Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

१०० अपार्टमेंटधारकांना लाभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराचे पाणी खालच्या मजल्यावर आलेल्या अपार्टमेंटमधील सर्व कुटुंबांना १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यासंबंधी प्रशासकीय पातळीवर मंगळवारी हालचाली गतिमान झाल्या. लाभार्थी कुटुंबांची यादी तयार केली जात आहे. पुराने बाधित १०० अपार्टमेंटमधील तीन हजारांवर कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.

दरम्यान, पुराचे पाणी खालच्या मजल्यावरील घरात गेले तरी अपार्टमेंटमधील सर्व फ्लॅटधारकांना अनुदान देण्यासंबंधी सरकारकडून स्पष्टपणे आदेश आलेला नाही. यामुळे प्रशासनातील संभ्रम कायम आहे. मात्र आदेश येताच, वाटप सुरू करण्यासाठी प्रशासन तयारीत आहे.

शहरातील पूरग्रस्तांना प्रापंचिक साहित्य खरेदीसाठी १५ हजार तर ग्रामीणमधील पूरग्रस्तांसाठी १० हजार रुपये अनुदान दिले जात आहे. यापैकी पाच हजार रोख स्वरुपात आणि उर्वरित रक्कम संबंधित कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. हे अनुदान ज्यांच्या घरात पुराचे पाणी गेले आहे, त्यांना वाटप केले जात आहे. सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुराने बाधित अपार्टमेंटमधील सर्व कुटुंबांना अनुदान वाटप करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या जातील, असे सांगितले. यानुसार जिल्हा महसूल प्रशासन अपार्टमेंट आणि त्यातील कुटुंबांची यादी तयार करत आहे. सरकारकडून लेखी आदेश येताच अनुदान वाटपाला सुरुवात करण्याची तयारी केली आहे.

रमणमळा, नाईक मळा, पुंगावकर मळा, माळी मळा, न्यू पॅलेस परिसर, पोलो ग्राऊंड, शाहूपुरी कुंभार गल्ली, गवत मंडई, यादवनगर, शास्त्रीनगर, जवाहरनगर, बुद्ध गार्डननजीकचा परिसर, रिलायन्स मॉल, गणपती मंदीर लगतचा परिसर, व्हीनस कॉर्नर, गाडी अड्डा, बसंत बहार रोड, दीप्ती कॉम्लेक्स, टायटन शोरूम, अश्विनी हॉस्पिटल, विल्सन पूल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, केव्हीजी पार्क परिसर, सुतार वाडा, कोंडाओळ, विल्सन पूल, शाहू पूल ते चित्रदुर्ग मठामागे, हरीपुजानगर परिसर, राजहंस प्रेस परिसर, महावीर कॉलेज, डायमंड हॉस्पिटल, विन्स हॉस्पिटल, नागाळा पार्क परिसर, खानविलकर पेट्रोल पंप परिसर, पोवार कॉलनी, जाधव पार्क, रामानंदनगर, सिध्दार्थनगर, सीता कॉलनी, जुना बुधवार पेठ, शुक्रवारपेठ, पंचगंगा तालीम, मस्कुती तलाव, दुधाळी मैदान परिसर, उत्तरेश्वर गवत मंडई, लक्षतीर्थ वसाहत, सुतारमळा, शिंगणापूर नाका परिसर, लक्षतीर्थ वसाहत परिसर, मीराबाग, डीमार्टमागील बाजू आणि कसबा बावडा परिसरातील अपार्टमेंटमध्ये पंचगंगा नदीच्या महापुराचे पाणी गेले. तळमजल्यावर पाणी साठून राहिल्याने अपार्टमेंटमधील सर्वच कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले. सलग आठ दिवस संबंधित कुटुंबांना घर सोडावे लागले होते. पाणी ओसरल्यानंतर ती कुटुंबे पुन्हा राहण्यासाठी आली. त्यांना अनुदान मिळाले नाही. ते लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणत आहेत.

विधानसभा निवडणुकीमुळे

आठवड्यानंतर विधानसभा निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे शहरातील मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी इच्छुकांत स्पर्धा लागली आहे. महापुराच्या निमित्ताने सरकारचे १५ हजार अपार्टमेंटमधील सर्वांना मिळाले तर विधानसभेला त्याचा फायदा होणार आहे, हे मतांचे गणित सत्ताधारी साधताना दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरीच्या संशयातून खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

घरातून दहा हजारांची रोकड आणि मोबाइल चोरल्याच्या संशयावरून गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील मध्यवर्ती हुडा परिसरात धारदार चाकूने नऊ वार करून, दगडाने ठेचून ऋषिकेश उर्फ चेअरमन अशोक कांबळे (वय २२, रा. गडमुडशिंगी) याचा खून केल्याची घटना उघडकीस आली. २ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित पंकज दिलीप कांबळे (वय २१), पद्मजित दिलीप कांबळे (वय २४), रोहित मोहन कांबळे (वय ४२, तिघेही रा. गडमुडशिंगी ) यांना अटक केली. चौथा संशयित दिलीप यल्लपा कांबळे (वय ५५, रा. गडमुडशिंगी) याचा रक्तदाब वाढल्याने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. दरम्यान कोर्टाने संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

गांधीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आणि मृत असे चौघेही एकाच गल्लीत राहतात. संशयित पद्मजित याचे मे महिन्यात लग्न झाले होते. त्यावेळी त्याच्या घरातून दहा हजारांची रोकड लंपास झाली होती. ही चोरी मृत ऋषिकेशने केल्याचा संशय या चौघांना होता.

सोमवारी रात्री दिलीप आणि त्याची दोन मुले पद्मजित, रोहित आणि त्यांचा एक नातेवाईक असे चौघेही गडमुडशिंगी परिसरातील मध्यवर्ती हुडा भागात आले. त्यावेळी मृत ऋषिकेश आणि संशयित चौघांत वाद झाला. पंकजने ऋषिकेशच्या छाती आणि पोटावर नऊ वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. पद्मजितने त्याच्या डोक्याने दगड घातला. हा प्रकार सुरू असताना परिसरातील नागरिक धावले. मात्र संशयितांना त्यांनाही रोखले. दरम्यान घटनेनंतर चौघेही पळून गेले. ऋषिकेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. परिसरातील नागरिकांना त्याला गडमुडशिंगी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत अमृतकर यांनी भेट दिली. त्यांनी दोन स्वतंत्र पथके तैनात करून संशयितांना विक्रमनगर येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी ऋषिकेशचा भाऊ विनायक कांबळे याने गांधीनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेतून विसर्ग

$
0
0

कराड : कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढल्याने धरणाचे सहापैकी दोन वक्री दरवाजे दीड फुटांनी वर उचलून त्यातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात ४६२८ तर पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २१००, असे एकूण ६७२८ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगला बनसोडे, विश्वनाथ शिंदेंनाकोपर्डे प्रतिष्ठानचे जीवनगौरव पुरस्कार

$
0
0

मंगला बनसोडे, विश्वनाथ शिंदेंना

कोपर्डे प्रतिष्ठानचे जीवनगौरव पुरस्कार

सातारा :

प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानचे वतीने देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्कारासाठी प्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे (करवडी-कराड) व पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद कोपर्डे यांनी दिली आहे.

प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश, मानचिन्ह, शाल व सातारा कंदी पेढे, असे पुरस्कारचे स्वरुप आहे. पुरस्काराचे हे चवथे वर्ष आहे. प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य, कला, संस्कृती व समाज परिवर्तन या क्षेत्रात आयुष्यभर मौलिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. यंदाचा कृष्णामाई जीवनगौरव पुरस्कार (लोककला) मंगला बनसोडे यांना व सात-तारा जीवनगौरव पुरस्कार (लोकसंस्कृती) डॉ. विश्वनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे. प्रसिद्ध साहित्यिक, पटकथाकार प्रताप गंगावणे यांच्या हस्ते येत्या महात्मा गांधी जयंतीदिनी बुधवारी, २ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे विश्वस्त पत्रकार, डॉ. विजय चोरमारे, डॉ. गजानन अपिने, प्रमोद कोपर्डे यांच्या निवड समितीने यंदाचे पुरस्कार निश्चित केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचा निष्ठावंत पाईक हरपला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद सदस्य बंडा माने यांच्या निधनाने अभ्यासू लोकप्रतिनिधी व तरुण सदस्यांचा मार्गदर्शक हरपला. पक्ष आणि गटातटापलीकडे जाऊन माने यांनी प्रत्येकाशी स्नेहबंध निर्माण केला. त्यांच्या जाण्याने काँग्रेसचा निष्ठावंत पाईक हरपला,'अशा शब्दांत त्यांना जिल्हा परिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

जिल्हा परिषदेची मंगळवारी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. दरम्यान, सकाळीच माने यांच्या निधनाचे वृत्त समजले. अनेक सदस्यांनी दत्तवाड येथे जाऊन अंत्यदर्शन घेतले. दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात त्यांना आदराजंली वाहून सभा तहकूब केली. सभेत गटनेते अरुण इंगवले यांनी दुखवटा ठराव मांडला आणि त्यांच्याविषयीच्या आठवणी जागविल्या. सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण यांनी दुखवठा ठरावाला अनुमोदन दिले. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, सीईओ अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, सदस्य महेश चौगुले आदी उपस्थित होते. दरम्यान, तहकूब सभा ११ सप्टेंबरला होणार आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोफखाना विभागातील सैनिकांचा रविवारी स्नेहमेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा आजी माजी सैनिक संघटना, १८ मैदानी तोफखाना विभाग यांच्यावतीने भारतीय सैन्यदलातील मराठा बटालियनच्या सैनिकांचा स्नेहमेळावा रविवारी (ता. ८) होणार आहे. सकाळी दहा वाजता कसबा बावडा रोड येथील महासैनिक दरबार हॉल येथे सकाळी दहा वाजता मेळावा होणार असून, राज्यातून ५०० हून अधिक सैनिक कुटुंबीयांसह या मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती सुभेदार आनंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तोफखाना विभागातील अधिकारी, सरदार, साहेबान, जवान व वीरनारी या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. पाटील म्हणाले, १५ ते १६ वर्षांच्या सैन्यदलातील सेवेनंतर सैनिक निवृत्त होतात. निवृत्तीनंतर प्रत्येकजण आपापल्या गावी परततो. त्यानंतर सैन्यातील सहकाऱ्यांना भेटण्याचे प्रसंग कमी होतात. मात्र, सेवाकाळात सैन्यातील सहकारी हे त्याचे कुटुंबच असते. त्यांना भेटता यावे, कुटुंबीयांसमवेत त्यांच्याशी संवाद साधता यावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.'

कार्यक्रमास कर्नल मलिकवीर सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान मेजर जनरल एम, एल.एन श्रवणकुमार भूषविणार आहेत. यावेळी कर्नल आर. व्ही, के. सिंह, बी. पी. शर्मा, व्ही. नंदकुमार, विनय वेखंडे, आदी उपस्थित राहणार आहेत. सुभेदार मेजर परशुराम तळेकर, सुभेदार तुकाराम जाधव, रमेश पाटील, अजित पाटील, संभाजी निकम यांनी मेळाव्याचे संयोजन केले आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाकडून मागवली पूरग्रस्त विद्यार्थ्यांची माहिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑगस्टमध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत आलेल्या महापुरामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना पुराचा फटका बसला अशा विद्यार्थ्यांची माहिती शिवाजी विद्यापीठाने कॉलेज प्रशासनाकडून मागवली आहे. याबाबतचे पत्र विद्यापीठाने प्राचार्यांना पाठवले आहे. कॉलेजनिहाय पूरग्रस्त विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाकडे आल्यानंतर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलत व मदतीच्या धोरणाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

महापुरात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली. शेतीसह घरे व जनावरांचे नुकसान झाले. कोल्हापूर शहरातील, शुक्रवार पेठ, कदमवाडी, जाधववाडी, रमणमळा, नागाळा पार्क, शाहूपुरी, सुतारमळा येथील घरांमध्येही पाणी शिरले, तर सांगलीतील हरिपूर, ब्रह्मनाळसह शिरोळ तालुक्यातील औरवाड, कुरूंदवाड, नृसिंहवाडी यासह गावठाणातील रस्त्यांवर पाणी आले. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. या दोन जिल्ह्यांतील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर महापुरामुळे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांची घरे कोसळली आहेत. शेतीचे नुकसान झाले आहे. जनावरे वाहून गेली आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पातळीवर आर्थिक दिलासा देता यावा यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे पूरग्रस्त विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कॉलेजमार्फत पूरग्रस्त विद्यार्थ्यांची नावे, कौटुंबिक माहिती, आर्थिक स्थिती याबाबतची माहिती पाठविण्याचे काम सुरू आहे.

येत्या ऑक्टोबरपासून विद्यापीठाच्या सत्र परीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जे विद्यार्थी पूरग्रस्त आहेत त्यांच्या परीक्षा फी माफीबाबत सरकारच्या उच्चशिक्षण मंत्रालयाशी चर्चा करण्याचाही विद्यापीठ प्रशासनाचा विचार आहे.

०००

समिती स्थापन

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त कॉलेज विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्याबाबत राज्यस्तरावरून मदतीसाठी पाठपुरावा करण्याबाबत विद्यापीठाच्या वतीने समिती स्थापन केली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी स्वतंत्र समितीची रचना करण्यात आली आहे. यामध्ये विद्यापीठ व शिक्षण सहसंचालक विभागीय कार्यालयाचे प्रतिनिधी समाविष्ट आहेत.

०००

कोट...

पूरग्रस्त विद्यार्थ्यांना राज्यस्तरावरून मदतनिधी उभारण्याबाबत किंवा त्यांच्या परीक्षा फी माफीबाबत पुढाकार घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून कॉलेजनिहाय अहवाल मागवला आहे. अद्याप ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. येत्या आठवड्यात सर्व माहिती घेऊन एकत्रित अहवाल तयार केला जाणार आहे.

डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळच्या मल्टिस्टेटसाठी ‘वर्षा’वर साखरपेरणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालकांचे नेतृत्व करत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत थेट वर्षा बंगल्यावर भेट घेऊन साखर पेरणी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. गोकुळच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अध्यक्ष रवींद्र आपटे आणि महाडिक यांच्या हस्ते फडणवीस यांना ५१ लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच गोकुळने १०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नवीन प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रणही देण्यात आले.

महाडिक यांनी एक सप्टेंबरला सोलापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये महाडिक यांना मोठ्या पदावर संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील आर्थिक सत्ता केंद्र असलेला गोकुळ संघ मल्टिस्टेट करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल झाला आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी मिळावयची आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रस्तावावर सही व्हावी यासाठी संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी खासदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता महाडिक यांच्यासह अध्यक्ष रवींद्र आपटे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, बाबा देसाई, मुंबई वाशी शाखेचे प्रमुख दयानंद पाटील वर्षा बंगल्यावर पोचहोले. वर्षा बंगल्यावरील प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीच्या आरतीला सर्वजण उपस्थित होते. गणेशदर्शनानंतर आपटे आणि महाडिक यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री निधीला ५१ लाख रुपयांचा धनादेश दिला. गोकुळच्या विस्तारीकरण प्रकल्पाच्या उद्घाटनाचे आमंत्रणही त्यांना देण्यात आले. आचारसंहितेपूर्वी उद्घाटन व्हावे, अशी इच्छा महाडिक आणि आपटे यांनी व्यक्त केली. सध्या महाजनादेश यात्रेचा शेवटचा टप्पा अपूर्ण असून, आपण कोल्हापूर, सांगली, कोकण दौऱ्यावर येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कार्यक्रम व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

संचालकांचे नेतृत्व थेट माजी खासदारांनी केल्याने मल्टिस्टेटचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी अजेंड्यावर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांच्या संमतीसह केंद्राची मल्टिस्टेटला परवानगी मिळावी याची जबाबदारी नेतेमंडळींनी महाडिक यांच्याकडे दिल्याची चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूरः स्वीकारले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

$
0
0

कोल्हापूर : ते विद्यार्थी ना त्या शिक्षकांच्या नातेसंबंधातील. ना मित्र परिवरातील कुटुंबीयांतील सदस्य. वास्तविक शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्या मुलांचा त्यांचा संबंध आला. गरजू आणि गरीब मुलांतील टँलेंट शोधून कुणी त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं. तर कुणी वर्षानुवर्षे अशा मुलांची शैक्षणिक वाटचाल सुलभ बनावी, गरीब कुटुंबीयांत शिक्षणाचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून त्यांच्या अपरोक्ष आर्थिक हातभार लावतात. सामान्य कुटुंबातील मुलांच्या जीवनात सुखकर्ता ठरलेल्या समाजातील दानशूर व्यक्ती, शिक्षक, प्राध्यापकांची ही प्रातिनिधीक ओळख. आयुष्यभर ज्ञानार्जनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांपैकी काहीजण निवृत्तीनंतरही वडिलकीच्या नात्याने सामान्य मुलांचे आधारवड ठरले आहेत.

होस्टेलसह शैक्षणिक खर्चाची जबाबदारी

सामान्य कुटुंबातील हुशार मुलांची बेताच्या परिस्थिमुळे शैक्षणिक कुचंबणा होऊ नये, त्यांच्या शिक्षणात परिस्थिती अडसर बनू नये यासाठी अमेरिकेतील डॉ. सर्जेराव रामराव देशमुख आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा यांनी ट्रस्टची स्थापना करुन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. देशमुख कुटुंब मूळचे साताऱ्यातील. कामानिमित्त अमेरिकत स्थायिक आहेत. त्यांनी उत्पन्नातील काही वाटा समाजातील हुशार मुलांसाठी खर्च करायचे ठरविले. उजळाईवाडी येथे रविराई कल्चरल एज्युकेशनल सोशल अँड चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. त्या ठिकाणी मुलांची निवास व भोजन व्यवस्थेसह शैक्षणिक खर्चही संस्था करते. संस्थेत वीस मुले असून त्यांना रोज शाळेत ये-जा करण्यासाठी वाहनाची सोय केली आहे. मुलींच्या शिक्षणाचे पालकत्वही त्यांनी स्वीकारले आहे.

गरीब मुलावर पोटच्या मुलासारखे प्रेम

महापालिकेच्या शाळेतील सहायक शिक्षक सुनील पाटील हे गेली वीस वर्षे शिक्षण क्षेत्रात आहेत. आजरा तालुक्यातील लाटगाव हे त्यांचे मूळ गाव. ज्योतिर्लिंग विद्यामंदिर येथे नोकरी करत असताना शाळेतील अखिलेश सूर्यकांत करोशी या सामान्य कुटुंबातील हुशार मुलाने त्यांचे लक्ष वेधले. करोशी कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची. यामुळे त्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून पाटील यांनी त्याचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली. स्वत:च्या मुलाबरोबर त्याला शिकवले. खासगी शिकवणीला घातले. सध्या हा मुलगा बारावीत शिकत आहे. नववीपासून तो उजळाईवाडी येथील रविराई ट्रस्टच्या होस्टेलमध्ये आहे. मात्र त्यांची नाळ तुटली नाही. उन्हाळी सुट्टीत, सण समारंभाला घरी आणतात. सुर्यकांतचे शैक्षणिक करिअर घडविण्याचा त्यांचा मानस आहे.

गुरुकुलमधील मुलीचे शैक्षणिक पालकत्व

निवृत्तीनंतचे आयुष्य म्हणजे निवांतपणे जगायचे असा काहींचा समज असतो. व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील निवृत्त प्राध्यापक श्रीकांत अडिवरेकर हे गरीब मुलांच्या शैक्षणिक वाटचालीला पूरक काम करत आहेत. २०११ मध्ये ते निवृत्त झाले. तत्पूर्वी १९८९ पासून ते गरीब मुलांना शैक्षणिक मदत, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यास सुरुवात केली. सध्या ते, कणेरी मठाचे स्वामी अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी सुरू केलेल्या गुरुकुलामध्ये मराठी, इतिहास विषयाचे अध्यापन करतात. त्यांनी, २०१७ पासून गुरुकुलमधील एका विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. वर्षाला साधारणपणे वीस ते बावीस हजार रुपये खर्च ते यासाठी करतात. एक मुलगी शिकली तर एक कुटुंब सुधारते. यासाठी मुलींच्या शिक्षणाला चालना दिली आहे. शैक्षणिक पालकत्व स्वीकारल्याचे ते सांगतात.

विद्यार्थ्यांशी जडले आपुलकीचे नाते

शिक्षकी पेशा म्हटली की शालेय वेळेत कामकाज, नित्याचे अध्यापन हे ठरलेले. मात्र त्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, त्यांच्या अडचणीची सोडवणूक करत शिक्षिका स्मिता समीर कारेकर यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांत वेगळे नाते निर्माण केले आहे. महापालिकेच्या शाळेत नोकरी करणाऱ्या कारेकर यांनी अनिकेत परुळेकर या गरीब विद्यार्थ्याचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारले आहे. त्याने महापालिकेच्या शाळेतील शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणासाठी अन्यत्र प्रवेश घेतला. त्यानंतरही त्या मुलाचा शैक्षणिक खर्च कारेकर करीत आहेत. कारेकर यांनी सदरबाजार, जाधववाडी, जरगनगर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय, प्रतिभानगर परिसरातील वि. स. खांडेकर विद्यालय अशा विविध ठिकाणी काम करताना हुशार आणि गरीब मुलांना मदतीचा हात दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी धावपळ

पैशा अभावी गरीब मुलांचा प्रवेश रखडलाय, मुलींना बस पास काढण्यात अडचणी उद्भवत आहेत. एखाद्या मुलाकडे गणवेश नाही, शैक्षणिक साहित्य घेणे परवडत नाही अशी मुले आढळली की त्यांना मदत करायची. कुणाला वह्या विकत घेऊन द्यायच्या. जमेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यासाठी धाव घेणाऱ्या शिक्षकात न्यू कॉलेजमधील प्रा. टी. के. सरगर यांचा समावेश होतो. दरवर्षीच ते मुलामुलींना मदत करत आहेत. ग्रामीण भागातील मुलींना अनेकदा बस पास काढण्याची प्रक्रिया माहीत नसते. रोजचा खर्च त्यांना परवडणारा नसतो हे लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षात त्यांनी जवळपास ४०० हून अधिक मुलींना पास मिळवून देण्यासाठी बस डेपो गाठला. कागदपत्रांची पूर्तता करून दिली. वीटभट्टी कामगारांच्या मुलांना मदत केली. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरगर कार्यरत असतात.

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळ : आकर्षक

$
0
0

लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती

पूलगल्ली तालीम मंडळ : २१ फुटी गणेश मूर्ती

श्री स्वयंभू गणेश मित्र मंडळ कोंडाओळ : साडे चार फुटाची आकर्षक गणेशमूर्ती

शिवशाही मित्र मंडळ कोंडाओळ : आकर्षक गणेश मूर्ती

भगवा ग्रुप तरुण मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती

सत्यनारायण मित्र मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती

गाईड मित्र मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलांचा सुगंध दरवळा

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

महापुरामुळे संपूर्ण श्रावण महिन्यात फूल मार्केटला आलेली मरगळ गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर तेजी येण्यास सुरुवात झाली आहे. रंगीबेरंगी फुलांने बाजारात सुगंध दरवळा असताना दरानेही तेजी पकडली आहे. दैनंदिन पूजेसह सजावटीसाठी भाविक फुले खरेदी करण्यासाठी फूल बाजारात गर्दी करत आहेत. पुरामुळे फुलशेतीचे प्रचंड नुकसान झाले. उत्पादन कमी झाल्याने दरात चांगली वाढ झाली आहे. झेंडू वगळता निशिगंध, शेवंती, गुलाब, अॅस्टर फुलांचे दर चांगलेच वधारले आहेत.

सर्वसामान्यपणे श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून फुलांची मागणी आणि दरात चांगली वाढ होते. जिल्ह्यातील अनेक शेतकरी श्रावण महिन्यापासून दिवाळीपर्यंत उत्पादन घेण्यासाठी फुलशेतीचे नियोजन करतात. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे १२०० हेक्टरवर फुलशेतीची लागवड केली होती. मात्र जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे ८५० हेक्टरवरील फुलशेतीचे नुकसान झाले. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणच्या फुलशेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने फुलांचा तुटवडा जाणवू लागला. तसेच संपूर्ण श्रावण महिन्यावर महापुराचे सावट राहिल्याने बाजारपेठेत फारशी उलाढाल झाली नाही.

गणेशोत्सवाला सुरुवात होण्याच्या अगोदर दोन दिवसांपासून फुलांच्या बाजारपेठेने तेजीकडे सुरुवात केली आहे. फुलांच्या दरात वाढ होऊ लागल्यानंतर गडमुडशिंगी, कंदलगाव, राशिवडे, वडणगे, निगवे, खेबवडे, इस्पुर्ली यासह सीमा भागातील शेतकरी शिंगोशी मार्केट येथे फुले विक्रीसाठी दररोज येत आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी १२ पर्यंत येथे फुले खरेदी करण्यासाठी भाविकांसह हार विक्रेते मार्केटमध्ये मोठी गर्दी करत आहेत. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीला दररोज फुलांचा हार घातला जातो. फुलांच्या दराबरोबर हारांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. हाराच्या लांबीप्रमाणे २० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे. महापुरानंतर थांबलेली फुलांची बाजारपेठेत पुन्हा चांगली उलाढाला होऊ लागल्याने शेतीकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

फुलांचे दर (किलोमध्ये)

झेंडू : ५० रु.

निशिगंध : ५०० रु.

शेवंती : २०० ते २५० रु.

अॅस्टर : दहा रुपये पेंढी

गुलाब : १०० रु. (दहा गुलाब)

केवडा : ५० रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवाला सामाजिक समतेची झालर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

पूरग्रस्तांना मदतीचा हात देत विधायक उत्सव साजरा करणाऱ्या शहरातील तालीम संस्था व मंडळांनी आता सामाजिक समतेच दर्शनही घडविले. शहरातील विविध भागात गणेशमूर्ती व पंजांची एकत्रित प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी गणेशोत्सव व मोहरम एकत्र आल्यामुळे दोन्ही उत्सवात सामाजिक समतेचे दर्शन होत आहे.

शहरातील मानाचा पंजा म्हणून बाबूजमाल दर्गा येथील नाल्या हैदर पंजाचा उल्लेख होतो. बाबूजमाल दर्गा येथे यापूर्वीही गणेशमूर्ती व पंजाची एकत्रित प्रतिष्ठापना केली होती. सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविताना यंदाही बाबूजमाल दर्गा येथे नाल्या हैदर पंजा व गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. शहरातील तालीम संस्थेमध्ये वर्षानुवर्षे गणेशमूर्ती व पंजा प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे.

खंडोबा तालीम मंडळ, जुना बुधवार पेठ, दिलबहार तालीम मंडळ, पूलगल्ली तालीम मंडळ, सणगर गल्ली तालीम मंडळ, बोडके गल्ली तालीम मंडळासह ५० हून अधिक संस्थांनी यंदा गणेशमूर्ती व पंजाची प्रतिष्ठापना केली आहे. शहरातील विविध भाागात पंजांची उत्साहात प्रतिष्ठापना होते. मंगळवार पेठेत तीन तालीम संस्था व सार्वजनिक तरुण मंडळांनी एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करत आहेत.

शहरातील अन्य भागामध्ये शाहुपुरीतील हसन हुसेन पंजा, काळाईमाम तालीमचा जादुई पंजा, शिवाजी पेठेतील चाँदसाहेब पंजा, लक्ष्मीपुरीतील गरीबशहा पंजा, तेली गल्लीतील शेवाळेंचा पंजा, अवचित पीर तालीम मंडळाचा पंजा, बोडके तालीमचा राजेबागस्वार पंजा, जुना बुधवार पेठ तालीम संस्थेचा झिमझिमसाहेब पंजा, शुक्रवार पेठेतील चाबुकस्वार पंजा,नंगीवली तालीम मंडळांचा झिमझिमसाहेब पंजा, भोई गल्लीतील मलिकाजान पंजा, राजारामपुरी मातंग वसाहत येथील गैबी पंजा यासह विविध ठिकाणी पंजाची प्रतिष्ठापना होते. दरम्यान शिवाजी चौकातील घुडणपीर दर्ग्यातील मानाचा अली झुल्फिकार व बेबी फातिमा पंजाची प्रतिष्ठापना गुरुवारी होणार आहे.

सणगर गल्ली तालीम मंडळ, बोडके तालीम मंडळ व जंगी हुसेन तालीम मंडळ आणि परिसरातील पाच सहा तरुण मंडळे एकत्र येऊन गेल्या १५ वर्षांपासून संयुक्त गणेशोत्सव साजरा करतात. कोल्हापुरात गणेश मूर्ती व पंजाची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. सणगर गल्ली व बोडके तालीम मंडळाने दोन्ही संस्थेत पंजांची स्वतंत्रपणे प्रतिष्ठापना केली आहे. पंजा प्रतिष्ठापनेला शंभर वर्षाहून अधिक परंपरा आहे. गेली दोन वर्षे मोहरम व गणेश उत्सव एकत्रित साजरे केले जातात. यंदा,तालीम संस्थांनी उत्सवातील वर्गणीची ६१ हजार इतकी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिली आहे.

राजेश पार्टे, अध्यक्ष उत्सव कमिटी, सणगर गल्ली तालीम मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता रक्तदानासाठी आधार ‘सक्ती’

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, कोल्हापूर

सर्वात पवित्र दान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. रुग्णाचा जीव वाचवण्यात रक्तदात्याची भूमिका महत्त्वाची ठरते. मात्र अलीकडे रक्त संक्रमणातून एचआयव्हीसारख्या आजाराचा धोका वाढल्याने दात्याची माहिती उपलब्ध व्हावी या हेतूने रक्तदानावेळी त्याच्याकडून आधार कार्ड घेण्याची सक्ती राज्य रक्तसंक्रमण प्राधिकरणातर्फे करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश राज्यातील रक्तपेढ्यांना देण्यात आले आहेत. यापुढे रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. यामुळे एचआयव्हीसारखा आजार आढळल्यास त्या व्यक्तीला तत्काळ उपचार प्रक्रियेत आणले जाईल.

गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रभावी जनजागृतीमुळे रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक तरुण नियमितपणे रक्तदान करतात. तसेच समाज माध्यमांवर विविध व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून रक्तदात्यांचे ग्रुप तयार झाले आहेत. त्यांच्याकडून अत्यावश्यक वेळी रक्तदान केले जाते. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मंडळांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. साधारणतः रक्तपेढ्या रक्त संकलित केल्यानंतर रक्ताची संपूर्ण तपासणी करतात. संकलित झालेल्या रक्तामध्ये एचआयव्ही आढळल्यास रक्तपेढीकडून रक्त नष्ट करण्यात येते. मात्र रक्तपेढीकडे रक्तदात्याची पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने तो व्यक्ती उपचाराच्या प्रक्रियेमध्ये येत नव्हता. तसेच याबाबतची माहिती रक्त पेढ्यांकडून इंटिग्रेटेड काऊन्सलिंग अँड टेस्टिंग सेंटरकडे म्हणजेच आयसीटीसी सेंटरकडे बहुदा पाठवली जात नव्हती. अलीकडे रक्तातून एचआयव्ही बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे हा धोका कमी करण्यासाठी व एचआयव्हीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्यावतीने रक्तदान करतेवेळेस आधार कार्ड घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

...

रक्तदात्याशी होईल संपर्क

याआधी रक्तसंकलन करताना रक्तदात्याचा पत्ता, संपर्क आदी पुरेशी माहिती गांभीर्याने ठेवली जात नव्हती. काहीवेळा रक्तदात्यांनी भरलेले अर्जही अपूर्ण असत किंवा संपर्क पत्ता चुकीचा असे. आधार कार्डमुळे रक्तदात्याची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. दरम्यान, तपासणीत एचआयव्ही आढळल्यास आयसीटीसी सेंटर व संबंधित दात्याशी संपर्क साधून त्याला उपचाराच्या प्रक्रियेत आणता येईल.

...

नॅट तपासणी कधी ?

रक्तातून एचआयव्हीचा होणारा धोका कमी करण्यासाठी आधुनिक नॅट चाचणी गरजेची असते. मात्र, जिल्ह्यात केवळ एका खासगी रक्तपेढीकडे अशी मशीन उपलब्ध आहे. त्यामुळे सरकारकडून किमान प्रत्येक जिल्ह्याला नॅट चाचणीचे मशीन उपलब्ध करून द्यावे. तसेच खासगी रक्तपेढ्यांना ही चाचणी सक्तीची करावी, अशी मागणी वारंवार होत आहे.

...

कोट

'राज्य रक्तसंक्रमण प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेला निणर्य स्वागतार्ह आहे. सर्व रक्तपेढ्यांनी या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी. आधार सक्तीमुळे रक्तातून होणाऱ्या एचआयव्ही संक्रमणाला अटकाव घालता येईल.

प्रकाश घुंगुरकर, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वृक्ष प्राधिकरण’कडे वर्षानुवर्षे अर्ज प्रलंबित

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घर बांधकाम, वाहतूक, विद्युत वाहिनीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या व वृक्ष तोडण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे अर्ज पाठववा लागतो. शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाही समिती व सदस्यांकडून सुचवल्या जातात. पण समितीकडे आलेले अर्ज वर्षानुवर्षे निर्गत होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या या तक्रारींचे पडसाद स्थायी समितीत उमटून खदखद व्यक्त झाली. पुन्हा या विषयावर महापालिकेच्या सभेत पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

वृक्ष प्राधिकरण समितीचे पदसिद् अध्यक्ष आयुक्त आहेत. समितीमध्ये सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग व शहर अभियंत्यासह चार तज्ज्ञ सदस्यांचा समावेश आहे. उद्यान ‌विभागाकडे धोकादायक वृक्ष किंवा फांदी तोडण्यासाठी अर्ज दाखल केला जातो. उद्यान विभागाकडून अर्ज समितीकडे सादर झाल्यानंतर वृक्ष किंवा फांदी (सहा इंचापेक्षा मोठी) तोडण्यासाठी परवानगी दिली जाते. ही परवानगी देताना सर्वसामान्यांना हेलपाटे मारण्यास भाग पाडले जाते,ठरविक लोकांना मात्र त्वरीत मंजुरी मिळते.

जून २०१८ पासून समितीमधून पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर व निर्सगमित्र संस्था बाहेर पडली. गेल्या दीड वर्षांपासून समितीचा कारभार सदस्यांविना सुरू असताना अर्जांची वेळेत दखल घेतली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवार पेठेतील सोमेश्वर चौक येथील सतीश सावर्डेकर या ज्येष्ठ नागरिकाने घरावर आलेली धोकादायक फांदी तोडण्यासाठी २०१५ मध्ये अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी लोकशाही दिनातही तक्रार केली. आयुक्तांपासून सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांना त्यांनी स्वतंत्र अर्ज दिले. पण यावर अद्याप निर्णय झालेला नाही. निर्णयच होत नसल्याने ते प्रचंड भीतीच्या छायेत वावरत आहेत. अशीच स्थिती शाहू स्मारक भवनच्या पिछाडीस असलेल्या अर्जदाराची झाली आहे. कोणत्याही क्षणी झाड उन्मळून पडण्याची शक्यता असल्याने त्यांनी उद्यान विभागाकडे अर्ज केला. पण त्यांचीही अवस्था सावर्डेकर यांच्यासारखी झाली आहे. त्यामुळे समितीचे कामकाज नेमके चालते कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उपस्थित होत आहे.

याबाबत उद्यान विभागाशी संपर्क साधला असता उद्यान विभागाकडे एकही अर्ज प्रलंबित नसल्याचे सांगण्यात आले. विभागाच्या खुलाशानुसार जर अर्ज प्रलंबित नसतील तर स्थायी समितीमध्ये उपस्थित केलेला प्रश्न चुकीचा होता का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना फांदी छाटण्यास परवानगी मिळत नसताना टेंबे रोड येथील नुकत्याच झालेल्या खाद्य शॉपीसमोरील वृक्षाच्या फांद्या तोडण्यास मात्र समितीने त्वरीत मंजुरी दिली असल्याचे समोर आले आहे. यानिमित्ताने समितीचा कारभार कोणाच्या मार्गदर्शनानुसार चालतो हेदेखील समोर येण्याची आवश्यकता आहे.

...

चौकट

राजीनामा दिलेल्या संस्थेच्या

पदाधिकाऱ्याची स्वाक्षरी

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून शहरवासियांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर समितीमध्ये महापौर, उपमहापौर, सर्व गटनेते यांचा समावेश करण्यासाठी आयुक्तांची भेट घेणार असल्याचे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात यापैकी उपमहापौर, विरोधी पक्षनेता, पक्षप्रतोद यांचा समितीमध्ये समावेश असल्याचे खुद्द सदस्यांसह सभापती देशमुख यांना माहिती नव्हते. त्याचबरोबर एक संस्था प्राधिकरण समितीमधून दीड वर्षापूर्वी बाहेर पडली आहे. त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्याची नियोजित बैठकीसाठी स्वाक्षरी उद्यान समितीच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभाः आचारसंहितेच्या कचाट्यात १२० कोटी

$
0
0

कोल्हापूरः जिल्ह्यातील रस्ते, गटर्स, आरोग्य सुविधांसह विविध विकासकामांसाठी सरकारकडून आलेल्या १६२ कोटींपैकी १२० कोटी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणार आहेत. आता कामांचे प्रस्ताव येऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा आदेश ठेकेदारास देण्याच्या कालावधीतच आचारसंहिता लागणार आहे. यामुळे नविन सरकार येईपर्यंत विकासकामांना ब्रेक लागणार आहे. लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव येण्यास विलंब आणि महापुरामुळे एक महिना प्रशासकीय यंत्रणा विस्कळीत झाल्याने मोठ्या प्रमाणात निधी शिल्लक राहिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्हा नियोजन समितीने सन २०१९ - २० आर्थिक वर्षासाठी २७१ कोटींचा जिल्हा विकास आराखडा तयार केला. त्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जूनमध्ये झालेल्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली. आराखड्यातील कामांसाठी सरकारने तातडीने १६२ कोटी वर्ग केले. पशुसंवर्धन, वन विभाग, लघु पाटबंधारे, पर्यटनस्थळ विकास आदी विभागांनी केलेल्या मागणीनुसार नियोजन प्रशासनाने ४१ कोटी ५० लाख वर्ग केले. त्यांनी निधी खर्चही केला.

दरम्यान, विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने सर्व आमदार, जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीची तयारी करण्यात व्यस्त आहेत. प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी आराखड्यात सुचवलेल्या विकासकामांचे प्रस्ताव दिलेले नाहीत. यामुळे प्रशासन, गेल्या आर्थिक वर्षात काम झाले आहे. मात्र, देय असलेल्या निधीचे प्रस्ताव निर्गत करत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील महापुरामुळे जिल्हा प्रशासनाचे कामकाज ठप्प राहिले. जिल्हाधिकारी कार्यालयातही पाणी गेल्याने जिल्हा नियोजन कार्यालयातील रस्ताही बंद झाला होता. लोकप्रतिनिधींकडून प्रस्तावही येऊ शकले नाहीत. यामध्ये महत्वाचे १५ दिवस गेले.

पूर ओसरल्यानंतर प्रशासन पूर्वपदावर येईपर्यंत सप्टेंबर महिना उजाडला आहे. प्रशासनही पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करणे आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला लागले आहे. गणेश चतुर्थी झाल्यानंतर म्हणजे १६ ते २० सप्टेंबरअखेर आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे विकासकामांचे नव्याने प्रस्ताव घेणे, प्रशासकीय मंजुरी देणे, ठेकेदार निश्चित करून काम सुरू करण्याचा आदेश देण्यासाठीचा कमीत कमी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक नाही. परिणामी विकासकामांसाठीचा १२० कोटींचा निधी निवडणूक होईपर्यंत अखर्चित राहणार आहेत. नव्याने निवडून येणाऱ्या आमदारांकडून आलेल्या प्रस्तावांना मंजुरी द्यावी लागणार आहे. विद्यमान आहेत मात्र ते निवडून न येता दुसरे उमेदवार आमदार झाल्यास कामही बदलणार आहे. माजी आमदारांनी सुचवलेली कामे मागे पडून नव्या आमदारांनी दिलेल्या कामांचे प्रस्ताव मान्य करावे लागणार आहेत. यामुळे निधी खर्च होण्यास विलंब होणार आहे.

शिल्लक निधी आधी

खर्च करावा लागणार

२०१९-२० या आर्थिक वर्षातील निधी खर्च करण्याची अंतिम मुदत मार्च २०२० पर्यंत आहे. मात्र जिल्हा नियोजनकडे आलेला निधी खर्च झाल्याशिवाय सरकार आराखड्यातील उर्वरित निधी देत नाही. यामुळे पहिल्या टप्प्यात प्राप्त निधीपैकी शिल्लक १२० कोटींचा निधी विकासकामांवर खर्च करावाच लागणार आहे. नव्या सरकारच्या ध्येय, धोरणांवर हा निधी वेळेत खर्च होणार आहे.

ही महत्वाची कामे थांबणार

मृद व जलसंधारण, वन्यजीव व्यवस्थापन आणि निसर्ग संरक्षण, गावातील गटर्स, रस्ते, स्मशानशेड, समाज मंदिर, सांस्कृतिक सभागृह, जिल्हा, ग्रामीण रस्ते विकास आणि मजबुतीकरण, लहान पूल बांधकाम, यात्रा, पर्यटनस्थळांचा विकास, व्यायामशाळांचा विकास, सार्वजनिक आरोग्य सुविधा निर्माण करणे, नागरी दलित वस्ती सुधारणांची कामे, अंगणवाडी इमारत बांधकाम, नाविन्यपूर्ण योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते.

Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कराराला फसले आणि गळाला लागले

$
0
0

लोगो : कडकनाथचा फास

.. . .. .. .. ... ... .. .. ..

महारयत अॅग्रोच्या माध्यमातून कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय, त्यातून दामदुप्पट उत्पन्नाच्या आमीषाला हजारो शेतकरी बळी पडले. काही दिवसानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फसवणुकीचा हा आकडा कोटीत आहे. गुंतवणूकदार शेतकरी या प्रकारात कसे अडकत गेले? वाचा आजपासून...

०० ०० ०० ०० ००

प्रकाश बनसोडे, इस्लामपूर

कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगाव येथील सुधीर शंकर मोहिते हा इस्लामपुरात स्पर्धा परीक्षेचा क्लास सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होता. दरम्यानच्या काळात त्याला कडकनाथचे प्रशिक्षण मिळाले आणि त्याने रयत अ‍ॅग्रो प्रा. लि. ही कंपनी स्थापन केली. अवघ्या दोन वर्षांत महाराष्ट्रासह चार ते पाच राज्यांतील हजारो शेतकऱ्यांना त्याने पाच कोटीहून अधिक रकमेला गंडा घातला. क्लास सुरू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुधीर मोहितेचा 'कडकनाथ'ने ट्रॅकच बदलला.

अवघ्या दोन वर्षांच्या काळात सुधीर मोहितेने रयत अ‍ॅग्रोसह महारयत अ‍ॅग्रो, इंडस ऑइल फूड, महारयत निधी, झेडेम मल्टी सर्व्हिस आणि महारयत अ‍ॅग्रो फिड्स अँड फूड्स या कंपन्यांची स्थापना केली. कडकनाथ कोंबडी पालन प्रकल्प शेतकऱ्यांच्या गळी उतरवण्यासाठी त्याने अनेक योजना, आमिषे गुंतवणूकदारांना दाखवली. या आमिषाला शेतकरी, बेरोजगार युवक बळी पडले.

शेतकऱ्यांकडून गुंतवणूक करून घेताना तो सोबत १०० रुपयांच्या स्टॅम्पवर तो करार करून घेत असे. या करारात रयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनी ही कंपनी शेतीपूरक व्यवसाय, त्यातही प्रामुख्याने रेशीम शेती, मत्स्य शेती, कुक्कुटपालन व शेळी पालन करते. ही कंपनी लोकांना प्रशिक्षिण देऊन व्यवसाय उभारून देते. व्यवसायातून उपलब्ध होणारे उत्पादन खरेदी करते. तसेच शेतकऱ्यांना विश्वास देऊन खरेदीची हमी देण्याचे काम ही कंपनी करत आहे. ही कंपनी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक शेतकऱ्यांकडून करत नाही किंवा शेतकऱ्यांना आर्थिक गुंतवणूक देत नाही. अशा प्रकारे करार करून घेऊन शेतकऱ्यांना गुंतवून घेतले जात होते.

करार करताना संपूर्ण जबाबदारी कंपनी घेणार शेतकऱ्यांनी फक्त प्रति युनिट ७५ हजार रुपये गुंतवायचे आणि उत्पन्न मिळवत रहायचे, असे आमिष दाखविल्याने अनेकांनी गुंतवणूक केली. सुरूवातीला इस्लामपुरात कार्यालय थाटून सुरू झालेला या कंपनीने हळूहळू सांगली, सातारा आणि कोल्हापूरतही पसरले. सुधीर मोहितेचे साथीदार संदीप मोहिते, हणमंत जगदाळे, हणमंत शेंडे आणि गणेश शेवाळे यांनी कंपनीचे प्रचारक म्हणून काम केले आणि कंपनीचा विस्तार राज्यभर झाला. सुरुवातीच्या टप्प्यात परतावा मिळाल्याने कंपनीची चर्चा होऊ लागली. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, केरळपासून छत्तीसगड राज्यपर्यंत कंपनीचा 'व्याप' वाढला. गुंतवणूक वाढत गेल्याने सुधीर मोहितेकडे मोठ्या प्रमाणावर पैसा येऊ लागला. त्यामुळे त्याची 'लाइफ स्टाइल'ही बदलली. तो किमती चारचाकी गाड्या वापरू लागला. त्याच्या चालकाला २७ हजार रुपये पगार आणि इतर भत्ते अशा सुविधा होत्या. एका कामासाठी चार माणसांची नेमणूक असा रुबाब सुरू झाला. शेतकर्‍यांच्याकडून घेतलेले पैसे व्यवस्थापनावर अशा पद्धतीने खर्च होऊ लागल्याने कंपनीचा कारभार तोट्यात येऊ लागला. काही दिवसांतच कंपनीकडून मिळणाऱ्या खाद्य आणि औषधांचा तुटवडा भासू लागला, डॉक्टरांच्या व्हिजिटही बंद झाल्या. त्यामुळे पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले. पक्षी सांभाळताना शेतकरी मेटाकुटीला आला आणि दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेला अखेर तोंड फुटले. राज्यभरातील गुंतवणूकदार शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि आणि कंपनीच्या विरोधात तक्रारी दाखल करण्याचे सत्र सुरू झाले.

\Bवर्षांत साडेसात हजार अंडी खरेदीची हमी\B

कंपनी २०० पक्ष्यांच्या युनिटसाठी शेतकऱ्यांकडून ७५ हजार रुपये घेत होती. यापैकी सुरूवातीला ४० हजार रुपये व पुढील चार महिन्यांत ३५ हजार रुपये देणे बंधनकारक होते. सुरुवातीला ४० हजार रुपये भरले की, कंपनीकडून २०० पक्षी, भांडी, औषधे, लसीकरण करणाऱ्या डॉक्टरांची व्हिजिट, पक्ष्यांना लागणारे खाद्य आणि पक्षी दगावले तर त्याची संपूर्ण जबाबदारी कंपनी घेत होती. कंपनीकडून मिळालेल्या २०० पक्ष्यांपैकी १२० पक्षी कंपनी स्वतः खरेदी करणार होती. याबरोबरच पहिली दोन हजार अंडी ५० रुपये दराने, दुसरी दोन हजार अंडी ३० रुपये दराने आणि त्यानंतरची साडेतीन हजार अंडी २० रुपये दराने कंपनी खरेदी करणार होती. याबरोबरच शेतकऱ्याकडे शिल्लक असलेल्या पक्ष्याची प्रतिनग ५०० रुपये देऊन कंपनी स्वत:च खरेदी करणार असल्याचे करारात नमूद केले आहे. गुंतवणूकदाराकडून कंपनीने एका वर्षात सात हजार ५०० अंडी आणि १२० पक्षी खरेदी करण्याचे बंधन कंपनीवर असल्याचेही करारात नमूद आहे. कंपनीने हमी पूर्ण न केल्यास गुंतवणूकदाराला कायदेशीर कारवाईचा अधिकारही या करारपत्रात दिला आहे.

(क्रमश:)

०० ०० ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांवर आता सुलतानी संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामसेवक संपावर तर महसूल कर्मचारी आज, गुरूवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहेत. महापुरामुळे नुकसान झालेल्यांचे पंचनामे लटकले आहेत. अर्थसहाय वाटपातही अडथळा आला आहे. यामुळे पूरग्रस्तांवर सुलतानी संकट ओढवले आहे. त्यांच्या अडचणीत भरच पडली आहे. परिणामी पुरामुळे पूर्णपणे उघड्यावर आलेले सैरभैर झाले आहेत. आता कुणाकडे धाव घ्यायची असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे करवीर, शिरोळ तर उर्वरित तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे, घरांचे मोठे नुकसान झाले. चार हजारांवर घरे जमीनदोस्त झाली आहेत. नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे करण्याची जबाबदारी गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांच्यावर आहे. मात्र ३१ ऑगस्टपासून विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ग्रामसेवक नसल्याने पंचनाम्यांचे काम थांबले आहे. ग्रामपंचायतीमधील प्रशासकीय कामकाजही थांबले आहे. पंचनाम्यात महत्वाची भूमिका असलेले ग्रामसेवक संपावर असल्याने तलाठी, कृषी सहायकांनीही पाठ फिरवल्याच्या तक्रारी आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे पुकारलेल्या काम बंद आंदोलनात जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील पदोन्नतीचे नायब तहसीलदार, अव्वल कारकून, शिपाई काम बंद आंदोलनात सहभागी होत आहेत. पंचनाम्याचा अहवाल तालुका ते जिल्हा प्रशासनापर्यंत पोहचवणारी यंत्रणाच यामुळे विस्कळीत होणार आहे. टिप्पणी तयार करून अर्थसहाय्याच्या प्रस्तावांना मंजुरी घेण्याचे कामही थंडावणार आहे. नुकसानीच्या पंचनाम्याची माहिती एकत्रीकरणावरही परिणाम होणार आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीने सर्वस्व हिरावून घेतलेल्या नुकसानग्रस्तांना आता कर्मचारी आंदोलनाचीही झळ बसत आहे. ग्रामसेवक आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारशी संबंधित आहेत. म्हणून जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांकडून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करणे अशक्य आहे. काम बंद आंदोलन बेमुदत असल्याने कधीपासून काम पूर्ववत होणार, या प्रश्नाचे उत्तरही पूरग्रस्तांना मिळत नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकार्पण सोहळ्यानिमित्त पूरग्रस्तांना मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण काम पूर्ण झाले आहे. चौक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (ता. ६) दुपारी सव्वा बारा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. लोकार्पण सोहळा साधेपणाने करताना पुराच्या पाण्याने पडझड झालेल्या उत्तर मतदारसंघातील ३०० कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आहेत, तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे,' अशी माहिती महापौर माधवी गवंडी व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्याध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

कार्याध्यक्षा क्षीरसागर म्हणाल्या, 'छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरणासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी निधी उपलब्ध करुन दिला. सुशोभीकरणाचे अभिमानास्पद असे काम झाले आहे. नुकत्याच येवून गेलेल्या पुरामुळे शहरवासियांचे नुकसान झाल्याने साध्या पद्धतीने हा सोहळा करण्यात येणार आहे. सकाळी सात वाजता पंचगंगा नदीच्या जलाने महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर मंत्रघोषांमध्ये पुतळ्याची विधीवत पूजा केली जाणार आहे. यावेळी उत्तर मतदारसंघातील पूरबाधित ३०० कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. पूर्ण घर पडलेल्या पूरग्रस्तांना दहा हजार तर किरकोळ नुकसान झालेल्या कुटुंबाला पाच हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. तसेच पुरामध्ये मृत अथवा वाहून गेलेल्या ५० जनावरांच्या मालकांना ५० जनावरे देण्यात येणार आहेत.'

सोहळ्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, संभाजीराजे छत्रपती, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार बैठकीस उपमहापौर भूपाल शेटे, सुशोभीकरण समितीच्या अध्यक्ष हसीना फरास, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक बाबा पार्टे, नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल कर्मचाऱ्यांचे आजपासूनकाम बंद आंदोलन

$
0
0

कोल्हापूर

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, महसूल लिपिकांचे पदनाम बदलावे आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज, गुरूवारपासून महसूल कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या शिष्टमंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुनील देसाई, अखिल शेख, संदीप पाटील, नवनाथ डवरी, अश्विनी कारंडे, राणी शिरसाट, स्नेहल जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

नायब तहसीलदार पदावरील सरळसेवा निवडीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करावे, विभागांतर्गंत बदलीचे अधिकार विभागीय आयुक्तांना द्यावेत, प्रत्येक तालुक्यात खनिकर्म निरीक्षक म्हणून अव्वल कारकुनांची नियुक्ती करावी, महसूल कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा द्याव्यात आदी १८ मागण्यांसाठी राज्य महसूल संघटनेतर्फे ११ ऑगस्टपासून विविध टप्प्यात आंदोलन केले जात आहे. सरकार मागण्यांप्रश्नी सकारात्मक नसल्याची भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची झाली आहे. संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांची सरकारच्या वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांशी बैठका फेऱ्या झाल्या. मागण्यांसंबंधी सरकारी आदेश काढण्यास नकार मिळाल्याने कर्मचारी काम बंद आंदोलन करीत आहेत. गुरूवारी सकाळी दहा वाजता सर्व कर्मचारी कामावर येतील. मात्र ते कामावर रूजू न होता, कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी ठिय्या मारणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाच्या १४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

$
0
0

कोल्हापूर

महापालिकेच्या अस्थापनावरील १४ कर्मचाऱ्यांना बुध‌ावारी पदोन्नती मिळाली. याबाबतचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी काढले. फायरमन संवर्गातील वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना तांडेल पदावर पदोन्नती देताना आदेश निघाल्यापासून त्यांच्या वेतन ग्रेडमध्ये वाढ होणार आहे. अनेक नगरसेवकांनी विभागातील कर्मचाऱ्यांना अद्ययावत साहित्य देण्याबरोबरच त्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याची तसेच तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी केली होती. त्यानुसार अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये विलास सातपुते, रमेश जाधव, महादेव भालकर, जयवंत डकरे, धनाजी यादव, शिवाजी नलवडे, संजय माने, राजेंद्र भोसले, भगवंत शिंगाडे, वामन चौरे, पुंडलिक पवार, किसण पवार, सर्जेराव लोहार, बाबूराव सनगर यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images