Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

न्यूट्रियंट्सच्या साखर विक्रीतून एफआरपी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दौलत साखर कारखान्याची न्यूट्रियंट्स कंपनीच्या काळात तारण असलेली साखर विक्री करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. साखर विक्रीतून थकीत एफआरपी भागवली जाणार आहे. १५ जुलैला दुपारी एक वाजता बँकेच्या केंद्र कार्यालयात कार्यकारी समितीसमोर या शिल्लक साखरेचा जाहीर लिलाव होणार आहे.

जिल्हा बँकेने थकीत कर्जापोटी हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखाना न्यूट्रीयंट्स कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला होता. कंपनीने सन २०१६-२०१७ च्या गळीत हंगामात एक लाख ४० हजार टन उसाचे गाळप केले. या गळीत हंगामात उत्पादित झालेली साखर बँकेकडे तारण ठेवून त्यावर कर्ज घेतले होते. कर्जातूनच कंपनीने शेतकऱ्यांची ऊसबिले भागवली दरम्यान, या हंगामातील शेतकऱ्यांची उर्वरित एफआरपी भागविण्याची जबाबदारी अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व जिल्हा बँक यांनी घेतली आहे. दरम्यान, चंदगडच्या तहसीलदारांनी महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) अंतर्गत शेतकऱ्यांची एफआरपी भागविण्यासाठी कारखान्याची मालमत्ता विक्रीला काढण्याची नोटीस जाहीर केली होती.

दरम्यान, बँकेकडे तारण असलेल्या साखरेचा दर्जा आणि गुणवत्ता कमी होत असल्याने ही साखर विक्री करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. त्यानुसार बँकेने साखर विक्रीची निविदा प्रसिद्ध केली आहे. नोटिशीनुसार बँकेने ४३ हजार ९२२ क्विंटल साखर साठा विक्रीस काढला आहे. जिल्हा बँक व अथर्व इंटरट्रेड कंपनी यांच्यात झालेल्या करारानुसार थकीत एफआरपी देण्याची जबाबदारी कंपनी आणि बँकेने स्वीकारली आहे. त्यानुसार बँकेने वेळोवेळी प्रादेशिक साखर संचालक, जिल्हाधिकारी व चंदगड तहसीलदार यांच्याकडे शेतकऱ्यांच्या याद्यांची मागणी केलेली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या याद्या बँकेला अद्याप मिळालेल्या नाहीत. तथापि, न्यूट्रियंट्स कंपनीच्या काळातील शेतकऱ्यांची थकीत एफआरपी भागविण्याची जबाबदारी अथर्व इंटरट्रेड कंपनी व जिल्हा बँकेने घेतलेली आहे. पावसाळी हवामानामुळे दिवसेंदिवस साखरेची प्रत खराब होत असल्यामुळे विक्री करणे गरजेचे असल्याने बँकेने साखर विक्रीचा निर्णय घेतला आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कळंब्यात ३२ हून अधिक डेंगीसदृश रुग्ण

$
0
0

दरम्यान, कळंबा येथे डेंगीची तीव्रता कायम आहे. गावात ३२ हून अधिक डेंगीसदृश रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी सर्व्हेक्षणात सात रुग्ण तापाने बाधित असल्याचे आढळून आले आहे. रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.धूरफवारणी, साठवणूक केलेल्या पाण्याचा निचरा, गटारी वाहत्या केल्या जात आहेत. तसेच टायर जप्ती सुरू आहे. कंटेनरमध्ये अळीनाशक औषधांची फवारणी करण्यात येत आहे.

आरोग्य विभागाने प्रत्येक गल्लीचे सर्व्हेक्षण करण्यासाठी दहा पथकांची नियुक्ती केली आहे. एका पथकात दोन कर्मचारी आहेत. १५ जुलैपर्यंत सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. सोबत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.

डेंगीला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायतीने गावात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे. सरपंच सागर भोगम म्हणाले, 'डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी धूर फवारणी केली जात आहे. महालक्ष्मी मंदिर, आरोग्य विभागाचे उपकेंद्र आणि महालक्ष्मी आखाडा येथे आरोग्य तपासणी शिबिर सुरू आहेत. अंगात ताप जाणवत असल्यास शिबिरात तपासणी करुन घ्यावी. नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा, पाणी साठवणुकीचे बॅरेल,भांड्यावर झाकणे बसवावीत, दोन दिवसांपेक्षा अधिक काळ पाणी साठवू नये. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाड्यांना १६ कोटींचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वत:ची इमारत नसलेल्या अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीमधून १६ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून १९३ अंगणवाड्यांचे बांधकाम होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला भरीव स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला.

दरम्यान, जिल्ह्यातील २०१७ अंगणवाड्यांना स्वमालकीची इमारत नसल्यामुळे त्या समाजमंदिर, मंदिर, खासगी इमारतीत व जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतीमध्ये भरत आहेत. तर पालकमंत्र्यांनी, महिला व बालकल्याण विभागाला मोठ्या प्रमाणात दिलेल्या निधीची जिल्हा परिषदेत चर्चा सुरू होती.

दुसरीकडे अंगणवाड्यांचे बांधकाम आचारसंहितेच्या कालावधीत अडकू नये म्हणून त्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या निधीसाठी जिल्हा परिषदेकडून पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू होता. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण १६ प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांतर्गत ३९९४ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी २०१७ अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीची इमारत नाही. स्वत:च्या मालकीची इमारत नसल्यामुळे या अंगणवाड्या समाजमंदिर, मंदिरे, खासगी मालकीच्या जागेत तसेच काही ठिकाणी जिल्हा परिषद इमारतीच्या मालकीच्या जागेत भरत आहेत.

अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून पाठपुरावा सुरू होता. निधीसाठी प्रस्ताव सादर केला होता. पालकमंत्री पाटील यांनी नियोजन समितीमधून २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षासाठीचे मिळून १६ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नव्हत्या. त्यामुळे त्यांना भेडसावणारी ही समस्या विचारात घेऊन पालकमंत्री पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे १९३ अंगणवाड्या स्वमालकीच्या इमारतीत भरू शकतील. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पालकमंत्र्यांची आभारी असल्याची प्रतिक्रिया महिला व बालकल्याण सभापती वंदना मगदूम यांनी व्यक्त केली.

००००

२०१७ अंगणवाड्यांना नाही स्वत:ची इमारत

स्वमालकीची इमारत नसलेल्या अंगणवाड्यांमध्ये ४०१ अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भरतात. ग्रामपंचायत मालकीच्या इमारतीमध्ये २५५ अंगणवाड्या भरतात. खासगी जागा व भाड्याच्या इमारतीत ९१२ अंगणवाड्या आहेत. मंदिर, हॉस्पिटल, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतीत भरणाऱ्या अंगणवाड्यांची संख्या ४०९ आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इएसआय हॉस्पिटल वाऱ्यावर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जुन्या इमारतीचे रखडलेले नूतनीकरण, डॉक्टरांची रिक्त पदे, अपुरा कर्मचारी वर्ग, राज्यकर्त्यांची उदासीनता, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा अशा प्रकारामुळे कोल्हापुरातील राज्य कामगार विमा रुग्णालयाची (इएसआय) अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्यावर्षी सुरू झालेल्या इएसआय हॉस्पिटलला प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. मात्र जबाबदार लोकप्रतनिधींनी याकडे पाठ फिरवली आहे.

कामगारांचे आरोग्य चांगले राहावे या हेतूने राज्य कामगार विमा रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र सरकारी उदासीनतेमुळे रुग्णालयाची दुरवस्था आहे. ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहालगत दहा वर्षांपूर्वी ९ कोटी ५० लाख रुपये खर्चून राज्य कामगार विमा योजनेच्या हॉस्पिटलची इमारत उभारण्यात आली. सद्यस्थितीत हॉस्पिटलमध्ये केवळ बाह्यरुग्ण विभाग चालू असून उर्वरित इमारत धूळ खात पडली आहे. रोज किमान अडीचशेहून अधिक कामगार उपचारासाठी बाह्यरुग्ण विभागात येतात. मात्र, गेल्या वर्षभरात बाह्यरुग्ण विभागापुढे काम सरकलेले नाही. आंतररुग्ण विभाग व प्रयोगशाळा सुविधा चालू करण्याची वारंवार मागणी होऊनही सरकारी पातळीवर हालचाल होत नाही. हॉस्पिटल प्रशासनाने यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याबाबत दुर्लक्ष केले आहे. हॉस्पिटलमधील रिक्त पदसंख्या, तेथे सुरू करायचे विभाग अशा धोरणात्मक बाबींचे निर्णय मुंबईत होत असल्याने स्थानिक पातळीवर कार्यरत अधिकारी हतबल आहेत.

सुसज्ज इमारतीची वाताहत

इएसआय हॉस्पिटल तब्बल आठ एकरात खाजगी हॉस्पिटलपेक्षाही देखणी व प्रशस्त इमारतीत आहे. डॉक्टरांसाठी निवासस्थाने, स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा आदींची सोय करण्यात आली होती. मात्र प्रशासनाच्या कचखाऊ धोरणांमुळे जुन्या इमारतींची वाताहत झाली आहे. नूतनीकरण नसल्याने इमारतीची पडझड झाली आहे. खिडक्यांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत असून विद्युत वायरी तुटलेल्या आहेत. ठिकठिकाणी उगवलेली झुडपे, गंजलेली लोखंडी दारे यामुळे इमारतीची अवस्था एखाद्या भयपटातील प्रसंगासारखी झाली आहे. हॉस्पिटलच्या आतील भागाचे विद्युतीकरण झालेले नाही तर ट्रान्सफॉर्मरही जळाला आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. जनरेटरची मागणी करूनही त्याबाबत काहीच हालचाल झालेली नाही.

रिक्त पदभरती नाही

शंभर बेडच्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची ३८ पदे मंजूर असून केवळ पूर्णवेळ ४ डॉक्टरांसह १० कंत्राटी डॉक्टर घेऊन प्रशासनाकडून सध्या हॉस्पिटलचा गाडा हाकला जात आहे. दररोज मोठ्या संख्येने उपचारासाठी कामगार येतात. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जिल्ह्याबाहेरून आलेल्या कामगारांना तिष्ठत राहावे लागते. केसपेपर काढण्यासाठी तब्बल एक तासाहून अधिक वेटिंग असल्याचे उपस्थित रुग्णांनी सांगितले. जिल्ह्यात पन्नास हजारांहून अधिक लाभार्थी आहेत.

चोरीच्या घटना वाढल्या

हॉस्पिटलची १५ फूट उंचीची संरक्षक भिंत कोसळली असल्याने चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. हॉस्पिटलचे वसतिगृह व इतर इमारतीतील वस्तूंची चोरी झाली आहे. लोखंडी वस्तू आणि इतर महत्त्वाचे साहित्य गायब आहे. काही दिवसांपूर्वी प्रसाधनगृहातील साहित्य, पाण्याच्या पाइप चोरीला गेल्याने रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागले होते. गेल्यावर्षी चोरट्यांबरोबर डॉक्टरांची हातघाई झाली होती. त्यामध्ये एका डॉक्टराच्या पायाच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. सध्या केवळ एका शिफ्टमध्ये दोन ते तीन सुरक्षारक्षक उपलब्ध असतात. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी अन्य वर्गातूनही पुढाकार घेणे गरजेचे आहे.

आरोग्यसेवा देण्यासाठी कामगारांच्या वेतनातून लाखो रुपये सरकार घेते. मात्र कामगारांना मिळणारा परतावा अतिशय तुटपुंजा आहे. सरकार कामगारांच्या आरोग्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कामगारांना काम सोडून हेलपाटे मारावे लागतात. पैसे देऊनही विकतचा मन:स्ताप होत आहे. यासाठी किमान स्थानिक राजकीय नेत्यांनी लक्ष द्यावे.

- युवराज पाटील, कामगार

हॉस्पिटलला अधिकाधिक निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. इमारतीच्या नूतनीकरणासाठी मुंबई येथील ऑफिसशी सातत्याने संपर्क सुरू आहे. आंतररुग्ण, दक्षता विभाग व प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी व पायाभूत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.

- डॉ. काजल गोल्डार, मेडिकल सुपरिटेंडेंट

000

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हॉस्पिटलच्या जुन्या इमारतीचे रखडलेले नूतनीकरण, डॉक्टरांची रिक्त पदे, अपुरा कर्मचारी वर्ग, राज्यकर्त्यांची उदासीनता, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कोल्हापुरातील राज्य कामगार विमा रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गतवर्षी सुरू झालेल्या इएसआय हॉस्पिटलला प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. याकडे जिल्ह्यातील नूतन खासदारांनी लक्ष देण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.

राज्यातील कामगारांचे आरोग्य चांगले राहावे या हेतूने राज्य कामगार विमा रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र सरकारी उदासीनतेमुळे या रुग्णालयात दुरवस्था आहे. तब्बल दहा वर्षे ९ कोटी ५० लाख रुपये खर्चून नागाळा पार्क शासकीय विश्रामगृहाच्या लगत राज्य कामगार विमा योजनेच्या हॉस्पिटलची इमारत उभारण्यात आली. सद्यस्थितीत हॉस्पिटलमध्ये केवळ बाह्यरुग्ण विभाग चालू असून उर्वरित इमारत धूळ खात पडली आहे. रोज किमान अडीचशेहून अधिक कामगार बाह्यरुग्ण विभागात येतात. मात्र, गेल्या वर्षभरात केवळ बाह्यरुग्ण विभागाच्या पुढे काम सरकलेले नाही. आंतररुग्ण विभाग व प्रयोगशाळा सुविधा चालू करण्याची वारंवार मागणी होऊनही सरकारी पातळीवर हालचाल होत नाही. हॉस्पिटल प्रशासनाने यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही वरिष्ठ अधिकारी त्याबाबतीत गाफील आहेत. हॉस्पिटलच्या धोरणांबाबत मुंबईत निर्णय होत असल्याने इथले अधिकारी हतबल आहेत.

सुसज्ज इमारतीची वाताहत

तब्बल आठ एकर परिसरात खाजगी हॉस्पिटलपेक्षाही देखणी व प्रशस्त इमारत उभा करण्यात आली आहे. डॉक्टरांसाठी निवास्थान, स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा आदीची सोय करण्यात आली होती. मात्र प्रशासनाच्या कचखाऊ धोरणामुळे जुन्या इमारतींची वाताहत झाली आहे. नूतनीकरण नसल्याने इमारतींची पडझड झाली आहे. खिडक्यांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत असून विद्युत वायर तुटलेल्या आहेत. अनावश्यक उगवलेली झुडपे, गंजलेली लोखंडी दारे यामुळे इमारतीची अवस्था हॉरर चित्रपटातील प्रसंगासारखी झाली आहे. हॉस्पिटलच्या आतील भागाचे विद्युतीकरण नाही तर ट्रान्सफॉर्मर जळाला आहे. प्रसंगी लाईट गेल्यास रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. जनरेटरची मागणी करूनही त्याबाबत काहीच हालचाल झालेली नाही.

रिक्त पदांची भरती नाही

शंभर बेडच्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची ३८ पदे मंजूर असून केवळ पूर्णवेळ ४ डॉक्टरांसह १० कंत्राटी पद्धतीने डॉक्टर घेऊन सध्या हॉस्पिटलचा गाडा हाकला जात आहे. दररोज मोठ्या संख्येने उपचारासाठी कामगार वर्ग येत असल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जिल्ह्याबाहेरून आलेल्या कामगारांना तिष्ठत राहावे लागते. केसपेपर काढण्यासाठी तब्बल एक तासाहून अधिक वेटिंग असल्याचे एकाने सांगितले. जिल्ह्यात पन्नास हजाराहून अधिक लाभार्थी आहेत.

चोरीच्या घटना वाढल्या

हॉस्पिटलची १५ फूट उंचीची संरक्षक भिंत कोसळली असल्याने चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. हॉस्पिटलचे वसतिगृह व इतर इमारतीतील वस्तूंची चोरी झाली आहे. लोखंडी व इतर महत्त्वाच्या साहित्य गायब आहे. काही दिवसांपूर्वी प्रसाधनगृहातील साहित्य, पाण्याच्या पाईप चोरीला गेल्याने रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागले होते. गतवर्षी चोरट्यांबरोबर डॉक्टरांची हातघाई झाली होती. त्यामध्ये एका डॉक्टराच्या पायाच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. सध्या केवळ एका शिफ्टमध्ये दोन ते तीन सुरक्षारक्षक उपलब्ध असतात. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

कोट:

आरोग्य सेवा देण्यासाठी कामगारांच्या वेतनातून लाखो रुपये सरकारला मिळतात. मात्र कामगाराला मिळणारा परतावा अतिशय तुटपुंजा आहे. सरकार कामगारांच्या आरोग्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कामगारांना काम सोडून हेलपाटे मारावे लागतात. पैसे देऊनही विकतचा मनस्ताप होत आहे. यासाठी किमान स्थानिक राजकीय नेत्यांनी लक्ष द्यावे.

युवराज पाटील, कामगार

हॉस्पिटलला अधिकाधिक निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. इमारतीच्या नूतनीकरणासाठी मुंबई येथील ऑफिसशी सातत्याने संपर्क सुरू आहे. आंतररुग्ण, दक्षता विभाग व प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी व पायाभूत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.

- डॉ. गोल्डार, मेडिकल सुपरिटेंडेंट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यस्तरीय अश्वघोष कलासक्त पुरस्कार जाहीर सोलापूरसह राज्यभरातील दहा जणांचा होणार सन्मान

$
0
0

राज्यस्तरीय अश्वघोष कलासक्त पुरस्कार जाहीर

सोलापूर

राज्यस्तरीय अश्वघोष कलासक्त पुरस्कार जाहीर झाले आहेत. सोलापूरसह राज्यभरातील दहा जणांचा अश्वघोष कलासक्त पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती कलावंत आशुतोष नाटकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सदाशिवराव कांबळे (वेशभूषाकार) पुणे, अमीर तडवळकर (चित्रपट अभिनेता) सोलापूर, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे (गीतकार) मुंबई, दादाकांत धनविजय (चित्रपट अभिनेते) नागपूर, ज्ञानेश्वर भोसले (निर्माता) मोहोळ, रामचंद्र धुमाळ (ज्येष्ठ कलावंत) पुणे, स्वरलक्ष्मी लहाने (मालिका पार्श्वगायिका) परभणी, अ. जब्बार धनंजय (चित्रपट संगीतकार) सोलापूर, प्रवीण घरडे ( दिग्दर्शक ) आणि डॉ. रमेश राठोड (निर्माता) पुणे यांना अश्वघोष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

रविवार ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अँफी थिएटर सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. जेष्ठ कलावंत किशोर महाबोले, बाळासाहेब वाघमारे, म्होरक्याचे दिग्दर्शक अमर देवकर आणि अखिल भारतीय दक्षिण नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल आणि बुके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनधारकाचा बिलासाठी आत्मदहनाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय साहित्य पोहचवण्यासाठी घेण्यात आलेले ट्रक आणि अधिकाऱ्यांसाठीची इनोव्हा आणि इतर सुमारे ३५० वाहनांचे बिल निवडणूक उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी मंजूर केले नाही. याप्रकरणी त्रस्त वाहनधारक उत्तम चव्हाण (नागाव) यांनी त्वरित बिल न मंजूर केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शुक्रवारी धुमाळ यांना दिला आहे.

दरम्यान, जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे तक्रार दिली. देवरा यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केली आहे.

लोकसभा निकाल लागून महिना होऊन गेला तरी अजूनही निवडणूक प्रशासनाने बिले दिलेली नाहीत. इव्हीएम यंत्रासह इतर साहित्य पोहचवण्यासाठी जाधव यांनी ६ ट्रक दिले होते. २३ मार्च २०१९ रोजी त्यांच्या ट्रकनी यंत्रे केंद्रावर पोहचवली. या भाड्यापोटीची ९० हजार रूपये त्यांना मिळालेले नाहीत. प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही बिल न मिळाल्याने ते आक्रमक होऊन धुमाळ यांच्या विरोधात सरकारकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला.

चव्हाण यांची इनोव्हा निवडणूक कामासाठी भाड्याने घेण्यात आली होती. त्याचे ७५ रूपयांचे भाडे मिळालेले नाही. परिणामी त्यांना बँकेचा हप्ता वेळेत भरता आला नाही. त्यांची इनोव्हा बँकेने ओढून नेली. त्यामुळे हताश झालेल्या चव्हाण यांनी बिल न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिल्याने निवडणूक प्रशासन हादरले आहे. निवडणुकीच्या विविध कारणांसाठी घेतलेल्या इतर ३५० वाहनांचे भाडेही देण्यात प्रशासनाने विलंब केल्याने धुमाळ यांच्याकडे येऊन रोज विचारणा करण्यासाठी रांग लागत आहे. तरीही तातडीने बिल देण्यासाठी कार्यवाही होत नाही. यामुळे निवडणूक प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

------------------

वाहने न देण्याचा इशारा

लोकसभा मतदान होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला. तरीही निवडणूक प्रक्रियेवेळी घेण्यात आलेल्या खासगी वाहनांचे बिल न दिल्याने लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे जाधव आक्रमक झाले आहेत. त्यांनी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी धुमाळ यांना काही दिवसांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी वाहने न देण्याचा इशारा दिला.

-------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्कॉनकडून घाटाची बांधणी

$
0
0

इस्कॉनकडून घाटाची बांधणी

सोलापूर :

श्रीकृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) पंढरपूर यांच्या वतीने पंढरपुरात चंद्रभागेच्या पूर्व तिरावर भव्य दिव्य अशा घाटाची बांधणी करण्यात आली आहे. त्या घाटाला इस्कॉनचे जनक श्रील प्रभुपाद, असे नामकरण करण्यात आले आहे. या घाटाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे, अशी माहिती अनंतशेष प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गजानन महाराजांची पालखी सोलापूर मुक्कामी

$
0
0

गजानन महाराजांची पालखी सोलापूर मुक्कामी

सोलापूर

शेगावहून पंढरपूरला आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी सोलापुरात आगमन झाल्यानंतर शुक्रवारी या पालखी सोहळ्याने सोलापूर नगरीत सकाळी प्रवेश केला. महापौर शोभा बनशेट्टी, पोलिस आयुक्त शिंदे, उपमहापौर शशिकला बत्तुल, मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी पालखीचे स्वागत केले.

गजानन महाराजांच्या या पालखीसोबत ६५० वारकरी असून, या पालखीचे सारथ्य तीन अश्व करीत आहेत. ८ जून रोजी पालखी शेगाव येथून निघाली आहे. पंढरपूरला पालखी १० जुलै रोजी पोहोचणार आहे. गजानन महाराजांची पालखी आठ जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करते. शेगाव-पंढरपूर असा ३३ दिवसांमध्ये ७५० किलोमीटरचे अंतर यामुळे पार पडते. शुक्रवारी पालखीचे सोलापुरात आगमन झाल्यानंतर पालखीच्या दर्शनासाठी सोलापूरकर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पालखी उपलप मंगल कार्यालयात मुक्कामासाठी येणार आहे. रविवारी पालखी उपलप मंगल कार्यालयातून निघून सकाळी दहा वाजता दमाणी नगर येथील सुंदराबाई प्रशालेत येणार असून, दुपारचे भोजन घेऊन पालखी तिऱ्हे मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संत तुकाराम संतपीठाचीघोषणा आषाढीला होणार

$
0
0

संत तुकाराम संतपीठाची

घोषणा आषाढीला होणार

पंढरपूर : संत तुकाराम संतपीठाचे आषाढी एकादशीला मुख्यमंत्री घोषणा करणार असून, शंभर कोटींच्या या आगळ्यावेगळ्या ज्ञानपीठाचा संपूर्ण आराखडा तयार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. वारकरी संप्रदायाची ओळख, परंपरा, संस्कृती आणि विचार जिवंत ठेवण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या या संतपीठात जगभरातील संतांवर संशोधन केले जाणार आहे. इतर विद्यापीठांपेक्षा संपूर्ण वेगळी धाटणी असलेल्या संतपीठाचे स्वरूप आंतरराष्ट्रीय असणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. दोन टप्प्यांत होणारे हे संतपीठ मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग मिळून उभे करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माउली बरड मुक्कामी

$
0
0

माउली बरड मुक्कामी

अतुल देशपांडे, सातारा

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाचा पालखी सोहळा हरिनामाचा गजर करीत, एक दिवसाच्या मुक्कामासाठी फलटण तालुक्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड नगरीत विसावला आहे. सांयकाळी सोहळा बरडमध्ये पोहोचताच सोहळ्याचे शाही स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करीत आपल्या लाडक्या माउलींचे जंगी स्वागत करण्यात आले.

टाळ मृदुंगाच्या निनादात हरिनामाच्या गजरात पालखी सोहळ्याने विडणी येथे नास्ता, पिंपरद येथे दुपारचे जेवण, वाजेगाव, निंबळक नाका येथे विश्रांती घेतली. त्या सोहळा बरड येथे मुक्कामासाठी विसावला. या वेळी भाविकांच्या दर्शनासाठी पालखी अनेक ठिकाणी थांबविण्यात आली.

विडणी येथून नास्ता करून पालखी सोहळा पिंपरद येथे दुपारच्या जेवणासाठी थांबला. रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या शेतामध्ये सावली आणि पाण्याची व्यवस्था पाहून महिला भगिनींनी स्वयंपाकास सुरुवात केली. टाळमृदुंग आणि भजन वाणीच्या साथीने जेवनाचा आस्वाद घेतल्यानंतर पालखी सोहळा बरडच्या दिशेने पुढे सरकला. बरड मार्गावर पालखी सोहळा आल्यानंतर सोहळ्यातील विश्वस्त मानकऱ्यांचा सत्कार या मार्गावरील सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आला. विठ्ठल भक्तांनी पालखी सोहळ्याचे बरड नगरीत शाही स्वागत केले. पालखी सोहळा बरडवासीयांचा निरोप घेऊन आज, शनिवारी सकाळी सातारा जिल्ह्यातील अखेरचा मुक्काम उरकून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थसंकल्प प्रतिक्रिया - शेट्टी, प्रा. पाटील, संजय कोले

$
0
0

'केंद्रसरकाने जाहीर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी निराशाजनक असून २०२२ पर्यंत उत्पादन दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेलाच मूठमाती देण्याचे काम सरकार करत आहे. अर्थसंकल्पामध्ये शेतीविषयी कोणतीच आशादायक घोषणा झाली नसून ॲग्रीकल्चर कॉरीडॉर, प्रक्रिया उद्योग, साठवणूक केंद्र उभा करणे, नाबार्डच्या योजना बंद झाल्याने शेतकरी गटाला कोणतेच लाभ मिळत नाहीत. यामुळे नवीन शेतकरी गट निर्माण करून त्यातून काहीही साध्य होणार नाही. मेगा फूड पार्क, अडचणीत सापडलेल्या उस ऊत्पादक व साखर उद्योगाच्या तोंडालाही पानेच पुसली आहेत. देशात शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणाऱ्या वस्त्रोद्योग धोरणासाठी कोणतीच भरीव तरतूद केलेली नाही. या पद्धतीनेच सरकारने धोरण राबविल्यामुळे शेतीक्षेत्राच्या आर्थिक विकासाचा दर ५ टक्क्यांवरून २.७ टक्क्यांवर आला आहे.

राजू शेट्टी, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना

........

'देश स्वातंत्र्य झाल्यापासून शेतकरी आशाळभूत नजरेने अर्थसंकल्पाकडे पाहतो. पण दरवर्षीप्रमाणे याही अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला निराशाच आली. कृषीप्रधान देश अशी ओळख असलेल्या देशात साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून अद्यापही त्या सुरू आहेत. या आत्महत्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे होत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढत आहे. बोजा कमी करण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा देण्याची आवश्यकता होती. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद दिसत नाही. शेतीचा जसा आर्थिक विकास दर घटत आहे तसेच भांडवली तूट सुद्धा दिसून येते. या अर्थसंकल्पाची गणना 'शोषण थांबेना, पोट भरेना' अशीच करावी लागेल.

प्रा. जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी पक्ष

........................

'शेतकरी नैसर्गिक शेती करत आला आहे, तरीही त्यांना पोटभर अन्न मिळत नव्हते. तसेच झिरो बजेट शेतीद्वारे पुरसे अन्नधान्य उत्पादन होणार नाही. उत्पादन खर्च कमी करा, शेती परवडेल असे अर्थसंकल्पाद्वारे सुचित करुन सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. एकीकडे दुप्पट उत्पादनाचा घोषा करतानाच झिरो बजेट शेती पुरस्कार हे परस्पर विरोधी आहे. शेतीमाल पणनच्या मूलभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पामध्ये कोणतीही तरतूद नाही. अनेकवेळा शेतीमाल शीतगृहे ,शीतवाहने, गोदामे नसल्याने खराब होऊन नुकसान होते, त्यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत. एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात शेतीचा वाटा बारा टक्के आहे. तर सर्वात जास्त रोजगार शेतीत मिळतो. तसेच ६० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. या व्यस्त प्रमाणामुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भाग गरीब, कर्जबाजारी, मागासलेला राहिला आहे. त्याकडे आताही दुर्लक्ष केले आहे.

संजय कोले, शेतकरी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक इमारत पाडताना वादावादी

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका प्रशासनाच्यावतीने महाद्वार रोड वांगीबोळ येथील धोकादायक इमारत उतरवताना शुक्रवारी कर्मचारी व भाडेकरु यांच्यामध्ये वादावादीचा प्रसंग उद्भवला. श्रीपाद पंडितराव यांची इमारत कर्मचारी उतरवताना भाडेकरु कारेकर यांनी अंगावर अॅसिड ओतून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पण पोलिस प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. शेवटी पोलिस बंदोबस्तात सुमारे ६० फूट लांबीची इमारत कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केली.

शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने इमारतींच्या मिळकतदारांना नोटिसा बजावल्या होत्या. नोटिशीद्वारे धोकादायक इमारती उतरवण्याची सूचना केली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने इमारत उतरवण्याची कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी महाद्वार रोड परिसरातील वांगी बोळ येथील पंडितराव यांची धोकादायक इमारत उतरवण्यासाठी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, कनिष्ठ अभियंता निवास पवार यांच्यास सुमारे ६० ते ७० कर्मचारी पोलिस बंदोबस्तात दाखल झाले. इमारत उतरवण्यास मुख्य मिळकदाराने समंती दिल्यानंतर कामाला सुरुवात झाली. मात्र त्याचवेळी भाडेकरु कारेकर यांनी इमारत पाडण्यास मज्जाव केला. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर त्यांची वादावादी झाली. या वादावादीमध्ये त्यांनी स्वत:वर अॅसिड ओतून घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांच्याकडील अॅसिडची बाटली काढून घेतली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

कारेकर यांना प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यांचा विरोध मावळला. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे ६० फूट लांबीची धोकादायक इमारत पाडून टाकली. तब्बल चार तासात इमारतीचा भाग काढून टाकण्यात आला. या प्रभागात आणखी आठ ते दहा धोकादायक इमारती असून त्या इमारतीही पाडल्या जाणार आहेत. ज्या मिळकतदारांना नोटिसा बजावल्या आहेत, त्यांनी स्वत:हून इमारती उतरवून घ्याव्यात, असे आवाहन महापालिकेच्यावतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराणा प्रताप चौकात आंदोलनानंतर पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सात महिन्यांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याने त्रस्त असलेल्या महाराणा प्रताप चौक परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी रास्तारोका आंदोलन केले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर काहीवेळाने पाणीपुरवठा सुरळीत झाली.

महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या महाराणा प्रताप चौकात गेल्या सात महिन्यांपासून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सकाळी चार ते आठ या वेळेत सोडण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा वेळेत बदल केल्याने परिसरातील पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ उडाला आहे. सायंकाळच्या सत्रात केवळ एक तास आणि ते देखील कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. तरीही बदल न झाल्याने आंदोलन करण्यात आले.

माजी स्थायी समिती सभापती रमेश पोवार यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महिला घागरी घेवून सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे काही क्षणात येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली. याची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी तातडीने हजर झाले. त्यांनी शनिवारपासून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. पण त्याला विरोध करत आजच पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर पाणी सोडण्यात आले. मात्र शनिवारपासून नियमितपणे सकाळी पाणी न सोडल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी अनिल पोवार, स्वप्नील गवळी, संभाजी गोंदकर, महेश हावळ, अस्लम नदाफ यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ बंधारे पाण्याखाली

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहर आणि परिसरात शुक्रवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत होती. जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. सकाळी आठपर्यंत झालेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस गगनबावडा तर सर्वात कमी पाऊस शिरोळ, हातकणंगले तालुक्यात झाला.

गेले सहा, सात दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी, धरणांत पाणी वाढत आहे. परिणामी वाड्या, वस्त्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला लागला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही काळ विश्रांती घेत पाऊस पडत होता. यामुळे शहरातील सखल भागात पाणी तुंबले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. साचलेल्या डबक्यातून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तळकोकण आणि सर्वच पाणलोट क्षेत्रात जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नद्यांतील पाणी वाढले आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ तर भोगावती नदीवरील खडक कोगे, हळदी बंधारे पाण्याखाली आहेत.

शहरातील सर्वच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. सार्वजनिक बागा, मैदानांतही चिखल, दलदल, पाणी तुंबले आहे. गढूळ पाणी आणि दलदलीमुळे साथीच्या रोगाचा फैलाव होत असून खासगी, सरकारी रुग्णालये फुल्ल झाले आहेत. थंडी, ताप, सर्दी या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यास लहान मुले, वृद्ध अधिक बळी पडत आहेत.

कोयना धरणात १७.६७ टीएमसी, अलमट्टीत २९.५२ टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्हा, राज्य माार्गवरही खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. त्याचा त्रास वाहनधारकांना होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकल मराठा समाजाच्यावतीने मान्यवरांचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार रविवारी (ता. ७) दुपारी बारा वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे होणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक जयेश कदम, दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठा मंत्रिगट समितीचे अध्यक्ष आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार नीतेश राणे, महापौर माधवी गवंडी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. राज्यातील मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, मराठा महासंघाचे शशिकांत पोवार, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, छावाचे नानासाहेब जावळे, राजेंद्र कोंढरे, प्रविण गायकवाड यांना आमंत्रित केले आहे. तसेच मुंबई हायकोर्टात बाजू मांडणारे वरिष्ठ विधीज्ज्ञ सतीश माने शिंदे, अॅड. अभिजीत पाटील उपस्थित राहणार आहेत. शाहीर दिलीप सावंत यांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहेत.

कार्यक्रमाला खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक, उल्हास पाटील, संध्यादेवी कुपेकर, डॉ. सुजीत मिणचेकर, सुरेश हाळवणकर, सत्यजीत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष संजय पवार उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेला वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, दिलीप देसाई, स्वप्नील पार्टे, सचिन तोडकर, धनंजय सावंत, माजी महापौर बाजीराव चव्हाण, अमर समर्थ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तिलारी घाटात रस्ता खचला

$
0
0

तिलारी घाटात रस्ता खचला

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

अतिवृष्टीमुळे तिलारी घाटातील रस्त्याकडेला असलेली दरड कोसळून रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागासह महसूल विभाग व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन रस्ता वाहतुकीला बंद केला.

खचलेला भाग पूर्ववत करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना करण्याचे काम सुरू होते. मात्र संततधार पावसामुळे कामात अडथळा निर्माण होत होता. सकाळी काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र दुपारनंतर संपुर्ण वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी पुढील दहा दिवस या मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.

दीड वर्षांपूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. त्यावेळी बांधकाम विभागाने या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करून डागडुजीही केली होती. तिलारी घाट हा नागमोडी वळणांचा असल्यामुळे वाहतुकीलाही धोकादायक आहे. घाटामध्ये रस्त्याच्या बाजूने मोबाइल कंपनीने केबल टाकण्यासाठी खोदाई केली आहे. त्यामुळे हा रस्ता खचल्याचा अंदाज आहे. या मार्गावरील चंदगड डेपोच्या दोन फेऱ्या व कोल्हापूर डेपोच्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मार्गावरील वाहतूक आजरा-आंबोलीमार्गे वळविण्यात आली आहे.

रस्त्याकडेला बांधलेली संरक्षक दगडी भिंत व रस्त्यामध्ये पाणी साचल्याने संरक्षक भिंत कोसळल्याने त्यासोबत रस्ताही खचला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे. तिलारी घाटाच्या माथ्यावर या मार्गावरील वाहतूक रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घाटाच्या खाली चेकनाका असून तेथेही वाहतूक रोखण्याची व्यवस्था केली आहे. रस्ता डागडुजीसाठी दहा दिवस लागतील असा अंदाज आहे.

संजय मांजरेकर, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९५०० झाडांचे ‘ऑक्सिजन पार्क’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सरकारी योजनेत लोकसहभाग आणि शैक्षणिक अभियानात नाविन्याचा अवलंब करत राज्यभर वेगळी छाप पाडणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषद आता ९५०० झाडांचे 'ऑक्सिजन पार्क' विकसित करणार आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरातील सुमारे एक एकर जागा यासाठी निश्चित केली आहे. विविध जातीची झाडे, फळांची रोपे आणि फुलझाडींनी या परिसरात हिरवाई फुलविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक वनीकरण आणि वन विभागाचे सहकार्य मिळाले आहे.

जिल्हा परिषदेचा मुख्यालय इमारत आणि आसपासचा परिसर हा जवळपास साडेआठ एकरचा आहे. ही सगळी जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. मुख्यालयात विविध विभागाची कार्यालये आहेत. राजर्षी शाहू सभागृह आणि समिती सभागृह आहे. याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या विविध समिती सभापतिसाठी निवासस्थाने बांधली आहेत. उपाध्यक्ष व कृषी समिती, बांधकाम समिती, शिक्षण समिती, महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण समिती सभापतीसाठी निवासस्थाने बांधली आहेत.

या व्यतिरिक्त शिल्लक जागेतील सुमारे एक एकर परिसरात 'ऑक्सिजन पार्क' प्रस्तावित केले आहे. या जागेत वृक्षलागवड करताना नव्या संकल्पनेचा अवलंब करण्यात येणार आहे. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्याची 'मियावॉकी फॉरेस्ट' संकल्पना सध्या सर्वत्र रुजली आहे. त्यानुसार पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरातील मोकळी जागा निवडली आहे. विशेष म्हणजे, झाडे जगावीत, त्यांची वाढ उत्तमरित्या व्हावी यासाठी दोन वर्षे वाढ झालेली रोपांची लागवड केली जाणार आहे. त्याद्वारे हा परिसर हिरवागार बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

. ..

३५ प्रकारची रोपे, फूल आणि फळझाडांचा समावेश

कोल्हापूर परिसरात वाढतील अशा जातीची रोपे, फुले व फळांच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. ३५ हून अधिक जातीच्या रोपांचा समावेश आहे. आंबा, वड, चिंच, करंज, बहावा, गुलमोहर, कडुलिंब या जातीच्या रोपांचा समावेश आहे. शिवाय विविध प्रकारच्या फळांच्या रोपांचा समावेश असेल. या परिसरात विविध प्रकारच्या झाडांनी या हिरवाई फुलविण्याचे नियोजन आहे. शिवाय नागिरकांसाठी 'वॉकिंग ट्रॅक', बैठकव्यवस्था अशी सोय करण्याचे नियोजन आहे. कृषि विभाग, बांधकाम विभाग आणि लेखाविभागातील काही अधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. लेखाधिकारी राजेंद्र नागणे, कनिष्ठ अभियंता विराज टोणे, वैभव खोत, कृषि विभागातील लतिफ शेख यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी हे काम पाहत आहेत.

.. .. .

जिल्हा परिषदेच्या परिसरातील जवळपास एक एकर जागेवर ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात येणार आहे. रोपांच्या लागवडीसह त्यांची उत्तम वाढ व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील.

डॉ. रवी शिवदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

... . .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिंचवडेजवळ झाड कोसळूनदोघे दुचाकीस्वार गंभीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या अंगावर कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील चिंचवडे (ता. करवीर)च्या पूर्वेला रस्त्यावर असणारे झाड दुचाकीस्वार कोसळल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले. शोएब ईलाई आत्तार (मुसलमानवाडी ता. गगनबावडा, वय २४) व प्रभाकर कृष्णात तेली (किसरुळ ता.पन्हाळा, वय ३५) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अत्तार व तेली हे आपल्या मोटरसायकल ( क्रमांक एम एच ०९- १०८१ ) वरून शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडे जाण्यासाठी चिंचवडेजवळ आले असता अचानक रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड त्यांच्यावर कोसळले. यात अत्तार यांच्या हाताला तर तेली यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे .

घटनास्थळी ग्रामस्थ व प्रवाशांनी धाव घेत झाडाखालील जखमींना मदत करत कोल्हापूर येथे रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले.

रस्त्यावर झाड पडल्यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरची वाहतूक दोन तास खोळंबली गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाव्यांचा खर्च सादर करा

$
0
0

महापालिका लोगो

कोल्हापूर टाइम्स टीम

'महापालिकेविरोधात सुरू असलेल्या दाव्यांसाठी कोट्यवधी रुपयांची फी वकिलांना द्यावी लागत आहे. फेअरडील कंपनीच्या विरोधातील न्यायालयीन दाव्यासाठी आतापर्यंत किती शुल्क दिले. कर्मचाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेल्या दाव्यामध्ये वकिलांना भरमसाठ फी दिली जाते. केवळ न्यायालयीन दाव्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असून सर्व निवाड्याची प्रकरणे स्थायी समितीला सादर करा,' असा आदेश महापालिकेच्या विधी विभागाला शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत सभापती शारंगधर देशमुख यांनी दिले.

सदस्य सत्यजित कदम, दीपा मगदूम व राजाराम गायकवाड यांनी सभेत महापालिकेच्यावतीने कोर्टात सुरू असलेल्या दाव्याबाबत वकिलांना आतापर्यंत दिलेल्या फीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच कोर्टप्रकरणांची माहिती सादर करण्यासह सर्व वकिलांना सभेस उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या.'फेअडील कंपनीविरोध सुरू असलेला खटला चालवण्यासाठी २२ वर्षांत एक कोटी, ६० लाखांची वकील फी दिली आहे.' असे विधी विभागाने स्पष्टीकरण दिले.

माधुरी लाड म्हणाल्या, 'कसबा बावडा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथील वीज प्रकल्प बंद आहे.' 'दुरुस्तीसाठी प्रकल्प बंद असून आठ दिवसांत सुरू होणार आहे,' असा खुलासा आरोग्य विभागाने केला.

'शहरातील उड्डाणपुलाखाली अवैध व्यवसाय, पार्किंग व अतिक्रमणे वाढत असून त्याला अटकाव करा,' अशी मागणी कदम यांनी केली. सभापती शारंगधर देशमुख म्हणाले, 'नगररचना विभागाकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना रेनवॉटर हार्वेस्टिंगची तपासणी केली जाते का? पूर्तता केली नसेल, तर कोणती कारवाई केली जाते. दाखला मिळण्यासाठी केव‌ळ सिस्टिम बसवली जाते. त्यानंतर देखभाल केली जात नाही. ' '२०१६ च्या नियमावलीनुसार ५०० चौरस मीटर भूखंडावर रेनवॉटर हार्वेस्टिंग बसवणे गरजेचे आहे. पूर्णत्वाचा दाखला देताना तपासणी केली जाते. त्याची देखभाल केली जात नसल्यास दंडाची आकारणी केली जाईल,' असे नगररचना विभागाने स्पष्ट केले.

विद्यार्थी गणवेश, बूटविना

महापालिकेच्या अनेक शाळांचा दर्जा उंचावत आहे. शिक्षकांचे प्रयत्न आणि अनेकठिकाणी नगरसेवकांच्या पाठबळाच्या जोरावर पटसंख्याही वाढत आहे. पण शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी, विद्यार्थ्यांना गणेवश आणि बूट मिळाले नाहीत. याबाबत सविता भालकर यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर १५ ऑगस्टपूर्वी गणवेश व बूट देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिंगणापूर येथे शहर पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीला लागलेल्या गळतीमुळे निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद राहिला. त्याचा सर्वाधिक फटका ए, बी, सी, इ वॉर्डातील नागरिकांना बसला. ऐन पावसाळ्यात शहरवासीयांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कळंबा व कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून तब्बल ३४ टँकरच्या फेऱ्या झाला. गळती काढण्याच्या कामाला सकाळपासून सुरुवात झालेली असली, तरी बंद पाणीपुरवठ्यांमुळे नागरिकांची पाण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली.

शिंगणापूर ते बुटकेश्वर ब्रेक प्रेशर टँकपर्यंतच्या जलवाहिनी गुरुवारी फुटली. त्यामुळे सांयकाळी पाणीपुरवठा होणाऱ्या अनेक भागात अपुऱ्या तर काही ठिकाणी पाणीपुरवठाच होऊ शकला नाही. शुक्रवारी गळती तातडीने दुरुस्ती होणार नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. 'बी' वॉर्डमध्ये सकाळी सत्रात पाणीपुरवठा होऊ शकला. मात्र अन्य वॉर्डामध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे कळंबा व बावडा फिल्टर हाऊसमध्ये टँकरच्या मागणीसाठी दुरध्वनी खणखणू लागला. दुपारपर्यंत दोन्ही ठिकाणावरुन प्रत्येक पाच टँकरची मागणी झाली. दुपारनंतर मात्र यामध्ये अधिक वाढ झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कळंबा फिल्टर हाऊस येथून १९ तर बावडा फिल्टर हाऊस येथून १५ अशा ३४ टँकरच्या फेऱ्या झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images