Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उदयनराजेंची हॅटट्रिक

$
0
0

उदयनराजेंची हॅटट्रिक

सातारा

सातारा लोकसभा मतदारसंघात शानदार हॅटट्रिक नोंदवत राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सव्वा लाखांच्या मताधिक्याने पुन्हा दिल्ली गाठली. भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांचा एक लाख नऊ हजार बारा मतांनी पराभव करीत साताऱ्यात आपलीच कॉलर टाईट असल्याचे उदयनराजे यांनी दाखवून दिले. उदयनराजेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा दणदणीत पराभव केला.

लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले हॅट्रीक करणार? याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून होते. पहिल्या फेरीत उदयनराजे यांनी साडेचार मतांचे लीड घेतले होते. मात्र, सर्वर डाउन असल्याने निकाल प्राप्त होण्यास विलंब होत होता. पहिल्या चार फेऱ्यामध्ये पोस्टल व ईटीबीपीएसची मते मोजण्यात आली तेव्हा राजेंची पाटलांवर साडेसहा हजार मतांची आघाडी होती. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला हादरे बसत असताना साताऱ्यात उदयनराजे यांच्या करिष्म्याने राष्ट्रवादीची पत वाचली. जो चमत्कार भाजपने महाराष्ट्रात घडवला, तो साताऱ्यात घडू शकला नाही. सहा विधानसभा मतदारसंघात फेरीनिहाय उदयनराजे यांना ५४७७९६ तर भाजपच्या नरेंद्र पाटील ४३६७६२ इतकी मते मिळाली. राजेंनी १११०३४ मतांची आघाडी घेत उदयनराजे यांनी खासदारकी तिसऱ्यांदा खिशात घातली. युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनीही त्यांना निवडणुकीत कडवी लढत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकमंत्र्यांची व्यूहरचना यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पक्षाच्या विस्तारासाठी स्थानिक पातळीवरील विविध घटकांशी आघाडी करायची, संधी मिळेल त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना उभारी द्यायची, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज घटकांना सामावून घेत पक्षाची ताकद वाढवायची ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची राजकीय निती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कमालीची यशस्वी ठरली. कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सोलापूर, माढा येथील युतीच्या विजयाने राज्याच्या राजकारणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ताकद वाढली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील युतीचे उमदेवार निश्चिती ते त्यांना निवडून आणण्यापर्यंत पालकमंत्र्याची भूमिका महत्वाची ठरली. लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविली होती. त्यापैकी कोल्हापूर, हातकणंगले या जागा शिवसेनेच्या वाट्याला तर सांगली, सोलापूर आणि माढा येथील जागा भाजपकडे आल्या होत्या. भाजप, शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून केला. ही सभा यशस्वी करुन दाखवित वातावरण निर्मिती करण्यात त्यांचा पुढाकार राहीला.

सत्तेच्या गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांनी कोल्हापूर, सांगली, हातकणंगले, सोलापूर, माढा मतदारसंघातील दोन्ही काँग्रेसच्या नाराज घटकांना पक्षात सामावून घेतले. कुणाला आमदारकीचे तिकीट, कुणाला महामंडळाच्या ऑफर्स देत भाजप भक्कम केला. ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार नाही तेथील शिवसेनेच्या उमेदवाराच्या पारड्यात सगळी ताकद टाकली. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेतील लहानसहान सत्ता घटकांना एकत्र करत साऱ्यांची ताकद युतीच्या मागे उभी केली. राज्यात आणि केंद्रात सत्तेच्या बळाचा अवलंब केला. सर्व प्रकारची रसद पुरवली. इतकेच नव्हे तर दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना राजकारणात खुले आव्हान देत भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्याना चार्ज केले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय केले.

विशेषत: हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पराभव हा त्यांच्यासह भाजपला सुखावणारा आहे. कारण शेट्टी हे गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे ठाकले होते. सरकारच्या शेतीविषयक धोरणावरुन त्यांनी मोदींवर निशाणा साधला होता. शिवाय विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन ते भाजपला आव्हान देत होते. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप, सेनेने एकसंधपणे प्रचार मोहिम राबवली. धैर्यशील माने यांच्या पाठीशी भाजपची ताकद उभी केली.

........

महाडिकांना अंतर, युतीधर्माला प्राधान्य

कोल्हापुरात पालकमंत्र्याची कसोटी लागली होती. कारण जिल्ह्याच्या राजकारणात ते, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत होते. राष्ट्रवादीचे खासदार व उमेदवार धनंजय महाडिक आणि त्यांच्यामध्ये चांगले सख्य होते. कोल्हापुरात मंत्री पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी सत्ता काबीज केली. मात्र लोकसभा निवडणुकीत मंत्री पाटील यांनी युतीधर्माला प्राधान्यक्रम दिला. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांनी 'गोकुळ'वरुन महाडिकांवर निशाणा साधला. शिवाय भाजपमधील महाडिक समर्थकांना वेगळा विचार कराल तर किंमत मोजावी लागेल, अशी तंबी दिली.

......................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या तीन फेऱ्यांतच मंडलिकांचा विजय निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील पहिल्या दोन-तीन फेऱ्यांमध्येच युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा विजय निश्चित झाल्यानंतर दुपारनंतर मतमोजणी केंद्रातील उत्सुकताच संपुष्टात आली. निकालाचा कल समजताच एकीकडे जल्लोषाला सुरुवात झाल्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया मात्र प्रचंड रेंगाळली. परिणामी मतदानमोजणी केंद्रामधील उत्साह मावळून गेला.

सकाळी दहा वाजताच युतीचे उमेदवार प्रा. मंडलिक राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा एकतर्फी पराभव करणार असल्याचे निश्चित झाले. दुपारी दोन वाजता झालेल्या अकराव्या फेरीत एक लाख ७६ हजार ६७७ मतांचे मताधिक्य घेत महाडिक समर्थकांची उरली-सुरली आशाही संपुष्टात आली. लोकसभेच्या सहाही मतदारसंघात मंडलिक यांना मताधिक्य मिळत असल्याने महाडिक समर्थकांनी मतमोजणी केंद्रातून व परिसरातून काढता पाय घेतला. त्यानंतरच्या प्रत्येक फेरीत सरासरी २० ते २५ हजारांचे मताधिक्य वाढत असल्याने निकालाची केवळ औपचारिकता शिल्लक होती. १३ व्या फेरीत मंडलिक यांनी दोन लाखांचे मताधिक्य मिळाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर प्रचंड जल्लोष करण्यात आला. सतराव्या फेरीअखेर अडीच लाखांचे मताधिक्क पार केल्यानंतर पुढील फेऱ्या मतमोजणीच्या केवळ औपचारिकता शिल्लक ठेवणाऱ्या ठरल्या. साधारणत: चार ते साडेचार वाजता ईव्हीएम मशिनची मतमोजणी पूर्ण झाली. पण त्यानंतर आकडेवारी एकत्र करणे आणि पोस्टल मतमोजणी करण्यास प्रचंड विलंब झाला. प्रक्रिया रेंगाळत गेल्यानंतर त्यांची उत्सुकताही कमी होत गेली.

दरम्यान, प्रचंड मोठे मताधिक्य मिळाल्यानंतर प्रा. मंडलिक यांनी आमदार अबिटकर यांच्यासमवेत मतमोजणी केंद्रात हजेरी लावली. त्यानंतर काहीवेळात आमदार चंद्रदीप नरके, कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके व आमदार राजेश क्षीरसागर दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विधानसभानिहाय पाच व्हीव्हीपॅट मशिनमधील स्पील मोजण्याचीही प्रक्रिया पूर्ण झाली. सायंकाळी सात वाजता संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली, पण निकाल हाती पडण्यास रात्री तब्बल करापर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

...................................

चौकट

विधानसभानिहाय मताधिक्य

चंदगड : ५९, ९०५

राधानगरी : ४५,९२०

कागल : ७२,५७७

कोल्हापूर दक्षिण : ४३,१५९

करवीर : ३६,८३३

कोल्हापूर उत्तर : २७, ७८३

एकूण : दोन लाख ६९ हजार ७९४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप कार्यालयासमोरआनंदोत्सव

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यातील भाजप, शिवसेना आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडूण आल्याबद्दल आणि देशात चांगले यश मिळाल्याबद्दल बिंदू चौकातील भाजपच्या कार्यालयासमोर गुरुवारी कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील कार्यालयाजवळ जाताच, कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत गुलालाची उधळण केली. फटाक्यांची आतषबाजी केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदासंघात भाजप, शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाले. त्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटले. जोरदार जल्लोष करून आनंद व्यक्त केला. त्यानंतर पालकमंत्री पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई, महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांच्यासह मिरवणुकीने अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी वीजकामगारांचा ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महावितरण कंपनीकडे काम करणाऱ्या जिल्ह्यातील ५५० कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले. त्यांना पुन्हा कामावर रूजू करून घ्यावे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. कोल्हापूर शहर, गडहिंग्लज, इचलकरंजी, जयसिंगपूर या वीज कार्यालयातर्गंत ५५० कामगार लाइनमन म्हणून काम करतात. मात्र महावितरण कंपनीने कंत्राट संपल्याचे कारण सांगत त्यांना कामावरून कमी केले. दीड महिन्यांपासून ते बेरोजगार झाले आहेत. नविन कंत्राटची निविदा प्रक्रिया वेळेत राबवली नाही. यामुळे अनेक महिन्यांपासून काम करणाऱ्या लाइनमनना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. संघातर्फे पत्रव्यवहार करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले. यामुळे कमी केलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे, थकीत वेतन त्वरीत द्यावे, कंत्राटी कामगार घेण्यासाठीच्या निधीची मागणी करावी, यासाठी त्या कामगारांनी आंदोलन सुरू केले. आंदोलनात संघाचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे, अनिल लांडगे, सागर निगडे, मधुकर माळी यांच्यासह कामगार सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकार साखरे, महाडिक यांच्या विरोधात आणखी एक तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सत्तर हजार रुपये कर्जाने दिलेल्या व्याजाची वसुली करण्यासाठी चार लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी संशयित सावकार सूरज साखरे (रा. देवकर पाणंद) आणि अभि महाडिक (रा. मंगळवार पेठ) यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अतुल लक्ष्मण खाटकी (वय ३०, रा. निवडे साळवण, ता. गगनबावडा) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल केली. या संशयित दोघांना मोक्का गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे.

जुना राजवाडाचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल यांना मटण व्यवसायासाठी पैशाची गरज होती. त्यांनी साखरे याच्याकडून १० हजार रुपये घेतले. त्यासाठी आठवड्याला एक हजार रुपये व्याज देण्याचे ठरले. वेळेत पैसे न दिल्यास दिवसाला एक हजार व्याज आकारण्याचे ठरले. अतुल यांना पुन्हा पैशाची गरज भासल्याने त्यांनी महाडिक याच्याकडून ६० हजार रुपये घेऊन दिले. त्या बदल्यात त्याची चारचाकी गाडी (एम. एच. ०९, सी. यु. ६०७१) ही तारण ठेवली. काही दिवसांनी घेतलेली रक्कम व्याजासह सुमारे १ लाख रुपये झाली. डिसेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत अतुल यांनी व्याजाने पैसे घेतले होते. वेळेत पैसे दिले नसल्याचे कारण देऊन संशयित दोघांनी चार लाख रुपयांची खंडणी अतुल यांच्याकडे मागितली. त्याला मानसिक त्रास देऊन ठार मारण्याची धमकी दिली. या दोघांच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बजाज फायनान्सद्वारे पाच लाखांचे कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शब्बीर सिकंदर मुजावर (वय ३५, रा. सुदर्शन हौसिंग सोसायटी, टेंबलाईवाडी) या मेकॅनिकला ५७ हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी संशयित अमित शर्मा, निलम चौहान या दोघांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारे आणखी १५ जणांची फसवणूक झाल्याचे मुजावर यांनी पोलिसांना सांगितले.

राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शब्बीर मुजावर यांचा वाहन दुरुस्तीचा व्यवसाय आहे. २ एप्रिल ते ९ मे च्या दरम्यान त्यांना संशयित अमित शर्मा याचा मोबाइलवर फोन आला. 'मी दिल्लीतून बजाज फायनान्समधून बोलतोय. तुमचा मोबाइल नंबर लकी आहे. तुम्हाला कंपनीकडून दोन लाखांचे कर्ज तत्काळ सहा टक्के व्याजाने मंजूर करण्यात येणार आहे,' असे सांगितले. मुजावर यांच्याकडून नाव, पत्ता आणि व्यवसायाची माहिती घेतली. त्यानंतर निलम चौहान या महिलेने संपर्क साधून तुमची कागदपत्रे ऑनलाइन पाठवून द्या, असे सांगितले. कर्ज मिळविण्यासाठी लागणारा अर्ज ई-मेल केला. व्हॉटस् अॅपवर कर्जमंजुरीसाठी लागणारी सर्व माहिती पाठविली. मुजावर यांनी या प्रकारे कर्ज मिळते का, याची चौकशी कोल्हापुरातील फायनान्स कार्यालयात काही कर्मचाऱ्यांकडे केली. त्यांनी ऑनलाइन कर्ज दिले जात असल्याचे सांगितल्याने त्यांचा विश्वास बसला. कर्ज मिळविण्यासाठी त्यांनी आपल्या बँकेतील खात्यावरून नेटबँकिंगद्वारे ५७ हजार ६७८ रुपये भरले. अर्जामध्ये त्रुटी असल्याचे सांगून या दोन भामट्यांनी आणखी पैसे भरण्यास सांगितले. मात्र या सर्व प्रकाराचा संशय आल्याने मुजावर यांनी फायनान्स कंपनीतील शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधला. त्यांनी आमच्याकडून अशा प्रकारे कर्ज दिले जात नाही, आमचा डाटा चोरीला गेला आहे. तुमच्या प्रकरणाशी आमचा काही संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी सायबर सेलकडे तक्रार केली. पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी चौकशी केली असता फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यानंतर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

...

आणखी ३५ हजार भरा

संशयितांनी पाच लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखविले. मुजावर यांनी ५७ हजारांची रोकड भरल्यानंतर त्यांना पाच लाख रुपयांचा धनादेश ऑनलाइनद्वारे दाखविण्यात आला. तुमचे नाव आणि रक्कम व्यवस्थित असल्याची खात्री करुन घ्या, असे सांगत काही सेकंदात तो भामट्यांनी डिलिट केला. दोन दिवसांत बँकेत हा धनादेश जमा होईल, असे सांगितले. मुजावर बँकेत धनादेश आणण्यासाठी गेले. त्या वेळी भामट्यांनी तुमचा बॅलेन्स कमी असल्याने धनादेश पाठवू शकत नाही, असे सांगितले. त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांकडे या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर बँक बॅलन्स आणि धनादेश याचा काहीही संबध नसल्याचे सांगितले. त्या वेळी भामट्यांनी पुन्हा ३५ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्या वेळी त्यांनी ही रक्कम भरण्यास नकार दिला. दरम्यान शुक्रवारी (ता. २४) रात्रीही भामट्यांकडून उर्वरित पैसे जमा करा, अन्यथा धनादेश रद्द करण्याचा मेसेज पाठविल्याचे मुजावर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिंगणापूर (ता. करवीर) येथील नवीन बांधलेल्या घरावर पाणी मारत असताना घाईगडबडीने पाण्याच्या हौदामध्ये पडलेली विद्युतमोटर बाहेर काढताना विजेचा धक्का बसून मोहन भाऊसो मस्कर (वय ५७) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन मस्कर याच्या नवीन घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. फरशी आणि गिलाव्याचे काम सुरु आहे. शुक्रवारी सकाळी ते विद्युत मोटर लावून घरावर पाणी मारत होते. त्यावेळी मोटर चालू स्थितीत हौदामध्ये पडली. ती खराब होईल, या भितीपोटी घाईगडबडीने चालू स्थितीत बाहेर काढत असताना विजेचा धक्का बसून ते जाग्यावरच बेशुध्द पडले. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील आणि शेजारील लोक पळत आले. वीजप्रवाह बंद करुन बेशुध्द मस्कर यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच नातेवाईकांसह गावातील नागरिकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टिफिन बॉक्स मेकिंग कार्यशाळा शनिवारी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

टिफिन बॉक्स हा प्रत्येकाच्या जिव्हाळयाचा विषय आहे. लहान मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये खाद्यपदार्थ कोणते असावे, त्यांच्या आवडीनिवडी या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. नेमकी हीच गरज ओळखून 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'तर्फे शनिवारी (ता. २५) टिफिन बॉक्स मेकिंग कार्यशाळा आयोजित केली आहे.

राजारामपुरी सातवी गल्ली येथील हाय टी कॅफे येथे दुपारी तीन वाजता कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत विविध पदार्थ शिकवण्यात येतील. यामध्ये आलू कुरकुरे बॉक्स, आलू पनीर बर्ड नेस्ट, पेरी पेरी सँडविच, चिली चीज सँडविच, मटार पॅटीस हे पदार्थ शिकवले जातील. कार्यशाळेतील सहभागासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. सुट्टीच्या कालावधीत ही कार्यशाळा होत आहे.

या कार्यशाळेसाठी 'मटा कल्चर क्लब' सभासदांना २५० रुपये शुल्क आहे. तर इतरांना ४०० रुपये शुल्क आहे. कार्यशाळेविषयक अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ९७६७८९०६२६ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच या क्रमांकावर एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपद्वारेही नोंदणी करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.त जनसुराज्यची भूमिका निर्णायक

$
0
0

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल सप्टेंबर २०१९ मध्ये संपत आहे. अध्यक्षपदासाठी नवे आरक्षण जाहीर होऊन २० सप्टेंबरपूर्वी अध्यक्षपदासाठी निवड होईल. सध्या जि. प. मध्ये भाजप, शिवसेना, जनसुराज्य व स्थानिक आघाड्यांची संयुक्त सत्ता आहे. आवाडे गट आणि स्वाभिमानी संघटनाही सत्तेत सहभागी आहेत. दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जि. प. तील सत्ता काबीज करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आवाडे गट आणि स्वाभिमानी सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडले तरी युतीधर्मानुसार संजय मंडलिक, प्रकाश आबिटकर व उल्हास पाटील गटाचे सदस्य सत्ताधाऱ्यांसोबत येऊ शकतात. यामुळे सत्ताबदल अशक्य वाटते. मात्र जनसुराज्य शक्ती पक्षाने विधानसभेसाठी जुळवाजुळव करताना वेगळी भूमिका घेतली तर जि.प.च्या राजकारणाला कलाटणी मिळू शकते. मात्र सध्या जनसुराज्य भाजपसोबत आहे. बदलत्या राजकीय स्थितीत महाडिक समर्थक सदस्य काय भूमिका घेणार हे महत्वपूर्ण ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माने गटाला नवे ‘धैर्य’

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

@gurubalmaliMT

कोल्हापूर

जिल्ह्याचे राजकारण एकेकाळी माने घराण्याच्या ताब्यात होते. गटाच्या ताकदीवरच घरात तब्बल पस्तीस वर्षे खासदारकी होती, पण राष्ट्रवादीच्या स्थानिक वादात होणाऱ्या अन्यायामुळे हा गट कमकुवत झाला, तो विखुरला. त्याची घुसमट सुरू झाली. पण लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाने माने गटाला नवे 'धैर्य' मिळाले आहे. या बळाच्या जोरावर पुन्हा एकदा जिल्ह्यातील हा गट एका झेंड्याखाली आणण्याची संधी नूतन खासदार धैर्यशील माने यांना मिळणार आहे.

बारा वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले बाळासाहेब माने हे पाचवेळा लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्यानंतर त्यांच्या स्नुषा निवेदिता माने दोन वेळा निवडून आल्या. पस्तीस वर्षे हे घराणे संसदेत कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व करत होते. पण दहा वर्षांपूर्वी राजू शेट्टी यांनी मानेंचा पराभव करत त्यांची हॅटट्रीक चुकवली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून माने गट शरद पवारांवर निष्ठा ठेवत त्यांच्यासोबत होता. पण लोकसभेतील पराभवानंतर स्थानिक नेतृत्वासह राज्य नेतृत्वाने त्यांना प्रत्येक ठिकाणी डावलण्यास सुरूवात केली. हातकणंगलेची जागा आघाडीच्या तडजोडीत ऐनवेळी काँग्रेसला दिली. त्या बदल्यात मानेंना विधानपरिषदेवर घेण्याचा शब्द दिला. पण प्रत्यक्षात तो शब्द नंतर फिरवला. यामुळे माने गटाची नाराजी वाढली. याचदरम्यान, माने यांच्याकडील राष्ट्रवादी महिला आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षपदही दुसऱ्यांना देण्यात आले.

एकीकडे राज्य व राष्ट्रीय नेतृत्वाकडून अवहेलना सुरू असताना स्थानिक पातळीवरही माने घराण्याला डावलले जात होते. विशेषत: आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून या गटाला बेदखल करण्यात येत होते. यामुळे कार्यकर्त्यांमधील खदखद वाढत होती. यातून जिल्हा परिषद निवडणुकीत धैर्यशील माने यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. हा केवळ इशारा होता. पण तो देखील पक्षाने गांभीर्याने घेतला नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा माने यांनी दाखवली. पण ती जागाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली. ज्यांच्या विरोधात दहा वर्षे लढा दिला, त्यांचाच झेंडा खांद्यावर घेऊन प्रचार करा, असा पक्षाचा आदेश पाळण्याची वेळ या घराण्यावर आली. पण त्याला स्पष्ट नकार देत हातातील 'घड्याळ' बाजूला ठेवत दोघांनीही सेनेचे 'धनुष्यबाण' हाती घेतले.

या सर्व घडामोडीत दहा वर्षांत या गटाची ताकद फारच कमी झाली. अनेक सरदार दुसऱ्या पक्षात गेले, कार्यकर्ते दुरावले. यामुळे गट विस्कळीत झाला. आर्थिक ताकद नाही, कार्यकर्ते नाही, संस्था नाही, यंत्रणा नाही अशा अवस्थेत लोकसभा लढण्याची घोषणा झाली. दुसरा पर्याय नव्हता म्हणून सेनेने त्यांना उमेदवारी दिली. शेट्टींचा विजय निश्चित आहे, असे गृहित धरूनच प्रचार सुरू झाली. पण पंधरा दिवसात वारे फिरले. युवकांचा प्रतिसाद मिळू लागला. इचलकरंजीत हवा झाली, बघता बघता ही हवा मतदारसंघात पोहोचली. जातीय समीकरण आणि शेट्टींनी इचलकरंजीसह अनेक घटकांकडे केलेले दुर्लक्ष याचा फायदा सेनेला झाला आणि सुमारे लाखाच्या फरकाने भगवा फडकला.

अचानक दोन महिन्यात घडलेल्या या घडामोडींमुळे माने घराणे पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आले आहे. ज्या राष्ट्रवादीने अन्याय केला, त्याचा बदला घेण्यात हे कुटुंब यशस्वी झाले आहे. या विजयाने नवे बळ मिळाले आहे. विविध पक्षात विखुरलेले कार्यकर्ते पुन्हा एका झेंड्याखाली आणण्याची संधी मिळाली आहे. संघटन कौशल्य आणि वक्तृत्वाच्या जोरावर लढाई जिंकण्याची धैर्यशील यांची कला या मोहिमेत उपयोगी पडणार आहे.

..........

कोट

'राष्ट्रवादीने दहा वर्षात आमच्यावर जो अन्याय केला, त्याचा बदला घेतला आहे. त्यांनी अन्याय केला, म्हणून आम्हाला नवी संधी मिळाली. या संधीचा वापर आता आमचा गट पुन्हा एकदा एकसंध करण्यासाठी करण्यात येईल. पण तो आता भगव्या झेंड्याखाली एकत्र येईल.

धैर्यशील माने, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सर्व उमेदवारांची मते

$
0
0

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सर्व उमेदवारांची मते

प्रा. संजय मांडलिक, शिवसेना : ७,४९,०८५ (विजयी)

धनंजय महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस : ४,७८,५१७

प्रा. डी. श्रीकाांत, बहुजन समाज पार्टी : ५,०३४

डॉ. अरुणा माळी, वंचित बहुजन आघाडी : ६३,४३९

किसन काटकर, बळीराजा पार्टी : १,९०२

दयानांद कांबळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी : १,५७०

नागरत्न सिद्धार्थ, बहुजन मुक्ती पार्टी : १,४२१

परेश भोसले, अपक्ष : १,०९२

बाजीराव नाईक, अपक्ष : २,०५५

अरविंद माने, अपक्ष : २,१२२

अजिज मुल्ला, अपक्ष : ३,३९०

युवराज देसाई, अपक्ष : १,७५८

राजेंद्र कोळी, अपक्ष : २,५९७

संदीप संकपाळ, अपक्ष : ५,९५५

संदीप कोगले, अपक्ष : २,२२४

पोस्टल मते : ५,४१२

एकूण वैध मते : १३,२२,१६१

नोटा : ८,६९१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय शिंदेच्या पराभवाच्या धक्क्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

संजय शिंदेच्या पराभवाच्या

धक्क्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर :

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे याचा भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पराभव केला. हा झालेला पराभव सहन न झाल्याने माढा तालुक्यातील शिंदेवाडीचा तरुण पांडुरंग शिंदे (वय २५ रा. शिंदेवाडी, ता. माढा) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला खासगी रूग्णालयात धाव घेऊन तरुणाच्या प्रकृतीची माहिती घेत जबाब नोंदवून घेतला. या घटनेची नोंद बार्शी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपसाठी माळशिरस ‘लाख’मोलाचे

$
0
0

भाजपसाठी माळशिरस 'लाख'मोलाचे

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ८४ हजार ७५० मतांनी विजय मिळवला. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात स्वत: वर्चस्व राखले होते. मागील लोकसभा मतदारसंघात देशात मोदींची लाट असताना ही मावळते खासदार विजयसिंह मोहिते यांनी व्यक्तिगत ताकदीवर विजय मिळवत राष्ट्रवादीचा गड राखला होता.

माढा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी माळशिरस, फलटण व माण मतदारसंघातून भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मताधिक्य मिळाले. माढा, करमाळा, सांगोला येथून राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना मताधिक्य मिळाले. शिंदेंना त्यांच्या माढा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात भ्रमनिरास झाला. भाजपने शिंदे व राष्ट्रवादी विरोधी गटास एकत्र केल्याने शिंदेंना फक्त साडेसहा हजारांचे मताधिक्य मिळाले. फलटण येथून आमदार रामराजे निंबाळकर यांच्याकडून राष्ट्रवादीला मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात भाजपचे उमेदवार निंबाळकरांना १३ हजार ९० मतांची आघाडी मिळाली आहे. माण येथून निबाळकरांनी अपेक्षित २३ हजार २१५ मतांची आघाडी घेतली. माळशिरस विधानसभा मतदारसंघाने निंबाळकरांना विजय मिळवून दिला. त्यांना सर्वाधिक एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. शिंदेंना येथून फक्त ४२ हजार ३९५ मते मिळाली.

सांगोला मतदारसंघातून शिंदेंना मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती. पण, फक्त साडेतीन हजारांचे मताधिक्य मिळाले. शिंदेना त्यांच्या हक्काच्या करमाळा मतदारसंघातून ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्याची अपेक्षा होती. पण, फक्त ३० हजारांचे मताधिक्य मिळवता आले. वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारीचा फटका शिंदेंना बसला. वंचित आघाडीने ५१,३४९ मते मिळवली.

विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान

माढा

भाजप-महाआघडी ९८,५६२

राष्ट्रवादी काँग्रेस १,०५,०६७

.......

करमाळा

भाजप-महायुती ७१,१७५

राष्ट्रवादी-आघाडी १,०१,६७९

......

सांगोला

भाजप-महायुती ७८,७४६

राष्ट्रवादी-आघाडी ८२,१२०

.......

माळशिरस

भाजप-महायुती १,४३,०२५

राष्ट्रवादी आघाडी ४२,३९५

........

फलटण

भाजप-महायुती ९४,४७६

राष्ट्रवादी आघाडी ७३,२६१

.......

माण

भाजप महायुती ९६,४७६

राष्ट्रवादी आघाडी ७३,२६१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांचे प्रस्ताव सादर करा

$
0
0

महापालिका लोगो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेच्या २०१८-१९ चे सुधारित आणि २०१९-२० च्या नवीन अंदाजपत्रकांमध्ये शहर विकासाच्या नावीन्यपूर्ण योजना व विकासकामे निश्चित केली आहेत. अशा कामांसाठी आवश्यक प्रस्ताव त्वरित सादर करा,' असे आदेश स्थायी समिती शारंगधर देशमुख यांनी प्रशासनाला दिले. योजनांचा आढावा घेण्यासाठी छत्रपती ताराराणी सभागृहात संबंधित अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली.

२०१८-१९ चे सुधारित व २०१९-२० चे नवीन अंदाजपत्रक स्थायी समितीने सादर केले. अंदाजपत्रकामध्ये विकासकामे आणि नावीन्यपूर्ण योजनांसाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळ, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बिंदू चौक येथील छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारणे, महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील सात ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कॅशलेस विमा योजना राबविणे, गोविंदराव पानसरे स्मारक, आदींचा समावेश आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली असून, या कामांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ते प्रस्ताव त्वरित सादर करा. याबाबत दर आठवड्याला आढावा बैठक घेणार असल्याचे सभापती देशमुख यांनी सांगितले.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगशे शिंदे, सहायक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, उपशहर अभियंता रमेश मस्कर, हर्षजित घाटगे, नारायण भोसले, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, आदी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनपाचे आज शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय आणि महापालिकेच्यावतीने दिव्यांग तपासणी आणि मोफत साधन पुरवठ्याबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी (ता. २५) केएमसी कॉलेज येथे शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराच्या नियोजनाबाबत सोमवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थित बैठक झाली. शिबिराची माहिती दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. न्याय मंत्रालयामार्फत देण्यात येणारा साधनपुरवठा पात्र दिव्यांगांना देण्यात येणार असून, त्यांनी शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन केले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, सर्व वैद्यकिय अधिकरी व आरोग्य निरिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत मतदारांनी महास्वामींना तारले

$
0
0

लिंगायत मतदारांनी महास्वामींना तारले

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा कमळ फुलले. २०१४च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे शरद बनसोडे यांनी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा १ लाख ५१ हजार मताधिक्याने पराभव केला होता. तर यंदाच्या निवडणुकीत भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींनी सुशीलकुमारांचा तब्बल १ लाख ५८ हजार ६०८ मताधिक्याने पराभव करीत भाजपचा गड राखला. शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने सोलापुरातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

महास्वामींनी भरघोस मतांनी सोलापूरची जागा कायम राखल्याने भाजपचा विश्वास आणखी दुणावला आहे. शिंदे यांच्या पराभवाला अपेक्षेप्रमाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर कारणीभूत ठरल्याचे स्प्ष्टपणे दिसून येत आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळाचा शिरकाव काँग्रेसजणांना थक्क करणारा

रात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालात महास्वामींना ५ लाख २४ हजार ९८५ , सुशीलकुमारांना ३ लाख ६६ हजार ३७७ आणि प्रकाश आंबेडकर यांना १ लाख ७० हजार ०७ मते मिळाली. महास्वामी तब्बल १ लाख ५८ हजार ६०८ मताधिक्याने निवडून आले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तरने महास्वामींना सर्वाधिक ६३ हजार ६६७ चे मताधिक्य दिले. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंच्या शहर मध्य, काँग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अक्कलकोट मतदारसंघात ही महास्वामींनी मुसंडी मारली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शहर मध्यमध्ये भाजपला ३० हजार ८२९ तर अक्कलकोटमध्ये भाजपलाच ४७ हजार ४२९ मताधिक्य मिळाले. सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या दक्षिण सोलापूरने ३७ हजार ७७८ मताधिक्य देऊन महास्वामींना तारले. या शिवाय सुशीलकुमार शिंदे यांना फक्त माजी आमदार राजन पाटलांच्या मोहोळ, कॉँग्रेस आमदार भारत भालके यांच्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. महास्वामी जंगम समाजाचे असल्याने लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि शहर उत्तर मतदारसंघात महास्वामींना मतांचे झुकते माप मिळाले. काँग्रेसच्या पाठीशी असणारा मतदार केवळ महास्वामी निवडणुकीत उभे राहिल्याने भाजपच्या पाठीशी गेला हे नाकारून चालणार नाही.

आंबेडकरांमुळे शिंदे वंचित

प्रकाश आंबेडकर यांच्या प्रवेशानंतरच काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शिंदे यांनी प्रयत्न करूनही ते आपला पराभव वाचवू शकले नाहीत. महास्वामी आणि शिंदे यांच्यात सरळ लढत झाली असती तर काहीसे वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते, असे चर्चिले जात असले तरी सुद्धा महास्वामींमुळे भाजपचा विजय सोपा झाला झाला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोघांनी वाद बाजूला ठेऊन लावलेली ताकद महास्वामींसाठी उपयोगी ठरली. सुशीलकुमार शिंदे यांना मिळालेली मते आणि वंचित आघाडीच्या मतांची बेरीज केल्यास ५ लाख ३६ हजार ३८४ होतात. जी मते महास्वामींना मिळालेल्या मतांपेक्षा ११ हजार ३९९ मते अधिक आहेत. मुस्लिम, दलित मते काँग्रेसच्या हक्काची असतानासुद्धा ती वंचितच्या पारड्यात गेल्याने शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सोलापूर लोकसभेसाठी उभारलेल्या ११ उमेदवारांना मिळालेली मते अगदी नगण्य असल्याने त्यांचा अन्य कोणत्याही उमेदवारावर प्रभाव दिसून आला नाही. एकूणच प्रकाश आंबेडकरांनी शिंदे यांना विजयापासून वंचित ठेवले म्हणावे लागेल.

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान

मोहोळ

भाजप - ७१७२२

कॉंग्रेस - ८७१५१

वंचित - ३०१४५

......

शहर उत्तर

भाजप - ९९२६०

कॉँग्रेस - ३५५९३

वंचित - २६८७०

.......

शहर मध्य

भाजप - ८०८२३

कॉँग्रेस - ४९९४

वंचित - २७४६८

..........

अक्कलकोट

भाजप - १०४९१७

कॉँग्रेस - ५७४८८

वंचित - २७६२५

........

दक्षिण सोलापूर

भाजप - ८८६९१

कॉँग्रेस - ५०९१३

वंचित - २८०९२

पंढरपूर

भाजप - ७७९३९

कॉँग्रेस - ८४१३५

वंचित - २६८७०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकलूजच्या तरुणाचा एव्हरेस्टवर मृत्यू (सोलापूर वरून आलेली बातमी)

$
0
0

सोलापूर

एव्हरेस्ट शिखर सर करणारा अकलूजचा गिर्यारोहक निहाल बागवान याचा एव्हरेस्ट कॅम्प-४ (उंची २६०००फूट) वर अति थकव्याने मृत्यू झाला. ही घटना २३ मे रोजी घडली आहे. त्याच्या मृत्यूबद्दलची माहिती नेपाळ येथील कंपनी 'पिक प्रमोशन प्रा. लि.' यांनी दिली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीला निहाल याच कंपनीबरोबर एव्हरेस्ट चढाई मोहिमेवर गेला होता. २३ मे रोजी सकाळी ८.३० वाजता एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर निहाल व त्याच्या शेर्पाने खाली उतरण्यास सुरवात केली. एकाच दिवशी जगभरातील २०० पेक्षा जास्त गिर्यारोहक चढाई करीत असल्यामुळे अनेक वेळा ये-जा करण्याचा मार्ग जाम होऊन गिर्यारोहकांना खूप वेळ थांबावे लागत होते. अशा परिस्थितीत अति थकव्यामुळे कॅम्प-४ येथे पोहचून निहाल बागवान याने शेवटचा श्वास घेतला, अशी माहिती 'पिक प्रमोशन प्रा. लि.'चे केशव पुडीया यांनी दिली आहे. दरम्यान, भारत सरकारकडून निहाल बागवान याचा मृतदेह एव्हरेस्ट कॅम्प ४ पासून खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे लक्ष्य आता विस्ताराकडे

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीत युतीधर्माचे पालन करताना भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा खासदार निवडून येण्याचे स्वप्न साकार केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मजबूत बूथद्वारे आपला ठसा उमटवत मताधिक्यात मोलाचा वाटा उचलला. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा विस्तार करताना आमदारांची संख्या वाढवण्यासाठी पालकमंत्र्यांना चांगलीच 'जडणघडण' करावी लागणार आहे.

पालकमंत्र्यासह आमदार सुरेश हाळवणकर आणि अमल महाडिक यांच्यावर शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जबाबदारी होती. पण आमदार महाडिक यांचे बंधू खासदार धनंजय महाडिकच राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने भाजपची चांगलीच गोची झाली. त्यामुळे पालकमंत्री आणि हाळवणकर यांना किल्ला लढवावा लागला. जिल्ह्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी राष्ट्रवादीच्या प्रचारात उतरले. तरीही भाजपने 'बूथ' वर भर देत प्रचार यंत्रणा राबवली. मित्रपक्षांच्या लोकप्रतिनिधींशी काही ठिकाणी खटके उडाले असले तरी संयम ठेवत भाजपने स्वतंत्र मेळावे घेत सेनेचा प्रचार केला. काही ठिकाणी सेनेबरोबर मेळावे घेऊन मतभेद दिसू नयेत यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रवादीचा प्रचार करणाऱ्या कारणे दाखवा नोटिसा बजावत अन्य पदाधिकारी राष्ट्रवादीच्या गोटात जाऊ नयेत याची काळजी घेतली.

लोकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात पालकमंत्री पाटील यांनी गोकुळ 'मल्टिस्टेट'ला राज्य सरकार परवानगी देणार नाही, हा बॉम्ब टाकून ग्रामीण भागातील शेतकरी व दूध उत्पादकांना युतीकडे वळवण्यासाठी खेळी केली. तर हातकणंगले मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सेनेचा हिरेरीने प्रचार केला. इचलकरंजीचे आमदार हळवणकर यांनी इचलकरंजीत धैर्यशील माने यांना मताधिक्य देऊन २००८ मध्ये माने गटाने केलेल्या मदतीची परतफेड केली.

जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार निवडून आल्याने सेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपला आपला विस्तार करण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. आगामी विधानसभेत युती होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या शिवसेनेचे सहा आमदार तर भाजपचे दोन आमदार आहेत. मतदानानंतर शहरातील आमदार राजेश क्षीरसागर यांना विधानसभा निवडणूकीत मदत करणारी नाही, अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली असली तरी त्याचे पडसाद युतीधर्मावर पडणार का हे भविष्यात पहायला मिळणार आहे. सेनेच्या वाट्याला असलेले सहा आमदारांचे मतदारसंघ सोडून भाजपला कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी या दोन हक्काचा जागा कायम ठेवण्याचे भाजपपुढे आव्हान असणार आहे. तसेच कागल, चंदगड हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपला मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांची 'कसोटी' लागणार आहे.

गेल्या पाच वर्षात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाले आहे. ही मंडळी भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. जर युती झाली तर त्यांची सोय कशी करायची, हे मोठे आव्हान भाजपपुढे असणार आहे. युती झाली नाही तर इच्छुकांना पाठबळ देऊन पक्षाचा ग्राफ वाढवण्यासाठी पालकमंत्र्यांना मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकांवरील राग पुतण्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा अट्टाहास धनंजय महाडिक यांना चांगलाच महागात पडला. या ठरावामुळेच ग्रामीण भागात महाडिक यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले. शिवाय 'सगळीकडे महाडिक नको' ही लोकभावना वाढली, साहजिकच यामुळे प्रा. संजय मंडलिकांचे मताधिक्य वाढले.

गेली अनेक वर्षे 'गोकुळ' वर महाडिक आणि पी.एन. पाटील यांची सत्ता आहे. या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, प्रा. मंडलिक यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये आमदार हसन मुश्रीफांची साथ मिळाली. गोकुळची निवडणूक हा गट थोडक्यात हरला. पण मल्टिस्टेटचा ठराव मंजूर झाला तरी नेत्यांच्या विरोधात हवा तयार करण्यात या गटाला यश मिळाले. गोकुळ दूध संघ सहकारी आहे, मल्टिस्टेटमुळे तो महाडिकांच्या हाती जाईल असे वातावरण या गटाने केले. शेतकरी आणि दूध उत्पादकांना देखील हा ठराव नको होता. त्यामुळे महाडिक यांच्याबाबत त्यांच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली. महाडिकांच्या समवेत खासदार महाडिकदेखील या ठराव प्रक्रियेत होते. यामुळे महादेवराव महाडिक यांच्यावरील राग मतदारांनी लोकसभा निवडणुकीत काढला. याचा ग्रामीण भागात महाडिकांना फार मोठा फटका बसला.

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच महादेवराव महाडिक यांनी लोकसभा हरल्यास गोकुळ ताब्यातून जाईल, अशी भीती व्यक्त केली. पण प्रचारात हा मल्टिस्टेचा मुद्दा विरोधकांनी फारसा आणला नाही, पण लोकांच्या मनात तो नक्की होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेवटच्या टप्प्यात मल्टिस्टेट होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यांचे ज्या पद्धतीने कौतुक झाले, त्यावरून हा मुद्दा किती महत्वाचा होता याचा पुरावा मिळाला. महाडिक यांचे संपूर्ण राजकारण 'गोकुळ' भोवती फिरते. त्यामुळे 'गोकुळ' साठी ते सर्वत्र तडजोडीचे राजकारण करत असतात. लोकसभेला पुतण्या, विधानसभेला मुलगा, जिल्हा परिषदेला सून हे त्यांचे राजकारण लोकांना आवडले नाही. सगळीकडे महाडिकच का, असा सवाल जनतेतून सुरू होता. त्यामुळे धनंजय महाडिक यांचे काम चांगले आहे, असे म्हणणाऱ्यांनी देखील 'पण महाडिक नको' असे म्हणत लोकसभेला राग काढला. यामुळेच महाडिक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images