीप नरके यांना विरोधकांकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

गोकुळ, जिल्हा बँक, साखर कारखान्यांबरोबरच कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची मुदत ऑगस्ट २०२० ला संपणार आहे. सध्या समितीवर राष्ट्रवादी, जनसुराज्य, काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीत राजकीय संदर्भ बदलले असल्याने बाजार समितीची निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.

पुढील वर्षी सहकारी आणि नागरी बँका, दूध संघ, संस्था, पंतसंस्थाच्याही निवडणुका होणार आहेत. कोल्हापूर शहरातील राजर्षी शाहू गर्व्हमेंट सर्व्हंटस बँकेची निवडणूक मार्च महिन्यात होणार आहे. तसेच दि अर्बन को ऑपरेटिव्ह बँक, कोल्हापूर महिला बँक, सत्यशोधक बँक, यूथ बँक, श्रीपतराव, गणेश बँक यड्राव, अण्णासाहेब चौगुले अर्बन बँक या नावाजलेल्या संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

...

कोट

'विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली असून २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे. कोल्हापूर विभागात सहकारी संस्थांचे मोठे जाळे असून विभागीय निबंधक, जिल्हा उपनिबंधक, साखर सहसंचालक कार्यालय, पदुम,पणन यांच्यामार्फत निवडणुकीचा कार्यक्रम राबवला जाणार आहे.

अरुण काकडे, विभागीय निबंधक

...

निवडणूक असलेल्या प्रमुख संस्था

जिल्हा बँक

गोकुळ दूध संघ

बाजार समिती

...

साखर कारखाने

राजाराम, कुंभी, वारणा, शरद.

...

सहकारी बँका

अर्बन, कोल्हापूर महिला, गव्हर्मेंट सर्व्हंटस्, यूथ, श्रीपतराव, गणेश, सत्यशोधक, अण्णासाहेब चौगुले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंढरपूरला जाणाऱ्या गाडीला अपघात; ५ वारकऱ्यांचा मृत्यू

$
0
0

सोलापूर: कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या एका टेम्पोला सांगोलजवळ झालेल्या भीषण अपघतात ५ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वारकरी बेळगावातील मंडोळी व हंगरगा गावचे रहिवासी आहेत.

अपघातग्रस्त टेम्पो बेळगावहून पंढरपूरकडे निघाला होता. या टेम्पोनं विटांनी भरलेल्या एका ट्रॅक्टरला मागून धडक दिली. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींचा नेमका आकडा कळू शकलेला नाही. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. अपघाताचे वृत्त कळताच मंडोळी आणि हंगरगा गावावर शोककळा पसरली आहे. मंडोळी ग्रामस्थ तात्काळ सांगोल्याला रवाना झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील शेतकरी सुखी व्हावा; चंद्रकांत पाटील यांचे विठ्ठल चरणी साकडे

$
0
0

पंढरपूर : राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठ्ठलाच्या चरणी आज घातले. महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी सुनील महादेव ओमासे आणि नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सौ. अंजली पाटील, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माजी अध्यक्ष अतुल भोसले, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, प्रांतधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी , तहसिलदार वैशाली वाघमारे आदी उपस्थित होते.

यावर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातील दुष्काळस्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही मदत मागितली आहे. गेली तीन चार वर्षे वारी निर्मल वारी करण्यासाठी प्रयत्न केला गेला. वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


बेडग गावचे ओमासे ठरले मानाचे वारकरी
मानाचा वारकरी ठरलेले सुनील ओमासे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील आहेत. शेतकरी कुटुंबातील ओमासे २००३ पासून वारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना चांदीची विठ्ठल रुक्मिणी मुर्ती, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना मोफत एसटी पासही देण्यात आला.

पंढरपूरला जाणाऱ्या गाडीला अपघात; ५ वारकऱ्यांचा मृत्यू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरीवाल्यांचा मनपासमोर ठिय्या

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अंबाबाई मंदिरच्या महाद्वार रोडवर किरकोळ विक्रीसाठी बसण्याची परवानगी मागण्यासाठी शुक्रवारी येथील फेरीवाल्यांनी आवळे, चिंचा, रांगोळी व नारळाच्या बुट्टीसह महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मारला. सुमारे दोन ते अडीत तास त्यांचे प्रतिकात्मक आंदोलन सुरू होते. आंदोलनासाठी परवानगी नसल्याने पोलिस प्रशासनाने आंदोलकांना हटवले.

करवीर निवासिनी अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाद्वारवर बसलेल्या फेरीवाल्यांमुळे अडथळा निर्माण होत होता. पश्चिम देवस्थान समितीने मंदिर परिवर अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकांने नवरात्रोत्सवापूर्वी फेरीवाल्यांना हटवून त्यांचे पुनर्वसन कपिलतीर्थ मार्केटमधील पार्किंगच्या जागेत केले. कारवाईमुळे मंदिराकडे येणारा रस्ता पूर्ण मोकळा झाला. पण पुनर्वसन केलेल्या जागेत व्यवसाय होत नसल्याचे कारण देत पुन्हा महाद्वार रोड व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न होऊ लागला. अतिक्रमण पथकांने येथे नियमित दोन कर्मचारी तैनात ठेवल्याने त्यांच्या या प्रयत्नाला यश आले नाही.

शुक्रवारी महासभा असल्याने फेरीवाल्यांचे नेते प्र. द. गणफुले यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता महापालिका प्रवेशद्वावर ठिय्या मारला. आवळे, चिंचा, रांगोळी व नारळ असे साहित्यासह त्यांनी आंदोलनास सुरुवात केली. अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण फेरीवाले आपल्या मागणीवर ठाम राहिले. प्रशासनाने मात्र पुन्हा महाद्वार रोडवर बसण्यास परवानगी देणार नाही, या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. अखेर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नसल्याने सर्व फेरीवाल्यांना हटविले. आंदोलनात शिला पाटील, शारदा गवंडी, राणी गुरव यांच्यासह आठ ते दहा फेरीवाले सहभागी झाले होते.

नेत्यांची आंदोलनाला फूस

महाद्वारवरील फेरीवाल्यांचे पुनर्वसन कपिलतीर्थ मार्केटच्या पार्किंगमध्ये करण्यात आले. त्याला बहुतांशी फेरीवाल्यांनी समर्थता दर्शवली. त्यांचे व्यवसायही सुरू आहेत. पण केवळ पाच ते सहा फेरीवाल्यांच्या हट्टामुळे पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. आजच्या ठिय्या आंदोलनात फेरीवाल्यांचा समावेश असला, तरी अनेक फेरीवाले नेते महापालिकेभोवती घिरट्या घालत अप्रत्यक्षरित्या आंदोलनाला पाठिंबा देत होते. पण त्यांचा प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी नव्हता. त्यामुळे काही ठरविक फेरीवाले नेते फेरीवाल्यांना फूस लावत असल्याची चर्चा आंदोलनस्थळी सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कामगार मुखपत्र सुवर्ण महोत्सव रविवारी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन पुरस्कृत स्वा.वीज कामगार मुखपत्राने सुवर्णमहोत्सव समारंभ रविवारी (ता. १०) कोल्हापुरात होणार आहे. उद्यमनगर येथील कृष्णा सांस्कृतिक भवनात अडीच वाजता कार्यक्रम होणार आहे.

फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. फेडरेशनची दोन मुखपत्रे असून वीज कामगार मुखपत्र १९६९ नियमित खंड न पडता सुरू आहे. देश आणि राज्यातील उर्जा क्षेत्रातील माहिती, कामगारांचे जीवनमान, उद्योग या विषयावर लेखन केले जाते. राज्यातील २० हजार मुखपत्राचे सदस्य आहेत. मुखपत्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला माजी महापौर माधवी गवंडी, कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल भोसले, डाकघर प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील, प्रा. डॉ. भारती पाटील, मा. वि. जोगळेकर, के.पी. तांबेकर उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला फेडरेशनचे कार्याध्यक्ष सी. एन. देशमुख, सरचिटणीस कृष्णा भोयर, महेश जोतदार उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमधील आयारामांच्या अस्वस्थतेत वाढ

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर

'तेलही गेले ... अन् तूपही गेले…' या म्हणीप्रमाणे सध्या भाजपमधील आयाराम मंडळींची अवस्था झाली आहे. विधानसभेचे तिकीट नाही, बंडखोरी आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवून सुद्धा यश काही गवसले नाही. शिवाय पाच वर्षांपूर्वी जनमानसात असलेली भाजपची हवा आता कमी होत आहे तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा जादा यश मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्या मंडळींची चांगलीच पंचाईत झाली आहे. पुढील राजकीय वाटचालीवरुन अनेकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

राज्यातील सत्तेची समीकरणेही जुळेनाशी झाली आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अन्य पक्ष एकवटत असल्यासारखे चित्र आहे. यामुळे भाजपमध्ये दाखल झालेली मंडळी राजकीय वाटचालीविषयी धास्तावली आहेत. पाच वर्षांपूर्वी केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचा वारु बेफाम सुटला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट, केंद्र व राज्यातील सत्तेमुळे सगळया सरकारी यंत्रणेवर भाजपची हुकुमत होती. पाच वर्षांच्या कालावधीत दोन्ही काँग्रेसमधील अनेकजण भाजपात दाखल झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात मोठ्या संख्येने इनकमिंग केले. जिल्हा परिषद व अन्य संस्थेच्या निवडणुकीत सगळी रसद पुरविली. यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात भरणा झाला. कोणाला महामंडळाच्या अध्यक्षपदाचा, कोणाला विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द दिला.

माजी मंत्री भरमू पाटील, गोपाळ पाटील, शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शिरोळमधील अशोक माने, अनिल यादव, अण्णा-भाऊ उद्योग समूहाचे अशोक चराटी, उद्योजक रमेश रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, चंदगडमधील शिवाजी पाटील या साऱ्या मंडळींनी आमदारकीचे स्वप्न रंगवित 'कमळ' हाती घेतले. भाजपने जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काहीजणांना पदे दिली. शाहू कारखान्याचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांना म्हाडा पुणे विभागाचे अध्यक्षपद दिले. शिरोळ तालुक्यातील काँग्रेसचे अनिल यादव यांना भाजपात प्रवेश देत 'गोकुळ'च्या स्वीकृत संचालकपदी बसविले. शिवाय वेगवेगळ्या मतदारसंघात विधानसभेसाठी इच्छुक मंडळींना रसद पुरविली.

मात्र विधानसभेला शिवसेना, भाजपची युती झाली आणि मोठ्या अपेक्षेने भाजपमध्ये दाखल झालेल्या मंडळींची कोंडी झाली. कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचे त्यांचे मनसुबे उधळले. अंतिमत: कोणी बंडखोरी करत तर कोणी अपक्ष म्हणून विधानसभा लढविली, पण आमदारकीचे स्वप्न काही साकार होऊ शकले नाही. शिवाय विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेइतके यश मिळाले नाही. यामुळे एक हाती सत्ता मिळण्याची शक्यता नाही. शत प्रतिशत भाजप नसल्यामुळे महामंडळे अथवा अन्य ठिकाणी वर्णी लागेल याविषयी कोणी खात्री देऊ शकत नाही. यामुळे ही मंडळी धास्तावली आहेत.

.....

………

…'पालकत्व' कोण निभावणार ?

गेल्या पाच वर्षात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाची अनेक खाती भूषविली. राज्यात दोन क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांची गणना झाली. मंत्रीपद, सोबतीला प्रदेशाध्यक्षपद यामुळे पालकमंत्री पाटील यांची राजकीय वजन चांगलेच वाढले होते. त्या बळावर त्यांनी जिल्ह्यात अनेकांना मदत केली. मात्र आता स्थिती बदलली आहे. भाजपची राज्यातील ताकद काही अंशी घटली. जिल्ह्यात भाजपच्या हाती भोपळा आला. संख्याबळ घटल्यामुळे पालकमंत्री पाटील यांच्यावर मर्यादा आल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर भरवसा ठेवून भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या मंडळींचे पालकत्व आता कोण निभावणार याची चिंता संबंधितांना लागून राहिली आहे.

…………………....

राजीनामा पक्षप्रतोदांकडे ...

दलितमित्र अशोक माने यांनी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवायची म्हणून भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. जनसुराज्य शक्तीपक्षाकडून निवडणूक लढवली. मात्र निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली. माने यांनी विधानसभेला सामोरे जाताना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व व जि.प.सदस्यपदाचा राजीनामा हा पक्षप्रतोद विजय भोजे यांच्याकडे दिला होता. हा राजीनामा प्रशासनाकडे न दिल्यामुळे माने यांचे सदस्यत्व शाबूत राहणार आहे.

...

भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह

भरमू पाटील, गोपाळ पाटील, अशोक चराटी, शिवाजी पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुनीता रेडेकर यांचे पती रमेश, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांनी राजकीय महत्वाकांक्षेपोटी भाजपात प्रवेश केला होता. सध्या सर्वच मतदारसंघात मूळ भाजप आणि दोन्ही काँग्रेसमधून भाजपवासी झालेले नेते, कार्यकर्ते यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मूळच्या काँग्रेसच्या आणि सध्या भाजपात दाखल झालेल्या मंडळीचे भविष्यकाळात पक्षातील स्थान काय राहणार हा विषय उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ कारखान्यांचे गाळप परवाने ‘पेंडिंग’

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : प्रलंबित एफआरपी, सरकारी देणी देण्यास विलंब या कारणांसह साखर आयुक्त कार्यालयाने कोल्हापूर विभागातील १८ साखर कारखान्यांचे गाळप परवाने पेंडिंग ठेवले आहेत. ऐन साखर हंगामाच्या तोंडावर परवाने पेंडिंग ठेवल्याने खळबळ उडाली आहे. पेंडिंग ठेवलेल्या कारखान्यांना १३ नोव्हेंबरला म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे.

दरवर्षी एक नोव्हेंबरला राज्यातील साखर हंगाम सुरू होतो; पण यंदा महापुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील ४५ लाख मेट्रिक टनाला फटका बसला. त्यातच परतीच्या पावसाने साखर हंगामाच्या वेळापत्रकाचे गणित बिघडवून ठेवले आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले नसल्याने हंगाम सुरू करण्याबाबत मंत्री समितीची बैठकही झालेली नाही.

परतीच्या पावसाने शेतात पाणी असल्याने हंगाम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तरीही साखर आयुक्त कार्यालयाने कारखान्यांना गाळप परवाना देण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. कोल्हापूर विभागात ३७ साखर कारखाने असून, कोल्हापूर जिल्ह्यात २२, तर सांगली जिल्ह्यात १५ कारखाने आहेत. बहुतांश कारखान्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर प्रदीपन केले आहे. हंगाम सुरू करण्यासाठी परवाने मागितले असून, त्याप्रमाणे माहिती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ११, तर सांगली जिल्ह्यातील सात कारखाने अशा १२ कारखान्यांचा परवाना पेंडिंग ठेवण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील केन अॅग्रो, शरद कारखाना नरंदे, गायकवाड कारखाना बांबवडे, रिलाएबल शुगर फराळे, सदाशिवराव मंडलिक कारखाना, आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज, पंचगंगा साखर कारखाना, कुंभी-कासारी, वारणा, आजरा कारखाना, दौलत साखर कारखाना हलकर्णी, सांगली जिल्ह्यातील राजारामबापू पाटील कारंदवाडी, सोनहिरा कारखाना वांगी, महांकाली कारखाना, यशवंत शुगर, माणगंगा आणि तासगाव या साखर कारखान्यांची गाळप परवाना प्रक्रिया पेंडिंग ठेवली आहे.

वारणा साखर कारखान्याची अंदाजे ५० कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. दोन वर्षे बंद असलेला दौलत साखर कारखाना यंदा पुन्हा सुरू करण्यात येणार असला तरी दोन वर्षांपूर्वीची ऊस उत्पादकांची थकीत देणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अनेक कारखान्यांनी ऊस उत्पादकांची एफआरपी दिली असली तरी अनेक सरकारी देणी दिलेली नाहीत. त्यामुळे त्यांचे गाळप परवाने पेंडिंग ठेवले आहेत.

येत्या पंधरा दिवसांत सर्व कारखाने पूर्णक्षमतेने सुरू होणार असून, त्यांना गाळप परवाने मिळाल्याशिवाय हंगाम सुरू करता येणार नाही. कारखान्यांना म्हणणे मांडण्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी पुण्यातील साखर आयुक्तालयात वेळ दिली आहे. त्यावेळी कारखान्यांना थकीत एफआरपी, सरकारी देणी यांचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. येत्या पंधरा दिवसांत नवीन सरकार स्थापन झाल्यावर परवाने प्रक्रियाही वेगाने होण्याची शक्यता आहे.

००००००

कोट...

गाळप परवाना प्रकिया ऑनलाइन असून, साखर आयुक्त कार्यालयाने दिलेली माहिती बँकेने उपलब्ध करून द्यावयाची असते. थकीत एफआरपी, सरकारी देणी याशिवाय अन्य माहिती न दिलेल्या कारखान्यांचे गाळप परवाने पेंडिंग ठेवले आहेत. परवाने पेंडिंग ठेवलेल्या कारखान्यांना १३ नोव्हेंबर रोजी म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे.

एस. एम. जाधव, सहसंचालक, साखर विभाग

०००००

गाळप परवाने पेंडिग कारखाने

कोल्हापूर जिल्हा

केन अॅग्रो, शरद नरंदे, उदयसिंग गायकवाड बांबवडे, रिलाएबल शुगर फराळे, सदाशिवराव मंडलिक, आप्पासाहेब नलवडे, दौलत हलकर्णी, पंचगंगा इचलकरंजी, कुंभी-कासारी कुडित्रे, वारणा, आजरा.

सांगली जिल्हा

राजारामबापू कारंदवाडी, सोनहिरा वांगी, महांकाली, यशवंत शुगर, माणगंगा, तासगाव, राजारामबापू जत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर, उपमहापौरांचा राजीनामा

$
0
0

१९ किंवा २० नोव्हेंबरला नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पक्षातंर्गत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार शुक्रवारी महापौर माधवी गवंडी यांनी राजीनामा दिला. सभागृहाने राजीनामा मंजूर केल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचे पत्र आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे दिले. तत्पूर्वी उपमहापौर भूपाल शेटे यांनीही अनपेक्षितपणे आपला राजीनामा महापौरांकडे दिला. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड १९ ते २० नोव्हेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. महापौर, उपमहापौरपदासाठी अनुक्रमे नगरसेविका अॅड. सुरमंजिरी लाटकर व नगरसेवक संजय मोहिते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस निर्माण झाल्याने गवंडी यांची दोन जुलै रोजी अनपेक्षीतरित्या महापौरपदी वर्णी लागली. निवड करताना त्यांचा कार्यकाल दोन महिन्यांचा असल्याचे पक्षाकडून स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पण आचारसंहितेपूर्वी नवीन निवड होणे शक्य नसल्याने त्यांचा राजीनामा लांबणीवर पडला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पक्षनेतृत्वाने त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी बोलवलेल्या सभेत राजीनामा दिला. तत्पूर्वी उपमहापौर शेटे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा महापौरांकडे दिला. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देताना वैयक्तिक व कौटुंबीक कारणाने राजीनामा देत असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. दरम्यान, रिक्त झालेल्या पदासाठी निवड सभा घेण्यासाठी तातडीने विभागीय आयुक्तांकडे निवडीचा कार्यक्रम व तारीख देण्यासाठी पत्रव्यवहार केला. त्यानुसार १९ किंवा २० रोजी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड होण्याची शक्यता आहे.

महापौर, उपमहापौरांच्या राजीनाम्यानंतर पुढील निवडीसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदासाठी अॅड. लाटकर एकमेव इच्छूक आहेत. तर उपमाहापौरपदासाठी काँग्रेसकडून संजय मोहिते व अशोक जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. लाटकर यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीमध्ये खलबते सुरू झाली असून ताराराणी आघाडीच्या नगरसेविका स्मिता माने यांची प्रमुख दावेदारी मानली जात आहे. त्यामुळे लाटकर विरुद्ध माने असा चुरशीचा सामना रंगण्याची शक्यता आहे. निवडीला विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लाभणार आहे. महापालिकेशी संलग्न कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये युती-आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात अनेक नगरसेवक पक्षीय भूमिका बाजूला ठेवून सक्रिय राहिले होते. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीकडे संख्याबळ असले, तरी त्यांना शिवसेनेचा नेहमीच टेकू मिळाला. त्या बदल्यात त्यांना परिवहन समितीचे सभापती पदही मिळाले. पण विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय संदर्भ बदलल्याने शिवसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान भाजपलाही आपले संख्याबळ कायम राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसचे विजयी उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव व भाऊ संभाजी जाधव भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे दोन्ही नगरसेवक कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महापौर व उपमहापौर निवडीच्या निमित्ताने महापालिकेचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.

...

चौकट

उपमहापौरपदी संजय मोहितेंना संधी

डिसेंबर २०१८ मध्ये उपमहापौरपदी भूपाल शेटे यांची निवड झाली. त्यांनी एक वर्षाचा कालावधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पक्षाने कालावधीही दिला. त्यांचा कार्यकाल संपण्यास अद्याप दीड महिन्याचा अवधी असताना सभेत त्यांनी अचानकपणे राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने सभागृहही आश्चर्यचकित झाले. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपमहापौरपदी संजय मोहिते यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे.

...

चर्चेविना सभा संपली

महापौर, उपमहापौरांच्या राजीनाम्यासाठी सभेचे आयोजन केले असले, तरी शहराच्या विविध प्रश्नावर चर्चा होईल अशी शक्यता होती. पण पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. भाजपचे गटनेत्यांनी यांनी रस्ते व डेंगी प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली. सत्तारुढ गटाने मात्र त्यास नकार दिला. त्यानंतर भाजप-ताराराणी आघाडीच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शमा मुल्लांचे नगरसेवकपद धोक्यात

$
0
0

फोटो आहे - अर्जुन टाकळकर ८६८७ (कोर्टाच्या परवानगीनंतर राष्ट्रवादीच्या नगरसेविका शमा मुल्ला सभेसाठी महापालिकेत पोलिस बंदोबस्ता दाखल झाल्या.)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोक्कातंर्गत कारागृहात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शमा मुल्ला यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. शुक्रवारच्या महासभेसाठी कोर्टाच्या परवानगीने त्यांनी उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. पण तांत्रिक कारणाने सभेला वेळेत पोहोचू न शकल्याने हजेरी पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी होऊ शकली नाही. सलग सहा महिने सभागृहात अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या पदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, निर्माण होणाऱ्या कायदेशीर बाबींबाबत महापालिकेच्या नगरविकास विभागाने विधिज्ञांचा अभिप्राय मागवला आहे.

मटका अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला केल्याप्रकरणी नगरसेविका मुल्ला यांच्यासह त्यांचे पती सलिम यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर मोक्कातंर्गत कारवाई केली असून त्या सध्या कळंबा कारागृहात आहेत. कारागृहात असल्यापासून त्या महापालिकेच्या सभेला अनुपस्थित होत्या. सभेपूर्वी त्यांनी रजेचा अर्ज दिलेला असला, तरी सलग सहा महिने सभेला अनुपस्थित राहिल्याने त्यांचे पद धोक्यात आले आहे. पद अबाधित राखण्यासाठी शुक्रवारच्या (ता.८) सभेला उपस्थित राहण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या.

मुल्ला यांच्या नातेवाईकांनी सभेला उपस्थित राहण्यासाठी कोर्टाकडे दोन तासांची परवानगी मागितली होती. कोर्टाने बारा ते दोन ही वेळ त्यांना दिली. मात्र तांत्रिक कारणामुळे कारागृहातून महापालिका सभेत येण्यास त्यांना विलंब झाला. त्या पोलिस बंदोबस्तात महापालिकेत दाखल झाल्या. पण त्यापूर्वीच सभेचे कामकाज पूर्ण झाले होते. दोन वाजल्यापासून सायंकाळी चारपर्यंत त्या नगरसचिवांच्या केबिनमध्ये थांबल्या होत्या. त्यांच्यासोबत नगरसेविका छाया पोवार, शोभा कवाळे, अॅड. सूरमंजिरी लाटकर, जयश्री चव्हाण,सभागृह नेते दिलीप पोवार, नगरसेवक अशोक जाधव, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. हजेरी पुस्तकावर स्वाक्षरी न करताच पुन्हा त्यांना पोलिस बंदोबस्तात कारागृहात परतावे लागले. या सर्व घडामोडींमुळे महापौर निवडीदरम्यान कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

.....

कोट

'कायद्यानुसार सभेचे कामकाज संपल्यानंतर कोणत्याही सदस्याची हजेरी पुस्तकावर स्वाक्षरी घेता येत नाही. रजा देवूनही सलग सहा महिने महासभेला अनुपस्थित राहिल्यास पद अपात्रतेची शक्यता आहे. कारवाईपूर्वी त्यांनी कोर्टात धाव घेतल्यास कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल. त्यासाठी विधीज्ञांकडे अभिप्राय मागवला आहे.

दिवाकर कारंडे, नगरसचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील प्रश्नांवर चर्चा अपेक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर, उपमहापौर राजीनाम्यासाठी बोलवण्यात आलेल्या सभेमध्ये विशेषत: रस्ते दुरुस्ती आणि डेंगीच्या फैलावाबाबत चर्चा होऊ शकली नाही. शहरातील प्रश्नांवर चर्चा न झाल्यामुळे नाराज झालेल्या भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सभेनंतर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेतली. शहराच्या मुलभूत प्रश्नावर चर्चा अपेक्षित होती, अशा शब्दांत त्यांनी आयुक्तांसमोर नारजी व्यक्त केली. सत्तारुढांनी आमच्या अधिकारावर गदा आणली, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी यांनी महापौर व उपमहापौर यांनी राजीनामा दिल्यानंतर खराब झालेले रस्ते व डेंगी फैलाबाबत सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. पण मावळत्या सभाध्यक्षा गवंडी यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी आघाडीच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. यावेळी बोलताना सूर्यवंशी म्हणाले, 'लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या सहा महिन्यात महासभेत विशेष चर्चा झालेली नाही. रस्ते आणि आरोग्याच्या प्रश्नाबाबत शहरवासियांच्या भावना तीव्र आहेत. सभेत बोलण्याचा आमचा अधिकार असताना सत्तारुढ गटाने अधिकार हिरावून घेतला. रस्त्यांची दुर्दशा झाली असून डेंगीचाही फैलाव वाढत आहे. त्याचा खुलासा प्रशासनाने करावा.' नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, 'साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने औषध फवारणी केली जाते. एका प्रभागात दोन-दोनवेळा औषध फवारले जाते, पण विरोधी गटातील नगरसेवकांच्या प्रभागात एकदाही फवारणी केली जात नाही.'

रुपाराणी निकम म्हणाल्या, 'स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांची व्यस्त प्रमाणात विभागणी झाली आहे. परिणामी प्रभागातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.' कमलाकर भोपळे यांनी विभागीय सभापती हे सफाई कर्मचारी देत नसल्याचा आरोप केला. किरण नकाते म्हणाले, 'महाद्वार रोडवर फेरीवाले कचरा टाकून जातात, मात्र व्यापाऱ्यांना जबाबदार धरले जात आहे.'

डेंगीला अटकाव करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाची माहिती आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली. त्यानंतर बोलताना आयुक्त म्हणाले, 'औषध फवारणीसाठी शिर्डी संस्थांकडून तीन मशिन उपलब्ध झाली आहेत. त्यानुसार औषध फवारणी सुरू आहे. प्रभागातील रुटीन बदलणार नाही याची काळजी घेत सफाई कर्मचाऱ्यांची विभागणी केली जाईल. तसेच नवीन भरतीनंतर ज्या प्रभागात कर्मचारी अपुरे आहेत, त्या प्रभागात प्राधान्याने कर्मचारी दिले जातील.'

यावेळी विरोधी पक्षनेते विलास वास्कर, किरण शिराळे, राजसिंह शेळके, विजय खाडे, उमा इंगळे, भाग्यश्री शेटके यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी सुखी होऊ दे

$
0
0

शेतकरी सुखी होऊ दे

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विठ्ठलाला साकडे; कार्तिकी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,' असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाला घातले. कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची सरकारी महापूजा शुक्रवारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते बेडग (ता. मिरज) येथील मानाचे वारकरी सुनील महादेव ओमासे आणि नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 'यंदा राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातील दुष्काळस्थिती होती. त्या नंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही मदत मागितली आहे. गेली तीन-चार वर्षे निर्मल वारी करण्यासाठी प्रयत्न केला गेला. वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.'

बेडगचे ओमासे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

मानाचा वारकरी ठरलेले सुनील ओमासे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील आहेत. शेतकरी कुटुंबातील ओमासे २००३पासून वारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना चांदीची विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना मोफत एसटीचा पास ही देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळगावचे पाच वारकरीअपघातात ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर/ बेळगाव

कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनाला अपघात होऊन बेळगाव तालुक्यातील मंडोळी आणि हंगरगा येथील पाच वारकरी ठार झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास मांजरी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे पिकअप आणि ट्रॅक्टरची धडक होऊन हा भीषण अपघात घडला. सर्व मृत आणि जखमी वारकरी बेळगावजवळील मंडोळी आणि हंगरगा गावचे आहेत.

मंडोळी (ता. बेळगाव) बसवाण गल्ली येथील दहा ते बारा वारकरी कार्तिकी यात्रेनिमित्त पिकअपमधून पंढरपूरला निघाले होते. मंडोळी येथून गुरुवारी रात्री निघालेली पिकअप गाडी शुक्रवारी पहाटे चार वाजता सांगोल्याजवळ पोहोचली. गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यावरून विटा भरून जात असलेल्या ट्रॅक्टरला पिकअपने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वारकऱ्यांच्या वाहनातील चार जण जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. चार जखमींवर पंढरपूरमध्ये उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगोल्यानजीकच्या अपघातातबेळगावचे पाच वारकरी ठार

$
0
0

सांगोल्यानजीकच्या अपघातात

बेळगावचे पाच वारकरी ठार

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर/ बेळगाव

कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनाला अपघात होऊन बेळगाव तालुक्यातील मंडोळी आणि हंगरगा येथील पाच वारकरी ठार झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास मांजरी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे पिकअप आणि ट्रॅक्टरची धडक होऊन हा भीषण अपघात घडला. सर्व मृत आणि जखमी वारकरी बेळगावजवळील मंडोळी आणि हंगरगा गावचे आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मंडोळी आणि हंगरगा गावावर शोककळा पसरली.

मंडोळी (ता. बेळगाव) बसवाण गल्ली येथील दहा ते बारा वारकरी कार्तिकी यात्रेनिमित्त पिकअपमधून पंढरपूरला निघाले होते. मंडोळी येथून गुरुवारी रात्री निघालेली पिकअप गाडी शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सांगोल्याजवळ पोहोचली. गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यावरून विटा भरून जात असलेल्या ट्रॅक्टरला पिकअपने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वारकऱ्यांच्या वाहनातील चार जण जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. चार जखमींवर पंढरपूरमध्ये उपचार सुरू आहेत.

या अपघातात कृष्णा वामन कणबरकर (वय ४६,) अरुण दत्तात्रय मुतकेकर (वय ३४), लक्ष्मण परसराम आंबेवाडीकर (वय ४६), महादेव मल्लाप्पा कणबरकर ( वय ४०, सर्व राहणार मंडोळी, जि. बेळगाव) आणि यल्लाप्पा देवाप्पा पाटील (चालक, वय, ३७. रा. हंगरगा), हे पाच जण ठार झाले आहेत. गणपत यल्लाप्पा दळवी (वय ७०), तमन्ना नारायण साळवी (वय ४८), गुंडू विठ्ठल तरळे (वय ७२), परसराम गणपत दळवी (वय ३२) या चार जखमींवर पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मृत आणि जखमींचे नातेवाईक, मंडोळी गावच्या ग्रामस्थांनी सांगोल्याकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोव्हेंबरअखेर महामार्गाची दुरुस्ती करा

$
0
0

नोव्हेंबरअखेर महामार्गाची दुरुस्ती करा

उदयनराजे भोसलेंचा इशारा

सातारा :

सातारा-पुणे राष्‍ट्रीय महार्मावरील रस्‍त्‍याची प्रचंड दुरवस्‍था झाली आहे. या रस्‍त्‍यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शारीरिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. त्‍यामुळे रिलायन्स आणि राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नोव्हेंबरअखेर रस्‍त्‍यांची जरूर ती सर्व दुरुस्‍ती-डागडुजी, करावी अन्यथा एक डिसेंबरपासून सातारा-पुणे रस्‍त्‍यावरील दोन्ही टोल नाक्‍यांवर टोल वसुली करू दिली जाणार नाही, असा इशारा शुक्रवारी माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी महामार्ग प्राधिकारी व रिलायंन्स कंपनीला दिला आहे.

टोल विरोधी सातारी जनता, या सामाजिक समुहाकडून, रस्‍ते दुरुस्‍त करा, सर्व सुविधा द्या, तोपर्यंत सातारा-पुणे रस्‍त्‍यावरील दोन्ही ठिकाणी टोल वसुल करू नये, अशी चळवळ सुरू करण्यात येणार आहे. शुक्रवारी या संघटनेच्या वतीने उदयनराजे भोसले यांना निवेदन दिले. त्यानंतर भोसले यांनी तातडीने राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी आणि रिलायन्सचे अधिकारी यांना बोलावून विस्‍तृत चर्चा केली. चर्चेनंतर नोव्हेंबरअखेर दुरुस्ती करावी अन्यथा एक डिसेंबरपासून नाक्‍यांवरील टोल वसुली करू दिली जाणार नाही, असा इशारा भोसले यांनी संबंधितांना दिला आहे.

................

गर्भवती महिलेचा

अपघातात मृत्यू

सातारा :

एसटी-दुचाकीच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गर्भवती महिलेची मृत्यूशी झूज अखेर चौथ्या दिवशी थांबली. या घटनेमुळे मृत कल्याणी देशमुख यांचे नातेवाईक संतप्त झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, या घटनेबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी बोलणे झाले असता, त्यांनी 'सरकार स्थापन होईपर्यंत मी काहीही करू शकत नाही,' असे धक्कादायक उत्तर दिले आहे. एकीकडे सातारा एसटी डेपोचे अधिकारी जखमींकडे फिरकले नसताना दुसरीकडे मंत्र्यानी बेजबाबदार उत्तर दिल्याने संतापाची लाट उसळली आहे.

कल्याणी देशमुख (वय २५, रा. नांदगाव ता. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. सोमवारी सकाळी त्या पती वैभव देशमुख यांच्यासोबत सोनोग्राफी करण्यासाठी निघाल्या होत्या. महामार्गावरुन जात असताना सातारानजीक खिंडवाडी येथे एसटी चालकाला अचानक हर्ट अ‍ॅटॅक आल्याने एसटीचा अपघात होऊन ती विरुद्ध लेनवर जावून वैभव व कल्याणी देशमुख यांच्या दुचाकीवर आदळली. या घटनेमुळे देशमुख दाम्पत्य गंभीर जखमी झाले. देशमुख दाम्पत्याला जखमी अवस्थेत साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. सोमवारपासून कल्याणी देशमुख मृत्यूशी झुंज देत होत्या. अपघात झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांमध्ये सातारा एसटी डेपोचे अधिकारी त्या ठिकाणी कोणीही फिरकले नाही. देशमुख कुटुंबीयांनी एसटी विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना दाद दिली नाही. देशमुख कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. गुरुवारसकाळी कल्याणी देशमुख यांची प्रकृती बिघडली, पोटातील पाच महिन्यांचा बाळासह त्‍यांचा मृत्यू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडे हॉटेल परिसर मृत्यूचा सापळाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीस वर्षांपूर्वी तावडे हॉटेल आलं की कोल्हापूर आलं अशी ओळख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे व्हायची. त्यानंतर महानगरपालिकेने २००७मध्ये राबविलेल्या एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातून तावडे हॉटेल ते सीपीआर चौक हा रस्ता विकसीत करण्यात आला. कोल्हापूरचे प्रवेशद्वार सिमेंटच्या रस्त्याने चकाचक झाले. पण गेल्या पाच वर्षांत देखभालीअभावी रस्ता खचला असून तावडे हॉटेल ते शिरोली टोल नाका हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे.

तावडे हॉटेलजवळील स्वागत कमानीतून शिरोली नाक्याकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंचे रस्ते खचले आहेत. शिरोली नाक्यावरुन तावडे हॉटेलकडे जाणारा रस्ता वेड्यावाकड्या पद्धतीने खचल्याने वेगाने येणाऱ्या वाहनांचा अपघात हमखास होणार असा 'डेंजर स्पॉट' तयार झाला आहे. रात्रीच्यावेळी खचलेल्या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने किरकोळ अपघात होत आहेत. हा स्पॉट मृत्यूचा सापळा बनला आहे.

शिरोली टोलनाका बंद असल्याने या परिसराची आबाळ झाली आहे. स्पीडब्रेकरचे रबरी स्टड खराब झाल्याने लोखंडी खिळे वर आले आहेत. पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइनसाठी सिमेंटच्या रस्त्याच्यामध्ये खोदाईच्यादृष्टीने दहा ते वीस फूटांचे डांबरी रस्ते बांधले आहेत. डांबरी रस्ते खराब झाल्याने सिमेंट आणि डांबरी रस्ते जिथे जोडले, तिथे मोठ्या खाचा पडल्या आहेत. प्रकल्पात निम्मा रस्ता सिमेंटचा आणि निम्मा डांबरी असा बनवला आहे. सातत्याने होणाऱ्या वाहतुकीने डांबरी रस्ते खराब होऊ लागले आहेत. देखभाल न झाल्यास पुढील दोन वर्षांत या रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य पहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताराराणी चौक ते व्हीनस चौक या रस्त्यांवरील छोटे मोठे खड्डे पडले आहेत. स्टेशन रोड ते व्हीनस चौक या रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या जास्त आहे. काही ठिकाणी पॅचवर्क केले असले तरी त्याचा दर्जा ढिसाळ आहे. व्हीनस चौक, दसरा चौक ते सीपीआर चौक या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले फुटपाथ काही ठिकाणी गायब झाले आहेत. रस्ते विकास प्रकल्प सुरू असताना शाहूपुरी पोलिस ठाण्याची इमारत प्रकल्पात अडथळा ठरत होती. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला. सध्या पोलिस ठाण्याची इमारत पाडली असली तरी रस्ता रुंदीकरण झालेले नाही.

फुलेवाडी रस्त्यांवरही खड्डे

फुलेवाडी रिंगरोड ते रंकाळा टॉवर या रस्त्यांवर दोन ठिकाणी खराब रस्त्यांचे मोठे पॅच आहे. फुलेवाडी अग्निशमन स्टेशनजवळील रस्त्यांवर मोठा खड्डा पडला आहे. प्रकल्प सुरू असताना रंकाळा डी मार्ट रस्त्यांचे काम रखडल्याने तिथला रस्ता खराब सुरु झाला आहे. टोल रद्द झाल्यानंतर महानगरपालिकेकडून रस्ता देखभालीचे प्रयत्न झाले नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यांचे दुखणे बळावले

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet:@MarutipatilMT

कोल्हापूर : शहरांतर्गत रस्त्यांची दिवसेंदिवस दुर्दशा होत असताना त्यामध्ये आता एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्यांची भर पडली आहे. आयआरबी कंपनीकडून बांधण्यात आलेला रस्ते प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतर झाल्यापासून एकादाही त्याची देखभाल, दुरुस्ती झाली नसल्याने दिवसेंदिवस रस्त्यांचे दुखणे बळावत निघाले आहे. काँक्रिट आणि डांबरी रस्त्यांमध्ये पडलेली भेग, जोड रस्त्यादरम्यान निर्माण झालेला खड्डा आणि फूटपाथची दुर्दशा झाल्याने हे रस्ते अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव लालफितीत अडकल्याने रस्त्यांची दुरुस्ती कशी करायची? आणि त्यासाठी निधी कसा उपलब्ध करायचा अशा दुहेरी कात्रीत महापालिका सापडली आहे.

एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत शहरात ४९.९९ किलोमीटर रस्त्यांची बांधणी करण्यात आली. आयआरबी कंपनीने २००८ मध्ये रस्त्यांची बांधणी केली. प्रकल्प खर्चाची रक्कम व त्याची देखभाल-दुरुस्तीची रक्कम टोलच्या माध्यमातून वसूल करण्यात येणार होती. पण शहरवासीयांकडून टोलविरोधी आंदोलने झाल्यानंतर टोल स्थगित करण्यात आला. कंपनीने २०११मध्ये प्रकल्प पूर्ण केल्याचा दावा केला. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी या रस्त्यांची डागडुजी करण्याची जबाबदारी कंपनीकडे होती. राज्य सरकारने टोल रद्द केला. कंपनीला पैसे भागवले. मात्र, रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी महानगरपालिकेवर येऊन पडली. मात्र गेल्या आठ वर्षांत एकदाही डागडुजी करण्यात आलेली नाही.

रस्ते बांधणी करताना निम्मा रस्ता सिमेंटचा आणि निम्मा डांबराचा अशा पद्धतीने तयार करण्यात आले. कालांतरांने या दोन्ही रस्त्यांमध्ये मोठ्या भेगा पडल्या आहेत. तावडे हॉटेल ते ताराराणी चौक, कळंबा ते संभाजी नगर, शाहू नाका ते मिलील्ट्री कॅम्प, फुलेवाडी ते रंकाळा, पुईखडी ते क्रेशर चौक अशा शहरात प्रवेशाच्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर अशी स्थिती दिसून येते. सिमेंटचे रस्ते जोडण्यासाठी केलेल्या डांबरी पॅचवर्कदरम्यान मोठे खड्डे निर्माण झाले आहेत.

काँक्रिट रस्त्याला जोडून केलेले डांबरी रस्ते उखडत असताना त्यांची लेव्हल काँक्रिट रस्त्यापेक्षा सुमारे सहा इंचांनी कमी झाली आहे. या सर्व रस्त्यांची देखभाल व दुरस्ती करण्यासाठी महापालिकेकडे निधी नाही. परिणामी प्रशासनाने २०१७ मध्ये प्रकल्पातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी २५ कोटीचा निधी मिळावा, यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला. त्यानंतर नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने संबंधीत विभागाच्या सचिवांची भेट घेतली. पण, दोन वर्षांनंतरही या प्रस्तावावर सरकारने निर्णय घेतलेला नाही.

एकीकडे शहरांतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती करणे महापालिकेच्या आवाक्याबाहेर गेलेले असताना या पन्नास किलोमीटरच्या रस्त्यांचीही त्यामध्ये भर पडत आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करायची कशी? असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर रस्त्यांची आणखी दुर्दशा झाली. या सर्व रस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्ते बांधणीसाठी १७८ कोटींचा निधी अपेक्षीत आहे. महापालिकेने हा प्रस्ताव राज्य सरकारला सप्टेंबर २०१९ मध्ये पाठवला.

प्रशासनाने यापूर्वी पाठविलेला एक प्रस्ताव लालफितीत अडकलेला असताना नवीन प्रस्तावला केव्हा मंजुरी मिळणार याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत सरकारकडून निधी मिळत नाही, तोपर्यंत शहरवासियांना या खड्डेमय रस्त्यांतूनच सध्या तरी प्रवास करावा लागणार आहे.

युटिलिटी शिफ्टिंगचा प्रश्नच

प्रकल्पातील रस्त्यांची दुर्दशा होत असतानाच युटिलिटी शिफ्टिंगचा मुद्दाही गंभीर बनला आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज लाइन यासाठी अनेकठिकाणी रस्त्यांची खोदाई केली आहे. त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न जटील बनला आहे. युटिलिटी शिफ्टिंगसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीचा आवश्यकता आहे. रस्ते दुरुस्तीलाच निधी मिळत नसेल, तर युटिलिटी शिफ्टिंगसाठी निधी आणायचा कसा हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

काँक्रिट रस्त्यांच्या पॅचवर्कला सुरुवात

रस्ते विकास प्रकल्पामधील विशेषत: काँक्रिट रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी महापालिकेच्या ठेकेदारांना आवाहन करण्यात आले होते. अतिवृष्टीनंतर केलेल्या आवाहनाला १३ ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर विभागीय कार्यालयांना पॅचवर्कच्या सूचना दिल्या. त्यानुसार राजारामपुरी ते सायबर चौकपर्यंतच्या रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात आले आहे.

रस्ते प्रकल्पातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे राज्य सरकारकडे दरवर्षी २५ कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव २०१७ मध्ये दिला होता. अद्याप प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही. शहरातील अन्य रस्त्यांसाठी सप्टेंबरमध्ये १७८ कोटींचा प्रस्ताव पाठवला असून त्याला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.

- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

जुलै २००८

महापालिका, आयआरबी, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रकल्प

२२० कोटी

प्रकल्प रक्कम

४९. ९९ किमी

रस्त्यांची लांबी

४७६ कोटी

कंपनीला दिलेली रक्कम

नोव्हेंबर २००८

युटीलिटी शिफ्टिंगचा मुद्दा पुढे व आंदोलन

जानेवारी २०११

कंपनीचा रस्ते बांधणीचा दावा

डिसेंबर २०११

टोल वसुलीस सरकारची परवानगी

जानेवारी २०१२

तीन आठवडे आंदोलन

मार्च २०१३

सरकारकडून टोलप्रश्नी त्रिसदस्यीय समिती

ऑगस्ट २०१३

आयआरबी कंपनीला पोलिस बंदोबस्त

जानेवारी २०१४

शहरवासीयांचे टोलविरोधात बेमुदत उपोषण

१२ जानेवारी २०१४

टोल आंदोलनाला हिंसक वळण

ऑगस्ट २०१५

राज्य सरकारकडून टोल रद्दची घोषणा

डिसेंबर २०१८

सरकारकडून टोलऐवजी ४७६ कोटी आयआरबीला अदा

कोट

सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून रस्ते बांधणीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. प्रस्तावाचा वारंवार पाठपुराव केला जात आहे. प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. लवकरच शहरातील रस्त्यांची दुरुस्ती होईल.

- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिख पुलालाखील ड्रेनेज लेव्हलचा सर्व्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मध्यवर्ती बसस्थानक आणि राजारामपुरी या दोन्ही भागांना जोडणाऱ्या बाबूभाई परिख पुलाखाली पाणी साचू न देण्यासाठी शनिवारी परिसराचा सर्व्हे करण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानक, महादेव मंदिर, शाहूपुरी जिमखान्याकडून पुलाकडे येणारे पाणी अन्यत्र वळवण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल, त्याचा तांत्रिक सर्व्हे करण्यात आला. परिसरातून येणारे ड्रेनेज आणि पावसाचे पाणी वळविण्यासाठी सर्व्हेद्वारे निघालेला निष्कर्ष आणि अहवाल महापालिकेला सादर करण्यात येणार आहे.

परिख पुलामध्ये विशेषत: पावसाळ्यामध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे पुलाच्या बांधकामाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पुलाच्या सर्व समस्यांची निर्गत करण्यासाठी परिख पूल नुतनीकरण समिती स्थापन करण्यात आली. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनीअर्सच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. शनिवारी इंजिनीअर्स असोसिएशन, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ड्रेनेज पातळीचा सर्व्हे केला. यामध्ये प्रामुख्याने पुलामध्ये साचणाऱ्या पाण्यासंबंधी अभ्यासपूर्ण निष्कर्ष नोंदवण्यात आले. एसटी आगार, महादेव मंदिराजवळील चॅनेल, शाहूपुरी जिमखान्याकडून पुलाकडे येणारे पाणी परस्पर निर्गत करण्यासाठी साइक्स एक्स्टेंशनमधील चॅनेल्स, परिख पुलाजवळील व नरसिंह अपार्टमेंट परीसरातील चॅनेलच्या तळपातळीचा अभ्यास करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, केआयटी कॉलेजचे प्रा. शीतल वरुर यांनी तांत्रिक सूचना केल्या. यावेळी नगरसेवक संजय मोहिते, आशिष ढवळे, आर. के. पाटील, वरिष्ट आगार व्यवस्थापक अजय पाटील, मनोज लिंग्रस, असोसिएशनचे राज डोंगळे, जयंत बेगमपुरे, उमेश कुंभार, फिरोज शेख, सुनील खिरुगडे, सुभाष कोळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाटकर यांच्याकडून मोर्चेबांधणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदाच्या प्रमुख दावेदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अॅड. सूरमंजिरी लाटकर यांचे पती, माजी शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी शनिवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची भेट घेतली. निवडीदरम्यान पत्नी सूरमंजिरी यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. सत्तारुढ गटाकडून मोर्चेबांधणीस सुरुवात झालेली असताना विरोधी भाजप-ताराराणी आघाडीमध्ये काहीशी शांतता दिसत आहे.

यापूर्वी दोनदा झालेल्या महापौर निवडीमध्ये अॅड. लाटकर यांना अखरेच्या क्षणी पदाने हुलकावणी दिली. पक्ष नेतृत्वाने शब्द देऊनही पद न मिळाल्याने लाटकर नाराज होते. पण, त्यांनी फारशी नाराजी दाखवून न देता पक्षकार्यात पुन्हा झोकून दिले. दोन्हीवेळी पक्षांतर्गत विरोधाचा त्यांना फटका बसला. पक्षातील हा विरोध कमी करण्यासाठी त्यांनी शनिवारपासून संपर्क मोहीम राबवण्यास सुरुवात केली. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह त्यांनी पक्षातील नगरसेवकांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

माजी उपमहापौर महेश सावंत, गटनेते सुनील पाटील, नगरसेवक संदीप कवाळे व आदिल फरास यांच्या निवासस्थानी जाऊन निवडीविषयी चर्चा केली. महापालिकेतील आघाडीची सत्ता कायम राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर काँग्रेसच्या काही नगरसेवकांचीही भेट घेतली. स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर भूपाल शेटे यांची भेट घेऊन महापौर निवडीच्या रणनितीबाबत चर्चा केली. दोघांनी काँग्रेसचे सर्व नगरसेवक पाठिशी राहतील असे स्पष्ट केले. लाटकर हे उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत प्रचारात सक्रिय होते. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांचा त्यांना भक्कम पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान सत्तारुढ गटातून महापौर निवडीच्या हालचाली गतिमान झालेल्या असताना विरोधी भाजप-ताराराणी आघाडीमध्ये काहीशी शांतता दिसत आहे. महापौर निवडीची तारीख जाहीर झाल्यानंतर विरोधी आघाडी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. या आघाडीकडून महापौरपदासाठी स्मिता माने यांचे नाव जवळपास निश्चित आहे. पण त्यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केलेली नाही. निवडीपूर्वी राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन झाल्यास त्याचे पडसाद हमखास महापौर निवडीवर उमटणार आहेत.

कारभाऱ्यांची भूमिका गुलदस्त्यात?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील कारभारी नगरसेवक नेहमीच अॅड. लाटकर यांना विरोध करतात. आमदार हसन मुश्रीफ देतील तो आदेश मान्य असल्याचे जाहीरपणे कुबली देतात. मात्र, पडद्याआड वेगळीच राजकीय मोर्चेबांधणी करतात असा अनुभव आहे. त्याचा लाटकर यांना दोनदा फटका बसला. एकप्रकारे कारभारी मुश्रीफ यांचा आदेशच डावलतात. दोनदा असा प्रकार घडला असला, तरी पक्षनेतृत्वाने त्याची गंभीर दखल घेतलेली नाही अशी कुजबूज आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांतच सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाटकर यांची मोर्चेबांधणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर महापौरपदाच्या प्रमुख दावेदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अॅड. सूरमंजिरी लाटकर यांचे पती, माजी शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी शनिवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची भेट घेतली. निवडीदरम्यान पत्नी सूरमंजिरी यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. सत्तारुढ गटाकडून मोर्चेबांधणीस सुरुवात झालेली असताना विरोधी भाजप-ताराराणी आघाडीमध्ये काहीशी शांतता दिसत आहे. यापूर्वी दोनदा झालेल्या महापौर निवडीमध्ये अॅड. लाटकर यांना अखरेच्या क्षणी पदाने हुलकावणी दिली. पक्ष नेतृत्वाने शब्द देऊनही पद न मिळाल्याने लाटकर नाराज होते. पण, त्यांनी फारशी नाराजी दाखवून न देता पक्षकार्यात पुन्हा झोकून दिले. दोन्हीवेळी पक्षांतर्गत विरोधाचा त्यांना फटका बसला. पक्षातील हा विरोध कमी करण्यासाठी त्यांनी शनिवारपासून संपर्क मोहीम राबवण्यास सुरुवात केली. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह त्यांनी पक्षातील नगरसेवकांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले. माजी उपमहापौर महेश सावंत, गटनेते सुनील पाटील, नगरसेवक संदीप कवाळे व आदिल फरास यांच्या निवासस्थानी जाऊन निवडीविषयी चर्चा केली. महापालिकेतील आघाडीची सत्ता कायम राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर काँग्रेसच्या काही नगरसेवकांचीही भेट घेतली. स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर भूपाल शेटे यांची भेट घेऊन महापौर निवडीच्या रणनितीबाबत चर्चा केली. दोघांनी काँग्रेसचे सर्व नगरसेवक पाठिशी राहतील असे स्पष्ट केले. लाटकर हे उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत प्रचारात सक्रिय होते. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांचा त्यांना भक्कम पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान सत्तारुढ गटातून महापौर निवडीच्या हालचाली गतिमान झालेल्या असताना विरोधी भाजप-ताराराणी आघाडीमध्ये काहीशी शांतता दिसत आहे. महापौर निवडीची तारीख जाहीर झाल्यानंतर विरोधी आघाडी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. या आघाडीकडून महापौरपदासाठी स्मिता माने यांचे नाव जवळपास निश्चित आहे. पण त्यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केलेली नाही. निवडीपूर्वी राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन झाल्यास त्याचे पडसाद हमखास महापौर निवडीवर उमटणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीला ताराराणीचे कडवे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शुक्रवारी (ता. ८) होणाऱ्या महापालिकेच्या सभेत महापौर माधवी गवंडी राजीनामा देणार आहेत. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अॅड. सुरमंजिरी लाटकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ताराराणी आघाडी निवडणुकीत इर्ष्येने उतरणार असल्याने महापौर निवडीत चुरस निर्माण होईल. ताराराणी आघाडीकडून स्मिता माने यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग येईल. लाटकर, माने यांच्यातील लढतीला राष्ट्रवादी विरुद्ध ताराराणी आघाडी असे स्वरुप येणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे महापालिकेची सत्ता आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल. या पदासाठी अॅड. लाटकर या एकमेव इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीला आव्हान देण्यासाठी त्यांचे पारंपरिक विरोधक माने यांना रिंगणात उतरवण्यात येणार आहे. काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक असून त्यांना शिवसेनेच्या चार नगरसेवकांचा पाठिंबा नेहमीच मिळाला आहे. विरोधी ताराराणी आघाडीचे १९ व भाजपचे १४ नगरसेवक आहेत. संख्याबळानुसार काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता अबाधित राहील अशी शक्यता आहे. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे पडसाद या निवडीवर पडण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव विजयी झाले. त्यांच्या पत्नी जयश्री जाधव व भाऊ संभाजी जाधव हे भाजपचे नगरसेवक आहेत. महापौर निवडीत दोघांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार अमल महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका व महिला बालकल्याण सभापती अनुराधा खेडकर यांच्या कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात भाजपच्या नगरसेविका अश्विनी बारामते व संतोष गायकवाड यांनी काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला. या फोडाफोडीच्या राजकारणाचेही महापौर निवडीवर पडसाद उमटणार आहेत. निवडीला हजर राहण्याऐवजी गैरहजर ठेवून एकमेकांचा राजकीय हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images