Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

असमान पाणी वितरणाला चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या १२ ते १३ प्रभागांत चोवीस तास पाणीपुरवठा होत असल्याची धक्कादायक माहिती अधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीत समोर आली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पाणीपुरवठा विभागाने सर्वच प्रभागात गुरुवारपासून (ता. ४) दोन तास नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे असमान पाणी वितरणाला चाप बसून सर्वांना एकसमान पाणी मिळण्याची शक्यता आहे.

शहराच्या विशेषत: 'ई' व 'ए' वॉर्डमध्ये वारंवार अपुऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. या भागांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी अनेकदा नियोजनाच्या बैठका पार पडल्या. पण प्रश्न जैसे थे राहिला. त्यामुळे पुन्हा एकदा यावर मार्ग काढण्यासाठी नगरसेवक व अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी (ता. २९) पार पडली. बैठकीत पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बोलवण्यात आले होते. बैठकीत कर्मचाऱ्यांनी अनेक भागात व्हॉल्व्ह सोड-बंद करण्यास कर्मचारीच नसल्याने २४ तास पाणीपुरवठा सुरू असल्याचे सांगितले. प्रथमच आलेल्या माहितीमुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर मात्र प्रशासनाने गतिमान हालचाली करत शहर व संलग्न प्रभागांना समान पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार शहरातील सर्वच नागरिकांना दैनंदिन दोन तास पाणीपुरवठा करण्यास गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा झाला नाही, तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजनही प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रात्री साडेदहानंतर हॉटेल, बारवर कारवाईचा बडगा

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील हॉटेल, बीअर-बार कोणत्याही परिस्थितीत रात्री साडेदहा नंतर सुरू राहिल्यास आचारसंहितेचा भंग म्हणून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक निवडणूक अधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी यांनी दिला.

हातकणंगले तालुक्यातील हॉटेल, बीअर-बार, पेट्रोल पंपचालक-मालक यांच्या तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.

कुलकर्णी म्हणाल्या, 'निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, बीअर-बार, पेट्रोल पंपचालक-मालकांनी आदर्श आचारसंहितेच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. तपासणी मोहीम पथकांकडून तालुक्यातील सर्व हॉटेल, बीअर बारचे संपूर्ण व्हिडीओ शूटिंग होणार असल्याने सर्वांनी हिशेबाचे रजिस्टर तत्पर ठेवावे, उमेदवारांकडून संबंधितांना दिल्या जाणाऱ्या कोडवर्ड पावत्यांवर निर्बंध घालण्यात आले असून याशिवाय हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे ड्रेसकोडही तयार करण्याची सक्ती केली आहे. आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी कडक पालन करावे तसेच निवडणूक कामांसाठी असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याने नाहक त्रास दिल्यास तत्काळ संपर्क साधावा.'

यावेळी अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुधाकर भोसले, पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, आयकर अधिकारी एस. एन गंधवाले, राज्य उत्पादन शुल्कचे अतुल पाटील यांनी मार्गदर्शन केले. बैठकीसाठी गटविकास अधिकारी आर. जी. पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील, नायब तहसीलदार दिगंबर सानप, नायब तहसीलदार शोभा कोळी, आदी उपस्थित होते.

०००००

फोटो ओळी...

हातकणंगले तालुक्यातील हॉटेल, बीअर बार, पेट्रोल पंपचालक-मालक यांची सोमवारी तहसीलदार कार्यालयात बैठक झाली. यावेळी बोलताना तहसीलदार सुधाकर भोसले. शेजारी अन्य मान्यवर.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडिया कक्षातर्फे प्रचार जाहिरातींवर ‘नजर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार आणि त्यांचे समर्थक करत असलेल्या सोशल मीडियावरील जाहिरातींवर जिल्हास्तरीय मीडिया, संपर्क व्यवस्थापन, सोशल मीडिया कक्षातर्फे नजर ठेवली जात आहे. प्रत्येक जाहिरातीची माहिती संकलित करून अहवाल खर्च नियंत्रण समिती आणि निवडणूक आयोगाकडे पाठवला जात आहे.

निवडणुकीत सर्वच पक्ष, उमेदवार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करत आहेत. त्यांनी स्वतंत्र आयटी सेल सुरू केला आहे. दरम्यान, यावेळी प्रथमच निवडणूक आयोगाने पक्षाच्या आणि उमेदवारांच्या अधिकृत अकाऊंटवर प्रचाराची जाहिरात केल्यास त्याचा निवडणूक खर्चात सामावेश केला आहे. त्यासाठी फेसबुक, व्टिटर, वॉटसअॅप अशा सोशल मीडियावरील जाहिरातीची माहिती संकलित केली जात आहे. त्यासाठी तज्ज्ञ २२ जणांचे पथक कार्यरत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्षातील पथकातर्फे पेड न्यूज, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियावरील जाहिरातींवर वॉच ठेवला जात आहे.

ध्वनीक्षेपक यंत्र लावून प्रचार करण्यासाठी गीत लावणे, चित्रफित दाखवणे, प्रचार गाणी लावणे, सोशल मीडियावरील जाहिरात अपलोड करण्यासाठी आवश्यक अधिकृत परवानाही या कक्षातर्फे दिला जात आहे. वैयक्तिक चारित्र्यहनन, दोन समाजात तेढ निर्माण होईल, शत्रुत्व, इर्षा वाढेल असा संदर्भ, आशय असणाऱ्या जाहिरातींना परवानगी टाळली जात आहे. विनापरवाना जाहिरात प्रसिध्द केल्यास गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

.....

चौकट

एकच परवानगी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आठवड्यापूर्वी महायुतीचा प्रचार मेळावा झाला. त्यावेळी केलेल्या जाहिराती, सोशल मीडियावरील चित्रफितीची परवानगी घेण्यात आली. उर्वरित उमेदवार, पक्षांनी अजूनही परवानगीसाठी कक्षाशी संपर्क साधलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाई आराखडा कागदावरच

$
0
0

फोटो : काळम्मावाडी येथे ग्रामस्थांना पाण्यासाठी अशी भटकंती करावी लागते.

मिलिंद पांगिरेकर, गारगोटी

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला असून, वेदगंगा नदी व कूर कालव्याच्या लाभक्षेत्रापासून वंचित राहिलेल्या भुदरगड तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. भुदरगड पंचायत समितीने पाणीटंचाईच्या आराखड्यात ४ गावे व २० वाड्यांचा समावेश केला आहे. दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या गावे, वाड्यांची माहिती असूनही पंचायत समितीने केलेला पाणीटंचाईचा आराखडा केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसत आहे.

भुदरगड तालुक्यातील बहुतांश गावे-वाड्या वेदगंगा नदीच्या दोन्ही बाजूला वसलेल्या आहेत. त्यामुळे पाटगाव प्रकल्पाच्या मौनीसागर जलाशयातील पाण्याचा लाभ या गावांना होतो. याशिवाय कोंडोशी, मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्पाचा लाभ नवले, मेघोली, कोंडोशी व परिसरातील गावांना, तर फये प्रकल्पाचा व कूर कालव्याचा लाभ मिणचे खोरीतील काही गावांना होतो. चिकोत्रा धरणाचा लाभ पिंपळगाव, बेगवडे या गावांना होतो. मात्र पाटगाव, फये, मेघोली, कोंडोशी या धरणाच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्याची समस्या नेहमीच भेडसावत आहे.

भुदरगड पंचायत समितीने पाणीटंचाई निवारण व प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी केलेल्या आराखड्यात ४ गावे व २० वाड्यांचा समावेश केला आहे. सध्या कडक उन्हाळा जाणवू लागला असल्याने पंचायत समितीने केलेला हा आराखडा केवळ कागदावरच राहिला आहे. पंचायत समितीच्या पाणीटंचाईच्या आराखड्यात नांगरगाव, न्हाव्याचीवाडी, बेडीव, टिक्केवाडी या गावांचा समावेश आहे. बारवेपैकी हाळवाडी, मोठे बारवे, लहान बारवे, पंडिवरे, मानवळे या गावांतील खासगी विंधन विहिरींचा अधिग्रहणाठी समावेश केला आहे. नांगरगाव, मिणचे बुद्रुक पैकी मोरस्करवाडी, न्हाव्याचीवाडी पैकी नवीन वसाहत, मानवळे पैकी जोगेवाडी, हेदवडे पैकी काळम्मावाडी, कारीवडे पैकी धनगरवाडा, बेडीव, तिरवडे पैकी कुडतरवाडी, नांदोली पैकी करंबळी, पुष्पनगर पैकी कालेकरवाडी, कल्याणकरवाडी, खेडगेवाडी, राणेवाडी पैकी वरेकरवाडी, नागणवाडी, कलनाकवाडी पैकी बोंडगेवाडी, माळवाडी, मुदाळ पैकी कुदळे वसाहत, तिट्टा वसाहत, देवकेवाडी, बारवे इंगळे वस्ती या गावांना नवीन विंधन विहिर प्रस्तावित केली आहे. देवर्डे पैकी कोल्हेवाडी, टिक्केवाडी, बेडीव पैकी धनगरवाडा, नांगरगाव पैकी भोसमोड्याचीवाडी या गावांतील नळ पाणीपुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी सुमारे १५ लाख ५० हजार रुपयांच्या निधीची गरज आहे.

००००

कोट...

उन्हाच्या तडाख्यामुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटू लागल्याने काही गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. गाव अथवा वाडी वस्तीजवळ पाणी उपलब्ध नसेल तर तात्पुरत्या उपाययोजनेची गरज असते. अशा गरज असलेल्या गावे व वाड्यांचा पाणीटंचाईच्या आराखड्यात समावेश केला असून, पाणी टंचाईसदृश स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

स्नेहल परीट, सभापती, भुदरगड पंचायत समिती

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देना, विजय बँकेच्या शाखांचेबडोदा बँकेत विलिनीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँक ऑफ बडोदामध्ये जिल्ह्यातील देना आणि विजया बँकेच्या १५ शाखांचे विलिनीकरण झाले आहे. सोमवारपासून विलीकरणाची प्रक्रिया सुरू असून पुढील १८ महिन्यांत सर्व व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा कार्यक्रम आखला आहे.

जिल्ह्यात देना बँकेच्या १२ शाखा तर विजया बँकेच्या तीन शाखा आहेत. या १५ शाखा सोमवारपासून बँक ऑफ बडोदा नावाने ओळखल्या जाणार आहेत. २०१९ मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बँक ऑफ बडोदा, विजया बँक, देना बँकेच्या विलीकरणाला मान्यता देण्यात आली होती.बडोदा बँकेचे तंत्रज्ञान वेगवान असल्याने देना व विजया बँकेत अपलोड करण्यासाठी कालावधी लागणार आहे. तसेच दोन्ही बँकांतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. बँकेतील ठेवी व कर्जांच्या व्यवहारांचे रुपांतर करण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. १८ महिन्यात तांत्रिकदृष्ट्या सर्व व्यवहार पूर्ण करण्यासाठी कालावधी देण्यात आहे.

कोल्हापुरातील दोन्ही बँकेच्या शाखा

देना बँक : कोंडाओळ लक्ष्मीपुरी, परिते, ठिकपुर्ली, गांधीनगर, इचलकरंजी, महागाव, हलकर्णी, कागल, सिद्धनेर्ली, माणगाव, शिनोळी, गणेशवाडी.

विजया बँक : उद्यमनगर कोल्हापूर, शिरोली पुलाची, गांधीनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दागिने लंपास

$
0
0

गडहिंग्लज : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील महादेव रामचंद्र घुगरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. बंद घराचे कुलूप तोडून आर्मी बॉक्समधील दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचा नेकलेस, पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे झुबे, पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे रिंग जोड, तीन हजार रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स व पाच हजारांची कर्णफुले असा एकूण २८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. याबाबतची नोंद गडहिग्लज पोलिसांत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराच्या तडाख्याला उन्हाचा ‘ब्रेक’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राजकीय नेत्यांच्या सभा, आघाडीचे मेळावे आणि आरोप, प्रत्यारोपांनी निवडणुकीची हवा तापत असताना लोकसभेचे उमेदवार आणि समर्थकांना मात्र उन्हाच्या तडाख्यावर कशी मात करायची हा प्रश्न भेडसावत आहे. उमेदवारांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी त्यावर शक्कल लढवत सकाळी भेटीगाठी, प्रचारफेरी तर संध्याकाळी कॉर्नर सभा, जाहीर सभा आयोजित करुन अधिकाधिक लोकापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुपारच्या कालावधीत कार्यकर्त्यांच्या घरी नागरिकांना जमवून भूमिका पटवून दिले जाते. आहे. एकीकडे विरोधकांच्या डावपेचाना उत्तर देताना उमेदवार व त्यांच्या समर्थकांना आता उन्हाचाही सामना करावा लागत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

कोल्हापूर, हातकणंगले, सांगली लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दहावी, बारावीची संपलेल्या परीक्षा, शाळा आणि कॉलेजची सुट्टी यामुळे हा कालावधी प्रचारासाठी कॅश करण्याचे नियोजन आहे. शनिवार, रविवारच्या सुट्टीच्या कालावधीत मोठ्या सभा घेण्यासाठी दोन्ही पक्षाकडून हालचाली सुरू आहेत. सुट्टीवर डोळा ठेवून राजकीय पक्ष प्रचाराचे नियोजन करत असताना दुपारच्या वेळेत प्रचारावर येणाऱ्या मर्यादाचाही विचार सुरू आहे. तापमानाचा पारा वाढत असताना प्रचाराचा टप्पा उंचाविताना कसरत होत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

उन्हाचा तडाखा, दुपारच्या वेळेत प्रचारफेरी काढल्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. शिवाय सभेला लोक गर्दी करत नाहीत या समस्या निर्माण होत आहेत. त्यावर शक्कल लढवत सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत संपर्कावर भर दिला आहे. सकाळच्या कालावधीत भेटीगाठी, प्रचारफेरीचे नियोजन केले जाते आणि सायंकाळी कॉर्नर सभेवर भर असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. लोकसभा मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण भागात समावेश आहे. शहरी भागातील नागरिकांची मानसिकता आणि ग्रामीण भागातील शेती कामाच्या लगबगीचा विचार करुन प्रचाराचे नियोजन सुरू असल्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुपारी मतदारांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.

मतदारसंघ मोठा असल्याने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. प्रचार फेऱ्यांपेक्षा लोकांना प्रत्यक्ष भेटून भूमिका पटवून देण्यावर भर आहे. गावागावात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, महिला संस्थेचे जिल्हाभर कार्यक्षेत्र आहे. महाडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते आहेत. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाड्यांशी संपर्क साधून दुपारच्या वेळेत कार्यकर्त्यांच्या घरी महिलांना एकत्र करुन त्यांच्यापर्यंत भूमिका पोहचविली जात आहे.

- अरुंधती महाडिक, अध्यक्षा, भागीरथी महिला संस्था

ऊनाची तीव्रता वाढू लागल्याने प्रचाराचे नवीन नियोजन करावे लागत आहे. दुपारी साडेबारा ते चार या वेळेत प्रचारफेरी, सभा घेण्याऐवजी त्या कालावधीत नियोजन, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीवर भर राहील. सकाळी लवकर प्रचाराला सुरुवात करायची. आणि सायंकाळी कोपरा सभा, सभा घेऊन जास्तीत जास्त मतदारापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहचवायचे असे प्रयत्न आहेत.

- संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मिडियावर प्रचाराचा धुरळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर उमेदवारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, कॉर्नर सभा, प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारांसमोर जातानाच सोशल मीडियावरही प्रचाराचा धुरळा उडाला आहे. प्रत्येक पक्षाकडून सोशल मीडियावरील अपडेटससाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांत सोशल मीडियावरही प्रचाराचा सामना रंगला आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित आघाडी अशा सर्वच घटकांनी सोशल मीडियासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवली आहे. भाजपने 'मैं भी चौकीदार' कॅम्पेनवर भर दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नोटाबंदी, शेतीचे प्रश्न, बेरोजगारी,जीएसटी यावरून आक्रमक प्रचार सुरू केला आहे. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे. नवनवीन तंत्राचा अवलंब करुन प्रचार यंत्रणा हायटेक बनली आहे. खरे तर घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी, प्रचार पत्रकांद्वारे उमेदवाराच्या कार्याची माहिती पोहचविणे ही पारंपरिक पद्धत. त्याच्या सोबतीला आता उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन सोशल मीडियावरील प्रचारावर भर दिला आहे. सोशल मीडियावर तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यक्त होते. बिनधास्तपणे ते आपली मते नोंदवितात. तरुणाईची मते कॅश करण्यासाठी कोल्हापुरातील उमेदवारांनी स्वतंत्र वॉर रुमची स्थापना केली आहे. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक व शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियाचा अतिशय खुबीने वापर सुरू आहे. समर्थक कार्यकर्त्यांकडून एकीकडे विकासकामांचे मार्केटिंग तर दुसरीकडे विरोधकांची खिल्ली उडविली जात आहे. याशिवाय प्रमुख नेत्यांची भाषणे, मतदारसंघातील कामाची प्रसिद्धी, सामाजिक काम फेसबुक पेजवर अपलोड करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘उद्दिष्टपूर्ती’ ची दमछाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मार्चअखेरीस वसुली मोहीम जोरदार राबवल्यानंतरही महापालिका प्रशासनाला २०१८- १९ आर्थिक वर्षामध्ये दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आले. नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली असताना ४३६ कोटी उद्दिष्टापैकी ३०३ कोटींचा महसूल कसाबसा जमा झाला. घरफाळा व पाणीपट्टी विभागासाठी 'सवलत योजना' जाहीर करुनही प्रशासनाची उद्दिष्टपूर्तीसाठी चांगलीच दमछाक उडाली. परिणामी १३३ कोटींची निर्माण झालेली महसूली तूट कशी भरुन काढायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या दहा वर्षात महापालिकेची आर्थिक वर्षातील वसुली ३१० कोटी पुढे जात नसताना २०१८-१९ च्या आर्थिक वर्षासाठी तब्बल ४३६ कोटीचे महसुली उद्दिष्ट दिले होते. घरफाळा, नगररचना, पाणीपट्टी आणि एलबीटी अनुदान या प्रमुख विभागांवरच वसुलीची भिस्त होती. घरफाळा विभागाने ६२ कोटी ४२ लाख, नगररचना ३७ कोटी ३७ लाख, एलबीटी अनुदान १३१ कोटी व पाणीपट्टी विभागाने ५२ कोटी ७० लाखांची वसुली केली. घरफाळा, पाणीपट्टी विभागाने ९० टक्केपेक्षा अधिक वसुली केली असली, तरी नगररचना व इस्टेट विभागाला वसुलीसाठी चांगलीच दमछाक करावी लागली आहे.

पाणीपट्टी विभाग ९० टक्के वसुली केली असल्याचा दावा करत असला, तरी इतर सरकारी कार्यालयाकडील वसुली करण्यास अपयश आले आहे. जानेवारीअखेर सर्वच विभागांनी २०७ कोटीपर्यंत वसुली केली होती. आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने बाकी असताना ५० टक्केही वसुली झालेली नसल्याने प्रशासनामध्ये धास्ती निर्माण झाली होती. परिणामी थकीत घरफाळा व पाणीपट्टी दंडात सवलत देणारी 'सवलत योजना' जाहीर करण्यात आली होती. या योजनेचा लाभ घेऊन अनेक मिळकदारांनी कर जमा केल्याने महापालिकेला ३०० कोटी टप्पा पार करण्यास यश आले. मात्र नगररचना व इस्टेट विभागाच्या वसुलीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. 'ड' वर्ग नियमावलीमुळे नगररचना विभागाला फटका बसला असून गाळेधारकांच्या भाड्याच्या प्रश्नामुळे इस्टेट विभागाची वसुली ५० टक्केपेक्षा कमी झाली आहे. प्रमुख विभागांची वसुली कमी झाल्यामुळे १३३ कोटीची महसुली तूट निर्माण झाली आहे.

...

चौकट

विभाग एकूण जमा

घरफाळा ६२ कोटी ४२ लाख

नगररचना ३७ कोटी ३७ लाख

एलबीटी १३१ कोटी

इस्टेट पाच कोटी २९ लाख

परवाना दोन कोटी ४९ लाख

पाणीपट्टी ५२ कोटी ७० लाख

एकूण ३०३ कोटी १४ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्यांच्या कोपरखळीने रंगत

$
0
0

खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांमध्ये शाब्दिक कोट्या रंगल्या. दोन्ही काँग्रेसचे नेते, स्वाभिमानीचे पदाधिकारी शेट्टी यांची वाट पाहत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थांबले होते. प्रत्येकजण, शेट्टी येणार आहेत का अशी विचारणा महाडिकांकडे करायचे. महाडिक प्रत्येकवेळी ताराराणी चौकात आहेत, पाच मिनिटात येतील असे सांगून वेळ मारुन न्यायचे. तेव्हा बास्केट ब्रिजमुळे शेट्टींना वेळ झाला का पहा, अशी टिप्पणी होताच सगळेजण हास्यकल्लोळात बुडाले. नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांची उपस्थिती चर्चेची ठरली. प्रा. पाटील हे मुश्रीफ व कोरे यांना जवळचे. ते जनसुराज्यशी निगडीत असले तरी महापालिकेत ते राष्ट्रवादीचे कारभारी म्हणून वावरतात. त्यांच्याकडे पाहत मुश्रीफ यांनी, 'जयंत पाटील आल्यामुळे महाडिक यांना जनसुराज्य पक्षाचा पाठिंबा दिसतो,' असे म्हणताच हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारी निकाली कुस्त्यांचे मैदान

$
0
0

चंदगड : निट्टूर ग्रामस्थ व बलभीम तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निट्टूर (ता. चंदगड) येथे गुढी पाडव्यानिमित्त शनिवारी (ता.६) दुपारी दोन वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. मैदानात प्रथम क्रमाकांची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन बाळू पुजारी (इचलकंरजी) विरुद्ध कर्नाटक केसरी विजेता रवीशचंद्र मुद्देबिहाळ (विजापूर) यांच्यात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वागताने भारावले शहिदांचे वंशज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वयाच्या ऐन तारुण्यात स्वातंत्र्यसंग्रामाच्या चळवळीत फाशी गेलेल्या शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या वंशजांचे सोमवारी सायंकाळी कोल्हापुरात आगमन झाले. शाहूनगरीत आपुलकीने आणि जल्लोषात झालेल्या स्वागताने भगतसिंग यांचे पुतणे अभयसिंग संधू, राजगुरू यांचे नातू सत्यशील आणि सुखदेव यांचे नातू अनुज थापर भारावून गेले. रुईकर कॉलनी येथे आगमन झाल्यानंतर कोल्हापुरी फेटा बांधून हलगी घुमक्याच्या तालावर आणि मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांसह या तिघांची मिरवणूक काढण्यात आली.

कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, साथी फाउंडेशन, वुई कॅन फाउंडेशन आणि मराठा रणरागिणी या संस्थांच्यावतीने शहीद क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांशी संवाद या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (ता. २) सायंकाळी शाहू खासबाग मैदान येथे हा संवाद होणार आहे. यासाठी या तिघांचे कोल्हापुरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आगमन झाले. रूईकर कॉलनी येथील ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानाजवळ त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरोज पाटील, सीमा पाटील, गीता हासूरकर, शुभांगी थोरात यांच्यासह सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना कोल्हापुरी फेटा बांधण्यात आला. यावेळी वस्ताद आनंदराव पोवार यांच्या आखाड्यातील मुलामुलींनी सादर केलेली लाठीकाठी, दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके पाहून अभयसिंग, सत्यशील व अनुज थक्क झाले.

यावेळी अभयसिंह म्हणाले, 'कोल्हापूरकरांच्या जल्लोषी स्वागताने आम्ही भारावलो. शहिदांनी प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवले होते. त्यांचे वंशज म्हणून केवळ अभिमान बाळगण्यापेक्षा देशासाठी काही योगदान देणे हे आमचे कर्तव्य आहे. याच भावनेतून आम्ही कार्यरत आहोत.' सत्यशिल राजगुरू म्हणाले, 'युवा पिढीमध्ये देशप्रेमाचे विचार बिंबवणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहनपर उपक्रम राबवले पाहिजेत.' अनुज म्हणाले, 'शहीद क्रांतिकारक आणि देशाचे जवान यांच्यामुळे आपला देश टिकून आहे. त्यांच्याविषयी आत्मियता बाळगणे हे प्रत्येकाचा धर्मच आहे. एक जवान शहीद होतो तेव्हा त्याचे कुटुंबीयही खूप मोठा त्याग करत असते याची जाणीव असणे खूप महत्त्वाचे आहे.'

दरम्यान ताराराणी चौक येथे शहीद कुटुंबीयांच्या हस्ते महाराणी ताराराणी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद, अशा घोषणा देऊन आतिषबाजी करण्यात आली. यावेळी संयोजक राहुल चिकोडे, जितेंद्र बामणे, विनय गुरव, पंकज अणेकर, सुनील रेडेकर, ॲँथनी डिसुझा, पृथ्वीराज महाडिक, जयेश ओसवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृतिशील राजाच्या राज्यारोहणाची सव्वाशे वर्षे

$
0
0

विकासाच्या मुहूर्तमेढीची सव्वाशे वर्षे

किंवा

रोवली विकासाच्या गंगोत्रीची मुहूर्तमेढ;

कोल्हापूर टाइम्स टीम

शेतकरी, पददलितांचा विकास करताना आधुनिक तंत्राचा अवलंब करत विकासाची गंगोत्री आणणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यारोहणास १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. शाहू महाराजांनी राज्यारोहण सोहळ्यानंतर केलेल्या कार्याने देशातील सामाजिक राजकीय, कार्याला वेगळे परिमाण लाभले. आजही शाहूंच्या कृतिशील विचारांचे प्रतिबिंब जाणवत राहते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केल्यानंतर त्याची धुरा छत्रपती संभाजीराजे, राजाराम महाराजांनी वाहिली. राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराराणी यांनी पन्हाळगडावर मराठ्यांची गादी स्थापन केली. कोल्हापूरच्या गादीवर पहिले शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शिवाजी महाराज द्वितीय, शहाजी महाराज (बुवासाहेब), शिवाजी महाराज तिसरे (बाबासाहेब) यांनी राज्यकारभार केला. १८३८पर्यंत करवीर राज्याचा संपूर्ण व सार्वभौम राज्यकारभार छत्रपतींच्या हातात होता. पण नंतर बाबासाहेब महाराजांच्या काळात कोल्हापूर संस्थानात इंग्रजांचा हस्तक्षेप सुरू झाला. या काळात कोल्हापुरात इंग्रजांविरोधात बंडही झाले. बाबासाहेब महाराजांचे बंधू चिमासाहेब यांना ब्रिटिशांनी अटक करुन त्यांना कराची येथे स्थलांतरीत केले. बाबासाहेब महाराजांचा १८६६मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज गादीवर आले. राजाराम महाराजांचा मृत्यू इटलीत झाला. त्यानंतर गादीवर आलेल्या चौथ्या शिवाजींचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी, आनंदीबाई यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव यांना १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेतले. दत्तकविधीनंतर यशवंतराव यांचे नाव शाहू ठेवण्यात आले. शाहूंचे राजकोट व धारवाड येथे शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण करून ते कोल्हापुरात परतल्यानंतर राज्यरोहण सोहळ्याचा निर्णय घेण्यात आला. सोहळ्याची निमंत्रणे ब्रिटीश अधिकारी, देशभरातील राजघराणी, सरदार, इनामदारांना पाठविण्यात आली. वयाच्या विसाव्या वर्षी, २ एप्रिल १८९४ रोजी न्यू पॅलेस येथे शाहूंचा राज्यारोहण सोहळा झाला. राज्यारोहणानंतर त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. 'आपली प्रजा कायम आनंदात रहावी यासाठी राज्यकारभार करीन' अशी ग्वाही दिली. बुवासाहेब महाराजांच्या मृत्यूनंतर इंग्रजांचा अंमल असल्याने पाच दशकांत छत्रपतींचा दरबार भरला नव्हता. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या या घटनेचे महाराष्ट्रात स्वागत झाले. लोकमान्य टिळकांनी 'केसरी'मध्ये 'कपिलषष्ठीचा योग' असा अग्रलेख लिहिला होता. राज्यरोहणानंतर १९२२पर्यंत संस्थानातील जनता शिक्षित व्हावी, त्यांचे जीवनमान उंचवावे यादृष्टीने राज्यकारभार करून महाराजांनी जगापुढे आदर्श ठेवला.

ब्रिटीश लायब्ररीत राज्यारोहण निमंत्रण पत्रिका

करवीर संस्थानाच्यावतीने राज्यारोहण सोहळ्याचे निमंत्रण ब्रिटीश अधिकाऱ्यांसह राजघराण्यांना पाठविण्यात आले होते. सोहळ्याची अस्सल निमंत्रणपत्रिका लंडनमध्ये वास्तव्यास असणारे इतिहास संशोधक संकेत कुलकर्णी यांना ब्रिटीश लायब्ररीत मिळाले. त्यांनी कार्यक्रमपत्रिकेचे छायाचित्र सोशल मीडियावर सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे. कोल्हापुरात न्यू पॅलेस, पुरालेखागार कार्यालयात ही निमंत्रणपत्रिका पहायला मिळू शकते.

तीन दिवस होते कार्यक्रम

दोन एप्रिल १९८४ रोजी, सोमवारी सायंकाळी पाच वाजता न्यू पॅलेस येथे राज्यारोहण सोहळा झाला. साडेनऊ वाजता रेसिडन्सीसाठी मेजवानी होती. तीन एप्रिल रोजी, मंगळवारी सकाळी सात वाजता गोल्फ स्पर्धांचे पारितोषिक वितरण तर सायंकाळी साडेचार वाजता महिला रायफल शूटिंग स्पर्धेचे बक्षिस वितरण महाराजांच्या हस्ते झाले होते. साडेआठ वाजता मान्यवरांसाठी मेजवानी होती. चार एप्रिल रोजी सकाळी सात वाजता गोल्फ स्पर्धेचे बक्षिस वितरण चीफ ऑफ कागल यांच्या हस्ते झाले. साडेचार वाजता महाराजांच्या हस्ते रायफल शूटिंग स्पर्धेचे बक्षिस वितरण झाले. साडेनऊ वाजता न्यू पॅलेस येथे शाही मान्यवरांना मेजवानी देण्यात आली. राज्यरोहण सोहळ्यास दोन एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास परगावचे मान्यवर रेल्वेने येणार होते. साडेआठऐवजी अन्य ट्रेनने जे मान्यवर येणार असतील, तर त्यांनी कोल्हापूरच्या दिवाणांशी संपर्क साधावा असा उल्लेखही निमंत्रण पत्रिकेतील टीपमध्ये आढळतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्याणराव काळेंचीभाजप प्रवेशाची घोषणा

$
0
0

कल्याणराव काळेंची

भाजप प्रवेशाची घोषणा

पंढरपूर

माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रभावी असलेले कल्याणराव काळे यांनी सोमवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप प्रवेशाची घोषणा केली. काळेंच्या भाजप प्रवेशामुळे संजय शिंदे यांच्यांसह सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.

सोलापूर जिल्हा कॉँगेसचे उपाध्यक्ष व वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या कल्याणराव काळे यांच्याकडे कार्यकर्त्यांची दमदार फळी असल्याने ऐन निवडणूक काळात काळेंचा निर्णय कॉंग्रेस आघाडीसाठी मोठा हादरा आहे. काळे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून ६५ हजार मते मिळवत राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे याना घाम फोडला होता. कार्यकर्ता मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावत भाजप प्रवेशाला एकमुखी पाठिंबा दिला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडे आकर्षित होणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात सोमवारी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांचा ही समावेश झाला. अडचणीत आलेल्या संस्थाना मदत तसेच शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिले असल्यामुळे संपूर्ण काळे गट भाजपवासी होत असल्याची घोषणा प्रवेश काळे यांनी केली.

.....

मोहिते-परिचारकांचे मनोमिलन

पंढरपूर :

मागील पन्नास वर्षे आणि तीन पिढ्यांचा संबंध असणारे पंढरपूरचे परिचारक व अकलूजचे मोहिते-पाटील यांच्यात आलेल्या दुराव्याचे रुपांतर मनोमिलनात झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार आहेत. भाजपला यामुळे मोठी ताकद मिळणार आहे. दहा वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत आलेले वैरत्व मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशाने संपले आहे. सोमवारी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दहा वर्षांनंतर परिचारकांच्या वाड्यावर जाऊन सुधाकर परिचारक यांची भेट घेऊन दहा वर्षांचा दुरावा संपवला.

ही दोन्ही राजकीय घराणी राष्ट्रवादीपासून पूर्णतः दुरावून भाजपवासी होताच पुन्हा मनोमिलन होताना दिसत आहे. रविवारी येथील बाजार समितीच्या आवारात आयोजित संकल्प मेळाव्यात रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पुढाकार घेत परिचारकांकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. त्यास आमदार प्रशांत परिचारक यांनी ही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रतिसाद दिला. सोमवारी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरीत येऊन सुधाकरपंत परिचारकांची भेट घेतली, धाकट्यांबरोबरच मोठे ही पुन्हा एकत्र आल्याचे सूचित केले.

परिचारक व मोहिते-पाटील यांचे तीन पिढ्यांचे संबंध असून, पंतांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यासमवेत काम केले आहे. पुढे पंत व विजयसिंह यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एकत्रित काम केले. हा दोस्ताना इतका होता की, लोक म्हणत पंतांच्या मुंबईचा रस्ता हा व्हाया अकलूज जातो. ही मैत्री ही दृष्ट लागण्यासारखी घनिष्ठ होती. २००९ची विधानसभा विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंतांच्या जागेवरून म्हणजे पंढरीतून लढली व यात त्यांचा पराभव झाला, या नंतर परिचारक व मोहिते पाटील गटात राजकीय संघर्ष सुरू झाला. नव्या पिढीच्या संबंधात खूप अंतर आले. मात्र, नव्या पिढीतील नेते मात्र मागे सरायला तयार नव्हते. प्रशांत परिचारक अजित पवार यांचे निकटवर्तीय बनले. यातूनच मोहिते-पाटील विरोधकांची फळी निर्माण झाली व यास महाआघाडी नाव देण्यात आले. यातील एक प्रवर्तक सध्या राष्ट्रवादीचे माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे आहेत. परिचारक व शिंदे यांची दोस्ती ही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. शिंदे राष्ट्रवादीत गेले असले तरी परिचारक व त्यांच्या अन्य महाआघाडीच्या नेत्यांनी भाजपमध्ये राहणे पसंत केले व लोकसभेसाठी ते पक्षासाठी काम करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुजोर राज्यकर्त्यांना धडा शिकवा : उदयनराजे

$
0
0

सातारा :

'स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक आणि लष्करी जवान यांच्या अनमोल त्यागातूनच देशाची जडणघडण झाली आहे. मात्र सध्याच्या सरकारने चुकीची धोरणे राबवल्याने देशाची अधोगती होऊ लागली आहे. विकेंद्रित झालेल्या सत्तेचे पुन्हा केंद्रीकरण होत असल्याने हे जुलमी सरकार उलथवून टाकण्याची वेळ आली आहे. मतदार हाच लोकशाहीतील खरा राजा असून, जनतेने अविचाराने न वागता मतदानाचा पवित्र अधिकार वापरून मुजोर राज्यकर्त्यांना धडा शिकवावा,' असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. नांदगाव (ता. कराड) येथील श्रीराम मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बूथ कमिटी सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोकुळ कर्मचाऱ्यांनी मांडली खासदारांसमोर 'वस्तुस्थिती'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी सायंकाळी 'गोकुळ'च्या कर्मचाऱ्यांकडून लोकसभा मतदारसंघातील आढावा घेतला. कर्मचाऱ्यांनी तालुक्याचा लेखाजोखा मांडताना महाडिकांसमोर मतदारसंघाची 'वस्तुस्थिती' मांडली. यावेळी गोकुळचे ७० टक्के संचालक उपस्थित होते.

महाडिक यांनी सोमवारी दुपारी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. तसेच लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथील कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर सायंकाळी जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील सुपरवायझर, डॉक्टरसह अन्य कर्मचाऱ्यांना ताराबाई पार्क येथील कार्यालयात बैठकीची सूचना दिली होती. पण आचारसंहिता असल्याने गोकुळच्या कार्यालयाऐवजी कावळा नाका येथील ताराराणी चौकातील कार्यालयात कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले.

महाडिक यांनी प्रत्येक तालुक्यातील कर्मचाऱ्यांकडून स्वतंत्रपणे आढावा घेतला. त्यांनी ग्राउंड लेव्हलवरील माहिती घेतली. कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती व गाववार मतदानाची माहिती दिली. कोणत्या नेता व कार्यकर्ता नाराज आहे, नाराजीची कारणेही खासदार महाडिकांना सांगितली. ५० टक्के मते राष्ट्रवादीला मिळतील असे सांगताना 'डेंजर झोन' तालुक्यांची माहितीही सुपरवायझरनी दिली. मताधिक्य वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काही सूचनाही केल्या. खासदार महाडिक यांनी माहितीचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. बैठकीला गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, रणजितसिंह पाटील, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, विलास कांबळे, जयश्री पाटील चुयेकर, रामराजे कुपेकर उपस्थित होते.

०००००

माजी अध्यक्ष विश्वास पाटील अनुपस्थित

बैठकीला गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील अनुपस्थित होते. अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने ते नाराज असल्याची कर्मचाऱ्यांत जोरदार चर्चा होती. तसेच संचालक राजेश पाटील, अंबरीश घाटगे, बाळासाहेब खाडे, अनुराधा पाटील, बाबा देसाई गैरहजर होते. अंबरीश घाटगे, अनुराधा पाटील शिवसेनेशी संबधित आहेत, तर राजेश पाटील शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचे नातेवाईक आहेत. खाडे हे पी.एन. पाटील यांच्यासमवेत एका कार्यक्रमाला गेले होते, तर बाबा देसाई भाजपचे पदाधिकारी असल्याने अनुपस्थित होते.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवारांच्या उपस्थितीतबुधवारी सोलापुरात मेळावा

$
0
0

शरद पवारांच्या उपस्थितीत

बुधवारी सोलापुरात मेळावा

सोलापूर :

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार येत आहेत. बुधवारी, तीन एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता दमाणी नगरातील शुभम लॉन्स येथे राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मेळावा संपल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता कन्ना चौक येथे जाहीर सभा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकार भवन गैरप्रकार प्रकरणी हायकोर्टात याचिका

$
0
0

पत्रकार भवन गैरप्रकार प्रकरणी हायकोर्टात याचिका

कराड :

कराड येथील पत्रकार भवन उभारणीमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेवरील आरक्षण बेकायदा उठविले गेल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित विभागांकडे गेल्या दोन वर्षांपासून दाद मागत आहे. तरीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नाईलाजास्तव या प्रकरणी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे, अशी माहिती याचिकादार पराग शेणोलकर यांनी दिली.

शेणोलकर म्हणाले, 'कराड येथील पत्रकार भवन उभारणीतील आर्थिक घोटाळा झाला आहे. पालिकेने भाजीपाला मार्केटच्या आरक्षित जागेवरती पत्रकार भवन बांधकामासाठी दिलेली परवानगी बेकायदा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी लेखी मागणी दोन वर्षांपासून करीत होतो, पण, सरकारकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सखोल चौकशीच्या मागणीसाठी अखेर हायकोर्टात याचिका केली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठ्याचा बोजवारा

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : जलवाहिनीला ठिकठिकाणी लागलेली गळती, अपुरे कर्मचारी, नियोजनातील त्रुटी आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे पाणीदार जिल्ह्याच्या मुख्य शहरात पाणीपुरव‌ठ्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. राधानगरी, काळम्मावाडी यांसारखी मोठी धरणे फुल्ल असताना आणि पंचगंगा नदी दुथडी भरुन वहात असताना अधिकारी, लोकप्रतिनिधींमधील समन्वयाअभावी नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे तर नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्याला शिस्त लावण्याबरोबर युद्धपातळीवर गळती दूर करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा 'नदी उशाला आणि कोरड घशाला' या म्हणीप्रमाणे शहरातील नागरिक नेहमीच तहानलेले राहतील अशी स्थिती आहे.

महानगरपालिकेच्या बालिंगा, कसबा बावडा येथील केंद्रांतून उपसा करून जलशुद्धिकरण केंद्रांमार्फत पाणीपुरवठा केला जातो. शहराचा विस्तार आणि पाण्याची मागणी वाढल्यानंतर शिंगणापूर योजना कार्यन्वित केली. योजनेद्वारे 'ई' वॉर्डातील नागरिकांना पाणी देण्यात येते. या योजनेला सुरुवात झाल्यानंतर काही वर्षे पाणीपुरवठा सुरळीत झाला. पण नंतर वारंवार निर्माण होणारी गळती, पाण्याची पळवापळवी, लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा यामुळे पाणी पुरवठ्याचा सातत्याने बोजवारा उडत आहे. या विभागात असलेली अपुरी कर्मचारी संख्याही याला कारणीभूत ठरत आहे.

शहराला दैनंदिन १२० एमएलडी पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना १४० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. यातील तब्बल ५० एमएलडी पाणी गळतीवाटे गटारीतून वाहते. परिणामी शहराला ३० एमएलडी पाणी कमी पडत आहे. महासभेपासून स्थायी समितीच्या प्रत्येक बैठकीत गळती रोखण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सांगण्यात येते. चंबुखडी येथील गळती काढताना ३० मीटर जलवाहिनी बदली. पंगू शेत, साळोखेनगर, पुईखडी पेट्रोलपंप येथील गळती काढण्यास यश आले. तर कळंबा रिंगरोड हॉटेल दुर्वांकुर येथे ५० मीटर जलवाहिनी बदलण्यात आली. महत्त्वाच्या पाच गळती दूर करण्यासह पाटणकर हायस्कूल, कणेरकर नगर येथीलही गळती काढण्यात यश आले. मात्र, आयटीआय हुनमान नगर, फुलेवाडी (हॉटेल राहुल) व कसबा बावडा येथील गळती काढण्यात पाणी पुरवठा विभागाला अपयश आले आहे. आता आयटीआयमधून गेलेल्या वाहिनीवरील गळती सापडत नसल्याने येथील जलवाहिनीच बदलण्यात येणार आहे.

शहरात जलवाहिन्यांचे सुमारे ५५० किलोमीटर जाळे आहे. मात्र, कोणती वाहिनी कधी टाकली गेली? त्याची दुरुस्ती कधी करणे आवश्यक आहे? याबाबतचा आराखडा पाणीपुरवठा विभागाकडे नाही. अनुभवी कर्मचाऱ्यांचीही वानवा आहे. परिणामी वारंवार जलवाहिन्या फुटून गळती निर्माण होत आहे. अनेक एअर व्हॉल्व्ह खराब झाले आहेत. जलवाहिनी, व्हॉल्व्ह दुरुस्तीने कर्मचाऱ्यांचा बहुतांशी वेळ गळती काढण्यात खर्ची जातो. पण त्यांचीही संख्या कमी असल्याने गळती काढण्यास विलंब लागतो. परिणामी पाणी कमी येऊन नागरिकांमध्ये रोष निर्माण होण्यावर होतो.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा योजना हस्तांतरीत झाल्यानंतर विभागाकडे वर्ग एक ते चार पदांचे ५४३ अधिकारी-कर्मचारी होते. यामध्ये ६० हंगामी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सद्यस्थितीत विभागाकडे ३७८ कर्मचारी असून त्यापैकी १११ हंगामी कर्मचारी आहेत. हंगामी कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींचा आश्रय असल्याने असे कर्मचारी त्यांच्याच तालावर नाचतात. त्याचाही परिणाम पाणी वितरणावर होतो.

कोट

मुख्य जलवाहिनीवरील कसबा बावडा वगळता सर्व ठिकाणच्या गळती दूर केल्या आहेत. मात्र, भूमिगत गळतीची ठिकाणे शोधताना अडचणी येत आहेत. एअर व्हॉल्व्हमधून जाणारे पाणी रोखण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

- सुरेश कुलकर्णी, जलअभियंता

दृष्टिक्षेपात पाणीपुरवठा

७०००००

शहराची लोकसंख्या

१२० एमएलडी

दररोज लागणारे पाणी

१३५ ते १४० एमएलडी

दैनंदिन उपसा

५० एमएलडी

दररोजची पाणीगळती

चार उपसा केंद्रांची क्षमता

३८ एमएलडी

बालिंगा

८ एमएलडी

कळंबा फ्लिटर हाऊस

६० एमएलडी

पुईखडी

३६.५ एमएलडी

कसबा बावडा

भूमिका

वितरणाचे नियोजन

काटेकोर व्हावे

पाणीदार जिल्हा अशी कोल्हापूरची ओळख सर्वदूर आहे. जिल्ह्यातील बहुतांश नद्या बारमाही वाहत असतात. यापैकी कोल्हापूर शहराला वळसा घालून धावणाऱ्या पंचगंगा नदीतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. नदी बारा महिने दुथडी भरून वहात असली तरी जुनी वितरण व्यवस्था, शिंगणापूर योजनेच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी लागलेली गळती यामुळे नागरिकांना अपुऱ्या, कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागते. मुख्य जलवाहिनीवरील व दृश्य स्वरुपातील गळती काढण्यास शहर पाणीपुरवठा विभागाला यश आले असले, तरी जुन्या वाहिन्या, दाबनलिका व वितरण वाहिनीला भूमिगत स्वरुपात असलेली गळती दूर करण्यास अद्याप प्रशासनाला यश आलेले नाही. परिणामी एकूण उपसा केलेल्या १४० एमएलडी पाण्यापैकी तब्बल ५० एमएलडी पाणी दररोज ३० ते ३५ ठिकाणांहून गळतीतून गटारीतून पुन्हा नदीत मिसळते. यातून पाण्याचा अपव्यव होतोच. पण, नागरिकांची तहानही भागत नाही. नागरिकांना मुबलक आणि पुरेसे पाणी देण्यासाठी जुन्या गळतीची ठिकाणे शोधण्याबरोबर विभागाच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागण्याची गरज आहे. अन्यथा थेट पाइपलाइनसारख्या योजना पूर्ण झाल्या तरी, येणारे पाणी गटारीतच जाणार असेल तर त्याचा काय उपयोग?. त्यामुळे जुनी वितरण व्यवस्था सक्षम करण्याबरोबर पाणीपुरवठा विभागाने वितरणाचे नियोजनही काटेकोर करण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुईकर कॉलनीत तीन उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील तीन उमेदवारांचे वास्तव्य कोल्हापूरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळख असलेल्य रुईकर कॉलनी येथे आहे. त्यामुळे रुईकर कॉलनीतील खासदार ही गेली वीस वर्षे असलेली परंपरा यंदाही कायम राहणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक आणि त्यांचे विरोधक शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचे बंगले रुईकर कॉलनीत आहेत. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार हा रुईकर कॉलनी परिसरातील असणार आहे. हातकणंगले मतदारसंघातून माजी खासदार निवेदिता माने यांचा मुलगा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैयर्शिल माने हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. ते विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात लढत आहेत. माने यांनी शेट्टी यांच्या विजयाची हॅटट्रिक रोखली तर रुईकर कॉलनीला दुसरा खासदार मिळू शकतो. रुईकर कॉलनीत गेली अनेक वर्षांपासून खासदारांचे निवासस्थान ही परंपरा कायम आहे. या परिसरात उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकिलांचे बंगले आहेत. ज्येष्ठ नेते, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचाही रुईकर कॉलनीत बंगला आहे. माजी खासदार बाळासाहेब माने यांचे वास्तव्य रुईकर कॉलनीत होते. त्यानंतर खासदार सदाशिवराव मंडलिक रुईकर कॉलनीत रहायला गेले. माने यांच्यानंतर काही काळ खंडित झालेली रुईकर कॉलनीतील खासदार ही प्रथा मंडलिक यांनी कायम ठेवली. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. खासदार मंडलिक व निवेदिता माने यांचे वास्तव्यही रुईकर कॉलनीत होते. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मंडलिक व माने पुन्हा निवडून आले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक यांच्याविरोधात धनंजय महाडिक यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. पण ते पराभूत झाले. मंडलिक व महाडिक या दोघांचे बंगले रुईकर कॉलनीत असल्याने कोण विजयी होणार, याकडे लक्ष लागले होते. २००८ च्या निवडणुकीत खासदार मंडलिक यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकताना रुईकर कॉलनीतील खासदार ही परंपरा कायम ठेवली. या निवडणुकीत मंडलिकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजेंचा पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना पक्षाने संधी दिली. महाडिक विजयी झाल्याने रुईकर कॉलनीतील खासदार हे समीकरण कायम राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images