Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महारयतची कोटीची रक्कम गोठवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या महारयत अॅग्रो कंपनीची दोन बँक खाती शाहूपुरी पोलिसांनी सील केली. दोन खात्यांवरील सुमारे एक कोटीची रक्कम गोठवली असून, अन्य खात्यांचीही तपासणी सुरू आहे.

महारयत अॅग्रो कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कंपनीचे पदाधिकारी सुधीर शंकर मोहिते आणि संदीप सुभाष मोहिते (दोघेही रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कराराचे उल्लंघन करून शेतकऱ्यांना तीन कोटी ९४ लाख रुपयांचा गंडा घातल्याने शाहूपुरी पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. शहरातील स्टेशन रोड येथे मलबार हॉटेलच्या वरच्या मजल्यावर कंपनीचे कार्यालय आहे. पोलिसांनी कार्यालयाची झडती घेतली असून, काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. यात शेकडो शेतकऱ्यांशी केलेली करारपत्रेही आहेत. कंपनीची इस्लामपूर येथे खासगी बँकांमध्ये खाती आहेत. यापैकी एका बँकेतील दोन खात्यांची पोलिसांनी तपासणी केली.

एका खात्यावरील ३० लाख ९५ हजार ५०० रुपये, तर दुसऱ्या खात्यावरील ६३ लाख ५७ हजार रुपयांची रक्कम शिल्लक आहे. पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन्ही खाती गोठवली. कंपनीची अन्य बँकांमध्येही खाती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. संशयित सर्व बँक खात्यांची चौकशी केली जाणार आहे. खाती गोठवल्याने कंपनीला रक्कम काढता येणार नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. दरम्यान, इस्लामपुरातही महारयत अॅग्रो कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने इस्लामपूर पोलिसांकडूनही तपास सुरू आहे. कंपनीच्या संस्थांपकांपैकी एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.

.. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये बेबनाव

$
0
0

मनपा लोगो

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

भाजप- शिवसेनेचा वारु चौखूर उधळत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेत कशीबशी सत्ता मिळवली. राज्यात एकमेव महापालिका काँग्रेस आघाडीच्या ताब्यात असताना काँग्रेसचा सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवकांच्या बेबनावामुळे सत्ता जाते की काय अशी शक्यता निर्माण होऊ लागली आहे. प्रत्येक महापौर निवडीमध्ये विरोधी पक्षांपेक्षा अंतर्गत बंडाळी आणि कुरबुरींमुळे सत्ता गमावण्याचा धोका निर्माण होतो आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे पक्षातील कारभारी आणि नगरसेवक मनमानेल त्याप्रमाणे निर्णय घेत आहेत. त्यामुळे शहरात राष्ट्रवादीला ओहोटी लागण्याची शक्यता दाट आहे.

२०१० च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सभागृहात राष्ट्रवादीचे तब्बल २७ सदस्य होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत हाच आकडा १५ पर्यंत घसरला. कारणे काहीही असली, तरी पक्षबांधणीकडे झालेले दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रवादीचे १४ सदस्य असले, तरी त्यांच्यातील बेबनाव प्रत्येक पदाधिकारी निवडीमध्ये दिसून येतो. हा बेबनाव असाच राहिल्यास २०२० च्या महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाला उमेदवार तरी मिळतील का, याबाबत साशंकता आहे.

सभागृहातील १४ नगरसेवकांना पदे देण्यासाठी नियोजन व एकवाक्यता ठेवली असती, तर सर्वांना पदे मिळाली असती. पण याबाबतचे कोणतेही नियोजन न करता आणि मर्जीतील लोकांना जादा कालावधी दिल्याने या कुरबुरी वाढत गेल्या. त्याचा परिपाक २०१८ च्या स्थायी समिती सभापती निवडीमध्ये दिसून आला. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा मेघा पाटील यांचा पराभव झाला. जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या सुनेचा पराभव पक्षाला जिव्हारी लागणारा होता. पण पक्षनेतृत्वाने त्याबाबत बोटचेपी भूमिका घेतली. तांत्रिक कारणामुळे दोन फुटीर नगरसेवक अपात्र ठरले. पण त्यांच्या मनातील खदखद कोणीच जाणून घेतली नाही. तसेच फुटीस कारणीभूत असलेल्यांचाही शोध घेतला नाही. त्यामुळे नंतर झालेल्या दोन्ही महापौर निवडींमध्ये पक्षातील कुरबुरी अधिकच वाढल्या. जून महिन्यात झालेल्या महापौर निवडीदरम्यान तर थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान देण्यात आले. नंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात यश आले. पण पद भोगणारेच नंतर पक्षाशी बांधील राहत नसल्याचे चित्र आहे.

राजर्षी शाहू समाधीस्थळ सुशोभीकरण उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने तर पक्षातील कुरबुरींचा कडेलोटच झाला. आपल्याच पक्षातील होणाऱ्या पदाधिकाऱ्याला उद्घाटनाची संधी मिळू नये, यासाठी पक्षनेतृत्वाला बाजूला सारून परस्पर कार्यक्रम ठरवण्यापर्यंत मजल गेली. कारभाऱ्यांच्या या खेळीमुळे आमदार मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यामध्ये वाद होतो की काय, अशी शक्यता निर्माण झाली. महापालिकेत गैर कारभाराला उत्तेजन देणार नाही, कोणतेही आरक्षण उठवणार नाही, असे पक्षनेतृत्वाने अनेकवेळा छाती बडवून सांगितले. मात्र शहराच्या विकासासाठी कधी नगरसेवकांची बैठक घेतल्याचेही ऐकिवात नाही. त्यांना कधी पक्षवाढीसाठी कार्यक्रम दिला असेही नाही. बिंदू चौक येथील पार्किंग ठेक्यामुळे महापालिकेचे नुकसान होणार याची कल्पना असतानाही कमी निविदेचा ठेका देण्याचा घाट घातला. अशा अनेक प्रकरणांकडे नेत्यांचे झालेले दुर्लक्ष पक्षाला हानीकारक ठरत आहे.

...

चौकट

नियंत्रण ठेवण्यात अपयश

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसह काँग्रेस, भाजप, ताराराणी, शिवसेना अशा सर्वच पक्षांमध्ये कुरबुरी आहेत. राष्ट्रवादी वगळता इतर पक्षातील अंतर्गत वाद कधीही वैयक्तिक पातळीवर जात नाही. गेलाच तर पक्षनेतृत्वाचा आदेश आल्यानंतर सर्वकाही आलबेल होते. पण राष्ट्रवादीमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नाही. त्यामुळे नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवतात. विशेषत: पद भोगलेले नगरसेवकच थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान देतात. अशावेळी ज्यांच्याकडे कारभार सोपवला आहे ते 'कारभारी' करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित होतो. प्रत्येक निवडीच्यादरम्यान पक्ष नेतृत्वाला अडचणीत आणण्याचा पद्धतशीर डाव खेळला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिनी मंत्रालया’त रस्सीखेच

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : 'मिनी मंत्रालय'ते मंत्रालय हा टप्पा सर करण्यासाठी जिल्हा परिषदेतील अनेक आजी-माजी सदस्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. यंदा निवडणूक लढवायचीच असा चंग बांधून मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. शिरोळ, चंदगड, राधानगरी मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्यांच्या यादीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या जास्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका सदस्याने पक्षीय बंधणे झुगारून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. ठिकठिकाणी उमेदवारीसाठी जि.प.सदस्यामध्येच उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.

सध्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने हे जिल्हा परिषदेशी निगडीत आहेत. मंडलिक यांनी अध्यक्ष तर माने यांनी उपाध्यक्षपदावर काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात करत आजवर मंत्रालय व संसदेपर्यंत मजल मारणाऱ्या सदस्यांची उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. सदस्यांचा जि. प. च्या माध्यमातून ग्रामीण भागाशी निगडीत योजना, अभियान या माध्यमातून जनसंपर्क असतो.

भुदरगड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य जीवन पाटील यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीसाठी मुलाखतही दिली. शिवाय 'वंचित'चे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. दरम्यान भारतीय जनता पक्षाकडे एकाच तालुक्यात दोघा तिघा सदस्यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. अन्य इच्छुकांची संख्या वेगळी, यामुळे उमेदवारीचा तिढा वाढणार आहे.

भाजपमधील यादी मोठी,

सदस्यांमध्येच चढाओढ

काँग्रेस विचारधारेत वाढलेल्या अनेकांनी राजकारणाची बदलती दिशा ओळखून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री पाटील यांनी पक्ष प्रवेशावेळी प्रत्येकाला शब्द दिला आहे. शिवसेना, भाजप युती होईल, असे नेते मंडळी सांगत असताना जिल्ह्यात मात्र तालुका पातळीवर प्रत्येकजण स्वतंत्र लढणार असल्याच्या थाटात मतदारसंघ पिंजून काढत आहेत. भाजपचे सदस्य व दलितमित्र अशोक माने यांनी हातकणंगले तर गारगोटी येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई यांनी राधानगरी भुदरगडमधून तयारी सुरू केली आहे. शिरोळ मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र या मतदारसंघात भाजपकडून जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी मुलाखती दिल्या आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघातून आजरा येथील सदस्या सुनीता रेडेकर यांचे पती रमेश, सदस्य हेमंत कोलेकर यांची नावे चंदगडसाठी चर्चेत आहेत. करवीर मतदारसंघातून केरबा चौगुले यांनी उमेदवारी मागितली आहे. चौगुले यांच्या पत्नी कल्पना या जिल्हा परिषद सदस्य आहेत. कागलमध्ये समरजित घाटगे यांची उमेदवारी प्रबळ मानली जात असताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परशुराम तावरे यांनीही मुलाखत दिली.

कागल, इचलकरंजीत 'नेक्स्ट जनरेशन'

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे नाव निश्चित मानले जाते. कागल मतदारसंघातून शिवसेनेकडून माजी आमदार संजय घाटगे यांच्या नावाची चर्चा आहे. त्या दोघांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. इचलकरंजीत काँग्रेस व भाजप यांच्यामध्ये थेट लढतीचे चित्र आहे. कागलमध्ये दुरंगी की तिरंगी लढत होणार हे शेवटच्या टप्प्यापर्यंत लांबणार आहे. माजी आमदार घाटगे यांचे पुत्र अंबरिश हे सध्या जिल्हा परिषदेत शिक्षण समिती सभापतिपदी आहेत. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल हे सध्या जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व करतात. तरुण नेतृत्वाला संधी आणि राजकारणातील बदलते संदर्भ यामुळे ऐनवेळी अंबरिश घाटगे आणि राहुल आवाडे यांची नावे पुढे येऊ शकतात. इचलकरंजीतील काँग्रेसच्या एका गटाने राहुल खंजिरे यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवारचे बेपत्ता अधिकारी सुखरुप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव

कारवारच्या कद्रा आणि गारे जंगलात तपासासाठी गेलेले कारवारचे डीवायएसपी शंकर मारिहाळ आणि इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली होती. पण जंगलातील अंधारामुळे ते जंगलात भरकट गेले होते, अशी माहिती मिळाली आहे. पथकातील सर्वजण सुखरूप असून ते जंगलातून बाहेर येत आहे. कारवारचे जिल्हाधिकारी हरीश कुमार यांनी याबाबत माहिती दिली.

कैगा आणि आयएनएस विराटबाबतचा एक सॅटेलाइट कॉल मिळाला होता. तो कुठून आला, याचा शोध घेण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरो आणि स्थानिक पोलिस असे १५ जणांचे पथक जंगलात गेले होते. रविवारी सायंकाळी मल्लापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत कद्रा आणि गारे जंगलात गेलेल्या पथकात कारवार आणि केंद्रीय गुप्तचर खात्यातील अधिकारी कर्मचारी होते. शोध सुरू असताना पाऊस आणि अंधारामुळे पथकातील सर्वजण विखुरले गेले. त्यामुळे त्यांची वाट चुकली आणि ते जंगलात भरकटले. डीवायएसपी शंकर मारिहाळ आणि इतरांची टीम कारवारच्या सुंकनाळ जंगलातून बेपत्ता झाली होती. त्यामुळे पोलिस खात्यात एकच खळबळ उडाली होती. डीएसपी शंकर मारिहाळ हे मूळचे बेळगावचे असून अलीकडेच त्यांची कारवारला बदली झाली आहे.त्यानंतर कारवार पोलिसांनी चार पथके नेमून जंगलात शोधमोहीम सुरू केली.

सध्या कारवारच्या जंगलात भरपूर पाऊस सुरू आहे. त्यामुळे भरकटलेले अधिकारी, डॉग स्कॉड आणि वनअधिकारी पायपीट करत जंगलातून बाहेर येत आहेत. रात्रभर डीवायएसपी मारिहाळ यांचा मोबाइल संपर्क आणि वायरलेस संपर्कही तुटला होता. सोमवारी सकाळी मारिहाळ व आयबी अधिकारी निश्चलकुमार अन्य तपास पथकाला सापडले. त्यांनी नेटवर्कमध्ये आल्यानंतर मोबाइलवरून कारवारचे कलेक्टर आणि एसपींना फोन करून सुखरूप असल्याचे कळवले. पोलिस निरीक्षक रमेश हुगार हेही पथकात असून त्यांनी शंकर मारिहाळ यांच्यासोबतचा सेल्फी पाठवला आहे.

.. . .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवडीसाठी मार्गदर्शन मागवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर माधवी गवंडी मंगळवारी (ता. ३) महासभेत राजीनामा देणार आहेत. मात्र राजीनाम्यापूर्वी, सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज संस्थातील पदाधिकाऱ्यांना डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यााचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे गवंडी यांनी राजीनामी दिल्यास निवडीबाबत कोणती कार्यवाही करायची याबाबत महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागवले आहे. प्रशासनाला मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच महापौर निवडीबाबतची संभ्रमावस्था संपुष्टात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतंर्गत ठरलेल्या फॉर्म्युलानुसार महापौर गवंडी यांचा कार्यकाल सोमवारी संपुष्टात आला आहे. कार्यकाल संपण्यापूर्वीच पक्षनेतृत्वाने राजीनामा देण्याची सूचना केली आहे. नेत्यांच्या आदेशानुसार राजीनाम्याची तयारी त्यांनी दर्शवली असून त्यासाठी महासभा बोलवण्याची सूचना केली आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता महासभा होणार आहे.

राज्य सरकारने मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्हा व पोलिस प्रशासनावर कामाचा अतिरिक्त ताण येवू नये तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अडीच वर्षाचा कार्यकाळ संपणाऱ्या पदांना डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याबाबतचा अध्यादेशही काढला आहे. मात्र कोल्हापूर महापालिकेचा अडीच वर्षाचा कालावधी संपण्यास अजून दीड वर्षाचा कालावधी असल्याने महापौर निवडीबाबत कमालीची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पक्षात ठरल्याप्रमाणे महापौरांनी राजीनामा दिल्यास आणि नंतर निवडीला परवानगी न मिळाल्यास पद रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तारुढ काँग्रेस व राष्ट्रवादीकडून याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. तसेच याबाबतची विचारणा सातत्याने महापालिका प्रशासनाला केली जात आहे.

प्रशासनानेही महापौरांनी राजीनामा दिल्यास निवड घेता येवू शकते का, या बाबतचे मार्गदर्शन मागवले आहे. महासभेपूर्वी मार्गदर्शन येईल अशी शक्यताही वर्तवली जात आहे. मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच महापौर गवंडी यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पाच्या उत्सवात जगण्याचं बळ

$
0
0

सुतारवाड्यातील उत्सवावर महापुराचे सावट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नागपंचमीच्या दिवशी पुराचे पाणी घरात शिरले. डोळ्यादेखत पाण्याने एकेक वस्तूचा कब्जा घेतला. जे साहित्य हाती लागेल ते पोटमाळ्यावर ठेवून स्थलांतरित ठिकाण गाठले. तब्बल अठरा दिवसांनी घरी परतलो. घरभर सगळा चिखल, संसारोपयोगी साहित्याची नासधूस झालेली. प्रशासन, सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला. संकटावर मात करत नव्या उमेदीने जीवनाला सुरुवात झाली. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना वर्षानुवर्षे केली जाते. यंदाचे वर्ष तरी त्याला कसा अपवाद राहील, खरं सांगायचं तर बाप्पाच्या उत्सवात जगण्याचं बळ लाभतं' हे बोल आहेत, सुतारवाड्यातील नागरिकांचे.

सुतारवाड्यात आजही महापुराच्या खुणा स्पष्टपणे दिसतात. १८ दिवस हा भाग पाण्याखाली होता. येथील जवळपास ६० कुटुंबांचे चित्रदुर्ग मठ, मुस्लिम बोर्डिंग येथे स्थलांतरित केले होते. चार ऑगस्टला स्थलांतरित झालेले ही कुटुंबे २२ ऑगस्टला पुन्हा घरी परतली. आजही भागात चिखलाचे साम्राज्य आहे. महापुराच्या आपत्तीवर मात करत ही कुटुंबे पुन्हा सावरत आहेत. येथील बहुतांश नागरिकांच्या घरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

घरगुती गणेशोत्सवाविषयी बोलताना सुतारवाड्यातील गीता पाटील म्हणाल्या, 'घरी परतल्यानंतर आठ दिवस घराची स्वच्छता सुरू होती. सगळीकडेच चिखल, कचरा पसरलेला. सुतारवाड्यात यंदा गणेश उत्सवाचा फार डामडौल नाही. गणेश उत्सवाची साऱ्यांनाच आतुरता असते. प्रत्येकाने साध्या पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. उत्सव साजरा होणार आहे. प्रत्येकजण ओढवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढत आहे.'

सुतारवाड्यातील सारा समाज हा कष्टकरी आहे. सुतारकाम, मेस्त्रीकाम, भाजीपाला विक्री, रिक्षा व्यवसाय करुन संसाराचा गाडा ओढतात. काही महिला धुणीभांडीचे काम करतात. प्रत्येकाच्या घरी सोमवारी गणेशाचे आगमन झाले. पूजा अर्चा झाली. पण थाटमाट कमी जाणवत होता. या संकटातून पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळो हीच प्रार्थना विघ्नहर्त्या गणेशाकडे केल्याचे भागातील महिला सांगत होत्या.

...

भगवा ग्रुप मित्र मंडळातर्फे

गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

सुतारवाड्यातील भगवा ग्रुप मित्र मंडळाचा गणेशोत्सव हा आकर्षण असतो. मंडळातर्फे वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा मात्र मंडळाने उत्सव लहान पद्धतीने साजरा करायचे ठरविले. लहान स्वरुपातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवः बाप्पांचे जल्लोषी स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: ढोलताशांचा निनाद, झांजपथकाचा ठेका, 'गणपती बाप्पा मोरया'चा अखंड गजर आणि पावसाच्या हलक्या सरी झेलत सोमवारी विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचे जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले. पारंपरिक वाद्यांसह साउंड सिस्टिमवर थिरकणाऱ्या तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना केली.

ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, रिक्षांना केलेली आकर्षक सजावट, डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा, रंगीबेरंगी कपड्यांची झालर यामुळे युवक-युवतींचा उत्साह ओसंडून वाहत होता. शहराच्या प्रत्येक भागातून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुपारपासून कुंभार गल्ली, पापाची तिकटी, बापट कँप, लोणार वसाहत, मार्केट यार्डसह आदी परिसरात गर्दी केली होती. भगव्या, पांढऱ्या टोप्या आणि फेटे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांसह बालचमूंनी डोक्याला बांधलेल्या भगव्या पट्ट्यांमुळे त्यांचाही उत्साह ओसांडून वाहत होता. सकाळी घरगुती गणरायाचे कुटुंबासह आगमन केल्यानंतर सर्व कार्यकर्ते मंडळाची मूर्ती आणण्यासाठी दुपारी बाहेर पडले.

ढोल ताशा, बेंझो, लेझीम, धनगरी ढोल या पारंपरिक वाद्यांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्ते गणेश मूर्ती घेवून रवाना होत होते. लहान मंडळाचे कार्यकर्ते हातगाडी, लहान टेम्पो यातून मूर्ती घेवून जात होते. मोठ्या मंडळांप्रमाणेच लहान मंडळाच्याही उत्साहाला उधाण आले होते. बिंदू चौक, पापाची तिकटी, राजारामपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, संभाजीनगर, उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी, स्टेशन रोड आदी सर्वच मार्गांवर सार्वजनिक मंडळाच्या श्रींची मिरवणुका दिसत होत्या. सकाळी पावसाच्या काही तुरळक सरी पडल्या. त्यानंतर काहीकाळ उघडीप राहीली, पण दुपारी तीन नंतर पावसाची पुन्हा रिपरिप सुरू झाली. तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह जराही कमी झाला नाही.

दुपारी चारनंतर सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुकी मोठ्या प्रमाणात निघाल्या. दिवसभर पांरपरिक वाद्यांचा गजर सुरू असताना सायंकाळनंतर अनेक मंडळांनी केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने डोळे दिपून जात होते. लाइटचा झगमगाट आणि साउंड सिस्टिमवर ताल धरत कार्यकर्ते बेभान होऊन नृत्य करत होते. रात्री उशीरापर्यंत शहराच्या सर्वच भागात श्रींच्या मूर्तींचे आगमन सुरू होते. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. बहुतांश सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. त्यामुळे पारंपरिक वाद्यांची पथके विविध ठिकाणी थांबल्याचे दिसत होते. मिरवणुकीमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, त्यासाठी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले होते.

हलगीच्या ठेक्यावर ज्येष्ठांची धम्माल

शहराच्या विशेषत: शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुध‌वार पेठ आणि कसबा परिसरात आजही लेझीम खेळली जाते. तरुणाई साउंड सिस्टिमवर थिरकत असताना ज्येष्ठ मंडळी मात्र हलगीच्या ठेक्यावर आपला उत्साह द्विगणित करत होते. हलगीच्या ठेक्यावर त्यांची लयबद्ध हालचाल पाहताना तरुणाई सुद्धा भान हरपून जात होती. जुन्या पेठांमध्ये आजही लेझीम क्रेझ असल्याचे गणरायाच्या आगमनानिमित्त दिसून आले.

ट्रॅक्टर, टेम्पोचालकांची चांगली कमाई

श्रींची मूर्ती नेण्यासाठी अनेक मंडळांनी ट्रॅक्टर, टेम्पो, रिक्षा, ट्रक आदी वाहनांचे आगाऊ बुकिंग केले होते. पण अनेक मंडळांना वाहने मिळाली नाहीत. त्यामुळे ऐनवेळी ग्रामीण भागातील वाहनधारकांकडे मंडळाचे कार्यकर्ते संपर्क करत होते. पुरामुळे ग्रामीण भागातील आर्थिक जनजीवन विस्कळीत झालेले असताना अनेक वाहनधारकांना यामुळे चांगली कमाई करता आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पॉट पंचनामाग्राह्य धरणार’

$
0
0

'स्पॉट पंचनामा

ग्राह्य धरणार'

सोलापूर :

पुरात वाहून गेलेल्या दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी तीस हजार रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. पूरग्रस्त भागातील पशूधन वाहून गेलेल्या पशूधनाला आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अशा पशूधनाचे मालक असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी तलाठी, पोलिस पाटील, सरपंच, गावपातळीवरील सहकारी दूध संघाचे संचालक व संबंधित पशूधनाचे मालक यांनी स्वाक्षरी केलेला स्पॉट पंचनामा, मदतीसाठी ग्राह्य घरण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

नुकसान झालेल्या जनावरांच्या गोठ्यांसाठीही मदत करण्यात येत आहे. असा गोठा घराला जोडून असला किंवा शेतात असला तरीही राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार २१०० रुपये प्रती गोठा मदत देण्यात येईल. शेतीसाठी एक हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ, बाधित कुटुंबांना तीन महिने गहू आणि तांदूळ मोफत वाटप करण्यात येत आहे. पडझड झालेल्या घरांचे बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेतून करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून अतिरीक्त एक लाख रुपये दिले जातील. घरांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ग्रामीण भागात २४ आणि शहरी भागात ३६ हजार रुपये देण्यात येतील. कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित करण्यात आली आहे. सामाजिक संस्थांची आर्थिक व कामाची कुवत विचारात घेऊन त्यांना कोणते गाव दत्तक देता येईल, या बाबत जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त संयुक्तपणे निर्णय घेतील. या कार्यक्रमातंर्गत घर बांधणीसाठी सरकारी जागा उपलब्ध नसल्यास भूसंपादन करून जागा उपलब्ध करून दिली जाईल. पायाभूत सुविधांमध्ये विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, रस्ते या सुविधा जिल्हाधिकारी नियमित योजनेमधून निर्माण करून देतील. छोटे गॅरेज, छोटे व्यावसायिक, हस्तकला, हातमाग कारागीर, बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक यांना नुकसानीच्या ७५ टक्के किंवा ५० हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. कुटुंब निश्चित करण्यासाठीच्या अटी सैल करण्यात आल्या आहेत, असेही देशमुख म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील पूरबाधित घरे नव्याने उभी करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुरामध्ये शहरातील अनेक घरे पडली. अनेक घरांचे मोठे नुकसान झाले, अशी सर्व पुरबाधित घरे नव्याने उभी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी पालकमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला. त्याचबरोबर त्यांनी शहरातील ज्या अपार्टमेंटमध्ये दोन दिवस पुराचे पाणी होते अशा अपार्टमेंटमधील सर्व फ्लॅटधारकांना पंधरा हजार रुपये सरकारचे अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला. त्याबाबतची सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

महापुरानंतर झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोल्हापूर शहरातील महापुराच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये शहरात घरे पडल्याने मोठे नुकसान झाल्याचे लक्षात आले. अशा कुटुंबांची यादी काढण्यास पाटील यांनी सांगितल्यानंतर शहरात अनेक घरांचे मोठे नुकसान झाल्यामुळे या सर्व लोकांची घरे उभे करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. अपार्टमेंटमध्ये पाणी आल्यानंतर अनेकांना मदत मिळाली नाही, त्याचादेखील त्यांनी आढावा घेतला. त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, असे आदेशही पाटील यांनी दिले. दरम्यान, पूरबाधित अपार्टमेंटमधील सर्व फ्लॅटधारकांनाही तत्काळ १५ हजार रुपये देण्याची सूचना त्यांनी दिली. या निर्णयामुळे शहरातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.ची सभा गाजणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेची मंगळवारी (ता. ३) होणारी सर्वसाधारण सभा माध्यमिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्या, सदस्याशी कर्मचाऱ्यांनी घातलेली हुज्जत आणि प्रलंबित विकासकामांवरुन गाजण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. महिला सदस्यांच्या नातेवाइकांचा कामकाजात हस्तक्षेप वाढल्याची तक्रार कर्मचारी संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे केली होती. तत्पुर्वी शिक्षण विभागातील कर्मचारी अशोक जाधवर, बालविकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी बी. एम. पाटील यांच्याविरोधात सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या. यावरुन गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेत कर्मचारी विरुद्ध सदस्य असे चित्र निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ सप्टेंबरच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. यामुळे विकासकामांच्या प्रस्तावाला तत्काळ प्रशासकीय मंजुरी मिळावी आणि वर्क ऑर्डर काढावी हा विषय उपस्थित होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिरीचे गहू, ड्रायफ्रुट्स, गूळाला मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर किराणा मार्केटमध्ये खिरीचे गहू, गूळ आणि ड्रायफ्रुट्सला मागणी वाढली आहे. धान्य आणि कडधान्याचे दर कमी असले तरी बाजारात ग्राहकांची संख्या कमी असल्याचे दुकानदार, व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवात घरोघरी गव्हाची खीर, मोदक, लाडू, पुरणपोळी, थापट वडी हे पदार्थ केले जातात. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खिरीचे गहू बाजारात उपलब्ध झाले आहेत. गव्हाची किंमत प्रतिकिलो ८० रुपये आहे.

गुळालाही मागणी वाढली असून प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर आहे. किंमत जास्त असून ड्रायफ्रुट्सची मागणी वाढली आहे. काजू प्रतिकिलो ७०० ते १००० रुपये, बदाम ८०० रुपये, खारीक २०० ते ५००, चारोळे १५०० रुपये, खसखस १२०० रुपये तर वेलदोड्याचा दर ६००० रुपये किलो आहे. खाद्यतेलाच्या दरात किरकोळ वाढ आहे. सरकरी तेलाच्या दरात दोन रुपयांनी वाढ

झाली आहे. गहू, हरभरा डाळ, तूरडाळ, रवा, आटा आणि कडधान्याचे दर स्थिर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर काळातील पगारी रजा मंजूर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापुरामुळे कमावर जाऊ न शकलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पूरकाळातील पगारी रजा मंजूर करावी. तसेच पूरबाधित कर्मचाऱ्यांना मदतीचा हात द्यावा,' अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉँग्रेस संघटनेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार जगताप म्हणाले, ‘महापुरामुळे सर्वत्र रस्ते बंद असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. अनेक कर्मचाऱ्यांच्याही घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांना बेघर व्हावे लागले. बसस्थानकांमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना घरी परत जाता आले नाही. महामंडळाने पाच ते बारा ऑगस्टदरम्यान कर्मचाऱ्यांची रजा मांडली आहे. पूरस्थितीत कर्मचाऱ्यांना पाठबळ देण्याऐवजी त्यांच्या रजा मांडून थट्टा केली. महामंडळाच्या या कार्यपद्धतीवर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. महामंडळाने नैसर्गिक आपत्ती नियमानुसार कर्मचाऱ्यांना पगारी रजा मंजूर करावी. अन्यथा नोटीस देऊन आंदोलन करावे लागेल. सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास कर्मचारी रस्त्यावर उतरतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गहू, ड्रायफ्रुट्स, गूळाला मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवामुळे किराणा मार्केटमध्ये खिरीचे गहू, गूळ आणि ड्रायफ्रुट्सला मागणी वाढली आहे. धान्य आणि कडधान्याचे दर कमी असले तरी बाजारात ग्राहकांची संख्या कमी असल्याचे दुकानदार, व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

गणेशोत्सवात घरोघरी गव्हाची खीर, मोदक, लाडू, पुरणपोळी, थापट वडी हे पदार्थ केले जातात. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खिरीचे गहू बाजारात उपलब्ध झाले आहेत. गव्हाची किंमत प्रतिकिलो ८० रुपये आहे.

गुळालाही मागणी वाढली असून प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर आहे. किंमत जास्त असून ड्रायफ्रुट्सची मागणी वाढली आहे. काजू प्रतिकिलो ७०० ते १००० रुपये, बदाम ८०० रुपये, खारीक २०० ते ५००, चारोळे १५०० रुपये, खसखस १२०० रुपये तर वेलदोड्याचा दर ६००० रुपये किलो आहे. खाद्यतेलाच्या दरात किरकोळ वाढ आहे. सरकरी तेलाच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे. गहू, हरभरा डाळ, तूरडाळ, रवा, आटा आणि कडधान्याचे दर स्थिर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरातील मंडळांनी जपले सामाजिक भान

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीमः महापुराच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी डीजेला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांचे स्वागत केले. काही मंडळांनी आवाज मर्यादेत ध्वनियंत्रणांचा वापर केला. मात्र, मंडळांनी उच्च ध्वनियंत्रणांचा अट्टाहास न धरल्याने पोलिस आणि मंडळांमध्ये संघर्षही निर्माण झाला नाही. मंडळांचे हेच सामाजिक भान गणेश उत्सवासह विसर्जन मिरवणुकीतही राहावे, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

महापुराने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मोठे नुकसान झाल्याने यंदाचा गणेशोत्सव भपकेबाजपणे साजरा करू नये, असे आवाहन पोलिसांनी सार्वजनिक गणेश मंडळांना केले होते. पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी यंदा उच्च ध्वनियंत्रणेला फाटा दिला. उच्च ध्वनियंत्रणा जोडणारच असा आग्रह अनेक मंडळांचा असतो. विशेषत: गणेशाच्या आगमन मिरवणुकीतच पोलिस आणि मंडळांच्या संघर्षाची ठिणगी पडते. विसर्जन मिरवणुकीपर्यंत हा संघर्ष वाढत जातो. यातच काही राजकीय नेत्यांचेही पाठबळ मंडळांना मिळते. यामुळे विसर्जन मिरवणुकीत आवाज मर्यादेचे उल्लंघन होते, असा आजवरचा अनुभव आहे. यावेळी मात्र पोलिसांना विशेष यातायात करावी लागली नाही. मंडळांनीच सामाजिक भान दाखवत आगमन मिरवणूक डीजेमुक्त पार पाडली. बहुतांश मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरला.

आगमन मिरवणुकीत बाराव्या गल्लीतील इगल मित्र मंडळ, हिंदवी स्वराज्य मंडळ, पद्मराज तरुण मंडळ, वेलकम फ्रेंड्स सर्कल, पद्मराज स्पोर्ट्स, जयशिवराय तरुण मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. सातव्या गल्लीतील न्यू फ्रेंड्स सर्कल, न्यू, गणेश मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ, राजारामपुरी स्पोर्ट्स, मास्टर स्पोर्ट्स, जय मराठा मित्र मंडळासह अन्य मंडळांनी डीजेला फाटा देऊन लेसर शो आणि आकर्षक विद्युत रोषणाईला प्राधान्य दिले. अनेक मंडळांनी महापुराची छायाचित्रे आणि सामाजिक संदेश देणारे फलकही सोबत आणले होते. मंडळांचे हेच सामाजिक भान पूर्ण गणेशोत्सवासह गणेश विसर्जन मिरवणुकीतही कायम राहावे, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांनी त्यांच्या हद्दीतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क ठेवला आहे. अनेक मंडळांनी उच्च ध्वनियंत्रणांना फाटा देऊन विधायक गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य दिले आहे. ज्या मंडळांवर यापूर्वी आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत, अशा मंडळांनी उच्च ध्वनियंत्रणांचा आग्रह धरू नये, यासाठी प्रबोधन सुरू आहे. विधायक उपक्रमांसह सुरक्षेसाठीही मंडळांना सूचना दिल्या आहेत.

सार्वजनिक मंडळांनी मूर्तींच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यकर्त्यांची नेमणूक करावी. मंडळांच्या आसपास वाहने थांबून वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पार्किंगची सोय करावी लागणार आहे. देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. अशावेळी महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगा तयार कराव्यात, महिला आणि तरुणींची छेडछाड टाळण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशा सूचना पोलिसांनी मंडळांना दिल्या आहेत.

दहा वाजताच संपली मिरवणूक

राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणूक रात्री बारापर्यंत सुरू राहते. यंदा १४ मंडळांनी मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचे पोलिसांना कळवले होते. प्रत्यक्षात यापैकी नऊ मडंळांनीच मिरवणुकीत सहभाग घेतला. सायंकाळी सुरू झालेली मिरवणूक रात्री दहा वाजताच संपली. मोजक्याच मंडळांचा सहभाग आणि डीजेमुक्तीमुळे मिरवणूक रात्री दहा वाजताच आटोपली. यामुळे पोलिसांवरील ताण कमी झाला.

महापुरानंतर सार्वजनिक मंडळांनी दाखवलेले भान उल्लेखनीय आहे. विसर्जन मिरवणुकीतही मंडळांनी आवाज मर्यादेचे पालक करावे, अशा सूचना दिल्या आहेत. मंडळांच्या सकारात्मक भूमिकेमुळे कोल्हापूरचा गणेशोत्सव राज्यात आदर्शवत ठरेल. - तिरुपती काकडे, अपर पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्त कृती समितीतर्फे ६ सप्टेंबरला आंदोलन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पूरग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, व्यापाऱ्यांची कर्जे माफ करावीत यांसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यांसाठी ६ सप्टेंबरला शिरोळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिरोळ तालुका सर्वपक्षीय पूरग्रस्त कृती समितीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदनाद्वारे दिला.

निवेदनात म्हटले आहे, ऑगस्ट महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. या तुलनेत सरकारी मिळणारी मदत तुटपुंजी आहे. सरकारी यंत्रणा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. पूरग्रस्त उघड्यावर पडले आहेत. पिके जमीनदोस्त झाली आहेत. घरांची पडझड झाली आहे. यामुळे शिरोळ तालुका राष्ट्रीय आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर करावा, सर्व सरकारी कर माफ करावेत, सरसकट कर्जमाफी करावी, अलमट्टी धरणातील पाणी पातळीचे नियोजन करावे, अन्यथा ६ सप्टेंबरला व्यापक आंदोलन केले जाईल.

निवेदन देताना माजी नगराध्यक्ष शरद आलासे, दादासाहेब पाटील, माजी नगरसेवक राजू आवळे, सुरेश सासणे, सरपंच विशाल चौगुले, सुरगौडा पाटील, काजल कांबळे, हर्षल पाटील, मंगल नरूटे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाडिक कुटुंबीयातर्फे शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

$
0
0

एकत्र पूजा-अर्चा

माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या शिरोली येथील निवासस्थानी शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गेल्या सात वर्षापासून शिरोली येथील निवासस्थानी गणेश उत्सव सुरू झाला आहे. साधारणपणे एक फूट उंचीच्या गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. गणेश उत्सवाच्या आगमनाची प्रत्येकालाच आतुरता लागलेली असते. गणेशाचे आगमन होण्यापूर्वी आरास, सजावट यामध्ये सगळ्यांचा कमी अधिक सहभाग असतो. पुरुष बाप्पाच्या उत्सवाच्या तयारीत सामील असतात. सकाळी कुटुंबातील महिला पूजा-आरती करतात. संध्याकाळी संपूर्ण कुटुंब सहभागी होते. गणेशाच्या आरतीला लहान मुले, पुरुष मंडळी सगळे उपस्थित असतात. उत्सवाविषयी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या, 'उत्सव कालावधीत अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन केले जाते. गणेशमूर्तीचे विसर्जन घरीच पाण्यात केले जाते. पर्यावरणपूरक व साध्या पद्धतीने घरगुती स्वरुपात उत्सव साजरा होतो. दरम्यान पूर्वी महाडिक कुटुंबीय येलूर येथील गणेश उत्सवासाठी जमायचे. आजही कुटुंबातील सगळ्या महिला गौरीच्या दर्शनासाठी येलूर येथे जमतात.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीपुरी गणेशोत्सव..

$
0
0

लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती

पूलगल्ली तालीम मंडळ : २१ फुटी गणेश मूर्ती

श्री स्वयंभू गणेश मित्र मंडळ कोंडाओळ : साडे चार फुटाची आकर्षक गणेशमूर्ती

शिवशाही मित्र मंडळ कोंडाओळ : आकर्षक गणेश मूर्ती

भगवा ग्रुप तरुण मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती

सत्यनारायण मित्र मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती

गाईड मित्र मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लैंगिक उपचाराकडे कल

$
0
0

sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : लैंगिक विषयावर संकोचामुळे अनेकजण खुलेपणाने बोलत नाहीत. अशा परिस्थितीत लैंगिक समस्येवर उपचार घेणे दूरच असते. मात्र लैंगिक आजाराबाबतचे गांभीर्य वाढू लागल्याने गेल्या पाच वर्षात लैंगिक समस्यांवर खुलेपणाने उपचार घेण्याकडे कोल्हापूरकरांचा कल वाढू लागल्याचे निरीक्षण लैंगिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. राजसिंह सावंत यांनी नोंदवले आहे.

लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यावर अनेक समज-गैरसमज आहेत. वयात येताना मुला-मुलींना योग्य मार्गदर्शन व शिक्षण मिळत नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात लैंगिक शिक्षण मिळणे आवश्यक आहे, असे मत वारंवार लैंगिक समस्या तज्ज्ञांकडून व्यक्त केले जाते. ज्या प्रमाणात शारीरिक आजारांकडे सजगतेने पाहिले जाते. त्या प्रमाणात लैंगिक आजार दुर्लक्षिले जातात. त्याचे गंभीर परिणाम भविष्यात दिसतात. नि:संकोचपणे लैंगिक समस्यावर उपचार न घेण्यामागे लैंगिक आरोग्य शिक्षणाचा अभाव असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहात लावण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांकडे उपचार घेऊन आर्थिक फसवणूक झालेले अनेकजण समाजाच्या भीतीने गप्प बसतात आणि त्यांचा आजारही बरा होत नाही. बहुतांशी लैंगिक समस्या लग्नानंतर काही दिवस किंवा त्यापूर्वी काही दिवस लक्षात येतात. या समस्येवर वेळीच उपचार न झाल्यास घटस्फोटापर्यंत जोडप्यांना सामोरे जावे लागते.

काय आहेत समस्या

समाजात लैंगिक समस्यांबाबत अनेक गैरसमज आहेत. पुरुषांत लैंगिक दुर्बलता, शीघ्रपतन, लैंगिक इच्छा नसणे, स्त्रियांत लैंगिक संवेदना नसणे, वेदनादायी समागम, हस्तमैथुन, स्वप्नदोष, लिंगाचा आकार लहान असणे अशा समस्या आढळतात.

काय आहेत कारणे

बहुतांश लैंगिक समस्यांमागे नैराश्य, राग, थकवा अशी मानसिक कारणे आढळतात. तर संप्रेरकाची कमतरता, लैंगिक अवयवांचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, वेदनाशामक व तणाव कमी करणाऱ्या गोळ्यांचे सततचे सेवन ही मुख्यतः कारणे आहेत.

काय कराल

लैंगिक समस्या उपचार व समुपदेशनाने बऱ्या होतात. समुपदेशनात शरीर रचना, लैंगिक क्रिया याबाबत शास्त्रीय माहिती दिली जाते. समस्येवर उपचार घेताना अधिकृत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जाहिराती पाहून भोंदू डॉक्टरांकडे जाऊ नये. परस्पर औषधे घेणे टाळावे व्हायग्रासारखी औषधे उपाय म्हणून घेऊ नयेत. आजार दीर्घकाळ रेंगाळत ठेवू नयेत, असे डॉ. सावंत यांनी सुचवले आहे.

म्हणून प्रश्न सुटणार नाही...

लैंगिक हिंसाचाराला आळा घालण्यासाठी पॉर्न साइटवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र, अनेक वेबसाइट तांत्रिक बदल करून पूर्ववत सुरू झाल्या आहेत. पॉर्न संकेतस्थळावर बंदी घालून प्रश्न सुटणार नाहीत. तर त्यासाठी शालेय स्तरावर लैंगिक शिक्षणाद्वारे मुलांच्या मनातील कुतूहल शमवावे लागेल. वेळीच मुलांना मार्गदर्शन मिळाल्यास ते चुकीच्या गोष्टींकडे वळणार नाहीत, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

जागतिक लैंगिक आरोग्य दिवसाची थीम 'सर्वांसाठी लैंगिक आरोग्य' ही आहे. मुख्यत: लैंगिक शिक्षण हे लैंगिक संबंधांचे शिक्षण नसते. वाढत्या वयाबरोबर शारिरीक व मानसिक बदलांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे ते शिक्षण असते. त्यामुळे या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश असावा. हे आजार बरे होणारे असतात. मात्र त्यासाठी डॉक्टर निवडताना काळजी घ्यावी.

डॉ. राजसिंह सावंत, सल्लागार, लैंगिक उपचारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेच्या दोन दरवाजांतून ६७२८ क्युसेक विसर्ग

$
0
0

कोयनेच्या दोन दरवाजांतून

६७२८ क्युसेक विसर्ग

कराड :

कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढल्याने धरणाचे सहापैकी दोन वक्री दरवाजे दीड फुटांनी वर उचलून त्यातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात ४६२८ तर पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २१००, असे एकूण ६७२८ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

.............

बंधाऱ्यांसाठी पाच कोटींचा निधी

कराड :

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील वांग नदीचे पाणी ठिकठिकाणी अडवून शेती व पिण्यासाठी उपयोगात आणण्याच्या उद्देशाने कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याकडे पाठवला होता. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी मंजुरी दिली आहे. ढेबेवाडी विभागातील मंद्रुळकोळे येथे दोन बंधारे, जानुगडेवाडी येथे दोन व सोनाईचीवाडी पाझर तलावासाठी व बंधाऱ्यासाठी सुमारे ४ कोटी ८८ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.

.........

'बळीराजा' करणार उपोषण

कराड : शेवाळवाडी, उंडाळे (ता. कराड) येथील रयत अथणी या खासगी साखर कारखान्याने आठ ते नऊ महिने झाले तरी गतवर्षीच्या २०१८-१९च्या गळीत हंगामातील ऊस बिलातील एफआरपीची पूर्ण रक्कम दिलेली नाही. त्यामुळे बळीराजा शेतकरी संघटना येत्या बुधवारी, ११ रोजी सकाळी अकरा वाजता येथील तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठल मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरणाऱ्याला अटक

$
0
0

विठ्ठल मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरणाऱ्याला अटक

पंढरपूर :

पंढरपूरच्या विठ्ठल-रुखुमाई मंदिरातील परिवार देवताच्या मंदिरातील दानपेटीतून पैशांची चोरी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष मोरे (रा. मुंढेवाजी, ता. पंढरपूर), असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याची चौकशी सुरू आहे. मोरे व्यंकटेश अर्थात बालाजी मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरत होता. मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या वामन एलमार, या पोलिस कर्मचाऱ्याला त्याचा संशय आला. त्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर मोरे वारंवार ठराविक मंदिरात जाऊन दानपेटीतील रक्कम काढताना आढळून आला. त्यानंतर एलमार यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

...........

पिस्तूल, जिवंत काडतुसांसह

पंढरपुरातून तरुणाला अटक

पंढरपूर :

पंढरपूर शहरात एका तरुणाकडून गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतूसे पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी शिवराज उर्फ भैय्या बाळासाहेब ननावरे, या २२ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण मंगळवेढा येथील एका खून प्रकरणातील आरोपी असून, सध्या जामिनावर बाहेर आहे. शहरातील शिवाजी चौक परिसरात एक तरुण पिस्तुलासह येत असल्याची खबर पोलिसांना मिळताच गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. हा तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीवर येताच पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून जाऊ लागल्यावर झडप टाकून त्यास पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक लोखंडी गावठी पिस्तूल आणि ५ जिवंत काडतुसे आढळून आली. गेल्या काही महिन्यांपासून शहरात गॅँगवार थोडेसे शांत झाले आहे. भैय्या ननावरे शहरातील क्रांती चौक परिसरात राहणार असून, खून प्रकरणातील आरोपी आहे. त्याच्याजवळ हे गावठी पिस्तूल कोठून आले, याचा तपास पोलिस करीत आहेत.

..........

'नवीन एफआरपी अमान्य'

पंढरपूर :

राज्यात काही भागात महापूर आणि काही भागात दुष्काळामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. नवीन एफआरपी कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने उसाला चार हजारांचा भाव दिल्याशिवाय कोयता लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पंढरपूर येथील ऊस परिषदेत दिला. रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेची ऊस परिषद पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठात पार पडली. या वेळी राज्यभरातून शेकडो शेतकरी ऊस परिषदेसाठी आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images