Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

टोलविरोधात उपोषणास्त्र

$
0
0
टोलविरोधात सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून सोमवारपासून (६ जानेवारी) बेमुदत उपोषण करण्याचे टोलविरोधी कृती समितीने जाहीर केले आहे. टोल रद्द केल्याची घोषणा होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे समितीने स्पष्ट केले आहे.

अनिल मेहतांची ‘FPBA’मध्ये निवड

$
0
0
मराठीतील ज्येष्ठ प्रकाशक व मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांची नवी दिल्ली येथील ‘द फेडरेशन ऑफ पब्लिशर्स अँड बुक सेलर्स असोसिएशन इन इंडिया’च्या (एफपीबीए) कार्यकारी समितीमध्ये निवड करण्यात आली आहे.

आयुक्तांना NCP नगरसेवकाची धमकी

$
0
0
प्रभागातील टपऱ्यांचे अतिक्रमण काढल्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिलीप कोल्हे यांनी काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे व उपमहापौर हरुण सय्यद यांच्यासोबत महापालिकेत जाऊन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना दमदाटी केल्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला.

सम्राटांविरुद्ध कारवाई करून दाखवा

$
0
0
‘गाळपास गेलेल्या उसाला रास्त दर मिळावा आणि उसाचे पैसे वेळेत मिळावेत यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केली. आंदोलनात कायद्याचा भंग केला म्हणून, आमच्यावर चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे दाखल होत आहेत.

मंडलिक किंवा ते सांगतील तोच उमेदवार द्या

$
0
0
‘खासदार सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर ती त्यांनाच मिळाली पाहिजे. जर ते इच्छूक नसतील तर त्यांच्या मर्जीनुसार उमेदवारी निश्चित करावी,’ अशी मागणी खासदार मंडलिक यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता मेळाव्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह विविध वक्त्यांनी केली.

मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय सर्वेक्षणानंतरच़

$
0
0
‘मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अनुकूलता दर्शविली असली तरी आरक्षणाबाबतचा अंतिम अहवाल हा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि जातीनिहाय सर्वेक्षण झाल्यानंतरच येईल.

‘केशवराव’साठी आणखी १० कोटी आणू

$
0
0
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी आणखी १० कोटींचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंजूर करण्याची ग्वाही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

तलाठी लांडगे लाच घेताना अटक

$
0
0
बुर्ली व रामानंदनगर (ता. पलूस) येथील तलाठी अलताफहुसेन बाबासाहेब लांडगे (रा. नागठाणे) याला पलूस तहसील कार्यालय परिसरात पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. खरेदी शेतजमीन दस्ताची सात बारा रजिष्टरला नोंद करण्यासाठी त्याने लाच घेतली.

आम्हालाही कुस्तीतील चांगले कळते

$
0
0
महापालिकेच्या केशवराव भोसले नाट्यगृह व शाहू खासबाग मैदान नुतनीकरणाच्या कार्यक्रमात खासदारकीच्या उमेदवारीवरून चांगलेच ‘आडव्या तिडव्या’च्या भाषेने नाट्य रंगले.

सुनीलकडून अमितकुमार चितपट

$
0
0
प्रेक्षणीय, थरारक आणि उत्कंठावर्धक झालेल्या कुस्तीत ‘उपमहाराष्ट्र केसरी’ सुनील साळुंखे याने झोळी डावावर ‘भारतकुमार केसरी’ अमितकुमारला चितपट करत मानाची गदा पटकावली.

‘कोल्हापूर’वर हक्क आमचाच

$
0
0
कोल्हापूर लोकसभेवर काँग्रेसचाच हक्क असल्याचे सांगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी उमेदवार म्हणून प्रा. संजय मंडलिक यांचे नाव पुढे केले, तर दुसरीकडे ‘आमची जागा आम्हाला सोडा,’ असे म्हणत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांचे नाव पुढे केले. त्यासाठी त्यांनी महाडिक व गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यातील वाद मिटविण्याचा विडा उचलला.

उद्योगांना स्वस्त वीज?

$
0
0
‘शेजारील राज्यांनी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून वीजदर कमी केले आहेत, त्यामुळे ती दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे. तरीही त्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योगांसाठीचा दर अधिक नसावा अशी शिफारस अहवालात केली आहे,’ असे सांगत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी औद्योगिक वीज स्वस्त होण्याचे संकेत दिले.

सरकारच्या उदासीनतेमुळे पर्यावरणाचे नुकसान

$
0
0
‘आयुर्वेद आणि निसर्गोपचार या भारतीय उपचार पध्दती जिवंत राहायच्या असतील तर सह्याद्रीच्या पश्चिम घाटासह जगभरातील वनौषधींचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

हसूर बुद्रुक येथे शिवसेनेचा रास्ता रोको

$
0
0
‘हसूर बुद्रूक ते बोळावी या मुरगूडकडे जाणारा हा रस्ता त्वरीत करावा अन्यथा कार्यकारी अभियंत्यांना काळे फासू, असा इशारा देत शिवसेना उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली हसूर बुद्रुक फाटा (ता. कागल) रास्ता रोको करण्यात आला. या रस्त्यातील खड्ड्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

शेतक-यांवर अन्याय करून पुनर्वसन नको

$
0
0
‘धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले पाहिजे हे सत्य असले तरी शेतकऱ्यांवर अन्याय करुन पुनर्वसन करु नये. आपण लोकांसाठी आहोत याचे अधिकाऱ्यांनी भान ठेवले पाहिजे.

गोपाळरावांनी २ दिवसांत राजीनामा द्यावा

$
0
0
गेले दोन हंगाम बंद असलेला हलकर्णी (ता. चंदगड) दौलत साखर कारखाना सुरु करण्यासाठी निविदा पध्दतीचा बहाणा करुन केशव शुगर्सची निविदा दौलतचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांनी मंजूर केली. ही कंपनी बोगस असतानाही गोपाळरावांनी अशा कंपनीचे भूत उभे करुन जनतेचा विश्वासघात केला आहे.

पाणी नियोजनाचा वीजनिर्मितीत अडथळा

$
0
0
जिल्ह्याच्या हरितक्रांतीला वरदान ठरलेल्या शतकोत्तर राधानगरी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रानेही नुकतीच एकसष्टी ओलांडली आहे.

थेट पाइपलाइनसाठी पाठपुरावा करू

$
0
0
‘इचलकरंजी शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने वाढत्या लोकसंख्येला भरपूर व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइन योजनेद्वारे पाणी आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे मी पाठपुरावा करणार आहे.

मटण विक्रीबाबत गुरुवारी निर्णय

$
0
0
मटण विक्री सुरु करण्याचा निर्णय येत्या गुरुवारी (ता.९) समाजाच्या होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल. मटण व्यावसायिकांचे आंदोलन सुरुच राहणार असून मंगळवार पासून प्रभागनिहाय मटण व्यावसायिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

दर्जानिहाय संस्थांची तपासणी करा

$
0
0
बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होत असल्याने दर्जानिहाय शिक्षण संस्थाची तपासणी एप्रिल महिन्यात करावी, अशी मागणी राज्यस्तरीय उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण परिषदेत करण्यात आली. शिवाजी पार्क येथील मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवनाच्या सभागृहात ही परिषद झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images