Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्रचारासाठी मॉर्निंग वॉक डिप्लोमसी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नाागरिक संघटनेतर्फे मॉर्निंग वॉक प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. शहराच्या विविध भागात सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार धनंजय महाडिक यांची विकासकामे लोकांपर्यंत पोहचविली जात आहेत.

संघटनेचे प्रमुख लालासाहेब जगताप, जोतिराम बाचूळकर यांच्याशी चर्चा करून संघटनेचे कार्यकर्ते शहराच्या विविध भागात प्रचार करत आहेत. व्यायाम करणारे तरुण, हास्ययोग परिवाराशी संपर्क साधून प्रचार सुरू आहे. प्रतिभानगर, सम्राटनगर उद्यान, शिवाजी विद्यापीठ परिसर, सायबर कॉलेज परिसर, हुतात्मा पार्क परिसरात प्रचार मोहिम राबवली. मोहिमेत राजहंस सोनवणे, नूरमहंमद सरकवास, भीमराव आडके, राजाराम पाटोळे, गणपतराव बागडी आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँकेची ३ कोटींची फसवणूक, वकिलाला अटक

$
0
0

सांगली ः बँकेच्या ३ कोटी २ लाख १४ हजाराच्या फसवणुकीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बँकेच्या पॅनेलवरील वकिलाला अटक करण्यात आली. अॅड. मुकुंद वासुदेव कुलकर्णी (वय ५३, रा. इस्लामपूर) असे वकिलाचे नाव आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या इस्लामपूर शाखेत हा प्रकार घडला असून, कुलकर्णी बँकेच्या पॅनेलवरील आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, वकिलाला कोर्टाने पोलिस कोठडी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक रविंद्र पिसाळ यांनी दिली.

अॅड. कुलकर्णीच्या सर्च रिपोर्टच्या आधारे शाखेने तब्बल ८१ जणांना कर्ज दिले आहे. संबंधितांकडून कर्जवसुली होत नसल्याने बँकेने केलेल्या चौकशीत त्या सर्वांनी बनावट सातबारा दिल्याचे तसेच तीस जणांकडे जमीनच नसल्याचे स्पष्ट झाले. असे असताना त्यांचे टायटल क्लिअर असल्याचा सर्च रिपोर्ट अॅड. कुलकणीने दिल्याचे समोर आले आहे. याचा तपास सुरु केल्यानंतर तीन संशयित कर्जदारांना अटक केली. चौकशीत अॅड. कुलकर्णीचा संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर सखोल चौकशीत बँकेची फसवणूक होण्यास कुलकर्णीने दिलेले खोटे रिपोर्टच कारणीभूत असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला अटक केली.

.. . . . .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेरणोलीत मधमाश्यांच्या चाव्यात पाचजण जखमी

$
0
0

आजरा : पेरणोली (ता आजरा) येथे शेतात कामाला गेलेले पाचजण मधमाश्यांनी चावा घेतल्याने जखमी झाले. ज्ञानदेव हरी येरूडकर, यशवंत गणपती कोडक, श्रावण लक्ष्मण लोंढे, एकनाथ भीमराव येरूडकर, प्रथमेश शिवराम गुरव अशी त्यांची नावे आहेत. जळणासाठी वाळलेली लाकडे जमा करत आसताना झाडावरील मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. यात ज्ञानेश्वर व एकनाथ गंभीर जखमी झाले. त्यांना गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असले दहा अधिकारी विकत घेऊ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पोलिसांना खरेदी केलंय, आम्ही खूप मोठे आहोत. तुमच्यासारखे दहा अधिकारी विकत घेऊ,' ही मग्रुरीची भाषा आहे, किणी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सोमवारी रात्री नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणाला सामोरे जावे लागले. कर्मचाऱ्यांनी हुज्जत घातल्यामुळे सीईओ व इतर अधिकाऱ्यांना रात्री साडेदहा ते बारा या वेळेत जवळपास दीड तास नाक्यावर थांबावे लागले. या सर्व प्रकाराची मित्तल यांनी एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

निवडणूकविषयक कामकाज आटोपून सीईओ मित्तल इस्लामपूरहून कोल्हापूरकडे परतत होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, आकांक्षा नरोडे, अपूर्व पिरके, रोहिणी कळंबे सोबत होते. किणी नाक्यावर टोलसाठी त्यांची मोटार अडविली. यावेळी चालक इंद्रजित पाटील यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना 'मोटारीला महाराष्ट्र शासन' असा फलक लावल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी कर्मचाऱ्याने सरकारचा फलक चालत नाही, असे सांगितले. तेव्हा सीईओ मित्तल यांनी ओळखपत्र दाखविले. त्यावर कर्मचाऱ्याने ओळखपत्र चालत नाही, असे सांगत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

मुदत संपलेले ओळखपत्र

पहिल्यांदा ड्रायव्हरशी हुज्जत घालणारा नाक्यावरील कर्मचारी नंतर मित्तल यांच्याशी उद्धटपणे बोलू लागला. तेव्हा मित्तल यांनी त्या कर्मचाऱ्याकडे ओळखपत्राची मागणी केली. कर्मचाऱ्याकडील ओळखपत्राची मुदत मार्च महिन्यात संपली होती. सीईओंनी ही बाब निदर्शनास आणल्यावर त्या कर्मचाऱ्याने ओळखपत्र चालते असे सांगत चढ्या आवाजात वाद घालू लागला. तेव्हा मोटारीत मागील बाजूस बसलेले उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम यांनी हे अधिकारी आयएएस आहेत, जि.प.चे सीईओ आहेत. व्यवस्थित बोला असे सांगितले. त्यावर कर्मचाऱ्याने कदम यांना धक्काबुक्की करत 'लई अधिकारी बघितले आहेत, तुमच्यासारखे दहा अधिकारी विकत घेऊ' अशी भाषा वापरली. तेव्हा मित्तल यांनी हा सारा प्रकार पोलिसांना कळवा, त्यांना फोन लावा अशा सूचना इतर अधिकाऱ्यांना केल्या. तेव्हा टोलवरील कर्मचाऱ्याने, 'आम्ही खूप मोठी माणसे आहोत, पोलिसांना खरेदी केलंय' असे उत्तर दिले.

००००

पोलिसांचे सहकार्य, एमएसआरडीसीकडे तक्रार

मित्तल म्हणाले, 'कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा, चुकीच्या वर्तणुकीविषयी नाक्यावरील व्यवस्थापकीय प्रमुखाला कल्पना दिली. तरीही कर्मचारी मुजोरीने वागले. या सर्व प्रकाराविषयी पोलिसांना कळविले. जिल्हा पोलिस अधीक्षकांशी चर्चा झाली. पोलिस प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळाले. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीविषयी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे' दरम्यान, निवडणुकीच्या कालावधीत दबाव टाकण्याचा हा प्रकार आहे का, असे विचारल्यावर मित्तल यांनी निवडणूक कमासंदर्भात असा कोणताही दबाव टाकण्याचा प्रकार आढळत नसल्याचे स्पष्ट केले.

००००

जि. प. कर्मचाऱ्यांकडून निषेध

जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत घडलेल्या प्रकाराचे जिल्हा परिषदेत पडसाद उमटले. कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन अधिकाऱ्यांना धक्काबुक्कीच्या प्रकाराचा निषेध केला. तसेच सीईओंची भेट घेतली. यामध्ये कर्मचारी संघटनेचे नीलेश म्हाळुंगेकर, सचिन मगर, भालचंद्र माने, संजय अवघडे, एकनाथ वरेकर, महावीर भिवरे, विद्या पाटील, फिरोजखान फरास यांचा समावेश होता. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनीही भेट घेतली.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाडिकांच्या उमेदवारीचे गौडबंगाल काय?’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राष्ट्रवादीचे तत्कालिन उमेदवार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रचारासाठी बिंदू चौकात घेण्यात आलेल्या जाहीर सभेत शरद पवार यांनी 'कौन है ये मुन्ना? कहाँसे आया?' असा विचारलेला सवाल कोल्हापूरकर अजूनही विसरलेले नाहीत. त्याच महाडिकांना पवारांनी उमेदवारी दिली हे गौडबंगाल आहे,' अशी टीका शिवसेनेचे माजी आमदार सुरेश साळोखे यांनी केली.

कपिलतीर्थ येथे झालेल्या सभेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी टीका केली. 'संसदरत्न पुरस्कार हा संसदेने दिलेला नसून तो त्यांनी खासगी संस्थेकडून विकत घेतलेला आहे. विचारलेल्या प्रश्नांपैकी किती सोडवले याचे किमान तपशील देण्याचे नैतिक धैर्य महाडिकांकडे आहे का?' असा सवाल केला. भाजपचे नगरसेवक अजित ठाणेकर, युवा नेते शेखर मंडलिक यांचीही भाषणे झाली. शिवाजी पेठेतील मित्रप्रेम मंडळ, लाड चौक, आठ नंबर शाळा, शिंदे लॉन या ठिकाणी झालेल्या सभेत वीरेंद्र मंडलिक, किशोर घाटगे, निलेश पाटोळे, विशाल देवकुळे, अदिनाथ साठे, निलेश गायकवाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाहीच्या मजबुतीसाठी काँग्रेचा विजय आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर :

या निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी काँग्रेसचा विजय महत्त्वाचा नसून देशातील लोकशाही मजबुत राहण्यासाठी काँग्रेस विजयी होणे आवश्यक असल्याचे राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी म्हटले आहे. भाजपा सत्तेवर आली तर पुन्हा देशात निवडणुका होतील की नाही हे सांगता येत नसल्याची भीतीही लातूरातील सभेत व्यक्त केली.

लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांच्या प्रचारासाठी सचिन पायलट यांची सायंकाळी सभा आयोजित केली होती. पायलट यांना सभेच्या ठिकाणी येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी अवघे दहा मिनीटे भाषण केले. यावेळी माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, आमदार अमित देशमुख, आमदार बसवराज पाटील, आमदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार दिलीपराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

सचिन पायलट यांनी भाजपावर टिकास्त्र सोडताना सांगितले की, 'गेल्या साठ वर्षांत आम्ही ज्या संस्था निर्माण केल्या आहेत त्या संस्था वेचून वेचून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात भितीचे वातावरण निर्माण केले जात आहे.' लातूर हा जिल्हा काँगेसचा गड होता आणि राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपाने सुद्धा देशभरात मित्र पक्ष मिळवले आहेत, परंतु ते काँग्रेस आघाडीला महामिलावट म्हणून हिणवत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी आमदार अमित देशमुख, शिवराज पाटील चाकुरकर, उमेदवार मच्छिंद्र कामंत यांची भाषणेही झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या टीमचे दिवस गेलेआता आमची टीमच राज्य करणार

$
0
0

पवारांच्या टीमचे दिवस गेले

आता आमची टीम राज्य करणार

पंढरपूर येथील सभेत मुख्यमंत्री फडणवी यांचा दावा

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'ज्या टीमचा कप्तानच मैदान सोडून पळून गेला, त्यांची टीम काय मॅच खेळणार. आता त्यांच्या टीमचे दिवस संपले, महाराष्ट्रात आणि देशात फक्त आमचीच टीम काम करेल,' अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या प्रवेशानिमित्त बुधवारी पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरोली येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात कल्याणराव काळे यांच्यासह त्याच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जेष्ठ नेते सुधाकर परिचारक, लक्ष्मण ढोबळे, माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील नेते उपस्थित होते. या वेळी काळे यांच्यासह पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा पवार, दगडूशेठ घोडके आणि स्वेरी कॉलेजचे प्राचार्य बब्रुवान रोंगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मोठ्या दबावाला सामोरे जावे लागले. मात्र, शेतकऱ्यांसाठी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे काळे यांनी सांगितले. हाच धागा पकडत इतकी वर्षे सुरू असलेले दबावाचे राजकारण केंव्हाच संपले आहे. अनेक वर्ष त्यांचे रावणाराज सुरू होते. मात्र आता रामराज्य आले आहे. जर तुमच्यावर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर रातोरात त्यांच्या दबावाची काय परिस्थिती करतो, ते पहा. मॅच खेळायला आलेला कॅप्टन मधूनच पळून गेला आता त्यांच्या टीमचे दिवस संपले. आता आमची टीमचं राज्य करणार आहे. आम्ही सगळ्यांनाच मदत केली आहे. काही नेत्यांची नवे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या सगळ्यांना भाजप प्रवेशासाठी दबाव टाकला असता तर आर्धी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मोकळी झाली असती, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. दुपारी बाराच्या सभेला मुख्यमंत्री दोन वाजता पोचूनही उन्हात हजारोच्या संख्येनी कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठी वाट पाहत थांबले होते.

राहुल गांधींकडून नुसते मनोरंजन

राहुल गांधींच्या भाषणाला आता टीव्हीवाल्यांना हे सर्व काल्पनिक असून, याच्या सत्यतेशी आमचा संबंध नाही, केवळ मनोरंजनासाठी पाहायचे असेल तर आपल्या जबाबदारीवर पाहावे, अशी टीप देण्याची वेळ येईल. राहुल गांधी काय बोलतात हे त्यांचे त्यांनाही समाजात नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमचीच टीम काम करील

$
0
0

पंढरपूर येथील सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'ज्या टीमचा कप्तानच मैदान सोडून पळून गेला, त्यांची टीम काय मॅच खेळणार. आता त्यांच्या टीमचे दिवस संपले, महाराष्ट्रात आणि देशात फक्त आमचीच टीम काम करेल,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या प्रवेशानिमित्त बुधवारी पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरोली येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात कल्याणराव काळे यांच्यासह त्याच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जेष्ठ नेते सुधाकर परिचारक, लक्ष्मण ढोबळे, माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील नेते उपस्थित होते. या वेळी काळे यांच्यासह पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा पवार, दगडूशेठ घोडके आणि स्वेरी कॉलेजचे प्राचार्य बब्रुवान रोंगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मोठ्या दबावाला सामोरे जावे लागले. मात्र, शेतकऱ्यांसाठी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे काळे यांनी सांगितले. हाच धागा पकडत इतकी वर्षे सुरू असलेले दबावाचे राजकारण केंव्हाच संपले आहे. अनेक वर्ष त्यांचे रावणाराज सुरू होते. मात्र आता रामराज्य आले आहे. जर तुमच्यावर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर रातोरात त्यांच्या दबावाची काय परिस्थिती करतो, ते पाहा. मॅच खेळायला आलेला कॅप्टन मधूनच पळून गेला आता त्यांच्या टीमचे दिवस संपले. आता आमची टीमचं राज्य करणार आहे. आम्ही सगळ्यांनाच मदत केली आहे. काही नेत्यांची नावे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या सगळ्यांना भाजप प्रवेशासाठी दबाव टाकला असता, तर अर्धी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मोकळी झाली असती, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. दुपारी बाराच्या सभेला मुख्यमंत्री दोन वाजता पोचूनही उन्हात हजारोच्या संख्येनी कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठी वाट पाहत थांबले होते.

राहुल गांधींकडून नुसते मनोरंजन

राहुल गांधींच्या भाषणाला आता टीव्हीवाल्यांना हे सर्व काल्पनिक असून, याच्या सत्यतेशी आमचा संबंध नाही, केवळ मनोरंजनासाठी पाहायचे असेल तर आपल्या जबाबदारीवर पाहावे, अशी टीप देण्याची वेळ येईल. राहुल गांधी काय बोलतात हे त्यांचे त्यांनाही समाजात नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गडमुडशिंगीत हाणामारी; आठजण जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा,

गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे दोन कुटुंबीयांत पूर्ववैमनस्यातून झालेल्या हाणामारीत आठजण जखमी झाले. याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यामध्ये पुजारी कुटुंबातील भिकाजी बाळू पुजारी, प्रकाश नारायण पुजारी, उत्तम पुजारी व म्हाळू कृष्णात पुजारी यांना, तर हजारे कुटुंबातील भगवान केरबा हजारे, शिवाजी केरबा हजारे, सतीश केरबा हजारे, केरबा विठ्ठल हजारे (सर्व रा. गडमुडशिंगी) यांना अटक केली आहे.

भगवान हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भिकाजी पुजारी यांच्यासह चौघांनी आपल्या दारात येऊन, तू शिवीगाळ का करतोस असा जाब विचारत काठी व लाकडाने मारहाण केली. त्यात भगवान हजारेंसह शिवाजी हजारे, सतीश हजारे, केरबा हजारे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, हजारे कुटुंबाविरोधात भिकाजी पुजारी यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की आम्हास शिवीगाळ का करतोस असा जाब विचारत भगवान केरबा हजारे, शिवाजी हजारे, ससीश हजारे, केरबा हजारे यांनी काठी, लाकडाने केलेल्या मारहाणीत भिकाजी पुजारी, प्रकाश पुजारी, उत्तम पुजारी, बाळू पुजारी जखमी झाले. त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेचे चटके ‘पोटाला’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एक महिन्यापासून शहर आणि परिसरातील हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंगचे कामकाज रात्री साडेदहा वाजता बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना जेवणाची सुविधाही बंद करावी लागली आहे. परिणामी रात्री उशिरा शहरात येणाऱ्या पर्यटकांना, स्थानिक नागरिकांना जेवण मिळत नसल्याने त्यांच्या पोटालाही आचारसंहितेच्या जाचक अटींचे चटके बसत आहेत. एका महिन्यात हॉटेल व्यावसायिकांना किमान २० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. परिणामी सरकारी करांमध्येही घट होणार आहे. शासनाला जीएसटीच्या किमान १ कोटीच्या रक्कमेला मुकावे लागले आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून लागू झाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री साडेदहा वाजल्यानंतर हॉटेल्स, बार बंद करण्याचे आदेश काढले. हॉटेल्स, बार, लॉजिंग सुरू ठेवणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जात आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी करणारे भरारी पथक व्हिडिओ शूटिंगसह येऊन उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्सचे चित्रिकरण करीत आहे. त्यांच्याकडून दमदाटीही केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी या पथकाचा धसका घेत सर्व हॉटेल्सचे शटर साडेदहाआधीच बंद करण्यात येत आहे.

सध्या शाळांना सुट्टी पडली आहे. पर्यटनाचा हंगाम आहे. परदेशासह परराज्यातून आणि जिल्ह्यांतून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. पुणे, मुंबई आदी ठिकाणाहून बसने प्रवासी रात्री उशिरापर्यंत पर्यटक येतात. त्यांना शहरात जेवण मिळत नसल्याचे चित्र आहे. रात्री साडेदहाच्या आत हॉटेलमधील सर्व विद्युतदिवे बंद झाले पाहिजे, समोरचे प्रवेशद्वार बंद करावे, कामगारही दिसू नयेत अशा कडक सूचना आहेत. त्यामुळे साडेनऊ वाजता हॉटेलमध्ये येऊन साडेदहा वाजेपर्यंत निवांतपणे बसून जेवण करता येत नाही. लवकर जेवण आवरा, आचारसंहितेचे पथक येणार आहे, हॉटेल बंद करायचे आहे असा तगादा व्यवस्थापक लावत ग्राहकांना लावत असल्याचे दिसते. ग्राहकांना घाईघाईने जेवण करावे लागत आहे. त्यामुळे कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्यावतीने पर्यटक, रात्री उशिराच्या ग्राहकांसाठी किमान रात्री ११ वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला आठवड्यापूर्वी देण्यात आले. मात्र, यावर सकारात्मक निर्णय झालेला नाही. निवेदनास केराची टोपली दाखवल्याची भावना व्यावसायिकांत निर्माण झाली आहे.

कोल्हापुरातच सक्ती का?

निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि इतर प्रमुख अधिकारी दिल्लीत असतात. तेथे बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरातील हॉटेल आचारसंहितेच्या काळात रात्रभर सुरू आहेत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी असेच चित्र आहे. असे असताना कोल्हापुरातच साडेदहानंतर हॉटेल बंद करण्याची सक्ती का, असा प्रश्न 'हॉटेल संघा'चा आहे. या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडून मिळत नाही. हॉटेल व्यवसायिक, आईस्क्रीम विक्री दुकानदार, खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉलधारक यांच्या व्यवयासावर परिणाम जाणवत आहे. रात्री येणाऱ्या पर्यटक, प्रवाशांची संख्या घटल्याने रिक्षा, टॅक्सीधारकांनाही झळ बसली आहे.

आइस्क्रीम विक्रेते थंड

शहरात आइस्क्रीमची १०० प्रमुख दुकाने आहेत. जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय अनेकांना आहे. उन्हाळा असल्याने रात्री उशीरापर्यंत नागरिक फिरायला बाहेर पडतात. मात्र रात्री साडेदहा वाजल्यानंतर सर्व दुकाने बंद करावी लागत असल्याने ऐन उन्हाळ्यात त्यांचा व्यवसाय थंड झाला आहे. सीपीआर, लक्ष्मीपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात हातगाड्यांवर रात्रभर चहाची सोय केली जाते. रुग्ण, नातेवाईकांना त्याचा मोठा आधार असतो. आता हातगाड्यावरील चहाविक्रीही बंद आहे.

कोट

हॉटेल्सना व्यवसाय परवाना देताना रात्री ११ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र एक महिन्यापासून आचारसंहितेचे कारण सांगून प्रशासन साडेदहा वाजल्यानंतर हॉटेल बंद ठेवण्यास भाग पाडते. दिल्ली, मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी रात्रभर हॉटेल्स सुरू असतात. मग, कोल्हापूरला वेगळा नियम कशासाठी? असा प्रश्न निर्माण होतो. नियमित वेळेआधी हॉटेल्स बंद केल्याने कोल्हापूरमध्ये व्यावसायिकांचे किमान २० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातून सरकारचा १ कोटींचा जीएसटीही बुडला आहे.

- उज्वल नागेशकर, अध्यक्ष, हॉटेल मालक संघ

६००

शहरातील एकूण हॉटेल

२० कोटी

सरासरी फटका

१ कोटी

जीएसटीचे उत्पन्न

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार, ठाकरे आज कोल्हापुरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी (ता. ११) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पवार यांची सायंकाळी कागल येथे तर ठाकरे यांची इस्लामपूर येथे प्रचार सभा आहे. पवार हे गुरुवारी पाचच्या सुमारास हेलिकॉप्टरने कोल्हापुरात येणार आहेत. त्यानंतर त्यांची सायंकाळी सहा वाजता खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी कागल येथील गैबी चौकात सभा घेणार आहेत. सभेनंतर त्यांचा कोल्हापुरात मुक्काम असून शुक्रवारी हातकणंगले मतदार संघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. सांगलीमध्येही त्यादिवशी सभा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे गुरुवारी सकाळी कोल्हापुरात येणार आहेत. ते दिवसभर थांबून सायंकाळी सहा वाजता इस्लामपूर येथे सभा घेणार आहेत. तिथून ते मुंबईला रवाना होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टी, महाडिक यांचा खर्च सर्वाधिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणूक खर्च निरीक्षक पथकाकडून रिंगणातील उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा तपशील बुधवारी निवडणूक आयोगाच्या खर्च निरीक्षकांसमोर सादर करण्यात आला. सरकारी दरसूचीप्रमाणे सर्वाधिक खर्च स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांनी केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, उमेदवारांनी दिलेला खर्च आणि प्रशासनाच्या निदर्शनास आलेल्या खर्चातील तफावतीची पडताळणी येथील शासकीय विश्रामगृहात रात्री उशिरापर्यंत केली जात होती.

प्रत्येक उमेदवारास ७० लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा आहे. दैनंदिन खर्चाची नोंद उमेदवारांनी ठेवणे आवश्यक आहे. त्यांची माहिती निवडणूक यंत्रणेकडेही सादर करणे सक्तीचे आहे. १ ते ७ एप्रिलअखेर उमेदवारांनी सरकारी यंत्रणेने नोंदवलेला खर्च आणि उमेदवारांनी दिलेल्या खर्चाच्या हिशोबाची पडताळणी आयोगाचे निरीक्षक शेरेन जोस, शैलेश बन्सल यांनी केली.

जिल्हा खर्च नियंत्रण समितीने निश्चित केलेले दर आणि उमेदवारांनी लावलेले दर यांच्यातील तफावत काढण्यात आली. त्यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघातील प्रत्येकी दोन उमेदवारांच्या खर्चात तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना तफावतीच्या कारणांचा खुलासा करण्याची नोटीस देण्यात येणार आहे. खुलासा प्राप्त झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुनावणी होईल. सुनावणीत उमेदवारांची बाजू न्याय असल्यास मान्य करण्यात येणार आहे. नसल्यास सरकारी खर्चाची रक्कमच एकूण खर्चात धरण्यात येणार आहे.

पुढील टप्पा १५ एप्रिलला

खर्चाच्या पडताळणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसऱ्या टप्यातील पडताळणी १५ तर शेवटच्या टप्यातील १९ एप्रिलला पडताळणी होणार आहे. यासंबंधीची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींना दिली आहे.

सात उमेदवारांना नोटिसा

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा तपशील खर्च निरीक्षकांना देणे बंधनकारक आहे. मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील बहुजन मुक्ती पार्टीचे सिद्धार्थ नागरत्न तर हातकणंगले मतदारसंघातील राजू मुजीकराव शेट्टी, संग्रामसिंह गायकवाड यांनी खर्चाचा तपशील वेळेत आणून दिला नाही. यांच्यासह खर्चात तफावत असलेल्या चार उमेदवारांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

उमेदवारांचा खर्च (सरकारकडे नोंद)

कोल्हापूर

धनंजय महाडिक : १६ लाख ६३ हजार ३२०

संजय मंडलिक : १२लाख ५७ हहजार ५४४

किसन काटकर, २७ हजार ३२५.

हातकणंगले मतदारसंघ

राजू शेट्टी :१८लाख ५३, ९८३

धैर्यशील माने :१४ लाख ७७ हजार ९३०

अस्लम सय्यद :२९ हजार २५०.

रघुनाथ पाटील :४२०५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या ब्रँडिंगसाठी क्रिडाईचे योगदान

$
0
0

फोटो आहे....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बांधकाम क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाचा अवलंब करून कोल्हापूरच्या वैभवात भर घालणारे प्रकल्प साकारू. कोल्हापूरच्या विकासासाठी व सामाजिक कार्यामध्ये क्रिडाईचा नेहमीच सहभाग राहिला आहे. ग्राहकांचा विश्वास, बांधकामाची गुणवत्ता, दर्जा ही त्रिसूत्री जपताना संस्था कोल्हापूरचे ब्रँडिंग करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल,' अशी ग्वाही क्रिडाई कोल्हापूर संस्थेचे नूतन अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी दिली.

क्रिडाई कोल्हापूर संस्थेच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीचा २०१९-२१ या वर्षासाठी पदग्रहण समारंभ बुधवारी दिमाखात पार पडला. क्रिडाईचे मावळते अध्यक्ष महेश यादव यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष बेडेकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव परीख आणि ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक व संस्थेचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल सयाजी येथे पदग्रहण समारंभ झाला. याप्रसंगी संस्थेतर्फे मावळते अध्यक्ष महेश यादव यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. क्रिडाई कोल्हापूरच्या ३१ वर्षांच्या वाटचालीत बेडेकर यांनी संस्थेचे दहावे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.

बेडेकर म्हणाले, 'बांधकामासाठी आवश्यक सरकारी व स्थानिक पातळीवरील प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. बांधकाम कामगारांसाठी कौशल्य विकसित कार्यक्रम, लहान मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहित करणाऱ्या उपक्रमांना चालना दिली जाईल. यानिमित्ताने सर्वांना बरोबर घेऊन काम करू.'

क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव परीख म्हणाले, 'सरकारी पातळीवरील बांधकामविषयक कामांसंदर्भात सातत्याने पाठपुरावा करू. जेणेकरून त्याचा फायदा राज्यभरातील सर्वच घटकांना होईल. क्रिडाई इंडियाशी समन्वय साधून केंद्र सरकारकडील बांधकाम प्रश्नांची सोडवणूक करू.' प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना व्ही. बी. पाटील म्हणाले, 'क्रिडाई कोल्हापूरचे सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. बालकल्याण संकुलच्या इमारती बांधकामासाठी क्रिडाईचे योगदान लक्षणीय होते. संस्थेच्या कार्यासाठी नेहमीच पाठीशी राहू.'

महेश यादव यांनी मनोगतामध्ये गेल्या चार वर्षांतील कामगिरीचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. सचिव के. पी. खोत यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव परीख, खजानिस गिरीश रायबागे, सहसचिव महेश यादव, डिजिटल मीडिया समन्वयक हेमांग शहा, 'रेरा' समन्वयक आदित्य बेडेकर यांचा सत्कार करण्यात आला.

००००

अध्यक्षपदी बेडेकर, उपाध्यक्षपदी देवलापूरकर

क्रिडाई कोल्हापूरची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली. अध्यक्षपदी विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्षपदी प्रकाश देवलापूरकर, सचिवपदी रविकिशोर माने, खजानिसपदी सचिन ओसवाल, सहसचिवपदी विक्रांत जाधव, गौतम परमार आणि सहखजानिसपदी प्रदीप भारमल यांची निवड झाली. कार्यकारिणीत संचालक श्रीधर कुलकर्णी, श्रेयांस मगदूम, प्रमोद साळुंखे, निखिल शहा, सागर नालंग, राजेश आडके, चेतन चव्हाण, शिवाजी संकपाळ, गणेश सावंत, अद्वैत दीक्षित यांचा समावेश आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविकेसह ४० जणांना ‘मोक्का’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

यादवनगर-पांजरपोळ येथे मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलिस पथकावर हल्ला केल्याप्रकरणी मटका अड्डामालक सलीम मुल्ला, माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शमा मुल्लासह सलीम मुल्लाचे भाऊ फिरोज, राजू आणि जावेद मुल्ला यांसह ४० जणांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) लावण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सकाळी नऊ वाजता पाठविलेला प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी साडेआठ तासांत मंजूर केला. दरम्यान, या प्रकरणातील पिस्तूलसह पाच राउंड आरोपींकडून जप्त करण्यात आली. आरोपींनी अधिकाऱ्यांचे पिस्तूल घेऊन पलायन केले होते.

८ एप्रिल रोजी मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २५ जणांना अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे १५ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. पोलिस अधिकाऱ्यावर झालेला हल्ला गंभीर असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सकाळी नऊ वाजता मुल्ला आणि त्याच्या टोळीतील ४० जणांवर 'मोक्का'चा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. वारके यांच्याकडे पाठवला. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सायंकाळी साडेपाच वाजता प्रस्तावाला तत्काळ मंजुरी दिली.

गुन्ह्याचा तपास शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्याकडे दिला आहे. अटक केलेल्या २५ जणांना सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. अजूनही या प्रकरणातील संशयितांचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या बहुतांशी संशयितांवर रॉबरी, खून, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, अवैध व्यवसाय, दरोडा, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना सोडविण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

.. .. ..

सलीम मुल्ला पसारच, पिस्तूल ताब्यात

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, मटकाबुकी मालक सलीम मुल्ला अद्याप पसार आहे. त्याच्या शोधासाठी तीन पथके तैनात केली आहेत. आतापर्यंत अटक केलेल्या २५ संशयितांकडून त्याच्यासंदर्भात चौकशी सुरु केली आहे. त्याला लवकरच ताब्यात घेऊ, असे पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, पोलिस कर्मचारी निरंजन पाटील यांनी संरक्षणार्थ काढलेले पिस्तूल हिसकावून घेऊन पसार झालेल्या नीलेश काळे, राजू मुल्ला आणि सुंदर दाभाडे आणि पिपू उर्फ सलमान मुल्ला या चौघांना अटक केली. काळेकडून पिस्तूल आणि पाच राउंडसह मोबाइल जप्त केले.

(संबधित वृत्त पान ३ वर)

.. .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग समिती सभापतीपदासाठी आज अर्ज दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापती निवड सभा सोमवारी (ता. १५) होणार आहे. त्यासाठी गुरुवारी (ता. ११) दुपारी तीन ते पाच वेळेत अर्ज दाखल होणार आहेत. आघाडीकडून विद्यमान सभापतींना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या ताराराणी, गांधी मैदान, शिवाजी मार्केट व राजारामपुरी विभागीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या प्रभाग समिती सभापतीपदांची मुदत संपली आहे. परिणामी विभागीय आयुक्तांनी नव्या सभापतीपदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करुन पिठासन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांची नियुक्ती केली. काँग्रेसकडून गांधी मैदान प्रभाग समितीसाठी रिना कांबळे, राजारामपुरीसाठी शोभा कवाळे यांची नावे निश्चित केली आहेत. शिवाजी मार्केट प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नाव निश्चित केले नसून ताराराणी विभागीय प्रभाग समितीसाठी आघाडीच्या उमेदवाराची घोषणा गुरुवारी करण्यात येणार आहे. अर्ज दाखल केल्यानंतर सोमवारी (ता.१५) प्रथम प्रभाग समिती क्रमांक एकच्या सभापतींची सकाळी साडेआकरा वाजता निवड होईल. त्यानंतर २,३ व ४ क्रमांकच्या प्रभाग समितींच्या सभापतींची निवड होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोगस सहीप्रकरणी ठेकेदाराला नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडील बिलावर बोगस सही केल्याप्रकरणी ठेकेदार फारुख शेख यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे. तीन लाख रुपयांच्या बिलावर कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांची बोगस सही केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता.

खोतवाडी येथील कामाचे तीन लाख रुपयांचे बिल आणि मेजरमेंट बुक एकाचवेळी सहीसाठी कार्यकारी अभियंत्यांकडे सादर करण्यात आले होते. बिलाची तपासणी करताना बोगस सही झाल्याचे अभियंता बुरुड यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी बुधवारी संबंधित ठेकेदाराला नोटीस काढून सात दिवसांत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्ही किंवा इतरांनी सही केली असल्यास कारवाई का करु नये असे नोटीशीत म्हटले आहे. ठेकेदाराकडून म्हणणे प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सहीचे प्रकरण उघडकीस येऊन तीन दिवसाचा कालावधी उलटला, तरी बोगस सहीचा धनी कोण हे अजून स्पष्ट झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'शाहूवाडी-पन्हाळ्या'त अद्याप सामसूम

$
0
0

चंद्रकांत मुदुगडे, शाहूवाडी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असताना हातकणंगले मतदारसंघातील शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण मात्र अद्याप सामसूमच आहे. खासदार राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने हातकणंगलेच्या आखाड्यातून लढण्यासाठी सज्ज झाले असले त्यांचे समर्थक म्हणून शाहूवाडी-पन्हाळ्यातून कोणीही राजकीय 'वस्ताद' नेता पुढे यायला तयार नाही. काही प्रमाणात आमदार सत्यजित पाटील यांनी अपरिहार्य राजकारणातून आपले पत्ते खुले केल्यामुळे युवा शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना याचा थोडाफार लाभ होईल असे सध्याचे चित्र आहे. महायुतीचाच एक घटक असणारे माजी आमदार डॉ. विनय कोरे मात्र 'माने' या 'ना माने' अशा द्विधा मनःस्थितीत असल्याने जनसुराज्य पक्ष कार्यकर्त्यांची 'शक्ती' कोणत्या दिशेला वळणार, याची उत्सुकता निवडणुकीच्या अखेरपर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉ. कोरे यांच्या या भूमिकेशी 'मिळतेजुळते' घेत शाहूवाडीतील भाजपचे कार्यकर्ते सावध पावलांनी निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. तर विधानसभा मतदारसंघातील स्वतःचे अस्तित्व हरवून गेलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक गटप्रमुख लोकसभा निवडणुकीत स्वतःला सिद्ध करतील असे म्हणणेही अतिशयोक्तीच ठरेल. शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाने सुरुवातीच्या काळापासून काँग्रेस विचारांची पाठराखण केली. यात प्रामुख्याने स्वर्गीय बाळासाहेब माने, त्यांच्या स्नुषा निवेदिता माने, मध्यंतरी कल्लाप्पांना आवाडे यांचा समावेश करावा लागेल. यानंतर अलीकडच्या काळातील लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघाला निर्णायक वळणावर नेण्यात याच मतदारसंघाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही सर्वश्रुत आहे. यात पुढे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहातून २००९ साली राजू शेट्टी यांनी शेतकरी नेता म्हणून मतदारसंघावर मिळविलेली अनपेक्षित मांड दहा वर्षे कायम राहिल्याचे वास्तव आहे. दरम्यान २००४ ते २००८ कालावधीत 'पन्हाळा-बावडा'चे आमदार म्हणून विनय कोरे (अपक्ष) तर 'शाहूवाडी-पन्हाळा'चे आमदार म्हणून सत्यजित पाटील-सरुडकर (शिवसेना) यांनी धुरा सांभाळली होती. याचवेळी शाहूवाडीतील काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले होते. अशावेळी 'राष्ट्रवादी'तून (सन २००९) लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या तत्कालीन खासदार निवेदिता माने यांनी या दोन्ही आमदारांना दुखावले होते. यातूनच येथील मतदानात निर्विवाद आघाडी घेत शेट्टी यांना खासदार म्हणून संसदेत प्रवेश करणे सोपे झाले होते. तर यानंतरच्या विधानसभापूर्व सरूड येथील मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'कोरे.. न कोरे' या केलेल्या घोषणेच्या लाटेत कोरे यांचा विधानसभेतील विजयी वारू केवळ ३८८ मतांच्या फरकाने रोखला होता, याची खंतही डॉ. कोरेंना असावी. यातच पुढच्या वाटचालीत 'डॅमेज कंट्रोल' साधता न आलेल्या माजी खासदार माने यांना आज महायुतीचा घटक असूनही कोरे यांच्याशी निवडणूक समझोता करण्यात यश मिळाले नसल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जबाबदारी स्वीकारूनही हा अपेक्षित समझोता होऊ शकलेला नाही. याउलट 'हातकणंगले'चा उमेदवारच बदलण्याच्या उघड हालचाली करून आपली दिशा स्पष्ट करणाऱ्या डॉ. कोरे यांनी महायुतीच्या कोल्हापूर येथील सभेला अनुपस्थित राहून 'धनुष्यबाणा'चा प्रचार करण्यात आपल्याला कसलेही स्वारस्य नसल्याच्या चर्चेला एकप्रकारे पुष्टीच दिली आहे. धैर्यशील मानेंची पाठराखण केल्यास विद्यमान आमदारांना त्याचे क्रेडिट मिळवून दिल्यासारखे होईल, या आणखी एका संदर्भाने डॉ. कोरे लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त धोरण स्वीकारतात की पडद्याआडच्या राजकारणात स्वारस्य दाखवितात, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. ००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैव वैद्यिकीय कचऱ्यावर नियमीत प्रक्रिया

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कसबा बावडा येथील प्लान्टमध्ये जैव वैद्यकीय कचऱ्यावर महापालिकेच्यावतीने प्रक्रिया केली जात असल्याने त्याचे चांगले परिणाम समोर आले आहेत. या कचरा संकलनाबाबत वैद्यकीय क्षेत्राकडून येणाऱ्या तक्रारी कमी झाल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांत महापालिकेच्या उत्पन्नात ७२ लाखांची भर पडली. ऑनलाइन बिलिंग सुविधेसह आवश्यकतेनुसार वाहनाचा पुरवठा महापालिकेकडून केला जात आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व हाताळण्याचे निर्देश महापालिकांना दिले आहेत. निर्देशानुसार आरोग्य विभागाकडून रुग्णालये, सुश्रूषा केंद्रे, दवाखाने, पशू वैद्यकीय संस्था, ब्लड बँका, दंत चिकित्सालो, व्हेटनरी दवाखान्यांतून नियमित जैव वैद्यकीय कचरा संकलीत केला जातो. दररोज सुमारे ९०० किलो वैद्यकीय कचरा संकलीत करून त्यावर शास्त्रीय प्रक्रिया करण्यासाठी कसबा बावडा येथे प्लान्टची उभारणी केली. यापूर्वी त्याचा ठेका नेचर इन नीड कंपनीला देण्यात आला होता. कंपनीतर्फे वैद्यकीय कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट, संकलन होत नसल्याचा अनेक तक्रारी नेहमी प्रशासनाकडे येत होत्या. कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत वैद्यकीय क्षेत्राच्या तक्रारी होत्या. कंपनीने महापालिकेचे ६० हजार रुपये भुईभाड्यासह ५३ लाखांची रॉयल्टी जमा केलेली नव्हती. त्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी कंपनीकडून काम काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रशासनाने जून २०१८ मध्ये प्रकल्प सील करुन ऑगस्टपासून स्वत:च चालविण्यास सुरुवात केली.

कचरा संकलन आणि विल्हेवाट योग्य प्रकारे लावताना हॉस्पिटल व्यवस्थापनांना मागणीनुसार सुविधा देण्यास सुरुवात केली. जैव वैद्यकीय कचरा संकलीत करण्यासाठी निर्धारित केलेले शुल्क जमा करण्यासाठी ऑनलाइन सुविधा देण्यात आली. नागरी सुविधा केंद्रातही याची सोय आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे शुल्क देण्याची पद्धत बंद झाल्याने त्यामध्ये पारदर्शकताही वाढली. त्यामुळे प्रकल्प चालवण्यास घेतल्यापासून महापालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ७२ लाखांची भर पडली आहे. प्रकल्पात प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून आवश्यकतेनुसार रिसायकलिंग प्रोसेसही राबवली जाते. भस्मीकरण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावल्यानंतर निर्माण होणारी राख रांजणगाव (पुणे) येथील लँडफिल साइटवर पाठवण्यात येत आहे.

पाच तालुक्यांतील संकलनास प्रतीक्षा

महापालिकेच्यावतीने ग्रामीण भागात सुविधा पुरवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जवळच्या पाच तालुक्यांतील कचरा संकलन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी संबंधीत आस्थापनांकडून निर्धारीत शुल्क घेण्यात येणार होते. ज्या आस्थापना जैववैद्यकीय कचरा देणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे अधिकारही प्रदूषण मंडळाने महापालिकेला दिले होते. मात्र अद्याप करवीर, कागल, राधानगरी, भुदरगड व गगनबावडा तालुक्यातील कचरा संकलनास महापालिकेने सुरुवात केलेली नाही.

प्रतिमहा शुल्क

प्रकार शुल्क (रुपयांत)

दवाखाना ४००

दाताचा दवाखाना ६६०

लॅबोरेटरी ११५८

ब्लड बँक ४८३१

हॉस्पिटल ७.३० (प्रतिबेड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल्स, व्यावसायिकांना २० कोटींवर फटका

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एक महिन्यापासून शहर आणि परिसरातील हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंगचे कामकाज रात्री साडेदहा वाजता बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना जेवणाची सुविधाही बंद करावी लागली आहे. परिणामी रात्री उशिरा शहरात येणाऱ्या पर्यटकांना, स्थानिक नागरिकांना जेवण मिळत नसल्याने त्यांच्या पोटालाही आचारसंहितेच्या जाचक अटींचे चटके बसत आहेत. एका महिन्यात हॉटेल व्यावसायिकांना किमान २० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. परिणामी सरकारी करांमध्येही घट होणार आहे. शासनाला जीएसटीच्या किमान १ कोटीच्या रक्कमेला मुकावे लागले आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून लागू झाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री साडेदहा वाजल्यानंतर हॉटेल्स, बार बंद करण्याचे आदेश काढले. हॉटेल्स, बार, लॉजिंग सुरू ठेवणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जात आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी करणारे भरारी पथक व्हिडिओ शूटिंगसह येऊन उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्सचे चित्रिकरण करीत आहे. त्यांच्याकडून दमदाटीही केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी या पथकाचा धसका घेत सर्व हॉटेल्सचे शटर साडेदहाआधीच बंद करण्यात येत आहे.

सध्या शाळांना सुट्टी पडली आहे. पर्यटनाचा हंगाम आहे. परदेशासह परराज्यातून आणि जिल्ह्यांतून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. पुणे, मुंबई आदी ठिकाणाहून बसने प्रवासी रात्री उशिरापर्यंत पर्यटक येतात. त्यांना शहरात जेवण मिळत नसल्याचे चित्र आहे. रात्री साडेदहाच्या आत हॉटेलमधील सर्व विद्युतदिवे बंद झाले पाहिजे, समोरचे प्रवेशद्वार बंद करावे, कामगारही दिसू नयेत अशा कडक सूचना आहेत. त्यामुळे साडेनऊ वाजता हॉटेलमध्ये येऊन साडेदहा वाजेपर्यंत निवांतपणे बसून जेवण करता येत नाही. लवकर जेवण आवरा, आचारसंहितेचे पथक येणार आहे, हॉटेल बंद करायचे आहे असा तगादा व्यवस्थापक लावत ग्राहकांना लावत असल्याचे दिसते. ग्राहकांना घाईघाईने जेवण करावे लागत आहे. त्यामुळे कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्यावतीने पर्यटक, रात्री उशिराच्या ग्राहकांसाठी किमान रात्री ११ वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला आठवड्यापूर्वी देण्यात आले. मात्र, यावर सकारात्मक निर्णय झालेला नाही. निवेदनास केराची टोपली दाखवल्याची भावना व्यावसायिकांत निर्माण झाली आहे.

कोल्हापुरातच सक्ती का?

निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि इतर प्रमुख अधिकारी दिल्लीत असतात. तेथे बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरातील हॉटेल आचारसंहितेच्या काळात रात्रभर सुरू आहेत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी असेच चित्र आहे. असे असताना कोल्हापुरातच साडेदहानंतर हॉटेल बंद करण्याची सक्ती का, असा प्रश्न 'हॉटेल संघा'चा आहे. या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडून मिळत नाही. हॉटेल व्यवसायिक, आईस्क्रीम विक्री दुकानदार, खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉलधारक यांच्या व्यवयासावर परिणाम जाणवत आहे. रात्री येणाऱ्या पर्यटक, प्रवाशांची संख्या घटल्याने रिक्षा, टॅक्सीधारकांनाही झळ बसली आहे.

आइस्क्रीम विक्रेते थंड

शहरात आइस्क्रीमची १०० प्रमुख दुकाने आहेत. जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय अनेकांना आहे. उन्हाळा असल्याने रात्री उशीरापर्यंत नागरिक फिरायला बाहेर पडतात. मात्र रात्री साडेदहा वाजल्यानंतर सर्व दुकाने बंद करावी लागत असल्याने ऐन उन्हाळ्यात त्यांचा व्यवसाय थंड झाला आहे. सीपीआर, लक्ष्मीपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात हातगाड्यांवर रात्रभर चहाची सोय केली जाते. रुग्ण, नातेवाईकांना त्याचा मोठा आधार असतो. आता हातगाड्यावरील चहाविक्रीही बंद आहे.

कोट

हॉटेल्सना व्यवसाय परवाना देताना रात्री ११ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र एक महिन्यापासून आचारसंहितेचे कारण सांगून प्रशासन साडेदहा वाजल्यानंतर हॉटेल बंद ठेवण्यास भाग पाडते. दिल्ली, मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी रात्रभर हॉटेल्स सुरू असतात. मग, कोल्हापूरला वेगळा नियम कशासाठी? असा प्रश्न निर्माण होतो. नियमित वेळेआधी हॉटेल्स बंद केल्याने कोल्हापूरमध्ये व्यावसायिकांचे किमान २० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातून सरकारचा १ कोटींचा जीएसटीही बुडला आहे.

- उज्वल नागेशकर, अध्यक्ष, हॉटेल मालक संघ

६००

शहरातील एकूण हॉटेल

२० कोटी

सरासरी फटका

१ कोटी

जीएसटीचे उत्पन्न

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिजाऊ कन्या उपक्रम कौतुकास्पद’

$
0
0

कोल्हापूर : 'कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा जिजाऊ कन्या भेट योजना प्रेरणादायी आहे. सभासदांच्या मुलींच्या नावे ठेव पावत्यांचा उपक्रम स्तुत्य आहे' असे प्रतिपादन शिक्षक समितीच्या ज्येष्ठ नेत्या इंदूमती हजारे यांनी केले. पतसंस्थेतर्फे सभासदांच्या मुलींच्या नावे पाच हजार रुपयांच्या ठेव पावती वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या.

संस्थेच्या माजी सभापती सुनीता पाटील, शशिकला शिंगे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी ४४ मुलींना ठेव पावत्या वितरित केल्या. पतसंस्थेच्या सभापती आशालता कांझर यांनी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

संस्थेचे मानद चिटणीस सुधाकर सावंत यांनी प्रास्ताविक केले. उपसभापती सरिता सुतार यांनी आभार मानले. शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई, शहराध्यक्ष संजय पाटील, संचालक प्रकाश पाटील, संजय कडगावे, उत्तम गुरव, सुभाष धादवड, वसंत आडके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images