Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अपुऱ्या सामुग्रीवरच अतिक्रमण कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने सोमवारपासून शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. परंतु पथकामधील कर्मचाऱ्यांची संख्या आणि जप्त केलेल्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी केवळ एकच डंपर असल्याने कारवाईवर मर्यादा येत आहेत. बुधवारी स्टेशन रोडवर कारवाई सुरू असताना जप्त केलेल्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वाहनांची तासनतास प्रतीक्षा करावी लागली. कारवाईवेळी यंत्रणाच सक्षम नसेल तर कारवाईचा फार्स कशासाठी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शुक्रवारी (ता. ५) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीनंतर शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यास सुरुवात झाली. सोमवारी खानविलकर पेट्रोल पंप, एसपी ऑफिस, प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात कारवाई केली. या कारवाईमध्ये वीस कर्मचारी, एक जेसीबी व दोन डंपर असा लवाजमा होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या कारवाईमध्ये कर्मचारी व वाहनांची संख्या कमी करण्यात आली. अपुरी यंत्रणा असतानाही पथकाने रामानंदनगर, आयटीआय ते इंदिरासागर हॉल परिसरात कारवाई केली.

बुधवारी अत्यंत संवेदनशील अशा स्टेशन रोड परिसरात कारवाई करताना मात्र पथकाला अपुऱ्या वाहनांचा फटका बसला. व्हिनस कॉर्नर, रेल्वे स्टेशनपासून हॉटेल पंचशीलपर्यंत कारवाईचा धडाका पथकाने लावला. यावेळी अनेक अनधिकृत केबिन्स व हातगाड्या ताब्यात घेतल्या. पण ताब्यात घेतलेले साहित्य भरुन एक डंपर गेल्यानंतर सुमारे तास ते दीड तास डंपरची प्रतीक्षा करावी लागत होती. परिणामी पथकाला कारवाई करुन डंपरची वाट पाहावी लागत होती. त्यामुळे ताब्यात घेतलेले होर्डिंग्ज, बॅनर्स, जाहिरात फलक रस्त्यावर ठेवून वाट पाहण्याची वेळ पथकावर आली.अपुरी यंत्रणा असतानाही अतिक्रमण निर्मूलन पथकाने २७ अनधिकृत हातगाड्या, दहा केबिन्स, दहा फुलविक्रेत्यांच्या टपऱ्या ताब्यात घेतल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुध‌वारी खासबाग मैदान येथील खाऊ गल्लीत प्लास्टिक विक्री व साठवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली. दहा किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून प्लास्टिकची साठवणूक केल्याबद्दल विक्रेत्यांना तब्बल पाच हजारांचा दंड केला. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात प्लास्टिकची विक्री खुलेआम विक्री सुरू असताना गेल्या चार महिन्यानंतर प्रथमच अशी दंडात्मक कारवाई केली.

राज्य सरकारने गेल्या वर्षी प्लास्टिक व थर्माकोल विक्री व साठवणुकीवर बंदी घातली आहे. निर्णयानुसार प्लास्टिक विक्री व साठवणूकप्रश्नी कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने प्रथम कारवाईचा धडाका लावला. पण नंतरही ही मोहीम पूर्णपणे थंडावली. परिणामी शहरात प्लास्टिकची खुलेआम विक्री व उत्पादन सुरू होते. बुधवारी मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई धडाका लावला.

आरोग्य विभागाच्या पथकाने खाऊ गल्लीतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे असलेल्या दहा किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करत दंडात्मक कारवाई केली. कारवाईमध्ये विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक सुशांत कावडे, शुभांगी पवार, राहुल राजगोळकर, नंदकुमार पाटील, सहायक आरोग्य निरीक्षक सौरभ घावरी व गीता लखन आदी सहभागी झाले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक संरक्षक भिंत उतरवली

$
0
0

मटा इम्पॅक्ट ... लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलाव येथील अंबाई टँकची तडे गेलेली सुमारे ११ फुटाची संरक्षक भिंत महापालिका प्रशासनाने बुध‌वारी उतरवली. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. अंबाई टँकच्या संरक्षक भिंतीला तडे गेल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने त्वरीत धोकादायक भिंत उतरवून घेतली.

शालिनी पॅलेसकडून रंकाळा पदपथाकडे जाताना अंबाई टँकच्या पश्चिमेकडील बाजूस संरक्षक भिंत आहे. सुमारे ११ फुटाच्या या भिंतीला दोन ते तीन ठिकाणी मोठ्या भेगा पडून भिंत एका बाजूला झुकली होती. पदपथ उद्यान ते क्रशर चौकांपर्यंत प्रचंड रहदारी असते. पालक लहान मुलांसह या रस्त्यावर फिरण्याचा आनंद घेत असतात. येथे असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमुळे येथील वर्दळीमध्ये अधिकच भर पडते. याच वर्दळीच्या ठिकाणच्या झुकलेल्या संरक्षक भिंतीमुळे सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या व सायंकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. कोणत्याही क्षणी भिंत कोसळण्याची शक्यता असल्याने येथून ये- जा करताना नागरिक जीव मुठीत घेऊनच जात होते.

याबाबतचे वृत्त बुधवारी (ता. १०) महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाले. यानंतर महापालिकेने तातडीने कार्यवाही करत सकाळपासूनच झुकलेली भिंत उतरवून घेतली. सुमारे सात फूट धोकादायक भिंतीचा भाग काढून टाकण्यात आला. यामुळे सुटीच्या निमित्ताने फिरायला येणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, महापालिका प्रशासनाने धोकादायक भिंत उतरवताना दाखवलेली तत्परता रंकाळ्याच्या डागडुजीसाठीही दाखवावी, अशी अपेक्षा भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा उमेदवारांना नोटिसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणूक खर्चात तफावतप्रकरणी चार उमेदवारांना तर खर्चच सादर न केल्याने दोन उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई, नंदकुमार काटकर यांनी खुलासा देण्याची नोटीस बजावली. नोटीस मिळाल्यापासून ४८ तासात उत्तर देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, काँग्रेससह मित्रपक्षाचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक, भाजप, शिवसेनेसह मित्रपक्षाचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक, हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी व शिवसेना, भाजप मित्रपक्षांचे उमेदवार धैर्यशील माने यांना खर्चात तफावत प्रकरणी तर राजू मुजीकराव शेट्टी, संग्रामसिंह गायकवाड यांना खर्चाचा तपशील दिला नसल्याने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

निवडणूक खर्च निरीक्षक पथकाने बुधवारी रिंगणातील उमेदवारांनी १ ते ७ एप्रिलअखेर केलेल्या खर्चाचा तपशील आयोगाच्या निरीक्षकांसमोर सादर केला. यावेळी उमेदवारांनी खर्चाची माहिती देणे बंधनकारक होते. मात्र राजू मुजीकराव शेट्टी आणि गायकवाड यांनी खर्च देण्याकडे पाठ फिरवली. उर्वरित उमेदवारांनी खर्च दिला आहे.

महाडिक यांचा खर्च १६ लाख ६३ हजार ३२० तर मंडलिक यांचा १२ लाख ५७ हजार ५४४, 'हातकणंगले'तील उमेदवार शेट्टी यांचा खर्च १८ लाख ५३ हजार ९८३, माने यांचा खर्च १४ लाख ७७ हजार ९३० खर्च निवडणूक पथकातर्फे देण्यात आला आहे. महाडिक यांच्याकडून केवळ २ लाख ८१ हजार ४२८, मंडलिकांकडून २ लाख ४५ हजार ४८८, शेट्टींकडून २ लाख ४६ हजार ८९०, मानेंकडून १ लाख ७२ हजार ३२ रूपये खर्च केल्याची माहिती दिली आहे. पडताळणीत महाडिक, मंडलिक, शेट्टी, माने यांच्या खर्चात मोठी तफावत असल्याचे समोर आले. उमेदवारांनी वाहन खर्च कमी दाखवला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या आठवड्यापूर्वी येथे झालेल्या सभेला एकूण ८ लाख ७६ हजार खर्च झाला. त्या सभेला शेट्टी उपस्थित असल्याने सभेच्या एकूण खर्चातील निम्मा म्हणजे ४ लाख ३७ हजार रूपयांचा खर्च शेट्टी यांच्या खर्चात धरला आहे. अशाप्रकारे चारही उमेदवारांच्या खर्चात मोठी तफावत निदर्शनास आल्याने नोटिसा काढण्यात आल्या आहेत. नोटिसीला उत्तर आल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

.......................

उमेदवाराचे नाव निवडणूक पथकाने नोंदवलेला खर्च उमेदवाराने दिलेला खर्च

धनंजय महाडिक १६ लाख ६३ हजार ३२० २ लाख ८१ हजार ४२८

प्रा. संजय मंडलिक १२ लाख ५७ हजार ५४४ २ लाख ४५ हजार ४८८

राजू शेट्टी १८ लाख ५३ हजार ९८३ २ लाख ४६ हजार ८९०

धैर्यशील माने १४ लाख ७७ हजार ९३० १ लाख ७२ हजार ०३२

...............

चौकट

तफावत का ?

उमेदवारी अर्ज भरताना, प्रचारावेळी कार्यकर्ते, मतदार स्वत:ची वाहने घेऊन येतात. त्याचाही खर्च निवडणूक निरीक्षकांनी उमेदवारांच्या खर्चात दाखवला आहे. तो उमेदवारांनी दाखवलेला नाही. यामुळे खर्चात तफावत दिसत आहे. ही वस्तुस्थिती असल्यास उमेदवारांचा खर्चही ग्राह्य धरण्यात येणार आहे. पण तफावत आढळल्यास नोटीस देण्याचे आयोगाचे आदेश असल्याने संबंधित उमेदवारांना नोटीस देऊन खुलासा मागवला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 19

साड्या, भांड्यांना मतदार भूलणार नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान व रेल्वे सेवेचा विस्तार केला. उडाण योजनेत कोल्हापूरचा समावेश झाला. भाजप सरकारने कोल्हापूर वैभववाडी रेल्वे योजना मंजूर केली. विमानतळ आणि रेल्वे या भाजप सरकारच्या विकास कामाचे श्रेय खासदारांनी घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. साड्या, भांडी वाटून मतदार भूलनार नाही,' अशी टीका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार महाडिक यांचे नाव न घेता केली. कळंबा येथील प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक बाबा देसाई होते.

पालकमंत्री पाटील यांनी आज कळंबा, मोरेवाडी, हणबरवाडी, गांधीनगर येथे शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. कळंबा येथील महालक्ष्मी तालीम मंडळ येथे झालेल्या सभेत ते म्हणाले, 'दुसऱ्याने दिलेल्या साडीपेक्षा स्वत:च्या नवऱ्याने दिलेली साडी पत्नीला प्रिय असते. महिला मेळाव्याच्या आडून साड्या व भांडी वाटली जात आहेत. निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर जिंकल्या जात आहेत. मतदार जागृत झाला असून साड्या व भांडी वाटून मतदार भूलणार नाही.'

भाजपच्या विकास कामाचे श्रेय विरोधक घेऊ लागले तर जशास तसे उत्तर देईल जाईल, असा इशारा देत पालकमंत्री पाटील म्हणाले, 'महायुतीच्या प्रचार प्रारंभात वैयक्तिक टीकाटिप्पणी करू नका असे आवाहन केले होते. पण आमच्या उमेदवारांवर टीकाटिप्पणी होत असेल माझ्या कार्यकर्त्यांना घातलेले बंधन मी तोडण्यास सांगितले आहे.'

सभेला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय पोवार, शिवसेना शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, भाजप सरचिटणीस अशोक देसाई, सुभाष रामुगडे, नगरसेवक विजय खाडे, सुजित चव्हाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडलिकावर टीका, महाडिकांचे कौतुक

$
0
0

मंडलिकावर टीका, महाडिकांचे कौतुक

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आघाडी सरकारच्या कालावधीत संपूर्ण देशभरात ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. कोल्हापूर जिल्ह्यात २५० कोटी रुपयांचा लाभ झाला. शेतकऱ्यांना कर्जाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीचा सारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यावर इथल्याच एका खासदाराने त्या कर्जमाफीच्या विरोधात नाबार्डकडे तक्रार केली. त्यामुळे ११२ कोटी रुपये परत गेले अशा शब्दांत पवार यांनी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यावर टीका केली. त्याचवेळी त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या पाच वर्षातील कामगिरीचे मुक्तकंठाने स्तुती केली. देशभरातील प्रभावी व संसदेत जादा प्रश्नांची मांडणी करणाऱ्या पहिल्या तीन खासदारांत महाडिकांचा समावेश आहे. खासदारांनी दिल्लीत व मतदारसंघात आदर्शवत काम कसे करावे याची शिकवणी इतर खासदारांना मिळावे म्हणून निवडणुकीनंतर महाडिकांचा खास प्रशिक्षण वर्ग भरविणार आहे, अशा शब्दांत पवार यांनी एका अर्थी प्रशस्तीपत्र दिले.

फाशी कुठल्या चौकात द्यायची?

साठ दिवसांत काळा पैसा भारतात परत आणला नाही तर फाशी द्या अशी वल्गना मोदी यांनी केली होती. सत्तेची पाच वर्षे संपत आली, अजून काळा पैसा काही परत आला नाही, आता त्यांना फाशी कुठल्या चौकात द्यायची? असा सवाल पवार यांनी केला. तसेच केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी 'गंगा नदी स्वच्छ केले नाही तर जलसमाधी घेईन' अशी शपथ घेतली होती. प्रदूषणमुक्त गंगा नदी काही पाहावयास मिळाली नाही, आणि त्यांनी जलसमाधी घेतल्याचे दिसले नाही. त्यांनी जलसमाधी घेतली नाही एका अर्थी बरेच झाले, नाहीतर गंगा आणखी प्रदूषित झाली असती, असा टोला लगावताच एकच हास्यकल्लोळ उठला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुकूमशाहीचा देशाला धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशाच्या घटनेबरोबरच संसद, रिझर्व्ह बँक, सुप्रीम कोर्टांवर हल्ला केला जात आहे. यातून देशात एकप्रकारची हुकूमशाही आणण्याचा भाजपचा डाव आहे. त्यासाठी फसव्या घोषणा करुन लोकांच्या अपेक्षा वाढवायच्या. त्यांच्या मतांचा फायदा घेऊन सत्ता हातात ठेवायचे धोरण अवलंबले जात आहे. त्यांच्या हातात देश सुरक्षित नाही. त्यांना धडा शिकवण्यासाठी देशात परिवर्तन करा,' असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी गुरुवारी कागल येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी पवार यांनी भाषणात भाजपबरोबरच पंतप्रधानांवर जोरदार टीका केली. देशाच्या घटनेवर हल्ला झाला असून नागरिकांना दिलेल्या अधिकारात बदल करण्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. काय वाट्टेल ते सहन करु, पण घटनेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर सामान्य माणूस सत्ता उलथवून टाकेल. विस्तवाशी खेळू नका, असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला.

भाजपला सत्तेचा माज चढला असून सत्ता डोक्यात गेली आहे, अशी कडवट टीका करत पवार म्हणाले, 'शेतकरी, कामगार, उद्योजकांना दिलेले शब्द पाळलेले नाहीत. मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण न देऊन फसवणूक केली आहे. त्यांना सामान्यांची अजिबात चिंता नाही. केवळ सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी ते खोटी आश्वासने देत आहेत. देशातील सर्व घटक दु:खी असून त्यांनी मूठभरांसाठी राज्य चालवले आहे. त्यांच्या मंत्री व खासदारांनी अनेक घोषणा केल्या आहेत. पण त्याची अंमलबजावणी काहीच झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६० दिवस द्या, परदेशातील काळा पैसा आणतो. १०० दिवस द्या, काळा पैसा उद्धस्त केल्याशिवाय राहणार नाही. पैसा आणला नाही तर भरचौकात फाशी द्या असे सांगितले होते. त्याचे काय झाले माहीत नाही. भाजपच्या हातात सत्ता असताना कधीही हल्ले झाले नाहीत असे बोलतात. अक्षरधाम मंदिर, रघुनाथ मंदिर, कारगिल हल्ला, पार्लमेंट हल्ला, अमरनाथ यात्रा, गोध्राकांड, पठाणकोट, उरी इतके हल्ले झाले. इतके हल्ले झालेले नेभळट सरकार देशाच्या इतिहासात पाहिलेले नाही. अशांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'आत्ता हे सोसत नाही

$
0
0

'आत्ता हे सोसत नाही...'

बाळासाहेब पाटील

Balasaheb.Patil@timesgroup.com

Tweet @BalpatilMT

बाहेर ऊन 'मी' म्हणत होतं. जस-जसं ऊन तापत जाईल तसं गावातल्या घराघरातलं वातावरण तापत होतं. त्यावर उपाय म्हणून रसन्याची पाकिटं फोडून गंजात सरबत केला होता, हलगीवाल्याला शेकायची गरज वाटत नव्हती. गल्ली-गल्ली तापली होती. घामाच्या धारा निघत होत्या. असल्या गरमागरम वातावरणात सगळं गाव गल्लोगल्ली फिरत होतं. या मिरवणुकीच्या पुढं एक 'तयारीचं' पोरगं जोरात घोषणा देत होतं आणि बाकीचे त्याचे अनुकरण करत किंवा वाक्य पूर्ण करत त्यात सामील होत होती. जिल्ह्याच्या पार एका टोकला आसलेल्या तालुक्यातील त्या आडवळणी गावात पदयात्रा सुरू होती. 'नेता खासदार झाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही' असा 'पण' केलेल्या कार्यकर्त्याच्या गावात ही पदयात्रा असल्यानं जोरात तयारी झाली होती. गल्लीत गर्दी सामावत नव्हती. उमेदवाराच्या कपाळावर आत्ता कुंकू लावलायला जागा शिल्लक नव्हती तरी ते आयाबायांना नकार देत नव्हते. हात जोडून दिसेल त्याला नमस्कार करत होते. त्यातून लहान मुलंही सुटत नव्हती. सगळं गाव भारल्यासारखं झालं होतं. नाही म्हणायला विरोधक आपापल्या घरात बसून या सगळ्याचा कानोसा घेत होते. त्यांनी आपल्या पोरांना या मिरवणुकीत सोडलं होतं. कोण-कोण कुठं-कुठं कसा-कसा आहे यावर नजर ठेवायला हे नजरबाज कामी येणार होते. तेही आम्ही तुमचेच आहे म्हणून बेमालूम मिसळून गेले होते.

गावातल्या गल्ल्याही भरभक्कम असल्यानं उमेदवाराच्या कपाळावरचा कुंकू घामाबरोबर ओघळत होता. चेहरा उन्हानं आणि कुंकवानं लालबुंद झाला होता. 'साहेब' हात जोडत होते आणि कार्यकर्ते कडे करून 'मी पुढे का तू पुढे' असं करत त्यांना संरक्षण पुरवत होते. गल्ली गल्ली करत पदयात्रा अगदी उधाणाला आली होती, त्यावेळी साहेबांच्या लक्षात आलं आपला बिनीचा शिलेदार कुठंतरी गायब झालाय. तरीही साहेबांना तिकडं लक्ष द्यायला उसंत नव्हती, कारण पदयात्रा लोकांनी 'हातात' घेतली होती. कुठल्यातरी जत्रेत गल्ली फुलावी तशी गर्दी उसळली होती. घोषणांनी घरा घराची कौले हलायला लागली. डेअरीच्या दारात आल्यावर तर घोषणेला एकच 'उकळी' आली. साहेबांना पुन्हा कार्यकर्ता आठवला, मात्र पदयात्रा लोकांनीच हातात घेतल्यानंतर त्यांच्या मनातला विचार बाजूला गेला. अखेर एक एक करत कार्यकर्त्याच्या गल्लीत पदयात्रा आली. कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्यांनी आता आणखी वातावरण तापवायला सुरुवात केली. घोषणांनी परिसर दणाणला. एक एक घर करत साहेब कार्यकर्त्याच्या दारात आले तर दोघा कार्यकर्त्यांनी त्यांना हळूच कानात सांगितलं, 'साहेब इथं जरा थांबायला लागतंय.' साहेबांचे कान टवकारले. कारण त्यांच्या तालुक्यात 'साहेब, या गावात जरा रडायला लागतंय' असं म्हटलं की एक 'भाबडे साहेब' बोलता बोलता हुंदका फोडतात आणि सभा 'सजवतात' हे त्यांना माहीत होतं. मग साहेब थांबले तेवढ्यात दोन कार्यकर्त्यांनी साहेबांच्या कार्यकर्त्याला उचलूनच बाहेर आणला. साहेबांना वाटलं, हा नाराज बिराज आहे की काय? पण आल्या आल्या त्यानं 'एकदाच घुसणार...' म्हणून घोषणा दिली आणि बघता बघता पुन्हा वातावरण तापलं. कार्यकर्ता कृतकृत्य झाला, 'साहेब, कायबी करा, खरं आता हे सोसत न्हायी. तालुक्यावर अन्याय झालाय. आम्हाला जगणं नकोसं झालंय, हाल बघवत नाही.'असं म्हणत म्हणत त्याचे डोळे भरून आले. साहेबही कार्यकर्त्याचे प्रेम बघून भारावले. तेवढ्यात साहेबांना रसना आणला. साहेबांनी इतरांना घ्यायला सांगितला. मग त्यांना काहीतरी आठवलं, 'अरे हो पण तू पदयात्रेतनं कुठं गायब झालास? आणि हा असा पोरांच्या हातावर का बसलास?' यावर 'साहेब खाली पाय टेकवत नाही. आत्ता तुम्ही खासदार झाल्यावरच खाली उतरणार आणि पायाच चप्पल घालून तुम्हाला हार घालायला येणार..'मग एकच जयघोष झाला. एकदाच घुसणार...!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषी कुलगुरूंना हटवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भ्रष्ट, गैर व बेकायदेशीर कारभार करणारे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हेच गतवर्षीच्या सदोष पदवी प्रमाणपत्रप्रकरणी दोषी आहेत. त्यांना कुलगुरूपदावरून हटवण्यासाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा) तर्फे मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत १६ एप्रिलपासून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती 'सुटा'चे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील व सुधाकर मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मानकर म्हणाले, '१६ एप्रिलला शिवाजी विद्यापीठासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून यामध्ये अधिसभा सदस्य व सुटा पदाधिकारी सहभागी होणार आहेत. २० एप्रिलला शिक्षक, कर्मचारी संघटना व कामगार संघटनांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. २६ रोजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील प्राध्यापकांचे धरणे आंदोलन दसरा चौकात करण्यात येणार आहे. ६ मे रोजी मुंबई येथे राज्यपालांच्या कार्यालयासमोर अधिसभा, विद्यापरिषद व व्यवस्थापन परिषद सदस्य व सुटा पदाधिकारी धरणे आंदोलन करणार आहेत.

मानकर पुढे म्हणाले, 'गेल्यावर्षीच्या दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांना दिलेल्या पदवीप्रमाणात अनेक त्रुटी होत्या. अशी प्रमाणपत्रे बदलून देण्याबाबत विद्यापीठाकडून अद्याप दिरंगाई सुरू आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये भौतिक व शैक्षणिक सुविधा नसलेल्या महाविद्यालयांना डॉ. शिंदे यांनी आपल्या अधिकारात संलग्नीकरणाचे नूतनीकरण दिले आहे. ६५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या महाविद्यालयांचाही यामध्ये समावेश असून, विद्यापीठाच्या चौकशी समितीने नूतनीकरण नाकारलेल्या २३ महाविद्यालयांना कुलगुरूंनी हिरवा कंदील दिला आहे.'

विद्यार्थीहिताचे निर्णय घेत असल्याचे सांगणाऱ्या कुलगुरूंनी विद्यार्थी विकास कक्ष स्थापन करण्याबाबत दुर्लक्ष केले आहे. विद्यापीठाच्या आर्थिक हिशेबांबाबत २०१७-१८ च्या ऑडिट रिपोर्टमध्ये नोंद केलेली नाही. या रेकॉर्डअभावी विद्यापीठ वित्तीय परिणामांची मोजणी करता आली नसल्याचे लेखापरीक्षकांनी नोंद केले आहे. गेल्यावर्षीच्या मार्चअखेर ६९ कोटी रुपये विद्यापीठाच्या खात्यावर होते. त्यापैकी ३६ कोटी रुपये विनाव्याज पडून होते. निधीचे योग्य व्यवस्थापन करण्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे व्याजरूपाने मिळणारे विद्यापीठाचे उत्पन्न बुडाले आहे. तसेच विद्यापीठाची वित्तीय पत्रके ही अधिकृत मानांकनाप्रमाणे नसल्याचेही ऑडिट रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. सरकारमान्य पदासाठी वेतन अनुदान व अन्य पदांसाठी स्वतंत्र खाते ठेवणे बंधनकारक असल्याच्या कायद्याचे कुलगुरूंनी उल्लंघन केले आहे. यामुळे सरकारने ३७ कोटी रूपये वेतन अनुदान रोखले असून कर्मचाऱ्यांना विद्यापीठ फंडातून पगारापोटी अॅडव्हान्स रक्कम देणे हा विद्यापीठ निधीचा गैरवापर आहे. विद्यापीठाची एकूण गुंतवणूक मार्च २०१८ अखेर २१४ कोटी रूपये होती. या गुंतवणुकीचा योग्य तपशील कुलगुरूंनी लेखापरीक्षकांस उपलब्ध करून दिलेला नाही.

पत्रकार परिषदेस आर. जी. कोरबू, अरूण पाटील, प्रकाश कुंभार आदी उपस्थित होते.

चौकट

३७८ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

भ्रष्ट व बेकायदेशीर कारभार करण्याबरोबरच कुलगुरू डॉ. शिंदे यांनी गेल्या तीन वर्षात आर्थिक उधळपट्टीही केली आहे. यामुळे विद्यापीठाच्या पैशाचा गैरवापर केला आहे. गेल्या तीन वर्षात कुलगुरूंनी ३७८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सुटातर्फे केला. यामध्ये दौऱ्यासाठी ८ लाख ९१ हजार रुपये इंधनावर, तर प्रवासावर साडेचार लाख रुपये खर्च केले आहेत. कुलगुरू निवासस्थानी भिंतीवरील गार्डन बनवण्यासाठी एक लाख ४३ हजार रुपये, निवासस्थानी नावाचा लोगो बनवण्यासाठीचा ४७ हजार रुपये तर टेबललँप खरेदीवर २७ हजार रुपये, कुलगुरूंनी निवासस्थानी कार्यालय करण्यासाठी ५३ लाख ६५ हजार रुपये खर्च केले आहेत. यामध्ये इंटेरिअर डेकोरेशन, फर्निचर व इलेक्ट्रिकल कामाचा समावेश आहे. निवासस्थानाच्या नूतनीकरणावर दोन लाख रुपये खर्च झाले आहेत. १८ लाख १७ हजार रुपयांचे नवे वाहन खरेदी केले आहे. एनसीसी गणवेशातील कुलगुरूंच्या फोटोफ्रेमसाठी ७३ हजार रुपये खर्च केले.

००००

सदोष प्रमाणपत्रांबाबतचा अहवाल अमान्य

दीक्षान्त कार्यक्रमात देण्यात येणाऱ्या पदवी प्रमाणपत्रांवर केवळ कुलगुरूंचीच स्वाक्षरी असेल, असा आदेश कुलगुरूंनीच दिल्याचे कागदोपत्री पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे सदोष प्रमाणपत्रांच्या दुबार छपाईवर झालेल्या आर्थिक नुकसानीला कुलगुरू डॉ. देवानंद शिंदेच जबाबदार आहेत. परिणामी डॉ. भारती पाटील यांच्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात याप्रकरणी दीक्षान्त विभागातील अधीक्षक व कर्मचाऱ्यांना दोषी ठरविले आहे. हा अहवाल चुकीचा असून मान्य नाही अशी भूमिका घेत माहिती अधिकारान्वये अहवालाची प्रत मागविल्याची माहिती प्रा. सुभाष जाधव यांनी दिली.

००००

कोट..

विद्यापीठ नियमानुसारच काम सुरू असून, केवळ विद्यापीठाच्या बदनामीपोटी सध्या आरोप करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. जे आरोप केलेत, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. प्रमाणपत्रांबाबत चौकशी समितीने दिलेला अहवाल स्वीकारणे किंवा नाकारण्याचा अधिकार संघटनांना नाही. आरोप करणाऱ्या संघटनांशी चर्चेला केव्हाही तयार आहे.

डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

००००००००

समित्यांच्या शिफारशींना कोलदांडा

विद्यापीठ व राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीच्या सदस्यांनी केलेल्या शिफारशींवर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी कारवाई केलेली नाही. प्रशासकीय गैरव्यवहारांमधील दोषींवर कारवाई होण्यास दिरंगाई होत आहे. देशपांडे समितीने ७ शिक्षक व १२ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका अनियमित असल्याचा अहवाल देऊनही कुलगुरूंनी कारवाई केली नाही. शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या अनियमित नेमणुकीसंबंधी चौकशीसाठी शानबाग समिती नेमली होती. समितीने माजी रजिस्टार डॉ. डी. व्ही. मुळे दोषी असल्याचे स्पष्ट केले, पण त्यांच्यावरही कारवाई केली नाही. गवळी समितीने महागाव येथील राजा शिवछत्रपती महाविद्यालयातील वेतन अनुदान अपहार प्रकरणाची चौकशी करून शिफारशींचा अहवाल २०१५ मध्ये सादर केला. अपहारप्रकरणी प्राचार्य डॉ. जाधव जबाबदार असल्याने त्यांची प्राचार्यपदाची मान्यता काढून घेण्याची शिफारस अहवालात केली आहे. मात्र, उलट त्यांना अभ्यास मंडळावर नियुक्त करून क्लीन चिटच दिली. हलकर्णीतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालाने यूजीसीकडून येणाऱ्या अनुदानातील रक्कमेचा दुरुपयोग केला. याप्रकरणी चौकशीसाठी डॉ. मोरे समिती नेमली. मात्र, अद्यापही याप्रकरणी कारवाई झालेली नाही. कुलपती कार्यालयाच्या निर्देशानुसार नेमलेल्या डॉ. पाटील समितीने देवचंद कॉलेजमधील अपहाराबाबत चौकशी अहवाल २०१४ मध्ये दिला. मात्र, यासंदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही. गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयातील ट्यूशन फी अपहाराची चौकशी करून जून २०१७ मध्ये प्राचार्य कारंडे छाननी समितीने अहवाल दिला. समितीने निष्कर्ष काढून १८ पैकी १५ आरोप सत्य असल्याचे सांगितले याप्रश्नी चौकशी समिती नेमली. मात्र, समितीने कॉलेजला भेटही दिली नाही की 'सिबाका' खात्याची चौकशीही केली नाही.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन ‘सुविधा’ ऑफलाइन

$
0
0

स्वतंत्र कक्ष कार्यरत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने ऑनलाइन 'सुविधा' अॅप आणले. मात्र हे अॅप ऑफलाइनच राहिले. परिणामी उमेदवार, त्यांच्या समर्थकांना अॅपमधून घर बसल्या मिळण्याऱ्या सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे. त्या सेवा देण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय, तालुक्याच्या ठिकाणी सुविधा कक्ष कार्यान्वित केले आहेत.

पहिल्यांदाच या निवडणुकीत अधिकाधिक ऑनलाइनचा वापर केला जात आहे. आचारसंहितेच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी सीव्हिजील अॅप आहे. अॅपवरील तक्रारींची दखल घेण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. अशाचप्रकारे सुविधा अॅपही आहे. हे अॅप आयोगाने तयार केले आहे. अॅपवरून उमेदवारी अर्ज भरणे, प्रचार वाहन, सभा, बैठकांची परवानगी घेणे, निवडणूक चिन्ह मिळवता येते. एका क्लिकवर घर बसल्या कधीही या सेवा मिळवता येतात. पण अॅपला तांत्रिक अडचणी आहेत. अॅपवरून मिळणाऱ्या कोणत्याही सेवा ऑनलाइन मिळत नाहीत. यासंबंधी स्थानिक निवडणूक प्रशासनाकडे राजकीय पक्ष, उमेदवारांचे प्रतिनिधी विचारणा करीत आहेत. आयोगाच्या पातळीवरच अॅप कार्यान्वित करण्यात आलेले नाही, असे प्रशासन सांगत आहे. अॅप सुरू होण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी निवडणूक प्रशासनाने ऑफलाइन सेवा देण्यासाठी कक्ष सुरू केले आहेत. प्रत्येक तालुका ठिकाणी आणि जिल्हास्तरावरील परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही कक्ष कार्यरत आहे. या कक्षातून परवाने दिले जात आहेत. ऑफलाइन असल्याने त्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत.

...............

एक दिवसही कार्यान्वित नाही

निवडणुकीदरम्यान मिळणाऱ्या विविध सेवांत सुविधा अॅपची माहिती देण्यात आली आहे. प्रत्यक्षात एकही दिवस हे अॅप कार्यान्वित झालेले नाही. अनेकजण मोबाइलवरून अॅप डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करतात, पण यश येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपकडून सहकार चळवळ उद्धवस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी सर्वप्रथम संसदेत केली. पुरोगामीत्वाचा वसा जपणारे खासदार महाडिक हेच खरे लोकप्रतिनिधी आहेत. कोल्हापूरचे पुरोगामी नागरिक या निवडणुकीत त्यांना विक्रमी मतांनी विजयी करतील,' असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी करवीर तालुक्यात संपर्क दौरा झाला. देवाळे, हळदी, कुर्डू, येवती, म्हाळुंगे परिसरात दोघांनी संपर्क दौरा केला. पी. एन. म्हणाले, 'शिवसेना, भाजप सरकारने सर्वसामान्यांची सहकार चळवळ उद्धवस्त केली. आता नागरिकांची दिशाभूल करुन मते मिळवण्याचे दिवस संपले आहेत. या निवडणुकीत जनता मोदी सरकारला थारा देणार नाही.'

यावेळी मारुती पाटील, निवास पाटील, एम. जी. पाटील, बाबूराव चव्हाण, डी. जी. पाटील, वसंत पाटील, कृष्णात हुजरे आदी उपस्थित होते. दरम्यान, म्हाळुंगे गावच्या विकासासाठी खासदारांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. निवडणुकीत म्हाळुंगे गाव महाडिकांच्या पाठीशी शंभर टक्के राहील,' असे दिग्विजय चव्हाण, रघुनाथ मोरे, माणिकराव चव्हाण यांनी सांगितले. संपर्क दौऱ्यात खासदार महाडिकांनी गावांच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याची ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोहन हंकारे राज्यात तिसरा

$
0
0

कोल्हापूर

येथील शेलाजी वनाजी संघवी विद्यालयाचा विद्यार्थी सोहन नागेश हंकारेने समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. त्याने १०० पैकी ९६ गुण मिळवले. महाराष्ट्र टँलेंट सर्च परीक्षेतही १०० पैकी ९६ गुण मिळवले. त्याला वर्गशिक्षिका क्रांती भादवणकर, सुनिता हंकारे यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका सुप्रिया देशपांडे यांचे प्रोत्साहन मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुतार लोहार समाजातील नागरिकांचा सत्कार

$
0
0

कोल्हापूर

सुतार लोहार समाजातील १०० ज्येष्ठ नागरिकांचा येत्या मे महिन्यात सत्कार करण्यात येणार आहे. यानिमित्ताने कला, क्रीडा, यांत्रिकी, अभियांत्रिकी या क्षेत्रात ठसा उमटविलेल्या मान्यवरांच्या कार्याचा गौरव होणार असल्याची माहिती सुतार, लोहार समाज उन्नती संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्षा राधा रवींद्र मेस्त्री यांनी दिली.

कार्यक्रमाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत सखी उन्नती मंचच्या अध्यक्षा रुपाली सातार्डेकर, सुरेखा सुतार, शोभा सुतार, सुनंदा सुतार, लता लोहार, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सुतार, अमित सुतार आदींची भाषणे झाली. वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी सुतार लोहार समाज उन्नती संस्था कार्यालय, लोळगे हॉल, फिरंगाई दवाखान्यासमोर येथे दुपारी चार ते सात या वेळेत फोटोसहित नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे संस्थापक दिगंबर लोहार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक होमिओपॅथिक दिन साजरा

$
0
0

फोटो आहे.

कोल्हापूर

पंचाचार्य होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयमध्ये जागतिक होमिओपॅथिक दिन साजरा झाला. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हनिमान यांची २६४ वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने संस्थेतर्फे रुक्मिणीनगरमधील संजीवनी रुग्णालयात मोफत सर्वरोग निदान, औषधोपचार शिबिर झाले.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजकुमार पाटील यांच्या हस्ते डॉ. हनिमान यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. याप्रसंगी डॉ. संतोष रानडे यांचे 'जगभरातील होमिओपॅथी चिकित्सा प्रणालीची सद्यस्थिती' या विषयावर व्याख्यान झाले. तर डॉ. रवीकुमार जाधव यांनी 'राजर्षी शाहू महाराज व होमिओपॅथी' व डॉ. शुभांगी जोशी यांनी सात्विक आहाराविषयी मार्गदर्शन केले. दिवसभर चाललेल्या शिबिरात डॉ. एम. आर. कुलकर्णी, डॉ. हिम्मत पाटील, सुहास पाटील, मिलिंद गायकवाड, दीपाली पाटील, सुनेत्रा शिराळे, गीतांजली कोरे, वर्षा पाटील, रुपाली पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. वंदना पोवार व फरजाना मुकादम यांनी रक्ततपासणी केली.

.. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शरद पवार विश्वासघातकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

'ज्यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांची विश्वासार्हता आतापर्यंत सर्वांनी अनुभवली आहे. या विश्वासघातकी राजकारण्याच्या नादाला शेतकऱ्यांचा नेता लागला आहे. हा नेता त्यांच्याही पाठीत कधी लाथ घालेल, हे सांगता येणार नाही. गेल्यावेळी मी त्यांच्यासाठी ही जागा सोडली होती. आता मात्र ते विश्वासघातक्यांच्या कळपात गेले आहेत,' असा घणाघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केला.

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ गुरुवारी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

आम्ही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीरपणे सांगतो. तसे शरद पवार यांनी राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे, असे आव्हान देऊन ठाकरे म्हणाले, 'स्वतःला शेतकऱ्यांचा नेता समजणारा रेड्याच्या नादी लागून वेडा बनला आहे. त्याने रेड्याचे शेपूट पकडलेय. पण जास्त जवळ गेलात तर रेडा लाथ घालेल. लाथ घालणे ही त्यांची संस्कृतीच आहे. अशा पात्रतेचे हे सर्व नेते एकत्र आल्याने आम्ही युती केली. आमची युती अभेद्य आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.'

ज्यांनी देशासाठी तुरुंगवास भोगला त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्याच्या हातात तुम्ही देश देणार आहात का? त्यांची संसदेत जायचीही पात्रता नाही, अशी टीका त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. सावरकरांची पुस्तके भेट देऊन त्यांना ती वाचायला लावली पाहिजेत म्हणजे क्रांतिकारकांची देशासाठी योगदान कळेल, असेही ते म्हणाले.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन कोटींचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नात आणि नात जावयाने आजीच्या घरात सुमारे दोन कोटी रुपयांचा डल्ला मारला. घरातील ६३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि तीन लाखांची रोकड घेऊन नात आणि नातजावई पसार झाले. सानेगुरुजी वसाहत परिसरातील देवणे कॉलनीत ही घटना घडली. याप्रकरणी राजू कांबळे (वय ४४ रा. देवणे कॉलनी) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा नात हर्षदा (वय २५) आणि तिचा पती सचिन होलगे (वय २७, रा. दानोळी, ता. शिरोळ) याला अटक करून तीन लाखांची रोकड जप्त केली. अद्याप दागिन्यांचा शोध सुरू आहे.

जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहू कांबळे माजी सैनिक आहेत. त्यांचे कुटुंबीय देवणे कॉलनी येथे राहतात. राजू यांचे वडील लहू आजारी असल्याने त्यांना दोन मार्चला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी नात आणि नातजावई यांचे घरी येणेजाणे सुरू होते. राजू यांनी ६३ तोळे दागिने आणि ३ लाख रुपयांची रक्कम तिजोरीत ठेवली होती. आजारी कालावधीत लहू यांची नात हर्षदा आणि तिचा पती सचिन दोघेही आले होते. त्या वेळी घरातील तिजोरी उघडून त्यांनी दागिने आणि रोकड घेऊन पलायन केले. त्यानंतर काही दिवस ते घरी आले नव्हते. लहू यांना डिस्जार्च मिळाल्यानंतर त्यांना घरी आणले. त्यावेळी तिजोरीतील दागिने गायब झाल्याचे राजू यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात दागिन्यांचा शोध घेतला. नातेवाइकांकडे विचारणा केली. अधिक चौकशी केल्यानंतर नातीनेच दागिने चोरल्याची खात्री झाली. त्यानुसार राजू कांबळे यांनी रात्री उशिरा तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने दोघांना अटक करून त्यांच्याकडील अडीच लाखांची रोकड जप्त केली. मात्र, दागिने सापडले नाहीत. दरम्यान, या दोघांना शुक्रवारी कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

००००

खासगी सावकारी?

राहत्या घरी ६३ तोळे सोने आणि सुमारे तीन लाख रुपयांची रक्कम कशी आली? याबाबत जुना राजवाडा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात सावकारीसाठी पैसे आणल्याचा संशय व्यक्त केला आहे. राजू कांबळे यांचे वडील माजी सैनिक आहेत. त्यांचा एक मुलगा महापालिकेत नोकरीला आहे, तर दुसरा रिक्षा व्यावसायिक आहे. त्यामुळे इतकी मोठी रक्कम या कुटुंबाकडे कशी आली, याी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरात मोठी रक्कम सापडल्याने सानेगुरुजी वसाहत परिसरात रात्री उशिरापर्यंत काहींकडे चौकशी सुरू होती.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुल मतदारांचा अखेर शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी पुरवणी मतदारयादीत वाढलेल्या मतदारांचा शोध लावण्यात अखेर येथील निवडणूक प्रशासनास यश आले. त्यानुसार एकूण २९ हजार १०४ मतदार वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारांना २३ एप्रिलला मतदान करण्याची संधी मिळणार आहे. वाढलेल्या मतदारांत सर्वाधिक संख्या स्त्री मतदारांची आहे. तृतीयपंथीय १० मतदारांचा नव्याने समावेश झाला आहे.

निवडणूक प्रशासनाकडून २५ मार्चपर्यंत नविन मतदार नोंदणी, नाव, पत्त्यात दुरूस्ती, स्थलांतर, मयत मतदार वगळण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले. या अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीत पात्र मतदारांच्या नावासह यादी प्रसिध्द करण्याची अंतिम मुदत ४ एप्रिल होती. ही मुदत संपली तरी नविन मतदार, कमी झालेल्या मतदारांची संख्या स्पष्ट होत नव्हती. यासंबंधीचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिध्द झाले होते. त्याची दखल घेत जिल्हा निवडणूक प्रशासनाने आयोगाकडे पाठपुरावा करून वाढलेल्या मतदारांची माहिती घेतली. त्यात २९ हजार १०४ मतदार वाढल्याचे समोर आले. अजून किती मतदारांची संख्या कमी झाली, नावात बदल आणि स्थलांतर मतदार किती कमी झाले, त्यांची संख्या अजूनही गुलदस्त्यातच आहे. यामुळे लोकसभेसाठी एकूण मतदारांची संख्या निश्चित झाली नाही. नाव कमी होऊन दुसऱ्या कोणत्या मतदारसंघात नाव समावेश झाला, यासंबंधीची माहितीही मिळत नसल्याचे चित्र आहे.

...........

पुरवणी यादीतील मतदारांची संख्या अशी

पुरूष : १३८४३, स्त्री :१५२५१, तृतीयपंथी : १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिटणी चेकपोस्टवर पकडलेली गुटख्याची पोती जवळ ठेवल्याप्रकरणी चंदगड पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक विलास मारुती हरेर व गडहिंग्लज पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक अरुण वसंत करंबळकर या दोघा कर्मचाऱ्यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी त्या दोघांवर निलंबनाची कारवाई करुन तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितावर ४८ तासांत कारवाई करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना बुधवारी जिल्हा परिषद प्रशासनाला केल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीचे दोन्ही उमेदवार निवडून आणू

$
0
0

संदीप देसाई

महानगरअध्यक्ष, भाजप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असले तरी आम्ही युती धर्माचे पालन करून दोन्ही उमेदवार निवडून आणू असा विश्वास भाजप महानगरअध्यक्ष संदीप देसाई यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत भाजपने 'फिर एक बार मोदी सरकार' अशी घोषणा करत मतदारांना साद घातली आहे. दोन्ही पक्षांत युती झाल्याने एकदिलाने काम सुरू आहे. देशात भाजपची पुन्हा सत्ता आणून नरेंद मोदी यांना पंतप्रधान करावायचे आहे. त्यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने प्रचारात उतरले आहेत. कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही जागेवर शिवसेनेचे उमेदवार आहेत. युतीधर्माचे पालन करण्यासाठी भाजपचे पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रचार सुरू केला. गेल्या साडेपाच वर्षांत भाजपने बूथ लेव्हलवर पक्षाचे संघटन केले आहे. तसेच भाजपचे विविध सेल कार्यरत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्व पदाधिकारी शिवसेनेच्या प्रचारात जिद्दीने उतरले आहेत.

युतीचा प्रचार करताना भाजपकडून गेल्या साडेपाच वर्षात पंतप्रधान मोदी यांनी राबवलेल्या उज्ज्वला गॅस, मुद्रा कर्ज योजना, जनधन योजना, आयुष्यमान भारत या योजनांचा सर्वसामान्यांना किती लाभ झाला आहे, याची वस्तुनिष्ठ माहिती आम्ही मतदारांना घरोघरी जावून सांगत आहे. युवा मोर्चा आणि महिला आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. तसेच अल्पसंख्याक, ओबीसी, अनूसुचित जातीच्या संघटनांचे मेळावे घेतले असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांवर प्रचाराची जबाबदार सोपवण्यात आली आहे.

एकीकडे भाजपकडून स्वतंत्र बैठका व मेळावे घेतले जात असले तरी शिवसेनेबरोबर संयुक्त प्रचार फेऱ्या, कोपरा सभा घेतल्या जात आहेत. मतदारांचा महायुतीला चांगला प्रतिसाद लाभला आहे. विरोधी पक्षावर टीका करण्याबरोबर गेल्या पाच वर्षांत भाजपने केलेल्या कामे सांगितले जात आहेत. पुलवामा हल्लाचा बदला घेताना भारतीय हवाई दलाने थेट पाकिस्तानच्या हद्दीत शिरून अतिरेक्यांचे हवाई अड्डे उद्ध्वस्त केल्याने भारताचा स्वाभिमान जगाला पहायला मिळाला आहे. सशक्त भारत करण्यासाठी महायुतीला मतदान द्यावे, असे आवाहन केले जात आहे. त्याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images