Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विना नंबरप्लेट वाहनांवर कारवाई करा

$
0
0

कोल्हापूर

'महापालिकेच्यावतीने ओला व सुका कचरा संकलीत करण्यासाठी खासगी कंपनीला ठेका दिला आहे. कंपनीची वाहने विना नंबरप्लेट फिरत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी,' अशी मागणी ताराराणी महिला आघाडीच्यावतीने शुक्रवारी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, 'महापालिकेच्या विविध प्रभागातून खासगी वाहनातून कचरा संकलीत केला जात आहे. कचरा गोळा करणाऱ्या एकाही वाहनावर नंबरप्लेट नसून त्यांचे पासिंग झाल्याचे निदर्शनास येत आहे. विना नंबरप्लेट वाहन फिरवणे गुन्हा असल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. कचरा गोळा करताना ठराविक आवाजात जाहिरात केली जाते. त्याचा त्रास नागरिकांना होत असून त्याबाबत प्रदूषण मंडळाकडून ध्वनी प्रदूषणाचे प्रमाणपत्र घेतले आहे का, याचीही तपासणी करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विभागात ४५ लाख मेट्रिक टन ऊस बाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुरामुळे सर्वच घटकाची मोठी हानी झाली. यंदाच्या साखर हंगामावर त्याचा परिणाम होणार आहे. कारण पुरामुळे कोल्हापूर विभागातील ४५ लाख मेट्रिक टन उसाला फटका बसला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ३० लाख तर सांगली जिल्ह्यात १५ लाख मेट्रिक टन उसाला फटका बसला आहे. ऊस उत्पादकांचे महापुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, साखर आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आगामी गळीत सुरू करण्यासाठी बैठक झाली. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दीर्घ चर्चा झाली. राज्यभरातील सर्व सहकारी आणि खासगी कारखान्याचे कार्यकारी संचालकांच्या उपस्थितीत यावेळी प्रत्येक जिल्ह्यातील ऊस उत्पादनाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये महापुरापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात १३५ लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. पण जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आल्याने ऊस कुजला आहे. अतिवृष्टीमुळे उसाचे उत्पन्नही घटले आहे. महापुराचा फटका बसल्याने जिल्ह्यात १०५ लाख मेट्रिक टन उसाचे उत्पन्न होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. कोल्हापूरप्रमाणे सांगली जिल्ह्यालाही महापुराचा फटका बसला आहे. सांगली जिल्ह्यात ८२ लाख मेट्रिक टन उस उत्पादनाचा अंदाज होता. पण, ६७ लाख मेट्रिक टनावर उत्पादन होण्याची शक्यता आहे.

नदीकाठच्या उसाला मोठा फटका बसला असून ज्या उसाला महापुराचा कमी फटका बसला आहे तो ऊस लवकर गाळप होण्याची गरज अनेक कारखानदारांनी यावेळी बोलून दाखवली. त्यासाठी लवकर हंगाम सुरू करण्याची मागणी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातील कारखान्यांनी केली. कर्नाटकातील दोन राज्यांनी कारखाने सुरू केले आहेत. एक नोव्हेंबर रोजी कारखाना सुरू झाला तर पुरातून वाचलेल्या उसाची तोड करुन त्यानंतर इतर ऊसतोडी केल्या जातील. पण, साखर हंगामाला उशीर झाला तर कर्नाटकातील कारखाने पुरात खराब झालेला ऊस गाळप न करता चांगला आणि दर्जेदार ऊस पळवतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. त्याचा फटका राज्यातील कारखान्याला बसू शकतो, याकडे कारखानदारांनी लक्ष वेधले.

पश्चिम महाराष्ट्र वगळता मराठवाडा आणि विदर्भातील कारखान्यांनी साखर हंगाम एक डिसेंबर सुरू करण्याची मागणी केली. दुष्काळामुळे उसाची वाढ खुंटली आहे. सध्या पाऊस पडल्याने उसाची वाढ होत असली तरी ती तोडीसाठी पुरेशी नाही. डिसेंबरपर्यंत ऊस परिपक्व झाल्यावर गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी केली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भातील साखर हंगामासाठी कारखाने सुरू करण्याचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करावे लागणार आहे.

००००००

एक नोव्हेंबरची मागणी

पुरातून वाचलेल्या उसाचे गाळप करण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील कारखान्यांनी एक नोव्हेंबरला हंगाम सुरू करण्याची मागणी केली. हंगाम सुरू करण्याबाबत कारखान्यांची मागणी मंत्रिगटासमोर ठेवण्यात येईल. त्यानंतर सुवर्णमध्य शोधून हंगाम सुरू करण्याची तारीख जाहीर केली जाईल, असे आश्वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावेळी दिले.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४१ महिने पगार नसल्याने‘आदिनाथ’चे कर्मचारी रस्त्यावर

$
0
0

४१ महिने पगार नसल्याने

'आदिनाथ'चे कर्मचारी रस्त्यावर

पंढरपूर :

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या ४१ महिन्यांपासून थकलेल्या वेतनाचा प्रश्न आता गंभीर झाला आहे. आर्थिक अडचणीत आलेल्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कुटुंबासमवेत रास्ता रोको करीत कारखान्याच्या अध्यक्षांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असलेल्या सरकारविरोधात संताप व्यक्त केला. गेली ४१ महिने पगार नसल्याने कर्मचाऱ्यांना रोजंदारीवर जावे लागत असून, महिलांवर धुणी-भांडी आणि मोलमजुरी करण्याची वेळ आलेली आहे. मागील चार दिवसांपासून करमाळा तहसील कार्यालयासमोर याच कारखान्यातील एका दिव्यांग कामगाराने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कारखाना संचालक आणि सहकार विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माढ्याची मतमोजणी होणार कुर्डुवाडीत

$
0
0

माढ्याची मतमोजणी

होणार कुर्डुवाडीत

पंढरपूर :

विधानसभा निवडणुकीची प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. माढा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कुर्डुवाडीत करण्याचे नियोजन प्रशासनाने केल्यामुळे माढ्यात नागरिक आणि प्रशासन यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. मतमोजणी कुर्डुवाडीत करण्याच्या विरोधात माढ्यात कडकडीत बंद पाळून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. शाळा, बाजारपेठ, पेट्रोल बंद ठेवून उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी महापौरांसह गटनेत्यांचा

$
0
0

Maruti.Patil @timesgroup.com tweet: @MarutipatilMT कोल्हापूर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अनेकांना आमदारकीचे स्वप्ने पडू लागली असून महापालिकेचे अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीची पहिली पायरी म्हणून अनेकजणांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपकडून मुलाखती दिल्या असून काहीजण वंचित बहुजन विकास आघाडीच्याही संपर्कात आहेत. काँग्रेसचे माजी महापौर सागर चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष व माजी महापौर आर. के. पोवार, आदिल फरास व ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम मैदानात उतण्याची शक्यता आहे. महापालिका क्षेत्रात विधानसभेच्या उत्तर व दक्षिण अशा दोन मतदारसंघाचा समावेश आहे. दक्षिण मतदारसंघामध्ये ग्रामीण भागाचाही समावेश असल्याने महापालिकेचे अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी उत्तर मतदारसंघातून लढण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे दोन माजी महापौर, दोन माजी स्थायी समिती सदस्य व एक विद्यमान नगरसेवक व ताराराणी आघाडीचे गटनेते यांच्यासह नगरसेवकांचे भाऊ, पती उत्तरमधून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आपआपल्या पद्धतीने सर्व इच्छुक पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीबाबत दावेदारी पोहोचवत आहेत. शिवसेना-भाजपचा युतीबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. पण उत्तर मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार याबाबत कमालीची संभ्रमावस्था आहे. काँग्रेसकडून माजी महापौर सागर चव्हाण, त्यांचे बंधू व नगरसेविका जयश्री चव्हाण यांचे पती सचिन चव्हाण यांनी मुलाखत दिली आहे. तर राष्ट्रवादीकडून माजी महापौर आरे. के. पोवार व माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी मुलाखत दिली आहे. फरास यांनी वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेवक व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उमेदवारी मागितली आहे. त्याचवेळी गत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले व विद्यमान नगरसेवक सत्यजित कदम यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी केली आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने कदम भाजपकडून लढण्याची शक्यता आहे. पण युती झाल्यास कोणता निर्णय घ्यायचा याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांचा लवकरच मेळावा होणार आहे. नगरसेवक संभाजी जाधव यांचे बंधू व विद्यमान नगरसेविका जयश्री जाधव यांचे पती ज्येष्ठ उद्योजक चंद्रकांत जाधव विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. युती, आघाडीचा निर्णय आणि जागांमध्ये आदलाबदल झाल्यानंतर इच्छुकांपैकी किमान तिघेजण बंडखोरीच्या पवित्र्यात दिसून येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडझोनसंदर्भात ‘पाटबंधारे’ची झाडाझडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाटबंधारे विभागाने पूररेषेसंदर्भात (रेड झोन) कोणती कार्यवाही केली असा प्रश्न कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने कोल्हापूर पाटबंधारे विभागाला केला. समितीच्या शिष्टमंडळाने शनिवारी याबाबत निवेदन दिले. मात्र पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गैरहजर असल्याबद्दल समितीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला.

निवेदनात म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली. शेतकरी, व्यापारी, उद्योजकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांची घरे बुडाली. जिल्ह्याला महापुराने वेढा दिल्याने राष्ट्रीय महामार्ग बंद पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयही बुडाले. महापुराने जनतेचे व सरकारचेही मोठे नुकसान झाले. महापुराला पाटबंधारे विभाग अधिक जबाबदार आहे. पूररेषेमध्ये अतिक्रमणे झाली आहेत. १९८९, २००५ आणि २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली. पाटबंधारे विभागाने पूररेषा संदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. पूर विस्तारण्याच्या जागेमध्ये अतिक्रमणे करून भराव टाकण्यात आले. २०१७ आणि २०१८ मध्ये ७०० एकर जागेमध्ये ब्ल्यू लाइन व रेड लाइन निश्चित केली होती असे समजते. ब्लू लाइन आणि रेड लाइनमध्ये कोणते बदल केले आहेत? अलमट्टी, हिप्परगी आणि कोल्हापूर जिल्ह्याचे क्षेत्र यांच्यात किती उंचीची तफावत आहे याची माहीती त्वरीत द्यावी, अशी मागणी समितीने यावेळी केली.

शिष्टमंडळात कोल्हापूर आणि गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड विवेक घाटगे, अशोक पोवार, रमेश मोरे, अॅड पंडितराव कांबळे, भाऊ घोडके आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलकांकडून कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महिला बचत गटांचा रोजगार हिरावून घेणारी सेंट्रल किचन पद्धत रद्द करा या मागणीसाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासोबत शनिवारी आयोजित केलेल्या बैठकीत प्रचंड गोंधळ उडाला. प्रभारी प्रशासनाधिकारी एस. के. यादव यांनी किचन तपासणीसाठी जात असताना फोनद्वारे संबंधीत ठेकेदाराला माहिती दिल्याने गोंधळात अधिक भर पडली. एका आंदोलकाने शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली, तर देसाई यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी बैठकीतून फरफट बाहेर काढले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.

सेंट्रल किचनच्या ठेक्याबाबत अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात शिष्टमंडळासमवेत बैठकीला सुरुवात झाली. यावेळी संघटनेचे व्ही. बी. पाटील यांनी प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासनाधिकारी यादव यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. ते म्हणाले, 'कोणतीही पूर्वसूचना न देता बचत गटांचा ठेका रद्द का केला?, ठेकेदाराला वर्कऑर्डर कशी दिली? पोषण आहारात प्रचंड त्रुटी असून त्याची तपासणी करा व ठेक्याला स्थगिती द्या. यादव व उबाळे भ्रष्टाचार करत आहेत.'

यादव यांनी कोर्टाचा आदेश आणि राज्य सरकारच्या नियमांचे उल्लंघन कायदेशीरदृष्ट्या करता येणार नसल्याचे सांगितले.

याबाबत बंडा साळोखे म्हणाले, 'पोटठेकेदार नेमता येत नसताना असा ठेकेदार नेमला कसा? त्याच्यावर कारवाई करुन ठेका काढून घ्या. अन्यथा या निराधार महिलांना विष द्या.'

उमा नासिपुडे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला. त्यानंतर पाच जणांचे शिष्टमंडळ किचनची पाहणी करण्यासाठी निघाले. त्याचवेळी यादव यांनी संबंधीत ठेकेदारांना फोनद्वारे तपासणीसाठी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे बैठकीत वादाची ठिणगी पडली आणि एकच गोंधळ उडाला. या गोंधळात शिक्षण मंडळाच्या एक कर्मचाऱ्याला आंदोलकांनी धक्काबुक्की केली. त्या आंदोलकाला पोलिसांनी फरफटत बाहेर काढले. त्यावेळी महिला आक्रमक बनल्या.

गोंधळानंतर देसाई यांनी 'कोर्टाचा आदेश असल्याने ठेका रद्द करता येणार नाही. पण, किचनची तपासणी करू. तपासणीमध्ये त्रुटी आढळल्यास कारणे दाखवा नोटीस देवून ठेका रद्द करू' अशी ग्वाही दिली. त्यानंतर यादव यांच्यासह पाच जणांचे शिष्टमंडळ किचनची पाहणी करण्यासाठी गेले.

शिक्षण उपसभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, प्रसाद जाधव, किशोर घाटगे, वर्षा कुलकर्णी, सुशीला माळकर, राधिका हिलगे, आशा साळोखे, वैभव हिलगे यांच्यासह बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बंद किचनचा अहवाल आयुक्तांकडे

बैठकीनंतर प्रशासनाधिकारी यादव यांच्यासह बचत गटाच्या महिलांनी मंगळवार पेठ व पाचगावसह सात ठिकाणच्या सेंट्रल किचनची तपासणी केली. तपासणीमध्ये सेंट्रल किचनमध्ये अन्न शिजवत नसून करारातील नियम व अटींचा भंग झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सायंकाळी उशीरात आंदोलकांसमोर अहवाल तयार करण्यात आला. अहवाल प्रशासनाधिकारी आयुक्तांना सादर केला. अहवाल सादर होईपर्यंत आंदोलक महापालिकेच्या आवारात थांबून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तणावपूर्ण वातावरणात अतिक्रमण हटवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या पश्चिम दरवाजातील अतिक्रमणे हटविल्यानंतर ताराबाई रोडवर कारवाई सुरू करताना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले. पथक व फेरीवाल्यांमध्ये प्रचंड झटापट झाली. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचा फौजफाटा दाखल झाल्यानंतर फेरीवाल्यांचा विरोध मावळला. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याचे समजताच बचावासाठी कोणीही नेते येणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर फेरीवाल्यांनी स्वत:हून साहित्य घेऊन जाण्यास सुरुवात केली. कारवाईदरम्यान प्रंचड तणाव निर्माण झाला होता.

अंबाबाई मंदिराच्या पश्चिम दरवाजाच्या पायरीपर्यंतचा रस्ता फेरीवाल्यांनी व्यापला आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश करणे जिकिरीचे बनले असताना देवस्थान समितीसह महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले होते. शनिवारी अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उगारला. पथक येताच सर्व विक्रेते साहित्य घेऊन गेले. रस्ता मोकळा झाल्यानंतर मध्यभागी त्वरीत बॅरिकेट्स लावण्यात आले. नंतर २५ जणांचे पथक ताराबाई रोडवर कारवाईस गेल्यानंतर तेथे त्यांना फेरीवाल्यांच्या प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले. याची माहिती मिळताच शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत घटनास्थळी दाखल झाले. पथक प्रमुख पंडीत पोवार यांनीही कारवाई ठाम राहण्याची भूमिका घेतली. जुना राजावाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. घुले व विक्रांत चव्हाण फौजफाट्यासह दाखल झाले. फेरीवाल्यांच्या काही नेत्यांनी कारवाईला विरोधाचा प्रयत्न केला. पण, पथकाने साहित्य जप्तीस सुरुवात केली. त्यामुळे पथक व फेरीवाल्यांमध्ये झटापट झाली. काही काळ तणावाचे वातावरणही निर्माण झाले. कारवाई सुरू असतानाच आचारसंहीता जाहीर झाल्याची माहिती मिळताच पथक अधिकच आक्रमक झाले. तर बाजू घेण्यासाठी कोणताही नेता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फेरीवाल्यांचा विरोध मावळला.

तत्पूर्वी फेरीवाल्यांनी बैठक घेऊन कारवाईस विरोधाचा निर्धार केला. पण प्रचंड पोलिस फौजफाटा आणि अतिक्रमण निर्मूल पथकाने त्यांचा विरोध मोडून काढला. त्यानंतर मंदिराजवळील आणि ताराबाई रोडवरील बायोमेट्रिक कार्डधारकांचे कपिलतीर्थ मार्केट येथे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह फेरीवाल्यांनी जागेची पाहणी केली. पार्किंगमधील जागेवर काँक्रिटीकरण करण्याबरोबरच हायमास्ट दिवे लावण्याची मागणी फेरीवाल्यांनी केली.

परवाने रद्द होणार

यावेळी नागरिकांनी रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटवल्यानंतर शोरुमधारक पैसे घेऊन बाहेरील फेरीवाल्यांना बसवत असल्याचे शहर अभियंता सरनोबत यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी तातडीने परवाना अधिकारी राम काटकर यांना बोलावून घेतले. शोरुमधारकाने फेरीवाल्याला जागा दिल्यास त्यांचा तत्काळ परवाना रद्द करण्याचा आदेश दिला. त्यानंतर कपिलतीर्थ मार्केट येथील जागेची पाहणी करुन तेथे बायमेट्रिक कार्डधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. तसेच अन्य समस्यांची निर्गत करण्यासाठी नवरात्रोत्सवानंतर बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पूरग्रस्तांसाठी रस्त्यांवर उतरू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूरग्रस्त शेतकरी आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना विधानसभा आचारसंहितेपूर्वी नुकसानभरपाई द्या, अशी मागणी आम्ही केली होती. त्याचा पाठपुरावाही केला. पण राज्य सरकारने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ढुंकूनही पाहिले नाही. आचारसंहिता आणि अन्य कोणतेही कारण न देता ही सगळी मदत एकाचवेळी पूरग्रस्तांना मिळाली पाहिजे, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे. तसेच नुकसानभरपाईसाठी रस्त्यांवर उतरण्याचा इशाराही त्यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.

पत्रकात असे म्हटले आहे की, महापुराने पाणी घुसल्याने अनेक घरे जमीनदोस्त झाली. त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. पाणी घुसलेल्या बहुतांश घरांमध्ये आजही राहण्यासारखी स्थिती नाही. शेतात पाणी साचल्याने पिके कुजली आहेत. महापूर आणि अतिवृष्टीमुळे इथला शेतकरी आणि नागरिक अक्षरशः मोडून पडला आहे. हजारोंचे संसार वाहून गेले असताना आणि पिके कुजली असताना या संकटात सरकारने नुकसानग्रस्तांच्या समस्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही. सरकारने पूरग्रस्तांची थट्टाच केली आहे. प्रत्यक्षात झालेले नुकसान आणि त्यांचे पंचनामे यामध्ये तर टोकाची विसंगती आहे.

मोदींकडून भ्रमनिरास....

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भ्रमनिरास झाली आहे,' अशी टीका मुश्रीफ यांनी केली आहे. महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी नाशिकला आलेले पंतप्रधान पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी काही मदत जाहीर करतील अशी अपेक्षा होती. परंतु केवळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करून ते 'हावडी मोदी' या कार्यक्रमासाठी ते अमेरिकेला रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यरात्री गळती काढण्यास यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंबुखडी (गणेश कॉलनी) येथे शिंगणापूर योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती काढण्यास शनिवारी मध्यरात्री पाणी पुरवठा विभागाला यश आले. उशीरापर्यंत प्रिस्टेड पाइपवर काँक्रिट टाकल्यानंतर पहाटे पाणीउपसा सुरू झाला. वितरणाच्या चारही टाक्या भरण्यास वेळ लागणार असल्याने रविवारी अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद असल्याने शनिवारी १५ टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

शिंगणापूर योजनेतील ११०० मीमी व्यासाच्या जलवाहिनीला गेल्या आठवड्यापासून गळती लागली होती. गळती काढण्यासाठी तीन तास विद्युत पुरवठा बंद ठेवून दुरुस्ती करण्यात आली. नऊ कर्मचाऱ्यांच्या टीमने जेसीबी, ब्रेकरच्या मदतीने दुरुस्ती केली. दुपारी प्रिस्टेड पाइप जॉईंट केल्यानंतर रात्री उशीरापर्यंत यावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू होते. मध्यरात्री काम संपल्यानंतर पहाटेपासून शिंगणापूर योजनेतून पाणी उपसा करण्यात सुरुवात झाली. मात्र, वितरण टाकी भरण्यास वेळ लागणार असल्याने सकाळच्या सत्रामध्ये पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. दुपारनंतर मात्र ए, बी, व 'ई' वॉर्डातील पाणीपुरवठा कमी व अपुऱ्या दाबाने होणार आहे.

दरम्यान शनिवारी पाणीपुरवठा बंद असल्याने १५ टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. महालक्ष्मी नगर, जरगनगर, राजारामपुरी, समृद्धी नगर, रमणमळा, कपूर वसाहत, लोणार वसाहत आदी ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला. उपअभियंता व्यकंटराव सुरवसे, शाखा अभियंता मिलिंद पाटील यांच्यासह पाणीपुरवठ्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता अंमलबजावणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणूकीची घोषणा होताच जिल्ह्यात आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. महानगरपालिका, जिल्हा परिषद, सरकारी समितीच्या पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्यात आली. चोवीस तासांत राजकीय पक्षाचे फलक, चिन्हे हटवण्यात येणार आहेत. जिल्ह्याला जोडणाऱ्या कर्नाटक आणि गोवा राज्यातील सीमेवर १४ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात येणार असून मद्य, हत्यारे, रोकड वाहतुकीवर नजर ठेवताना परराज्यातील गुंडावर कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम आणि आचारसंहिता अमंलबजावणीची माहिती दिली.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'जिल्हा परिषदेची १८ वाहने ताब्यात घेण्यात आली. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांची सहा आणि पंचायत समिती सभापतींची बारा वाहने जमा करण्यात आली. महापौरांसह सहा पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्यात आली. सोशल मीडियावर प्रचार करण्याऱ्या उमेदवारांनी परवानगी घ्यावी लागणार आहे. निवडणुकीसाठी २६ हजार ८९२ कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर काढण्यात आली आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पोस्टल मतदानाची सोय करण्यात येणार आहे. सैनिकांसाठी ईटीपीबीएस सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. शिरोळ, इचलकरंजी, करवीर, हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त गावातील एक लाख ४६ हजार मतदारांना डुप्लिकेट मतदान ओळखपत्रे तयार करण्यात आली असून त्याचे वाटप करण्यात येत आहे. यंदाच्या निवडणूकीत सखी व आदर्श मतदान केंद्र ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक, अशा दहा मतदान केंद्रे फक्त महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहेत. उमेदवाराकरिता खर्चाची मर्यादा २८ लाख रुपये निश्चित करण्यात आली असून खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी दहा हजार रुपये तर अनुसुचित जाती जमाती उमेदवारांसाठी पाच हजार रुपये डिपॉझिट निश्चित केली आहे.'

पत्रकार परिषदेला पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.

नवरात्रात हॉटेलसाठी अर्धा तास वाढ

हॉटेल मालक संघाच्या विनंतीवरुन नवरात्र उत्सवात पर्यटक आणि भाविकांची सोय व्हावी, यासाठी हॉटेल सुरु ठेवण्यासाठी अर्धा तासाची वेळ वाढवण्यात आली आहे. नवरात्र उत्सव वगळता हॉटेल, बार, परमिट रुम रात्री साडेदहा वाजता बंद करण्यात येतील. पण नवरात्र उत्सवात फक्त हॉटेलला रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली.

१०

जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ

३३४०

एकूण मतदान केंद्रे

७०

संवेदनशिल मतदान केंद्रे

२६,९८२

एकूण कर्मचारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठााला ‘आयएसओ’ मानांकन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विद्यार्थी केंद्रित उपक्रम, गुणवत्ता, संशोधन आणि मुदतीत परीक्षा निकाल जाहीर करण्याची परंपरा जपत उच्च शिक्षणात वेगळेपण निर्माण केलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. जागितक पातळीवर उत्कृष्टतेचा मापदंड निश्चित करणाऱ्या 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅडर्डायझेशन'या संस्थेकडून 'आयएसओ ९००१:२०१५'मानांकनांचे प्रमाणपत्र शनिवारी विद्यापीठाला प्रदान करण्यात आले. असे मानांकन मिळविणारे हे राज्यातील पहिले तर देशातील चौथे विद्यापीठ ठरले आहे. 'आयएसओ प्रमाणपत्रामुळे विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण वाटचाल पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाली'असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रशासन, अभ्यासक्रमांची रना व निर्मिती, अध्ययन अध्यापन पक्रियेतील वेगळे प्रयोग, परीक्षाविषयक कार्यपद्धती, संशोधन प्रकल्प, नवतंत्रज्ञानाचा अवलंब या बाबींची पाहणी करुन प्रमाणपत्र मिळाले आहे. नजीकच्या काळात होणाऱ्या 'नॅक'पाहणीच्या अनुषंगाने हे प्रमाणपत्र महत्वपूर्ण ठरल्याचेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने (आयक्यूएसी) महत्वपूर्ण भूमिका बजावली. प्रमाणपत्र वितरणावेळी प्र-कुलगुरू डी. टी. शिर्के, कुलसचिव विलास नांदवडेकर, आयक्यूएसीचे संचालक आर. के. कामत, ट्यू सूद साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील जोशी, सहाय्यक व्यवस्थापक अनिल साळवी, कोल्हापूर विभागाचे शाखाधिकारी सुजित पाटील उपस्थित होते.

दरम्यान आयएसओ मानांकनापुरतीच ही प्रक्रिया थांबणारी नाही. तर या कंपनीकडून वर्षातून दोनदा विद्यापीठाचे मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने ३७ तज्ज्ञ तपासणींची नियुक्ती केली आहे असे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, डॉ. पी. डी. राऊत, डॉ. नमिता खोत, डॉ. डी. के. गायकवाड, सहाय्यक कुलसचिव वैभव ढेरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रणिती शिंदेंकडून आचारसंहिता भंग?

$
0
0

मतदारांना मेकअप बॉक्सचे वाटप; नरसय्या आडम यांची आचारसंहिता भंगाची तक्रार

सोलापूर :

राज्यभरात शनिवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झालेली असताना सोलापुरात पहिल्याच दिवशी माजी आमदार नरसय्या आडम यांनी शहर मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटप करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी आमिष म्हणून मेकअप बॉक्सचे वाटप केले. दुपारी आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही बॉक्स वाटप झाल्याचा आरोप आडम यांनी केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मात्र, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मेकअप बॉक्सचे वाटप केल्याचे म्हटले आहे. शिवाय पक्षाने अजून माझी उमेदवारी ही जाहीर केलेली नाही, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, 'पोलिस आणि संबंधित अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतील,' असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी म्हंटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लांबणीवर

$
0
0

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लांबणीवर

सातारा :

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसोबत सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा न केल्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोटनिवडणूक कधी होणार, अशी उत्सुकता सातारकरांना लागून राहिली आहे.

उदयनराजे भोसले राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर विधानसभा निवडणुकीबरोबर पोटनिवडणूक लागेल, असे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. विधासभेसोबत पोटनिवडणूक घेण्याची अट उदयनराजेंनी ही घातली होती. मात्र, शनिवारी आयोगाने सातारा पोटनिवडणुकीची घोषणा केली नाही. भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून पोटनिवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली होती. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश

$
0
0

तीन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश

कराड :

शिवसेनेचे पाटण तालुक्यातील आमदार शंभूराज देसाई यांच्या बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यासह सातारा जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांवर गत वर्षीच्या गळीत हंगामातील एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. तीन कारखान्यांनी मिळून एकूण २३ कोटी ५९ लाख ४१ हजार रुपये थकीत ठेवले आहेत. जप्ती आदेशामध्ये ग्रीन पॉवर शुगर्स, शरयू अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिकवा, पवारांचं आवाहन

$
0
0

सातारा: स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशकडून भारतावर हल्ले झाले. साताऱ्यातील जवानांनी हे हल्ले परतवून लावले. महाराष्ट्र घडवणारे यशवंतराव चव्हाणही याच मातीतले आहेत. त्यामुळे हा जिल्हा विचारांशी कधीच प्रतारणा करणार नाही, असं सांगतानाच ज्यांनी विचारांशी प्रतारणा केली त्याला धडा शिकवा, असं आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना पराभूत करण्याचा अप्रत्यक्ष इशाराही दिला. तसेच विधानसभाच नव्हे तर साताऱ्याची लोकसभेची जागाही जिंकायची आहे. कामाला लागा आणि विजयानंतर गुलाल उधळायला बोलवा, असंही पवार म्हणाले.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी साताऱ्यात विराट सभा घेऊन उदयनराजे यांच्या साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. पवारांनी आधी साताऱ्यात जोरदार रॅली काढली. त्यानंतर पार पडलेल्या सभेत बोलताना पवार यांनी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर शरसंधान साधलं. विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिकविण्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. ज्यांनी विचारांशी प्रतारणा केली, त्यांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, असं सांगतानाच ज्यांच्या हातात सत्ता आहे ते शेतकऱ्यांना कवडीची किंमत देत नाहीत. काळ्या आईशी इमान राखणाऱ्यांना जर हे मदत करत नसतील तर यांना सत्तेतून खाली खेचण्याची गरज आहे, असं पवार म्हणाले.


चुकीच्या हातात महाराष्ट्र जाऊ देणार नाही

मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. आम्ही तरुणांच्यापाठी ताकद उभी करावी, असं लोकांचं मत आहे. त्यामुळे आम्ही तरुणांच्या पाठी ताकद उभी करणार! मी २० तास काम करेल, पण चुकीच्या लोकांच्या हातात महाराष्ट्र जाऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.


गुलाल उधळायला बोलवा

येत्या २१ तारखेला मतदान आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसह लोकसभाही जिंकायची आहे. आता साताऱ्यात गुलाल उधळायलाच मला बोलवा, असं आवाहन करत पवारांनी उदयनराजेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.

स्वाभिमानाचा इतिहास कुठाय?

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा इतिहास निर्माण केला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज दिल्लीला गेले. पण औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा उचित सन्मान केला गेला नाही. महाराज तिथून परत आले. त्यामुळे त्यांना आग्र्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले. मात्र महाराजांनी परत येऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि आता…?, असा सवाल करत उदयनराजेंनी स्वाभिमान गहाण टाकल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाज्या पाच रुपयांनी महागल्या

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भाजी मंडयात भाज्यांची मोठी आवक झाली असून पितृ पंधरवड्यामुळे भेंडी, दोडका, गवारी, चवळी शेंग, काळ्या बियांचा घेवडा, मोहोर यांना मोठी मागणी असून या भाज्यांच्या दरात प्रतिकिलो पाच रुपयांनी वाढ झाली आहे.

पितृ पंधरवडा निम्म्यावर आला असून आठवडाभर महालय सुरू राहणार आहेत. भाज्यांची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. कांद्याची आवक घटल्याने दर ५० ते ५५ रुपयांवर स्थिर आहे. लसूण प्रतिकिलो २०० ते २२० रुपये दर कायम आहे. भेंडी, दोडक्याचा दर प्रतिकिलो साठ ते ८० रुपये असून गवार, चवळी शेंग, काळ्या बियांचा घेवडा, श्रावण घेवड्याचा दर प्रतिकिलो ८० रुपये आहे. कोबी गड्ड्याच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. १५ ते ३० रुपये कोबी गड्ड्याचा दर आहे. फ्लॉवर गड्ड्याचा दर २० ते ४० रुपये असून टोमॅटोचा दर प्रतिकिलो १० ते २० रुपये दर होता. पालेभाज्यांची आवक मोठी झाली असून मेथी, पोकळा, कोथंबिर, शेपू, पालक, करडा पेंडीचे दर १० रुपये होता. सफरचंद, डाळिंबाची आवक झाली असून सफरचंदाचा दर प्रतिकिलो १०० ते १५० रुपये इतका आहे. डाळिंबा दर प्रतिकिलो ३० ते ८० रुपये असून ग्राहकांची फळांना मागणी वाढली आहे. पेरु, मोसंबीचे बाजारात आगमन झाले आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ६०

टोमॅटो : १० ते २०

भेंडी : ६०

ढबू : ४०

गवार : ८०

दोडका : ५० ते ६०

कारली : ६०

वरणा : ४० ते ६०

हिरवी मिरची : ४०

फ्लॉवर : १५ ते ४० (प्रति गड्डा)

कोबी : १५ ते ३० (प्रति गड्डा)

बटाटा : २०

लसूण : २०० ते २२०

कांदा : ४० ते ५५

आले :१०० ते १२०

पडवळ : १५ ते २० (प्रति नग)

मुळा : १० ते १५ (प्रति नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : १०

कांदा पात : १०

कोथिंबीर : १०

पालक : १०

शेपू :१०

करडा : १०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १०० ते १६०

डाळिंब : ३० ते ८०

केळी : ३० ते ६० (डझन)

जवारी केळी : २० ते ६० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनता बझारप्रकरणी गुन्हे दाखल करा’

$
0
0

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पा कुंभार जनता सेंट्रल को ऑपरेटिव्ह स्टोअर्स जनता बझारमधील अपहाराप्रकरणी अध्यक्ष, संचालक आणि डिझेल विभाग प्रमुखावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुरेश पोवार यांनी जिल्हा उप निबंधकांची भेट घेऊन केली. जिल्हा उप निबंधकांना निवेदन दिले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, संस्थेच्या अध्यक्ष व डिझेल विभाग प्रमुखाने स्वत:च्या खासगी वापरासाठी १० लाख १८ हजार ५०० रुपयांचा अपहार केला. बांधकाम समितीकडून रेवणसिद्ध मंजूर संस्थेला तीन लाख ३० हजार रुपये रक्कम दिली. वकिलांना कोर्ट खर्चासाठी कोणतीही पावती न घेता चार लाख ७५ हजार रुपये दिले. तसेच जनता सहकारी बँकेतून वेळोवेळी १० लाख १८ हजार ५०० रुपयांची उचल केली. या अपहार प्रकरणी अध्यक्ष उदय पोवार यांसह सर्व संचालकांची चौकशी करावी. निवेदनावर सुरेश पोवार, अरविंद साळोखे, योगेश शेटे, उत्तम पवार यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केडीसीसी’च्या माऊली योजनेत ३०८ कोटींच्या ठेवी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापूर आणि सणासुदीच्या दिवसातही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माऊली ठेव योजनेत तब्बल ३०८ कोटींच्या ठेवी जमा झाल्या. बँकेने आषाढी वारीचे औचित्य साधून एक जुलैपासून माऊली ठेव योजना सुरु केली. ३१ डिसेंबरपर्यंत या योजनेची अंतिम मुदत आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ए. बी. माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे की, गेल्यावर्षी वसंत वर्षा ठेव योजनेत तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल ३५० कोटींच्या ठेवी जमा झाल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षी बँकेने ३२ कोटीचा तोटा सहन करून १७४४ कोटी ३७ लाख रुपयांचे पीक कर्ज व ३७७ कोटी पाच लाख रुपये मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा केला आहे. बँकेने पीक कर्ज पुरवठ्यामधून शेतकऱ्यांनी १३३.५३ लाख मे.टन ऊस उत्पादित केला. यातून ३६०५ कोटी रुपये उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले. या उत्पन्नातील जिल्हा बँकेकडे फक्त १९ टक्के एवढ्याच ठेवी आल्या. जर शेतकऱ्यांनी जास्त ठेवी बँकेत ठेवल्या तर सहा हजार कोटींचा ठेव इष्टांक कधीच पूर्ण झाला असता. बँक देशात एक नंबरला आली असती. शेतकरी, ग्राहक, ठेवीदार, संस्था, हितचिंतक या सगळ्यांच्या विश्वासावर बँक राज्यात नंबर एक ठरली आहे. याबाबत बँकेने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवबानाना पार्कमध्ये कचऱ्याचे ढीग

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कचरा कोंडाळे नाहीत आणि अॅटो टिपर येत नसल्याची सबब पुढे करत जीवबा नाना पार्कमध्ये प्लास्टिक, शिल्लक अन्न आणि अन्य कचरा थेट रस्त्यावरच टाकला जात आहे. रस्त्यावर टाकलेला कचरा उंचावरून येणाऱ्या सांडपाण्यामुळे थेट कळंबा तलावात मिसळण्याची शक्यता आहे. नागरिकांची यातून बेपर्वाई दिसून येत असताना महापालिकेसह कळंबा ग्रामपंचायनेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. हा कचरा तलावात येण्याची शक्यता असल्याने पाणी प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.

बापूराम नगर बीएड कॉलेजपासून जीवबा नाना जाधव पार्काची हद्द सुरू होते. या पार्कचा भाग असलेल्या नंदनवन पार्क व कृष्णकृपा अपार्टमेंटमध्ये सुमारे ३० ते ३५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथे कचरा टाकण्यास कंटेनर नसल्याने आणि घरोघरी कचरा संकलन करणारी टीपर येत नसल्याने नागरिक बिनदिक्तपणे प्लास्टिक पिशव्या, घरातील शिल्लक अन्नपदार्थ रस्त्यावर टाकून देत आहेत. त्यामुळे उंचावरील या दोन्ही ठिकाणी कचऱ्याचा ढीग साचला आहे. त्यावरच पुन्हा कचरा टाकला जात आहे. कचऱ्याभोवती भटकी कुत्र्यांचा वावर वाढला असूना दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात सुटली आहे. उंचावर टाकलेला कचरा मोठ्या पावसात थेट गटारीतून कळंबा तलावात येण्याची शक्यता आहे.

उघड्यावर टाकलेल्या कचऱ्याची निर्गत महापालिका व कळंबा ग्रामपंचायतीने करायला हवी. मात्र, परिसरातील अपार्टमेंटधारकही याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसते. अपार्टमेंट बांधताना परवानगी घेताना कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे हमीपत्र घेतले जाते. महापालिका सातत्याने ओला व सुका कचरा वेगळा करण्याबरोबरच उघड्यावर कचरा टाकू नका असे आवाहन करते. पण अपार्टमेंट्स व नंदनवन पार्कातील काही कुटुंबांनी आवाहनाची पूर्णपणे वासलात लावली आहे. दोन्ही ठिकाणी महापालिकेच्या हद्दीत असली तरी कचरा कळंबा हद्दीतील रस्त्यावर टाकला जात आहे. याबाबत ग्रामपंचायतीने नागरिकांना अटकाव करण्याची आवश्यकता असताना पदाधिकारी त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. दिवसेंदिवस कचरा रस्त्यावर टाकला जात असताना त्याकडे ग्रामपंचायत आणि महापालिका दोन्ही घटक दुर्लक्ष करत आहेत.

नागरिकांना येथील रस्त्यावर कचरा टाकू नका अशी सूचना अनेकवेळा केली. पण नागरिक उलट प्रश्न करून वादावादी करीत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीलाही कल्पना दिली. पण कोणीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही.

- संदीप जाधव, कळंबा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images