Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पावसाचे पाणी पुरते वर्षभर

0
0
जिल्ह्यातील पाण्याच्या मुबलकतेमुळे रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे बहुतांश नागरिक कानाडोळा करत असतात. ही यंत्रणा म्हणजे महागडी, किचकट तसेच पावसाळ्यातील पाणी वर्षभर कसे पुरणार, त्यामध्ये अाळ्या तयार होणार नाहीत का? अशा अनेक शंका नागरिक उपस्थित करत असतात. त्यामुळे जागा असूनही अनेकजण प्रयत्न करत नसल्याची परिस्थिती आहे.

कोल्हापूर दक्षिणमधूनही लढण्याची शिवसेनेची तयारी

0
0
‘जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार देण्यात येणार असून कोल्हापूर उत्तर बरोबरच विधानसभेचा दक्षिण मतदारसंघही शिवसेनेसाठी सोडण्याची मागणी मित्रपक्ष भाजपकडे करण्यात येणार आहे.

पूर्ववैमनस्यातून धनाजी गाडगीळ यांचा खून

0
0
पूर्ववैमनस्यातून धनाजी तानाजी गाडगीळ (३५, रा. पाचगाव, करवीर) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी रात्री तलवार व गुप्तीने हल्ला करुन खून केला. या हल्ल्यात अमर बाबासाहेब बावडेकर (३२, रा. पाचगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. मृत धनाजी जाधव हे माजी पंचायत समिती सदस्य दिलीप जाधव यांचे मेहुणे होते.

गडहिंग्लजमध्ये महिलाराज येणार?

0
0
उपनगराध्यक्ष पदानंतर आता स्थायीसह विविध विषय समित्यांचे राजकारण पालिकेत रंगले आहे. सध्या सर्व समित्यांच्या सभापतीपदी महिला आहे. हाच फॉर्म्युला राहणार की बदल होणार याची उत्सूकता लागली आहे. तहसीलदार हनुमंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत आज या समित्यांची रचना होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांनी दिली.

मुंबईच्या सराफाला कागलजवळ लुटले

0
0
कर भरण्यासाठी थांबलेल्या व्हॉल्व्हो बसमधील मुंबईच्या सराफ व्यापाऱ्याचे सुमारे २६ लाखाचे ५६ हजार रुपयाचे सोन्याचे ९६५ ग्रॅम वजनाचे दागिने अज्ञातांकडून लंपास करण्यात आले. सदर व्यापाऱ्यांने आपल्या बॅगमधील दागिन्यांची पिशवी नेत असल्याच्या संशयावरुन दोघांना अडविण्याचा प्रयत्न केला असता हिसडा मारुन ते दोघेजण पळून गेल्याचे व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितले आहे.

रेल्वेगाड्यांना आता ५ जनरल डबे

0
0
‘शाहूपुरीतून राजारामपुरीकडे जाण्यासाठी फूट ओव्हरब्रीज आणि मेटल डोअर डिटेक्टरचे काम जानेवारीत सुरू करण्यात येणार आहे. त्याशिवाय यापुढे सर्व रेल्वेगाड्यांना पाच जनरल डबे राहणार आहेत.

चित्रनगरीसाठी १५ कोटी मंजूर

0
0
गेल्या २७ वर्षांपासून कोल्हापूर चित्रनगरीचा रेंगाळलेला प्रश्न येत्या वर्षाअखेरीस सुटणार असून, सहा लोकेशन्ससह चित्रिकरण सुरू होणार आहे. या कामासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लोकेशन्स डिझाइन्सचे कामही प्रत्यक्ष सुरू झाल्याची माहिती कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

ज्येष्ठ नागरिकांना इ-तिकीट आरक्षण

0
0
ज्येष्ठ नागरिकांना आता घरसबसल्या एसटीच्या तिकीटाचे आरक्षण करता येणार आहे. ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांच्यासाठी सवलतीच्या इ-तिकीट आरक्षणाची सुविधा एसटीने उपलब्ध करुन दिली आहे. ही माहिती राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्काधिकारी मुकुंद धस यांनी दिली.

धनंजय महाडिक तयारीला लागा

0
0
‘महाडिक तुम्हाला आमच्यासोबत लोकसभेत काम करायचे आहे. तीन महिने उरलेत कामाला लागा. सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यावर आता येऊ नका,’ अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी धनंजय महाडिक यांची कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित केल्याचे संकेत दिले.

चौदावं वरीस दारू पिण्याचं?

0
0
भारतात मद्य पिण्याचा परवाना वयाची १८ वर्षे ओलांडल्यानंतर दिला जात असला तरी १४ वर्षे वयोगटापर्यंतची बहुसंख्य मुले या व्यसनाच्या आहारी गेली आहेत. ख्रिसमस आणि थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशन पार्ट्यांमध्ये त्यांचे दारू पिण्याचे प्रमाण तिप्पट होत असल्याची धक्कादायक माहिती दी असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या (असोचॅम) नव्या अहवालातून समोर आली आहे.

जिल्हाधिका-यांच्या विरोधात मनसेचा निषेध मोर्चा

0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा पदाधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या प्रशासकीय कारवाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले, संभाजी पाटील व धनंजय शेलार या पदाधिकाऱ्यांनी वाळू लिलावप्रकरणी जिल्हा प्रशासनाला महसूल मिळवून देण्यासाठी मोठी मदत केली.

सातारा बसस्थानक बनले समस्यांचे आगार

0
0
सातारा मध्यवर्ती बसस्थानक पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचा थांबा आहे. दररोज हजारो बसची ये-जा सुरू असते. अनेक लांब पल्ल्याच्या बस या ठिकाणी थांबतात. तरीही बसस्थानकाचे ओंगळ रुप मात्र, प्रवाशांना नाकी नऊ आणत आहे.

शिक्षकांचा समाज आणि समाजाचे शिक्षक

0
0
जगात भारताइतकी समृद्ध ज्ञानपरंपरा असणारा पण तरीही दयनीय अवस्थेतील लाखो शिक्षकांचा जमाव असणारा दुसरा देश अस्तित्वात नाही. येथे ‘जमाव’ हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरत आहे.

जागे व्हा...!

0
0
गतवर्षी मंत्रालयाला आग लागल्यानंतर सर्व सरकारी कार्यालयांचे फायर ऑडिट केले. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी मंत्रिमंडळाने आदेशवजा सूचना दिल्या. सरकारी कार्यालयाला आग लागली तरी संबंधित विभागाला काही फरक पडत नाही, परंतु जनतेने वर्षानुवर्षे अशा विभागांकडे जमा केलेली महत्त्वाची कागदपत्रे, ऐतिहासिक पुराव्यांचे दस्तऐवज जळाले तर हे कधीही भरून न येणारे नुकसान असते.

लिंगायत समाजाचा हातकणंगले ‘तहसील’वर मोर्चा

0
0
लिंगायत धर्माला सरकारकडून स्वतंत्र घटनात्मक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या मागणीसाठी हातकणंगले तालुक्यातील लिंगायत बांधवांनी सोमवारी हातकणंगले तहसील कार्यालवर मोर्चा काढला.

अस्वस्थता निर्माण करण्याची कलावंतात ताकद

0
0
‘कलावंत हा आपल्या कलेच्या माध्यमातून माणसातील संवेदना जागृत करू शकतो. स्वत:च्या कलाकृतीद्वारे आनंद, सुख किंवा सौंदर्य निर्माण करीत असताना माणसांच्या मनात अस्वस्थता निर्माण करण्याची ताकद कलावंतात असते,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.

महिलेचे गंठण लंपास

0
0
देवकर पाणंद येथून निर्मला मोहन सावंत (वय ६४, रा. राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद) यांचे अडीच तोळ्याचे गंठण मोटरसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारून पळवले.

‘लाळखुरकत’ने आज-यात १६ जनावरे मृत्युमुखी

0
0
जिल्ह्यात लाळखुरकत साथीने थैमान घातले असून, आजरा तालुक्याच्या पूर्व भागातही साथीने प्रवेश केला आहे. तालुक्यात लाळखुरकतने सोळा जनावरे दगावली असून, कित्येक जनावरांना या साथीने ग्रासले आहे.

प्रयोगशाळांवरच विज्ञान संस्थेचा ‘प्रयोग’

0
0
काही शाळा, कॉलेजमध्ये कागदावर असलेल्या प्रयोगशाळा आणि कागदावरच प्रयोग पूर्ण करणाऱ्या शाळांची यादी राज्य विज्ञान शिक्षण संस्था राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देणार आहे. संस्थेने राज्यभरातील शाळांच्या प्रयोगशाळांची तपासणी सुरु केली आहे.

कोल्हापूर NCP ला... मंडलिकांचे काय?

0
0
कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी धनं​जय महाडिक यांना देण्याचे संकेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले, याचा अर्थ कोल्हापूरची जागा या पक्षाकडे जाणार याचेही आपोआप संकेत मिळाले आहेत. पण या जागेवर डोळा ठेवून काँग्रेसमध्ये आलेल्या खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे काय हा प्रश्न आता महत्वाचा ठरणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images