Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सुरक्षा अभियानाचा रोड शो!

0
0
रस्ता सुरक्षा अभियानाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहुतकीचे तीन-तेरा वाजले. सुरक्षा सप्ताहानिमित्त काढलेल्या चारचाकी फेरीने सकाळी कामावर जाणाऱ्यांचे वेळापत्रक बदलले. संभाजीनगर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, भवानी मंडपासह शहराच्या मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र कायम होते.

‘केएमटी’मध्ये मागासवर्ग कक्ष स्थापन करा

0
0
केएमटीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची जात प्रवर्गनिहाय बिंदूनामावलीत नोंद करण्याचे व तत्काळ मागासवर्ग कक्ष स्थापन करण्याचे आदेश पुणे आयुक्तांनी महापालिकेला दिले आहेत. बिंदूनामावली व आरक्षणाची पदे भरण्याबाबत कोणत्याही सूचनांचे पालन महापालिकेने केले नसल्याची तक्रार वाहक युनून मुल्ला, विलास लाखे, नवनाथ मुंढे यांच्यासह १३५ जणांनी दाखल केली होत्या.

व्हाइट आर्मीच्यावतीने धाडसी तरुणांचा सत्कार

0
0
क्रशर चौकात बुडालेल्या तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केलेल्यांचा तिघा तरुणांचा जीवन मुक्ती सेवा संस्थेच्या (व्हाईट आर्मीच्या) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

सिग्नल तातडीने सुरू करा

0
0
शहरातील रस्त्यांवर होत असलेली गर्दी आणि त्यामुळे वाहतुकीचा उडालेला बोजवारा पाहता महापालिकेने शहरात सिग्नल तातडीने कार्यान्वित करावेत, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना निवेदन देण्यात आले.

‘नो पार्किंग’च्या ठिकाणीच पार्किंग

0
0
वाहतुकीला शिस्त लागावी, पार्किंगच्या समस्येची सोडवणूक व्हावी आणि पाहिजे त्या ठिकाणी वाहने लावण्याच्या प्रवृत्तीला चाप बसावी यासाठी शहरात ठिकठिकाणी ‘नो पार्किंग’ ची नियमावली राबवली जाते. पण काही वाहनधारक ‘नो पार्किंग’ व्यवस्थेच्या उलटे वागत असतात. शहरातील प्रमुख बाजारपेठेत तर ही समस्या मोठी आहे.

३६५ दिवसांत ३६८ व्हीआयपी दौरे

0
0
जिल्ह्यात एक वर्षात ३६८ व्हीआयपी दौरे झाल्याने पोलिसांवर ताण वाढू लागला आहे. विमानतळाची सोय असल्याने दक्षिण महाराष्ट्रातील मंत्र्यांचा दौरा कोल्हापुरातूनच सुरू होत असल्याने दौऱ्यांची संख्या वाढली आहे.

सांगलीतील ९ रस्ते ‘नो हॉकर झोन’

0
0
सरकारच्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहरातील नऊ प्रमुख रस्ते ‘नो हॉकर’ झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यात सांगलीतील पाच, मिरजेतील तीन आणि कुपवाडमधील एका रस्त्याचा अंतर्भाव आहे, अशी माहिती उपायुक्त्त नितीन कापडणीस यांनी दिली.

‘राजारामबापू’च्या ठेवी १ हजार कोटींवर

0
0
‘१ जानेवारी २०१४ रोजी राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या ठेवी एक हजार कोटी ३१ लाख रुपये इतक्या झाल्या आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय १७०० कोटी रुपये आहे. लवकरच बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‘शेड्यूल्ड बँकेचा’ दर्जा मिळण्याची शक्यता आहे.

हातकणंगल्यातून लढण्यास तयार

0
0
गेल्यावेळी अवघ्या वीस दिवसांत खासदारकीची लॉटरी लागलेल्या जयवंतराव आवळे यांनी​ आता लातूरमधून लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले असून, आपण हातकणंगल्यातून लढण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

शिरोळ तालुक्यात दोघांची आत्महत्या

0
0
शिरोळ तालुक्यात आलास व कुटवाड येथे शेजमजुरासह दोघांनी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. नितीन रघुनाथ कांबळे (वय ३०) व ज्ञानदेव आण्णासाहेब पाटील (वय २५) अशी त्यांची नावे आहेत. आलास येथील नितीन कांबळे हा ऊसतोड मजूर होता.

हत्तींपाठोपाठ गव्याचाही उपद्रव

0
0
गेल्या काही दिवसांपासून आजरा तालुक्यात हत्तींनी धुमाकूळ घातला असून, त्यांच्याकडून पिके व फळबागांच्या मोठ्या प्रमाणात नुकसानीच्या घटना ताज्या असतानाच आता गव्यानेही हत्तींचा कित्ता गिरविण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील हाजगोळी (खुर्द) येथील परिसरात गेले पंधरवडाभर तळ टोकून असलेल्या गव्याकडून हा प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला.

‘अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यास तत्काळ निलंबन’

0
0
सरकारी जागांवर अतिक्रमण होऊ न देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी राजकीय पक्ष अथवा संघटनांना पाठपुरावा करावा लागणे हे यथायोग्य नाही. राजकीय दबावापोटी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असाल तर खपवून घेतले जाणार नाही. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तत्काळ निलंबित करण्यात येईल असा दमच प्रांताधिकारी विवेक आगवणे यांनी भरला.

गॅझेटनुसार दाखले द्या

0
0
मुस्लिम जातीचा दाखला हा स्थानिक चौकशी व समाज संघटनेच्या दाखल्यावरुन व अन्य पुराव्याद्वारे देण्याचे आदेश असतानाही तहसील कार्यालयातून व्यवसायाच्या पुराव्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे दाखले मिळण्यास अडचणी निर्माण होऊन विलंब होत आहे. या कारणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

वीज दरवाढ रद्द करा

0
0
वीज वितरणातील गळतीचा बोजा वीज दरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांवर लादण्यात येत आहे. यामुळे ही अन्यायी वीज दरवाढ रद्द करावी अशी मागणी करीत स्वाभिमानी युवा संघटनेच्यावतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या येथील विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मटण विक्रेत्यांचा बंद सुरूच

0
0
महापालिका आयुक्त व आरोग्याधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर ठोस निर्णय न झाल्याने मटण डिलर असोसिएशन व खाटीक समाजाने सोमवारपर्यंत मटण विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चेत मार्ग निघून शनिवारपासून बंद मागे घेण्याची आशा संपल्याने या रविवारीही मटणासाठी नागरिकांना धावपळ करावी लागणार आहे.

मनीष नागोरी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात

0
0
बेकायदशीर व बनावट पिस्तूल विक्री करणाऱ्या मनीष नागोरीला मोक्का कारवाईअंतर्गत मुंब्रा कोर्टातून करवीर डीवायएसपी व्ही. टी. पवार यांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. कोर्टाने नागोरीला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

जिल्ह्यात होणार ८० कोटींची कामे

0
0
एमआयडीसी अंतर्गत राज्यात रस्ते, पाणी आणि विजेसंदर्भातील दीड हजार कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यातील सुमारे ८० कोटींची कामे कोल्हापूर जिल्ह्यात होणार असून आठ दिवसात या कामांचे टेंडर काढण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीचे मुख्य अभियंता एस. बी. पाटील यांनी दिली.

रंकाळा प्रदूषणमुक्तीला प्राधान्य देणार

0
0
शहरातील रखडलेले रस्ते व प्रदूषणामुळे दुरवस्थेकडे वाटचाल करणारा रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे नूतन महापौर सुनीता राऊत यांनी सांगितले.

ना लोकसभा, ना पक्ष विसर्जन

0
0
काँग्रेसच्या हातात हात देणार, राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार, मंत्री होणार, पक्ष विसर्जित करणार अशा गेली चार वर्षे सुरू असलेल्या चर्चेला जनसुराज्य शक्तीपक्षाने पूर्णविराम दिला आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वांचा अंदाज घेऊन नंतर ताकदीने विधानसभा लढवण्याचा निर्धार या पक्षाने केला आहे.

५ लाख ओबीसी २०१६ मध्ये धम्मात

0
0
उच्चवर्णीय हिंदूंनी सातत्याने गोंधळात ठेवून आमचा सत्तेसाठी वापर केला. धर्माची भीती दाखवत जातीत बंदिस्त केले. उशीरा का होईना आमचा शत्रू आम्हाला समजला. आमची मूळ संस्कृती धम्माचीच आहे. त्यामुळे नागपूरच्या दीक्षाभूमीवर २०१६ मध्ये पाच लाख ओबीसी बांधव धम्माचा स्वीकार करतील, असे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images