Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

स्वच्छता मोहीम आज

0
0

कोल्हापूर: महापालिका, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्यावतीने रविवारी (ता. ५) स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. सकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या मोहिमेमध्ये जयंती नाला आणि परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी पाच विभाग करून त्यांच्यावर अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी शनिवारी सायंकाळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी जयंती नाल्याची पाहणी केली. स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह नगरसेवकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिक वापरल्याप्रकरणी ३५ हजारांचा दंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर शनिवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई केली. मॉल, हॉटेल व फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्याकडून ३५ हजाराचा दंड वसूल केला. दंडात्मक कारवाई केलेल्या संबंधितांनी पुन्हा प्लास्टिकचा वापर केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. राज्य सरकारने प्लास्टिकचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातल्यानंतरही शहरात अनेकठिकाणी राजरोसपणे विक्री सुरू आहे. महापालिकेच्यावतीने विविध ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी कारवाई करण्यासाठी दोन पथके तैनात केली होती. रिलायन्स मॉल, मुल्लाणी शॉप, रौनक शॉपसह फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. दोन पथकांनी दिवसभरात प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्यांवर ३५ हजारांचा दंड केला. कारवाईमध्ये विभागीय आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, शिवाजी शिंदे, ऋषिकेश सरनाईक, शुभांगी पोवार, अरविंद कांबळे आदी सहभागी घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी फाउंडेशनच्याश्रमदानात राबले हजारो हात

0
0

पाणी फाउंडेशनच्या

श्रमदानात राबले हजारो हात

सोलापूर

रानमसले (ता. उ. सोलापूर ) येथील गावात पाणी फाउंडेशन अंतर्गत श्रमदानाचे काम मोठ्या उत्साहात सुरू आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी रानमसलेकर वैतागून पाणी फाउंडेशन स्पर्धेत उतरून गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला आहे. महाश्रमदानासाठी गावातील प्रत्येक घरातील महिला, पुरुष व तरुण युवक, युवती, शाळेतील विद्यार्थी सहकुटुंब महाश्रमदानासाठी स्वतः हून हजर राहिले होते.

गावातील किराणा दुकान, हॉटेल, चहा कँटीन, तसेच इतर व्यवसाय कडकडीत बंद करून दुष्काळाच्या राक्षसावर गावातील व बाहेरगावाहून आलेले साडेतीन हजार जलमित्र संख्येने कंपार्टमेंट बंडिंग बांधकामावर तुटून पडले होते. गावांतून सकाळीच सजवलेल्या बैलगाडीतून बैलांना झुली, चंगाळ्या घालून बैलांच्या अंगावर 'पाणी अडवा, पाणी जिरवा', 'पाणी वाचवा, देश वाचवा', असे जल बचतीचे संदेश लिहिले होते. पारंपरिक पद्धतीने बाल दिंडी भगव्या पताका खांद्यावर घेऊन आबालवृद्ध टाळ मृदंगाच्या गजराज भजन गात महाश्रमदानासाठी गेले. श्रमदानास सोलापूर शहर परिसरातून पाणी फाउंडेशनच्या 'जलमित्र', आवाहनानुसार मुंबई, पुणे, हैदराबाद, अक्कलकोट, विजयपूर, इंडी, बिदर, मंगळवेढा, मोहोळ, केमवाडी, नान्नज, परिसरातून जलमित्र दाखल झाले होते. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते, राजकीय नेते, प्रशासकीय आधिकारी, कर्मचारी, विविध संघटना प्रथमच एकजुटीने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध : सहकार मंत्री सुभाष देशमुख

0
0

दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध : सहकार मंत्री सुभाष देशमुख

सोलापूर :

'फळबाग जतन करण्यासाठी प्रामुख्याने ठिंबक सिंचनचा वापर करा, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,' अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

दक्षिण सोलापूर मतदारसंघातील हिरज, डोणगाव, कंदलगाव, येळेगाव, मंद्रूप, शिरवळ, बंकलगी येथे शनिवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दुष्काळ पाहणी दौरा केला. सद्यपरिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

पिण्याच्या पाण्यासाठी वाडी वस्तीवर बोअर, टँकर आणि चारा छावणीची मागणी प्रामुख्याने दिसून आली. पाणंद योजनेतून रस्ते व्हावेत, वीजबिल माफ व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. बी-बियाणे निम्म्या किंमतीत मिळावे, दुष्काळ निधी, पिक विमा लवकर मिळावा, वडापूर बॅरेज बंधारा लवकर बांधून मिळाल्यास पाण्याचा प्रश्न सुटेल, रोजगार हमीची कामे चालू करावीत, कांदा अनुदान/ पीकविमा अद्याप जमा झाले नसल्याची तक्रार काही गावातून झाली. मंद्रूप ग्रामस्थांनी पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. पाण्याची वानवा आहे. पाणी टँकर चालू करावेत अशी मागणी केली. दुष्काळ निवारण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येईल, अशी हमी सुभाष देशमुख यांनी या वेळी शेतकऱ्यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोन न घेतल्यास वेतन कपात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पिण्याच्या पाण्यासह महापालिकेच्यावतीने पुरवण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांबाबत काही समस्या उद्भवल्यास अधिकारी, कर्मचारी फोन घेत नाहीत, असा आरोप शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला. याची प्रशासनाने गंभीर दखल घेत पदाधिकाऱ्यांचे फोन अधिकाऱ्यांनी न घेतल्यास एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला. सभेत आपटेनगर टाकीतून होणाऱ्या दूषित पाण्यापुरवठ्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सभापती शारंगध देशमुख अध्यक्षस्थानी होते.

सभेला सुरुवात होण्यापूर्वीत सदस्या दीपा मगदूम यांनी जोपर्यंत पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सभेला येत नाहीत तोपर्यंत सभा सुरू न करण्याचा पवित्रा घेतला. परिणामी अर्धातास सभेचे कामकाज थांबले. जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सहायक अभियंता व्ही. एन. सुरवसे व शाखा अभियंता अक्षय अटकर यांना तातडीने बोलवून घेतले. दोन्ही अधिकारी बैठकीत आल्यांतर सर्वच अधिकाऱ्यांना धारेवर धरले यावेळी 'आपटेनगर पाण्याच्या टाकीमध्ये कबुतरांच्या विष्टेमुळे दूषित पाणीपुरवठा होत असून पाण्यामध्ये मृतावस्थेत कबूतर आढळून आले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना फोन केल्यास फोन रिसिव्ह करत नाहीत. पाइपलाइन वॉशआउट करण्याची सूचना देऊनही अंमलबजावणी केली जात नाही. जर फोन रिसिव्ह करणार नसेल तर सीम कार्ड जमा करा. तसेच प्रशासन अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? दूषित पाणीपुरवठ्याची जबाबदारी अटकर यांच्यावर न देता सुरवसे व जलअभियंता कुलकर्णी यांनी घ्यावी.' अशी सूचना सभापती देशमुख व मगदूम यांनी केली.

'जे अधिकारी, कर्मचारी फोन घेत नाहीत त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येईल. महापालिकेकडे असणाऱ्या चार टँकरपैकी दोन टँकर पाणीपुरवठा तर दोन टँकर आरोग्य विभागाकडे आहेत. नवीन चार टँकर आल्यानंतर उपनगरांमध्ये करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा होईल.' असे प्रशासनाने स्पष्ट केले.

राजाराम गायकवाड यांनी वॉर्ड मिटिंगला अधिकारी उपस्थित रहात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. 'आयुक्तांनी केलेल्या वॉर्ड मिटिंगच्या नियोजनानुसार अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्तांसह संबंधित अधिकारी उपस्थित राहतील. त्याबाबतच्या सूचना दिल्या असून किरकोळ समस्या वॉर्ड मिटिंगमध्ये निर्गत होतील. पाणी, स्वच्छता व आरोग्य आदी कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्याबरोबरच नाले सफाईचे काम नियोजनानुसार सुरू आहे.' असे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट केले.

'आमदार फंडातील कामे दीड वर्षात पूर्ण झालेली नाहीत. अमृत योजना व आमदार फंडातील कामाबाबत ना हरकत प्रमाणपत्रे कशी दिली.'असा प्रश्न सभापती देशमुख यांनी उपस्थित केला. अशा कामाबाबत प्रशासन ना हरकत प्रमाणपत्र देत नाही. छाया पोवार यांनी 'पंतप्रधान आवास योजनेची रक्कम कधी जमा होणार.' योजनेचे दोन हप्त जमा असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

सभेत माधुरी लाड, सविता घोरपडे, सविता भालकर यांनी प्रश्न उपस्थित केले. कळंबा कारागृह ते वाशी नाक्यापर्यंतच्या डीपी रोडचे काम प्रलंबित असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाल्यानंतर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी डीपी रोडवरील प्रलंबित कामाचा अहवाल त्वरीत सादर करण्याच्या सूचना केल्या.

विज बिलात बचत करण्यासाठी शहरात एलईडी दिवे बस‌वण्यात येणार आहेत. प्रायोगिकतत्वावर उपनगर व शहरातील दोन प्रभागात एलईडी दिवे बसवून विज बिलात किती बचत झाली, याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अद्याप तसा अहवाल प्राप्त झाला नसून दोन्ही प्रभागात पूर्ण एलईडी दिवे बसवण्यात आले नसल्याचे बैठकीत सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. दोन दिवसांत त्याबाबतचा अहवाल सादर करू असे उपअभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले.

सभापती देशमुख यांची पाहणी

आपटेनगर येथील पाण्याच्या टाकीमधून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. त्यानंतर सभापती देशमुख यांनी पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सायंकाळी सहा वाजता जलअभियंता कुलकर्णी, सहायक अभियंता सुरवसे, शाखा अभियंता अटकर यांच्यासोबत पाहणी करुन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. टाकीवर ताडपदरी टाकून बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलबुर्गींनी जपला प्रबोधनाचा वसा

0
0

लोगो : बसव व्याख्यानमाला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अन्नदानाइतकेच अक्षरदान मोलाचे आहे. महात्मा बसवेश्वरांचे समता, बंधुत्व व लोकशाहीवादी तत्त्वांनी समाविष्ट वचनसाहित्य सामान्यांपर्यंत पोहोचले तरच समाजाची उन्नती साधेल या धारणेतून डॉ. एम. एम. कलबुर्गी यांनी 'अक्षर दासोह' संकल्पना राबविली. ज्ञानाचा वटवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलबुर्गी यांनी आयुष्यभर शिक्षण, संशोधन व सामाजिक कार्यातून लोकविकास आणि प्रबोधनाचा वसा जपला,' असे प्रतिपादन प्रा. डॉ. गोपाल महामुनी यांनी केले.

कोल्हापूर लिंगायत समाज संस्था व बसव केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसव व्याख्यानमाला आयोजित केली आहे. प्रा. महामुनी यांनी 'सत्याचा महामार्ग : शहीद डॉ. एम. एम. कलबुर्गी' या विषयाने व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर होते. चित्रदुर्ग मठ येथे व्याख्यानमाला सुरू आहे.

प्रा. महामुनी म्हणाले, 'कर्नाटक आणि महाराष्ट्राची ओळख केवळ शेजारी आणि भाषिक राज्यापुरतीच मर्यादित नाही, तर या दोन्ही राज्यांमध्ये प्राचीन काळापासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अनुबंध आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या दोन्ही राज्यांत विचारवंतांच्या हत्या झाल्या. मात्र, व्यक्तीची हत्या करून विचार संपविता येत नाहीत. त्यांच्या साहित्यातील, संशोधनातील विचार चिरकाल टिकणारे असतात हा विचार अंगिकारून कलबुर्गी यांनी जीवनभर काम केले. त्यांना ५० वर्षांची संशोधनाची दीर्घ परंपरा लाभली होती. धारवाड येथे प्राध्यापक, हम्पी येथे कुलगुरूपदावर काम करताना त्यांनी संशोधन व प्रबोधनाचा पिंड कायम जपला. समाजाला नव शिक्षण दिले.'

राजशेखर तंबाखे यांनी प्रास्ताविक केले. निखिल कुंभार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यश आंबोळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बसव मल्लिकार्जुन स्वामी, सरला पाटील, बाबूराव तारळी, सुधीर पांगे प्रमुख उपस्थित होते.

००००

विद्यापीठ कर्जमुक्त केले....

महामुनी म्हणााले, 'डॉ. कलबुर्गी १९९९ ते २००२ मध्ये हम्पी विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा विद्यापीठावर तीन कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांनी कन्नड विद्यापीठ संसद निधी स्थापन करून समाजमनाला साद घालून विद्यापीठासाठी निधी उभारला. कुलगुरुपदावरून निवृत्त होताना विद्यापीठ कर्जमुक्त होऊन खात्यात एक कोटी रुपयांचा निधी शिल्लक होता. त्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत विद्यापीठाच्या प्रकाशन विभागातर्फे ३०० पुस्तके प्रकाशित झाली.'

०००००

आजचे व्याख्यान

व्याख्याते : प्राचार्य सोमनाथ रोडे

विषय : महात्मा बसवन्ना व महात्मा गांधी

वेळ : सायंकाळी ५.३०

ठिकाण : चित्रदुर्ग मठ

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाकडून आता ‘संवादाचा पूल’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामासाठी नव्याने पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावावरुन राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि केंद्रीय पुरातत्व विभाग आमने-सामने आले आहेत. पुलाचे काम पुर्णत्वास जावे यासाठी दोन्ही विभागात समन्वय साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. ़

पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना केंद्रीय पुरातत्व विभागाच्या प्रादेशिक संचालक कार्यालयाने पर्यायी पुलाचे बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. काम सुरू ठेवल्यास गुन्हा दाखल करावा लागेल, अशी नोटीस बजावली आहे. पुरातत्व विभागाच्या नोटिशीने खळबळ उडाली असली तरी पुलाचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. पुलाच्या प्रश्नावर नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. ६)बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला राष्ट्रीय महामार्ग, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत.

पुरातत्व विभागाने राष्ट्रीय महामार्गाला नोटीस पाठवली असली तरी जिल्हा प्रशासनाला मिळालेली नाही. तरीही जिल्हा प्रशासनाने आज शनिवारी आढावा घेतला. केंद्रीय पुरातत्व विभागाने यापूर्वी पुलाच्या बांधकामाला परवानगी दिली आहे. पण १०१ ते ३०० मीटर अंतराच्या पुढील बांधकामासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने नव्याने बांधकाम सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय पुरातत्व विभागाला पाठवणे बंधनकारक आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाने पाठवला आहे की नाही याची खातरजमा जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता कांडगावे यांची बदली झाली असून नवीन अधिकारी अशोक भोसले रुजू झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाने प्रस्ताव पाठवला आहे की नाही, प्रस्ताव पाठवला असेल तर त्यामध्ये पुरातत्व विभागाने त्रुटी काढल्या आहेत का याची माहिती नसल्याने दोन्ही विभाग आमने-सामने आले आहेत. दोन्ही विभागात समन्वय ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

गुन्हा कसा दाखल करणार?

केंद्रीय पुरातत्व विभागाने यापूर्वी पुलाच्या बांधकामाला परवानगी दिली आहे. त्यासंबधीची कागदपत्रे जिल्हा प्रशासनाकडे आहेत. पुरातत्व विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांकडे परवानगी पत्र सादर केले जाईल. परवानगीचे पत्र असताना पोलिसांना गुन्हा दाखल करता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. तांत्रिक मंजुरीची पुर्तता करुन पुलाचे बांधकाम कायम सुरू ठेवले जाणार आहे.

पुरातत्वला हवी आहे ब्रह्मपुरीची जागा

पर्यायी पुलाला परवानगी देताना ब्रह्मपुरी टेकडीची जागा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या नावे करून देण्याचे जिल्हा प्रशासनाने तोंडी मान्य केले आहे. ब्रह्मपुरीवरील दोन मोठे प्लॉट पुरातत्वच्या नावावर करून देणे शक्य आहे. पण त्यातील एक जागा खासगी व्यक्तीच्या नावे आहे. त्यामुळे जागा हस्तांतर करण्याचे काम थांबले आहे. पुरातत्व विभागाच्या नावावर जमीन झाल्यावर महानगरपालिकेला टेकडीवरील अतिक्रमण काढण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. अतिक्रमण करणाऱ्या कुटुंबांना झोपडपट्टी विकास प्रकल्पातून घरे द्यावी लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकावर अत्याचार; चारू चांदणेला जन्मठेप

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुश्रृषानगर, देवकर पाणंद येथील दर्शन शहा या दहा वर्षीय मुलाच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेला आरोपी योगेश उर्फ चारू आनंदा चांदणे (वय २८, प्लॉट क्रमांक ३३, शुश्रूषानगर, देवकर पाणंद) याला १२ वर्षांच्या मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांच्यासमोर खटल्याचे कामकाज झाले.

सरकारी वकील ॲड. सुजाता इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारू चांदणेने २५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसाठी दर्शन शहा या शाळकरी मुलाचे अपहरण केले. मात्र नंतर त्याचा खून केला होता. या गुन्ह्यातील आरोपी चारूला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सध्या तो कळंबा कारागृहात ही शिक्षा भोगत आहे.

दरम्यान, चारू याने आणखी एका मुलावर लैंगिक अत्याचार केले होते. पीडित १२ वर्षांचा मुलगा ऑक्टोबर २०१३ मध्ये दिवाळीच्या सुट्टीत पाहुण्यांकडे देवकर पाणंद येथे आला होता. त्यावेळी चांदणे याने त्याला घरात बोलावून पैशाचे आमीष दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. हा प्रकार पीडीत मुलाच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक आय. एस. सोनकांबळे यांनी केला. त्यानंतर कोर्टात आरोपपत्र पाठविले होते. या खटल्यात ६ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगा व इतरांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश ए. यू. कदम यांनी चारूला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा स्वतंत्र भोगायची आहे. उपनिरीक्षक सोनकांबळे यांना पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा बेडगे यांनी तपासात महत्त्वपूर्ण मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सुटा’चे कुलगुरू हटाव आंदोलन तात्पुरते स्थगित

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे (सुटा) पुकारण्यात आलेले 'कुलगुरू हटाव आंदोलन' तात्पुरते स्थगित केले आहे. 'सुटा'तर्फे उपस्थित केलेल्या विविध मागण्यांसंदर्भात एका महिन्याच्या आत कारवाई करण्याचे व विद्यापीठाचा कारभार सुधारण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे पत्रक संघटनेचे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, 'सुटा'तर्फे जानेवारी २०१९ पासून कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या गैर, भ्रष्ट व बेकायदेशीर कारभाराच्या विरोधात कुलगुरू हटाव आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाचा एक भाग म्हणून सहा मे रोजी राजभवनसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी शुक्रवारी (ता. ३) 'सुटा'च्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

बैठकीत दहा मुद्यांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये 'त्या' १२९ आरोपांबाबत सुटा शिष्टमंडळ व विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्याची एकत्र छाननी करून सत्यता तपासली जाईल. २० जूनपूर्वी छाननी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यापीठ प्रशासन आवश्यक कारवाई करेल. आर्थिक गैरव्यवहार व उधळपट्टीबाबत विद्यापीठाचे वित्त लेखा अधिकारी व 'सुटा' पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत छाननी होईल. तसेच आवश्यक त्या दुरुस्ती करण्यात येतील. देशपांडे समिती व शानभाग समितीच्या शिफारशीनुसार सुरू असलेली विभागीय चौकशी लवकर पूर्ण करण्याचे ठरले. सध्या ही चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत सुरू आहे. चौकशी पूर्ण होताच दोषीवर तातडीने कारवाई केली जाईल,' असे बैठकीत ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमन मित्तल यांची प्रतिक्रिया....

0
0

'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये वैविध्यपूर्ण लिखाण वाचावयास मिळते. वेगवेगळ्या विषयावरील अभ्यासपूर्ण लेख, शिक्षण, आरोग्य, खेळाविषयी परिपूर्ण माहिती यामुळे सर्वच वयोगटातील वाचकांची 'मटा'ला पसंती लाभली आहे. 'मटा'ने 'राऊंड टेबल','चॅटरुम' सारख्या वेगळ्या संकल्पना राबविल्या. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याशी निगडीत विकास प्रकल्पांची चर्चा घडविली. शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशा सार्वजनिक उपक्रमांना चालना दिली.

अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भक्तिसेवा’चा आज मेळावा

0
0

कोल्हापूर : भवानी मंडप येथील भक्तिसेवा विद्यापीठ हायस्कूलच्या १९८८-८९ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी (ता. ५) सकाळी दहा वाजता होणार आहे. हॉटेल वृषाली येथे होणाऱ्या मेळाव्यानिमित्त तब्बल २९ वर्षांनंतर माजी विद्यार्थी आठवणींना उजाळा देणार आहेत. मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज असेल तरच शटडाऊन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मे महिन्यातील उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे या काळात शहरवासियांना पाण्याचा तुटवडा जाणवू नये, त्यासाठी गरज असेल तरच पाणीपुरवठ्याचे शटडाऊन घेण्याचे नियोजन महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाने केले आहे. तातडीच्या कामासाठी शटडाऊन घेताना त्याचा कालावधीत कमीतकमी राहील याकडेही लक्ष दिले जाणार आहे.

जलवाहिनी फुटणे किंवा विद्युत उपकरणांमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेकदा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला एक दिवसांपासून तीन दिवसांपर्यंत शटडाऊन घ्यावे लागते. शटडाऊन घेतल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होतो. विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या रोषाला आणि आंदोलनाला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रशासनाला रोषाला सामोरे जावे लागते. शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा करणारी जुनी जलवाहिनी असल्याने त्यामध्ये बिघाड होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा बिघाड काढण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. मात्र एप्रिल महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली. मे महिन्यातही पाण्याची मागणी वाढत आहे.

त्यामुळे नागरिकांना पाण्याची टंचाई भासू नये, त्यासाठी अत्यंत तातडीच्या दुरुस्तीसाठी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. हा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा कालावधीत अत्यंत कमी राहील, याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

\Bगंगावेशमध्ये पाणी गळती

\Bदरम्यान एकीकडे तातडीच्या कामासाठी शटडाऊन घेण्याचे नियोजन केले असताना शहरात अनेकठिकाणी छोट्या-छोट्या पाण्याच्या गळती सुरू आहेत. कळंबा जेल येथील एअर व्हॉल्व्हमधून रात्रीच्यावेळी मोठ्याप्रमाणात पाणीगळती सुरू आहे. त्याचप्रमाणे गंगावेश येथील निगवेकर गल्लीमध्ये छोट्या पाणीपुरवठ्याच्या लाइनला गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. तसेच धैर्यप्रसाद हॉल येथील एअर व्हॉल्व्ह व रा. ना. सामाणी हायस्कूलपासून सातत्याने पाणी वाहत असते. या छोट्या गळती काढण्यासाठी महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाला युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त पार्किंगमुळे रस्ते गायब

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी रस्त्याकडेला पार्क केलेली वाहने आणि बेवारस वाहनांवर पोलिसांसह महानगरपालिकेने कारवाई केली होती. या कारवाईनंतरही शहरात बेशिस्त पार्किंगचा प्रश्न कायम आहे. रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांमु‌ळे वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोकाही वाढला आहे. अनेक वाहन दुरुस्ती करणारे रस्त्यावर वाहने उभी करून दुरुस्तीसह अनेक कामे करत असतात.

शहरात वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि पार्किंगसाठी जागेचा अभाव असल्याने अनेक वाहने रस्त्याकडेलाच पार्क केली जातात. मूळ शहरातील अंबाबाई मंदिर परिसर, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ यासह शाहूपुरी, राजारामपुरी, कसबा बावडा परिसरात वाहन पार्किंगची समस्या गंभीर आहे. रहिवाशांनी वाहनांच्या पार्किंगची स्वत:ची सोय केलेली नाही. बहुतांश वाहने घराबाहेर रस्त्याकडेलाच पार्क केली जातात. इमारतींचे बांधकाम करताना पार्किंगसाठी जागा दाखवली, मात्र या जागेत दुकानगाळे थाटले आहेत. या वृत्तीमुळे सर्रास वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. दुकानांचे अतिक्रमण फुटपाथवरून रस्त्यांवर आले आहे. यापुढे विक्रेत्यांची वाहने पार्क केली जातात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी स्थिती असते. यामुळे वाहनधारकांना उरलेल्या जागेतून वाट काढावी लागते.

बागल चौक ते उमा टॉकिज चौक या मार्गावर वाहनांचे स्पेअरपार्ट विक्री, सुशोभीकरण, कोचिंगची दुकाने आहेत. पांजरपोळ परिसरातही गॅरेज आणि कोचिंगची दुकाने आहेत. यामुळे दिवसभर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा असतात. स्टेशन रोड, सुभाष रोड, उद्यमनगर, शाहूपुरी, राजारामपुरी येथे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची गर्दी असते. शहरातील काही मोजकी रुग्णालये वगळल्यास बहुतांश रुग्णालयांचे स्वत:चे पार्किंग नाही. रुग्णालयात येणारे रुग्ण, नातेवाईक यासह रुग्णवाहिकाही रस्त्याकडेला उभ्या असतात. खासगी क्लासेस, हॉटेल्स गॅरेजमध्ये येणारी वाहने रस्त्याकडेला पार्क केली जातात. अलिकडे शहरात कार बाजार वाढले आहेत. शाहूपुरी परिसरात रस्त्याकडेलाच जुन्या कारची विक्री सुरू आहे.

\B

महावीर गार्डन रस्त्यावर कोंडी

\Bमहावीर गार्डन ते खानविलकर पेट्रोल पंप दरम्यानच्या रस्त्याकडेला बागेत आलेल्या नागरिकांची वाहने थांबलेली असतात. तसेच अनेकखाद्यपदार्थांच्या गाड्या असल्याने वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. महावीर गार्डनपासून थोड्या अंतरावर एक गॅरेज असून तेथे रस्त्यावरच वाहने लावल्याने एक लेन त्यांनी व्यापली आहे. \B

२४६ जणांना नोटिसा

\Bमहानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलिसांच्या मदतीने गेल्या सहा महिन्यात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या २४६ वाहनधारकांना नोटिसा पाठवल्या होत्या. यापैकी ९४ वाहने जप्त करण्यात आली. दंड भरून घेतल्यानंतर ४५ वाहने सोडली, तर ४९ वाहने अद्याप महापालिकेच्या ताब्यात आहेत. १५२ वाहनधारकांनी स्वत:हून वाहने काढून घेतली होती. वाहतूक पोलिसांनीही बेवारस वाहने हटवण्याची मोहीम हाती घेतली होती. या कारवाईनंतर काही काळ रस्ते मोकळे झाले होते. मात्र, कारवाई थांबताच पुन्हा वाहने रस्त्याकडेला पार्क केली जात आहेत.

पाठवलेल्या नोटिसा : २४६

स्वत:हून काढून घेतलेली वाहने :१५२

जप्त केलेली वाहने : ९४

दंड वसूल केलेली वाहने : ५४

महापालिकेच्या ताब्यातील जप्त वाहने: ४९

वसूल केलेली दंडाची रक्कम : ५४०००

चौकट - पार्किंग चार्जेसचाही परिणाम

शहरात चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी प्रतितास ३० रुपये आकारले जातात. महापालिकेने १३ ठिकाणी पे अँड पार्किंगची सोय केली आहे. मात्र, राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत कोल्हापुरात पार्किंगसाठी जादा पैसे घेतले जातात. यामुळे पर्यटक पार्किंग स्पॉटकडे जाण्यापेक्षा शहरात रिकामी जागा मिळेल तिथे वाहन पार्क करतात. माफक पार्किंग चार्जेस ठेवल्यास पार्किंगला शिस्त लागू शकते.

कोट - नागरिकांनी रस्त्यावर वाहने पार्क करू नयेत, अशा सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. पोलिस आणि महापालिका प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाईदेखील केली आहे. आता पुन्हा कारवाईची मोहीम सुरू केली जाणार आहे. वाहनधारकांनी स्वत:च्या जागेत पार्किंगची सोय करावी.

अनिल गुजर - वाहतूक पोलिस निरीक्षक

कोट - वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने पार्क करणाऱ्या वाहनधारकांना सूचना दिल्या आहेत. याशिवाय बागल चौक, पांजरपोळ परिसरातील स्पेअरपार्ट विक्रेत्यांना रस्त्यावर वाहने लावू नयेत, अशा नोटिसा दिल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून थांबलेली ही मोहीम पुन्हा सुरू होणार आहे.

पंडित पोवार, अतिक्रमण विभागप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वन्य प्राण्यांसाठी’ अत्याधुनिक वाहने

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : वन्यप्राण्यांचा बंदोबस्त, बचाव, नियंत्रणासाठी येथील वनविभागाकडे अत्याधुनिक तीन अॅनिमल रेस्क्यू व्हॅन (वाहन) दाखल झाल्या आहेत. सुसज्ज आणि आवश्यक सुविधांसाठीची त्या वाहनांची अंतर्गत रचना येथील एका खासगी कंपनीत केली जात आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच वाहने वन प्रशासनात कार्यरत होणार आहेत. त्यामध्ये हत्ती वगळता इतर प्राणी पकडणे, नियंत्रण ठेवण्यासाठीच्या साहित्यासह आठ कर्मचारी बसण्याची व्यवस्था असेल.

जिल्ह्यात अलीकडे हत्ती, गवे, डुकरे, माकड, मोर यांचा वावर मानवी वस्तीजवळ वाढला आहे. दोन महिन्यांपूर्वी शहराच्या वेशीलगत कसबा बावडा परिसरात एका गव्याने ठाण मांडले होते. अशा प्राण्यांच्या उपद्रवामुळे करवीर, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड तालुक्यांतील संबंधित शेतकरी हैराण झाले आहेत. याउलट वन प्रशासनाकडे प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीची यंत्रणा अपुरी आहे. पुरेशी वाहने नाहीत. उपलब्ध वाहनांत वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठीचे साहित्य ठेवता येत नाही. रात्रीच्यावेळी प्राण्यांवर वॉच ठेवता येत नाही. त्यामुळे येथील वन प्रशासनाने सरकारकडे अॅनिमल रेस्क्यू व्हॅनची मागणी केली.

सरकारने प्रत्येक वाहनास १४ लाखांप्रमाणे निधी मंजूर केला. वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. मात्र, येथील भौगोलिक परिस्थिती, प्राणीनिहाय नियंत्रण, बंदोबस्तासाठीचे साहित्य ठेवण्याची जागा, कर्मचाऱ्यांसाठीची बैठक व्यवस्था, रात्रीच्यावेळी लांब अंतरावरील प्राणी दिसण्यासाठीची प्रखर लाईटची सुविधा, लहान प्राणी पकडण्यासाठी जाळी, पिंजरा ठेवण्यासाठीच्या आवश्यक वाहनांची रचना तयार केली जात आहे. अशी तीन वाहने कोल्हापूर विभागासाठी तैनात असतील. सांगली जिल्ह्यासाठी एक आणि आजरा, चंदगड, पाटणे तर करवीर, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यांसाठी प्रत्येकी एक वाहन कार्यरत असेल. वन्य प्राण्यासंबंधी शेतकऱ्यांकडून माहिती मिळताच त्या ठिकाणी वाहन सर्व यंत्रणेसह शक्य तितक्या लवकर दाखल होईल. वाहनातील साहित्याद्वारे प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन केले आहे.

०००००

चौकट

हत्ती हुसकावण्यासाठी

हत्ती सहजपणे पकडणे अशक्य आहे. त्यामुळे नव्या वाहनात त्यांना हुसकावण्यासाठी मिरची पूड, ढोल, ताशा, मोठ्या आवाजाचे फटाके, रात्रीच्यावेळी उपयोगी पडतील असे टॉर्च असे साहित्य असेल. यामुळे हत्ती असलेल्या परिसरात स्थानिकांच्या मदतीविना मोहीम राबविणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी वाहने जंगल, वनहद्दीत धावणार आहेत.

००००

एका हत्तीचा वावर

पावसाळ्यानंतर जिल्ह्यात सात हत्तींच्या कळपाचा संचार होता. उष्णता वाढल्यानंतर सध्या सहापैकी दोडामार्ग, कोकणात तर काही हत्ती कर्नाटक गेले आहेत. सध्या एकाच हत्तीचा वावर चंदगड तालुक्यातील पाटणे, तिलारी, गवसे (ता. आजरा) परिसरात असल्याचे वनप्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याच्याकडून उसासह उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मल्टिस्टेट’ प्रश्नांवर पालकमंत्र्यांचे घूमजाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (गोकुळ) महाराष्ट्र व कर्नाटक राज्य सरकारने ना हरकत दाखला दिला नाही तरी केंद्र सरकार कायद्यानुसार स्वत:च्या अधिकारात मल्टिस्टेट दूध संघ म्हणून परवानगी देऊ शकते,' असे मत व्यक्त करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घूमजाव केले आहे.

लोकसभा निवडणूक प्रचारावेळी पाटील यांनी राज्य सरकार गोकुळ मल्टिस्टेटच्या प्रस्तावाला परवानगी देणार नाही, असे स्पष्ट केले होते. दोन दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटक सरकारने मल्टिस्टेटला 'ना हरकत' देणार नसल्याची माहिती दिली होती. त्यामुळे मल्टिस्टेटचा प्रश्न संपला असल्याची चर्चा सुरू असतानाच रविवारी पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेवेळी सांगितले की, महाराष्ट्र व कर्नाटक राज्याने मल्टिस्टेटला विरोध केला आहे. गोकुळ दूध संघ हा जिल्ह्याचा दूध संघ रहावा, अशी उत्पादकांबरोबरच राज्य सरकारचीही भूमिका आहे. दोन्ही राज्यांनी मल्टिस्टेटला परवानगी दिली नसली तरीही केंद्र सरकार त्यांच्या अधिकारात परवानगी देऊ शकते. हा निर्णय केंद्रात येणारे नवे सरकार घेईल.'

राज्यात भाजप शिवसेना युतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येणार यावर ठाम असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. पवारांच्या घरातील कुणीही निवडून येणार नाही या मतावर मी ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबाद मतदार संघात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविषयी शंका व्यक्त केली आहे, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, खैरे चांगल्या मताने निवडून आल्यावर दानवे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत मी चुकलो असे खैरे म्हणणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

०० ०० ००

पुलाचे काम सुरुच राहील

केंद्रीय पुरातत्त्व विभागाने पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी यापूर्वीच लेखी पत्र दिले आहे. काही तांत्रिक उणिवा आहेत. त्या पूर्ण केल्या जातील. पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रयत्नशील आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

.. .. ..

दुष्काळाचे राजकारण नको

सरकार दुष्काळाबाबत गंभीर असून, सर्व उपाययोजना सुरु आहेत. तरीही राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही ही खासदार शरद पवार यांनी केलेली टीका योग्य नाही. पवारांनी दुष्काळाचे राजकारण करू नये, त्यांच्या सूचनांचे स्वागत करू, असे पाटील म्हणाले.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टोलविरोधी कृती समिती आज पालकमंत्र्यांना भेटणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील टोल हटवण्याचे टोलविरोधी आंदोलन यशस्वी झाले. पण आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद करुन कोर्टाकडून वॉरंट काढले जात आहे. याबाबत मंगळवारी (ता. ७) दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सोमवारी (ता. ६) दुपारी तीन वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत रविवारी घेण्यात आला. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात समितीची बैठक पार पडली.

जनरेट्यामुळे आंदोलनाला यश येवून टोल रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांवर विविध कलमांखाली शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. राज्य सरकारने टोल हद्दपार केल्यानंतर कृती समितीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनामधील कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी स्वत: आदेश दिलेले असतानाही पुन्हा कार्यकर्त्यांना वॉरंट येण्यास सुरुवात झाली आहे. वस्तुत: मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर संबंधित विभागाला ई-मेलद्वारे आंदोलन मागे घेण्याची विनंती कृती समितीने यापूर्वीच केली आहे. मुख्यमंत्र्याचे आदेश असताना पुन्हा वॉरंट बजावले जात असल्याने कार्यकर्त्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.

बैठकीस समितीचे निमंत्रक निवास साळोखे, आर. के. पोवार, दिलीप देसाई, बाबा पार्टे, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, भगवान काटे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अॅड. बाबा इंदूलकर, अॅड. पंडित सडोलीकर, स्वप्नील पार्टे, प्रसाद जाधव, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केशवराव’मध्ये सुविधांचा खेळखंडोबा

0
0

केशवराव नाट्यगृह ... फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शिक्षण, आरोग्य या सुविधेइतकेच शहराची सांस्कृतिक भूक भागविणे ही महापालिकेची जबाबदारी. त्यातंर्गत शहरात अद्ययावत नाट्यगृह, रंगकर्मी व कलाकारांना आवश्यक सुविधा आणि प्रेक्षकांसाठी कँटीन, स्वच्छतागृह, पार्किंगची सोय हे विषय महापालिकेच्या अजेंड्यावर असले पाहिजेत. मोठा गाजावाजा करत कोट्यवधी रुपये खर्चून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण केले. मात्र नूतनीकरणानंतरही नाट्यगृहात वातानुकूलित यंत्रणा, पिण्याच्या पाण्याची सोय, साऊंड ऑपरेटरची व्यवस्था, जनरेटरची उपलब्धता या साऱ्या पातळीवर सुविधांचा खेळखंडोबा पाहावयास मिळत आहे.

थिएटरमध्ये ८० लाखाच्या किंमतीची साऊंड सिस्टीम आहे, मात्र साऊंड ऑपरेटर नसल्यामुळे कार्यक्रमादरम्यान अडचणी निर्माण होतात. रेकॉर्डिंग होवू शकत नाही. साऊंड ऑपरेटर आणि सहायक साऊंड ऑपरेटरची नियुक्तीच केली नाही. दुसरीकडे सभागृहात वातानुकूलित यंत्रणेची सुविधा आहे, पण एसी कार्यक्रम सुरू असेपर्यंत पूर्ण वेळ चालू राहील का यासंबंधी कुणी खात्री देवू शकत नाही. एसी बंद झाला तर सभागृहात पंख्यांची सोय नाही. दोनपैकी एकच जनरेटर कार्यान्वित असतो. वातानुकूलित यंत्रणेचा भार तो खेचत नाही, या साऱ्या समस्यांना तोंड देत संयोजक व कलाकारांना कार्यक्रम सादर करण्याची कसरत करावी लागत आहे.

गेल्या तीन दशकाच्या कालावधीत नाट्यगृहाचे तीन वेळा नूतनीकरण झाले. १९८४ मध्ये नूतनीकरण झाले त्यावेळी आसनक्षमता ९५३ इतकी होती. त्यानंतर वीस वर्षांनी नाट्यगृहाचे पुन्हा नूतनीकरण झाल्यानंतर आसनक्षमता ७४३ झाली. २०१६ मध्ये पुन्हा नाट्यगृहाचे पुर्ननूतनीकरण झाल्यावर आसनक्षमता ७१४ पर्यंत खाली आली. बाल्कनीतील शेवटच्या तीन रांगेतील काही खुच्र्या या फक्त शोभेच्या बनल्या आहेत. त्या ठिकाणाहून रंगमंचावरुन कार्यक्रम नीट दिसत नसल्याची तक्रार संयोजकांची आहे. नाट्यवितरकांनी महापालिका प्रशासनाकडे याबाबीचे लक्ष वेधूनही त्यामध्ये काही सुधारणा केल्या नाहीत. नाट्यगृह परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

.........

बॉक्स सेट, नाटकाचे पडदेच नाहीत

नाट्यगृहात स्वत:चा बॉक्स सेट गरजेचा आहे. संगीत नाटकासाठी राजमहाल, रस्ते दर्शविणाऱ्यासह तीन प्रकारचे पडदे आवश्यक आहेत. मात्र नाट्यगृह व्यवस्थापनकडे संगीत नाटकाचे पडदेच नाहीत. याशिवाय विंग्ज, सोलर लाइट, डिमर्स, अद्ययावत माइक्स, कॉलर माइक्स, वायरलेस माइक्स या सुविधा पूर्ण क्षमतेने नाहीत. यामुळे नाट्यप्रयोग, संगीत नाटकांच्या सादरीकरणादरम्यान अडचणी उदभवतात.

..........

महापालिकेकडून अपेक्षा.....

पिण्याच्या पाण्याची सोय

नाट्यगृहात स्टेजवर लेवल्स, बॉक्स सेट

साऊंड ऑपरेटरची नियुक्ती

नाट्यगृहात पंख्यांची सोय

नाट्यगृह परिसरात कँटीन

प्रेक्षकासाठी असलेल्या टॉयलेटलची नियमित स्वच्छता

नाट्यगृहाच्या बाहेर नाटकांचे बोर्डस लावण्यासाठी उत्तम प्रकारची फ्रेम

नाट्यगृहाचा कर्मचारी वर्ग प्रशिक्षित हवा

.........

कोट

' नाट्यगृहात अत्यावश्यक सुविधा निर्माण कराव्यात यासाठी नाट्य परिषद व रंगकर्मीनी सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा केला. नाट्यगृहाचे नूतनीकरण करताना वेळोवेळी सूचना केल्या. मात्र प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. जर महापालिकेला नाट्यगृह चालवायला जमत नसल्यास त्याचा ताबा सरकारकडे द्यावा.

आनंद कुलकर्णी, अध्यक्ष, नाट्य परिषद कोल्हापूर शाखा

.............

'नाट्यगृहात अपंगांना ये जा करण्यासाठी मार्ग नाही. थिएटर हाऊसफुल्ल झाले तरी चारही दरवाजे उघडत नाहीत. दोन दरवाजाला आतल्या बाजूंनी पायऱ्या नाहीत. थिएटरमध्ये वातानुकूलित यंत्रणा आहे, पण त्याची खात्री नाही. थिएटरमधील जुने पंखे काढून टाकले आहेत. जुने पंखे काढू नका अशा सूचना रंगकर्मीनी केल्या होत्या, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.

सुनील माने, नाट्यलेखक व दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणुकीनिमित्त मार्ग बंद

0
0

कोल्हापूर

शिवजयंती उत्सव मिरवणुकीच्या निमित्त सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी चार वाजल्यापासून मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महालक्ष्मी चौक, पापाची तिकटी, माळकर चौक, शिवाजी पुतळा चौक, बिंदू चौक मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. मिरवणूक संपेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व वाहनांना आणि फेरीवाल्यांना प्रवेश बंद राहील, असे पत्रक पोलिसांनी प्रसिद्धीस दिले आहे. शिवजयंती उत्सव मिरवणुकीनिमित्त विविध सार्वजनिक तरुण मंडळांतर्फे मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहराच्या प्रमुख मार्गावरुन ही मिरवणूक होत आहे. त्यामुळे सोमवार (ता. ६) आणि मंगळवारी (ता. ७) या दोन दिवशी सायंकाळी चारनंतर मिरवणूक संपेपर्यंत या मार्गावरील प्रवेश बंद राहणार आहेत. या मार्गाजवळ असलेल्या जवळच्या रस्त्यांवरही वाहनांचे पार्किंग शिस्तीने करावे. शक्यतो वाहने बिंदू चौक, शिवाजी स्टेडियम आणि अन्य ठिकाणी पार्किग करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा वर्षे पसार असलेल्या दोघांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सहा वर्षांपासून फरार असलेल्या दोघाजणांना मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पोलिसांनी रविवारी अटक केली. संशयित जावेद सुहेल अहमद पटेल (वय २८, रा. अथणी-विजापूर, सध्या रा. रामकृष्ण नगर, कुपवाड, ता. मिरज), नितीन जगन्नाथ शिंगाडे (वय ३०, रा. नेहरू चौक, तळंदगे, ता. हातकणंगले, सध्या रा. कुपवाड, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूपुरी हद्दीतून दुचाकी चोरी करून पसार झालेले संशयित जावेद पटेल, नितीन शिंगाडे या दोघांचा शोध सुरु होता. ते गेल्या सहा वर्षांपासून पसार होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांना दोघे संशयित मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक सचिन पंडित, कॉन्स्टेबल इकबाल महात, सुनील कवळेकर, शिवाजी खोराटे, असिफ कलयगार व किरण भोगण यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांना पुढील कारवाईसाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपटेनगर टाकीला पर्यायी व्यवस्था करा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'आपटेनगर पाण्याच्या टाकीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ही टाकी कबुतरांसह पक्ष्यांचे अश्रयस्थान बनली आहे. पक्ष्यांची विष्ठा पाण्यात पडण्यासह तेथे मृतावस्थेतही पक्षी आढळून येत आहेत. गेल्या सात महिन्यांपासून टाकीची अशी अवस्था आहे. मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपटेनगर टाकीला पर्यायी व्यवस्था करा' अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्यावतीने महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांशी चर्चा केली. दक्षिण मतदारसंघाचे संघटक अवधूत साळोखे यांनी टाकीची झालेली दुरवस्था, पाणीपुरवठा लाइनमध्ये आढळलेली मृत पक्ष्यांचे अवशेष आदींची छायाचित्रे दाखवली. संबंधीत अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊनही दुर्लक्ष करीत आहेत. आपटेनगरसह टाकीवर असलेल्या भागात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले.

संजय पवार यांनी आपटेनगर टाकीप्रमाणे शहरातील अनेक टाक्यांची अशी दुरवस्था झाली आहे. येथे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. आयुक्तांनी शिष्टमंडळाच्या मागणीचा विचार करून आपटेनगर टाकीवर तातडीने ताडपत्री टाकण्याची सूचना केली. शिष्टमंडळात माजी आमदार सुरेश साळोखे, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दत्ताजीराव टिपुगडे, शुभांगी पवार, स्मिता सावंत, सुधीर राणे, साताप्पा शिंगे, राजू सांगावकर, स्वप्नील साळोखे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images