Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

टँकरच्या पाण्याने पादुकांना स्नान

$
0
0

संत तुकारामांच्या पालखीचा रिंगण सोहळा

म. टा. वृत्तसेवा, अकलूज

सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत असला, तरी अजूनही सोलापूर जिल्हा या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. रविवारी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याने निरास्नान घालण्याची वेळ आली. निरा नदीमध्ये पाणी नसल्याने टँकरद्वारे पादुकांना स्नान घालताना वारकऱ्यांमध्ये एकच हळहळ व्यक्त होत होती. तीन वर्षांपूर्वी २०१६ सालीही तुकारामांच्या पादुकांना टँकरने स्नान घालण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत नदी पात्र कोरडे राहिल्याने पादुकांना निरा स्नान घालण्यात आले नाही.

पादुकांना स्नान घातल्यानंतर पालखी सोहळा अकलूज मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. अकलूज येथे हजारो ग्रामस्थांनी सोहळ्याचे तोफांच्या सलामीत स्वागत केले. सदाशिवराव माने विद्यालयात टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाच्या जयघोषात रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. प्रारंभी पताकाधारी, त्यानंतर तुळशी वृंदावनधारी व हंडेवाल्या महिला, विणेकरी, पखवाज व टाळकरी यांनी एकापाठोपाठ एक 'तुकाराम, तुकाराम' असा नामघोष करीत रिंगण पूर्ण केले. टाळ्यांच्या व टाळमृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. त्यानंतर देवाचा अश्‍व आणि स्वाराचा अश्व यांनी नेत्रोद्दिपक दौड करून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रिंगण पूर्ण झाल्यानंतर अश्‍वांच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. यावेळी भाविकांनी पारंपरिक खेळ खेळले. रिंगणानंतर सोहळा अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात विसावला.

.....................

माळशिरस तालुक्यात संतांच्या पालख्यांचे आगमन

श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासमवेत संत सोपानकाका, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्‍वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे माळशिरस तालुक्यात आगमन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुईखडीवरचा भन्नाट रानवारा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

डोळयांना सुखावणारी हिरवाई, अंगभर लपेटून राहणारा पाऊस आणि ओल्याकंच मातीचा सुगंध पसरविणारा भन्नाट रानवारा, निसर्गाच्या या विलोभनीय रुपाचे प्रत्यंतर घडते ते, पुईखडी येथे. शहराच्या उंचीवरचा हा भाग. सभोवताली पाऊस आणि नजरेत पावसात खुललेले कोल्हापूरचे सौंदर्य अशी दुहेरी अनुभूती मनाला प्रफुल्लित बनविते.

अंगावर पावसाच्या हलक्या सरी झेलत नागमोडी वळणाचा रस्त्यावरुन ड्राइव्हिंगचा आनंद लुटणारी तरुणाई पाहिली की वळणदार रस्त्यावर क्षणभर पावलं थबकतात, आणि वय विसरुन सिनीअर माणसंही पाऊसधारा झेलण्यासाठी आसुसतात. शहरालगतचा हा परिसर टेकवडीवर वसलेला आहे. पुईखडी टेकडीवर पोहचले की नजरेच्या टप्प्यात शहर सामावतं. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पेट्रोल पंपापासून वळणदार रस्त्यांची सुरुवात होते. पंपालगतच्या चहाच्या टपरीवर गरमागरम चहाचा आस्वाद घेत प्रवासी, वाहनधारकाही पावसात मिसळून जातात. चहाच्या टपरीच्या बाजूला दगडापासून मूर्ती घडविणाऱ्या कारागिरांची लगबग सुरू असते. हा सारा माहौल नजरेत टिपत असताना पुईखडी टेकडीककडे जाणारा वळणदार रस्ता खुणावू लागते. रस्त्याच्या डाव्या बाजूला टुमदार बंगले आणि उजव्या बाजूला घर आणि अध्येमध्ये डोकावणारी शेतीची पिके,पावसाने नवे रुप लाभलेले धरित्रीचे हिरवेकंच रुप डोळयांना सुखावून जाते.

पुईखडी घाटातील वळणदार प्रवास, टिप टिप बरसणारा पाऊस याचे तरुणाईला भलतेच आकर्षण. कोल्हापूरला ये-जा करणारे काहीजण हमखास येथे थांबतात. पावसाचा आनंद लुटतात. काही हौशी तरुण मोबाइलवर सेल्फी घेत हा क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करतात. रविवारी सकाळी तर पावसाची विविध रुपे टेकडीवर अनुभवता आली. कधी जोरदार कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, कधी लख्खं ऊन तर कधी हलक्या सरींचा सुखद वर्षाव, निसर्गाचा हा सारा अविष्कार पाहताना देहभान हरपणारे नागरिक. काही जण पावसात भिजत, आनंद घेत प्रवास सुरुच ठेवतात. तर कोण राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या चहाच्या टपरीसमोर थांबतात. मंगल कार्यालय परिसरात आडोसा आहे का शोध घेतात. पाऊस थांबला की पुन्हा प्रवास सुरू होतो. पुन्हा पावसाच्या सरी आणि भिजणारा नवा माणूस, हे चक्र सुरू असतं. पाऊस थांबला की टेकडीवरील भन्नाट वारा अवतीभवती घोंघावू लागतो. ऊन, वारा, पावसाच्या या चक्रात जो तो हरवून जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्याच दिवशी भाजपचे एक हजार सदस्य

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीस शनिवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ऑनलाईन व लेखी फॉर्म भरुन एक हजार व्यक्तींनी सदस्य म्हणून नोंदणी केली. ११ ऑगस्टपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे.

पक्षाने शिवाजी पेठ, निवृत्ती चौक, जोशी गल्ली, व्हीनस चौक, दसरा चौक, राजारामपुरी जनता बाजार चौक, कसबा बावडा लाइन बाजार चौक येथे अभियान राबवले आहे. पक्षाच्या कोल्हापूर महानगरच्यावतीने या 'संघटन पर्व' महाअभियानाची सुरवात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पश्चिम देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार पेठ मंडलाच्या वतीने शाहू बँक येथे झाली. पक्षाच्या सदस्य नोंदणी टोल फ्री क्रमांकावर मिस्डकॉल देऊन पक्षाचे सदस्य व्हावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. सर्व मंडलामध्ये देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव व महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी सदस्य नोंदणीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना प्रोत्साहित केले. मंडल अध्यक्ष संतोष माळी, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, सरचिटणीस सुभाष रामुगडे, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, उपाध्यक्ष गणेश देसाई, सयाजी आळवेकर, नचिकेत भुर्के, सुलभा मुजुमदार, किशोरी स्वामी, प्रभावती इनामदार, प्रमोदिनी हर्डीकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाज्यांच्या दरात घसरण

$
0
0

लोगो : बाजारभाव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दमदार पावसामुळे भाजी मंडईत फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली. प्रतिकिलोमागे १० ते २० रुपयांनी भाज्या स्वस्त झाल्या. पालेभाज्याही स्वस्त झाल्याने ग्राहकांनी खरेदीत उत्साह दाखवला. दरम्यान तोतापुरी आणि अननसाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.

मान्सूनचा पाऊस लांबल्याने गेल्या आठवड्यात भाजी पाल्याचे दर वाढले होते. कोथंबिरी पेंडीचा दर ५० ते ६० रुपयांवर पोचला होता. आज मंडईत कोथंबिरीची प्रति पेंढी १० ते २० रुपयांनी विकली गेली. मेथी पेंढीच्या दरात घसरण झाली. २० ते २५ रुपये प्रति पेंडीचा दर दहा रुपयांनी कमी झाला. १० ते १५ रुपये मेथीची पेंढी विकली गेली. पोकळा, मेथी, कांदा पात या पालेभाज्यांच्या पेंढ्यांचा दर प्रतिपेंढी दहा रुपये दर होता. वांग्याच्या दरातही प्रतिकिलो १० रुपयांनी कमी झाला. प्रतिकिलो २० रुपये वांग्याचा दर होता. श्रावण घेवड्याचे बाजारात आगमन झाले आहे. प्रतिकिलो ८० ते १०० दराने विक्री झाली. गवारीचा दर ८० रुपयांवर स्थिर होता. तोतापुरी आब्ंयाच्या दरातही घट झाली आहे. दहा ते पंधरा रुपये प्रतिनगाचा दर होता. अननसाचा प्रतिनगाचा दर २० ते २५ रुपये इतका होता.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ४० रु.

टोमॅटो : २० रु.

भेंडी : ६० ते ८० रु.

ढबू : ४० रु.

गवार : ८० रु

दोडका : ४० ते ६० रु.

घेवडा : ८० ते १०० रु.

कारली : ६० रु.

वरणा : ६० रु.

हिरवी मिरची : ४० ते ५० रु.

फ्लॉवर : २० ते ३० रु.

कोबी : १० ते २० रु.

बटाटा : २० रु.

लसूण : ८० रु.

कांदा : २० रु.

पडवळ : १५ ते २० (प्रति नग)

दुधी : १० ते २० (प्रती नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी :१० ते १५ रु.

कांदा पात : १० रु.

कोथिंबीर : १० ते २० रु.

पालक : १० रु.

शेपू :१० रु.

करडा : १० रु.

पुदीना : १० ते १५ रु.

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : ६० ते १४० रु.

डाळिंब : ४० ते ६० रु.

मोसंबी : ३० ते ८० रु.

चिकू : ४० रु.

केळी : २० ते ६० (डझन)

जवारी केळी : ३० ते ७० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९५०० झाडांचे ‘ऑक्सिजन पार्क’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सरकारी योजनेत लोकसहभाग आणि शैक्षणिक अभियानात नाविन्याचा अवलंब करत राज्यभर वेगळी छाप पाडणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषद आता ९५०० झाडांचे 'ऑक्सिजन पार्क' विकसित करणार आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरातील सुमारे एक एकर जागा यासाठी निश्चित केली आहे. विविध जातीची झाडे, फळांची रोपे आणि फुलझाडींनी या परिसरात हिरवाई फुलविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक वनीकरण आणि वन विभागाचे सहकार्य मिळाले आहे.

जिल्हा परिषदेचा मुख्यालय इमारत आणि आसपासचा परिसर हा जवळपास साडेआठ एकरचा आहे. ही सगळी जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. मुख्यालयात विविध विभागाची कार्यालये आहेत. राजर्षी शाहू सभागृह आणि समिती सभागृह आहे. याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या विविध समिती सभापतिसाठी निवासस्थाने बांधली आहेत. उपाध्यक्ष व कृषी समिती, बांधकाम समिती, शिक्षण समिती, महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण समिती सभापतीसाठी निवासस्थाने बांधली आहेत.

या व्यतिरिक्त शिल्लक जागेतील सुमारे एक एकर परिसरात 'ऑक्सिजन पार्क' प्रस्तावित केले आहे. या जागेत वृक्षलागवड करताना नव्या संकल्पनेचा अवलंब करण्यात येणार आहे. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्याची 'मियावॉकी फॉरेस्ट' संकल्पना सध्या सर्वत्र रुजली आहे. त्यानुसार पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरातील मोकळी जागा निवडली आहे. विशेष म्हणजे, झाडे जगावीत, त्यांची वाढ उत्तमरित्या व्हावी यासाठी दोन वर्षे वाढ झालेली रोपांची लागवड केली जाणार आहे. त्याद्वारे हा परिसर हिरवागार बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

. ..

३५ प्रकारची रोपे, फूल आणि फळझाडांचा समावेश

कोल्हापूर परिसरात वाढतील अशा जातीची रोपे, फुले व फळांच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. ३५ हून अधिक जातीच्या रोपांचा समावेश आहे. आंबा, वड, चिंच, करंज, बहावा, गुलमोहर, कडुलिंब या जातीच्या रोपांचा समावेश आहे. शिवाय विविध प्रकारच्या फळांच्या रोपांचा समावेश असेल. या परिसरात विविध प्रकारच्या झाडांनी या हिरवाई फुलविण्याचे नियोजन आहे. शिवाय नागिरकांसाठी 'वॉकिंग ट्रॅक', बैठकव्यवस्था अशी सोय करण्याचे नियोजन आहे. कृषि विभाग, बांधकाम विभाग आणि लेखाविभागातील काही अधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. लेखाधिकारी राजेंद्र नागणे, कनिष्ठ अभियंता विराज टोणे, वैभव खोत, कृषि विभागातील लतिफ शेख यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी हे काम पाहत आहेत.

.. .. .

जिल्हा परिषदेच्या परिसरातील जवळपास एक एकर जागेवर ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात येणार आहे. रोपांच्या लागवडीसह त्यांची उत्तम वाढ व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील.

डॉ. रवी शिवदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

... . .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणातून समाज सक्षम व्हावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा समाजाला आरक्षणाच्या ४० वर्षांच्या लढाईला यश मिळाले, मेहनत कामाला आली. आरक्षण मिळाले, पुढे काय हा खरा प्रश्न आहे. राज्यात मराठा समाज ३४ टक्के आहे, पण समाजातील बहुसंख्य मंडळी ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत. आरक्षणाच्या माध्यमातून हा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला, तरच आरक्षणाचा लढा सार्थकी ठरेल. सामाजिक संस्था व समाजधुरिणांनी समाजाला प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी स्वीकारावी,' असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केले.

सकल मराठा समाजातर्फे आयोजित कृतज्ञता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. काँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या राणे समितीचे प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी समाजाला आरक्षण देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. यानिमित्त त्यांचाही सत्कार झाला. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.

आमदार सतेज पाटील म्हणाले, 'मराठा समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रश्नांची तड लावली. आघाडी सरकारच्या कालावधीत आरक्षणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. सध्याच्या सरकारने आरक्षण लागू केले. पालकमंत्री पाटील यांची समन्वयकाची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी मराठा भवनसाठी जागा द्यावी.'

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ' मराठा आरक्षणासाठी सर्व समाज रस्त्यावर उतरल्याने राजकीय नेत्यांची धडगत नव्हती. आरक्षणाचा निर्णय हा समाजाच्या लढाईचा विजय आहे. सुप्रीम कोर्टातही आरक्षण कायम टिकावे यासाठी विधिमंडळातील सर्व सदस्यांनी समाजाच्या पाठीशी राहिले पाहिजे.'

माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्णत्वास आली ही आनंददायी बाब आहे. संसदेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करणारा मी पहिला खासदार होतो.'

सचिन तोडकर यांनी आंदोलनाच्या कालावधीत रेल्वेची जाळपोळ करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली. यावेली मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान सहकार्य केल्याबद्दल मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांचा सत्कार करण्यात आला.

दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक तर जयेश कदम यांनी स्वागत केले. संदीप पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी महापौर माधवी गवंडी, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, मराठा महासंघाचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार, जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहीर दिलीप सावंत यांनी शाहिरीच्या माध्यमातून सभागृहात चैतन्य निर्माण केले.

'मटा'ने बजावली समाज प्रबोधनाची भूमिका

मराठा आरक्षणाच्या लढाईत प्रसारमाध्यमाची भूमिका खूप मोलाची ठरली. आरक्षणाच्या आंदोलनाच्या प्रांरभापासून 'महाराष्ट्र टाइम्स'ने उत्कृष्ट लिखाण करत समाजात जागृती केली. खरे तर, 'मटा'ने समाज प्रबोधनाची भूमिका बजावली असे गौरवोद्गार नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी काढले.

राजकारणापलीकडील क्षेत्रे गाजवावीत

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, 'मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभर एकजूट पाहावयास मिळाली. आरक्षणाच्या माध्यमातून समाजाची सर्वांगीन उन्नती झाली पाहिजे. मराठा समाजाने राजकारणापलीकडे जाऊन उद्योग, व्यवसाय, शेती, सैन्यदल अशा विविध क्षेत्रात कामगिरी करावी. दिल्लीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधानपदावर कधी विराजमान होणार याकडे लक्ष आहे. दिल्लीत महाराष्ट्राचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकल मराठा समाज...

$
0
0

काँग्रेस सरकारच्या कालावधीत माजी मुख्यमंत्री राणे हे आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख होते. त्याचा संदर्भ घेऊन राणे म्हणाले, 'मराठा समाजासाठी काही तरी करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. अन्य समाजाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. १६ टक्के आरक्षण दिले, पण ते आरक्षण टिकले नाही. आताच्या सरकारने आरक्षण देण्याचा शब्द खरा केला. मराठा समाजाने एकजूट दाखवून सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले.'

सरकारने याचिका दाखल करावी

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, 'मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षणाची आवश्यता होती. सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकण्यासाठी सरकारने वकिलांची फौज तैनात करावी. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या प्रवर्गाला केंद्रातील खुल्या प्रवर्गाच्या आरक्षणाची संधी मिळणार नाही, असा निकाल गुजरात हायकोर्टाने दिला आहे. त्याचा परिणाम मराठा आरक्षणावर होणार नाही, यासाठी सरकारने याचिका दाखल करावी.' त्यावर आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुजरात हायकोर्टाच्या निकालाचा अर्थ काढून मराठा आरक्षणाविषयी गैरसमज होऊ नयेत. केंद्रातील आरक्षण कोणत्याही परिस्थिीत मराठा समाजाला मिळेल. आवश्यकता भासल्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सरकारतर्फे याचिका दाखल करतील, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकल मराठा समाज..समारंभाला मान्यवरांची गर्दी

$
0
0

फोटो ओळी..

सकल मराठा समाजातर्फे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित कृतज्ञता समारंभ झाला. या कार्यक्रमाला समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मल्टिस्टेट’वरून पुन्हा उकळी

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर: जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) मल्टिस्टेट प्रश्नांवरून ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी बंडाचे निशान उभारल्याने संचालकात फूट पडण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा आणि पुढील वर्षी होणाऱ्या 'गोकुळ'च्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून सर्वसाधारण सभेत गप्प बसलेल्या संचालकांनी या प्रश्नांवर नेते मंडळींना कात्रज घाट दाखवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मल्टिस्टेटवर सर्व संचालकांचे एकमत असल्याच्या दाव्याला यामुळे तडा गेला आहे.

गतवेळच्या गोकुळच्या पंचवार्षिक निवडणूक आमदार सतेज पाटील यांनी थेट महादेवराव महाडिक यांना आव्हान देत निवडणूक लढवली होती. आमदार हसन मुश्रीफ आणि चंद्रदीप नरके यांनी पाटील यांच्या पारड्यात मते टाकली असती तर 'गोकुळ'चा निकाल वेगळा लागला असता. निसटत्या विजयामुळे सावध झालेल्या नेते मंडळींनी 'गोकुळ'ची सत्ता आपल्या ताब्यात रहावी, यासाठी मल्टिस्टेटचा घाट घातल्याची चर्चा दूध उत्पादकांत सुरू झाली. मल्टिस्टेट ठरावाला ज्येष्ठ पाच संचालकांनी विरोध केला होता. या संचालकांचे बंड शमवण्यात नेते मंडळींना यश आले. तरीही सर्वसाधारण सभेत मल्टिस्टेट प्रश्नांवर झालेल्या राड्याने गोकुळची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. एरवी दोन ते तीन तास चालणारी सभा अवघ्या एक मिनिटात गुंडाळल्याने दूध उत्पादकांत नाराजी पसरली. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत माजी खासदार धनंजय महाडिक यांना बसला.

आगामी विधानसभा निवडणुकीत मल्टिस्टेटचा फटका बसू नये, याची काळजी नेते मंडळी व संचालक मंडळी घेत आहेत. हा ठराव मागे घेण्यासंदर्भात संचालकांत चर्चा सुरू असताना अरुण डोंगळे यांनी तोंड फोडले. त्यांनी थेट लेटरबॉम्ब टाकून 'संचालक पदाचा राजीनामा द्यावा लागला तर बेहत्तर पण मल्टिस्टेटला विरोध करणार' अशी भूमिका घेतली. डोंगळे यांनी राधानगरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची घोषणा केली असून त्यांनी प्रचारही सुरू केली आहे. मल्टिस्टेटचा मुद्दा निवडणुकीत अडचणीचा ठरणार असल्याने डोंगळे यांनी आरपारची लढाई सुरू केली आहे. त्यांनी आनंदराव पाटील-चुयेकर यांच्यासारखे नेतृत्व नसल्याचा उल्लेख निवेदनात करून एक प्रकारे महाडिक यांना शह देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

'डोंगळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मल्टिस्टेटला विरोध केला आहे,'असा आरोप माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केला आहे. पण मल्टिस्टेटचा निर्णय घेताना संचालकांच्या बैठकीत डोंगळे यांनी विरोध केला होता, असा डोंगळे समर्थकांकडून दावा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत राधानगरीत तालुक्यात डोंगळे यांनी महाडिक यांच्या प्रचारात आघाडी घेतली होती. एकीकडे सर्व संचालकांच्या गावात महाडिक यांना कमी मते पडली असताना डोंगळे यांच्या गावात महाडिकांना मताधिक्य मिळाले आहे. डोंगळे यांच्याकडे गोकुळचे साडेतीनशे ते चारशे ठराव आहेत. प्रत्येक पंचवार्षिक निवडणूकीत चुयेकर, नरके यांच्यानंतर डोंगळे यांना मते पडतात. त्यामुळे गोकुळमधील वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

मल्टिस्टेटवरुन प्रश्नांवर संचालक एक आहेत, अशी दावा केला जात असला तरी खासगीत संचालकांकडून या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. गोकुळचे बहुतांशी संचालक हे काँग्रेसशी संबधित आहेत. तर महाडिक गटाकडून गेल्या पाच वर्षांत भाजपधार्जिने धोरण स्वीकारल्याने संचालकांत नाराजी आहे. महाडिक यांच्या कार्यशैलीचा फटका गोकुळला बसत असल्याची चर्चा होऊ लागला आहे. राज्यात इतर दूध संघाच्या तुलनेत गोकुळची प्रगती वेगाने होत असताना महाडिक गटाच्या राजकारणामुळे संघाची बदनामी होत आहे. हे थांबवायचे असेल तर मल्टिस्टेटचा ठराव मागे घेण्यासाठी संचालकाकडून आग्रह होण्याची शक्यता आहे.

संचालकांची होणार बैठक

गोकुळ व मल्टिस्टेटवरुन विरोधकांनी रान उठवले असल्याने त्याचा फटका करवीर, कोल्हापूर दक्षिण विधानसभा निवडणुकीत होणार आहे. तसेच काही संचालक विधानसभेची तयारी करत आहेत. मल्टिस्टेटच्या निर्णयापूर्वी संचालक वापरत असलेली वाहने विक्री करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हा ठरावही डोंगळे यांनीच मांडला होता. मल्टिस्टेटचा निर्णय आगामी सर्वसाधारण सभेत मागे घ्यावा, यावर चर्चा करण्यासाठी संचालक एकत्र येणार होते. पण तत्पुर्वी डोंगळे यांनी लेटरबॉम्ब फोडून मल्टिस्टेटच्या विषयाला तोंड फोडले. पुढील दीड वर्षात मल्टिस्टेटच्या प्रश्नांवर बरीच उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठ आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्या बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या प्रमुख मागणीच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी (ता. ८) सहा जिल्ह्यातील वकिलांच्या खंडपीठ कृती समितीची बैठक होत असून मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन पुकारण्याची शक्यता आहे. कसबा बावडा येथील न्यायसंकुलात सायंकाळी सहा वाजता बैठक होणार आहे.

कोल्हापुरात जोपर्यंत खंडपीठ होत नाही तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार जिल्हा बार असोसिएशनने केला आहे. त्यासाठी मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांच्या भेटीसाठी गेले दोन महिने पूर्ण होत आहेत. त्यांच्या भेटीसाठी असोसिएशनकडून पत्रव्यवहारही पूर्ण झाला आहे. त्यांच्या भेटीसाठी येत्या ३१ जुलै पर्यंत प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासह राज्य सरकारही कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी फारसे अनुकूल असल्याचे दिसत नाही. येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुक होत आहे. तरीही खंडपीठाचा प्रश्न सुटलेला नाही. मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी गेल्या ३४ वर्षांपासून वकील संघटनांचे आंदोलन सुरू आहे. मात्र संबंधित घटकांकडून फारसा प्रतिसाद नाही. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील खंडपीठ कृती समितीची बैठक होत आहे. बैठकीत येत्या १३ जुलै रोजी लोकअदालत होत आहे. या लोकअदालतीच्या कामकाजाला असहकार आंदोलन, रास्ता रोको, रेल्वे रोकोसह आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रणजित गावडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुप्रीम’ मध्ये कायदेतज्ज्ञांची फौज उभी करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय हा अद्वितीय आहे. हे आरक्षण सुप्रीम कोर्टातही कायद्याच्या सर्व पातळीवर टिकावे यासाठी आवश्यक दाखले, कागदपत्रांच्या पुराव्यासह निष्णात कायदेतज्ज्ञांची फौज सुप्रीम कोर्टात उभी करु,'अशी ग्वाही पालकमंत्री आणि मंत्री गटाचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारतर्फे केस लढविण्यासाठी अॅटर्नी जनरल तुषार मेहता यांची नियुक्ती केल्याची माहितीही त्यांनी दिली.

सकल मराठा समाजातर्फे, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मदत केलेल्या विविध घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित केला होता. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. याप्रसंगी त्यांच्या हस्ते, पालकमंत्री पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा, ग्रंथ भेट देऊन सत्कार झाला. पालकमंत्र्यांच्या हस्ते, श्रीमंत शाहू महाराज यांचा सन्मान झाला. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हा समारंभ पार पडला.

'मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे ही माझी जीवननिष्ठा होती,'अशा भावना पालकमंत्र्यांनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, 'मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. त्यामध्ये कसलाही राजकीय हेतू नव्हता. धार्मिक व आर्थिक निकषावर आरक्षण मिळत नाही. ३२ टक्के मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे असंख्य पेपर समोर आणले. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची याकामी मदत झाली. काँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेतला नव्हता. ही चूक सुधारुन आमच्या सरकारने, मागासवर्गीय आयोगाच्या अहवालासह मराठा समाजाला आरक्षण घोषित केले. सुप्रीम कोर्टात, सोमवारपासून सुनावणीला सुरुवात होत आहे. 'सुप्रीम'मध्येही आरक्षण कायम राहील यासाठी राज्य सरकार, सकल मराठा समाज मिळून टीमवर्कने प्रयत्न करू. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४२ कार्यकर्त्यांच्या कुटुंबांतील एका सदस्याला सरकारतर्फे एसटी खात्यात नोकरी देण्यात येत आहे. आरक्षणाची ताकद खूप मोठी आहे. त्या माध्यमातून मिळालेल्या सुविधा समाजातील खालच्या घटकापर्यंत पोहचविल्या पाहिजेत. समाजाने केवळ आरक्षणावर अवलंबून न राहता सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सक्षम बनावे. मार्गदर्शनासाठी गावागावांत मराठा केंद्रे साकारली पाहिजेत. कोल्हापुरातील मराठा भवनचा प्रश्नही मार्गी लावू. '

......

गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरुन दाखल गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला राज्य सरकारने सुरुवात केली आहे. आंदोलनादरम्यान पाच लाख रुपयांच्या आतील नुकसानप्रकरणी गुन्हे मागे घेण्याबाबतचे अधिकार राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ते, दर आठवड्याला एक बैठक घेऊन आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला गती देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना यासंदर्भातील माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. आतापर्यंत ४० आंदोलकावरील गुन्हे मागे घेतले आहेत. मात्र पाच लाखांपेक्षा अधिक नुकसानीप्रकरणी दाखल गुन्हे, जाळपोळ, पोलिसांवरील हल्ले यासंबंधाने दाखल गुन्ह्यासंदर्भात सरकारला स्वतंत्र विचार करावा लागेल.'

...............................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी वाटपावरून संघर्ष चिघळणार

$
0
0

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडील निधी वाटपात भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षांचा समावेश करण्याच्या निर्णयावरुन जिल्हा परिषदेत सत्तारुढ भाजप आघाडी व विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत संघर्ष चिघळणार आहे. दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांनी, समाजकल्याण विभागाचा निधी वाटपाचा अधिकार भाजप तालुकाध्यक्षांना देण्याचा अधिकार नियमबााह्य आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. जिल्हा परिषद सभागृहात आणि सभागृहाबाहेर आंदोलने करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी दिला.

समाजकल्याण विभागातर्फे दलित वस्ती सुधारणा अंतर्गत ३५ कोटी रुपयांच्या निधीच्या वाटपाचे सूत्र पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी निश्चित केले. आतापर्यंत हा निधी संपूर्णपणे जिल्हा परिषद सदस्यांना मिळायचा. यंदा मात्र पालकमंत्र्यांनी, भाजपच्या तालुकाध्यक्षांना एकूण रकमेच्या १५ ते २० टक्के निधी देण्याचा फॉर्म्युला ठरविला आहे. या निर्णयावर जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्कच्या निधीवर गदा येणार आहे. शिवाय नियमांना फाटा देऊन सदस्य नसणाऱ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निधी वाटप कसा करता येऊ शकतो असा मुद्दा आता जिल्हा परिषद सदस्य मांडत आहेत. राष्ट्रवादीचे सदस्य सतीश पाटील म्हणाले, 'राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला निधी देऊन जिल्हा परिषद सदस्यांचा अवमान करण्याचा प्रकार आहे. पालकमंत्र्यांच्या निर्णयामुळे सभासदांच्या निधीवर गंडांतर येणार आहे. सदस्यांना डावलून इतरांना निधी देण्याचा प्रकार खपवून घेणार नाही. सभागृहातही आवाज उठवू आणि सभागृहाबाहेर आंदोलन करू.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी...१

$
0
0

पुरस्कार वितरण : हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड संस्थेतर्फे इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. स्थळ : समर्थ विद्या मंदिर सभागृह, शांतिनगर उचगाव. वेळ : सकाळी ११ वा.

बैठक : भारिप बहुजन महासंघातर्फे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक. स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक. वेळ : दुपारी १ वा.

व्याख्यान : भारिप बहुजन महासंघातर्फे प्रा. डॉ. सुरेश शेळके यांचे व्याख्यान. विषय : 'प्रतिक्रांतीच्या काळात समतावाद्यांची भूमिका'. स्थळ : शाहू स्मारक भवन, दसरा चौक. वेळ : सायंकाळी पाच वा.

शिबिर : योगप्रवीण विठ्ठल तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन प्राणायाम ध्यान शिबिर. स्थळ : प्रभातीर्थ अपार्टमेंट, ताराबाई रोड. वेळ : सायंकाळी पाच वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजपुरवठा खंडीत

$
0
0

कोल्हापूर: महावितरणच्या शाहू मिल ३३ केव्ही वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही भूमीगत वाहिनीत रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बिघाड झाली. यामुळे मंगळवार पेठेतील विविध भागातील वीज पुरवठा अर्धा तासहून अधिक वेळ खंडीत झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. पावसामुळे दुरुस्तीच्या कामात व्यत्यय निर्माण झाल्यामुळे या भागातील वीज पुरवठा बंद राहिला. अर्धा तासांनी वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांचा सत्कार

$
0
0

सकल मराठा समाजातर्फे आयोजित आरक्षण कृतज्ञता समारंभात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार झाला. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, प्रा. जयंत पाटील, जयेश कदम, दिलीप पाटील आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवप्रसादचे ध्येय कलेक्टर होण्याचे

$
0
0

मुलांच्या शिक्षणासाठी धुणीभांडी करत आई करतेय धडपड

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ना खासगी शिकवणी, ना वैयक्तिक मार्गदर्शन, दहा बाय बारा फुटाच्या एका खोलीत आई-बहिणीसोबत वास्तव्य. स्वयंपाक खोलीही तीच आणि अभ्याससुद्धा त्याच ठिकाणी. गरीब कुटुंबातील शिवप्रसाद बसय्या मुगडलीमठ या विद्यार्थ्याकडे शिकण्याची मोठी जिद्द आहे. खासगी शिकवणी, वैयक्तिक मार्गदर्शन यापासून कोसो दूर लांब असलेल्या या मुलाने दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविलेल्या, सातवीत शिकत असताना तलाठी, पीएसआय परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या शिवप्रसादला भारतीय प्रशासकीय सेवेत करिअर करायचे आहे. कलेक्टर होण्याचे त्याचे स्वप्न आहे.

शिवप्रसादच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची वाटचाल ही संघर्षमय आहे. बसय्या व गीता हे पती पत्नी, पंधरा सोळा वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी कोल्हापुरात दाखल झाले. राजारामपुरी तसेच खत्री लॉन परिसरात भाड्याच्या खोलीत संसार थाटला. गेली आठ नऊ वर्षे हे कुटुंब नेहरुनगर दत्त मंदिर परिसरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे. शिवप्रसाद सातवीत तर त्याची बहिण गिरिजा चौथीत शिकत असताना वडील बसय्या यांचे निधन झाले.

पतीच्या निधनानंतर कुटुंबांचा सारा भार आई गीता यांच्यावर आला. रहायला भाड्याची खोली, उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. आभाळ कोसळल्यासारखी स्थिती निर्माण झालेली. या कठीण परिस्थितीला धैर्याने सामोरे जात गीता यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ तर केलाच शिवाय त्यांच्या शिक्षणावरही लक्ष केंद्रित केले. आपण शिकलो नाही, मुलांनी शिकावं, नाव कमवावं ही त्यांची आंतरिक इच्छा आहे. धुणीभांडी करुन महिन्याला पाच हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळते. शिवप्रसादचे दहावीचे वर्ष असल्यामुळे त्याच्या शिक्षणाला पैसे कमी पडू नयेत म्हणून त्यांनी संबंध वर्षभर आणखी, तीन चार कुटुंबांत धुणीभांडी केली.

सुट्टीत काम करुन वह्या पुस्तके घेतली

शिवप्रसादला आईच्या कष्टाची जाणीव होती. नववीची परीक्षा संपल्यावर त्याने उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत खासगी नोकरी केली. दोन महिने काम करुन मिळालेल्या पैशातून दहावीची पुस्तके, वह्या घेतल्या. दहावीच्या अभ्यासक्रमाचे नियोजन केले. नियमित अभ्यास,वाचन, लिखाणावर भर असा स्वयंअध्ययनचा पॅटर्न निश्चित केला. रोज सकाळी वाचन, रात्री दहा ते बारा एक वाजेपर्यंत लिखाण आणि नोट्स काढायच्या. काही शंका आल्यास दुसऱ्या दिवशी शाळेतील शिक्षकांकडून निरसन करुन घ्यायचे. महाराष्ट्र हायस्कूलमधील शिक्षकांनी त्याला नेहमीच प्रोत्साहित केले. त्याचे सातवीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या नेहरुनगर विद्यामंदिर येथे झाले. शिष्यवृत्ती परीक्षा, गणित प्राविण्य परीक्षेत यश मिळवत चुणूक दाखवली होती.

……………..

कोट

'मुलाने मोठ्या कष्टात शिक्षण घेतले. परीक्षेत त्याने मिळवलेल्या गुणामुळे ऊर भरुन आला. मुलांनी माझ्या कष्टाचे सार्थक केल्याचे समाधान वाटते. मात्र त्याचवेळी त्याच्या शैक्षणिक भवितव्याविषयी चिंता दाटून राहिलीय. कॉलेजचा खर्च कसा पेलणार, हा मोठा प्रश्न आहे.

गीता मुगडलीमठ, आई

………………………………………….........................

'सायन्स शाखेतून अकरावी, बारावी करायचे आहे. बारावीनंतर इंजिनीअरिंग अभ्यासक्रम शिकणार आहे. खरं सांगायचे तर, भारतीय प्रशासकीय सेवेत मला करिअर करायचे आहे. यूपीएससीची परीक्षा देऊन आयएएस व्हायचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी अभ्यास आणि कष्ट करायची माझी तयारी आहे.

शिवप्रसाद मुगडलीमठ, विद्यार्थी

……………………………….................................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यस्तरीय विनोदी कथास्पर्धेचे आयोजन

$
0
0

राज्यस्तरीय विनोदी कथा

स्पर्धेचे आयोजन

कराड

गुंफण अकादमीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेसाठी कथा पाठवण्याचे आवाहन अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले आहे. विनोदी लेखनाच्या बाबतीत जाणवणारी पोकळी भरून काढण्याच्या हेतुने विनोदी लेखन व लेखक यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अकादमीच्या वतीने ही स्पर्धा घेतली जाते. स्पर्धेचे हे सतरावे वर्ष आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, लेखकांनी आपली सुटसुटीत विनोदी कथा कागदाच्या एका बाजुस सुवाच्च अक्षरात लिहून अथवा टाईप करून गुंफण अकादमी, द्वारा विकास धुळेकर, १४६ अ, साईलीला अपार्टमेंट, प्रतापगंज पेठ, सातारा (मोबाइल ९८५०६५९७०९ / ९८८१७३९७१०) या पत्त्यावर पाठवावी. अकादमीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहकाची आत्महत्या

$
0
0

बेळगाव :

कर्नाटक राज्य परिवहनच्या वाहकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. बस डेपोतच वाहकाने आत्महत्या केली होती. खात्यातील दोन अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे वाहकाने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले होते. आत्महत्या केलेल्या वाहकाचे नाव आनंद हरिजन (५३ रा. केदनूर) असे आहे.

आत्महत्येची घटना कळल्यावर त्याचे नातेवाईक आणि दलित संघटनांचे कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका घेतली. सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत बसस्थानकात मृतदेह ठेवून त्यांनी ठिय्या मांडला होता. आमदार अनिल बेनके यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यानंतर आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दुपारी एक वाजता अधिकाऱ्यांना निलंबित केल्यावर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेत मृतदेहावर अंतिम संस्कार केले. सहाय्यक रहदारी नियंत्रण अधीक्षक एस. एम. मुल्ला आणि डेपो मॅनेजर एल. एस. लाठी, अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी मार्केट पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

..........

कोयने मुसळधार पाऊस सुरूच

म. टा. वृत्तसेवा, कराड

पाटण तालुक्यासह कोयना धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरूच आहे. कोयना धरणातील पाण्याची आवकही दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी सायंकाळी सहा वाजता संपलेल्या गेल्या चोवीस तासांत कोयना धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ४.६४ टीएमसीने वाढ झाली आहे. शिवसागर जलाशयात ३८ हजार ५६ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. कोयनानगर येथे गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक ३७२, नवजा ३६१ व महाबळेश्वर येथे २४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी सहा वाजता कोयना धरणात २६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

............

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील मोरणा विभागाला वरदान ठरलेल्या मोरणा-गुरेघर धरणात सध्या ८० टक्के पाणीसाठा झाला असून, अद्यापही पावसाचे प्रमाण जास्त असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या सांडव्यावरून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग मोरणा नदीत सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मोरणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होवून पूरस्थिती निर्माण झाली आहे.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊसही प्रेमवेडा

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@anuradhakadamMT

धुक्याची चादर लपेटून येणाऱ्या थंडीतला रंकाळा असो, लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्या झळांनी चमकणारा रंकाळा असो किंवा ओलाचिंब करणाऱ्या झिम्माड पावसाच्या सरी झेलणारा रंकाळा असो... रंकाळ्याच्या काठावर ऋतू फक्त बदलतो... त्या ऋतूसोबत येणारी भावना मात्र दगडी काठांवर धडकणाऱ्या बेभान पाण्यासारखीच. आता या घडीलाही आभाळाच्या ओंजळीतून बसरणाऱ्या धारा झेलत उधाणलेला रंकाळा डोळ्यांच्या डोहात मावता मावत नाहीय... रंकाळ्याभोवतीचा कोणताही निवांत कोपरा शोधून प्रेमाच्या सागरात बुडालेल्या प्रेमवेड्यांसारखा रंकाळ्यावरचा पाऊसही रोमँटीक झाला आहे.

कोल्हापूरच्या वर्णनाचे कितीही मनोरे रचले तरी रंकाळ्याची जोड दिल्याशिवाय तो कळस पूर्ण होत नाही. कोणत्याही वयाचा कोल्हापूरकर रंकाळ्याच्या काठाशी, हेलकावे खाणाऱ्या पाण्याच्या लाटांशी, इथल्या टॉवरच्या दगडी कमानीशी... इतकेच नव्हे तर राजघाटाच्या पायऱ्यांपासून परताळ्यातील गर्द झाडीशी अगदी एकरूप झाला आहे. वळीवाची सर येण्याआधी भरून आलेलं आभाळ जितकं रंकाळ्याच्या काठावरून सुंदर दिसत असेल, तितके ते क्वचितच आणखी कुठूनतरी दिसेल. वळवानंतर येणाऱ्या मान्सूनची पहिली रंकाळ्याच्या दगडी काठावर बैठक मारून अंगावर झेलण्यात असलेली मजा तर काही औरच. जुलैचा पाऊस म्हणजे कधी सडकून सर यावी आणि चिंब करून जावी असा तर कधी तासदीडतास सलग रिमझिम बरसणारा तर कधी वेड्यासारखा कोसळणारा. पावसाने कोणतंही रूप घ्यावं आणि त्याच क्षणी आपण रंकाळ्यावर असावं हा क्षण पावसाळ्यातील अत्त्युच्य सुखाचा. अर्थात छत्री, रेनकोट यांच्याशी कट्टी करून रंकाळ्यावर पावसात फिरणार असाल तर ते भिजलेपण कधी तुम्हाला आतपर्यंत चिंब करेल हे कळायलाही उसंत मिळणार नाही.

ताराबाई रोड संपला आणि राजघाटाच्या पायऱ्या नजरेच्या टप्प्यात आल्या की अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. भर पावसात तांबट कमानीपासून रंकाळ्याची वाट पायी चालायची ठरवलं तर वरून पावसाच्या धारा आणि ओली पायवाट संपूच नये असे न वाटणारा विरळाच. आता शाहू उद्यानापासून रंकाळ्याचा प्रवाह कापत जाणाऱ्या पुलावरून उसळी मारणारे रंकाळ्याचे पाणी, समोर काळेभोर ढग उतरून खाली आल्याचे दृश्य, आकाशात लोलकासारख्या आकार बदलणाऱ्या ढगांचे नक्षीकाम, नजरेच्या एकशेऐंशी कोनात काठोकाठ उमललेला रंकाळा पाहिला तरी पाऊस हवाहवासा वाटतो. खणीपासून रस्त्याला लागलेल्या रंकाळ्याच्या दगडी काठाशी सलगी करत पावसाच्या संगतीने चालताना मनातील प्रेमाचे धुमारे फुलायला क्षणाचाही विलंब लागत नाही. रंकाळ्यावर पावसात यावं तर भिजण्यासाठीच. पावसाच्या थेंबांसोबत इथला अंगाशी मस्ती करणारा वारा प्रेमात पडायला लावणारा. पाणीदार रंकाळा, भोवतीची हिरवाई कधी गुलाबी दिसायला लागते याचे भान हरपणाऱ्या रंकाळ्यावर फेरफटका मारताना पावसाच्यासाथीने प्रेमाच्या झऱ्यालाही उमाळे फुटतात.

पावसात आत अन् बाहेर चिंब होणे या प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल तर येत्या पावसात रंकाळ्याकडे वळणारं पाऊल नक्कीच याचं उत्तर देईल. राजघाटावर आल्यानंतर डावीकडे रंकाळ्याचा अथांग डोलारा आणि उजवीकडे देखणा टॉवर झिम्माड पाऊस आणि हवीहवीशी वाटणारी सोबत असेल तर जगात यालाच सुख म्हणत असणार हे नक्की. शालिनी पॅलेसपासून परताळ्यापर्यंतच्या हिरव्या झाडातला रंकाळ्यावरचा पाऊस प्रेमात वेडा करून सोडणारा. ओलावलेले हात एकमेकांच्या हातात गुंफून परताळ्यातील निमूळत्या पायवाटेने चालणाऱ्यांना प्रेमात भिजवणारा पाऊस फक्त रंकाळ्यावरच बरसतो. शालिनीच्या कोरीव वास्तूकडे पाठ करून दगडी बाकावर बसून भर पावसात समोरचा उधाणलेला रंकाळा न्याहाळत प्रेमाच्या गुजगोष्टी करणाऱ्यांसाठी तर रंकाळ्यावरचा पाऊस आयुष्यभर आठवणीचा चिंब ठेवाच. हे क्षण कुणी कॅमेऱ्यात टिपतं, कोणी मोबाइलच्या पाच इंचाच्या फ्रेम बंद करतं तर कुणी पापण्यांच्या राज्यात कोरतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेबी’च्या नियमामुळे गुंतवणूक सुरक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शेअर बाजारात गुंतवणूक करणे अवघड आहे, हा समाजात मोठा गैरसमज आहे. पण बदलत्या परिस्थितीनुसार उघड्या डोळ्यांनी व्यवहार केले तर शेअर बाजारातही उत्तम गुंतवणुकीची संधी मिळू शकते. 'सेबी'च्या नियमांमुळे शेअर बाजारातील गुंतवणूक सुरक्षित झाली आहे,' असे प्रतिपादन सीडीएसएलच्या शिक्षण विभागाचे माजी प्रमुख चंद्रशेखर ठाकूर यांनी केले.

'अर्थसंकल्प २०१९ आणि शेअर बाजारातील संधी' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशन आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ यमाजी मालकर म्हणाले, 'भाजप एनडीए सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील अर्थसंकल्पात भांडवल उभारणीच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याने भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची होणे शक्य आहे. यापुढे डिजिटल व्यवहार वाढविण्यावर सरकार भर देणार असून, एक कोटी रुपये बँकेतून काढणाऱ्यांना दोन टक्के टीडीएस लावण्यात आला आहे. देशात फक्त एक लाख ४० हजार श्रीमंत कर भरतात. त्यांच्यावर कर लादण्याचे समर्थन होऊ शकत नाही. कर भरणाऱ्यांची संख्या वाढत नसल्याने अप्रत्यक्ष कराद्वारे कर वसूल केला जाणार आहे.'

युरोप, अमेरिका खंडात ग्राहकांची संख्या कमी होत असल्याने जगभरातील देशांचे भारताकडे लक्ष लागल्याचे सांगून मालकर म्हणाले, 'जगभरातील वित्तीय संस्था कमी व्याजदराने भारतात गुंतवणूक करणार आहेत. सार्वजनिक उद्योगांत निर्गुंतवणूक केली जाणार आहे. सरकारी जागांचा वापर करून घरबांधणी केली जाणार असून, पुढील तीन वर्षांत एक कोटी ९० लाख परवडणारी घरे बांधली जाणार आहेत. इलेक्ट्रिक व्हेइकल हा उद्योग जगाच्या अजेंड्यावर असून भविष्यात त्यामध्ये भारत गुंतवणूक करणार आहे.'

असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र शहा यांनी प्रास्ताविक केले. सचिव राजीव शहा यांनी सूत्रसंचालन केले. मनीष झंवर यांनी आभार मानले. यावेळी सहसचिव विपीन दावडा, खजानिस प्रवीण ओसवाल, संचालक अजित गुंदेशा, रवींद्र सबनीस अशोक पोतनीस उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images