Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाचगावातील आरोग्य केंद्रासाठी साडे तीन कोटी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाचगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हा परिषदेने साडेतीन कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. यापैकी एक कोटी ५० लाख रुपयांची तत्काळ तरतूदही केली. यामुळे पाचगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. जि. प. सदस्या मनीषा टोणपे यांचा या केंद्रासाठी प्रयत्न सुरू होते.

या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, जैताळ व हणबरवाडी या गावातील नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा मिळणार आहेत. गेली अनेक वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय चर्चेत होता. पाचगाव ग्रामपंचायतीनेही यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीची उपलब्ध जागा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेने या केंद्रासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. महिनाभरात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे मतदारसंघातील विविध गावांना आरोग्य विषयक सुविधांचा लाभ होणार असल्याचे सदस्या टोणपे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उदयनराजेंच्या विरोधात कोण? राष्ट्रवादीकडून पर्यायांची चाचपणी

$
0
0

उदयनराजेंच्या विरोधात कोण?

राष्ट्रवादीकडून पर्यायांची चाचपणी

सातारा : उदयनराजे भोसले यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे, तसे संकेत ही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे उदयनराजेंच्या विरोधात कोणता उमेदवार रणांगणात उतरवायचा? याची चाचपणी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सुरू झाली आहे. सद्यस्थितीत माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते आदींची नावे चर्चेत आहेत. चारही नेते दिग्गज असून, त्यापैकी एकास रणांगणात उरतविल्यास लोकसभेचा सामना चुरशीचा होणार आहे.

एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना ५ लाख ७९ हजार २६ तर प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांना ४ लाख ५२ हजार ४९८ मते मिळाली होती. उदयनराजेंच्या मताधिक्‍यामध्ये प्रथमच अडीच लाख मतांची घट झाली होती. त्यामुळे विजयी होऊन देखील उदयनराजेंनी गुलाल उधळा नव्हता. दुसऱ्या बाजूला सातारा लोकसभा मतदारसंघ १९९६चा अपवाद वगळता कायम कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा गड राहिला आहे. मात्र, आता उदयनराजे भाजपमधून निवडून येऊन दुसऱ्यांदा अपवाद घडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उदयनराजेंच्या निमित्ताने कोणत्याही परिस्थितीत साताऱ्याचा गड काबिज करण्याचे भाजपचे मनसुबे आहेत.

राजेंच्या भाजपप्रवेशामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली आहे. शरद पवार साताऱ्याचा गड सहजासहजी भाजपच्या ताब्यात जावू देणार नाहीत. लोकसभा मतदारसंघापैकी सातारा विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे प्राबल्य अद्याप कायम आहे. वाईत मकरंद पाटील, कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे, कराड-उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील आणि पाटणमध्ये माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आहे. कराड-दक्षिणमध्ये भाजपने शिरकाव केला असला तरी त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाची एकत्रित ताकद आघाडीच्या उमेदवाराला चांगल्या प्रमाणात मताधिक्‍य देऊ शकते. त्यामुळे उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी आगामी पोटनिवडणूक म्हणावी तेवढी सोपी असणार नाही. तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून निवडणूक लढविताना जेवढे परिश्रम घ्यावे लागले, त्यापेक्षा अधिक परिश्रम उदयनराजेंना घ्यावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेप्रश्नी आरोग्य कर्मचारी धारेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शास्त्रीनगर प्रभागात गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छता कर्मचारी गैरहजर असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. गैरहजर कर्मचाऱ्यांची हजेरी लावली जात असल्याने संतापलेल्या नगरसेवक व शिवसेनेचे गटनेते नियाज खान यांनी समर्थकांसह आरोग्य निरीक्षक व मुकादमांना बुध‌ावरी धारेवर धरले. मंगळवार पेठ येथील महाराणी ताराबाई विद्यालयातील कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित कर्मचारी देण्याबरोबरच सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले.

गेल्या अनेक दिवसांपासून शास्त्रीनगर प्रभागातील आरोग्य कर्मचारी गैरहजर असतात. कर्मचाऱ्यांअभावी प्रभागातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना गैरहजर कर्मचाऱ्यांची हजेरी लावली जात असल्याचा आरोप करत विभागीय कार्यालयात खान यांनी प्रवेश केला. बायोमेट्रिक मशीन बंद का, अशी विचारणा करत नोंदणी रजीस्टरची तपासणी करताना आरोग्य निरीक्षक व मुकादम यांना धारेवर धरले. उपस्थित कर्मचाऱ्यांची नोंदणी पाहून अनुपस्थित कर्मचाऱ्यांची हजेरी लावली कशी? अशी विचारणा करत मुकादमांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्यासोबत समर्थकांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय हटणार नसल्याचा त्यांनी पवित्रा घेतला. त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले.

याबाबतची माहिती मिळताच आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर कार्यालयात दाखल झाले. खान व त्यांच्या समर्थकांनी पुन्हा त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. तसेच कर्मचारी गैरहजर असताना हजेरी लावली जात असल्याचे सांगिले. त्यामुळे राजगोळकर निरुत्तर झाले. खान यांनी आक्रमक होत कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधल्यानंतर ते काहीसे शांत झाले. प्रभागात जादा कर्मचारी देण्याबरोबर सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी शुभम देशपांडे, अमर चव्हाण, शुभम लाखे, मृणाल पाटील, विकी पाटील, रवी गवळी, विशाल देशपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारी नगररचनाविभागाचा विशेष कँप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या प्रत्येक सभेत प्रलंबित प्रकरणांवरून टिकेचे लक्ष बनलेल्या नगररचना (टीपी) विभागाच्यावतीने शनिवारी (ता. २१) विशेष कँपचे आयोजन केले आहे. सकाळी दहा ते सहा वेळेत शहरातील नागरिकांना कँपमध्ये विकास परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन विभागाने केले आहे. शुक्रवारी (ता.१३) झालेल्या सभेत टीपीवर टिकेचा भडिमार करताना विशेष कँप घेण्याची सूचना केली होती. सभेत त्यानुसार आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिलेल्या सूचनेनुसार शनिवारी विशेष कँपचे आयोजन केले आहे. कँपमध्ये टीपी विभागाशी संबंधित कामांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी समक्ष कागदपत्रांची छाणणी करून बांधकामांना परवानगी देण्यात येणार आहे. यावेळी जोतापातळी तपासणी प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, मुदतवाढ देणे, रेखांकन मंजुरी प्रकरणे मंजूर करणे, भूखंड विभाजन व एकत्रीकरण करणे, अनामत रक्कम परत करणे, वास्तुविशारद व वास्तुशिल्प परवाना देणे, नुतनीकरण करणे, झोन दाखले व भाग नकाशे देणे आणि 'ना हरकत प्रमाणपत्र' यावर निर्णय घेण्यात येणार आहे. कँपमध्ये समावेश करण्यासाठी टीपी कार्यालयात नाव नोंदणी करावी व आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या टीपी विभागाच्यावतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार भांडवलदार, दलालांचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सध्याचे राज्यकर्ते स्वच्छ व पारदर्शक कारभाराचा डांगोरा पिटत असले तरी भाजपचे सरकार हे सगळ्यात मोठे लबाड सरकार आहे. रस्ते कामात प्रचंड मोठ्या प्रमाणात लूटमारी सुरू आहे,' अशी टीका बहुजन वंचित विकास आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केली. 'दलाल व भांडवलदारांचे हित सांभाळणाऱ्या भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचून वंचित बहुजन आघाडीच्या हाती राज्याची सूत्रे सोपविणे हाच पर्याय आहे. भाकरी उलटली नाही तर करपते. आज भाकरी करपायला लागली आहे. तेव्हा राज्यातील २८८ मतदारसंघांत लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी गुरुवारपासून प्रचाराला सुरुवात करावी,' अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले.

'वंचित'तर्फे नागपूरपासून सुरू केलेल्या सत्ता संपादन रॅलीचा समारोप कोल्हापुरात झाला. समारोपप्रसंगी दसरा चौक येथे बुधवारी सायंकाळी सभा झाली. भर पावसात तब्बल दोन तासांहून अधिक काळ सभा सुरू होती. सभेत आंबेडकर यांनी सामान्य माणसांना सत्तास्थानी बसविण्यासाठी 'वंचित'ची लढाई आहे. त्यासाठी काँग्रेसला १४४ जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र देशातील प्रस्थापित हातमिळवणी करायला तयार नाहीत. म्हणून आम्ही स्वतंत्रपणे लढू.'

महापुराने ओढवलेली आपत्कालिन स्थिती हाताळण्यात सरकार कुचकामी ठरले. हा महापूर निसर्गनिमित नव्हे तर मानवनिर्मित आहे, असा थेट आरोप आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले, 'कोल्हापूर, सांगली, सातारा, गडचिरोली या भागात महापुराने थैमान घातले असताना मुख्यमंत्री जनादेश यात्रा तर त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी पीकनिला गेल्यासारखे महापुरात सेल्फी काढत होते. इतके बेफिकीर आणि असंवेदशील राज्यकर्त्यांच्या हाती राज्यकारभार आहे. सत्तेच्या धुंदीमुळे भाजपमध्ये मस्तवालपणा आला आहे. देशात सध्या भीतीचे वातावरण आहे. मोदी सरकाच्या गेल्या शंभर दिवसांच्या कालावधीत ३३ हजार कुटुंबीय देश सोडून गेले. त्यांची संपत्ती ५०० कोटींहून अधिक होती. भयमुक्त समाजनिर्मिती, सामान्यांच्या हिताचा कारभारासाठी वंचित प्रयत्नशील आहे. लोकांना परिवर्तन हवे असून नक्कीच सत्ता संपादन करू.' याप्रसंगी अॅड. शिवानंद हैबतपुरे, यशवंत भिंगे, अस्लम सय्यद, अॅड. इंद्रजित कांबळे, सुनील खोत, नवनाथ पडळकर, प्रेमकुमार माने, कपिल राजहंस, अशोक बन्नेनवर, प्रेमकुमार माने, अनिल म्हमाणे आदींची उपस्थिती होती. डॉ. अरुणा माळी यांनी आभार मानले.

महाजनादेश यात्रेवर २५ कोटींची उधळपट्टी

आघाडीचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील म्हणाले, 'वंचित व बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न आहे. प्रकाश आंबेडकर हे ३७० जातींना सोबत घेऊन सन्मानाची लढाई करत आहेत. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत भाजप, सेनेने हा राज्य गहाण ठेवले. मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा ही नागरिकांची नव्हे. २५ कोटी खर्चून यात्रेचा इव्हेंट सुरू आहे.'

केजी टू पीजीपर्यंतची जबाबदारी सरकारची

आंबेडकर म्हणाले, 'वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास केजी टू पीजीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी सरकार उचलेल. पोलिस कर्मचाऱ्यांना आठ तासांची ड्यूटी राहील. अंगणवाडी, आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ केली जाईल. सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे देशात मंदी आली. बेरोजगारी वाढत आहे. शेतमालाचे भाव गडगडण्याची भीती आहे. वंचितची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना मदत करू.'

जेलच्या भीतीपोटी विरोधी पक्ष लंगडा

सरकार आम्ही चोऱ्या केली नाहीत, असे सांगत आहे. मात्र रस्ते कामात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. ज्या ठिकाणी गरज नाही तेथे रस्ते व खोदाई करून लूटमारी होत आहे. विरोधी काँग्रेस,राष्ट्रवादी पक्ष लंगडा बनला आहे. स्वत:च्या पायावर उभा राहू शकत नाही. आणि कुणी उभे राहण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जेलची हवा खायला लागेल ही भीती आहे. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाडे, डोंगळेंनी घेतली आंबेडकरांची भेट

$
0
0

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर दौऱ्यात माजी मंत्री प्रकाश आवाडे, रजनी मगदूम, 'गोकुळ'चे संचालक अरुण डोंगळे यांनी भेट घेतली. भुदरगड तालुक्यातील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत वंचित आघाडीच्या दसरा चौक येथील व्यासपीठावर हजेरी लावली. त्यांनी 'राधानगरी -भुदरगड'मधून उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्ह्यातील विविध मतदारसंघांतील इच्छुकांनी आंबेडकर यांची भेट घेऊन 'वंचित'कडून लढण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे. याबाबत बोलताना आंबेडकर यांनी दोन्ही काँग्रेसमधील नाराज, बिगर नाराज मंडळी संपर्कात असल्याचे सांगितले. दरम्यान आंबेडकर हे सांगलीहून कोल्हापूरला येत असताना जयसिंगपूर येथे त्यांची व प्रकाश आवाडे यांची भेट झाल्याचे वृत्त आहे. मात्र आवाडे यांनी आंबेडकरांच्यासोबत अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे सांगितले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी बी. जी.मांगले यांनी आंबेडकरांची भेट घेतली. मांगले हे सभेवेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजेत तृतीय पंथीयाचा खून

$
0
0

मिरजेत तृतीय पंथीयाचा खून

मिरज :

मिरज बसस्थानक परिसरातील पाकीजा बेकरीजवळ गौस रज्जाक शेख उर्फ काजल (रा. सिद्धार्थ वसाहत) या तृतीय पंथीयाचा अज्ञाताने धारदार शस्त्राने भोसकून खून केला आहे. या बाबत त्याची बहीण रेश्मा मलंग (वय, ३०) यांनी गांधी चौकी पोलिसात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली आहे. गांधी चौकी पोलिसानी या संबंधी अधिक तपास सुरू केला आहे. मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास गौस उर्फ काजल हा पाकीजा बेकरीजवळ आल्यानंतर गौस याला कोणीतरी अज्ञाताने धारदार शस्त्राने भोसकले होते. त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्कलकोटला २२ दिवसांतून पाणीपुरवठा

$
0
0

अक्कलकोटला २२ दिवसांतून पाणीपुरवठा

सोलापूर

स्वामी समर्थांची अक्कलकोट नगरी अनेक दिवसांपासून पाण्याविना तहानलेली आहे. नगरपालिकेच्या वतीने २० ते २२ दिवसांतून एकदा नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नगरपालिकेवर भाजपची सत्ता असताना ही अक्क्लकोटवासीयांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना ही पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. पाण्याची टंचाई दूर करण्यात नगरपालिका अपयशी ठरली आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आचेगाव येथील जय हिंद शुगर या खासगी कारखान्याच्या वतीने दररोज १७ हजार ५०० रुपये खर्चून २५ टँकरद्वारे सुमारे सव्वा लाख लिटर पाणीपुरवठा करून अक्क्लकोटवासीयांची तहान भागविली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीडित विद्यार्थी आज पुन्हा शाळेत जाणार

$
0
0

पीडित विद्यार्थी आज पुन्हा शाळेत जाणार

पोलिस, शिक्षण विभाग कठोर कारवाई करणार

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

पंढरपूरमधील इंग्रजी माध्यमाच्या एका खासगी शाळेत पहिलीत शिकणाऱ्या एका मुलाला शिक्षिकेशी अश्लील व लाजिरवाणे कृत्य केल्याचा ठपका ठेवत शाळेतून काढून टाकले होते. या बाबत 'मटा'ने दिलेल्या वृत्तानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला होता. सोलापूरच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी आज, गुरुवारी त्या मुलाला पुन्हा शाळेत दाखल करणार आहेत. संबंधित मुलावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. या प्रकरणी शाळेवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली आहे.

शिक्षण विभागाने सर्व प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. आज, गुरुवारी शिक्षण अधिकारी शाळेतून काढून टाकलेल्या मुलाला पुन्हा शाळेत दाखल करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. शिक्षण हक्क कायद्याच्या कलम ८ आणि ३१ नुसार कोणत्याही मुलाला शाळेतून काढून टाकता येत नाही. संबंधित मुलास शाळेत बसवून न घेतल्यास शिक्षण विभाग शाळेवर कडक कारवाई करणार आहे, असे शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड यांनी सांगितले आहे.

पोलिसही दाखल करणार गुन्हा

सोलापूर पोलिस वादग्रस्त खासगी शिक्षण संस्थेवर बाल हक्क संरक्षण अधिनियम २०१५च्या कलम ७५नुसार गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मुलाच्या पालकाने पोलिसात तक्रार दिली आहे. शाळेतून काढून टाकताना दिलेल्या नोटीस मधील मजकूर मुलाच्या शैक्षणिक व मानसिक जडणघडणीवर परिणाम करणारा आहे. या नोटीसच्या आधारे शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यामधील दोषींना पाच वर्षापर्यंत शिक्षा किंवा पाच लाखांपर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती पंढरपूर शहरचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली आहे.

कोट

आरटीईनुसार मुलाचा प्रवेश झाल्याने शाळा त्याचा प्रवेश रद्द करू शकत नाही. आज संबंधित मुलास पुन्हा शाळेत बसवण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी मुलासोबत शाळेत जातील. त्या नंतरही या मुलाला शाळेत बसू न दिल्यास शिक्षण विभाग या शाळेच्या विरोधात कडक कारवाई करेल. कोणत्याही परिस्थितीत मुलावर अन्याय होऊ देणार नाही.

संजयकुमार राठोड, जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी, सोलापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात पन्नास मिमी पाऊस

$
0
0

सोलापुरात पन्नास मिमी पाऊस

रस्ते जलमय, घरांत शिरले पाणी

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर शहर आणि परिसरात बुधवारी दुपारी पावसाने धुमाकूळ घातला. दुपारी दीड वाजता सुरू झालेला मुसळधार पाऊस सुमारे दोन तास मुसळधार कोसळत होता. पावसाने परिसर जलमय झाला आहे. अनेक नागरिकांच्या घरांत पाणी शिरले आहे. दोन तासात सुमारे पन्नास मिमी पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागात झाली आहे.

मंगळवारी सकाळी पावसाचे वातावरण नव्हतेच. मात्र, दुपारी आभाळ भरून आले होते, भर दुपारी अंधार पसरला होता. दुपारी दीड वाजता पाऊस कोसळायला सुरुवात झाली. दोन तास मुसळधार पावसाने सोलापूरकरांना झोडपून काढले. भैय्या चौक, कुमार चौक, मंगळवार बझार, अवंती नागरी आदी ठिकाणचे चौक पाण्यात होते. पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद झाल्याने मनपा व स्थानिक नागरिकांना पाण्याला वाट करून देण्यासाठी कसरत करावी लागली. रेल्वे स्टेशन परिसरातील काडादी चाळीत पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. कुमार चौक परिसरातील घरे पाण्यात होती. मनपाने जेसीबीच्या सहाय्याने पाण्याला वाट करून दिली. शहरातून गेलेले नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने आणि त्यातील घाण पाणी नाल्याबाहेर येऊन नागरिकांच्या उंबऱ्याला लागल्याने मोठा गोंधळ उडाला. पावसाळा सुरू झाल्यापासून बुधवारी तिसरा मोठा पाऊस झाला. दुपारी चार वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. आमदार प्रणिती शिंदे यांनी भर पावसात रेल्वे स्टेशन परिसरात जलमय झालेल्या व पाणी घरात शिरलेल्या नागरिकांची भेट घेऊन पाहणी करीत दिलासा दिला. कोंतम चौक, शिवाजी चौक, होटगी रोड, बुधवार बाजार, नळ बझार चौक, मौलाली चौक, सम्राट चौक, चौपाड, शास्त्री नगर, नई जिंदगी आदी ठिकाणी पावसामुळे वाहनधारक आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्वसनात लोकसहभाग वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुरामुळे नुकसान झालेल्यांचे पुनर्वसन आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोकसहभाग अधिक घ्यावा, शहरातील रेड आणि ब्लू लाइन त्वरित निश्चित करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) पुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्ण वत्स यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बुधवारी प्रशासनास दिले. शहरातील पूरग्रस्त भागाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.

गेल्या महिन्यातील महापूर आणि अतिवृष्टीमुळे शहर आणि जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांचे पुनर्वसन करणे, भविष्यात पूर आल्यास नुकसान होऊ नये, यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी सरकारने जागतिक बँकेकडे ३२ हजार कोटींची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून वत्स यांच्या नेतृत्वाखालील गृहनिर्माण तज्ज्ञ पी. के. दास, उपजीविका तज्ज्ञ हेमंत वाळवेकर, अविनाश कुमार यांचे पथक जिल्हा दौऱ्यावर आले आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी पथकाने शाहूपुरीतील कुंभार गल्लीस भेट दिली. तेथील नुकसानग्रस्त गणेश मूर्तिकारांशी थेट संवाद साधला. शक्य असल्यास कायमस्वरूपी स्थलातंर व्हावे, शक्य नसल्यास पुराचे पाणी आले तरी नुकसान होऊ नये अशाप्रकारे घरांचे बांधकाम करावे, असे वत्स यांनी सुचवले. शिवाजी पूल आणि जयंती नाल्याच्या पाहणीवेळी त्यांनी पुराचे पाणी येऊ नये, यासाठी संरक्षक भिंत बांधू नये, त्याऐवजी नाला, नदीकाठावर वृक्षलागवड करावी, असे सांगितले. कोल्हापूर महापालिकेने शहर विकास आराखडा करताना उंच आणि सखल भाग कुठे आहेत, हे निश्चित करावेत, रेड आणि ब्लू लाइन निश्चितीसाठी पाठपुरावा करावा, पडझड झालेल्यांची घरे उभी करताना आणि त्यांचे आर्थिक स्रोत पूर्ववत करण्यासाठी लोकांचा सहभाग घ्यावा, अशाही सूचना केल्या. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते. त्यांनी नुकसानीची तीव्रता निदर्शनास आणून दिली.

गायकवाडवाडा, उत्तरेश्वर पेठ परिसरातील नुकसानीची पाहणी करून पथक इचलकरंजीला गेले. तेथे महापुराचे पाणी घुसलेल्या पॉवर लूमला भेट दिली. तेथून शिरोळ, नृसिंहवाडी येथील नुकसानीची पाहणी केली. नृसिंहवाडीतील दुकानदारांनी पूरनियंत्रणासाठी केंदीय पातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी पथकाकडे केली. कुरुंदवाड, टाकळी येथेही पथकाने भेट दिली. गुरुवारीही पथक जिल्ह्यात आहे. दुपारनंतर सांगलीला रवाना होणार आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीडित विद्यार्थी आज पुन्हा शाळेत जाणार

$
0
0

पंढरपूर: पंढरपूरमधील इंग्रजी माध्यमाच्या एका खासगी शाळेत पहिलीत शिकणाऱ्या एका मुलाला शिक्षिकेशी अश्लील व लाजिरवाणे कृत्य केल्याचा ठपका ठेवत शाळेतून काढून टाकले होते. या प्रकरणी संस्थाचालक नागेश माळवे यांच्यावर बाल हक्क कायदा २०१५च्या कलम ७५ नुसार पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी संबंधित संस्था चालकावर बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. या बाबत मुलाच्या पालकांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली होती. दरम्यान, सोलापूरच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी आज, गुरुवारी त्या मुलाला पुन्हा शाळेत दाखल करणार आहेत. संबंधित मुलावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. या प्रकरणी शाळेवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली आहे.

शिक्षण विभागाने सर्व प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. आज, गुरुवारी शिक्षण अधिकारी शाळेतून काढून टाकलेल्या मुलाला पुन्हा शाळेत दाखल करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. शिक्षण हक्क कायद्याच्या कलम ८ आणि ३१ नुसार कोणत्याही मुलाला शाळेतून काढून टाकता येत नाही. संबंधित मुलास शाळेत बसवून न घेतल्यास शिक्षण विभाग शाळेवर कडक कारवाई करणार आहे, असे शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर सोलापूर पोलिस वादग्रस्त खासगी शिक्षण संस्थेवर बाल हक्क संरक्षण अधिनियम २०१५च्या कलम ७५नुसार गुन्हा दाखल केला आहे. शाळेतून काढून टाकताना दिलेल्या नोटीस मधील मजकूर मुलाच्या शैक्षणिक व मानसिक जडणघडणीवर परिणाम करणारा आहे, अशी तक्रार पोलिसात दाखल झाली होती. या गुन्ह्यामधील दोषींना पाच वर्षापर्यंत शिक्षा किंवा पाच लाखांपर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती पंढरपूर शहरचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली आहे.

आरटीईनुसार मुलाचा प्रवेश झाल्याने शाळा त्याचा प्रवेश रद्द करू शकत नाही. आज संबंधित मुलास पुन्हा शाळेत बसवण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी मुलासोबत शाळेत जातील. त्या नंतरही या मुलाला शाळेत बसू न दिल्यास शिक्षण विभाग या शाळेच्या विरोधात कडक कारवाई करेल. कोणत्याही परिस्थितीत मुलावर अन्याय होऊ देणार नाही.

- संजयकुमार राठोड, जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी, सोलापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाव्यांसह महाआघाडीसाठी‘स्वाभिमानी’चा पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीत सर्व डाव्या आणि लहान पक्षांचा समावेश करून महाआघाडीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी मुंबईत आज, गुरूवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात बैठक होणार आहे. बैठकीस शेट्टी यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, आमदार कपिल पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी १२५ जागा घ्यायच्या आणि उर्वरित ३८ जागा घटक पक्षांना देण्याचा निर्णय झाला आहे. यानुसार काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील करवीर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले. राष्ट्रवादीनेही विदर्भात उमेदवार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन्ही काँग्रेसने आता जाहीर केलेल्या जागेवर घटक पक्षांनी दावा केलेला नाही. मात्र ज्या जागेवर 'स्वाभिमानी'सह इतर घटक पक्षांनी दावा केला आहे, तिथे गुंता निर्माण झाला आहे.

आघाडीची महाआघाडी होण्यासाठी स्वाभिमानी, जनता दल, शेकाप, प्रहार अशा २० पक्षांच्या समावेशासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यासाठी पहिली बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय कोणत्या पक्षाची ताकद कशी आहे, यावर चर्चा होईल. त्यानंतर एकत्रितपणे काँग्रेस, राष्ट्रवादीकडे मतदारसंघनिहाय जागेचा प्रस्ताव देण्यात येणार आहे. या बैठकीनंतरच जिल्ह्यातील 'स्वाभिमानी'ने किती आणि कोणते मतदारसंघ मागितले आहेत, हे पुढे येणार आहे. दरम्यान, 'स्वाभिमानी'ने शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी, चंदगड, राधानगरी या पाच मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. महाआघाडीत जागा वाटपावेळी तडजोडीची चर्चा झाल्यास शिरोळ, हातकणंगले, राधानगरी मतदारसंघासाठी 'स्वाभिमानी' अधिक आग्रही राहणार आहे.

...

कोट

'शेकाप, जनता दलासह सर्व डाव्या आणि छोट्या पक्षांना एकत्र करून काँग्रेस, राष्ट्रवादीशी महाआघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी डावे आणि इतर घटक पक्षांच्या नेत्यांची मुंबईत व्यापक बैठक आयोजित केली आहे. बैठकीत किती आणि कोणत्या जागांची मागणी करावयाचे हे निश्चित होईल.

राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिलीतील मुलावर अश्लिलतेचा ठपका, संस्थाचालकावर गुन्हा

$
0
0

पंढरपूर: शिक्षिकेशी अश्लील आणि लाजिरवाणे कृत्य केल्याचा ठपका ठेवून पहिलीमध्ये शिकणाऱ्या मुलाला शाळेतून काढल्याप्रकरणी संस्थाचालक नागेश माळवे यांच्यावर पंढरपूर शहर पोलिसांनी बाल हक्क संरक्षण अधिनियम २०१५च्या कलम ७५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'ने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांत दाद मागितली होती. अखेर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी संबंधित संस्था चालकावर काल रात्री गुन्हा दाखल केला. शिक्षिकेशी अश्लील आणि लाजिरवाणे कृत्य केल्याचा ठपका ठेवत फिनिक्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या व्यवस्थापनाने पहिलीत शिकणाऱ्या मुलाला शाळेतून काढून टाकलं होतं. त्यानंतर पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली होती. अखेर पोलिसांनी बाल हक्क संरक्षण अधिनियम २०१५ च्या कलम ७५ नुसार संस्थाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलाला दिलेल्या नोटिशीतील मजकुरामुळे त्याच्या भविष्यातील शैक्षणिक व मानसिक जडणघडणीवर परिणाम होणार असल्याने व्यवस्थापनावर कलम ७५ जेजे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पाच वर्षांपर्यंत शिक्षा किंवा पाच लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. 'महाराष्ट्र टाइम्स'मुळे आपल्या मुलावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटून न्याय मिळू शकला, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. पीडित मुलाचे पालक चहाची टपरी चालवत असून, शिक्षण हक्क कायद्यामुळे मुलाला या शाळेत मोफत प्रवेश मिळला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रिएटिव्ह क्लब’ रविवारपासून

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विविध प्रकारच्या कलागुणांच्या सादरीकरणासाठी कोल्हापुरातील हौशी लोकांसाठी हक्काचा मंच उपलब्ध करुन देण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' व सेकंड होम या संस्थेने पुढाकार घेतला आहे. लेखन, गायन, वादन, संगीत, नाट्य, नृत्य, अभिनय, स्टँड अप कॉमेडी या कलाप्रकाराची आवड असणाऱ्या व ते सादर करू इच्छिणाऱ्या हौशी नागरिकांसाठी 'क्रिएटिव्ह क्लब'च्या माध्यमातून सुवर्णसंधी मिळणार आहे. 'मटा कल्चर क्लब' आणि 'सेकंड होम'च्या या संयुक्त उपक्रमाला रविवारपासून (ता. २२) सुरूवात होईल.

दर रविवारी सायंकाळी सात ते आठ या वेळेत क्रिएटिव्ह क्लबचे व्यासपीठ उपलब्ध असणार आहे. आपल्या कलेची साधना वाढवून इतरांच्या कलेचा आस्वाद घेता येईल. या क्लबच्या माध्यमातून एकच छताखाली अनेक कलांचा आस्वाद घेण्याबरोबरच कलाक्षेत्रातील हौशी लोकांबरोबर कलेच्या अभिसरणाची संधी मिळणार आहे. विविध करमणुकीच्या कार्यक्रमांचा यात समावेश असेल. यामध्ये हौशी कलाकार व कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन 'सेकंड होम'च्या संचालिका अपूर्वा नानिवडेकर-सिंग यांनी केले आहे.

क्रिएटिव्ह क्लबसाठीच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी ९९२१०३३२०० या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थांनी केले आहे. कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील कलागुणांची आवड जोपासणाऱ्या नागरिकांना कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एफआरपी पूर्ततेसाठी ६ कारखान्यांची धडपड

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

आगामी साखर हंगामासाठी जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी साखर आयुक्ताकडे ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. परवाना मिळवण्यासाठी एफआरपीचे बंधन घातल्याने शिल्लक एफआरपी देण्यासाठी कोल्हापूर विभागातील सहा कारखान्यांची धडपड सुरू आहे. गाळप परवाना देण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे.

महापूर, अतिवृष्टी आणि साखर उद्योगापुढील अडचणी लक्षात घेऊन साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यासाठी अर्ज करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. गाळप परवाना दिल्याशिवाय कोणत्याच कारखान्याला हंगाम सुरू करता येत नाही. २०१८-२०१९ या हंगामातील राज्यातील कारखान्यांकडून अद्याप ५८९ कोटी रुपये एफआरपी थकित आहे. यापैकी कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, आजरा, गायकवाड आणि सांगली जिल्ह्यातील केन शुगर, महाकाली, यशवंत खानापूर या कारखान्यांची दहा ते पंधरा टक्के एफआरपी थकीत आहे. कारखान्यांना गाळप परवाना मिळवण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरताना एफआरपीसह सर्व करांची माहिती भरणे आवश्यक आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे.

यंदा राज्यातील १९५ कारखान्यांनी ९५२.११ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. एकूण १०७ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. १९५ पैकी १२९ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. ४९ कारखान्यांनी ८०.९९ टक्के एफआरपी तर १३ कारखान्यांनी ६०.७९ टक्के एफआरपी दिली आहे. चार कारखान्यांनी फक्त ४९ टक्के एफआरपी दिली आहे. या कारखान्यांना पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय परवाना मिळणार नाही. सध्या साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांकडून साखरेची विक्री सुरू झाली आहे. या रक्कमेतून एफआरपी दिली जात आहे. गेल्यावर्षी काही कारखाने एफआरपी देण्यास असमर्थ ठरले होते. त्यावेळी साखर आयुक्तांनी एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना हप्ते बांधून दिले होते. सांगली जिल्ह्यातील वसंतदादा कारखान्याने बांधून दिलेल्या हप्त्यातून एफआरपी दिली होती. त्यामुळे यंदा त्यांना गाळप परवाना मिळवताना अडचणी येणार नाहीत.

आज बैठक

आगामी गळीत हंगामाच्या तयारीबाबत साखर आयुक्तांनी शुक्रवारी (ता. २०) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना आमंत्रित करण्यात आले आहे. याबैठकीत थकीत एफआरपी, साखर उद्योगतील अडचणी आणि समस्यांवर चर्चा होणार आहे.

१९५

राज्यातील साखर कारखाने

३८

कोल्हापूर विभागातील कारखाने

९५२.११ लाख मेट्रिक टन

राज्यातील एकूण गाळप

१०७ लाख मेट्रिक टन

राज्यातील साखर उत्पादन

५८९ कोटी रुपये

राज्यातील थकीत एफआरपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टार्टअपने मिळाले पाठबळ

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या मेक इन कोल्हापूर-स्टार्टअप कॉन्क्लेवमध्ये नवउद्योजकांना आपल्या उद्योगांचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. यातून उद्योगातील बदलत्या संधी आणि नव्या पिढीची कल्पकताही समोर आली. उद्योगांच्या मदतीसाठी अनेक यंत्रणा सरसावल्याने कोल्हापुरी स्टार्टअपला पाठबळ मिळाले. देशातील आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर मटा कॉन्क्लेव उद्योजकांचा उत्साह वाढवणारे ठरले, अशा भावना या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या.

कोल्हापुरातील उद्योग हा जिल्ह्याच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगार वाढत राहावा, यासाठी महाराष्ट्र टाइम्सने नेहमीच पुढाकार घेतला आहे. 'मेक इन कोल्हापूर' संकल्पनेंतर्गत 'स्टार्टअप कॉन्क्लेव' विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. या कॉन्क्लेवमध्ये उद्योजकांच्या संघटनांसह औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, पतपुरवठा करणाऱ्या बँकांचे अधिकारी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक यासह ज्येष्ठ उद्योजकांचाही सहभाग होता. आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी उद्योगांमधील बदलत्या संधी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, जगाशी स्पर्धा कशी करावी याचा कानमंत्र दिला. उपस्थित नवउद्योजकांसाठी डॉ. शिकारपूर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून नावीण्यपूर्ण कल्पना तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल नेमके मार्गदर्शन केले.

स्टार्टअप कॉन्क्लेवमध्ये नवउद्योजकांच्या त्यांच्या उद्योजकांचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. यात पायताणचे प्रमुख अनुराग कोकितकर यांनी ऑनलाइन मार्केटमधील संधी स्पष्ट केल्या. 'मेक मी हायर'च्या अंजोरी परांडेकर, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे यांनी त्यांच्या क्षेत्रातील उद्योगांच्या संधींचे सादरीकरण केले. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे सांगत तरुणांनी कौशल्य आत्मसात करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला. नवउद्योजकांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही कॉन्क्लेवने आपल्या कल्पना मांडण्याची संधी दिली. यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनांना चालना मिळाली. तज्ज्ञांसमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. अनेक दिग्गज उद्योजकांशी थेट चर्चा करण्याची संधीही नवउद्योजक आणि विद्यार्थ्यांना मिळाली.

उद्योजक, पतपुरवठादार आणि तज्ज्ञ मार्गदर्शक एकत्र आल्याने 'मटा कॉन्क्लेव' आगळेवेगळे ठरले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी स्टार्टअपसाठी उद्योगांचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी घेतली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी उद्योजक आणि बँकांची एकत्र बैठक घडवण्याचे आश्वासन दिले. आर्थिक घोटाळे शोधून बँकिंग सेक्टर भक्कम करण्यायासाठी आयटी क्षेत्रात येणाऱ्या काळात मोठ्या संधी असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. अपूर्वा जोशी यांनी सांगितले. तज्ज्ञांशी थेट बोलण्याची संधी मिळाल्याने नवउद्योजकांसाठी स्टार्टअप खऱ्या अर्थाने पाठबळ देणारे ठरले.

बँक ऑफ इंडिया ही जिल्ह्यातील अग्रणी बँक नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव तत्पर आहे. बँकेने 'एस. एम. ई. योजनेअंतर्गत 'वेलकम ऑफर' सुरू केली आहे. ही स्कीम सर्व उद्योजकांसाठी आकर्षक आणि फायदेशीर आहे. उद्योग क्षेत्राच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करून जलद सेवा देण्यासाठी बँकने एस. एम. ई. सिटी सेंटरची स्थापना केली आहे. इच्छूक उद्योजकांनी बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेत संपर्क साधावा.

- नितीन देशपांडे, झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया

स्टार्टअप कॉन्क्लेवच्या माध्यमातून महाराष्ट्र टाइम्सने कोल्हापूरच्या विकासाला चालना दिली. विशेषत: उद्योगांबद्दल असलेली महाराष्ट्र टाइम्सची आस्था उद्योजकांचा उत्साह वाढवणारी आहे. स्टार्टअप कॉन्क्लेवने जिल्ह्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले. आर्थिक मंदीच्या काळात उद्योग टिकावेत आणि वाढावेत यासाठी कॉन्क्लेवमधील चर्चा उपयुक्त ठरली. येणाऱ्या काळात याचे चांगले परिणाम दिसतील अशी खात्री आहे.

- चंद्रकांत जाधव, उद्योजक

महाराष्ट्र टाइम्स आणि कोल्हापूरचा विकास यांचे अतूट नाते आहे. शिक्षण, संशोधन, उद्योग, व्यापार, बांधकाम, शेती अशा अनेक क्षेत्रांच्या विकासासाठी महाराष्ट्र टाइम्सने वेळोवेळी प्रोत्साहन दिले. सकारात्मक भूमिका घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. मटा कॉन्क्लेवने विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणले. कॉन्क्लेवमधील चर्चेने उद्योगांना चालना दिली. यापुढेही कोल्हापूरच्या विकासासाठी महाराष्ट्र टाइम्स नेहमीच पुढाकार घेईल.

- डॉ. भारत खराटे, संचालक, चाटे शिक्षण समुह

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मटा कॉन्क्लेव हे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. यानिमित्ताने सर्व क्षेत्रातील चांगले प्रयोग, सर्जनशील संस्था, व्यक्तींची माहिती मिळते. कोल्हापुरातील सर्वच चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणारा मटा कॉन्क्लेव जिल्ह्याच्या विकासाचा सोबती बनला आहे. सर्वच क्षेत्रातील कार्यशील व्यक्तींचा उत्साह वाढवणारा हा उपक्रम कोल्हापुरातील सकारात्मक उर्जा वाढवणारा ठरत आहे. यातून अनेकांना प्रोत्साहन मिळत आहे.

- अश्विनी दानीगोंड, प्रमुख, मनोरमा इन्फोटेक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिद्दीच्या बळावर विश्वजितची राष्ट्रीय भरारी

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : प्रतिकूल परिस्थितीमुळे वडिलांचे फुटबॉलमध्ये करिअर करण्याचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द कोल्हापुरातील युवा फुटबॉल खेळाडू विश्वजित शिंदे याने बाळगली आहे. नुकतीच त्याची भारतीय ज्युनियर मुले फुटबॉल संघात निवड झाली. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने त्याची निवड केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विश्वजितची सुरू असलेली घौडदौड नव्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.

विश्वजित भारताचे पहिले ऑलिंम्पिक कुस्तीपटू दिनकरराव शिंदे यांचा पणतू असून क्रीडाक्षेत्राचा वारसा त्याला घरातूनच मिळाला आहे. त्याचे वडील विजय शिंदे हे पेंटिंगची कामे करतात. आई वैष्णवी या पिठाची गिरण चालवून संसाराला हातभार लावतात. अवघ्या १५ वर्षांच्या जिगरबाज विश्वजितने जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर फुटबॉलमधील प्रवास मोठ्या दिमाखात सुरु केला आहे. पाचवीत असताना त्याची फुटबॉलशी नाळ जुळली. स. म. लोहिया विद्यालयातून सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली. दिल्लीतील नामांकित सुदैवा फुटबॉल क्लबने कोल्हापुरात घेतलेल्या सराव शिबिरातून विश्वजितची आयलीग स्पर्धेसाठी निवड झाली. त्यानंतर त्याचा खेळ उंचावत गेला. दिल्लीसाठी निवड झाल्यानंतर शिंदे कुटुंबीयांसमोर आर्थिक अडचणी होत्या. घरापासून लांब राहण्याची सवय नसल्याने त्याने येथे परत येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कुटुंबीयांनी दिलेल्या पाठबळावर त्याने दिल्लीत आठ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले.

खेळाडू घडवण्यात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिकताना विश्वजितची दोनवेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी निवड झाली होती. रिलायन्स शालेय फुटबॉल चषकात चमकदार कामगिरी करत त्याने सर्वात जास्त स्कोअर केला. या स्पर्धेत तो गोल्डन बूटचा मानकरी ठरला. उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी सुरू केलेल्या कोल्हापूर फुटबॉल क्लबच्या माध्यमातून त्याचा सराव सुरू आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनकडून झालेल्या निवड चाचणीत त्याने कौशल्य दाखवले. मलेशियात झालेल्या फ्रेंडशिप सामन्यात विश्वजितला देशाकडून एकमेव चांगली कामगिरी करता आली. तो फॉरवर्डला स्ट्रायकर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याला प्रदिप साळोखे, अमित पोवार, प्रा. अमर सासणे यांचे मार्गदर्शन लाभले.

आहाराकडे लक्ष

चांगला खेळाडू घडवताना आहार महत्वाचा ठरतो हे लक्षात असल्याने विश्वजितचे वडील विजय शिंदे यांनी त्याच्या डाएटकडे लक्ष दिले. बऱ्याचदा स्थानिक खेळाडूंना पोषक आहार मिळत नाही. आर्थिक अडचणींमुळे डाएटकडे दुर्लक्ष होते हे लक्षात घेऊन शिंदे यांनी प्रसंगी हातउसने पैसे घेत मुलाच्या आहाराकडे लक्ष दिले.

इच्छाशक्ती व जिद्दीच्या जोरावर फुटबॉल खेळामध्ये यशस्वी करिअर करता येते. कोल्हापुरात फुटबॉलसाठी पोषक वातावरण आहे. एक निश्चित ध्येय ठरवून त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास खेळातील कामगिरी उंचावता येईल. भविष्यात भारतीय फुटबॉल संघात स्थान मिळविण्याची तयारी आहे.

- विश्वजित शिंदे, युवा फुटबॉल खेळाडू

लोगो : युवामुद्रा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिर अतिक्रमणाच्या विळख्यात

$
0
0

कोल्हापूर: ताराबाई रोडपासून महाद्वारापर्यंत दुतर्फा बसलेले विक्रेते, महाद्वार कमानीपासून रस्त्यावर मध्यभागीच ठाण मांडून बसलेले आवळे, चिंचा विक्रेते, घाटी दरवाजासमोर तवे विकणाऱ्या महिला, कार्तिक स्वामी मंदिराच्या पिछाडीस भिंतीलगत फूलविक्रेत्यांनी मारलेले शेड, रेलिंगजवळ लागणाऱ्या दुचाकी अशा अतिक्रमणाच्या विळख्यांनी अंबाबाई मंदिराचा परिसर जखडून गेला आहे. अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे. मात्र, अद्याप महापालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नाही.

नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाई मंदिराची स्वच्छता, धुलाई, दर्शन रांगेतील मंडप उभारणीच्या कामाला वेग आला आहे. नवरात्रकाळात अंबाबाई मंदिरात लाखो भाविक येतात. पहाटेच्या आरतीपासून रात्री पालखी सोहळ्यापर्यंत मंदिर परिसर गर्दीने फुलून जातो. दहा दिवसांवर नवरात्रोत्सव आला आहे. मात्र, सध्याची मंदिराच्या परिसराची अवस्था अतिक्रमणांमुळे अत्यंत धोकादायक झाली आहे.

ताराबाई रोड ते महाद्वार चौक या रस्त्यावर दुतर्फा कपडे, ज्वेलरी, चप्पल यांच्या हातगाड्या लावल्या जातात. हा रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीचा असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. तसेच मित्रप्रेम तरुण मंडळाजवळ अधिकृत रिक्षा थांबा असताना महाद्वार चौकापर्यंत नियमबाह्य रिक्षा उभ्या केल्या जातात. रिक्षाचालकांवर कोणतीही कारवाई होत नाही. दुकानदारांकडून रस्त्यावर होणारे अतिक्रमण, फिरते विक्रेते व नियमबाह्यपणे उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षा यामुळे महाद्वार चौक सतत गजबजलेला असतो.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाद्वार रोडवरील अतिक्रमणावर घाव घालण्यासाठी महापालिकेने कार्यवाही करण्याची गरज आहे. वर्षभरात तात्पुरती कारवाई केली जाते. सहा महिन्यांपूर्वी महाद्वार रोड, जोतिबा रोड येथील अतिक्रमण हटवण्यात आले होते, मात्र सध्या पुन्हा दुकानदारांपासून ते फेरीवाल्यापर्यंत सर्वांनीच अतिक्रमण केले आहे.

महाद्वार चौक ते महाद्वार प्रवेशद्वार हा मार्ग कायम अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला असतो. या मार्गाच्या दुतर्फा इमिटेशन ज्वेलरी, पूजेचे साहित्य, खेळण्यांची दुकाने आहेत. या दुकानदारांनी दुकानाच्या पुढे दोन ते तीन फूट अतिक्रमण केले आहे. शिवाय रस्त्यावरच स्टॉल मांडून फेरीवाले दुकाने थाटतात. मध्यभागी आवळे, चिंचा, हळदीकुंकू, फुटाणे, मण्यांचे दागिने यांचे विक्रेते बसतात. चप्पलस्टँडही याच मार्गावर आहे. देवस्थान समिती व महापालिकेच्या पुढाकाराने येथील अतिक्रमण हटवण्यासाठी दरवर्षी मोहीम राबवली जाते. मात्र काही दिवसांनी पुन्हा हे विक्रेत याठिकाणी बस्तान बसवतात.

महाद्वार कमानीसमोर रेलिंग घातल्यास फेरीवाल्यांना बसता येणार नाही. त्यामुळे अतिक्रमण होऊ नये यासाठी येथे रेलिंग घातले पाहिजे. फेरीवाले व महापालिका कर्मचारी यांच्यामध्ये अनेकदा आर्थिक व्यवहार होत असल्याने फेरीवाले अतिक्रमणाच्या कारवाईला घाबरत नाहीत. त्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली पाहिजे.

- अविनाश गोठणकर, नागरिक

रिक्षांमुळे वाढली कोंडी

जोतिबा रोड, महाद्वार रोडवर पसरलेल्या रिक्षांमुळे येथे अधिकच कोंडी होत आहे. आखून दिलेल्या क्षमतेपेक्षा जादा रिक्षा येथे थांबत असल्याने भाविकांना आणि अन्य वाहनधारकांना ये-जा करणेही मुश्किल होत आहे. दुकानांसमोर थांबणाऱ्या रिक्षांमुळे पार्किंगमधील अडथळ्यांसह दुकानांतील व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे.

येथे आहे विळखा

- महाद्वार ते महाद्वार कमान रस्त्यात फेरीवाल्यांचे ठाण

- ताराबाई रोड ते महाद्वार चौकात बेकायदेशीर रिक्षा थांबा

- काशी विश्वेश्वर मंदिरासमोरील रेलिंगबाहेर दुचाकी वाहनांचे पार्किंग

- कार्तिकस्वामी मंदिर पिछाडीस फूलविक्रेत्यांचे शेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 4

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images