Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोयनेतून विसर्ग वाढला

$
0
0

कोयनेतून विसर्ग वाढला

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कमी असला तरी संततधार सुरूच होती, त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील पहिले आणि दुसरे जनित्र सुरू करून २१०० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात ४५ हजार ७७४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ८४ टीएमसी झाला आहे. पावसाच्या पाण्याची वाढती आवक लक्षात घेता निर्धारीत जलपातळी राखण्यासाठी शुक्रवारी पायथा वीजगृहातील दुसरे जनित्रही सुरू करून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे धरणातून एकूण २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. कोयना नदीला पूर आला असून, प्रशासनाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाचे असेच वाढते प्रमाण राहिले तर शनिवारी धरणाच्या सहाही वक्र दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

........

बोर्गेवाडीनजीक भूस्खलन

कराड : कोयनेसह पाटण तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मणदूरे विभागातील कड्याखालची बोर्गेवाडी गावानजीक असलेला गावठाणालगतचा दहा एकरातील डोंगर खचून तो खालच्या बाजूला असणाऱ्या मेंढोशी गावाच्या दिशेने सरकला आहे. त्यामुळे बोर्गेवाडीसह मेंढोशी गावाला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तत्काळ प्रशासनाला देऊनही अद्याप प्रशासनाचा कोणताच अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी शुक्रवारी पाटणच्या नायब तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले.

.................

ओढ्याच्या पुरात

माय-लेकीची आत्महत्या

कराड :

पाटण तालुक्यातील डोंगरपठारावर वसलेल्या घाणबी येथील मांडवकडा नावच्या शिवारात असणाऱ्या ओढ्याच्या पाण्यामधून वाहून जाऊ माय-लेकीचा दुदैवी अंत झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. दरम्यान, पती बबन शिर्के यांच्यासोबत झालेल्या किरकोळ वादातून पत्नी हौसाबाई बबन शिर्के (वय ३८) यांनी मुलगी कोमल बबन शिर्के (वय ९) हिला घेवून गावातील ओढ्यात आत्महत्या केल्याचा संशय प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पाटणच्या सपोनी तृप्ती सोनवणे यांनी दिली आहे. यातील हौसाबाई यांचा मृतदेह सापडला असून, अद्याप कोमलचा मृतेदह सापडला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचगंगेचे पाणी जमादार क्लबच्या पुढे

$
0
0

फोटो आहेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शुक्रवारी सकाळी उसंत घेतलेल्या पावसाने दुपारनंतर पुन्हा जोर धरला. बंद झालेले राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पुन्हा सुरू झाल्याने पंचगंगा नदीचे पाणी जामदार क्लबच्या पुढे आले. पंचगंगा नदीने धोकापातळी ओलांडली असून पाणी नागरी वस्तीत येवू लागल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभर शहरात दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर एका झाडाची फांदी मोडून पडली. दोन घरांच्या भिंती कोसळून किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जिल्ह्यासह धरणक्षेत्रात पावसाने काहीशी उसंत घेतल्याने गुरुवारी रात्रीपासून राधानगरी धरणाचे चारपैकी दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले. शुक्रवारी सकाळीही अशीच स्थिती असल्याने धरणातून होणारा विसर्गही कमी झाला. त्यामुळे पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. पण दुपारनंतर पुन्हा पावसाने जोर पकडला. धरणक्षेत्रातही पावसाची संततधार सुरू झाल्याने बंद झालेल्या राधानगरी धरणाच्या तीन व सहा क्रमांकाच्या स्वयंचलित दरवाज्यातून पुन्हा विसर्ग सुरू झाला. चार दरवाजांतून सायंकाळी ७,१२१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे राजाराम बंधाऱ्यावर ४३.४ पाणीपातळी गाठली. पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर येवून ते जामदार क्लबच्या पुढे आले. तर मस्कुती तलाव परिसर, बापट कँपमध्ये पाणी शिरले. पाणीपातळी वाढत गेल्यानंतर शिरोली ते तावडे हॉटेलपर्यंतच्या सर्व्हिस रोडवर पाणी आले. तर रात्री आठ वाजता उलपे मळ्यात पंचगंगेचे पाणी आले.

जयंती नाल्यातील पाण्याला फुगवटा आल्याने सुतारवाडा, फोर्ड कॉर्नरमागे, नष्टे इस्टेटच्या मागील बाजूस पाणी आले. सुतारवाड्यातील दहा कुटुंबांना यापूर्वीच स्थलांतरीत केले आहे. सायंकाळनंतर पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर आणखी सहा कुटुंबांचे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने चित्रदुर्ग मठात स्थलांतर केले. पावसाच्या जोर कायम असल्याने जुन्या घरांना त्याचा फटका बसला. दुपारी सोमवार पेठेतील मराठा बँकेजवळील जुन्या घराची भिंत कोसळली. सायंकाळी शनिवार पेठेतील गवळी गल्लीतील एका घराची भिंत कोसळी. अग्निश्मन दलाच्या जवानांनी पडलेल्या भिंतीचे साहित्य बाजूला केले. यामध्ये किरकोळ स्वरुपाचे नुकसान झाले.

नागाळा पार्क येथील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानासमोरील झाड सकाळी पडले. तर अप्सरा चित्रपटगृह येथील झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. राजारामपुरीतील वि. स. खांडेकर शाळेजवळील झाडाची फांदी पडल्याने वाहतूक ठप्प झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेली फांदी बाजूला केल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरळीत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी कहर केला. दुपारनंतर पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यामुळे शहरात सुतारवाडा, जामदार क्लब, मस्कुती तलाव परिसर, नष्टे इस्टेटच्या मागे, फोर्ड कॉर्नरची मागची बाजू, बापट कॅम्प, रमण मळा येथे मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यातच राधानगरी धरणाचे बंद झालेले स्वयंचलित दोन दरवाजे पुन्हा उघडल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. धरणातून ७,१२१ क्युसेक्स विसर्ग सुरू असून, पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे.

राजाराम बंधारा येथे सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पाणीपातळी ४३.४ फूट होती. जिल्ह्यातील सात मार्गांवरील एसटी वाहतूक थांबवली आहे. दरम्यान, हळदीजवळ पाणी आल्याने गगनबावडा, रत्नागिरीपाठोपाठ राधानगरी मार्गही बंद झाला आहे. चंदगड तालुक्यातील तिलारी घाटात दरड कोसळल्याने कोकणात जाणारा एक मार्ग बंद झाला. सर्वच नद्या धोकापातळीवरुन वाहत असल्याने ७९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

दरम्यान, शहरात तीन ठिकाणी झाडे पडली, तर दोन ठिकाणी घराच्या भिंती पडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेले झाड बाजूला केल्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली. सोमवार पेठ येथे मराठा बँक आणि शनिवार पेठेतील गवळी गल्लीतील एका घराची भिंत कोसळली. भिंत पडल्याने घरातील लोकांना बाहेर पडणे मुश्कील बनले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी कुटुंबांची सुटका केली.

अतिवृष्टीमुळे राज्य परिवहन मंडळाने सात मार्गांवरील एसटी फेऱ्या बंद केल्या.

.. .. ..

स्थलांतर शाळांमध्ये

पूरस्थिती निर्माण झाली असल्याने पूरबाधीत कुटुंबांचे स्थलांतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये करण्यात येणार आहे. अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सुटी देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाला तसे कळवले आहे.

....

जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली

शहरात तीन ठिकाणी झाडे पडली

दोन घरांच्या भिंती कोसळल्या

पन्हाळा पश्चिम भागातील १२ गावे संपर्कहिन

राधानगरी मार्गही बंद

सांगली, इचलकरंजी, शिरोळमध्ये स्थलांतर

०० ०० ०

कोकणसाठी वळसा

गगनबावडा आणि राधानगरी या दोन मार्गावरील वाहतूक पुरामुळे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोकणात जाण्यासाठी आंबा आणि आंबोली हे दोनच मार्ग उरले आहेत. त्यातही कोल्हापुरातून पन्हाळापर्यंतच्या रस्त्यावर पाणी आल्याने शहरातून आंबा घाटाकडे जाण्यासाठी शिये मार्गे वाघबीळकडून पुढे जावे लागत आहे. आंबोलीला राष्ट्रीय महामार्गावरुन जाता येत असल्याने सध्या तरी या मार्गावर कोणती अडचण नाही.

०० ० ० ०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथक तमिळनाडूला रवाना

$
0
0

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आवश्यक ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र आणण्यासाठी निवडणूक प्रशासनाचे पथक शुक्रवारी तमिळनाडूला रवाना झाले. तेथून यंत्र आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. बंदोबस्तात यंत्रे आणण्यासाठी बंदूकधारी चार पोलिसही गेले आहेत. यंत्रे येथे येण्यासाठी चार ते पाच दिवस लागतील, असे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी परिषद राखीव प्रवर्ग सोडत बेकायदेशीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विद्यापीठ व महाविद्यालयीन प्रतिनिधी नियुक्तीसाठी होणाऱ्या विद्यार्थी परिषद निवडणुकीतील राखीव प्रवर्ग सोडत बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाच्यावतीने पत्रकाद्वारे केला आहे. राखीव प्रवर्गाताील पोट जातींनाही प्रतिनिधित्व देणे चुकीचे असून याचा परिणाम मतदार संख्येवर होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष वसंतराव मगदूम यांनी ही माहिती दिली.

पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र विद्यापीठ सार्वजनिक कायद्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जाती व इतर मागास जाती या चार प्रवर्गांसाठी महाविद्यालय व विद्यापीठ अधिविभाग यांना सोडतद्वारे प्रतिनिधी ठरवणे आवश्यक आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने या चार राखीव प्रवर्गांतील पोट जातींचाही सोडत काढत असताना समावेश केला आहे. असा बदल करणे कायद्यानुसार अयोग्य आहे. त्यामुळे ही सोडत बेकायदेशीर ठरते. २९ ऑगस्टला मतदान होणार असल्याने व १९ ऑगस्टला नोंदणी यादी जाहीर होणार असल्याने राखीव प्रवर्ग जागा वाटप प्रक्रिया सुधारितपणे राबविण्याची गरज आहे. २९ जुलै रोजी झालेल्या राखीव प्रवर्ग सोडतनुसार अनुसूचित जातीसाठी ७६, अनुसूचित जमातीसाठी ४१, विमुक्त जातीतील पोट जातींसह ६५ व इतर मागासवर्गीय ११२ ही संख्या चुकीची आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने रोस्टर पद्धती वापरली असण्याची शक्यता आहे. तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय होणार आहे. विद्यापीठास २९४ महाविद्यालयांसाठी राखीव प्रवर्ग संख्या ठरवताना चार राखीव प्रवर्ग जातींचेच प्रतिनिधित्व निश्चित करणे बंधनकारक आहे. यामध्ये अनुसूचित जातींसाठी ७४, अनुसूचित जमातीसाठी ७४, भटक्या व विमुक्त जातींसाठी ७३ व इतर मागासवर्गाच्या जातींसाठी ७३ या पद्धतीने २९४ महाविद्यालयांना राखीव प्रवर्ग ठरवावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांचा सन्मान राखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेत अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कारभाराचा बोजा पडतो. सरकारमार्फत जाहीर होणाऱ्या योजनांच्या निधीसाठी त्यांच्याकडून पाठपुरावा कमी पडतो. परिणामी नागरिकांना नागरी सुविधा कमी मिळतात. त्याचे पडसाद सभेत उमटून त्यांना धारेवर धरले जाते. त्यामुळे महापालिकेचीच बदनामी होते. याबाबत चार भिंतीमध्ये बसून सकारात्मक चर्चेद्वारे मार्ग काढा. पण त्यांना अपमानित करू नका, त्यांचा सन्मान राखा' अशा कानपिचक्या आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी नगरसेवकांना दिल्या. कचरा संकलन करण्यासाठी मिळालेल्या ऑटो टिपरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किंवा सभागृहाबाहेर विकासकामांवरून नगरसेवक अधिकाऱ्यांना धारेवर धरतात. नुकतीच सभागृहात जल अभियंत्यांवर पाणी फेकण्याची घटना घडली. अनेकवेळा नगररचना विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे संतप्त नगरसेवकांनी कार्यालयाला टाळे ठोकण्याचे प्रकार घडले. अनेकदा क्षुल्लक कारणावरून नगरसेवक अधिकाऱ्यांना धारेवर धरताना नागरिकांनी पाहिले आहे. अशा प्रकारांमुळे पदाधिकाऱ्यांबरोबर महापालिकेची बदनामी होते. या बाबत आमदार पाटील यांनी नगरसेवकांना फटकारले.

आमदार पाटील म्हणाले, 'अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून नवे अधिकारी मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. निधी आहे, पण त्यासाठी पाठपुरावा करणारा अधिकारी नाही. थेट पाइपलाइनची योजना आणि शहर पाणीपुरवठ्याची जबाबदारीही एकाच अधिकाऱ्यावर असल्याने सर्वांचेच समाधान होऊ शकत नाही. त्यामुळे महत्त्वाच्या योजना रखडतात. काहीवेळा त्यांच्याकडून चुकाही होतात. अशावेळी सभागृहात त्यांना जाब विचारण्यापेक्षा चार भिंतीआड चर्चा करा. त्यांची चूक त्यांना लक्षात आणून द्या. त्यातून सकारात्मक गोष्टी घडतील आणि महापालिकेची बदनामीही थांबेल.'

आमदार पाटील यांनी कार्यक्रमात नगरसेवकांना उपदेशाचे डोस दिल्याने त्याची चर्चा कार्यक्रमानंतर रंगली. या उपदेशानंतर नगरसेवकांच्या कार्यपद्धतीत काही बदल होतो का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्यासाठी ५० कोटींचा निधी मंजूर होईल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'रंकाळा तलावाच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेने १५ कोटींचा प्रस्ताव दिला. तलावाच्या सुशोभिकरणासाठी ५० कोटींचा निधी मंजूर होईल. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. रंकाळ्यासह कोटितीर्थ, कळंबा तलावाच्या सुशोभीकरणावर भर देताना उर्वरीत ६० ऑटो टिपरसाठी प्रयत्न करू' अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. कचरा संकलनासाठी महापालिकेच्या ताफ्यात झालेल्या ऑटो टिपरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर माधवी गवंडी होत्या. बुद्धगार्डन येथील केएमटी वर्कशॉपमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते टिपरचे उद्घाटन झाले.

नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार क्षीरसागर म्हणाले, 'शहर विकासासाठी नियोजन मंडळाच्या माध्यमातून निश्चित निधी देऊ. रंकाळा तलावाच्या सुशोभिकरणासाठी ५० कोटींचा निधी मिळण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे. नऊ ऑगस्टपूर्वी हा निधी मिळेल. उर्वरीत ऑटो टिपरसाठी प्रस्ताव सादर करा. त्यासाठीही निधी देऊ.'

आमदार पाटील म्हणाले, 'शहराचे वैभव नागरी सुविधांवर अवलंबून असते. स्वच्छता ही प्रत्येकाची पहिली जबाबदारी असली पाहिजे. नगरसेवकांनी आपला प्रभाग नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. राज्य सरकारने लावलेल्या 'सेस'च्या माध्यमातून २० हजार कोटींचा निधी मिळाला. जनतेने भरलेल्या 'सेस' पुन्हा योजनांच्या माध्यमातून शहरासाठी मिळत आहे. पुढील काळात महापालिकेच्या वैभवात भर घाल्याणसाठी सर्वांनी पक्ष विरहीत काम करुया. आयुक्त स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून महापालिका आणि जनतेला जोडण्याचे काम करत आहेत.'

आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'इ-बसेससाठी खासदार प्रा. संजय मंडलिक व संभाजीराजे छत्रपती प्रयत्न करत आहेत, ही कौतुकाची बाब आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांच्यामध्ये जाणिवजागृती करण्याची आवश्यकता आहे.'

उपमहापौर भूपाल शेटे, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी दौलत देसाई, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, परिवहन सभापती अभिजित चव्हाण, सत्यजित कदम, शिक्षण सभापती श्रावण फडतारे, दिलीप पोवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. विजय वणकुद्रे यांनी सूत्रसंचलन केले. नगरसेवक नियाज खान यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिन्मय सेवा ट्रस्टतर्फे निवासी युवा शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चिन्मय मिशन कोल्हापूर शाखेतर्फे १६ ते १८ ऑगस्ट या कालावधीत निवासी युवा शिबिराचे आयोजन केले आहे. चिन्मय युवा केंद्राचे राष्ट्र्रीय संचालक स्वामी स्वात्मानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होणार असल्याची माहिती कोल्हापूर शाखेचे उपाध्यक्ष डॉ. वासुदेव देशिंगकर व प्रतिनिधी अत्री चैतन्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.

युवकांमध्ये नेतृत्वगुण, सांघिक भावना, निर्भयता, ध्येय स्पष्टता या गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने शिबिराच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. चिन्मय गणाधीश आश्रम टोप संभापूर येथे शिबिर होईल. या शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आठ ऑगस्टपर्यंत नाव नोंद करावी असे आवाहन केले. या सशुल्क शिबिराच्या माहितीसाठी चिन्मय पुष्पांजली, प्रतिभानगर मेन रोड व htpp://bit.ly/UBCHYK2019 या लिंकवर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपची महाजनादेश यात्रा २९ ऑगस्टला कोल्हापुरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजपची महाजनादेश यात्रा २९ ऑगस्टला कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली

तावडे हॉटेल ते ताराराणी चौक या मार्गावर रात्री साडेआठ वाजता रोड शो होणार आहे, अशी माहिती कामगार, पर्यावरण आणि मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे यांनी शनिवारी पत्रकार परिषेदत दिली. जनादेशयात्रेच्या नियोजनासाठी मंत्री भेगडे कोल्हापूरात आले होते. त्यांनी शनिवारी सकाळी भाजप पदाधिकाऱ्यांची पक्ष कार्यालयात बैठक घेतली.

मंत्री भेगडे म्हणाले, 'राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीने लोकोपयोगी कामे केली आहेत. पाच वर्षांतील कार्याची माहिती ते जनादेश यात्रेतून करत आहेत. एक ऑगस्टला विदर्भातील मोझरी येथून यात्रेस सुरुवात झाली असून एक सप्टेंबर रोजी यात्रेची नाशिक येथे सांगता होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रेची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून होणार आहे. सोलापूर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील महाजनादेश यात्रा २९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहे. इचलकरंजी येथे दुपारी साडेसहा वाजता सभा होणार आहे. त्यानंतर ही यात्रा कोरोची, हातकणंगलेतून रात्री साडेआठ वाजता कोल्हापुरात येणार आहे. तावडे हॉटेल ते ताराराणी चौक या मार्गावर रॅली कॉढण्यात येईल. ताराराणी चौकात छोटी सभा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा रात्री कोल्हापुरात मुक्काम असेल. रविवारी ३० रोजी मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद होईल. त्यामध्ये ते आपली भूमिका मांडणार आहेत. कोल्हापुरातून जनादेशयात्रा राधानगरी तालुक्यात जाईल. तेथून ही यात्रा कोकणात जाणार आहे.'

पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, सुभाष रामुगडे, संपर्क नेते मधुसुदन देशपांडे, गोकुळचे संचालक बाबा देसाई, अॅड. संपतराव पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ मृतांच्या नावे बनावट वटमुखत्यार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आठ मृत व्यक्तिंच्या नावे बनावट स्वाक्षरी करुन वटमुख्यात्यार करुन कळंबा तर्फे ठाणे येथील जमीन हडप करुन महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित गुंडू अर्जुना पाटील (वय ६७ रा. १८६१ बी वॉर्ड, संभाजीनगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला. महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता रमेश सदाशिव काबंळे (वय ५२ रा. साई कॉलनी, आपटेनगर) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली. फसवणुकीचा प्रकार २० जानेवारी २००० ते २००६ या कालावधीत घडला.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पाटील याने महापालिका हद्दीतील कळंबा तर्फे ठाणे येथील रिव्हिजन सर्वे क्रमांक २९८-३ ही मिळकत १५६ जणांच्या नावावर आहे. २० जानेवारी २००१ मध्ये नोटरी वकील एस. जोशी यांच्याकडून वटमुखत्यार दस्त करून घेतला. दस्तात लिहून देणार म्हणून गणपती पाटील (रा. म्हालसवडे, ता. करवीर) सावित्रीबाई पाटील, अनुसया काजवे (रा. भाटणवाडी, ता. करवीर), राऊ पाटील (रा. हासूरदुमाला, ता. करवीर), आनंदराव कलिकते (रा. शिरगाव, ता. राधानगरी), सुभाष पाटील (रा. म्हालसवडे, ता. करवीर), रंगराव पाटील (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी), ईश्वरा पाटील (रा. आणाजे, ता. राधानगरी) यांच्या नावे करण्यात आले. मात्र हे आठजण २० जानेवारी २००१ पूर्वी मृत झाले आहेत. मात्र दस्तात त्यांची नावे लिहून त्यांच्यासमोर खोट्या स्वाक्षरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यासह सदाशिव हरी हुजरे (रा. शिरगाव) यांचीही खोटी स्वाक्षरी करुन बनावट वटमुख्यत्यारपत्र तयार करुन घेतले. ही कागदपत्रे २००६ मध्ये महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केट येथील नगररचना कार्यालयाकडे जमा केली होती. त्यानंतर हा भूखंड विकसित केला. १२ एप्रिल २००६ रोजी रेखांकन मंजुरीही घेऊन मनपाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोषण आहार कामगार संघटनेची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेने शनिवारी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात पोषण आहार कर्मचारी व महिलांनी भर पावसात आंदोलन केले. जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयीन कामकाजानिमित्त बाहेर असल्यामुळे आंदोलकांना बराच वेळ वाट पाहावी लागली. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेतच ठिय्या मारला.

मदतनीसांच्या मानधनात वाढ करावी, कमी मोबदल्यात भाकरी करण्याचे काम शक्य नाही, भाकरीसाठी इंधन खर्च वाढणार आहे. त्यामुळे आहारामध्ये भाकरीचा समावेश करण्याचा पुर्नविचार करावा अशी मागणी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष प्रा. ए. बी. पाटील, कॉम्रेड भगवान पाटील, अमोल नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. विनातक्रार, विना चौकशी कामावरुन कमी केलेल्या स्वयंपाकी, मदतनीसांना तत्काळ कामावर घ्यावे, इंधन, भाजीपाला, बिले व मानधन दरमहा दहा तारखेच्या आत मिळावीत, जिल्हा परिषदेकडून कामगारांना दोन ड्रेस द्यावेत, ऑक्टोबर २०१७ ते मार्च २०१९ पर्यंतची ऑनलाइन डाटा भरलेली व न भरलेली इंधन, भाजीपाला बिले प्रलंबित आहेत. थकीत रक्कम मिळावी आणि गॅसचे अनुदान सर्व शाळांना मिळावे अशा मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. आंदोलनात वर्षा कुलकर्णी, अश्विनी साळोखे, अश्विनी पाटील, ललिता सावंत, पूनम भुकटे, महादेव फुटाणे, दिनकर पाटील आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापोळा-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळली

$
0
0

तापोळा-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळली

सातारा :

तापोळा-महाबळेश्वर रस्त्यावर शनिवारी सकाळी भली मोठी दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कास-बामणोली-तापोळा परिसराला चार दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. तापोळ्यापासून जवळच वाघेरा गावाजवळ शनिवारी सकाळी नऊ वाजता महाबळेश्वर रस्त्यावर प्रचंड मोठी दरड कोसळून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या ठिकाणी मातीचा प्रचंड मोठा ढिगारा व मोठे-मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. दरड हटविण्यासाठी अनेक तास लागणार असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दरम्यान, कास-बामणोली रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. तसेच कासच्या पुलावरून अधून-मधून पाणी वाहत असल्याने सातारा-बामणोली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक गावांमध्ये चार दिवसांपासून वीज गायब झाली आहे. पावसामुळे शेतीलाही फटका बसला आहे. भात शेतीच्या खाचरांचे बांध पडून नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

.................

स्वाइन फ्लूने

महिलेचा मृत्यू

सातारा :

महागाव येथील स्वाइन फ्लू झालेल्या एका महिलेचा पुणे येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शशिकला रघुनाथ कदम (वय ४४, रा. महागाव, ता. सातारा) यांना चार दिवसांपूर्वी सर्दी, ताप, खोकला येत होता. त्यांनी गावातीलच एका खासगी डॉक्टरकडे तपासणी करून औषधे घेतली. मात्र, काहीच फरक न पडल्याने त्यांनी संगमनगर (सातारा) येथील एका डॉक्टरला दाखवले. संबंधित डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता शशिकला कदम यांना स्वाइन फ्लूची लक्षणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गुरुवारी दुपारी त्यांना तत्काळ पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

..........

पोलिस अधिकारी जखमी

सातारा :

पुण्याहून साताऱ्याकडे कारने येत असताना खेड शिवापूरजवळ झालेल्या अपघातात पोलिस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे यांच्यासह त्यांचा चालक जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झाला. पोलिस मुख्यालयात उपअधीक्षक (गृह) असलेले राजेंद्र साळुंखे कामानिमित्त पुण्याला गेले होते. सायंकाळी काम आटोपून ते साताऱ्याला येत असताना खेड शिवापूर टोल नाक्याजवळ त्यांच्या गाडीला खड्ड्यांमुळे अपघात झाला. साळुंखे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना बारा टाके पडले आहेत. त्यांचे चालक बोराटे किरकोळ जखमी झाला आहे. पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये साळुंखे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकारिता पदवीच्या अभ्यासक्रमाला मंजुरी

$
0
0

पत्रकारिता पदवीच्या अभ्यासक्रमाला मंजुरी

सोलापूर :

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने 'बॅचलर ऑफ व्होकेशनल पत्रकारिता व जनसंज्ञापन' हा पदवी अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्यास नवी दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजुरी दिल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. या अभ्यासक्रमाला प्रवेश सुरू असून, कोणत्याही विद्याशाखेची बारावी किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर

$
0
0

विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर

सोलापूर :

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाविद्यालय आणि विद्यापीठ अधिविभागाचे मतदान ७ सप्टेंबर, तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे मतदान २४ सप्टेंबरला होणार आहे. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या ९८ महाविद्यालयांत या निवडणुका होणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी परिषद निवडणुकीसाठी २६ ऑगस्ट २०१९पर्यंत प्रवेशित विद्यार्थी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेतून एकोणीस हजार क्युसेक विसर्ग

$
0
0

कोयनेतून एकोणीस हजार क्युसेक विसर्ग

म. टा. वृत्तसेवा, कराड

मागील दहा दिवसांपासून कोयना परिसरात सुरू असलेल्या धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे कोयना धरणात ८० हजार २०८ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. १०५.२५ टीमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना जलाशयात शनिवारी ९०.४६ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणात निर्धारित जलपातळी राखण्यासाठी शनिवारी कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे दुपारी एक वाजता दोन फुटांनी तर सायंकाळी पाच वाजता आणखी एक फुटाने, असे तीन फुटांनी उचलून कोयना नदी पात्रात १७ हजार १२६ आणि पायथा वीजगृहातून २ हजार १००, असे एकूण १९ हजार २२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे कोयना व कराडपासून पुढे कृष्णा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे.

शनिवारी दिवसभरात कोयनानगर येथे ५८, नवजा ७५ तर महाबहेश्वर येथे १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मागील चोवीस तासांत कोयनानगर येथे २२६, नवजा २३५, महाबळेश्वरात ३३५ मिलिमीटर इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातील अतिपर्जन्यमान असलेल्या प्रतापगड येथे १०९, सोनाट ९९, वळवण १०७, बामणोली ६४, काठी ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे कोयना जलाशयात ८० क्युसेकने पाण्याची आवक होत आहे.

धरणांतील पाणीपातळी टीएमसीमध्ये : धोम ८.७४, धोम-बलकवडी ३.४८, कण्हेर ९.०१, उरमोडी ७.४७, तारळी ५.०९, निरा-देवघर १०.४४, भाटघर २०.२०, वीर ८.९०.

.................

शाळेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत

कराड-चांदोली रस्त्यासह विभागातील पाच पूल पाण्याखाली गेल्याने विभागातील वाहतूक ठप्प झाली आहे.

शुक्रवारी रात्री वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने दक्षिण मांड नदीसह येळगाव, येळगाव-टेवडी, टाळगाव, उंडाळे-तुळसण, येवती ओढ्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. शनिवारी सकाळी ही जोराचा पाऊस सुरू असल्याने सकाळी दहाच्या दरम्यान येळगाव-गोटेवाडी, टाळगाव, उंडाळे-तुळसण, उंडाळे-मनु, येळगाव येथील मुख्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. शनिवारी सकाळची शाळा असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. अनेक ठिकाणी पालक, शिक्षकांनी पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांना सही सलामत रस्ता ओलांडून नेण्याचे काम केले, तर काही ठिकाणी तासंतास प्रवाशी, नागरिक, विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शुक्रवार पेठेत पुराची धास्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत असून शुक्रवार पेठेतील शंकराचार्य मठाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील भोपेराव मॅन्शनपर्यंत पाणी आले. रविवारी पाणीपातळी वाढली तर शंकराचार्य मठ, सिद्धार्थनगर, मस्कूती तलाव, गवत मंडईला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंचगंगा नदीची मच्छिंद्री झाल्याने धोक्याची पातळी वाढली आहे. जामदार क्लब रस्त्यावर पाणी आल्याने या रस्त्यांवरील रहिवाशांना घराच्या मागील बाजूने जाण्याचा मार्ग पत्करला आहे. या परिसरातील बहुतांशी घरे उंचावर असल्याने कमी धोका आहे. पण, शंकराचार्य मठाकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी आल्याने हा रस्ता बंद झाला आहे. परिसरातील नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. शंकराचार्य मठाच्या पिछाडीस असलेल्या घरांच्या मागील बाजूस पाणी आले आहे. हीच स्थिती मस्कुती तलाव, गवत मंडई परिसरात झाली आहे. गवत मंडई परिसरातील नागरिकांनी घराच्या पिछाडीस असलेल्या गोठ्यातील जनावरे रस्त्यांवर बांधली आहेत. काही कुटुंबांनी सुरक्षित ठिकाणी जनावरे बांधली आहेत. पुराचे पाणी घरात शिरल्यास कोणत्याही क्षणी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांनी तयारी ठेवली आहे. काही कुटुंबांनी पाहुण्यांकडे रहावयास गेले आहेत. परिसरातील शाळा, सांस्कृतिक हॉलमध्ये नागरिकांना हलवण्यासाठी यंत्रणाही प्रशासनाने सज्ज ठेवली आहे.

भूमिगत वाहिनीच्या वायरचा महिलेला 'शॉक'

आझाद चौकात दिलबहार तालीम मंडळाच्या वळणावर भूमिगत विद्युतवाहिनीच्या उघड्यावरील वायरचा शॉक लागल्याने एक महिला जखमी झाली. शनिवारी दुपारी पावनेदोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितले की, एक महिला मुलाला घेवून खासबाग मैदान परिसरात पायी चालत जात होत्या. त्याच्या पायातील चप्पल तुटल्याने मंडळाच्या वळणावर भूमिगत असलेल्या विद्युतवाहिनीच्या उघड्यावरील वायरचा शॉक लागल्याने जखमी झाली. या घटनेने या परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी त्या महिलेला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या परिसरातील काही भूमिगत विद्युत वाहिनींच्या वायर उघड्यावर आहेत. त्या दुरुस्त करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात महापूर, नागरिकांची कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रचंड कोसळणाऱ्या पावसाने शहराची कोंडी होत आहे. महापुराचे पाणी शहराच्या अनेक भागात शिरू लागल्याने शहराला धोका वाढला आहे. शनिवारी पावसाने जराही उसंत घेतली नाही. त्यामुळे पुराच्या पाण्याला उतार मिळेनासा झाला आहे.
दरम्यान, राधानगरी, वारणा आणि कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यासह शहराला महापुराचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला आहे. सर्वच नद्यांनी धोकापातळी ओलांडल्याने जिल्ह्यातील ८४ बंधारे आणि १९ एसटीचे मार्ग बंद करण्यात आले आहे. शहरात पुराचे पाणी पंचगंगा तालीम मंडळ (शुक्रवार पेठ), शाहूपुरी कुंभार गल्ली, उलपे मळ्यात शिरले. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

पुराचा मोठा धोका निर्माण झाल्याने जिल्ह्यातील १९७ कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यात शिरोळमधील १६७, हातकणंगले ३० तर इचलकरंजी २५ कुटुंबांचा समावेश आहे. आंबेवाडी, चिखली गावात पुराचे पाणी आल्याने कोणत्याही क्षणी तेथील कुटुंबांचे स्थलांतर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पावसामुळे शहरात दोन घराच्या भिंती कोसळल्या तर पाच ठिकाणी झाड कोसळून मोटारसायकलींचे नुकसान झाले.

धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसांमुळे राधानगरी धरणाच्या स्वयंचलित चार दरवाज्यातून ७,१२१ क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्यावर ४४.२ फूट झाली. पुराच्या पाण्याला मोठ्या प्रमाणात फुग येत आहे. शुक्रवारी जामदार क्लबपर्यंत असलेले पाणी शनिवारी शुक्रवार पेठेतील पंचगंगा तालमीपर्यंत आले. त्यामुळे शंकराचार्य मठाकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारील कुटुंबामध्ये प्रचंड भीती आहे. बापट कँप परिसरातही पाण्याची पातळी वाढली असून जाधववाडीकडे जाणारा मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला.

पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने जयंती नाल्याला मोठी फुग आली. त्यामुळे दुपारी शाहूपुरी कुंभार गल्लीत पुराचे पाणी आले. फोर्ड कॉर्नर आणि नष्टे इस्टेटच्या मागील बाजूला पुराच्या पाण्याचा विळखा पडला आहे. बिंदू चौक सबजेल परिसर आणि सिद्धार्थनगर येथील एका घराची भिंत कोसळली. नर्सरी बाग परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरावर मोठे झाडे पडले. त्यामुळे मंदिराचे नुकसान झाले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारातील झाड पडल्याने चार दुचाकींचे नुकसान झाले. सायन्स कॉलेज, नेहरू नगर आणि मुक्त सैनिक वसाहतीतही झाडे कोसळून किरकोळ नुकसान झाले. सायंकाळी पाच वाजता शाहूपुरी कुंभार गल्लीतील एक घरात साप शिरल्याने नागरिकांत घबराट उडाली.

दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढून आंबेवाडी व चिखली गावात पुराचे पाणी घुसले आहे. दोन्ही गावांचा संपर्क सुटल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाल्याने कोणत्याही क्षणी येथील कुटुंबाचे स्थलांतर होण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. त्यातच वीज गेल्याने अनेक गावे अंधारात गेली. त्यामुळे या गावांची मोठी कोंडी झाली.

.. .. . .. ..

शिरोळ, सांगलीचा धोका वाढला

वारणा आणि कोयनेतून विसर्ग वाढवल्याने पुराचे पाणी सर्वत्र पसरू लागले आहे. त्यामुळे शिरोळ, कुरुंदवाड, दानोळीसह सांगलीतील स्थिती बिकट होत आहे. पुराचे पाणी पसरु लागल्याने सांगलीतून ११० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

.. .. . .

एसटीचे १९ मार्ग बंद

जिल्ह्यातील ८४ बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यातील १९७ कुटुंबांचे स्थलांतर

पाच ठिकाणी झाडे पडून आर्थिक नुकसान

कुंभार गल्लीत घरात साप घुसला

दोन घरांच्या भिंती कोसळल्या

शुक्रवार पेठेतील कुटुंबाचे स्थलांतर

वीज नसल्याने अनेक गावे अंधारात

०० ०० ०० ०० ०० ०० ०० ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’ला ४२ हजार लिटरची दूधाची तूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसामुळे मार्ग बंद झाल्याने जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (गोकुळ) गेल्या पाच दिवसांत ४२ हजार ८५३ लिटर दुधाची तूट आली आहे. जिल्ह्यातील नद्याचे पाणी वाढू लागल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे रविवारच्या दूध संकलनावर मोठा परिणाम होणार आहे. शनिवारी सकाळी १५ हजार ३४८ लिटर दूध कमी आले आहे.

गोकुळकडून दररोज साडेनऊ ते दहा लाख लिटर दूधाचे संकलन होते. पण गेल्या काही दिवसात पावसाने जिल्ह्याला झोडपल्याने संकलनावर परिणाम झाला आहे. पर्यायी मार्गाने दूध संकलन केले जात आहे. तरीही गगनबावडा, पन्हाळा, चंदगड, शाहूवाडी तालुक्यांतील काही गावांकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे दूध संकलन बंद झाले. गगनबावडा तालुक्यातील तिसंगी, पाटपन्हाळा, पणोत्री, मोताईवाडी, चंदगड तालुक्यातील हेरे, माळगे, तुर्केवाडी, शाहूवाडी तालुक्यातील पाल, काटे या मार्गावरील संकलन बंद झाले. ३० जुलैपासून आजअखेर ४२ हजार ८५३ लिटर दूध कमी झाले.

करवीर आणि राधानगरी तालुक्यात सर्वाधिक दूध संकलन होत आहे. दोन्ही तालुक्यात पर्यायी मार्गावरून दूध संकलन केले जात आहे. बालिंगे पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने रविवारी संकलनाला फटका बसण्याची शक्यता आहे. काही गावात बल्क कुलर असल्याने तीन दिवस दूध संकलनाची सोय आहे. पण, ज्या गावात बल्क कुलरची सोय नाही, त्या गावात डेअरीमार्फत दूध उत्पादकांना कळविण्यात येत असल्याचे गोकुळ प्रशासनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणत्याही क्षणी स्थलांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवसभरचा सतत सुरू राहिलेला पाऊस आणि राधानगरी धरणातून वाढलेल्या विसर्गामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झाले. पंचगंगा नदीचे पाणी शहरातील नागरी वस्तीमध्ये आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुराचे पाणी शुक्रवार पेठेतील पंचगंगा तालमीपर्यंत आल्याने रात्री येथील एका कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. पाणी वाढल्यानंतर आणखी कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. संततधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात वाहतूक कोंडी झाली. अनेक ठिकाणी पडझड होऊन आर्थिक नुकसान झाले. दुपारी शाहूपुरी कुंभार गल्लीत पाणी आल्याने महापुराचा विळखा अधिक घट्ट होण्याचे संकेत मिळाले.

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलीत दरवाजे उघडून ७ हजार १२१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदीचे पाणी नागरी वस्तीत आले. शुक्रवार पेठ, मस्कुती तलाव परिसर, दुधाळी, रमणमळा, जाधववाडी बापट कँपच्या परिसरात पुराचे पाणी आले. नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने जयंती नाल्याला मोठी फूग आली. कळंबा तलावातून येणारे पाणी नदीच्या बॅकवॉटरमुळे सुतारवाडा, फोर्ड कॉर्नर, नष्टे इस्टेटच्या मागील बाजूला आले.

शाहूपुरीत पुराच्या पाण्यातून आलेला साप एका घरात घुसल्याने या कुटुंबाची चांगलीच तारांबळ उडाली. जामदार क्लबपासून पाणी पंचगंगा तालमीकडे सरकल्याने शंकराचार्य मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अमोल गिरीगोसावी कुटुंबातील सात व्यक्तींचे स्थलांतर केले. पुराचे पाणी नागरी वस्तीत वाढत असल्याने पूरबाधित कुटुंबांचे स्थलांतर करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे.

दरम्यान दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जुन्या घरांच्या भिंती व झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. बिंदू चौक सबजेलच्या पिछाडीस व सिद्धार्थनगर येथील एका घराची भिंत पडली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी दहा वाजता राजर्षी शाहू समाधीस्थळ परीसरातील छत्रपती शिवाजी मंदिरावर मोठे झाड पडले. त्यामुळे मंदिराच्या शिखर व कौलांचे नुकसान झाले. तर पाच ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याची घटना घडली. पद्मा चित्रपटगृह, नेहरूनगर, मुक्तसैनिक वसाहत येथे झाड कोसळले. शासकीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या ‌आवारातील झाडाची फांदी तुटून मोटारसायकलींवर पडली. यामध्ये चार मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले.

शहरातील खराब झालेले रस्ते आणि पावसामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. जिल्हाधिकारी कार्यालय, बसंत-बहार, व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, बिंदू चौक, मिरजक तिकटी, खरी कॉर्नर, शाहूपुरी व न्यू शाहूपुरी येथे वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती.

कळंबा तलावावर हुल्लडबाजी

गेल्या आठ दिवसांपासून कळंबा तलावाचा सांडवा ओसंडून वाहू लागला आहे. नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी युवक, युवतींची गर्दी होत आहे. गर्दीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. मात्र काही युवकांकडून हुल्लडबाजी सुरू आहेत. हुल्लडबाजीमुळेच तीन दिवसांपूर्वी दोन युवक वाहून जाताना केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावले. ही घटना ताजी असताना अजुनही काही युवक मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजी करीत असल्याचे दिसले. त्यांच्या हुल्लडबाजी वेळीच अटकाव न केल्यास एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागलचा ‘शाहू’ देशात सर्वोत्कृष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साखर उद्योगातील शिखर संस्था असलेल्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यात कागलचा छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देशात सर्वोत्कृष्ट कारखाना ठरला असून, कारखान्यास वसंतदादा पाटील पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ऊस विकासामध्ये शिरोळचा दत्त सहकारी कारखाना, तर हुपरीच्या जवाहर कारखान्याने सर्वाधिक गाळपामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. हमीदवाड्यातील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याने सर्वाधिक साखर उताऱ्यात अव्वल स्थान पटकावले. चार कारखान्यांनी देशभरातील कारखान्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत कोल्हापूरच्या यशाची पताका कायम फडकावत ठेवली आहे. एकूण २१ पुरस्कारांपैकी राज्यातील १० पुरस्कार महाराष्ट्रातील कारखान्यांनी पटकावले आहेत. देशभरातील २६२ साखर कारखान्यांपैकी ९९ सहकारी साखर कारखान्यांचा पुरस्कार प्रक्रियेत विचार करण्यात आला.

दिल्लीतील एनसीयूआय सभागृहात येत्या २८ ऑगस्टला पुरस्कार वितरण होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामविलास पासवान, रावसाहेब दानवे आणि खासदार शरद पवार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

०००

शाहू साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च पुरस्कार मिळाला ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी घालून दिलेली व्यवस्थापनाची घडी आणि सभासद शेतकऱ्यांबरोबरच कारखान्याचे अधिकारी, कामगार, ऊसतोडणी वाहतूक मजूर व वाहतूक कंत्राटदार यांच्यामुळेच कारखान्याला हे यश मिळाले.

समरजित घाटगे, अध्यक्ष, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images