Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्रिन्सेस पद्माराजे ज्युनिअर कॉलेज

$
0
0

दोन फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल अँड ज्यनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या भावना कदमने (७७.०७) प्रथम, आरती पाटीलने (७६.७६) द्वितीय, तर श्वेता पाटीलने (७६) तृतीय क्रमांक पटकावाला. वाणिज्य शाखेत शिवानी साळोखेने ८७.०७ टक्के गुणांसह प्रथम, प्रतीक्षा मोरबाळेने (८४.९२) द्वितीय व देविका खडकेने (८३.३८) तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत कार्तिकी राजदीपने (८९.५३) प्रथम, ऋतुजा मानेने (८१.६९) द्वितीय, तर सोनल गणेशाचार्यने (७५.६९) तृतीय क्रमांक पटकावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्ची ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण

$
0
0

आर्ची ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण

सोलापूर :

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) हिने यंदा बारावीची परीक्षा दिली होती. रिंकूने ८२ टक्के गुण मिळवत बारावी उत्तीर्ण झाली आहे. तिने कला शाखेतून परीक्षा दिली होती. रिंकूने दहावीला सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील शाळेतून परीक्षा देत ६६.१० टक्के गुण संपादित केले होते. बारावीला तिला ८२ टक्के गुण मिळाले आहेत. तिने यंदा सोलापूर जवळील टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा दिली होती. तिला बघण्यासाठी परीक्षा केंद्रावर गोंधळ होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रिंकूचे विषयनिहाय गुण असे,

इंग्रजी ५४, मराठी ८६, इतिहास ८६, भूगोल ९८, राज्यशास्त्र ८३, अर्थशास्त्र ७७, पर्यावरण ४९ (एकूण : ५३३ /६५०)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री तुळजा भवानी पुजारी मंडळाचे तुळजापुरात धरणे आंदोलन

$
0
0

श्री तुळजा भवानी पुजारी मंडळाचे तुळजापुरात धरणे आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी देऊळ कवायत कलम ३६ कायद्यानुसार श्री तुळजा भवानी मातेच्या मंदिरात नियम मोडणाऱ्यांवर कार्यवाही करावी. मंदिर प्रशासनाच्या वतीने योग्य त्या मूलभूत सुविधा भाविकांना मिळत नसल्यामुळे श्री तुळजा भवानी पुजारी मंडळाच्या वतीने मंगळवारी मंदिर प्रशासनाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

या वेळी श्री तुळजा भवानी मंदिर प्रशासनचे व्यवस्थापक व्यवस्थापक दिनेश झापंले यांना श्री तुळजा भवानी पुजारी मंडळाच्या वतीने विविध मागण्या संदर्भात एक लेखी निवेदन देण्यात आले. देऊळ कवायत कायदा ३६ नुसार दोषी असणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही करण्याबाबतीत लेखी आश्वासन देण्यात आले होते. पण त्याची अमंलबजावणी झालेली नाही, ज्या व्यक्ती दोषी आढळल्या आहेत, त्यांची सुनावणी पूर्ण करून तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. मंदिरातील सर्व कायदेशीर हक्कदार पुजाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा दुजाभाव केला जावू नये. सुरक्षा रक्षक व कर्मचारी कलम ३६ नुसार कार्यवाही करण्यास दिरगांई करतात, अभिषेक पास पुजाऱ्यां व्यक्तीरिक्त मंदिरातील कर्मचारी, पोलिस, कर्मचारी अधिकारी यांना देण्यात येऊ नये. श्री तुळजा भवानी मातेच्या मंदिरातील दर्शन मंडपात गैर प्रकार करणाऱ्या व्यक्तीस मंदिरात प्रवेश देऊ नये. दर्शनाला येणाऱ्या भक्तांची फसवणूक व पुजाऱ्याची बदनामी टाळण्यात यावी. १६ आणे कमासदार, पाळकर पुजारी व उपाध्ये पुजारी यांच्या पैकी मंदिरामध्ये महत्वाच्या पदावरती असणाऱ्या व्यक्तीला श्री तुळजा भवानी अभियांत्रिकी महाविद्यालयावर बदली करण्यात यावी. अभिषेक मंडप, दर्शन मंडप २, आराध रुम याची कामे तत्काळ सुरू करण्यात यावी. भक्तांसंदर्भात दुर्घटना टाळण्यास मंदिरमधून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र पर्याय व्यवस्था करण्यात यावी. आपत्कालीन सुविधा, प्रथमोपचार केंद्र, पिण्याचे पाणी आदींसह उपाय योजना करण्यात याव्यात. भवानी मातेच्या मंदिरात स्नानासाठी आलेल्या माहिलांची स्वतंत्र व्यवस्था करावी आदी मागण्या निवेदनात आहेत. सर्व मागण्या संदर्भात तत्काळ अमंलबजावणी करण्यात यावी, अन्यथा या पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात, येईल असा इशारा देण्यात आला आहे. धरणे आंदोलनाला भवानी मातेचे मुख्य महंत तुकोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव सांळुके, उपाध्यक्ष विपीन शिंदे, पुजारी मंडळाचे संचालक शिवाजी बोधले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालकल्याण’मधील मुलींचे स्वप्न आर्मी, बँक ऑफीसर बनण्याचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालकल्याण संकुल या संस्थेमधील अस्मिता दिंडे आणि नेत्रा दारवी यांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. या दोन्ही विद्यार्थिनींनी अनुक्रमे बँक आणि आर्मी अधिकारी व्हायचे आहे. रोज दोन ते अडीच तास अभ्यास, अधिकारी होण्याचे स्वप्न हे यशाचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले.

अस्मिता आणि नेत्रा या दोघी गेल्या सहा वर्षांपासून बालकल्याण संकुलमध्ये राहतात. अस्मिताने येथील एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. वाणिज्य शाखेतून ती उत्तीर्ण झाली. तिने, सुट्टीच्या कालावधीत नर्सिंगचा तीन महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. ती रोज दोन तास अभ्यास करायची. तिला बँक अधिकारी व्हायचे आहे.

तर नेत्रा ही न्यू कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिने कला शाखेतून शिक्षण घेतले आहे. नेत्राने हँन्डबॉल खेळात राज्यस्तरावर चमक दाखवली आहे. तिला सैन्य दलात करिअर करायचे आहे. बालकल्याण संकुलमधील प्रत्येक घटकाचे सहकार्य लाभल्याची भावना दोघींनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडी स्ट्रीट लाइट बसवण्यास सुरुवात

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्य सरकारच्यावतीने शहरात एलईडी स्ट्रीट लाइट बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यानुसार रविवारी कावळा नाका ते शाहू नाका परिसरात स्ट्रीट लाइट कार्यन्वित करण्यात आली असून त्याचे उद्घाटन महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

विजेची बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने सर्व शहरात एलईडी स्ट्रीट लाइट बसवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सायंकाळी शिवाजी विद्यापीठ येथील केएसबीपी उद्यानाजवळ महापौर मोरे यांच्या हस्ते उद्घाटन केले.

शहरातील स्ट्रीट लाइटवर महापालिकेचे वर्षाला आठ कोटीचे बिल येते. अशा सर्व ठिकाणी एलईडी दिवे बसवण्यात येणार असल्याने विज बिलामध्ये चार कोटीची बजत होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाच्यावतीने केला जात आहे. उद्घाटन समारंभास उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, नगरसेवक प्रवीण केसरकर, संदीप कवाळे, संजय मोहिते, माजी नगरसेवक राजू साबळे, इंद्रजित बोंद्रे, अदिल फरास, विक्रम जरग आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंती नाला स्वच्छतेसाठी यंत्रसामुग्री

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्यावतीने जयंती नाल्याची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. दर रविवारी होणाऱ्या मोहिमेमध्ये आमदार अमल महाडिक यांनी दोन पोकलॅन मशिन उपलब्ध करून दिली आहे. मोहीम सुरू असे पर्यंत यंत्रसामुग्री देण्यात येणार आहे.

आमदार महाडिक यांनी दिलेल्या पसिद्धी पत्रकामध्ये स्वच्छता मोहीम राबवल्याबद्दल आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे कौतुक करताना म्हटले आहे, 'नमामि पंचगंगा उपक्रमातंर्गत पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. स्वच्छता मोहिमेसाठी आयुक्तांनी आवाहन केल्यानंतर दोन पोकलॅन मशिन उपलब्ध करून दिली आहे. पंचगंगा प्रदूषणास जयंती व गोमंती नाले कारणीभूत ठरत आहेत. या नाल्यांची स्वच्छता करुन प्रदूषण रोखण्यास घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. नागरिकांनी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टिक, निर्माल्य व प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या वस्तू नाला अथवा नदीमध्ये टाकू नये.' असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूल उदघाटन कार्यक्रमात विश्वासात घ्यावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाचे रेंगाळलेले काम जनरेट्यामुळे मार्गी लागले. पुलाच्या कामात अडथळा निर्माण केलेले काही लोक श्रेय घेण्यासाठी उदघाटन कार्यक्रम घेण्यासाठी धडपत आहेत. यातून वाद निर्माण झाला आहे. हे टाळण्यासाठी सर्व पक्षीय कृती समितीला विश्वासात घेऊनच उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशी मागणी मंगळवारी करण्यात आली.

सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. महापौर सरिता मोरे अध्यक्षस्थानी होत्या. महाराणा प्रताप चौकातील आर. के. पोवार यांच्या कार्यालयात बैठक झाली.

कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, 'शिवाजी पुलाचे आयुर्मान संपल्यामुळे २०१२ मध्ये तत्कालीन खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी नविन पुलासाठी १४ कोटींचा निधी मंजूर करवून घेतला. मात्र पुलाच्या कामात काही मंडळींनी विघ्न आणले. मात्र कोल्हापुरच्या स्वाभिमानी जनतेने कृती समितीच्या माध्यमातून लढा उभारुन काम पूर्णत्वास आणले.'

बाबा पार्टे म्हणाले, 'पुलाच्या पूर्ततेसाठी कृती समितीला तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचे सहकार्य लाभले. या दोघांनाही उद्घाटनासाठी निमंत्रित करुया. यासाठी पालकमंत्र्यांनी सहकार्य करावे. सर्वांना एकत्र करुन उदघाटनचा कार्यक्रम घेण्यात यावा.'

अशोक पोवार म्हणाले, 'पुलाच्या कामासाठी केलेल्या आंदोलनाची काही लोकप्रतिनिधींनी चेष्टा करत कोल्हापुरच्या स्वाभिमानी जनतेचा अवमान केला. दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याचा उपहासात्मक सल्ला दिला. त्यांना उदघाटनास बोलवू नये. सर्वसामान्य नागरिकांच्या हस्ते उदघाटन करावे.'

किशोर घाटगे म्हणाले, 'पूल पूर्ण झाल्यानंतर चाचणीसाठी २८ दिवस लागणार आहेत. असे असताना उदघाटनाची घाई का केली जात आहे, समजत नाही.'

फिरोज खान यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पुलाचे उदघाटन करावे, असे सुचवले.

यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, ॲड.पंडीत सडोलीकर, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, नामदेव गावडे यांनी विविध सूचना मांडल्या. याप्रसंगी समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

.........

चौकट

आदेशाबाबत माहितीसाठी आज बैठक

पुलाच्या उदघाटनासंबंधी सरकारचे काय आदेश आहेत, त्याची माहिती घेण्यासाठी आज, बुधवारी दुपारी साडेतीन वाजता येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले यांच्यासोबत बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्नती अभियानः हजारो दिव्यांगांना मिळणार साहित्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राबविलेल्या दिव्यांग उन्नती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अभियान अंतर्गत २२४०२ दिव्यांगांची तपासणी केली. यापैकी १५७३६ पात्र लाभार्थ्यांना लवकरच साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.

शिबिरातून एकाच जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना लाभ देण्याचा देशपातळीवर नवीन रेकॉर्ड जि.प.ने केला आहे. यापूर्वी राजस्थानमधील १४२०० लाभार्थी योजनेसाठी एकाच वेळी पात्र ठरले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेने हा रेकॉर्ड मोडीत काढला. या अभियानासाठी जिल्हा परिषदेतील सर्व पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी, सरपंच व ग्रामसेवकांच्या अभिनंदनाचा ठराव स्थायी समितीच्या सभेत केला.लाभार्थ्यांना व्हिलचेअर, ट्रायसिकल, कुबड्या, रोलेटर, कॅलीपर, कृत्रिम अवयव, श्रवणयंत्र, एमआर किट आदी साहित्याचे वाटप येत्या दोन महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा परिषद...

$
0
0

जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा...

'माध्यमिक'च्या आठजणांची

मुख्यालयाबाहेर बदली

किरण लोहारांवरील कारवाईचीही शिफारस शिक्षण विभागाकडे करणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील आठ कर्मचाऱ्यांची मुख्यालयाबाहेर बदली करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत झाला. तसेच माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी शिफारस येत्या आठ दिवसांत शिक्षण विभागाकडे करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने सदस्यांना दिली. जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

स्थायी समितीच्या बैठकीला प्रारंभ होताच सदस्य अरुण इंगवले आणि राजवर्धन निंबाळकर यांनी चौकशी समितीच्या अहवालानुसार संबंधित कर्मचारी व शिक्षणाधिकाऱ्यांवर काय कारवाई केली? असा प्रश्न प्रशासनाला केला. त्यावर अधिकाऱ्यांनी माध्यमिकमधील आठ कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली करणार असल्याचे सांगितले. प्रशासनाचा हा खुलासा सदस्यांना मान्य झाला नाही. शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभारावरून जिल्हा परिषदेची नाचक्की होत आहे. कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली करा, असे सुचविले. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी संबंधितांची मुख्यालयाबाहेर बदली केली जाईल अशी ग्वाही दिली.

दरम्यान, बदलीसाठी चुकीची माहिती देणाऱ्या शिक्षकांवर कारवाईप्रश्नी १८ मुख्याध्यापकांनी शिक्षकांना पाठीशी घातल्याच्या कारणावरून त्यांना नोटिसा काढण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे तलाव ताब्यात घेण्याचा विषय गाजला. गेली अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे, यावरून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता मनीष पवार यांना सदस्यांनी याप्रश्नी धारेवर धरले. स्थायीच्या बैठकीत उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, शिक्षण समिती सभापती अंबरीश घाटगे, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

००००

ग्रामीण भागात होणार 'वॉटर ऑडिट'

जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत पाणी बचतीच्या प्रचारासाठी ग्रामीण भागात जल साक्षरता अभियान राबविण्याचे ठरले. तसेच गावपातळीवर दररोज पाण्याचा किती वापर होतो, पिण्याच्या पाण्याचे प्रमाण व शेतीसाठी लागणारे पाणी या साऱ्याचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत चालू योजनेच्या देखभाल दुरुस्तीचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. सदस्य प्रा. शिवाजी मोरे, हेमंत कोलेकर यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गाव पातळीवरील पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्याचे ठरले. जलस्रोतांच्या बळकटीकरणावर भर देण्याची सूचना केली. अर्धवट पाणी योजना तत्काळ पूर्ण करुन पाणी टंचाई दूर करण्याच्या सक्त सूचना केल्या. चर्चेत बंडा माने, राणी खमलेट्टी यांनी सहभाग घेतला.

००००

'मेन राजाराम'चे मैदान पार्किंगसाठी प्रस्ताव

मेन राजाराम हायस्कूल परिसरातील जागा आणि मैदान सुट्टीच्या दिवशी भाडे आकारून पार्किंगसाठी देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. भाडे आकारणी, पार्किंगची निविदा पद्धत यासंबंधी रूपरेषा ठरविण्याचे आदेश दिले. सुट्टीच्या दिवशी शाळा परिसरातील जागा पार्किंगसाठी देऊन उत्पन्नवाढीचे नियोजन आहे. उन्हाळी व दीपावली सणाची सुट्टी, नवरात्र उत्सवात जागा पार्किंगसाठी देण्याचे प्रस्तावित आहे. करवीर नगर वाचन मंदिराला वापरावयास दिलेल्या जागेत वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर इंटरसिटी वीकेंडला राहणार बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत दौंड आणि सोलापूर रेल्वे स्टेशन दरम्यान देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असल्याने येत्या १० जुलैपर्यंत प्रत्येक शनिवार-रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा परिणाम पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी गाडीवर झाला असून येत्या एक जून ते सात जुलै या कालावधीत दर शनिवारी आणि रविवारी ही गाडी रद्द करण्यात येणार आहे. इतर दिवशी मात्र गाडी नेहमीप्रमाणे धावेल.

सोलापूर विभागात घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी येत्या सात जुलै पर्यंत शनिवार-रविवारी रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोलापूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेमू गाडीवर या ब्लॉकचा परिणाम झाला आहे. येत्या १० जुलैपर्यंत दर शनिवार-रविवारी ही डेमू सोलापूर ते कुर्डूवाडी या दरम्यानच धावणार आहे; तसेच पुणे-सोलापूर डेमू येत्या १० जुलैपर्यंत भिगवणपर्यंत धावणार आहे. दरम्यान, या दोन्ही गाड्या शनिवार-रविवार वगळता इतर दिवशी आपल्या पूर्वनियोजित मार्गावर धावणार आहेत. पुणे-हैदराबाद एक्स्प्रेस ही आठवड्यातील तीन वेळा धावणारी गाडी येत्या सहा जुलैपर्यंत कुर्डूवाडी ते हैदराबाद अशी धावेल. ही गाडी सोमवार आणि बुधवारी पुण्याहूनच हैदराबादसाठी रवाना होईल; तसेच हैदराबाद-पुणे ही गाडी कुर्डूवाडीपर्यंतच धावेल. मंगळवारी आणि शुक्रवारीच ही गाडी हैदराबाद-पुणे या मार्गावर धावेल, अशी माहिती मध्ये रेल्वेच्या पुणे विभागाने कळविली आहे.

-------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर जिल्ह्याचा निकाल ८५.८१ टक्के

$
0
0

सोलापूर जिल्ह्याचा निकाल ८५.८१ टक्के

सोलापूर :

सोलापूर जिल्ह्याचा निकाल ८५.८१ टक्के लागला. यामध्ये यंदाही ही मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले. त्यांनी ९२.७० गुण मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण शेकडा ८१.३९ टक्के आहे. सोलापूर जिल्ह्यातून इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी सर्व शाखांमधून नियमित व बहिस्थ असे ५४७८२ विद्यार्थी-विद्यार्थिनींची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडे नोंदणी झाली होती. यापैकी ४६ हजार ९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८१.३९ टक्के आहे, तर मुलींचे ९२.७० असे प्रमाण असल्‍याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात गुरुवारी आंबा महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरवासियांना अस्सल नैसर्गिकरीत्या पिकवलेला हापूस व केशर आंबा चाखता यावा यासाठी गुरुवारी (ता.३०) लक्ष्मीपुरी येथील श्रद्धानंद सांस्कृतिक हॉल येथे आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. चार दिवस महोत्सवात आंबा विक्री केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता सहकारी संस्थाचे विभागीय सह निबंधक धनंजय डोईफोडे यांच्या हस्ते व बाजार समितीचे सभापती बाबासाहेब लाड यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कोकणातील हापूस आंबा मध्यस्तांशिवाय थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून ग्राहकांना रास्त दरात उपलब्ध व्हावा, यासाठी महोत्सवाचे आयोजन केले आहे. ३० जून ते दोन जून या कालावधीत सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत आंबा विक्री केली जाणार आहे. महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य कृषी पण मंडळाचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले, बाजार समितीचे सभापती लाड, सचिव मोहन सालपे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधिस्थळाचे २६ जूनला लोकार्पण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नर्सरी बागेत सुरू असलेल्या राजर्षी शाहू समाधिस्थळाचा लोकार्पण सोहळा राजर्षी शाहू जयंतीनिमित्त २६ जूनला करण्याचा मानस आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी उर्वरित कामे त्वरित करण्यात येतील,' अशी माहिती महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी दिली. संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रसंगी पोलिस बंदोबस्त घेतला जाईल. असेही त्यांनी सांगितले. महापौर मोरे म्हणाल्या, 'गेल्या चार वर्षांपासून नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधिस्थळ परिसराचे सुशोभीकरण सुरू आहे. मेघडंबरीसह अन्य कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. राजर्षी शाहूंचा सामाजिक समतेचा संदेश देणारे हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात येईल. त्यासाठी महापालिकेने स्वनिधीतून निधीची उपलब्धता केली आहे. सद्य:स्थितीत समाधिस्थळाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. पण सिद्धार्थनगर येथील काही रहिवाशांनी प्रवेशद्वारावरून काम बंद पाडले आहे. याबाबत रहिवाशांशी चर्चा करून मार्ग निघेल. प्रसंगी बांधकामास विरोध झाल्यास पोलिस बंदोबस्त घेतला जाईल. उर्वरित कालावधीत शाहू समाधिस्थळ काम पूर्ण करून २६ जूनला लोकार्पण सोहळा करण्याचा मानस आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्याचा निकाल ८६.२६ टक्के

$
0
0

सातारा :

सातारा जिल्ह्याचा निकाल ८६.२६ टक्के इतका लागला आहे. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील ३८ हजार १९८ पैकी ३२ हजार ९५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सातारा जिल्ह्यात ९३.५३ टक्के मुली आणि ८०.४७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. इयत्ता बारावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाल्यानंतर निकाल पाहण्यासाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनजीकच्या सायबर कॅफेत विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती.

........

अवैध वाळू उपशावर कारवाई

सातारा : कोरेगाव-जळगाव रस्त्यावर वांगणा नदी पात्रालगत मळवी नावाच्या शिवारात अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपशावर सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी सकाळी ६.३०च्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत ६१ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंचायत समितीचे माजी सभापती संजय झंवर, उपनगराध्यक्ष संजय पिसाळ यांच्यासमवेत ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

....

ऐतिहासिक तोफ सापडली

सातारा :

नव्या पोलिस वसाहतीचे खोदकाम सुरू असताना पोलिसांना ऐतिहासिक तोफ सापडली आहे. या तोफेचे वजन सुमारे साडेतीनशे किलो आहे. ही तोफ पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. पोलिस मुख्यालयाजवळील पोलिस वसाहतीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पोलिसांची जुनी वसाहत या ठिकाणी होती. जेसीबीच्या साह्याने जुन्या वसाहतीच्या भिंतीचे दगड हटवून त्या ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. हे काम सुरू असताना रविवारी मोठ्या खड्यामध्ये तोफ असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जेसीबीच्या साह्याने ही तोफ वर काढण्यात आली. ही तोफ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असावी, असे इतिहास तज्ज्ञांचे मत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धैर्यशील माने राजू शेट्टींच्या घरी; घेतले आशीर्वाद

$
0
0

कोल्हापूर:

महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत परंपरेचं नवं उदाहरण आज कोल्हापूरमधील हातकणंगले इथं पाहायला मिळालं. हातकणंगलेमधून लोकसभा निवडणूक जिंकणारे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आज पराभूत उमेदवार राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. तसंच, नव्या वाटचालीसाठी शेट्टींच्या आईचे आशीर्वादही घेतले.

महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांचा पराभव धक्कादायक पराभव केला. मात्र, प्रचारातील हेवेदावे बाजूला सारून नवनिर्वाचित खासदार माने यांनी आज शेट्टी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. शेट्टींनीही तितक्याच खुल्या दिलानं माने यांचं स्वागत केलं. माने यांना फेटा बांधून विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर धैर्यशील यांनी राजू शेट्टी यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. या भेटीची जोरदार चर्चा कोल्हापूरमध्ये रंगली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपमध्ये जाणार नाही, आमदार कदम यांचा खुलासा

$
0
0

सांगली: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. कदम यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचा खुलासा करत या चर्चेवर पडदा टाकला आहे.

विश्वजीत कदम यांनी एक पत्रक काढून त्याद्वारे भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचा खुलासा केला आहे. मी भाजपमध्ये जाणार असल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि सोशल मीडियातून प्रसारित होत आहे. हे वृत्त निराधार असून त्यात काहीही तथ्य नसल्याचं कदम यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. सांगलीतली काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदमही भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यापार्श्वभूमीवर कदम यांनी हा खुलासा केला आहे.

69559478

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'कला-संस्कृती'चे शेअरिंग

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet : Appasaheb_MT

कोल्हापूर : ते दोघे आर्किटेक्ट, कलाक्षेत्राविषयक दोघांनाही मनस्वी आवड. कला, संस्कृती आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ झाल्या पाहिजेत ही त्यांची आंतरिक भावना. या उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आर्किटेक्ट मिलिंद रणदिवे व सिकंदर नदाफ यांनी राजेंद्रनगर परिसरातील शिव-शिल्प कॉलनीतील निवासी इमारतीला कलात्मक लूक दिला आहे. 'सराय शेअरिंग कल्चर'ची सुरुवात केली आहे. चित्रकार, शिल्पकारांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनासाठी आर्ट गॅलरी, कार्यक्रम, वर्कशॉपसाठी हॉलची उभारणी केली आहे. निसर्गाचा सहवास अनुभवत प्रदर्शनातील कलाकृती पाहण्याचा अनोखा आनंद या ठिकाणी लाभतो.

'सराय शेअरिंग कल्चर'मधील आर्ट गॅलरीमुळे कोल्हापूर व परिसरातील नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. पेशाने आर्किटेक्ट असलेल्या रणदिवे व नदाफ यांनी वैशिष्ट्यपूर्णरित्या आर्ट गॅलरी साकारली आहे. जुन्या वास्तूमध्ये बदल करताना कलादालनाला साजेशी बांधणी केली. चित्रकृती व शिल्पकृती मांडण्यासाठी प्रशस्त दालन, कलाकृती उठावदार दिसतील या पद्धतीची प्रकाश योजना आणि निसर्ग सहवास ही कलादालनाची वैशिष्ट्ये आहेत.

कलाकारांसाठी गेस्ट रुमची सुविधा आहे. सध्या कोल्हापुरात आर्ट गॅलरीची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहे. गॅलरीची संख्या कमी आणि प्रदर्शन भरविणाऱ्या कलाकारांची संख्या मोठी असे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे अनेकांना प्रदर्शनासाठी सात, आठ महिने कलादालनासाठी प्रतीक्षा करावी लागते. या पार्श्वभूमीवर राजेंद्रनगर एसससी बोर्डनजीकच्या चौकातील 'शेअरिंग कल्चर'मधील आर्ट गॅलरी नवोदितासाठी हक्काचे व्यासपीठ ठरत आहे. कला, संस्कृती आणि सामाजिक व अन्य विषयावर चर्चा, संवाद आणि मनमुराद गप्पा यातून कल्चर शेअरिंग होईल ही त्या मागील भावना आहे.

याबाबत मिलिंद रणदिवे म्हणाले, 'सराय... या नावापासूनच वेगळेपण जपले आहे. कारावॅन सराय या शब्दजोडीतून सराय हा शब्द आहे. त्याचा संदर्भ प्राचीन अशा 'सिल्क रुट'शी जोडला आहे. सिल्क रुट ही अशी जागा आहे जिथे काही लोक काही काळ एकत्र येतात. सांस्कृतिक देवाणघेवाण करतात. ज्या माध्यमातून अनुभवांची समृद्धी वाढते. शेअरिंग कल्चरमध्ये कला, संस्कृती, सामाजिक व अन्य विषयावर चर्चा, मनमोकळा संवाद होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरी मतदारसंघ वार्तापत्र

$
0
0

वार्तापत्र

राधानगरी मतदारसंघ

मंडलिकांच्या विजयाने आबिटकरांचा मार्ग सुकर

फोटो : प्रकाश आबिटकर, के. पी. पाटील, धैर्यशील देसाई

मिलिंद पांगिरेकर, गारगोटी

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राधानगरी मतदारसंघातून २४ हजार २८८ मताधिक्य घेतलेल्या धनंजय महाडिक यांच्या विरोधात यावेळी प्रचंड नाराजीची लाट निर्माण झाली. या लाटेला थोपविण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आल्याने यावेळी प्रा. संजय मंडलिक यांना ३९ हजार २१५ चे मताधिक्य मिळाले. मंडलिक यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला. मंडलिकांना १ लाख २६ हजार १६०, तर महाडिकांना ८६ हजार ९४५ मते मिळाली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार प्रकाश आबिटकर यांनी ताकद पणाला लावली. याचा थेट फायदा आमदार आबिटकर यांना येत्या विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

गेल्या निवडणुकीत महाडिक यांच्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. त्यावेळी प्रा. मंडलिक यांच्या पाठीशी प्रकाश आबिटकर यांच्याव्यतिरिक्त एकही मोठा नेता नव्हता. यावेळी मात्र पालकमंत्री पाटील, आमदार आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव, के. जी. नांदेकर, बिद्रीचे संचालक मधुकर देसाई, भाजपचे नाथाजी पाटील, प्रवीण सावंत, अलकेश कांदळकर तसेच सतेज पाटील समर्थक काँग्रसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, युवक नेते सचिन घोरपडे, राधानगरीतून विजयसिंह मोरे, सदाशिवराव चरापले, मारुती जाधव, अभिजित तायशेटे, नंदकुमार सूर्यवंशी, तर आजऱ्यातून अशोक चराटी, अभिषेक शिंपी यांच्यासह राष्ट्रवादीतील काही नेत्यांचे मंडलिकांना पाठबळ मिळाले. महाडिक यांच्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, गोकुळचे संचालक धैर्यशील देसाई, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, गोकुळचे संचालक विलास कांबळे यांनी प्रयत्न केले. युवा नेते राहुल देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश करूनही त्याचे कार्यकर्ते महाडिक यांच्या प्रचारात होते. गेल्या पाच वर्षांत महाडिक यांनी पक्षापेक्षा आपल्या सोयीची भूमिका घेतल्याने त्यांची वेळोवेळी बदललेली भूमिका मतदारांना पसंत पडली नाही. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासूनच महाडिकविरोधी सुप्त लाट जाणवत होती. ही लाट निकालापर्यंत सुसाट गेल्याचे स्पष्ट झाले. त्यात आमदार सतेज पाटील यांच्या 'आमच ठरलंय' फॅक्टरचा फायदा मंडलिकांना झाला. याशिवाय गोकुळ मल्टिस्टेटचा मुद्दाही प्रभावी ठरला.

लोकसभेच्या निकालाने आमदार आबिटकर यांना बळ मिळाले आहे. याचा त्यांना विधानसभेवेळी उपयोग होणार आहे. त्यादृष्टीने आबिटकर यांनी व्यूहरचना केल्याचे दिसते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार के. पी. पाटील यांची हॅटट्रिक रोखून आमदार आबिटकर यांनी ४० हजारांच्या मताधिक्याने बाजी मारली. के. पी. पाटील यांच्या विरोधात निर्माण झालेल्या नाराजीने आबिटकर यांना विजयापर्यंत जाता आले. प्रा. मंडलिक यांच्या विजयामुळे आमदार आबिटकर यांचा मार्ग काहीसा सोयीस्कर झाला आहे. या निवडणुकीत त्यांनी झपाटून प्रचार यंत्रणा राबविली. भाजपमध्ये उमेदवारीसाठी प्रवेश केलेल्या राहुल देसाई यांची मात्र गोची झाली आहे. राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यात उमेदवारीसाठी संघर्ष होणार असल्याचे चित्र आहे. त्यात काँग्रेसकडून अरुण डोंगळे, सत्यजित जाधव, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनाही बरीच तयारी करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताराः टेंभू योजनेचे पाणी कराडला देण्याची मागणी

$
0
0

कराड :

टेंभू योजनेचे पाणी कराड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना मिळावे, अशी मागणी होत आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी तालुक्यांतील दुष्काळी गावांना योजनेचे पाणी मिळाले. पण, कराड तालुक्यातील गावे आजही पाणी टंचाईने होरपळत आहेत. या पाण्यासाठी आता कराड तालुक्यातील लोक आक्रमक झाले असून, या कामी शामगावच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.

कोयना एक्स्प्रेसमधून पडून अज्ञाताचा मृत्यू

जरंडेश्वर (ता. कोरेगाव) रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर कोयना एक्स्प्रेसमधून पडून एका अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील जिल्हा रुग्णालयात आणला आहे. मृत्युमुखी पडलेल्या अज्ञात इसमाची उंची ५.५ फूट, सडपातळ, काळा सावळा, चेहरा उभट, काळे-पांढरे, भुरे केस, फिकट पिवळा फूल शर्ट, हाफ पांढरे बनियन, क्रीम रंगाची फूल पॅन्ट, छातीवर काळाची डागाची जन्म खून, असे त्यांचे वर्णन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकाम करत ऋतुजानेमिळवले लख्ख यश

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

त्यांच्या घरची परिस्थिती सामान्य. दोघी बहिणी. वडिलांचा मेसचा व्यवसाय म्हणजे बेभरवशाच्या उत्पन्नाचा स्रोत. अशा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत ऋतुजा आनंद खुताळे हिने बारावीच्या परीक्षेत ८१.५४ टक्के गुण मिळवले. पहाटे तीन वाजता उठायचे. अभ्यास, घरकाम करायचे. कॉलेज सुटल्यानंतर घरकाम असा दिनक्रम असलेल्या ऋतुजाने हे यश मिळवले.

ऋतुजाचे मूळ गाव कागल तालुक्यात वाळवे खुर्द. प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील शिक्षण सिद्धनेर्ली येथे झाले. त्यानंतर आनंद खुताळे हे पाच वर्षांपूर्वी मुलींच्या शिक्षणासाठी कोल्हापुरात आले. सायबर चौकात हॉटेल आणि मेस चालवून ते चरितार्थ चालवतात. येथील एनसीसी भवनजवळ ते राहतात.छोट्याशा भाड्याच्या घरात राहून ते जिद्दीने मुलींना शिक्षण देत आहेत. ऋतुजा पहिल्यापासूनच हुशार आहे. राजाराम कॉलेजला ११ वीला प्रवेश मिळाल्यानंतर तिने नियमित अभ्यासाची सवय लावून घेतली. रोज पहाटे लवकर उठून अभ्यास करायचा, कॉलेजला जावून आल्यानंतर घरकामात मदत करायची असा तिचा दिनक्रम राहिला. अभ्यासात सातत्य राहिल्याने चांगले यश मिळवले. पुढे तिला स्पर्धा परीक्षेतून आयपीएस, पीएसआय व्हायचे आहे. त्यासाठी ती राजाराम कॉलेजमध्येच बी.एला प्रवेश घेणार आहे. बी.ए करत ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे.

०००

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरची परिस्थिती सामान्य. दोघी बहिणी. वडिलांचा मेसचा व्यवसाय. बेभरवशाचे उत्पन्नाचे स्त्रोत. अशा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत ऋतुजा आनंद खुताळे हिने बारावीच्या परीक्षेत ८१.५४ टक्के गुण मिळवले. पहाटे तीन वाजता उठायचे. कॉलेज सुटल्यानंतर घर काम करत तिने हे यश मिळवले.

ऋतुजाचे मूळ गाव कागल तालुक्यात वाळवे खुर्द. प्राथमिक, माध्यमिकपर्यंतचे शिक्षण सिध्दनेर्ली येथे झाले. त्यानंतर आनंद खुताळे मुलींच्या शिक्षणासाठी पाच वर्षापूर्वी कोल्हापुरात आले. सायबर चौकात हॉटेल आणि मेस चालवून ते चरितार्थ चालवतात. छोट्याशा भाड्याच्या घरात राहून ते जिद्दीने मुलींना शिक्षण देत आहेत. येथील एनसीसी भवनजवळ ते राहतात.

दरम्यान, ऋतुजा पहिल्यापासूनच हुशार आहे. राजाराम कॉलेजला ११ वीला प्रवेश मिळाल्यानंतरच नियमित अभ्यासाची सवय लावून घेतली. रोज पहाटे लवकर उठून अभ्यास करायचे, कॉलेजला जावून आल्यानंतर घरकामात मदत करायचे असा तिचा दिनक्रम राहिला. अभ्यासात सातत्य राहिल्याने चांगले यश मिळवले. पुढे तिला स्पर्धा परीक्षेतून आयपीएस, पीएसआय व्हायचे आहे. त्यासाठी ती राजाराम कॉलेजमध्येच बी.एला प्रवेश घेणार आहे. बी.ए करत ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images