Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पर्यायी पुलासाठी काहीही करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पर्यायी पुलाचे बांधकाम पूर्ण व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. अंतिम टप्प्यात बांधकामास कोणी अडथळा निर्माण करत असेल ते खपवून घेतले जाणार नाही. हे काम पूर्ण होण्यासाठी वेळप्रसंगी काहीही करू,' असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला. पुरातत्त्व विभागाने शिवाजी पुलाच्या बांधकामास घेतलेल्या हरकतीनंतर खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या कोल्हापूर उपमंडळाचे संरक्षक सहायक विजय चव्हाण यांनी २५ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागास नोटीस दिली आहे. या नोटिसीद्वारे पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाचे बांधकाम सात दिवसांच्या आत काढून घेण्याची सूचना केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे. याबाबत तातडीने खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, 'केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत पुरातत्त्व खात्याच्या नियमांमधून कोल्हापूरसाठी सवलत मिळवली. यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी पुलासाठी आवश्यक असलेली जमीन संपादित करून ब्रह्मपुरी टेकडीवरील अतिक्रमणे हटवण्याचीही जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, या जागेत खासगी मालकीची एक एकर जमीन आहे. या जमिनीचा मोबदला पुरात्तत्व विभागाने जमीन मालकास द्यावा, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्त्व खात्यास पाठवले आहे. पुरातत्त्व खात्याने मोबदला देण्यास असमर्थता दर्शवली आहे.'

याबाबत ते पुढे म्हणाले, 'जमीन संपादनाच्या वादाबाबत पुरातत्त्वचे अधिकारी रमी राजन, उषा शर्मा, तसेच पंतप्रधान कार्यालयाचे सचिव दिपेश मिश्रा यांच्याशी चर्चा केली. तातडीने भूसंपादन शक्य नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी विशिष्ट मुदतीत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन पुरातत्त्व खात्यास द्यावे, असा पर्याय सुचवला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी आपण चर्चा केली असून, त्यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. यानंतरही कामात अडथळा निर्माण झाल्यास आपण स्वस्थ बसणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनासह काहीही करू शकतो.'

पूल बनला अस्मितेचा मुद्दा

'वाद-विवाद आणि आंदोलनांनंतर सुरू झालेले पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अवघ्या काही दिवसांत यावरून वाहतूक सुरू होऊ शकते. मात्र, अधिकाऱ्यांमधील विसंवादामुळे पुन्हा पुलाचे काम रखडू शकते. आता कोल्हापूरकरांसाठी पुलाचा प्रश्न अस्मितेचा मुद्दा बनला आहे. कोणत्याही स्थितीत याचे काम थांबणार नाही. पुन्हा जनआंदोलन उभे राहू शकते,' असा इशाराही यावेळी खासदार संभाजीराजे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऊस उत्पादन घटणार, शेतकरी धास्तावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भोगावती व पंचगंगा नद्यांमधील पाणी शेतीसाठी उपसाबंदी केल्यामुळे या दोन्ही खोऱ्यांतील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यामुळे उपसाबंदी हटवावी किंवा कालावधी कमी करावा यासाठी शेती पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी पुढील आठवड्यात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. उपसाबंदीमुळे उसाची वाढ खुंटणार असून, एकरी उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.

पाटबंधारे विभागाने एप्रिल महिन्यात दोन दिवस आणि मे महिन्यात चार दिवसांच्या कालावधीत उपसाबंदी जाहीर केली आहे. ग्रामीण भागात सहकारी तत्त्वावरील पाणीपुरवठा संस्थांमार्फत पाणीपुरवठा होतो. एरव्ही पंधरा ते वीस दिवसांनी पाणीपुरवठ्याचा फेरा येतो. मे महिन्यातील चार दिवसांच्या उपसाबंदीमुळे पाण्याचा फेरा २५ दिवसांपर्यंत वाढणार आहे. यामुळे राधानगरी ते प्रयाग चिखलीपर्यंतच्या भोगावती खोऱ्यातील आणि प्रयाग चिखली ते शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्यापर्यंतच्या पंचगंगा नदीकाठावरील शेतीवर परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

भोगावती आणि पंचगंगा नदीकाठावरील या पट्ट्यात हजारो एकर शेती असून, मुख्य पीक ऊस आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत उपसबंदी घातल्यामुळे एकरी दहा ते पंधरा टन ऊस उत्पादन घटणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी, पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडणार असल्याचे इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील यांनी सांगितले.

००००

...तर आंदोलन करावे लागेल

करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, 'पाणी उपसाबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. गेल्या आठवड्यात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी उपसाबंदीचा कालावधी कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सहा दिवसांचा कालावधी उपसा बंदी केल्याचे आदेशात म्हटले आहे. मुळात उन्हाळ्यात उपसाबंदी नको अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. याप्रश्नी पुन्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन भूमिका मांडू, अन्यथा आंदोलन करावे लागेल.'

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोगो : माय सिटी माय प्राइड'शिवाजी'च्या संकेत

$
0
0

लोगो : माय सिटी माय प्राइड

'शिवाजी'च्या संकेत साळोखेची

संतोष ट्रॉफीमध्ये कमाल

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर म्हणजे फुटबॉल खेळातील प्रतिभावंतांची खाण. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या खेळातून अनेक दिग्गज खेळाडू निर्माण झाले. त्यांनी आपल्यातील अंगभूत कौशल्याने राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारत कोल्हापूरचे नाव देशपातळीवर पोहोचवले. यामध्ये विशेषत: सर्वात जुन्या अशा शिवाजी तरुण मंडळाने आघाडी राखली आहे. संघाच्या संकेत अनिल साळोखे याने सलग दोन वर्षे राष्ट्रीय स्तरावरील संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत प्रतिनिधीत्व करुन या परंपरेत आपले स्थान मिळवले आहे.

कोल्हापूरच्या गावठाण भागात फुटबॉलचे वेड कायमपणे जपले. त्याला पेठापेठांतील व तालमीमधील ईर्ष्या कारणीभूत असली, तरी अनेकांनी फुटबॉलवर जीवापाड प्रेम केले. आता त्याला व्यावसायिकतेची जोड मिळत आहे. परिणामी फुटबॉल रसिकांमध्ये त्यांनी आदराचे स्थान मिळवले. असेच स्थान मिळवण्याचा प्रयत्न सध्या शिवाजी पेठ येथील संकेत साळोखे करत आहेत. केवळ प्रयत्न न करता यातूनच करिअर घडविण्याचा ध्यास घेतला आहे.

संकेतचे वडील अनिल साळोखे हे एका सराफ दुकानात काम करतात. इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना फुटबॉलमध्ये करिअर करता आले नाही. मात्र ही कमतरता ते संकेतच्या रुपाने भरुन काढत आहेत. संकेतही आपल्या खेळातून त्यांना निराश करत नाही. महाराष्ट्र हायस्कूलमध्ये प्रथम प्रदीप साळोखे यांच्याकडून फुटबॉलचे धडे घेताना त्याने शालेय राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. सुब्रतो मुखर्जी स्पर्धेत त्याने प्रत्येक वयोगटात छाप पाडली. ड्रिबल, कटिंगमध्ये माहीर झालेला संकेतने विशेषत: हेडद्वारे गोल करण्यात पटाईत आहे. स्थानिक स्पर्धेत त्यांने अनेकदा लेफ्ट विंगमधून प्रेक्षणीय गोलची नोंद केली. त्याची हीच कामगिरी त्याला दोनवेळा संतोष ट्रॉफीपर्यंत नेण्यास कारणीभूत ठरली. कुडित्रे येथील स. ब. खाडे महाविद्यालयामध्ये एसवायबीएचे शिक्षण घेताना त्याने फुटबॉलवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. प्रशिक्षक प्रा. अमर सासने आणि अभिजित वणिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव सुरू आहे.

लियानल मेस्सी, नेयमार व सुनील छेत्रीला आदर्श मानून फुटबॉलमध्ये सध्या संकेत झोकून देत आहे. फुटबॉलसाठी लागणारे अनेक कौशल्य आत्मसात करुन व्यावसायिक क्लबमध्ये जाण्यासाठी त्याचे कसोशीने प्रयत्न आहेत. त्यासाठी तो भारतीय फुटबॉल संघात स्थान मिळवलेल्या निखिल कदम, सुखेदव पाटील, अनिकेत जाधव यांना फॉलो करत आहे.

फिटनेसवर भर

शालेय स्तरापासून संकेत फुटबॉलचे मैदान गाजवत आहे. महाराष्ट्र हायस्कूलकडून खेळताना त्याने प्रत्येक प्लेसवर आपली चुणूक दाखवली. मंडळाकडून लेफ्ट विंगर म्हणून तो आपली छाप पाडण्यास यशस्वी होत आहे. यशस्वी खेळ करताना त्याची किरकोळ शरीरयष्टी अडथळा ठरली. त्यावर मात करण्यासाठी तो फिटनेसवर अधिक भर देत आहे. त्यासाठी फुटबॉल सरावासोबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डायट प्लन करून दररोज जीममध्ये तयारी करीत आहे.

फुटबॉलमध्ये करिअर करण्याचे निर्धार शालेय स्तरापासूनच केला. त्यासाठी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात सराव करतो. व्यावसायिक क्लबमध्ये स्थान मिळवण्यासाठी काही जुन्या खेळाडूंकडून टीप्स घेत आहे.

- संकेत साळोखे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळी समाजातर्फे सत्कार

$
0
0

कोल्हापूर: वीरशैव लिंगायत माळी समाजातर्फे पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल राहुल माळी यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे संचालक राजू माळी यांच्या हस्ते सत्कार झाला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अशोक माळी, उपाध्यक्ष संतोष माळी, खजानिस बाळासाहेब माळी, तानाजी माळी, संभाजी माळी, संतोष माळी, शशिकांत माळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिव-बसव जयंतीनिमित्त कार्यक्रम

$
0
0

कोल्हापूर: वीरशैव लिंगायत समाजातर्फे शिवजयंती व महात्मा बसवेश्वर जयंती भव्यतेने साजरी करण्याचा निर्णय वीरशैव लिंगायत समाजाच्या बैठकीत झाला. समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे यांच्या अध्यक्षतेखाली दसरा चौक येथील चित्रदुर्ग मठ येथे बैठक झाली.

शिवजयंतीनिमित्त सोमवारी (ता.६) चित्रदुर्ग मठात प्रतिमापूजन करण्यात येणार आहे. बसवेश्वर जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. ७) धार्मिक विधी, वरदशंकर महापूजा, अक्कमहादेवी महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. संत साहित्याचे अभ्यासक प्रा. शिवाजीराव भुकेले यांचे सकाळी ११ वाजता व्याख्यान होईल. सायंकाळी पाच वाजता चित्रदुर्ग मठापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन होईल. मिरवणुकीनंतर महाप्रसाद वाटप होईल. रात्री 'अंतरंग'हा भाव भक्तीगीतांचा कार्यक्रम आहे. नियोजनाच्या बैठकीतील चर्चेत सुहास भेंडे, चंद्रकांत स्वामी, राजू वाली, श्रीकांत बनछोडे, नानासाहेब नष्टे, राजेश पाटील-चंदूरकर, चंद्रकांत हळदे आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविका मुल्लाला नोटीस

$
0
0

लोगो : पोलिसांवरील हल्ला प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मटक्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी मोक्कातंर्गत कारवाई केल्याने अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शमा मुल्लाला महापालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली. मुल्लाकडून चार दिवसांत खुलासा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९६५ नुसार सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्यानुसार नगसेवकपद रद्द होऊ शकत नसले तरी कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यास त्यांचे पद कायद्यानुसार अपात्र ठरेल.

आठ एप्रिल राोजी प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी यादवनगर येथील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छापा टाकला होता. कारवाई दरम्यान मुल्ला याच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शमा मुल्ला यांनी कारवाईला विरोध करत पोलिसांवर हल्ला केला होता. घटनेनंतर पोलिसांनी नगरसेविका मुल्ला यांच्यासह ५० जणांवर मोक्कातंर्गत कारवाई करून अटक केली.

नगरसेविका मुल्ला यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी नगरेविका मुल्ला यांच्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल महापालिका प्रशासनाला पाठवून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पत्र पाठवले होते.

त्यानुसार प्रशासनाने मुल्ला यांना दहा दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस पाठवून सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. नोटीस मिळाल्यानंतर मुल्ला यांनी सद्य:स्थिती ठीक नसल्याने खुलासा करण्यासाठी १५ दिवसांची मुदत मागितली होती. मुदत संपण्यास चार दिवसांचा अवधी असल्याने या मुदतीत त्यांचा खुलासा प्राप्त होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९६५ नुसार सरकारी कामात अडथळा करणे या गुन्ह्यानुसार पद अपात्र ठरवण्याची तरतूद नाही. मात्र या किंवा अन्य कायद्यानुसार मुल्लांना कोर्टाने शिक्षा दिल्यास त्यांचे पद रद्द होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडहिंग्लजला गुरुवारपासून यूथ फुटबॉल स्पर्धा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि महागाव येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे अखिल भारतीय यूथ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली आहे. ९ ते १४ मेअखेर एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर स्पर्धा होणार आहेत. एसजीएम युनायटेड करंडक स्पर्धेत केरळ, तेलंगण, कर्नाटक, दादर-नगर-हवेली, दिल्ली आणि महाराष्ट्रातील ३६ संघ सहभागी होणार आहेत. १३, १५ आणि १८ वर्षांखालील गटात होणाऱ्या या स्पर्धेसाठी एकूण एक लाख रुपयांची बक्षिसे आहेत.

आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या धर्तीवर सहा वर्षे जीपीएल स्पर्धेनंतर गेल्या वर्षीपासून ही स्पर्धा सुरू झाली. १३, १५ आणि १८ वर्षांखालील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक फुटबॉल संघटना (फिफा)आणि भारतीय फुटबॉल महासंघाच्या सूचना आहेत. युवा खेळाडूंना खेळण्याची अधिक संधी मिळावी हाच स्पर्धेचा उद्देश आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे.

लिग कम नॉकॉऊट पद्धतीने ही स्पर्धा होईल. प्रत्येक गटासाठी दोन दिवस स्पर्धा असून रोज सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रात सामने होतील. प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख दहा हजार, उपविजेत्यांना आठ हजार, तर उपांत्य फेरीतील संघांना तीन हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना स्पर्धावीर, गोलरक्षक, बचावपटू, मध्यरक्षक आणि आघाडीपटू अशी वैयक्तिक बक्षिसेही आहेत. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला सामनावीर, तर पराभूत संघातील चांगल्या खेळाडूला लढवय्या म्हणून बक्षीस दिले जाणार आहे.

स्पर्धेत सहा राज्यांतील संघांनी प्रवेश निश्चित केला असून, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अमरावती, मिरज, डेरवण संघांचा सहभाग आहे. सहभागी खेळाडूंची भोजन आणि निवासाची सोय संयोजकांनी केली आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना केली आहे. युनायटेडचे अध्यक्ष संभाजीराव शिवारे, उपाध्यक्ष अरविंद बारदेसकर, संत गजानन शिक्षण समूहाचे विश्वस्त डॉ. संजय चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण आणि सहकारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कच्च्या मालातील दरवाढीने पशुखाद्य दरवाढ अपरिहार्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कच्च्या मालाची दरवाढ आणि वाढत्या वीज खर्चामुळे पशुखाद्याच्या किमतीतील वाढ अपरिहार्य आहे, असे पत्रक जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. दरवाढीबाबत होणारे आरोप केवळ राजकारणातून होत आहेत, असा आरोप पत्रकातून केला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, अपुरा पाऊस आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे मक्याच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत ६० ते ७० टक्के वाढ झाली आहे. आंध्र आणि कर्नाटकामध्ये कमी पावसामुळे सरकीचे उत्पादन घटले असून सरकी पेंडच्या दरात ५० टक्क्याने वाढ झाली आहे. राईट पॉलिश आणि डीओआरबीच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. वीजदरवाढ झाल्याने वीज खर्चात १४.६७ टक्के वाढ झाली आहे. वाहतूक खर्च ७.३३ टक्क्यांनी वाढला आहे. या सर्व कारणांमुळे गोकुळने तीन वर्षांनंतर दरवाढ केली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत गोकुळचे पशुखाद्य स्वस्त असून, प्रोटिनचे घटक जास्त आहेत. पशुखाद्याची सरस गुणवत्ता व त्या तुलनेत किफायतशीर दर याचा विचार करून दूध उत्पादक नेहमीच गोकुळच्या पशुखाद्यास प्राधान्य देत आहेत.'

००००००

सेनेच्या संचालकांशी चर्चा करा

दूध उत्पादकांच्या पाठिंब्यावर गोकुळने आपली गुणवत्ता टिकून ठेवली आहे. सहकार क्षेत्रातील अन्य संस्था अडचणीत येत असताना गोकुळने यशाची कमान नेहमीच उंच ठेवली आहे. आपण एका दर्जेदार संस्थेची बदनामी करत आहोत, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही आंदोलन करण्याआधी त्यांच्या पक्षाचे दोन संचालक गोकुळमध्ये आहेत. त्यांच्याशी चर्चा करून पशुखाद्याबाबतची माहिती घ्यावी, असे आपटे यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काळ्या पाण्याची शिक्षा

$
0
0

प्रवीण कांबळे, हातकणंगले

कोल्हापूर जिल्ह्याची वरददायिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या पंचतारांकित औद्योगिक वसाहत, लक्ष्मी इंडस्ट्रीज या औद्योगिक वसाहतीचे प्रक्रिया न केलेले केमिकल मिश्रित सांडपाणीपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे नदीकाठावरील गावांना काळ्या पाण्याची शिक्षा मिळत आहे. मध्यंतरी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन प्रदूषणास कारणीभूत असलेल्या घटकांवर कारवाई करण्याबाबत सूचना देऊनही त्यावर कार्यवाही झालेली नाही.

संपूर्ण देशात सर्वात जास्त प्रदूषित असलेली नदी म्हणून पंचगंगा नदीचा उल्लेख केला जातो. कोल्हापूर शहर, पंचतारांकीत औद्योगिक वसाहत, लक्ष्मी इंडस्ट्रीज, इचलकरंजी शहर आदींच्या केमिकलमिश्रित पाण्याने पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. यामुळे हातकणंगले तालुक्यातील रुकडी, माणगाव, साजणी, तिळवणी, रुई, चंदूर आदी गावातील शेतजमिनींवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. पाणी दुषित झाल्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना त्वचारोग, कॅन्सर, पोटाचे विकार आदी रोगांनी ग्रासले आहे. या विरोधात पंचगंगा नदी काठावरील गावांनी सलग २२ दिवस जनआंदोलन उभारून साखळी उपोषण केले. तसेच रुकडीतील मच्छीमारांनी पंचगंगा नदीच चोरीला गेल्याची तक्रार हातकणंगले पोलिस ठाण्यात दिली. यामुळे हे आंदोलन राज्यभर गाजले.

पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्या पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीसह लक्ष्मी इंडस्ट्रीज, इचलकरंजी शहरातील काळा ओढा, इंगळी व पट्टणकोडोली ओढा आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन या गंभीर प्रकारणांची दखल घेत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नदीकाठावरील इचलकरंजी शहर, लक्ष्मी इंडस्ट्रीज, पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीसह कोल्हापुरातील जयंती नाला या प्रत्यक्ष भेटी दिल्या. येथील गंभीर स्थिती पाहून संतापलेल्या मंत्री रामदास कदम यांनी या प्रदूषण करणाऱ्या घटकांना वारंवार वाचवणाऱ्या प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या 'प्रदूषण'च्या अधिकाऱ्यांनी फक्त लक्ष्मी इंडस्ट्रीज मधील युनिरोज प्रोसेस हा कारखाना बंद करण्याचे आदेश देत कारवाई केली होती.

महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रदूषित असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी नदीकाठावरील गावांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्या पुढाकाराने पंचगंगा बचाव कृतीची स्थापना करून सलग २२ दिवस साखळी उपोषण तसेच रुकडीतील मच्छीमार बांधवांनी पंचगंगा नदी चोरी गेल्याची तक्रार हातकणंगले पोलिस ठाण्यात देऊन प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रदूषणाच्या मुद्यावर हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील जनतेत मोठ्या असंतोष निर्माण झाला होता. वारंवार तक्रारी करुन देखील प्रदूषणच्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षाने कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामाची पद्धती सर्वत्र चर्चेत आली.यामुळे वैतागलेल्या लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेतून नाराजीचा सूर उमटत होता.

सध्या पंचतारांकित औद्योगिक वसाहत व लक्ष्मी इंडस्ट्रीज मधील केमिकल मिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत अजूनही मिसळत असल्याचे चित्र दिसून असून नदीकाठच्या गावांना काळ्या पाण्याची शिक्षा देणाऱ्या या औद्योगिक वसाहतीवर ठोस कारवाई करण्याची मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नेमके काय काम करतात? हा संशोधनाचा विषय बनला असून येत्या काळात काही संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे समजते.

रुई बंधाऱ्यांवर दुर्गंधी

लक्ष्मी इंडस्ट्रीजमधील केमिकल मिश्रीत फेसाळलेले सांडपाणी प्रक्रिया न करता थेट पंचगंगेत मिसळत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. रुई बंधाऱ्यांवर या सांडपाण्याची दुर्गंधी पसरली आहे.

तळंदगे पितेय विषारी पाणी

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या केमिकल मिश्रित पाणी ओढ्याच्या माध्यमातून जाते. या पाण्यामुळे शेजारील तळंदगे गाव अक्षरशः विषारी झाले असून परिसरातील गवत, चारा खाऊन अनेक जनावरे दगावली असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते.

०००००००००००

फोटो ओळी: रुई बंधाऱ्यांवर लक्ष्मी इंडस्ट्रीज मधील फेसाळलेले केमिकल मिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मल्टिस्टेट’ने विधानसभा तापणार

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

Tweet : gurubalmaliMT

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत अगदी शेवटच्या टप्प्यात केवळ स्पर्श झालेला गोकुळ 'मल्टिस्टेट'चा मुद्दा विधानसभेला मात्र प्रचाराचा आणि राजकारणाचा प्रमुख मुद्दा बनण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणूक अद्याप सहा महिन्यांवर असतानाही आतापासून या विषयावर राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे पक्षीय राजकारण अथवा आघाडी धर्म बाजूला ठेवून 'मल्टिस्टेट'चा मुद्दा तापविला जाण्याची शक्यता आहे. त्यातच कर्नाटक सरकारने मल्टिस्टेटला 'ना हरकत' देण्यास नकार दिल्याने विरोधकांना आणखी बळ मिळाले आहे.

जिल्ह्याचे राजकारण जिल्हा बँक आणि गोकुळभोवती फिरते. या दोन्ही संस्था जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या असल्याने त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्त्व येते. त्यामुळे त्या ताब्यात ठेवण्यासाठी नेते प्रयत्नशील असतात. विधानसभेसाठी इच्छुक असलेले अनेकजण या दोन संस्थांचे संचालक होण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे बहुतांश आमदार गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थांचे संचालक आहेत. यंदाही अरुण डोंगळे, राजेश पाटील, अनिल यादव या गोकुळच्या संचालकांसह संजय घाटगे, सत्यजित पाटील, राहुल देसाई, चंद्रदीप नरके, भरमू सुबराव पाटील हे नातेवाईक विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांना मल्टिस्टेटचा मुद्दा प्रचारात अडचणीचा ठरण्याची चिन्हे आहेत.

चार वर्षांपूर्वी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला विरोधकांनी घाम फोडला. त्यामुळे आगामी निवडणूक सुकर करण्यासाठी सत्ताधारी गटाने संघ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या विरोधानंतरही ठराव मंजूर झाला, पण त्याचे पडसाद पुढील अनेक निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत. त्याची सुरुवात लोकसभा निवडणुकीत झाली. खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात हा मुद्दा मांडण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर मल्टिस्टेटविरोधात भूमिका घेताना राज्यसरकारची संमती मिळणार नसल्याचे जाहीर केले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हा विषय आला आणि गाजलासुद्धा. विधानसभा निवडणुकीत मात्र हा विषय विरोधक फारच तापविण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवातही झाली आहे. कारण ही निवडणूक आणखी सहा महिन्यांनंतर होणार असताना, लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच मल्टिस्टेटवरून राजकारण सुरू झाले आहे. कर्नाटक सरकारने मल्टिस्टेटला 'ना हरकत' देण्यास नकार दिल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. यावरून त्यांचे पुढील राजकारण स्पष्ट होते. त्यांच्यासोबत प्रा. संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके आणि हसन मुश्रीफदेखील असणार आहेत.

गोकुळवर माजी आमदार महादेवराव महाडिक आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांची सत्ता आहे. मुश्रीफांचे समर्थक सत्ताधारी गटात आणि ते विरोधात आहेत. महाडिक कोणत्या पक्षात नसले तरी भाजपमध्ये असल्यासारखेच पावले पडतात. त्यामुळे या संस्थेवर सध्या काँग्रेस आणि भाजपची सत्ता आहे असे म्हणता येईल. विरोधातही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, शेकाप असे अनेक पक्ष आहेत. यावेळी पक्षीय राजकारण आणि आघाडी धर्म बाजूला ठेवून प्रचार होणार हे नक्की.

मल्टिस्टेटचा मुद्दा आमदार पाटील आणि नरके अधिक आक्रमकपणे मांडण्याची चिन्हे आहेत. त्याची सुरुवात त्यांनी केली आहे. महाडिक आणि पी. एन. यांना रोखण्यासाठी ते हा विषय तापविणार असल्याने कुंभी कारखान्याचा विषय विरोधकांनी पुढे आणला आहे. यामुळे करवीरच्या राजकारणात गोकुळला 'कुंभी'ने उत्तर मिळणार आहे. अनेक संचालक आणि त्यांचे नातेवाईक विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे या सर्वांना अडचणीत आणण्यासाठी मल्टिस्टेचा मुद्दा पुढे करण्यात येईल. प्रत्येक मतदारसंघात आणि गावागावांत गोकुळचे सभासद, दूध उत्पादक आहेत. त्यामुळे हा विषय विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनणार आहे.

०००००

चौकट

मल्टिस्टेट विरोधक...

आमदार हसन मुश्रीफ, खासदार राजू शेट्टी, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, प्रा. संजय मंडलिक, संपतराव पवार-पाटील

मल्टिस्टेट समर्थक...

माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, अरुण नरके, खासदार धनंजय महाडिक

००००

दृष्टिक्षेपात गोकुळ...

मागील निवडणुकीतील सभासद : ३,२४८

येत्या निवडणुकीस पात्र सभासद : ३,६५९

दैनंदिन दूध संकलन : १४ लाख लिटर

दहा दिवसांचे बिल : ४२ कोटी

प्राथमिक दूध संस्था : ५,८००

दूध उत्पादक सभासद : ५,५०,००

महिला दूध उत्पादक : ५० हजार

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रॉसड्रेन कामासाठी रस्ता वाहतुकीस बंद

$
0
0

कोल्हापूर

साईक्स एक्सेंटशन अंतर्गत शहाजी लॉ कॉलेज येथे शनिवार(ता.४)पासून क्रॉसड्रेनचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी जनता बझार ते शहाजी लॉ कॉलेज दरम्यानचा रस्ता दोन जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शहाजी लॉ कॉलेज येथे क्रॉसड्रनेचे काम हाती घेण्यात येणार आहे. मुख्य रस्त्यावर शनिवारपासून काम सुरू राहणार असल्याने लॉ कॉलेज ते जनता बझार चौकापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत राजारामपुरीकडे व राजारामपुरीहून शाहूपुरी किंवा एसटी स्टँडकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी अन्य मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. वाहनधारकांनी काम पूर्ण होऊ पर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांना होणार साहित्य पुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिव्यांग उन्नती अभियानाचा तिसरा टप्पा राबविण्यात येत आहे. यामध्ये दिव्यांगांची तपासणी करुन त्यांना आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे. ११ ते २६ मे या कालावधीत तालुकानिहाय दिव्यांग तपासणी शिबिर होणार आहे. कोल्हापूर शहरासाठी २५ तर करवीर तालुक्यासाठी २६ मे रोजी शिबिर आयोजित केले आहे.

या शिबिरात दिव्यांगांची नोंदणी केल्यानंतर तपासणी पश्चात पात्र लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य वाटप केले जाईल. यामध्ये व्हिलचेअर, ट्रायसिकल, कुबड्या, रोलेटर, कॅलिपर, कृत्रिम अवयव, श्रवणयंत्र, एम.आर.किट, स्मार्ट केन, लो व्हिजन कट, डायसी प्लेअर, कुष्ठरोग किट या साहित्याचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेने दिव्यांग उन्नती अभियानच्या पहिल्या टप्प्यात नोंदणी करुन माहिती संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अपंगत्व प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करुन प्रमाणपत्रे दिली जात आहेत. दिव्यांगाच्या सर्व्हेत २१ प्रकारात ४५,१३६ दिव्यांगांची नोंद झाली आहे. त्यांना साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय या विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. मंत्रालयाने, एका कंपनीला शिबिर आयोजित करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषदेत बैठक होऊन दिव्यांग तपासणी शिबिराचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

भुदरगड येथे ११ मे रोजी पहिले शिबिर होणार आहे. राधानगरीत (ता.१२ मे), आजरा (ता.१३), चंदगड (ता.१४), गगनबावडा (ता. १५), इचलकरंजी (ता.१६), कागल (ता.१७), पन्हाळा (ता.१८), शिरोळ (ता.२०), हातकणंगले (ता.२२) आणि गडहिंग्लज येथे २४ मे रोजी तपासणी शिबिर होईल. शिबिरात आवश्यक साहित्याची नोंदणी करुन दीड, दोन महिन्यात साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी समाजकल्याण अधिकारी संजय शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निजामुद्दीन एक्सप्रेसच्या चार फेऱ्या रद्द

$
0
0

कोल्हापूर: तांत्रिक कारणांमुळे निजामुद्दीन एक्स्प्रेसच्या (१२१४७) चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. २१ व २८ मे रोजीच्या कोल्हापूर ते दिल्ली (निजामुद्दीन स्थानक)च्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. तसेच निजामुद्दीन ते कोल्हापूर एक्सप्रेसच्या (१२१४८) २३ व ३० मे दरम्यानच्या फेऱ्या रद्द केल्याची माहिती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जयप्रभा’प्रश्नी मनपालाही अपयश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झालेल्या जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी २००० मध्ये महापालिकेच्या महासभेत जमीन आरक्षित करण्याचा ठराव केला. राज्य सरकारकडे ठराव पाठवण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री विलासराव देशमुख यांच्यासमोर झालेल्या पहिल्याच सुनावणीमध्ये जमीन आरक्षित ठेवणाचा ठराव फेटाळण्यात आला. परिणाम स्टुडिओ वाचवण्यासाठी महापालिकेने केलेल्या प्रयत्नालाही अपयश आले होते. त्याचीच परिणिती दिवाणी न्यायालयाच्या निकालामध्ये दिसून येते.

जयप्रभा स्टुडिओची मालकी लता मंगेशकर यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही जागेची विक्रीही केली. स्टुडिओमधील इमारती व उर्वरित जागा विक्रीला मनाई करण्यासाठी शहरात जनआंदोलन उभा राहिले. आंदोलनाची दखल घेत स्टुडिओचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी तत्कालीन महापालिकेच्या सभागृहाने प्रयत्न केले. त्याचाच भाग म्हणून महापालिकेने २००० मध्ये झालेल्या महासभेत स्टुडिओची जागा आरक्षित करण्याचा ठराव केला. महासभेत केलेला ठराव राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठवला. ठरावाला मंगेशकर यांच्यावतीने आव्हान देण्यात आले. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री देशमुख यांच्यासमोर सुनावणी झाली. पहिल्याच सुनावणीमध्ये नगरविकास खात्याने जमीन आरक्षित करण्याचा ठराव फेटाळून लावला. त्यामुळे महापालिकेने स्टुडिओचे अस्तित्व जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला अपयश आले.

त्यानंतर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. पण ही याचिका न्यायालयाने निकालात काढत स्टुडिओवर मंगेशकर यांची मालकी असल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणमध्ये उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू

$
0
0

माणमध्ये उष्माघाताने

शेतकऱ्याचा मृत्यू

सातारा :

माण तालुक्यात गुरुवारी उष्माघाताने एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. सायकलवरून भर दुपारी घरी जात असताना ही घटना घडली. विष्णू आप्पा धनवडे (वय ६०, कुकुडवाड, धनवडेवाडी) असे उष्माघाताने बळी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

भीषण पाणी टंचाईप्रश्‍नी विष्णू धनवडे काही शेतकऱ्यांसमवेत कुकुडवाड ग्रामपंचायतीत गुरुवारी गेले होते. ग्रामपंचायतीकडून माणसी २० लिटर पाणी मिळत असून, ते पुरत नाही. जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर बनला आहे. चारा छावणी कधी सुरू होणार यासह अन्य अडचणी त्यांनी मांडल्या होत्या. त्यानंतर धनवडे हे तेथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या धनवडेवाडी येथील आपल्या घरी सायकलवरुन निघाले होते. पारा ४१ अंश सेल्सिअस होता. तीव्र उन्हामुळे धनवडे यांना वाटेतच भोवळ येऊन ते खाली कोसळले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

कुकुडवाड परिसरात तीन वर्षांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या गावांतर्गत मानेवाडी, धनवडेवाडी, शिवाजीनगर, कारंडेवाडी या वाड्या असून, गावाची लोकसंख्या सुमारे चार हजार आहे. गेल्या काही दिवसांपासून तर या परिसरात तापमानाचा पारा वाढल्यामुळे उन्हाळा नकोसा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अॅस्टर’मध्ये हजारावर हृदयशस्त्रक्रिया यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये हृदयशस्त्रक्रिया विभागात मार्च २०१२ पासून आजतागायत एक हजारहून अधिक क्लिष्ट व गुंतागुंतीच्या हृदयविकार शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉ. अमोल धर्माधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हृदयरोग शस्त्रक्रिया विभागामध्ये १० वर्षांच्या रुग्णांपासून ते ८२ वर्षे वयाच्या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामध्ये हृदयाची बायपास सर्जरी, हृदयाची झडप बदलणे, ह्रदय झडप दुरुस्त करणे, ओपन हार्ट सर्जरी, हृदयाला छिद्र असणे यांचा समावेश आहे. निकामी झालेले फुफ्फुस किंवा फुफ्फुसाचा भाग काढून टाकणे, छातीला मार लागणे, बरगड्यांचे फ्रॅक्चर, फुफ्फुसातील रक्तवाहिनीतील गुठळी (पल्मोनरी एम्बोलिझम) यांसारख्या आजारांवरील उपचार येथे केले जातात.

या विभागात हदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अमोल धर्माधिकारी व भूलशास्त्रतज्ज्ञ डॉ. अमोल कोडोलीकर हेसुद्धा पूर्णवेळ उपलब्ध आहेत. शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर व उपकरणे उपलब्ध असून, रुग्णावर अत्याधुनिक अतिदक्षता विभागात उपचार केले जातात. अॅस्टर डी. एम. हेल्थ केअर ही आजघडीला देशात व परदेशात वैद्यकीय व फार्मसी सुविधा देणारी एक नामांकित आरोग्यसेवा देणारी संस्था आहे. डी. एम. हेल्थ केअरशी देश-विदेशातील अनेक हॉस्पिटल्स जोडली गेली आहेत. कोल्हापुरातील अॅस्टर आधार हॉस्पिटल हा त्याचाच एक भाग आहे. यावेळी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. अमोल कोडोलीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद मोटे व हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. उल्हास दामले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

krishna

$
0
0

आत्मभान शिबीर

कराड :

कराड, येथील कृष्णा हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाच्या वतीने सोमवार-शुक्रवार दरम्यान ११ ते १४ वयोगटांतील विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी आत्मभान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात आयोजित आत्मभान शिबीराला उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर, विद्यार्थी-पालकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय पैलूंचा अभ्यास करून त्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. इच्छुक पालकांनी कृष्णा हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाशी अथवा ९९२२३५३८०९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जत्रेत भारुडाचा कार्यक्रम

कराड :

गावच्या जत्रेत होणाऱ्या वारेमाप खर्चाला फाटा देत लोकप्रबोधन करणाऱ्या भारुडाचा कार्यक्रम आयोजित करून पैशाची बचत करण्यात आली. बचत करण्यात आलेल्या पैशाचा उपयोग गावच्या विकासासाठी करण्याचा स्तुत्य उपक्रम हजारमाची (ता. कराड) गावच्या तरुणांनी केला आहे. एकीकडे गावाच्या विकासकामात पैसे कमी पडत असताना जत्रेत लाखो रुपयांचा होणारा खर्च टाळून तरुणांनी नवा पायंडा पाडला आहे. मोठमोठाल्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम टाळून त्याऐवजी 'नाचू भारुडाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी,' हा समाज प्रबोधनपर कार्यक्रम गावात आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे यंदा गावकऱ्यांना वेगळ्या प्रकारची जत्रा अनुभवायला मिळाली. उदयसिंह पवार व शाबीर मुल्ला या तरुणांनी या उपक्रमात पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी शिवाजी पुलासंदर्भात सोमवारी बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलासंदर्भात सोमवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. बैठकीला पुलाच्या बांधकामासंदर्भात सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना अर्कार्लॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या कोल्हापूर विभागाने पर्यायी पुलाच्या बांधकामासंदर्भात नोटीस पाठवली आहे. शेवटच्या टप्प्यात नोटीस पाठवल्याने जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीकडून रविवारी (ता. ५) शिवाजी पुलावर सकाळी साडेदहा वाजता तातडीने बैठकीचे आयोजन केले आहे.

शिवाजी पुलाचे आयुर्मान संपले असल्याने पर्यायी पुलाची उभारणी सुरु आहे. शेवटच्या टप्प्यातील बांधकामाला केंद्रीय पुरातत्व विभागाने परवानगी दिली आहे. मात्र पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना अर्कार्लॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने पर्यायी पुलाच्या बांधकामा संदर्भात नोटीस पाठवली आहे. ब्रह्मपुरी या पुरातत्व स्थळापासून ११० मीटरच्या अंतराच्या आतील बांधकाम काढून घ्यावे, असा उल्लेख आहे. या नोटीशीमुळे संतापाची लाट उसळली आहे. सध्या पुलाचे बांधकाम ब्रम्हपुरी पर्यटनस्थळपासून ११० मीटर अंतराच्या बाहेर असून केंद्रीय पुरातत्व विभागाने यापूर्वीच परवानगी दिली आहे.

पुरातत्व विभागाने नोटीस पाठवल्यानंतरही पुलाचे काम सुरु ठेवण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले यांनी केली आहे. त्यामुळे पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पुलासंदर्भात काढलेल्या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांसाठी सरकार तिजोरी रिकामी करणारः महादेव जानकर

$
0
0

पंढरपूर

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत पैसा कमी पडू देणार नाही. प्रसंगी शेतकऱ्यांसाठी तिजोरी खाली करण्याची सरकारची तयारी आहे. असा दावा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केला.

दुष्काळी पहाणी दौऱ्याच्या निमित्ताने आज जानकर यांनी सांगोला तालुक्यातील विविध छावण्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली . जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्यात तीन किलोने वाढ केल्याचे सांगत जनावरांची संख्या व इतर जाचक अटी देखिल शिथिल केल्या जाणार असल्याचे संकेत जानकर यांनी दिले . गेल्यावर्षी छावण्यात झालेले गैरप्रकार टाळण्यासाठी संपूर्ण डिजिटलायझेशन केल्याचा दावा जानकर यानी केला .

राज्यात एकूण १ कोटी १२ लाख पशुधन असुन सरकारने सुरु केलेल्या १२४८ छावण्यामध्ये ८ लाख जनावरे दाखल झाल्याचे जानकर यानी सांगितले .
पशु पालकांच्या मागणी नुसार प्रत्येकी जनावर १५ ऐवजी आता १८ किलो चारा देण्यात येणार आहे. तर जनावरांना बॅच मारण्यासाठी शेतकर्यांकडून घेतलेले सहा रूपये देखील परत करण्यात येणार आहेत. या शिवाय जनावरांचा विमादेखील सरकार काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महादेव जानकरांना राज्यातील लोकसभेचा निकाल काय असेल असे विचारले असता, माढा,बारामती आणि सांगली सह किमान ४२ जागा भाजप, शिवसेना जिंकेल असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.

दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आलेले महादेव जानकर यानी काल सांगोला तालुक्यातील यमगर मंगेवाडी येथे छवणीतच मुक्काम केला.

69174780

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’ने वाढवले १७०० मतदार

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर : 'मल्टिस्टेट'च्या वाटेत येत असलेले काटे, आक्रमक झालेले विरोधक, त्यांची वाढलेली ताकद यामुळे आगामी निवडणुकीत ऐनवेळी अडचण नको म्हणून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालकांनी तब्बल १७०० संस्था सभासद वाढवले आहेत. यातील बहूतांश संस्था सत्ताधारी नेते आणि संचालकांनी वाढवल्याने सत्तेच्या समीकरणात त्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

चार वर्षांपूर्वी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्या सत्ताधारी पॅनेलविरोधात आमदार सतेज पाटील व प्रा. संजय मंडलिक यांनी कडवी झुंज दिली. मात्र विरोधकांचे केवळ दोन संचालक निवडून आले. पाटील-मंडलिक यांच्या गटाच्या अनेक विरोधी उमेदवारांचा निसटता पराभव झाला. विरोधकांनी दिलेली चुरशीची झुंज, मतांतील कमी फरक आणि आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांची बदललेली भूमिका यामुळे आगामी निवडणूक कठीण जाणार असल्याचे सत्ताधारी आघाडीच्या लक्षात आले. त्यामुळे 'गोकुळ'ला 'मल्टिस्टेट' करण्याचा डाव खेळवण्यात आला. हा ठराव वार्षिक सभेत वादग्रस्त ठरला. ठराव मंजूर झाला असला तरी अजूनही राज्य व केंद्र सरकारची त्याला मान्यता मिळाली नाही. त्यातच विरोधकांनी कर्नाटक सरकारकडे धाव घेऊन त्या सरकारला मल्टिस्टेटला परवानगी नाकारण्यास भाग पाडले. त्यामुळे संघ मल्टिस्टेट होणार की नाही? याबाबत संभ्रमावस्था आहे.

ऐनवेळी 'मल्टिस्टेट'चा डाव अंगलट आलाच तर पर्यायी तयारी असावी म्हणून चार वर्षांत १७०० संस्था सभासद वाढवले आहेत. यातील हजारावर संस्था सत्ताधारी आघाडीच्या आहेत, ज्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. विरोधकांनी संस्था वाढविण्याचा प्रयत्न केला. पण ते दूध पुरवठा करण्याची अट पूर्ण करू शकत नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही. त्यामुळे सध्यातरी सत्ताधाऱ्यांची मते वाढली आहेत. गोकुळ मल्टिस्टेट झाल्यास सत्ताधारी आघाडी वर्षभरात आणखी हजारावर संस्था वाढवेल अशी शक्यता आहे. पण मल्टिस्टेटच्या वाटेत अडथळा कायम राहिल्यास तयारी असावी म्हणून त्यांनी चार वर्षात अतिशय नियोजनबद्धरित्या संस्था सभासद वाढवले आहेत. त्यामुळे विरोधकांना त्याचा त्रास होणार आहे.

मुश्रीफ, नरकेंमुळे अडचण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार मुश्रीफ व शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके हे यावेळी सत्ताधारी गटाबरोबर राहण्याची शक्यता नाही. त्यामुळेच सत्ताधारी गटाने आपल्याला मतदान करतील असे हजारावर संस्था सभासद वाढवले आहेत. गोकुळची सत्ता कायम ठेवण्यासाठीची त्यांची ही खेळी विरोधकांना अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत. सध्या सत्ताधारी गटात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच भाजप आणि शिवसेनेचेदेखील संचालक आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मल्टिस्टेटला राज्य सरकारकडून मान्यता न देण्याची घेतलेली जाहीर भूमिका कायम राहिल्यास अडचण नको यासाठीच सत्ताधारी नेत्यांनी आपल्या मर्जीतील संस्था सभासद वाढवले आहेत.

गोकुळ

३२४८

चार वर्षांपूर्वीच्या सभासद संस्था

१७००

वाढीव संस्था सभासद

४२००

मतदानास पात्र संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images