Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिवप्रसादचे ध्येय कलेक्टर होण्याचे

$
0
0

मुलांच्या शिक्षणासाठी धुणीभांडी करत आई करतेय धडपड

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ना खासगी शिकवणी, ना वैयक्तिक मार्गदर्शन, दहा बाय बारा फुटाच्या एका खोलीत आई-बहिणीसोबत वास्तव्य. स्वयंपाक खोलीही तीच आणि अभ्याससुद्धा त्याच ठिकाणी. गरीब कुटुंबातील शिवप्रसाद बसय्या मुगडलीमठ या विद्यार्थ्याकडे शिकण्याची मोठी जिद्द आहे. खासगी शिकवणी, वैयक्तिक मार्गदर्शन यापासून कोसो दूर लांब असलेल्या या मुलाने दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविलेल्या, सातवीत शिकत असताना तलाठी, पीएसआय परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या शिवप्रसादला भारतीय प्रशासकीय सेवेत करिअर करायचे आहे. कलेक्टर होण्याचे त्याचे स्वप्न आहे.

शिवप्रसादच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची वाटचाल ही संघर्षमय आहे. बसय्या व गीता हे पती पत्नी, पंधरा सोळा वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी कोल्हापुरात दाखल झाले. राजारामपुरी तसेच खत्री लॉन परिसरात भाड्याच्या खोलीत संसार थाटला. गेली आठ नऊ वर्षे हे कुटुंब नेहरुनगर दत्त मंदिर परिसरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे. शिवप्रसाद सातवीत तर त्याची बहिण गिरिजा चौथीत शिकत असताना वडील बसय्या यांचे निधन झाले.

पतीच्या निधनानंतर कुटुंबांचा सारा भार आई गीता यांच्यावर आला. रहायला भाड्याची खोली, उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. आभाळ कोसळल्यासारखी स्थिती निर्माण झालेली. या कठीण परिस्थितीला धैर्याने सामोरे जात गीता यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ तर केलाच शिवाय त्यांच्या शिक्षणावरही लक्ष केंद्रित केले. आपण शिकलो नाही, मुलांनी शिकावं, नाव कमवावं ही त्यांची आंतरिक इच्छा आहे. धुणीभांडी करुन महिन्याला पाच हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळते. शिवप्रसादचे दहावीचे वर्ष असल्यामुळे त्याच्या शिक्षणाला पैसे कमी पडू नयेत म्हणून त्यांनी संबंध वर्षभर आणखी, तीन चार कुटुंबांत धुणीभांडी केली.

सुट्टीत काम करुन वह्या पुस्तके घेतली

शिवप्रसादला आईच्या कष्टाची जाणीव होती. नववीची परीक्षा संपल्यावर त्याने उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत खासगी नोकरी केली. दोन महिने काम करुन मिळालेल्या पैशातून दहावीची पुस्तके, वह्या घेतल्या. दहावीच्या अभ्यासक्रमाचे नियोजन केले. नियमित अभ्यास,वाचन, लिखाणावर भर असा स्वयंअध्ययनचा पॅटर्न निश्चित केला. रोज सकाळी वाचन, रात्री दहा ते बारा एक वाजेपर्यंत लिखाण आणि नोट्स काढायच्या. काही शंका आल्यास दुसऱ्या दिवशी शाळेतील शिक्षकांकडून निरसन करुन घ्यायचे. महाराष्ट्र हायस्कूलमधील शिक्षकांनी त्याला नेहमीच प्रोत्साहित केले. त्याचे सातवीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या नेहरुनगर विद्यामंदिर येथे झाले. शिष्यवृत्ती परीक्षा, गणित प्राविण्य परीक्षेत यश मिळवत चुणूक दाखवली होती.

……………..

कोट

'मुलाने मोठ्या कष्टात शिक्षण घेतले. परीक्षेत त्याने मिळवलेल्या गुणामुळे ऊर भरुन आला. मुलांनी माझ्या कष्टाचे सार्थक केल्याचे समाधान वाटते. मात्र त्याचवेळी त्याच्या शैक्षणिक भवितव्याविषयी चिंता दाटून राहिलीय. कॉलेजचा खर्च कसा पेलणार, हा मोठा प्रश्न आहे.

गीता मुगडलीमठ, आई

………………………………………….........................

'सायन्स शाखेतून अकरावी, बारावी करायचे आहे. बारावीनंतर इंजिनीअरिंग अभ्यासक्रम शिकणार आहे. खरं सांगायचे तर, भारतीय प्रशासकीय सेवेत मला करिअर करायचे आहे. यूपीएससीची परीक्षा देऊन आयएएस व्हायचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी अभ्यास आणि कष्ट करायची माझी तयारी आहे.

शिवप्रसाद मुगडलीमठ, विद्यार्थी

……………………………….................................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘योजनांच्या खर्चाची प्रशासकीय मंजुरी महिनाअखेरपर्यंत द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्हा वार्षिक योजनेतील विविध योजनांची खर्चाची प्रशासकीय मंजुरी महिनाअखेरपर्यंत द्यावी', असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते.

देवरा म्हणाले, 'प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सौर ऊर्जेची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. समाज कल्याण विभागाने ५० टक्के निधी जुलैअखेरपर्यंत खर्च करावा. वृक्ष लागवड कार्यक्रमातर्गंत लावलेली झाडे किती जिवंत आहेत, त्याचे सर्व्हेक्षण करावे. '

समाज कल्याण निरीक्षक संजय पवार यांनी विशेष घटक योजनेची तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी जलयुक्त‍ शिवार अभियानाची माहिती दिली. विभागीय वन अधिकारी दिपक खाडे यांनी ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत माहिती दिली. महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी राजाराम तलाव येथे मियावॉकीच्या धर्तीवर वृक्षारोपन करण्यात येईल, असे सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, प्रातांधिकारी सचिन इथापे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साळवे टोळीला मोक्का

$
0
0

साळवे टोळीला मोक्का

कराड :

कराड शहर व उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीत मारामारी, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी करणे, असे अनेक गंभीर गुन्हे नोंद असणाऱ्या येथील युवराज साळवे व त्यांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाईच्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी मंजुरी दिली आहे. टोळी प्रमुख युवराज सर्जेराव साळवे, सुरत सर्जेराव पाटील व अन्य तीन अशा पाच जणांच्या टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती येथील पोलिसांनी दिली आहे.

कराड शहर, ग्रामीण व उंब्रज पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार युवराज साळवे याने गुन्हेगारी टोळी निर्माण करून आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी कृत्याद्वारे दहशत निर्माण केल्याने त्याच्या टोळीवरती संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोक्का कारवाईचा प्रस्ताव उंब्रज पोलिसांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या शिफारसीसह कोल्हापूर येथील विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे पाठविला होता. त्यास वारके यांनी मंजुरी दिली आहे.

..........

लाचखोर वाहतूक पोलिस बडतर्फ

कराड :

कोल्हापूर नाक्यावरती प्रवाशांची चढ-उतार करण्यासाठी थांबविण्यात येत असलेल्या प्रवाशी वाहनांवर कारवाई न करण्यासाठी येथील कराड शहर पोलिस ठाण्यातील वाहतूक नियंत्रण शाखेतील दोन वाहतूक पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कारवाईत लाच घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येथील पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केली. पोलिस हवालदार विठ्ठल विष्णू चव्हाण, पोलिस नाईक अभिजीत जनार्दन थोरात, अशी कारवाई करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

..........

पावसाचा जोर कमी

कराड :

कोयना धरण परिसरासह कराड व पाटण तालुक्यांसह जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही मंदावली आहे. सध्या धरणात ८२७३ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणात १८.०१ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माउलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेशला

$
0
0

माउलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेशला

आज रंगणार पहिले गोल रिंगण सदाशिवनगरमध्ये

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

आषाढी वारीसाठी आळंदीतून निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी सकाळी अकरा वाजता सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरी येथे आगमन झाले. माउली...माउलीच्या गगनभेदी गजरात पालखी सोहळ्याचे मोठ्या दिमाखात सोलापूर जिल्ह्यात स्वागत झाले. रविवारी पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सदाशिवनगर येथे नव्याने तयार केलेल्या जागेत होणार आहे. त्या नंतर हा सोहळा माळशिरस मुक्कामी पोहोचेल.

सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामानंतर सोहळा सकाळी साडेसहा वाजता नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. पहाटे सोहळा प्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते माउलींची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. आरतीनंतर पालखी सोहळा धर्मपुरीकडे मार्गस्थ झाला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणात वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने झपझप पडत होती. दिंड्यादिंड्यामध्ये भजनाला रंग भरत होता. सकाळचे काकड्याचे अभंग दिंड्यादिंड्यामधून गायले जात होते. टाळ, मृदुंगाच्या सुरेख साथीने गोड व कर्णमधूर चालीने वातावरण प्रसन्न बनले होते. पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. सकाळच्या न्याहरीसाठी सोहळा सव्वा नऊ वाजता साधु बुवाच्या ओढ्याजवळ पोहोचला. रथातून माउलींची पालखी उतरविण्यात आली. ती असंख्य भाविकांनी खांद्यावर घेवून माउली...माउली नामाचा जयघोष करीत साधु बुवांच्या मंदिरात आणली. साधु बुवांच्या पादुकांवर माउलींच्या पादुका ठेवून तेथे पूजा व आरती करण्यात आली. या वेळी कुंभारगावकरांच्यावतीने अॅड. संपतराव कुंभारगांवकर यांनी प्रवचनाची सेवा केली. सकाळची न्याहरी झाल्यानंतर सकाळी दहा वाजता हा सोहळा धर्मपुरीकडे मार्गस्थ झाला.

सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने माउलींसह वैष्णवांच्या स्वागतासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता. पालकमंत्री विजकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, आमदार रामहरी रूपनवर आदींनी माउलींसह वैष्णवांचे स्वागत करून माउलींचे दर्शन घेतले. त्यानंतर पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. धर्मपुरी कॅनॉल येथे माउलीला दुपारी नैवेद्य दाखविण्यात आला तर वारकऱ्यांनी दुपारचे भोजन घेतले.

बरड मुक्कामानंतर शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या दर्शनासाठी गेलेले हजारो वारकरी शिंगणापूर फाटा येथे सोहळ्यात पुन्हा सहभागी झाले. शिव व विष्णू हे एकच आहेत. त्याची महती सांगणारे अभंग दिंड्यादिंड्यामधून गायले जात होते. शिंगणापूर फाटा येथे सायंकाळचा विसावा घेऊन सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी नातेपुते ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. सायंकाळी सहा वाजता हा सोहळा पालखी तळावर पोहोचला. समाज आरतीनंतर हा सोहळा नातेपुते मुक्कामी विसावला.

आज गोल रिंगण

श्री ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज सदाशिवनगर येथील पुरंदावडे हद्दीतील नवीन जागेत होणार आहे. या रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. रिंगण सोहळ्यानंतर हा सोहळा माळशिरस मुक्कामी पोहोचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माउलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

$
0
0

सदाशिवनगरमध्ये आज रंगणार पहिले गोल रिंगण

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

आषाढी वारीसाठी आळंदीतून निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी सकाळी अकरा वाजता सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरी येथे आगमन झाले. माउली...माउलीच्या गगनभेदी गजरात पालखी सोहळ्याचे मोठ्या दिमाखात सोलापूर जिल्ह्यात स्वागत झाले. रविवारी पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सदाशिवनगर येथे नव्याने तयार केलेल्या जागेत होणार आहे. त्या नंतर हा सोहळा माळशिरस मुक्कामी पोहोचेल.

सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामानंतर सोहळा सकाळी साडेसहा वाजता नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. पहाटे सोहळा प्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते माउलींची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. आरतीनंतर पालखी सोहळा धर्मपुरीकडे मार्गस्थ झाला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणात वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने झपझप पडत होती. दिंड्यादिंड्यामध्ये भजनाला रंग भरत होता. सकाळचे काकड्याचे अभंग दिंड्यादिंड्यामधून गायले जात होते. टाळ, मृदुंगाच्या सुरेख साथीने गोड व कर्णमधूर चालीने वातावरण प्रसन्न बनले होते. पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. सकाळच्या न्याहरीसाठी सोहळा सव्वा नऊ वाजता साधु बुवाच्या ओढ्याजवळ पोहोचला. रथातून माउलींची पालखी उतरविण्यात आली. ती असंख्य भाविकांनी खांद्यावर घेवून माउली...माउली नामाचा जयघोष करीत साधु बुवांच्या मंदिरात आणली. साधु बुवांच्या पादुकांवर माउलींच्या पादुका ठेवून तेथे पूजा व आरती करण्यात आली. या वेळी कुंभारगावकरांच्यावतीने अॅड. संपतराव कुंभारगांवकर यांनी प्रवचनाची सेवा केली. सकाळची न्याहरी झाल्यानंतर सकाळी दहा वाजता हा सोहळा धर्मपुरीकडे मार्गस्थ झाला.

.........................

सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने माउलींसह वैष्णवांच्या स्वागतासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता. पालकमंत्री विजकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, आमदार रामहरी रूपनवर आदींनी माउलींसह वैष्णवांचे स्वागत करून माउलींचे दर्शन घेतले. त्यानंतर पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. धर्मपुरी कॅनॉल येथे माउलीला दुपारी नैवेद्य दाखविण्यात आला तर वारकऱ्यांनी दुपारचे भोजन घेतले.

बरड मुक्कामानंतर शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या दर्शनासाठी गेलेले हजारो वारकरी शिंगणापूर फाटा येथे सोहळ्यात पुन्हा सहभागी झाले. शिव व विष्णू हे एकच आहेत. त्याची महती सांगणारे अभंग दिंड्यादिंड्यामधून गायले जात होते. शिंगणापूर फाटा येथे सायंकाळचा विसावा घेऊन सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी नातेपुते ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. सायंकाळी सहा वाजता हा सोहळा पालखी तळावर पोहोचला. समाज आरतीनंतर हा सोहळा नातेपुते मुक्कामी विसावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजय भांबळे

शिवाजी पूलावर वॉकिंग म्युझियम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पुलाचे जतन व संवर्धन करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. लाइट अँड साऊंड शो, वॉकिंग म्युझियमद्वारे कोल्हापूरच्या संस्कृतीची ओळख जगाशी करुन देण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.

पर्यायी पूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल अडगळीत पडू नये त्याचे संवर्धन व्हावे, अशी भूमिका 'महाराष्ट्र टाइम्स'ने १२ जून रोजी केली होती. 'मटा'च्या भूमिकेला कोल्हापूरकरांनी पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी दुपारी शिवाजी पुलाला भेट दिली. त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उप जिल्हाधिकारी संजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उप अभियंता संपत आबदार, अर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, विजय गजबर आदी उपस्थित होते.

संभाजीराजे यांनी पुलाची पाहणी करून अधिकारी, अर्किटेक्ट्शी चर्चा केली. 'शिवाजी पूल कोल्हापूरचे चौथे शिवाजी यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर संस्थांनाच्या तिजोरीतून ब्रिटीश रॉयल कंपनीने बनवला आहे,' अशी माहिती संभाजीराजेंनी यावेळी दिली. पहिल्या टप्प्यात पुलाचे संवर्धन करण्याचा सूचना त्यांनी आयुक्तांना केली. त्यासाठी खासदार फंडातील पन्नास लाख ते एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचे अंदाजपत्रक तयार करावे, अशी सूचनाही त्यांनी आयुक्तांना केली.

यावेळी संभाजीराजे म्हणाले, 'परदेशात प्राचीन पुलाचे जतन केले जाते. झेक रिपब्लिकनची राजधानी प्राग येथे प्राचीन पुलाचे सुंदर पद्धतीने जतन केले आहे. शिवाजी पूल हा पुरातन वास्तू असल्याने त्याचे पर्यटन स्थळात रुपांतर करता येते. पुलावर लाइट अॅँड साऊंड शो करता येईल. या शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराराणी, चौथे शिवाजी, राजर्षी शाहू महाराजांचा दैदिप्यमान इतिहास दाखवता येईल. हा शो पंचगंगा घाटावरुन पर्यटकांना पाहता येईल. पण पहिल्या टप्प्यात पुलाची डागडुजी आणि संवर्धन केले जाईल. त्यानंतर पुलावर कोल्हापूरच्या संस्कृतीचे ओळख असलेले कार्यक्रम रोज करता येतील. सामाजिक क्रांती, हरितक्रांतीच इतिहास पुलाच्या परिसरात मांडून वॉकिंग म्युझियम करता येईल.'

यावेळी अर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंग असोसिएशनचे अजय कोराणे, माजी नगरसेवक विनायक फाळके, संजय पवार आदी उपस्थित होते.

कमानीची डागडुजी

पंचगंगा नदीवरील समाधी मंदिराच्या प्रवेशद्वार कमानीची डागडुजी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. पण त्यांच्याकडे निधीची कमतरता असल्याने छत्रपती ट्रस्टच्या माध्यमातून कमान उतरवून पुन्हा नव्याने उभारणी करण्याची सूचना श्रीमंत शाहू छत्रपतींनी केली आहे. पावसाळ्यानंतर हे काम हाती घेतले जाईल.

गाळेधारकांचे पुनर्वसन करा

भवानी मंडपातील गाळेधारकांचे पुनर्वसन महानगरपालिकेने करावे, अशी मागणी संभाजीराजेंनी आयुक्ताकडे केली. गाळेधारकांनीही त्यासाठी तयारी दर्शवली असून त्यासाठी आम्ही पुढाकार घ्यायला तयार असे संभाजीराजे यांनी सांगितले. 'भवानी मंडपात १८५७च्या बंडासह कोल्हापूर छत्रपती घराण्याचा इतिहास लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून दाखवला जाईल,' असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण क्षेत्रातील योजनांच्याअंमलबजावणीची साशंकता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी भरीव निधीची घोषणा केली. उच्च शिक्षण संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली. राष्ट्रीय संशोधन संस्थेची स्थापना, ऑनलाइन अभ्यासक्रमांना चालना या गोष्टी शिक्षण क्षेत्रासाठी दिलासादायक आहेत. मात्र, वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या अंमलबजावणीविषयी साशंकता आहे. सरकारी पातळीवर घोषणा उदंड होतात, मात्र नियोजनाच्या पातळीवर कृतिशील कार्यक्रमांचा अभाव आढळत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

देशभरातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता, संशोधन याविषयी नेहमीच चर्चा होते. जागतिक पातळीवरील विद्यापीठाच्या अव्वल क्रमांकात देशभरातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. विद्यापीठस्तरीय शिक्षणातील संशोधन आणि त्याची उपयुक्तता याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उच्च शिक्षणाची गुणवत्ता, कृषी महाविद्यालयातील संशोधन हा सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने, शालेय स्तरापासूनच शिक्षण स्तर उंचाविण्यावर भर दिल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. राष्ट्रीय संशोधन संस्थेद्वारे वेगवेगळ्या पद्धतीच्या संशोधनाला चालना, नाविन्य व वैशिष्ट्यपूर्ण शोधप्रबंधासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली. संशोधनावर फोकस ठेवण्याचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. सरकारने, शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन, संशोधनाला चालना, परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी योजनांचा समावेश असल्यामुळे अपेक्षा उंचावल्या आहेत.

विद्यापीठ व महाविद्यालयातील संशोधनाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदीची आवश्यकता होती. युजीसीकडून गेल्या पाच वर्षात प्राध्यापकांन संशोधन प्रकल्प व महाविद्यालयाच्या विकासासाठी निधी मिळाला नाही. केंद्राने आखलेल्या शैक्षणिक धोरणाचे लाभ ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत.

- प्राचार्य मंगलकुमार पाटील

अर्थसंकल्पात प्राथमिक शिक्षणासाठी मोठी तरतूद केली असती तर सामान्यांच्या हिताचे ठरले असते. मात्र सरकारने प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सामान्य मुलांच्या शिक्षणासाठी काही केले नाही. प्राथमिक स्तरावरील शाळा टिकाव्यात, त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात. मात्र, सरकारी पातळीवर प्राथमिक शिक्षणाविषयी अनास्था आहे.

- प्रभाकर आरडे, राष्ट्रीय अध्यक्ष, एआयएफईटीओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेण्णा तलाव भरून वाहिला

$
0
0

वेण्णा तलाव भरून वाहिला

सातारा :

महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस कोसळत असून, आठवड्याभरात झालेल्या धुवॉंधार पावसामुळे वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. वेण्णा तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. सांडव्यावरून वाहणाऱ्या जलधारांचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळत आहे. त्याचा आनंद स्थानिकांसह येथे फिरवायला आलेल्या पर्यटकांनी घेतला. यंदा मान्सून पावसाचे उशिरा आगमन झाले. जून महिन्याचे पहिले दोन आठवडे अगदी कोरडेच गेले. मात्र त्यानंतर दमदार आगमन होऊन २७ जूनपासून पाऊस सुरू झाला. हवामान खात्याच्या नोंदीनुसार आजपर्यंत एकूण १३३९.३ मी. मी. पाऊस झाला आहे. मागील आठवडाभर येथे सुरू असलेल्या संततधारेमुळे नौका विहारासाठी प्रसिद्ध असलेल्या तसेच महाबळेश्वरसह पाचगणी या दोन पर्यटनस्थळास पाणीपुरवठा करणाऱ्या वेण्णा तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत होती आणि रविवारी सकाळी वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल, डिझेल दरवाढीने महागाईला निमंत्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर दोन रुपयांचा सेस वाढवला असला तरी, प्रत्यक्षात मात्र सुमारे अडीच रुपयांची दरवाढ झाली. तातडीने शनिवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. इंधन दरात अनपेक्षितपणे झालेली वाढ महागाई वाढवण्यास कारणीभूत ठरणार आहे.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया आणि आंतरराष्ट्रीय ट्रेड वॉरमुळे गेली दोन वर्ष पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८० ते ९० रुपयांदरम्यान होते. इंधनाचे दर आवाक्यात राहावेत, यासाठी केंद्र व राज्य सरकारने करांचा बोजा कमी करावा, अशी मागणी केली जात होती. मात्र, यातून फारसा दिलासा मिळाला नाही. गेली चार-पाच महिने इंधन दर किंचित स्थिर होते. इंधन दर आणखी कमी होतील अशी नागरिकांना अपेक्षा होती. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने मात्र नागरिकांना दिलासा देण्याऐवजी इंधन दरवाढीचा धक्का दिला. पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क आणि रस्ते अधिभारात प्रत्येकी एक रुपयांची वाढ केली. प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ जाहीर झाली असली तरी, राज्याच्या अन्य करांसहीत अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी पेट्रोलच्या दरात दोन रुपये ४० पैशांची वाढ झाली, तर डिझेलच्या दरात दोन रुपये ४४ पैशांची वाढ झाली.

इंधन दरवाढीमुळे रोज थेट सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण वाढला आहे. वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होणार आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एसटी, रेल्वे यासह रिक्षाभाडे, स्कूल बसचे भाडे वाढू शकते. माल वाहतूक महागल्याने अन्नधान्याचेही दर वाढू शकतात. विशेष म्हणजे इंधन दरात कपात झाली तरी वाढलेले अन्नधान्य व वाहतूक व्यवस्थेचे दर कमी होत नाहीत. दैनंदिन गरजेच्या सर्वच वस्तू महागण्याचे संकेत मिळत आहेत. याचा फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे. इंधन दरवाढीचा परिणाम उद्योगांनाही सहन करावा लागणार आहे. यामुळे राज्य सरकारने इंधनावरील करांचा बोजा कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सोने एक हजाराने महागले

सोन्यावरील आयात शुल्क अडीच टक्क्यांनी वाढवल्याने प्रति दहा ग्रॅम किमान एक हजार रुपयांची वाढ झाली. तातडीने या दराची अंमलबजावणी सुरू झाली. शुक्रवारी कोल्हापुरात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ३५ हजार रुपये होता. शनिवारी हा दर ३५९०० रुपये झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू राहिल्यास यात आणखी वाढ होऊ शकते.

पेट्रोल आणि डिझेलचे दर मुळातच परवडणारे नाहीत. यात आणखी अडीच रुपयांची वाढ केल्याने वाहतूकदारांचे नियोजन कोलमडले. यामुळे महागाईची झळ सोसावी लागणार आहे. इंधन दरवाढीविरोधात लवकरच वाहनधारकांना रस्त्यावर उतरावे लागेल.

- सुभाष जाधव, अध्यक्ष, लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन

सरकारने चुकीच्या वेळी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. याचा परिणाम महागाई वाढण्यावर होणार. उद्योगांनाही याचा मोठा फटका बसू शकतो. इंधनाला पर्याय नसल्याने सरकारने अन्य कर कमी करून ग्राहकांना दिलासा द्यावा.

- सागर पाटील, वाहनधारक

इंधन दर

शुक्रवारी

पेट्रोल - ७६.२२

डिझेल - ६६.४७

शनिवारी -

पेट्रोल - ७८.६२

डिझेल - ६८.९१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅकर्सकडून दोघांना ऑनलाइन गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँक खात्याचे डिटेल्स आणि गुगल पे अकाउंटवरील माहिती घेऊन हॅकर्सनी दोघाजणांच्या बँक खात्यांवरुन परस्पर २३ हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका अज्ञातासह संशयित पियुष रामचंद्र रेणुसे (रा. उत्तरप्रदेश) यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या हॅकरचा सायबर पोलिसांकडून शोध सुरू आहे. यापैकी एका प्रकरणात 'ओएलएक्स'वरील एक प्रॉडक्ट आवडल्याचे सांगत 'गुगल पे' अकाउंटची माहिती घेऊन फसवणूक झाली आहे.

जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले की, अभिजीत भिमगोंडाभिक्काप्पा पाटील (२९, रा. नाळे, कॉलनी, संभाजीनगर, मूळ गाव सुळकूड, ता. कागल) यांच्या फोनवर एका व्यक्तीने हिंदीतून संवाद साधला. त्याने पेमेंट कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून बँक खात्याची डिटेल्स घेतली. त्यानंतर काही सेकंदात खात्यामधून १८ हजार २३० रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. ही रक्कम कपात झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाइलवर आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात एका महिलेची फसवणूक झाली. फिर्यादी रेवती राजेश देवलापूरकर (वय ४३, रा. गुरु महाराजनगरी, ध्यानचंद हॉकी स्टेडियम परिसर) यांनी 'ओएलएक्स' अ‍ॅपवर टाकलेल्या जाहिरातीला प्रतिसाद देऊन संशयित पियुष रेणुसे (रा. उत्तरप्रदेश) याने फोन करुन 'आपले प्रोडक्ट आवडले आहे. ते मी घेण्यास तयार आहे. तुमचा गुगल पे अकाउंट नंबर पाठवा आणि तुम्ही ऑनलाइन रहा' असे सांगितले. काही वेळाने त्याने तुमच्या अकाउंटवर पाच हजार रुपये पाठविले आहेत, ते तुम्ही स्वीकारा अशी विनंती करीत रिक्वेस्ट पाठविली. ती देवलापूरकर यांनी स्वीकारली. काही वेळातच त्यांच्या मुलाच्या एसबीआय बँकेच्या उद्यमनगर शाखेतील बचत खात्यातून पाच हजार रुपये परस्पर काढल्याचे निदर्शनास आले.

००००

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँक खात्याचे डिटेल्स आणि गुगल अ‍ॅपवर टाकलेली जाहिरातीचे प्रोडक्ट आवडल्याचे सांगून हॅकर्सने दोघा जणांच्या बँक खात्यावरुन परस्पर २३ हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका अज्ञातासह संशयित पियुष रामचंद्र रेणुसे (रा. उत्तरप्रदेश) यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या हॅकर्सचा शोधासाठी सायबर विभागाकडून सुरु झाला आहे.

जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत भिमगोंडाभिक्काप्पा पाटील (२९, रा. नाळे, कॉलनी, संभाजीनगर, मूळ गाव सुळकुड, ता. कागल) यांच्या फोनवर हॅकर्सने हिंदी भाषेतून संवाद साधला. त्याने पेमेंट कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून बँक खात्याची डिटेल्स घेतली. त्यानंतर काही सेकंदात खात्यामधून १८ हजार २३० रुपये कपात झाली. ही रक्कम कपात झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाइलवर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दरम्यान दुसऱ्या प्रकरणात एका महिलेची फसवणूक झाली. फिर्यादी रेवती राजेश देवलापुरकर (वय ४३, रा. गुरु महाराजनगरी, ध्यानचंद हॉकी स्टेडियम परिसर) यांनी ओएलएक्स अ‍ॅपवर टाकलेल्या जाहिरातीला प्रतिसाद देवून संशयित पियुष रेणुसे (रा. उत्तरप्रदेश) याने फोन करुन 'आपले प्रोडक्ट आवडले आहे, मी घेणेस तयार आहे', मला आपला गुगल अकाउंट नंबर पाठवा व तुम्ही ऑनलाइन रहा, असे सांगितले. काही वेळाने त्याने तुमच्या अकाउंटवर पाच हजार रुपये पाठविले आहेत, ते तुम्ही स्विकारा अशी विनंती करीत रिक्वेस्ट पाठविली ती देवलापूरकर यांनी स्विकारली. काही वेळातच त्यांच्या मुलाच्या एसबीआय बँकेच्या उद्यमनगर शाखेतील बचत खात्यातून पाच हजार रुपये परस्पर काढल्याचे निदर्शनास आले. तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिरो बजेट शेतीतून दुप्पट उत्पादन अशक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रासायनिक खते आणि किटकनाशकाच्या वापराने जमिनीचा पोत बिघडून उत्पादन घटत असल्याने सेंद्रिय शेतीसाठी अनेकजण प्रयत्न करतात. त्याच धर्तीवर केंद्र सरकारने झिरो बजेट शेतीला प्राधान्य देताना शेतीवरील खर्च कमी करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला. मात्र झिरो बजेट किंवा सेंद्रिय शेतीद्वारे शाश्वत उत्पादन मिळत नसल्याने २०२२पर्यंत शेतकऱ्यांचा उत्पन्न कसे दुप्पट होणार असा प्रश्न आहे.

सेंद्रिय किंवा झिरो बजेट शेतीच्या माध्यमातून जमिनीची सुपिकता वाढत असली तरी उत्पादकता वाढत नाही. गेल्या काही वर्षात रासायनिक खताचे दु:ष्परिणाम समोर आल्यानंतर शेतकऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर झिरो बजेट शेतीसाठी प्रयत्न केले. त्याद्वारे शेतीचा खर्च कमी झाला तरी, उत्पादनात मात्र घट झाली. परिणामी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी अपरिहार्यपणे रासायनिक व यांत्रिकीकरण शेतीला प्राधान्य द्यावे लागते. जमिनीची सुपिकता जेवढी महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे उत्पादनही भरघोस होण्याची आवश्यकता आहे. पण केवळ झिरो बजेट शेतीला पुरस्कार केल्यास केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेला खीळ बसेल.

शेती प्रक्रिया उद्योगाला चालना देवून उत्पादन वाढवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी केंद्र व राज्य सरकारने प्रक्रिया उद्योगांसाठी प्रस्ताव मागवले. पण अद्याप या प्रस्तावांना मान्यता मिळालेली नाही. एका कोल्हापूर जिल्ह्यातून १३० प्रस्ताव कृषी आयुक्तालयात धूळ खात पडले आहेत. अशीच स्थिती पीक विम्याबाबत दिसून येते. अर्थसंकल्पामध्ये पीक विम्यासाठी ९७५ कोटींची तरतूद केली. मात्र विमा भरपाईसाठी कंपन्यांनी लादलेल्या अटींमुळे पीक विमा योजना शेतकऱ्यांना कधीही फलदायी ठरलेली नाही.

२०१५ मध्ये तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्यानंतर तूरडाळीची लागवडीसाठी केंद्र सरकारने आवाहन केले. संपूर्ण देशात तूरडाळीचे बंपर उत्पादन होऊन दरात मोठी घट झाली. त्याचा फटका उत्पादकांना बसला. हमीभावाने तूरडाळ खरेदी करण्यासाठी उशीरा केंद्रे सुरू केली. पर्यायाने उत्पादकांनी मिळेल त्या भावात विक्री केली. एखाद्या कृषी उत्पादनासाठी आवाहन केल्यानंतर त्याची खरेदी करण्याची जबाबदारीही असते. या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याने कोट्यवधींचा फटका बसला. महागाईचा आलेख सातत्याने वाढत असताना गेल्या दोन वर्षांत रासायनिक खत्यांच्या किंमती सरासरी टनामागे सरासरी १२०० ते १३०० रुपयांनी वाढ झाली. मात्र, हमीभावामध्ये अवघी ५५० ते ५६० रुपयांची वाढ केली. हमीभावासाठी एक हजार कोटींची तरतूद केली असली, तरी यातून शेतकऱ्यांना समाधानकारक हमीभाव मिळेल अशी कोणतीच शाश्वती नाही.

'देश स्वतंत्र झाल्यापासून शेतकरी आशाळभूत नजरेने अर्थसंकल्पाकडे पाहतो. पण दरवर्षीप्रमाणे याही अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला निराशाच आली. कृषीप्रधान देश अशी ओळख असलेल्या देशात साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून अद्यापही त्या सुरू आहेत. या आत्महत्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे होत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढत आहे. बोजा कमी करण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा देण्याची आवश्यकता होती. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद दिसत नाही. शेतीचा जसा आर्थिक विकासदर घटत आहे. तसेच भांडवली तूटसुद्धा दिसून येते. या अर्थसंकल्पाची गणना 'शोषण थांबेना, पोट भरेना' अशीच करावी लागेल.

- प्रा. जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी पक्ष

'शेतकरी नैसर्गिक शेती करत आला आहे, तरीही त्यांना पोटभर अन्न मिळत नव्हते. झिरो बजेट शेतीद्वारे पुरेसे अन्नधान्य उत्पादन होणार नाही. उत्पादन खर्च कमी करा, शेती परवडेल असे अर्थसंकल्पाद्वारे सूचित करुन सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. एकीकडे दुप्पट उत्पादनाचा घोषा करतानाच झिरो बजेट शेती पुरस्कार हे परस्पर विरोधी आहे. शेतीमाल पणनच्या मूलभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पामध्ये कोणतीही तरतूद नाही. अनेकवेळा शेतीमाल शीतगृहे, शीतवाहने, गोदामे नसल्याने खराब होऊन नुकसान होते, त्यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत. एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात शेतीचा वाटा बारा टक्के आहे. तर सर्वात जास्त रोजगार शेतीत मिळतो. ६० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. व्यस्त प्रमाणामुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भाग गरीब, कर्जबाजारी, मागासलेला राहिला आहे. त्याकडे आताही दुर्लक्ष केले आहे.

- संजय कोले, शेतकरी संघटना

पॉइंटर

- शेतकरी सन्मान योजनेपासून लाभार्थी वंचित

- पीक विमा योजनांचा लाभ विमा कंपन्यांना अधिक

- हमीभावात नगण्य वाढ

- पीक विमा परतफेड अनुदानाची वर्षानवर्षे प्रतीक्षा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड आणि पाटण तालुक्यामध्ये शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने कोयना धरणातील शिवसागर जलाशयाची पाणि पातळीत झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत २.६७ टीएमसी पाण्याची आवक झाली असून, सध्या धरणात २०.८३ टीएमसी समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, कराड शहरासह परिसरातही शनिवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी, टोकणीच्या कामांना वेग आला आहे.

पाटण तालुक्याच्या विविध भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. शनिवारी सहा जुलै रोजी कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने धरणाच्या पाणि पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाटण तालुक्यातील कोयना धरणासह तालुक्याच्या विविध धरणाचे परिसरात समाधानकारक पाऊस पडत होता. बुधवार व गुरुवारपासून पाऊस कमी झाला होता, त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत होणारी वाढ मंदावली होती. मात्र, दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पुन्हा पावसाने दमदार सुरवात केली आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोयना, केरा, मोरणा काजळी, उत्तरमांड या नद्याच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

कोयना धरण परिसरात शनिवारी सायंकाळी पाच वाजता संपलेल्या २४ तासात कोयना २३८, नवजा २७६ तर महाबळेश्वरमध्ये १६९ मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १५७४४ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे.

पाटण बस स्थानकात पाणी शिरले

पाटण शहरासह पाटण तालुक्याच्या विविध भागात गेले दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, या पावसाने पाटण शहरातील नवीन बसस्थानक परिसरात असणाऱ्या दुकानात गुडघाभर पाणी शिरले होते. सुमारे पाच तास दुकानांत पाणी होते. लुगडेवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने काहीकाळ वाहतूक बंद होती.

सडा-वाघापूरचा रिव्हर्स वॉटर फॉल

पाटण तालुक्यातील सडा-वाघापूर येथील प्रसिद्ध उलटा धबधबा सुरू झाला आहे. पावसामुळे पाण्याचे उलटे फवारे उडत आहेत. शनिवारी परिसरातील लोकांनी धबधबा पाहण्यासाठी धाव घेतली. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पाण्याचे उलटे तुषार आणखी उंच जावून पर्यटकांना या धबधब्याचे विहंगमय दृश्य पहावयास मिळणार आहे. साधारण आणखी आठ दिवसांनंतर येथे पर्यटकांची गर्दी वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मल्टिस्टेट’ विरोधात डोंगळेंचे बंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या निर्णयाला माजी अध्यक्ष आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी विरोध केला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी गोकुळ संचालकपदाचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी दिला. 'गोकुळचे खरेखुरे आधारवड आनंदराव पाटील यांच्यासारखे विश्वासू नेते राहिले नाहीत,' असा घरचा आहेरही त्यांनी नेत्यांना दिला. गेल्या तीन वार्षिक सर्वसाधारण सभा सुरळीत चालवल्या नाहीत. त्या प्रश्नोत्तराशिवाय गुंडाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी पत्रकात केला आहे.

अरुण डोंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून 'मल्टिस्टेट'च्या निर्णयाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. 'गोकुळच्या कक्षा रुंदावण्याच्यादृष्टीने दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय योग्य होता. पण, सहकारात काही निर्णय लोकभावनेचा आदर करूनच घ्यावे लागते. मल्टिस्टेटचे महत्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यात संचालक मंडळ आणि गोकुळचे नेते कमी पडले, असे सर्वसामान्यांचे मत आहे. ही बाब नेत्यांच्या लक्षात आणून दिली आहे. संचालक मंडळासह पक्षीय बैठक घेऊन गोकुळ मल्टिस्टेट करावे की नाही, याचा पुनर्विचार व्हावा. गोकुळचा कारभार आणि प्रगती उत्तम असूनही गेल्या तीन वार्षिक सर्वसाधारण सभा सुरळीत चालवल्या नाहीत. त्या प्रश्नोत्तराशिवाय गुंडाळण्यात आल्या. त्यामुळे विरोधक संतापले आणि संघाशी एकनिष्ठ असलेल्या सभासदांत नाराजी पसरली आहे. ज्यांनी मल्टिस्टेटला सभेत पाठिंबा दिला, तेही आज आतून मल्टिस्टेटला विरोध करत आहेत. गोकुळचे आधारवड दिवंगत आनंदराव पाटील यांनी मल्टिस्टेटला पाठिंबा द्या असे आवाहन केले असते तरी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन विरोधकही या निर्णयाच्या बाजूने राहिले असते. पण आज त्यांच्यासारखे विश्वासू नेते संघासाठी राहिले नाहीत, असे बोलले जाते' असे पत्रकात म्हटले आहे.

'दूध उत्पादक, डेअरीचे संचालक, सचिव, कर्मचारी, अधिकारी यांच्याबरोबर गोकुळचा जो ग्राहक आहे त्याला मल्टिस्टेटचे महत्व पटवून देण्याची गरज होती. त्यामुळे जनमानसात मल्टिस्टेट विरोधात प्रक्षोभ दिसत आहे. दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा पुनर्विचार होण्याची गरज आहे. कारण ती जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आहे. आर्थिक उलाढालीत दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत प्रत्येकाचा सहभाग आहे. याचा पक्षीय बैठकीत पुनर्विचार होण्याची गरज आहे. आज आपण लोकभावनेच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गोकुळ संचालकपदाचा राजीनामा द्यावा लागला तरी बेहत्तर, ही माझी या मागची ठाम भूमिका आहे' असे पत्रकात म्हटले आहे.

००००००

गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय जेव्हा घेतला, तेव्हा कधीही डोंगळेनी विरोध केला नाही. आता त्यांनी भूमिका का बदलली हे लक्षात येत नाही. डोंगळेंनी संचालक मंडळाच्या सभेत आणि सर्वसाधारण सभेत विरोध करायला हवा होता. गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय मी आणि पी. एन. पाटील यांनी सर्व संचालकांची मते विचारुन घेतला. गोकुळ मल्टिस्टेट झाला किंवा नाही झाला, याचा संघावर फरक पडत नाही. कारण हा संघ दूध उत्पादकांच्या विश्वासावर प्रगती करत आहे. गोकुळ हा कुणा व्यक्तीचा नसून तो दूध उत्पादकांचा आहे. कर्नाटकातील दूध संकलनासाठी मल्टिस्टेटचा निर्णय घेतला होता.

- महादेवराव महाडिक, माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी समाजकल्याणचा, समन्वय भाजपचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडील दलित वस्ती सुधारणा व अन्य विकासकामांच्या निधी वाटपाच्या नियोजनात तालुका पातळीवर भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षांचा समन्वय राहणार आहे. समाजकल्याणकडे यंदा जिल्ह्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांना निधी वाटप होते. निधी वाटपात भाजप तालुकाध्यक्ष कामे सुचविणार आहेत. यावरून काही सदस्यांनी, आमच्या हक्काच्या निधीवर अतिक्रमण वाढले, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सर्किट हाउस येथे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजप व आघाडी पक्षाच्या सदस्यांची बैठक झाली. कृषी, शिक्षण, समाजकल्याण विभागातील परस्पर निधीवाटपाचा प्रकार खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी कारभाऱ्यांना दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध विकासकामाचा फॉर्म्युला निश्चित झाला. आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, 'म्हाडा'चे अध्यक्ष समरजित घाटगे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

पहिल्यांदा गडहिंग्लजमधील सदस्यांशी मते आजमावून घेतली. त्यापाठोपाठ चंदगड, आजरा, कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील सदस्य भेटले. हातकणंगले, शिरोळपाठोपाठ करवीर तालुक्यातील सदस्य भेटले. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर विकासकामांचे श्रीफळ वाढवून गतीने कामकाज करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी सदस्यांना केल्या. गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे, उपाध्यक्ष सर्जेराव पाटीलयांनी सदस्यांच्या शिष्टमंडळासमवेत पालकमंत्र्यांची भेट घेतली.

००००

अंबरिश घाटगे गैरहजर, आवाडे गट लांबच

शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे बैठकीला गैरहजर होते. गोकुळचे संचालक दौऱ्यावर आहेत, त्यामध्ये घाटगे यांचा समावेश असल्यामुळे ते बैठकीला हजर नव्हते. दरम्यान, काही सदस्यांनी शिक्षण विभागातील कारभाराविषयी तक्रार करण्यासाठी कागदपत्रे, वर्तमानपत्रातील बातम्यांच्या फायली तयार करुन आणल्या होत्या. मात्र, त्यावर चर्चा झाली नाही. आवाडे गटाच्या महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम या अनुपस्थित होत्या. त्यांचे वडील आजारी असल्यामुळे बैठकीला येऊ शकत नसल्याचे त्यांनी कळविले होते. राहुल आवाडेही बैठकीपासून लांबच राहिले. स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्हा परिषदेत सत्ताधारी आघाडीसोबत आहे. 'स्वाभिमानी'चे सदस्य पद्माराणी पाटील, शुभांगी शिंदे या उपस्थित होत्या.

००००

'निधी ब्लॉक'चा आदेश, जनसुराज्यमध्ये अस्वस्थता

शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यांतील सदस्य एकत्रित भेटले. बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे, प्रा. शिवाजी मोरे, शंकर पाटील, शिवसेनेचे हिंदुराव पाटील, राष्ट्रवादीचे विजय बोरगे यांचा समावेश होता. पालकमंत्री पाटील यांनी समाजकल्याण निधी वाटपावरून सदस्यांच्या काही तक्रारी आहेत, परस्पर निधी वाटप करू नका. प्रत्येकाला निधी द्या, अन्यथा समाजकल्याणचा निधी ब्लॉक करू अशी तराटणी 'समाजकल्याण'च्या सभापतींना दिली. महापुरे यांनी निधी वाटपात सुसूत्रता आहे, सर्वांना विश्वासात घेऊन निधी दिल्याचा खुलासा केला. बैठकीदरम्यान जनसुराज्यचे सगळे सदस्य गप्प होते. मात्र बैठकीनंतर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सदस्यांत अस्वस्थता होती.

००००

सत्ताधारी आमदारांसह जि.प. पदाधिकाऱ्यांवर खैरात

जिल्हा नियोजन समितीतून जनसुविधा, नागरी सुविधेसाठी सदस्यांना आठ लाख रुपयांचा निधी मिळायचा, त्या निधीमध्ये दोन लाख रुपयांची कात्री लावत सहा लाखांपर्यंत केला. जनसुविधा, नागरी सुविधेच्या निधीत सत्ताधारी आमदारांना झुकते माप देऊन प्रत्येकी ३५ लाख रुपयांची तरतूद केली. खासदारांना प्रत्येक योजनेसाठी १५, तर विरोधी आमदारांना प्रत्येकी २० लाख रुपये मिळतील. जिल्ह परिषद अध्यक्षांना ५० लाख, उपाध्यक्षांना ३० लाख, समिती सभापती, पक्षप्रतोद, गटनेत्यांना २० तर जिल्हा नियोजन समिती सदस्यांना १० लाख मिळतील. क वर्ग अंतर्गत मंदिर, पर्यटनस्थळासाठी खासदार व सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी १५ लाख, विरोधी आमदारांना १० लाख तर जिल्हा परिषद अध्यक्षांना २५, उपाध्यक्षांना २०, पक्षप्रतोद, गटनेत्यांना लाख मिळतील.डीपीसी सदस्यांना पाच लाख मिळतील.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'एकजूट नसल्याने कोल्हापूरची पीछेहाट'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुरोगामी विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवला. त्यांचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आपण समर्थपणे पेलली का? असा सवाल करत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या कोल्हापूरची एकजूट नसल्याने पीछेहाट झाल्याचे सांगत आपल्यातील त्रुटींबाबत आत्मचिंतन करून विकासासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. भारतीय जन संविधान मंच आणि कोल्हापूर कॉलिंगच्या वतीने 'चांगुलपणाची चळवळ'अंतर्गत आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. रेसिडेन्सी क्लब येथे खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते राष्ट्रीय मानवाअधिकार आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झाल्याबद्दल ज्ञानेश्वर मुळे व श्रमदानातून शहर स्वच्छतेची चळवळ रुजवलेले आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. मुळे म्हणाले, 'जामनगरमध्ये ज्याप्रमाणे ज्यू लोकांना आश्रय दिला. त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धातील निर्वासितांना वळीवडे येथे आश्रय दिला. जामनगरप्रमाणे वळीवडेची ख्याती आंतरराष्ट्रीयपातळीवर पोहोचली नाही. यापुढे मात्र आपल्यातील छोटे-छोटे दुवे जोडून सर्वगुणसंपन्न जिल्हा आदर्शवत जिल्हा बनवला पाहिजे. त्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन कार्यरत असलेल्या व्यक्ती, संस्थांना पाठबळ देण्याची आवश्यकता आहे.' तत्पूर्वी मुळे यांच्या हस्ते जयंती नाला परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पारस ओसवाल यांनी 'चांगुलपणाची चळवळ' विषयाची संकल्पना विशद केली. यावेळी आर्किटेक्ट मोहन वायचळ, प्रा. बी. जी. मांगले, प्राचार्य जी. पी. माळी, राजीव परूळेकर, सुनील बासराणी, किशोर देशपांडे, डॉ. प्रमिला जरग आदी उपस्थित होते. डॉ. शीतल पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबवडेतील लॉजवर छापा, पीडित महिलेची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-मलकापूर रोडवर मिठारवाडी-आंबवडे (ता. पन्हाळा) येथील निसर्ग रेसिडन्सी लॉजिंगवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली. यावेळी लॉज मालकासह तिघांना अटक केली. संशयित मालक अमर अशोक दीपक (वय ३५), व्यवस्थापक अशोक शंकर घाटगे (४५, दोघे रा. पिंपळे तर्फे सातवे, ता. पन्हाळा), एजंट शामराव भगवान शिंदे (५९, रा. आरळे, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून मोटारसायकल, मोबाइल, रोख रक्कम असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी सांगितले की, निसर्ग लॉजिंगवर वेश्या व्यवसाय चालतो, अशी तक्रार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्याकडे आली होती. त्यांनी अनैतिक मानवी वाहतूक विभागाच्या सहायक निरीक्षक प्रियांका शेळके यांना कारवाईचे आदेश दिले. शेळके यांनी पथकासह शुक्रवारी रात्री छापा टाकला असता एक पीडित महिला सापडली. तिला एजंट शामराव शिंदे हा मोटारसायकलवरुन लॉजवर घेऊन येत होता. वेश्या व्यवसायासाठी सुमारे ५०० ते १ हजार रुपयांचा दर आणि हॉटेलचा दर वेगळा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान या लॉजचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे निरीक्षक सावंत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवीर पंचायत समितीसाठी जागेचा शोध सुरू

$
0
0

कोल्हापूर : करवीर पंचायत समितीच्या कार्यालयासाठी जागेचा शोध सुरूच आहे. शाहूपुरी येथील बीटी कॉलेजच्या इमारतीचा काही भाग मिळावा अशी मागणी आहे. भाऊसिंगजी रोडवरील जुन्या कोर्टाची इमारत, पंचायत समितीच्या कार्यालयासाठी मिळावी असाही प्रयत्न करवीर पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासन करत आहेत. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी काही जागा पाहिल्या आहेत. सोमवारी पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. करवीर पंचायत समितीच्या सध्याच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी गळती लागली आहे. कार्यालयात पुरेशा सुविधा नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी भिडे यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

$
0
0

कोल्हापूर : शिव प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. पालकमंत्री पाटील यांची शनिवारी, जिल्हा परिषदेतील भाजप व मित्र पक्ष आघाडीतील सदस्यांसोबत बैठक झाली. सकाळी अकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत ही बैठक झाली. दरम्यान भिडे यांनी सर्किट हाऊस येथे पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली. मात्र या भेटीचा तपशील मिळू शकला नाही. पण त्यांच्या निकटवर्तीयांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरमध्ये पार पडला सर्वांत मोठा रिंगण सोहळा

$
0
0

पंढरपूरः

सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळ्याच्या प्रवेशानंतर सदाशिवनगर येथील रिंगण सर्वांत मोठा सोहळा म्हणून ओळखला जातो. रविवारी खऱ्या अर्थानी हा नयनरम्य रिंगण सोहळा लक्ष लक्ष नेत्रांनी साठवून घेतला.

आसमंत व्यापून टाकणारा टाळमृदुंगाचा नाद व त्यातून निर्माण होणारे माऊलीऽऽ माऊलीऽऽ नामाचे नादब्रह्म या सर्वांचा संगम म्हणजे रिंगण होय. पुरंदावडे गावच्या हद्दीत अश्वांनी नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रिंगण सोहळ्यानंतर माऊली माळशिरस मुक्कामी विसावला. पहाटे भिमराव वाघमारे यांनी कर्णा केला. अवघे वैष्णवजन लगबगीने प्रातःविधी उरकून पालखी तळावर जमा होवू लागले. माऊलींच्या तंबूत सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी माऊलींची नैमित्तिक पूजा केली. ही पूजा सुरू असतानाच टाळाच्या साथीने विणेच्या झंकारीत पहाटेचे अभंग व भूपाळ्या सुरू झाल्या. पवमान पूजा झाल्यानंतर माऊलींची आरती करण्यात आली. माऊलींच्या पादुका माळशिरस मुक्कामासाठी पालखीत विराजमान करण्यात आल्या. माऊली माऊली नामाच्या जयघोषात खांदेकऱ्यांनी लिलया पालखी खांद्यावर घेतली. एक एक दिंड्या क्रमांकाप्रमाणे उभा राहू लागल्या. माऊली रथात विराजमान झाल्यानंतर सकाळी ६.३० वाजता सोहळा माळशिरसकडे मार्गस्थ झाला.

सकाळी थोडावेळ उन्हाचा चटका जाणवला. त्यानंतर मात्र हळूहळू आकाशात ढगांनी गर्दी करायला सुरूवात केली. या सकाळच्या सुखद वातावरणातच वैष्णवांनी पंढरीची वाट धरली. सकाळी ९ वाजता सोहळा मांडवे ओढा येथे पोहोचला. येथे माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला व वारकऱ्यांनी दुपारचे भोजन उरकले. विश्रांतीनंतर दुपारी १ वाजता सोहळा पहिल्या गोल रिंगणासाठी सदाशिवनगर नजीक पुरंदावडे गावच्या हद्दीकडे मार्गस्थ झाला. दुपारी १२.३० वाजता माऊलींचे अश्व तर १ वाजता लाखो वैष्णवांसह माऊलींचा पालखी सोहळा पुरंदावडे येथे पोहोचला. येथे सरपंच देवीदास ढोपे, पांडुरंग सालगुडे यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. रथापुढील २७ तर रथामागील २० अशा सुमारे ४७ दिंड्या रिंगणासाठी रिंगणस्थळी पोहोचल्या. पोलिसांनी चोपदारांच्या मदतीने आखीव रेखीव रिंगण तयार केले होते. रिंगणाच्या मध्यभागी पालखी ठेवण्यासाठी छोटासा मंडप टाकण्यात आला होता. एक प्रदक्षिणा करून अश्वख रिंगणामध्ये आणण्यात आले तर पालखी रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आली.

अश्वांची नेत्रदीपक दौड

माऊलींच्या पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या पद्धतीने माऊलींची पूजा बांधली जाते. रिंगण सोहळा ही एक पूजा आहे. समाजातील सर्व थरातील लोक एकत्र येऊन ही विश्वर माऊलींची पूजा बांधतात. टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष सुरू असतानाच अश्वांचचे रिंगण सुरू होते व या रिंगणाच्या माध्यमातून माऊलींचे विश्वरूप दर्शन वारकऱ्यांना होते. पुरंदावडे येथील हा नेत्रदीपक रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी लाखो भाविक उपस्थित झाले होते. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. कधी पाऊस कोसळेल याचा नेम नव्हता. दुपारी दीड वाजता रिंगण सोहळ्यास सुरूवात झाली. जरीपटक्याच्या भोपळे दिंडीच्या ध्वजाने रिंगणाला २ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर राजाभाऊ, रामभाऊ, बाळासाहेब या चोपदारांनी माऊली व स्वाराच्या अश्वांना रिंगणासाठी सोडले. सुरूवातीला काही वेळ स्वाराचा अश्वच अग्रभागी राहिला. त्यानंतर माऊलींच्या अश्वाजने नेत्रदीपक दौड करीत स्वाराच्या अश्वा‍ला अर्ध्या फेरीतच मागे टाकत तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी माऊलीऽऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करून हा रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठवित सोहळ्याचा आनंद लुटला. या अश्वाला आवरताना सेवकांची मात्र दमछाक झाली. रिंगण सोहळ्यानंतर दिंड्यांमधून हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी हे मैदानी खेळ रंगले. त्यानंतर चोपदारांनी उडीच्या कार्यक्रमासाठी दिंड्यांना निमंत्रित केले. माऊलींना मध्यभागी घेवून या दिंड्यांमध्ये टाळ, मृदुंगाच्या साथीन आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्मचा उडीचा खेळ रंगला. सर्व वारकरी श्वांस रोखून या नादब्रह्मात तल्लीन होऊन गेले होते.

पुरंदावडे येथील रिंगण सोहळा झाल्यानंतर श्री ज्ञानेश्वहर माऊलींचा पालखी सोहळा माळशिरसकडे मार्गस्थ झाला. सोहळा येळीव येथे अर्ध्या तासाच्या विश्रांतीसाठी विसावला. त्यानंतर तो माळशिरसकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी समाजआरतीनंतर हा सोहळा विसावला. उद्या हा पालखी सोहळा सकाळी वेळापूरकडे मार्गस्थ होईल. सकाळी खुडूस फाटा येथे गोल रिंगण, वेळापूरजवळ धावा व मानाचे भारूडाचा कार्यक्रम झाल्यानंतर सोहळा वेळापूर मुक्कामी विसावेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>