Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तिहेरी शिधापत्रिकेबाबत संभ्रम दूर करण्याची मागणी

$
0
0
केंद्र सरकारने अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्याचे काम राज्य सरकारमार्फत सुरू आहे; पण तिहेरी शिधापत्रिका प्रकारात बदल केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करावा, अशी मागणी कोल्हापूर जनशक्ती पक्षाने केली आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष सुभाष वोरा आणि समीर नदाफ यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

‘लेक शिकवा’ अभियानासाठी निधी द्या

$
0
0
स‌ावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस देशभरात ‘बालिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे ३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत सरकारतर्फे राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान’ कार्यान्वित करण्यात येणार आहे.

फॅन्सी फॅड जाता जाईना

$
0
0
त्यातही दुचाकीच्या नंबरप्लेट मोठ्या प्रमाणात फॅन्सी असल्याचे दिसते. फॅन्सी नंबरप्लेट, अस्पष्ट नंबरप्लेट, नंबरप्लेट न लावता नेत्याचा फोटो लावून नियमभंग करणाऱ्या साडे पाच हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

तारतम्य आणि जल्लोषही

$
0
0
महापौर, उपमहापौरपदासह अन्य तीन समित्यांच्या सभापतींच्या निवडी गुरुवारी जाहीर करण्यात आल्या. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी झाल्या. महापौरपदी राष्ट्रवादीच्या सुनीता राऊत, उपमहापौरपदी मोहन गोंजारे, सचिन चव्हाण (स्थायी), वसंत कोगेकर (परिवहन) आणि रोहिणी काटे यांची महिला व बालकल्याणच्या सभापती‌पदी निवड करण्यात आली.

शेतकरी संघटनेचा सोलापुरात मोर्चा

$
0
0
कच्च्या साखरेच्या निर्यातीला विरोध करण्यासाठी संघटनेच्या वतीने संस्थापक खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. साखर कारखान्यांऐवजी निर्यातदार कंपन्यांना जगविण्याचाच हा खटाटोप असल्याचा आरोप यांवेळी करण्यात आला.

बेकायदेशीर बॉक्साइट उत्खनन

$
0
0
बाँक्साईट उत्खननाची कोणतीही परवाणगी नसताना उत्खनन करणाऱ्या चारजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकून ट्रक जप्त केले होते. ही कारवाई होताच सर्व मायनिंग कंपन्यांच्या कार्यालयात खळबळ उडाली.

वीटभट्टी कामगाराचा खून

$
0
0
उदगाव (ता. शिरोळ) येथे पत्नीची छेड काढल्याचा जाब विचाणाऱ्या वीटभट्टी कामगाराचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. रामा अर्जुन नगराळ वय (४५) असे मृताचे नाव आहे. खुनाच्या घटनेनंतर राजू यमनाप्पा गुदगेन्नावर हा संशयित फरारी झाला आहे.

सर्फनाला प्रकल्पाचे गावठाण ले-आउट पंधरा दिवसांत

$
0
0
आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पांतर्गत आंबाडे येथील विस्थपितांसाठी येथील मुलकी पड जमिनीमध्ये तिसऱ्या गावठाणाचा प्लॅन पंधरा दिवसात तयार होईल, अशी हमी अपर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांनी प्रकल्पग्रस्तांना दूरध्वनीवरून दिली.

थेट पाइपलाइनचा करार मराठीत करा

$
0
0
कोल्हापूर शहरावर लादलेल्या रस्ते विकास प्रकल्प आणि शिंगणापूर गळकी पाणी योजनेचा अनुभव लक्षात घेऊन टेंडर प्रक्रियेनंतर काळम्मावाडी थेट पाइपलाइनचा करार मराठी भाषेत जनतेसाठी जाहीर करावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांनी केली.

सुपरवायझरचा खून प्रेम प्रकरणातून

$
0
0
कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यातील बगॅस डेपोचा सुपरवायझर दिगंबर सुभाष गळवे (वय २१, रा. गळवेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) याचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

घाटातील वाट बिकटच

$
0
0
माळशेज घाटात एस. टी. कोसळून २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. कोल्हापूर जिल्ह्यातूनही कोकण, गोव्याला जाण्यासाठी आंबा, आंबोली आणि करूळ घाटातून जावे लागते. हे घाटही वाहतुकीच्या दृष्टीने फार सुरक्षित आहेत असे नाही.

११ जानेवारीपासून साहित्य पर्वणी

$
0
0
राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि मराठी भाषा विभागाच्यावतीने ११ ते १३ जानेवारीपर्यंत आयोजित केलेल्या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्याहस्ते दुपारी सव्वाबारा वाजता होणार आहे.

‘सेमिस्टर’वरून विद्यापीठाची ‘परीक्षा’

$
0
0
शिवाजी विद्यापीठाने सत्र परीक्षा (सेमिस्टर) पद्धत सुरू करून तीन वर्षे होत आहेत. सत्र परीक्षांचा लांबलेला कालावधी, निकालास होत असलेला उशीर यामुळे या व्यवस्थेतील दोष समोर येत आहेत. परिणामी कॉलेजिसकडून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांवर मर्यादा येत आहेत.

महापौरपदी सुनीता राऊत

$
0
0
महापौरपदी राष्ट्रवादीच्या सुनीता अजित राऊत यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे मोहन यशवंत गोंजारे यांची गुरुवारी अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत या निवडी झाल्या.

चार दिवस फक्त शाकाहार

$
0
0
मटण विक्रेत्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चिकन आणि मासे विक्रेत्यांनीही सोमवारपर्यंत (६ जानेवारी) बंद पाळण्याचा निर्णय घेतल्याने खवय्यांसह पर्यटकांनाही आणखी चार दिवस सक्तीने शाकाहारच घ्यावा लागणार आहे.

तांबडा, पांढरा; चार दिवस विसरा...

$
0
0
मटण विक्रेत्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चिकन आणि मासे विक्रेत्यांनीही सोमवारपर्यंत (६ जानेवारी) बंद पाळण्याचा निर्णय घेतल्याने खवय्यांसह पर्यटकांनाही आणखी चार दिवस सक्तीने शाकाहारच घ्यावा लागणार आहे. गुरुवारी झालेल्या मटण डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

‘लेडीज होस्टेलला सावित्रीबाई फुलेंचे नाव द्या’

$
0
0
शिवाजी विद्यापीठातील लेडिज होस्टेलला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या (युवती विभाग) नेतृत्वाखाली विद्यापीठातील होस्टेलमधील विद्यार्थिनीनी केली. विद्यार्थिनींनी एकत्र येत प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांना निवेदन दिले.

सिलिंडरवरील एलबीटी रद्द करा - मनसे

$
0
0
सांगली महापालिका सिलिंडरवर फक्त १ टक्का एलबीटी आकारत असताना कोल्हापूर महापालिका आकारत असलेला ४.२५ टक्के कर रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मास्तरकी नहीं तो कोतवाली सही!

$
0
0
कष्टाचे काम करण्यापेक्षा कमी प्रतिष्ठेची का असेना मात्र सरकारी नोकरी असावी याकडे युवकांचा कल आहे. उच्च विद्याविभूषीत युवकांना स्पर्धा परिक्षेसारखे माध्यम आहे. मात्र यामध्ये कठोर मेहनत असल्यामुळे काही पदवीधारकांनी कोतवाल भरतीमध्ये स्वारस्य दाखवले आणि ते पदही पदरात पाडून घेतले.

वाहतुकीच्या नियमांचे लहान वयातच शिक्षण द्या

$
0
0
‘युध्दात जेवढी माणसे मृत्यू पावली, त्यापेक्षाही जास्त बळी रस्ते अपघातात जातात. वाहन चालविण्याच्या नियमांचे पालन केल्यास अपघातांवर नियंत्रण येऊ शकते. लहान वयातच विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची शिकवण देण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी केले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images