Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अर्ज भरण्यासाठी नेट कॅफे फुल्ल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून प्रवेश अर्ज भरून नोंदणी करण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून शहरातील नेट कॅफे विद्यार्थी व पालकांच्या गर्दीने हाउसफुल्ल झाले आहेत. ऑनलाइन अर्ज भरणे व प्रवेश निश्चिती करणे या दोन टप्प्यात प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. १४ जूनपासून मूळ गुणपत्रक मिळेपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचे असल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह होता. दहावीचे गुणपत्रक मिळाल्यानंतर पुढच्या पाच दिवसांत प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे मुख्य केंद्र भवानी मंडप येथील मेन राजाराम हायस्कूल असून ११ संकलन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

दरम्यान, सकाळी दहा वाजता पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय व अकरावी प्रवेश प्रक्रिया समितीच्यावतीने अधिकृत संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले. तसेच प्रवेश अर्ज संकलन केंद्रावर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक सुरेश आवारी, सहायक संचालक सुभाष चौगुले आदी उपस्थित होते.

दहावीचा ऑनलाइन निकाल ८ जून रोजी जाहीर झाला आहे. कोल्हापूर शहरात अकरावीसाठी यावर्षी कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांसाठी १४ हजार १४० जागा उपलब्ध असून ऑनलाइन प्रक्रियेद्वारेच प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत. अद्याप विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. येत्या आठवड्यात मूळ गुणपत्रिका मिळण्याची तारीख एसएससी बोर्डातर्फे जाहीर करण्यात येणार आहे. यावर्षी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे मंडळाच्या www.dydekop.org या अधिकृत वेबसाइटद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्या सूचनेनुसार शुक्रवारपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली. मोबाइल फोनद्वारेही रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध असली तरी अर्ज भरण्यात काही चूक होऊ नये, याची खबरदारी म्हणून पालक व विद्यार्थ्यांनी नेट कॅफे चालकांकडून फॉर्म रजिस्ट्रेशन करण्याला प्राधान्य देण्यात आल्याचे चित्र नेट कॅफेबाहेर लागलेल्या रांगा व गर्दीतून दिसून आले. शहरातील कॉलेज परिसरातील नेट कॅफेवर गर्दीचा ओघ जास्त होता. ज्या शाखेला प्रवेश घ्यायचा आहे त्या शाखेबाबत कॉलेजमधून अभ्यासक्रमाविषयी माहिती घेण्यासाठीही पालकांनी गर्दी केल्यामुळे शुक्रवारी सकाळपासून शहरातील सर्व कनिष्ठ कॉलेजमध्ये गजबज होती. सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेला हा प्रवेश प्रक्रियेचा माहोल सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरूच होता.

झेरॉक्स सेंटरवरही गर्दी

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासोबत प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती काढण्यासाठी शुक्रवारी दिवसभर झेरॉक्स सेंटरवरही विद्यार्थ्यांची गर्दी होती. ऑनलाइन गुणपत्रिकेची प्रत, पात्रतेनुसार दाखले, आधारकार्ड, पालकांच्या उत्पन्नाचा दाखल यासह आवश्यक कागदपत्रांचे झेरॉक्समधील दोन ते तीन सेट विद्यार्थ्यांकडून तयार केले जात होते. तसेच आयडेंटीकार्ड साइज फोटो काढण्यासाठीही विद्यार्थ्यांनी फोटो स्टुडियोकडे मोर्चा वळवला.

सर्व्हर प्रॉब्लेम सुरूच

अधिकृत वेबसाइट सकाळी दहा वाजता कार्यान्वित झाल्यानंतर नेट कॅफेद्वारे ऑनलाइन नोंदणी करण्यास सुरुवात झाली. यासाठी पालक व विद्यार्थी सकाळीच नेट कॅफेमध्ये आले होते. मात्र दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास अनेक ठिकाणी नेट कॅफेवर सर्व्हर डाऊन असल्याची समस्या उद्भवत होती. पाच ते दहा मिनिटांसाठी सर्व्हर डाऊन होत राहिल्याने एका विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन करण्यामध्ये वेळ जात होता.

तक्रार निवारण केंद्र

कला शाखेसााठी डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, वाणिज्य शाखेसाठी न्यू कॉलेज तर विज्ञान शाखेसाठी विवेकानंद कॉलेज येथे तक्रार निवारण केंद्र असेल. ज्या विद्यार्थ्यांची तक्रार असेल त्यांनी ऑनलाइन तक्रार केल्यानंतर त्या अर्जाची प्रत तक्रारनिवारण केंद्रामध्ये जमा करायची आहे.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा चांगली आहे. यामुळे प्रवेश प्रक्रिया पारदर्शी होणार आहे. मी नेट कॅफेद्वारे रजिस्ट्रेशन केले असून दुसऱ्या टप्प्यातील प्रवेशप्रक्रियेसाठी लागणारी माहिती घेतली आहे.

दिव्या खटावकर, विद्यार्थिनी

ऑनलाइन प्रक्रिया चांगली आहे, मात्र यामध्ये खूप वेळ जातो. त्याऐवजी अर्ज भरून देण्याची प्रक्रिया सर्वसमावेशक आहे. ऑनलाइन अर्ज भरणे किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी नेट कॅफेशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे किमान सर्व्हर सुविधा सुरळीत ठेवण्यात यावी.

राजश्री सोनुले, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्वोच्च न्यायालयाचा धनंजय मुंडेंना दिलासा

$
0
0

दाखल केलेल्या गुन्ह्यालाही स्थगिती

म. टा. प्रतिनिधी, बीड

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, दोन दिवसापूर्वी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर मुंडेंवर शुक्रवारी पहाटे दाखल केलेल्या बर्दापूर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती मिळाली आहे. दरम्यान, मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पुस (ता. अंबाजोगाई) येथे नियोजित जगमित्र साखर कारखान्यासाठी चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केल्याप्रकरणी मुंडे यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. ही जमीन देवस्थानची असल्याचा दावा वादीतर्फे करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना औरंगाबाद उच्च न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्याविरोधात मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी शुक्रवारी पहाटेच बर्दापूर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ कर्मचाऱ्यांच्याबदली आदेशांना ब्रेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या गैरकामकाजात अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष सहभागी असलेल्या आठ कर्मचाऱ्यांच्या बदली आदेशाला ब्रेक लागला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमन मित्तल यांनी सही करूनही सामान्य प्रशासनाने बदली आदेश अडवले आहेत. यामुळे या बदली प्रकरणातही 'अर्थ'पूर्ण वाटाघाटींची चर्चा सुरू आहेत, का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोहार यांच्या कामकाजाच्या चौकशीत अनेक नियमबाह्य प्रकरणे चव्हाट्यावर आली म्हणूनच त्यांना कार्यमुक्त करण्याचा अहवाल चौकशी समितीने सीईओंकडे दिला. मात्र, लोहार यांच्या बेकायदेशीर कामकाजास मदत करणारे अधीक्षक प्रकाश नलवडेंसह आठ कर्मचाऱ्यांची बदली मुख्यालयात करण्याची मागणी तक्रारदार सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी लावून धरली. स्थायी समितीमध्ये बदलीचा ठरावही करून घेतला. जिल्हा परिषद सर्वसाधरण सभेत यावरील चर्चेत बहुतांश सदस्यांनी आठजणांच्या बदलीची मागणी केली. त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या बदली आदेशावर सीईओ मित्तल यांनी सही केली. त्यांच्या बदल्या शाहूवाडी, चंदगड, शिरोळ तालुक्यांत करण्याचाही निर्णय झाला. तरीही सामान्य प्रशासन आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहे. अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्याशी चर्चा करून आदेशाची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. हे कारण वरवर सांगितले जात असले तरी चुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठिशी घालण्यासाठी जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप होत आहे.

०००

नलवडे यांना कार्यमुक्तचा प्रस्ताव

लोहार यांच्या वादग्रस्त कामकाजात नलवडे यांचा सहभाग असल्याच्या तक्रारी आहेत. ते वर्ग दोनचे अधिकारी असल्याने त्यांच्यावरील कारवाईचा अधिकार शिक्षण आयुक्तांना आहेत. यामुळे नलवडेंना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार आहे.

०००

बदलीची मागणी केलेले कर्मचारी, अधिकारी

अधीक्षक प्रकाश नलवडे, मदन जाधव, वरिष्ठ सहायक शिवाजी खटांगळे, अभिजित बंडगर, राजू घोटणे, अजित कणसे, कनिष्ठ सहायक दाजी पाटील, आबासाहेब दिंडे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारच्या सुगम, दुर्गम ऑनलाइन प्रणालीद्वारे शुक्रवारी जिल्ह्यातील १०५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यांच्या बदलीचे आदेश शनिवार (ता.१५) पासून संबंधित शिक्षकांना देण्यात येणार आहे. याउलट सोयीच्या ठिकाणी बदली होण्यासाठी गेल्या वर्षी चुकीची माहिती भरलेल्या ११८ शिक्षकांनाही बदलीला सामोरे जावे लागले. यामुळे पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून 'अर्थ'पूर्ण घडमोडींनंतरही त्या ११८ शिक्षकांना दिलासा मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले.

दुर्गम भागातील शाळेत सलग तीन वर्षे सेवा बजावलेले शिक्षक सुगम भागात, तर सुगम परिसरातील शाळेत दहा वर्षे काम केलेल्या शिक्षकांची बदली दुर्गम भागातील शाळेत झाली. त्यासाठी आठवड्यापूर्वी बदलीपात्र शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज भरला होता. त्यांच्या बदलीची प्रक्रिया राबविण्यात आली. बदलीचे ऑनलाइन तयार झालेले आदेश गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. या प्रक्रियेद्वारे एकूण १०५० शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यात सर्वाधिक शिक्षक शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड या डोंगराळ तालुक्यांना मिळाले आहेत. जिल्हा परिषदेमधील समिती सभागृहात शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली.

दरम्यान, या बदली प्रक्रियेतून वगळण्याची मागणी चुकीची माहिती भरलेल्या प्रकरणात दोषी आढळलेल्या १८८ शिक्षकांची आहे. मात्र, नियमानुसार त्यांची बदली करणे आणि एक वेतनवाढ रोखण्याच्या आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल ठाम आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईवारी करून शिक्षण सचिवांची भेट घेऊन ११८ शिक्षकांची बदली करू नये, अशी मागणी केली. त्यांनी ती मागणी फेटाल्याने बदली टाळण्यासाठी आर्थिक ताकद लावलेल्या शिक्षकांच्या वाट्याला तेलही गेले आणि तूपही गेले अशी वेळ आली आहे. यामुळे शुक्रवारच्या बदली आदेशालाच स्थगिती मिळविण्यासाठी ११८ मधील शिक्षिका सुमित्रा कोळी, सुनीता साळुंखे, शशिकला पाटील, शीतल चव्हाण, एकनाथ ढवण, शंकर कुंभार या आठजणांनी येथील वरिष्ठस्तर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. सीईओ यांना प्रतिवाद करून दाखल केलेल्या या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी चुकीची माहिती भरलेली नाही. यावेळच्या बदली प्रक्रियेतून आम्हाला वगळावे, आहे त्याच ठिकाणी ठेवावे, आमच्या ठिकाणच्या बदलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली. मात्र, न्यायालयाने एकतर्फी बदली प्रक्रियेस स्थगिती देण्यास नकार दर्शवला. जि. प. चे वकील राजेंद्र पाटील यांनी बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली. त्यानुसार सोमवारी जि. प. ची बाजू ऐकण्यासाठी सुनावणी होणार आहे. यामुळे त्वरित स्थगिती घेऊन आहे, त्याच ठिकाणी राहण्याच्या आठ शिक्षकांचे प्रयत्नांना न्यायालयीन पातळीवरही सध्यातरी यश आले नाही. तरीही काही शिक्षक हायकोर्टात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी अजून झालेली नाही.

०००००

ढपला पाडलेलेच पुढे

चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांची बदली रोखण्यासाठी आणि वेतनवाढ रोखण्याची कारवाई टाळण्यासाठी ढपला पाडलेले पदाधिकारी ११८ शिक्षकांना न्यायालयात जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुरविण्यासाठी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. यामुळे त्या पदाधिकाऱ्यांची बांधिलकी विद्यार्थ्यांशी आहे की, सोयीच्या बदलीसाठी चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांशी आहे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक निकषावर सरसकट आरक्षण द्याखासदार उदयनराजे भोसले यांची मागणी

$
0
0

आर्थिक निकषावर सरसकट आरक्षण द्या

खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून एकमेकांमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार सुरू आहे. सामाजिक सलोखा निर्माण होण्याऐवजी आरक्षणावरून जातीजातींमध्ये भांडणे लागत आहेत. त्यामुळे मराठा, मुस्लिम, धनगर आणि लिंगायत समाजाला जातीच्या निकषावर आरक्षण न देता आर्थिक निकषावर सरसकट आरक्षण द्या' अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सोलापुरात पत्रकार परिषदेत केली.

'द्यायचे असेल सर्वांना सरसकट आरक्षण द्या, नाहीतर कोणालाच आरक्षण देऊ नका. आरक्षणच रद्द करा, सर्वांना समानता द्या, अशा शब्दात खासदार उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला. ठराविक जात हा विषय बाजूला ठेऊन सर्व जातींना आर्थिक निकष लावून आरक्षण दिल्यास समाजा-समाजामध्ये निर्माण होणारा तेढ कमी होण्यास मदत होईल. आमदार आणि खासदार कोण आहेत. यांचे स्टॅँडर्ड काय? लोक निवडून देतात म्हणून आमच्यासारखी लोकं निवडून येतात,' असेही उदयनराजे म्हणाले

ईव्हीएम तर रडीचा डाव

ईव्हीएम मशीनबाबत मला संशय आहे. हा रडीचा डाव आहे. आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेतल्यास निकाल वेगळा दिसेल, असे म्हणत त्यांनी लोकसभेची फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली. प्रगत राष्ट्रांत ईव्हीएमवर मतदानप्रक्रिया होऊन निवडणूक पार पडल्यानंतर संशयाचे वातावरण निर्माण होताच पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुकांना प्राधान्य देण्यात आल्याचे उदयनराजे यांनी सांगितले. नुसते निवडून येणे महत्वाचे नाही. मी सुद्धा पराभव पचवला आहे. यंदा आपले मताधिक्य २ लाखांनी घटले आहे. मोठ्या सभा जेथे झाल्या त्या ठिकाणी अनेकांना जवळपास दोन लाखांच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिवाय ज्या ठिकाणी उमेदवाराला १०० टक्के विजयाची खात्री होती, त्या ठिकाणी सुद्धा उमेदवार दोन दोन लाखांच्या फरकाने पराभूत झाले आहेत. याचा अर्थ नेमका काय समजायचा. हा सर्व कारनामा ईव्हीएम मशीनचाच आहे. झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यामध्ये सुद्धा फरक होणे हा नेमका प्रकार न समजायला लोक वेढे नाहीत. बटन दाबल्यावर चिठ्ठी पडतेच ना? त्यापेक्षा आम्ही चिठ्ठी टाकतो, असा आरोप करीत उदयनराजेंनी लोकसभा निवडणुकीवर हेराफेरीचा आरोप केला.

दुष्काळाचे राजकारण

दुष्काळ नैसर्गिक आहे. त्याची कोणी सुद्धा हमी देऊ शकत नाही. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा दुष्काळ होताच. परंतु त्या वेळी दुष्काळाचे नियोजन केले जायचे. आज मात्र केवळ राजकारण होताना दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आज आदर कमी झालेला आहे, ही खेदाची बाब आहे. दुष्काळ आला म्हणून गाव सोडून जायला कोणालाही स्वारस्य नाही. शेतकऱ्यांच्या प्रगतीशिवाय देशाची प्रगती शक्य नाही. इन्कम, रिसर्च, मॅनेजमेंट आणि अॅग्रीकल्चर अर्थात 'इर्मा' ची सांगड घातल्यास शेतकरी साधन होईल, असे मतही खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फांदी पडून महिलेचा मृत्यू

$
0
0

फांदी पडून महिलेचा मृत्यू

सातारा :

पाचगणी-वाई रस्त्यावरील अभिनेता आमीर खान यांच्या बंगल्यासमोरच्या झाडाची वाळलेली फांदी किरण स्वप्नील माने (रा. पिंपरी चिंचवड, पुणे) या पर्यटक महिलेच्या अंगावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

माने दाम्पत्य महाबळेश्‍वर, पाचगणीत फिरायला आल्या होत्या. त्यांच्यासोबत आणखी चार जण होते. महाबळेश्‍वरमध्ये फिरून झाल्यानंतर त्यांनी तेथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी फिरत हे सर्व जण पाचगणीला आले. पाचगणीहून पुण्याकडे मोटारसायकलवरून (एम. एच. १४ एच जे ८८५८) हे दाम्पत्य निघाले असता अभिनेता आमीर खान यांच्या बंगल्यासमोर गाडीवर झाडाची वाळकी फांदी अचानक कोसळली. ही फांदी माने यांच्या अंगावर कोसळून त्या जबर जखमी झाल्या. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या बाबत स्वप्नील माने यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

.........

बलात्कारप्रकरणी

दहा वर्षांची शिक्षा

सातारा :

पाचवड (ता. माण) येथील शिंदे वस्तीवरील कडवळ्याच्या शेतात ४ जुलै २०१५ रोजी अल्पवयीन गतिमंद मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करणारा नराधम धनाजी आप्पासाहेब शिंदे (वय ३०, रा. शिंदे वस्ती, पाचवड) यास वडूजचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी दहा वर्षे शिक्षा आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शिंदे याने त्याची नातलग असलेल्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने नऊ साक्षीदार तपासण्यात आले. सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अजित कदम व सहाय्यक सरकारी वकील नितीन गोडसे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश मलाबादे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पीडित व्यक्तीस वीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशीम सल्लागार समिती सदस्यपसी डॉ. जाधव

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महाराष्ट्र शासनातर्फे नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या रेशीम सल्लागार समितीवर येथील शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. ए. डी. जाधव यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे वस्त्रोद्योग सचिव हे समितीचे अध्यक्ष राहणार असून नागपूरचे रेशीम संचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

डॉ. जाधव रेशीमशास्त्र विषयाचे अध्यापन, संशोधन, प्रसार व प्रचार यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. क्युबा या देशासाठीही ते रेशीम सल्लागार म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन या समितीवर त्यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील सर्वांगीण रेशीम विकासाच्या दृष्टीने धोरण तयार करणे, राज्यातील रेशीम विस्तार व विकासासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू इत्यादी राज्यांच्या धर्तीवर तुती रेशीम उद्योगाची आणि झारखंड, छत्तीसगड राज्यांच्या धर्तीवर टसर रेशीमगाठी विकास कार्यक्रमांचा कृती आराखडा तयार करणे, धोरण तसेच आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी कामकाजाची दिशा ठरविणे, राज्यात पैठणी, येवला इत्यादी पारंपरिक कौशल्यावर आधारित रेशीम उत्पादनाचा जागतिक पातळीवर प्रचार करून त्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सेरी-टुरिझम प्रकल्प हाती घेण्यासाठी उपाययोजना सुचविणे आदी कामकाज समितीमार्फत करणे अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा व्यवस्थापन व निर्मूलन विषयक कार्यशाळा

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापूर लिंगायत तेली समाजातील श्री महालक्ष्मी महिला मंडळातर्फे 'कचरा व्यवस्थापन व निर्मूलन'विषयक कार्यशाळा झाली. महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री सावर्डेकर यांनी कचरा व्यवस्थापनविषयी माहिती दिली. घरातील कचऱ्याचे वर्गीकरण,कचऱ्यापासून सेंद्रीय खत निर्मिती यासंबंधी प्रात्यक्षिके दाखविली. संगिता कोकितकर यांनी मार्गदर्शन केले. सुलभा रणदिवे यांनी आभार मानले. यावेळी रजनी माळकर, स्वाती तेली, मीना सांगावकर, नीलम बनछोडे, माधुरी गवळी आदी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बसवेश्वर संदेश यात्रेचे उद्या आगमन

$
0
0

कोल्हापूर: महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी राज्यभरातून संदेश यात्रा काढण्यात येत आहे. बेंगळुरू येथे बसविण्यात येणाऱ्या १४ फुटी बसवमूर्ती आणि चित्ररथारसह ही यात्रा सुरू आहे. महात्मा बसवेश्वर संदेश यात्रेचे रविवारी (ता.१६) सकाळी ९.३० वाजता कोल्हापुरात आगमन होत आहे. ताराराणी चौक येथे यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर दसरा चौकातील चित्रदुर्ग मठापर्यंत मिरवणुकीचे नियोजन आहे. यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. संदेश यात्रेचे स्वागत, त्यानंतर आयोजित मिरवणूक व अन्य कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजेंना आवरा, अन्यथा आम्ही बाहेर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजेंना आवरावे, अन्यथा आम्ही पक्षातून बाहेर पडू, असा निर्वाणीचा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. या वेळी रामराजेंनी उदयनराजेंबरोबरच माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावरही शेलक्या भाषेत टीका केली.

नीरा-देवघर धरणाचे पाणी बारामतीऐवजी माढा, सांगोला आदी दुष्काळी भागाकडे वळविण्याच्या मुद्द्यावरून उदयनराजे यांनी कराडमध्ये गुरुवारी रामरोंजवर खापर फोडले होते. त्याला रामराजेंनी प्रत्युत्तर दिले.

'उदयनराजेंनी मला स्वयंघोषित भगीरथ म्हटले. तुम्हीही स्वयंघोषित छत्रपती आहात, तुमचा राज्याभिषेक झालेला नाही. त्यामुळे आपण दोन्ही स्वयंघोषित लोकांनी एकमेकांशी वाद घालणे योग्य नाही. वेळ मिळाल्यास आणि मन थाऱ्यावर असल्यास उदनराजेंनी खंडाळ्याच्या खिंडीपलीकडील नीरा उजवा कालव्याजवळ आपल्या लँड क्रूझर गाडीतून जावे आणि डाव्या दिशेने वळून आंदरूडपर्यंत प्रवास करावा. त्यावेळी उदयनराजेंना समजेल की, ज्या भागाला नीरा- देवघर योजनेतील पाणी कधीही मिळू शकत नव्हते अशा भागापर्यंत १०-१५ बोगदे पाडून मी कृष्णेचे पाणी पोहोचवले. मी १५ वर्षे लाल दिव्याच्या गाडीतून फिरत असेल तर तुम्हाला दु:ख होण्याचे कारण काय आहे?' असा प्रतिसवाल रामराजेंनी केला.

'त्यांनाही दोन वर्षे लाल दिवा मिळाला होता. या काळात त्यांनी काय केले? जावलीमध्ये ते काय करता त्याची फाइल माझ्याकडे आहे. ते कोणाला पैसे मागतात, एनओसीसाठी लोकांकडून पैसे खातात, हे मला माहिती आहे,' अशा शब्दांत रामराजेंनी उदयनराजेंचा समाचार घेतला.

'खासदारांना सांभाळणार असाल, तर आम्हाला बाहेर पडण्याची परवानगी द्या, असे उद्या साताऱ्यातील बैठकीत आम्ही पवार साहेबांना सांगणार आहोत,' असे रामराजे म्हणाले.

'स्वत:ला भगीरथ म्हणवून घेणाऱ्यांनी लाल बत्तीचा वापर केला आणि लोकांची खिल्ली उडविण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यांना देवसुद्धा माफ करणार नाही.'

उदयनराजे भोसले

खासदार, सातारा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कराडमध्ये ते मला गुरू म्हणाले, मात्र निवडणूक होताच त्यांनी शब्द फिरवला. फलटणमध्ये येऊन ते आम्हाला बांडगूळ म्हणतात. याच बांडगुळांनी त्यांच्या आधीच्या पिढीला सांभाळले होते, हे त्यांनी लक्षात ठेवावे.

रामराजे नाईक-निंबाळकर

विधान परिषदेचे सभापती

साताऱ्यात जोपर्यंत ही पिसाळलेली तीन कुत्री आहेत, तोपर्यंत मीही पिसाळलेलाच राहणार, असा इशारा देताना रामराजे निंबाळकर यांनी खा. उदयनराजे, खा. रणजितसिंह निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांची तुलना कुत्र्याशी केली आहे. दरम्यान, रामराजे यांच्या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेली चार ते पाच दिवसापासून नीरा-देवघर पाणी पेटलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल केलेल्या टीकेला आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजें यांना आवरावे, अन्यथा आम्ही पक्षातून बाहेर पडू असा निर्वाणीचा इशारा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे.

उदयनराजे यांनी नीरा देवघर पाणी प्रश्नावरून रामराजे नाईक निंबाळकर यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. भगीरथ म्हणून घेणाऱ्यांनी लाल बत्तीचा वापर केला आणि लोकांची खिल्ली उडवण्यापलीकडे काही केले नाही, त्यांना देवसुद्धा माफ करणार नाही, असे उदयनराजेंनी म्हटले होते.

सध्याच्या नीरा देवघरच्या पाणीप्रश्नावरून पेटलेल्या राजकारणामुळे राष्ट्रवादीतून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बाहेर पडणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेली अनेक दिवस छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामधील वाद विकोपाला गेला होता मात्र लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांची समजूत काढून खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी दिली यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी एकत्र येत खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रचार केला यामध्ये कराड येथे झालेल्या जाहीर सभेत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले होते की, श्रीमंत रामराजे हे माझे गुरु आहेत वक्तव्य केले होते यांचा धागा पकडत त्यांनी पलटवार केला की, पक्षात राहून पक्षाच्या विरोधात बोलण्याची सवय जात नसल्याने खासदार उदयनराजे यांना आवरा अन्यथा आम्ही पक्षातून बाहेर पडू असा इशारा दिला आहे.

उदयनराजेंनी मला स्वयंघोषित भगीरथ म्हटले. मला वाटतं की, तुम्ही स्वयंघोषित छत्रपती आहात, तुमचा राज्याभिषेक झालेला नाही. त्यामुळे आपण दोन्ही स्वयंघोषित लोकांनी एकमेकांशी वाद घालणे योग्य नाही. तुम्हाला कधी वेळ मिळाला आणि तुमचं मन थाऱ्यावर असेल तर एकदा खंडाळ्याच्या पलीकडे खिंडीजवळ नीरा उजवा कालवा आहे. उदयनराजेंनी त्याठिकाणी आपल्या लँडक्रुझर गाडीतून जावे आणि डाव्या दिशेने वळून आंदरूडपर्यंत प्रवास करावा. त्यावेळी उदयनराजेंना समजेल की, ज्या भागाला नीरा- देवघर योजनेतील पाणी कधीही मिळू शकत नव्हते अशा भागापर्यंत १०-१५ बोगदे पाडून मी कृष्णेचे पाणी पोहोचवले. त्यामुळे काहीजण मला भगीरथ म्हणत असतील किंवा मी गेली १५ वर्ष लाल दिव्याच्या गाडीतून फिरत असेल तर तुम्हाला दु:ख होण्याचे कारण काय आहे, असा सवाल रामराजे निंबाळकर यांनी उदयनराजेंना विचारला.

तुम्हालाही दोन वर्षे लाल दिवा मिळाला होता. या काळात तुम्ही काय केले? तुम्ही स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणवता माञ जावलीमध्ये तुम्ही काय काय करता त्याची फाईल माझ्याकडे आहे असे म्हणत तुम्ही कोणा कोणाला पैसे मागता,कोणा कोणाला ञास देता एनओसीसाठी लोकांकडून पैसे खाता. असले धंदे आम्ही कधी केले नाहीत.यामुळे जावलीत तुम्ही का मागे पडला व लोकांनी तुम्हाला का नाकारले.तर लोकसभा निवडणुकीमध्ये कराड येथील झालेल्या सभेत तुम्ही मला गुरू म्हणाला होता मात्र निवडणुक होताच तुम्ही शब्द फिरवायला सुरुवात केली यामुळे उद्या सातारा येथे होत असलेल्या मिटींगमध्ये पवार साहेबांना खासदारांना संभाळणार असला तर आम्हाला बाहेर पडण्याची परवानगी द्या असे खा.उदयनराजे भोसले यांच्यावर नाराजी व्यक्त केली. फलटणमध्ये येऊन तुम्ही आम्हाला बांडगुळ म्हणता. मात्र, याच बांडगुळांनी तुमच्या आधीच्या पिढीला सांभाळले होते, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत रामराजेंनी उदयनराजेंचा समाचार घेतला. पुढील काळात पाणीप्रश्नावरून राजकारण चांगलेच तापणार असून पुढील काळात याच विषयावरून बरीच राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उदयनराजे स्वंयघोषीत छञपती -रामराजे

उदयनराजेंनी मला स्वयंघोषित भगीरथ म्हटले. मला वाटतं की, तुम्ही स्वयंघोषित छत्रपती आहात, तुमचा राज्याभिषेक झालेला नाही असा पलटवार पञकारपरीषदेत श्रीमंत रामराजे यांनी केले.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण मध्ये केलेल्या टिकेला माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खरपुस समाचार घेत ते म्हणाले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनी छञपती घराण्यावर केलेली टीका तुम्हाला शोभते का,वय वाढल्यामुळे भाषणात आपण जो डान्स केला.टीका करताना आपण त्यांना पिसाळलेली कुञी म्हणला.आपल्यावर टीका केली तर आपण सहन करु शकत नाही.श्रीमंत रामराजे यांना पाण्याच्या खात्यामध्ये राहुन समजले नाही आपल्या हक्काचे पाणी बारामतीला देताना यांना लाज वाटली नाही.आता जेव्हा सरकारने पाणी दुष्काळी भागाला माघारी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे त्यामध्ये तांञिक गोष्टी काढुन लोकांचे नुकसान कसे होईल,हायकोर्टामध्ये मुद्दे कसे उपस्थित करता येतील अशा गृहनास्पद गोष्टी श्रीमंत रामराजे हे करीत आहे.मी या गोष्टीचा फलटण,खंडाळा,सांगोला, माळशिरस,पंढरपुर जनतेच्या वतीने निषेध करतो.खर तर अशा लोकांना रस्त्यावर जोडे मारले पाहिजे.यांना मतदारसंघातुन हाकलुन दिले पाहिजे हे लोक जनतेत राहुन जनतेबरोबर गद्दारी करणारी ही लोक तांञिक तृटी पुढे करुन हायकोर्टात कसे मांडता येईल.ज्या बारामतीकरांनी गळ्यात पट्टा बांधला आहे त्यांनी परत कस देता येईल अशा प्रवृत्तींचा मी जाहिर निषेध करतो आणि मी ठामपणे सांगतो की माढा मतदारसंघांला ७ टीएमसी पाणी वाढवुन मिळाले आहे प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ होईल.कुठल्याही शेतकऱ्याला यापासुन वंचित ठेवणार नाही मी माढा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी हे सांगतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्राफिक गार्डन देतेय नियमांचे धडे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम वाहनांची गजबलेल्या रस्त्यातून जाताना चौकात सिग्नल लागतो तेव्हा चौकात असलेल्या सिग्नलच्या खांबावरील लाल, हिरवा व पिवळा या रंगाचा अर्थ काय असे अनेकदा मुलं विचारतात. आईबाबांसोबत ट्रीपला जाताना महामार्गावर पथकराचे थांबे लागतात तेव्हा वाहनाच्या प्रकारानुसार लेनमधून जाताना मुलांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव असतात. उड्डाणपुलावरून गाडी चालवताना वळणं कशी घ्यावी, रस्त्यावरील एकेरी मार्गांच्या दिशा कशी ओळखावी, भुयारी मार्गांचा वापर करताना काय काळजी घ्यावी, अशा अनेक शंका मुलांच्या मनात डोकावत असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे हसतखेळत देणारे ट्राफिक गार्डन मुलांसाठी मनोरंजनातून वाहतूक नियमांचे शिक्षण ही नवी संकल्पना घेऊन खुले झाले आहे. पोलिस मुख्यालयाच्या परिसरात पोलिस आणि केएसबीपी यांच्या माध्यमातून पोलिस उद्यानात ट्राफिक गार्डन साकारले आहे. वाहतुकीचे नियम मुलांना शालेय वयात समजावेत यासाठी हे गार्डन तयार करण्यात आले आहे. आकर्षक झाडे, बसण्यासाठी बेंच, टायर आर्टमधून तयार केलेला प्ले ट्रॅक अशा हटके डिझाइनचे ट्राफिक गार्डन बच्चेकंपनीठी पिकनिक स्पॉटही बनले आहे. पोलिस मुख्यालयात उद्यानाशेजारी तीन एकर जागेत गार्डन तयार झाले आहे. गार्डनमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला अॅम्पी थिएटर आहे. या ठिकाणी ट्राफिक पोलिसांच्या रोबोमार्फत नागरिकांचे स्वागत करून ट्राफिक गार्डनची माहिती दिली जाते. कार्यालयाशेजारी असलेल्या प्रशस्त हॉलमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांच्या ध्वनिचित्रफिती पाहता येतात. मुख्य गार्डनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सायकल, इलेक्ट्रिक बाइक, इलेक्ट्रिक कार घेता येते. रस्त्यांवर वाहतुकीचे नियम कसे पाळावेत, याचे प्रात्यक्षिक घेता येते. आयलँड, ट्राफिक सिग्नल, टोल प्लाझा, उड्डाणपूल, पादचारी पूल, झेब्रा क्रॉसिंग, पार्किंग याची माहिती मिळते. वाहतूक नियमांचे फलकही सर्वत्र लावले आहेत. गार्डनमध्ये दोन ठिकाणी ट्राफिक सिग्नल तयार केले आहेत. यामध्ये गार्डनच्या मध्यभागी तयार करण्यात आलेला चौक आणि चार सिग्नल यंत्रणेमुळे लाल, पिवळ्या व हिरव्या दिव्याचा अर्थ समजून घेणे सोपे झाले आहे. याठिकाणी प्रात्यक्षिकातून वाहतूक नियमांची माहिती मिळते. बोगद्यातून जाताना कोणती दक्षता घ्यावी याची माहिती मिळावी, यासाठी गार्डनमध्ये बोगद्याचीही निर्मिती केली आहे. नियमांची माहिती देण्यासाठी वाहतूक पोलिसही गार्डनमध्ये तैनात केले जाणार आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागा विकसित केली आहे. पोलिस उद्यान आणि ट्राफिक गार्डनमध्ये येणाऱ्या नागरिकांना खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी पोलिस कल्याण विभागामार्फत सहा स्टॉल सुरू केले जाणार आहेत. गार्डनमध्ये सर्वांसाठी मोफत प्रवेश मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय साहित्य महागले

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. शालेय साहित्याने बाजारपेठ सजली असून पालकही साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहेत. गतवर्षी पेक्षा यंदा शैक्षणिक साहित्य महागले असून दहा टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या पालकांच्या खिशाला दरवाढीमुळे कात्री लागली आहे.

सामान्यतः कच्चा माल, पेट्रोल व डिझेल यांचे भाव वाढल्याने यावर्षी शालेय साहित्यही महाग झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पुस्तके, गाईड, वर्क बुक्स यांच्यासोबत वह्या, दफ्तरे ,जेवणाचे आकर्षक डबे, पाण्याच्या बाटल्या आणि वॉटर बॅग्ज अशा साहित्याने बाजारपेठ सजली आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादक कंपनीने दरात काही प्रमाणात वाढ केली आहे. दरवर्षी शालेय साहित्य दरवाढीचा सामना पालकांना करावा लागत आहे.

दरवाढीबाबत विक्रेते सर्जेराव पायगुडे म्हणाले, 'मागील दोन वर्षांपासून वह्यांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने नामांकित कंपन्यांनी दरवाढ केली आहे. दरवाढ झाल्याने आवश्यक तेवढ्या वह्या व साहित्य घेण्यास पालक प्राधान्य देत आहेत. पालक दरवाढीसाठी विक्रेत्यांना जबाबदार धरतात मात्र, उत्पादक कंपन्यांनी दरवाढ केल्याने विक्रेत्यांकडे पर्याय उरत नाही. दरवाढ झाल्याने साहित्य खरेदीनंतर सवलतीबाबत आवर्जून विक्रेत्यांकडे विचारणा होत आहे.'

दप्तर व वह्यांचे दर

दोनशे पानी वह्या १५० ते ३०० रुपये डझन,ए फोर साईज वह्या २५० ते ६०० रुपये डझन, शंभर पानी वह्या १५० रुपये डझन, दोनशे पेजीस लहान वह्या ३०० रुपये तर मोठ्या वह्या ६०० रुपये डझन तर कापडावर जीएसटी लागू असल्याने दप्तराच्या किमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे. बाजारात दप्तरांची किंमत अडीचशे ते आठशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

गणवेश दर

सरकारी खासगी व इंग्रजी माध्यमांचे गणवेश वेगवेगळे असतात. त्याचे दरही दर्जानुसार ठरतात. शहरातील कापड दुकानात मराठी शाळांचे गणवेश तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंत तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या गणवेशाचे जर किमान पाचशे ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहेत. गतवर्षीपेक्षा गणवेशाच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे.

इतर साहित्याचे दर

वॉटर बॅग ५० ते ३०० रुपये, कंपास पेटी ३० ते २०० रुपये, टिफिन बॉक्स ५० ते २५० रुपये, रेनकोट लहान मुले २०० ते ५५० रुपये असे दर आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने शालेय साहित्यात दरवाढ होत असल्याने पालकांचे बजेट कोलमडत आहे. त्यामुळे पालकांकडून सवलतीची मागणी विक्रेत्याकडे केली जाते. वाढत्या महागाईमुळे आवश्यक तेवढ्याच साहित्याची खरेदी करणार आहोत.

संजय भोईटे, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हनुमाननगर ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सभा

$
0
0

कोल्हापूर: हनुमानगर ज्येष्ठ नागरिक संघाची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. संघाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव हिलगे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. नामदेवराव पाटील यांनी जमाखर्चाचा ताळेबंद मांडला. कार्यवाह अरुण जोशी यांनी विविध उपक्रमांचा आढावा घेतला. ज्येष्ठ पत्रकार शरद कारखानीस यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध योजनांची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष हिलगे यांनी वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल मानपत्र देऊन सत्कार झाला. याप्रसंगी अशोक कुलकर्णी, प्रकाश हळबे, दिलीप शिंदे, डॉ. एम. एस. पाटील, बाळासाहेब सोनुले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयावर देवदासींचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देवदासींच्या घरकुल प्रस्तावांना त्वरित मान्यता द्यावी, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या नेतृत्वाखाली देवदासींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.

देवदासींना श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेतून लाभ मिळावा, निराधारांच्या पेन्शनमध्ये वाढ करून २५०० रुपये करावे, देवदासींच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करावा, आदी मागण्यांचे फलक घेऊन मोर्चा महावीर गार्डनपासून निघाला. तेथून खानविलकर पेट्रोल पंपमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला. तेथे माजी नगरसेविका मायादेवी भंडारी यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. मोर्चात अशोक भंडारी, शारदा पाटोळे, रेखा वडर, देवा साळोखे, रेणुका वाघमारे, नसीम देवडी, आदी सहभागी झाले होते.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 0


२२ हजार कृषी वीज कनेक्शन प्रलंबित

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मिळून तब्बल २२ हजार शेतकरी कृषीपंप वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी महावितरणकडे पैसे भरुनही अद्याप जोडणी झाली नाही. दुसरीकडे कृषीपंपांच्या वीजदराच्या सवलतीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या तीन वर्षांत राज्य विद्युत नियामक आयोगाने चार वेळा शेती पंप वीज दरात वाढ केली. त्यामुळे वीज दरात व थकबाकीत प्रचंड वाढ झाली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज सवलतीच्या दरात द्यावी तसेच सरकारी पाणी पट्टीच्या सवलतीच्या दराबाबत निर्णय घ्यावा. सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या नावावरील पोकळ व दंडीत सरकारी पाणीपट्टीची थकबाकी माफ करावी, अशी मागणी इरिगेशन फेडरेशनने केली होती. त्यासाठी इरिगेशन फेडरेशनने जानेवारी २०१९ मध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचे आंदोलनही केले होते.

डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वालील आंदोलनात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहीचे पत्र आंदोलनस्थळी दिले होते. त्यामध्ये ३१ जानेवारी, २०१९ अखेर इरिगेशन फेडरेशनच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील मागण्यासंदर्भात निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी महिन्यात ऊर्जा व पाटबंधारे विभागाच्या मंत्र्यांची बैठक घेऊन सर्व प्रश्न निकालात काढू, असे म्हटले होते, मात्र आज अखेर कुठलाही निर्णय झाला नाही असा आक्षेप इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी नोंदविला.

२०१४ पासून शेतीसाठीचे वीज कनेक्शन प्रतीक्षेत आहेत. विद्युत लोकपाल मुंबई यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यांनी आदेश देऊनही वीज कनेक्शनची जोडणी झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषीपंपासाठी डिसेंबर २०१८ अखेर दोन्ही जिल्ह्यात मिळून २२ हजार कनेक्शन प्रलंबित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजे-रामराजे वाद चिघळला; पवारांची मध्यस्थी निष्फळ

$
0
0

सातारा :

नीरेच्या पाण्यावरुन खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून हा वाद शमावा, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शनिवारी बोलावलेली बैठकही निष्फळ ठरली आहे. उदयनराजे हे चिडून बैठकीतून बाहेर पडल्याने वादावर तोडगा निघू शकला नाही.

नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून राजकारण तापलेले असताना उदयनराजे भोसले यांनी १४ वर्षे बारामती-इंदापूरला जास्त पाणी देण्यावरून रामराजे नाईक निबाळकरांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर या टीकेला उत्तर देताना रामराजेंनी उदयनराजेंवर खालच्या पातळीवरील टीका केली होती. स्वयंघोषीत छत्रपती, चक्रम असे शब्दप्रयोग त्यांनी उदयनराजेंबाबत केले होते. तसेच पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे उदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू, असा इशारा दिला होता. दरम्यान, उदयनराजेंवरील टीका सहन न झाल्याने त्यांच्या समर्थकांनी शनिवारी सातार्‍यात रामराजेंचा पुतळाही जाळला. त्यामुळे हा वाद अधिक विकोपाला जाऊ नये यासाठी शरद पवारांनी मुंबईत शनिवारी दुपारी या दोन्ही नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, बैठक सुरु झाल्यानंतर चिडलेले उदयनराजे काही वेळातच बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, रामराजेंनी माझ्यावर स्वयंघोषीत छत्रपती अशी टीका केली. मी स्वयंघोषीत छत्रपती नाही, लोकांनी त्यांच्या मनात मला ते स्थान दिले आहे. छत्रपतींच्या घराण्याचा मी कधीही वैयक्तिक स्वार्थासाठी वापर केला नाही. रामराजेंनी मला चक्रमही म्हटलं, हो मी चक्रम आहे. लोकांवर अन्याय होत असेल तर मी चक्रम होतो. मला अन्याय सहन होत नाही त्यामुळे मी स्वपक्षीयांवरही बोलतो त्याला घरचा आहेरही म्हटलं जातं. तुम्ही सभापती आहात ना तर तसे वागा, असा सल्ला देताना तुम्हाला कोणाशी काय बोलायचंय ते बोलून घ्या, पुढचं नंतर बघूच, असेही उदयनराजे यावेळी म्हणाले. रामराजेंचा उल्लेख पिसाळलेलं कुत्रं असा करीत, बरं झालं मी बैठकीतून बाहेर पडलो अन्यथा हे कुत्रं मलाही चावलं असतं, अशा खालच्या शब्दांत उदयनराजेंनी रामराजेंवर हल्लाबोल केला.

...तर रामराजेंची जीभ हासडली असती

रामराजे निंबाळकर वयाने मोठे आहेत, म्हणून त्यांचा मान राखला. माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती. कुणाचंही ऐकून घ्यायला मी लेचापेचा नाहीय, असा संताप उदयनराजेंनी यावेळी व्यक्त केला. मी उदयनराजे आहे महाराजांच्या घरात जन्म घ्यायला नशीब लागतं, असंही ते पुढे म्हणाले. शरद पवारांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ देत, पण मी सहन करणार नाही, असंही उदयनराजेंनी ठणकावले. बैठकीनंतर बाहेर आलेल्या रामराजे निंबाळकरांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं. 'नो कमेंट्स' असं म्हणत रामराजे निघून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन किलो सोन्यासह एक कोटी ६७ लाखांची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजेंद्रनगर येथील लक्ष्मी गोल्ड गुलियन कंपनीचे दोन किलो सोने, ६७ लाखांची रोकड आणि महागडी कार असा एक कोटी १८ लाखांचा मुद्देमाल चार चोरट्यांनी लुटला. हा प्रकार शुक्रवारी (ता. १४) पहाटे साडेतीन वाजता मनोरा हॉटेलजवळ घडला. लुटारूंनी कंपनीच्या दोन्ही कर्मचाऱ्यांचे अपहरण करून मारहाण केल्यानंतर त्यांना बांबवडे आणि आंबा येथे सोडले.

याबाबत चिंतामणी भगवान पवार (वय २४, रा. ऐनवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) याने शनिवारी (ता. १५) पहाटे राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. लुटीच्या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, लुटारूंच्या शोधासाठी चार पथके कोकण, गोवा आणि पुण्याकडे रवाना झाली आहेत. राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगर येथील लक्ष्मी गोल्ड गुलियन कंपनी सोने, चांदी खरेदी-विक्री व कमिशनवर रोख रक्कम देवाण-घेवाणीचे काम करते. किशोर शिंदे व विकास कदम यांची ही कंपनी असून, चिंतामणी पवार हे कंपनीत काम करतात. पवार हा सुशांत कदम व सागर सुतार या दोन मित्रांना घेऊन कारमधून कंपनीचे सोने व रोकड आणण्यासाठी गुरुवारी मुंबईला गेला होता. शुक्रवारी पहाटे हे तिघे दोन किलो सोने व ६७ लाखांची रक्कम घेऊन सर्वजण कोल्हापुरात आले. राजेंद्रनगर येथे मनोरा हॉटेलमागे असलेल्या कंपनीच्या कार्यालयाकडे ते निघाले होते.

मनोरा हॉटेलसमोर पोहोचताच एक कार त्यांच्या कारसमोर येऊन थांबली. कारमधून उतरलेल्या तिघांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यानंतर सत्तूरचा धाक दाखवत दरवाजा उघडण्यास सांगितले. पवार यांनी दरवाजा न उघडल्याने एकाने मोठा दगड काचेवर मारून जबरदस्तीने दरवाजा उघडला. कारमध्ये बसून त्यांनी रत्नागिरी मार्गावर कार घेण्यास भाग पाडले. यानंतर तिघांनाही मारहाण करून त्यांच्याकडील दोन किलो सोने आणि ६७ लाखांची रोकड काढून घेतली. यानंतर तिघांकडील मोबाइल व खिशातील पैसे काढून घेतले. पहाटे पाचच्या सुमारास यातील चिंतामणी पवार व सुशांत कदम या दोघांना बांबवडे येथे उतरवले, तर सागर सुतारला आंबा येथे उतरवले. दरम्यान, चौथा लुटारू कार घेऊन कोकणच्या दिशेने निघून गेला. यानंतर लुटारू कार आणि एक कोटी ६७ लाखांचा मुद्देमाल घेऊन कारसह कोकणच्या दिशेने निघून गेले. जवळ पैसे नसल्याने पवार हा मित्रांसह ट्रकमधून कोल्हापुरात पोहोचला. शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास त्याने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

लूटमारीची घटना घडल्याचे समोर येताच जिल्ह्यात खळबळ उडाली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन लुटारूंच्या शोधासाठी चार पथके तैनात केली. ही पथके कोकणसह गोवा व पुण्याकडे गेली आहेत. आंतरराज्यीय टोळीकडून लुटीचा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, लुटारूंना सोने व रोकडची माहिती पुरवणारा टिप्सर स्थानिक असावा, असा संशय व्यक्त केला आहे. आंबा ते रत्नागिरी या मार्गावरील हॉटेल्स आणि लॉजचे सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिस निरीक्षक सुनील पाटील अधिक तपास करीत आहेत.

लूटमारीचा प्रकार गंभीर असून, संशयितांच्या शोधासाठी चार पथके रवाना झाली आहेत. स्थानिकाच्या मदतीनेच लुटीचा प्रकार झाल्याची शक्यता आहे. संबंधित कंपनीने कोणत्याही सुरक्षेशिवाय एवढी मोठी रक्कम आणि सोने का आणले याचीही चौकशी होईल.

डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबांनी फुलविले मुलांचे जीवन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खरे तर, त्यांच्यामध्ये वडील आणि मुलांचे नाते. पण वडिलांची भूमिका खुबीने निभावताना त्यांनी मुलांवर आईसारखं मायेची पखरण घातली. आईपण जपताना मुलांसोबत मित्रत्वाचे नाते निर्माण केले. शिक्षण, नोकरी अशा प्रत्येक टप्प्यावर आई आणि वडील या दोन्ही भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या पित्याची कहाणी आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरणारी आहे. बाबांनी संगोपन तर केलेच. शिवाय आयुष्यातील प्रत्येक प्रसंगावर मानसिक आधार दिला, जीवनही फुलविले, अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त करताना मुलांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.

मुलांच्या संगोपनासह करिअरकडे लक्ष

बंडोपंत लक्ष्मण कांबळे हे सेवानिवृत्त शिक्षक. सुमारे ३३ वर्षे शिक्षकाची नोकरी करून जून २०१०मध्ये निवृत्त झाले. ते मूळचे आजरा तालुक्यातील हात्तीवडे येथील आहेत. सध्या कळंबा, साई मंदिरनजीक राहतात. त्यांना दोन मुले. मोठा मुलगा अभिजित हा बीई मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण करून मोठ्या पदावर आहे. तर लहान मुलगा हर्षदने एमएसडब्ल्यूचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मात्र मुले हायस्कूलला शिकत होती, तेव्हा कौटुंबीक कारणामुळे या मुलांसाठी आई आणि वडिल अशा दोन्ही भूमिका त्यांनी निभावल्या. घरी दोन मुले व त्यांच्याशिवाय तिसरे कुणी नव्हते. नोकरीनिमित्त त्यांची ठिकठिकाणी बदली व्हायची. कापशी, सातवे, गडहिंग्लज, भोर अशा विविध ठिकाणी नोकरी केली. दर शनिवारी नोकरीच्या ठिकाणावरुन कोल्हापूर गाठायचे, मुलांची देखभाल करायची. त्यांचे कपडे धुवायचे. त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य, कपडेलत्ता, घरातील वस्तू अशा विविध घटकांची पूर्तता करायची. सुरुवातीच्या काळात राहायला भाड्याची खोली होती. एकीकडे नोकरीसाठी धावाधाव दुसरीकडे मुलांची काळजी, त्यांच्या संगोपनासाठी धडपड मात्र या साऱ्या बाबीचा त्रागा न करता त्यांनी मुलांना सांभाळले. उच्च शिक्षण दिले.

बाबांच्या आधारामुळे आईची उणीव नाही

मंगळवार पेठेतील हळदणकर कुटुंबीय हे मध्यमर्गीय. कुटुंबप्रमुख विठ्ठल हळदणकर हे औद्योगिक वसाहतीत खासगी नोकरी करणारे. पत्नी उषा आणि विपुल व सायली अशी दोन मुले. सुख समाधानाने आयुष्य जगत असताना साधारणपणे नऊ वर्षापूर्वी उषा यांना एका आजाराने ग्रासले. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यावेळी मोठी मुलगी सायली अकरावी तर विपुल हा आठवीत शिकत होता. एकीकडे पत्नीच्या निधनाचे दुख, दुसरीकडे मुलांच्या संगोपनाची जबाबदारी, हा सारा प्रसंग कसोटी पाहणारा. या साऱ्या प्रसंगाला विठ्ठल हळदणकर यांनी धीराने तोंड देत मुलांना सावरले. घरातील कामे, जेवण बनविणे ही कामे करताना मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची काळजी घेतली. प्रत्येक टप्प्यावर मुलांना आधार, प्रोत्साहन देत आईची उणीव भासू दिली नाही. मोठी मुलगी सायलीने मायक्रोबायोलॉजीमध्ये शिक्षण घेऊन पुण्यामध्ये नोकरी करत आहेत. मुलगा विपुल हा हैदराबादमध्ये कला शिक्षक आहे. नोकरीनिमित्त दोन्ही मुले लांब असली तर रोज त्यांचा बाबांशी संभाषण होते. 'बाबांचा आधार, करिअरसाठी स्वातंत्र्य हे आमच्या आयुष्यासाठी खूप मोलाचे ठरले. त्यांनी आईची उणीव भासू दिली नाही. मामा दीपक पांडूरंग पोतदार यांचे पाठबळ लाभले' अशी कृतज्ञतेची भावना विपुल यांनी व्यक्त केली.

लोगो : फादर्स डे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कंपनी सेक्रेटरी’तील संधीवर उद्या कार्यशाळा

$
0
0

प्लॅनेट कॅम्पसचा लोगो वापरावा..

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) व 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे 'कंपनी सेक्रेटरी क्षेत्रातील करिअरच्या संधी' या विषयावर सोमवारी (ता. १७) मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे. संस्थेच्या कोल्हापूर चॅप्टर कार्यालय, सीएस नं ४५५, ऑफिस युनिट नंबर ४०३/४०४, मातोश्री प्लाझा, चौथा मजला व्हीनस कॉर्नर येथे सकाळी ११.३० वाजता कार्यशाळेला प्रारंभ होईल.

यावेळी सीएस अमित पसारे, ऐश्वर्या तोरस्कर, वृषाली चौगुले मार्गदर्शन करणार आहेत. द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या एकमेव संस्थेत कंपनी सेक्रेटरीचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. संस्थेच्या मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे शाखा आहेत. संस्थेच्या अभ्यासक्रमात तीन स्तर आहेत. ते पास झाल्यास कंपनी सेक्रेटरी पदवी मिळते. बारावीनंतर आठ महिन्यांचाा फाउंडेशन कोर्स करता येतो.

पास झालेली व्यक्ती नऊ महिन्यांनंतर एक्सएक्टिव्ह कोर्सला प्रवेश घेऊ शकते. त्यानंतर प्रोफेशनल प्रोग्रॅम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्रशिक्षण घेऊन सीएस होता येते. २०१३ च्या कंपनीज अॅक्टप्रमाणे मोठ्या कंपन्यांना कंपनी सेक्रेटरी नेमावा लागतो आणि छोट्या कंपन्यांना त्यांची सेवा घ्यावी लागते. या क्षेत्रात करिअरसाठी भरपूर वाव आहे. याशिवाय सरकारी अकाउंटस, कायदा विभाग या ठिकाणी कंपनी सेक्रेटरी हवे असतात. सीएसचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या व या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images