Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

निवडणूक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी मतदान केंद्रावर डमी व्यक्तीस पाठवल्याचे प्रकरण सांगली जिल्ह्यातील मणदूर (ता. शिराळा) येथील धनगरवाडा केंद्रावर उघड झाले. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करणे, कर्तव्यात कसुरी केल्याने विलास गणपती पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. परिणामी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून निवडणूक काम टाळण्यासाठी केलेली बनावटगिरी विलासला चांगलीच महागात पडली.

फिर्यादीत म्हटले आहे, करूंगली (ता. शिराळा) येथील मातोश्री हिराबाई देशमुख माध्यमिक विद्यालयात विलास शिपाई आहे. २३ एप्रिलला झालेल्या लोकसभा मतदान प्रक्रियेसाठी त्याची मदतनीस म्हणून हातकणंगले मतदारसंघातील मणदूर केंद्रावर नियुक्ती झाली होती. त्याच्या नियुक्तीचा आदेश सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. मात्र ते प्रत्यक्षात कामावर हजर नव्हते. त्याची चौकशी तहसीलदार गणेश शिंदे यांनी केली. त्यावेळी पाटील यांनी आपल्या जागेवर लक्ष्मण पाटील नावाच्या त्रयस्त व्यक्तीस पाठवले, असल्याचे समोर आले. लक्ष्मण यांनी दिवसभर काम करून भत्ताही घेतल्याचे स्पष्ट झाले. अशाप्रकारे फसवणूक करून कर्तव्यात कसुरी केल्याने विलास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नायब तहसीलदार कृष्णा नाईक यांनी फिर्याद दिली आहे.

नियोजनबद्ध दिशाभूल

विलास पाटील यांनी निवडणूक प्रशासनाची दिशाभूल नियोजनबद्धरित्या केल्याचेही चौकशीतून पुढे आले. त्याने आपल्या आडनावाशी साधर्म्य असलेल्या त्रयस्त व्यक्तीस केंद्रात कामास पाठवले. केंद्रात पाठवण्यासाठी विलास त्याला प्रशिक्षणासाठी सोबत घेऊन गेल्याचेही सांगितले जात आहे. विलास यांच्या सांगण्यावरून डमी लक्ष्मणने दिवसभर केंद्रात काम केले आहे. यामुळे लक्ष्मणला कारवाईतून वगळण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगलीत जुन्या नोटांचं घबाड, तिघांना अटक

$
0
0

इस्लामपूर:

वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथे छापा टाकून इस्लामपूर पोलिसांनी सुमारे १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. यामध्ये ५०० च्या जुन्या नोटांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघाजणांना ताब्यात घेतले आहे. एवढी मोठी रक्कम सापडल्याने तालुक्यात एकच खळखळ माजली आहे.

येडेमच्छिंद्र येथे जुन्या नोटा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर मंगळवारी रात्री उशिरा पोलिस निरिक्षक नारायण देशमुख यांनी पथकासह छापा टाकला. यामध्ये ५०० च्या ९९ लाख ९७ हजार ५०० रुपये किंमतीच्या जुन्या नोटा मिळून आल्याचे देशमुख यांनी सांगितले. या नोटा कुठून आल्या? व कोणाच्या आहेत? याचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प. कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेली अनेक महिने बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय आहे. जि. प. कडील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या या सात व आठ मे रेजी समुपदेशन पद्धतीने होणार आहेत. प्रशासनाने बदलीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

मंगळवारी (ता. ७) समिती सभागृह येथे सकाळी १०.३० वाजल्यापासून सामान्य प्रशासन विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. ग्रामपंचायत विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या बदल्यासाठी दुपारी दोन ते चार या वेळेत प्रक्रिया होणार आहेत. प्राथमिक शिक्षक वगळता प्राथमिक शिक्षण विभागाकडील कर्मचाऱ्यांसाठी दुपारी चार वाजता समुपदेशन बदली प्रक्रिया होईल.

बुधवारी (ता. ८) कागलकर हाऊस येथे सहा विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये आरोग्य विभाग, अर्थ विभाग, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व विशेष सेवा योजना विभागाकडील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या या समुपदेशनाने होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निसर्ग मित्र’ची समाजमनाला साद

$
0
0

लोगो : पक्षी वाचवा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पक्षी निरीक्षणाच्या निमित्ताने काही निसर्ग प्रेमी एकवटले. पक्षी निरीक्षणाचा छंद जपतानाच त्यांनी पर्यावरण जागृती, पर्यावरण संवर्धनापर्यंत कार्याची व्याप्ती वाढविली. 'निसर्ग मित्र'संस्थेची स्थापना करून निसर्ग जागृती विषयक उपक्रमांना चालना देणाऱ्या या संस्थेने पक्षी वाचवूया अशी समाजमनाला साद घातली आहे. 'पक्षी वाचवूया, निसर्गाचे वैभव जपूया 'म्हणत पर्यावरणपूरक उपक्रम राबविले.

'पक्षी वाचवूया'अभियानसाठी कृतशील पाऊल हे संस्थेच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. पक्षांना नैसर्गिक अधिवास लाभावा म्हणून वाळलेल्या दुधी भोपळ्यापासून घरटी तयार करण्याविषयी प्रोत्साहित केले. पक्षांना खाद्य म्हणून शेवगा, भोकरसह फुलवर्गीय वनस्पतींची लागवडीविषयी जागृती केली जाते. पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मातीच्या पसरट भांड्याचे वाटप केले जाते. पक्षांची घरटी ही दक्षिण उत्तर-दिशेने असावीत, शिवाय पक्ष्यांसाठी आश्रयस्थाने तयार करताना साहित्याचा वापर याविषयी संस्थेतर्फे लोकांत जागृती केली जाते.

संस्थेने प्रारंभापासून पर्यावरणाबाबत जागृती, पर्यावरण संवर्धनावर फोकस ठेवला आहे. १९८२ च्या सुमारास पक्षी निरीक्षणाचाा उद्देश ठेवून निसर्ग प्रेमी एकवटले. सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, डॉ. सुभाष आठले, डॉ. विजय करंडे यांचा निसर्ग मित्र संस्थेच्या स्थापनेत पुढाकार. त्यांच्यासह संस्थेच्या संस्थापक सभासदांमध्ये डॉ. जय सामंत, वसंतराव शिरगावकर, डॉ. पुष्पा बेर्डे, प्रा. श्री. द. महाजन, आदम मुजावर, शेखर पडळकर आदींचा समावेश होता. पक्षी निरीक्षण, जंगलभ्रमंती, वृक्षारोपण, परसबाग या माध्यमातूनय 'निसर्ग मित्र' मंडळींनी पर्यावरण संवर्धनाचा विचार सातत्याने समाजसमोर ठेवला. १९९० च्या दशकात यामध्ये पर्यावरण अभ्यासक डॉ. मधुकर बाचूळकर सामील झाले.

बीज संकलन, पुस्तक प्रकाशनही

'निसर्ग मित्र'संस्थेने रंकाळा तलाव बचाव, पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी उपक्रम, सह्याद्री बचाव, पर्यावरणपूरक गणपती उत्सव, वृक्ष दत्तक उपक्रमावर भर दिला. महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा व्यवस्थापन समिती, हरित सेना या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी काम केले. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने दरवर्षी देशी वृक्षांचे बीज संकलन केले जाते. बेल, शेंद्री, जांभूळ, कडिपत्ता, सीताअशोक, जारुळ, बहावा, पारिजातक, सोनचाफा अशा झाडांच्या बिया संकलित केल्या आहेत. पर्यावरणपूरक काम करताना संस्थेने 'ओळख रानभाज्यांची, फ्लोरा ऑफ सागरेश्वर वाइल्ड लाइफ सेन्चुरी'ही पुस्तके प्रकाशित केली आहेत.

संस्थेचे पर्यावरणपूरक उपक्रम

कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण

कचरा व्यवस्थापन विषयक जागृती

कचऱ्यापासून बायोगॅस व खतनिर्मिती प्रशिक्षण

नैसर्गिक रंगाच्या निर्मितीसाठी कार्यशाळा

देवराया वाचवूया उपक्रम

रानभाज्यांचे संवर्धन, परसबाग कार्यशाळा

निसर्ग संवर्धन, पक्षी वाचवा अभियानसाठी संस्था विविध पातळीवर कार्य करते. 'पक्षी वाचवूया'उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना सामावून घेण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली. मातीच्या पसरट भांडयाचे वाटप, पक्ष्यांना खाद्य म्हणून फुलवर्गीय वनस्तींची लागवड याविषयी प्रबोधन केले जाते.

अनिल चौगुले, कार्यवाह निसर्ग मित्र संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पुलावर सेनेचा रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पशुखाद्याचे दर कमी करावेत, गायीच्या दूध दरात दोन रुपयांनी वाढ करावी, या मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने शिवाजी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर गोकुळने पशुखाद्याच्या दरात पोत्यामागे १०० रुपये दरवाढ केली आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेने आंदोलन केले. ३० एप्रिपला शिवसेनेने म्हशींसह गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी बारा वाजता अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी निषेधाचा घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलनात माजी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, धनंजय सावंत, एस. आर. पाटील, सुजित चव्हाण, राजू जाधव यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. यापुढील काळात आजरा, चंदगड, गोकुळ शिरगाव, बिद्री येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जयप्रभा’ची मालकी लता मंगेशकरांकडेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जयप्रभा स्टुडिओ ही लता मंगेशकर यांची खासगी मालमत्ता असून, त्यावर कोणतेही आरक्षण नाही. त्यामुळे स्टुडिओची मालकी लता मंगेशकर यांच्याकडेच कायम राहणार असून त्यावर बांधकाम करण्यास मुभा राहील, असा महत्त्वपूर्ण निकाल वरिष्ठस्तर सहदिवाणी न्यायाधीश ए. ए. भोसले यांनी दिला. मंगेशकर यांच्याविरोधात अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि चित्रपट व्यावसायिकांनी दाखल केलेला दावा जिल्हा न्यायालयाने खर्चासह फेटाळला.

स्टुडिओची जागा विकसकाला देण्याच्या विरोधात चित्रपट महामंडळासह चित्रपट व्यावसायिकांनी कोल्हापूर महापालिका आणि लता मंगेशकर यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. या दाव्यावर गेल्या महिन्यात दोन्ही पक्षाच्यावतीने युक्तिवाद पूर्ण झाले. मंगेशकर यांच्यावतीने अॅड. महादेवराव आडगुळे यांनी तर महामंडळाच्यावतीने अॅड. प्रकाश मोरे यांनी बाजू मांडली. सोमवारी या दाव्यावर अंतिम सुनावणी झाली.

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्याकडून लता मंगेशकर यांनी हा स्टुडिओ खरेदी केला होता. स्टुडिओच्या जागेपैकी सात एकर जागा त्यांनी विकसकाला विकली. त्यावर इमारत उभारण्यात आली. उर्वरित साडेतीन एकरच्या विक्रीबाबत २०१२ मध्ये खासगी विकसकास ही जागा दिल्याने त्यांच्या विरोधात कोल्हापूरकरांनी आंदोलन केले. त्यावेळी चित्रपट महामंडळाने स्टुडिओ राज्य सरकार आणि कोल्हापूर महापालिकेने ताब्यात घ्यावा व त्याठिकाणी चित्रपट निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. या जागेचा वापर व्यापारीकरणासाठी करू नये यासाठी लता मंगेशकर यांना कायमस्वरुपी मनाई करावी यासाठी कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता.

स्टुडिओबाबत १९४७ मध्ये झालेल्या खरेदीपत्रात तत्कालीन संस्थानने ही मिळकत चित्रपट निर्मितीसाठीच वापरावी, अशी अट घातली होती. ती अट १९८२ मध्ये महाराष्ट्र सरकारने रद्द केली. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी या मिळकतीचा वापर करण्याचा अधिकार मंगेशकर यांना आहे. ही मिळकत २०१२ मध्ये वारसास्थळाच्या वर्ग तीनच्या यादीत असली तरी आयुक्त आणि वारसास्थळ समितीच्या परवानगीनेच या जागेत बांधकाम करण्याची मुभा आहे. तसेच चित्रपट महामंडळातर्फे यशवंत भालकर आणि लता मंगेशकर यांच्यावतीने वटमुखत्यार विलास बाबुराव यादव यांच्या साक्षी यापूर्वी झाल्या आहेत. त्याआधारे हा दावा फेटाळण्यात आला.

यासंदर्भात झालेल्या सुनावणीत जयप्रभा स्टुडिओ ही लता मंगेशकर यांनी १९५९ मध्ये कोर्ट लिलावामध्ये खरेदी केलेली वैयक्तिक मिळकत आहे. या जागेवर महापालिकेने २००६ साली बागबगीचा व सांस्कृतिक केंद्राचे आरक्षण टाकले होते. मात्र दोन वर्षांनी म्हणजेच २००८ मध्ये दुसऱ्या विकास आराखड्यात या जागेवर कोणतेही सार्वजनिक आरक्षण टाकले नाही. त्यामुळे जागेवर अन्य कोणत्याही व्यक्ती संस्था किंवा सरकारला हक्क सांगता येणार नाही. तसेच या मिळकतीत मंगेशकर यांनी कोणतीही पाडापाडी केलेली नाही किंवा विक्री करण्याचा निर्णय घेतलेला नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. आडगुळे यांनी केला.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाहू समाधिस्थळ काम २६ जूनपूर्वी पूर्ण करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधिस्थळाच्या स्मारकाचे तसेच संरक्षण भिंतीचे व सुशोभिकरणाचे काम २६ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापौर सरिता मोरे यांनी दिले. स्मारकाच्या कामाला गती येण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ताराराणी सभागृहात बैठक घेण्यात आली. दरम्यान, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सहा मे रोजी स्मारकाच्या ठिकाणची पाहणी केली जाईल, असे सांगितले.

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, 'मेघडंबरीचे एक कोटी रुपये खर्चाचे काम पूर्ण झाले आहे. संरक्षक भिंतीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी पाच कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.' स्मारक समिती सदस्य इंद्रजित सावंत म्हणाले, 'संरक्षक भिंतीचे काम सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, ते लवकर पूर्ण करावे. या परिसरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सभागृह असून, ते विकसित करण्यासाठी ४० लाखांची गरज आहे.'

स्मारक समिती सदस्य वसंतराव मुळीक यांनी, समाधिस्थळ ऐतिहासिक स्मारक होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत असे सांगितले. अदिल फरास यांनी, स्मारकाचे लवकरात लवकर लोकार्पण व्हावे अशी सूचना केली. माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी समाधिस्थळाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची सूचना केली. आयुक्त कलशेट्टी म्हणाले, 'शाहू समाधिस्थळ कोल्हापूरवासीयांच्या आस्मितेचा प्रश्न आहे. येथील कामांचा पाठपुरावा केला जाईल. येत्या ६ मे रोजी समाधिस्थळी जाऊन पाहणी केली जाईल. ७० लाखांची जी उर्वरित कामे आहेत त्याची वर्कऑर्डर आचारसंहितेनंतर तातडीने काढली जाईल.'

यावेळी प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, नगरसेविका हसीना फरास, मेहेजबीन सुभेदार, अभिलेखा अधिकारी गणेशकुमार खोडके, ठेकेदार व्ही. के. पाटील, अफजल पिरजादे, आदी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्यवस्थापन’चे सदस्य कुलपतींच्या भेटीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या आठ सदस्यांनी राज्यपाल तथा कुलपती के. विद्यासागर राव यांची गुरुवारी भेट घेतली. त्यांनी विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची कुलपतींना माहिती दिली. शिष्टमंडळाला मार्गदर्शन करताना राव यांनी, 'विद्यापीठाने ऊस, गूळ व चर्मोद्योगावर संशोधन करुन विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात'असे आवाहन केले.

विद्यापीठातील सध्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन परिषद सदस्यांनी घेतलेली भेट व 'सुटा'तर्फे मुंबई येथे सहा मे रोजीच्या आंदोलनाची घोषणा या दोन्ही घटना शैक्षणिक वर्तुळात चर्चेच्या ठरल्या आहेत. विकास आघाडीशी निगडीत व कुलपती नियुक्त सदस्य मिळून व्यवस्थापन परिषदेमधील आठ जणांनी गुरुवारी दुपारी राजभवन येथे कुलपतींची भेट घेतली. व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी यांनी 'गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत विद्यापीठाच्या हिताच्या विविध योजनांची अंमलबजावणी झाली आहे. व्यवस्थापन परिषदेचा विद्यार्थीकेंद्रित व सकारात्मक कामकाजावर भर आहे. तसेच विद्यापीठ कायदा व परिनियमावलीचे उल्लघंन होणार नाही यासाठी परिषद प्रयत्नशील आहे,' अशी माहिती दिली.

शिष्टमंडळात सदस्य डॉ. विवेक खानझोडे, डॉ. भारती पाटील, संजय जाधव, अॅड. धैर्यशील पाटील, लोभाजी भिसे, डॉ. चंद्रशेखर कारंडे, प्राचार्य डॉ. धनाजी कणसे आदींचा समावेश होता. शिष्टमंडळातील सदस्यांशी चर्चा करताना राज्यपालांनी विद्यापीठाने संशोधनाच्या माध्यमातून कष्टकरी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल यासाठी प्रयत्नशील राहावे असे नमूद केले.

अनेक उपक्रम स्तुत्य

शिवाजी विद्यापीठाने शहीद जवानांना मुलांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एक हजार मुलींना मोफत एसटी प्रवासाची सुविधा निर्माण केली आहे. हे दोन्ही निर्णय ग्रामीण भागातील मुला, मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यासाठी मोलाच्या आहेत असे गौरवोद्गार राज्यपाल राव यांनी काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शिवाजी’च्या संकेतची संतोष ट्रॉफीमध्ये कमाल

$
0
0

लोगो : माय सिटी माय प्राइड

'शिवाजी'च्या संकेत साळोखेची

संतोष ट्रॉफीमध्ये कमाल

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर म्हणजे फुटबॉल खेळातील प्रतिभावंतांची खाण. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या खेळातून अनेक दिग्गज खेळाडू निर्माण झाले. त्यांनी आपल्यातील अंगभूत कौशल्याने राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारत कोल्हापूरचे नाव देशपातळीवर पोहोचवले. यामध्ये विशेषत: सर्वात जुन्या अशा शिवाजी तरुण मंडळाने आघाडी राखली आहे. संघाच्या संकेत अनिल साळोखे याने सलग दोन वर्षे राष्ट्रीय स्तरावरील संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत प्रतिनिधीत्व करुन या परंपरेत आपले स्थान मिळवले आहे.

कोल्हापूरच्या गावठाण भागात फुटबॉलचे वेड कायमपणे जपले. त्याला पेठापेठांतील व तालमीमधील ईर्ष्या कारणीभूत असली, तरी अनेकांनी फुटबॉलवर जीवापाड प्रेम केले. आता त्याला व्यावसायिकतेची जोड मिळत आहे. परिणामी फुटबॉल रसिकांमध्ये त्यांनी आदराचे स्थान मिळवले. असेच स्थान मिळवण्याचा प्रयत्न सध्या शिवाजी पेठ येथील संकेत साळोखे करत आहेत. केवळ प्रयत्न न करता यातूनच करिअर घडविण्याचा ध्यास घेतला आहे.

संकेतचे वडील अनिल साळोखे हे एका सराफ दुकानात काम करतात. इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना फुटबॉलमध्ये करिअर करता आले नाही. मात्र ही कमतरता ते संकेतच्या रुपाने भरुन काढत आहेत. संकेतही आपल्या खेळातून त्यांना निराश करत नाही. महाराष्ट्र हायस्कूलमध्ये प्रथम प्रदीप साळोखे यांच्याकडून फुटबॉलचे धडे घेताना त्याने शालेय राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. सुब्रतो मुखर्जी स्पर्धेत त्याने प्रत्येक वयोगटात छाप पाडली. ड्रिबल, कटिंगमध्ये माहीर झालेला संकेतने विशेषत: हेडद्वारे गोल करण्यात पटाईत आहे. स्थानिक स्पर्धेत त्यांने अनेकदा लेफ्ट विंगमधून प्रेक्षणीय गोलची नोंद केली. त्याची हीच कामगिरी त्याला दोनवेळा संतोष ट्रॉफीपर्यंत नेण्यास कारणीभूत ठरली. कुडित्रे येथील स. ब. खाडे महाविद्यालयामध्ये एसवायबीएचे शिक्षण घेताना त्याने फुटबॉलवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. प्रशिक्षक प्रा. अमर सासने आणि अभिजित वणिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव सुरू आहे.

लियानल मेस्सी, नेयमार व सुनील छेत्रीला आदर्श मानून फुटबॉलमध्ये सध्या संकेत झोकून देत आहे. फुटबॉलसाठी लागणारे अनेक कौशल्य आत्मसात करुन व्यावसायिक क्लबमध्ये जाण्यासाठी त्याचे कसोशीने प्रयत्न आहेत. त्यासाठी तो भारतीय फुटबॉल संघात स्थान मिळवलेल्या निखिल कदम, सुखेदव पाटील, अनिकेत जाधव यांना फॉलो करत आहे.

फिटनेसवर भर

शालेय स्तरापासून संकेत फुटबॉलचे मैदान गाजवत आहे. महाराष्ट्र हायस्कूलकडून खेळताना त्याने प्रत्येक प्लेसवर आपली चुणूक दाखवली. मंडळाकडून लेफ्ट विंगर म्हणून तो आपली छाप पाडण्यास यशस्वी होत आहे. यशस्वी खेळ करताना त्याची किरकोळ शरीरयष्टी अडथळा ठरली. त्यावर मात करण्यासाठी तो फिटनेसवर अधिक भर देत आहे. त्यासाठी फुटबॉल सरावासोबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डायट प्लन करून दररोज जीममध्ये तयारी करीत आहे.

फुटबॉलमध्ये करिअर करण्याचे निर्धार शालेय स्तरापासूनच केला. त्यासाठी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात सराव करतो. व्यावसायिक क्लबमध्ये स्थान मिळवण्यासाठी काही जुन्या खेळाडूंकडून टीप्स घेत आहे.

- संकेत साळोखे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेदरकार वाहतुकीने जीव टांगणीला

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे शहरात रोज अनेकांचे जीव टांगणीला लागलेले असतात. पोलिसांच्या कारवाईला न जुमानता हुल्लडबाजांची टोळकी वर्दळीच्या रस्त्यांवर स्टंटबाजी करून इतरांच्या जिवाला धोका निर्माण करतात. अशा वाहनधारकांवर वेळीच कडक कारवाई होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

बेशिस्त वाहनधारकांमुळे शहरात गर्दीच्या ठिकाणी पादचाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागते. जागा मिळेल तिथे केलेले वाहनांचे पार्किंग आणि फेरीवाले, दुकानांच्या अतिक्रमणांमुळे रस्त्यांवर प्रचंड कोंडी होते. यातच हुल्लडबाज, स्टंटबाज वाहनधारकांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही मुश्कील होते. शळा, कॉलेजला सुट्या लागल्याने दुचाकी उडवणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी वर्दळीच्या रस्त्यांवर तरुणांची टोळकी दुचाकी घेऊन बाहेर पडतात. क्रशर चौक ते रंकाळ उद्यान, रंकाळ टॉवर ते रंकाळा चौपाटी, महावीर गार्डन परिसर, नागाळ पार्क, ताराबाई पार्क, राजारामपुरी, सायबर परिसर अशा अनेक ठिकाणी बाइकस्वारांचे स्टंट सुरू असतात. अनेकदा दुचाकींच्या पुंगळ्या काढून कर्कश्श आवाज केला जातो. समोरून येणाऱ्या वाहनांना कट मारून पुढे जाणे, पाठीमागून येताना अचानक आरडाओरडा करणे, ट्रिपलसिट गाडी चालवणे, कर्कश्श हॉर्न वाजवणे असे प्रकार नेहमीच सुरू असतात.

शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून गेल्या वर्षभरात हुल्लडबाज वाहनधारकांविरोधात विशेष मोहीम राबवली गेली. दुचाकी चालवणाऱ्या शळा, कॉलेजच्या मुलांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. विद्यार्थ्यांसह पालकांचेही प्रबोधन केले. मात्र, गेल्या दीड महिन्यात पोलिस निवडणुकीच्या कामात अडकल्याने बेशिस्त वाहनधारकांवरील कारवाया घटल्या आहेत. यातच शाळा, कॉलेजच्या परीक्षा संपल्याने रिकामटेकड्या तरुणांकडून मौजमजेच्या नावाखाली बेदरकारपणे गाड्या उडवणे सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी महावीर गार्डन परिसरात हुल्लडबाज दुचाकीस्वारामुळे अपघात ओढवला होता. गेल्या आठवड्यात निवडणूक कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यासही समोरून आलेल्या भरधाव दुचाकीमुळे जीव गमवावा लागला. शहरात रोजच किरकोळ अपघात घडत आहेत.

दुचाकीस्वारांसह काही कारचालक आणि एसटीचे चालकही धोकादायक पद्धतीने वाहने चालवून स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालतात. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातून कोकणात जाणाऱ्या एका एसटीच्या चालकाने व्हिनस कॉर्नर ते दसरा चौक मार्गावर बेदरकारपणे एसटी चालवून प्रवाशांसह वाहनधारकांचा जीव धोक्यात घातला. नागरिकांनी पाठलाग करून त्या एसटी चालकास समज दिली. ट्रॅफिक सिग्नल तोडून पुढे जाणे, सिग्नलवर शॉर्टकट मारणे, वनवेतून उलट्या दिशेने वाहन चालवणे, गर्दीच्या ठिकाणी नो पार्किंगमध्येच वाहन पार्क करणे, धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करणे असे प्रकार अनेकदा सुरू असतात. पोलिसांनी पुन्हा बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारून रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षित करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

नोटिसा मिळूनही सुधारणा नाही

वाहनधारकांची बेशिस्त शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद होते. अशा बेशिस्त वाहनधारकांना पोलिसांकडून थेट घरी नोटीस पाठवली जात आहे. गेल्या वर्षभरात सुमारे १० हजारांहून अधिक वाहनधारकांना नोटिसा पाठवल्या आहेत. आरटीओकडून दंड आणि लायसन जप्तीच्या कारवायादेखील सुरू आहेत. मात्र, कारवाया होऊनही वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्तीचा अभाव असल्याचे मत पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

गतीच्या वेडापायी अनेक तरुण भरधाव वाहने चालवतात. याचा फटका सामान्य नागरिक आणि इतर वाहनधारकांना बसतो. रस्त्याने सुरक्षितपणे चालणेही अवघड बनले आहे. सुट्टीच्या काळात पोलिसांनी विशेष दक्षता घेऊन बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करावी.

- नरेश अग्रवाल, नागरिक

वाहनधारकांनी स्वत:हून नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतात. मुद्दाम भरधाव वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाया केल्या जात आहेत. दंडवसुलीसह त्यांना नोटिसाही पाठवणे सुरू आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या हतात वाहन देताना नियमांचे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात.

- अनिल गुजर, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचे पाणी पिण्यासाठी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सम्राटनगरात राहणारे उद्योजक नितीन देसाई हे आपल्या बंगल्याच्या स्लॅबवरील पावसाचे पाणी पूर्ण उन्हाळ्यात पिण्यासाठी वापरतात. गेल्या दोन वर्षांपासून रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाद्वारे ते ५०० स्क्वेअर फूट स्लॅबवरील पावसाचे पाणी जमिनीत बांधलेल्या टाकीत साठवतात. ते पाणी उन्हाळ्यात पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वापरतात. उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे भविष्यात पाणी बचतीशिवाय पर्याय नाही. पाण्याची बचत करणे, साठवणे, वाचवणे, मुरवण्यासंबंधी जागृतीसाठी निसर्गमित्र संस्थेतर्फे देसाई यांच्या बंगल्यात पाणी जागृती कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी देसाई हे रेनवॉटर हार्वेस्टिंगचा यशस्वी प्रकल्प उभारून कृतीतून पाणीबचतीचे कसे धडे गिरवत आहेत, त्याची माहिती संस्थेचे अनिल चौगुले यांनी दिली.

उद्योजक देसाई म्हणाले, 'सम्राटनगरातील ३२०० स्वेअर फूट जागेत दोन वर्षांपूर्वी बंगल्याचे बांधकाम काढले. त्याचवेळी दीपक देवलापूरकर यांच्या सल्ल्यानुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारला. त्यासाठी १ लाख १७ हजार रुपये खर्च केले. घरावरील एक हजार स्क्वेअर फुटांपैकी ५०० स्क्वेअर फूट स्लॅबवर पडणारे पाणी एकत्र केले. ते पाइपद्वारे आणून जमिनीत बांधलेल्या टाकीत सोडले आहे.'

देसाई हे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी स्लॅब स्वच्छ धुवून घेतात. पावसाळ्यात सुरुवातीचे काही दिवस स्लॅबवरील पाणी संकलित केले जात नाही. नंतर स्लॅबवरचे पाणी टाकीत सोडले जाते. या पाण्यातून कचरा, मातीचे लहान कण टाकीत जावू नयेत यासाठी टाकीला वरच्या बाजूला साधा फिल्टर बसवला आहे. त्यामुळे स्वच्छ पाणी टाकीत जाते. ७००० लिटर क्षमतेची टाकी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आपोआप पाणी एका व्हॉल्व्हद्वारे बाहेर पडते. साठलेल्या पाण्यावर सूर्यप्रकाश पडू नये असे टाकीचे बांधकाम आहे. हे पाणी थेट पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वापरले जाते. घरातील चार सदस्यांना उन्हाळ्यात वापरून पाणी शिल्लक राहते.

उद्योजक देसाई यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमावेळी शहर उपअभियंता आर. के. पाटील यांनीही पाणी बचतीचे महत्व विशद केले. ते म्हणाले, 'महानरपालिकेतर्फे रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारणीसाठी प्रोत्साहन दिले जाते. मोठ्या गृह प्रकल्पांना याची सक्तीच आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बचतीवर लक्ष केंद्रीत केलेच पाहिजे.'

सांडपाण्याचा पुर्नवापर

उद्योजक देसाई यांनी हँडवॉश, बाथरूमचे सांडपाणीही एका टाकीत संकलित केले आहे. त्या पाण्यावर घराजवळील बागेचे नियोजन केले आहे. या सांडपाण्याचा वापर झाडांसाठी होतो. लॉनसाठीही हे पाणी वापरले जाते. दररोज केवळ ६५० मिली पाणी स्प्रेव्दारे फवारून चारचाकी मोटार धुण्याचे तंत्रही त्यांनी अवगत केले आहे. अशा पद्धतीने आपल्या कृतीतून उद्योजक देसाई पाणी बचतीचा संदेश ते देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवजयंतीचा उत्साहाला चढला रंग

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अक्षय्यतृतीयेदिवशी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या उत्साहाला कोल्हापुरात रंग चढला आहे. पेठ, तालीम व तरूणाईच्या वर्तुळात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील कुंभार गल्लीमध्ये शिवप्रतिमांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. तर पताका, भगवे झेंडे यांच्या स्टॉलनी बाजारपेठेतही शिवजयंतीची चाहूल ठळक केली आहे.

पताका व झेंड्यांनी बाजारपेठ शिवमय

शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका व झेंड्यांमुळे वातावरण शिवमय झाले आहे. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ, सिंहासनारूढ, लढाऊरूप तसेच बालशिवाजी रूपातील प्रतिमांच्या खरेदीला शहरातील पापाची तिकटी कुंभार गल्ली, शाहूपुरी कुंभारगल्ली येथे गर्दी वाढू लागली आहे. बाजारगेट, मिरजकर तिकटी, ताराबाई रोड, पापाची तिकटी, पानलाइन या भागातील बाजारपेठेत भगव्या पताका विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत. तसेच जय शिवाजी अक्षरे लिहिलेल्या झेंडयांनाही मागणी वाढली आहे. शिवजयंती मिरवणुकीस सहभागी होण्यासाठी शिवाजी महाराज, शहाजीराजे, जिजाऊ, बालशिवाजी, मावळे यांच्या वेशभूषा खरेदीसाठी ड्रेपरी व्यावसायिकांकडे बुकिंग करण्यास सुरूवात झाली आहे. तसेच चंद्रकोर, कानातले डूल यांनाही मागणी वाढली आहे.

संयुक्त रविवार पेठेतर्फे उत्सव

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संयुक्त रविवार पेठ मंडळाच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. गेल्या दहा वर्षांपासून

रविवार पेठ भागातील ७० ते ८० मंडळे एकत्र येऊन संयुक्तरित्या ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. यावर्षी हा उत्सव ३ ते ६ मे दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रवीण सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवाजी महाराजांचा भव्य चित्ररथ, जो २०१८ च्या स्वातंत्र्यदिनसंचालना मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्ररथाची प्रतिकृती आणि तांत्रिक देखावा आहे हे यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण आहे. तो रथ कोल्हापुरात या शिवजयंती उत्सवानिमित्त बघायला मिळणार आहे. तसेच कोल्हापुरात प्रथमच भव्य २० बाय ९० पिक्सल व्हिडिओ लाइट सिस्टीम पहायला मिळणार आहे. ऐतिहासिक तलवारी, विविध शस्त्रे यांचे शस्त्र,नाणी, पुस्तके प्रदर्शन, शिवाजी महाराजांची प्रतिकृती असणारे टी शर्ट,टॅटू,स्टॉल्स ऐतिहासिक पोवाडा, लहान मुलांसाठी ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला, रविवारी अतिषबाजी करण्यात येणार आहे. मुख्य दिवशी सोमवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी जन्मकाळ व सुंठवडा वाटप करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीचे केरळचे वाद्यवृंद आकर्षण ठरणार आहे. पारंपारिक वेशभूषेसह, लेझीम ढोल पथक व इतर वाद्य त्याचप्रमाणे फेटा बांधलेल्या महिलांचा लक्षणीय सहभाग असणार आहे. या माध्यमातून संकलित निधीपैकी उर्वरित सर्व निधी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व आरोग्य विमा यासाठी देण्यात येणार आहे. यावेळी अजित गायकवाड, मोहन पोवार, सुनील खोत, बाळासाहेब मुधोळकर, गजानन तोडकर, रवींद्र पाटील, विनायक चंदूगडे, संजय तोरस्कर, महेश ढवळे, रतन हुलस्वार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवनदायिनी मृतवत

$
0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असणारी पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यात मृतवत झाली आहे. नदीच्या प्रदुषणाने आजवर अनेकांचा बळी घेतला आहे. जलपर्णीचा विळखा, काळसर, हिरवट रंगाचे रसायनयुक्त पाणी अशी या नदीची स्थिती आहे. शिरोळ तालुक्यातील पंचगंगेकाठच्या अनेक गावातील नागरिकांना हेच पाणी प्यावे लागते. राजकीय मंडळींची उदासिनता आणि प्रशासनाची अकार्यक्षमतेमुळे स्थिती गंभीर बनली असून आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनास जाग येणार? असा प्रश्‍न आहे.

प्रयाग चिखलीजवळ उगम पावलेल्या पंचगंगा नदीने कोल्हापूर जिल्हा सुजलाम् सुफलाम् केला आहे. हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आल्याने जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावला आहे. मात्र, गेल्या चौदा वर्षांपासून नदीच्या प्रदुषणात वाढ झाली असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. दरवर्षी नदी प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील नागरिकांना बसतो. प्रदूषणामुळे रुग्णांची संख्याही वाढली आहे.

शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीत पंचगंगा ही कृष्णा नदीत मिसळते. बारमाही वाहणाऱ्या पंचगंगा नदीत कोल्हापूर व इचलकरंजी शहराचे मैलामिश्रीत सांडपाणी, औद्योगिक वसाहतींचे रसायनयुक्त सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना मिसळत असल्याने शिरोळ तालुक्यात स्थिती गंभीर आहे. येथे नदीचे पात्र जलपर्णीने व्यापले आहे. पात्रातील काळसर, हिरवट रंगाच्या पाण्यामुळे मासे तसेच अन्य जलचर यापूर्वीच मृत्यूमुखी पडले आहेत. धरणगुत्ती, नांदणी, हेरवाड, तेरवाड, शिरढोण, टाकवडे, शिरदवाड यांसह अन्य गावांच्या नळपाणी पुरवठा योजना पंचगंगा नदीवर अवलंबून आहेत. प्रचंड दुर्गंधी असल्याने नदीतील पाणी जनावरेही पीत नाहीत. त्यामुळे नळाचे प्रदुषीत पाणी प्यायचे कसे हा ग्रामस्थांसमोर प्रश्‍न आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पेयजल प्रकल्पांवर अवलंबून रहावे लागते. गावोगावच्या पाणीयोजना आता अडचण नसून खोळंबा अशी स्थिती आहे.

पंचगंगा नदीत रासायनिक सांडपाणी मिसळले की, दरवर्षी जलचर मरतात. मृत मासे पाण्यावर तरंगतात, पाण्यास दुर्गंधी सुटते. प्रदूषण रोखण्यासाठी शिरोळ तालुक्यातील नागरिक टाहो फोडतात, रस्त्यावर उतरून आंदोलनाचे हत्यार उपसतात. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास धडक देऊन नदीच्या पाण्याचे नमुने घेण्यास भाग पाडतात. मात्र, प्रदूषण करणाऱ्या घटकांना नोटीस बजाविण्यापलिकडे ठोस कारवाई होताना दिसत नाही. सात वर्षांपूर्वी पंचगंगा नदीकाठच्या गावांना प्रदुषणाचा फटका बसला. काविळीने तब्बल ३८ जणांचा बळी गेला. प्रदूषण करणार्‍या घटकांवर कारवाई करण्याचे आदेशही निघाले. मात्र नंतर प्रशासन ढिम्म आहे. पंचगंगेचे दुषीत पाणी नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीपात्रात मिसळत असल्याने कृष्णेचे पाणीही प्रदुषित होत आहे. परिणामी इचलकरंजी, नृसिंहवाडी, कुरुंदवाड, औरवाड, शिरोळ, आलास, बुबनाळ, अकिवाट, मजरेवाडी, राजापूर, खिद्रापूर यांसह अन्य गावांनाही प्रदुषणाचा फटका बसत आहे. राजकीय मंडळींची उदासिनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदी प्रदुषणाचा प्रश्‍न दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत आहे. शिरोळ तालुक्यात नदीकाठच्या गावांतील नागरिकांना आजही दूषीत पाण्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.

नोव्हेंबरनंतर वाढ

प्रतिवर्षी नोव्हेंबरनंतर नदीच्या प्रदुषणाची तीव्रता वाढते. दुषीत पाणी मिसळल्याने पंचगंगा नदीची अक्षरशः गटारगंगा बनते. नदीतील मासे व अन्य जलचर मृत होवून पाण्यावर तरंगतात अन् नदीकाठी प्रचंड दुर्गंधी सुटते. साखर कारखान्यांचे सांडपाणीही नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने प्रदुषणाची तीव्रता अधिक वाढते.

कृष्णेचेही प्रदूषण

शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीवरील राजापूर बंधार्‍याच्या बॅकवॉटरचा लाभ पंचगंगा नदीकाठच्या अनेक गावांना होतो. मात्र, आता पंचगंगा नदीच्या दुषित पाण्यामुळे कृष्णा नदीही प्रदुषीत होत आहे. तालुक्यात नांदणी, धरणगुत्तीसह अनेक गावांना पंचगंगेचे पाणी प्यावे लागते. परिणामी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

इचलकरंजीला फटका

इचलकरंजी शहरासाठी कृष्णा नदीतून पाण्याचा उपसा केला जातो. नृसिंहवाडीत कृष्णा-पंचगंगा संगमापासून काही अंतरावर जॅकवेल आहे. पंचगंगा नदीच्या प्रदुषणाची तीव्रता वाढल्यास इचलकरंजीकरांनाही याचा फटका बसतो. नृसिंहवाडी, कुरूंदवाड, बुबनाळ, औरवाडसह परिसरातील अन्य गावांनाही दुषित पाणी प्यावे लागते. यामुळे पंचगंगा नदी प्रदुषण रोखण्यासाठी ठोस कारवाईची गरज आहे.

आरोग्यावर परिणाम

शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी पंचगंगा नदी प्रदुषणप्रश्‍नी वेळोवेळी आंदोलने छेडली आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी येतात, दुषीत पाण्याचे नमुने घेतात. मात्र प्रदुषणास जबाबादार प्रोसेस व अन्य कारखान्यांवर कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. दुसरीकडे नदी प्रदुषणामुळे शिरोळ तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे.

फोटो

- शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदीपात्रात काळसर, हिरवट रंगाचे पाणी असून नदीचे पात्र जलपर्णीने व्यापले आहे.

- तेरवाड बंधार्‍याजवळ टिपलेले छायाचित्र.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यातील १६० गावांना टँकरने पाणीपुरवठा

$
0
0

साताऱ्यातील १६० गावांना टँकरने पाणीपुरवठा

सातारा :

सातारा जिल्ह्यात टंचाईची स्थिती अधिक तीव्र होत आहे. सध्या १६० गावे आणि ७२३ वाड्यांसाठी १९१ टँकर सुरू आहेत. १९१ टँकरना ४२५ खेपा पुरवाव्या लागत आहेत, तर तीन लाख नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. माणमधील सर्वाधिक ६७ गावे आणि ५२८ वाड्या या टंचाईच्या तडाख्यात सापडल्या आहेत. माण तालुक्यातील मध्यम व लघु पाटबंधारेचे दहापैकी सहा तलाव पूर्णत: कोरडे पडले आहेत. सहा तलावांपैकी चारमध्ये मृतसाठा असल्याने तालुक्यातील जनतेला भीषण पाणीटंचाई भासत आहे. ९५ टँकरने १९७ टँकरच्या खेपाने ६७ गावे व ५२८ वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे, तर तालुक्यातील ४७ विहिरींचे अधिग्रहण करून पुरवठा सुरू असला तरी अनेक वाड्या-वस्त्यांवर टँकरच्या नियमानुसार फेऱ्या होत नसल्याने अनेकवेळा ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.

खटाव तालुक्यात सरकारने १४३ गावांपैकी १२७ गावांमध्ये टंचाई घोषित करून सर्व सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने ३९ गावांमध्ये ९५ खेपांद्वारे टँकर सुरू करून काही प्रमाणात ग्रामस्थांची तृष्णा भागविण्याचा प्रयत्न केला आहे. जावळी तालुक्यातील ५६ गावांमध्ये पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. सुमारे २० गावांचे टंचाई प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले आहेत. यापैकी फक्त चार गावांमध्ये टँकर सुरू केले आहेत. कोरेगाव तालुक्यात १३८ पैकी ८६ गावे प्रशासनाने टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत.

.....

कराड : कराड तालुक्यात ६१ पाझर तलाव आहेत. त्यापैकी ४४ पाझर तलाव आटले आहेत. ४४ तलाव फेब्रुवारीच्या मध्यावरच कोरडे पडले असून, उर्वरित १७ तलावांत केवळ ५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्कलकोट नगरी दुमदुमली

$
0
0

सोलापूर :

दिगंबरा दिगंबरा...श्रीपाद वल्लभ दिगंबरा..! श्री क्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १४१व्या श्रींच्या पुण्यतिथी निमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पहाटे रथोत्सव, विधीवत पूजा, धार्मिक कार्यक्रम, पारायण, महाप्रसाद, रक्तदान, सेवेकरी निवासाचे उद्घाटन व जिम्नॅशियमचा ११ वा वर्धापन दिन मान्यवरांच्या भेटी व सत्कार आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गेल्या ३० वर्षापासून श्रींची पुण्यतिथी साजरी केली जाते. या बरोबरच नगर प्रदक्षिणेच्या शेवटच्या सात दिवस रथ सप्ताह असतो यामध्ये न्यासाच्या रथाचा सहभाग असतो. दरम्यान, गुरुवारी पहाटे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील पूजनानंतर अमोलराजे भोसले यांच्या हस्ते रथाचे पूजन करून बुधवार पेठेतील समाधी मठाकडे मार्गस्थ करण्यात आले.

महाप्रसादालयात सकाळी स्वामींचे पारायण संपन्न झाले. दुपारी साडेअकराच्या दरम्यान श्री व अन्नपूर्णा, महाप्रसादाचे पूजन आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्या करण्यात आले. या वेळी अन्नछत्र मंडळातील नैवेद्य श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, बुधवार पेठेतील समाधी मठात श्रींना दाखविण्यात आले. या वेळी न्यासाच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या सेवेकरी निवासाचे उद्घाटन अमोलराजे भोसले व सचिव शाम मोरे यांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. दरम्यान, सांगली येथील प्रसिद्ध चिरमुरा, सुरती मुरमुरा व पोहाचे होलसेल व्यापारी संजय गोल्ड ब्रँडचे सूर्यकांत सूर्यवंशी गेल्या ३० वर्षांपासून श्रींच्या पुण्यतिथी दिवशी स्वामी भक्तांच्या महाप्रसादकरिता अन्नछत्र मंडळास भाजीपाला पुरवितात, त्यांची अखंड सेवा सुरूच आहे. या बाबत न्यासाकडून त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाटण तालुक्यात गतवर्षी ६७ गावांतील संभाव्य पाणी

$
0
0

पाटण तालुक्यात गतवर्षी ६७ गावांतील संभाव्य पाणी टंचाईचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी पाच गावांना तीन टँकर चालू करण्याची गरज भासली होती. यंदा पाणी टंचाईसंदर्भात ६७ गावांची संभाव्य यादी जाहीर करण्यात आली आहे. किल्लेमोरगिरी आणि आब्रुंळकरवाडी गावाला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमानी कारभार, आदेश धाब्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिक्षकांचे तक्रार अर्ज जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणे, शिक्षक पदांना चुकीच्या पद्धतीने मान्यता, इचलकरंजीत इमारत नसताना शाळेला मंजुरी अशा प्रकारचे कारनामे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार व शिक्षण विभागाने केली आहेत. जिल्हा परिषदेच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या २९ पानी अहवालात ४३ प्रकरणांचा समावेश आहे. एका मुख्याध्यापकाच्या निलंबनप्रश्नी प्रकरण मिटवण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केल्याचे चौकशी समितीच्या समोर आले आहे. जवळपास २४ प्रकरणांत त्यांनी शिक्षण विभागाची नियमावली, सरकारचा आदेश धाब्यावर बसविल्याचे अहवालावरून सामोरे येत आहे.

एका शिक्षण संस्थेची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. असा ठपकाही समितीने ठेवला आहे. वाळवा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षांनी शिक्षणाधकारी व शिक्षण विभागाविरोधात तक्रार केली होती. आर्थिक व्यवहार करून अनेक शिक्षकांच्या पदांना बेकायदेशीर मान्यता दिल्याचा आरोप आहे. कोणतीही भरती प्रक्रिया राबविली नाही. रोस्टर तपासणी न करता, जाहिराती न तपासता, संस्थेतील रिक्त पदे न तपासता पदांना मान्यता दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यावर चौकशी समितीने चुकीच्या पद्धतीने मान्यता दिल्या आहेत. तसेच सरकारी निर्णयाचा भंग केला आहे. यामुळे ते प्रशासकीय कारवाईस पात्र आहेत, असा अहवाल समितीने दिला आहे.

केर्ले येथील हनुमान हायस्कूलमधील अवैध शिक्षक भरतीविषयी अॅड. व्ही. बी. माने यांनी तक्रार केली होती. याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी कोर्टाच्या आदेशानसार संबंधित शिक्षक, व्यवस्थापन व मुख्याध्यापकांची सुनावणी घेऊन निर्णय घेणे अपेक्षित होते. याप्रकरणी लोहारांच्या कामकाजात अनियमितता दिसून येत असल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. दगडू मारुती थडके (आकुर्डे) शिवाजी दत्तात्रय कांबळे (वाटंगी),अनिल राजाराम जगताप (इचलकरंजी), संगीता बळवंत फास्के (एकोंडी),तिलोत्तमा विठ्ठलराव सोनवणे (कणेरी), सुरेश पाटील (कासारपुतळे) यांच्यासंदर्भातील काही प्रकरणांत त्यांनी कामात दिरंगाई, काही ठिकाणी कर्तव्यात कसूर केल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने नोंदविला आहे.

\Bअधिकाराचा दुरुपयोग...कर्तव्यात कसूर

\Bसाळोखेनगर येथील राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या विश्वस्तामध्ये वाद आहे. तथापि पीटीआर उताऱ्यावरील सदस्यांच्या ठरावानुसार मुख्याध्यापक पदाला सरकारच्या नियमाच्या विरोधात मान्यता देण्याचा प्रकार घडला आहे. ही बाब प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही. शाळेचे दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी व कर्मचाऱ्यांची आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रभारी मुख्याध्यापकपदास मान्यता देणे आवश्यक होते. मात्र शिक्षण विभागाने कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी अधिकाराचा दुरुपयोग व कर्तव्यात कसूर केल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे.

तीन लाखाची मागणी

मुख्याध्यापक एस. एच. टाकवडे यांना निलंबित करण्यासाठी शैक्षणिक संस्थेने १२ फेब्रुवारी, २०१८ रोजी शिक्षणाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. त्याला शिक्षणाधिकाऱ्यांनी १४ फेब्रुवारी रोजी परवानगी देऊन खातेनिहाय चौकशी सुरू केली. खातेनिहाय चौकशीचे काम १२० दिवसात पूर्ण करण्याचे बंधन आहे. त्या कालावधीत चौकशी पूर्ण झाली नाही तर त्या मुख्याध्यापकाला पुन:स्थापित करणे आवश्यक असते. मात्र शैक्षणिक संस्थेकडून तशी कार्यवाही झाली नाही. शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थेला त्याविषयी सूचना केल्या. तरीसुद्धा शिक्षण संस्थेने मुख्याध्यापकाला सेवामुक्त केले. संस्थेचे कृत्य हे नियमबाह्य ठरल्यावर वेतनेत्तर अनुदान रोखण्याची व प्रशासक नेमण्याची कार्यवाही शिक्षण विभागाकडून अपेक्षित होती. याप्रकरणी मुख्याध्यापक टाकवडे यांनी शिक्षणाधिकारी लोहार यांची भेट घेतली असता आपले प्रकरण बंद करावयाचे झाल्यास तीन लाखाची मागणी केल्याचे त्यांनी चौकशी समितीसमोर सांगितले. तर शिक्षणाधिकाऱ्यांकडील १९ डिसेंबर, २०१८ रोजीच्या पत्रानुसार संबंधित शाळेत दोन वर्षांपासून शिक्षक संवर्गातील पदे रिक्त असल्याने कोणालाही शिक्षक मान्यता दिली नाही, असे कळविल्याचे अहवालात नमूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्लामपुरात १ कोटीच्या जुन्या नोटा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

इस्लामपूर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सापळा रचून दोन युवकांकडून चलनातून बाद केलेल्या एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. एक हजार व पाचशे रुपये मूल्याच्या जुन्या नोटांचे बंडल घेऊन हे दोघे युवक नोटा बदलून मिळण्यासाठी घेऊन आले होते. त्यांच्याकडे ९९ लाख ९७ हजार ५०० रुपयांची रक्कम आढळून आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अद्यापही नोटा बदलून देणारी टोळी कार्यरत आहे का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दत्तासिंग हरिसिंग हजारे (वय २९, रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा) आणि आणखी एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. ही रक्कम दीपक प्रल्हाद बाकले (रा. जुळेवाडी, ता. कराड,) आणि रमेश मोहनराव पाटील (रा. नरसिंहपूर, रा. वाळवा) या दोघांनी बदलण्यासाठी दिल्याचे ताब्यात घेतलेल्या दोघांनी सांगितले आहे. नोटा कोण बदलून देणार होते किंवा या दोन युवकांकडून नोटा स्वीकारायला कोण येणार होते, हे अद्याप ही स्पष्ट झालेले नाही.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दक्षिणेतून मीच उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून माझी उमेदवारी असेल. तसेच राधानगरी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडवा अशीमागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. शिवसेनेकडून ऋतुराज पाटील यांची उमेदवारी असेल ही केवळ अफवा आहे, असेही ते म्हणाले.

आमदार पाटील हे विधानपरिषद सदस्य आहेत. त्यांची मुदत अजून तीन वर्षे आहे. यामुळे दक्षिणेतून ते प्रतिमा पाटील अथवा ऋतुराज यांना संधी देतील अशी चर्चा होती. पाटील यांनीही याबाबत नंतर आपली भूमिका जाहीर करू असे सांगितले होते, या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या पत्रकार बैठकीत त्यांनी दक्षिणमधून स्वत: लढणार असल्याचे सांगत चर्चेला पूर्णविराम दिला. पाटील यांच्या पवित्र्यामुळे पुन्हा एकदा पाटील विरुद्ध महाडिक असा राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे.

आमदार पाटील म्हणाले, 'कोल्हापूर दक्षिण मतदार संघात मीच उभा राहणार आहे, त्याबाबत कुणीही संदिग्धता बाळगू नये. केंद्रात व राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची यापूर्वी जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे यांनी भेट घेऊन सहा विधानसभा मतदार संघांची मागणी केली आहे. २००४, २००९ प्रमाणे कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले या सहा जागा काँग्रेसच्या आहेत. तसेच राधानगरी विधानसभा मतदार संघ काँग्रेसला सोडावा, अशी मागणी करण्यात येईल,' असे त्यांनी स्पष्ट केले. राधानगरीवर हक्क सांगत पाटील यांनी दोन्ही पक्षातील नव्या वादाला तोंड फोडले आहे. सोशल मीडियावर ऋतुराज पाटील यांची शिवसेनेकडून उमेदवारी असेल, असा मजकूर फिरत आहे, याकडे लक्ष वेधले असता पाटील यांनी ही अफवा असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी स्मारकासाठी निधी देऊ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पापाची तिकटी परिसरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, सरकार दरबारी आग्रह धरून लागेल तेवढा निधी देऊ,' अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. महापालिकेत झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. महापालिका अधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींची लवकरच बैठक घेऊन डिझाइन निश्चित करण्याची सूचना महापौरांनी केली.

छत्रपती संभाजी स्मारकाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी आमदार क्षीरसागर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. स्मारकाबाबत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'या स्मारकासाठी ४२ लाखांचा डीपीआर तयार केला आहे. यामध्ये संभाजी महाराजांचा पराक्रम दर्शविणारे म्युरल तसेच संरक्षण भिंत, सुशोभीकरण अशी कामे आहेत. यासाठी महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात २० लाख रुपयांची तरतूद केली आहे. तसेच म्युरलचे डिझाइन शिल्पकार किशोर पुरेकर यांच्याकडून करून घेतले आहे.'

आमदार क्षीरसागर म्हणाले, 'महापालिकेने तरतूद केलेल्या निधीपेक्षा जो जादाचा निधी लागणार आहे, तो आमदार फंडातून देऊ. पण स्मारकांचे डिझाइन हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रतिनिधींना दाखवले आहे का? त्यांना ते दाखवावे, त्यांच्या काही सूचना असतील तर तसे बदल करून घ्यावेत.' दरम्यान, महापालिकेमुळेच काम रखडल्याचा आरोप दीपक मगदूम यांनी केला. 'प्रशासन आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी यांच्यात बैठक घेण्याची मागणी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी केली. नियोजित जागेवरील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची सूचना बंडा साळोखे यांनी केली.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'आचारसंहिता असल्याने आता काही करता येणार नाही. पण सर्वांनी एक बैठक घ्यावी. आराखडा अंतिम करा, २५ मे दरम्यान टेंडर काढता येईल. त्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी राहील.'

उपमहापौर भूपाल शेटे यांनी स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, नगरसेवक ईश्वर परमार, राहुल चव्हाण, विजयसिंह खाडे-पाटील, आदिल फरास, अशोक देसाई, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, हिंदुराव शेळके, महेश उरसाल यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

००००

चौकट

म्युरलची जबाबदारी हिंदुत्ववाद्यांची

बैठकीत संजय साडविलकर म्हणाले, 'सर्वानुमते म्युरलसाठी डिझाइन फायनल करू. त्यानंतर ते पूर्ण तयार करून बसविण्याची जबाबदारी हिंदुत्ववादी घेतील. त्यासाठी कोणीही कसलाही खर्च घेणार नाही, तिथे कोणाचेही नाव असणार नाही. संभाजी महाराजांचे भक्त सर्व स्वखर्चाने, स्वश्रमाने करतील. त्यामुळे महापालिकेने म्युरलसाठी धरलेला १८ लाखांचा खर्च वाचेल.'

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images