Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दिग्गजांचे अर्ज आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचे अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आज, गुरूवारी आमदार राजेश क्षीरसागर, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे, ऋतुराज पाटील यांच्यासह दिग्गज मोठ्या शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यामुळे इच्छुकांची मोठी गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. अर्ज दाखल करण्याच्या कक्षात प्रशासनाने मनुष्यबळ वाढवले आहे.

विद्यमान आमदार मुश्रीफ पुन्हा कागलमधून रिंगणात येत आहेत. अर्ज दाखल करताना ते शक्तीप्रदर्शन करतील. शिवसेना, भाजप आघाडीचे उमेदवार संजय घाटगे, अपक्ष समरजित घाटगे अर्ज दाखल करतील. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. क्षीरसागर यांना तिसऱ्यांदा शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याची संधी मिळत आहे. सकाळी साडेदहा वाजता पेटाळा मैदानातून रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून शहरातील वातावरण भगवे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शहरातील खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी या मार्गावरून रॅली फिरून छत्रपती शिवाजी चौकात सांगता होणार आहे. त्यानंतर क्षीरसागर मोजके नेते, कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत.

दक्षिण विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस आघाडीकडून ऋतुराज पाटील गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यासाठी ते सायकलवरून जाणार आहेत. सकाळी १० वाजता दसरा चौकातून सायकल रॅली सुरू होणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनाही सायकल घेऊन येण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. 'फिट है तो सीट है' अशी टॅगलाइन वापरत त्यांनी तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. 'चंदगड'मधून शिवाजी पाटील अर्ज दाखल करणार आहेत.

...

चौकट

दौलत देसाई यांचा

आज कार्यकर्ता मेळावा

'काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी 'उत्तर'मधील उमेदवारी देण्याबाबत शब्द दिला होता. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाकडे रितसर मुलाखत दिली. बुधवारपर्यंत उमेदवारीसाठी माझे नाव अग्रस्थानीही होते, पण कालांतराने काय घडामोडी घडल्या हे समजण्यापलीकडचे आहे. आमदार पाटील यांनी उमेदवारीबाबत दिलेला शब्द पाळला नाही,' अशी प्रतिक्रिया दौलत देसाई यांनी व्यक्त केली. देसाई यांच्या कार्यकर्त्यांचा गुरुवारी (ता. ३) सकाळी न्यू शाहूपुरी येथे मेळावा होत आहे. यावेळी पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेहुण्यानंतर जावई रुसले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील राष्ट्रवादीतील उमेदवारीवरून माजी आमदार के. पी. पाटील आणि जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या मेहुणा-पाहुण्यातील वाद मिटतो न मिटतो तोच के. पी. यांचे जावई धैर्यशील पाटील यांनी बंडाचे निशान उभारले आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी के. पी. पाटील यांनी दिवसभर प्रयत्न केल्यानंतर उशिरा यश आल्याचे समजते.

के. पी. यांनी सोळांकूर येथे जाऊन ए. वाय. यांची भेट घेऊन एकोप्याने प्रचाराला सामोरे जाण्याचे आवाहन केले. मात्र या सर्व प्रक्रियेतून बाजूला राहिलेले के. पी. यांचे जावई व भोगवतीचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील-कौलवकर नाराज झाले. त्यांनी बुधवारी सकाळी सोशल मीडियातून गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. काही वेळात हा संदेश संपूर्ण मतदारसंघात व्हायरल झाला. तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकही घेण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मेहुण्या-पाहुण्याती वाद शमतो न शमतो तोच जावई धैर्यशील नाराज झाल्याने मतदारसंघात खळबळ उडाली. याची दखल घेत के. पी. यांनी सकाळी निवास्थानी जावून त्यांची तातडीने भेट घेतली. भेटीत बरीच खलबते झाल्यानंतर पाटील-कौलवकर यांनी अर्ज भरणार नसल्याचा शब्द दिल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनालाइट जादा बिलाचा शॉक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑगस्ट महिन्यातील महापुराच्या कालावधीत जवळपास दहा दिवस दुकाने पाण्याखाली होती, वीज पुरवठा बंद होता. मात्र महावितरणने पूरबाधित भागातील लहानसहान व्यावसायिक, व्यापाऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील वीज बिले चुकीच्या पद्धतीने आकारली आहेत. काही ग्राहकांच्या बिलात ५०० रुपयांची तर काही ठिकाणी १००० रुपयांपर्यंत वाढीव बिले दिल्याच्या तक्रारी आहेत. वीज बिले दुरुस्त करुन मिळावीत म्हणून दुकानदार महावितरणच्या कार्यालयाकडे पिच्छा पुरवित आहेत. दरम्यान, ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महावितरणने बिलात दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे.

ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी, पंचगंगा नदीचा महापूर यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी शिरले. व्हीनस कॉर्नर परिसर, बसंत बहार रोड, स्टेशन रोड, विल्सन पूल परिसर, फोर्ड कॉर्नर परिसर, शाहूपुरी पाचवी व सहावी गल्ली, कुंभार गल्ली या भागातील दुकानदारांना मोठा फटका बसला. शाहूपुरीतील स्पेअर पार्टस विक्री, व्हीनस कॉर्नर परिसरातील फर्निचर, गादी कारखाना, आइस फॅक्टरी, रंग साहित्य विक्रीची दुकाने, प्लायवूड विक्री, हॉटेल व्यावसायिक, कपड्यांची शोरुम्स आहेत.

महापुराच्या कालावधीत ही सगळी दुकाने बंद होती. दुकानात आठ ते दहा फुट पाणी होते. यामुळे व्यावसायिकांना लाखो रुपयांचा फटका बसला. आहे. शाहूपुरी सहाव्या गल्लीत फ्लेक्स, रेडियम, डिजिटल फलक निर्मिती करणाऱ्या लहानसहान व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. या साऱ्या विक्रेत्यांना महावितरणकडून ऑगस्ट महिन्यातील बिले वितरित केली आहेत. ऑगस्ट महिन्यात दुकाने बंद असताना जादा बिले पाहून किरकोळ दुकानदार चक्रावले आहेत. वाढीव बिले पाहून काहींनी महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेतली. बिलात दुरुस्ती करुन मिळावी यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे.

...

कोट

'दुकानाचे लाइट बिल दरमहा साधारणपणे ९०० ते १००० रुपये असायचे. ऑगस्ट महिन्यात बसंत बहार रोडवर पाणी पसरले. दुकानात पाणी शिरले. दहा ते बारा दिवस दुकान बंद होते. वीज पुरवठा खंडीत होता. महावितरणकडून त्या महिन्याच्या बिलापोटी जादा रकमेची आकारणी झाली आहे. साधारणपणे ४५० ते ५०० रुपये जादा बिल आले आहे.

शिवप्रसाद भोसले, व्यापारी

...

कोट

'घरगुती व व्यापारी या दोन्ही प्रकारातील बिलांची आकारणी चुकीच्या पद्धतीने झाली आहे. बिले दुरुस्त करुन मिळावीत म्हणून महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला. तेव्हा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिलाचा भरणा करा, पुढील बिलावेळी बघू या अशी मोघम उत्तरे दिली. ऑगस्ट महिन्यात लाइट नसताना जादा बिलाची वसुली हा चुकीचा प्रकार आहे.

सुरेश कुमठेकर, व्यापारी

...

व्यापारी ग्राहकांसाठीची बिल आकारणी

युनिट आकारणी प्रति युनिट

शून्य ते २०० ६.१० पैसे

२०० युनिटपुढे ९.२५ पैसे

...

कोट

'वीज बिले वाढीव असल्याची ग्राहकांची तक्रार असल्यास त्यांनी महावितरणच्या आसपासच्या कार्यालयात रितसर तक्रार करावी. लेखी व ऑनलाइन स्वरुपात तक्रारी स्वीकारल्या जातात. यंत्रणेकडून त्या बिलाची शहानिशा करुन दुरुस्ती करण्यात येत आहे.

डॉ. नामदेव गांधले, कार्यकारी अभियंता, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपेकरांचा राजकीय संन्यास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

जिल्ह्यातील पक्षाच्या नेतृत्वाने सतत विरोधकांना पाठबळ देत आमचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला, अशी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी टीका करत गटातटाच्या राजकारणातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे असे सांगून पत्राद्वारे राजकीय संन्यास जाहीर केला. डॉ. बाभूळकर यांचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास एक दिवसाचा अवधी शिल्लक असताना बाभूळकर यांनी पत्राद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आमदार संध्यादेवी कुपेकर व आपण राजकीय प्रवास संपवत आहोत, असे स्पष्ट केले. कुपेकर आणि बाभूळकर यांच्या निर्णयामुळे राजेश पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

१९६३ पासून शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून राजकारण करणाऱ्या कुपेकर घराण्याने राजकारणातून निवृत्ती घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर सध्यादेवी कुपेकर यांना उमेदवारी दिली. त्यानंतर संग्राम कुपेकर यांनी बंड पुकारत शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढविली. मात्र, चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील मतदारांनी संध्यादेवी कुपेकर यांना कौल दिला. यावेळी कुपेकर यांच्याऐवजी डॉ. बाभूळकर लढतील, असे आडाखे बांधले जात होते. मात्र, त्यांचा ओढा राष्ट्रवादीपेक्षा भाजपाकडे होते. त्यामुळे त्या युतीच्या घोषणेची वाट पाहत होत्या. दरम्यान युतीची उमेदवारी संग्राम कुपेकर यांना मिळाली. त्यानंतर बाभूळकर यांनी माघार घेत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव संध्यादेवी कुपेकर यांनी फेरविचार करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान बाभूळकर या नागपूरला गेल्या होत्या. मंगळवारी कुपेकर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन बाभूळकर यांचे मन वळवून लढण्यास सांगू असे सांगितले. मात्र, पवार यांनी कुपेकर यांनाच लढण्यास सांगितल्याचे समजते. मात्र, गेल्या काही वर्षांत आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार कुपेकर यांच्यात बिनसले आहे. त्यामुळे कुपेकर या राष्ट्रवादीशी फटकून राहत होत्या. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने चंदगडमध्ये अप्रत्यक्ष भाजपशी आघाडी केली होती. शरद पवार यांच्या दौऱ्यात मुश्रीफ यांच्याबाबत अनेकदा तक्रारीही झाल्या होत्या. तर कुपेकर आणि भाजपच्या सलोख्याकडेही पवारांनी दुर्लक्ष करून दोघांनाही एकप्रकारे अभय दिले होते. एकीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कुपेकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असताना मुश्रीफ यांनी मात्र, कुपेकर रिंगणाबाहेर कशा जातील याचीच एकप्रकारे फिल्डिंग लावली. डॉ. बाभूळकर यांनी पत्रात जिल्ह्यातील पक्षनेतृत्वावर टीका केली आहे. 'बाबासाहेब कुपेकर यांनी बांधलेली संघटना गेली ४०-४५ वर्षे मजबूत आहे पण दुर्दैवाने जिल्हा नेतृत्वाने विरोधकांना बळ देऊन मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. तरीही आम्ही प्रयत्न केले. यापुढे पुढचा प्रवास नवीन नेतृत्वावर सोपवायला हवा. मला आई आणि आईसाहेबांना प्रेमाने निरोप द्या,' अशी भावनिक हाकही पत्रात घातली आहे.

पाटील यांना मुश्रीफांचे पाठबळ

खासदार संजय मंडलिक यांचे मेहुणे असलेले आणि नरसिंग पाटील यांचे चिरंजीव राजेश पाटील यांना उमेदवारीसाठी पाठबळ दिल्याची चर्चा सुरू झाल्याने कुपेकर नाराज होत्या. मध्यंतरी दौलत कारखाना चालविण्यास देण्यावरून पाटील यांनी केडीसीसी बँकेविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे मुश्रीफ आणि पाटील यांच्यात तणाव असल्याचे बोलले जात होते. मात्र, पाटील यांची उमेदवारी राष्ट्रवादीतून पुढे आल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खुद्द शरद पवार कुपेकर यांच्यासाठी आग्रही असताना मुश्रीफ यांनी याबाबत चकार शब्द काढला नसल्याने डॉ. बाभूळकर यांनी नाव न घेता टीका केली आहे.

बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर सात वर्षे चंदगड मतदारसंघाची सेवा केली. सगळेच प्रश्न सुटले नाहीत. पण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी साथ दिली आता प्रकृती साथ देत नाही. त्यामुळे जनतेला वेळ देऊ शकणार नसल्याने निर्णय घेतला आहे.

आमदार संध्यादेवी कुपेकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर स्लो ट्रॅकवर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सलग दोनवेळा आमदारकी भूषविणाऱ्या राजेश क्षीरसागर यांच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पूर्णपणे शहरी आहे. शहरात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रकल्पाची उभारणी वा शहराला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठीची उपाययोजना झालेली दिसून आली नाही. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाला तरी त्याचे काम अजून सुरू करता आलेले नाही. त्यामुळे शहरातील विकासाची गती संथ आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जात असलेल्या उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजप तसेच काँग्रेसलाही मानणारी मते आहेत. त्यातून क्षीरसागर सलग दोनवेळा निवडून आले. शेवटच्या टप्प्यात त्यांना राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदी संधी देण्यात आली. त्यातून मतदार संघासाठी, कोल्हापूरसाठी मोठा निधी आणण्याची संधी होती मात्र कालावधी कमी असल्याने मर्यादा आल्या. सध्या त्यांच्याविरोधात नवखा उमेदवार असण्याची शक्यता आहे. युती झाल्यास भाजपकडून क्षीरसागर यांना मदत करणे क्रमप्राप्त होणार आहे. पण विरोधात शहरातील कोणत्या भागातील व कितीजण निवडणूक लढवणार यावर क्षीरसागर यांचे मतांचे पारडे किती जड राहणार हे स्पष्ट होणार आहे.

भाजप, सेनेचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी अंबाबाई मंदिरासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी आश्वासन दिले. पण काँग्रेस आघाडीच्या काळापासून चालत आलेला तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करुन त्यावर काम करण्यास युती पाठीमागे पडली. पहिल्या टप्प्यातील ८७ कोटीच्या कामासाठी आठ कोटी रुपयांचा निधी शेवटच्या काही महिन्यात वर्ग केला आहे. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी आवश्यक असलेल्या खंडपीठाची मंजुरी अद्याप मिळालेली नाही. सरकारकडून त्याबाबत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे. या खंडपीठाबाबत ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा वकिलांची व या परिसरातील नागरिकांची होती.
शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने थेट पाइप लाइन योजनेचे काम चालवले. शहरवासीयांकरिता ती लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यायला हवी होती. पण अनेक मंजुरीमध्ये ती रखडली गेली. यंदाही ती पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. शहरात सध्या वाहतुकीच्या कोंडीने नागरिकांना बेजार करुन टाकले आहे. त्यासाठी उड्डाणपूल, भुयारी मार्ग यांसारख्या सुविधा तसेच पार्किंगच्या जागांसाठी काम करण्याची नितांत आवश्यकता आहे. याशिवाय रिंगरोड अद्ययावत केल्याशिवाय पर्याय नाही. पण, यातील कोणत्याही कामाचा पाठपुरावाही या पाच वर्षात झालेला नाही.

मतदारसंघ
२७६, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ

आमदारांचे रिपोर्टकार्ड
राजेश क्षीरसागर, शिवसेना
- सलग दुसऱ्यांदा आमदार
- राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यभार
- २०१४ मध्ये २२०४२१ मतांनी विजयी
- अधिवेशनातील उपस्थिती : ७९ टक्के
- विचारलेले प्रश्न : ५८

मतदारसंघातील कामे
- एलबीटी रद्दसाठी पाठपुरावा
- शिवाजी चौक पुतळा सुशोभीकरण
- मैदान, उद्यानांमध्ये ओपन जिमची उभारणी
- मल्टीस्पोर्टस क्रीडांगण
- सौंदत्ती यात्रेसाठी एसटीचे भाडे कमी

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न
- अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासाचे काम
- खंडपीठाची उभारणी
- शहरासाठी आवश्यक थेट पाइपलाइन योजना
- शहर वाहतुकीसाठी उपाययोजना
- शाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारक

निवडणूक रिंगणातील अन्य उमेदवार
काँग्रेस : वसंतराव मुळीक, दौलत देसाई
भाकप : सतिशचंद्र कांबळे
शेकाप : बापूसाहेब लाड
अपक्ष : चंद्रकांत जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'या' २९ वर्षीय उमेदवाराची संपत्ती वयापेक्षा जास्त

$
0
0

कोल्हापूर: शिक्षण सम्राट डी. वाय. पाटील यांचे नातू ऋतुराज पाटील यांची संपत्ती पाहून तुम्ही थक्क व्हाल. ऋतुराज हे अवघे २९ वर्षाचे असून त्यांची एकूण संपत्ती त्यांच्या वयापेक्षाही जास्त म्हणजे ३४ कोटी एवढी आहे. ते कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा लेखाजोखा देण्यात आला आहे.

ऋतुराज पाटील हे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आहेत. ते डी. वाय. पाटील यांचे नातू आणि संजय पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी जमीन जुमला, ठेवी, गाड्या, दागदागिने अशी कोट्यवधीची संपत्ती दाखवली आहे. ऋतुराज यांनी त्यांची ३४ कोटी ३५ लाख ६५ हजार ४३७ रुपयांची एकूण संपत्ती दाखवली आहे. विवाहित असलेल्या ऋतुराज यांच्याकडे ४ लाखांची दुकाटी बाईक आहे. पोर्शे आणि फोर्ड या दोन कारही त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या एका पोर्शे कारची किंमतच २ कोटी ६२ लाख ३३ हजार २५७ एवढी आहे. तर फोर्डची किंमत २७ लाख रुपये आहे.

हिरे आणि सोनेही

ऋतुराज यांच्याकडे ४ लाख ६० हजार ६३५ रुपयांचे हिरे असून ४ लाख ६५ हजार १३१ रुपये किंमतीचे सोनेही त्यांच्याकडे आहे. त्यांच्या शेतजमीन, घर आणि इमारतीची किंमत ११ कोटी ४७ लाख ७ हजार २९७ एवढी आहे. या शिवाय ४ लाख १ हजार ३२० रुपये किंमतीची दुकाटी, ५५ हजार ७८७ रुपयांची सुझुकी बाइकही त्यांच्याकडे असल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे.

१६ कोटीहून अधिक कर्ज दिलं

ऋतुराज यांनी तब्बल १६ कोटीहून अधिक रक्कम कर्जानं दिल्याचंही या अर्जात उघड झाली आहे. त्यांनी हॉटेल सयाजीला ११ लाख ६४ हजार ८४० रुपये, डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ४२ लाख ७२ हजार रुपये, गजानन अॅग्रो फार्मरला १३ कोटी ९५ लाख २७ हजार ९९९ रुपये आणि त्यांचा भाऊ पृथ्वीराज पाटील यांना १ कोटी ७२ लाख ६० हजार रुपयांचं कर्ज दिल्याचं नमूद केलं आहे.

२२ कोटींच्या ठेवी

या शिवाय ऋतुराज यांनी २२कोटी ८८ लाख ५८ हजार १४० रुपयांची विविध ठिकाणी केलेली गुंतवणूकही दाखवली आहे. शेअर्समध्ये पैसा गुंतविल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, ऋतुराज यांनी आज सायकल रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर आमदार सतेज पाटील, पत्नी प्रतिमा पाटील, संजय पाटील यांचेसह काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते हे दसरा चौकातून पदयात्रा करत जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले. यानंतर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारायण मूर्ती यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार

$
0
0

सातारा: इन्फोसिसचे संस्थापक डॉ. एन. आर. नारायण मूर्ती यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. थर्मेक्‍स कंपनीच्या माजी अध्यक्षा अनू आगा यांना रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, अडीच लाख रुपये रोख व रयत वस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

रयत शिक्षण संस्थेचा शंभरावा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा होणार आहे. हा कार्यक्रम कर्मवीर समाधी परिसराच्या प्रांगणात पार पडणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, रयत परिवाराचे माजी कार्याध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील, विद्यमान कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उप कार्याध्यक्ष भगीरथ शिंदे, सहसचिव (माध्यमिक) विजय सावंत, सहसचिव (प्राथमिक) विलास महाडिक उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीची वाटचाल उलघडून दाखवणारा रयत शिक्षण पत्रिका या कर्मवीर विशेषांकाचे प्रकाशन शरद पवार व डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे


बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी विजयादशमीच्या मुहुर्तावर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी काले (ता. कराड) येथे सत्यशोधक समाज परिषदेत रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात ७३७ शाखा १३५५३ सेवकांचे ज्ञानदान व ४५८०४४ विद्यार्थी इतका मोठा पसारा असणारी ही संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था समजली जाते. रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांनी 'नॅक'ची प्रतिष्ठित नामांकने प्राप्त केली असून शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताऱ्यात सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.


याशिवाय यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या एकत्रीकरणातून स्वतंत्र विद्यापीठाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्याची घोषणा सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व असणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात अनेक महत्वाच्या प्रकल्पांची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री सुक्त पठण

$
0
0

कोल्हापूर : जरगनगर येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त श्री सुक्त पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. भक्तीमय वातावरणात कार्यक्रम पार पडला. श्री सुक्त म्हणजे देवीची स्तुती आणि देवीचे सार्थ वर्णन असते असे सप्तर्षी प्रबोधन वर्गाच्या संचालिका मेघा बांभोरीकर यांनी नमूद केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुक्त पठणाची १६ आवर्तने करण्यात आली. याप्रसंगी मधुरिमा चिकोडे, शोभा साळुंखे, सुप्रिया कोरडे, संगीता ओतारी, रंजिता साळोखे, लता यादव आदी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दसऱ्यानिमित्त ग्राहकांच्या स्वागतासाठी बाजारपेठा फुल्ल असून साडेतीनपैकी एक असलेल्या मुहूर्तावर ग्राहकांकडून इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तू घरी आणण्याचे नियोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील इलेक्ट्रॉनिक शोरूम सज्ज झाली आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरघोस सवलती दिल्या जात आहेत. शहरात ठिकठिकाणी ऑफर्सचे फ्लेक्स झळकत आहेत.

'दसरा दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या उक्तीस अनुसरूनच या काळात नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. वर्षभर प्लॅन करून हमखास दसऱ्यात नवीन वस्तू घरी आणल्या जातात. याकाळात ग्राहकांना आकर्षक ऑफर व डाउन पेमेंट भरून वस्तू खरेदी करता येत आहेत. त्यामुळे परवडेल त्याठिकाणी वस्तू खरेदीला ग्राहक प्राधान्य देत आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये एसी, एलइडी, वॉशिंग मशिन, फ्रीज, कुलर्स, मायक्रोओव्हन, लॅपटॉप आदींच्या खरेदीची धूम असून वस्तू खरेदीसाठी फायनान्स कंपन्या आणि बँकांची मदत होत आहे. ग्राहकांसाठी एक्सेंज ऑफर उपलब्ध आहेत. एका वस्तूवर दुसरी फ्री अशा गोष्टींमुळे ग्राहक आकर्षित होत आहेत. सध्या मोठ्या आकारातील एलइडीची क्रेझ आहे. साधारणतः २१ ते ४२ इंचापर्यंत टीव्ही खरेदी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. फ्रिजमध्ये सिंगल, डबल डोअर तसेच जादा लिटरच्या फ्रिजला अधिक पसंती दिली जात आहे. शहरातील शिवाजी स्टेडियम, लक्ष्मीपुरी, गांधीनगर या परिसरातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे.

स्मार्टफोन, लॅपटॉपची विक्री

आजकाल प्रत्येकाला चांगला स्मार्टफोन आपल्याकडे असावा असे वाटते. तरुणाईमध्ये फ्लॅगशीप स्मार्टफोनची क्रेज आहे. साधारणत: दहा टक्केपर्यंत मोबाइल खरेदीवर सवलत दिली जात आहे. 'नो कॉस्ट इएमआय' सुविधाही उपलब्ध आहेत. पाच हजारापासून सव्वा लाखांपर्यंतचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. मोबाइल फोन ॲक्सेसरीजवर भरघोस सूट आहे. शालेय, कॉलेजवयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेताना सूट व कमी व्याजदराची योजना दिली जात आहे. २० हजारांपासून १ लाखापर्यंतचे लॅपटॉप उपलब्ध आहेत.

ऑनलाइन शॉपिंगचा परिणाम

सध्या भरघोस सवलत मिळत असल्याने ग्राहक ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देत आहेत. फ्लिपकार्ट, अमेझॉनसारख्या ऑनलाइन विक्री करणाऱ्या साइटवर सध्या सेल सुरू असल्याने ग्राहकांचा तिकडे अधिक ओढा आहे. त्यामुळे दुकानात जाऊन वस्तू खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन दरांची तपासणी केली जात आहे. त्यानुसार वस्तू कुठे खरेदी करावी याबाबत ग्राहक चोखंदळपणे ठरवत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरची डिझायनर झळकतेय जर्मनीत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सतत नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असते. पण, ते नागरिकांना सुरक्षित, वापरण्यायोग्य बनवण्याचे आव्हान डिझाइन आणि डेव्हलपमेंट इंजिनीअरला पेलायचे असते. हेच आव्हान जिथे स्थानिक भाषेशिवाय दुसरी भाषा बोलली जात नाही, अशा जर्मनीमध्ये राहून कोल्हापूरची कन्या सानिया पवार सहज पेलत आहे. नाविन्यपूर्ण कल्पनांचा ध्यास असलेल्या सानियाने केवळ दोन वर्षाच्या कालावधीतच या क्षेत्रातील नैपुण्य दाखवल्याने तिने विकसित केलेल्या एका डिझाइनला 'बेस्ट डिझाइन'चे पारितोषिकही मिळाले आहे.

डिझाइन डेव्हपलमेंटच्या क्षेत्रात काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. कारण त्यांनी निर्माण केलेले उत्पादन जग हाताळणार असते व त्यातून जगाला एक नवीन व उत्कृष्ट उत्पादन दिल्याचे समाधान मिळत असते. सानियाने इंजिनीअरिंगमध्ये करिअर करण्याचे ठरवले. माईसाहेब बावडेकर प्रशालेतून दहावी व विवेकानंद कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अलाहाबाद येथील मोतीलाल नेहरू एनआयटीमध्ये इंडस्ट्रीयल आणि प्रॉडक्शन इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. मुळात प्रथमपासून नवीन घडवण्याची आस असलेल्या सानियाने या करिअरमध्ये जोमाने वाटचाल सुरू केली. नवीन काही तरी करायचे हा ध्यासच तिने घेतला. त्यामुळे एम. एस. करण्यासाठी थेट जर्मनी गाठली. जर्मन हा देश असा आहे की तिथे इंग्रजीपेक्षा जर्मन भाषेचाच बहुतांश वापर केला जातो. त्यामुळे संवादासाठी अडचण येऊ नये म्हणून तिने प्रथम भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर काईझर्सलाऊटर्न युनिव्हर्सिटीमध्ये कमर्शिअल व्हेईकल टेक्नॉलॉजीमध्ये एम. एस. पूर्ण केले.

तीन वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर जॉन डिअर कंपनीच्या युरोपिअन टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटरमध्ये सहा महिन्यांची इंटर्नशिप केली. येथेच तिने नैपुण्याची चुणूक दाखवली. ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या जॉन डिअरच्या कंपनीने त्यांच्या नवीन ट्रॅक्टर मॉडेलचे हूड (इंजिन कव्हर) डिझाइन करण्यात तिने महत्वाची जबाबदारी पेलली. ट्रॅक्टरचे हे नवीन मॉडेल विविध देशात विक्रीला जात आहे. हे कौशल्य पाहून कंपनीने तिला तिथेच थिसिस करण्याची संधी दिली. सहा महिन्याच्या कालावधीत तिने रोबोटिक लॉन मोवरचं कन्सेप्ट डिझाइन (गवत कापण्याचं स्वयंचलित यंत्र) बनवले.

या कामाच्या जोरावर स्टुटगार्ट येथील पेर्माट्रेड वॉटर टेक्निकमध्ये डिझाइन आणि डेव्हलपमेंट इंजिनीअर म्हणून नेमणूक झाली. डिझायनर बनण्याचे स्वप्न पूर्ण झालेल्या सानियाने हिटिंग वॉटर ट्रीटमेंट युनिटचे कार्यक्षम डिझाइन तयार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याला बेस्ट डिझाइनचे पारितोषिक मिळाले. नुकतीच ती हॅनोफर येथील बिझरबा ग्रुप या कंपनीमध्ये रुजू झाली आहे. तिच्या वाटचालीला आई डॉ. विश्रब्धा व किर्लोस्कर ऑईल इंजिन्समध्ये एच. आर. मॅनेजर असणारे वडील राहुल यांचे भक्कम पाठबळ मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा ठिकाणी दुरंगी, इचलकरंजी, कागल तिरंगी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघापैकी सहा ठिकाणी दुरंगी सामना रंगणार आहे. करवीर, शाहूवाडी, राधानगरी या मतदारसंघात पारंपरिक उमेदवार एकमेकांसमोर असतील. कागल, इचलकरंजीत तिरंगी तर शिरोळ, हातकणंगलेत बंडखोरीमुळे निकालाचे गणिते बदलण्याची चिन्हे आहेत. स्थानिक आघाड्यांच्या कुरबुरी, गटबाजीवर मात करताना प्रबळ उमेदवारांची दमछाक होत आहे.

शिवसेनेने सर्व सहा जागांवर विद्यमान आमदारांना रिंगणात उतरविले. काँग्रेसने ऋतुराज पाटील, राहुल खंजिरे हे दोन नवे चेहरे दिले आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ सेनेचा बालेकिल्ला आहे. आमदार राजेश क्षीरसागर हे तिसऱ्यांना लढणार असले तरी स्वपक्षातील नाराजी दूर करण्याचे, महत्त्वाकांक्षी भाजप पदाधिकाऱ्यांना सोबतीला घेऊन किल्ला सर करण्याचे मोठे आव्हान आहे. काँग्रेसने ऐनवेळी उद्योजक चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षातील इच्छुकांची समजूत काढणे, राष्ट्रवादीला सोबत घेणे हे यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

'दक्षिण'मध्ये पाटील आणि महाडिक गटाने लढत कमालीची प्रतिष्ठेची बनवली आहे. तर करवीर आणि शाहूवाडी या दोन्ही मतदारसंघात पारंपरिक उमेदवारांत काँटे की टक्कर असेल. राधानगरीत सेनेचे प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्यामध्ये पुन्हा सरळ लढत होईल. ए. वाय. पाटील यांच्या माघारीमुळे के. पी. पाटील यांना दिलासा मिळाला आहे. 'चंदगड'मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरुन काथ्याकूट सुरू होता. विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर, त्यांच्या कन्या नंदिनी बाभुळकर यांनी राजकीय संन्यास घेतल्यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादीकडून राजेश पाटील आणि सेनेकडून संग्राम कुपेकर यांच्यात थेट लढतीची शक्यता आहे. हातकणंगलेत सेनेचे उमेदवार सुजित मिणचेकर यांच्याविरोधात काँग्रेसकडून राजूबाबा आवळे, जनसुराज्यकडून अशोक माने यांची नावे चर्चेत आहेत. जनुसराज्यने अशोक मानेंना संधी दिल्यास माजी आमदार राजू आवळे यांच्या भूमिकेकडे लक्ष राहील.

कागलला गटाच्या ताकतीचा फैसला

कागल तालुक्याचे राजकारण मंडलिक, मुश्रीफ आणि दोन्ही घाटगे गटांत विभागले आहे. चारही गटात प्रत्येक निवडणुकीत सोयीनुसार पाठिंब्याचे राजकारण करतात. यंदा येथे तिरंगी लढत आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, सेनेचे उमेदवार संजय घाटगे आणि शाहू कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांच्यात तुल्यबळ लढत होईल. लोकसभेला सेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना येथून ७३ हजारांचे मताधिक्क्य मिळाले. त्यांच्या प्रचारात सेनेसह दोन्ही काँग्रेसचे हात पडद्याआड सक्रिय होते. त्याची परतफेड करताना मंडलिकांची कसोटी लागेल.

इचलकरंजी तिरंगी

इचलकरंजीत भाजपचे सुरेश हाळवणकर, ताराराणी आघाडीचे प्रकाश आवाडे आणि काँग्रेसकडून राहुल खंजिरे अशी तिरंगी लढत आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मंत्री आवाडे अपक्ष म्हणून ताकत आजमावणार आहेत. त्यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला नगरसेवक राहुल खंजिरे यांच्या रुपाने तरुण चेहरा मिळाला. मात्र आवाडे यांच्या माध्यमातून पडलेली फूट, राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक जांभळे, नगरसेवक मदन कारंडे यांच्यातील गटबाजी कायम आहे. भाजपकडून हाळवणकर हे हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. नगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. राष्ट्रवादीचा एक गट त्यांच्यासोबत आहे.

शिरोळमध्ये स्वाभिमानी-राष्ट्रवादीत अंतर

शिरोळमध्ये सेनेकडून आमदार उल्हास पाटील दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. त्यांना पाठिंबा देण्यावरुन बहुजन विकास आघाडीत कुरुबुरी झाल्या. भाजप पदाधिकाऱ्यांनीही निवडणूक लढविण्याची भाषा केली. ही नाराजी दूर करुन पाटील यांना जुळणी करावी लागेल. स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रवादीत कटूता आली आहे. राष्ट्रवादीकडून राजेंद्र पाटील-यड्रावकर पाच वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत आहेत. मात्र आघाडीमुळे स्वाभिमानीला ही जागा देण्यात आली. स्वाभिमानीकडून सावकार मादनाईक चर्चेत आहेत. तर यड्रावकर बंडखोरीच्या तयारीत आहेत. त्यामुळे येथे गणिते बदलतील.

उत्तर : राजेश क्षीरसागर (शिवसेना) विरुद्ध चंद्रकांत जाधव (काँग्रेस)

दक्षिण : अमल महाडिक (भाजप) विरुद्ध ऋतुराज पाटील (काँग्रेस)

करवीर : चंद्रदीप नरके (शिवसेना) विरुद्ध पी. एन. पाटील (काँग्रेस)

शाहूवाडी पन्हाळा : सत्यजित पाटील (शिवसेना) विरुद्ध विनय कोरे (जनसुराज्य शक्ती )

राधानगरी भुदरगड : प्रकाश आबिटकर (शिवसेना) विरुद्ध के. पी. पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

चंदगड आजरा : राजेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध संग्राम कुपेकर (शिवसेना)

दृष्टिक्षेपात निवडणूक

- शिवसेनेचे सहा विद्यमान आमदार रिंगणात

- भाजपच्या समरजितसिंह घाटगे यांची बंडखोरी

- आवाडे ताराराणी आघाडीच्या माध्यमातून ताकत आजमावणार

- काँग्रेसकडून ऋतुराज पाटील, राहुल खंजिरे नवे चेहरे

- राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, नंदिनी बाभुळकर यांचा संन्यास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीतली मेजवानी स्वस्त

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार आणि पक्षांसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने खर्चाचे सरकारी दर जाहीर केले आहेत. त्यात मिसळ २५, तर मटण थाळी १५० तर शाकाहारी थाळीचा दर ८० ते ११० रुपये निश्चित केले आहेत. सर्वच दर पत्रकावर नजर टाकल्यास कमीत कमी निर्धारित केलेले दर खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे एकप्रकारे उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.

विधानसभा निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवारास २८ लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा आहे. यासाठी प्रचारावेळी उमेदवार आणि पक्षांकडून दैनंदिन खर्च निवडणूक प्रशासनाकडे सादर करावा लागतो. याशिवाय निवडणूक प्रशासनही स्वतंत्रपणे खर्चाची नोंद ठेवणार आहे. यासाठी प्रचारात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचे दर निवडणूक प्रशासनाने विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून निश्चित केले आहेत. हे दरपत्रक प्रशासनाने पक्षांना दिले आहे. दरम्यान, प्रशासनाच्या दरपत्रकातील दर बाजारपेठेपेक्षा कमी आहेत. एक कप चहाचा दर पाच रुपये लावण्यात आला आहे. पेनची किंमत चार रुपये आहे. एक प्लेट मिसळचा दर २५ आणि मटण थाळीचा कमीत कमी दर १५० रुपये निश्चित केला आहे. अशा विविध प्रकारच्या वस्तूंचे कमीत कमी दर बाजारपेठेच्या तुलनेत कमी आहेत. यामुळे सरकारी दरपत्रकातही स्वस्ताई दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडियाद्वारे प्रचार करण्याकडे कल वाढला आहे. यामुळे एकाचवेळी पाठवण्यात येणाऱ्या प्रचाराच्या एसएमएसलाही पैसे आकारण्यात येणार आहे. ९ ते १८ पैसे प्रती एसएमएस असा त्याचा दर आहे. इलेक्ट्रानिक मीडियावरील जाहिरातीचे पैसे खर्चात समाविष्ट होणार आहे. उमेदवारांना प्रत्येक वस्तूची पावती जीएसटीसह जोडावी लागणार आहे.

दरपत्रक

हार, तुरे : १०० ते ५०० रुपये

पोवाडा, हलगी, लेझीम, झांज, तुतारी पथक प्रतिदिन : ५०० ते १० हजार

मैदान भाडे प्रतिदिन : ५ हजार ते १० हजार

सांस्कृतिक सभागृह प्रतिदिन : ११ हजार ८०० ते १ लाख ५९ हजार ३००

नारळ प्रतिनग : १० रुपये

प्रचार कार्यालयातील पेन : ४ रुपये

चहा कप : ५ ते १० रुपये

बिस्किट पुडा : ५ ते १० रुपये

लस्सी एक ग्लास : १० ते २० रुपये

उपीट, शिरा, वडा पाव प्रतिप्लेट : १० ते २० रुपये

शाकाहारी जेवण थाळी : ८० ते ११० रुपये

रिक्षा, दुचाकी वाहन प्रतिदिन : ७०० रुपये

कार : १८००, ट्रक : ३००० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यू कॉलेजमध्ये ११ पासून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

न्यू कॉलेजतर्फे संस्थेचे चेअरमन डी. बी. पाटील यांच्या नावांनी ११ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. सकाळी ९. ३० ते सायंकाळी ५. ३० या वेळेत न्यू कॉलेज येथे स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी, 'राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांची प्रस्तुतता', 'आर्थिक मंदीच्या चक्रव्यूहात भारत', 'महिला सबलीकरण वास्तव आणि आभास', 'चांद्रयान २ यश की अपशय', 'कृत्रीम बुद्धिमत्तेचे आव्हान', 'पर्यावरण असंतुलन आणि पृथ्वीचे भवितव्य' हे विषय आहेत. ही स्पर्धा सीनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी आहे. पदव्युत्तर व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी होऊ शकणार नाहीत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना १० हजार, द्वितीय क्रमांकाला सात हजार, तृतीय क्रमांकासाठी पाच हजार आणि चतुर्थ क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला २००० रुपयांचे बक्षीस आहे. प्रत्येकी एक हजार रुपयांचे दोन उत्तेजनार्थ बक्षीसे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेत श्रमदान

$
0
0

'स्वच्छता ही सेवा'अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात स्वच्छता श्रमदानाचा कार्यक्रम झाला. महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्लास्टिक मुक्तीची शपथ दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी स्वच्छता अभियानमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून जिल्हा प्लास्टिक मुक्त करु या असे आवाहन केले. कार्यक्रमानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील प्लास्टिक संकलित केले. यामध्ये १२० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जवळपास ३२ किलो प्लास्टिक संकलित केले. तसेच सर्व तालुक्यातील पंचायत समित्यामध्येही कार्यालयीन स्वच्छता व प्लास्टिक संकलन मोहीम राबवली. गांधी जयंतीचे औचित्य साधून गावामध्ये श्रमदानातून स्वच्छता मोहीम, प्लास्टिक मुक्ती विषयक कार्यक्रम राबविले. प्रास्ताविक पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी कोले.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, राजेंद्र भालेराव, शिक्षणाधिकारी आशा उबाळे उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्बन बँक संचालक कणेरकर, माने अपात्र

$
0
0

कोल्हापूर: दि कोल्हापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक शिरीष कणेरकर आणि जयसिंग माने यांचे संचालकपद सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अपात्र ठरवले आहे, असे पत्रक उदय मिसाळ यांनी प्रसिद्धिस दिले आहे. मिसाळ यांनी सहकार मंत्र्याकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन दोन संचालकांना अपात्र ठरवले आहे. पत्रकात म्हटले आहे, संचालक कणेरकर यांनी अॅड. शामराव शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेतून सोने तारणावर एक लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज भरले नाही. वेळेत कर्ज न भल्याने दोन लाख २३ हजार, ३६३ रुपयांची थकबाकी झाली आहे. संचालक मानेही सत्यशोधक बँकेत थकबाकीदार असून त्यांची ५३२८ रुपयांची थकबाकी आहे. मिसाळ यांनी सहकार कायदा कलम १५४ नुसार सहकार मंत्र्याकडे थकबाकीबाबत पुर्ननिरीक्षण अर्ज केला होता. त्यांचा अर्ज मंजूर होऊन २० सप्टेंबर रोजी दोघांचे संचालकपद रद्द करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रणिती शिंदे, आडम यांचे शक्तिप्रदर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

विधानसभा निवडणुकीची धामधूम गुरुवारपासून सुरू झाल्याचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या गोंधळावरून सोलापुरात दिसून आले. शहर मध्य मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे, माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत तर शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने, शहर उत्तर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पालकमंत्री विजयकुमार देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदनशिवे, सोलापूर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सहकारमंत्री सुभाष देशमुख, काँग्रेसचे उमेदवार बाबा मिस्री यांनी साधेपणाने गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

पालकमंत्री, सहकारमंत्री, आनंद चंदनशिवे यांनी साधेपणाने तर उर्वरित उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपापल्या मतदारसंघातून अर्ज दाखल केले. आमदार प्रणिती शिंदे आणि बाबा मिस्त्री यांची काँग्रेस भवनपासून मिरवणूक निघाली. त्यांच्यासोबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे हेही उपस्थित होते. माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांनी शक्तिप्रदर्शन करीत दत्त नगरमधून मिरवणूक काढली. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कामगारवर्ग उपस्थित होता. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी महावीर भवनात मेळावा घेतला व त्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी व मोजके पदाधिकारी उपस्थित होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. शहर मध्य मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ गुरुवारीही कायम होता. शिवसेनेकडून दिलीप माने यांनी एकट्याने बुलेटवर येऊन अर्ज दाखल केला. मात्र, दुपारनंतर पुन्हा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे यांना एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा सुरू झाली होती. अक्कलकोटमध्ये काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनीही अर्ज दाखल केला. तर, मोहोळ मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने नगरसेवक मनोज शेजवाल यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६६ जणांचे ९४ अर्ज दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दहा मतदारसंघांसाठी गुरुवारी ६६ उमेदवारांनी ९४ अर्ज दाखल केले. आमदार राजेश क्षीरसागर, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, जनसुराज्यचे नेते विनय कोरे, ऋतुराज पाटील, आदी दिग्गजांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. दरम्यान, शुक्रवारी (ता.४) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठी गर्दी होणार आहे. उर्वरित इच्छुक सर्वजण अर्ज दाखल करणार आहेत.

मतदारसंघनिहाय उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रमुख उमेदवार असे : चंदगड : गोपाळराव पाटील (अपक्ष), शिवप्रसाद तेली (अपक्ष), अनिरुद्ध रेडेकर (अपक्ष), अमर चव्हाण (राष्ट्रवादी), विद्याधर गुरबे (अपक्ष), शिवाजी पाटील (भाजप), संग्राम कुपेकर (शिवसेना), गंगाधर व्हसकोटी (वंचित बहुजन आघाडी), नगराध्यक्षा स्वाती कोरी (जनता दल).

राधानगरी : के. पी. पाटील (राष्ट्रवादी), राहुल देसाई (भाजप), अरुण डोंगळे (अपक्ष), चंद्रकांत पाटील-कौलवकर (अपक्ष), सत्यजित जाधव (अपक्ष).

कागल : आमदार हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी), नाविद मुश्रीफ (राष्ट्रवादी), संजय घाटगे (शिवसेना), सुयशा अंबरिश घाटगे (अपक्ष), समरजितसिंह घाटगे (अपक्ष), नवोदिता समरजितसिंह घाटगे.

करवीर : राहुल पाटील (काँग्रेस), पी. एन. पाटील (काँग्रेस), शैलाबाई शशिकांत नरके (शिवसेना), डॉ. आनंदा दादू गुरव (वंचित बहुजन आघाडी). कोल्हापूर दक्षिणमध्ये : ऋतुराज संजय पाटील (काँग्रेस). कोल्हापूर उत्तर : आमदार राजेश क्षीरसागर (शिवसेना), वैशाली क्षीरसागर (अपक्ष), संभाजी साळुंखे (अपक्ष), भरत पाटील (महाराष्ट्र क्रांतिसेना).

शाहूवाडी : विनय कोरे (जनसुराज्य शक्ती पक्ष), संभाजी यादव (अपक्ष), गौतम कांबळे (बीएसपी). हातकणंगले : डॉ. प्रशांत गंगावणे (अपक्ष), डॉ. सुजित मिणचेकर (शिवसेना), शिवाली आवळे (अपक्ष), सागर शिंदे (एआयएमआयएम). इचलकरंजी : आमदार सुरेश हाळवणकर (भाजप), भारती सुरेश हाळवणकर (भाजप), राहुल खंजिरे (काँग्रेस), राहुल आवाडे (अपक्ष), प्रकाश आवाडे (अपक्ष), शशिकांत आमणे (बहुजन वंचित आघाडी). शिरोळ : आमदार उल्हास पाटील (शिवसेना), उज्ज्वला उल्हास पाटील (अपक्ष), अनिल मादनाईक (स्वाभीमानी पक्ष), प्रमोद पाटील(अपक्ष).

दरम्यान, बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहारमार्गे येत कार्यकर्त्यांसमवेत संभाजी साळुंखे चालत येत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला.

००००

सर्वाधिक अर्ज राधानगरीतून

मतदारसंघनिहाय दाखल अर्ज : चंदगड : १३, राधानगरी : ११, कागल : ७, कोल्हापूर दक्षिण : १, करवीर : ५, कोल्हापूर उत्तर : ४, शाहूवाडी : ६, हातकणंगले : ६, इचलकरंजी : ७, शिरोळ : ६.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 12

नारायण मूर्ती, अनु आगा यांना ‘रयत’चे पुरस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

रयत शिक्षण संस्थेच्या शंभराव्या वर्धापनदिनानिमित्त आज, शुक्रवारी आयोजित सोहळ्यात 'इन्फोसिस'चे संस्थापक डॉ. एन. आर. नारायण मूर्ती यांना 'डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार' तर, थरमॅक्स कंपनीच्या माजी अध्यक्ष अनु आगा यांना 'रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, अडीच लाख रुपये रोख व रयत वस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

कर्मवीर समाधी परिसराच्या प्रांगणात होणाऱ्या या सोहळ्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, रयत परिवाराचे माजी कार्याध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील, विद्यमान कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपकार्याध्यक्ष भगीरथ शिंदे, सहसचिव (माध्यमिक) विजय सावंत, सहसचिव (प्राथमिक) विलास महाडिक उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीची वाटचाल उलगडून दाखवणारा 'रयत शिक्षण पत्रिका' या कर्मवीर विशेषांकाचे प्रकाशन शरद पवार व डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋतुराज ३४ कोटींचे मालक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू ऋतुराज पाटील यांच्या नावे ३४ कोटी ३५ लाख ६५ हजार ४३७ रूपयांची मालमत्ता आहे. वयाच्या २९ व्या वर्षी त्यांच्याकडे इतकी मालमत्ता असल्याचे उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आले आहे. त्यांच्याकडे दोन कोटी ६२ लाख ३३ हजार २५७ रूपये किंमतीची पोर्शे कार तर फोर्ड कंपनीची २७ लाखांची अलिशान कार आहे. ते काँग्रेसच्या तिकीटावर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शहरातील उत्तरमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची मालमत्ताही कोट्यवधींची आहे.

ऋतुराज हे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे तर डॉ. संजय पाटील यांचे सुपुत्र आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी जमीन जुमला, ठेवी, गाड्या, दागदागिने अशी कोट्यवधीची संपत्ती दाखवली आहे. २०१८-१९ मध्ये त्यांनी आयकर विवरणपत्रात १ कोटी ४० लाख ८७ हजार ७२२ रूपयांचे उत्पन्न दाखवले आहे. त्यांनी हॉटेल सयाजीला ११ लाख ६४ हजार ८४० रुपये, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ४२ लाख ७२ हजार रुपये, गजानन अॅग्रो फार्मरला १३ कोटी ९५ लाख २७ हजार ९९९ रुपये आणि त्यांचा भाऊ पृथ्वीराज पाटील यांना १ कोटी ७२ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज दिले आहे.

उत्तर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत:सह पत्नी, दोन मुलांच्या नावे मालमत्ता ९ कोटी २८ लाख ६२ हजारांची संपत्ती दाखवली आहे. त्यांनी ज्वेलरी व्यवसाय करीत असल्याचे म्हटले आहे. स्वत:च्या नावे फॉच्युरनरसह सात वाहने तर पत्नीच्या नावे स्कोडा कारसह दोन वाहने आहेत. राजेश यांच्या नावे कदमवाडी, मुंबई येथे प्रत्येक एक आणि शनिवार पेठमध्ये दोन फ्लॅट, पत्नी वैशाली यांच्या नावे रमणमळा येथे बंगला, पुणेजवळील ताथवडे आणि पनवेल येथील कामोटे येथे फ्लॅट आहे. एका मुलाच्या नावे शनिवार पेठ आणि रमणमळा येथे घर, दुसऱ्या मुलाच्या नावे शनिवार पेठेत घर आहे. मुलगा ऋतुराज क्षीरसागर शासकीय ठेकेदार आहे.

...

ऋतुराज पाटील

एकूण मालमत्ता : ३४ कोटी ३५ लाख

वाहन : ४ लाखांची दुकाटी बाईक, ५५ हजार ७८७ रुपयांची सुझुकी बाइक

हिरे आणि सोने : ४ लाख ६० हजार ६३५ रुपये

४ लाख ६५ हजार १३१ रुपये किंमतीचे सोने.

शेतजमीन, घर आणि इमारतीची किंमत : ११ कोटी ४७ लाख ७ हजार २९७.

कर्ज : १७ कोटी ६६ लाख

दिलेले कर्ज : १६ कोटींहून अधिक

ठेवी : २२ कोटी ८८ लाखांच्या ठेवी

...

राजेश क्षीरसागर

एकूण मालमत्ता : ९ कोटी २८ लाख ६२ हजार

स्वत:सह दोन मुले, पत्नीकडे रोख रक्कम : १ लाख ६० हजार

कुटुंबाकडे जंगम मालमत्ता : २ कोटी ३१ लाख ९३ हजार

स्थावर मालमत्ता : ६ कोटी ९६ लाख ६८ हजार

स्वत: व पत्नी वैशाली यांच्या नावे कर्ज : ६६ लाख ६८ हजार

कुटुंबाकडे सोने : १३ लाख ८ हजार

हिरे दागिने : १३ लाख १ हजार

प्लॅटीनम दागिने : ७ लाख १५ हजार

...

आमदार क्षीरसागर

यांना नोटीस

आमदार क्षीरसागर यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेले प्रतिज्ञापत्र अपूर्ण आहे. यासंबंधी निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी त्यांना नोटीस दिली आहे. यासंबंधीची नोंद प्रतिज्ञापत्रावर करण्यात आली आहे.

...

१२ गुन्हे दाखल

आमदार क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्जात भरलेल्या माहितीमध्ये १२ गुन्हे दाखल झाल्याचे नमूद केले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, मनाई आदेशाचा भंग करणे, बेकादेशीर जमाव करणे, काठीने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करणे, महिला पोलिसांचा विनयभंगसारखे कृत्य करणे यासह विविध आंदोलनातील गुन्हे दाखल असल्याचे त्यांच्या अर्जात नमूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images