Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘वंचित’ची प्रस्थापितांना धडकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मागासवर्गीय आणि मुस्लिम मतदार ही काँग्रेसची पारंपारिक व्होट बँक. या हुकुमी मतदारांसह बहुजन समाजातील विविध घटकांना वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत मिळवलेली मते आणि विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या यामुळे प्रस्थापितांना धडकी भरत आहे. 'वंचित'कुणाला तारणार आणि कुणाला पराभवाची चख चाखायला लावणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वंचितला सक्षम उमेदवार मिळाल्यास युती व दोन्ही काँग्रेस समोर तगडे आव्हान उभे राहू शकते.

'वंचित'ने लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात मिळून १ लाख ८६ हजार ८५८ मते मिळवली. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अरुणा माळी यांना ६४ हजार ४३९ तर हातकणंगले मतदारसंघात अस्लम सय्यद यांना १लाख २३ हजार ४१९ मते मिळाली आहेत. 'वंचित'ने विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याची घोषणा केली आहे. यामुळे जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंडळीही वंचितच्या संपर्कात आहेत. वंचित आघाडीचे नेते आंबेडकर यांनी 'काँग्रेसमधील नाराज, बिगर नाराज सगळेच आमच्या संपर्कात आहेत. आणि चर्चेसाठी आमचे दरवाजे खुले आहेत, असे जाहीर करून इतरांना साद घातली आहे.

लोकसभा निवडणुकीला हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, करवीर या मतदारसंघातील वंचितला मिळालेली मते लक्षणीय आहेत. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात वंचितकडे तगडा उमेदवार मिळाल्यास, ज्या त्या मतदारसंघातील निकालावर परिणाम होऊ शकतो, अशी स्थिती आहे. अॅड. आंबेडकर यांच्या दौऱ्यावेळी कोल्हापूर, सांगलीतील वेगवेगळ्या पक्षातील मंडळींनी त्यांची भेट घेतल्याने आगामी निवडणुकीत वेगळे चित्र आकाराला येऊ शकते. ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुलाखतीदरम्यान इचलकरंजी नितीन लायकर, नगरसेवक अब्राहम आवळे, भुदरगड तालुकामधून जीवन पाटील, दयानंद कांबळे, कोल्हापूर दक्षिणमधून प्रा. बी. जी. मांगले, शिरोळमधून समाजकल्याण समितीचे माजी सभापती विलास कांबळे, तर हातकणंगलेत शामराव गायकवाड, डॉ. मिलिंद हिरवे, अॅड. प्रेमकुमार माने, अॅड. इंद्रजित कांबळे यांनी मुलाखती दिल्या होत्या.

\Bहातकणंगलेत भाऊगर्दी, उत्तर,

दक्षिण, शिरोळमध्येही इच्छुक जास्त \B

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती झाल्या. दहा ठिकाणी मिळून ७२ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यामध्ये कोल्हापूर उत्तरमध्ये नऊ, कोल्हापूर दक्षिणमध्ये आठ, चंदगडमध्ये सात, शाहूवाडीत सहा, करवीरमध्ये सात, हातकणंगलेत १४, राधानगरीत तीन, कागलमध्ये सहा आणि शिरोळमध्ये नऊ जणांनी उमेदवारी मागितली आहे. हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक १४ उमेदवार वंचितच्या तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत. त्या पाठापोठ कोल्हापूर उत्तर, दक्षिण, शिरोळमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांनी 'वंचित'कडे उमेदवारीची मागणी केली आहे.

दहा विधानसभा मतदारसंघात वंचितला लोकसभेतील मते

कोल्हापूर उत्तर: ७१८३

कोल्हापूर दक्षिण: ११,३७३

करवीर: १६,५२२

कागल: ९८३३

राधानगरी: १०,४४४

चंदगड : ७८९६

शाहूवाडी: १३,३१७

हातकणंगले: ४१,२११

इचलकरंजी : १७,२४८

शिरोळ : २०,४४२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युतीच्या घोषणेकडे लागले डोळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप-शिवसेना युतीची घोषणा कधी होणार याकडे जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघातील भाजप इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. युती तुटल्यास इच्छुकांच्या आकांक्षांना बळ मिळणार आहे तर युती झाल्यास दोन्ही पक्षांतील अनेकांना गप्प बसावे लागणार आहे, तसे न झाल्यास बंडखोरी अटळ आहे.

भाजप-शिवसेना युती झाल्यास विद्यमान सहा आमदारांच्या जागा शिवसेनेला तर भाजपच्या दोन आमदारांच्या जागासह कागल आणि चंदगड विधानसभा मतदार संघावर भाजपने दावा केला आहे. भाजपने शिवसेनेची हक्काची कोल्हापूर उत्तरही जागा मागितली असल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपने सर्व विधानसभा मतदार संघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असल्या तरी प्रबळ उमेदवारांची त्यांच्याकडे वाणवा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनादेश यात्रेत कागल विधानसभा मतदार संघात समरजित घाटगे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. पण तिथे शिवसेनेकडून माजी आमदार संजय घाटगे दावेवार आहेत. गतवेळच्या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात त्यांनी कडवी झुंज दिली होती. त्यामुळे घाटगेही यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणारच अशी घोषणा केली आहे. युती झाल्यावर ही जागा शिवसेनेला की भाजपला यावर दोन घाटगेंपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार आहे. अन्यथा कागलमध्ये तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे.

चंदगड मतदार संघही गतवर्षी शिवसेनेकडे होता. गतवेळच्या निवडणूकीत भाजपने मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा सोडली होती. चंदगड मतदार संघात भाजपकडून माजी आमदार भरमू पाटील, गोपाळराव पाटील, अशोक चराटी, रमेश रेडेकर, हेमंत कोलेकर, शिवाजी पाटील इच्छुक आहेत. राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभूळकर यांच्यासाठी भाजपने रेड कार्पेट अंथरले आहे. बाभुळकरांना उमेदवारी दिली तर अन्य इच्छुक उमेदवार तलवारी म्यान करुन पक्षाध्येश पाळणार की बंडखोरी करणार हे निवडणूक जाहीर झाल्यावर स्पष्ट होणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघावर भाजपने दावा केल्याने युती झाल्यास शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्व कोणता निर्णय घेतात याकडे युतीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मतदार संघातून निवडणूक लढवावी, असा भाजप कार्यकर्त्यांकडून आग्रह होत आहे. पालकमंत्र्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय न घेतल्यास गतवेळच्या निवडणूकीत ४० हजार मते घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची दावेदारी राहणार आहे. मधुरिमाराजे यांना भाजपकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. उद्योगपती चंद्रकांत जाधव यांचे नावही चर्चेत आहे. राधानगरी मतदार संघात राहुल देसाई यांनी भाजप उमेदवार म्हणून प्रचारात लागले आहेत. राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारल्यास जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

युती तुटली तर भाजप जनसुराज्यशी युती होणार असल्याने शाहूवाडी आणि हातकणंगले दोन्ही मतदार संघावर जनसुराज्यकडून दावा होण्याची शक्यता आहे. शाहूवाडीतून जनसुराज्य विनय कोरेंना ग्रीन सिग्नल मिळेल पण हातकणंगले विधानसभा मतदार संघात भाजपकडून अशोक माने यांची उमेदवारी शक्य आहे. जनसुराज्यचे माजी आमदार राजीव आवळे हेही इच्छुक असून त्यांनी थांबणार नाही, असे सांगून लढण्याची इरादा स्पष्ट केला आहे. शिरोळ मतदार संघातून अनिल यादव, राजवर्धन निंबाळकर, माधवराव घाटगे हे तिघेही इच्छुक आहेत. करवीर विधानसभा मतदार संघात भाजपची ताकद कमी असली तरी के. एस. चौगले, पी. जी. शिंदे यांनी उमेदवारी मागितली आहे.

२०१४ मध्ये भाजप उमेदवारांना मिळालेली मते

मतदार संघाचे नाव उमेदवार मते

कागल: परशराम तावरे ५५२१

कोल्हापूर दक्षिण: अमल महाडिक १,०५,४८९

करवीर के. एस. चौगुले ५२२८

कोल्हापूर उत्तर: महेश जाधव ४०,१०४

इचलकरंजी : सुरेश हाळवणकर ९४,२९३

स्वाभिमानीच्या मतदारसंघात चाचपणी

भाजपने आणि मित्र पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रत्येकी पाच जागांवर २०१४ ची निवडणूक लढवली होती. भाजपने दोन जागा जिंकल्या तर स्वाभिमानी पाचही जागेवर पराभूत झाले होते. सुरेश हाळवणकर दुसऱ्यावेळी निवडून आले तर कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक विजयी झाले. यावेळी स्वाभिमानी विरोधी गटात असल्याने स्वाभिमानीकडे असलेल्या मतदार संघात भाजप चाचपणी करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावरील चर्चा रस्त्यांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोशल मीडियावर एका नगरसेविकेने केलेल्या टिकेचा निषेध करण्यासाठी समर्थकांनी 'छत्रपती घराण्यावर टीका करणाऱ्यांचा जाहीर निषेध' हा फलक झळकवला. पण फलकाला परवानगी नसल्याने हा फलक महापालिकेने उतरून घेतला. पण या फलकाची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर सुरू होती.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात मधुरिमाराजे यांनी उभे रहावे यासाठी त्यांचे समर्थक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या उमेदवारीवरुन एका महिला नगरसेविकेने 'छत्रपती घराण्याने पराभवाची हॅटट्रीक करू नये', असे पत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते. या पत्रकावर सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. महिला नगरसेविकेचे पतीविरोधात काहींनी टीका करणारे मजकूर लिहिले. त्यामुळे महिला नगरसेविकेच्या दोन दिरांनी आणखी एक पत्रक प्रसिद्ध करत टीका करणाऱ्या दोघा कार्यकर्त्यांवर जोरदार टीका केली. सोशल मीडियावर हा धुमाकूळ सुरू असताना छत्रपती घराण्याशी संबधित समर्थकांनी टीका करणाऱ्यांविरोधात निषेधाचा फलक तयार केला. गुरुवारी सकाळी पंचगंगा हॉस्पिटलजवळून हा फलक कार्यकर्ते गंगावेशकडे घेऊन जात होते. पण परवानगी नसल्याने महानगरपालिका आणि पोलिसांनी हा फलक लावू दिला नाही. शुक्रवार पेठ पोलिस चौकीजवळ हायमॅक्स दिव्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हा फलक लावण्यात येणार होता. पण महानगरपालिकेने फलक लावण्यास परवानगी न दिल्याने परिसरातील तणाव टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’, डाव्यांना हव्यात ६० जागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह डाव्या विचारांचे सर्व पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षासोबत राहून महाआघाडी होण्याच्या दिशेने सकारात्मक पावले पडत आहेत. गुरुवारी मुंबईतील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात डाव्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. बैठकीत ५५ ते ६० जागा 'स्वाभिमानी'सह डाव्या पक्षांना देण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे करण्याचा निर्णय झाला.

बैठकीस 'स्वाभिमानी'चे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, आमदार बच्चू कडू, आमदार कपील पाटील, प्रताप होगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छोट्या आणि प्रादेशिक पक्षांतील घडामोडीही गतिमान झाल्या आहेत. शिवसेना, भाजपच्या विरोधात जिंकून येणाऱ्या मतदारसंघातच रिंगणात उतरण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यामुळे विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत डाव्यांसह लहान पक्ष जाणार आहेत. यासाठीची पहिली बैठक मुंबईत झाली. बैठकीत मतदारसंघनिहाय राजकीय ताकदीचा आढावा घेण्यात आला. यानुसार ५५ ते ६० जागा काँग्रेस, राष्ट्रवादीकडून मागण्याचा निर्णय झाला. जागा देण्यास मान्यता मिळाल्यानंतर प्रभाव असलेल्या मतदारसंघानुसार डावे आणि इतर पक्ष जागा वाटून घेणार आहेत. महाआघाडीतून शिरोळ, हातकणंगले, राधानगरी, शाहूवाडी विधानसभा मतदासंघ 'स्वाभिमानी'ला मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या जागा 'स्वाभिमानी'ला दिल्यास हातकणंगले, शिरोळ, राधानगरी मधील काँग्रेस, राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार काय करणार याची उत्सूकता आहे.

इच्छुकांचा

स्वबळाचा नारा

'स्वाभिमानी'चे अध्यक्ष शेट्टी सकाळी महाआघाडीसाठी मुंबईत पुढाकार घेऊन बैठक घेतली. त्या बैठकीत महाआघाडीसोबतच राहण्याची भूमिका त्यांनी मांडली. याउलट 'स्वाभिमानी'तून इच्छुक असलेले स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा देत आहेत. येथील कार्यालयात सायंकाळी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढवण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. कोणासोबत फरफटत जाण्याऐवजी स्वत:च्या ताकदीवर सर्व जागा लढवाव्यात असा सूर त्यांच्यातून उमटला. बैठकीस 'स्वाभिमानी' पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, भगवान काटे, राजेंद्र गड्यान्नावर, वैभव कांबळे, अजित पोवार, रमेश भोजकर, बाळासाहेब पाटील, अविनाश मगदूम आदी उपस्थित होते.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या

नेत्यांशी चर्चा

महाआघाडीतील जागा वाटपासंबंधी शेट्टी आणि आमदार पाटील यांनी मुंबईत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली. मुंबईत मंत्रालयात त्यांची भेट घेऊन 'स्वाभिमानी'सह डाव्या पक्षांना ६० जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांची लूटमार

$
0
0

कोल्हापूर :

लिफ्ट आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने प्रवाशांची लूटमार करुन मारहाण केल्याच्या घटनांत मागील सात महिन्यांच्या कालावधीत वाढ झाली आहे. प्रवाशांना लुटणारी ही सराईत टोळी असून टोळीचे म्होरके अद्याप पसारच आहेत. कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल, मध्यवर्ती बसस्थानक, सायबर, चित्रनगरी परिसर, शेंडा पार्क परिसरात या घटना घडत आहेत. लुटारू टोळ्यांच्या दहशतीने शहरालगतचे नाके आणि निर्जन रस्तेही धोकादायक बनले आहेत.

चाकूच्या धाकाने प्रवासी अमोल खंडागळे (वय ३४, रा. पृथ्वी सहनिवास अपार्टमेंट, सांगली) यांना ५० हजाराला लुटल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी घडली. त्या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांच्या कालावधीत लुटमारीच्या घटनांत वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या आणि पिकअप थांब्यावर थांबलेल्या प्रवाशांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटण्याचे प्रकार घडले आहेत. पुणे, मुंबईहून येणाऱ्या आणि पुढे बेळगाव, बेंगलोरकडे जाणाऱ्या काही खासगी ट्रॅव्हल्स कोल्हापुरात उतरणाऱ्या प्रवाशांना तावडे हॉटेल परिसरातच उतरवतात. रात्री उशिरा आलेल्या प्रवाशांना शहरात जाण्यासाठी रिक्षा न मिळाल्यास त्यांना खासगी वाहनधारकांकडून लिफ्ट घ्यावी लागते. अनेकदा प्रवाशांना पायी चालत शहरात पोहोचावे लागते. या कालावधीत तावडे हॉटेल ते शाहू मार्केट यार्ड हा परिसर अगदीच निर्मनुष्य असल्याचा गैरफायदा घेवून लूटमार होत आहे. या परिसरात शाहूपुरी पोलिसांची नियमित गस्तही नसते. महामार्गाच्या पूर्वेला गांधीनगर पोलिसांची हद्द आहे, तर पश्चिमेला शाहूपुरी पोलिसांची हद्द आहे. गांधीनगर पोलिस महामार्गापर्यंत गस्त घालतात. शाहूपुरी पोलिसांची गस्त शाहू मार्केट यार्डपर्यंत असते, मात्र तावडे हॉटेल परिसरात अपवादानेच पोलिस आढळतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. पोलिसांचा वावर नसल्याने रात्रीच्या अंधारात या ठिकाणी लुटारूंचा वावर वाढला आहे.

फारशी वर्दळ नसलेली ही जागा लुटारूंकडून वाटमारीसाठी हेरली जाते. सन २०१७ मध्ये तावडे हॉटेल परिसरात दुचाकीवरून जाणारे दोघे या परिसरात लघुशंकेसाठी थांबले असता, लुटारूंनी दमदाटी करून त्यांच्याकडील रोख रकमेसह किमती मोबाइल काढून घेतले. लुटारूंनी एका तरुणाकडील तीस हजारांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बाबूभाई परिख पुलाजवळही दुचाकीस्वारांना लुटण्याचा प्रकार ऑगस्ट महिन्यात घडला आहे. स्टेशन रोड या वर्दळीच्या मार्गावरही लुटारूंनी वाटसरूंना धमकावून त्यांचे किमती मोबाइल हातोहात लंपास केल्याचे प्रकार घडले आहेत. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पर्स लांबवणाऱ्या महिलांच्या टोळ्या सक्रीय आहेत. राजाराम तलाव, शाहू नाका, शेंडा पार्क, सायबर चौक ते संभाजीनगर रिंग रोड या मार्गांवरही वारंवार लूटमारीच्या घटना घडत असल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

महामार्गही असुरक्षित


पुणे- बेंगलोर महामार्गावरून रात्री उशिरा कागल पंचतारांकित एमआयडीसी, गोकुळ शिरगाव आणि शिरोली एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांना प्रवास करावा लागतो. या कर्मचाऱ्यांना अनेकदा लुटारू टोळ्यांचा सामना करावा लागला आहे. दुचाकीच्या आडवे वाहन मारून दमदाटी करून लुटणे, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वाठार ते कागलदरम्यान दर आठवड्याला एखादी लुटीची घटना घडतेच.

सांगली मार्गावरील दहशत कायम

कोल्हापूर ते सांगली मार्ग वाटमारीसाठी पूर्वीपासूनच बदनाम आहे. हातकणंगले परिसरातील मजले खिंड, हातकणंगले ते पेठवडगाव मार्गावरील आळते खिंड हे रात्रीच्या प्रवासासाठी डेंजर झोन झाले आहेत. कुंथुंगिरी डोंगर आणि बाहुबली मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर तर भरदिवसा लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा परिसर आजही सुरक्षित नाही. पोलिसांनी गस्त वाढवूनही या मार्गावरील लुटीच्या घटना कमी झालेल्या नाहीत.

‘सांगलीच्या प्रवाशाला चाकूच्या धाकाने केलेल्या लुटमारीचा तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पाहून लवकरच संशयितांना ताब्यात घेतले जाईल.

संजय मोरे, शाहूपुरी पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्याकांडप्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी

$
0
0

कोल्हापूर: ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तिघा संशयितांना ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या तिन्ही संशयितांची पुणे आणि मुंबईतील कारागृहात रवाना करण्यात आली आहे.

कॉम्रेड पानसरे यांच्या हत्याप्रकरणात आणखी तिघा संशयितांची नावं पुढे आली होती. एसआयटीने एका बंद लिफाफ्यातून उच्च न्यायालयाकडे ही नावे सादर केली होती. त्यानंतर या संशयितांची धरपकड करण्यात आली आणि त्यांची चौकशी करण्यात आली. आज त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले असता त्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिनियुक्तीवरील ३८ कर्मचारी मूळ ठिकाणी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषद मुख्यालयात गेली दीड ते दोन वर्षे रुजू झालेल्या ३८ कर्मचाऱ्यांना मूळ ठिकाणी हजर होण्याचा आदेश प्रशासनाने गुरुवारी काढला. आता संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ मूळ ठिकाणी हजर व्हावे लागणार आहे. यामध्ये जि. प. पदाधिकाऱ्यांकडील सहा स्वीय सहायकांचा समावेश आहे. मुख्य व अतिरिक्त कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडीलही प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांनाही मूळ ठिकाणी पाठविले आहे.

समाजकल्याण विभाग, औषध भांडार विभागात प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी होती. त्या सगळया कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे त्या विभागातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयातील नियुक्त्या रद्द करण्यावरुन गाजली होती. सभेनंतर दहा दिवसांत प्रशासनाने कारवाई केली.

सामान्य प्रशासन विभागाकडील १५, एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजना जिल्हा कक्षकडील एक, आरोग्य विभागाकडील १४, ग्रामपंचायत व अर्थ विभागाकडील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. आवश्यकता असल्यास नव्याने प्रतिनियुक्तीवर अन्य कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यासाठी सभागृहाने मान्यता दिली होती. ३८ पैकी पाच कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्याला विभागीय आयुक्त कार्यालयाची मान्यता नव्हती.

पदाधिकाऱ्यांकडील स्वीय सहाय्यकांवर कृपादृष्टी

प्रशासनाने प्रतिनियुक्तीवरील सगळया ३८ कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचा आदेश काढला. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या सहा स्वीय सहायकांचा समावेश आहे. मात्र काही कालावधीनंतर पदाधिकाऱ्यांना, त्यांना आवश्यक त्या कर्मचाऱ्यांची पुन्हामुख्यालयात प्रतिनियुक्तीवर करण्याचे ठरले आहे. पदाधिकाऱ्यांकडील स्वीय सहाय्यकावर कृपादृष्टी दाखविण्यामागील कारण काय असा सवाल जि. प. मध्ये उपस्थित होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निलंबनाचा प्रस्ताव सीईओंकडे

$
0
0

कोल्हापूर: जिल्हा परिषद सदस्यांसोबत उद्धटपणे वर्तणूक करणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचारी अशोक जाधवर यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या सहीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. यामुळे जाधवर यांच्यावर दोन दिवसांत निलंबनाची कारवाई होवू शकते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांना निलंबित करण्याचा ठराव केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रियदर्शिनी कंपनीतर्फे पूरग्रस्तांना मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिरोली औद्योगिक वसाहत येथील नेमिचंद संघवी ग्रुप तथा प्रियदर्शिनी पॉलिसॅक्स लिमिटेड कंपनीतर्फे जिल्ह्यातील विविध गावातील पूरग्रस्तांना मदत वाटप करण्यात आले. एकूण पाच हजार लोकांना मदत वाटप करण्याचे नियोजन आहे. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांनाही मदतीचा हात दिला जाणार आहे.

दरम्यान पहिल्या टप्प्यात प्रयाग चिखली, आंबेवाडी, वडणगे, वरणगे, पाडळी, नवे पारगाव, निलेवाडी, शिरोली, निगवे, शिये, केर्ले, रुई, इचलकरंजी आदी गावांत मदत करण्यात आली. कर्नाटकातील जुगूळ गावांतही जीवनावश्यक साहित्य वितरित केले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नेमिचंद संघवी यांच्या मर्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. कंपनीचे संचालक शीतलकुमार संघवी, प्रीतम संघवी, वैशाली संघवी यांच्या उपस्थितीत प्रयाग चिखली येथे साहित्य वाटप केले. संघवी ग्रुप व कंपनीतर्फे जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मदत कार्य राबविले जात आहे. आणखी काही दिवस मदत कार्य सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. एच आर विभागप्रमुख एस. जी. बुधले, महाव्यवस्थापक टी. के. सिंग, संदीप संकपाळ, उमेश मिश्रा, प्रसाद थोरात, प्रवीण लोंढे, महादेव पाटील, राकेश गवळी, कुणाल चौगुले हे मदत वाटप कामात सक्रिय आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा, लसूण महागली

$
0
0

कोल्हापूर: अतिवृष्टीचा फटका बसल्याने कांदा, लसूण आणि आल्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. कांद्याचा दर ५५ रुपयांवर पोहचला असून तो ८० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने यंदा दसरा, दिवाळी सणात कांदा रडवणार आहे. लसणाचा दर प्रतिकिलो २०० रुपये तर आल्याचा दर १२० रुपये झाला आहे.

राज्यात मराठवाडा वगळता सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने पिकांसह भाजीपाला उत्पादनाला फटका बसला आहे. कांदा, आले, लसून ही पिके जमिनीखाली असल्याने अतिवृष्टीने कुजली असून त्यांचे उत्पादनही कमी आले आहे. ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी जादा पाऊस पडल्याने सप्टेंबर महिन्यात बाजारात दाखल होणारा कांदा यंदा एका महिना उशिरा येणार आहे. कोल्हापूरसह राज्यभरातील बाजारपेठेत कर्नाटकातून कांदा दाखल होतो. पण हा कांदा येण्यासाठी आणखी महिनाभर वाट पहावी लागणार आहे. तसेच ज्यांच्याकडे साठवणुकीचा जुना कांदा होता तो पावसाच्या भीतीने विक्रीस काढण्यात येत आहे.

राजर्षी शाहू मार्केट यार्ड येथील शेती उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी अहमदनगर येथील कांदा आलेला आहे. या कांद्याचा दर प्रतिक्विंटल चार हजार ते ४७०० रुपये दर मिळाला. त्यामुळे किरकोळ बाजारात हा दर ५५ ते ६० रुपयांपर्यंत पोचणार आहे. गेल्या १५ दिवसांत कांद्याच्या दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची दरवाढ झाली आहे.

कांद्याबरोबर लसूणही महाग झाला आहे. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातून लसूण कोल्हापुरात विक्रीस येते. यंदा लसणाचे उत्पन्न कमी झाल्याने दर वाढले आहेत. प्रतिकिलो १६० ते २०० रुपये लसणाची विक्री होत आहे. आल्याची आवक सातारा, पुणे आणि कर्नाटकातून होते. पण पावसामुळे आले कुजल्याने आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. प्रतिकिलो १२० रुपये दराने आल्याची विक्री होते. कांदा, आले, लसूण हे तीनही पदार्थ स्वयंपाक घरात फोडणीसाठी वापरत असल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे.

अतिवृष्टीमुळे कांद्याला फटका बसला आहे. सध्या अहमदनगर येथून कांदा येत असली तरी आवक कमी आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. दसरा, दीपावलीपर्यंत दर चढे राहणार आहेत. नवीन कांदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आल्यावर कांद्याचे दर उतरतील.

मनोहरलाल चूग, कांदा व्यापारी

हॉटेल, चायनीजला बसतोय फटका

कांदा, आले आणि लसणाचा वापर खाद्यपदार्थात मोठ्या प्रमाणात होतो. मासांहारी जेवणात हे तीनही पदार्थ वापरले जातात. सॅलड, रायता, दही कांद्यामध्ये कांद्याचा मोठा वापर होतो. चायनीज पदार्थामध्ये लसून आणी आले पेस्टचा वापर केला जातो. दरवाढीमुळे हॉटेल आणि चायनीज पदार्थ विक्री व्यावसायिकांना फटका बसत आहे.

मार्केड यार्डातील आवक आणि दर (प्रति १० किलोचे दर)

१७ सप्टेंबर

पोती कमाल दर किमान दर सरासरी

कांदा ८१४८ १५० ४०० २८०

लसूण आवक नाही

आले ४१ ७०० ९५० ८२५

दिंनाक १८ सप्टेंबर

कांदा ७२१४ १५० ३८० २८०

लसूण २०० ८०० १६०० १२००

आले १३० ४०० ६०० ५००

१९ सप्टेंबर

कांदा ३११० २०० ४६० ३४०

लसूण ४०० ८०० १६०० १०००

आले ७६ ४०० ९०० ६५०

२० सप्टेंबर

कांदा ६८३२ २०० ४८० ३६०

लसूण १३०० ८०० १६०० १२००

आले आवक नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी महापौरांसह गटनेत्यांचा विधानसभेसाठी शड्डू

$
0
0

चव्हाण, पोवार, कदम सिंगल फोटो

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अनेकांना आमदारकीचे स्वप्ने पडू लागली असून महापालिकेचे अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीची पहिली पायरी म्हणून अनेकजणांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपकडून मुलाखती दिल्या असून काहीजण वंचित बहुजन विकास आघाडीच्याही संपर्कात आहेत. काँग्रेसचे माजी महापौर सागर चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष व माजी महापौर आर. के. पोवार, आदिल फरास व ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम मैदानात उतण्याची शक्यता आहे.

महापालिका क्षेत्रात विधानसभेच्या उत्तर व दक्षिण अशा दोन मतदारसंघाचा समावेश आहे. दक्षिण मतदारसंघामध्ये ग्रामीण भागाचाही समावेश असल्याने महापालिकेचे अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी उत्तर मतदारसंघातून लढण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे दोन माजी महापौर, दोन माजी स्थायी समिती सदस्य व एक विद्यमान नगरसेवक व ताराराणी आघाडीचे गटनेते यांच्यासह नगरसेवकांचे भाऊ, पती उत्तरमधून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आपआपल्या पद्धतीने सर्व इच्छुक पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीबाबत दावेदारी पोहोचवत आहेत.

शिवसेना-भाजपचा युतीबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. पण उत्तर मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार याबाबत कमालीची संभ्रमावस्था आहे. काँग्रेसकडून माजी महापौर सागर चव्हाण, त्यांचे बंधू व नगरसेविका जयश्री चव्हाण यांचे पती सचिन चव्हाण यांनी मुलाखत दिली आहे. तर राष्ट्रवादीकडून माजी महापौर आरे. के. पोवार व माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी मुलाखत दिली आहे. फरास यांनी वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे.

शिवसेनेकडून माजी नगरसेवक व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उमेदवारी मागितली आहे. त्याचवेळी गत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले व विद्यमान नगरसेवक सत्यजित कदम यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी केली आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने कदम भाजपकडून लढण्याची शक्यता आहे. पण युती झाल्यास कोणता निर्णय घ्यायचा याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांचा लवकरच मेळावा होणार आहे. नगरसेवक संभाजी जाधव यांचे बंधू व विद्यमान नगरसेविका जयश्री जाधव यांचे पती ज्येष्ठ उद्योजक चंद्रकांत जाधव विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. युती, आघाडीचा निर्णय आणि जागांमध्ये आदलाबदल झाल्यानंतर इच्छुकांपैकी किमान तिघेजण बंडखोरीच्या पवित्र्यात दिसून येतील.

...

चौकट

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक 'वंचित'कडून इच्छूक

राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते व माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी 'उत्तर'मधून पक्षातर्फे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. उमेदवारीबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असताना त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीची मागणी केली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख असताना आणि पक्षाने अनेक पदे दिली असताना वंचितकडून त्यांनी उमेदवारी मागितल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: सेंट्रल किचनबाबत महापालिकेने चुकीची

$
0
0

कोल्हापूर: सेंट्रल किचनबाबत महापालिकेने चुकीची निविदा प्रक्रिया राबवली असून यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्यावतीने, सेंट्रल किचन रद्द करावे, अशी मागणी पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.

कोल्हापूर शहरात १६ सप्टेंबरपासून सेंट्रल किचनद्वारे शालेय पोषण आहार पुरवण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता स्वयंपाकी, मदतनीस व बचतगटाच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. ही प्रक्रिया चुकीची असून सर्व कामगारांना कामावर रूजू करावे, असेही या पत्रकात म्हटले आहे. याबाबत प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा महोत्सवात विवेकानंदची आघाडी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवाजी विद्यापीठाच्या ३९ व्या जिल्हा स्तरीय युवा महोत्सवाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये यश मिळवलेल्या महाविद्यालयांना फलटण येथे होणाऱ्या मध्यवर्ती युवा महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. १८ सप्टेंबर रोजी जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव झाला होता. त्याचा निकाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. सावंत यांनी जाहीर केला आहे.

विवेकानंद महाविद्यालयाने वादविवाद, सुगम गायन, लोकवाद्य वृंद, मूकनाट्य अशा बहुतांशी स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयाने क्रमांक पटकावून आघाडी घेतली. आजरा महाविद्यालय, न्यू कॉलेज, राजाराम कॉलेज यांनीही आपली छाप पाडली. २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत मध्यवर्ती महोत्सव फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात होणार आहे.

वक्तृत्व (मराठी ) प्रथम: दि न्यू कॉलेज, कोल्हापूर. द्वितीय : राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर. तृतीय: श्री व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी.

वक्तृत्व (हिंदी) प्रथम: डी.आर.माने महाविद्यालय, कागल. द्वितीय : सर्व अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ. तृतीय : महावीर महाविद्यालय, कोल्हापूर.

वक्तृत्व (इंग्रजी) प्रथम : सर्व अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ. द्वितीय: डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज. तृतीय: देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर.

वादविवाद- प्रथम: दूध सागर महाविद्यालय, बिद्री. द्वितीय: विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर. तृतीय :डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, कोल्हापूर.

सुगम गायन - प्रथम: विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर. द्वितीय: श्री शिव शाहू महाविद्यालय, सरुड. तृतीय: श्री व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी.

लोकवाद्यवृंद - प्रथम: विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर. द्वितीय: डी.आर.माने महाविद्यालय, कागल. तृतीय : देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर.

समुहगीत भारतीय - प्रथम: विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर. द्वितीय :राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर. तृतीय: दि न्यू कॉलेज, कोल्हापूर.

लोककला - प्रथम: दत्ताजीराव कदम आर्टस अँण्ड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी. द्वितीय : महावीर महाविद्याल, कोल्हापूर. तृतीय: दि न्यू कॉलेज, कोल्हापूर

लोकनृत्य - प्रथम: आजरा महाविद्यालय. द्वितीय: श्री शिव शाहू महाविद्यालय, सरूड. तृतीय: विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर.

मूकनाट्य - प्रथम: विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, द्वितीय: देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर. तृतीय :दूध साखर महाविद्यालय, बिद्री.

लघुनाटिका - प्रथम : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर. द्वितीय : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूर. तृतीय: देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर.

पथनाट्य - प्रथम: दूध साखर महाविद्यालय, बिद्री. द्वितीय: विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर. तृतीय : शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, यड्राव.

एकांकिका - प्रथम : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूर. द्वितीय : देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर. तृतीय: शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, यड्राव.

नकला - प्रथम: राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर. द्वितीय : आर्टस, कॉमर्स, सायन्स कॉलेज कोवाड. तृतीय: सर्व अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अध्यादेशाला दांडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली असली तरी अद्याप नाबार्डचा कर्जमाफीच्या संदर्भात कोणताच अध्यादेश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाला नसल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिली. कर्जमाफीचा अध्यादेश न काढणाऱ्या राज्य सरकारवर फसवणूक केल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध केला आहे. अध्यादेश न काढल्याने दुहेरी कर्जाचा बोजा चढणार असल्याने शेतकरी आणि बँकेचे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पूरग्रस्त शेतकऱ्यांची खावटी कर्जासह संपूर्ण पीक कर्जमाफी करुन तत्काळ नवीन पीक कर्ज मंजूर करावे, या मागणीचे निवेदन जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे , महापुराने जिल्ह्यातील लाखो एकर शेती पाण्याखाली गेली. ऊस पिकासह भात, भाजीपाला, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने गेल्या महिन्यात कर्जमाफी जाहीर केली आहे. त्याप्रमाणे बँकेने संपूर्ण कर्जमाफी करुन नवीन हंगामासाठी तत्काळ पीक कर्ज मंजूर करावे.'

शिष्टमंडळाशी बोलताना अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, 'राज्य सरकारने शेतकऱ्यांचे एक हेक्टरवरील पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. पण सरकारने कर्जमाफीचा अध्यादेश काढलेला नाही. सरकारने अध्यादेश न काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सातबारा उताऱ्यावर नोंद करताना अडचणी येणार आहेत. शेतकरी आणि बँकेवर दुहेरी कर्जाचा भुर्दंड बसणार आहे. नाशिक येथे महाजनादेश यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज जाहीर करतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांनी कोणतीच घोषणा न केल्याने निराशा झाली आहे.' शिष्टमंडळात वैभव कांबळे, अदिनाथ हेमगिरे, रामचंद्र फुलारे, सुरेश पाटील, संपत पोवार आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.

...

पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्ज देणार

एक ऑक्टोबरपासून नवीन लावण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँक कर्ज देणार आहे. पण राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम मिळणार आहे का, याचा अध्यादेश बँकेला मिळालेला नाही. पूरग्रस्त शेतकऱ्यांना नवीन कर्ज देताना बँकेला नवीन धोरण ठरवावे लागणार आहे. या धोरणाचा मसुदा संचालक मंडळापुढे ठेवला जाईल. त्यानंतर पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्ज दिले जाईल, असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले. कर्जमाफीचा अध्यादेश न निघाल्याने सात बारा उताऱ्यावर नोंदी करताना अडचणी येतील, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक खान यांच्यावरील गुन्हा मागे घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मंगळवार पेठ येथील विभागीय आरोग्य कार्यालयात गोंधळ घालून अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याप्रकरणी नगरसेवक नियाज खान यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्या,' या मागणीसाठी शुक्रवारी सायंकाळी शास्त्रीनगर प्रभागातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. उपमहापौर भूपाल शेटे व स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी शनिवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला.

प्रभागातील स्वच्छता होत नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक खान यांनी समर्थकांसह बुध‌वारी विभागीय आरोग्य कार्यालयाला ठाळे ठोकण्याचा प्रयत्न करत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दमदाटी केली होती. या विरोधात आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. महापालिकेने हा गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी प्रभागातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयीन कामकाजामुळे उपस्थित नसल्याने मोर्चेकरांनी उपमहापौर शेटे व स्थायी समिती सभापती देशमुख यांची भेट घेतली. दोघांनी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्याशी चर्चा करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला. मोर्चात दिनेश परमार, रणजित मिणचेकर, संजय पाटील, डॉ. विजय गावडे, शोभा सांगावकर, रेणुका डंक, सविता जमादार, आयेशा जमादार, हेमा तोडकर आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपुरवठा आज बंद

$
0
0

कोल्हापूर

शिंगणापूर योजनेतील चंबुखडी येथील जलवाहिनीला लागेली गळती शनिवारी (ता.२१) काढण्यात येणार आहे. दुरुस्तीमुळे उपशाअभावी ए, बी व ई वॉर्डातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुरुस्तीनंतरही रविवारी अपुऱ्या व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. चंबुखडी गणेश कॉलनी येथील ११०० मीमी व्यासाच्या जलवाहिनीला गेल्या आठवड्यापासून गळती लागली आहे. गळती काढण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शटडाऊन घेत गळती काढण्याचा प्रयत्न केला. पण भूमिगत विद्युत वाहिनीमुळे यश आले नाही. शनिवारी महावितरण या भागातील विद्युतपुरवठा बंद करणार असल्याने गळतीचे काम पुन्हा हाती घेतले आहे. दुरुस्तीमुळे ए, बी, व ई वॉर्डातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार शेफारलंय

$
0
0

'ईव्हीएम मशिन आणि आमच्यातील सूर्याजी पिसाळांमुळे सरकार शेफारलंय', अशी टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी यावेळी केली. तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अदिल फरास हे वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात आहेत,याबाबत विचारले असता ते म्हणाले, 'अदिल फरास तसे करणार नाही. पण वंचित आघाडीकडून उमेदवारी घेतली तर त्याला निवडणूक काय असते, असे समजेल', असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत गटाच्या महिलांचा ठिय्या

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सेंट्रल किचन सिस्टिमद्वारे पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारामुळे बचत गटांच्या महिलांवर अन्याय होणार आहे. बचत गटांकडून पुरवण्यात येणाऱ्या आहार पुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार नसताना ठेका काढून घेतला जाणार असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शालेय पोषण आहार कामगार संघटनेने महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन केले. फोनद्वारे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शनिवारी सकाळी साडेआकरा वाजता बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तत्पूर्वी बचत गट संघटनेने सेंट्रल किचन सिस्टिम हद्दपार करा या मागणीसाठी मोर्चा काढला. बिंदू चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजी रोड मार्गे मोर्चा शिवाजी मार्केट येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयाजवळ आल्यानंतर आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. शिक्षण मंडळातील एकही वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी नसल्याने सहभागी आंदोलकांनी पायरीवरच ठिय्या मारला. आंदोलन करत त्यांनी प्रशासनाचा निषेध केला. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हटणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

शिक्षण मंडळातील संदीप उबाळे व अन्य अधिकाऱ्यांनी आंदोलकांबरोबर चर्चा केली. उबाळे यांनी प्रभारी शिक्षण अधिकारी एस. के. यादव यांच्याशी आंदोलकांची चर्चा घडवून आणली. पण या चर्चेचाही फारसा उपयोग झाला नाही. 'बचत गटाच्या महिला सदस्या सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसार पोषण आहार तयार करुन निश्चित केलेल्या शाळांना पुरवठा करत आहेत. त्याबाबत कोणतीही तक्रार नसताना ठेका का काढून घेतला जात आहे? या निर्णयामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या महिलांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे,' असे उबाळे यांना आंदोलकांनी ठणकावून सांगितले. सुमारे तीन तास घोषणा देत बसलेल्या आंदोलकांनी शेवटी आयुक्तांबरोबर फोनद्वारे चर्चा केली. त्यांनी याबाबत आयुक्त कार्यालयात सकाळी साडेआकरा वाजता बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्याबाबतचे लेखी पत्र शिक्षण मंडळाने आंदोलकांना दिले.

आंदोलनात वर्षा कुलकर्णी, हेमा पोवार, बंडा साळोखे, वैशाली सोनवणे, संगीता कांबळे, सरिता कांबळे, सरिता पोवार, अश्विनी साळोखे, साधना पाटील, शशिकांत पाटील, विजया साळोखे आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणावर आज हातोडा

$
0
0

मटा इम्पॅक्ट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराला पडलेला अतिक्रमणाचा विळखा शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी हटवण्यात येणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने विशेषत: पश्चिम दरवाजासमोरील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. तसेच ताराबाई रोडवरील मित्रप्रेम मंडळापर्यंतच्या सर्व फेरीवाल्यांना हटवण्यात येणार आहे. अतिक्रमणाबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिका व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सरसावली आहे.

अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणाबाबत नेहमीच भाविक व स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अधूनमधून कारवाई केली जाते. पण पुन्हा फेरीवाले तेथे ठाण मांडतात. फेरीवाल्यांना फेरीवाला नेत्यांचा पाठिंबा मिळत असल्याची चर्चा असली, तरी त्यामुळे अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते.

ताराबाई रोडपासून ते पश्चिम दरवाजापर्यंत आवळे, चिंच, बांगडी असे अनेक साहित्य विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा ठाण मांडून बसलेले असतात. तर कापड विक्रेते व अन्य साहित्यांचे स्टॉल लावलेले असतात. त्यामुळे या रस्त्यावरील फूटपाथ गायब झाले असून अशीच स्थिती मंदिराच्या सभोवती पहायला मिळते. किरकोळ विक्रेत्यांनी येथे नेहमीच ठाण मांडलेले असताना अनधिकृत रिक्षा स्टॉपचीही संख्या वाढत आहेत. त्यामुळे दर्शनाला येणाऱ्या भाविकांसह स्थानिकांना चालणेही मुश्कील झाले आहे. याबाबत शुक्रवारी देवस्थान समितीने महापालिका यंत्रणेशी संपर्क साधला. त्यानंतर मंदिर परिसरातील विशेषत: पश्चिम दरवाजा येथील अतिक्रमणे शनिवारी हटवण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत येथील फेरीवाल्यांना सूचनाही देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीपी’ चा आज विशेष कँप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या राजारामपुरी येथील नगररचना विभागाला (टीपी) शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भेट देवून आढावा बैठक घेतली. बांधकाम विभागाशी संबंधित फाइल प्रलंबित राहिल्यास जबाबदार अभियंत्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी बैठकीत दिला. शनिवारी (ता.२१) टीपी विभागात होणाऱ्या विशेष कँपबाबत त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दर आठवड्याला टीपीची आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले. टीपीतील प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी आज, विशेष कँपचे आयोजन केले आहे. यावेळी जोता पातळी तपासणी प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, मुदतवाढ देणे, रेखांकन मंजुरी प्रकरणे मंजूर करणे, भूखंड विभाजन व एकत्रीकरण करणे, अनामत रक्कम परत करणे, वास्तुविशारद व वास्तुशिल्प परवाना देणे, नुतनीकरण करणे, झोन दाखले व भाग नकाशे देणे आणि 'ना हरकत प्रमाणपत्र' यावर निर्णय घेण्यात येणार आहे. ज्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images