Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सुंदरचे दान कायमचे ‘वारणा’च्या पदरात

$
0
0
पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत जोतिबा देवस्थानला दिलेला सुंदर हत्ती आता पुन्हा आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील वारणा उद्योग समूहाला परत दान देण्याचा निर्णय घेतला आहे. देवस्थानकडे हत्ती पोसण्याची ऐपत आहे, मात्र इतर अडचणींमुळे समितीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सुंदरचा कायमचा मुक्काम वारणानगरातच राहणार आहे.

जय‌सिंगपुरात हातभट्टींवर छापा

$
0
0
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टीची गावठी दारू विक्री रोखण्यासाठी जयसिंगपूर येथे पाचजणांवर कारवाई केली.

३ वर्षांच्या मुलीचे जटानिर्मूलन

$
0
0
खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या कोतोली (ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) येथील स्वप्नाली जयराम झोरे या तीन वर्षांच्या मुलीचे जटानिर्मूलन करण्यात आले.

२६५० रू. न देणा-यांना बेड्या ठोका

$
0
0
‘राजकारण्यांचे घोटाळे बाहेर काढून, सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळवून देणे हेच नवीन वर्षाचे उद्दीष्ट आहे. केंद्र सरकारने मदत देऊनही उसाला २६५० प्रतिटन दर न देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांना बेड्या ठोका,’ अशी जोरदार मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

दगडाने ठेचून सुपरवायझरचा खून

$
0
0
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यातील बगॅस डेपोचा सुपरवायझर दिगंबर सुभाष गळवे (वय २१, रा. गळवेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांचा दगडाने ठेचून खून केला.

शेतक-यांच्या पदरात माती

$
0
0
किरकोळ भाजपाला विक्रीला बाजार समितीचे प्रशासक डॉ. महेश कदम यांनी विरोध केल्यामुळे बुधवारी किरकोळ व्यापाऱ्यांनी भाजीपालाच खरेदी केला नाही. त्यामुळे वांगी, टोमॅटो, कोबीसारख्या भाजीपाल्यांचा दर १ ते २ रुपये किलो असा निघाला. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काही शेतकऱ्यांना तर वाहनाचे भाडेही निघाले नाही.

बांधकामांना आधार कर्नाटकी वाळूचा

$
0
0
गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्रात वाळू उपशावर असलेल्या निर्बंधाचा परिणाम वाळू टंचाईवर झाल्याने आठ-नऊ हजार रुपयांना मिळणारा ट्रक आता वीस हजार रुपयांवर गेला आहे. ही सगळी वाळू कर्नाटकातून आणली जात असून, कोल्हापुरातील सगळी बांधकामे कर्नाटकी वाळूनेच केली जात आहेत.

‘सुकन्या’ योजनेची अंमलबजावणी सुरू

$
0
0
स्त्री भ्रूण हत्त्या रोखणे, व मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘सुकन्या’ योजनेची अंमलबजावणी बुधवारपासून सुरु झाली. या योजने अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलीच्या नावावर एलआयसीमध्ये २२ हजार ५०० रुपये रक्कम जमा करण्यात येणार आहे.

अर्थसाक्षरता अभियानात दीड हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

$
0
0
मुलांना बालवयातच अर्थसाक्षरतेचे धडे मिळावेत, गुंतवणुकीसह बचतीचे महत्व कळावे आणि अगदी वाढदिवसाच्या नियोजनातूनही त्यांना आर्थिक नियोजनाची घडी बसवता यावी या उद्देशाने कोल्हापुरात घेण्यात आलेल्या ‘अर्थसाक्षरता अभियान’ या अनोख्या स्पर्धा उपक्रमात दहा शाळांतील दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

‘अक्षरधारा’चा शब्दोत्सव उद्यापासून

$
0
0
पुण्यातील अक्षरधारा संस्थेच्यावतीने पंचशतकी महोत्सवी शब्दोत्सव शुक्रवार (ता. ३) पासून सुरू होत आहे. प्रख्यात साहित्यिक व विनोदी कथालेखक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते शाहू स्मारक भवनात दुपारी २.४५ वाजता उद्घाटन होणार आहे.

प्रवाशांना अभिवादनाने नववर्षाची सुरुवात

$
0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रतिमा प्रवाशांच्यात उज्जवल करण्यासाठी एसटी वाहकांनी बुधवारी प्रवाशांना अभिवादन केले. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवासी या उपक्रमाने भारावून गेले. प्रवाशांना गुलाबपुष्प देण्यात आले. एसटीच्या विविध सेवा आणि प्रवासाची माहिती दररोज देण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.

‘एक्साइज’ला फुटला ‘घाम’

$
0
0
मद्य पिणाऱ्यांची संख्या वाढत असतानाही महसूल वाढण्याऐवजी कमी झाला असल्याचे एक्साइज विभागाला ऐन थंडीत घाम फुटण्यासारखी स्थिती झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत डिसेंबर महिन्यातील महसूल ४३ लाख रुपयांनी घटला आहे.

शाहू पुतळ्याच्या चौथ‍ऱ्यात बदल नको

$
0
0
महापालिकेच्यावतीने दसरा चौकातील शाहू पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याचे नियोजन आहे. मात्र, हे करताना त्याच्या मूळ स्वरूपात म्हणजेच पुतळ्याभोवतीचा अष्टकोनी चौथरा आणि अष्टकोनी स्तंभ यांच्यात बदल न करण्याची मागणी सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राने केली आहे.

बुद्धिबळाच्या पटावर

$
0
0
हॅलो एव्हरीवन! सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! मराठीतून लिहिण्याचा हा माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग आहे. आधी मी थोडी माझ्या व्याकरणाबद्दल साशंक होते, पण लगेचच माझ्या लक्षात आले की, इथे भाषेपेक्षा माझे बुद्धिबळाच्या पटावरील व पटामागील अनुभव, विचार व भावना आपल्या सर्वांसोबत ‘शेअर’ करणे जास्त महत्त्वाचे आहे.

जैवविविधतेचा अभ्यास हवा

$
0
0
शहरात पूर्वी मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येत होती. वेगवेगळे परिसर पक्षिजीवन, दुर्मिळ वृक्ष, सरपटणारे प्राणी, कीटक, फुलपाखरे यांच्यासाठी प्रसिद्ध होते. पण कालौघात या जैवविविधतेला ग्रहण लागून त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

होणार रेनवॉटर हार्वेस्टिंग सेंटर

$
0
0
शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंग संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग सेंटर उभारण्याचा निर्णय भारतीय जल संस्कृती मंडळाने घेतला आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे.

परवडणारी घरेही महाग

$
0
0
रेडीरेकनरच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत झालेल्या वाढीचा बोजा ग्राहकांवरच येऊन पडणार आहे. या वाढीमुळे ग्राहकांकडून भरल्या जाणाऱ्या स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फीबरोबरच महापालिकेकडे भरावे लागणाऱ्या प्रीमिअम शुल्कातही वाढ होणार आहे.

डेंजरस मोबाइलवाले मोकाटच

$
0
0
मोबाइलवर बोलत वाहन चालवणाऱ्या संख्या वाढत चालली असताना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून अशा डेंजरस पीपलकडे दुर्लक्षच होत असल्याचे चित्र आहे.

आम्ही उपरेच आहोत का ?

$
0
0
वृध्द कलाकारांच्या मानधनाचा रेंगाळलेला प्रश्न, विम्याचे संरक्षण नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन केला जाणारा प्रवास, मुलांच्या शिक्षणाची अडलेली गाडी, शिक्षण सोडून मुलींना बारीवर नाचण्यासाठी करावी लागणारी कसरत, गृहनिर्माण योजनेच भिजत घोंगडं आणि संघटनेला एकत्र येण्यासाठी सांस्कृतिक हॉलची वानवा अशा अनेक समस्यांचा पाढा वाचत कोल्हापूर कलापथकाच्या वर्धापनदिनी कलाकारांच्या ओठावर एकच खंत आली की आम्ही उपरेच आहोत का?

तर कंपन्या, वितरकांवर फौजदारी

$
0
0
‘ग्राहकांना फसवणाऱ्या गॅस कंपन्या आणि वितरकांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल’ असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांनी गुरुवारी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात गॅस कंपन्याचे विक्री अधिकारी, वितरक व ग्राहकांची संयुक्त बैठक जिल्हा प्रशासनाने घेतली. यावेळी ग्राहकांनी असंख्य तक्रारी मांडल्या.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>