Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘आप’च्या दणक्याने महायुतीला जाग

$
0
0
महायुतीत सहभागी होण्यासाठी चर्चेचे दरवाजे चार महिन्यानंतरही ‘स्वाभिमानी’ला खुले झालेले नाहीत, यामुळे ‘आप’ सोबत आघाडी करण्याचे संकेत देताच महायुतीचे नेते खडबडून जागे झाले आहेत. महायुतीच्या नेत्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करण्याचे केवळ ठरवले नसून तारीख सुध्दा निश्चित केली आहे.

महिला कॉन्स्टेबल मडिवाल निलंबित

$
0
0
स्वतःच्या बंगल्यात वेश्या व्यवसाय करण्यास परवानगी देणाऱ्या शाहूपुरी पोलिस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल सुमन रावसो मडिवाल (वय ५०, रा. ओम शिवकुमार बंगला) हिला जिल्हा पोलिसप्रमुख विजयसिंह जाधव यांनी मंगळवारी निलंबित करुन खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले.

‘माढा’वरूनच अडले घोडे

$
0
0
स्वाभिमान’ची पश्चिम महाराष्ट्रातील तीस विधानसभा व राज्यातील नऊ ते दहा लोकसभा मतदारसंघांत ताकद आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात त्यांची हक्काची दहा हजारांवर मते आहेत. या मतांवर महायुतीचा डोळा आहे.

जमिनीला सोन्यापेक्षा जादा भाव

$
0
0
वर्षभरात गावठाणापेक्षा ‘ए’ व ‘ई’ वॉर्ड आणि शहराजवळच्या ग्रामीण भागात खरेदी विक्रीच्या व्यवहारांची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्याने ​परिसरातील रेडीरेकनरच्या दरात १५ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गुजरी परिसरातील दरात सर्वाधिक वाढ असून, प्रति चौरस फुटाचा दर ३९०७ रुपये झाला आहे.

...म्हणून पत्नीला पेटवले

$
0
0
तीन मुलींनंतर मुलगा होत नाही म्हणून पत्नीला शिविगाळ करून तिला पेटवण्याचा प्रकार उचगांव येथील हनुमान नगरमध्ये घडला. या घटनेतील शहिता अल्ताफ चमनशेख ही महिला भाजून गंभीर जखमी झाली आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

कत्तलखान्याचा डाव हाणून पाडू

$
0
0
कत्तलखाना आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात उभारण्याचा महापालिकेचा डाव हाणून पाडण्याचा इशारा महाराष्ट्र नव​निर्माण सेना कृती समितीच्यावतीने दिला आहे. याबाबतची निविदा ताबडतोब रद्द करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

शिक्षकांची नोकरी टांगणीला

$
0
0
शाळांत संच मान्यता झाली असली तरी २५०० शिक्षकांची वैयक्तिक मान्यता झालेली नाही. त्यामुळे पाच जिल्ह्यातील ३५० ज्युनिअर कॉलेजमधील कायम विनाअनुदानित शिक्षकांच्यावर टांगती तलवार आहे.

शेतक-यांवरच हत्तींचा प्रतिहल्ला

$
0
0
आजरा परिसरात हत्तींच्या कळपांनी थैमान घातले असून, येथून जवळच असलेल्या कर्पेवाडी येथे उसाच्या फडात शिरलेल्या हत्तींना हुसकावण्यासाठी गेलेले वनविभागाचे कर्मचारी व शेतकऱ्यांवरच हत्तींनी प्रतिहल्ला केला.

‘दौलत’च्या संचालकांना शनिवारपर्यंत मुदत

$
0
0
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना तिसऱ्या हंगामात चालवायला घेण्याबाबत केशव शुगर्सने धोका दिला असून त्यांच्या या पवित्र्यामुळे अडचणीत सापडला आहे. येत्या शनिवारी (ता.४) पर्यंत संचालक मंडळाने उर्वरीत संपर्कासाठी कृषीबंध (गारगोटी) व शर्मा (मुंबई) याच्यासह अन्य कंपन्यांशी वाटाघाटी करुन निर्णय घ्यावा.

नववर्षाच्या स्वागतावेळी इचलकरंजीत हाणामारी

$
0
0
नववर्षाचे स्वागत करीत असताना इचलकरंजीतील मंगळवार पेठेत तरूणांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी मंगळवार पेठेतील १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गावभाग परिसरात स्पिकर लावल्यावरून केलेल्या हल्ल्यात पिता पुत्र जखमी झाले. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

कुरुंदवाड पालिका सभेत अधिकारी धारेवर

$
0
0
तात्व‌िक मतभेदामुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचारी कामचुकार करीत असल्याने कुरूंदवाड पालिकेच्या सभेत पक्षप्रतोद रामचंद्र डांगे तसेच सदस्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. या सभेत रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण, मातंग व बौध्द समाजासाठी सभागृह बांधणे, बगीचा विकसीत करणे आदी विकास कामांना मंजूरी देण्यात आली.

आजरा ‘महसूल’ची लक्तरे वेशीला

$
0
0
कानोली (ता. आजरा) येथील सव्वा ३३ हेक्टर जमिनीचे भूमिहिनांच्या नावाखाली झालेले वाटप रद्द करण्यात आल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी अजय पवार यांनी नुकताच दिल्याने आजरा महसूल विभागात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

‘वीज दरवाढ मागे घ्या’

$
0
0
शेती पंपाची आणि घरगुती वीज बिलात भरमसाठ केलेली वाढ त्वरित मागे घ्यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करुन वीज वितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकू असा इशारा कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे आणि कागल तालुका शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष सागर भोसले यांनी दिला आहे.

वीट व्यवसाय बंद पाडण्याचा कट

$
0
0
कुंभार समाजाच्या वीट व्यवसाय सरकारने अनेक जाचक नोटिसा पाठवून बंद पाडायचा चंग बांधलेला दिसत आहे.पण कुंभार समाजाने एकसंघ राहून या वीट व्यवसायामया आडवे येणाऱ्यांना कडाडून विरोध केला पाहिजे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष आणि कोल्हापूरचे माजी महापौर मारुतराव कातवरे यांनी केले.

परीक्षा बहिष्कारापूर्वी बोर्ड अलर्ट

$
0
0
प्रलंबित विविध मागण्यांसाठी बारावी परीक्षेच्या कामकाजावर ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीसाठी होणारी धावपळ थांबविण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सज्ज झाले आहे.

लोकसभेसाठी मंडलिक गटाची शनिवारी बैठक

$
0
0
काँग्रेसने कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी प्रा. संजय मंडलिक यांना द्यावी, यासाठी मंडलिक गटाने आता फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून गटाची शनिवारी (ता. ४) बैठक बोलाविण्यात आली आहे.

सांगली महापालिकेला नगरसेवकाने ठोकले टाळे

$
0
0
गुंठेवारीतील विकास कामांसाठी निधी मंजूर करताना विरोधी नगरसेवकांना जाणिवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी विकास आघाडीचे नगरसेवक बाळासाहेब गोंधळे यांनी बुधवारी दुपारी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या मुख्यालयाला कुलूप ठोकले. त्यांनी उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या गाडीच्या आडवे लोटांगणही घेतले.

खादी ग्रामोद्योगचा ‘पर्यावरण बचाओ’चा नारा

$
0
0
खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या माध्यमातून ‘प्लास्टिक हाटाओ पर्यावरण बचाओ’ अभियान राबविण्यात येत आहे. मॉल आणि दुकानांतून प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या पिशव्या खादी ग्रामोद्योगातून उपलब्ध करून दिल्या जातील.

आंदोलक-पोलिसांत झटापट

$
0
0
सोनतळी (ता. करवीर) येथील एका महिलेचा विनयभंग करणारे चिखलीचे ग्रामसेवक रायसिंग वळवी यांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी आंबेडकरी समाज पक्ष व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रवेशद्वारावर आंदोलकांना अडविताना पोलिस व आंदोलकांमध्ये झटापट झाली.

जल्लोषाला अटकाव केल्याने कार फोडली

$
0
0
नववर्षाच्या जल्लोषाला अटकाव करणाऱ्या तरूणांच्या जमावाने लक्ष्मीपुरीत कार फोडल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी आशिष मिलिंद हुलस्वार (रा.चिले कॉलनी, मंगळवार पेठ) याला अटक केली असून आठजण फरार आहेत. दरम्यान मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या पाच वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images