Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आघाडीचे २१ आजी-माजी आमदार संपर्कात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील आमदारांचे शिवसेना - भाजप युतीत मोठ्या प्रमाणात 'इनकमिंग' होत असताना 'आघाडीचे २१ आजी-माजी आमदार संपर्कात आहेत,' असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी गुरुवारी केला.

अरण येथे सावता परिषदेतर्फे आयोजित माळी समाजाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. 'मुंबई येथील शिवाजी पार्कवर लवकरच 'रासप'तर्फे दहा लाखांचा महामेळावा होणार आहे. विधानसभेसाठी युतीकडे ५० जागांची मागणी केली असून, दोन्ही काँग्रेसमधील २१ आजी-माजी आमदार संपर्कात आहेत,' असा दावा जानकर यांनी केला.

संत सावता माळी यांच्या जन्मगावी अरण येथे दरवर्षी माळी समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात येतो. राज्यभरातील दहा हजारांहून अधिक समाजबांधव मेळाव्यास उपस्थित होते. महामेळाव्यास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याऐवजी जानकर उपस्थित होते. या वेळी माळी समाजाचे पहिले मंत्री अतुल सावे यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. माळी समाजाचे नेते आणि सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांचा भाजपने केवळ वापर करून घेतला आहे, अशी खंत वक्त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर लगेचच दूरध्वनीवरून मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी कल्याण आखाडे यांची 'म्हाडा' औरंगाबाद विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली.

इच्छुकांची हजेरी

विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असताना इच्छुक उमेदवारांकडून आणि विद्यमान आमदारांकडून विविध समाजांच्या मेळाव्यास उपस्थिती दिसून येत आहे. गुरुवारी अरण येथील माळी समाजाच्या महामेळाव्यास गेल्या निवडणुकीत माढा मतदारसंघातून पराभूत झालेले शिवसेना उमेदवार शिवाजी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबन शिंदे आणि भाजप प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे तिघेही व्यासपीठावर एकमेकांशेजारी बसले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धमक नसेल तर कामे कशी होतील: शरद पवार

$
0
0

म. टा. वृत्तेवा, इस्लामपूर

'राष्ट्रवादी सोडून गेलेली मंडळी पक्ष सोडण्यासाठी कामे होत नसल्याचे कारण सांगत आहेत. पण तुमच्यात काम करून घ्यायची धमक नाही, तर कामे कशी होतील,' असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना विचारला.

इस्लामपूर येथे राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी शुभारंभ समारंभात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, बबनराव ढाकणे, कन्हैयाकुमार, आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भगत पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'सत्ता असो वा नसो कामाप्रती निष्ठा असायला हवी. कामे होत नाहीत म्हणून सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाणे योग्य नाही. सध्या सत्तेचा गैरवापर होत आहे. जाती पातीवरून हल्ले होतात. माणसाला जनावराएवढीसुद्धा किंमत राहिली नाही, अशा काळात आपण सर्वांनी एकत्र राहायला हवे. पुन्हा एकदा आपल्या देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी ताकद द्या.'

ते पुढे म्हणाले, 'जी मंडळी सध्याचा महाराष्ट्र चालवू शकतात, अशी काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मंडळी आम्हाला राज्यात दिसतात. त्यात जयंत पाटील यांना आम्ही अग्रस्थानी पाहतो. पाटील यांच्याकडे राज्याची जबाबदारी आहे. गेली ३० वर्षे तुम्ही त्यांना साथ दिली आहे, ती तशीच साथ कायम ठेवा. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्यापासूनच्या तीन पिढ्या या घराण्यावर प्रेम करत आल्या आहेत. स्थानिक लोकांना प्राधान्य देवून त्यांच्या हाताला काम देण्याची सुरुवात बापूंनी केली. ग्रामीण भागात उद्योग उभारून बापूंनी हजारो हातांना काम दिले. लोकांच्या भावना दुखवणार असतील तर वाद वाढवायचे नाहीत, संघर्ष टोकाला जाऊ द्यायचा नाही, म्हणून बापूंनी खूजगाव चांदोलीचा वाद मिटविला. जनजागृती करण्यासाठी टोकाचे कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती. समाज समृद्ध करण्यासाठी आणि पाया भक्कम करण्यासाठी बापूंनी कष्ट घेतले. त्यांच्या नंतरची पिढी सुद्धा त्यांच्या दोन पावले पुढे आहे. यापुढे तुम्ही सर्वांनी जयंतरावांच्या पाठीमागे ताकद उभा करणे हीच खरी बापूंना श्रद्धांजली ठरेल.'

जेष्ठ नेते बबनराव ढाकने, 'राजारामबापूंनी प्रतिकूल परिस्थितीत वंचितांचे नेतृत्व केले. वंचित माणूस स्वाभिमानाने उभा करण्यासाठी बापूंनी जीवन खर्ची घातले. बापू हे कोणत्या पक्षाचे नव्हेतर सर्व सामान्यांचे नेते होते. त्यांनी सत्तेसाठी कधीच काम केले नाही.'

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, 'राजारामबापूंनी २० कलमी कार्यक्रम लोकांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले. समानतावादी विचारसरणीच्या विरोधात असणाऱ्यांना बापूंनी विरोध केला. गोरगरीब जनतेची सेवा करण्याची नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही.'

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'उपकाराची परतफेड म्हणजे गद्दारी असा काहींसा ट्रेंड महाराष्ट्रात रूजत आहे. पवारसाहेबांनी मला इतक भरभरून दिलं, तरीही मी दुसऱ्या पक्षात चाललोय असे सांगणाऱ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. आपण कोणाच्या चुका काढत बसलो तर देशाचे विघटन व्हायला वेळ लागणार नाही. स्वतःच्या तब्बेतीची काळजी न करता सर्वसामान्य माणूस जगाला पाहिजे, यासाठी पवारसाहेब अहोरात्र झटत असतात. त्यांना साथ दिली पाहिजे.'

माजी आमदार लक्ष्मण माने म्हणाले, 'सध्या राजकीय परिस्थिती अतिशय चमत्कारित आहे. जे जाणार आहेत त्यांनी लवकर जावे म्हणजे वातावरण चांगले होईल. ज्यांना कंटाळून आम्ही बाहेर पडलो, त्याच जातीयवाद्यांच्या पंगतीला जात आहात, हे विसरू नका. सत्तेचे आणि पैशाच्या आमिषाने सगळेजण जात आहेत. आपलीच माणसं भाजप मध्ये गेल्याने आता भाजपचे शुद्धीकरण होत आहे.'

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, 'एखादा विचार कधीच संपत नाही. या मातीत बापू या नावाचं महत्त्व काय आहे, हे काम करताना मी अनुभवलं. तळागाळातील कार्यकर्ता घडवण्याचे काम बापूंनी केले. आज पुरोगामी महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्यासाठी एकसंघपणे काम करण्याची गरज आहे. कधी चांगले वाईट दिवस आले तरी संकटात जो साथ देतो तो खरा कार्यकर्ता. मी बापूंच्या पोटी जन्मलो हे माझे भाग्य समजतो.' यावेळी जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, सरोजिनी चव्हाण यांची भाषणे झाली.

यावेळी सरोजिनी चव्हाण लिखित 'राजयोगी' ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. जयंत पाटील यांचे पुत्र राजवर्धन यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी स्वागत केले. राजारामबापू कारखान्याचे चेअरमन पी. आर. पाटील यांनी आभार मानले. यावेळी राजारामबापू दूध संघाचे चेअरमन विनायक पाटील, आमदार सुमनताई पाटील, आनंदराव पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, विश्वास पाटील, सदाशिव पाटील उपस्थित होते.

'इंग्रजांच्या जासूसांना घालवायला हवे'

युवा नेता कन्हैयाकुमार म्हणाले, 'आपल्या देशातून इंग्रजांना घालवयाला जेवढा त्रास झाला नाही. तेवढा त्रास या इंग्रजांच्या जासूसांना घालवायला होणार आहे. ते स्वतःला राष्ट्रवादी म्हणतात आणि बी.एस.एन.एल. सारखी राष्ट्राची संपत्ती असलेली संस्था विकत आहेत. आपल्या देशात १०० पैकी ४७ लोक बेरोजगार केले आहेत. इंग्रजांनी जसे प्रयोग केले तसेच प्रयोग हे आपल्यावर करत आहेत. भाजपला हरवायचे असेल तर राजारामबापूंसारखी पदयात्रा काढून जनसंपर्क वाढवावा लागेल. त्यांचे विचार आत्मसात करावे लागतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणच्या माहितीचे संकलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कदमवाडीतील पाच एकर २९ गुंठे गायरातील अतिक्रमणाचा नेमका प्रश्न आणि त्याला मिळणारे अभय यावर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केली. याची दखल महसूल प्रशासनाने घेतली असून हे अतिक्रमण काढण्यासाठी हालचाली वेगावल्या आहेत. महसूल प्रशासनाने माहिती संकलनाचे काम सुरू केले आहे. यासंबंधी शुक्रवारी (ता. २) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे.

कदमवाडीतील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांचा त्रास मूळ रहिवाशांना आणि लगतच्या शेतकऱ्यांना होत आहे. महसूल, महानगरपालिकेने त्यांच्या तक्ररीची दखल न घेतल्याने हायकोर्टात त्यांनी धाव घेतली. हायकोर्टाच्या आदेशानुसार महसूल प्रशासनास आता कारवाई करावी लागणार नाही. न केल्यास याचिकाकर्ते शेतकऱ्यांनी अवमान याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. यांची सविस्तर माहिती 'मटा'तील बातम्यांतून प्रसिद्ध झाल्यानंतर अतिक्रमणधारकांत खळबळ उडाली आहे. अतिक्रमणधारकांना पाठीशी घालणाऱ्यांकडून पडद्याआडच्या हालचालींना वेग आला आहे.

प्रॉपर्टी कार्ड मिळाले आहेत, असे कारण सांगून अतिक्रमण नियमितीकरणासाठी दबाव वाढवला जात आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड मिळाले तरी अतिक्रमण केलेल्या जमिनीची मालकी सरकारचीच आहे. सरकारी जागेवरील अतिक्रमण पाडण्याचे सरकारचेच आदेश आहेत. हायकोर्टानेही अतिक्रमण काढण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली आहे. यामुळे कितीही राजकीय दबाव असला तरी स्थानिक महसूल प्रशासनास अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करावी लागणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून गायरानात एकूण घरे किती आहेत, त्यांचे बांधकाम कोणते आहे, कोणते घर कधी बांधले आहे, यासंबंधी माहिती संकलित केले जात आहे.

कदमवाडी गायरानातील अतिक्रमित घरांची सविस्तर माहिती घेतली जात आहे. पहिल्या टप्यात काही माहिती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील. सर्व माहिती उपलब्ध झाल्यानंतर अतिक्रमण निर्मूलनासंबंधी हायकोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुडाच्या राजकारणामुळे लोकशाही धोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशात सध्या सुडाचे राजकारण सुरू आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक समानता नाही. सुडाच्या राजकारणामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. संविधान टिकेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. देशातील सध्याचे राजकारण पाहता २०२४ मधील निवडणूक होईल का, याविषयी साशंकता वाटते,' असे मत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.

सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट, महाराष्ट्र विकास आघाडी बहुजन अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरम महाराष्ट्रतर्फे 'सेक्युलर जनतेची संवाद परिषद' झाली. परिषदेचे उद्घाटक म्हणून कोकाटे बोलत होते. महाराष्ट्र विकास आघाडीचे राज्याध्यक्ष मंचकराव डोणे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी महावितरणमधील सेवानिवृत्त अधिकारी एस. पी. कांबळे यांचा सपत्नीक सत्कार झाला. मानचिन्ह, बुद्धमूर्ती, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. येथील शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला.

कोकाटे म्हणाले, 'गुणवत्ता ही कुणाची मक्तेदारी नाही. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कर्तबगारीकडे पाहिले की त्याची साक्ष पटते. कादंबरीकार, शाहीर, कथाकार, नाटककार म्हणून त्यांची कामगिरी श्रेष्ठ आहे. त्यांच्या 'फकिरा'च्या दर्जाची साहित्यकृती अन्य कोणत्याही प्रादेशिक भाषेत नाही.अण्णा भाऊ हे व्यक्ती नसून साहित्याचे, प्रबोधनाचे, विचारांचे विद्यापीठ होते. त्यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार कार्य केले.' सत्काराला उत्तर देताना एस. पी. कांबळे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माझा सत्कार होत आहे हे माझे भाग्य समजतो,'असे भावोत्कट उद्गार काढले.

याप्रसंगी प्राचार्य सुरेश वाघमारे यांचे भाषण झाले. बोधिवृक्षाला पाणी घालून व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून परिसंवादाचे उद्घाटन झाले. स्वागताध्यक्ष संभाजी कांबळे यांनी स्वागत केले. अनिल म्हमाणे यांनी प्रास्ताविक केले. इंद्रजित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश केसरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अॅड. इंद्रजित कांबळे, बसवंताप्पा उबाळे, सरोज कांबळे, वैभव कांबळे, प्रा. कपिल राजहंस दयानंद ठाणेकर आदी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीचे आजी-माजी २१ आमदार संपर्कात

$
0
0

पंढरपूरः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील आमदारांचे शिवसेना - भाजप युतीत मोठ्या प्रमाणात 'इनकमिंग' होत असताना 'आघाडीचे २१ आजी-माजी आमदार संपर्कात आहेत,' असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी गुरुवारी केला.

अरण येथे सावता परिषदेतर्फे आयोजित माळी समाजाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. 'मुंबई येथील शिवाजी पार्कवर लवकरच 'रासप'तर्फे दहा लाखांचा महामेळावा होणार आहे. विधानसभेसाठी युतीकडे ५० जागांची मागणी केली असून, दोन्ही काँग्रेसमधील २१ आजी-माजी आमदार संपर्कात आहेत,' असा दावा जानकर यांनी केला.

संत सावता माळी यांच्या जन्मगावी अरण येथे दरवर्षी माळी समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात येतो. महामेळाव्यास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याऐवजी जानकर उपस्थित होते. या वेळी माळी समाजाचे पहिले मंत्री अतुल सावे यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. माळी समाजाचे नेते आणि सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांचा भाजपने केवळ वापर करून घेतला आहे, अशी खंत वक्त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरवठा मुख्यालयातही भेटबंदी

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा कार्यालयात सर्वसामान्यांना प्रशासकीय कामानिमित्त कर्मचाऱ्यांना भेटण्यास जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे यांनी अघोषित बंदीचा तोंडी फतवा काढण्याच्या तक्रारी आहेत. यामुळे शिधापत्रिका, धान्य दुकानासंबंधीच्या तक्रारीवर तालुका पातळीवर न्याय न मिळाल्यास कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी शिस्तीच्या नावाखाली एकाधिकारशाही लादत सामान्यांना न्याय नाकारण्याचा प्रकार या कार्यालयाकडून होत असल्याचा आरोपही होत आहे.

शहर आणि जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांवर नियंत्रण ठेवणे, शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला धान्य वितरण करणे, नवीन शिधापत्रिका वाटप करणे, विभक्तीकरण अशा कामकाजासंबंधी जिल्हास्तरावरील तक्रारींचे निरसन करण्याची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची आहे. यापूर्वीच्या सक्षम अधिकाऱ्यांमुळे हा विभाग राज्यात नावलौकिक मिळवला होता. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी राणी ताटे पुरवठा अधिकारी म्हणून रूजू झाल्या. अल्पावधीतच त्यांचे कामकाज वादग्रस्त बनले आहे.

गाव, तालुकास्तरावर हेलपाटे मारूनही न्याय न मिळालेले लोक जिल्हा पुरवठा कार्यालयात रोज येतात. कार्यालयात प्रवेश करताच एकाचवेळी तीन शिपाई त्यांना अडवतात. कुणाकडे काम आहे, पुढे जाऊ नका, आहे तिथेच थांबा, असे म्हणत रोखले जाते. ज्यांना भेटायचे आहे, त्यांचे नाव सांगितल्यानंतर पहिल्यांदा मॅडमना (जिल्हा पुरवठा अधिकारी ताटे) भेटा, असे म्हणतात. त्यानंतर संबंधित ताटे यांना भेटण्यासाठी चिठ्ठी देतात. मात्र, भेटीसाठी अनेक तास प्रतीक्षा करत थांबावे लागते, अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. पत्रकारांनीही असा अनुभव अनेकवेळा आला आहे.

०००

जिल्हाधिकाऱ्यांची सहज भेट,

ताटेंकडे मात्र प्रतीक्षा

जिल्हाधिकारी दौलत देसाई सामान्यांना कोणत्याही दिवशी सहजपणे भेटतात. तक्रारदारांची व्यथा ऐकूण घेत न्याय मिळवून देण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करतात. जिल्ह्याची प्रशासकीय जबाबदारी असतानाही कक्षासमोरील प्रत्येकाला ते सहज भेटू शकतात. याउलट केवळ पुरवठा विभागाचा कार्यभार असताना ताटे यांना भेटण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते. आठवड्यापूर्वी पूर्वसूचना देऊनही काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी त्या उपस्थित राहिल्या नाहीत. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध करून ठिय्या आंदोलन केले होते.

००००

अधिकाऱ्यांत सुप्त संघर्ष

पुरवठा विभागात अनेक दिवसांपासून अधिकाऱ्यांतील सुप्त संघर्ष धुमसतो आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कक्षात फायलींच्या फेकाफेकीचे प्रकारही घडल्याचे सांगितले जाते. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभाग विशेष चर्चेत आला आहे. तेथे कामानिमित्त जाणाऱ्यांना सौजन्याची वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. म्हणून एकाधिकारशाही लादणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याच्या पावित्र्यात काही संघटना आहेत.

००००

कोट...

लोकशाहीमध्ये जनता मालक आणि अधिकारी नोकर असतात. विविध घटकांतील लोक विविध प्रकारचे कर भरतात. त्यातून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार होतात. यांचे भान जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ठेवावे. कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यास भेटण्याचा अधिकार नागरिकांना आहे. यावर जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे निर्बंध आणू शकत नाहीत. कोल्हापुरात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. प्रसंगी त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.

सुभाष देसाई, संस्थापक अध्यक्ष, ब्लॅक पँथर

०००

कोट

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्फे गरीब, वंचित घटकातील कुटुंबांना धान्य मिळते. यामुळे पुरवठा विभागाशी सर्वाधिक संपर्क सामान्य लोकांचा येतो. अशांना प्रशासकीय कामाकाजाच्या तक्रारीसंबंधी जिल्हा पुरवठा अधिकारी ताटे भेटत नसतील, गाऱ्हाणी ऐकूण घेत नसतील, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सर्वसामान्यांना भेटण्यास मनाई करत असतील तर हे कोल्हापूरची जनता सहन करणार नाहीत. कामकाजात सुधारणा न झाल्यास ताटे यांच्या बदलीची मागणी केली जाईल.

संजय पाटील, प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापक बाजीराव पाटील निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वडणगे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी तील मुख्याध्यापक बाजीराव पाटील याला प्रशासनाने गुरुवारी सेवेतून निलंबित केले. करवीर पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली होती. बाल लैंगिक छळ कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

मुख्याध्यापक पाटीलच्या विरोधात पालकांनी तक्रारी केल्या होत्या. शाळेतील मुलींशी गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी नोंदविल्या. या प्रकाराची गंभीर दखल घेत शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे तक्रार केल्या. प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी करवीर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी शंकर यादव व केंद्रप्रमुख तनुजा कोळेकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. चौकशी अधिकाऱ्यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीअंती गटशिक्षणाधिकारी यादव यांनी, 'त्या' मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. शिक्षण विभागातर्फे गुरुवारी निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पोलिसाकडील दाखल गुन्ह्याची माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारी आंदोलन

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिकशाळा मुख्याध्यापक संघातर्फे शनिवारी (ता. ३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी दोन ते पाच या वेळेत आंदोलन करण्याचा निर्णय मुख्याध्यापक संघ येथे झालेल्या बैठकीत झाला. शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध करण्याचा निर्णय झाला. बैठकीला सचिव दत्ता पाटील, दादा लाड, डॉ. सुभाष जाधव, प्रा. जयंत आसगावकर, वसंतराव देशमुख, सुधाकर सावंत, राजेश वरक, विलास साठे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हज यात्रेकरू रवाना

$
0
0

कोल्हापूर: हज यात्रेसाठी कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून ११० यात्रेकरू रवाना झाले. कोल्हापूर हज कार्पोरेशनतर्फे हज यात्रेचे नियोजन केले आहे. गुरुवारी रात्री दसरा चौक येथे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व यात्रेकरुंच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या करमणूक कार्यक्रम

$
0
0

कोल्हापूर : श्री सौराष्ट्र कडवा पटेल समाज कोल्हापूरतर्फे शनिवारी (ता. १०) करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मार्केट यार्ड येथील श्री शाहू सांस्कृतिक भवन येथे रात्री ८.३० वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होईल. गुजरात येथील प्रसिद्ध गायक हेमंत चौहाण, गीताबेन चव्हाण, मयूर चौहाण, चंद्रेश गढवीसह अन्य कलाकार कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे पास सत्यम पान शॉप टाकाळा चौक, गणेश टायर सांगली रोड, जलाराम ट्रान्स्पोर्ट लक्ष्मीपुरी येथे उपलब्ध आहेत.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मणांना अॅट्रोसिटी कायद्याचे संरक्षण देण्याची मागणी

$
0
0

पंढरपूर:

ब्राह्मण समाजाला आरक्षण नको. मात्र, अॅट्रोसिटी कायद्याचे संरक्षण द्या अशी जोरदार मागणी ब्राह्मण समाज मेळाव्यात करण्यात आली. एखाद्या प्रवृतीवरून संपुर्ण समाजाला बदनाम करण्याच्या प्रकारास आळा बसू शकेल असा सूर यावेळी उपस्थितांमधून निघाला.

माढा येथे ब्राह्मण समाज सेवा संघाच्यावतीने तालुक्यातील ब्राम्हण समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मण समाजाने आरक्षण मागितले नाही. 'सेव्ह टॅलेंट, सेव्ह नेशन' ही संकल्पना आता पुढे येते आहे. राज्यात सुमारे दीडशे पुस्तकांमध्ये ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहून समाजाची बदनामी करण्यात आली असल्याचा आरोप मेळाव्यात करण्यात आला. ब्राह्मण समाज पुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर समाजाला आरक्षण नको संरक्षण हवे आहे अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. त्याशिवाय, समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, उद्योगधंदे सुरू करता यावेत यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे आणि राज्यातील पौरोहित्य करणाराना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जावे या मागण्याही राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश ब्राह्मण परिषदेने समाजाच्या प्रश्नावर समाजजागृतीचे अभियान हाती घेतले असल्याचे परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. मोहिनीताई पत्की यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनबाबत पाठपुरावा करू

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याबाबत महापालिकेच्या सभेत झालेल्या ठरावाच्या प्रतिसह सोमवारी माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेतली. याबाबत सर्व नगरसेवकांनी पत्र द्यावे, त्याबाबत पाठपुरावा करू, ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली. त्यानंतर माजी नगरसेवकांनी शनिवारी (ता. ३ ऑगस्ट) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला.

देशातील खासदार-आमदारांना ज्याप्रमाणे पेन्शन मिळते, त्याप्रमाणे पेन्शन द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवकांनी करत तसा ठराव सभेत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नुकत्याच झालेल्या सभेत माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याचा ठराव मंजूर केला होता. तसेच यापूर्वी २०१४ मध्येही अशाच पद्धतीचा ठराव केला होता. शिष्टमंडळाने महापौर माधवी गवंडी यांच्याकडून ठरावाची प्रत आयुक्तांकडे सादर करत प्रशासनाने कार्यवाही करून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची विनंती केली. 'धोरणात्मक निर्णय असल्याने याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. मात्र सर्वांनी एकत्र येत पत्र दिल्यास ते राज्य सरकारच्या संबंधित विभागाला पाठवू.' अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर दोन दिवसांत पुन्हा आयुक्तांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला.

तसेच तीन ऑगस्ट रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांनाही माजी नगरसेवकांच्या पेन्शनबाबतचे निवेदन देण्याचा निर्णय घेतला. शिष्टमंडळात माजी माहपौर आर. के. पोवार, मारुतराव कातवरे, बाबा पार्टे, नंदकुमार मोरे, सुजित पोतदार, अशोक भंडारी, अदिल फरास, प्रकाश गवंडी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धाकधूक वाढली

$
0
0

फोटो आहेत

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसांमुळे राधानगरी धरण ओव्हरफ्लो होऊन पंचगंगा नदीने पात्र विस्तारले आहे. नदीने धोका पातळी ओलांडली असून पाणी हळूहळू नागरी वस्तीमध्ये शिरू लागले आहे. सुतारवाडा, रमणमळा येथील विन्स हॉस्पिटल, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नरच्या मागे व मस्कुती तलावाच्या परिसरात पुराचे पाणी आले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार सकाळपासून पावसाने थोडीशी उसंत घेतली असली, राधानगरी धरणातून विसर्ग चालूच असल्याने पुराचा धोका वाढू लागला आहे.

शहर आणि जिल्ह्याला गेल्या आठदिवसांपासून पावसाने झोडपून काढले. धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण ओव्हर फ्लो होऊन चार स्वयंचलित दरवारजे उघडले. पावसांने थोडी उसंत घेतल्यानंतर गुरुवारी रात्री दोन दरवाजे बंद झाले असले, तरी अजूनही धरणातून ४,२५६ क्युसेक्स विसर्ग सुरू असून पंचगंगा नदीने (४३ फूट) धोका पातळी ओलांडली आहे. पूरस्थिती उद्भवून रमणमळा, महावीर कॉलेजच्या मागील बाजू, विन्स हॉस्पिटल परिसरातील अनेक बंगल्यांच्या बेसमेंटमध्ये पाणी घुसले. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वितावरण निर्माण झाले आहे. अशीच स्थिती बापट कँप परिसरात आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने जयंती नाल्यातील पाण्याला प्रचंड फुगवटा येऊन पाणी पात्राबाहेर आले. सुतारवाडा, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नरच्यामागे पाणी आले आहे. तसेच नष्टे इस्टेटच्या मागील बाजूस नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले. तर मस्कुती तलाव परिसरातही पुराचे पाणी आले. राधानगरी धरणातून पाण्याचा असाच विसर्ग सुरू राहिल्यास शुक्रवार पेठेतील महापालिकेच्या पंचगंगा हॉस्पिटलच्या रस्त्यावर रात्रीपर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे. सुतारवाड्यात पाणी आल्यानंतर दहा कुटुंबांचे यापूर्वीच स्थलांतर केले असले, तरी पाण्याची पातळी वाढल्यानंतर येथील आणखी पाच कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

पंगगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने जिल्हा व महापालिका आपत्ती व्यवस्थापन वारंवार फिरती करून पूरस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतिदिनी जि.प.कर्मचाऱ्यांचे आंदोलन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा परिषदेतील कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यभर नऊ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेसमोर प्रातिनिधीक स्वरुपात काही कर्मचारी आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधतील. जि.प. कर्मचाऱ्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी राज्यकर्त्यांनी त्यांना केवळ आश्वासनाचे गाजर दाखविण्याचे काम केले, असा आरोपही महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बलराज मगर यांनी पत्रकार परिषदेत केला.

मगर म्हणाले, 'राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. सेवांतर्गत कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगत योजना, सहावा वेतन आयोगातील त्रुटी यासह अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुनही सोडवणूक झाली नाही. सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ नऊ ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेसमोर आंदोलन होणार आहे. महिला परिचरांच्या हस्ते सायंकाळी उपोषणाची सांगता होईल. त्यानंतर सीईओंना निवेदन दिले जाईल.' पत्रकार परिषदेला आरोग्य संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे, कर्मचारी संघटनेचे कृष्णात किरुळकर, राजाराम वरुटे, एम. आर. पाटील, एम. एम. पाटील, महावीर सोळांकुरे, अमोल घाटगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमाणपत्र वितरण

$
0
0

कोल्हापूर: ललित गांधी फाऊंडेशन संचलित शिक्षक अभ्यासक्रमच्या २०१८-१९च्या ११ व्या बॅचचे प्रमाणपत्र वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे प्रमुख पाहुणे तर संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या बॅचमधील गौरी गुणेने ८८. ८३ टक्के, पल्लवी पाटीलने ७४. ६७ तर सुप्रिया पाटीलने ७४. ५० टक्के गुण मिळवले. याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महावीर एज्युकेशन सोसायटीचे सचिव महेश सामंत, महावीर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या धनाश्री व्हनागडे, मुख्याध्यापिका विद्या सरमळकर, निलम जाधव आदी उपस्थित होत्या. स्मिता गायकवाड यांनी स्वागत केले. तृप्ती कांबळे व रुचिरा कारेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘टीपी’ ला ठोकले टाळे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जुनी मोरे कॉलनी येथील वहिवाटीच्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढण्यास दोन वर्षेपासून दिरंगाई करत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी नगरसेविका दीपा मगदूम यांच्यासह नागरिकांनी राजारामपुरी येथील नगररचना कार्यालयाला (टीपी) टाळे ठोकले. उपशहररचनाकार (सहाय्यक अभियंता) एन. एस. पाटील यांना शिष्टमंडळाने धारेवर धरले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी शनिवारी (ता.३) याबाबत होणाऱ्या सुनावणीदरम्यान निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आले.

जुनी मोरे कॉलनी येथे गेल्या २५ वर्षांपासून सुमारे २० फुटांचा रस्ता सोडला आहे. महापालिकेच्यावतीने येथे अनेकवेळा रस्त्याची डागडुजी केली. मात्र दोन वर्षापूर्वी सावर्डेकर व नलवडे या मिळकतदारांनी बांधकाम करून संरक्षक भिंत उभारली. संरक्षक भिंतीचे बांधकाम पाच फूट रस्त्यात येत असल्याने नगरसेविका मगदूम यांच्यासह जुनी मोरे कॉलनीतील नागरिकांनी महापालिका व नगररचना विभागाकडे तक्रार केली. अतिक्रमण हटवण्यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार केला. पण टीपीचे उपशहररचनाकार पाटील यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. स्थायी समितीमध्ये अनेकदा या रस्त्यावरील अतिक्रमण काडण्याबाबत चर्चा झाली. टीपी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याचे आश्वासनही दिले. पण त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही. अन्य मिळकतदारांनी वहिवाटीनुसार २० फुटाचा रस्ता सोडलेला असताना या दोन मिळकतदारांमुळे रस्ता अरुंद झाला. याची दखल घेतली जात नसल्याने येथील नागरिक संतप्त झाले.

शुक्रवारी नगरसेविका मगदूम, प्रतिज्ञा निल्ले यांच्यासह नागरिकांनी टीपीच्या मुख्य प्रवेशद्वाराला ठाळे ठोकले. यावेळी पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान काहीवेळात स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख दाखल झाले. त्यांनी अतिरिक्त आयुक्त देसाई यांच्यासी संपर्क साधल्यानंतर ते तातडीने दाखल झाले. पाटील यांच्याकडून सर्व माहिती घेतल्यानंतर शनिवारी (ता.३) याबाबतची सुनावणी होणार आहे. सुनावणीवेळी प्रकरण निकाली काढण्याचे आश्वासन दिले. दरम्यान शिष्टमंडळाने सदरचे बांधकाम गुंठेवारीमध्ये येत असल्याने बांधकामच रद्द करण्याची मागणी केली.

शिष्टमंडळात मधुकर सुतार, मैनुद्दीन देसाई, अशोक कोटकर, धोंडिराम मांडवकर, विलास गायकवाड आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा

$
0
0

कैलास स्मशानभूमी पाण्याखाली

सातारा :

संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत कृष्णा नदीच्या तीरावर पाणी साचले आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार काहीकाळासाठी थांबविण्यात आले आहेत.

कृष्णा नदीच्या काठावर सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आहे.

.......

जवानाला लुटणाऱ्यास अटक

सातारा :

सैन्य दलातील जवानाच्या गळ्यातील चेन हिसकावून पलायन करणाऱ्या आरोपीला तीन तासांच्या आत गजाआड करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले. ही घटना गुरूवारी रात्री दोनच्या सुमारास जरंडेश्वर नाक्यावर घडली. ऋतिक जितेंद्र शिंदे (वय २०, रा. मस्केवाडा, एमएसईबी कार्यालयासमोर, गोडोली, सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जवान प्रवीण अरुण भोसले (रा. अंबवडे, ता. कोरेगाव) आणि त्याचे मित्र रात्री बाहेरगावहून कारने साताऱ्यात येत होते. जरंडेश्वर नाक्यावर अचानक त्यांच्या कारचे पेट्रोल संपले. त्यामुळे सर्वजण कारमधून उतरून रस्त्यावर उभे राहिले होते. त्या वेळी वाढे फाट्याकडून दुचाकीवरून आलेल्या एका युवकाने जवान प्रवीण भोसले याच्या गळ्यातील चेन हिसकावून पलायन केले होते. शिंदेवर जबरी चोरी, मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

..........

रेवंडे घाटात दगड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प

सातारा :

साताऱ्याच्या पश्चिम भागात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरड पडण्याचे सत्र सुरूच आहे. सातारा तालुक्यातील रेवंडे घाटात गुरुवारी सकाळी मोठा दगड रस्त्यावर आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या निधीतून घाट रस्ता तयार करण्यात आला आहे. पश्चिम भागात यंदा झालेल्या संततधार पावसामुळे वारंवार दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास रेवंडेतून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या सोनार खिंडीत मोठा दगड कोसळून रस्त्यावर आला, त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला.

.......

महिला ओढ्यातून वाहून गेली

सातारा :

वेळे कामथी (ता. सातारा) येथील लता विजय चव्हाण (वय ५०) या ओढ्यातील पुरामध्ये वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेतातून घरी परतत असताना ही दुर्देवी घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

शेतामध्ये भात लागण करून लता चव्हाण या अन्य महिलांसह घरी येत होत्या. तीन महिला एकमेकींचा हात धरून पुरातून वाट काढत हळूहळू पुढे जात होत्या. मात्र, चव्हाण यांचा अचानक हात सुटला. त्यामुळे त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या. गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता रात्री सव्वासात वाजता खडकजाई ओढा परिसरात त्यांचा मृतदेह सापडला. गेल्या चार दिवसांपासून वेळे कामठी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे ओढ्यांना पूर आला आहे. चव्हाण यांच्या पश्चात मुलगा नामदेव चव्हाण हा एकुलता एक असून, तो दिव्यांग आहे.

.............

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपेंना

वसंतराव घाटगे जीवनगौरव पुरस्कार

सातारा :

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना फिनिक्स ऑर्गनायझेशन, या सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. वसंतराव घाटगे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. वडूज येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मूळचे खटाव तालुक्यातील एनकूळ येथील असलेले तुपे संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत, अशी माहिती संयोजक रणजितसिंह देशमुख यांनी दिली. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते व पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरू डॉ.फडणवीस यांनाशिक्षणतज्ज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार

$
0
0

कुलगुरू डॉ.फडणवीस यांना

शिक्षणतज्ज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार

सोलापूर :

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना पुण्याच्या आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे विनोद विद्यापीठ, या संस्थेच्या वतीने दिला जाणारा शिक्षणतज्ज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १३ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका विशेष समारंभात हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

आचार्य अत्रे यांची १२१वी जयंती १३ ऑगस्ट २०१९ रोजी असून, त्या निमित्त आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त शिक्षण क्षेत्रातील तसेच अर्थशास्त्र आणि संशोधनातील विशेष योगदानानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना शिक्षणतज्ज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पुण्यातील शिवाजीनगर येथील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान-विनोद विद्यापीठाच्या सभागृहात पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

$
0
0

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

सोलापूर :

अंगणवाडी सेविकांनी वाढीव आणि दोन महिन्यांपासून न मिळालेले मानधन मिळावे, या प्रमुख मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी हजारो अंगणवाडी सेविकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शुक्रवारपासून पोषण आहार वगळता अन्य कामांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाइलवर काम करण्याची सक्ती रद्द करावी, त्या बदल्यात लॅपटॉप द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ सप्टेंबर २०१८ला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ जाहीर केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने अद्याप केली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून मानधनदेखील मिळाले नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ येत आहे. ११ जूनला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पेन्शनची घोषणा केली होती. टीएचे थकीत पैसे देण्यात यावेत आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी मोर्चा काढला. या वेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका कर्मचारी संघाच्या प्रदेश उपाध्यक्षा सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद मीटरचे होणार क्रॉस चेकिंग

$
0
0

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाणीमीटर बंद असल्याचे सांगितल्यानंतर त्याची फेरतापसणी केली जात नाही. त्याचा अनेकदा गैरफायदा घेतला जातो. मीटर बंद नसताना चुकीची माहिती देणाऱ्या मीटर रिडरवर कारवाई करण्याबरोबरच नागरिकांनी महापालिका प्रशासनाला माहिती दिल्यास स्थायी समितीमार्फत तपासणी करण्यात येईल. माहितीमध्ये तफावत आढळल्यास रिडरवर कारवाई करण्यात येणार आहे. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेवरुन सदस्यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले.

सभापती शारगंधर देशमुख, सत्यजित कदम व सविता भालकर यांनी बंद मीटरबाबत प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, 'पाणी मीटर बंद असल्याचे सांगून रिडर नागरिकांना मीटर बदलण्यास भाग पाडतात. त्याची फेरतपासणी होत नाही. यातून रिडरांचा कमिनशनचा धंदा वाढला. अनेक मिळकतदारांना पाणी बिलेच दिलेली नाहीत, अशा मीटर रिडरवर कारवाई करा. नागरिकांनी मीटर बंद असल्याचे सांगितल्यास खात्री करुन घ्या. क्रॉस चेकिंगमध्ये मीटर रिडर चुकीचे सापडल्यास कारवाई करू.' त्यावर पाणीपुरवठा विभागाने , ३,४०० मीटर बंद असून त्याचे क्रॉस चेकिंग करण्यात येईल. मीटर रिडरनी चुकीची माहिती दिल्यास करवाईबाबतचा प्रस्ताव सादर करु,' असे स्पष्ट केले.

सचिन पाटील, देशमुख, कदम यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थाबाबत प्रशासनाला खडे बोल सुनावले. 'शहरातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. महापालिकेचे अभियंते करतात काय? रस्ते विकास प्रकल्पातील व काही रस्त्यांची अवस्था चांगली आहे. महापालिकेने केलेले रस्ते लगेच का खराब होतात. दर्जा तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे? ज्या ठिकाणी वाहतूक जास्त आहे, अशा ठिकाणी मुरुमाऐवजी काँक्रिटीकरण करुन खड्डे बुजवता येतात का, याची पडताळणी करावी,' अशी मागणी केली. 'पावसाळ्यात डांबरीकरणासाठी येणारा खर्च जास्त असून त्याबाबतचा सर्व्हे करुन अहवाल सादर करु,' असे प्रशासनाने सांगितले.

प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या, ' शहरातील रस्त्यांवर भटक्या गाई, कुत्र्यांप्रमाणे घोड्यांची संख्याही वाढत आहे.' त्यावर अतिक्रमण विभागाच्यावतीने 'विभागीय कार्यालयामार्फत नियोजन करुन आठ दिवसांत मोहीम राबवू,' असे स्पष्ट करण्यात आले. संदीप कवाळे यांनी राजारामपुरी येथील ड्रेनेजलाइन चोकअप झाल्याचे निदर्शनास आणून दिले. सविता भालकर म्हणाल्या, 'महापालिकेच्या अनेक शाळांच्या छतांना गळती लागली आहे. तातडीने शाळांच्या छतांची दुरुस्ती करावी.'

माधुरी लाड म्हणाल्या, 'शहरात बेवारस वाहनांची संख्या वाढत असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. अमृत योजनेतंर्गत नवीन लाइन टाकल्यानंतर जुन्या लाइन बंद केलेल्या नाहीत. जुनी कनेक्शन जोडून देण्यास कंपनी नकार देत आहे.' यावर, लाईन बझार येथील दोन लाइन बंद करायच्या राहिल्या आहेत. जुनी कनेक्शन जोडून देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

पूजा नाईकनवरे म्हणाल्या, 'एक ऑगस्टपर्यंत १२ प्रभागात एलईडी बल्ब बसवण्यात येणार होते. पण अद्याप काम पूर्ण झालेले नाही.' या प्रश्नावर विद्युत विभागाच्या वतीने, 'पावसामुळे काम थांबले असून पाऊस कमी झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल,' असे सांगण्यात आले.

...

चौकट

आयुक्त, प्रशासनाचे अभिनंदन

'जयंती नाल्याची स्वच्छता केल्याने पाणी प्रवाहीत राहिले. त्यामुळे मोठ्या पावसातही शहरात नदीचे पाणी कमी आले. स्वच्छता मोहीम राबवणारे आयुक्त व प्रशासनाचे 'स्थायी'मध्ये अभिनंदन करण्यात आले. यावेळी सदस्यांनी खड्डे बुजवण्यासाठी अशाप्रकारे मोहीम राबवता येवू शकेल का, याबाबत विचार करण्याचे प्रशासनाला आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images