Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तालुक्याध्यक्षाना निधी वाटपाचा अधिकार बेकायदेशीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सामाजिक न्याय विभागाच्या निधी वाटपाचे अधिकार भाजपाच्या तालुकाध्यक्षांकडे देण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि बेकायदेशीर आहे,' अशी टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. या निर्णयाचा तात्काळ फेरविचार न केल्यास हायकोर्टात न्याय मागणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या पत्रकात मुश्रीफांनी असे म्हटले आहे, 'पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या भाजपच्या सदस्यांची बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. जनतेकडून विविध करांमधून गोळा झालेला हा पैसा विकास कामांसाठी अर्थसंकल्पाप्रमाणे खर्च केला जातो. पूर्वीपासून विकास निधीच्या वाटपाबाबत कायदेशीर तरतुदी आहेत. त्याप्रमाणेच या निधीचे वाटप झाले पाहिजे. या निधीच्या वाटपामध्ये पक्षीय पातळीवर तालुकाध्यक्ष किंवा जिल्हाध्यक्ष यांना कोणतेही अधिकार असत नाहीत. सभागृहांमध्ये जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना म्हणजेच खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सदस्य यांना अधिकार असतात. त्याप्रमाणे हे वाटप आतापर्यंत होत आले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी भाजपाच्या तालुकाध्यक्षांना निधी वाटपाचे दिलेले अधिकार अत्यंत बेकायदेशीर आहेत. याबाबत त्यांनी तत्काळ फेरविचार करावा. लवकरच त्यांना भेटून याबाबत समक्ष चर्चाही करणार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या दोन महिन्यांवर आलेली आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये जर निधी अडकला तर विकासकामावर त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधानसभेच्या भीतीने संचालकाकडून वाहने बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लोकसभा निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी संघातील (गोकुळ) मनमानी कारभाराचा फटका बसल्याने खडबडून जागे झालेल्या कारभारी व संचालकांनी विधानसभेत दणका बसण्याच्या भीतीने वाहने बंद केली आहेत,' असा आरोप गोकुळ बचाव कृती समितीने एका पत्रकाद्वारे केला आहे.

पत्रकात असे म्हटले आहे, वाहने बंद केली म्हणून संचालकांना वाहन भत्ता देणार का? असा प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत. लोकसभा निवडणुकीनंतर 'गोकुळ'बाबत मिळालेले हे पहिले यश आहे. यापुढे सुद्धा आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ बचाव कृती समितीच्या वतीने गोकुळ मल्टिस्टेटला विरोध सुरू राहणार आहेच. संघातील भ्रष्टाचार, गायीच्या दुधाला दिला जाणारा कमी दर, पशुखाद्याचे वाढीव दर, गोकुळ शॉपीतील भ्रष्टाचार, नोकरभरती याविरोधात संघर्ष सुरूच राहणार आहे. 'गोकुळ'च्या काही संचालकांना आगामी विधानसभा निवडणूक लढायची इच्छा आहे. लोकसभेत लोकांनी दणका दिला तसा दणका आपल्याला विधानसभा निवडणुकीत बसणार या भीतीनेच गोकुळ नेत्यांनी आणि संचालकांनी गाड्या बंद करायचा निर्णय घेतला आहे. संचालकांच्या गाड्या बंद केल्या म्हणजे कारभार स्वच्छ झाला, असे लोकांना वाटेल या भ्रमात संचालकांनी राहू नये.'

गोकुळवर एकहाती सत्ता ठेवण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी गोकुळ मल्टिस्टेटचा घाटही घातला होता. परंतु सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांचा हा डाव गोकुळ बचाव समिती आणि सभासदांनी उधळवून लावला. सर्वसामान्य दूध उत्पादकांनाही मल्टिस्टेटमुळे होणारी गोकुळची लूट लक्षात आली. मल्टिस्टेट करून संघ स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा डाव नेत्यांनी केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोकुळ नेत्यांचा हा डाव हाणून पाडत सामान्य जनतेने संघ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीला लोकांनी घरात बसविले. याचाच धसका या नेत्यांनी आणि संचालकांनी घेतला आहे. गोकुळ बचाव कृती समितीचे बाबासो देवकर, बाळासाहेब कुपेकर, किशोर पाटील, सदाशिव चरापले, बाबासो चौगले, किरणसिंह पाटील यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षपदी राजीव परीट

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्राथमिक शिक्षक राजीव श्रीपती परीट तर उपाध्यपदी आरोग्य सेवक दिनकर रामचंद्र तराळ यांची निवड झाली. जिल्हा उपनिबंधक निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. या दोघांची निवड २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी आहे. चेअरमन परीट यांच्या नावाला महावीर सोळांकुरे व एम.आर. पाटील यांनी सूचक व अनुमोदन दिले. तर तराळ यांच्या नावासाठी के. आर. किरुळकर व शांताराम माने हे अनुक्रमे सूचक व अनुमोदक होते. याप्रसंगी सचिन मगर, राजाराम वरुटे, संगीता गुजर, कृष्णात कारंडे, शिवाजी काळे यांची भाषणे झाली. याप्रसंगी सुकाणू समिती सदस्य भालचंद्र माने, प्रकाश पाटील, लालासो मोहिते, व्यवस्थापक विजयकुमार बोरगे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजीनगर पेट्रोल पंपाला पुन्हा आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संभाजीनगर येथील पेट्रोल पंपावरील मशिनच्या नोजलला रविवारी सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास आग लागल्याने कर्मचारी, ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. आग लागल्याचे समजताच सुधाकर जोशी नगर झोपडपट्टी आणि परिसरातील नागरिकांनी पेट्रोल पंपावर दगडफेक केल्याने कर्मचाऱ्यांनी पंप बंद ठेवला. पंपाचे संचालक प्रमोद वाघ यांनाही धक्काबुक्की झाल्याचे समजते. अखेर अग्निशमन दलाच्या जवावांनी ही लागलेली आग आटोक्यात आणली. नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन पंप बंद करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी पेट्रोल पंपावरील कार्यालयाला आग लागल्याने मोठी तारांबळ उडाली होती.

सुधाकर जोशीनगर झोपडपट्टीजवळ इंडियन ऑइल कंपनीचा 'अतुल्य आई सर्व्हिस स्टेशन' या नावाने पेट्रोल पंप आहे. कर्मचाऱ्यांनी सकाळी सात वाजता हा पंप सुरू केला. नऊ वाजण्याच्या सुमारास पंपावरील एका मशिनच्या नोजलमध्ये आग लागला. यामधून धूर येऊ लागल्याने पंपावरील कर्मचारी आणि पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली. हा प्रकार शेजारील सुधाकर जोशी नगर झोपडपट्टीतील नागरिकांना कळाला. सुमारे ८० ते १०० जणांचा जमाव या ठिकाणी आला. काही नागरिकांनी या पंपावर दगडफेक केली. २९ जुलै रोजी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. यावेळी येथील रहिवाशांनी रास्ता रोको केला होता. मात्र त्यानंतरही जिल्हा प्रशासनाकडून काहीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करीत रहिवाशांनी पंपावरील कर्मचारी आणि संचालक वाघ यांना जाब विचारला. काहींनी त्यांना धक्काबुक्की केल्याचे समजते. घटलेला हा प्रकार जुना राजवाडा पोलिस आणि महापालिकेच्या अग्निशामक दलाला क‌ळविला. दलाच्या जवानांनी ही नोझलला लागलेली आग विझविली. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी पंपावरील वीजपुरवठा बंद करण्यास सांगितले. दरम्यान या घटनेनंतर रहिवाशांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली. नागरी वस्तीत हा पंप बंद करावी. आगीची घडलेली ही चौथी घटना असल्याचे सांगितले. पालकमंत्री पाटील यांनी याप्रकरणी सोमवारी (ता. ८) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. सुमारे अर्ध्या तासानंतर तणाव निवळला.

आगीची चौथी घटना

या पंपावर आगीचा हा चौथा प्रकार असल्याचे सांगण्यात आले. आठ महिन्यांपूर्वी याच पंपावरील पंक्चर दुकानाला रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली होती. गेल्या वर्षीही शॉर्टसर्किटनेच पंपाच्या केबिनला आग लागली होती. त्यावेळी नागरिक आणि पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझविली होती. या पंपावर २९ जून रोजी शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत केबीन जळून खाक झाले. आगीत केबिनमधीन खुर्च्या, एसी, टेबल, वायरिंग आणि सर्व फाइल्स जळून खाक झाल्या. याप्रकरणी रहिवाशांनी रास्ता रोको केला होता. या पंपावर चौथ्यांदा आग लागल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'एकजूट नसल्याने कोल्हापूरची पीछेहाट'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुरोगामी विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवला. त्यांचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आपण समर्थपणे पेलली का? असा सवाल करत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या कोल्हापूरची एकजूट नसल्याने पीछेहाट झाल्याचे सांगत आपल्यातील त्रुटींबाबत आत्मचिंतन करून विकासासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. भारतीय जन संविधान मंच आणि कोल्हापूर कॉलिंगच्या वतीने 'चांगुलपणाची चळवळ'अंतर्गत आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. रेसिडेन्सी क्लब येथे खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते राष्ट्रीय मानवाअधिकार आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झाल्याबद्दल ज्ञानेश्वर मुळे व श्रमदानातून शहर स्वच्छतेची चळवळ रुजवलेले आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. मुळे म्हणाले, 'जामनगरमध्ये ज्याप्रमाणे ज्यू लोकांना आश्रय दिला. त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धातील निर्वासितांना वळीवडे येथे आश्रय दिला. जामनगरप्रमाणे वळीवडेची ख्याती आंतरराष्ट्रीयपातळीवर पोहोचली नाही. यापुढे मात्र आपल्यातील छोटे-छोटे दुवे जोडून सर्वगुणसंपन्न जिल्हा आदर्शवत जिल्हा बनवला पाहिजे. त्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन कार्यरत असलेल्या व्यक्ती, संस्थांना पाठबळ देण्याची आवश्यकता आहे.' तत्पूर्वी मुळे यांच्या हस्ते जयंती नाला परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पारस ओसवाल यांनी 'चांगुलपणाची चळवळ' विषयाची संकल्पना विशद केली. यावेळी आर्किटेक्ट मोहन वायचळ, प्रा. बी. जी. मांगले, प्राचार्य जी. पी. माळी, राजीव परूळेकर, सुनील बासराणी, किशोर देशपांडे, डॉ. प्रमिला जरग आदी उपस्थित होते. डॉ. शीतल पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेतून बाहेर पडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

समाजकल्याण विभागाच्या निधी वाटपाच्या प्रक्रियेत भाजप तालुकाध्यक्षाला सामावून घेण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला जिल्हा परिषदेतील सर्व पक्षीय सदस्यांकडून विरोधाला सुरुवात झाली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या काही सदस्यांनी एकत्र येऊन भाजप नेत्यांनी निर्णय मागे न घेतल्यास सत्तेतून बाहेर पडू, आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला धडा शिकवू,'असा पवित्रा घेतला आहे.

समाजकल्याण समिती सदस्यांनी प्रशासनाला समितीशिवाय मंजूर केलेली दलित वस्ती सुधारणेची कामे ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे पत्र देत थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला आव्हान दिले. शिष्टमंडळात भाजप सदस्यांचा समावेश आहे.

दरम्यान जिल्हा परिषद सत्तेतून बाहेर पडायचे की नाही याचे सर्वाधिकार पक्षाचे नेते व माजी आमदार विनय कोरे ठरविणार आहेत. त्यांचा निर्णय हा अंतिम राहील, असेही सदस्यांनी सांगितले. काही सदस्यांनी कोरे यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. पालकमंत्री पाटील यांनी रविवारी सर्किट हाऊस येथे बैठक घेऊन समाजकल्याण समितीच्या निधी वाटपात भाजपच्या तालुकाध्यक्षांना सामावून घेण्याचे आदेश दिले होते. पालकमंत्र्यांच्या या आदेशाच्या विरोधात जि. प. मधील समाजकल्याण समितीमधील सर्वपक्षीय सदस्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास यांना निवेदन दिले. त्यामध्ये 'पालकमंत्री पाटील यांनी सर्किट हाऊस येथे बैठक घेऊन समाजकल्याण विभागाकडील दलित वस्ती निधीचे तालुकानिहाय वाटप केले. वास्तविक दलित वस्ती सुधारणेसाठी निधी वाटपाचा अधिकार हा समाजकल्याण समितीचा आहे. समितीशिवाय मंजूर करण्यात आलेले दलित वस्ती सुधारणा संदर्भातील विकास कामे ग्राह्य धरण्यात येणार नाही,' असे म्हटले आहे.

निवेदनावर सभापती विशांत महापुरे, सदस्य मनीषा माने, शिवसेनेचे सदस्य प्रवीण यादव, मनीषा कुरणे, कोमल मिसाळ, स्वाती सासने, काँग्रेसचे सुभाष सातपुते, सविता चौगुले, पांडुरंग भादिंगरे, राष्ट्रवादीचे परवीन पटेल आणि भाजपचे महेश चौगुले, अशोक माने यांच्या सह्या आहेत. तत्पुर्वी जिल्हा परिषदेत समाजकल्याण समिती सदस्यांची बैठक झाली. बैठकीत जनसुराज्यच्या काही सदस्यांनी व महिला सदस्याच्या पतीनी निधी वाटपात बाह्यव्यक्ती नियुक्त करण्याचा आदेश मागे घेतला नाही तर सत्तेतून बाहेर पडू असा इशारा दिला. समिती सभापतीसह काही सदस्यांनी, गटनेते अरुण इंगवले यांची भेट घेतली.

'निवडणूक कशाला लढवायची?'

समाजकल्याणच्या निधी वाटपाच्या मुद्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची सोमवारी दुपारी बैठक झाली. राष्ट्रवादीचे सदस्य सतीश पाटील, जीवन पाटील, काँग्रेसचे सदस्य भगवान पाटील, बजरंग पाटील, सुभाष सातपुते, जनसुराज्यचे शंकर पाटील उपस्थित होते. त्यांनी ही पालकमंत्र्यांचा आदेश हा सदस्यांवर अन्याय करणारा असल्याचे सांगत त्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे सदस्य मंगळवारी पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. घटनाबाह्य व्यक्तींना निधी वाटपाचे अधिकार मिळत असतील तर सदस्यांनी निवडणूक कशाला लढवायची? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एका पदाधिकाऱ्यांच्या केबिनमध्येही बैठक झाली. त्यावेळी भाजपचे काही सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’चे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) नवीन विस्तारित दूध प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. आपटे यांनी सोमवारी सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सरकारकडे प्रलंबित गोकुळच्या प्रस्तावांवर चर्चा केली. सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आपटे यांनी सांगितले.

गोकुळने उभारलेल्या नवीन विस्तारित दूध प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे आपटे यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर कार्यक्रमाची वेळ ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी वाशी शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत गाय दूध आणि दूध पावडर अनुदानाचे प्रस्ताव लवकर मंजूर करावेत, अशी विनंती आपटे यांनी केली. तसेच लोणी व तुपावरील जीएसटी कमी करावा, पशुखाद्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोलॅसिसवरील २५ टक्के जीएसटी कमी करावा, सहकारी संस्थांचे वीज दर कमी करावेत, शासकीय गोदामातील निकृष्ट दर्जाचे धान्य प्राधान्याने सहकारातील पशुखाद्य बनवणाऱ्या संघांना द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

मल्टिस्टेटवर चर्चा नाही

मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या भेटीत मल्टिस्टेट प्रश्नांवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अध्यक्ष आपटे यांनी सांगितले. गोकुळचे नेते महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्या सूचनेनुसार चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मल्टिस्टेटचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे. मल्टिस्टेटचा प्रस्ताव दूध उत्पादकांना समजावून सांगण्यास कमी पडलो आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. माझी त्यांची भेट झाली नसल्याने यावर अधिक चर्चा झाली नसल्याचे आपटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरातील गुंतवणूकदारांनाही फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ७५० अंकांनी घसरल्याने गुंतवणूकदारांना दोन दिवसांत पाच लाख कोटी रूपये नुकसान सोसावे लागले आहे. त्याचा फटका कोल्हापूरातील गुंतवणूकदारांनाही बसला कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. पुढील आठ दिवसात शेअर बाजारातील निर्देशंकाने उभारी घेतल्यावर फायदा होईल, अशी आशा गुंतवणूकदारांकडून व्यक्त केली जात आहे.

अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी शेअर बाजारातील निर्देशकांने ४० हजाराचा आकडा पार केला होता. शुक्रवारी भाजप सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर सलग तीन दिवस शेअर बाजार कोसळला. आज, सोमवारी सकाळी शेअर बाजार सुरु झाल्यावर पुन्हा घसरण झाली. पहिल्या तासात शेअर बाजार ४०० अंकानी घसरला. दुपारपर्यंत निर्देशांक ७५० अंकानी घसरल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. दिवसभर टीव्ही, इंटरनेटवर गुंतवणूकदार मार्केटचा आढावा घेत होते. पण दिवसभर निर्देशांक वर न आल्याने गुंतवणूकदारांत निराशा पसरली.

श्रीमंतांवर कर लादल्याने आणि परदेशातील गुंतवणूक करणाऱ्या फर्म व कंपन्यांवर कर लादणार असल्याने शेअर बाजार खाली आला आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच एक कोटीपेक्षा जास्त रक्कम बँकेतून काढणाऱ्या श्रीमंतावर दोन टक्के टीडीएस लावण्यात आला आहे. या निर्णयावर संसदेत चर्चा झाल्यानंतर बिल पास होणार आहे. सोमवारी शेअर बाजार सुरु झाल्यावर गुंतवणूकदारांकडून घरबांधणी आणि इन्फास्ट्रक्चर संबधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुकता दाखवली होती. पण शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीचा धडाका वाढवला. त्यामुळे नामवंत कंपन्याचे शेअर्स घसरले. तेल, मोटार उद्योग, बांधकाम कंपन्यात गुंतवणूक केलेल्या कोल्हापुरातील गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.

गुंतवणूकदारांना गेल्या दोन दिवसात मोठा फटका बसला असला तरी पुढील महिन्याभरात झालेला तोटा भरुन होण्याची आशा गुंतवणूकदारांनी व्यक्त केली. जाणकारांच्या मते, शेअर बाजारामध्ये चढउतार होत असतात. या ठिकाणी संयमाची आवश्यकता असते. दर पडलेल्या कंपन्यांचा अभ्यास करुन भविष्यात त्या कंपन्यांचे शेअर्स वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील आठ दिवसांत गुंतवणूकदार शेअर खरेदीकडे लक्ष देतील. घरबांधणी, रस्ते बांधणीला केंद्र सरकारने प्राधान्य दिल्याने या संबधित इन्फास्ट्रक्चर कंपन्यांशी संबधित शेअर्समधील दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरणार आहे. तरीही सोमवारी झालेल्या नुकसानीमुळे गुंतवणूकदार सावध झाले असून पुढील काही दिवस मार्केटचा अभ्यास करुन शेअर्स खरेदी करतील, असे मत ब्रोकर्सनी व्यक्त केले.

...

कोट

'शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने देशभरातील गुंतवणूकदारांबरोबर कोल्हापुरातील गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. पण बाजारात असे चढउतार होत असतात. पुढील आठ ते पंधरा दिवसांनी शेअर बाजार वधारल्यावर झालेला तोटा भरुन येऊ शकतो.

राजेंद्र शहा, अध्यक्ष, कोल्हापूर इन्व्हेस्टर असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आशा वर्कर्स युनियनची महापालिकेसमोर निदर्शने

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत आशा वर्कर्सच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी समन्वयक, जिल्हा आशा समन्वयक, जिल्हा परिषद अंगणवाडी प्रकल्प अधिकारी यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घ्यावी,' या मागणीसाठी 'सिटू' संलग्न जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आशा वर्कर्स युनियनने २७ मागण्यांचे निवदेन अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे, आशांना गटप्रवर्तक त्वरित मिळावेत, सर्व प्रकारचे दाखले, एचबीएनसी किट, प्रवास भत्ता, मोबाइल भत्ता, मेडिकल सवलती, हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा, जेएसवाय व्यतिरिक्त संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्यास तीनशे रुपये मानधन आशांना मिळावे, प्रतिवर्षी १ हजार रुपये स्टेशनरी खर्च त्यांच्या खात्यात जमा करावा, साडीसाठी ६०० ऐवजी १ हजार रुपये द्यावेत, दोन अपत्यांवर कुटुंब शस्त्रक्रिया केल्यास हजार रुपये मिळणारा लाभ पुन्हा चालू करावा,' आदी मागण्या केल्या आहेत. 'सिटू'चे कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी ज्योती तावरे, सारिका जाधव यांच्यासह आशा वर्कर्स सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच डेंगी नियंत्रात आणावा,' या मागणीचे निवेदन शिवसेना शिष्टमंडळाच्यावतीने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व जिल्हा सेनाप्रमुख संजय पवार यांनी केले.

निवेदनात म्हटले आहे, 'शहरात अनेकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. तसेच अनेक बांधकामे अर्धवट आहेत. अशा ठिकाणी पाणी साचून राहिल्याने डेंगीच्या डासांची पैदास अधिक होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच भटक्या कुत्र्यांचा दिवसेंदिवस उपद्रव वाढत असून भटकी कुत्री नागरिकांवर हल्ला करून जखमी करत आहेत. शहरातील मांसाहार विक्रीच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलजवळ तर कुत्र्यांचा कळप दिसून येतो. स्टॉलवरील शिल्लक अन्नची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नसल्याने भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे.' निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्याबरोबर चर्चा करताना बांधकाम साईटवर पाणी साचू न देण्याची सूचना संबंधीताना करावी. तसेच डेंगीच्या सर्वेक्षणासाठी स्वतंत्र पथक स्थापन करा. अशी मागणी केली.

शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुजित चव्हाण, देवस्थान समिती सदस्य शिवाजी जाधव, अवधूत साळोखे, दुर्गेश लिंग्रस, हर्षल सुर्वे, धनंजय सावंत, शुभांगी पोवार, दीपाली शिंदे, सुमन शिंदे यांच्यासह जिल्हा शिवसेना शहर शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीची निवड यादी बुधवारी प्रसिद्ध होणार

$
0
0

कोल्हापूर

अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी बुधवारी (ता. १०) प्रसिद्ध होणार आहे. अकरावी प्रवेश समितीमार्फत मंगळवारी यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र काही कारणास्तव निवड यादी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कलाशाखेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. शहरात ३३ कॉलेज असून विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे मुलांचा ओढा आहे. वाणिज्य अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागेपेक्षा जादा अर्ज आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईएसआय हॉस्पिटलला अधिकारी देणार भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ईएसआय हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्यादृष्टीने केंद्र सरकारच्यावतीने १५ दिवसांत अधिकाऱ्यांचे पथक पाठवण्यात येईल. त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन आवश्यक बाबींची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी सोमवारी संसदेमध्ये दिले. या हॉस्पिटलच्या दुरवस्थेबाबत खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.

कामगारांना आरोग्य सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने ताराबाई पार्क येथे ईएसआय हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. पण ते पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने दुरवस्था झाली आहे. त्याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स' ने शुक्रवारी 'ईएसआय हॉस्पिटलची वाताहत कायम' असे वृत्त दिले होते. दहा कोटी खर्च करुन सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसाठी १०० खाटांचे हॉस्पिटल बांधण्यात आले. या जिल्ह्यांमध्ये सुमारे सात लाखांच्या आसपास कर्मचारी संख्या असून त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्य संख्या पाहिल्यास सुमारे ३० लाख नागरिकांना या हॉस्पिटलचा उपयोग होणार आहे. सध्या प्रत्येक महिन्याला या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम हॉस्पिटलकरिता वर्ग केली जाते. वर्षाकाठी ही रक्कम सुमारे ८५ कोटी रुपये इतकी आहे. इतक्या प्रमाणावर निधी देऊनही हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन, एक्स-रे, एमआरआय, पॅथॉलॉजी लॅब व इतर कोणत्याही आरोग्य सुविधा कर्मचाऱ्यांना मिळत नाही. पुरेसे कर्मचारी नसल्याने सर्व वॉर्डरुमला कुलूप लावण्यात आली आहेत.

या अवस्थेबाबत सोमवारी खासदार मंडलिक यांनी तारांकित प्रश्न विचारला. हे हॉस्पिटल सर्व सोयीसुविधांसह पूर्ण कार्यक्षमतेने सुरू करावे, अशी मागणीही केली. त्यावर केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी १५ दिवसांत या हॉस्पिटलबाबत माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवले जाईल. त्यानंतर आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात पावसाच्याजोरदार सरी

$
0
0

सोलापुरात पावसाच्या

जोरदार सरी

सोलापूर

सोलापूर शहर आणि परिसरात सोमवारी सायंकाळी सोलापुरात जोरदार पाऊस झाला. दिवसभरात अनेकदा आकाशात ढग दाटून आले. त्या नंतर तुरळक प्रमाणात पाऊस यायचा आणि गायब व्हायचा. मात्र, सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर काही प्रमाणात ऊन जाणवले. मात्र, ढगाळच वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शहरी भागात पाऊस पडला आहे. मात्र. ग्रामीण भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस नगरसेविकेचा राजीनामा

$
0
0

काँग्रेस नगरसेविकेचा राजीनामा

सोलापूर :

सत्ताधारी भाजपच्या विरोधात आंदोलन करून महापालिकेच्या सभागृहाला टाळे ठोकणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीमाना दिला. गटबाजीला कंटाळून पक्ष सोडत असल्याचे त्यांनी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांना सांगितले. फुलारे यांच्या राजीनाम्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. मनपाचे अंदाजपत्रक वेळेवर होत नाही, नगरसेवकांना भांडवली कामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप करून नगरसेविका फुलारे यांनी सर्वसाधारण सभेच्या दिवशी महापालिकेच्या सभागृहाला टाळे ठोकले होते. या वेळी सभागृहात काही नगरसेवक अधिकारी होते. या बद्दल फुलारे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती. काँग्रेसच्या नगरसेवकांनी या आंदोलनात साथ देण्याऐवजी थेट कारवाईला करायला सांगितल्याने फुलारे संतापल्या होत्या. त्यांनी काँग्रेसच्या गटनेत्यावर टीका केली होती. त्यामुळे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी श्रीदेवी फुलारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीशीला उत्तर देताना फुलारे यांनी थेट काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माउलींचा पालखी सोहळा वेळापूर मुक्कमी

$
0
0

माउलींचा पालखी सोहळा वेळापूर मुक्कमी

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

माउलींचा पालखी सोहळा सोमवारी सकाळी साडेसहा वाजता माळशिरसहून मार्गस्थ झाला. पालखी सोहळा दुसऱ्या गोल रिंगणासाठी सकाळी नऊ वाजता खुडूस शिवारात पोहोचला. ढगाळ वातावरणात चोपदारांनी रिंगण लावून घेतले. परंपरेप्रमाणे रिंगणाला सुरूवात झाली. सकाळी साडेनऊ वाजता माउलींचा अश्‍व रिंगणासाठी सोडण्यात आला. पुरंदावडे येथील नेत्रदीपक दौडीनंतर अश्‍वांनी आजही खुडूस येथे नेत्रदीपक दौड करून लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यामागे स्वाराच्या अश्‍वानेही नेत्रदीपक दौड करून प्रदक्षिणा पूर्ण केली. माउली...माउली...नामाचा जयघोष करीत रिंगण सोहळा संपला. त्या नंतर वारकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीचे खेळ खेळले. झिम्मा, फुगडी, हुतुतू मैदानी खेळ रंगले. या रिंगण सोहळ्यानंतर सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ झाला.

खुडूस ग्रामस्थांचे भक्तीपूर्ण स्वागत स्वीकारून श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा निमगांव मगराचे (पाटी) येथे दुपारी बारा वाजता पोहोचला. निमगांव, विझोरी, विजयनगर आदी ग्रामपंचायतीच्या वतीने येथे सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या परिसरातील हजारो भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. वारकऱ्यांनी येथे दुपारचे भोजन व विश्रांती घेतली. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पंढरीस जात असताना वेळापूरनजीक टेकडीवरून त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. त्यामुळे ते येथूनच पंढरपूरपर्यंत धावत सुटले, अशी आख्यायिका आहे. वारकरी तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून येथून धावतात. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक येथील टेकडीवर गर्दी केली होती. सायंकाळी ४.३० वाजता चोपदारांनी अश्‍वानंतर एक एक दिंडी सोडण्यास प्रारंभ केला.

भारूडानंतर सायंकाळी साडेपाच वाजता सोहळा वेळापूर मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी सव्वा सहा वाजता सोहळा ज्ञानेश्‍वर महाराज पालखी तळावर पोहोचला. समाज आरतीनंतर सोहळा वेळापूर मुक्कामी विसावला.

मंगळवारी सकाळी ठाकूरबुवा येथे गोल रिंगण, तोंडले येथे नंदाच्या ओढ्यावर दुपारचा विसावा घेऊन संत ज्ञानदेव, संत सोपानकाका या दोन बंधूंच्या भेटीच्या सोहळ्यानंतर पालखी सोहळा पिराची कुरोली येथे पंढरपूर तालुक्यात प्रवेश करेल व भंडीशेगाव मुक्कामी पोहोचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणीची कृष्णेत उडी

$
0
0

सांगली :

शहरातील आयर्विन पुलावरून एकोणीस वर्षीय तरुणीने कृष्णा नदीत उडी घेतल्याने अनेकांची धावपळ उडाली आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली असून, रात्री उशीरापर्यंत शोधकार्य सुरू होते. साखर कारखाना परिसरातील तरुणी आयर्विन पुलाजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास आली होती. त्यावेळी तिने तिच्याजवळील मोबाइल पाण्याच्या पाइपलाइनवर ठेवला आणि नदीत उडी घेतली. हा प्रकार एका महिलेने पाहिला. तिला अडविण्याचा प्रयत्न केला परंतु, त्या पूर्वीच तिने उडी घेतली. त्या नंतर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे त्या मुलीचा मोबाइल मिळून आला. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत शोध मोहीम सुरू होती.

.......

कोयनेत मुसळधार पाऊस सुरूच

कराड :

कराड, पाटण तालुक्यांसह कोयना धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरूच असल्यामुळे कोयना धरणातील पाण्याची आवकही दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता संपलेल्या गेल्या चोवीस तासांत कोयना धरणातील पाणीसाठ्यात सहा टीएमसीने वाढ झाली आहे. शिवसागर जलाशयात ५०,५६५ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. कोयनानगर येथे गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक १३९, नवजा ११६५ व महाबळेश्वर येथे १२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, कोयना विभागात गेले तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोयना-तोरणे गावा दरम्यानच्या मार्गावरती सोमवारी दरड कोसळल्याने तोरणे गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. कराड परिसरातही सोमवारी संततधार कायम राहिल्याने येथील कोयना नदीला पूर आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी नदी पात्राबाहेर येऊन शेतातील पिकांत घुसले आहे. संततधार पावसामुळे येथील महामार्गाकडेच्या सेवा रस्त्यांवर पाणी साचल्याने या रस्त्यावरून वाहन चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रहार’चे शोले स्टाईल आंदोलन

$
0
0

'प्रहार'चे शोले स्टाईल आंदोलन

सोलापूर :

सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या चौदा महिन्यांपासून पगार थकीत आहेत. या थकीत पगाराविरोधात परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून सोलापुरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. या कर्मचाऱ्यांना त्यांचा थकलेला पगार दिला नाही तर आम्ही पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही, अशी भूमिका कर्मचारी आणि प्रहार संघटनेने घेतली आहे.

परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या अकरा दिवसांपासून थकीत पगाराविरोधात संप सुरू आहे. या पूर्वीही या कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन केले होत. तसेच वेळोवेळी निवेदनही दिले होते. तरीही प्रशासन मूग गिळून गप्प आहे, त्यामुळे प्रहार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकोबांच्या पालखी सोह‌‌‌ळ्याचे माळीनगरमध्ये उभे रिंगण

$
0
0

तुकोबांच्या पालखी सोह‌‌‌ळ्याचे माळीनगरमध्ये उभे रिंगण

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीचे माळीनगर येथे उभे रिंगण झाले. मंगळवारी तुकोबारायांची पालखी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहेत. जगतगुरु संत तुकाराम महराज यांची पालखी अकलूज येथून माळीनगर येथे आली. अत्यंत शिस्तबद्ध रित्या पालखी सोहळयांच्या प्रारंभी असणारा नगारखाना पुढे आला. त्यांच्या पाठोपाठ स्वार असणारा आणि स्वार नसणारा अश्व आला. या वेळी या सोहळयात असणाऱ्या दिंडया या रस्त्याच्या दुतर्फा विभागल्या गेल्या. संत तुकोबारायांचा रथासाठी आणि तुकोबांच्या अश्वांसाठी पायघड्या घालण्यात आल्या. त्या नंतर चोपदारांचा इशारा झाला. सुरूवातीला स्वार नसणाऱ्या तुकोबारायांच्या अश्वाने उभ्या रिंगणामधे धावण्यास सुरूवात केली. त्या नंतर स्वारधारी पताका घेतलेल्या अश्वांनी रिंगणामधे धावायला प्रारंभ केला. अगदी काही क्षणामधे दोन्हीही अश्व संत तुकाराम महाराजांच्या रथाजवळ गेले. या वेळी दोन्हीही अश्वांनी तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतले. मानकऱ्यांनी त्यांच्या गळयामधे पुष्पहार अर्पण केले. त्या नंतर परत एकदा अश्व उभ्या रिंगणामधून नगारखान्यांकडे धावले. रिंगण सोहळ्यानंतर पालखी माळीनगरच्या मॉडर्न हायस्कूलच्या मैदानावर विसाव्यासाठी थांबली. सोमवारी सायंकाळी तुकोबांची पालखीने बोरगाव येथे मुक्काम केला. मंगळवारी तुकोबारायांची पालखी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात संततधार सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर, परिसर, जिल्ह्यात सोमवारी दिवसभर झालेल्या धुवाँधार पावसाने ४१ बंधारे पाण्याखाली गेले. पंचगंगेसह सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. परिणामी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बंधाऱ्यावर पाणी येणे, दरड पडणे, रस्ता खचणे अशा विविध कारणांमुळे आठ गावजोड रस्ते बंद झाले आहेत. ओढे, नालेही भरून वाहू लागले आहेत. कोदे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला. परिणामी पाण्याखाली जाणाऱ्या बंधाऱ्यांचीही संख्या वाढली. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, सरकारी कोदे, खडक कोगे, 'तुळशी'वरील बीड, 'कासारी'वरील करंजफेण, काटे, पेंडाखळे, वालोली, ठाणे, आवळे, पुनाळ, तिरपण, यवलूज, दूधगंगेवरील सुळकूड, सिद्धनेर्ली, दत्तवाड, वेदगंगेवरील वाघापूर, निळपण, कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली, हिरण्यकेशीवरील ऐनापूर, साळगाव, निलजी, नांगनूर, धामणीवरील सुळे, आंबर्डे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

करवीर तालुक्यातील कुडित्रे, कोगे, देवाळे, दिंडनेर्ली, कागल तालुक्यातील नंदगाव, बिद्री, सावर्डे, केनवडे, गोरंबे, आनूर, बस्तवडे, हमीदवाडा, अर्जुनवाडा, नंद्याळ, गडहिंग्लज तालुक्यातील निलजी, नूल, येणेचवंडी, नंदनवाड, आजऱ्यामधील देवकांडगाव, कोरीवडे, पेरनोली, साळगाव, चंदगडमधील गुडवळे, खामदळे, हेरे, कोळींद्रे, शिपूर, नांदवडे या गावांना जोडणारे रस्ते बंद झाले आहेत. सोमवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या चोवीस तासात गगनबावडा, राधानगरी, चंदगड तालुक्यातील अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात एकूण ६४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माझ्या निवडणुकीची काळजी इतरांनी करू नये’

$
0
0

अरुण डोंगळे यांचा सिंगल फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पण त्याचबरोबर आमचे नेते महादेवराव महाडिक यांचे पुत्र आमदार अमल महाडिकही निवडणूक लढवणार आहेत. लोकशाहीत आपले मत मांडण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा सर्वांनाच हक्क असतो. मी लढवणाऱ्या निवडणुकीची काळजी नेत्यांनी करु नये', असा टोला 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांनी नाव न घेता महाडिक यांना लगावला .

गोकुळ मल्टिस्टेट करण्याच्या निर्णयाला डोंगळे यांनी विरोध केला असून प्रसंगी संचालक पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेवर महादेवराव महाडिक यांनी,विधानसभा निवडणूक लढवायची असल्याने डोंगळे मल्टिस्टेटला विरोध करत आहेत. त्यांना १५ हजारपेक्षा जास्त मते पडणार नाहीत, अशी टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर डोंगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा हक्क आहे. संचालक मंडळाच्या बैठकीतही मी माझी भावना बोलून दाखवली आहे. माझा मल्टिस्टेटला विरोध नाही. पण दूध उत्पादक, डेअरीचे संचालक, सचिव, ग्राहक, गोकुळच्या कर्मचाऱ्यांचा मल्टिस्टेटला विरोध आहे. हे घटक जर गोकुळपासून लांब गेले तर त्याचे परिणाम संघाला भोगावे लागतील. लोकशाहीत जर सर्व घटकांचा विरोध असेल तर नेत्यांनीही मल्टिस्टेटचा हट्ट सोडला पाहिजे. या निर्णयाचा पुनर्विचार झाला पाहिजे असे माझे मत आहे.'

डोंगळे म्हणाले,' गेल्या तीन वर्षात गोकुळच्या सभा एक ते पाच मिनिटात गुंडाळण्यात आल्या. आम्ही दूध उत्पादकांना मल्टिस्टेटचे फायदे पटवून देण्यास कमी पडलो आहे. लोकशाहीत दूध उत्पादक आणि दूध संस्थांची भूमिका आम्ही ऐकून घेतली पाहिजे. गोकुळशी संबधित सर्व घटकांचा विरोध असेल तर याचा विचार नेत्यांनी करणे गरजेचे आहे. निवडणुका येतील व जातील. पण संघाचे वैभव कायम टिकले पाहिजे.'

...

संचालक जिल्ह्याबाहेर

गोकुळचे संचालक बेंगळूर येथे अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. अभ्यास दौरा करुन संचालक हैद्राबाद, तिरुपतीसह अन्य ठिकाणी गेले आहेत. ज्येष्ठ संचालकांसह बहुतांशी संचालक जिल्ह्याबाहेर आहेत. मल्टिस्टेटच्या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी सर्व संचालक एकत्रित जमणार होते. पण डोंगळे यांच्या लेटरबॉम्बमुळे बैठक होणार की पुढे ढकलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १० ते १४ जुलै या कालावधीत संचालक मंडळाची बैठक होणार आहे. त्यामध्ये मल्टिस्टेटच्या विषयाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images