Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

भारिप बहुजन महासंघाचीइव्हीएम विरोधात निदर्शने

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

येथील भारिप-बहूजन महासंघातर्फे सोमवारी इव्हीएम विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. कार्यकर्त्यांनी इव्हीएमविरोधी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजलेल्या मतांमध्ये तफावत आढळून आली आहे. २६ मतदारसंघात झालेल्या मतांपेक्षा कमी मतमोजणी झाली. परिणामी मतदारांचा इव्हीएम मशीनवरील विश्वास उडाला आहे. हे मशीन हॅक करता येते, असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निदर्शनांमध्ये अॅड. इंद्रजित कांबळे, दत्ता मिसाळ, सतिश माळगे, नितीन कांबळे, संबोधी कांबळे, योगेश कांबळे आदी सहभागी झाले होते.

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील भारिप बहुजन महासंघातर्फे इव्हीएम मशीन विरोधी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. मशीन विरोधी घोषणाबाजीने परिसर दणानून सोडले.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणीच्या मतांमध्ये तफावत आढळून आले आहे. २६ मतदारसंघात झालेल्या मतांपेक्षा कमी मतमोजणी झाली. परिणामी इव्हीएम मशीनवरील विश्वास उडाला आहे. हे मशीन हॅक करता येते, असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे. यामुळे पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, निदर्शने करताना अॅड. इंद्रजित कांबळे, दत्ता मिसाळ, सतिश माळगे, नितीन कांबळे, संबोधी कांबळे, योगेश कांबळे आदी सहभागी झाले होते.

-------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवनिच्या विद्यार्थ्यांचेदहावी, बारावीत यश

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अवनि अनाथालयातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये चांगले यश मिळवले. भंगार गोळा करणे, धुणी-भांडी करणे, चहाच्या गाड्यावर काम करणाऱ्या पालकांच्या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यश मिळवले.

नवीन वाशीनाका परिसरात जिवबा नाना जाधव पार्कमध्ये अवनिची संस्था आहे. संस्थेतर्फे चालवण्यात येणाऱ्या अनाथालयातील सोनालिका पोवार हिने दहावी परीक्षेत चांगल्या गुणांनी यश मिळवले. तिच्या घरची परिस्थिती गरीबीची आहे. त्यामुळे वडिलांनी तिला अनाथालयात दाखल केले. येथे राहून ती चांगला अभ्यास केला. प्रज्ञा पगारे गेल्या ९ वर्षांपासून अवनिमध्ये आहे. ही लहान असतानाच वडील मृत झाले. म्हणून तिला अनाथालयात दाखल केले. अतिशय जिद्दीने तिने अभ्यास केला. मोनाली साळुंखे पहिली ते बारावीपर्यंत या संस्थेत आहे. तिची आई वीटभट्टीवर काम करते. वडील बेपत्ता आहेत. अशा कुटुंबातील मोनालीने चांगल्या बारावीत यश मिळवले. संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले, आर. वाय. पाटील यांचे या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा कोटींची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

क्रीडा कोट्यातून तहसीलदारपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून ९८ लाख रुपये रोख, तर चार गुंठ्यांची जागा बळकावल्याप्रकरणी सोमवारी (ता. १७) पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज आला. या गुन्ह्यातील मुख्य संशयित प्रसाद शिंदे हा असून, पोलिसांनी भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनाही चौकशीसाठी बोलवले होते. या प्रकरणात मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या ओएसडीच्या नावाने बोगस फोन करण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणाची कुणकुण लागल्यानेच भाजपने तातडीने रविवारी देसाई यांचा राजीनामा घेतला असल्याचे स्पष्ट होत आहे.

या प्रकरणात प्रसाद शिंदे याच्यासह संदीप देसाई आणि आणखी एक पदाधिकारी सहभागी असल्याची शक्यता आहे. त्यांनी मंगळवार पेठेत राहणाऱ्या व खेळाडू असलेल्या एका युवकाला प्रथम पिस्तूल परवाना मिळवून देण्यास मदत केली. त्यातून विश्वास संपादन केल्यानंतर त्याला क्रीडा कोट्यातून तहसीलदारपद मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी कोल्हापुरातील काही खेळाडूंचे दाखलेही देण्यात आले. त्यामुळे त्या युवकाचा विश्वास बसला. त्याने या चौघांना पैसे द्यायला सुरुवात केली. वेळोवेळी ९८ लाख रुपये दिले. या दरम्यानच्या कालावधीत मुख्यमंत्र्यांच्या बनावट ओएसडीकडून तक्रारदाराशी संभाषण घडवून आणले जात होते. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ओएसडी यादव यांच्या नावाचाही वापर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या बनावट ओएसडीच्या नावाने फोन करुन, 'तुमचे काम अंतिम टप्प्यात असून, पैसे द्यावे लागतील', असे सांगण्यात येत होते. त्यामुळे तो युवक पैसे देत गेला. चार संशयितांपैकी एकाने मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीसाठी एक प्लॉट द्यावा लागणार आहे. त्यासाठी चार गुंठ्यांचा प्लॉट त्या युवकाकडून लिहून घेतला. हा व्यवहार पूर्ण होईपर्यंत संबंधित प्लॉट मध्यस्थी करणाऱ्या चौघांपैकी एकाच्या नावावर करावा, असे सांगितले. या प्रकरणाची माहिती संबंधित युवकाच्या घरात पंधरा दिवसांपूर्वी समजली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फसवणूक झालेल्या युवकाचे वडील राज्य उत्पादन शुल्क खात्यातील वरिष्ठ पदावरुन निवृत्त झाले आहेत. या प्रकरणाचा तक्रार पोलिस अधीक्षकांकडे दाखल होताच भाजपचे देसाई यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना लागली होती. त्याची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी देसाई यांचा तातडीने राजीनामा घेण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत चर्चा करताना देसाई यांनी या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असे स्पष्ट केले होते. राजीनामा दिल्यानंतर देसाई यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे पत्रही प्रसिद्धीस दिले होते. पण सोमवारी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यातून देसाई यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. हे प्रकरणच देसाई यांना भोवल्याचे स्पष्ट होत आहे.

.. . ..

नोकरीच्या आमिषाने फसणूक केल्याचा तक्रार अर्ज मिळाला असून, त्यात प्रसाद शिंदेसह भाजपच्या माजी महानगर अध्यक्षाचे नाव आहे. या फसवणुकीत शिंदे याचा थेट संबंध असून, देसाई यांच्या संबंधाचा शोध घेतला जात आहे. चौकशी करून गुन्हा दाखल होईल.

डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय गोदामातीलगहू साठ्याची तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील मार्केट यार्ड परिसरातील शासकीय गोदामातील फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या गव्हाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली. या साठ्यातील गहू निकृष्ट नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. राणी ताटे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, धान्य वितरण करताना गहू निकृष्ट असल्याचे समोर आल्यास धान्य दुकानदारांनी तो गहू उतरून घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राज्यात विविध ठिकाणी काळा पडलेला आणि निकृष्ट दर्जाचा गहू वितरित होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याकडे रेशन बचाव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. ताटे, 'फुड कार्पोरेशन'चे देवेंद्र सिंग, सचिन नाईकवाडी यांच्या पथकाने गोडावूनमधील गहू साठ्याची तपासणी केली. तपासणीत सरकारी निकषानुसार गहू चांगला असल्याचे समोर आले. दरम्यान, डॉ. ताटे, यादव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेवून तपासणी अहवाल सादर केला. जिल्हाधिकारी देसाई यांनीही निकृष्ट धान्याचे वितरण करू नये, अशी सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीच्या मारहाणीमध्ये पत्नीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कांचन सचिन कोकणे (वय ३१, रा. विचार माळे, सदर बाजार) या महिलेवर पती सचिन मलाजी कोकणे याने केलेल्या अमानुष मारहाणीमुळे सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सोमवारी रात्री कांचन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन व कांचन दोघे पती-पत्नी मूकबधीर आहेत. सचिनला दारुचे व्यसन होते. यातूनच तो पत्नी कांचन हिला सातत्याने मारहाण करत होता. शनिवारी व रविवारी त्याने केलेल्या मारहाणीमध्ये कांचन यांचे दोन्ही हात मोडले होते. तर डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना सोमवारी सकाळी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर तिच्या सासूने मुलाविरोधात शाहूपुरी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. सचिन याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, उपचार सुरू असताना कांचन यांचा रात्री उशीरा मृत्यू झाला. याची माहिती नातेवाईकांना समजताच त्यांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. यामुळे येथे काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशीरापर्यंत पती सचिन याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. संशयित सचिन याचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांची बदली, कारभाऱ्यांची चांदी

$
0
0

गुरुजींची शाळा... मालिका लोगो

.........

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चुकीच्या पद्धतीच्या कारभाराला चाप लावण्यासाठी ज्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार कामकाजासाठी अट्टाहास धरायला हवा, त्याच मंडळींनी शिक्षक बदली प्रक्रियेत सभागृहाचा ठराव फाट्यावर बसवला. जिल्हा परिषदेची नियमावली, सरकारी आदेश धाब्यावर बसवून काहीजणांनी 'हम करे सो कायदा' या पद्धतीने शिक्षक बदली प्रकरण हाताळायला सुरुवात केली. शिक्षक संघटनेतील काही नेत्यांना हाताशी धरुन लाखोंच्या वाटाघाटी केल्या. दोषी शिक्षकांनीही बदलीच्या कारवाईला ब्रेक लागणार म्हणून हात सैल सोडला. परिणामी जिल्हा परिषदेत 'बदल्या शिक्षकांच्या अन् चांदी कारभाऱ्यांची'असे चित्र निर्माण झाले.

ऑनलाइन बदली प्रक्रियेंतर्गत चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांच्या कारवाईवर प्रशासन ठाम आहे. सध्यस्थितीमध्ये शिक्षकांची अवस्था 'तेलही गेले तूपही गेले हाती धुपाटणे आले'अशी बनली आहे. गेले वर्षभर शिक्षकांच्या बदलीचा विषय गाजत आहे. चार जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ११८ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याची आणि बदलीचा ठराव मंजूर केला. सभागृहाच्या ठरावानुसार कारवाई करण्याच्या सीईओंच्या निर्णयामुळे सोयीच्या ठिकाणी नोकरी करणाऱ्या शिक्षकांची झोप उडाली.

सभेनंतर संबंधित शिक्षकांनी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन गाऱ्हाणी मांडण्यास सुरुवात केली. शिक्षक संघटनेतील काही नेते मंडळी पुढे सरसावली. जि.प.मधील कारभारी सदस्यांच्या भेटी घेतल्या. तिघेही कारभारी सत्तारुढ आघाडी गटातील शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. शिवाय जिल्हा परिषदेतही महत्वाची पदे त्यांच्याकडे असल्याने साहजिकच प्रशानासवर छाप होती.

शिक्षक संघटनेतील काही नेते मंडळींनी बदली प्रकरण मिटवण्यासाठी कारभाऱ्यांच्या भेटी घेतल्या. शिक्षकांची संख्या ११८, बदली थांबविण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची तयारी त्यांनी ठेवली. कुणी पदाची ताकद वापरली, कुणी सभागृहातील ज्येष्ठत्व व आतापर्यंतचे अनुभव पणाला लावत शिक्षकांची पाठराखण केली. सीईओ, बदलीवर ठाम असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी दुसरीकडे मोर्चा वळविला. मात्र या साऱ्या घडामोडीत सर्वसाधारण सभेचा ठराव फाट्यावर बसविला. अन्य समिती सभापती, सदस्यांना विचारात न घेता शिक्षकांच्या कारवाईला खीळ घालण्याचा खटाटोप केला.

...........

मित्तलांनी झुगारला दबाव

सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार दोषी शिक्षकांवर एक वेतनवाढ रोखण्याची व त्यांची अन्यत्र बदली करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घेतला. मात्र सभेच्या चार दिवसानंतरच कारभारी पुढे सरसावले. त्यांनी मित्तल यांची भेट घेऊन कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र मित्तलांनी कारवाई होणारच असे ठणकावून सांगितले. याप्रसंगी कारभाऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून कारवाईला खो घालण्यासाठी खेळी केल्या. मात्र सीईओ मित्तल यांनी त्यांच्या दबावाला जुमावले नाही. मध्यंतरी त्यांनी, ग्रामविकास विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता यांना शिक्षकांच्या बदली प्रकरणाची माहिती दिली. मुळात शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी गुप्ता यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनीही मित्तल यांच्या निर्णयाचे स्वागतच केले. यामुळे कारभाऱ्यांच्या सगळ्या खेळ्या व्यर्थ ठरल्या.

........

कारभाऱ्यांचा इंटरेस्ट अन् शिक्षकांची आकडेमोड

शिक्षक बदली प्रकरणात जिल्हा परिषदेत कारभाऱ्यांच्या कारभाराची आणि शिक्षकांनी बदलीसाठी मोजलेल्या किंमतीची आकडेमोड सुरू आहे. ११८ मध्ये समाविष्ठ शिक्षकातील काही मंडळींनी व शिक्षक संघटनेतील काही नेत्यांनी कलेक्शनची जबाबदारी पार पाडल्याची चर्चा आहे. बदली थांबविण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने किंमत मोजली आहे. शिक्षकांनी जमविलेल्या हिशेबाचा आकडा लाखाच्या घरात पोहचत असल्याची टीका आता सुरू आहे. सगळेच शिक्षक काही या प्रक्रियेत सामील झाले नाहीत. मात्र काही शिक्षक आणि कारभाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे नाव मात्र जिल्हा परिषदेचे खराब होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिस्टल, गावठी कट्टा जप्त कराड : मसूर (ता

$
0
0

पिस्टल, गावठी कट्टा जप्त

कराड :

मसूर (ता. कराड) येथील मसूर-कराड रस्त्यावरील शहापूर फाट्यानजीक उंब्रज पोलिसांनी राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान येथील कुख्यात गुंड युवराज साळवी याच्या कारमध्ये एक पिस्टल, एक गावठी कट्टा, दोन जिवंत राऊंड भरलेल्या मॅक्झिन आढळून आले आहेत. संशयितांनी घटनास्थळी कार सोडून पलायन केल्यानंतर पोलिसांनी कारची झडती घेतली असता, ही शस्त्रे आढळून आली. दरम्यान, पोलिस फरार संशयिताचा तपास करीत आहेत.

मसूर-कराड रस्त्यावर रविवारी रात्री उशीरापर्यंत कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी सुरू होती. एका गाडीची तपासणी पोलिस करीत असतानाच गाडीतील पाच जण कारचे दरवाजे उघडे सोडून कारमधून बाहेर आले. त्यांच्याकडे नाव पत्त्याबाबत विचारणा करीत असताना त्यापैकी एक जण युवराज साळवी (रा. कोपर्डे हवेली) हा गुंड असल्याचे व तो पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे लक्षात आले. पोलिस गाडी तपासत असताना त्या पाच जणांनी पलायन केले.

......

पत्नीच्या खून प्रकरणी पतीला अटक

कराड :

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री गोळेश्वर येथील बापूजी साळुंखे नगर येथे घडली. शबाना फिरोज मुल्ला (वय ३०) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी पती फिरोज सलीम मुल्ला (वय ३३, मुळ रा. वडगाव हवेली, ता. कराड) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. काही महिन्यांपूर्वी पत्नी शबाना मुल्ला हिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय फिरोज मुल्ला याला आला होता. या वरून दोघांमध्ये वाद विवाद झाले होते. हा वाद खूप टोकाला गेल्याने चिडून जाऊन फिरोजने पत्नी शबाना हिचा गळा आवळून खून करून पसार झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात मार्ड संघटनेचेकाळ्या फिती लावून काम

$
0
0

सोलापुरात मार्ड संघटनेचे

काळ्या फिती लावून काम

सोलापूर

पश्चिम बंगालमधील डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील निवासी डॉक्टरांनी रविवारी एकत्र येऊन आंदोलन केले. सोमवारपासून काळ्या फिती लावून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. सरकारने यावर कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास येत्या २४ जूनपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप दडमल यांनी दिला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर शाखेच्या वतीने सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तास दैनंदिन बाह्य रुग्णसेवा व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, सोलापुरात मार्ड संघटनेने काळ्या फिती लावून कामकाज सुरू ठेवल्याने सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. रुग्णसेवा पूर्ववत सुरू होती, त्यामुळे ओपीडीमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत होती. सरकारी रुग्णालयात १५० निवासी तर २००च्या वर आंतरवासीय डॉक्टर कामकाज पाहत आहेत. दररोज ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या ८००च्या वर आहे. मात्र त्या प्रमाणात डॉक्टर मंडळींची संख्या खूपच कमी असल्याने प्रत्येक रुग्णांवर लक्ष देताना डॉक्टर मंडळींना कसरत करावी लागत आहे, यातूनच उपचार मिळाला नाही म्हणून डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे डॉ. दडमल यांनी सांगितले.

......

मिरजेत डॉक्टरांचा मोर्चा

मिरज : कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमएच्या मिरज शाखेच्या वतीने सोमवारी सकाळी दहा वाजता मोर्चा काढण्यात आला. शहरातील वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. केमिस्ट असोसिएशनसह विविध पक्ष आणि संघटनांनी मोर्चास पाठींबा दिला. मोर्चाद्वारे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदन देण्यात आले. या वेळी आयएमचे अध्यक्ष डॉ. शशिकांत दोरकर यांच्यासह डॉ. मुकुंदराव पाठक, डॉ. शिरीष पारगावकर, डॉ. एन. एस. ससे, डॉ. डी. एस. टकले, डॉ. किरण प्राणी, डॉ. सुनील कुलकर्णी, डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. सोमशेखर पाटील, डॉ. शिरीष चव्हाण, डॉ. शरद देसाई, डॉ. बी. टी. कुरणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. प्रभा कुरेशी, डॉ. रविकांत पाटील, डॉ. संजीव कुलकर्णी यांच्यासह आयएमचे पदाधिकारी, शहरातील डॉक्टर मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षणाची वाट सातासमुद्रापार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम शिक्षणासाठी आता केवळ आपल्या गाव किंवा शहराचीच नव्हे तर देशाची वेस ओलांडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परदेशातील शिक्षणाच्या संधी अधिक वेगाने खुल्या होत आहेत. पदवी तसेच पदव्युत्तरसह स्पेशलायझेशनसाठी परदेशातील नामांकित विद्यापीठे किंवा कॉलेजमध्ये कोल्हापुरातूनही दरवर्षी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सरासरी तीन हजारांच्या आसपास आहे. विविध प्रवेश परीक्षा, फी सवलत व शिष्यवृत्ती यांच्याविषयी असलेल्या योजनांची माहिती घेत विद्यार्थी परदेशातील शिक्षण आवाक्यात आणत आहेत. विशेषत: मेडिकल, इंजिनीअरिंग, माहिती तंत्रज्ञान व मॅनेजमेंट या विषयात परदेशातील शिक्षणाची वाट सातासमुद्रापार जात आहे. परदेशातील शिक्षण हे महाग हा विचार सध्या मागे पडत असून स्पेशलायझेशन, संशोधन याकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाच्या संधी खुणावत आहेत. वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात स्पेशालिस्ट व परफेक्शनिस्ट या दोन गुणांना असलेले महत्त्व ओळखून करिअरची दिशा निश्चित करायची असेल तर परदेशातील इंजिनीअरिंग आणि मेडिकल या शाखांतील संधींचे आकाशही विस्तारले आहे. परदेशातील शिक्षणासाठी विद्यापीठांची निवड कशी करावी, तेथील विद्यापीठ व कॉलेज यांचा दर्जा कसा तपासावा याबाबत इंटरनेटवर असलेल्या इत्यंभूत माहितीचा वापर विद्यार्थी व पालकांकडून केला जात आहे. मेडिकलमधील तज्ज्ञ होण्यासाठी परदेशातील संधी मेडिकलमधील करिअरसाठी अमेरिकेला विद्यार्थ्यांची अधिक पसंती आहे. यामध्ये कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क या शहरांमधील विद्यापीठांकडे विद्यार्थ्यांचा कल जास्त आहे. परदेशात मेडिकलच्या शिक्षणात कार्यरत असलेली ४०० हून अधिक विद्यापीठे आहेत, त्यातील ५० विद्यापीठेच दर्जेदार आहेत. या ५० मध्ये आपल्याला स्थान कसे मिळवता येईल यासाठी विद्यार्थी सजग असतात. परदेशी शिक्षणाची असलेली क्रेझ पाहता फसवणूक होण्याचा धोका आहे, त्यासाठी मात्र परदेशातील वैद्यकीय कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याचा विचार सुरू झाला की कॉलेजची निवड करणे, त्या कॉलेजचा दर्जा, अनुभव तपासून पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाइन शोध घेणे तंत्रज्ञानाच्या मदतीने सोपे झाले आहे. दरवर्षी २० हजार विद्यार्थी परदेशात मेडिकलच्या शिक्षणासाठी जातात, व त्यापैकी छोट्या शहरातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दहा हजारांच्या घरात आहे. परदेशात मेडिकल शिक्षण पूर्ण झाले की भारतात येऊन काम करण्याचा परवाना मिळवण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या तयारीबाबतही दक्ष रहावे. परदेशातील शिक्षणाचा फायदा यासाठी होतो की तेथे मिळणारे विद्यार्थीवेतन आर्थिक भार कमी करते. परदेशातील मेडिकल पदवी घेत असताना कोणत्या विषयात तज्ज्ञ होणार आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठीच या संधीचा फायदा घेतला पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शृंगारातून अध्यात्माकडे’ कार्यक्रमाला दाद

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 'स्नेहबंध' या इमारतीच्या बांधकामासाठी आयोजित 'शृंगारातून अध्यात्माकडे' कार्यक्रमाला रसिकांची दाद मिळाली. शास्त्रीय गायिका नीला नागावकर व हेमसुवर्णा मिरजकर यांनी या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. नागावकर यांनी अभंग तर मिरजकर यांनी लावण्या सादर केल्या. 'लावणी ते अभंग' हा संगीतमय प्रवास रसिकांच्या पसंतीस उतरला. या कार्यक्रमात १५ कलाकारांचा सहभाग होता. प्रसूतीतज्ज्ञ डॉ. जे. एल. नागावकर यांनी ऑर्गन वादन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलीचा आदेश होवूनही कारवाई ठप्पच

$
0
0

जि.प. लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माध्यमिक शिक्षण विभागातील आठ कर्मचाऱ्यांच्या बदलीचा आदेश होवून कारवाई मात्र ठप्प आहे. या कर्मचाऱ्यांच्या बदलीवरुन पदाधिकारी आणि सदस्यात वेगवेगळी मतमतांतरे आहेत. शिवाय प्रशासनातही दोन मतप्रवाहामुळे कारवाईचे घोडे अडले आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या गैरकामकाजात साथ दिल्याप्रकरणी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा विषय सर्वसाधारण सभेत झाला होता. सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी याप्रश्नी तक्रार केली होती. प्रशासनाने अहवाल तयार करुन सात कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या कारवाईचा प्रस्ताव तयार केला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची सही झाली. दरम्यान, काही सदस्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांवर सरसकट कारवाई होऊ नये, जे दोषी असतील त्यांच्यावर बडगा उगारावा, अशा सूचना केल्या.

कारवाईवरुन मतभेद निर्माण झाल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. सीईओ व अध्यक्ष यांनी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्याचे ठरले. याप्रश्नी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. त्यामध्ये तीन-चार कर्मचारी दोषी आढळले असतील तर सगळ्यांवर कारवाई करणे योग्य नव्हे. शिवाय अधिकाऱ्यांनी याप्रश्नी सदस्य राजवर्धन निंबाळकर यांच्याशी चर्चा करावी असे सुचविले आहे. या साऱ्या प्रक्रियेत बदल्या रखडल्या आहेत.

...

तक्रार नसणाऱ्याचे नाव बदली यादीत

माध्यमिक शिक्षण विभागातील आठ कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत दुजाभाव झाला आहे. ज्या कर्मचाऱ्याविषयी कसल्याही तक्रारी नाहीत त्याचे नाव बदली यादीत आहेत. तर ज्या कर्मचाऱ्याविषयी तक्रारी होत्या त्यांचे नाव यादीतून वगळले आहे. शिक्षण विभागातील वशिल्याचा फायदा घेऊन हा प्रकार घडल्याची कर्मचाऱ्यात चर्चा आहे.

........

भालेरावांवरील आरोपाच्या चौकशीला सुरुवात

ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी ग्रामविकास निधीच्या मंजुरीसाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या विद्या पाटील यांचे पती विलास पाटील यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांची नियुक्ती केली आहे. याप्रकरणी, शुक्रवारी (ता. २१) विलास पाटील यांना म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. त्यानंतर भालेराव यांच्याकडे त्यांच्यावरील आरोपाप्रश्नी चौकशी होणार आहे. दरम्यान, सोमवार व मंगळवारी भालेराव हे रजेवर आहेत.

........

चुकीच्या माहितीप्रकरणी २५ ला सुनावणी

चुकीची माहिती भरुन सोयीच्या ठिकाणी बदली करुन घेतलेल्या शिक्षकांवर प्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात आठ शिक्षकांनी जिल्हा कोर्टात याचिका दाखल केली आहे. जिल्हा कोर्टात प्रशासनाने सोमवारी म्हणणे मांडले. त्यामध्ये शिक्षकांवरील कारवाई योग्य आहे, बदलीसाठी चुकीची माहिती भरुन लाभ घेतले आहेत, खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायमस्वरुपी एक वेतनवाढ व बदलीची कारवाई प्रस्तावित केल्याचे म्हणणे मांडले असून याप्रश्नी २५जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदल्या उद्या

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे बुधवारी (ता.१९) शिक्षकांच्या समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया आयोजित केली आहे. यामध्ये २०१९ मधील बदलीमध्ये विस्थापित झालेले, आंतरजिल्हा बदलून हजर झालेले व २०१८ चे विस्थापित शिक्षकांच्या समुपदेशनाने बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संबंधितांनी त्यादिवशी जिल्हा परिषदेत उपस्थित राहावे. पदस्थापनेच्या कामासाठी मंगळवारी (ता.१८) कुणीही भेटू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नातेवाईकांचा हस्तक्षेप आणि आचारसंहिता

$
0
0

जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतमधील सदस्यांच्या नातेवाईकांचा कामकाजातील हस्तक्षेप हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभागाने १७ जुलै २००७ रोजी संबंधितासाठी आचारसंहिता जाहीर केली आहे. प्रशासन त्या आदेशाचा अभ्यास करत असल्याचे वृत्त आहे. त्या आदेशात पदाधिकाऱ्यांनी त्यांची कामे स्वत: करणे गरजेचे आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करु नये. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये बसू नये असे आदेशात म्हटले आहे. तसे आढळून आल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या नियम १९९५ नुसार संबंधित पदाधिकारी व सदस्यांवर कारवाई करण्याची नियमावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्षासाठी सज्ज व्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

सरकारने शेतकरी हिताचे धोरण राबविले नाही. यामुळेच गेल्या पाच वर्षांत बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दुप्पट झाले. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोट बांधली. यापुर्वीही अनेक पराभव पचविले आहेत. राजकारण हा माझा धंदा नाही, पराभवाने खचून जाणारा मी नाही. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्‍न आहेत. त्यांच्या आत्महत्येचे लोण थांबविण्यासाठी, शेतीच्या लढाईसाठी पुन्हा नव्या दमाने सज्ज व्हा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. वीजप्रश्‍नी एक जुलै रोजी कृषीदिनी कोल्हापूर येथे महावितरणच्या विभागीय कार्यालयास धडक देऊन घेरोओ घालण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत चर्चा करण्यासाठी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सयाजीराव मोरे, जालंदर पाटील, माजी जि. प. सदस्य अनिल मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर प्रमुख उपस्थित होते.

यावेळी शेट्टी म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी मी देशातील २१० शेतकरी संघटनांची मोट बांधली. राज्यकर्त्यांना याची धडकी भरली. लोकसभा निवडणुकीत मला पराभव पत्करावा लागला. यामुळे शेट्टींना कसे घरी बसविले असे काहींना वाटत असेल. पण आता मला जास्त वेळ मिळाला आहे. मी आता शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी त्यांच्या उरावर बसणार आहे. राजकारण हे माझ्या पोटापाण्याचे साधन नाही. यापुर्वीही दत्त साखर कारखान्याच्या निवडणुकीत मी अनेक पराभव पचविले आहेत. शेतकऱ्यांना लाचारीचे जिणे जगावे लागू नये, म्हणून शेतकरी संघटनेची बांधणी केली. यामुळे गेल्या १५ वर्षात शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडले. मात्र आता पराभवाने खचून चळवळीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वीज व पाणी हे महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. यासाठी लढा उभारण्याची गरज आहे. पाय रोवून उभे राहिले तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल. राज्यात दुष्काळ पडला आहे. पाऊस पडला तरी शेतकऱ्यांकडे बियाणे व खते खरेदीसाठी पैसे नाहीत. बँकातून कर्ज मिळत नाहीत. एकीकडे विजय मल्ल्या, निरव मोदी यांच्यासारखे उद्योगपती हजारो कोटींची कर्जे बुडवून बिनधास्त आहेत. त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. दुसरीकडे थोड्या फार कर्जासाठी सुरू असलेल्या वसुलीच्या तगाद्याने शेतकरी गळफास घेवून आत्महत्या करीत आहेत. देशातील हे भीषण वास्तव आहे. गतवर्षी उसाची एफआरपी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना लढा द्यावा लागला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढत नाहीत. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात, तालुक्यात भांडणे लावण्याचा उद्योग सरकारकडून बारामती येथून सुरू झाला आहे. यामुळे पुन्हा नव्या दमाने उभारी घेण्याची गरज आहे.'

जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीचा कौल आम्हाला मान्य असून निवडणूक हे संघटनेचे साध्य नव्हते. राजू शेट्टी यांनी खासदार झाल्यानंतर गेल्या दहा वर्षात शेतकरी हितासाठी लढा दिला. पराभवानंतर कार्यकर्ते खचले नाहीत. शेट्टी यांनी आंदोलन जाहीर करावे.'

जालंदर पाटील म्हणाले,'नव्या लढाईचे रणशिंग फुंकणारा हा मेळावा आहे. स्वाभिमानीची चळवळ शेतकऱ्यांच्या घामाच्या दामासाठी आहे. ही लढाई अशीच पुढे सुरू राहील. आग ओकत राहिल्याशिवाय स्वाभिमानीची धग कळणार नाही. आपला जन्म रडण्यासाठी नाही, लढण्यासाठी आहे. यामुळे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सज्ज व्हा. '

यावेळी सयाजीराव मोरे, आण्णासो चौगुले, भागवत नरवाडे यांची भाषणे झाली. स्वागत आदिनाथ हेमगिरे यांनी केले. याप्रसंगी राम शिंदे, आप्पा एडके, विठ्ठल मोरे, मिलिंद साखरपे यासह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोयनेतील ३५ टीमएसी पाणी मिळायला हवे

'कोयना धरणातील ६७ टीएमसी पाणी विजनिर्मितीसाठी खर्च होते. विजेपेक्षा पाणी महत्त्वाचे आहे. वीज कशीही तयार करा, ६७ पैकी ३५ टीएमसी पाणी शेतीसाठी मिळायला हवे यासाठीही लढाई करावी लागेल,' असे राजू शेट्टी म्हणाले.

आत्ता यांना सुट्टी नाही...

'गेल्या चार वर्षांपासून महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना नव्या वीज जोडण्या दिल्या नाहीत. यामुळे वीज बिले दुरूस्त करा, नव्या जोडण्या द्या, अशी आमची मागणी आहे. यासाठी एक जुलैरोजी कृषीदिनी कोल्हापूर येथे महावितरणच्या विभागीय कार्यालयास घेराओ घालण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी मेळाव्यात केली. स्वाभिमानी संपली असे म्हणणाऱ्यांना ताकद दाखवू. यांना आता सुट्टी नाही,' असेही ते म्हणाले.

सहा जुलैरोजी आंबा येथे शिबिर

'लोकसभा निवडणुकीत मला पराभव पत्करावा लागला. याबाबत आत्मचिंतन झाले पाहिजे. आजवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत विचारविनीमय करून प्रत्येक निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या सहा व सात जुलै रोजी आंबा येथे स्वाभिमानीचे चिंतन शिबिर होईल,' असेही शेट्टी म्हणाले.

बुडव्यांच्या टोळक्यात मी नाही

'साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून मी बसल्यामुळे बरे वाटले नाही, अशा प्रतिक्रीया व्यक्त झाल्या. पण शेतकऱ्यांची एफआरपी थकित ठेवणारे बहुतांश कारखाने हे शिवसेना, भाजपाच्या कार्यकर्त्यांचे आहेत. मी बुडव्यांच्या टोळक्यात सामील झालो नाही,' असेही शेट्टी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील १४६ गावे असुरक्षित

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील डोंगरालगतची १७ आणि पूरबाधीत १२९ गावांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. या गावांत बैठका घेऊन आपत्कालीन परिस्थितीमध्ये यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, ही बाधीत गावे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या पातळीवर सरकारची उदासीनता दिसते. परिणामी वर्षानुवर्षे गावांची यादी मागील पानावरून पुढे अशीच राहिली आहे.

अती पावसामुळे जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावती, कुंभी, कासारी, दूधगंगा, वेदगंगा, वारणा, कडवी यांसह कृष्णा या नद्यांना पूर येतो. त्यावेळी नदीकाठावरील गावांत, वाडी- वस्त्यांमध्ये पाणी जाते. तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करावे लागते. अशी स्थिती १२९ गावांमध्ये असते. सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील गावांना बसतो. पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर बाधीत गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यावेळी प्रशासन, लोकप्रतिनिधींची धावाधाव होते. पूर ओसरल्यानंतर हा विषय बेदखल केला जातो. वर्षानुवर्षे अशीच स्थिती आहे. शिवाय डोंगराच्या पायथ्याशी असलेली १७ गावांत जोरदार पावसामुळे भूस्खलनाचा धोका आहे. भूस्खलामुळे पुणे जिल्ह्यातील माळीण हे गाव गाडले गेल्यानंतर जिल्ह्यातील अशा १७ गावांच्या स्थलांतराचा विषय पुढे आला. मात्र सरकारी पातळीवरून सकारात्मक कार्यवाही झाली नाही. तेथील रहिवाशांना दर पावसाळ्यात भीतीच्या छायेखाली दिवस काढावे लागतात. आता गेल्या दोन दिवसांपासून पावसाला प्रारंभ झाला आहे. प्रशासनाने धोकादायक गावांतील लोकांना पावसाळा संपेपर्यंत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

पूरबाधीत आणि डोंगरालगतच्या गावांना पावसाळ्यात सतर्क राहण्याचे आदेश गाव पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेतर्फे देण्यात आले आहेत. ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन आपत्तीच्या काळात करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. पूरबाधित गावांतील लोकांच्या मदतीसाठी १५ यांत्रिक बोटी तैनात आहेत. लाइफ जॅकेटची तरतूद करण्यात आली आहे.

- प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

या १७ गावांना भूस्खलनाचा धोका

भुदरगड : पडखंबे पैकी खोतवाडी, पडखंबेपैकी रावणवाडी, वासनोलीपैकी धनगरवाडा, वासनोलीपैकी जोगेवाडी, कारीवडेपैकी हाणफोडेवाडी, टिक्केवाडी, ममदापूर.

राधानगरी : बुजवडे. गगनबावडा : मार्केवाडी, साळवण, तिसंगीपैकी बालेवाडी.

शाहूवाडी : उखळूपैकी खोतवाडा.

करवीर : बोलोली, वाशी, महे.

गडहिंग्लज : चिंचेवाडी.

पन्हाळा : मराठवाडी.

या १२९ गावांना पुराचा धोका

शिरोळ : कोथळी, उमळवाड, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, कनवाड, हसूर, शिरटी, नृसिंहवाडी, बस्तवाड, अकिवाट, राजारापूर, खिद्रापूर, मजरेवाडी, गणेशवाडी, शेडसाळ, कवठेगुलंद, गौरवाड, औरवाड, बुबनाळ, आलास, दत्तवाड, दानवाड, कवठेसार, दानोळी, टाकवडे, शिरदवाड, अब्दुललाट, शिरोळ, कुरूंदवाड, धरणगुत्ती, नांदणी, शिरढोण, तेरवाड, हेरवाड.

हातकणंगले : निल्लेवाडी, पारगाव, चावरे, घुणकी, किणी, भादोली, लाटवडे, भेंडवडे, खोची, वाठार तर्फे वडगाव, कुंभोज, हिंगणगाव, शिरोली पुलाची, हालोंडी, इंगळी, रुई, चंदूर, रांगोळी, हुपरी, इचलकरंजी, रेंदाळ.

करवीर : हळदी, आरे, बालिंगे, नागदेवाडी, साबळेवाडी, खुपीरे, शिंदेवाडी, हणमंतवाडी, पाडळी खु., निटवडे, केर्ले, केर्ली, वरणगे, चिखली, शिंगणापूर, आंबेवाडी, वडणगे, निगवे, कसबा बावडा, शिये, भुये, वळीवडे.

पन्हाळा : बाजारभोगाव, कळे, मल्हारपेठ, सावर्डे तर्फे असंडोली, भामटे, तांदूळवाडी, आकुर्डे, गोठे, आसगांव, परखंदळे, घरपण.

राधानगरी : फेजिवडे, पडळी, राधानगरी, गुडाळ, गुडाळवाडी, आणाजे, आवळी बु., घोटवडे, टिटवे, सरवडे, कसबा वाळवे.

कागल : वंदूर, सुळकूड, सिद्धनेर्ली, बामणी, करनूर, शंकरवाडी, एकोंडी, निढोरी, कुरूकली, बाणगे, चिखली.

गगनबावडा : अणदूर, खोकुर्ले, मार्गेवाडी, निवडे, साळवण, मांडुकली पैकी पडवळवाडी, वेतवडे.

शाहूवाडी : सोडोली, थेरगाव, मलकापूर, पाटणे, करंजफेण.

कोल्हापूर शहर : पचगंगा नदीकाठालगतच्या वसाहती.

भुदरगड : पाटगाव, शेणगाव, खानापूर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मान्सून पावसाला सुरुवात झाली असून या कालावधीत साथीच्या आजारांचा फैलाव होतो. अशा आजारांना अटकाव करण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना करा,' असे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून संबंधितांना उपाययोजनाबाबत आदेश देण्यात आले.

शहरामध्ये डेंगी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कुटुंब कल्याण केंद्र व आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक स्थापन करण्याची सूचना आयुक्तांनी केली. शहरातील संवेदनशील भागामध्ये दैनंदिन साथीच्या आजाराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. सर्वेक्षणादरम्यान भंगार साहित्य, टायर जप्ती आणि डासोत्पत्ती होईल, असे साहित्य ताब्यात घेण्याची सूचना मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील यांना केली. शहरातील अर्धवट बांधकाम ठिकाणांची यादी तयार करुन या ठिकाणी पाणी साठून राहणार नाही, याबाबत संबंधित बांधकाम व्यवसायिकांना दक्षता घेण्याबाबत सूचना कराव्यात, अशी सूचना सहाय्यक संचालक नगररचना प्रसाद गायकवाड यांना केली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ. अमोल माने, उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, साथरोग अधिकारी डॉ. रमेश जाधव, सर्व कुंटुंब कल्याण केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन रूपयांच्या माहितीसाठी पाच रूपयांचा खर्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीमधील संजय गांधी योजना तहसीलदार कार्यालयात केंद्रीय माहिती अधिकाराचा फज्जा उडवला जात आहे. या अधिकाराखाली माहिती मागितलेल्या अर्जदारास दहा रूपयांपर्यंतची माहिती मोफत देणे बंधनकारक असताना या कार्यालयाकडून नियमबाह्यपणे पैशाची वसुली केली जात आहे. दोन रूपयांच्या माहितीसाठी पत्रव्यवहारावर पाच रूपये खर्च केले जात आहेत.

शहरात संजय गांधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कार्यालय आहे. जिल्ह्यातील तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांची माहितीची मागणी केलेला माहिती अधिकाराखालील अर्ज या कार्यालयाकडे पाठवला जातो. मात्र अशा अर्जानुसार वेळेत माहिती दिली जात नाही. शहरातील अर्जदारासही ३० दिवसानंतर माहिती दिली जाते. कार्यालयासमोर दर्शनी भागात प्रथम, अपिलीय माहिती अधिकाऱ्यांच्या नावाचा फलक लावलेला नाही. यामुळे नागरिकांना माहिती अधिकारी कोण अशी विचारणा करावी लागते.

माहिती अधिकारातील तरतुदीनुसार दहा रूपयांपर्यंतची माहिती मोफत आणि पुढील प्रत्येक पानासाठी प्रत्येकी दोन रूपये घेतले पाहिजे. मात्र या कार्यालयातील प्रथम माहिती अधिकारी तथा उपलेखापाल मदन घुगे यांनी एका पानासाठी दोन रूपये भरण्यासाठी पत्रव्यवहार केला. विशेष म्हणजे दोन रूपयांसाठी त्यांनी पाच रूपयांचे सरकारी पोष्ट तिकिट लावले. अधिकारातील नियमांचे उल्लंघन करून नियमबाह्यपणे दोन रूपये भरण्यास कशासाठी पत्रव्यवहार केला आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्तीमुळे काही भागात पाणीटंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालिंगा ते चंबुखडीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्तीच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली. परिणामी शहराच्या निम्म्या भागात अपुरा पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागला. नागरिकांच्या मागणीप्रमाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने चार टँकरच्या बारा फेऱ्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. मंगळवारी दुरुस्ती पूर्ण होण्याची शक्यता असली, तरी टँकरच्या मागणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

बालिंगा उपसा केंद्राकडून चंबुखडीकडे येणाऱ्या जलवाहिनीला गेल्या काही दिवसांपासून गळती लागली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असून पाण्याचा अपव्यव होत होता. त्यामुळे सोमवारपासून मुख्य जलवाहिनीवरील गळती काढण्यास शहर पाणीपुरवठा विभागाकडून सुरुवात केली. दुरुस्तीमुळे सी, डी व संलग्न उपनगरे, फुलेवाडी, फुलेवाडी रिंगरोड, लक्षतीर्थ वसाहत, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, आपटेनगर, साने गुरुजी वसाहत परिसरात अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. कळंबा फिल्टर हाऊस येथून चार व कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून आठ अशा १२ टँकरच्या फेऱ्याद्वारे नागरीकांना पाणीपुरवठा केला. दुरुस्तीचे काम मंगळवार दुपारपर्यंत सुरू राहणार असल्याने सकाळच्या सत्रात येणाऱ्या भागांना अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. सायंकाळच्या सत्रात होणारा पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असली, तरी टाकी भरुन पाणी वितरण होईपर्यंत शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्याच दिवस शिक्षकाविना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

जिल्ह्यातील बहुतांशी प्राथमिक शाळांमध्ये नवागतांच्या स्वागतोत्सवानंतर नवीन शैक्षणिक वर्षाला धडाक्यात सुरुवात झाली. याचवेळी शिक्षकांच्या वाढत्या रिक्त पदसंख्येमुळे शाहूवाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा डोलारा मात्र कोलमडून पडल्यासारकी अवस्था आहे. जवळपास ८० शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून रिक्त २०० जागांवर शिक्षक अजून हजर झालेले नाहीत.

प्राथमिक शिक्षकांच्या झालेल्या नुकत्याच ऑनलाइन बदली प्रक्रियेनंतर तालुक्यात कार्यरत सहा मुख्याध्यापकांसह ६० शिक्षकांची अन्य तालुक्यात बदली झाली. तर आंतरजिल्हा बदलीतून २० शिक्षकांना सोमवारी शाहुवाडीतून मुक्त करण्यात आले. बदलीनंतर अन्य जिल्हा किंवा तालुक्यातून शाहुवाडीत एकही शिक्षक बदलीने दाखल झालेला नाही. यामुळे तालुक्यात याआधीच ११८ रिक्त शिक्षकपदांची संख्या ८० ने वाढून दोनशेच्या घरात पोहचली आहे. यातून पहिल्याच दिवशी जवळपास २० शाळांत एकही शिक्षक नव्हता.

शिक्षकांच्या रिक्त पदसंख्येचा समतोलच ढासळल्यामुळे तालुक्यातील शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर तर आलाच, शिवाय 'विना शिक्षक' हा मागील पाठ पुढे गिरवणाऱ्या अनेक प्राथमिक शाळा ग्रामीण भागाच्या शैक्षणिक प्रगतीत आता अडथळा ठरू लागल्या आहेत. याबाबत विद्यार्थी व पालकांचा रोष पत्करणाऱ्या तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी, सदस्यांना चतुरस्त्र चाल खेळणाऱ्या जिल्हा प्रशासनाने वेळप्रसंगी कात्रजचा घाट दाखवून हा प्रश्न भिजत ठेवला आहे.

शाहूवाडी तालुक्यात सध्या जिल्हा परिषदेच्या २३ केंद्रांतर्गत २७४ प्राथमिक शाळांमध्ये एकूण ८९० शिक्षक पदे मंजूर आहेत. वास्तविक जिल्हा प्रशासनाच्या समानीकरण (सरासरी रिक्त पदे) तत्वानुसार शाहुवाडीत ७२ रिक्त शिक्षकपदे असायला हवीत. परंतु जवळपास रिक्त शिक्षकपदांनी २०० चा आकडा गाठल्याचे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभालाच स्पष्ट झाल्याने शिक्षण खात्यातील बदली धोरण आणि प्रशासनाच्या मनमानी, अनागोंदी कारभारामुळे शाहूवाडीसारख्या डोंगरी तालुक्यातील मुलांच्या प्राथमिक शिक्षणाचा हक्क हिरावला जात असल्याचा संताप पालकातून व्यक्त होत आहे.

शाहूवाडी तालुक्यातील शिक्षण सेवेबाबत जणू 'काळ्या पाण्याची शिक्षाच' हा समस्त शिक्षकवर्गात बळावत असलेला गैरसमज कोण आणि कसा पुसणार? हाच खरा प्रश्न आहे. साहजिकच बहुतांशी केंद्रातील शिक्षकांची आजही ८० टक्के रिक्तपदे आहेत. त्यामुळे शिक्षण प्रवाहात येऊ पाहणाऱ्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील मुलांचे शैक्षणिक भवितव्य मात्र आजही अंधारात चाचपडत राहिल्याचे ढळढळीत सत्य आहे.

शिक्षक नसलेल्या शाळा

शेंबवणे, धुमकवाडी, गावडी, पिंपळेवाडी, ठमकेवाडी, काळकेवाडी, मुटकलवाडी, परळे, चौकेवाडी, मुसलमानवाडी (अनुस्कुरा), पार्टेवाडी, पाटीलवाडी (शित्तूरवारूण), हुंबवली, पळसवडे आदी शाळांत शिक्षक नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमृत’ च्या सुपरवायझरला खडसावले

$
0
0

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अमृत योजनेतंर्गत शहरात सुरू असलेल्या जलवाहिनी टाकण्याचा कामामध्ये कोणत्याही प्रकारची सुसूत्रता दिसत नाही. जलवाहिनी टाकलेल्या ठिकाणी रस्ता दुरुस्ती न केल्याने नागरिकांना पहिल्याच पावसात चिखल आणि दलदलीचा सामना करावा लागला. कंपनी बेजबाबदारपणे काम करत असल्याचे पडसाद सोमवारी झालेल्या बैठकीत उमटले. बैठकीत दास ऑफशोअर कंपनीचे मॅनेजर शिवाजी आडूरकर व सुपरवायझर किरण पाटील यांना नगरसेवकांनी चांगलेच खडसावले. योग्य पद्धतीने काम न केल्यास नगरसेवक राहुल चव्हाण यांनी पाटील यांची धिंड काढण्याचा इशारा दिला. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांना अन्य नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

अमृत योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामाबाबत पंधरा दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत कंपनीला सूचना दिल्या होत्या. तरीही कंपनीच्या कामात बदल न झाल्याने छत्रपती ताराराणी सभागृहात कंपनीचे व्यवस्थापक, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, महापालिका संबंधित अधिकारी यांची नगरसेवकांसोबत आढावा बैठक झाली.

बैठकीत परिवहन समिती सभापती अभिजित चव्हाण, सभागृह नेता विलास वास्कर, गटनेता सत्यजित कदम, नियाज खान, नगरसेवक राजाराम गायकवाड, नगरसेविका पूजा नाईकनवरे, माधुरी लाड, उमा बनछोडे, शोभा कवाळे, मेहजबीन सुभेदार, ललिता बारामते यांनी ठेकेदाराच्या कामाबाबत तक्रारी व सूचना मांडल्या. यामध्ये संबंधित ठेकेदारकडे अनुभवी कर्मचारी नाहीत, काम करताना संपूर्ण रस्त्याची खोदाई केली आहे. कामाबाबत विचारणा केल्यास नगरसेवकांचे फोन घेतले जात नाहीत. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर खरमातीची वाहतूक न करता तेथेच टाकली जात आहे. जानेवारी महिन्यात खोदाई केलेल्या रस्त्याची दुरुस्ती अद्याप झालेली नसल्याचे स्पष्ट करत सुपरवायझर पाटील यांना धारेवर धरले. यावेळी राहुल चव्हाण यांनी कामाच्या नियोजनाबाबत पाटील कधीही फोन घेत नाहीत. एका गल्लीतील काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या गल्लीतील कामाला सुरुवात करण्यासाठी प्रत्यक्ष कामावर जावून सूचना केली असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला. यावेळी चव्हाण हे पाटील यांच्या अंगावर धावून गेले.

एमजीपीचे प्रभारी कार्यकारी अभियंता चंद्रशेखर कागलकर यांनी ठेकेदारास कामाचा आवश्यक आराखडा करुन दिला असून कर्मचाऱ्यांची संख्या कमी असली, तरी नियोजनाप्रमाणे काम होणे आवश्यक आहे. कामाची गती वाढवण्यासाठी कर्मचारी व अभियंत्यांची संख्या वाढवण्याची सूचना ठेकेदार कंपनीला दिली.

सभापती शारंगधर देशमुख म्हणाले, 'अमृतची योजना पुढील ३० वर्षांचा विचार करुन करण्यात आलेली आहे. थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाल्यानंतर ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरु केल्यास सध्या मिळणारे पाणीही पूर्ण क्षमतेने शहरास मिळणार नाही. ठेकेदार मनमानीप्रमाणे काम करत असून त्याला दंड करावा.'

.............

खोदाईच्या ठिकाणी रिस्टोरेशनचे आदेश

शहरामध्ये अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी जलवाहिनी टाकल्यानंतर रस्ता दुरुस्ती करणे आवश्यक होते. पण ठेकेदार कंपनीकडून नियमानुसार काम होत नाही. परिणामी एका पावसातच शहराच्या अनेक भागात नागरिकांना खोदाई केलेल्या भागातून जावे लागले. त्याबाबत बैठकीत बहुतांशी सदस्यांनी ठेकेदार कंपनीच्या सुपरवाझरना धारेवर धरल्यानंतर स्थायी समिती सभापती देशमुख यांनी जलवाहिनीचे काम बंद करुन प्रथम आरसीसी टाकीचे व खोदाई केलेल्या ठिकाणी रिस्टोरेशन करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images