Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाचगावचे राजकारण पुन्हा वेगळ्या वळणावर

$
0
0
पाचगावच्या सरपंच राधिका खडके यांचा अनुसूचित जातीचा दाखला विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवल्याने पाचगावचे राजकारण जिल्ह्यात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

फेब्रुवारीतील ‘अटक करा’ मागणीची डिसेंबरमध्ये पुनरावृत्ती

$
0
0
राजकीय वैमनस्यातून १३ फेब्रुवारी २०१३ मध्ये सिध्दाळा गार्डनजवळील अॅक्सिस बँकेजवळ दिवसा गोळ्या झाडून अशोक पाटील यांचा केल्यावर आमदार महादेराव महाडिक व भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या समर्थकांनी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना अटक करावी, अशी मागणी केली होती.

शाहू स्मारक समितीच्या निर्णयाची चौकशी करा

$
0
0
‘शाहू स्मारकाचे आपण तयार केलेले मॉडेल पाहण्याची साधी तसदी निवड समितीने घेतली नसल्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी आर्टिस्ट अशोक सुतार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

दलित स्त्रियांचा संघर्ष पडद्यावर

$
0
0
दीडशे वर्षातील मराठी भाषेतील दलित लेखिकांनी चितारलेले दलित महिलांचे जीवन, संघर्ष, प्रेरणा, स्त्रियांची दुःखे ‘दलित बाईच्या नावानं’ या माहितीपटातून खुली होणार आहेत. श्रमिक प्रतिष्ठान आयोजित या ५८ मिनिटांच्या माहितीपटाची निर्मिती ‘साहित्य अकादमी’साठी करण्यात आली आहे.

चित्रकाराची गूढ कहाणी

$
0
0
आंतरराष्ट्रीयस्तरावरील भारतीय चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या जीवनावरील लघुपट हा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सोमवारचा लक्षवेधी लघुपट ठरला. दरम्यान ‘या कलाकृतीच्या माध्यमातून गायतोंडे यांच्या अमूर्तशैलीतील चित्रकारिता, त्यांचे गूढ जीवन, कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जीवनानुभवाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे लघुपटाचे दिग्दर्शक सुनील काळदाते यांनी सांगितले.

महाडिक-पाटील तेढ वाढली

$
0
0
जिल्ह्यातील एका गावच्या ग्रामपंचायतीचे राजकारण आता मंत्री आणि खासदार व्हायला निघालेल्यांना बदनाम तर करत आहेच, शिवाय दोघांतील वैर वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे.

राजकारणातले ‘फुकटचे बळी’

$
0
0
नेत्यांच्या राजकारणात निष्ठावंत कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांचा फुकटचा बळी गेला आहे. नेते, दादा यांची गटबाजी आयुष्यभर मानणाऱ्या काही कार्यकर्त्यांची डोकी फुटली. त्यात काही जणांचा हकनाक बळी गेला. घरगुती भांडणापासून ते जिल्ह्याच्या राजकारणापर्यंत काही कार्यकर्त्यांची फळी समर्थ साथ असणाऱ्या नेत्यांनी आणि दादांनी सांभाळली आहे.

सरपंचांची जात ‘खोटी’

$
0
0
पाचगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच राधिका खडके यांचा अनुसूचित जातीचा दाखला अवैध असल्याचा निकाल विभागीय जातपडताळणी समितीने सोमवारी (ता. २४) दिला. यामुळे पाचगाव ग्रामपंचायतीच्या राजकारणाला नवीन वळण लागणार आहे. खडके यांचा दाखला अवैध ठरल्याने गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गटाला धक्का बसला आहे.

मिलिंद पाटीलकडून खुनाची कबुली

$
0
0
पाचगांव येथील अशोक पाटील यांच्या गुन्ह्यातील प्रमुख संशयित आरोपी दिलीप जाधव उर्फ डी.जे. याचा मेव्हणा धनाजी तानाजी गाडगीळ (वय ३४, रा. प्रगतीनगर, पाचगांव) याच्या खुनातील प्रमुख आरोपी मिलिंद अशोक पाटील (वय २४) व प्रमोद कृष्णात शिंदे, आयरेकर (वय २१, दोघे रा. भैरवनाथ मंदिराजवळ, रूमाले गल्ली, पाचगांव, ता. करवीर) या दोन आरोपींना अटक केली.

लेखन

$
0
0
पाणिनीनं देवनागरीचा आणि हेमाडपंतानं मोडी लिपीचा शोध लावला म्हणतात. शेकडो वर्षांपूर्वीच्या ह्या सॉफ्टवेअरची फ्री-टू-ऑल हार्ड कॉपी शाळेत अगदी परवा परवापर्यंत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मिळत होती. ते सॉफ्टवेअर आता मॅनमेड कम्प्युटरवर अपलोड झाले आहे.

३१ डिसेंबरला डाक अदालत

$
0
0
कोल्हापूर डाक विभागाच्यावतीने मंगळवारी (३१ डिसेंबर) डाक अदालतीचे आयोजन केले आहे. पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारीचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या अदालतीमध्ये दखल घेतली जाणार आहे.

गणिताचा सर्वांगीण अभ्यास व्हावा

$
0
0
‘गणिताचे उपयोजित ​गणित आणि शुद्ध गणित असे वर्गीकरण न करता गणित या विषयाचा सर्वांगीण अभ्यास झाला पाहिजे. तसेच ‘डायनॅमिकल सिस्टम्स’ हा विषय पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची गरज असल्याचे मत इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेस बेंगळुरूचे प्रा. व्ही.जी. टिकेकर यांनी व्यक्त केले.

हवे विकासाचे राजकारण

$
0
0
राजकारण म्हटले की, ईर्षा, कुरघोड्या, शह-काटशह या गोष्टी आल्याच. निवडणूक आली की, या गोष्टींना अगदी उत येतो. सत्ता संपादनासाठी कार्यकर्ते इरेला पेटतात, पण निवडणूक संपली की, मतभेद विसरून गावगाडा हाकला जातो, पण गेल्या काही वर्षांत पाचगावातील राजकारण याला अपवाद ठरत आहे.

‘विवेकानंद’मध्ये फुल्ल टू धमाल!

$
0
0
गॅदरिंग म्हणजे कॉलेज यूथसाठी फुल टू धमालच! लोकगीते, लोकनृत्ये आणि पथनाट्य ते मिमिक्री, एकपात्री प्रयोगांची रेलचेल आ​णि विद्यार्थ्याच्या कलागुणांचा आविष्कार स्नेहसंमेलनातून घडत आहे. विवेकानंद कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातही तरुणाईचा जोश, जल्लोष आणि बहारदार नृत्याविष्काराचे दर्शन घडले.

तापमानातील बदलामुळे जोरदार वारे

$
0
0
वातावरणात दररोज बदल होत असून, शहरात गेले दोन दिवस जोरदार वारे वाहत आहे. वाऱ्याच्या परिणामी आगामी दोन-तीन दिवस शहरात थंडीचा कडाका अधिकच जाणवणार आहे. हिमालय परिसरात बर्फ पडल्यामुळे मध्य भारतावरच एअर बेल्ट तयार झाल्याचे के.आय.टी. कॉलेजमधील एन्व्हायर्न्मेंट इंजिनीअरिंग विभागाचे प्रा. सौरभ जोशी यांनी सांगितले.

घरबांधणीसाठी जागा द्या

$
0
0
नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी कुरुंदवाड येथे माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मंडल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन मंडल अधिकारी शंकर सुतार यांना देण्यात आले. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

कारखान्यांचे वाहनतळ हाउसफुल्ल

$
0
0
ऊसदर आंदोलनामुळे साखर कारखान्यांचा लांबलेला गळीत हंगाम, त्यातच दुबार पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांची घाई यामुळे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांवर ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे तोडलेला ऊस गव्हाणीत जाण्यास दोन ते तीन दिवसांचा अवधी लागत आहे.

किमान वेतन लागू करा

$
0
0
अंगणवाडी सेविका व मदतनिसांना किमान वेतन कायदा लागू करावा. मानधनातील फरकाची रक्कम त्वरीत मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने शिरोळ पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला. तसेच ठिय्या आंदोलन करण्यात आले.

१२ एकरांचा लिलाव संशयास्पद

$
0
0
चित्री प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये शिल्लक राहिलेल्या जमिनीचा लिलाव मूळ जमीनमालकासह इतरांनाही अंधारात ठेवून २०१० मध्ये परस्पर उरकण्याचा कारनामा करणाऱ्या महसूल विभागामुळे आजरा तालुक्यातील सावरवाडी गाव प्रकाशझोतात आले. जमिनीच्या मूळ मालक असलेल्या सबनीस कुटुंबीयांनी तक्रार केल्यावर अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांनी चौकशीचे आदेश दिले.

बापूरामनगरमधील रस्त्याचे काम रखडले

$
0
0
शहराबाहेरील मोठे उपनगर म्हणून बापूराम नगरची ओळख आहे. या नगराची स्थापना झाल्यानंतर याठिकाणी आखीवरेखीव स्वरुपात रस्त्यांची बांधणी करण्यात आली होती. आता मात्र या नगरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, मुख्य मार्गाचे काम तर गेल्यावर्षापासून रखडले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images