Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूरची क्रीडापताका आंतरराष्ट्रीय पातळीवर

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : क्रीडानगरी अशी कोल्हापूरची ओळख. कमालीची जिद्द, जिंकण्याची आतूर ईर्ष्या हे या मातीतील खेळाडूंचे अंगभूत कौशल्य. या कौशल्याच्या जोरावर, नेमबाजी, क्रिकेट, फुटबॉल, कुस्ती, जलतरण, बुद्धिबळ, कबड्डी अशा सर्वच खेळांमध्ये कोल्हापूरचे नाव महाराष्ट्रात पर्यायाने देशभरात पोहोचवले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धात दैदिप्यमान कामगिरी करत क्रीडानगरी ही बिरुदावली आणखी बळकट केली.

कुस्ती व फुटबॉल खेळांमुळे कोल्हापूर नगरीची क्रीडानगरी अशी सार्थ बिरुदावली निर्माण केली. राजर्षी शाहू महाराज व राजराम महाराजांची धोरणे यासाठी प्रेरणादायी ठरली. कुस्तीमध्ये पहिले ऑलिंम्पिक पदक मिळवणारे खाशाबा जाधव आणि पदक थोडक्यात हुकलेले के. डी. माणगावे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे नाव कोरले. नंतरच्या काळात खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा, तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे कोल्हापूरच्या खेळाडूंनी सर्वच खेळांमध्ये आपला डंका पिटला. खेळाडूंच्या परिश्रमाला सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींचे पाठबळ मिळाल्याने खेळाडूंची गरुडझेप अधिक वेगवान ठरली.

तेजिस्विनी सावंतने जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी केली. तेजिस्विनीच्या या यशाने नेमबाजीला वेगळे वलय मिळाले. तिच्या कामगिरीची पुनरावृत्ती करत राही सरनोबतने जागतिक आणि आशियाई नेमाबाजी स्पर्धांत पदक पटकावत ऑलिंम्पिकमध्ये पिस्टल प्रकारात पात्रता मिळवली. असे यश मिळवणारी ती पहिली महिला ठरली. अशीच कामगिरी अनुष्का पाटील व जान्हवी पाटील यांनी केली. मुलांमध्ये शाहू माने हाही नेमबाजीमध्ये योगदान देत आहे. शाहू स्टेडियम पुरता मर्यादीत असलेला खेळ अशी टीका सहन करत असलेल्या कोल्हापुरी फुटबॉलने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. २३ वर्षाखालील भारतीय संघात निखिल कदमने स्थान मिळवल्यानंतर सुखदेव पाटील हाही भारतीय संघात दाखल झाला. तर अनिकेत जाधवने १७ वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले.

क्रिकेट म्हणजे केवळ मुलांचा खेळ असा समज असताना स्थानिक स्पर्धांत बॉलगर्ल म्हणून काम करणाऱ्या अनुजा पाटीलने भारतीय महिलांच्या क्रिकेट संघात स्थान पटकावले. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भरीव योगदान देऊन नेमबाजीवरुन कोल्हापूरवासियांचे लक्ष क्रिकेटकडे वळवले. अनुजाच्या कामगिरीने प्रोत्साहित होऊन आज अनेक मुली क्रिकेटचे धडे गिरवताना मैदानावर दिसत आहेत. पारंपरिक खेळात खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत असताना फॉर्म्यूला वनसारख्या स्पर्धांत कृष्णराज महाडिक व चित्तेश मंडोडी यांनी कोल्हापूरचा डंका जागतिक पातळीवर वाजवला. तर ऋचा पुजारीने ग्रँड मास्टरचा किताब मिळवून कोल्हापूरच्या बुद्धिबळला नवी ओळख दिली.

शालेय स्तरापासून जलतरण क्रीडा प्रकारात वीरधवल खाडेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ऑलिंम्पिकसारख्या जागतिक स्पर्धांत जलतरणमध्ये पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. प्रो-कबड्डीमुळे या क्रीडा प्रकारतील खेळाडूंचे जीवनमानच बदलून गेले आहे. सागर खुटाळे, तुषार पाटील यांनी सलग दोन वर्षे छाप पाडल्यानंतर सिद्धार्थ देसाईने यावर्षी सर्वात महागडा खेळाडू ठरण्याचा बहुमान मिळवला. तर रमेश भेंडिगिरी यांनी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणन स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या सर्व वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीने प्रेरीत होऊन सद्यस्थितीत अनेक ज्युनिअर खेळाडू विविध राष्ट्रीय स्पर्धांत आपल्या कामगिरीची छाप पाडताना दिसतात.

कुस्तीत वुमेन स्पिरीट

कोल्हापूरच्या लाल मातीने अनेक मल्ल दिले. पहिले ऑलिंम्पिक पदक मिळवणारे खाशाबा जाधव, के. डी. माणगावे हे या मातीतील मल्ल. त्यांची परंपरा चालवत गणपतराव आंदळकर, दादू चौगुले, राम सारंग, संभाजी वरुटे-आरेकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला. युवराज पाटील यांनी मातीतील कुस्तीत देशभर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. पण त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीतील कोल्हापूरची पाटी कोरीच राहिली. एकीकडे पुरुष गटात अशी पिछेहाट होत असताना महिला कुस्तीगिरांनी मात्र स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामध्ये रेश्मा माने, नंदिनी साळोखे, स्वाती शिंदे, ऐश्वर्या येरुडकर आदींचा समावेश आहे. त्या राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासगी प्रवासी बसवर आरटीओची धडक

$
0
0

शहरातील विविध भागांत ३९५ बसची तपासणी; पैकी ६८ बस जप्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) राबविलेल्या खासगी प्रवासी बस तपासणी मोहिमेत शहरातील विविध भागांत ३९५ बसची तपासणी करण्यात आली. यापैकी ९७ बस दोषी आढळल्या असून, पैकी ६८ बस आरटीओने जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या बसपैकी ४८ वाहनधारकांकडून कर स्वरूपात २१ लाख ३५ हजार ११४; तर दंड म्हणून ६ लाख, २४ हजार ८०० असा एकूण २७ लाख ५९ लाख ९४१ रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे.

पुणे शहर व परिसरात राज्य भरातील खासगी बस प्रवासी वाहतूक करत असतात. प्रवाशांची वाहतूक करताना त्यांच्याकडून मोटार वाहन कायदा व नियमांतर्गत परवाना, अटी व शर्थींचा भंग होत असल्याच्या तसेच प्रवासी बसमधून मालवाहतूक करणे, जादा भाडे आकारणे अशा अनेक तक्रारी परिवहन कार्यालयाकडे प्राप्त होतात. तक्रारींनुसार आरटीओ कार्यालयाने एप्रिल महिन्यात तपासणी मोहीम हाती घेत खासगी प्रवासी बसवर धडक कारवाई केली. यामध्ये शहरातील सोलापूर रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता, नाशिक रस्ता आणि मुंबई रस्ता या ठिकाणी आरटीओने तीन वायूवेग पथकांच्या माध्यमातून तपासणी केली. प्रत्येक पथकात दोन मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. वायूवेग पथकांनी एक महिन्यात ३९५ वाहनांची तपासणी केली. यापैकी ९७ वाहने विविध कारणांसाठी दोषी आढळली. यामध्ये प्रामुख्याने कर थकविणे, परवाना नसणे, वाहतुकीचे नियम मोडणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि परवानगी नसताना मालवाहतूक करणे आदी कारणांवरून वाहनांवर कारवाई करण्यात आली. ९७ वाहनांपैकी आरटीओने ६८ वाहनांवर जप्तीची कारवाई केली. यापैकी ४८ वाहनधारकांकडून कर आणि दंडापोटी २७ लाख ५९ लाख ९४१ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, असे आरटीओ प्रशासनाने सांगितले.

प्रवाशांनी आरटीओकडे तक्रार करावी

सुटीच्या दिवसांमध्ये एसटी महामंडळाच्या गाड्यांना गर्दी असल्याने नागरिक खासगी प्रवासी बसने प्रवास करतात; मात्र नागरिकांच्या गरजेचा फायदा घेत बसचालक नागरिकांकडून तिकिटाचे दुप्पट-तिप्पट पैसे आकारतात. नियमानुसार सुटीच्या दिवसांत खासगी प्रवासी बसला ठरलेल्या तिकिटाच्या दीडपट पैसे आकारता येतात. मात्र, बसचालक अनेकदा त्यापेक्षाही जास्त तिकीटदर आकारतात. असा प्रकार आढळल्यास संबंधित बसचालकाविरोधात प्रवाशांनी थेट आरटीओ कार्यालयात तक्रार करावी. अथवा rto.12-mh@gov.in या मेलवर मेल करावा, असे अवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.

उन्हाळा, दिवाळी, गणपती, नवरात्राच्या दिवसांत अनेकांना सुट्या असतात. या दिवसांतच जास्तीत जास्त व्यवसाय करण्यासाठी खासगी बसचालक मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करतात. अनेकदा निमयांचे पालन न केल्याने बसचालक प्रवाशांचा जीवही धोक्यात घालतात. त्यामुळे महिनाभर बसव्यावसायिकांवर कारवाई केली आहे. येथून पुढेही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे.

- संजय राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक नवोपक्रमाचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच व्यावसायिक शिक्षणाची उपलब्धता असणाऱ्या संस्था, मेडिकल-इंजिनीअरिंगसह वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील अद्ययावत अभ्यासक्रम शिकण्याची संधी यामुळे गेल्या काही वर्षांत कोल्हापूरची ओळख ही 'एज्युकेशनल हब' म्हणून निर्माण झाली. 'केजी टू पीजी'पर्यंतची शिक्षण सुविधा असणाऱ्या कोल्हापुराने प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तावाढीसाठी राजर्षी शाहू सर्वशिक्षा अभियान, माझी शाळा - समृद्ध शाळा, विद्यापीठाची 'कमवा व शिका' यांसारख्या संकल्पनांची यशस्वी अंमलबजावणी करत शैक्षणिक नवोपक्रमाचा कोल्हापुरी पॅटर्न निर्माण केला.

देशभरातील नामांकित शैक्षणिक संस्थांनी इंटरनॅशनल स्कूल आणि कॉलेजीस सुरू केल्यामुळे कोल्हापूरचे शैक्षणिक क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. बदलत्या काळाची पावले ओळखून पारंपरिक अभ्यासक्रमांसह मेडिकल, इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्ट कॉलेजच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांनीही आधुनिक शिक्षणाची कास धरली. प्राथमिक स्तरावर शाळांची पटसंख्या वाढ, शैक्षणिक गुणवत्ता आणि गरीब, गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करुन देणाऱ्या या उपक्रमांचे राज्यानेही अनुकरण केले. विवेकानंद, रयत आदी शिक्षण संस्थांने ग्रामीण भागात कॉलेजांची स्थापना करून सामान्य मुलांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध केल्या. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, भारती विद्यापीठ, केआयटी, डीकेटीई, वारणा उद्योग समूह, संजय घोडावत शिक्षण समूहाने शिक्षणक्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली.

जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सर्वशिक्षा अभियानाच्या पॅटर्नवर सरकारी मान्यतेची मोहोर उमटली. तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कालावधीत या अभियानची सुरुवात झाली. लोकसहभागातून शाळांचा विकास या सूत्रावर आधारित डॉ. जे. पी. नाईक माझी शाळा, समृद्ध शाळा अभियानचा राज्यभर गवगवा आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांने शिष्यवृत्ती परीक्षेत नवा पॅटर्न निर्माण केला.

शैक्षणिक वारसा जपत करिअरही फुलविले

राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन मुलांच्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शंभर वर्षापूर्वी स्थापन केलेली वेगवेगळ्या जाती, धर्माची होस्टेल्स ग्रामीण भागातील मुलांना आधारवड ठरली आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव या भागातील मुलांनी या होस्टेलमधून उच्च शिक्षण पूर्ण केले. बोर्डिंगचा हा शतकोत्तर वारसा जपताना अनेक संस्थांनी ही होस्टेल्स केवळ विद्यार्थ्यांच्या निवासाची सोयीपुरताच मर्यादित न ठेवता स्पर्धा परीक्षा, बँकीग क्षेत्रातील करिअरसाठी मुलांना प्रोत्साहित केली.

विद्यापीठाची 'लोकल टू ग्लोबल' झेप

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचे प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून शिवाजी विद्यापीठाची ओळख. विद्यापीठाने गेल्या सहा दशकाच्या वाटचालीत काळानुरुप बदल करत 'लोकल टू ग्लोबल' अशी झेप घेतली. देशातील आणि परदेशातील विद्यापीठांशी सामज्यंस करार करत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना संशोधनाची दालने खुली केली आहेत. नॅनो टेक्नॉलॉजीसारखा अद्ययावत अभ्यासक्रम सुरू केला. विद्यापीठातील पदार्थविज्ञान, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्रशास्त्र, जीवशास्त्र विभागातील प्राध्यापकांचे संशोधनाचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला. परीक्षेनंतर ४४ दिवसांत निकाल लावण्याच्या पॅटर्नचा राज्यभर गवगवा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहारांचे नियमबाह्य कामकाज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी पदोन्नती, सेवाज्येष्ठतेच्या नियमाला फाटा, शिक्षक भरतीत अनियमिता केल्याचा ठपका चौकशी समितीने त्यांच्यावर ठेवला आहे. त्यांनी विविध प्रकरणात कर्तव्यात कसूर केली असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी शिफारस केली. चौकशी समितीच्या २९ पानी अहवालात लोहारांच्या बेकायदेशीर कामाचा पोलखोल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी अहवाल सादर केला. याप्रसंगी चर्चेत सहभागी होताना 'स्थायी'चे सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी लोहार यांच्या कारभाराचा पंचनामा केला.

निंबाळकर म्हणाले, 'अनियमितता व चुकीच्या पद्धतीने कामकाज करत लोहारांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. सरकारी नियमांना फाटा देऊन सरकारचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले असून अशा अधिकाऱ्यांना नोकरीतून कायमस्वरुपी काढून टाका, असा ठरावही स्थायी समितीने करावा,' अशी सूचना केली. चौकशी समितीने ४१ अर्जदारांच्या तक्रारी, कार्यालयाकडील नोंदी, आणि निष्कर्ष नोंदविले आहेत. सभेला प्रमुख पदाधिकाऱ्यासह सदस्य जयवंत शिंपी, युवराज पाटील, राहुल आवाडे, कल्लाप्पाण्णा भोगण यांची उपस्थिती होती.

लोहारांच्या समर्थनातील पत्रे खोट्या सहीचे

लोहार यांच्या समर्थनार्थ शाहूवाडी तालुक्यातील २२७ अर्ज चौकशी समितीकडे दाखल झाले होते. त्यापैकी दहा जणांना म्हणणे मांडण्यासाठी बोलावूनही एकही जण उपस्थित राहिला नाही. २२९ नावावरील नाव व स्वाक्षरी पाहिल्या असत्या त्या एकाच व्यक्तीने एकाच पेनाने व खोट्या सह्या केल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या अर्जांवर विचार करण्याची आवश्यकता नाही. लोहारांची बाजू मांडणाऱ्या अर्जांचे प्रकरण हे पूर्णपणे संशयास्पद वाटते असे चौकशी समितीने अहवालात नमूद केले आहे.

मिळकत करात घोटाळा

ग्रामपंचायतीच्या हद्दीतील औद्योगिक वसाहतीतील मिळकत करात कारखानदार व ग्रामसेवकांच्या संगनमतातून घोटाळा झाला असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. सीईओ मित्तल यांनी वसाहतीतील सर्व मिळकतीचे फेरमोजमाप करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

किरण लोहारांच्या कामकाजावरुन सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. चौकशी अहवाल सदस्यांना उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा अभ्यास करून येत्या स्थायी समितीच्या सभेत त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय होऊन सरकारकडे अहवाल सादर करण्याची प्रक्रिया प्रशासन पूर्ण करेल.

शौमिका महाडिक, अध्यक्षा जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेअरडीलवरुन प्रशासन धारेवर

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जकात ठेकेदार फेअरडील कंपनीची महापालिकेच्याविरोधात लवादासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान एलबीटी अधिकारी, वकिलांनी जाणीवपूर्वक कुमकवत बाजू मांडली. कंपनीसोबत मिलीभगत केल्याने लवादाचा निर्णय विरोधात गेला, असा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी, तसेच मध्यावरच माघार घेतलेल्या वकिलांवर फौजदारी दाखल करा,' अशी मागणी मंगळ‌ारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत सदस्यांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. दरम्यान महिला सदस्यांना सभागृहात बोलू देत नसल्याने त्यांनी सभात्याग करण्याचा इशारा दिला. त्यानंतर सभाध्यक्षांनी यापुढे सभेत प्रथम महिलांना बोलण्यास प्राधान्य देण्याचा निर्णय दिला.

शहरातील जकातीचा ठेका घेतलेल्या फेअरडील कंपनीला महापालिकेने नुकसान भरपाईपोटी १२२ कोटी रुपये देण्याचे आदेश हाय कोर्टाच्या लवादाने नुकतेच दिले. लवादाच्या निर्णयाचे पडसाद मंगळवारी सभागृहात उमटले. विधी व एलबीटी विभागाने अर्थपूर्ण व्यवहार केल्याने महापालिकेला १२२ कोटीचा भुर्दंड बसणार असून जनतेच्या कराची रक्कम अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कंपनीच्या घशात घालण्याचा नामुष्कीजनक प्रकार घडला. कंपनीने अधिकाऱ्यांना हाताशी धरुन यंत्रणा खिळखिळी केली आहे, असा आरोप सदस्यांनी सभागृहात केला.

उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, 'महापालिकेने कंपनीला १९९६ मध्ये २५ कोटीचा जकात ठेका दिला. कराराप्रमाणे कंपनी ५२ हप्त्यामध्ये दर आठवड्याला ४८ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार सहा आठवडे रक्कम दिली. नंतर हप्ते न दिल्याने ठेका काढून घेतला. तसेच पाच कोटीची बँक गॅरंटी जप्त केली व ठेका काढून घेतला. कंपनीने कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाने लवाद नेमण्याचे आदेश दिले. लवाद नेमण्यास विधी विभागाने विरोध केला नाही. त्यानंतरही लवादासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान अधिकाऱ्यांनी स्थायी समितीमध्ये झालेला ठरावच गायब केला. तसेच प्रशासनाने वेळोवेळी स्थायी अथवा महासभेला न्यायालयीन प्रक्रियेची माहिती दिली नाही. या सर्व प्रकरणाला परवाना अधीक्षक राम काटकरही जबाबदार आहेत.'

प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'कंपनीचे महापालिकेकडे दोन कोटी रुपये ठेव स्वरुपात आहेत. काही दिवसांपूर्वी तडजोड करण्यासाठी प्रयत्न झाले. पण तत्कालीन आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सुनावणी दरम्यान लवादासमोर भक्कम बाजू न मांडता विरोधी पक्षाला फायदेशीर ठरतील अशी कागदपत्रे महापालिका यंत्रणेमार्फत पोहोच केली. परिणामी २५ कोटीसाठी १२२ कोटी देण्याचा वेळ प्रशासनावर आली आहे.' तौफिक मुल्लाणी म्हणाले, 'कंपनीच्या विरोधातील झालेल्या निवाड्यामध्ये विधी विभाग गब्बर झाला. मात्र महापालिकेचे नुकसान झाले. मिलीभगत करणाऱ्या विधी ‌विभागाची चौकशी करून बार काउंसिलकडे तक्रार करा,' अशी मागणी केली.

प्रवीण केसरकर यांनी भांडवली मूल्यवर्धीत करप्रणाली रद्द झाली का? अशी विचारणा केली. 'राज्य सरकारने सुरू केलेली करप्रणाली कायम असून करप्रणालीमध्ये बदल होणार नाही.' असे प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान उमा बनछोडे, जयश्री चव्हाण, शोभा कवाळे आदी महिला सदस्यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पुन्हा नगरसेवकांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला नगरसेवकांनी सभात्याग करण्याचा इशारा दिला. त्यामध्ये सभाध्यक्षा मोरे यांनी हस्तक्षेप करत यापुढे प्रथम महिला सदस्यांना बोलण्यास प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महिला सदस्यांनी आपली मते मांडली. मात्र त्यानंतर स्वीपिंग मशीनच्या ठेक्यावरून उपमहापौर शेटे व आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्यात खडाजंगी झाली.

आयुक्तांचे चौकशीचे आदेश

सभागृहात वकील व एलबीटी अधिकाऱ्यांवर झालेल्या आरोपांची दखल आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतली. जकात ठेकेदार कंपनीने लवादासमोर दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी ज्या अधिकाऱ्यांनी, वकिलांनी हलगर्जीपणा केला आणि त्यांच्यामुळे महापालिकेच्या विरोधात निकाल गेला, अशावर कारवाई करण्याचा करण्याचा इशारा दिला. तसेच संबंधितांची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना देत असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

पाटणकरांचे चौकशी लावण्याचे आव्हान

उपमहापौर शेटे यांनी वकिल, अधिकाऱ्यांचे कंपनीबरोबर मिलीभगत असल्याचा आरोप केला. त्याचवेळी संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी असलेल्या अतिरिक्त आयुक्तांना 'केवळ वकिलांच्या फीच्या धनादेशावर स्वाक्षरी करता का? मुंबईला गेला का नव्हता' अशी विचारणा करत 'खड्ड्यात घालणारे अतिरिक्त आयुक्त काय कामाचे?' अशी जोरदार टीका सभागृतहा सदस्यांनी केली. यामुळे संतापलेल्या पाटणकरांनी 'उघड चौकशी लावा,' असे आव्हान उपमहापौर शेटे यांना दिले.

'प्रशासन देईल ती शिक्षा मान्य'

फेअरडील व महापालिकेच्या निवाड्या दरम्यान कंपनीला मदत केल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर केला. त्यामध्ये परवाना विभागाचे अधीक्षक राम काटकर यांचा समावेश होता. मात्र सभागृहात नसल्याने त्यांना म्हणणे मांडता आले नाही. कंपनीने दिलेल्या सुविधांबाबत आपल्यावरील आरोप सिद्ध झाल्यास प्रशासन देईल ती शिक्षा भोगण्यास तयार असल्याचे काटकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेचा ‘गोकुळ’वर म्हशींसह मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) पशुखाद्याच्या पोत्यामागे शंभर रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने म्हशींसह गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयावर मोर्चा काढला. शिवसैनिकांनी मुख्य प्रवेशद्वारालाच म्हशी बांधून दरवाढीचा निषेध केला. मुख्य कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्यावर शिवसैनिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. दरवाढीविरोधात जिल्ह्यात रास्ता रोको करण्याची घोषणाही करण्यात आली.

पितळी गणपती मंदिर येथून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली म्हशींसह मोर्चास सुरुवात झाली. 'पशुखाद्य दरवाढ करणाऱ्या संचालकांचा धिक्कार असो', 'पशुखाद्याची दरवाढ रद्द झालीच पाहिजे,' अशा घोषणा देण्यात आल्या. ताराबाई पार्क येथील कार्यालयाजवळ पोलिसांनी मोर्चा अडविला. त्यानंतर प्रवेशद्वाराला म्हशी बांधून निषेध केला.

त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यालयातील सभागृहात घाणेकर यांच्याशी चर्चा करून दरवाढ कमी करण्यासंदर्भातील निवेदन दिले. चर्चेवेळी पवार, देवणे यांनी लोकसभेची निवडणूक झाल्यावर दरवाढ का केली? पशुखाद्याचे दर वाढवता आणि दुसरीकडे गायीच्या दुधाचे दर कमी का करता?, नासलेल्या दुधाचा हिशेब उत्पादकाला का देत नाही?, अशा प्रश्नांची सरबत्ती केली.

कच्चा माल महागल्याने पशुखाद्याचे दर वाढले आहेत. पशुखाद्याचा प्रकल्प गोकुळ 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर चालवते. तसेच सर्व कंपन्यांच्या पशुखाद्याचे दर वाढले आहेत याकडे घाणेकर यांनी लक्ष वेधल्यावर आंदोलक चिडले. गोकुळने दरवाढ केल्यानंतर अन्य पशुखाद्य कंपन्यांनी दर वाढवल्याचा आरोप करण्यात आला.

गाय दूध दरवाढीबद्दल घाणेकर यांनी खुलासा केला. साखर उद्योगाप्रमाणे गेले दोन वर्ष दूध व्यवसाय अडचणीतून जात आहे. सरकारने कॅशलेसची अट घातल्याने गोकुळला गायीच्या दुधाला अनुदान मिळालेले नाही. तर गोकुळने गायीच्या उच्चप्रतीच्या दुधाला २८ रुपये ९५ पैसे दर दिला आहे, असा युक्तिवाद करताच कार्यकर्ते चिडले. कच्चा माल महागल्यावर पशुखाद्याचे दर वाढवता. मग दुधाचा दर का वाढवत नाही, असा प्रश्न शिवसैनिकांनी केला. कॅशलेस म्हणून गोकुळला वगळावे यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. आंदोलनात प्रा. सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, संभाजी भोकरे, प्रकाश पाटील भिकाजी हळदकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक सहभागी झाले होते.

००००००

आठवडाभर आंदोलन

पशुखाद्य दरवाढीविरोधात शिवसेनेच्या वतीने आठवडाभर रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. गुरुवारी (ता.२) सकाळी ११ वाजता शिवाजी पुलावर, शुक्रवारी (ता.३) आजरा एसटी बसस्थानक चौकात, शनिवारी (ता.४) शिरगाव फाटा चंदगड, मंगळवारी (ता. ७) गोकुळ शिरगाव येथे, बुधवारी (ता.८) बिद्री शीतकरण केंद्राजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाई निवारणासाठी विशेष योजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टंचाईग्रस्ते गावे आणि वाडीवस्तीसह आराखड्यात समाविष्ठ नसलेल्या गावातही विशेष योजनेतून शाश्वत उपाययोजना आखण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या बैठकीत झाला. ज्या गावांमध्ये व वाड्यावस्त्यात तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहेत, अशा ठिकाणांचा सर्व्हे करुन दोन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना अध्यक्षा महाडिक यांनी वरिष्ठ भूवैज्ञानिक, यांत्रिकी विभागाचे उपअभियंता व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून अनेक ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

पाणी टंचाईसाठी आयोजित बैठकीत गावांशी निगडीत अन्य प्रश्नांची चर्चा झाली. मात्र या महत्त्वपूर्ण बैठकीकडे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी जिल्ह्यातील विविध भागातील पाणी टंचाईची गावे, सध्याच्या उपाययोजनेचा आढावा घेतला. टंचाई निवारण कृती आराखड्यात २८८ गावे व वाड्यावस्त्या समाविष्ठ आहेत. यापैकी १२६ ठिकाणी खासगी विहिरी ताब्यात घेण्याची कार्यवाही आहे. तर ७७ ठिकाणी विंधन विहिरीची व्यवस्था करायची आहे. मंजूर २६ विंधन विहिरींपैकी २५ ठिकाणची कामे अंतिम टप्प्यात आहेत. १५ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता मनीष पवार यांनी दिली. नळ पाणी पुरवठा योजनेंतर्गत चार ठिकाणी दुरुस्ती, चार विंधन विहिरीची दुरुस्तीची कामे समाविष्ठ आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाड्यावस्त्यावर झिंक कोरेट टाकी

तीन तालुक्यातील ११ वाड्यावस्त्यावर पुढील वर्षी पाणी टंचाईला सामोरे जाऊ नये, म्हणून झिंक कोरेट टाकी प्रस्तावित केली आहे. यामध्ये चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूरकपैकी धनगरवाडा, कुपाळेपैकी बांद्रे, मिरवेल दलितवस्ती, मिरवेलपैकी नामपोल, राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्लीपैकी ढेरेवाडी फणस, भैरी, माजगावपैकी कुटाळवाडी, अस्वलवाडी, मोहितेवाडीचा समावेश आहे. शाहूवाडी तालुक्यातील सोनाळीवाडी, बुऱ्हाणवाडी येथे झिंक टाकी प्रस्तावित आहे.

शहरालगतच्या गावातील खुल्या जागांचे फेरसर्व्हेक्षण

ग्रामीण भागातील खुल्या जागांवरील अतिक्रमणे, वसाहती विकसित करताना सरकारी नियमानुसार आवश्यक खुली जागा न सोडलेल्या ग्रामपंचायतीमधील खुल्या जागांचे फेरसर्व्हेक्षण होणार आहे. यामध्ये कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणातील गावांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी वसाहती विकसित झाल्या सोसायटीने खुली जागा अद्यापही ग्रामपंचायीच्या नावावर केल्या नाहीत. यासह जिल्ह्यातील सर्वच गावातील खुल्या जागांची माहिती, फेरसर्व्हेक्षण करण्याचे आदेश सीईओ मित्तल यांनी दिली. करवीर तालुक्यातील जवळपास ४० हून अधिक गावच्या ग्रामसेवकांची बैठक घेऊन त्यांना सक्त सूचना केल्या. खुल्या जागेसंदर्भात गृहनिर्माण सोसायटी व वसाहतींना नोटीसा पाठवून मुख्यालयला माहिती कळविण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहारांना सेवेतून कार्यमुक्त करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी कर्तव्यात कसूर, दप्तर दिरंगाई व सरकारी नियमांचे उल्लंघन केले आहे. यामुळे ते प्रशासकीय कारवाईस पात्र ठरतात, त्यांना जिल्हा परिषद सेवेतून कार्यमुक्त करावे आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र बदल्या कराव्यात, अशी शिफारस चौकशी समितीने केली आहे. दरम्यान, येत्या १५ दिवसात स्थायी समितीची विशेष सभा घेऊन लोहार यांच्यावर कारवाई करावी, असा अहवाल प्रशासनाकडून शिक्षण आयुक्तांकडे पाठविणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत चौकशी समितीने लोहार यांच्या कामकाजाच्या चौकशीचा २६ पानी अहवाल सादर केला. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. चौकशी समितीने ४३ तक्रारींसंदर्भात सुनावणी घेऊन लोहार हे विविध प्रकरणात दोषी असल्याचे म्हटले आहे. तसेच ते हेतुपुरस्सर जिल्हा परिषदेने बोलाविल्या सभेस अनुपस्थित राहतात, असा ठपकाही त्यांच्यावर समितीने ठेवला आहे. लोहार यांच्या कामकाजाविषयी जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रचंड तक्रारी आहेत. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही सदस्यांनी त्यांच्या भ्रष्ट कामकाजाचा पाढा वाचला.

शिक्षक मान्यता, मुख्याध्यापक पदोन्नती, शाळा मान्यता अशा विविध प्रकरणात लोहार यांनी नियमबाह्य व गैरकारभार केल्याचा आरोपही सदस्यांनी यापूर्वीच केला आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करण्याचा ठराव सभागृहाने मंजूर केला होता. या समितीने तक्रारदारांचे म्हणणे व पुराव्याच्या आधारे लोहार हे कारवाईस पात्र ठरत असून त्यांना सेवेतून कार्यमुक्त करण्याची शिफारस केली. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, सदस्य अरुणकुमार इंगवले, प्रसाद खोबरे, भगवान पाटील व समिती सचिव रविकांत आडसूळ यांचा चौकशी समितीत समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गळतीने रस्त्यावर पाण्याचे लोंढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भक्तीपूजानगर ते गजानान महाराजनगर दरम्यान अमृत योजनेचे काम सुरू असताना जुनी सिमेंट पाइपलाइन फोडून वळवण्याचा प्रयत्न करताना गळती लागल्याने रस्त्यावर पाण्याचा लोंढा वाहू लागला. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात हॉकी स्टेडियम रस्त्याला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. शहर पाणीपुरवठा विभागाचा गलथानपणा आणि ठेकदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन दिवस हजारो लिटर पाणी वाया गेले.

शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्याचा बट्याबोळ उडाला असताना हजारो लिटर पाण्याचा अपव्यव करून एकप्रकारे आगीत तेल ओतण्याचा प्रकार घडला.

विश्वपंढरीच्या मागील बाजूस असणाऱ्या भक्तीपूजानगर ते गजानन महाराज नगर दरम्यान अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठ्याची पाइपलाइन टाकण्यात येत आहे. याच मार्गावर १९४७ मध्ये टाकलेली सिमेंटची पाइपलाइन आहे. जुन्या पाइपलाइनमधून विश्वपंढरीकडे फाटा मारण्यासाठी खोदाई करण्यात आली. रविवारी रात्री मध्यरात्री सुमारे दहा ते १५ कर्मचाऱ्यांच्या मदतीने काम सुरू होते. सिमेंट पाइपलाइनला फाटा मारुन विश्वपंढरीकडे पाणी आणण्यासाठी दुसरी पाइपलाइन जोडण्यात आली. मात्र योग्य पद्धतीने काम झाले नसल्याने सोमवारी रात्री जोडकामातून पाणी येण्यास सुरुवात झाली. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पद्मा कॉलनीमधून हे पाणी थेट हॉकी स्टेडियमच्या रस्त्यावर आले.

मंगळवारी पहाटे तर या लाइनवरील पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहू लागले. मोठ्या पावसाळ्यात ज्याप्रमाणे रस्त्यावरुन पाणी वाहत असते, त्याचप्रमाणे कडाक्याच्या उन्हाळ्यात पाणी वाहू लागले. याबाबतची माहिती नगरसेवक किरण नकाते यांना मिळताच त्यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेत अवैध पद्धतीने मुख्य पाइपलाइनला फाटा का मारला जातो याबाबत जाब विचारला. त्याचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी थेट जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश दिले. मात्र पाणीपुरवठा बंद होऊपर्यंत हाजारो लिटर पाणी रस्त्यावरुन वाहत होते. पाइपलाइनचा पाणीपुरवठा बंद केल्याने यावर अवलंबून असलेल्या ५८ व ५९ प्रभागातील नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेईई मेन्स परीक्षेत कोल्हापूरकर झळाळले

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) एप्रिल २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षा तथा जेईई मेन्स या परीक्षेत कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी २७ मे होणाऱ्या जेईई अॅडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

देशभरातील आयआयटी, एनआयटी, सीएफटीआय, राज्य पातळीवरील अभियांत्रिकी कॉलेज या संस्थांमधील प्रवेश जेईई मेन्स व अॅडव्हान्स परीक्षांच्या आधारे पूर्ण करतात.

चाटे शिक्षण समूहातील विविध सेंटरचे २१७ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. चाटे संस्थेचे वरद येरगोळे (९९.७८) तर आविष्कार सूर्यवंशी (९८.८१) हे एनटीए स्कोअर करून चाटे शिक्षण समूहात अव्वल आले आहेत. अनिरुद्ध सोनवणे, आशुतोष शिरोडकर, सुमित चौगुले, वैभव बिचवे, शिवम मानकर, नेहा जाधव, दर्शन मुळे, रोहन जाधव, आदर्श गणमुखी, वैष्णवी पाटील, सौरभ हंजे, आदित्य कर्णिक, सोमेश खरबाळ, आकांक्षा देसाई, अनय राजगुरू यांनी विशेष गुणांसह यश मिळवले. ओम पाठक, तेजस कुंभार, हिमांशु पवार, अनुराग चव्हाण, दिपाली पाटील, हेमराज तायशेटे, यश धनसरे, साहिल सोनटक्के, वर्षा कुंभार, जयदीप कोयंडे, उदितांशु प्रभावळे, क्षितिजा साखरे, पियुष पोतदार, कोमल माने, समीक्षा कुंभार, गार्गी वायदंडे, खुशबू शेख, अमृता हनिमानळे, निसर्ग केळुसकर, योगेश सोनवणे, सिद्धांत भालेराव, वैभव कांबळे, सुमेध दानोळीकर, संस्कृती शिंदे, अभिषेक कांबळे, नीरज सोनवणे, आयुष जाधव, स्वराज सरदेसाई, उद्धव नागरगोजे, यश शिंदे, प्रथमेश बुरूड, प्रसाद सुतार, आदिनाथ शेळके, वैष्णवी पवार, तेजस मोरे, मेघराज साळुंखे, प्रसाद जोशी, आशुतोष थिटे, आदिनाथ ढमढेरे, प्रतीक गुरव, प्रज्वल अहेर आदी विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हालेवाडीच्या शाळेचा बदलला चेहरामोहरा

$
0
0

लोगो :शतकमहोत्सवी शाळा

Balasaheb.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : 'गाव करील ते राव काय करील', अशी एक म्हण आपल्याकडे आहे. मात्र, सध्या गावागावांतील वातावरण पाहता तेही दुर्मिळ होत चाललं आहे. तरीही सकारात्मक विचार करणाऱ्यांच्या पुढाकाराने एखादे काम हाती घेतले तर पूर्ण व्हायला वेळ लागत नाही. असाच अनुभव हालेवाडी (ता. आजरा) येथील शतकमहोत्सवी शाळेच्या कामानिमित्ताने येत आहे. नोकरीनिमित्त शहरांत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत १० लाख रुपयांपर्यंत निधी जमा केला आणि पाहता पाहता शाळेचा चेहरा-मोहरा बदलून गेला. केवळ भौतिक सुविधाच नव्हे तर गुणवत्तावाढीसाठीही या तरुणांनी पुढाकार घेतल्याने हे काम जिल्ह्यात आदर्शवत ठरत आहे.

हालेवाडी हे दीड-दोन हजार लोकसंख्येचे गाव. या गावातील बहुसंख्य तरुण नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या शहरांत वास्तव्यास आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केल्यानंतर जून १९१९ ला या गावात प्राथमिक शाळा सुरू झाली. गावातील तालीम, लक्ष्मी देवालय, भैरीचे देवालय आणि काही घरांत वर्ग भरायचे. १९९० च्या दरम्यान शाळेची प्रशस्त इमारत झाली. या शाळेतून आजवर अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आणि मोठ्या हुद्द्यावर नोकऱ्या करून निवृत्ती घेतली तर अनेकजण आजही मोठ्या पदांवर काम करताहेत. गेल्या काही वर्षांत गावोगावी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रस्थ वाढल्याने गावोगावच्या शाळांतील पटसंख्या कमी होत होती. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रमाण वाढले, परिणामी शाळांची गुणवत्ता कमी होत होती. या सगळ्याचा विचार करून आणि शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तरुणांनी शाळेचा कायापालट करण्याचा विचार मांडला. मोठ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांत ज्या सुविधा दिल्या जातात त्या सुविधा आपल्या शाळेत का देता येऊ नयेत या ध्येयाने मुंबईमध्ये मल्टिनॅशनल कंपनीत वरिष्ठ हुद्द्यावर असलेले शिवाजी आपके, महादेव पंडित, हिंदुस्थान पेट्रोलियममधून निवृत्त झालेले जयवंत पन्हाळकर, अशोक आजगेकर, शिक्षक निंगोजी पाटील, सैन्यदलातून निवृत्त झालेले सुधीर साळोखे, सदाशिव पन्हाळकर, गावातील शिक्षक राजाराम पन्हाळकर, आनंदा गेंगे, डॉ. अशोक फर्नांडिस यांनी पुढाकार घेतला आणि स्वत: पहिल्या टप्प्यात दीड लाखांची रक्कम जमा केली. अभियंता असलेले शंकर आजगेकर यांनी कामाचे नियोजन केले. यानंतर व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करून त्यावर आवाहन केल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. यातून मोठी रक्कम जमा झाली. प्रारंभी शाळेत मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालय, वॉश रूम आणि पाण्याची टाकी बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर शाळेचा व्हरांड्यात उत्कृष्ठ दर्जाची फरशी घातली, पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी बांधून घेतल्या. उंच-सखल असलेले शाळेचे मैदान माजी विद्यार्थ्यांच्या खर्चातूनच सपाट करण्याचे काम सुरू आहे. शाळेला रंग दिल्यानंतर बोलक्या भिंती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

सुसज्ज संगणक लॅब

शाळेला मिळालेले संगणक धूळ खात पडून होते. त्याचे साहित्य वापराविना पडून होते. ते सगळे अडगळीतून बाहेर काढले आणि स्वतंत्र कम्पुटर लॅब तयार केली. यासाठी गावात सुतारकाम करणाऱ्या शरद लोहार यांनी फर्निचरकाम केले. यासाठी महादेव पंडित यांनी खर्च केला. त्यानंतर काही माजी विद्यार्थ्यांनी की बोर्ड आणि माऊस भेटरुपाने दिले. त्यामुळे आज सुसज्ज अशी लॅब तयार झाली आहे.

पन्हाळकरांचे दातृत्व

१९९० मध्ये बांधलेल्या शाळेच्या इमारतीची अनेक कामे आत्ता निघत आहेत. शौचालयासाठीच तीन लाख रुपये खर्च झाल्याने पुढील कामे संथगतीने सुरू होती. त्याचवेळी गावातील चांगल्या कामासाठी पुढाकार घेणारे हिंदुस्थान पेट्रोलियममधून निवृत्त झाल्यानंतर जयवंत पन्हाळकर यांनी शाळेचा व्हरांड्याचे काम हाती घेतले. यासाठी त्यांनी एक लाख रुपये दिले. त्यानंतर पुन्हा आणखी रक्कम घालून सुसज्ज व्हरांडा केला. या कामासाठी केवळ माजी विद्यार्थ्यांनीच नव्हे तर ते ज्या ठिकाणी काम करतात त्या त्या ठिकाणी काम करतात तेथील त्यांच्या मित्रांनीही मदत केली. कोल्हापुरातील अनिल येजरे यांच्या मित्रांनी शाळा रंगवण्यासाठी रंग दिला. मुंबईतील शिवाजी आपके याच्या कंपनीतील काही मित्रांनी रोख स्वरुपात जवळपास ५० हजार रुपयांची मदत केली. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या प्रकाश पंडित यांच्या कंपनीतील डायरेक्टरनी जवळपास ४५ हजार रुपयांची संगमरवरी सरस्वतीची मूर्ती दिली.

ग्रंथालय साकारणार

गावातील तरुण आणि शाळेतील मुलांसाठी ग्रंथालय साकारण्याची कल्पना पुढे आल्यानंतर आवाहन केले. यासाठी अनेकांनी आपल्याकडील जुनी, नवीन पुस्तके दिली तर अजून अनेकजण देत आहेत. शाळा गावाबाहेर असल्याने त्यासाठी बंदिस्त कपाटे लागणार असल्याने त्यासाठी एक खोली तयार करून ग्रंथालय साकारण्यात येणार आहे. आवाहनानंतर अनेकांनी शाळेसाठी मासिकांची वर्गणी भरत ती कायमस्वरुपी सुरू केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस

$
0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलाव सुशोभिकरण आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचे काम करताना टॉवर परिसरातील कठडा वरिष्ठ कार्यालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय काढल्याबद्दल देखरेख अधिकारी कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे यांना मंगळवारी उपशहर अभियंत्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. या करवाईमुळे महापालिकेच्या अधिकारी, ठेकेदार व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे अधोरेखित झाले.

रंकाळा सुशोभिकरण आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचे काम सुरू आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून चार कोटी ८० लाखाचा निधी जाहीर झाला असून ५० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. टॉवर परिसरातील काम ठेकेदार व्ही. के. पाटील यांना दिले असून कनिष्ठ अभियंता वांडरे यांच्या देखरेखेखाली काम सुरू आहे. टॉवर परिसरात काम करण्यासाठी जेसीबी मशीन जाण्यासाठी संबंधितांनी रस्त्यालगत बांधलेला कठडा काढला. त्याचवेळी शिवजयंतीसाठी सुरू असलेल्या स्टेजसाठी एका सार्वजनिक मंडळाने पाडले असल्याचा संशय होता.

ऐतिहासिक वास्तू पाडल्यामुळे मंडळाच्या कार्यपद्धतीवर टीका होऊ लागली. मात्र टॉवरचे संवर्धन व जतन करण्यासाटी दगडी बांधकामाचे कॉपिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे कामाला सुरुवात झाली. रस्त्याकडील कठड्याच्या आतील बाजूस असलेली दलदल काढून दगडी पेव्हिंग करण्यासाठी समोरचा कठडा काढला. मात्र हा कठडा काढताना संबंधित ठेकेदारांने वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेतली नाही. 'परवानगी न घेताच कठडा काढल्याबद्दल कनिष्ठ अभियंता वांडरे यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.' अशी माहिती उपशहर अभियंता रमेश मस्कर यांनी दिली. याबाबत वांडरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, 'दगडी कॉपिंग व कठड्याची आतील बाजुतील दलदल काढून दगडी पेव्हिंग करण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या कठड्याचे काम करण्यात येणार येईल.'

रंकाळा तलाव विविध कारणामुळे संवेदनशील विषय बनला आहे. तलावाचे संवर्धन व जतन करण्यासाठी अनेक घटक प्रयत्नशील असताना महापालिका प्रशासनातील समन्वयाचा अभाव दिसून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानाचा हक्क काढूनघेण्याचे कारस्थान

$
0
0

मतदानाचा हक्क काढून

घेण्याचे कारस्थान

कराड :

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांसह त्यांच्या बगलबच्च्यांनी महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच तब्बल साडेचारशे कारखाना सभासदांना अक्रियाशील ठरवून त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचे कारस्थान रचले आहे. मात्र, हे दृष्ट कट-कारस्थान आम्ही उर्वरित सर्व सभासदांपर्यंत पोहचवित ते सभासदांच्या पाठिंब्यावरच उध्वस्त करणार आहे, अशी माहिती कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन व विरोधी गटातील विद्यमान संचालक अविनाश मोहिते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कारखान्याचे विरोधी गटातील विद्यमान संचालक अशोकराव जगताप, काही सभासद शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाक्षरीवरून सभात्याग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये उपसूचनेसह करवाढीचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी २० फेब्रुवारीपर्यंत घेणे अपेक्षित होते. तसेच अर्थसंकल्पाच्या उपसूचनेवर विरोधी गटनेत्यांची स्वाक्षरी नसतानाही विषय अजेंड्यावर आल्याचा मुद्दा महापालिकेच्या मंगळवारच्या सभेत वादाचे कारण ठरले. महासभेत ठरल्याप्रमाणे गटनेत्यांची स्वाक्षरी नसल्याने प्रथम ताराराणी व नंतर भाजप नगरसेवकांनी सभात्याग करत आपला रोष व्यक्त केला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. यावेळी विरोधी आघाडीने करनिर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम म्हणाले, 'आचारसंहिता असल्याने निर्णय घेता येणार नाहीत, अशी वस्तुस्थिती असताना करवाढीच्या विषयाचा समावेश कशासाठी केला. करवाढीला दिलेल्या उपसूचनेवर सर्व गटनेत्यांच्या स्वाक्षरी घेण्याचा निर्णय महासभेत घेतला होता. पण विरोधी आघाडीच्या गटनेत्यांच्या स्वाक्षरी न घेता विषयपत्रिकेवर विषय आलाच कसा? प्रशासन मनमानी कारभार करत असेल, तर कोर्टात जाणार.' असा इशारा देत सभात्याग केला. त्यांच्यासोबत सर्वच ताराराणी आघाडीचे नगरसेवक सभागृहातून निघून गेले.

भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी म्हणाले, '२० फेब्रुवारीपर्यंत करनिश्चिती होणे अपेक्षित होते. पण त्यावर कार्यवाही झालेली नसताना गटनेत्यांच्या स्वाक्षरीशिवाय विषय पत्रिकेवर विषय का आणला? अशी विचारणा केली. तसेच सभात्याग करण्याचा इशारा दिला. दोन्ही आघाडीप्रमुखांनी करनिर्धारक व संग्राहक कारंडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

आचारसंहिता शिथिल झाली नसल्याचे स्पष्ट करत कारंडे म्हणाले, '२० फेब्रुवारीपूर्वी मालमत्ता करांचे दर निश्चित झाले असून त्याला सभागृहाने उपसूचना दिली आहे. आजच्या सभेत परवाना शुल्कबाबतचे विषय आहेत.' यावर विरोधी आघाडीचे समाधान न झाल्याने भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला. विरोधी आघाडीने सभात्याग केला, तरी कोरम पूर्ण असल्याने सभा पुढे चालू राहिली.'

भाजप-ताराराणीची स्वतंत्र पार्टीमिटिंग

निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या सभागृहामध्ये भाजप-ताराराणीची आघाडी अभेद्य राहिली. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व युतीच्या प्रचार करण्यावरुन आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. हे मतभेद सभेपूर्वी झालेल्या पार्टी मिटिंगमधून समोर आले. दोन्ही आघाडीने स्वतंत्र मिटिंग घेत सभागृहात प्रवेश केला. कोणत्याही विषयावरुन एकत्रपणे सभात्याग करणारी आघाडीने आज स्वतंत्रपणे सभात्याग केला. परिणामी निवडणुकीचे पडसाद आगामी काळात महापालिकेच्या राजकारणावर उमटणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोक्का न्यायालयाचा प्रस्ताव गृहखात्याकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरात विशेष मोक्का कोर्ट सुरू व्हावे, या मागणीचा प्रस्ताव कोल्हापूर पोलिस दलाकडून गृह खात्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

खून, मारामाऱ्या, खासगी सावकारीसह मटका, जुगार हातभट्ट्या असे संघटित गुन्हे करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्यास पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. त्यांच्यावर हद्दपारी बरोबर थेट मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे. पोलिस अधीक्षक देशमुख यांनी संघटित गुन्हेगारांवर थेट मोक्काचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन वर्षांत राज्यात सर्वात जास्त कोल्हापूर जिल्ह्यात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्का प्रस्ताव संबंधित पोलिस ठाण्याकडून तयार करून तो पोलिस अधीक्षकांमार्फत विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला जातो. त्यांच्या मंजुरीनंतर मोक्काअंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाते. मात्र, याचे काम पुण्यातील विशेष मोक्का कोर्टात केले जाते. त्यासाठी तपासी अधिकाऱ्यांना संशयित गुन्हेगारांना घेऊन वारंवार पुण्यातील कोर्टात वारंवार जावे लागते. यात पोलिस अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांचे श्रम व वेळ वाया जातो. तसेच गुन्हेगारांना पुण्यापर्यंत न्यायचे व पुन्हा आणण्याची जोखीमही स्वीकारावी लागते. या सर्व अडचणींचा विचार करुन विशेष मोक्का कोर्ट कोल्हापुरात सुरू व्हावे, याबाबतचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तिघे अटकेत

$
0
0

कोल्हापूर: चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतील दिलबहार तालीम मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ यांच्यात झालेल्या अंतिम फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणी तिघां संशयितांना जुना राजवाडा पोलिसांनी आज अटक केली. अमित सुभाष जाधव (वय ३५) धैर्यशील शशिकांत पोवार (वय ३२) व अनिकेत महेश साळुंखे (वय २४ सर्व रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. २४ मार्चला प्रकार घडला होता.

अंतिम सामन्यादरम्यान पंचांनी दिलेल्या निर्णयाला आक्षेप घेत दिलबहार समर्थकांनी मैदानात व मैदानाबाहेर गोंधळ घातला. दोन्ही संघाचे समर्थक आमने-सामने आल्याने तणाव निर्माण होऊन तोडफोडीचा प्रकारही घडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्ही कोल्हापुरीराज्यात भारी

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : 'आम्ही कोल्हापुरी, राज्यात भारी' या उक्तीला साजेसे काम करीत अनेक अधिकारी राज्याच्या प्रशासकीय सेवेत आपला वेगळा ठसा उमटवित आहेत. अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करीत ते कोल्हापूरचे नाव उंचावत आहेत. चांगल्या कामाचा नावलौकीक त्यांनी मिळवला, टिकवला आहे. प्रशासनात त्यांचे नेहमीच वेगळेपण राहिले. भूषण गगराणी, ज्ञानेश्वर मुळे, विश्वास नांगरे-पाटील यांनी कोल्हापुरी अधिकारी म्हणून विशेष छाप पाडली.

भूषण गगराणी हे मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव आहेत. १९९०मध्ये ते आयएएस झाले. सुरुवातीच्या काळात त्यांनी सिंधुदूर्ग येथे जिल्हाधिकारी पद भूषवले. पर्यटन विभाग, सार्वजनिक आरोग्य अशा विविध पदावर सेवा बजावली आहे. सध्या ते मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव म्हणून काम पाहत आहेत. महत्वाच्या पदावर असल्याने कोल्हापूरचे नाव ते राज्य पातळीवर उज्ज्वल करत आहेत.

आर. पी. झेंडे हे राज्य निवडणूक आयोगाकडे सहसचिव पदावर आहेत. त्यांचे गाव चंदगड तालुक्यातील पारले. ते कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर होते. सातारा, अमरावती आदी ठिकाणी त्यांनी काम केले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे महत्वाच्या पदावर काम करत आहेत. मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासह निवडणूक प्रक्रियेसंबंधी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडत आहेत.

मंत्रालयात अर्थ विभागात सहसचिव पदावर कार्यरत असलेले वसंत पाटील यांचे गाव राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड. त्यांनी प्राथमिक शिक्षण येथेच घेतले. १९८७ मध्ये पीएसआय म्हणून प्रशासकीय सेवेत रूजू झाले. १९९३ मध्ये मंत्रालयात कक्ष अधिकारपदी निवडले गेले. पदोन्नतीने ते अर्थ विभागात सहसचिव झाले. मागील तीन वर्षापासून त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. दुर्गम भागातून जाऊन प्रशासकीय सेवेत यशस्वी कामगिरी करीत आहेत.

सध्या नाशिक पोलिस आयुक्त पदावर असलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांचे शिक्षण शिवाजी विद्यापीठात झाले. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील कोकरुड. ते आयपीएस अधिकारी आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावेळी ताज हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी धाडसी कारवाई केली. यूपीएससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. लेखन आणि वक्तृत्व ही दोन कौशल्ये त्यांच्याकडे आहेत. पोलिस दलात त्यांनी विविध उपक्रमांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

ज्येष्ठ लेखक, 'पानीपत'कार विश्वास पाटील यांचे मूळ गाव शाहूवाडी तालुक्यातील नेर्ली. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पाटील यांनी प्रशासकीय सेवा आणि साहित्य क्षेत्रात दबदबा निर्माण केला. १९९६ मध्ये ते भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी झाले. त्यांनी विविध विषयांवर विपूल लेखन केले असले तरी 'पानीपत' ही कांदबरीच त्यांची ओळख बनली. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून ते निवृत्त झाले.

परराष्ट्र मंत्रालयात महत्त्वाच्या पदांवरील सेवेनंतर नुकतेच निवृत्त झालेल्या ज्ञानेश्वर मुळे यांचे गाव शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत होऊनही त्यांनी चिकाटी, जिद्दीच्या जोरावर मोठे स्थान मिळवले. ते आयआरएस झाले. परराष्ट्र खात्यात त्यांनी महत्वाची पदे भूषवली. परराष्ट्र मंत्रालयातील सचिवपदावरून ते निवृत्त झाले. मराठमोळा अधिकारी म्हणून राज्यात आणि दिल्लीत प्रशासकीय सेवा त्यांनी गाजवली.

राधानगरीसारख्या दुर्गम तालुक्यात माझे गाव. तरीही मोठ्या जिद्दीने प्रशासकीय सेवेत रुजू झालो. मराठी माध्यमात शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळवले. तीन वर्षांपासून राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्यात अर्थ विभागाचा सहसचिव म्हणून योगदान देत आहे.

- वसंत पाटील, सहसचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठा विहिरीत टाकले विषारी औषध

$
0
0

पाणी पुरवठा विहिरीत

टाकले विषारी औषध

सातारा

भाडळे (ता. कोरेगाव) येथे भवानीनगर परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या युनुस शिकलगार यांच्या विहिरीत अज्ञात व्यक्तीने रविवारी रात्री विषारी औषध टाकले. या औषधामुळे पाणी दुषित झाले असून, विहिरीतील मासे मृत्युमुखी पडले आहेत. या प्रकरणी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भवानीनगर परिसराला सामाजिक बांधिलकीतून शिकलगार आपल्या विहिरीवरून विना मोबदला पाणीपुरवठा करीत आहेत. या विहिरीतील पाण्यामुळे सुमारे अडीचशे ते पाऊणे तीनशे लोकांचा आणि २५०पेक्षा जास्त जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न संपुष्टात आला आहे.

...........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार हनुमंत डोळसयांचे कर्करोगाने निधन

$
0
0

आमदार हनुमंत डोळस

यांचे कर्करोगाने निधन

मंगळवारी दसुर गावी होणार अंत्यसंस्कार

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विद्यमान आमदार हनुमंत डोळस यांचे मंगळवारी सकाळी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मागील दोन वर्षांपासून ते पोटाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. आज, बुधवारी सकाळी दहा वाजता दसूर (ता. माळशिरस) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून डोळस यांच्यावर मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील सैफी रुग्णालयात उपचार सुरू होते. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार डोळस २००९ आणि २०१४ मध्ये निवडून आले होते. १९९९ ते २००५ पर्यंत माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासमवेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या उभारणीत त्यांनी योगदान दिले होते. माळशिरसचे आमदार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. हनुमंत डोळस मोहिते-पाटील घराण्याचे विश्वासू सहकारी होते. पोटाचा कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रासलेले हनुमंत डोळस गेल्या वर्षभरापासून मृत्यूशी झुंज देत होते. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १९८५पासून दर वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन ते करीत असत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यांच्या दुष्काळी दौऱ्यासाठी आले होते. सांगोला तालुक्यातील मंगेवाडी येथे त्यांनी चारा छावणीला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवादही साधला. मंगेवाडीत असतानाच त्यांना आमदार डोळस यांचे निधन झाल्याचे वृत्त समजाच, पुढील दुष्काळी दौरा रद्द करून तातडीने हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले.

.............

आतील पानासाठी वापरता येईल

हनुमंत डोळस यांचा जन्म १ जून १९६२ रोजी दसूर (ता. माळशिरस) येथे झाला. पहिली-चौथीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा दसूर, तर पाचवी-सातवीपर्यंतचे शिक्षण बोंडले येथे झाले. आठवी-अकरावीपर्यंतचे शिक्षण पंढरपूरमधील विवेकवर्धिनी येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. वयाच्या चौथ्या महिन्यात आईचे व वयाच्या आठव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्याने डोळस यांनी मोठ्या कष्टाने आयुष्य जगत आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी मुंबईत गेल्यानंतर वेटर म्हणून हॉटेलमध्ये नोकरी केली. विजयसिंह मोहिते-पाटील १९८०मध्ये आमदार झाल्यावर त्यांच्याशी जवळीक वाढली. १९८२मध्ये युवक कॉंग्रेसचे बोरोवली शाखेचे अध्यक्ष झाले. १९८५मध्ये मुंबई शहर युवक कॉंग्रेस कार्यकारणीवर त्यांची निवड झाली. १९९०मध्ये म्हाडाच्या सदस्यपदी निवड झाली. १९९७मध्ये युवक कॉंग्रेसच्या राज्य कार्यकारणीवर निवड झाली. राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना होताच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. जून १९९९ रोजी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांची निवड झाली. डिसेंबर १९९९मध्ये महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर २००९ आणि २०१४मध्ये ते राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तिकीटावर माळशिरसमधून निवडून आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७१ लाख मे. टन साखर पडून

$
0
0

म. टा. प्रतिनधी, कोल्हापूर

कोल्हापूर विभागातील कारखान्यांची गतहंगाम व चालू हंगामात उत्पादित झालेली ७१ लाख १२०४ मेट्रिक टन साखर विक्रीविना गोदामांमध्ये पडून आहे. साखर विक्री न झाल्याने कारखाने व बँका अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या विभागातील ७५ टक्के कारखान्यांची गेल्या महिन्यात साखर विक्रीच झाली नसल्याने आगामी साखर हंगामावर मोठे संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर विभागात एकूण ३८ साखर कारखाने असून, कोल्हापूर जिल्ह्यात २२, तर सांगली जिल्ह्यात १६ कारखाने आहेत. २०१८ मध्ये साखरेचे दर कोसळल्याने साखर उद्योगावर मोठे संकट आले आहे. गतवर्षी साखरेचे बंपर उत्पादन झाल्याने आणि विक्री न झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील २२ कारखान्यांची २४ लाख ८४ हजार ११२ मेट्रिक टन साखर शिल्लक होती. यंदाही ५० लाख ६० हजार ९६१ मेट्रिक टन उत्पादन झाले. मात्र, साखर विक्री न झाल्याने कारखान्यांना घेतलेल्या कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे कर्जापोटी तारण असलेली साखर कारखान्यांना विकता आली नाही.

केंद्र सरकारने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल २९०० रुपये केला. त्यानंतर तो ३१०० रुपये केला. तसेच एफआरपी देण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना सॉफ्टलोन देण्याचे आदेश दिले. त्यामुळे साखर उद्योगाला थोडाफार दिलासा मिळाला. पण ज्या साखर कारखान्यांची एफआरपी कमी आहे, त्यांनी ३१०० पेक्षा कमी दराने साखर विक्री केल्याने अनेक कारखान्यांची साखर शिल्लक आहे. जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या कोल्हापुरातील ११ कारखान्यांनी गेल्या तीन महिन्यांत साखर विक्री केली नाही. त्यामुळे १२५ ते १५० कोटी रुपये कर्जाचे हप्ते थकले आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ५२ लाख ५२ हजार ६९८ मेट्रिक टन साखर गोदामात पडून आहे.

सांगली जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी यंदा २० लाख ९७७५ मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले असून, १० लाख २१ हजार ६३३ मेट्रिक टन साखरेची विक्री केली आहे. गतवर्षी शिल्लक असलेली साखर मिळून यंदा सांगली जिल्ह्यात १८ लाख ६८ हजार ५०६ मेट्रिक टन साखर विक्रीविना शिल्लक आहे. कोल्हापूर विभागातील साखरेला यापूर्वी पश्चिम बंगाल, पूर्वेत्तर भारतात मोठी मागणी होती. पण कोल्हापूरचे मार्केट उत्तर प्रदेशने काबीज केले आहे. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील अंतर कमी असल्याने वाहतूक खर्च कमी पडतो. त्यामुळे कोल्हापूर विभागातील साखर महाग पडते. साखर उद्योगापुढे निर्माण झालेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी होत आहे. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर साखर उद्योगाला अनुदान द्यावे, या मागणीला सर्व राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

००००००

जिल्हा कारखाने गतवर्षी शिल्लक साखर उत्पादित साखर विक्री झालेली साखर यावर्षीची शिल्लक साखर

कोल्हापूर २२ २४,८४,११२ ५०,६०,६९१ २३,१२,३७४ ५२,३२,६९८

सांगली १६ ८,८०,३६४ २०,०९,७७५ १०,२१,६२३ १८,६८,५०६

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images