Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उदयनराजेंच्या विरोधात कोण? राष्ट्रवादीकडून पर्यायांची चाचपणी

$
0
0

सातारा : उदयनराजे भोसले यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे, तसे संकेत ही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे उदयनराजेंच्या विरोधात कोणता उमेदवार रणांगणात उतरवायचा? याची चाचपणी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सुरू झाली आहे. सद्यस्थितीत माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते आदींची नावे चर्चेत आहेत. चारही नेते दिग्गज असून, त्यापैकी एकास रणांगणात उरतविल्यास लोकसभेचा सामना चुरशीचा होणार आहे.

एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना ५ लाख ७९ हजार २६ तर प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांना ४ लाख ५२ हजार ४९८ मते मिळाली होती. उदयनराजेंच्या मताधिक्‍यामध्ये प्रथमच अडीच लाख मतांची घट झाली होती. त्यामुळे विजयी होऊन देखील उदयनराजेंनी गुलाल उधळा नव्हता. दुसऱ्या बाजूला सातारा लोकसभा मतदारसंघ १९९६चा अपवाद वगळता कायम कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा गड राहिला आहे. मात्र, आता उदयनराजे भाजपमधून निवडून येऊन दुसऱ्यांदा अपवाद घडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उदयनराजेंच्या निमित्ताने कोणत्याही परिस्थितीत साताऱ्याचा गड काबिज करण्याचे भाजपचे मनसुबे आहेत.

राजेंच्या भाजपप्रवेशामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली आहे. शरद पवार साताऱ्याचा गड सहजासहजी भाजपच्या ताब्यात जावू देणार नाहीत. लोकसभा मतदारसंघापैकी सातारा विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे प्राबल्य अद्याप कायम आहे. वाईत मकरंद पाटील, कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे, कराड-उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील आणि पाटणमध्ये माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आहे. कराड-दक्षिणमध्ये भाजपने शिरकाव केला असला तरी त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाची एकत्रित ताकद आघाडीच्या उमेदवाराला चांगल्या प्रमाणात मताधिक्‍य देऊ शकते. त्यामुळे उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी आगामी पोटनिवडणूक म्हणावी तेवढी सोपी असणार नाही. तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून निवडणूक लढविताना जेवढे परिश्रम घ्यावे लागले, त्यापेक्षा अधिक परिश्रम उदयनराजेंना घ्यावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेनऊ हजार कुटुंबे बेघर

$
0
0

भीमगोंडा देसाई, कोल्हापूर: गेल्या महिन्यात आलेल्या महापूर आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ९ हजार ५४२ घरे पूर्णपणे कोसळली. यामुळे संबंधित कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. याशिवाय ३१ हजार ४९२ घरांची पडझड झाली आहे. महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यंत्रणेतर्फे केलेल्या पंचनाम्यातील अंतिम अहवालातून हे चित्र समोर आले आहे. दरम्यान, या घरांच्या पुर्नबांधणीसाठी अनुदान देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५५४ कोटी ६५ लाखांची मागणी जागतिक बँकेकडे केली आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील महापुरामुळे हातकणंगलेतील पाच, शिरोळ तालुक्यातील १८, गगनबावड्यातील एक, करवीर तालुक्यातील तीन अशी २७ गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. या गावांतील मातीची सर्व घरे जमीनदोस्त झाली. याशिवाय ३१८ गावे पूर आणि अतिवृष्टीने बाधित झाली होती. या गावांतील घरांची मोठ्या संख्येने पडझड झाली. शहरातील अनेक वसाहतीमध्ये पंचगंगा नदीचे पाणी घुसले. येथीलही खापऱ्यांची घरे पूर्णपणे पडली आहेत. शहरातील आणि गावनिहाय पडझडीचा पंचनामा प्रशासनातर्फे करण्यात आला. प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामा केल्यानंतर ३१ हजार ४९२ घरांची पडझड तर ९ हजार ५४२ घरे पूर्णपणे कोसळली असल्याचे स्पष्ट झाले.

घर पूर्णपणे पडल्याने संबंधित कुटुंबांतील सदस्यांवर जवळचे नातेवाईक किंवा भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. सामान्य, गरीब घटकांतील कुटुंबे अधिक असल्याने नवीन घर बांधण्यासाठी पैसे उभा करणे त्यांना अडचणीचे झाले आहे. सरकारकडून आर्थिक मदत मिळाली तरच त्यांचे घर उभा राहणार आहे. त्यांना अर्थसहाय करण्यासाठी सध्या पैसे नसल्याने राज्य सरकारने जागतिक बँकेकडे हात पसरले आहे. मात्र बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर नुकसानग्रस्त कुटुंबांना पैसे मिळण्यास विलंब होणार आहे. आता विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागेल. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक निवडणुकीत व्यस्त राहणार आहेत. प्रशासनही निवडणुकीच्या कामात असेल. यामुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक मदत मिळण्यासंबंधी पाठपुरावा करण्याला मर्यादा येणार आहे. म्हणून नवीन सरकार आल्यानंतरच घर बांधण्यासाठी अनुदान मिळण्याची शक्यता आहे. परिणामी संबंधित कुटुंबांचा भाड्याच्या घरातील मुक्काम वाढणार आहे.

घरकुल योजनेतूनही लाभ

महापूर, अतिवृष्टीमुळे पडझड झालेली घरे नव्याने बांधणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रधानमंत्री (शहरी आणि ग्रामीण), शबरी, रमाई अशा घरकुल योजनेतूनही अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसह राज्य आणि केंद्र आपत्ती प्रतिसाद निधीतून आर्थिक मदत मिळण्यासाठी बाधित कुटुंब पडझड झालेल्या घरात रहात नसावे, ग्रामसेवक, तलाठी यांचा संयुक्त पंचनाम्याचा अहवाल असण्याची अट घातली आहे.

सर्वाधिक शिरोळ तालुक्यात

तालुका पूर्ण पडलेल्या घरांची संख्या, पडझड झालेल्या घरांची संख्या

हातकणंगले १६५३ २१४३

शिरोळ ५४१४ ५८६१

पन्हाळा ९६ २६६१

शाहूवाडी ३२ ८६८

राधानगरी ४३ १४८०

गगनबावडा २ २३९

करवीर १०२६ ४३६३

कागल २३७ ३४६५

गडहिंग्लज ६५४ ४८१९

भुदरगड २३ १३२५

आजरा २९ १७४३

चंदगड ३३३ २५२५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपुरातील ‘त्या’ शाळेला नोटीस

$
0
0

.......

लोगो मटा इम्पॅक्ट

.......

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

शिक्षिकेशी अश्लील कृत्य केल्याचा ठपका ठेवून पहिलीतील विद्यार्थ्याला काढून टाकणाऱ्या शाळेला शिक्षण विभागाने नोटीस बजावून सविस्तर अहवाल देण्यास सांगितले आहे. शिक्षण विभागाच्या पथकाने तातडीने या शाळेला भेट देऊन घडल्या प्रकाराची चौकशी केली.

पंढपूरमधील इंग्रजी माध्यमाच्या एका खासगी शाळेने इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या एका मुलाला खोडकरपणा, मुलींची छेडछाड आणि शिक्षिकेशी अश्लील व लाजिरवाणे कृत्य केल्याचा ठपका ठेवत शाळेतून काढून टाकले होते. शाळेच्या या कारवाईने मुलाचे पालक आणि चिमुरड्या मुलाला मोठा मानसिक धक्का बसला होता. कायदा धाब्यावर बसवून धडधडीतपणे केलेल्या या मनमानी कारभाराचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला.

पहिलीतील मुलाची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीचा विचार न करता आरोप ठेवल्याने संबंधित कुटुंब खचून गेले होते. शाळेचा हा प्रताप 'महाराष्ट्र टाइम्स'ने समोर आणल्यानंतर शिक्षण विभागाचे पथक तातडीने शाळेत चौकशीसाठी मंगळवारी गेले. या सर्व प्रकारचा अहवाल शाळेकडून मागविण्यात आला आहे.

पहिलीच्या मुलावर ठेवलेल्या या आरोपानंतर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. 'इतक्या लहान वयात मुलाची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढ झालेली नसते. त्याच्याकडून एखादे कृत्य घडले असले तरी ते निरागस भावनेतून घडलेले असते,' असे मानसोपचार तज्ज्ञ विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे.

'मुलाला पुन्हा सन्मानाने शाळेत घेईपर्यंत हा लढा सुरूच ठेवू,' असे मुलाच्या वडिलांनी सांगितले.

'शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढता येत नाही. तरीही या मुलाचे नाव कसे कमी केले, असा सवाल शाळा प्रशासनाला केला आहे. पहिलीचा विद्यार्थी शिक्षिकेशी अश्लील कृत्य कसे करू शकतो, याचीही विचारणा केली आहे. घाणेरडे आरोप ठेवून विद्यार्थ्याला शाळेतून काढणे बेकायदा असून, त्याला तातडीने पुन्हा शाळेत घेण्याचे आदेश देणार आहोत.'

संजयकुमार राठोड, जिल्हा शिक्षण अधिकारी, सोलापूर

......................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरप्रशासनाची लगीनघाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाची लगीनघाई सुरू झाली आहे. जिल्हानिहाय तयारीच्या आढाव्यासाठी आज, बुधवारी मुंबईत बैठक होत आहे. बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर आचारसंहिता लागू होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभेसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली आहे. यादी उपलब्ध करून घेत इच्छुक उमेदवारांनी गठ्ठा मतदार असलेल्या भागात संपर्क वाढवला आहे. प्रशासनाने मतदानासाठी आवश्यक इव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांची चाचणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मतदारसंघनिहाय मतदान केंद्र निश्चित केले आहे. पोलिस प्रशासनाशी समन्वय ठेवत संभाव्य संवेदनशील केंद्रांची यादी निश्चित केली जात आहे. आचारसंहिता लागू होताच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याची तयारी पूर्ण केली आहे. तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीच्या ठिकाणी नवे अधिकारी रूजू झाले आहेत. आचारसंहिता लागू होण्याआधी विकासकामांची प्रशासकीय मान्यता घेण्याची धांदल सुरू राहिली. जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासनाची यासाठी धावपळ दिसत आहे. प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी स्वत: आमदार जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पाठपुरावा करीत आहेत. दोन दिवसांत आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके यांनी अतिरिक्त जिल्हाधिाकरी नंदकुमार काटकर यांची भेट घेऊन विकासकामांबाबत पाठपुरावा केला. विरोधी पक्षांसह विविध संघटनांतर्फे निवेदन, निदर्शने, आंदोलन करण्याचे प्रमाण चार दिवसांपासून वाढले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी देसाई यांनी सायंकाळी एक तास स्वत: जिल्हा निवडणूक कार्यालयात बसून मुंबईच्या बैठकीसाठीची सविस्तर माहिती तयार करून घेतली. निवडणूक उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांच्याकडून अचूक माहितीचे पॉवर पाईंट प्रेंन्झेटेशन तयार करून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा सुरळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिंगणापूर योजनेच्या जलवाहिनीला लागलेल्या दोन गळतीपैकी एक गळती दुरूस्त करत मंगळवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत केला. जमिनीखालील विद्युत केबलमुळे विद्युतपुरवठा बंद करावा लागणार असल्याने गणेश कॉलनीतील गळती न काढताच महापालिकेच्यावतीने पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे गळतीवाटे आजही गटारीतून पाणी वाहून जात आहे. दरम्यान सकाळच्या भागात पाणी न आलेल्या ठिकाणी १२ टँकर फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

आठ दिवसांपासून शिंगणापूर योजनेच्या जलवाहिनीला चंबुखडी परिसरातील दत्त कॉलनी व गणेश कॉलनी येथे गळती लागली आहे. दुरुस्तीसाठी शहर पाणीपुरवठा विभागाने शटडाऊन घेतले होते. सोमवारी दिवसभर जेसीबी मशीन व दहा कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केली. मात्र गणेश कॉलनी येथे भूमिगत विद्युत केबल असल्यामुळे दुरुस्ती करण्यासाठी विद्युतपुरवठा बंद करण्याची आवश्यकता होती. त्याबाबत महावितरणला महापालिकेने पत्रव्यवहार केला आहे. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही गळती न काढताच मंगळवारी पहाटेपासून पाणी उपसा सुरू करण्यात आला.

सकाळच्या सत्रात होणारा पाणीपुरवठा होऊ शकला, नसला तरी दुपारच्या सत्रात पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला. ज्या भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही त्या भागात टँकरद्वारे पाणी पुरविण्यात आले. कळंबा फिल्टर हाउस येथून नऊ व कसबा बावडा फिल्टर हाउस येथून तीन अशा १२ टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीता खाडे यांचा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठविला आहे.

वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र त्या भाजपच्या संपर्कात असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, गेले काही महिने त्या जिल्हा राष्ट्रवादीमधील घडामोडींवरुन नाराज होत्या. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या त्या निकटवर्तीय समजल्या जातात. दहा वर्षे त्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

सध्या त्यांच्या सदस्यपदाचा कार्यकाल संपला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या जिल्हा नेतृत्वावर नाराज होत्या. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्या पक्षात कार्यरत होत्या. प्रदेश सरचिटणीस, उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. पक्षाचे जिल्हा कार्यालय गेली वीस वर्षे त्यांच्या निवासस्थानानजीकच्या जागेत होते. त्या खोल्यांची डागडुजी करायची असल्यामुळे कार्यालय अन्यत्र हलवावे, असेही त्यांनी पक्षाला कळविले होते. त्यांच्या जागेतील कार्यालय पक्षाने अन्यत्र हलविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट ....

$
0
0

कोट

'दोन्ही काँग्रेसच्या नेते मंडळींनी शिरोळची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात येईल असे सांगितले आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची काँग्रेस आघाडीबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. स्वाभिमानी संघटनेची सुरुवात शिरोळ तालुक्यातून झाली आहे. यामुळे हा मतदारसंघ आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे.

सावकार मादनाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदाधिकाऱ्यांकडील प्रतिनियुक्त्या रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे प्रतिनियुक्तीवर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द होणार आहेत. सात कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर मुख्यालयात नियुक्ती झाली होती. त्यांच्यासह विविध विभागांत प्रतिनियुक्तीवर असलेल्या अन्य ३१ कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. सीईओंनी स्वाक्षरीनंतर त्या कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द होऊन मूळ ठिकाणी त्यांना हजर व्हावे लागणार आहे. ३१ पैकी काही कर्मचारी हे पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील आहेत. जि.प. सर्वसधारण सभेत प्रतिनियुक्तीवर मुख्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचा ठराव केला होता. यामध्ये सामान्य प्रशासन विभाग व आरोग्य विभागातील १४, वित्त विभाग, ग्रामपंचायत विभाग आणि महिला बाल विकास विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यापैकी काही नियुक्त्यांना विभागीय आयुक्तांची मान्यता नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादीचा कार्यभार सध्या तात्पुरत्या जागेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासाठी राजारामपुरी येथे जागा निश्चित केली आहे. मात्र, तेथे फर्निचर व कार्यालयासाठी आवश्यक अन्य बाबींची पूर्तता करण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत जिल्हा कार्यालयाचे कामकाज पक्षाचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्या कार्यालयातून चालणार आहे. मार्केट यार्ड समोरील परिसरात कार्याध्यक्ष साळोखे यांच्या मालकीचे कार्यालय आहे. तेथे जिल्हा कार्यालयाचे संपूर्ण साहित्य हलविले आहे. ताराबाई पार्क येथील कार्यालय सध्या त्या ठिकाणी स्थलांतरित केले आहे. पक्षाच्या स्थापनेपासून ताराबाई पार्क येथील पक्षाच्या महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांच्या निवासस्थानी नजीकच्या जागेत कार्यालय होते. पक्षाने कार्यालय बांधणीसाठी जुना पुणे, बेंगळूर रोडवर जागा घेतली आहे. त्या ठिकाणी दहा वर्षांपूर्वी कार्यालय बांधण्याची चर्चा झाली. पण चर्चेपलीकडे काही घडले नाही. यामुळे पक्षावर आता कार्यालयासाठी जागा शोधण्याची वेळ आली. दिवाळीच्या अगोदर अथवा नंतर राजारामपुरी सहावी गल्ली येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्याचे पक्षाचे नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजना स्मरणपत्र

$
0
0

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कॉलेजमधील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची माहिती मागविली होती. मात्र सांगली जिल्ह्यातील अनेक कॉलेजनी मुदतीत माहिती दिली नसल्याचे समोर आले आहे. विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून कॉलेजना संबंधित आवश्यक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याबाबत मंगळवारी पुन्हा कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्टरबाजी

$
0
0

कोल्हापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी पोस्टर झळकावली आहेत. ‘मी पुन्हा येणार तुमच्या कोंबड्या चोरताना पाहायला’, ‘पक्षात येताय की ईडी पाठवू, ज्यांचे नाव घेऊन सत्तेत आले त्यांचेच किल्ले विकायला काढले, हे माझे सरकार’ या आशयाचे हे पोस्टर संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले. रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात ही पोस्टरबाजी केली. या पोस्टरच्या माध्यमातून राष्ट्रवादीनं फसवी कर्जमाफी, कडकनाथ कोंबडी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. ‘जादूगार मोदी आले, जादूची कांडी फिरवली आणि सगळं बदलून गेलं’ अशी उपरोधिक टीकाही केली आहे. ‘मी पुन्हा येणार फसवी कर्जमाफी द्यायला, तुम्ही पुरात बुडा आम्ही सेल्फी घेणार’ या पोस्टरच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला.
71165879

सध्या कोल्हापूर आणि सांगली परिसरात कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण गाजत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या विषयावरून कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच, त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. सोमवारी पलूस तालुक्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कोंबड्या फेकत निषेधही केला होता. मात्र भाजप सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. सरकारच्या या धोरणावर टीका करताना ‘मी पुन्हा येणार तुमच्या कोंबड्या चोरताना पाहायला’ असे फलक लावले आहेत. मंगळवारी सकाळी हा प्रकार पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आला. महाजनादेश यात्रेच्या मार्गावरील हे सगळे पोस्टर पोलिसांनी यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वीच हटविले.
71165900

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विटा -वाळूज एसटीला अपघात; ३८ विद्यार्थी जखमी

$
0
0

सांगली: विटा आगाराची विटा- वाळूज या एसटीबसला अपघात झाल्याची घटना आज साकाळी घडली. या अपघातात ३८ शालेय विद्यार्थी जखमी झाले आहेत. एस टी बुधवारी सकाळी देवनगर परिसरातील एका वळणावर पलटी झाली. समोरुन येणार्‍या वाहनाला जागा देण्याच्या प्रयत्नात एसटीचालकाचा एसटीवर ताबा सुटला आणि बस रस्त्याकडेला घसरल्यानं हा अपघात झाला.

या अपघातात ३८ शाळकरी मुले किरकोळ जखमी झाल्याचं समोर आले आहे. सर्व जखमी मुलांवर विटा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आमदार अनील बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी रुग्णालयात धाव घेवून जखमींची विचारपूस केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'वंचितला बी टीम म्हणणारे काँग्रेस भाजपचे गुलाम'

$
0
0

कोल्हापूर: वंचित बहुजन आघाडीची मुख्य लढाई भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गिनती करत नाही. बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणारे काँग्रेसवाले हे भाजपचे गुलाम असून त्यांच्या इशाऱ्यावर ते चालतात. ही मंडळी चौकशी आणि केसेस टाळण्यासाठी भाजपात सहभागी होत आहेत, अशी खरमरीत टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात केली.

वंचित बहजन आघाडीची ‘सत्ता संपादन रॅली’बुधवारी कोल्हापुरात दाखल झाली. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिन्स हॅक न झाल्यास वंचित बहुजन आघाडी सत्तेवर येऊ शकते, असा विश्वासही व्यक्त केला. आपण विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचेही स्पष्ट केले.

आंबेडकर पुढे म्हणाले की, सगळे पक्ष सत्तेसाठी सरसावले आहेत, पण सत्ता का, हवी याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. ‘वंचित’ मात्र निश्चित कार्यक्रम घेऊन निवडणूक लढवित आहे. वंचित आघाडीची झेप सत्ता संपादनासाठी आहे. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागा लढविणार आहे. यापूर्वी काँग्रेसला राज्यात निम्म्या निम्म्या जागेचा प्रस्ताव दिला होता. आता मात्र त्यांच्याशी आघाडीसोबत चर्चा करणार नाही. त्यांच्याशी आघाडी करून वंचितचे आम्हाला सँडवीच, फुटबॉल होऊ द्यायचे नाही. राज्यातील लहानसहान पक्षांना सोबत घेऊन सगळ्या जागा लढवू आणि सत्ता संपादन करू. पहिली यादी येत्या आठ दिवसांत जाहीर होईल. पहिल्या टप्प्यात ओबीसी, त्यानंतर मुस्लिम उमेदवारांची यादी जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.

आघाडी एमआयएमने तोडली, आमचे दरवाजे खुले

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या आघाडी तोडण्याच्या टीकेवर आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना सूज्ञपणा आला, चांगली गोष्ट आहे, असा टोला लगाविला. ते म्हणाले की, विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू असताना एमआयएमने आघाडी तोडण्याचे काम केले. मात्र, आघाडीसाठी आमचे दरवाजे कायमचे खुले आहेत. एमआयएम सोबत नसल्यामुळे मुस्लिम मते दुरावणार नाहीत. कारण भाजपला पराभूत करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये उरली नाही. वंचित बहुजन आघाडीच भाजपला रोखू शकतो याची जाणीव मुस्लिम मतदारांना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुधोळ बँकेचे वीरशैव बँकेत विलीनीकरण

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

बँकेचा व्यवसाय आणि वस्तार करण्यासाठी कर्नाटक राज्यातील मुधोळ को-ऑपरेटिव्ह बँकेला वीरशैव बँकेत सामावून घेण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र शेटे यांनी ७८ व्या सर्वसाधारण सभेत केली. त्यांच्या ठरावाला सभासदांनी एकमुखी पाठिंबा दिला. सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची घोषणाही करण्यात आली. बँकेच्या प्रधान कार्यालयात सभा झाली.

अध्यक्ष शेटे यांनी सभासदांना वीरशैव बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, 'बँकेने आर्थिक वर्षात १३२५ कोटीचा उच्चांकी व्यवसाय केला असून ८२५ कोटीच्या ठेवींचा टप्पा पार केला असून ५०१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. प्रतिकुल परिस्थितीत ढोबल एनपीए ४.९५ इतका नियंत्रित ठेवला आहे.' सरव्यवस्थापक अविनाश खोत यांनी नोटीशीचे वाचन केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मांगलेकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभासद रावसाहेब पाटील, सुरेश कु-हाडे, चंद्रशेखर हिरेमठ, सौ लक्ष्मी शिवाजी मालकर, गणेश वाळवेकर, सदाशिव बोधले यांनी विचारलेल्या सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. उपाध्यक्ष अरविंद माने यांनी आभार मानले.

सभेला संचालक नानासाहेब नष्टे, बाबासाहेब देसाई, कल्लेश माळी, राजेश पाटील, गणपतराव पाटील, रत्नमाला घाळी, सूर्यकांत पाटील-बुदीहाळकर, शकुंतला बनछोडे, चंद्रकांत स्वामी, डॉ. दिलीप चौगुले, महादेव साखरे, अनिल सोलापुरे, राजेंद्र लकडे, रंजना तवटे, अनिल स्वामी, सदानंद हत्तरकी, चंद्रकात सांगावकर, आप्पासाहेब आर्वे उपस्थित होते. सभेचे नियोजन उपसरव्यवस्थापक राजेंद्र कोरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उद्यमशीलतेला नव संकल्पनांची जोड द्या’

$
0
0

लोगो : मटा कॉन्क्लेव

कोल्हापूर टाइम्स टीम

'दक्षिण महाराष्ट्रात, कोल्हापुरात शंभर वर्षापूर्वी गारमेंट व्यवसायातून राजर्षी शाहू महाराजांनी उद्यमशीलतेला गती दिली. औद्योगिक क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवून ते अनेक उद्योजकांचे प्रेरणास्रोत बनले. इथल्या उद्योगाचा हा गौरवशाली इतिहास असला तरी त्याची म्हणावी तशी प्रगती झाली नाही, हे वास्तव आहे. सद्यस्थितीत स्थानिक रोजगार निर्मितीवर भर देत उद्यमशीलतेला नव संकल्पनांची जोड देण्याची गरज आहे' असे प्रतिपादन कायनेटिक कम्युनिकेशनचे संचालक आणि आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले. महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने बुधवारी हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार हॉलमध्ये शानदार सोहळ्यात 'मेक इन कोल्हापूर-स्टार्टअप मटा कॉन्क्लेव २०१९'चे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे येथील सावित्राबाई फुले विद्यापीठाच्या इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी औद्योगिक क्षेत्रातील नव्या संधींचा शोध घेताना अभिनव कल्पनांना मूर्त रुप देण्याचे आवाहन केले.

सुमारे अडीच तासांच्या कार्यक्रमात, 'नवसंकल्पनांसोबत नव्या संधींचा शोध घेणेही क्रमप्राप्त आहे. अशा संधींचा मागोवा तरुणांनी घ्यावा, कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास इतर शहरांच्या तुलनेत वेगाने होण्याची गरज आहे. इथल्या औद्योगिक कंपन्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून आपला ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवला. त्याला आणखी जोड मिळायला हवी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक विजय जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. भाग्यश्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

अभिनव कल्पनांना मूर्त रुप द्या

'कोणत्याही व्यवसायात स्टार्टअपसाठी प्रथम समस्यांचा शोध घेतला पाहिजे. त्यांचे निराकरण करण्यासाठी अभिनव कल्पनांची मांडणी हवी. आपल्या कल्पनांना मूर्त रुप देताना बिझेनस मॉडेल तयार करा. आपल्याकडील 'सरस्वती'चे रुपांतर संपत्तीत करण्यासाठी आयटी, सेवा, आरोग्य, वाहतूक, शिक्षण, मनोरंजन आणि व्यापार या क्षेत्रांतील स्टार्टअपच्या विपूल संधी शोधा' असे मत आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले. त्यासाठी मातृभाषा, इंग्रजी भाषेसह अन्य परदेशी भाषा आत्मसात करा असा सल्लाही त्यांनी दिला.

डॉ. शिकारपूर म्हणाले, 'देशातील प्रत्येक व्यक्तीकडे टॅलेंट आहे. या टॅलेंटचा शोध घेतला पाहिजे. टॅलेंटला पाठबळ दिल्यास त्यांच्याकडून अभिनव कल्पना येऊ शकतात. अभिनव कल्पनांना कोणतीही भौगोलिक सीमा नाही. मात्र यासाठी माहितीचे स्रोत निर्माण करता आले पाहिजे. मातृभाषा महत्त्वाची आहेच. सोबत इंग्रजी आणि रशियन, चायनीज, फ्रेंच, जपानी अशा परदेशी भाषांचे ज्ञानही अवगत करण्याची गरज आहे. परदेशी भाषांचे ज्ञान स्टार्टअपसाठी अनिवार्य आहे. त्यातून आपल्याला जागतिकीकरणाचे फायदे अधिक मिळतील. तंत्रज्ञानाचे सर्वच पातळ्यांवर वेगाने एकत्रिकरण होत असल्याने पुढील वीस वर्षांत टॅब, लॅपटॉप अशा वस्तूही इतिहासजमा होतील. सूर्यप्रकाशाच्या गतीने इंटरनेट सुविधा उपलब्ध होऊन संगणक शरीराचा अविभाज्य भाग बनेल. त्यातून संगणकाची व्याख्याच बदलून जाईल. २०२०नंतर आयटी क्षेत्रात मोठे बदल होतील. तंत्रज्ञानातील बदलांतून जीवन अधिक सुलभ होईल. मार्केटमध्ये सातत्याने बदल होत आहेत. ऑफलाइनवरुन ऑनलाइन बिझनेस करताना ग्राहक तुमची वाट पाहणार नाहीत. इंटरनेट व्यवहारातील प्रिन्सिपल्स समाजावून घेऊन वैयक्तिक माहिती मूल्याचे रुपांतर संपत्तीत केले पाहिजे. अन्न व फळ प्रक्रिया, वॉटर ट्रिटमेंट यांसारख्या उद्योगात स्टार्टअपच्या विपूल संधी आहेत. त्याचबरोबर वाहतूक, शिक्षण, सेवा, आरोग्य, मनोरंजन आणि व्यापार क्षेत्रही लाभदायी आहे. स्टार्टअपसाठी समस्यांचा शोध घेत त्या सोडविण्यासाठीची अभिनव कल्पना मांडा. त्याचा व्यवहारात वापर करा. या बिझनेस मॉडेलसाठी भांडवल मिळेल. नफाही मिळू शकेल.'

व्यवसायाला धेय्याची जोड द्या

'स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग क्षेत्र अशा अनेक संस्थांच्या समस्यांचा शोध घेऊन त्यावर उपाय शोधा. समस्यांचा शोध स्टार्टअपसाठी उपयोगी ठरेल. नवउद्योजक होताना उद्योगांतील समस्या कोणत्या? उद्योगांतील कारणे, त्यातील नेटवर्क हे पहा. त्यासाठी मेंटॉर आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया पार पडताना एखादी नाविन्यपूर्ण कल्पना आत्मसात करा. त्या कल्पनेला धेय्याची जोड दिल्यास कोणत्याही उद्योगाच्या स्टार्टअपमध्ये यश मिळेल' असा विश्वास पुणे येथील सावित्राबाई फुले विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी व्यक्त केला.

डॉ. पालकर म्हणाल्या, 'औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी शिक्षण पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. शिक्षण आणि नवी कल्पना हे २१व्या शतकातील चलनी नाणे आहे. नव्या ज्ञानाचे फायद्यात रुपांतर करण्याची आवश्यकता आहे. जेवढ्या मोठी संधी, तेवढे मोठे आव्हानही असते. एखादी नवी कल्पना तुम्हाला यशस्वी उद्योजक बनवू शकते. अर्थात त्यासाठी सातत्याने नवनव्या गोष्टींचा शोध घेण्याचा ध्यास हवा. स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग क्षेत्र यांतून नवी संकल्पना आकाराला येऊ शकते. त्याद्वारे स्टार्टअप सुरू करता येईल. राज्याची लोकसंख्या १२ कोटी आहे. ही लोकसंख्या आपले बलस्थान माना. कोणत्याही प्रॉडक्टची निर्मिती केल्यानंतर राज्याबाहेरील ग्राहकांचा शोध घेण्याची आवश्यकता नाही. देशाच्या जीडीपीमध्ये १५ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. त्यात आपला वाटा वाढवण्यासाठी मशिनरी, इंटरनेट, बीग डेटा अशा क्षेत्रातील नवनव्या उद्योगांना सुरुवात करता येईल. स्टार्टअपपूर्वी त्यातील समस्या, उद्योग सुरू करण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. त्याला संकल्पनेची जोड द्या. संकल्पनेला तंत्राची जोड ही २१ शतकातील सर्वाधिक मूल्य मिळवून देणारी गोष्ट आहे. आपल्याकडील ज्ञानामुळेच टॉर्क मॉर्ट्स, बायज्यू, अरविंद आय केअर, मार्क झुकेरबर्क आदी व्यक्ती, संकल्पना यशस्वी झाल्या.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिपाईपद भरतीचा ठेका देण्याच्या आदेशाची होळी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने बुधवारी बाह्ययंत्रणेतर्फे शिपाई पदाची नियुक्ती करण्यासंबंधीच्या सरकारी आदेशाची होळी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदेशाची होळी करून जोरदार निदर्शने केली. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, २९ ऑगस्ट २०१९च्या सरकारी आदेशानुसार सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने बाह्य यंत्रणेतर्फे शिपाई पुरवण्यासाठी निविदा काढली. यातून मुंबईतील मे. अल्फाकॉम सर्व्हिसेस इंडिया लि. कंपनीला ठेका मिळाला आहे. कंपनीने शिपाई पुरवण्याचा करार केला आहे. त्यामुळे चतुर्थश्रेणी (शिपाई) संवर्गच संपुष्टात येणार आहे. भविष्यातया संवर्गातून वारसा हक्काने, अनुकंपा तत्वाने नोकऱ्या मिळणाऱ्या नाहीत. त्यामुळे बाह्य यंत्रणेकडून शिपाईपदे भरतीस विरोध करण्यास संघटनेचा विरोध आहे.

दरम्यान, शिपाई पद बाह्य यंत्रणेतून भरण्याचा आदेश मागे घ्यावा या मागणीसाठी संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी चतुर्थ श्रेणीचा संवर्ग अडचणीत येण्यासंबंधीच्या आदेशाची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारवर होळी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले, सरचिटणीस महेश पाटील, शिवाजी निकम, गणेश आजगावकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रस्ताव जमेना, तिढा सुटेना

$
0
0

चार सिंगल फोटो

के.पी., ए.वाय, सत्यजित जाधव, जीवन पाटील

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पक्षाची ताकद असूनही नेतेमंडळींतील गटबाजी, सहकारी काँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या हालचाली यामुळे राधानगरी- भुदरगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोंडीत सापडला आहे. 'मेहुणे - पाहुणे' यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. तर काँग्रेसचे माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव यांनी यंदा लढायचेच म्हणून शड्डू ठोकला आहे. मतदारसंघातील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात उमेदवारीचा फैसला होणार आहे. यामध्ये आमदार हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

हा मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. मात्र आघाडी अंतर्गत इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे त्यांची समजूत काढताना नेत्यांची कसोटी लागणार आहे. माजी आमदार के. पी. पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यामधील नाते हे 'मेहुणे - पाहुणे' असे आहे. गेली ३५ वर्षे ते राजकारणात एकत्र आहेत. शिवाय त्यांच्यामध्ये कौटुंबीक नातेसंबंध आहे. मात्र गेल्या काही वर्षात दोघांमध्ये राजकीय वितुष्ट आले. आगामी विधानसभा निवडणूक लढवायची म्हणून दोघेही पाच वर्षांपासून तयारी करत आहेत.

दोघांनीही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली. उमेदवारी आपणालाच मिळेल म्हणून दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकांसमोर मुलाखती दिल्या. त्या मुलाखतीदरम्यान राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पक्ष निरीक्षकांसमोर राधानगरी, भुदरगडसंदर्भात प्रस्ताव मांडला होता. विधानसभेची उमेदवारी के. पी. पाटील यांना तर ए. वाय. पाटील यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमनपद असा हा प्रस्ताव आहे. मात्र ए. वाय. यांनी, हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगत उमेदवारीसाठी दावा कायम ठेवला आहे. दुसरीकडे मुश्रीफ यांचा या दोघांत समेट घडविण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफांची दोघांवरही भिस्त आहे आणि दोघेही मुश्रीफांना जवळचे आहेत. यामुळे तोडगा कसा निघणार याविषयी उत्सुकता आहे.

...

संचालक नसताना चेअरमनपद कसे ?

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नाहीत. त्यांच्या पत्नी अर्चना या संचालकपदी आहेत. ए. वाय. यांनी यापूर्वी संचालकपदी काम केले आहे. २००४ ते २००६ या कालावधीत दीड वर्षे ते चेअरमन होते. आता आमदार मुश्रीफ यांनी चेअरमनपदाचा मांडलेला प्रस्ताव किती कालावधीसाठी आणि कुणासाठी, संचालक नसताना चेअरमनपद कसे ? असा प्रश्न राष्ट्रवादीतील काही मंडळी उपस्थित करत आहेत. मे २०२० मध्ये जिल्हा बँकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

...

काँग्रेस आघाडीतील इच्छुकांमुळे वाढली धास्ती

काँग्रेस आणि राष्ट्रवादीधील आघाडी धर्मानुसार राधानगरी भुदरगड मतदारसंघ हा राष्ट्रवादीला मिळणार आहे. राष्ट्रवादीतून उमेदवारी कुणाला हे ठरायचे बाकी आहे. दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार व तालुक्यातील ज्येष्ठ नेते दिनकरराव जाधव यांचे पुत्र सत्यजित यांनी विधानसभा लढविण्याची घोषणा केली. त्यांनी वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन करत आता थांबायचे नाही असे जाहीर केले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील हे सुद्धा निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे मुलाखत दिली आहे. या सगळ्यांची मोट बांधताना नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या काळात बेरोजगारी वाढली

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक बेरोजगारी वाढली आहे. खोटं, फसवं सरकार सत्तेत आहे. बेकारी, मंदी वाढत असताना मूळ मुद्द्यांवरून तरुणांचे लक्ष वळवले जात आहे. भाजपने केलेली विकासकामे पाहण्यासाठी दुर्बिण घ्यावी लागेल,' अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बेरोजगार यात्रा मेळाव्यात केली. महाराष्ट्र एनएसयूआयच्या वतीने राज्यभरात बेरोजगार यात्रा काढण्यात येत आहे. बुधवारी यात्रचे शहरात आगमन झाले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात शेकडो तरुणांच्या उपस्थितीत मेळावा झाला. एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यावेळी प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, 'प्रगतशील राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामागे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेले औद्योगीकरण कारणीभूत आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने रोजगाराच्या अमाप संधी राज्यात उपलब्ध झाल्या. किंबहुना बाहेरील राज्यातून तरुण नोकरीसाठी महाराष्ट्रात येत होते. गेल्या पाच वर्षात लाखो लोकांचा रोजगार गेला. भाजप सरकार दोन कोटी नोकऱ्या देणार होते. मात्र आहे त्याच नोकऱ्या मंदीमुळे जात आहेत. अनेक तरुणांसमोर शिकून काय करायचे असा प्रश्‍न आहे. बेरोजगारीबाबत तरुणांमध्ये जाणीव जागृती होऊ नये यासाठी मूळ मुद्द्यावरून त्यांचे लक्ष वळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. उद्योगधंदे बंद होत असून महिलांवर अत्याचार वाढत आहेत. धार्मिक विद्वेषाचे राजकारण केले जात आहे. मात्र, त्यावर बोलायला भाजप सरकार तयार नाही. धार्मिक प्रश्न उपस्थित करून जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यावरून विचलित केले जात आहे. '

ते पुढे म्हणाले,' तरुणांनी आता जागे व्हावे. देशात तरुणांची मोठी ताकद आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकत्र यावे. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा समस्यांवर तरुणांनी खुलेआमपणे सरकारला प्रश्न विचारावेत. सरकार व्यवस्थित नसेल तर तरुणांचे करिअर बरबाद होऊ शकते. युवकांनी उघड्या डोळ्याने निर्णय घ्यावा. सोशल मीडियावरील चुकीच्या गोष्टीवरून मत न बनवता त्याची शहानिशा करावी. येणाऱ्या काळात संधी निर्माण करणारे सरकार आल्याशिवाय तरुणाईचे भले होणार नाही. त्यासाठी तरुणांनी काँग्रेस पक्षाला सोबत करावी.'

प्रदेशाध्यक्ष अमीर शेख म्हणाले,' सत्तेवर आल्यावर भाजप सरकार दोन कोटी नोकऱ्या देणार होते. मात्र मंदीमुळे आहे त्या नोकऱ्या टिकविणेही अवघड झाले आहे. देशहितासाठी हे सरकार सत्तेवरून जाणे गरजेचे आहे. याकामी युवकांचे योगदान मोलाचे ठरणार आहे.'

एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सचिन चव्हाण, राहुल माने, दिपक थोरात, बयाजी शेळके, इंद्रजित बोंद्रे, अभिजीत देठे उपस्थित होते. अभिषेक मिठारी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वंचित’ची मुख्य लढाई भाजपशीच: आंबेडकर

$
0
0

कोल्हापूर: ' वंचित बहुजन आघाडीची मुख्य लढाई भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काळजी करत नाही. बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणारे काँग्रेसवाले हे भाजपचे गुलाम असून त्यांच्या इशाऱ्यावर ते चालतात. ही मंडळी चौकशी आणि केसेस टाळण्यासाठी भाजपात सामील होत आहेत,'अशी खरमरीत टिका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात केली.

वंचित बहजन आघाडीची 'सत्ता संपादन रॅली' बुधवारी कोल्हापुरात दाखल झाली. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिन्स हॅक न झाल्यास वंचित बहुजन आघाडी सत्तेवर येऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. आपण विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 'महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये धरणातील पाणी वाटपाविषयी समन्वयाचा अभाव आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी संयुक्त अजेंडा ठरला तर पूरस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल,' असे ते म्हणाले.

अॅड. आंबेडकर म्हणाले, 'सगळे पक्ष सत्तेसाठी सरसावले आहेत, पण सत्ता का हवी याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. 'वंचित' मात्र निश्चित कार्यक्रम घेऊन निवडणूक लढवित आहे. वंचित आघाडीची झेप सत्ता संपादनासाठी आहे. विधानसभेच्या सर्व २८८ जागा आम्ही लढविणार आहे. यापूर्वी काँग्रेसला राज्यात निम्म्या निम्म्या जागेचा प्रस्ताव दिला होता. आता मात्र त्यांच्याशी आघाडीबाबत चर्चा करणार नाही. त्यांच्याशी आघाडी करुन वंचितचे आम्हाला 'सँडवीच, फुटबॉल' होऊ द्यायचे नाही. राज्यातील लहानसहान पक्षांना सोबत घेऊन सगळ्या जागा लढवू आणि सत्ता संपादन करू. उमेदवारांची पहिली यादी येत्या आठ दिवसांत जाहीर होईल. पहिल्या टप्प्यात ओबीसी, त्यानंतर मुस्लिम उमेदवारांची यादी जाहीर करू.'


एमआयएमने आघाडी तोडली

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अॅड. आंबेडकर यांनी टीका केली. ते म्हणाले, 'विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू असताना एमआयएमने आघाडी तोडण्याचे काम केले. मात्र आघाडीसाठी आमचे दरवाजे कायमचे खुले आहेत. एमआयएम सोबत नसल्यामुळे मुस्लिम मते दुरावणार नाहीत. कारण भाजपला पराभूत करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये उरली नाही. वंचित बहुजन आघाडीच भाजपला रोखू शकतो याची जाणीव मुस्लिम मतदारांना आहे. आपल्यावर कुठल्याही प्रकारचे डाग नाहीत. त्यामुळे टीका करण्याचे धाडस कुणी करत नाही. वंचितमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी आतापर्यंत राजकारणात अनेक कोलांटउड्या मारल्या. भटका विमुक्त समाजही त्यांच्यासोबत नाही.'

वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यास ...

उजाला योजनेतील लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरवर १०० रुपये अनुदान

लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता

ओबीसींची जनगणना होणार

मुस्लिम समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्तीसाठी शनिवारी पुन्हा पाणीपुरवठा बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंबुखडी, गणेश कॉलनी येथील शिंगणापूर योजनेतील ११०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने पुन्हा एकदा पाण्याचे संकट उभे आहे. ही गळती शनिवारी (ता. २१) काढण्यात येणार असल्याने शिंगणापूर येथून होणारा पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ए, बी, व 'ई' वॉर्ड आणि त्यास सलंग्न उपनगरां पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी अपुरा व कमी दाबाने होणार आहे.

शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीला सोमवारपासून (ता.१६) दोन ठिकाणी गळती लागली आहे. दत्त कॉलनी येथील दुरुस्ती पूर्ण झालेली असली, तरी गणेश कॉलनी येथील गळती अद्याप निघालेली नाही. या दुरुस्तीला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे शनिवारी पूर्ण तर रविवारी अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. ए व बी वॉर्डातील संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग व शहराअंतर्गत येणाऱ्या साळोखेनगर टाकी परिसर, कणेरकरनगर, बापूरामनगर, आयटीआय, कळंबा जेल, आपटेनगर, दत्तोबा शिंदेनगर, जीवबानाना पार्क, सुभाषनगर पंपिंगवर अवलंबून असणारा परिसर, दादू चौगुले नगर, जरगनगर, रामानंदनगर, रायगड कॉलनी, संलग्न ग्रामीण भाग, संभाजीनगर काही भाग, एलआयसी कॉलनी, देवकर पाणंद काही भाग, साळोखे पार्क, जवाहर नगर, वाय. पी. पोवार नगर परिसर. शिवाजी पेठ व मंगळवार पेठेचा काही भाग, टिंबर मार्केट, गंजीमाळ, वारे वसाहत.

'ई' वॉर्डातील राजारामपुरी वितरण व्यवस्थेवर अवलंबून असणारा संपूर्ण परिसर, सम्राटनगर, प्रतिभानगर, सायबर चौक, राजारामपुरी, शाहू मिल, उद्यमनगर, राजेंद्रनगर, टाकाळा, दौलतनगर, शाहुपूरीतील काही भाग, पाचबंगला, साईक्स एक्स्टेशन, कावळानाका, रूईकर कॉलनी, लिशा हॉटेल, सह्याद्री सोसायटी, कदमवाडी, राजीवगांधी वसाहत, लोणार वसाहत, शिवाजीपार्क, महाडीक वसाहत आदी भागात पाणीपुरवठा होणार नाही. या कालावधीत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. बालिंगा, बावडा व कळंबा जलशुद्धीकरणातून नियमित पाणीपुरवठा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images