Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘कंत्राटदारांना त्रास देणा-यांवर कारवाई’

0
0
‘शहरातील विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांना काही नगरसेवक तसेच तथाकथित समाजसेवक त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींमुळे नगरोत्थान योजनेतील कोट्यवधींची कामे खोळंबली आहेत. सातत्याने टेंडर काढूनही महापालिकेचे काम करण्यास कोणी तयार होईना. या प्रकारामुळे जनतेला मिळणाऱ्या सुविधांना मर्यादा येत आहे.

विश्वकोशाचा हिंदी अनुवाद करणार

0
0
मराठी भाषेतील उत्तमोत्तम ज्ञान, माहिती आणि संदर्भ असलेला मराठी विश्वकोश आता हिंदी भाषेत अनुवादित होणार आहे. हिंदीतील नामवंत प्रकाशन संस्था राजकमल प्रकाशनने विश्वकोशाच्या अनुवादासंबधी उत्सुकता दाखविली असून विश्वकोश ‌निर्मिती मंडळानेही त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

३५ वर्षांच्या लढ्याला यश

0
0
कोल्हापूर शहराला काळम्मावाडी ( दूधगंगा धरण) धरणातून थेट व शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी ३५ वर्षांपासून मागणी होत होती. या मागणीसाठी मोर्चे काढण्यात आले, निदर्शेने करण्यात आली. राज्याच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याकडे थेट पाइपलाइनचे गाऱ्हाणे मांडण्यात आले. पण प्रत्येकवेळी कोल्हापूरच्या तोंडाला पाने पुसण्यात आली.

हरवलेलं 'पत्र' सापडेल

0
0
‘साध्या ५० पैशाच्या पोस्टकार्डातून जो शब्दांचा अनमोल ओलावा जपला जायचा, पत्रासाठी जी मनात हूरहूर असायची ती आजच्या स्मार्टफोनच्या जगात हरवली आहे.

थेट पाइपलाइनला मंजुरी

0
0
कोल्हापूरकरांची तीन दशकांची मागणी असलेल्या काळम्मावाडी धरणातून शहरपर्यंत थेट पाइपलाइन योजनेला केंद्र सरकारने मंगळवारी मंजुरी दिली. केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ यांनी ४२५.४१ कोटी रुपये खर्चाच्या या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याने योजना प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

थर्टी फर्स्ट मूड

0
0
शहरात ३१ डिसेंबरचे वातावरण तयार होऊ लागले आहे. हॉटेल्स, पार्टी प्लॅनर्स थर्टी फर्स्टच्या तयारीत गुंतले आहेत. तर काही बॅकपकर्सची थर्टीफर्स्टसाठी शहरबाहेरील विविध डेस्टिनेशन्स गाठण्याची तयारी सुरू आहे. विविध ऑफर्स, नव्या थीम आणि ईडीएम यंदाचे ३१ डिसेंबरचे आकर्षण असणार आहे.

IT पार्कला महापालिकेचे 'लाइक'

0
0
आयटी असोसिएशनच्या प्रस्तावानुसार आयटी पार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आयटीमध्ये काम करणाऱ्या स्थानिकांबरोबरच बाहेरच्या व्यावसायिकांनाही आकर्षित करण्यासाठी या पार्कची मदत होणार आहे.

मोदक गुळाला ७०१० रुपयांचा विक्रमी भाव

0
0
कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये झालेल्या गुळाच्या सौद्यामध्ये मोदक गुळाला प्रतिक्विंटल ७०१० रुपयांचा विक्रमी भाव मिळाला. हा गूळ खोडशी (ता. कराड) येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी भगवान भोसले यांचा आहे.

मराठी समाजशास्त्र परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन औरंगाबादला

0
0
मराठी समाजशास्त्र परिषदेचे २४ वे राष्ट्रीय अधिवेशन १८ व १९ जानेवारीला औरंगाबाद येथे आयोजित केले आहे. औरंगाबाद येथील सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान कॉलेज, समर्थनगर येथे हे अधिवेशन होणार आहे.

बायोकेमिस्ट्री अॅनालायझर मशीन धूळखात

0
0
सीपीआरमधील टेस्टसंदर्भातील अत्यंत महत्वाचे बायोकेमिस्ट्री अॅनालायझर मशीन सबंधित किटस नसल्याने धूळखात पडून आहे. काविळ, किडनी, ह्दयरोग आदींसाठीच्या रोज सरासरी शंभर पेशंटच्या पाचशे टेस्ट यामुळे बंद झाल्या आहेत.

पर्यावरणीय संघर्षात विकासाची संधी

0
0
कोल्हापूर जिल्ह्यातील १२ पैकी दहा तालुके पश्च‌िम घाटात आहेत. साहजिकच जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धन हा कळीचा मुद्दा आहे. सह्याद्री प्रोजेक्ट टायगरच्या सीमा कोल्हापुरातही येत असल्याने तसेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील राधानगरी अभयारण्याचा समावेश पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास हे मुद्दे महत्त्वाचे बनले आहे.

नवे वर्ष, नवी आशा

0
0
वर्ष सरत आले. जरासे विसावून भलेबुरे नक्की काय घडले हे आठवण्याची ही वेळ. बुरे सारे पाठीमागे ठेवायचे आणि भल्या गोष्टींच्या साथीने नव्या वर्षाला सामोरे जायचे नव्या अभ्युदयाची नवी आशा घेऊन... सांस्कृतिक क्षेत्रातही बरेच घडले आणि बिघडलेसुद्धा.

संगणक प्रशिक्षण झाले ‘हँग’

0
0
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला सदस्यांना कम्प्युटरचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ई-लर्निंगची व्यवस्था केली. जिल्ह्यातील ४००६ महिला सदस्यांना महिन्याभरात कम्प्युटर साक्षर करण्याची जिल्हा परिषदेची योजना होती.

५६ कोटी उभारावे लागणार

0
0
पा‌णी योजनेसाठी महापालिकेला दहा टक्के रक्कम उभारावी लागणार आहे. ही रक्कम ४२ कोटी होते. शिवाय जॅकवेल उभारणी आणि भूसंपादनासाठीचे १४ कोटी महापालिकेलाच उभे करावे लागणार आहेत. महापालिकेची स्थिती पाहता एवढी रक्कम उभारणे शक्य नाही.

अडकूर येथून विवाहिता बेपत्ता

0
0
अडकूर (ता. चंदगड) येथून १७ डिसेंबर रोजी विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या पतीने तिली आहे. श्रद्धा ऊर्फ मोना राजेश शिंदे (वय २२) असे विवाहितेचे नाव आहे. याबाबतची नोंद चंदगड पोलिसांत दिली आहे. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ होणार

0
0
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या गेल्या तीन वर्षापासूनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना होणार आहे. कामगार व विशेष सहाय्य मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेला यासंदर्भात पत्र मिळाले आहे.

कारखाना चालवायला अक्कल लागते

0
0
‘खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत प्रतिआव्हानाद्वारे ‘दौलत’चे कर्ज तुम्ही भरा, आम्ही कारखाना चालवून दाखवू, अशा वल्गना करतात. पण त्यांची ही वृत्ती म्हणजे पाण्यावर लोणी काढण्याचा प्रकार असून, कारखाना काढायला अक्कल लागते, आयता चालवायला नाही,’ असा प्रतिहल्ला राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

शरद पवारांकडून शेतक-यांची थट्टा

0
0
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना कृषिमंत्री शरद पवार यांना विनोदाचा विषय वाटू लागला आहे. त्यांनी ‘दौलत’ स्वाभिमानीला चालवायला देण्याबाबतचे वक्तव्य केले. त्याला संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी तयारी दाखविली आहे. कारखाना बंद असल्यामुळे तालुक्यातील जनता अडचणीत असताना पवार यांना ‘दौलत’ हा चेष्टेचा विषय वाटू लागला आहे.

‘ऊस वजनकाटे तपासणी मोहीम सुरू करा’

0
0
ग्राहकाला केंद्रबिंदू मानून उत्पादक व विक्रेत्यांनी कार्य केल्यास खरेदी विक्रीची प्रक्रिया सुरळीत होईल. त्यामुळे कुणाचीही फसवणूक होणार नाही.

विकासाचा डांगोरा पिटणाऱ्यांनी कोणते ‘लै भारी’ काम केले?

0
0
‘बिद्री साखर कारखाना राज्यात ‘लै भारी’चा डांगोरा पिटून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या अध्यक्षांनी कारखाना सभासद शेअरची किंमत पाच हजारवरून दहा हजार केली. तसेच सभासद साखर पाच रुपये किलोवरून दहा रुपये किलो केली. मग यांनी सभासदांच्या हितासाठी कोणता लै भारी कारभार केला,’ असा प्रश्न उपस्थित करत आमदार के. पी. पाटील यांच्या कारभारावर माजी जि. प. सदस्य प्रकाश आबिटकर यांनी टीका केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images