Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

इतिहासाला मिळाला उजाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागतिक वस्तूसंग्रहालय दिनानिमित्त शनिवारी शालेय मुलांना न्यू पॅलेस आणि म्युझियमधील ऐतिहासिक वास्तू पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून सुरू झालेल्या लढाया आणि कोल्हापूरची स्वतंत्र गादी या ऐतिहासिक घटनाक्रमाला यानिमित्ताने उजाळा मिळाला. शाही मराठा संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पर्यटकांनीही चांगली गर्दी केली होती.

श्रीमंत शाहू छत्रपती यांचे निवासस्थान असलेले आणि वस्तू संग्रहालयाचा समावेश असलेल्या न्यू पॅलेसची उभारणी अहिल्यादेवी महाराणी यांच्या देखरेखेखाली झाली. सुमारे सात वर्षे न्यू पॅलेसची उभारणी सुरू होती. न्यू पॅलेसमधील वस्तू संग्रहालयामध्ये अनेक ऐतिहासिक वस्तूंचा खजिना आहे. संग्राहालयाला दररोज हजारो पर्यटक तसेच शालेय विद्यार्थी भेट देवून इतिहासाची उजळणी करतात. संग्रहालयामध्ये मौल्यवान ऐतिहासिक वस्तू, राजचिन्हे, दागिने, चांदीची अंबारी व हौदा, जुन्या शस्रास्रांमध्ये तलवारी, बंदूका, हत्ती व घोड्यांचे दागिने, वैशिष्टपूर्ण फर्निचर, छत्रपती घराण्याचा वंशपरंपरागत पाळणा, शाहू महाराजांच्या वापरातील वस्तू, राजघराण्यांच्या वंशावळी, छत्रपतींच्या जीवनावरील मौल्यवान ऐतिहासिक पेंटींग्ज, प्रिन्स ऑफ वेल्सची तलवार, साठमारीची हत्यारे, कलाकुसरीच्या वस्तू असे अनेक मौल्यवान वस्तूंचा यामध्ये समावेश आहे.

संग्रहालयातील हा ऐतिहासिक दस्ताऐवज शालेय विद्यार्थ्यांना पाहता आला. शाही मराठा संघटनेचे प्रमुख रविराज निंबाळकर यांनी त्याबाबतची माहिती दिली. पन्हाळा गडावरुन जुन्या राजवाड्यामध्ये मराठा गादीची स्थापना केली. त्यानंतर न्यू पॅलेसमधून मराठा साम्राज्याचा कारभार सुरू होता. अनेक ऐतिहसिक घटनांचा पट निंबाळकर यांनी मुलांसोबत उलगडला. त्यानंतर त्यांनी न्यू पॅलेस पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनाही जागतिक वस्तूसंग्रहालय दिनानिमित्त न्यू पॅलेसची सफर घडवून आणली. यावेळी मधुरीमाराजे छत्रपती, फत्तेसिंह निंबाळकर, आदित्य निंबाळकर, समरजित निंबाळकर, विश्वजीत घाडगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महोत्सवामुळे राधानगरीचे पर्यटन बहरेल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

'राधानगरी पर्यटन महोत्सवामुळे राधानगरीसह कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनास वेगळी दिशा मिळतेय. त्यामुळे पर्यटकांत वाढ होऊन स्थानिक लोक पर्यटनास उद्योग म्हणून स्वीकारतील' असा विश्वास श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केला. राधानगरी येथे राधानगरी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

राधानगरी पर्यटन महोत्सवाचे उदघाटन शाहू महाराज छत्रपती आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पाणी पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आले. श्रीमंत शाहू छत्रपती यांनी राधानगरी शहराच्या स्थापनेचा इतिहास सांगून राधानगरीच्या पर्यटन वृद्धीची संकल्पना स्पष्ट केली.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, 'जे आपल्याकडे आहे, त्याची योग्य पध्दतीने मांडणी करून लोकांना पर्यटनासाठी आकर्षित करण्याची गरज आहे. राधानगरी पर्यटनाचा उत्सव संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा व्हावा अशी अपेक्षा आहे.'

पर्यटन महोत्सवाचे संकल्पक आणि संयोजक अभिजित तायशेट्ये म्हणाले, 'अलमटी धरणावर ज्याप्रमाणे पर्यटनाच्या सुविधा झाल्या आहेत, त्याप्रमाणे राधानगरी धरणावर सुविधा निर्माण केल्यास चांगल्या प्रकारे पर्यटन वाढेल. त्यासाठीचा आराखडा तयार केला आहे . पर्यटनाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व स्थळांचा विकास साधून भौतिक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. पर्यटन उद्योगाचं महत्व लोकांना समजवण्यासाठी महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सव आणि भौतिक सुविधांच्या माध्यमातून राधानगरीचे पर्यटन देश- विदेशांत पोहोचेल.'

या प्रसंगी सरपंच कविता शेट्टी यांचे भाषण झाले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रांजल पालकर, स्वाती सांगावकर, सुनील माने, विशाल घोलकर, गायत्री शिंदे, प्रतिराज टिपुगडे, प्रल्हाद एकावडे यांचा आणि राधानगरी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरील 'अग्निदिव्य' हे नाटक सादर करण्यात आलं. उपसरपंच शत्रुघ्न सांगावकर, भाजप तालुका अध्यक्ष दीपक शिरगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम पाटील, संभाजी आरडे, सम्राट केरकर यांच्यासह राधानगरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पर्यटक उपस्थित होते.

फोटो : राधानगरी पर्यटन मोहत्सवाच्या उदघाटन प्रसंगी श्रीमत शाहू महाराज छत्रपती यांना राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रकाश आबिटकर, अभिजित तायशेट्ये आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्याने उदारमतवादाला गती द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेली तीन ते चार हजार वर्षे समाज रुढींच्या गुलामगिरीत आहे. विषमता आर्थिकतेवर अवलंबून आहे. धर्मसत्ता, राजसत्तेने विषमता जोपासली. समाजामधील वाईट रुढी, जळमटे नाहीशी करून समतावादी समाज घडविणे गरजेचे आहे. यासाठी साहित्य हे उदारमतवादाला वेग देणारे हवे. शिवाय समतेची चळवळ सर्वच क्षेत्रांमध्ये हवी' असे प्रतिपादन राष्ट्र सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांनी केले. प्रबोधन सेवाभावी संस्थेतर्फे नववे प्रबोधनवादी साहित्य संमेलन रविवारी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे झाले. संमेलनाध्यक्षपदी समीक्षक प्रा. डॉ. आनंद पाटील हे होते.

संमेलनात 'प्रबोधनाने मला काय दिले' या विषयावरील परिसंवादात शाम पाखरे, प्राचार्य एस. एम. कांबळे, आनंदराव चौगले, प्रा. टी. आर. गुरव यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी डॉ. विलास पोवार यांचे भाषण झाले. डॉ. नवनाथ शिंदे यांनी 'प्रबोधनकार ठाकरे'हा एकपात्री प्रयोग सादर केला.

संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी सध्याच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय स्थितीचा वेध घेत प्रा. सुराणा म्हणाले, 'राजकीय पक्षांची भूमिका ही समाजहिताची हवी. देशातील अनेक खासदार, आमदार आज कोट्यधीश आहेत. ते लोकप्रतिनिधी गरीबांचा विचार करतील का? जागतिकीकरणााने रोजगार वाढला नाही, संपत्ती वाढली. जातीतून आलेली विषमता संपविण्यासाठी अगोदर वेद व गीता संपविला पाहिजे. वंचित, दलित घटकांच्या प्रश्नांना साहित्यातून वाट मोकळी करुन दिली पाहिजे. मानवी जीवनाची उन्नती साधणारा धर्म असावा या विचारधारेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मनिरपेक्ष जग हा विचार महत्वाचा आहे. समतेची चळवळ बळकट होण्यासाठी आपल्यातील बंधूभाव हा जे जे उपेक्षित आहेत त्यांच्याशी हवा.'

समाज प्रबोधन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. बी. शिंदे यांनी प्रबोधनवादी साहित्य संमेलनामागील भूमिका मांडली. विशाखा जितकर व राजेंद्र रत्नाबाई बळवंत यांनी सूत्रसंचालन केले. अशोक चौगुले यांनी आभार मानले. याप्रसंगी मीरासाहेब मगदूम, प्रा. अनिल घस्ते, बाबूराव शिरसाठ, सुरेश शिपूरकर, भरत लाटकर, व्यंकाप्पा भोसले, नामदेव कांबळे, महादेव पडवळे, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

परीवर्तनाची बाराखडी शिका

संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद पाटील म्हणाले, 'इतिहास म्हणजे स्मृती असते. त्यांचा बरा, वाईट उपयोग सतत सुरू असतो. पुराव्याबद्दल वाद उद्भवतात, तेव्हा वैज्ञानिक कसोट्या लावाव्या लागतात. आज सनातन धर्मवादातून समाजाला मध्ययुगाकडे नेण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत धर्मनिरपेक्ष सम्राट शिवाजींची मूळ प्रतिमा पुराव्यानिशी समजून सांगण्याची गरज आहे. प्रबोधनाची चळवळ इतिहासकालीन आहे. उदारमतवादी साहित्याची समाजाला गरज आहे. बहुजन समाजाकडेही साहित्य विषयक प्रज्ञा आहे. पण प्रस्थापित साहित्यकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मुळात आपले शिक्षण अज्ञानाच्या उत्पादनाला वाव देणारे आहे. समाजाच्या प्रबोधनासाठी सांस्कृतिक साक्षरतेची गरज आहे. यासाठी सांस्कृतिक अभ्यास आणि सांस्कृतिक साक्षरतेचे वर्ग सुरू व्हायला पाहिजेते. परिवर्तनाची नवी बाराखडी प्रत्येकाने शिकली तर या चळवळीला गती येईल.'

उत्कृष्ट प्रबोधन कार्यकर्ता पुरस्कार

संमेलनात 'उत्कृष्ट प्रबोधन कार्यकर्ता' पुरस्काराने रावसाहेब पाटील (कुरुंदवाड), प्राचार्य जे. बी. बारदेस्कर व प्रा. किसनराव कुराडे (गडहिंग्लज), डॉ. नवनाथ शिंदे (आजरा), बाळासाहेब गवाणे (कोल्हापूर) यांना सन्मानित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्याजवळ जीप-बोलेरो अपघात; मुंबईचे तीन ठार

$
0
0

सातारा:

लग्नकार्य आटोपून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. दहिसर येथे राहणाऱ्या सामंत कुटुंबातील तीन जण सातारा पुणे महामार्गावर एका अपघातात जागीच ठार झाले आहेत. सातारा -पुणे महामार्गावरील जुन्या खांबाटकी टोलनाक्याजवळ रस्त्याच्या कडेला मालट्रक (क्रमांक के.एल.१६ यु -४४२०) उभा होता. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास भरधाव वेगाने येणारी महिंद्रा बोलेरो जीप (क्रमांक एम-एच ४७-एबी १७८४) ही मालट्रकला पाठीमागून येऊन धडकली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सावंतवाडीहून बोरीवलीकडे भरधाव वेगात निघालेली बोलेरो जीप रविवारी सकाळी पारगाव-खंडाळ्यानजीक महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. यामध्ये बोलेरो जीपचे मोठे नुकसान झाले. विनायक कामत हे मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त अधिकारी आपली पत्नी स्मिती कामत, मेहुणे बाळकृष्ण सामंत व विलास सामंत यांच्यासमवेत मुंबईहून गावी सावंतवाडीला लग्नसमारंभासाठी गेले होते. लग्नकार्य उरकून रविवारी पहाटे सावंतवाडी येथून मुंबईला निघाले. पुणे-बेंगलोर महामार्गावरून मुंबईकडे जाताना खांबाटकी बोगदा ओलांडून पुढे आल्यावर पारगाव-खंडाळ्यानजीक हा अपघात झाला.

या अपघातात विलास सामंत (मूळ राहणार पाट ता .कुडाळ जि. सिंधुदुर्ग), बाळकृष्ण शंकर सामंत (वय ६६, रा. दहिसर, मुंबई) व विनायक कामत (मूळ राहणार तळवडे ता.सावंतवाडी) हे जागीच ठार झाले. तर कामत यांच्या पत्नी स्मिती कामत ( रा . तळवडे ता. सावंतवाडी) व चालक रवी गावकर (रा.जुहु सर्कल, मुंबई ) हे दोघे गंभीर जखमी आहेत. स्मिती कामत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. खंडाळा येथे खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसने पैसे मागितलेच्या रागातून तरुणास भोसकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उसने घेतलेले पैसे परत मागितलेच्या रागातून तरुणाला भोसकले प्रकरणी नगरसेवक ईश्वर परमार यांच्या पुतण्यासह तिघांवर जुनाराजवाडा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला. संशयित कुणाल परमार (रा. सी वॉर्ड, गुजरी), त्याचा मित्र रुपेश सूर्यवंशी (रा. घिसाड गल्ली, सोमवार पेठ), अजित खैरमोडे (रा. बिंदू चौक) अशी त्यांची नावे आहेत. परमार आणि सूर्यवंशी यांनी केलेल्या चाकू हल्ल्यात ओंकार काशिनाथ गाडवे (वय २४, रा. विजयनगर कॉलनी, संभाजीनगर) हा जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार हा एका खासगी बँकेत नोकरी करतो. अजित खैरमोडे हा त्याचा मित्र आहे. अजितला मित्राची सोन्याची वस्तू सोडविण्यासाठी सहा हजार रुपयांची गरज होती. त्याने गुरुवारी (ता. १६) ओंकारकडून दोन तासांसाठी पैसे उसने घेतले. त्याच दिवशी रात्री ओंकारने फोनवरुन अजितकडे पैशाची मागणी केली. त्यातून 'कुठले पैसे?' असे म्हणत संशयित परमार, सूर्यवंशी व खैरमोडे यांनी त्याला मारहाण केली. याप्रकरणी ओंकारने राजवाडा पोलिसांत त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्याचा राग या संशयित तिघांना होता.

दुसऱ्या दिवशी पुन्हा ओंकारने पैशाची मागणी केली. त्याचा या तिघांना राग आला. अजितने त्याला बिंदू चौकात घरासमोर येण्यास सांगितले. तो त्या ठिकाणी आल्यानतंर तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. परमारने चाकूने ओंकारच्या डाव्या हाताचे दंडावर आणि सूर्यवंशीने त्याच्या छातीवर वार करून संशयित पळून गेले. जखमी ओंकारवर सीपीआरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याने या तिघांविरोधात पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांकडून ३०७ कलमाला बगल

ओंकार गाडवे याने मारहाणीची पहिली तक्रार १७ मे रोजी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली होती. या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही. संशयितांवर काहीच कारवाई केली नाही. त्यानंतर संशयितांनी त्याच्यावर चाकूने वार केले. ओंकारच्या छातीवर खोलवर जखम झाल्याने शस्त्रक्रिया करुन अकरा टाके घातले आहेत. वेळेत उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला. जीवघेणा हल्ला करुनही पोलिसांनी संशयितांविरोधात कलम ३२४ (मारहाण) नुसार गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक संशयितांविरोधात कलम ३०७ नुसार (खूनी हल्ला) गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु राजकीय दबावाखाली ३२४ चे कलम लागू केल्याची चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेंडी स्वस्त, फ्लॉवर महागला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वैशाख वणव्याने उन्हाचा तडाखा वाढला असून त्यांचा परिणाम भाजी मंडयांवरही जाणवू लागला आहे. या आठवड्यात मंडईत भेंडी, दोडका, वांगी स्वस्त असून कोबी, फ्लॉवर महागले आहेत. पालेभाज्यांची प्रतिपेंढी १० ते २० रुपयांनी विक्री होत आहे. आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दीडशे ते दोनशे रुपये डझन अशा दराने विक्री सुरू आहे. त्यामुळे आंब्यांकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. बाजारात फणसाचेही आगमन झाले आहे.

भेंडी, वांग्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने प्रतिकिलो २० ते ३० रुपयांनी विक्री होत आहे. दोडक्याचा दर प्रतिकिलो ३० ते ४० रुपये आहे. गवार ६० ते ८० रुपये असून चवळी शेंग २० ते ३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने मेथी, करडा, शेपू, कांदा पात पेंढीचा दर १५ ते २० रुपये आहे. कोथंबिर पेंढीचा दर २० ते ३० रुपये आहे. फ्लॉवर आणि कोबीची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. कोबीगड्ड्याची विक्री १५ ते ३० रुपयांनी तर फ्लॉवरचा प्रतिगड्डा २० ते ४० रुपये इतका आहे. आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने १५० ते २०० रुपये प्रति डझन दराने विक्री होत आहे. दक्षिण भारतातील लालबाग आंब्याची विक्री प्रतिकिलो ५० रुपया दराने होत आहे. ग्राहकांना आंबा खरेदी करता यावा यासाठी १०० रुपयांना सहा ते आठ नग अशी विक्रीही जोरात होत आहे.

रानमेवाही बाजारात दाखल

जांभूळ, करवंद हा रानमेवाही बाजारात दाखल झाला आहे. जांभळाचा दर प्रतिकिलो १०० रुपये आहे. काही विक्रेते मापटे, चिपटे या पारंपरिक मापाने विक्री करतात. करवंदांची दहा रुपये चिपट्याने विक्री होत आहे. फणसही बाजारात दाखल झाला आहे. २० ते १०० रुपये असा फणसाचा दर आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : २० ते ३०

टोमॅटो : ४०

भेंडी : २० ते ३०

ढबू : ४०

गवार : ४० ते ६०

दोडका : ४०

कारली : ६०

वरणा : ३०

हिरवी मिरची : ४० ते ५०

फ्लॉवर : २० ते ४०

कोबी : १५ ते ३०

बटाटा : २०

लसूण : ८०

कांदा : १५ ते २५

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : १५

कांदा पात : १५

कोथिंबीर :२० ते ३०

पालक : १०

शेपू :१५

करडा : १०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १२०

डाळिंब : ४० ते ६०

केळी : २० ते ६० (डझन)

जवारी केळी : ३० ते ७० (डझन)

आंबे : १५० ते ४०० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यासह जिल्ह्याला ‘स्वाइन’चा विळखा

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMt

बदलते हवामान, तापमानात होणारे चढउतार यामुळे राज्यासह जिल्ह्यावर स्वाइन फ्लूचे संकट घोंगावत आहे. मागील साडेसात वर्षात राज्यातील २ हजार ६४८ रुग्णांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाला आहे. तर २१ हजार २२८ इतक्या रुग्णांनी उपचार घेतला आहे. गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात ६० जणांचा बळी स्वाइन फ्लूने घेतला तर जानेवारीपासून जिल्ह्यात ८५५ रुग्णांचे स्क्रीनिंग झाले. त्यापैकी ११६ संशयितांमध्ये ४७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या तीन महिन्यातील जिल्ह्यातील स्वाइन फ्लू बळींची संख्या १२ अशी आहे.

गेल्या दोन वर्षांपासून स्वाइन फ्लूने कोल्हापूरकरांची पाठ सोडलेली नाही. गतवर्षी डेंगीने कोल्हापूरकरांचा पिच्छा पुरवला होता. त्यात यंदा स्वाइन फ्लूचे संकट भेडसावू लागले आहे. जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने स्वाइन फ्लू विषाणूना पोषक असे वातावरण मिळते. त्यामुळे स्वाइन फ्लूसदृश रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होते. अचानक प्रतिकारशक्ती खालावल्याने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या संख्या अधिक आहे. स्वाइन फ्लूसदृश लक्षणे दिसताच तात्काळ उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

काय आहे स्वाइन फ्लूचे संकट ?

२००९ पासून देशापुढे स्वाइन फ्लूचे संकट घोंगावत आहे. स्वाइन फ्लूच्या एच- १, एन- १ या विषाणूंची एका व्यक्तीपासून दुसऱ्याला लागण होते. अल्पावधीत संसर्ग फैलावत असल्याने रोगाचा धोका अधिक वाढतो. विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर पहिल्या ते चौथ्या दिवसांपर्यंत त्याची लक्षणे दिसून येतात. स्वाइन फ्लू संसर्गजन्य आजार असल्याने एच १ - एन १ विषाणू बाधित व्यक्तीच्या खोकण्यातून किंवा शिंकण्यातून हा आजार फैलावतो. तसेच बाधित व्यक्तीच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर निघणाऱ्या कफच्या माध्यमातून ती व्यक्ती, ज्या ठिकाणी स्पर्श करेल, त्या ठिकाणी संसर्ग होतो. स्वाइन फ्लूमध्ये प्रामुख्याने थंडी वाजून ताप येणे, कमालीचा थकवा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी ही लक्षणे आढळून येतात. काही लक्षणे सात दिवसांपर्यंत टिकतात. इतर आजारांतही स्वाइन फ्लू सदृश्य लक्षणे आढळतात. त्यामुळे चाचणी करून घेण्यास प्राधान्य द्यावे. १२ वर्षाआतील मुले, वयोवृद्ध, गरोदर माता यांना अधिक धोका असल्याने त्यांनी विशेषतः काळजी घेणे गरजेचे आहे. याशिवाय, ज्यांना फुफ्फुसाचे विकार, दमा, तीव्र हृदयविकार, मूत्रपिंड व यकृताचे विकार आहेत, अशांना अधिक धोका संभवतो.

............

दक्षता कशी घ्यावी?

स्वाइन फ्लूची लक्षणे आढळताच प्रतिबंधात्मक औषधे घेण्यास प्राधान्य द्यावे. तत्काळ औषधोपचार मिळाल्यास त्याला अटकाव घालणे शक्य आहे. स्वाइन फ्लूचा प्रसार आणि प्रचार थांबवण्यासाठी तोंड आणि नाक पूर्णतः झाकून बाहेर पडावे. साबणाने हात वारंवार धुवावेत. दरवाज्याच्या कड्या, रिमोट यांसारख्या वस्तू नीट पुसून घ्याव्यात. शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. हातरुमालाचा वापर करावा. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ आवर्जून खावेत. आहारात फळे व भाज्या याचा वापर वाढवावा. भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. नियमित व्यायाम करावा. आहारात 'ब' १२ जीवनसत्व असणारे पदार्थ वाढवावेत. ताप व खोकला अंगावर न काढता त्वरित फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधावा.

...........

पॉइंटर

राज्यातील स्क्रीनिंगची संख्या १० लाख ५८ हजार ३४१

राज्यातील संशयित रुग्ण- १८ हजार ७७८

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- १ हजार ५३६

रुग्णालयात भरती रुग्ण-१६७

घरी सोडण्यात आलेले रुग्ण- १ हजार २०७

(राज्यातील जानेवारीपासूनची आकडेवारी)

कोट

बदलते वातावरण स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी पोषक असते. अशावेळी सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखी, थकवा जाणवल्यास तात्काळ उपचार घ्यावेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, दमा व मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. स्वाइन फ्लूला घाबरण्याची गरज नाही. त्याच्यावर संपूर्णतः मोफत उपचार सरकारी रुग्णालयात उपलब्ध आहेत.

डॉ. अजित लोकरे, अधिष्ठाता सीपीआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक व क्रुझरचा भीषण अपघात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

येथील हातकणंगले-पेठवडगाव या मुख्य रस्त्यांवरील कुंभोज फाट्यावर केमिकलचे साहित्य घेऊन निघालेला दहा चाकी ट्रक आणि कर्नाटकातील जमखंडी तालुक्यातील नवदाम्पत्याला जोतिबा दर्शनासाठी घेऊन निघालेली क्रुझर जीप यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात जीपमधील दोन वर्षांची बालिका जागीच ठार झाली. शिवाली सिद्धाप्पा कुंभार (रा. सावळगी, ता. जमखंडी, जि. बागलकोट) असे मृत बालिकेचे नाव असून अन्य नऊजण गंभीर जखमी झाले. त्यातील नवदाम्पत्यासह चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्वांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.

या अपघातातील निलिमा बसवराज कुंभार (वय २५), बसवराज अशोक कुंभार(वय ३०),कावेरी सिद्दाप्पा कुंभार (२५ ),राधिका भैराप्पा कुंभार (२८), भैराप्पा कुंभार (३२),रितेश सिद्वाप्पा कुंभार(९),निर्मला सुदेश कुंभार (३४),प्रेमावली दुर्गाप्पा कुंभार (४०), हाजिसाब मुल्ला (५७) (सर्व रा. सावळगी,ता. जमखंडी) हे नऊजण गंभीर जखमी आहेत.

ट्रक व क्रुझर जीप यांच्यातील अपघातात धडक इतकी जोरदार होती की ट्रक उलटून त्याची चाके निखळून बाजूला पडली तर क्रुझरचा चक्काचूर झाला होता. यावेळी घटनास्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ट्रक रस्त्यांतच उलटल्याने सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

याबाबत घटनास्थळांवरुन मिळालेली माहिती अशी, जमखंडी तालुक्यातील सावळगी येथील कुंभार कुंटुबीय क्रुझर जीप नंबर(के.ए-४८-एम-६८२९ )यामधून नवदाम्पत्याला घेऊन जोतिबा दर्शनांसाठी पहाटे लवकरच निघाले होते. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही जीप हातकणंगले बसस्थानक सोडून हातकणंगले-पेठवडगाव मुख्य रस्त्यांवरील कुंभोज फाट्यावर आली असता जीप चालकाच्या डोळ्यावर झापड आल्याने त्याचे जीपवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी समोरून येणाऱ्या पुण्याहून फाउंड्री उद्योगासाठी केमिकलचे साहित्य घेऊन निघालेला दहा चाकी ट्रक नंबर (एम.एच.१२-एच. डी- ५२९७)याच्याशी समोरासमोर जोरदार धडक झाली.

या धडकेत क्रुझर जीप मधील चालकाच्या शेजारी बसलेली चिमुकली शिवाली कुंभार ही जागीच ठार झाली तर अन्य नऊ जण गंभीर जखमी झाले.

या अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजाने हातकणंगले पेठ भागातील व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जीपमध्ये अडकलेल्या सर्वांना जीपचा पत्रा कापून तत्काळ बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

यावेळी हातकणंगले पोलिस निरीक्षक सीताराम डुबल व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी हालवण्यासाठी मदत केली व रस्त्यांवरील वाहतूक सुरळीतपणे चालू केली. यावेळी जखमींच्या ओरडण्याच्या, किंचाळण्याच्या आवाजाने परिसरात वातावरण सुन्न झाले.

नवदाम्पत्य गंभीर

नुकतेच लग्न झालेल्या जोडप्यांना जोतीबाच्या दर्शनासाठी घेऊन निघालेल्या कुंभार कुंटुबीयांच्या क्रुझर जीपचा व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चिमुकली शिवाली जागीच ठार झाली. नवदाम्पत्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने नवदांपत्यासाठी रविवार घातवार ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदासंघातील मतमोजणी गुरुवारी (ता. २३ मे) होणार आहे. मात्र, रविवारीच दिवसभर मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक त्या पद्धतीने बॅरीकेड्स बांधण्यात आले. केंद्रात सीसीटीव्ही बसविण्यात आले असून मत मोजणीसाठी २० टेबल लावले आहेत. केंद्रात इंटरनेटची जोडणी करण्यात आली असून उद्या (मंगळवारी) इंटरनेटची चाचणी आणि मतमोजणीदिवशी ज्या पद्धतीने फेरीनिहाय मतसंख्या ऑनलाइन भरायची आहे, त्याचा डेमो होईल. दरम्यान, दोन्ही मतमोजणी केंद्रांबाहेर १६ ठिकाणी स्क्रीन लावण्यासंबंधी तांत्रिक माहिती घेतली जात आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी रमणमळ्यातील शासकीय गोदामात तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी शिवाजी विद्यापीठासमोरील राजाराम तलावाशेजारी शासकीय गोदामात मतमोजणी होईल. एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय २० टेबलांवर मतमोजणीला एकाचवेळी सुरूवात होईल. मतमोजणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता राहण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी एकूण १२ सीसीटीव्ही बसवण्यात आले. उमेदवारांच्या प्रतिनिधींना टेबलनिहाय रांगेत बसवण्यासाठी बॅरीकेड्स बांधण्यात आले.

मतमोजणीच्या २० टेबलांवर प्रत्येकी एक आणि निवडणूक निर्णय अधिकारी, पोष्टल मतमोजणी ठिकाणीच्या ठिकाणी एक असे एकूण एका उमेदवारांचे २८ प्रतिनिधी असतील. त्यांच्यासह मतमोजणी कर्मचारी अधिकाऱ्यांना फेरीनिहाय निकाल ऐकण्याची उत्सुकता असणार आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक मतमोजणीच्या ठिकाणी आठ स्क्रीन लावण्यासंबंधी तांत्रिक मार्गदर्शन घेतले जात आहे. तांत्रिकदृष्या हे शक्य न झाल्यास फळ्यावर फेरीनिहाय मते लिहिली जातील. मतमोजणी केंद्राबाहेरही सहा ठिकाणी स्क्रीन लावण्याचे नियोजन आहे. स्क्रीनची जागा निश्चित केली जात आहे. प्रत्यक्षात मतमोजणी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन टप्यांत प्रशिक्षण देण्यात आले. २२ मे रोजी शेवटची रंगीत तालीम होणार आहे. त्यानंतर गुरुवारी सकाळी ७ वाजता थेट मतमोजणीला प्रारंभ होईल. १४ ऐवजी २० टेबलांवर इव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी होणार आहे. इव्हीएमची मतमोजणी दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर व्हीव्हीपॅटवरील चिठ्या मोजणीला केली जाणार आहे.

व्हीव्हीपॅटमुळे लागणार विलंब

यंदा पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटवरील चिठ्या मोजल्या जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच केंद्रांवरील चिठ्या मोजल्या जातील. निवडणूक प्रशासनाने पाच केंद्रांत एकाचवेळी चिठ्या मोजण्याची तयारी केली प्रशासनाने केली होती. त्यानुसार सायंकाळी सहा पर्यंत निकाल लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र निवडणूक आयोगाने एकावेळी एकाच केंद्रातील चिठ्या मोजाव्यात अशी सूचना दिली. परिणामी अंतिम निकाल लांबणार आहे.

भोजनाची व्यवस्था

मतमोजणीच्या ठिकाणीच अधिकारी, कर्मचाऱ्यांना जेवण पोहोच केले जाणार आहे. जेवण, नाष्टा दर्जेदार असावा, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत. दर्जा तपासण्यासाठी आज (सोमवारी) अधिकारी जेवण, नाष्ट्याची चव तपासणी केली जाईल. भोजन, पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, माध्यम कक्षही स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षावरील कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कोट

मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक सुविधा निर्माण केल्या आहेत. बॅरीकेड्स, इंटरनेट, सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तयारी पूर्ण होत आली आहे. व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांमुळे निकालास उशीर झाला तरी सूक्ष्म नियोजन केल्याने कोणतीही अडचण येणार नाही.

- नंदकुमार काटकर, अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर पुन्हा तापले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वातावरणातील बदलांमुळे गेल्या चार दिवसांपासून शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी दिवसभरात ४१ अंश सेल्सिअस कमाल आणि २१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सुट्टीचा दिवस असूनही वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने दिनचर्येत बदल करत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहराच्या तापमानात चाळीशी ओलांडली होती. मे महिन्याच्या मध्यावरदेखील ही उष्णतेची लाट कायम राहिली. सोमवारपर्यंत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर कोकणात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत तापमानात सातत्याने वाढ दर्शवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळी व संध्याकाळच्या वेळेत महत्त्वाची कामे करण्यास प्राधान्य दिले. सकाळी नऊ वाजल्यापासून उष्मा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना टोपी, मफलर आदी साधने सोबत घेऊन जाण्यास प्राधान्य दिले. दुपारी १२ ते ४ या वेळेत रस्त्यावरची वाहतूक तुरळक होती. तीव्र उन्हामुळे बाजारपेठेतही शांतता असल्याचे दिसून आले. उखाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी नागरिकांनी एसी, कुलर आणि पंख्याचा आसरा घेतला. तर थंडाईचा अनुभव घेण्यासाठी लिंबूपाणी व शीतपेयांच्या गाड्यावर नागरिकांनी धाव घेतली. शहरात ठिकठीकाणी कलिंगड, नारळ पाणी, ताक, लस्सी विक्रीचे गाडे मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहेत. महिलांनी ताक व मठ्ठा विक्रीचे स्टॉल लावले आहेत.

कोट

हवामानात सातत्याने होणारे बदल साथीच्या आजारांना पूरक ठरतात. या काळात पोटाचे विकार वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ऋतूचक्रानुसार आहारात बदल करत योग्य ती काळजी घेण्यास प्राधान्य द्यावे. सर्दी, खोकला, घसादुखी अशी लक्षणे आढळतात तात्काळ उपचार घ्यावेत. विशेषत: लहान मुले व ज्येष्ठांची काळजी घ्यावी.

- डॉ. सुभाष पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जदारांना धमकी देणाऱ्यासावकार पती-तत्नीवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीस टक्के व्याजाने घेतलेली रक्कम परत देऊनही शिवीगाळ, धमकी देऊन जादा रक्कम देण्याचा तगादा लावल्याप्रकरणी संशयित विजय अनिल शिंदे, त्याची पत्नी रंजना विजय शिंदे (दोघेही रा. सुबराव गवळी तालीम जवळ, मंगळवार पेठ) या दोन सावकारांवर जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी महापालिकेचे निवृत्त कर्मचारी रतन शंकर पचरवाल (वय ५८ रा. संभाजीनगर कामगार चाळ, घर क्रमांक १२) यांनी फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी सांगितले की, पचरवाल यांनी जुलै २०१७ मध्ये संशयित दोघांकडून वीस टक्के व्याजदराने ७० हजार रुपये घेतले होते. त्यांनी ही रक्कम व्याजासह वेळावेळी परत केली. आजअखेर त्यांनी या दोघांना मूळ घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेपेक्षा २ लाख ३० हजार रुपयांची जादा रक्कम परत केली. मात्र, व्याजाची आणखी रक्कम द्यावी लागत असल्याचे सांगत दोघांनी सातत्याने तगादा लावला. त्यांच्या त्रासाला कंटाळून पचरवाल यांनी फिर्याद दाखल केली. संशयित दोघांच्यावर महाराष्ट्र सावकार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कळंबा येथील काही गुंडांना बोलावून संशयितांनी सातत्याने धमकी दिली. शिंदे हा एका मटका व्यावसायिकाशी संबधित असून व्याजाने पैसे देतो. त्याने कर्ज देण्यासाठी तयार केलेले स्टॅम्प पेपर बनावट असल्याचा आरोप पचरवार यांनी पोलिस ठाण्यात केला. त्यांच्या त्रासाला कंटाळून १७ एप्रिल रोजी विषप्राशनाचा प्रयत्न केल्याचे पोलिसांसमोर सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झुंड कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार

$
0
0

गारगोटी: गव्यांच्या वास्तव जीवनावर आधारित असलेल्या जंगल संशोधक दत्ता मोरसे यांच्या झुंड कादंबरीला जळगाव येथील उज्जैनकर फाउंडेशन साहित्य प्रतिष्ठानचा 'तापी पुर्णा' हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला. या अगोदर त्यांच्या या कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, तुकोबा माणदेशी पुरस्कार, करवीर नगर वाचन साहित्य मंडळ, डी. डी. आसगांवकर सांस्कृतिक ट्रस्ट, कविवर्य ए. पां. रेंदाळकर साहित्य पुरस्कार अशा विविध सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. मोरसे यांचे १६ वर्षे जंगलात गवा आणि अरण्य भाषा यावर त्याचे काम सुरू आहे. सध्या महाष्ट्रातील प्रसिद्ध युवा जंगल अभ्यास म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या घोलमोड व झुंड या कादंबऱ्या पर्यावरण वादी निसर्ग साहित्य म्हणून प्रसिद्ध आहेत. निसर्ग संवर्धनाची चळवळ अधिक बळकट करण्याचे कार्य या कादंबऱ्यातून वाचकासमोर आणल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदाराने बदलले नाल्याचे पात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर नागरी वस्तीमध्ये पाणी शिरू नये यासाठी रामानंद नगरात महानगरपालिकेने संरक्षक भिंत बांधली. पण ठेकेदाराने बांधकाम व्यावसायिकाचे हितसंबंध जोपसण्यासाठी नाल्यामध्ये भिंत बांधली. त्यामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह बदलला असून पावसाळ्यामध्ये अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे.

पाचगाव येथून येणारा नाला रामानंदनगरपर्यंत सुस्थितीत आहे. मात्र तेथून पुढे आल्यानंतर नाल्याचे पात्र बदलण्याची किमया ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांनी संगनमताने केली आहे. नाल्यातील पाणी पावसाळ्यामध्ये नागरी वस्तीमध्ये घुसू नये, यासाठी संरक्षक भिंत बांधली. पण ही भिंत बांधताना नाल्याच्या पात्राबाहेर बांधण्याची आवश्यकता असताना भिंत नाल्याच्या मध्ये बांधली आहे. सुमारे एक कोटी रुपये खर्च करुन पात्रातच भिंत बांधल्याने नाल्याचा प्रवाह बदलला असून पावसाळ्यामध्ये पात्र बदलल्यामुळे अनेक घरात पाणी जात आहे. ठेकेदारांने बांधकाम व्यावसायिकाचे हितसंबंध जोपासण्यासाठी निधीचा अपव्यय केला असून त्यामागे एक माजी नगरसेवक सहभागी आहे. या सर्व प्रकरणांची आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक सतीश लोळगे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून प्रबोधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवचरित्र आणि सामाजिक प्रश्नांवरील व्याख्याने, कोल्हापूरचे ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासह पर्यावरण, 'पाणी वाचवा' या विषयातून शिवराज्यभिषेक सोहळ्यातून प्रबोधनाची दिशा दाखवण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठा महासंघाने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अशोकराव भंडारी होते.

सहा जून रोजी कोल्हापुरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी सर्व जाती, धर्मातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीत कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या. शिवराज्याभिषेक सोहळ्यातील मिरवणुकीत वारकरी समाज सहभागी होईल, अशी घोषणा यादव महाराज यांनी केली. सर्वधर्मियांचा सहभाग सोहळ्यात असावा, अशी सूचना प्रताप साळोखे, बबन रानगे यांनी केली. आरक्षणासह अन्य मागण्यासाठी मराठा समाजाने मोर्चा काढूनही त्या प्रश्नांची सोडवणूक झाली नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्याासाठी मिरवणूकीत फलक लावण्यात यावे अशी मागणी महादेव जाधव यांनी केली.

शाहीर दिलीप सावंत म्हणाले, 'शिवजयंती तिथीऐवजी तारखेने जाहीर व्हावी यासाठी बहुजन समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. सध्या दुष्काळाचा प्रश्न सर्वत्र भेडसावत असल्याने सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत 'पीक हमीभाव', 'पाणी वाचवा', 'पाणी जिरवा' या प्रबोधनपर फलकांचा अंतर्भाव करावा.

आनंद म्हाळुंगेकर यांनी शिवाजी महाराजांची जलनीती, पाणी नियोजन, शेतीला मदत या संदर्भात माहिती जनतेत व्हावी यासाठी उपक्रम राबवावेत, अशी सूचना केली. किशोर घाटगे यांनी एकाच विषयावर व्याख्याने आयोजित करण्याची सूचना करताना मिरवणूकीत महिलांचा सहभाग वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

'अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नियुक्तीसंदर्भात सरकारने पावले उचलण्यासाठी फलकांचा वापर करावा,' अशी मागणी रामदास पाटील यांनी केली. राज्याभिषेक सोहळ्यातील स्त्री भ्रूण हत्येवर प्रबोधन करणारी मोहीम राबवण्याची सूचना नम्रता जाधव यांनी केली. पाचगांवचे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी म्हणाले, 'सोहळ्याच्या निमित्ताने नवीन व्याख्यात्यांची व्याख्यानमाला आयोजित करावी. शिक्षण, करिअर हा व्याख्यानाचा केंद्रबिंदू असला पाहिजे.'

अशोक पोवार यांनी गडकोटांची सहल काढण्यासाठी पुढाकार घेण्याची सूचना केली. मिरवणूक मार्गावर प्रबोधनपर फलक लावण्याची सूचना शैलजा भोसले आणि प्रसाद जाधव यांनी केली. प्रा. टी. एस. गायकवाड म्हणाले, 'मराठवाडा, विदर्भात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे सोहळ्यात पाणी वाचवा, जीव वाचवा ही मोहीम हाती घ्यावी.' चंद्रकांत चव्हाण यांनी स्वराज्य भवनाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

अरुण बोंगिरवार पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि जयंती नाल्यासह शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचा सत्कार करण्याची सूचनाही करण्यात आली.

बैठकीला माळी समाजाचे अध्यक्ष अशोक माळी, अजय इंगवले, लमानी समाजाचे रामचंद्र पोवार, शंकरराव शेळके, चंद्रकांत चव्हाण, राजपूत समाजाचे अमरसिंग रजपूत, शिवमूर्ती झगडे, रमेश आपटे, शिरीष देशपांडे बंकट थोडगे, चर्मकार समाजाचे अरुण कुराडे, बाबूराव बोडके, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, महादेवराव पाटील, संजय जाधव आदी उपस्थित होते.

\B

'जाती गाडा, देश घडवा'

\Bबैठकीच्या समारोप करताना वसंतराव मुळीक म्हणाले, 'जाती गाडा, देश घडवा' या तत्वानुसार शिवराज्यभिषेक सोहळ्यात सर्व धर्मियांचा सहभाग वाढवत आहोत. प्रबोधनाची दिशा ठरवणारा सोहळा होण्यासाठी एक ते तीन जून या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार आहे. पारंपरिक वाद्ये, मर्दानी खेळाला उत्तेजन देताना नशापाणी, डॉल्बीला फाटा दिला जाईल. दुष्काळ, पाणी वाचवा, स्वच्छता, आरोग्य या विषयावर प्रबोधन केले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेलनाडेसह १८ जणांच्या विरोधात ‘मोक्का’ प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खून, खुनी हल्ला, अपहरण, मारहाण, मटका जुगाराचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 'एस. टी.' गँगचा म्होरक्या आणि इचलकरंजी नगरपरिषदेचा पाणीपुरवठा सभापती संजय शंकर तेलनाडे, त्याचा भाऊ सुनील तेलनाडे, वकील पवनकुमार उपाध्ये यांच्यासह १८ जणांच्या विरोधात संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का ) कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठविला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिली.

कळंबा येथील मटका अड्ड्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय तेलनाडे त्याच्या साथीदारांसह पसार झाला आहे. त्याने मोबाइल बंद केल्याने लोकेशन सापडलेले नाही. त्याचा साथीदार जावेद दानवाडे, नूर सय्यद यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. तेलनाडे याचे इचलकरंजीसह जयसिंगपूर, शिरोळ, कर्नाटकात मटक्याचे जाळे आहे. त्याने ठिकठिकाणी एजंट नेमले आहेत. तेलनाडे याला मटकाचालक सलीम हेपरगी याच्या खूनप्रकरणी अटक केली होती. तो त्यातून निर्दोष बाहेर पडला आहे. त्यानंतर भरत त्यागी खूनप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणातही तो जामिनावर बाहेर आहे. इचलकरंजीमध्ये तो मटकाकिंग राकेश अग्रवाल याच्या मदतीने मटका जुगार अड्डा चालवितो. इचलकरंजी येथील सराइत 'एस.टी.' गुन्हेगारी टोळीचा तो म्होरक्याही आहे. या व्यवसायात त्याने सुक्षिक्षित बेरोजगारांना जाळ्यात अडकविले आहे. त्याने अवैध व्यवसायातून मिळालेल्या पैशातून जमिनी, स्थावर मालमत्ता, आलिशान गाड्या खरेदी केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. दरम्यान, ११ मे रोजी शहापूर पोलिस ठाण्यात त्याच्यासह भाऊ सुनील तेलनाडे, वकील पवनकुमार उपाध्ये, हृषिकेश लोंढे, अरविंद मस्के, राकेश कुंभार, दीपक कोरे, इम्रान कलावंत, राहुल चव्हाण, अरिफ कलावंत, अभिजित जामदार, संदेश कापसे, दिगंबर शिंदे यांच्यासह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अष्टविनायक पार्कात तीन बंगले फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोरेवाडी (ता. करवीर ) येथील आर. के. नगरजवळील अष्टविनायक पार्कात बंद असलेली तीन बंगले फोडून १५ तोळे सोने, तीन लाख रुपयांची रोकड, मोबाइल असा एकूण साडेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी रात्री झालेल्या या प्रकाराने अष्टविनायक पार्क परिसरात खळबळ उडाली आहे. बंगल्याच्या टेरेसवर झोपलेल्या एका कुटुंबाला चोरी झाल्याचे कळाल्यानंतर मोठी तारांबळ उडाली. एकाच पार्कात तीन बंगले फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अष्टविनायक पार्कात तीन बंगल्यांचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सागर रामचंद्र कासे, मुकुंद सुबराव वीर आणि आयटीआयमधील शिक्षक योगेश सोनुले या तिघांची घरे जवळ आहेत. मुकुंद वीर कुटुंबियासोबत मनवाड (ता. खानापूर) येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. त्यांचा बंगला बंद असल्याने चोरट्याने त्यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून प्रवेश केला. त्यांच्या घरातील बेडरुममधील तिजोरी कटावणीने उचकटली. त्यातून दोन लाखांची रोकड आणि सोने चांदीचे दागिने लंपास केले. तेथून चोरटे सागर कासे यांच्या घरात चोरीसाठी घुसले. कासे रात्री नळाला आलेले पाणी भरण्यासाठी रात्री बारापर्यंत जागे होते. त्यानंतर ते कुटुंबासोबत बंगल्याच्या टेरेसवर झोपले. चोरट्यांनी त्यांच्या घरात कडी कोयंडा उचकटून प्रवेश केला. त्यांच्या तिजोरीतून साडेतेरा तोळ्यांचे दागिने, रोकड आणि मोबाइल लंपास केला. कासे एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांनी हॉस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी बँकेच्या लॉकर्समधून दागिने घरी आणले होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काम करीत असलेले शिक्षक योगेश सोनुले सुट्टीसाठी इचलकरंजी येथे गेले होते. त्यांचा बंगलाही चोरट्यांनी फोडला. त्यांच्या बेडरुममधील तिजोरीतून सोन्याचे मंगळसूत्र, २१ हजारांची रोकड आणि मोबाइल लंपास केला. दरम्यान या तीन ठिकाणी झालेल्या चोरीतून काही बेटेक्सचे दागिने होते. ते चोरांनी ओळखून त्या ठिकाणी ठेवले. त्यामुळे चोरटे सराइत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी श्वानाला पाचारण केले. मात्र त्याने पार्कातील मुख्य रस्त्यापर्यंतचा मार्गावरच घुटमळले. ठसे तज्ज्ञांनी तिजोरीवरील चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र लंपास

$
0
0

कोल्हापूर : गुजरी येथील सराफी दुकान ते ताराबाई पार्क या रोडवर प्रवास करीत असताना चंद्रकांत बाबूराव सपकाळ (वय ७२, रा. मावळ, पुणे) यांच्या बॅगेतील सव्वातोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार घडला. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, सपकाळ शुक्रवारी सायंकाळी सात वाजता कोल्हापुरात आले होते. त्यांनी गुजरी येथील एस. आर. पोतदार यांच्या सराफी दुकानातून ४७ हजार रुपये किंमतीचे १३ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र खरेदी केले. तेथून ताराबाई पार्काकडे चालत जात असताना अज्ञाताने त्यांच्या बँगेतून मंगळसूत्र लंपास केले. दरम्यान चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेज पाहून चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाहीरात क्षेत्राचे बदलते स्वरुप

$
0
0

फोटो :अर्जुन टाकळकर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जनसंपर्क क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. समाजजीवनाच्या विविध घटकांशी त्याचा नित्याचा संपर्क असतो. या क्षेत्रात रोजगाराच्या संधीही विपुल आहेत. या क्षेत्रातील प्रभावी कामकाजासाठी काळानुरुप बदल आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब अंगिकारावा. नजीकच्या काळात अनेक बदल संभवत असून या क्षेत्रातील व्यावसायिकांनी त्यासाठी तयार राहावे,' असे आवाहन सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा. अनन्य मेहता यांनी केले.

पब्लिक रिलेशन्स काउन्सिल ऑफ इंडिया, कोल्हापूर चॅप्टरतर्फे कोल्हापूर विभागातील जनसंपर्क क्षेत्रातील व्यावसायिकांची पहिली परिषद रविवारी येथे झाली. उद्घाटनप्रसंगी त्यांनी 'जनसंपर्क क्षेत्रातील बदलते प्रवाह' या विषयावर बीजभाषण केले. संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. एम. हिर्डेकर अध्यक्षस्थानी होते. मेहता म्हणाले, 'इंटरनेट, सोशल मीडियामुळे भरमसाठ माहिती उपलब्ध होत आहे. मात्र लोकांना माहीत होईल, अशा पद्धतीने 'डाटा'सादरीकरण झाले पाहिजे. तरच प्रभावी व परिणामकारकरित्या काम होईल. केवळ माहितीच्या देवाणघेवाणीसाठी हे क्षेत्र नाही. अचूक व अधिकृत माहिती, त्याद्वारे नागरिकांशी जोडण्यासाठी ते उपयुक्त ठरणारे आहे.'

डॉ. हिर्डेकर म्हणाले, 'जनसंपर्क क्षेत्राकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. जनसंपर्काची साधने वाढलेली आहेत. संस्था व नागरिकांतील आशय व सौहार्दपूर्ण संवादासाठी जनसंपर्क घटक महत्त्वाचा आहे. जनसंपर्क अधिकारी हा समाजातील प्रत्येक घटक आणि संस्थांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. तो वस्तुनिष्ठ माहितीने परिपूर्ण असावा. जनसंपर्क व्यावसायिकांनी बहुआयामी व समाजाभिमुख भूमिका बजावण्याची गरज आहे.' याप्रसंगी परिषदेचे राष्ट्रीय सचिव अविनाश गवई व कालिदास पाटील यांची भाषणे झाली.

दुसऱ्या सत्रात आयोजित परिसंवादात शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार म्हणाल्या, 'जनसंपर्क हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जनसंपर्क अधिकारी हा डायनॅमिक असावा. या क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविण्यासाठी वाचन, निरीक्षण महत्त्वाचे आहे.' सायबर येथील प्रा. राजेंद्र पारिजात यांनी 'जनसंपर्क, जाहिरात आणि व्यावसायिक जबाबदारी या अनुषंगाने मार्गदर्शन केले. संस्थेचे खजिनदार राजेश शिंदे यांनी परिसंवाद सहभाग घेतला. ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष अलोक जत्राटकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष सतीश ठोंबरे यांनी स्वागत केले. सचिव रावसाहेब पुजारी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंती नाल्याचे पात्र विस्तारले

$
0
0

फोटो आहेत

कोल्हापूर टाइम्स टीम

जयंती नाल्यासह उपनाल्यातील गाळ व कचरा काढण्याची मोहीम गेल्या तीन आठवड्यापासून सुरू आहे. पात्रातील गाळ मोठ्या मशिनरीच्या मदतीने काढून टाकला जात असल्याने सर्वच नाल्यांची खोली आणि पात्र विस्तारले. नाल्यांची खोली वाढल्याने पंचगंगा नदीमध्ये जाणाऱ्या सांडपाण्याला काही प्रमाणात अटकाव होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. सलग तिसऱ्या रविवारी महापालिकेच्यावतीने राबवलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये शहरातील स्वयंसेवी संस्था व नागरिक सहभागी झाले होते.

गेल्या तीन आठवड्यापासून शहरात नाल्यांची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे. सांडपाणी रोखण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी सहभाग घेत श्रमदान चळवळ अधिक बळकट केली. रविवारी सकाळी हॉकी स्टेडियम येथून नाल्यातील गाळ काढण्यास सुरुवात झाली. आयसोलेशन हॉस्पीटल येथील डी वॅटस् प्रकल्प, बालाजी पार्क, अॅग्रिक्लचर लँड, रामानंदनगर व पाचगाव येथून येणाऱ्या नाल्यातील गाळ व कचरा काढण्यात आला. दोन पोकलॅन व जेसीबी मशिनरीच्या सहायाने गाळ काढण्यात आला. काढलेला गाळ चार डंपरद्वारे अन्यत्र टाकण्यात आला. या परिसरात राबवलेल्या नाला स्वच्छता मोहिमेमध्ये शहरातील विविध संस्था व नागरिकांनी सहभाग घेतला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत अनेकांनी नाल्यात उतरुन स्वच्छता केली. मोहिमेची पाहणी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली.

हॉकी स्टेडियम परिसरात श्रमदानातून नाला सफाई सुरू असताना सिद्धार्थनगर येथील बंधाऱ्याजवळील गाळ ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांनी काढला. सलग तिसऱ्या रविवारी नाल्यातील गाळ काढताना प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण अधिक दिसून आले. नाला पात्रातील साचलेला गाळ व कचरा काढण्यासाठी मशिनरीचा उपयोग करुन पात्राची रुंदी व खोली वाढवण्यात येत आहे. यामुळे शहरात दररोज निर्माण होणारे सांडपाण्याचा काही प्रमाणात अटकाव होऊन पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

स्वच्छता मोहिमेमध्ये देशभक्त सामाजिक सेवा संस्था, आसरा फाउंडेशन, शक्तीवस्ती, राष्ट्रभक्ती, वरिष्टस्तर बचत गट, सिव्हील इंजिनीअरिंग अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंग, व्हाइट आर्मी यांच्यासह दिलीप देसाई, उदय गायकवाड, दिलीप पोवार, पारस ओसवाल, आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे, पारस ओसवाल, अशोक रोकडे, महादेव कुंभार, चंद्रकांत कांडेकरी, जितेंद्र लोहार, सुनील पोवार, नगरसेवक किरण नकाते, उपायुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगरसचिव दिवाकर कारंडे, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोगय निरिक्षक डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते. मोहिमेदरम्यान नवस्वराज्य चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने डॉ. संदीप पाटील यांनी कर्मचारी व नागरिकांना सुमारे एक हजार हँडग्लोजचे वितरण केले.

...........

चौकट

रामानंदनगर येथील समस्या दूर होईल?

मोठ्या पावसाला सुरुवात होऊन नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्यानंतर शहरातील बहुतांशी नाल्यामध्ये बॅक वॉटर निर्माण होते. आणि नागरी वस्तीमध्ये पाणी शिरते. याचा फटका रामानंदनगर येथील रहिवाशांना बसतो. पाचगावकडून येणाऱ्या नाल्यातील पाण्याचा प्रवाह थांबल्याने पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते. सद्य:स्थितीत नाल्याच्या पात्रातील गाळ काढल्याने येणाऱ्या पावसाळ्यात ही समस्या दूर होईल अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरांची पडझड, दुर्गंधीचाही फेरा

$
0
0

पोलिस म्हणजे समाजाचे रक्षण करण्याची, कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी स्वीकारणारी यंत्रणा. बंदोबस्तासाठी कुठेही आणि कधीही जायची तयारी पोलिस कर्मचाऱ्यांची असते. मात्र, त्यांना मिळणाऱ्या सुविधांची स्थिती अतिशय बिकट आहे. सोन्या मारुती चौकातील पोलिस वसाहतीकडे पाहिले तर पोलिसांच्या निवासस्थानाची दुरावस्था नजरेत येते. गावाकडून संसारासाठी लागणारे जेमतेम साहित्य घेऊन वसाहतीतील या घरांत सुमारे ३०० हून अधिक कर्मचारी राहतात. पडझड झालेल्या, कौलारू दहा बाय दहाच्या खोल्यांत त्यांनी संसार मांडला आहे. नव्याने भरती झालेले आणि हक्कांचे घर नसलेल्यांना या वसाहतीचा मोठा आधार आहे. मात्र, त्यांची स्थिती दयनीय आहे. गेल्या तीन दशकांपासून वसाहतीतील घरांची दुरावस्था तशीच आहे.

Sachin.Yadav@timesgroup.com

Tweet :@sachinyadavMT

कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व काळात लक्ष्मीपुरी आणि बुधवार पेठ परिसरातील सोन्या मारुती चौकानजीक पोलिसांना राहण्यासाठी १७० घरे (क्वार्टर्स) बांधण्यात आली. सध्या या घरांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. पडझड झालेली घरे, अस्वच्छता, रस्त्यातून वाहणारे सांडपाणी, दुर्गंधी, डासांचा फैलाव, स्वच्छतागृहांची विदारक अवस्था यामुळे वसाहतीला अवकळा प्राप्त झाली. गेल्या अनेक वर्षांत घरांची दुरुस्ती झालेली नाही. परिणामी येथील बहुतांश पोलिस कर्मचारी ही घरे सोडून भाड्याच्या घरांत रहावयास गेले आहेत. तर काही पोलिसांच्या कुटुंबीयांनी या वसाहतीतच आपला संसार चालवला आहे.

बुधवार पेठेतील पोलिस वसाहतीत कौलारू दहा बाय दहाच्या दोन खोल्यांची घरे आहेत. स्वयंपाकासाठी स्वतंत्र आणि एका बैठ्या खोलीसह अंघोळीसाठी छोटेसे बाथरूम अशी या घरांची रचना आहे. इथे घटकाभर विश्रांती घ्यायची म्हटली तरीही कमी जागेमुळे पोलिसांची घुसमट होते. अनेक पोलिसांचे आई, वडील, पत्नी, मुले असे सहा ते सात जणांचे कुटुंब आहे. मुलांना अभ्यास करायला जागा नाही. आई-वडिलांना स्वयंपाकघरातच झोपावे लागते. एखादा पाहुणा आला तर दोन दिवस घरी थांबा म्हणायचे धाडस होत नाही असे पोलिस कर्मचारी सांगतात. जागेअभावी इच्छा असूनही नातेवाईकांना राहता येत नसल्याची खंत पोलिसांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

इंग्रजांच्या काळात सुमारे पाच एकर जागेत लक्ष्मीपुरी व बुधवार पेठ परिसरात पोलिसांना राहण्यासाठी १७० घरे (क्वार्टर्स) बांधण्यात आली. पोलिस मुख्यालयानंतरची जुनी असलेली ही वसाहत शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयासमोरील सोन्या मारुती चौकात (पूर्वीचा जुना बुधवार पेठ) आहे. सध्या वसाहतीत ८४ खोल्यांपैकी ६० हून अधिक खोल्या रिकाम्या आहेत. प्रचंड त्रास असतानाही पोलिसांची १५ कुटुंबे इथे नाइलाजाने वास्तव्य करत आहेत. बहुतांश सर्वच घरांची आयुष्यमर्यादा संपली आहे. वसाहतीत डांबरी रस्ता नाही. वीस वर्षापूर्वी येथे खासदार निधीतून रस्ता केला गेला. नंतर काहीच झाले नाही. परिसरात अंधाऱ्याचे साम्राज्य आहे. या भागातील स्ट्रीट लाइट बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य असते. रात्री-अपरात्री बॅटरी घेऊन चालावे लागते. त्यामुळे महिला व मुली रात्री घराबाहेर न पडणे पसंत करतात.

नव्याने भरती झालेले तरुण लहान खोल्या आणि अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे पोलिस लाइनमध्ये राहण्यास येत नाहीत. त्यामुळे अनेक खोल्या रिकाम्या आहे. खोल्यांची देखभाल होत नसल्याने उंदीर, घुशींनी धुमाकूळ घातला आहे. येथे पुरुष व महिलांसाठी सहा शौचालये आहेत. पण, त्यांचे दरवाजे तुटले असल्याने असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. शौचालयांची दारेही मोडलेली आहेत. परिसरातील स्थानिक नागरिक शौचालयासमोरील मोकळ्या जागेत कार पार्किंग करत असल्याने वाट काढतच शौचालयाकडे जावे लागते. शौचालयाच्या स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी नियुक्त आहेत. प्रत्येक कुटुंबाकडून मासिक वर्गणी त्यासाठी दिली जाते.

पावसाळ्यात तर सापांच्या वावरामुळे हा परिसर धोकादायक बनतो. काही पोलिसांच्या घरात तर सर्पमित्रांचे मोबाइल क्रमांक लिहून ठेवले आहेत. दोन वर्षापूर्वी पडक्या घरांमध्ये सापांनी अनेक दिवस मुक्काम केला होता. वसाहतीसमोर मैदानात रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा असतो. बंद खोल्यांच्या परिसरात अश्लिल चाळ्यांचे प्रकार घडतात. येथील पोलिस ग्रामीण भागात नोकरीस असल्याने रात्रीच्यावेळी कुटुंबीयांना भीतीच्या छायेखाली दिवस काढावे लागतात. वसाहतीच्या देखभालीची जबाबदारी जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडे आहे.

राज्य सरकारने जिल्ह्यातील पोलिसांसाठी १४०० निवासस्थाने मंजूर केली. प्रत्येक कर्मचाऱ्यांना चार खोल्यांचे घर असे नियोजन करून २९ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर केला. मात्र निधी अद्याप आला नसल्याने कामाचा श्रीगणेशा झालेला नाही.

(पूर्वार्ध)

जुना बुधवार पेठ पोलिस लाइनमधील घरांच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठांकडे सातत्याने निधीची मागणी केली आहे. नवीन घरे मंजूर झाल्याने येत्या काही दिवसांत येथे वास्तव्य करीत असलेल्या १५ कुटुंबांना पोलिस मुख्यालयानजीकच्या वसाहतीत स्थलांतरीत केले जाणार आहे.

- प्रमोद जाधव, पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images