Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गावांमध्ये कट्ट्यांवर रंगू लागल्या चर्चा अन् पैजा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकार्याला वेग आला असून, गावोगावी चौकांत चर्चा, बैठका आणि भोजनावळींना ऊत आला आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार हे पटवून देताना पैजा आणि ईर्षा टोकाला जाऊ लागल्या आहेत. पैजेसाठी दारू, मटण आणि रोख रक्कम याबरोबर सोन्याचे दागिने देण्याचे ठरत आहे.

निवडणूक कोणतीही असली तरी सामान्य जनतेला आणि विशेषत: राजकीय आवड असलेल्या लोकांना मेजवानीच असते. राजकारणात उमेदवार उभे राहतात. प्रचार सभा सुरू असतात हे नियमितचे चित्र दिसते. पण निवडणुकीविषयी अतिशय लळा असलेल्या व्यक्ती स्थिर मनाने सभा प्रचार ऐकत नाहीत. त्यांना आपल्याच मनातील उमेदवाराविषयी अभिमान असतो. त्या ईर्ष्येपोटी आपल्या मित्राबरोबर पैजा लावण्यात धन्यता मानतात. राधानगरी तालुक्यात गावोगावी लोकसभा निवडणुकीविषयी खलबते सुरू आहेत. सध्या लोकसभेची निवडणूक सुरू असली तरी अनेकजण विधानसभेच्या प्रचारफेरीची बांधणी करत आहेत. या फेरीतून फिरलेली मंडळी संध्याकाळी चौकात येऊन अमूकच उमेदवार निवडून येणार अशी ठाम भूमिका घेऊन सांगतो. यातून विवाद वाढत जातात, याचबरोबर दुसऱ्याने सांगितलेला मुद्दे खोडून काढण्यासाठी पैजाही जोर धरू लागल्या आहेत. पैजेमध्ये भोजनावळी, धाब्यावर जेवण, पाचशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतच्या बोली करून कागदावर लिखित स्वरूपात मांडल्या जात आहेत. राधानगरी तालुक्यातील एका गावात सोन्याची अंगठी पैजेचा विडा म्हणून देण्याचा निर्णय एका युवकाने घेऊन आपल्या उमेदवाराविषयी आपुलकी दर्शवली आहे. गावच्या चौकात आणि बैठकीच्या ठिकाणी एकाच मतदारसंघातील चर्चेबरोबर पंतप्रधान कोण चांगला, देश चालविण्यास कोण समर्थ आहे, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या घडामोडींचा धावता आढावा घेतला जात आहे.

ग्रामीण भागात राजकारण प्रत्येकाच्या नसानसात भिनलेले आहे, याचा प्रत्यय येऊ लागला आहे. पैजा लावण्यात युवावर्ग अधिक संख्येने सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. निवडून येणारी व्यक्ती येणार, पण ग्राउंड लेव्हलला कोणत्या थराला लोक जातात याचे प्रत्यंतर दिसू लागले आहे. आपले करिअर करण्यापेक्षा अद्यपही युवापिढी राजकारणाची रसभरीत चर्चा करण्यात धन्यता मानत आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डिझाइन, आर्किटेक्टचर क्षेत्रात करिअरची संधी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

डिझाइन व आर्किटेक्चर क्षेत्रात विद्यार्थ्यांना भरपूर संधी आहेत. या अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांनी निवड करून भविष्यकाळ उज्ज्वल करावा,' असे आवाहन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष विजय कोराणे यांनी केले. विजयालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डिझाइन फेअर २०१९ चे आयोजन केले होते. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कलाप्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या प्राचार्या गिरीजा कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी युआयडी विद्यापीठ अहमदाबाद येथील आदित्य चौहाण यांनी इंटेरिअर, डिझाइन या क्षेत्रातील करिअरसंदर्भात मार्गदर्शन केले. मुंबईच्या अॅमिटी विद्यापीठाचे प्रा. सुशांत जगनाडे यांनी आर्किटेक्चरसंदर्भात मार्गदर्शन केले. शिल्पसागर अॅकॅडमीचे मनजीत जाधव यांनी प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कूरमध्ये दिव्यांग मतदार जनजागृती मोहीम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

कूर (ता. भुदरगड) येथे स्वीपअंतर्गत दिव्यांग मतदार जनजागृती कार्यक्रम पार पडला. येथील कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात झाला. दिव्यांग मतदारांना व्हीव्हीपॅट मशिनची सखोल माहिती व्हावी या उद्देशाने निवडणूक विभागातर्फे या मोहिमेचे आयोजन केले होते. प्रा. राहुल चित्रगार यांनी व्होटर अॅपसंदर्भाने महत्त्वपूर्ण माहिती सांगितली व सर्व दिव्यांग मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. व्हीव्हीपॅट मशिनच्या कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिक भुदरगड तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविले. गटशिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगले यांनी प्रास्ताविक केले. ग्रामसेवक श्री. बारड, मुख्याध्यापक डी. डी. कडव, अपंग समावेशित शिक्षणचे पी. जी. पाटील, नितीन कांबळे, संजय पाटील, श्रीकांत शिरतोडे आदी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाजीपूर अभयारण्यात‘बायसन’ करणार जलदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

जंगलात प्राण्यांना चारा-पाणी मिळेनासा झाल्याने त्यांचा मानवी वस्तीमध्ये शिरकाव होत आहे. त्यांच्याकडून पिकांचे नुकसान होत असून, मानवावर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांना किमान उन्हाळ्यात पाणी मिळावे यासाठी बायसन नेचर क्लबमार्फत जंगलातील पाणवठे व तळी या ठिकाणी टँकरमार्फत पाणी सोडले जाणार आहे.

दाजीपूर अभयारण्य (ता. राधानगरी) देशातील गवा प्राण्यांचे अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. जागतिक जैवविविधता असलेला भाग म्हणून नोंद आहे. या अभ्ययारण्यात गवे, अस्वल, रानकोंबडे, भेकर, हरीण, ससे असे प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. गवे संख्येने अधिक आहेत. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून जंगलातील चारा आणि पाणी संपले की, हे प्राणी-पक्षी जंगलाशेजारच्या मानवी वस्तीकडे येऊन शेतवडीचे नुकसान, मानवावर हल्ला करण्याचे प्रमाण वाढत आहे. किमान पाण्यासाठी जंगली प्राणी मानवी वस्तीकडे येऊ नये यासाठी बायसन नेचर क्लबमार्फत जंगल भागातील पाणवठ्यांवर टँकरद्वारे पाणी सोडले जाते. सहा एप्रिल पाडव्याच्या दिवसापासून या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. बायसन नेचर क्लब या संघटनेचे कार्यकर्ते जंगली भागातील पाणवठ्यांचा शोध घेऊन टँकरमार्फत पाणीपाणवठा, तळी या ठिकाणी पाणी सोडले जाणार आहे.

दाजीपूर अभयारण्यातील प्राणी-पक्ष्यांना उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी सहकार्य करावे, असे आवाहन बायसन नेचर क्लबने केले आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांत या उपक्रमामध्ये कोणाला जलदान करायचे असल्यास बायसन नेचर क्लबशी संपर्क साधावा. वन व वन्यजीव विभागाच्या सहकार्याने राधानगरी दाजीपूर जंगल परिसरात या नावीण्यपूर्ण उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटनाद्रोहींच्या हाती सत्ता नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींनी शपथेसह घटनेशीही द्रोह केला. त्यांना सत्ता हातात ठेवण्याचा अधिकार नाही. सत्ता हिसकावून घेऊन त्यांना जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. मतदारांनी निवडणुकीतून हे काम करावे,' असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. मार्केट यार्ड येथील रामकृष्ण हॉलमध्ये मंगळवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या महाआघाडीच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी बोलताना पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'आजवर या देशातील एकाही पंतप्रधानाने द्वेषभावनेतून कोणावर वैयक्तिक टीका केली नाही. मोदी जिथे जातील तिथे विरोधी नेत्यांवर टीका करतात. संस्थांची प्रतिष्ठा राखण्याची खबरदारी त्यांनी घेतली नाही. गांधी घराण्यावर ते नेहमीच टीका करतात. मात्र, गांधी घराण्याने देशासाठी वैयक्तिक बलिदान दिले. मोदींच्या द्वेषबुद्धीमुळे दुसरी अपेक्षा कशी करणार? 'ना खाउंगा ना खाने दुंगा,' हे वचन मोदींनी पाळले नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राफेल विमान खरेदी घोटाळा आहे. या विमानाची किंमत ३५० कोटी रुपयांवरून १६६० कोटी रुपयांवर गेली. सरकारने संसदेत याची माहिती दिली नाही. फाइल चोरीस गेल्याचे त्यांनी सुप्रिम कोर्टात सांगितले. आजवर याबाबत पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही? नक्कीच दाल में कुछ काला है.'

राफेल करारातील रिलायन्सचा समावेश, नोटाबंदी, काळा पैसा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरक्षण, स्वायत्त संस्थांमधील सरकारचा हस्तक्षेप या मुद्यांवरून पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. वर्ध्यातील मोदींच्या भाषणाबद्दल बोलताना खासदार पवार म्हणाले, 'दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी मोदी आमच्या कुटुंबावर बोलले. माझी आई कोल्हापुरातील होती. त्यामुळे आमच्यावर पंचगंगेच्या पाण्याचे संस्कार आहेत. घर सांभाळण्यात कोल्हापूरच्या कन्येचा कोणीच हात धरू शकत नाही. मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करू नये. राष्ट्रवादी हा लक्षावधी लोकांनी उभा केलेला पक्ष आहे. पक्षातील पुढील पिढीवरही असेच संस्कार आहेत.' पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नावही घेण्याचे त्यांनी टाळले. 'जे ते बोलतात ते कधी खरे होत नाही,' असे म्हणत त्यांनी पालकमंत्र्यांचा उल्लेख टाळला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, 'ही निवडणूक देशपातळीवरील मुद्यांवर आहे, त्यामुळे स्थानिक मतभेदांच्या पलिकडे जाऊन काम करण्याची गरज आहे. एकमेकांची गंमत बघत बसण्याची ही वेळ नाही. आपले मतभेद नंतर बघू. महागाई, बेरोजगारी असे महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून विरोधक देशभक्तीचा आव आणत आहेत. मोदींना सत्तेतून खाली खेचण्याची ताकद शरद पवार यांच्यातच आहे, त्यामुळे चंद्रकांत पाटील पवारांवर टीका करतात. त्यांनी कोल्हापुरातील स्वत:चे घर सांभाळले तरी भरपूर झाले.' यावेळी हातकणंगलेचे उमेदवार राजू शेट्टी, कोल्हापूरचे उमेदवार धनंजय महाडिक, कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील. जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, ए. वाय पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले...

मोदींनी पदाचा सन्मान ठेवला नाही

वैयक्तिक टीका करणारे मोदी पहिलेच पंतप्रधान

मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करू नये

राफेलबाबत पोलिसात तक्रार का नाही?

रिलायन्सला कंत्राट कोणत्या निकषांवर?

मताचा अधिकार उद्ध्वस्त करण्याचा हेतू

माझ्यावर कोल्हापूरच्या पाण्याचे संस्कार

सत्ता हिसकावून मोदींना जागा दाखवण्याची वेळ


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचार न करणाऱ्या भाजपनगरसेवकांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विरोधी उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय राहणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांना पक्ष आदेश डावलल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांच्या सहीने नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

नोटिशीत असे म्हटले आहे, युतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याऐवजी आपण विरोधी उमेदवाराचा प्रचार करताना सक्रीय आहेत, असे निदर्शनास येत आहे. या सर्वांची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. आपण केलेल्या पक्ष विरोधी भूमिकेबद्दल कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. नोटीस मिळताच दोन दिवसांत खुलासा करावा, अन्यथा आपण पक्ष शिस्तीला महत्त्व देत नाही, असे समजून आल्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजेंचा अर्ज दाखल

$
0
0

खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी सातारा शहरातून रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. वाद्यांचा गजर आणि समर्थनार्थ घोषणांनी सातारा शहर दुमदुमून गेले होते. रिक्षातून सुरू असलेले निवेदन आणि बॅण्डवरील महाराष्ट्रगीत, पारंपरिक हलगी पथकाच्या बरोबरीनेच लमाणी समाजातील महिलांचे लेझीम पथक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. गांधी मैदानावरून सुरू झालेली रॅली पोवई नाक्यावर येत असताना ठिकठिकाणी उदयनराजेंचे फटाके वाजवून, जोरदार घोषणा देत उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत होते. तापमान चाळीस अंशाच्या जवळपास पोहोचले होते तरीही कार्यकर्ते व नागरिक तळपत्या उन्हात रॅलीत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'पवार कुटुंबाची चिंता मोदींनी करू नये'

$
0
0

सातारा :

'देशाच्या पंतप्रधानांचा आम्ही आदर करीत आलो आहे. पण, आताचे पंतप्रधान जातीयवादी आहेत. भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. मोदी साहेब पवार घराणे आजही एकत्र आहे आणि भविष्यातही एकत्रच राहील. त्याची तुम्ही काळजी करू नका,' असा पलटवार माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. पवारांच्या पुतण्याने शरद पवारांची दांडी गुल केली. या मोदींच्या टीकेचा अजित पवारांनी समाचार घेतला. अजित पवार म्हणाले, 'आतापर्यंत झालेल्या सर्व पंतप्रधानांचा आम्ही आदर करीत आलो आहे. परंतु आतापर्यंत जेवढे पंतप्रधान होऊन गेले, त्यांनी कधीही व्यक्ती आणि घराण्यावर टीका केली नाही. पण, मोदी विकासकामांवर न बोलता घराण्यावर टीका करीत आहेत. मोदीसाहेब पवार आजही एकत्र आहेत आणि उद्या ही एकत्रच रहातील, मोदीसाहेब पवार घराण्याची तुम्ही चिंता करू नये.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्टेट बँकेच्या ग्राहकाचीनऊ लाखांची रोकड लंपास

$
0
0

सोलापूर

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पंढरपूर शाखेत भरणा करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाची नऊ लाखांची रोकड चोरट्यांनी हातोहात लंपास केली. सीएमएस या कंपनीचा तरुण नऊ लाखांची रक्कम घेऊन स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेतील कॅश काउंटरवर उभा होता. त्यावेळी तीन ते चार तरुणांनी रोकड घेऊन उभ्या असलेल्या सौरभ सतीश हेंद्रे या तरुणाला घेरले आणि त्याचे लक्ष विचलित केले. त्याच वेळी समोर उभ्या असलेल्या गार्डचे एकाने लक्ष वेधून घेतले आणि चोरट्यांनी टेबलावर ठेवलेली बॅग पळविली. चारही चोरटे बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीएससी परीक्षा घोटाळा, दोघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मित्राला पास करण्यासाठी तोतया विद्यार्थी म्हणून बसणाऱ्या दोघांविरुद्ध इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव सुनील हरिश्चंद्र अवतारे (रा. खारघर, मुंबई) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भास्कर माधव तास्के (रा. वाकोडी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) व इंद्रजीत बाळसो माने (रा. बहादूरवाडी, ता. वाळवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या दोघांनी संगनमत करून ७ मे ते ७ जून २०१५ या कालावधीत आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवर बनावट खाते तयार केले. इंद्रजीत माने याने भास्कर तासगावकर या नावाने बनावट खाते तयार करून परीक्षेसाठी अर्ज दाखल केला. त्याचा मित्र भास्कर माधव तास्के याला पास करण्यासाठी माने आणि भास्कर तास्के या दोघांनी ही शक्कल लढवली. आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवर भास्कर माधव तास्के आणि भास्कर माधव तासगावकर ही दोन नावे समान असल्याने त्यांचे बैठक क्रमांक सलग आले. इंद्रजीत माने हा तोतया उमेदवार म्हणून परीक्षेला बसला. यावेळी त्याने भास्करला मदत केली. या परीक्षेत तास्के उत्तीर्ण झाला. परीक्षा उत्तीर्ण झाल्याने तो शासनाची नोकरी मिळवण्यास पात्र झाला. हा प्रकार लोकसेवा आयोगाच्या लक्षात आल्याने लोकसेवा आयोगाच्या उपसचिवांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. या गुन्हाचा तपास सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला आहे.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातून सर्वाधिक मताधिक्क्य मिळावे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'मी कोल्हापूरचा उमेदवार असल्याने शहरातून मला जास्तीत जास्त मताधिक्क्य द्यावे,' असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. राष्ट्रवादीच्या लक्ष्मीपुरी येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, उद्योगपती व्ही. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी खासदार महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे घराघरात पोहचवून निवडून द्या असे आवाहन केले. दरम्यान नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांचा उल्लेख अनेक नेत्यांनी जनसुराज्यचे नेते असा केला. त्यावर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी'जनसुराज्य पक्ष आमच्यासोबत आहे की नाही, हे माहीत नाही. पण, त्या पक्षाचे नेते आमच्यासोबत आहेत' अशी टिप्पणी केली. त्यावर प्रा. पाटील यांनी, 'पक्षाचे मला माहीत नाही. पण, मी कार्यकर्त्यासह महाडिकांच्या पाठीशी आहे' असे सांगितले. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी 'राष्ट्रवादीचे सगळे नगरसेक आमच्यासोबत आहेत. पक्षात कोणीही गद्दार नाही. काँग्रेसच्या नगरसेवकांशी चर्चा करुन त्यांनाही प्रचारात सामील करुन घेऊ' असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या शहरात आज अपुरा पाणीपुरवठा

$
0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने बुधवारी (ता. ३) बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील पंपाची दुरुस्ती आणि वितरण नलिका जोडण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. दुरुस्तीकाळात शहरातील 'ए', 'सी', 'डी', 'ई' वॉर्डासह संलग्न उपनगरे व ग्रामीण भागाला अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पंपाची गेल्या चार दिवसांपासून दुरुस्ती सुरू आहे. चारपैकी तीन पंप सुरू असल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासून शहराच्या अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पंपाच्या दुरुस्तीस विलंब होत असल्याने एकाचवेळी दुरुस्ती करण्यासाठी बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्णयानुसार संपूर्ण 'सी' व 'डी' वॉर्ड व त्यास संलग्न उपनगरे, ग्रामीण भाग तसेच 'ए' वॉर्डातील फुलेवाडी, फुलेवाडी रिंगरोड, लक्षतीर्थ वसाहत परिसर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, आपटेनगर, सानेगुरुजी परिसर, तुळजाभवानी कॉलनी, तलवार चौक, हरिओम नगर, जुना वाशी नाका, शिवाजी पेठ, सरनाईक कॉलनी, राज कपूर पुतळा व जाऊळाचा गणपती परिसर तर 'ई' वॉर्डातील खानविलकर पेट्रोल पंप, शाहूपुरी ५,६ व ७ वी गल्ली, कुंभार गल्ली, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, बागल चौक व बी. टी. कॉलेज परिसरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

दरम्यान 'ई' वॉर्डातील केव्हीज पार्क परिसरात अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. ही समस्या दूर करण्यासाठी उद्योग भवन ते पाटलाचा वाडा येथे उपनलिका टाकण्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर येथे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होऊ शकेल, असा दावा शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर कारखानदारी संकटात !

$
0
0

सर्वच कारखान्यांची गोडावून्स फुल्ल, अवकाळीचा दणका शक्य

Gurubal.Mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर : महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशात स्वस्त मिळते म्हणून व्यापाऱ्यांनी तेथील साखर उचलल्याने राज्यातील सर्वच कारखान्यांतील साखर गोडावूनमध्येच पडून राहिली आहे. मार्च महिन्यात एक पोतेही साखर विक्री झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूर विभागात २५ लाख मेट्रिक टन साखरेचा उठावच झाला नाही. यामुळे साडेसात हजार कोटी रूपयाची उलाढाल थंडावली आहे. गोडावूनबाहेर असलेल्या साखरेला अवकळीचा दणका बसण्याची चिन्हे दिसत असल्याने कारखानदार हवालदिल झाले आहेत.

महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखर तयार होते. पण गेल्या काही वर्षात या उद्योगासमोरील अडचणी वाढत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बहुतांशी साखर कारखान्याची गोडावून्स सध्या भरलेली आहेत. कारण उत्तर प्रदेशात स्वस्त साखर मिळाल्याने महाराष्ट्रातील साखरच व्यापाऱ्यांनी उचलली नाही. यामुळे कोल्हापूर विभागातील एकाही कारखान्यातील एक पोतेही साखर मार्च महिन्यात विकले गेले नाही. साखर तारण ठेवत बँकांनी त्या किंमतीच्या ८५ टक्के कर्ज दिले आहे. पण विक्री नसल्याने कर्जाची परतफेड थांबली आहे. कर्ज काढण्याची मर्यादा संपली आहे. त्यामुळे बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. पैसे नसल्याने एफआरपी देण्यासाठी अथवा कर्मचाऱ्यांना पगार देणेही मुश्कील झाले आहे.

काही कारखान्यांनी सरकारचा आदेश झुगारून स्वस्त दरात साखर विकली. बिलावर ३१०० रूपये दर दाखवला, पण प्रत्यक्षात सुट देत व्यापाऱ्यांनी काळाबाजार केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. पण सरकारच्या आदेशाला घाबरून इतरांनी गोडावूनमध्येच साखर ठेवली आहे. टनाला २९०० रू. ऐवजी ३१०० रूपये याप्रमाणे साखर विक्री करण्यास सरकारने मान्यता दिली. मात्र उत्तर प्रदेशात टनाला दिडशे रूपये कमी दरात साखर मिळत असल्याने व्यापाऱ्यांनी तेथील साखर उचलली. गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या राज्यात जाणारी कोल्हापुरी साखरेची बाजारपेठ उत्तर प्रदेशाने काबीज केली. याचा मोठा फटका कोल्हापूर विभागाला बसला आहे.

कोल्हापूर विभागात सध्या २५ लाख टन मेट्रिक साखर कारखान्यात पडून आहे. राज्यात हा आकडा १०५ लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक आहे. यातील ७५ टक्के साखर इतर राज्यात विक्री होते. तीच थांबली आहे. गोडावूनमध्ये ठेवलेल्या साखरेच्या एका पोत्याला रोज किमान एक रूपये व्याज भरावे लागते. एका कारखान्याकडे सध्या पाच लाख पोती साखर आहे. या संदर्भात साखर उद्योग तज्ज्ञ पी. जी. मेढे म्हणाले, 'बहुतेक सर्वच कारखान्यांची कर्ज काढण्याची क्षमता संपल्याने बँकांनी कर्ज देण्याचे थांबवले आहे. यामुळे कामगारांचा पगार, एफआरपी आणि इतर खर्चासाठी पैसेच नसल्याने कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारने मदत न केल्यास या व्यवसायाला फार मोठा दणका बसणार आहे.'

.. .. ..

मार्च महिन्यात जिल्ह्यातील एक पोतेही साखर बाजारात गेली नाही. सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने हा उद्योग प्रचंड संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.

हसन मुश्रीफ, आमदार

.. . .. .. ..

कोल्हापूर विभागातील कारखाने ३८

सहकारी कारखाने २६

खासगी कारखाने १२

साखर पडून २५ लाख मे.टन

साखरेचा दर ३१०० प्रति टन

.. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांना हद्दपार होतील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील उमेदवार खासदार धनंजय महाडिक आणि हातकणंगलेतील उमेदवार खासदार शेट्टी यांच्या प्रचार मेळाव्यात आघाडीच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले. 'लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणून लोक पालकमंत्र्यांनाच जिल्ह्यातून हद्दपार करतील,' अशी टीका केली. तर खासदार राजू शेट्टी यांनी आरोपांना उत्तर देताना बिंदू चौकात खुल्या चर्चेला या असे आव्हान दिले. शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, रिपाई, दलित महासंघ आणि मित्रपक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळावा झाला.

खासदार शेट्टी म्हणाले, 'महसूलपासून कृषी खात्यापर्यंत आणि यूएलसी जमिनीपासून ते इतर कामातील गैरकारभाराचा बिंदू चौकात पंचनामा सुरू केला तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पळता भुई थोडी होईल. त्यांच्या कामकाजाचे पुरावे जमा होत आहेत. त्यांनी खुल्या चर्चेचे आव्हान स्वीकारावे, बिंदू चौकात कुस्ती होऊन जाऊ द्या. पाटील यांनी रस्ते विकास कामासाठी केंद्र सरकारकडून किती पैसे आणले हे एकदा जाहीर करावे. सध्या सुरू असलेली महामार्गाची कामे खासगीकरणातून आहेत. यामध्ये त्यांचे कर्तृत्व काय? कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी २० कोटी रुपये निधी दिल्याचा डांगोरा पिटता, तर ही रक्कम कुठे, कसे खर्च केला याचा हिशोब द्या. आमच्यासारख्या चळवळ्या माणसाच्या नादाला लागू नका, नाही तर अंगलट येईल.'

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, 'पंतप्रधान मोदी हे भावनिक राजकारण करून तरुणांची माथी भडकावत आहेत. ५६ इंच छातीचा टेंभा मिरवणारे व स्वत:ला चौकीदार म्हणवून घेणारे मोदी पुलवामा हल्ल्यावेळी झोपले होते काय.'

याप्रसंगी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या सरला पाटील, जनसुराज्यचे प्रा. जयंत पाटील, आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख, आरपीआय कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर यांची भाषणे झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी स्वागत केले.

ते दिवस गेले आत्ता...

'पवार यांच्यासोबत वीस वर्ष राहिलेल्या माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव आज प्रतिगामी शक्तींसोबत संगत करत आहेत. वडील खासदार होते म्हणून मुलगा खासदार बनण्याचे दिवस आता संपले आहेत. कोल्हापुरातील नागरिक कर्तृत्व व विकासात्मक राजकारणाला साथ देतात' विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

तर तुमच्याविरुद्ध संघर्ष

खासगीकरणातून होणाऱ्या रस्त्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागणार आहेत. कारण पुन्हा एकदा टोलचा संघर्ष निर्माण होणार आहे. त्यावेळी भाजपवाले सत्तेत नसतील, तेव्हा संघर्ष आता व्यासपीठावर असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यासोबतच करावा लागणार असल्याचा इशाराच शेट्टी यांनी दिला.

चंद्रकांत पाटलांची उंची काय?

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, 'चंद्रकात पाटील यांनी आयुष्यात एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नाही. काय उंची आहे या माणसाची? त्यांनी साठ वर्षात एकही निवडणूक न हरलेल्या शरद पवार यांच्यावर टीका करावी हे हास्यास्पद आहे. येत्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर आणि हातकणंगलेतून आघाडीचे दोन्ही खासदार निवडून आणू. तेव्हा पालकमंत्र्यांना त्यांची जागा कळेल.'

एवढी संपत्ती आली कुठून?

स्वाभिमानी संघटनेचे प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, 'यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यानंतर राज्याच्या राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रातील धुरीण म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. मात्र पालकमंत्री स्वत:ची उंची न मोजता पवारांचे राजकारण संपविण्याची भाषा करत आहेत. ते राजकारणात नवखे आहेत. पवारांना राजकारणातून संपविणारा कुणी जन्माला आला नाही, उलट लोकसभा निवडणुकीनंतर लोक पालकमंत्र्यांनाच जिल्ह्यातून हद्दपार करतील. कोल्हापूर जिल्हा विकत घेण्याची भाषा करण्याइतकी संपत्ती त्यांच्याकडे कुठून आली? कालपरवापर्यंत ते दुसऱ्याकडे पैसे मागत होते.'

'लागलं तर ऑपरेशन करू'

आमदार सतेज पाटील व खासदार महाडिकांतील संघर्षावरुन बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले, 'मतदारसंघात वावड्या खूप आहेत. सगळे काही आबादीआबाद नाही. काही लोक नाराज आहेत. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न सुरू आहे. जखम खोल असून दुरुस्ती करावी लागेल. चांगले औषध देऊ, उपचारही करू' असे म्हणताच त्यावर आमदार मुश्रीफ यांनी 'लागलं तर ऑपरेशन करू' असे म्हणताच नेते मंडळींना हसू आवरले नाही. तेव्हा आवाडे यांनी ऑपरेशन करायची गरज भासणार नाही. येत्या निवडणुकीत कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगली या ठिकाणी आघाडीचे उमेदवार विजयी होतील'अशी ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवाना देताना पूररेषेची माहिती द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूर नियंत्रण रेषेची नव्याने अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सरकारीपातळीवर प्रयत्न सुरू असताना मंगळवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुणे येथील यशदा आपत्ती व्यवस्थापन केंद्रामार्फत आपत्ती निवारण विभाग व नगररचना विभागाची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत पूर परिस्थिती क्षेत्रातील इमारतींचे आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा प्लॅन तयार करा, बांधकाम परवाना देताना इमारत पूर क्षेत्रात येते का, याबाबतची माहिती घेऊनच बांधकाम परवाना द्या, अशा स्पष्ट सूचना संबंधित विभागांना दिल्या.

बैटकीत आयुक्तांनी पूरपरिस्थती क्षेत्रातील इमारतींच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्लॅन तयार करणे, इमारत बांधकाम परवानगी देताना संबंधित बांधकाम पूरक्षेत्रात येते की नाही याची संपूर्ण माहिती घेवूनच बांधकाम परवानगी द्यावी. तसेच ज्या इमारतीमध्ये पूर येण्याची शक्यता आहे किंवा ज्या इमारतीचे रस्ते पुरामुळे बाधित होणार आहेत, अशा इमारतीच्या विकसकांनी बोटी, लाइफ जॉकेट इत्यादी पुरापासूनची बचावासाठीची साहित्य सामुग्री इमारतीमध्ये बंधनकारक करावी, या काळात स्वयंसेवक तयार ठेवण्याबरोबर सामाजिक संस्थांशी संपर्क ठेवण्याच्या सूचना केल्या. बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, यशदा, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विलिनीकरणात कोलहापुरातील बँका आघाडीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीयकृत बँकांचे विलिनीकरण सुरु असताना सहकार चळवळीत ठसा उमटवेल्या पण चुकीच्या पद्धतीने गैरकारभार केलेल्या आठ नागरी व सहकारी बँकांचे गेल्या पाच ते पंधरा वर्षात विलिनीकरण झाले आहे. तर पाच बँका अवसायानात निघाल्या आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूर अर्बन, आवाडे, कमर्शिअल बँक, वीरशैव बँक, वारणा बँकेने खासगी बँकांशी स्पर्धा करत उत्कृष्ट कारभार केला आहे.

एक एप्रिलपासून बँक ऑफ बडोदामध्ये देना बँक, विजया बँकेचे विलिनीकरण होऊन बँक ऑफ बडोदा ही देशातील दोन क्रमांकाची बँक झाली आहे. पण विलिनिकरणाची प्रक्रिया १५ वर्षांपूर्वी सहकार खात्यात सुरु झाली. ज्या नागरी बँका अडचणीत आहेत त्यांचे विलिनीकरण करण्यात यावे, अशी योजना रिझर्व्ह बँकेने सुरु केली. नागरी व सहकारी बँकांच्या संचालकांनी नातेवाईक व सगेसोयऱ्यांना केलेले चुकीचे कर्जवाटप आणि ठप्प झालेली कर्जवसुली यामुळे बँकांचा एनपीए वाढला. रिझर्व्ह बँकेने अशा बँकांवर नियंत्रणे आणली. त्यामुळे ठेवींना कमी प्रतिसाद मिळू लागला. बँक अवसायानात जाऊ नये व आपली गैरकृत्ये उघडकीस येऊ नयेत यासाठी सहकारी बँकांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला. त्यामध्ये महावीर बँक शामराव विठ्ठल बँकेमध्ये, कोल्हापूर जनता बँक पीएनजीमध्ये, मराठा बँक सारस्वतमध्ये, शाहू बँक एनकेजीएसबी बँकेत विलिन झाल्या. बँकांचे विलिनीकरण झाल्याने ग्राहक व ठेवीदारांचा फायदा झाला असला तरी कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम झाला. अनेक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले तर काहीजणांना सेवेत सामावून घेण्यात आले. बँक विलिनीकरणासाठी संचालकांनी पैसे घेतल्याचा आरोप झाला. संचालक बदनाम झाले. राजकारणात असलेल्या संचालकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जनतेने घरचा रस्ताही दाखवला. सांगली जिल्ह्यातील पार्श्वनाथ तर साताऱ्याची अजिंक्यतारा या बँका कराड बँकेत विलिन झाल्या. कुरुंदवाडची गणेश बँक फेडरल बँकेत, इचलकरंजीतील शिवनेरी डोंबिवली बँकेत, इचलकरंजी महिला बँक जी.पी.पार्थिक, चौंडेश्वरी पुणे अर्बन बँकेत विलिन झाली. विलिनकरणाचा शहाणपणा काही बँकांनी दाखवला असताना दुसरीकडे काही बँका अवसायानात निघाल्या. त्यामध्ये रवि बँक, एस.के. पाटील बँक, साधना, शिवाजी गडहिंग्लज, इचलकरंजी कामगार या बँका अवसायानात निघाल्या. त्याचा फटका ठेवीदारांना बसला.

एकीकडे बँकांचे विलिनीकरण होत असताना आणि त्या अवसायानात निघाल्या असताना शतकमहोत्सवी अर्बन बँक, कमर्शिअल, वीरशैव, वारणा या बँकांनी काटेकोर व चोख कारभार करुन सभासदांचा विश्वास कायम राखला. अर्बन, वीरशैव, वारणा बँकेवर ठेवीदारांचा विश्वास वाढला असून या तीनही बँकांची शेड्यूल्ड बँकेकडे वाटचाल सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैराग खूनप्रकरणी १८ आरोपींना जन्मठेप

$
0
0

वैराग खूनप्रकरणी १८ आरोपींना जन्मठेप

सोलापूर :

निवडणुकीच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून इजप्पा पवार याचा डोळ्यात मिरची पूड टाकून, दगडाने ठेचून व सत्तूर आणि लाकडाने मारहाण करून खून केल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने वैराग येथील १८ आरोपींना मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच मृताच्या पत्नीला एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले.

बार्शी तालुक्यातील वैराग येथे निवडणुकीच्या कारणावरून मयत इजप्पा मारुती पवार याच्याबरोबर शशिकांत धोंडे आणि दादा काळोखे यांच्याबरोबर भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून २६ एप्रिल २०१४ रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास वैराग येथील इंदिरा नगर झोपडपट्टी येथील सार्वजनिक रोडवर एकूण २१ जणांनी मयत इजप्पा पवार याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार शस्त्राने पवार याच्यावर हल्ला केला होता, यात इजप्पा याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी न्यायालयात खटला चालू होता. त्याचा मंगळवारी निकाल लागला. दोन आरोपी फरार, तर एकाचा मृत्यू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूकबधिर मुलींचे शिक्षकांकडून लैंगिक शोषण

$
0
0

पंढरपूर :

गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पंढरपुरात घडली आहे. निवासी मूकबधिर शाळेतील चार मुलींचा लैंगिक छळ त्याच शाळेतील शिक्षकांनी केल्याचे समोर आले आहे.

पंढरपूर उपविभागीय पोलिसांच्या दामिनी पथकाने शाळेतील मुलींशी चर्चा करण्यासाठी भेट दिली असता या मूकबधिर मुलींनी शिक्षकाकडून चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला जात असल्याची तक्रार खुणेने केली. या नंतर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी मूकबधिरांची भाषा कळणाऱ्या विशेष शिक्षकेला घेऊन या मुलींचा जबाब घेतला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. या नंतर तातडीने पोलिसांनी या शाळेतील ज्ञानोबा म्हस्के, अर्जुन सातपुते, संतोष कुलाल आणि सिद्धेश्वर वाघमोडे, या चार शिक्षकांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ज्या मुलींना दैवाने मूकबधिर केले, ज्यांना आपली व्यथा देखील सांगता येत नाही, अशा मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नराधम शिक्षकांना कठोर शिक्षा करण्याची मागणी होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दांडीबहाद्दरांवर होणार फौजदारी

$
0
0

दांडीबहाद्दरांवर होणार फौजदारी

कराड

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेसाठी १७३५ केंद्राध्यक्ष व सहाय्यक केंद्राध्यक्षांना येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात सोमवारी दोन सत्रांत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास तब्बल ११९ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे त्या संदर्भात त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला असून, खुलासा समाधानकारक नसल्यास संबंधित दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली.

............

कृष्णा बँकेला अकरा कोटींचा नफा

कराड :

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये कृष्णा सहकारी बँकेला ११ कोटी २६ लाख ७५ हजार रुपये एवढा ढोबळ नफा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बँकेच्या ढोबळ नफ्यात ३ कोटी ४५ लाख ३२ हजार रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली आहे.

कृष्णा बँकेच्या ३१ मार्च २०१९ अखेरच्या एकूण ठेवी ३१४ कोटी १६ लाख रुपयांच्या असून, २०१ कोटी १७ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ५१५ कोटींच्या वर झाला असून, बँकेच्या सी. डी. रेशोचे प्रमाण ६४.०४ टक्के आहे. त्याचप्रमाणे बँकेचा ढोबळ एनपीए ५.३० टक्के असून, निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. बँकेचे एकूण भागभांडवल ५६१ कोटी असून, ३४४ कोटींहून अधिक स्वनिधी शिल्लक आहे. तसेच १४४ कोटींची गुंतवणूक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॉफ्ट लोनसाठी प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विभागातील ३६ पैकी ३२ साखर कारखान्यांनी सॉफ्ट लोनसाठी साखर आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवले आहेत. आयुक्तांनी हे प्रस्ताव तपासून बँकांना कर्ज देण्यासाठी पत्रे पाठवली आहेत. त्यामुळे पुढील १५ दिवसांत एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३६ कारखान्यांचा हंगाम जवळजवळ संपला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त, दत्त यासह हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा साखर कारखान्याचा हंगाम सुरु आहे. अन्य सर्व कारखाने बंद झाले आहेत. यंदा साखर उद्योग आर्थिक संकटात सापडला असल्याने एकरकमी एफआरपी ऐवजी कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडले आहेत. बहुतांशी कारखान्यांनी प्रतिटन २३०० रुपये पहिला हप्ता दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर घसरले आहेत. देशातंर्गत बाजारात साखरेचा दर प्रतिक्विंटल २९०० रुपयांवरून ३१०० रुपये केला असला तरी एफआरपी देण्यासाठी प्रतिटन ५०० रुपये कारखान्यांना कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या अन्नधान्य सार्वजनिक वितरण मंत्रालयाने कारखान्यांना सॉफ्ट लॉन देण्यासाठी बँकांना नोटीस काढली आहे.

यंदाच्या साखर हंगामात एकरकमी एफआरपी रक्कमेची २५ टक्के रक्कम ज्या कारखान्यांनी दिली आहे त्यांना सॉफ्ट लोन मिळणार आहे. तसेच गतहंगामात कारखान्याने उत्पादित केलेल्या पांढऱ्या साखरेच्या १०.५५ टक्के साखरेवर प्रतिक्विंटल ३१०० रुपयांप्रमाणे कर्ज देण्यात येणार आहे. या कर्जाचे व्याज केंद्र व राज्य सरकार भरणार आहे. पण हे कर्ज मिळण्यासाठी कारखान्यांना सर्व माहिती साखर आयुक्तांना पाठवावी लागणार आहे. कोल्हापूर विभागातील ३२ साखर कारखान्यांनी सॉफ्ट लोनसाठी प्रस्ताव पाठवले आहेत. साखर आयुक्तांच्या प्रमाणापत्रानंतर बँकांकडून सॉफ्ट लोन मिळणार आहे. काही कारखान्यांचे प्रस्ताव साखर आयुक्तांकडे गेले असून त्यांनी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या कारखान्यांना सॉफ्ट लोन देण्यासाठी बँकांनी कार्यवाही सुरु केली आहे.

...

चौकट

साडेचार हजार कोटी एफआरपी अदा

कोल्हापूर विभागातील ३६ कारखान्यांनी ३१ मार्च अखेर ५८९७ कोटींपैकी ४५८४ कोटी रुपये एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. अजूनही १३१२ कोटी एफआरपी थकीत आहे. जिल्ह्यातील दालमिया, जवाहर, दत्त शिरोळ, गुरुदत्त, घोरपडे या कारखान्यांनी पूर्ण एफआरपी जमा करण्यास सुरुवात केली आहे. सॉफ्ट लोनसाठी एकूण एफआरपीपैकी २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा नियम असल्याने कारखान्याकडून दुसऱ्या हप्ता देण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. सॉफ्ट लोन मिळाल्यावर पूर्ण एफआरपी देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

...

कोट

'कोल्हापूर विभागातील ३२ कारखान्यांनी सॉफ्ट लोनसाठी प्रस्ताव दिले आहेत. हे प्रस्ताव साखर आयुक्तांकडे पाठवण्यात आले आहेत. आणखी चार कारखान्यांचे प्रस्ताव पुढील आठवड्यात येतील. साखर आयुक्तांच्या प्रमाणपत्रानंतर बँकांना सॉफ्ट लोन मिळेल.

सचिन रावळ, प्रादेशिक साखर सहसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images