Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘आरटीई’ अंतर्गत दुसरी प्रवेश फेरी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतल बालकांना २५ टक्के राखीव कोट्यातून प्रवेश देण्याच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे कार्यालयाकडून शनिवारी दुसरी लॉटरी काढण्यात आली.

एनआयसी सेंटर पुणे यांच्याकडून दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थी निवड यादी आरटीई पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाइलवर शाळेच्या नावासह एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. मात्र पालकांनी मेसेवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अॅप्लिकेशन वाइस डिटेल्स अथवा सिलेक्टड व नॉट सिलेक्टड या टॅबवर जाऊन आपला फॉर्म नंबर लिहून लॉटरीची खात्री करावी असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी केले आहे. आरटीईअंतर्गत पहिली प्रवेश फेरी पूर्ण झाली. दुसऱ्या फेरीतील विद्यार्थी प्रवेशाचा कालावधी आरटीई पोर्टलवर नमूद करण्यात येणर आहे. या कालावधीत संबंधित पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांनी पुढील फेरीमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत जागरुक राहावे, मुदतीत शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून शाळेमध्ये प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कळंब्यात तापाची साथ, २० डेंगीसदृश्य रुग्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर तालुक्यातील कळंबा तापाची साथ पसरली आहे. गेल्या काही दिवसांत डेंगीसदृश्य २० रुग्ण आढळले आहेत. डेंगीसदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शनिवारी गावात प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी पावले उचलली. नागरिकांनी पाण्याचा साठा करू नये असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

कचरा उठाव, अस्वच्छता यामुळे नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषद सदस्या मनीषा टोणपे यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. तसेच त्यांनी आरोग्य विभागालाही उपाययोजनेच्या सूचना केल्या होत्या. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर विविध भागाची तपासणी केली. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकार मंत्री सुभाष देशमुख झाले सायकलस्वार

$
0
0

सहकार मंत्री सुभाष देशमुख झाले सायकलस्वार

सोलापूर :

'सायकल प्रवास प्रदूषण मुक्तीसाठी, सायकल प्रवास स्वतःच्या आणि पर्यावरणाच्या स्वास्थ्यासाठी,' असा संदेश देत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात सायकलवरून प्रवास केला. येत्या काळात जमेल त्या प्रमाणे सायकलवर प्रवास करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

शनिवारी सकाळी बालाजी सरोवर येथे नियोजित उद्योजकांच्या बैठकीला सहकार मंत्री सुभाष देशमुख सायकलवरून पोहोचले. रोजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक युगात स्वतःकडे आणि निसर्गाकडे सवडीने वेळ देणारे खूप कमी लोक आहेत आणि सर्वांना हे शक्य होत नाही, पण प्रत्येकांनी ठरवून आठवड्यातून एक दिवस तरी सायकल प्रवास करून जीवनात बदल घडवला पाहिजे. या निमित्ताने स्वतःचे स्वास्थ आणि पर्यावरणाचा समतोल दोन्ही साधणे शक्य होईल, असे ही देशमुख म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी पेटवली;सक्तमजुरीची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहशत निर्माण करण्यासाठी दुचाकी आणि हातगाडी पेटवून दिल्याप्रकरणी दोघांना महिनाभर सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पवन गोरोबा वाघमारे (वय १९) आणि आकाश ऊर्फ विक्की राम पवार (१९, दोघेही रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) यांना शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनी फिर्यादी रमेश हरीलाल गुप्ता ( ४५ रा. पिंपरी) यांनी फिर्याद दाखल केली होती. खटल्याचे कामकाज सरकारी वकील मोनिका निकम यांनी पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. या प्रकरणाचा तपास पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक व्ही. बी. बढे यांनी केला.

फिर्यादींची दुचाकी आणि हातगाडी ३० ऑक्‍टोबर २०१६ रोजी रात्री एकच्या सुमारास पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आली होती. फिर्यादी यांनी शेजारी राहणाऱ्यांच्या मदतीने दुचाकी व हातगाडी विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्या जळून खाक झाल्या होत्या. घटना घडल्यानंतर फिर्यादी यांच्या घराजवळ असलेल्या एका बंगल्यातून आरोपींना स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. त्या वेळी वाघमारे आणि पवार याने तय्याब अत्तार यांच्या हाताला चावा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ संस्थांवर कारवाईचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १८ संस्थांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्यावर भविष्यनिधी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा सहायक भविष्य निधी आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला.

पत्रकात म्हटले आहे की, कंपनी, संस्थांनी आस्थापनावरील कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरणे बंधनकारक आहे. पाच जिल्ह्यातील अनेक संस्था, कंपन्यांनी २०१७पासून निर्वाहनिधीची रक्कम भरलेली नाही. आजरा साखर कारखाना, मारुती गारमेंट्स (गोकुळ शिरगाव), घाटगे-पाटील ट्रान्स्पोर्ट (कोल्हापूर), रिलायबल शुगर डिस्टिलरी पॉवर लि. (कोल्हापूर), अॅक्टिफ कार्पोरेशन लि. (कोल्हापूर), हॉलीवूड अकादमी (पन्हाळा, कोल्हापूर) यांच्यासह १८ संस्थांनी नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूवाडी : रखडलेले प्रश्न

$
0
0

रखडलेले प्रश्न

शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघ

०००००

औद्योगिकीकरणाला खीळ

निधीच्या तुलनेत विकास कमीच; लघुपाटबंधारे प्रकल्पासह पर्यटनाला ब्रेक

चंद्रकांत मुदुगडे, शाहूवाडी

शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचा बराचसा भाग डोंगरी, दुर्गम वाड्यावस्त्यांनी व्यापलेला. साहजिकच येथे सोयीसुविधांची वानवा. आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी गेल्या साडेचार वर्षांत मतदारसंघातील मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यात सर्वाधिक विकासनिधी खेचून आणला. मात्र, तालुक्यातील औद्योगिकीकरणाला बसलेली खीळ लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना चिंतन करायला लावणारी आहे.

सरकारच्या नवीन नियमावलीने तालुका औद्योगिक वसाहतीचा घेतलेला बळी, विविध नवउद्योग निर्मितीकडे दुर्लक्ष आणि याबाबत दबावाऐवजी कट्टर गटातटाच्या राजकारणात धन्यता मानणारी येथील जनतेची मानसिकता, आदी कारणांनी उद्योगरथाची चाके तालुक्यात फिरू शकलेली नाहीत. साहजिकच वाढत्या उपद्रवी बेरोजगारीने तालुक्याचा कानाकोपरा पोखरला आहे. यातून बुद्धिवंतांची खाण म्हणून निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक तरुणांनी मोठ्या पदांवर झेप घेतली असली तरी त्यामुळे नेत्यांवर येणारा बेरोजगारीचा आळ मात्र पूर्णविराम घेऊ शकत नाही, हेच येथील वास्तव आहे. भरीत भर म्हणून की काय तालुक्यात अपवादात्मक परिस्थिती सोडता व्यावसायिक, औद्योगिक शिक्षणाच्या संधीही उपलब्ध झालेल्या नाहीत.

मतदारसंघाचा निम्मा अधिक भाग कोरडवाहू आहे. यावर उपाय म्हणून अस्तित्वात येऊ पाहणारे रणवरेवाडी, तळपवाडी, सोनुर्ले यांसारखे महत्त्वाकांक्षी लघुपाटबंधारे प्रकल्प कमालीचे रखडल्याने जल-जमीन समीकरण विकासाकडे सरकू शकलेले नाही. साडेतीन दशकांहून अधिक काळ रखडलेला आणि उपयुक्ततेच्या मुद्द्यावर टीकेचे लक्ष्य ठरलेला वारणा उजवा कालवा सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतरही (सुप्रमा) निधीअभावी लटकलेला आहे. जलयुक्त शिवारसारख्या जलसंधारण मोहिमेचा 'ठेकेदारी'शिवाय अन्य कोणत्या घटकाला लाभ झालेला नाही. त्यामुळे कोरडेपणाचे हे लेणे तालुक्याला आणखी किती काळ माथी घेऊन मिरवावे लागणार आहे? या प्रश्नाचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले असावे.

विशेषतः या भागातील नागरिक भात, नाचणी, रताळी उत्पादनानंतर रोजगाराच्या प्रतीक्षेत राहतात. याच भागात वन आणि खनिज संपत्तीची मुबलकता आहे. आजवर या संपत्तीलाच लुबाडण्याचा 'उद्योग' फोफावत राहिला. त्यामुळे तालुक्याच्या अलौकिक निसर्गसौंदर्यास जणू दृष्ट लागल्याचे भयाण वास्तव स्वीकारण्यावाचून पर्याय उरलेला नाही. बांबवडे येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम गेल्या तीन तपांपासून रखडले आहे. निधी मंजुरीचा खेळ खेळून आता ते थकलेल्या अवस्थेत आहे. कोडोली (ता. पन्हाळा) सारख्या निमशहरी गावात एकाच छताखाली प्रशासकीय सेवा मिळावी म्हणून ग्रामस्थांचा आग्रह राहिला असताना त्याकडेही आजवरच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. येथील बसस्थानकाच्या विस्तार आणि नूतनीकरणातील 'संथ गती' आणि येळाणे (ता. शाहूवाडी) बसस्थानकाची अडखळत सुरू असलेली वाटचाल या बाबीही लोकप्रतिनिधित्वाची कसोटी पाहणाऱ्या आहेत.

ऐतिहासिक विशाळगड परिसर, अणुस्कुरा, जुगाई येळवण परिसर, उदगिरी व धोपेश्वर तसेच पन्हाळगड, आदींसह अनेक ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने विशिष्ट उंचीवर नेण्याची संधी असूनही त्यादृष्टीने पावले उचलली गेली नाहीत. साहजिकच घाटमाथ्यावरील दिशाहीन पर्यटनाचा श्वास कित्येक वर्षे गुदमरतो आहे.

०००००

कोट....

मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती डोंगराळ आणि नैसर्गिक अडचणीची आहे. केंद्र सरकारच्या बदललेल्या धोरणानुसार प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाला ८० टक्के ग्रामस्थांची संमती मिळत नाही. प्रकल्प स्थलांतरित करायचा म्हटल्यास अन्यत्र आवश्यक गायरान उपलब्ध नाही. उर्वरित ग्रीन झोनमध्ये छोट्या-छोट्या प्रक्रिया उद्योगांच्या उभारणीसाठी संबंधित विभागांकडे प्रस्ताव सादर करण्याचे विचाराधीन आहे. रखडलेल्या पाटबंधारे प्रकल्पांना वाढीव निधीसह 'सुप्रमा'त शर्थीने यश मिळाल्याने ते लवकरच मार्गी लागणार आहेत. मतदारसंघाच्या विकासात योगदान देण्यासाठी जे काही करता येईल, ते सर्व करण्यासाठी प्राधान्य राहणार आहे.

आमदार सत्यजित पाटील

०००००

पॉइंटर्स...

- नवे उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारीत वाढ

- लघु पाटबंधारे प्रकल्प खोळंबले

- जलसंधारणाची कामे ठप्प

- पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष

- विशाळगड, अणुस्कुरा, जुगाई येळवण, उदगिरी, धोपेश्वर,

- पन्हाळागडाचे पर्यटन कधी बहरणार?

- क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान

- पाच वर्षांनंतरही कामे 'विचाराधीन'

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताराबाई रोडवर अतिक्रमण हटवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वटपोर्णिमेच्या निमित्ताने ताराबाई रोडवर आंबे, फणससह इतर साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवण्यात आले. महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाला संबधित विक्रेत्यांनी विरोध केल्याने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. शहरातील महाव्दार रोड व ताराबाई रोडवरील अतिक्रमण हटावाची कारवाई गेले काही दिवस सुरू आहे. शनिवारी या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमण हटवण्यास सुरूवात केली. त्याला विरोध झाला. त्यामुळे पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला. यावेळी विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईवेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पंडित पोवार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत शाळांवर होणार कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारच्या मान्यतेशिवाय जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत शाळांत प्रवेश घेऊ नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी केले आहे. संस्थाचालकांनी या शाळा त्वरित बंद कराव्यात अन्यथा शिक्षण हक्क अधिनियमानुसार कारवाई केली जाईल असा इशारा विभागाने दिला आहे.

शिक्षण विभागाने, अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये विद्याजंली प्राथमिक विद्यालय कोंडिग्रे, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल शिरदवाड, परिवर्तन प्राथमिक शाळा शिरदवाड या शिरोळ तालुक्यातील शाळा अनधिकृत आहेत. कागल तालुक्यातील ज्ञान प्रबोधिनी इंग्लिश मीडियम स्कूल बाचणी, श्रीमती शांताबाई मगदूम माध्यमिक विद्यालय निढोरी, अराईज इंग्लिश स्कूल म्हाकवे या शाळांना सरकारची मान्यता नाही. हातकणंगले तालुक्यातील संस्कार बाल विद्यामंदिर आळते, शिवमुद्रा प्रायमरी स्कूल आळते, ज्ञानगंगा विद्यालय सैनिक पॅटर्न निवासी व अनिवासी शाळा (रांगोळी) अनधिकृत असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महामंडळातर्फे नॅपकीन उत्पादनास प्रोत्साहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मासिक पाळीवेळी महिलांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकीन विकत घेणे परवडत नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी स्टेपअप फाउंडेशनच्या मदतीने सामान्य, गरीब महिलांना परवडेल अशा दरात सॅनिटरी नॅपकीन उत्पादीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,' असे प्रतिपादन महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी शनिवारी केले. सरोजीनिदेवी विश्वनाथ विश्वस्त मंडळातर्फे स्वयंसिद्धा संस्थेच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रामगणेश गडकरी सभागृहात कार्यक्रम झाला.

अध्यक्षा ठाकरे म्हणाल्या, 'बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या महिलांना मासिक पाळी दरम्यानच्या वेदना सहन होत नाहीत. उपचार घेणे परवडत नाही. या कारणांमुळे गर्भाशय पिशवी काढून घेत असल्याचे काही दिवसांपूर्वी पुढे आले. म्हणून राज्यातील महिला बचत गटातर्फे स्वस्तात सॅनिटरी नॅपकीन वितरण करण्यासाठी महामंडळ धडपडत आहे. त्यासाठी स्टेपअप फाउंडेशनची मदत मिळाली आहे. लवकरच त्याचे उत्पादन सुरू होईल. जन्मताच बचत करणे, प्रामाणिकपणा, सचोटी, कष्ट करण्याचे गुण महिलांकडे असतात. याच जोरावर त्या छोटे-मोठे उद्योग करून स्वावलंबी बनत आहेत. अशा महिलांना स्वयंसिद्धा पाठबळ देत आहे. समाजातील खालच्या स्तरातील गरजू महिलांना व्यवसायासाठी संस्था मदत करत आहे, हे कौतुकास्पद आहे. सरकारची कोणतीही आर्थिक मदत न घेते असे काम केले जात आहे हे विशेष.'

अध्यक्षा ठाकरे म्हणाल्या, 'राज्यात बचत गटांच्या माध्यमातून महिला एकत्र येत आहेत. महामंडळाने प्रोत्साहन दिल्याने राज्यात १४ लाख महिला बचत गट तयार झाले आहेत. त्यापैकी साडेसात लाख महिला सक्षम झाल्या आहेत. त्यांना उद्योग, व्यवसायासाठी विविध बँकांनी २ हजार ५५६ कोटींचे कर्ज वितरण केले. इतक्या कर्जाची परतफेड संबंधीत महिलांनी प्रामाणिकपणे परतफेड केली. म्हणूनच बँका महिला बचत गटांकडे जाऊन कर्ज घेण्याचे आवाहन करीत आहेत.'

यावेळी ठाकरे यांना कै. मधुकर सरनाईक परिवर्तन दूत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. इतर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सन्मान मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमात नृत्य, गणेश, शिववंदना, गीत, अभिनय गीत, कृष्ण नृत्य सादर करण्यात आले. तृप्ती पुरेकर यांनी प्रास्ताविक केले. संतोष माने यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्वयंसिद्धाच्या संचालिका कांचन परूळेकर, सरोजिनीदेवी विश्वनाथ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, उगार महिला मंडळाच्या अध्यक्षा स्मिता शिरगांवकर, डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्या तिरोडकर, स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा जयश्री गायकवाड आदी उपस्थित होते. सुनिता शिरगोपीकर यांनी सूत्रसंचालन तर तृप्ती पुरेकर यांनी आभार मानले.

पुरस्कार प्राप्ता मान्यवर असे

स्मिता शिरगावकर (उगार, कर्नाटक), अभिजित सोनवणे (पुणे), स्वामिनी महिला बचतगट (वेंगुर्ला), विश्वनाथ आपटे, वैशाली आपटे, संतोष माने (बोरमाळ, ता. शाहूवाडी), दीपक कांबळे (तरसंबळे), ज्योती चव्हाण (कोल्हापूर), स्नेहल पवार, साक्षी लोहार (कोल्हापूर), किर्ती कुळे (आरवली, जि. सिंधुदूर्ग), शंकुतला औंधकर (कोल्हापूर), साहील शेख, ओंकार खोपडे, बन्सी पटेल, प्रतिक्षा कुऱ्हाडे, सोनू गोरल, सिद्धी हुंबे, शिवमाला भोसले, निर्मला शिंदे, माधुरी हांडे, सुचेता बेंडके, सुर्यप्रभा भोसले, पल्लवी नलवडे, वैशाली चौगुले, नीता दटमजगे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंशदायी’च्या चौकशीसाठी समिती

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : अंशदायी निवृत्ती पेन्शन योजनेसाठी जिल्हा परिषद सेवेतील १५३७ कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेल्या रकमेचा घोळ आणि पावत्या देण्यातील दिरंगाईच्या चौकशीसाठी नुकतीच त्रिसदस्यीय समितीची निवड करण्यात आली. समितीने चौकशी करून पंधरा दिवसांत अहवाल द्यावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत. चौकशी अहवालानंतर कपात रकमेच्या पावत्या संबंधित कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कोणामुळे विलंब झाला हे शोधणे, त्यांच्यावर दोष आणि जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

एक जानेवारी २००५ नंतर जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू झाली. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेमधील १५३७ कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि ग्रेड पेची १० टक्के रक्कम कपात झाली. तितकीच रक्कम सरकारकडून जमा करून घेणे आणि पगारातून कपात अशा दोन्ही रकमेच्या पावत्या प्रत्येक महिन्यास संबंधित कर्मचाऱ्याला देणे बंधनकारक होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले. विविध खाती आणि वित्त विभागाच्या समन्वयामुळे या गोष्टीस वेळ लागला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले.

कपात रक्कम आणि सरकारकडून रकमेचे काय केले, असे प्रश्न उपस्थित होत गेले. शेवटी हा विषय जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेकडे गेला. संघटनेने पगारातील कपात आणि सरकारकडून दरमहा पेन्शनपोटी जमा झालेल्या रकमेच्या पावत्या द्या, अन्यथा काम बंद आंदोलन करू, अशा इशाऱ्याचे निवेदन सीईओंना देण्यात आले. त्यानंतर युद्धपातळीवर पावत्यांचा शोध घेणे, सरकारशी पत्रव्यवहार करून पेन्शनसाठीची दरमहाची रक्कम मिळविण्यात वित्त विभागाला यश आले. कर्मचारी आणि वर्षनिहाय पेन्शन रकमेच्या पावत्या तयार करून वाटपाचे काम केले जात आहे.

दरम्यान, पावत्या देण्यात विलंब कुणामुळे झाला, त्यास दोषी कोण, दप्तर दिरंगाई कोणाची त्याच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. पंधरा दिवसांत समितीमधील तीन सदस्यांनी वेगवेगळ्या विभागांकडून पगार कपातीच्या रकमेचा धनादेश वेळेत जमा करणे, पावत्या तयार करण्याचे काम करण्याची जबाबदारी त्यावेळी वित्त विभागातील कोणाची होती, ते अधिकारी, वरिष्ठ सहायक आणि तालुका पातळीवरील संबंधित टेबल पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे.

००००

कोट...

अंशदायी पेन्शन योजनेसाठी कपात रकमेच्या पावत्या देण्यात विलंब झालेल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीईओंच्या आदेशाने समिती नियुक्त केली आहे. त्यांना पंधरा दिवसांत अहवाल देण्याची मुदत दिली आहे. वित्त विभागाकडे आता सर्व कर्मचाऱ्यांच्या पावत्या तयार आहेत. त्या दिल्या जात आहेत.

संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि. प.

००००

५५ कोटींच्या पावत्या तयार

२०१० पासून आतापर्यंत पेन्शन योजनेच्या प्रलंबित पावत्यांचा हिशेब लावण्यात वित्त विभागास यश आले आहे. १५३७ कर्मचाऱ्यांच्या पगारातून २२ कोटी ३१ लाख ४ हजार २८३, सरकारच्या हिश्श्यापोटीचे २२ कोटी ३१ लाख ४ हजार २८३, सहाव्या वेतन आयोगातील फरकाचे ५२ लाख २९ हजार २४७, व्याजाचे १० कोटी १५ लाख ४८ हजार ४३७ रुपयांच्या पावत्या कर्मचारीनिहाय तयार केल्या आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ ६७ शिक्षकांची आज सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोयीच्या ठिकाणच्या बदलीसाठी चुकीची माहिती भरणाऱ्या ११५ पैकी ६७ शिक्षकांची रविवारी (ता. १६) जिल्हा परिषदेत फेरसुनावणी होणार आहे. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्यावर बदलीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात शिक्षकांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

कोर्टाने त्या शिक्षकांची कागदपत्रे तपासणी व सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासमोर ६७ शिक्षकांची सुनावणी होईल. प्राथमिक शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना रविवारी कामावर हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. संबंधित शिक्षकांच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी होणार आहे. सोमवारपासून शाळांना सुरुवात होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १०५० शिक्षकांच्या बदल्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. शिक्षण विभागाने शुक्रवारीच शिक्षकांना नोटिसा लागू केल्या आहेत. दुसऱ्या जिल्ह्यात बदलून गेलेल्या ५७ शिक्षकांनी बदलीचे आदेश तत्काळ मिळावेत यासाठी शनिवारी जिल्हा परिषदेत धाव घेतली. सीईओ, शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. तत्काळ प्रक्रिया पूर्ण करा म्हणून गडबड करणाऱ्या काही शिक्षकांना प्रक्रियेनुसार कामे होतील असे अधिकाऱ्यांनी सुनावल्याचे वृत्त आहे.

लोकप्रतिनिधी, मंत्र्याची शिफारस पत्रे

जिल्ह्यातील सुगम, दुर्गम ऑनलाइन प्रक्रियेंतर्गत शिक्षकांच्या बदल्या प्रक्रियेला सुरुवात झाली. ऑनलाइनद्वारे बदलीसाठी २० ठिकाणची पसंतीक्रम नोंदवायचे आहे. मात्र अनेक शिक्षकांना प्राधान्यक्रमाने नोंदविलेल्या ठिकाणी बदली मिळाली नाही. अन्य ठिकाणी त्यांची बदली झाल्यामुळे काही शिक्षकांनी पुन्हा एकदा सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी म्हणून जिल्हा परिषद गाठले. लोकप्रतिनिधी व मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत काहीजणांनी शिफारसपत्रे जोडली आहेत. मात्र अधिकाऱ्यांनी बदली प्रक्रिया ऑनलाइन होत असल्यामुळे त्यामध्ये फेरफार करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.

सोमवारी 'शाळा प्रवेशोत्सव'

नव्या शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून (ता. १७) सुरुवात होत आहे. महापालिका व जिल्हा परिषदेतर्फे सोमवारी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम होणार आहे. शिवाय सहा ते चौदा वयोगटातील मुलांची १०० टक्के पटनोंदणी होण्यासाठी शालेय स्तरावर स्वागत सोहळे होणार आहेत. मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण, शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थांचे वाटप शाळेच्या पहिल्या दिवशी करण्यात येणार आहे. शहरात महापौर, आयुक्त, नगरसेवक हे मुलांचे स्वागत करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांना सूचना केल्या आहेत. पटनोंदणी, प्रभातफेरी, मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप होईल. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, पदाधिकारी हे विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. 'पालकांनी सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांची शाळेमध्ये नोंदणी करावी' असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले आहे.

लोगो : जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवारांची मध्यस्थी अपयशी (राजे वाद एकत्र)

$
0
0

उदयनराजे-रामराजे वाद पेटला

म. टा. वृत्तसेवा, मुंबई/सातारा

नीरेच्या पाण्यावरून सुरू झालेला खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. हा वाद निवळावा यासाठी शरद पवारांनी शनिवारी बोलावलेली बैठकही निष्फळ ठरली आहे. उदयनराजे चिडून बैठकीतून बाहेर पडल्याने त्यांच्यातील वादावर तोडगा निघू शकला नाही.

नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून राजकारण तापलेले असताना उदयनराजे भोसले यांनी १४ वर्षे बारामती-इंदापूरला ज्यादा पाणी देण्यावरून रामराजे नाईक निबाळकरांवर जोरदार टीका केली होती. त्या नंतर या टीकेला उत्तर देताना रामराजेंनी उदयनराजेंवर खालच्या पातळीवरील टीका केली होती. तसेच पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे उदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू, असा इशारा दिला होता. दरम्यान, उदयनराजेंवरील टीका सहन न झाल्याने त्यांच्या समर्थकांनी शनिवारी साताऱ्यात रामराजेंचा पुतळाही जाळला. त्यामुळे हा वाद अधिक विकोपाला जाऊ नये यासाठी शरद पवारांनी मुंबईत शनिवारी दुपारी या दोन्ही नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच चिडलेले उदयनराजे बैठकीतून बाहेर पडले. त्या नंतर त्यांनी थेट पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली. 'रामराजेंनी माझ्यावर स्वयंघोषित छत्रपती अशी टीका केली. मी स्वयंघोषित छत्रपती नाही, लोकांनी त्यांच्या मनात मला ते स्थान दिले आहे. छत्रपतींच्या घराण्याचा मी कधीही वैयक्तिक स्वार्थासाठी वापर केला नाही. रामराजेंनी मला चक्रमही म्हटले, हो मी चक्रम आहे, लोकांवर अन्याय होत असेल तर मी चक्रम आहे. मला अन्याय सहन होत नाही. तुम्ही सभापती आहात, सभापतींसारखे वागा. रामराजे निंबाळकर वयाने मोठे आहेत, म्हणून त्यांचा मान राखला. माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती. कुणाचेही ऐकून घ्यायला मी लेचापेचा नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो घ्यावा. रामराजेंना जर पक्ष सोडून जायचे असेल तर कुशाल जावे, त्यांना माझ्या आड दडू नये, असेही उदयनराजे म्हणाले.

......

रामराजेंची भाटगिरी, कृष्णा खोरेची ३२ हेक्टर जागा बारामतीकरांना दिली

सातारा : बारामतीची इमाने इतबारे भाटगिरी केली म्हणून २0 वर्षे मंत्रिपद, सभापतिपद मिळाले. या कालखंडात पाठबंधारे विभागाची सुमारे ३२ हेक्टर जागा बारामतीकरांच्या विविध संस्थाकरिता त्यांच्या घशात घातल्या. खंडाळा फलटणचे मतदार आणि शेतकऱ्यांच्या जीवावर राजकीय कारकिर्द उभी राहिली, त्या मतदार शेतकऱ्यांना पाणी मिळते आहे. तर या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी फार मोठे संकट कोसळल्यासारखे अवस्था त्यांची झाली आहे. रामराजेंवर आता मिरजच्या कृष्णामाई रुग्णालयात उपचार करण्याची गरज आहे. त्यांनी आता विश्रांती घ्यावी, अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केली. दरम्यान, रामराजेची पिवळी शिधा पत्रिका आहे. अल्प उत्पन्न गटातील असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांनी मुंबईत सरकारी फ्लॅट घेतल्याचा गौप्यस्फोट ही त्यांनी केला.

...............

फलटणमध्ये बंद

विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन सातारा येथे करण्यात आल्याने फलटण शहरातील लघु व्यावसायिक संघटना व रामराजे समर्थकांनी फलटण शहर बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद शहर व परिसरात उमटले. शहरात तणाव पूर्ण शांतता होती या घटनेच्या निषेधार्थ फलटण बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते शहरातील रस्त्यावर उतरले. प्रमुख कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले. या आवाहनास फलटणवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून शहरातून बाईक रॅली काढली होती. या बाईक रॅलीचे नेतृत्व पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्‍वजित राजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

.........

रामराजेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

सातारा :

सातारा जिल्ह्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. रामराजेंनी उदयनराजेंवर स्वयंघोषित छत्रपती म्हणून टीका केल्यानंतर उदयनराजे भोसले समर्थकांनी शनिवारी दुपारी पोवई नाक्यावर रामराजेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पोवई नाका येथे रामराजेंच्या पुतळ्याचे दहन करून त्यांच्या वक्तव्याचा निषेधही केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीबीएस’समोर पुन्हा खासगी ट्रॅव्हल्स

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सना वटेश्वर मंदिर ते ताराराणी चौक परिसरात थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. यातील बहुतांश ट्रॅव्हल्स पुन्हा सीबीएस परिसरातच थांबत असल्याने या परिसरातील ट्रॅव्हल्सची, वाहनांची, प्रवाशांची गर्दी वाढत आहे. महानगरपालिकेने ट्रॅव्हल्ससाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था न केल्यास आगामी काळात सीबीएस ते ताराराणी चौक परिसरात वाहतूक कोंडीचा धोका वाढणार आहे.

बहुतांश खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची कार्यालये सीबीएस परिसरात आहेत. मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणारे प्रवासी मिळावेत, यासाठी ट्रॅव्हल्स कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू असते. दिवसभर ट्रॅव्हल्सची वर्दळ वाढत असल्याने अन्य वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी खासगी ट्रॅव्हल्सना सीबीएस परिसरात थांबण्यास मनाई केली होती. वटेश्वर मंदीर ते ताराराणी चौक या परिसरात रस्त्याकडेला थांबण्याची मुभा ट्रॅव्हल्सना दिली. याशिवाय प्रवासी घेण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकासमोरून दाभोलकर कॉर्नरमार्गे पुन्हा बाहेर पडण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या.

विशेषत: गर्दीच्या काळात रात्री आठपर्यंत सीबीएस परिसरात खासगी ट्रॅव्हल्स थांबू नयेत, याची दक्षता घेतली जात होती. गेल्या काही दिवसात मात्र पुन्हा ट्रॅव्हल्स सीबीएस परिसरात थांबत आहेत. पोलिस हटकत नाहीत, तोपर्यंत त्या रस्त्याकडेलाच उभ्या असतात. रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान दाभोलकर कॉर्नर, स्टेशन रोड, ताराराणी चौक या परिसरात ट्रॅव्हल्सचीच कोंडी असते. अनेक ट्रॅव्हल्स रस्त्यात मध्यभागी थांबवल्या जातात. स्टेशन रोडवरील अयोध्या टॉवर आणि प्रभाकर प्लाझासमोरही ट्रॅव्हल्स थांबवल्या जातात. यामुळे अन्य वाहनधारकांची कोंडी होते.

ट्रॅव्हल्समुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महानगरपालिकेकडे स्वतंत्र बस अड्ड्याची मागणी केली होती. यानुसार ताराराणी चौकातील फायर स्टेशनच्या मागील जागेत बसअड्डा तयार करण्याचा निर्णयही झाला होता. पोलिसांसह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणीही केली. मात्र, याबाबत पाठपुरावा झाला नाही. परिणामी खासगी ट्रॅव्हल्स पुन्हा सीबीएस परिसरात गर्दी करीत आहेत.

पोलिस व खासगी ट्रॅव्हल्स मालकांच्या बैठकांमध्ये अनेकदा रस्त्यावरील पार्किंगवरून खडाजंगी झाली. बहुतांश ट्रॅव्हल्स कंपन्यांची कार्यालये महालक्ष्मी चेंबरमध्ये असल्याने व्यावसायिक दृष्टिकोणातून ट्रॅव्हल्स मालक सीबीएस परिसरात थांबण्याचा आग्रह धरतात. बसअड्ड्यासाठी पर्यायी जागा मिळाल्यास त्या जागेत जाण्यासही ते तयार आहेत. मात्र, महापालिकेकडून गांभीर्याने जागेबाबत हालचाली होत नाहीत. ताराराणी चौक परिसरातील बसअड्ड्याची पाहणी करून महिन्याभरात जागा ताब्यात देण्याचे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र, या जागेतील अतिक्रमण काढण्याचेही काम महापालिकेने केलेले नाही. वाहतूक सोयींबाबत महापालिकेची हीच उदासिनता कायम राहिल्यास येणाऱ्या काळात सीबीएस परिसरातून पायी चालणेही कठीण होण्याचा धोका आहे.

गाडी अड्ड्याचा पर्याय

व्हिनस कॉर्नर येथील गाडी अड्ड्याची जागा रिकामी करून तिथे तात्पुरत्या स्वरुपात ट्रॅव्हल्ससाठी बसअड्डा होऊ शकतो. बहुमजली पार्किंग इमारत तयार करताना बेसमेंटची जागा बसअड्ड्यासाठी ठेवता येईल. दसरा चौकातून बसअड्ड्यात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स व्हिनस कॉर्नर येथून बाहेर पडतील. एकेरी वाहतुकीमुळे अन्य वाहनांनाही अडथळा होणार नाही. हा बसअड्डा पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्ससाठी वापरात येईल, तर दक्षिणेकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्ससाठी ताराराणी चौकातील बसअड्डा वापरात येऊ शकतो. या पर्यायांवर गांभीर्याने विचार होणयाची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सीबीएस परिसरात ट्रॅव्हल्समुळे वाहतूक कोंडी होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे. पोलिसांच्या गैरहजेरीत सीबीएस परिसरात थांबून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवायाही केल्या जात आहे. मात्र, केवळ दंड करून हा प्रश्न सुटणार नाही. खासगी ट्रॅव्हल्ससाठी स्वतंत्र बसअड्डा तयार करण्याची गरज आहे. महापालिकेने तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी.

- अनिल गुजर, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

लोगो : मटा भूमिका

प्रवासी वाहतुकीच्या

नियोजनाची गरज

दाभोलकर कॉर्नर परिसरातून रोज किमान एक हजार एसटींच्या फेऱ्या होतात, तर तीनशेहून अधिक खासगी ट्रॅव्हल्सच्या फेऱ्या होतात. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या या परिसरात ट्रॅव्हल्ससारखी मोठी वाहने थांबल्याने प्रचंड कोंडी निर्माण होते. याशिवाय अपघातांचा धोकाही वाढत आहे. ट्राफिक सिग्नलपासून जवळच ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जातात. सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी रस्त्यातच ट्रॅव्हल्स वळवण्याचे प्रकार सुरू असतात. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून ट्रॅफिक सिग्नलचे नियोजन कोलमडते. अलिकडे स्टेशन रोडवरही ट्रॅव्हल्स उभ्या असतात. रात्री आठ ते अकरा या वेळेत तर अन्य वाहनांना मार्ग काढणेही कठीण बनते. यामुळे अपघातांचाही धोका वाढला आहे. महानगरपालिकेने तातडीने ताराराणी पुतळा आणि व्हिनस कॉर्नर येथील बसअड्डा सुरू करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुभेदार आण्णासाहेब मानेयांचे अपघाती निधन

$
0
0

सुभेदार आण्णासाहेब माने

यांचे अपघाती निधन

सातारा :

वरकुटे येथील रहिवाशी व टेरीटोरीयल आर्मी महाराष्ट्र १०९मध्ये सुभेदार पदावर कार्यरत असलेले आण्णासाहेब बचाराम माने (वय ४०) यांचे पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मृत्यूनंतर नातेवाईकांनी महाराष्ट्र बटालियनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मुत्रपिंड व यकृत दान करण्यात आले.

माने यांनी महाराष्ट्राबरोबरच पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, जम्मू काश्मीर येथे आपली सेवा बजावली होती. सेवेत असताना आपल्या कबड्डी खेळात चांगलीच चुणूक दाखवली होती. सुरुवातीस खेळाडू त्या नंतर संघाचा कर्णधारांना व मुख्य प्रशिक्षक, अशा भूमिका पार पाडत त्यांनी आपल्या बटालियनला अनेक विजेतेपद मिळवून दिली होती.

.......

रामराजे समर्थकांचा रास्ता रोको

सातारा :

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले समर्थकांनी पुतळा दहन केला होता. या प्रकरणाचा निषेध म्हणून तरडगाव येथे पुणे-पंढरपूर रोडवर रास्ता रोको व मोर्चा काढण्यात आला. या वेळी काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, राजुरी (ता. फलटण) येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. साखरवाडी येथे काळे झेंडे दाखवत निषेध फेरी काढली.

........

पूल न पाडण्याची हमी द्या

कराड : कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन जुन्या पुलावरील वाहतूक नवीन कृष्णा पुलावर वळवण्याचे प्रात्यक्षिक रविवारी पार पडले. मात्र, ते अयशस्वी झाल्याने या वेळी जुना कृष्णा पूल पाडला जाणार नाही, असे लेखी पत्र द्या, अन्यथा पुलाचे कामकाज होऊ दिले जाणार नाही, असा आक्रमक पावित्रा नागरीकांनी घेतला. त्या मुळे काहीकाळ वातावरण तंग झाले होते. दरम्यान, प्रात्यक्षिकावेळी आलेल्या अडचणींचा अभ्यास व त्या बाबत प्रशासनाशी बैठक घेऊन व गुरुवारी पुन्हा एकदा चाचणी घेऊन वाहतूक वळवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्याख्यानमाला...प्राचार्य डॉ. अशोक बाबर

$
0
0

'धर्मांतरणाच्या निर्णयात

जातिनिर्मूलनाचे सूत्र'

प्राचार्य डॉ. अशोक बाबर

लोगो : माणगाव परिषद व्याख्यानमाला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशभरातील सांस्कृतिक एकतेमुळे जातिव्यवस्थेचा प्रश्न जटिल बनला. जातीचे अक्राळविक्राळ स्वरूप सर्वत्र पसरले. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरणाच्या निर्णयात जातिव्यवस्था निर्मूलनाचे पक्के सूत्र होते. जातिअंतासाठी लढाई करताना चळवळीतील कार्यकर्त्यांनी या सूत्राचा अभ्यास करावा,' असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अशोक बाबर (कवठेमहांकाळ) यांनी केले.

माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीतर्फे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. 'जातिनिर्मूलाचे महान योद्धे डॉ. बाबासाहेब आंबेडकर' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विनय कांबळे होते. तीन दिवसीय व्याख्यानमालेचा रविवारी समारोप झाला. शाहू स्मारक भवन येथे व्याख्यानमाला पार पडली.

प्राचार्य बाबर म्हणाले, 'जाती या प्रस्थापित समाजाने वा मनुने तयार केलेल्या नसून, त्या समाजाने निर्माण केल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधक होते, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना समाजव्यवस्था, जातिव्यवस्था, सामाजिक चळवळींचा अभ्यास होता. जातिव्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठी त्यांनी धर्मांतरणाचा घेतलेला निर्णय खूप दूरगामी होता. धर्मांतरणामुळे सामाजिक चळवळीला बळकटी लाभली. सांस्कृतिक एकतेमुळे जातीयता घट्ट टिकून राहिली. सांस्कृतिक एकतेतून एकजातीय विवाह पद्धतीला सुरुवात झाली. एकजातीय विवाहामुळे जाती बळकट होत गेल्या.'

जातिअंताची लढाई, समाजातील सद्य:स्थिती, स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवून घेणाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांशी केलेली सलगी या पार्श्वभूमीवर प्राचार्य बाबर यांनी मार्मिक टिप्पणी केली. ते म्हणाले, 'बुद्धिवादी माणूस सहजपणे बदनाम होऊ शकतो. कपटी, संकुचित लोकांच्या गोटात जाऊ शकतो. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे याचे उत्तम उदाहरण आहेत. समाजात असा संसर्ग अनेकांना झाला आहे. मंत्रिमंडळात सहभागी झालेले अविनाश महातेकर यांनाही तो संसर्ग झाला आहे.'

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळी, जातिनिर्मूलनाची लढाई यासंदर्भात तपशीलवार मांडणी केली. राहुल ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ए. बी. कांबळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आधी लबाडी, आता टाळाटाळ

$
0
0

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खरे बोलण्याची आणि सत्याने वागण्याची शिकवण देणारी मंडळी म्हणून शिक्षकाविषयी समाजात प्रचंड आदरभाव आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांचे अंमळ जास्तच कौतुक, मात्र जिल्ह्यातील ११८ शिक्षकांनी सोयीच्या ठिकाणी बदली पाहिजे म्हणून सरसकट चुकीची माहिती भरून लाभ घेतल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले. आणि शिक्षकांनी घातलेला हा घोळ गेले वर्षभर मिटला नाही. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असताना 'त्या'शिक्षकांवर कारवाईचा प्रश्न सध्या घोंघावत आहे. शाळा सुरू होत असताना नवीन शैक्षणिक उपक्रम, पटनोंदणी अभियान, गुणवत्ता वाढ यापेक्षा प्राथमिक शिक्षण क्षेत्र सध्या शिक्षकांच्या बदलीच्या लबाडीवरुन गाजत आहे. याप्रश्नावर टाकलेला फोकस....

लोगो: गुरुजींची 'शाळा'

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या म्हटल्या की घोळ आणि वशिलेबाजी ठरलेली. शिक्षक संघटना, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतातून सोयीच्या ठिकाणी नोकरीसाठी मोठ्या उलाढाली व्हायच्या. यामध्ये प्रामाणिक शिक्षक भरडले जायचे. काहीजण कायमस्वरुपी सुगम भागात तर काही जणांच्या नशिबी कायमच दुर्गम भागात नोकरी, या गैरप्रकाराला चाप बसावा आणि बदलीत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी गेल्या वर्षी ऑनलाइन बदली प्रक्रिया राबवली. यामध्ये काही शिक्षकांनी चुकीची माहिती सादर करत शिक्षण विभागाची फसवणूक केली. ही लबाडी सामोरी आल्यावर संबंधित शिक्षक आता अन्याय झाल्याचे सांगत कारवाई टाळण्यासाठी धावपळ करत आहेत.

गेल्या वर्षी ऑनलाइन पद्धतीने ४५०० शिक्षकांच्या बदल्या झाल्या. एनआयसीने तयार केलेल्या सॉफ्टवेअवर शिक्षकांनी माहिती सादर केली. दरम्यान १५८ शिक्षकांनी चुकीची माहिती भरून सोयीच्या ठिकाणी बदली करून घेतल्याच्या तक्रारी झाल्या. ज्या शिक्षकांवर अन्याय झाला त्यांनी थेट ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्याकडे तक्रारी केल्या. जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात शिक्षकांना नोटिसा काढून खोटी माहिती भरल्याप्रकरणी कारवाई का करू नये, अशा नोटिसा काढल्या. ४० शिक्षकांचा खुलासा मान्य झाला. तर ११८ शिक्षकांनी खोटी माहिती भरल्याचे निष्पन्न झाले.

चुकीची माहिती, खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे

शिक्षण विभागाने तालुकानिहाय तपासणी केली. कागदपत्रांची छाननी केली. त्यामध्ये संबंधित शिक्षकांनी नोकरी सुरू झाल्याची चुकीची तारीख भरणे, अंतराचे खोटे दाखले जोडण्याचे प्रकार केले आहेत. काही शिक्षकांनी तर खोटी प्रमाणपत्रे जोडण्याचा प्रताप केला आहे. आंतरजिल्हा बदली तारीख चुकीची नमूद करून सोयीचे ठिकाण मिळवले. प्राथमिक शिक्षण विभागाच्या चौकशी अहवालानुसार निलंबित असतानाही चुकीची माहिती भरून बदलीचा लाभ घेतल्याचे म्हटले आहे. भाषा या विषयासाठी मॅप केले असताना विज्ञान विषयातून फॉर्म भरला, समाजशास्त्र विषयासाठी मॅप केले असताना भषा विषयातून फॉर्म भरला, जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची माहिती भरली नसल्याचे सामोरे आले आहे. भाषा विषयासाठी मॅप केले असताना समाजशास्त्र विषयातून फॉर्म भरला, अर्जामध्ये मॅनेजमेंट दिनांक चुकीचा लिहिल्याचे सामोरे आले आहे. काही शिक्षकांनी बदलीसाठी खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे जोडली आहेत, हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचीही कागदपत्रे दिली आहेत.

कारवाई झालेल्या शिक्षकांची तालुकानिहाय संख्या

शिरोळ: ३४

हातकणंगले: ३१

पन्हाळा: १९

गडहिंग्लज: ०८

आजरा: ०७

करवीर : ०७

चंदगड : ०५

कागल : ०४

भुदरगड : ०३

राधानगरी : ०६

शाहूवाडी : ०१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तानाजी सावंत यांच्या रुपाने माढ्याला प्रथमच मंत्रिमंडळात स्थान

$
0
0

तानाजी सावंत यांच्या रुपाने माढ्याला प्रथमच मंत्रिमंडळात स्थान

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

माढा तालुक्यातील नेते व विधान परिषदेतील शिवसेनेचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची मंत्रिपदी निवड झाली. शपथविधी समारंभ सुरू होताच सोलापुरातील शिवसैनिकांमध्ये व माढा तालुक्यात जल्लोषाचे वातावरण पसरले. फटाक्यांची आतषबाजी करीत ठिकठिकाणी शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. सावंत यांच्या रुपाने राज्य स्थापनेपासून प्रथमच माढा तालुक्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

शिवसेनेचे शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले म्हणाले,' तानाजी सावंत यांच्या रूपाने आम्हाला मंत्रिमंडळात मिळालेल्या स्थानाचा उपयोग करून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवता येतील. शहर जिल्ह्याच्या विकासासाठी या मंत्रिपदाचा निश्‍चित ते उपयोग करतील. या योग्य निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.'

सोलापुर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील शेतकरी कुटुंबात प्रा. तानाजी सावंत यांचा जन्म झाला. त्यांचे कार्यक्षेत्र पुणे असून, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळच्या माध्यमातून ते सक्रिय आहे. शिक्षण क्षेत्रात विविध शाखेत संस्थेने मोठी कामगिरी केली आहे. सावंत यवतमाळ येथून विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी करीत त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले. सध्या भैरवनाथ शुगर कारखान्याचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पाच युनिट कार्यान्वित आहेत. शिवजलक्रांती या महत्वाकांक्षी प्रोजेक्टमधून उस्मानाबाद जिल्ह्यात मोठे काम निर्माण केले आहे. 'शिवजलक्रांती'च्या माध्यमातून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक निर्माण केली आहे. त्या नंतर त्यांना शिवसेनेचे उपनेतेपद ही देण्यात आले. यवतमाळ येथून विधान परिषद लढविण्याचा उद्धव ठाकरेंचा आदेश मिळताच अशक्य असणारा विजय सावंत यांनी खेचून आणला होता. या विजयाने शिवसेनेत त्यांचे महत्त्व वाढले होते. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यात प्रा. तानाजी सावंत यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळात सेनेकडून समावेश झाल्याचे मानण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूवाडी : रखडलेले प्रश्न

$
0
0

रखडलेले प्रश्न

शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघ

०००००

औद्योगिकीकरणाला खीळ

निधीच्या तुलनेत विकास कमीच; लघुपाटबंधारे प्रकल्पासह पर्यटनाला ब्रेक

चंद्रकांत मुदुगडे, शाहूवाडी

शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचा बराचसा भाग डोंगरी, दुर्गम वाड्यावस्त्यांनी व्यापलेला. साहजिकच येथे सोयीसुविधांची वानवा. आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी गेल्या साडेचार वर्षांत मतदारसंघातील मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यात सर्वाधिक विकासनिधी खेचून आणला. मात्र, तालुक्यातील औद्योगिकीकरणाला बसलेली खीळ लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना चिंतन करायला लावणारी आहे.

सरकारच्या नवीन नियमावलीने तालुका औद्योगिक वसाहतीचा घेतलेला बळी, विविध नवउद्योग निर्मितीकडे दुर्लक्ष आणि याबाबत दबावाऐवजी कट्टर गटातटाच्या राजकारणात धन्यता मानणारी येथील जनतेची मानसिकता, आदी कारणांनी उद्योगरथाची चाके तालुक्यात फिरू शकलेली नाहीत. साहजिकच वाढत्या उपद्रवी बेरोजगारीने तालुक्याचा कानाकोपरा पोखरला आहे. यातून बुद्धिवंतांची खाण म्हणून निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक तरुणांनी मोठ्या पदांवर झेप घेतली असली तरी त्यामुळे नेत्यांवर येणारा बेरोजगारीचा आळ मात्र पूर्णविराम घेऊ शकत नाही, हेच येथील वास्तव आहे. भरीत भर म्हणून की काय तालुक्यात अपवादात्मक परिस्थिती सोडता व्यावसायिक, औद्योगिक शिक्षणाच्या संधीही उपलब्ध झालेल्या नाहीत.

मतदारसंघाचा निम्मा अधिक भाग कोरडवाहू आहे. यावर उपाय म्हणून अस्तित्वात येऊ पाहणारे रणवरेवाडी, तळपवाडी, सोनुर्ले यांसारखे महत्त्वाकांक्षी लघुपाटबंधारे प्रकल्प कमालीचे रखडल्याने जल-जमीन समीकरण विकासाकडे सरकू शकलेले नाही. साडेतीन दशकांहून अधिक काळ रखडलेला आणि उपयुक्ततेच्या मुद्द्यावर टीकेचे लक्ष्य ठरलेला वारणा उजवा कालवा सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतरही (सुप्रमा) निधीअभावी लटकलेला आहे. जलयुक्त शिवारसारख्या जलसंधारण मोहिमेचा 'ठेकेदारी'शिवाय अन्य कोणत्या घटकाला लाभ झालेला नाही. त्यामुळे कोरडेपणाचे हे लेणे तालुक्याला आणखी किती काळ माथी घेऊन मिरवावे लागणार आहे? या प्रश्नाचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले असावे.

विशेषतः या भागातील नागरिक भात, नाचणी, रताळी उत्पादनानंतर रोजगाराच्या प्रतीक्षेत राहतात. याच भागात वन आणि खनिज संपत्तीची मुबलकता आहे. आजवर या संपत्तीलाच लुबाडण्याचा 'उद्योग' फोफावत राहिला. त्यामुळे तालुक्याच्या अलौकिक निसर्गसौंदर्यास जणू दृष्ट लागल्याचे भयाण वास्तव स्वीकारण्यावाचून पर्याय उरलेला नाही. बांबवडे येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम गेल्या तीन तपांपासून रखडले आहे. निधी मंजुरीचा खेळ खेळून आता ते थकलेल्या अवस्थेत आहे. कोडोली (ता. पन्हाळा) सारख्या निमशहरी गावात एकाच छताखाली प्रशासकीय सेवा मिळावी म्हणून ग्रामस्थांचा आग्रह राहिला असताना त्याकडेही आजवरच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. येथील बसस्थानकाच्या विस्तार आणि नूतनीकरणातील 'संथ गती' आणि येळाणे (ता. शाहूवाडी) बसस्थानकाची अडखळत सुरू असलेली वाटचाल या बाबीही लोकप्रतिनिधित्वाची कसोटी पाहणाऱ्या आहेत.

ऐतिहासिक विशाळगड परिसर, अणुस्कुरा, जुगाई येळवण परिसर, उदगिरी व धोपेश्वर तसेच पन्हाळगड, आदींसह अनेक ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने विशिष्ट उंचीवर नेण्याची संधी असूनही त्यादृष्टीने पावले उचलली गेली नाहीत. साहजिकच घाटमाथ्यावरील दिशाहीन पर्यटनाचा श्वास कित्येक वर्षे गुदमरतो आहे.

०००००

कोट....

मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती डोंगराळ आणि नैसर्गिक अडचणीची आहे. केंद्र सरकारच्या बदललेल्या धोरणानुसार प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाला ८० टक्के ग्रामस्थांची संमती मिळत नाही. प्रकल्प स्थलांतरित करायचा म्हटल्यास अन्यत्र आवश्यक गायरान उपलब्ध नाही. उर्वरित ग्रीन झोनमध्ये छोट्या-छोट्या प्रक्रिया उद्योगांच्या उभारणीसाठी संबंधित विभागांकडे प्रस्ताव सादर करण्याचे विचाराधीन आहे. रखडलेल्या पाटबंधारे प्रकल्पांना वाढीव निधीसह 'सुप्रमा'त शर्थीने यश मिळाल्याने ते लवकरच मार्गी लागणार आहेत. मतदारसंघाच्या विकासात योगदान देण्यासाठी जे काही करता येईल, ते सर्व करण्यासाठी प्राधान्य राहणार आहे.

आमदार सत्यजित पाटील

०००००

पॉइंटर्स...

- नवे उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारीत वाढ

- लघु पाटबंधारे प्रकल्प खोळंबले

- जलसंधारणाची कामे ठप्प

- पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष

- विशाळगड, अणुस्कुरा, जुगाई येळवण, उदगिरी, धोपेश्वर,

- पन्हाळागडाचे पर्यटन कधी बहरणार?

- क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान

- पाच वर्षांनंतरही कामे 'विचाराधीन'

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतनवाढ रोखणार, प्रसंगी फौजदारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चुकीची माहिती भरून सोयीच्या ठिकाणी बदली करून घ्यायची आणि चौकशी रम्यान तक्रारी करायच्या, या शिक्षकांच्या प्रवृत्तीवर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल रविवारी चांगलेच भडकले. ६८ शिक्षकांच्या फेरसुनावणीदरम्यान त्यांनी चुकीची माहिती भरल्याप्रकरणी संबंधित शिक्षकांची एक वेतनवाढ रोखून बदली करण्याचा आदेश दिला. प्रसंगी काही प्रकरणात फौजदारी दाखल करण्याचा आदेश दिला.

बदलीप्रकरणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यामधील गटशिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई का करु नये? अशा नोटिसा काढण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी ऑनलाइन बदली करताना शिक्षकांनी चुकीची माहिती भरली. अशा शिक्षकांवर प्रशासनाने बदलीची कारवाई केली आहे. त्याला शिक्षकांनी हायकोर्टात आव्हान दिले. कोर्टाने, त्या शिक्षकांच्या माहितीची फेरतपासणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार रविवारी जिल्हा परिषदेतील समिती सभागृहात सुनावणी झाली.

सीईओ मित्तल, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्या उपस्थितीत फेरसुनावणी झाली. प्रत्येक शिक्षकाची स्वतंत्रपणे फेरसुनावणी घेण्यात आली. तत्पुर्वी कागदपत्रांची तपासणी केली. शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले. समिती सभागृहासमोर जमलेल्या शिक्षकांत अस्वस्थता जाणवत होती. दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत फेरसुनावणी झाली. यावेळी मित्तल यांनी चुकीची माहिती भरुन दिशाभूल करणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाईचे आदेश दिले. ६८ शिक्षकांपैकी काही जणांची वेतनवाढ रोखण्याबरोबर बदलीची कारवाई होणार आहे.

मुख्याध्यापकांवर कारवाई,

नेतेगिरी करणाऱ्यांना झटका

शिक्षकांनी कारवाई टाळण्यासाठी ठिकठिकाणी धाव घेतली. पदाधिकाऱ्यांना भेटले. प्रशासनाच्या विरोधात तक्रारी केल्या. या प्रकरणावरून सीईओ मित्तल यांनी शिक्षक, मुख्याध्यपकांची खरडपट्टी काढल्याचे वृत्त आहे. 'पहिल्यांदा चुका करायच्या नंतर तक्रारी करायची हा प्रकार योग्य नाही,' अशा शब्दांत त्यांनी सुनावल्याचे वृत्त आहे. शिक्षकांनी माहिती भरल्यानंतर त्याची योग्यरित्या खातरजमा केली नसल्याच्या कारणावरुन सुमारे १८ मुख्याध्यपकांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाईचे आदेश सीईओंनी दिले. शिक्षकांनी कोर्टातील याचिकेत 'चुकीची माहिती भरण्यास आपण नाही तर मुख्याध्यापक जबाबदार आहेत,' असे म्हटले होते. दरम्यान सुनावणीप्रसंगी कागल तालुक्यातील समन्वय समितीमधील पदाधिकारी व शिक्षक सुरेश कांबळे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मुळात त्यांनी बदलीसाठी चुकीची माहिती भरली होती. सीईओंच्या हा प्रकार लक्षात येताच ते चांगलेच संतप्त झाले, 'इतरांवर जी कारवाई झाली त्याच्या दुप्पट यांच्यावर कारवाई करा,' असा आदेश दिला.

गटशिक्षणाधिकाऱ्याला बाहेर काढले

शिरोळ तालुक्यातील शिक्षक बदलीतील समानीकरण प्रक्रियेत १२ शाळांच्या रिक्त जागेत अदलाबदल करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रश्नी प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर. डी. काळणे, विस्तार अधिकारी डी. एल. कामत, कनिष्ठ सहायक ए. व्ही. अस्वले यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रविवारी, फेरसुनावणी सुरू असताना प्रभारी गटशिक्षणाधिकारी काळगे त्याठिकाणी दाखल झाले. सीईओंनी, 'याठिकाणी काय काम आहे?' अशी विचारणा काळणे यांच्याकडे केली. तसेच त्यांना मुख्यालयाबाहेर जाण्याचा आदेश दिल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या मोर्चा

$
0
0

कोल्हापूर : महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाने जाहीर केल्याप्रमाणे विद्यापीठीय कर्मचारी मंगळवारी (ता. १८) शिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी व अन्य प्रलंबित मागण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने शनिवारी विद्यापीठात आंदोलन केले. विद्यापीठातील द्वारसभेप्रसंगी ऑफीसर्स फोरमतर्फे एस. एम. कुबल यांनी फोरमची राज्यव्याप्ती आंदोलनातील सहभागाची व्याप्ती स्पष्ट केली. सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी मार्गदर्शन करताना आंदोलनाच्या पुढील टप्प्याची माहिती दिली. शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी प्रशासनाची सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. दरम्यान सेवक संघाने आंदोलनाची व्याप्ती वाढविताना १८ जून रोजी शिक्षण सहसंचालक कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images