Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

धैर्यशील माने यांच्या माध्यमातून माने

$
0
0

धैर्यशील माने यांच्या माध्यमातून माने कुटुंबीयांची तिसरी पिढी संसदेत प्रतिनिधित्व करणार आहे. माजी खासदार बाळासाहेब माने यांनी सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर श्रीमती निवेदिता माने यांनी दोन वेळा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. आजोबा आणि आईनंतर आता धैर्यशील माने लोकसभा निवडणुकीत विजयी ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादीचा पाय खोलात

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet@Appasaheb_MT

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या खासदाराचा पराभव आणि हक्काच्या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमदेवाराला मिळालेले मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती 'बुडत्याचा पाय खोलात'अशी झाली आहे. पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात राष्ट्रवादी पक्ष गटातटात विखुरला आहे. पक्षाच्या उमेदवाराच्या दारुण पराभवामुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवाय पक्षातील अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून हक्काच्या मतदारसंघात पक्ष बॅकफूटवर पोहचला.

खासदारपदाच्या कालावधीत पक्ष कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी फटकून वागण्याच्या प्रकारामुळे धनंजय महाडिकांना या निवडणुकीत फटका बसला. 'राष्ट्रवादी'च्या स्थापनेपासून अर्थात १९९९ पासून येथे पक्षाने कायम विजयाचा गुलाल उधळला. अपवाद फक्त २००९ मधील. जिल्ह्यात पक्षाची भक्कम बांधणी, कार्यकर्त्यांची फौज, जिल्ह्यातील मातब्बर राजकारणी, साखर कारखानदारांची सोबत यामुळे राष्ट्रवादी आणि कोल्हापूर असे समीकरण बनले होते. मात्र गेल्या काही वर्षात पक्षात ठराविक पदाधिकाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली. सोयीच्या राजकारणामुळे विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीतही पक्षाचे संख्याबळ घटले. पक्ष संघटन असो की स्थानिक स्वराज्य संस्था, प्रत्येक ठिकाणी मर्जीतल्या कार्यकर्त्यांना-नेत्यांच्या नातेवाईकांना संधी दिल्यामुळे सामान्य कार्यकर्ते पक्षापासून दुरावले. शिवाय पक्षातील ठराविकांच्या मक्तेदारीमुळे अनेक पदाधिकारी पक्षापासून दुरावले आहेत.

सध्या विधानसभेत राष्ट्रवादीकडून आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार संध्यादेवी कुपेकर हे प्रतिनिधित्व करतात. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार महाडिक यांना सहापैकी एकाही विधानसभा मतदारसंघात एकाही ठिकाणी आघाडी घेता आली नाही.याला महाडिकांचे राजकारण जितके कारणीभूत आहे, तितकेच पक्षातील गटबाजी, सवतासुभा कारणीभूत आहे. जिल्ह्याचे नेते आणि आमदार प्रतिनिधित्व करत असलेल्या कागलमध्ये ७० हजाराहून तर चंदगड विधानसभा मतदारसंघात ५० हजाराहून अधिक मताधिक्य विरोधी शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना मिळाले.

उर्वरित कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर, राधानगरी मतदारसंघात शिवसेनेला भरभरून मते मिळाली. राधानगरी मतदारसंघात जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आणि माजी आमदार के. पी. पाटील हे पक्षाचे दोन प्रमुख पदाधिकारी आहेत. दोघेही विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. मात्र दोघांत एकवाक्यता नव्हती. दोघेही स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबवित होते. कोल्हापूर शहरात राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक आहेत पण त्यापैकी अपवाद वगळता एकानेही महाडिक यांना मदत केली नाही. युवा पदाधिकाऱ्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. सहाही विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते हे खासदार महाडिक यांच्याशी फटकून वागत असल्याचे चित्र संबंध निवडणूक कालावधीत पाहावयास मिळाले. त्याला काही अंशी महाडिकांचे सोयीचे राजकारणही कारणीभूत ठरले. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेतील सोयीची भूमिका कारणीभूत ठरली. या साऱ्याचा फटका या निवडणुकीत बसला.

नेतेमंडळीत दुफळी, प्रचारात आक्रमकतेचा अभाव

पक्षांतर्गत गटबाजी, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा 'आमचं ठरलंय'चा फॅक्टर यामुळे राष्ट्रवादी पहिल्यापासून प्रचारात बॅकफूटवर राहिली. त्याचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसू नये म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पाच वेळा कोल्हापूर दौरा केला. आणि राष्ट्रवादीतील वातावरण ठीक करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासमोर एकत्र येणारी मंडळी त्यांच्या दौऱ्यानंतर पुन्हा पक्षाशी फटकून वागले. दुसरीकडे शिवसेना व भाजपने एकसंधपणे प्रचारावर भर दिला, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर यांनी आक्रमक प्रचारावर भर दिला. त्याला राष्ट्रवादीतील जिल्ह्यातील नेते मंडळींनी विरोधकांच्या प्रचाराला जशास तसे उत्तर देण्याची आवश्यकता होती. मात्र राष्ट्रवादीच्या नेते मंडळीत आक्रमक प्रचाराचा अभाव आढळला. मुळात राष्ट्रवादीच्या नेते मंडळीत एकवाक्यतेचा अभाव होता. प्रत्येक जण विधानसभेवर डोळा ठेवून काम करताना दिसला. राष्ट्रवादीतील मंडळी रुसवेफुगवे, गटातटात गुरफटले असताना कागल, चंदगड, राधानगरी, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील विरोधी पक्षातील नेतेमंडळींनी पायाला भिंगरी बांधल्यासारखे मतदारसंघ पिंजून काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लबाडी करणाऱ्या १०७शिक्षकांना ‘क्लीन चिट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑनलाइन बदली प्रक्रियेत सोयीच्या गावातील शाळा मिळण्यासाठी चुकीची माहिती भरून लबाडी केलेल्या ११८ पैकी १०७ शिक्षकांना क्लीन चिट, तर ११ जणांना दोषी ठरविण्यात आले. शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घेतलेल्या सुनावणीनंतर हे स्पष्ट झाले.

गेल्या वर्षी बदली प्रक्रियेवेळी १५८ शिक्षकांनी खोटी, चुकीची माहिती भरून लबाडी केल्याचे समोर आले. त्यातील ४० शिक्षकांचे खुलासे मान्य करण्यात आले होते. उर्वरित ११८ शिक्षकांना दोषी ठरवले. त्यांची तात्पुरती एक वेतनवाढ रोखली. सरकारने बदली केलेल्या ठिकाणी जाण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, यामधील अनेक शिक्षकांनी आम्हाला निकष न कळाल्याने चुकीची माहिती भरल्याचे म्हणणे सीईओ मित्तल यांच्यासमोर मांडले. कारवाई मागे घेण्यासंबंधी शिक्षक संघटना, पदाधिकाऱ्यांनी जोरदार दबावही आणला. त्यातून मित्तल यांना कारवाईवर फेरविचार करावा लागला. त्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरुवात झाली. सुनावणीत ११ शिक्षकांनी गंभीर चूक करून हव्या, त्या ठिकाणी बदलीचा फायदा घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यांची एक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा कायम ठेवण्यात येणार आहे. उर्वरित १०७ शिक्षकांना क्लीन चिट देण्यात आली. त्यांची शिक्षा मागे घेण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षक आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, यावर्षीच्या बदली प्रक्रियेत खोटी माहिती भरणाऱ्या शिक्षकांची गय गेली जाणार नाही, असे सीईओ मित्तल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

०००

दबावातूनच

११८ शिक्षकांना लेखी नोटीस देऊन म्हणणे घेत वेतनवाढ रोखण्याची शिक्षा केली होती. आता पुन्हा सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकण्याची काय गरज होती, केवळ शिक्षक संघटना आणि राजकीय दबावामुळेच काही शिक्षकांना क्लीन चिट देण्यासाठी सुनावणी घेतल्याचा आरोप आता होत आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूरज साखरे गँगविरोधात तक्रारी देण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एसएस गँग' चा म्होरक्या संशयित सूरज साखरेसह साथीदारांविरोधात नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी द्याव्यात, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. या टोळीला शिक्षा होण्यासाठी भक्कम पुराव्याचे दोषारोपपत्र पुणे विशेष मोक्का कोर्टात सादर केले जाणार आहे. त्यासाठी पिळवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी केले आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एसएस गँग'चा मुख्य म्होरक्या सूरज हणमंतराव साखरे (वय २८, रा. कश्यप हाईट अपार्टमेंट, देवकर पाणंद), त्याचा साथीदार ऋषभ सुनील भालकर (२१, रा. जनाई दत्तनगर, कळंबा रोड) व पुष्कराज मुकुंद यादव (२०, रा. शिंगणापूर, ता. करवीर) यांना २९ मे पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील संशयित अभि ऊर्फ युवराज मोहन महाडिक (रा. मंगळवार पेठ), युनूस हसन मुजावर (रा. राजारामपुरी), चालक धीरज आणि पार्थ हे पसार झाले आहेत. पोलिसांनी संशयितांच्या घरांवर छापे टाकले. त्यांनी बेकायदेशीर सावकारी करुन मिळविलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या खरेदी दस्ताच्या फाइली, बँक पासबुके जप्त केली आहेत. या संशयित सावकारांनी दहशत माजवून अनेक मिळकती मिळविल्या आहेत. अनेकांच्याकडे खंडणी मागून रोकड मिळविली आहे. त्यांनी दुप्पट, तिप्पट व्याज आकारणी ग्राहकांकडून केली आहे. मोटार वाहन गहाणवट ठेवण्यासह आदी बेकायदेशीर कृत्ये केली आहेत. या टोळीविरोधात तक्रारीसाठी पोलिस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा येथे संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माने कुटुंबींयातील तिसरी पिढी संसदेत

$
0
0

धैर्यशील माने यांच्या माध्यमातून माने कुटुंबीयांची तिसरी पिढी संसदेत प्रतिनिधित्व करणार आहे. माजी खासदार बाळासाहेब माने यांनी सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर श्रीमती निवेदिता माने यांनी दोन वेळा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. आजोबा आणि आईनंतर आता धैर्यशील माने लोकसभा निवडणुकीत विजयी ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेतही ‘मल्टिस्टेट’ गाजणार

$
0
0

कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवात 'मल्टिस्टेट' चा मुद्दा प्रभाव ठरला असून मल्टिस्टेटचे भूत विधानसभा निवडणुकीतही इच्छुक उमेदवारांच्या मानगुटीवर बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील पाच वर्षाच्या जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) केंद्रस्थानी राहिला आहे. महाडिक गटाची ताकद 'गोकुळ'मध्ये असल्याने आमदार सतेज पाटील यांनी २०१५ च्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी संचालकांविरोधात कडवी लढत दिली होती. गोकुळच्या ऑडिट रिपोर्टमधील त्रुटीवरुन त्यांनी रान पेटवले. गोकुळने गाय दूध दरात कपात केल्यानंतर आमदार पाटील यांनी गोकुळवर मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांनीही मोर्चा काढला होता. महाडिक यांनी दूध दर कपातीचे समर्थन केल्याने ग्रामीण भागातील शेतकरी दुखावला गेला.

गोकुळवर आपले वर्चस्व रहावे यासाठी महाडिक गटाने गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा ठराव संचालक मंडळाच्या सभेत मांडला. या निर्णयाला आमदार पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांनी विरोध केला. गोकुळचे नेते माजी आमदार महाडिक , पी.एन. पाटील यांनी मल्टिस्टेटचे समर्थन केले. मल्टिस्टेटमुळे जिल्हा दूध संघाचे अस्तित्वच नष्ट होणार हा प्रचार जिल्ह्याच्या घराघरात पोचला. गोकुळच्या सर्वसाधारण सभेत या ठरावावरुन सत्ताधारी आणि विरोधकांत राडा झाला. लोकसभेच्या निवडणूकीत मल्टिस्टेट हा प्रचाराच्या अजेंड्यावर राहिला.

लोकसभा निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या पराभवात मल्टिस्टेट हे महत्वाचे कारण ठरले आहे. महाडिक यांच्या प्रचाराची सारी सुत्रे गोकुळचे बहुतांशी संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे होती. संचालकांची जनमानसातील प्रतिमा नकारार्थी असल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसला. महाडिक यांच्या प्रचारार्थ गोकुळचे १४ संचालक कार्यरत होते. बहुतांशी संचालकांच्या कार्यक्षेत्रातील गावात महाडिक यांना मताधिक्य मिळू शकले नाही. वीस ते तीस वर्ष संचालक असलेल्या संचालकांकडे वाहने, त्यांनी नोकरी लावलेल्या कर्मचाऱ्यांचा ताफा असतानाही मताधिक्य न मिळाल्याने संचालक मंडळ नेत्यांच्या रडारवर आले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत गोकुळचे नेते पी.एन. पाटील, महादेवराव महाडिक यांचे चिरंजीव आमदार अमल महाडिक हे उमेदवार असणार आहेत. त्यांचे विरोधक आमदार चंद्रदीप नरके, सतेज पाटील यांच्या अजेंड्यावर मल्टिस्टेटचा मुद्दा राहणार आहे. संचालक अनुराधा पाटील यांचे चिरंजीव आमदार सत्यजित पाटील शाहूवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अंबरिश घाटगे यांचे वडील संजय घाटगे अथवा स्वत: अंबरिश घाटगे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांनीही राधानगरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. संचालक धैर्यशील देसाई यांचे बंधू राहुल देसाई, दीपक पाटील यांचे वडील माजी आमदार भरमू सुबराव पाटील, संचालक राजेश पाटील निवडणूक लढण्याची शक्यता आहे. गोकुळशी संबंधित नेते, संचालक, त्यांचे नातेवाईक निवडणूक लढणार असल्याने त्यांचे विरोधक निवडणुकीत मल्टिस्टेटचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

.........

दूधदर कपातीचा फटका

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत गोकुळने गाय खरेदी दूध दरात दोन रुपयांनी कपात केली. त्यामुळे दूध उत्पादकांतील असंतोषाचा फटका महाडिक यांना बसला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले असतानाही पेट्रोल व डिझेल दर वाढ होऊ नये याची काळजी सत्ताधारी पक्ष घेतात. पण अशी काळजी गोकुळच्या नेत्यांनी दूध दरात कपात करताना घेतली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरांत अपुरा पाणीपुरवठा

$
0
0

महापालिका लोगो

लोगो : स्थायी समिती सभा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अमृत योजनेंतर्गत पाइपलाइन टाकताना नवी पाइपलाइन जुन्या पाइपलाइनला जोडली जात आहे. त्यामुळे पाइप भरण्यास विलंब होत असल्याने उपनगरांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी पाइपलाइनचे काम बंद ठेवून प्रथम टाक्यांच्या कामाला सुरुवात करा,' अशी सूचना सभापती शारंगधर देशमुख व सदस्या दीपा मगदूम यांनी मांडली.

अमृत योजनेतील कामावर कोणाचे नियंत्रण आहे? असा प्रश्न उपस्थित करत सभापती देशमुख म्हणाले, 'जुन्या पाइपलाइनवर नवीन पाइपलाइन जोडली जात आहे. अनेक भागात पाइपलाइन जोडल्याने अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अशी समस्या उद्भवू नये, यासाठी पाइपलाइनचे काम बंद ठेवून टाक्यांची उभारणी करावी. अमृतमधील डीपीआर काळम्मावाडी योजना पूर्ण झाल्यानंतर पूर्णक्षमतेने कार्यान्वित होईल, पण योजना पूर्ण होण्यापूर्वी पाइपलाइन जोडल्यास शहरात पाणीटंचाई निर्माण होईल. २० प्रभागांसाठी एक अभियंता द्यावा.'

'जुनी पाइपलाइन खराब झाली असल्याने नवीन टाकली जात आहे. संपूर्ण लाइन टाकल्यानंतर जुनी पाइपलाइन बंद केली जाईल. परिणामी अपुऱ्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही. तसेच ठेकेदाराचे काम समाधानकारक नसल्याने दंडात्मक कारवाई केली आहे. खोदकाम पूर्ण करून रिस्टोलेशन करूनच ठेकेदाराला बिल दिले जाईल,' असा खुलासा प्रशासनाने केला.

दीपा मगदूम यांनी 'उपनगरांमध्ये नालेसफाई झालेली नाही. प्रभागातील कामांसाठी जेसीबी व डंपरची मागणी केल्यास ते मिळत नसून आरोग्य निरीक्षक स्वप्निल उलपे उर्मट बोलतात. तसेच आपटेनगर टाकीवर झाकण्यासाठी पाच लाखांची ताडपत्री घेतली का?' अशी विचारणा केली. 'आपटेनगर पाण्याच्या टाकीचा स्लॅब कमकुवत असल्याने कर्मचाऱ्यांकडून काम करणे शक्य नव्हते. त्यासाठी जादा दराची निविदा आली. निविदेतील दराप्रमाणेच काम केले आहे. तसेच प्रत्येक प्रभागात आठवड्यातून एक दिवस जेसीबी दिला जातो. एक दिवस जेसीबी न दिल्यास संबंधितावर कारवाई करू,' असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. माधुरी लाड यांनी कसबा बावडा येथील पाण्याच्या टाकीचे काम केव्हा पूर्ण होणार? अशी विचारणा केली. कसबा बावडा पाण्याच्या टाकीचे काम वीस दिवसांत पूर्ण होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

००००

स्थायी समितीमधील मंजूर विषय

२०१० पर्यंत निवृत्त कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती करणे

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील शेडचे काम करणे

अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांसाठी कॅशलेस विमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा कोटींच्या कामासाठी १४ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या १० कोटींच्या कामासाठी महापालिका प्रशासनाला १४ कोटी मोजावे लागणार आहेत. नव्या दरपत्रकानुसार १.३ टक्के दराने शुक्रवारी निर्माण कन्ट्रक्शनची निविदा मंजूर केली. पण पूर्वीच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम खर्च होणार आहे.

दहा वर्षांपूर्वी तुळजाभवानीनगर ते साळोखेनगर, लक्षतीर्थ वसाहत, बीडी कामगार वसाहत ते फुलेवाडी, कळंबा रिंगरोड, राजोपाध्येनगर ते डायना पार्क रस्त्याची निविदा मंजूर होऊन मुंबई येथील व्हीयूबी कंपनीला रस्त्याचे काम दिले. पण कंपनी सातत्याने काम करण्यास विलंब लावला. शेवटी कंपनीकडून काम काढून घेण्यात आले. दहा वर्षांपूर्वी आणि दहा कोटींचे काम निर्माण कन्ट्रक्शनला देण्यात आले. मात्र, या कामासाठी अन्य निविदा नसल्याने कंपनीला नव्या डीएसआर दरपत्रकाप्रमाणे १.३ टक्के दराची निविदा मंजूर केली. त्यामुळे दहा कोटींच्या कामाला १४ कोटींचा खर्च होणार असून महापालिकेला चार कोटींचा अधिक बुर्दंड बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उजनीतील पाणीसाठा वजा पन्नास टक्क्यांवर

$
0
0

सोलापूरः

उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने खलावला असून, प्रकल्पाची पातळी वजा पन्नास टक्के झाली आहे. मृतसाठ्यातील जवळपास २७ टीएमसीहून अधिक पाणी संपले आहे. सध्या धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.

उजनी धरण २०१८च्या पावसाळा हंगामात क्षमतेने म्हणजे १११ टक्के भरले होते. मात्र, पावसाने सोलापूर जिल्ह्यात हात आखडता घेतल्याने ऑगस्ट महिन्यापासूनच सिंचन व पिण्यासाठी पाणी सोडावे लागत होते. यामुळे उजनीची अवस्था उन्हाळा येता येता बिकट झाली. मागील महिन्यापासून धरण वजा पातळीत आले आहे. यातच आता सोलापूरसह भीमा काठच्या गावांसाठी धरणातून पाणी सोडले जात असल्याने मागील धरण जवळपास दहा टक्के खालावले आहे. शुक्रवारी सकाळी उजनी वजा ४८.८१ टक्के होती, तर सायंकाळपर्यंत ती वजा ४९.५० टक्के झाली. आता या प्रकल्पातील पाणीसाठा वजा पन्नास टक्के झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.ला दिल्ली जवळ

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : महापालिका आणि जिल्हा परिषद या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था. थेट नागरिकांशी निगडीत. दरम्यान थेट ग्रामीण भागाशी निगडीत राजकारण करत जिल्हा परिषद ते खासदार, आमदारकीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या सदस्यांची संख्या मोठी आहे. याउलट महापालिकेतील नगरसेवकांना मात्र मुंबई आणि दिल्लीच्या राजकारणापासून लांबच आहेत. गेल्या पाच दशकाच्या कालावधीत जिल्हा परिषदेचे पाच सदस्य खासदार तर ११ जण आमदार बनले. याउलट माजी आमदार दिलीप देसाई वगळता महापालिकेचा एकही नगरसेवक आमदार होऊ शकला नाही.

माजी महापौर रामभाऊ फाळके यांनी १९९१ मध्ये शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र ते दिल्लीत पोहचू शकले नाहीत. दुसरीकडे खासदार प्रा. संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाने जिल्हा परिषदेतील सदस्यांचा 'मिनी मंत्रालय'ते 'संसद' हा प्रवास पुन्हा अधोरेखित झाला. ग्रामीण भागावर पकड ठेवून राजकारणाची सूत्रे हलवित असताना आतापर्यंत जि.प.तील पाच सदस्यांनी संसद गाठली.

माजी खासदार बाळासाहेब माने हे पहिले जि. प. सदस्य जे खासदार बनले. ३० ऑक्टोबर ते १५ फेब्रुवारी, १७७७ या कालावधीत जि.प.अध्यक्ष होते. १९८० पासून सलग पाचवेळा खासदार म्हणून निवडून येत मतदारसंघात वर्चस्व राखले होते. जिल्ह्याच्या राजकारणावरही पकड ठेवली. आता त्यांचे नातू धैर्यशील माने संसदेत पोहचले. ते २००७ ते २०१२ या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य होते. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा राजकीय आलेख हा जिल्हा परिषद पुढे आमदार, राज्यमंत्री आणि लोकसभेवर चार वेळा प्रतिनिधित्व असा उंचावला. त्यांचे पुत्र प्रा. संजय मंडलिक यांनी २१ मार्च २०१२ ते १२ मार्च २०१४ या कालावधीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा राजकीय प्रवास हा संघर्षाचा. जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम करताना आमदार म्हणून निवडून आले, आमदारकीची टर्म संपण्याअगोदर २००९ मध्ये खासदार बनले. त्यांच्या व्यतिरिक्त जि. प. सदस्य ते आमदारकी हा राजकीय प्रवास ग्रामीण भागातील अनेक मंडळींनी केला. यामध्ये जि. प. चे माजी अध्यक्ष दिनकरराव यादव, बाबासाहेब पाटील-सरुडकर, बाबासाहेब कुपेकर, यशवंत एकनाथ पाटील, नामदेवराव भोईटे, हसन मुश्रीफ, सत्यजित पाटील-सरुडकर, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक यांचा समावेश आहे. यांच्यापैकी अनेकांनी जि. प. त विविध पदे भूषविली आहेत.

महापालिकेतील एकमेव सदस्य आमदार

महापालिका ही शहर मर्यादित. मतदारसंघही लहान आहेत. शहरी भागाचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवकांची झेप मात्र मंत्रालय आणि संसदेपर्यंत पोहचली नाही. अपवाद फक्त माजी आमदार दिलीप देसाई यांचा. देसाई हे १९७८ ते १९८४ या कालावधीत महापालिकेत नगरसेवक होते. ते १९९० मध्ये शिवसेनेकडून आमदार झाले. माजी महापौर आर. के. पोवार, महादेवराव आडगुळे, ताराराणी आघाडीचे गटनेते व नगरसेवक सत्यजित कदम यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र त्यांना यश मिळाले नाही. माजी महापौर रामभाऊ फाळके यांनी १९९१ मध्ये शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांना ७५,१७७ इतकी मते मिळाली. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही नगरसेवकाला खासदारकीची निवडणूक लढविण्याची संधीही मिळाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणक्षेत्रातील कामे तातडीने पूर्ण करा; आयुक्तांच्या सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेतून त्वरित पाणीपुरवठा होण्यासाठी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी सातत्याने प्रयत्न करत आहेत. कामाचा आढावा दर आठवड्याला घेत असून, शनिवारी त्यांनी धरणक्षेत्रातील पाहणी केली. यावेळी धरणक्षेत्रातील कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली. दरम्यान, तत्पूर्वी दुधाळी एसटीपी व शूटिंग रेंज, आयसोलेशन हॉस्पिटलची पाहणी केली.

पावसाळ्यापूर्वी जॅकवेल, इंटकवेल व दोन इन्स्पेक्शन वेलचे काम करण्याचे आव्हान आहे. कामाचा वेग वाढविला असला तरी जॅकवेलचे अद्याप राफ्ट टाकण्याचे काम सुरू आहे. इंटकवेलच्या कामाचीही अशीच स्थिती आहे. काम युद्धपातळीवर होण्यासाठी आयुक्त सातत्याने योजनेला भेट देत आहेत. पावसाळा सुरू होऊन धरणक्षेत्रात पाणी येईपर्यंत मिळणारा कालावधी २० ते २५ दिवसांचा आहे. या कालावधीत धरणक्षेत्रातील कामे तातडी पूर्ण करा. त्यासाठी आवश्यक मशिनरी व मनुष्यबळ वाढविण्याची सूचना जेकेसी कंपनीचे प्रोजेक्ट इन्चार्ज राजेंद्र माळी यांना दिल्या. धरणक्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या जॅकवेलमध्ये राफ्ट टाकण्यासाठी स्टील बांधणीचे काम सुरू आहे. राफ्ट जोडण्याचे काम निम्म्याहून जास्त झाले. त्याचबरोबर दोन वर्षांपूर्वी इंटेक वेलसाठी दोन ते तीन मीटरची खोदाई करण्यात आली होती. इंटेकवेलमधील साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू आहे. पण पावसाळ्यापूर्वी जॅकवेल व इंटकवेलचे काम धरणपाणीपातळीच्या वर आणण्याचे नियोजन करा, अशीही सूचना केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, युनिटी कन्सल्टंटचे आर. एम. हासबे, उपजल अभियंता बी. एम. कुंभार उपस्थित होते.

दरम्यान, सकाळी दुधाळी १७ एमएलडी एसटीपी प्लांट केंद्राची पाहणी केली. सांडपाण्यावर योग्यरितीने प्रक्रिया करण्याची सूचना केली. त्यानंतर दुधाळी उद्यान, शूटिंगरेंज, बॅडमिंटन हॉल व व्यायमशाळेची पाहणी केली. तसेच आयसोलेशन हॉस्पिटलची पाहणी करुन तेथील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला. रविवारी (ता.२६) शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जयंती नाला परिसराची पाहणी केली. तसेच अंबाबाई मंदिरलाही भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रवी इंगवले पद्माराजे प्रभागातून उतरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांना अपात्र ठरविल्यामुळे सिद्धार्थनगर व पद्माराजे उद्यान प्रभागातील पोटनिवडणूक जाहीर झाली. पोटनिवडणुकीसाठी प्रभागातील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पद्माराजे उद्यान प्रभागातून शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

दोन्ही प्रभागांतील पोटनिवडणूक २३ जूनला होणार आहे. त्यासाठी गुरुवार (ता. ३०) पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी दोन्ही प्रभागांतील इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. पद्माराजे उद्यान प्रभागातून स्वत: इंगवले शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर सेनेचे गतवेळच्या निवडणुकीतील उमेदवार महेश चौगले व सुजित चव्हाण यांचीही नावे चर्चेत आहेत. सेनेकडून इच्छुकांची संख्या जास्त असताना राष्ट्रवादीकडूनही माजी नगरसेवक अजित राऊत निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीकडून कोराणे कुटुंबीयही इच्छुक आहे. २०१५ च्या निवडणुकीत ताराराणी आघाडीकडून निवडणूक लढविलेले माजी उपमहापौर विक्रम जरग यावेळी काँग्रेसकडून रिंगणात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्वप्निल पाटोळे, शेखर पोवार यांचीही नावे चर्चेत आली आहेत.

सिद्धार्थनगर प्रभागातून मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला तगड्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल. इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या प्रभागात शिवसेनेकडून तेजस्विनी घोरपडे, धनंजय सावंत व सुशील भांदिगरे यांनी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर लाईक पिरजादे, नेपोलियन सोनुले, विलास केसरकर व उमेश काशीद यांच्या नावाची चर्चाही सुरू आहे. सभागृहाचा कालावधी दीड वर्ष शिल्लक आहे. आचारसंहितेमुळे नव्या नगरसेवकांना जेमतेम वर्ष ते सव्वा वर्षाचा कालावधी मिळणार असला, तरी पोटनिवडणुकीत प्रचंड ईर्षा दिसते.

००००

भाजप-ताराराणीबाबत औत्सुक्य

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना व ताराराणी आघाडी स्वतंत्रपणे लढले होते. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी तर भाजप-ताराराणी आघाडीमध्ये छुपी युती होती. निवडून येण्याची खात्री असलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे छुप्या पद्धतीने ताकद लावत सर्वच पक्षांनी संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न केला. सद्य:स्थितीत सभागृहातील बहुमत राखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढू शकतात, पण लोकसभा निवडणुकीत वितुष्ट आल्यामुळे भाजप-ताराराणी आघाडी पोटनिवडणुकीला एकत्र सामोरे जाईल का? हा औत्सुक्याचा विषय ठरेल.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने रविवारी (ता

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने रविवारी (ता.२६) सकाळी सात ते नऊ या वेळेत महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. जयंती नाला पंपिंग हाउस ते गाडीअड्डा, रिलायन्स मॉलच्य पिछाडीस, ओढ्यावरील गणपती मंदिर, बुद्ध गार्डन ते अॅस्टर आधार हॉस्पिटल परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. मे महिन्यापासून दर रविवारी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मोहिमेत सामाजिक संस्था, तरुण मंडळे, सेवाभावी संस्था व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३१ मेपर्यंत अहवाल द्या; राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील दारूण पराभवाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कारणमीमांसा सुरू झाली आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा शाखेला पत्र पाठवून ३१ मेपर्यंत निवडणुकीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्या मतदारसंघात मताधिक्य कमी मिळाले, त्यामागील कारणे संबंधित पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहेत. पक्षाने दोन्ही मतदारसंघांतील पराभव गांभीर्याने घेत बूथनिहाय डाटा सादर करावा, असा आदेशच दिला आहे.

प्रदेश राष्ट्रवादीच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील अध्यक्षस्थानी होते. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. दोन्ही ठिकाणच्या पराभवामुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शनिवारी ताराबाई पार्क येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत त्याचे किरकोळ पडसादही उमटले.

बैठकीच्या प्रारंभी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी अहवाल पाठविण्यासंदर्भात प्रदेशकडून मिळालेल्या पत्राची माहिती दिली. जिल्हा कार्यालय, तालुकाध्यक्ष, विधानसभा मतदारसंघ, नगरपालिका क्षेत्र अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील माहिती द्यावयाची असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मते, विरोधी उमेदवारांनी घेतलेली मते, विरोधकांनी आघाडी घेतली असल्यास त्यामागील कारणेही अहवालात नमूद करावयाची आहेत.

पक्षाच्या आदेशानुसार २९ मेपर्यंत जिल्हा कार्यालयाकडे संबंधितांनी अहवाल सादर करायचा आहे. संपूर्ण जिल्ह्यातील अहवाल मिळाल्यानंतर पक्षाचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, अनिल साळोखे, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांची संयुक्त बैठक होईल. त्यामध्ये पराभवाची कारणमीमांसा, जिल्ह्यातील अहवालावर चर्चा होऊन जिल्हा कार्यालयातर्फे प्रदेशकडे निवडणुकीचा अहवाल दिला जाईल. - ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अहवालावरून ठरणार पात्रता

कार्याध्यक्ष अनिल साळोखे हे प्रदेशच्या पत्राबाबत सांगताना के. पी. पाटील म्हणाले, 'बहुतांश ठिकाणची बूथनिहाय आकडेवारी अजून मिळालेली नाही. तेव्हा अहवालात काय लिहायचे ते नेमके सांगा.' दरम्यान, बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांत कुजबूज वाढली. तेव्हा कार्याध्यक्ष साळोखे उपस्थितांना उद्देशून म्हणाले, 'बूथनिहाय अहवाल द्यावयाचा आहे. विरोधी उमेदवाराला जादा मते मिळाली असल्यास त्याची कारणे नमूद करायची आहेत. ते पाहून पक्षनेतृत्व, तुम्ही त्या पदासाठी पात्र आहात की नाही हे ठरविणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळकडून गाय दूध खरेदीत दोन रुपये वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केल्याची घोषणा अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी शनिवारी केली. खरेदी दरात वाढ झाल्याने विक्री दरातही दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अमूल, मदर डेअरीने नुकतीच विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे.

गोकुळने शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत गाय दूध खरेदी दरामध्ये दोन रुपये वाढ केली आहे. ही दरवाढ २१ मेपासून दिली जाणार आहे. त्यामुळे तीन जूनच्या बिलात दूध उत्पादकांच्या खात्यात वाढ होणार आहे. ही दरवाढ ३.५ फॅट व ८.५ एसएनएफकरिता होणार आहे.

मार्च महिन्यात गोकुळने गाय खरेदी दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी कपात केल्याने दुधाचा दर २५ रुपयांवरून २३ रुपयांवर खाली आला होता. त्यामुळे दूध उत्पादकांतून तीव्र पडसाद उमटले होते. दूध दर कपातीचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले.

लोकसभेचे मतदान झाल्यानंतर गोकुळने कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने पशुखाद्याच्या दरात प्रतिपोत्यामागे १०० रुपयांनी वाढ झाल्याने दूध उत्पादकांकडून टीका सुरू झाली. शिवसेनेनेही गोकुळवर म्हशींसह मोर्चा काढून पशुखाद्याचे दर कमी करावे व गाय दूध दरात वाढ करावी, अशी मागणी केली होती. दूध उत्पादकांत निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन गोकुळने दोन रुपयांनी वाढ केल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी नेत्यांकडून डिझास्टर मॅनेजमेंट सुरू झाल्याचा सूर उमटू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपच्या 'त्या' १५ पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केल्याबद्दल भाजपकडून १५ पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. बहुतांशी पदाधिकारी हे भाजपचे आमदार अमल महाडिक यांचे समर्थक असल्याने खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा खासदार व्हावा, यासाठी भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात आला. पण राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक हे आमदार महाडिक यांचे चुलत बंधू असल्याने भाजपचे अनेक कायकर्ते थेट राष्ट्रवादीच्या प्रचारात उतरले होते. निवडणूक प्रचार कालावधीत पक्षाने सतीश पाटील-धरणपणकर, फुलेवाडीचे राजू मोरे, रणजित जाधव, शिवप्रसाद घोडके, जयराज निंबाळकर यांना पक्षविरोधी काम केल्याबद्दल नोटीस पाठवली होती. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपचे सात ते आठ पदाधिकारी आणि नगरसेवकांनीही राष्ट्रवादीचा प्रचार केला.

मतदानानंतर मुंबईत झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत पक्षविरोधी काम केलेल्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पक्षाने दिले आहे. त्यानंतर १५ पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. पदाधिकाऱ्यांनंतर नगरसेवकांनाही नोटीस पाठवण्याचे संकेत प्रदेश कार्यकारिणीकडून मिळत आहेत. दरम्यान पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पक्षाने चार सदस्यांची नियुक्ती केली आहे. या समितीत एका वकिलांसह तीन सदस्य आहेत. खुलाशानंतर पक्ष कारवाई करणार आहे.

दरम्यान भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी दक्षिणेत पक्षाचे कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी मागितली असता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असा निरोप त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे पालकमंत्री आमदार पाटील त्यांच्याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महास्वच्छता अभियान आज

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने रविवारी (ता.२६) सकाळी सात ते नऊ या वेळेत महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. जयंती नाला पंपिंग हाउस ते गाडीअड्डा, रिलायन्स मॉलच्य पिछाडीस, ओढ्यावरील गणपती मंदिर, बुद्ध गार्डन ते अॅस्टर आधार हॉस्पिटल परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. मे महिन्यापासून दर रविवारी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मोहिमेत सामाजिक संस्था, तरुण मंडळे, सेवाभावी संस्था व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिक, मुश्रीफांची बैठकीला दांडी

$
0
0

फोटो....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी आयोजित केलेल्या बैठकीकडे आमदार हसन मुश्रीफ आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पाठ फिरवली. या दोघांच्या अनुपस्थित झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी, 'कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निकाल हा विश्वास न बसणारा आहे. पक्षाचा पराभव कशामुळे झाला याचा शोध घेऊ, त्रुटी दुरुस्त करून विधानसभा ताकदीने लढवू,' असेही सांगितले.

पक्षाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवर पराभवाचे सावट स्पष्टपणे जाणवत होते. मुश्रीफ व महाडिक यांच्या उपस्थितीत पराभवाची कारणमीमांसा होईल अशी शक्यता होती. मात्र, तेच बैठकीला आले नसल्यामुळे बैठक अवघ्या अर्ध्या तासात आटोपती घेतली. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, 'एकतर्फी निकालामुळे संपूर्ण देशभर निवडणुकीवर विश्वास राहिला नसल्यासारखे वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या कोल्हापुरातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे. पराभवाविषयी चिंतन करू, कारणांचा शोध घेऊ. लोकसभेच्या निकालामुळे नेत्यांना बोध घ्यावाच लागेल. यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सावरेल. विधानसभेला लोकसभेच्या उलटी परिस्थिती होऊ शकते. विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे लढतील.'

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड म्हणाले, 'हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फटका बसला. जातीचा फॅक्टर आमच्याकडे चालला नाही. कोल्हापूर मतदारसंघात तर भूकंपच झाला. दोन्ही मतदारसंघांतील पराभव धक्कादायक आहे, त्यातून सावरायला काही दिवस लागतील.'

बैठकीला आमदार संध्यादेवी कुपेकर, व्ही. बी. पाटील, बाबूराव हजारे, तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, मुकुंद देसाई, मधुकर जांभळे, प्रा. किसन चौगले, नेताजी पाटील, आप्पासाहेब धनवडे, जि.प. सदस्य सतीश पाटील, विनय पाटील, बाजार समितीचे संचालक नेताजी पाटील, आदी उपस्थित होते. बाळासाहेब देशमुख यांनी आभार मानले.

००००

००००

जयकुमार शिंदेंनी डागली तोफ

बैठकीत पक्षाचे कार्यकर्ते जयकुमार शिंदे म्हणाले, 'आजच्या बैठकीत निवडणुकीतील पराभवाची चर्चा होणे अत्यावश्यक होते. पराभवाला पक्षातील काही मंडळी कारणीभूत आहेत, त्यांनी प्रामाणिकपणे पक्ष कार्य केले नाही. काँग्रेसने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली नाही. महाडिकांच्या विरोधात शहरातूनच सुरुंग लागला. प्रचारात एकही नगरसेवक फिरकला नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या जिवावर मोठे झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षासाठी किती योगदान दिले? त्यांचा पक्षाला कितपत फायदा झाला?' यावर पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणाने काम केले, चुकीची वक्तव्ये करू नका, असे सांगत शिंदे यांना जिल्हाध्यक्षांनी शांत राहण्याच्या सूचना केल्या.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती पदाधिकाऱ्यांनी लढविली खिंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या विजयात तरुण पदाधिकाऱ्यांचा विजयात मोठा वाटा होता. तर आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्येष्ठांचा भरणा असल्याने युतीचे पदाधिकारी निवडणुकीत भारी पडल्याची चित्र स्पष्ट झाले.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा खासदार निवडून आणायचा अशी जिद्द भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली होती. दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये काही वेळा टोकाचे विरोध होऊन पक्षशिस्त पाळत युतीचा प्रचार केला. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील हे तरुण आमदार आहेत. शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनीही चांगली तडफ दाखवली. शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, ऋतुराज क्षीरसागर, वीरेंद्र मंडलिक, जिल्हा परिषद शिक्षण सभापती अमरिश घाटगे, सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर यांच्यासह बहुतांशी पदाधिकारी तरुण असल्याने त्यांनी तडफ दाखविली. भाजपमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, सरचिटणीस विजय जाधव, राहुल चिकोडे, अशोक देसाई, या तरुण कार्यकर्त्यांनी खिंड लढविली. भाजपच्या प्रत्येक बूथमध्ये वीसहून अधिक तरुण कार्यकर्ते आहेत. या सर्वांचा फायदा लोकसभा निवडणुकीत महायुतीला झाला.

एकीकडे भाजप शिवसेनेकडे तरुण तडफदार पदाधिकाऱ्यांचा समावेश असताना राष्ट्रवादी, काँग्रेसकडे तरुणांची वानवा जाणवत होती. दोन्ही पक्षात प्रचारासाठी सूर जुळला नव्हता. आघाडीचे बहुतांशी पदाधिकारी ज्येष्ठ असल्याने त्यांच्याकडून प्रचार करण्यात मर्यादा आल्या. राष्टवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी तरुण कार्यकर्त्यांमध्ये जोश आणण्याचा प्रयत्न केला. पण महायुतीच्या प्रचारापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. राष्ट्रवादीकडून अदिल फरास हे एकमेव तरुण पदाधिकारी प्रचारात दिसले. काँग्रेसच्या ज्या गटाकडे तरुणांचा भरणा होता तो गट शिवसेनेच्या प्रचारात होता. पी. एन. पाटील गटाचे करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, उदय पाटील, कुर्डूचे सरपंच संदीप पाटील, दत्तात्रय मेडशिंगे यांच्याकडे प्रचाराची धुरा होती. पण नरके यांच्या तरुण कार्यकर्त्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर, उस्मानाबादजिल्हा झाला भगवा

$
0
0

सोलापूर, उस्मानाबाद

जिल्हा झाला भगवा

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर जिल्हा तीन लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. सोलापूर, माढा व उस्मानाबादमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे. सोलापूरमधून अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. माढा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपने सुरूंग लावत येथे पहिल्यांदाच कमळ फुलविले आहे. बार्शी विधानसभा क्षेत्र जोडलेला मराठवाड्यातील सेनेचा उस्मानाबादचा गड शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी राखला आहे.

सोलापूर जिल्हा परंपरागत काँग्रेसचा मानला जात होता. तेथे आता लोकसभेच्या सर्व जागा भाजप व शिवसेनेच्या हाती आहेत. सोलापूर व उस्मानाबाद या दोन्ही जागा मागील निवडणुकीत महायुतीकडेच होत्या, यंदा यात माढ्याची भर पडली आहे. राष्ट्रवादीचा गड असणाऱ्या माढ्यात ज्याचे नेतृत्व पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे, तेथे यंदा भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना येथे यश मिळाले आहे. माढ्याला सातारा जिल्ह्याचा माण व फलटण हे विधानसभा मतदारसंघ जोडले आहेत. निंबाळकर फलटणचे आहेत. या निमित्ताने सातारा भागाला माढ्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून लिंगायत मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी विजयी झाले आहेत. त्यांनी देशाचे माजी गृहमंत्री व काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला आहे. सलग दुसऱ्यांदा शिंदे येथून पराभूत झाले आहेत. त्यांनी यंदा आपली ही शेवटची निवडणूक असल्याची भावनिक साद घातली होती. मात्र, मतदारांनी भाजपच्या पारड्यातच मतदान टाकले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा क्षेत्र जोडलेल्या उस्मानाबाद लोकसभेत शिवसेनेने यंदा उमेदवार बदलला होता व ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. हा निर्णय योग्य असल्याचे मतमोजणीनंतर सिद्ध झाले आहे. त्यांनी येथून राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह यांचा पराभव केला आहे. सोलापूर, माढा व उस्माबाद या तीन ही लोकसभा मतदारसंघात महायुतीने उमेदवार बदलले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images