Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘गृह’ निर्माणाला नियमांचा जाच नको

$
0
0

लोगो : मटा जाहीरनामा

कोल्हापूर टाइम्स टीम

नोटबंदी, रेरा, यापाठोपाठ वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी यामुळे गृहनिर्माण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मरगळीचे चित्र आहे. रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, आर्थिक उलाढाल, या क्षेत्रावर आधारित इतर रोजगार निर्मिती या बाबींचा विचार केल्यावर गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी आहेत. सरकारने बांधकाम व्यवसायिकांच्या परवान्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुलभ करावी. किचकट नियमांत बदल करून सुसूत्रता आणावी. ड वर्ग विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करुन सरकारने गृहनिर्माण क्षेत्राला 'बूस्ट' दिल्यास शहराचा विकासाचा मजला उंचावेल अशा अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांनी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मटा जाहीरनामा'उपक्रमात व्यक्त केला.

देशात गुंतवणुकीचे दोन नंबरचे क्षेत्र म्हणून गृहनिर्माण क्षेत्र ओळखले जाते. केंद्र सरकारची 'सर्वांसाठी घर योजना २०२२' योजना खरोखर चांगली आहे. चांगल्या योजना आणि घोषणांना प्रभावी अंमलबजावणीची जोड मिळायला हवी. प्रधानमंत्री आवास योजनेतील अटींमध्ये शिथीलता आणल्यास परवडणाऱ्या घरांचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होईल पायाभूत सुविधांची उपलब्धता, दळणवळणाच्या संधी आणि सरकारी नियमावलींच्या कचाट्यात गृहनिर्माण क्षेत्र अडकणार नाही या पद्धतीने कामकाज केल्यास बांधकामांना चालना मिळू शकेल असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

नियमावलीत हवी लवचिकता

गृह बांधणी क्षेत्रावर विविध व्यवसाय अवलंबून आहेत. मात्र जीएसटी, नोटबंदी, रेरा कायद्यामुळे रिअल इस्टेलला काही प्रमाणात फटका बसला. गेल्या काही वर्षात गुंतवणूक कमी झाली. सध्या हा व्यवसाय संक्रमणाच्या स्थितीत आहे. सरकारने गृह प्रकल्प क्षेत्राला चालना देण्यासाठी नगरविकास खात्याच्या नियमावलीत लवचिकता आणावी. पायाभूत सुविधा, विमानसेवा, स्मार्ट सिटी संकल्पना, स्वच्छ भारत योजना प्रभावीपणे राबविल्या तर शहर विकासाला गती लाभेल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणखी सवलती हव्यात.

- राजीव परीख, अध्यक्ष क्रिडाई महाराष्ट्र

गृह बांधणी क्षेत्राकडे हवे लक्ष

'रेरा' कायद्यामुळे बांधकाम व्यवसायला आर्थिक शिस्त निर्माण झाली. मात्र, रेराच्या कार्यकक्षेत बांधकाम व्यावसायिकांच्यासोबत महापाालिका, महावितरण व सरकारी कार्यालये आणली पाहिजेत. कारण अधिकाऱ्यांच्या चालढकल वृत्तीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांचे मध्यम व लहान शहरातील गृह बांधणी प्रकल्पाकडे लक्ष नाही. कारण मेट्रो सिटीतील बांधकाम व्यवसायात ते भागीदार आहेत. नगररचना कार्यालयाचा कारभार (टीपी)हा सहायक संचालकामार्फत झाला पाहिजे. त्यामध्ये आयुक्त, उपायुक्तांचा हस्तक्षेप नसावा.

- महेश यादव, अध्यक्ष क्रिडाई कोल्हापूर

भौगोलिक रचनेनुसार हवी नियमावली

प्रत्येक शहराची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. त्याचा विचार करुन विकास नियंत्रण नियमावली आवश्यक आहे. कोल्हापुरात तर साठ टक्के मिळकती या स्पेसीफाइड एरियात आहेत. यापूर्वीच्या शहर विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. टीडीआर प्रणाली विचित्र असल्यामुळे विकास आराखड्यात अडथळे निर्माण होत आहेत. सरकारने बांधकाम व्यावसायिकांसाठी नियमावलीत सूसुत्रता आणावी. रोज एक जीआर काढण्याचा अजब प्रकार थांबला पाहिजे.

- विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष क्रिडाई कोल्हापूर

प्रकल्प नोंदणी शुल्कात कपात करा

सरकारने बांधकाम क्षेत्रासाठी विविध योजना आखल्या, पण त्या घोषणांची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. नोटबंदी, जीएसटीचा बांधकाम व्यवसायला फटका बसला. बांधकाम व्यवसायाला शिस्त लावण्यासाठी महारेरा कायदा लागू केला. पण या कायद्यान्वये आकारण्यात येणारी गृहप्रकल्प नोंदणी शुल्क कमी करण्याची आवश्यकता आहे. नोंदणी शुल्क कमी करण्यासाठी क्रिडाईमार्फत पाठपुरावा सुरू आहे. सरकारने दखल घेऊन न्याय द्यावा.

- आदित्य बेडेकर, क्रिडाई यूथ समन्वयक

मोठ्या शहरांशी कनेक्टिव्हिटी हवी

सरकारने जीएसटीत कपात केल्यामुळे बांधकाम क्षेत्राला लाभ होईल. नागरीकरण वाढत असल्याने शहरांत दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात. मोठ्या शहरांशी विमानसेवा सुरू झाल्यास कोल्हापुरात आयटी क्षेत्राच्या विस्ताराला वातावरण निर्माण होईल. वीस हजार चौरस मीटर किंवा मोठ्या गृह प्रकल्पाना केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन विभागाची एनओसी बंधनकारक आहे. यामुळे मोठे गृहप्रकल्प रखडत असून सरकारने नियमात बदल करायची गरज आहे.

- कृष्णा पाटील, बांधकाम व्यावसायिक व संचालक क्रिडाई

विकास नियंत्रण नियमावलीतील जाचक अटी

'ड' वर्ग विकास नियंत्रण नियमावलीतील काही अटी जाचक आहेत. सरकारने अग्रक्रमाने त्यामध्ये सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक शहराच्या भौगोलिक रचनेचा विचार करुन ज्या त्या शहरासाठी नियमावली बनवावी. बांधकाम व्यवसायासाठी ऑनलाइन परवाना प्रक्रिया गरजेची आहे. राज्य सरकारच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्याप्रमाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या अन्य महापालिकेत बदल्या झाल्या पाहिजेत. यामुळे महापालिकेत वर्षानुवर्षे ठिय्या मांडलेल्या अधिकाऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात येईल.

- के. पी. खोत, बांधकाम व्यावसायिक

हद्दवाढ व प्राधिकरणची कुचेष्टा

कोल्हापूच्या विकासाचे महाद्वार ठरणाऱ्या हद्दवाढ आणि प्राधिकरणची कुचेष्टा झाली. सरकारने मोठा गाजावाजा करत प्राधिकरणची घोषणा केली. मात्र कार्यालयाकडे मनुष्यबळाची, निधीची वानवा, नव्या प्रकल्पांचा अभावामुळे प्राधिकरण स्थापूनही विकासाला गती लाभली नाही. नोटबंदी, जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्रात मंदी निर्माण झाली. वास्तविक सरकारने बांधकाम क्षेत्राला पोषक धोरणांची अंमलबजावणीला प्राधान्यक्रम पाहिजे. सरकारने पोषक धोरण आखावे.

- प्रकाश मेडशिंगे, बांधकाम व्यावसायिक

आमचा जाहीरनामा..

- सरकारने गृहनिर्माण क्षेत्राला पोषक धोरणांची अंमलबजावणी करावी

- ड वर्ग विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा कराव्यात

- नगरविकास खात्याकडून रोज नवीन अध्यादेश काढण्याची प्रकिया बंद व्हावी

- बांधकाम विषयक सर्व परवानग्या ऑनलाइन मिळाव्यात

- शहरात पायाभूत सुविधा, दळणवळणाच्या सोयी उपलब्ध कराव्यात

- प्रत्येक शहराच्या भौगोलिक रचनेचा विचार करुन नियमावली बनवावी

- विमानसेवा सुरळीत चालू राहिल्यास आयटी क्षेत्र विस्तारेल

(संकलन : आप्पासाहेब माळी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हवाई दलाची क्षमतावाढ

$
0
0

हवाई दलाच्या ताफ्यात सोमवारी चार चिनूक हेलिकॉप्टर (सीएच-४७एफ (I)) दाखल झाले. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत चंडिगड हवाई तळावर झालेल्या कार्यक्रमात ही हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट करून घेण्यात आली. या हेलिकॉप्टरमुळे हवाई दलाच्या क्षमतेमध्ये वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरवणी मतदार यादीसाठी २९ हजार अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे एकूण २९ हजार, ८२० अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नव्याने नावाचा समावेश करण्यासाचे सर्वाधिक अर्ज आहेत. उर्वरित अर्ज नाव वगळणे, नाव, पत्त्यात दुरुस्ती, स्थलांतरसाठी अर्ज केले आहेत. या अर्जांची छाननी चार एप्रिलपर्यंत करण्यात येणार आहे. पात्र नावे लोकसभेच्या मतदार यादीत असतील. त्यांना मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे.

सप्टेंबर महिन्यात प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली. त्यानंतर व्यापक विशेष मोहीम राबवून नवीन मतदार नोंदणी, दुबार मतदारांची नावे कमी करणे, स्थलांतर मतदार वगळण्यासाठी अर्ज मागवण्यात आले. त्यात जिल्ह्यातून ऑनलाइन सहा हजार, ६०१ तर ऑफलाइन २३ हजार, २१९ जणांनी अर्ज केले आहेत. सोमवारी शेवटच्या दिवसांपर्यंत इतके अर्ज झाले आहेत. या अर्जांची छाननी संबंधित मतदान केंद्रस्तरावर होईल. त्यानंतर पात्र मतदारांना मोबाइलवर मॅसेज पाठवण्यात येणार आहे. पुरवणी मतदार यादीत नाव असल्यास या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यात येणार आहे. यापुढील काळातही नाव नोंदणीसह सर्व प्रक्रिया सुरू राहणार आहे. मात्र त्या अर्जावर निर्णय होणार नाही. परिणामी त्यांना यावेळी मतदान करता येणार नाही. पुढील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची संधी मिळणार आहे.

सर्वाधिक दक्षिण

मतदार यादीतील नावासाठी दाखल अर्ज आणि कंसात ऑनलाइन अर्ज विधानसभा मतदारसंघनिहाय असे : चंदगड :१८९९(३२१), राधानगरी :१३६३(१८८), कागल : १९१३ (४०९), कोल्हापूर दक्षिण : ३८९० (१५५१), करवीर :१६६३(२९८), कोल्हापूर उत्तर :२३६३ (११६१), शाहूवाडी : १६९१ (२५५), हातकणंगेल : ३६९१ (७९२), इचलकरंजी :२४६५ (५६३), शिरोळ :२२८२ (१०६३).

लोकसभा निवडणुकीसाठी पुरवणी मतदार यादीत नाव समावेशासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. पात्र मतदारांना यावेळी मतदानाची संधी मिळेल. यापुढील दिवसात केलेल्या अर्जांवर निर्णय होणार नाही. त्यांना या लोकसभेसाठी मतदान करता येणार नाही.

सतीश धुमाळ, उपजिल्हाधिकारी, निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात उदयनराजें-नरेंद्र पाटील लढत

$
0
0

साताऱ्यात उदयनराजे-नरेंद्र पाटील लढत

सातारा

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी रविवारी कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांनी त्याच वेळी साताऱ्यातून खासदार उदयनराजेंच्या विरोधात पाटील यांच्या उमेदवारीची घोषणाही केली. त्यामुळे सातारा मतदारसंघात आता उदयनराजेंविरुद्ध नरेंद्र पाटील, अशी हायहोल्टेज लढाई पाहायला मिळणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उदयनराजेंविरोधात कोण, असा सस्पेन्स गेल्या काही दिवसांपासून कायम होता. सातारा मतदारसंघ युती अंतर्गत शिवसेनेकडे असल्यामुळे येथून सेनेतर्फे कोण मैदानात उतरणार याची उत्कंठा लागून राहिली होती. या पार्श्‍वभूमीवर नरेंद्र पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी अचानक हजेरी लावत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या नंतर रविवारी त्यांनी कोल्हापूर येथे भाजप-शिवसेनेच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रचार शुभारंभाच्या जाहीर सभेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यातील लढत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले.

नरेंद्र पाटील मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेतेमंडळींशी त्यांचे ऋणानुबंध आहेत. माथाडी नेता म्हणून ते प्रसिद्ध आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी मतदारसंघात रान उठवून आपली रणनिती स्पष्ट केली होती. या लढाईत त्यांना आता शिवसेना नेत्यांची साथ लाभणार असली तरी भाजपाला आपल्यासोबत सक्रीय करण्यात ते कितपत यशस्वी होतात यावरही त्यांच्या यशाची गणिते अवलंबून राहणार आहेत. 1996 नंतर या मतदार संघात पुन्हा एकदा सेनेचा भगवा फडकावण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे खा. उदयनराजे व नरेंद्र पाटील यांच्यातील हायहोल्टेज लढाईची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित : रावसाहेब दानवे

$
0
0

नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित : रावसाहेब दानवे

सोलापूर

'आज देशामध्ये भयानक युद्धजन्य परिस्थिती आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आता देश सुरक्षित राहू शकतो, अशी तमाम देशवासीयांची भावना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि मोदींचे हात बळकट करा,' असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

सोमवारी हेरिटेज येथे महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे बोलत होते. दानवे म्हणाले, 'राज्यात युती अभेद्य आहे, ती कोणीसुद्धा मोडू शकणार नाही हे कोल्हापुरातील विराट महामेळाव्याने दाखवून दिले आहे. करवीर नगरीच्या महालक्ष्मीने आशीर्वाद दिला आहे. महालक्ष्मीच्या साक्षीने राज्यात महायुतीच्या सर्व उमेदवार निवडून येऊन देशात पुन्हा युतीची सत्ता येऊन पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील.'

............

रावसाहेब दानवे चुकले आणि सावरले

दानवे यांनी सोलापुरातील आपल्या भाषणात मोठी चूक केली. पुलवामा हल्ल्याबद्दल बोलताना, 'पाकिस्तानने देशातील ४० अतिरेकी मारले,' असे विधान केले. आपण चुकल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच सावरत पाकिस्तानने देशातील सैनिकांना मारले असे म्हटले. मात्र, त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दानवेंनी शहीद जवानांचा अपमान केल्याची तीव्र भावना नेटकरी व्यक्त करीत आहेत. या विधानावरून विरोधी पक्षांनीही दानवे लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दानवेंचा या बाबतच व्हिडीओ शेअर करून त्यांना हेच का भाजपचे बेगडी देशप्रेम? असा प्रश्न विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रावसाहेब दानवेंचा एका व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात युतीला ४८ जागा हमखास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने अनुकूलता असून, राज्यात युतीला लोकसभेमध्ये ४८ जागा मिळतील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. कागल येथे झालेल्या युतीच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

पुढचा बॉम्ब खूपच मोठा असल्याचा गौप्यस्फोट करून पालकमंत्री पाटील म्हणाले 'सगळे बॉम्बे फोडून झाल्यावर मी मतदारसंघात बसून असणार आहे. प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभेसाठी येणार हे काही नवीन नाही. आजचा समाज सेलिब्रिटींना मत द्यायला नाही, बघायला येतो. नाहीतर देशाचे पंतप्रधान हेमामालिनी, प्रियांका चोप्रा झाल्या असत्या. शिवसेनेचे धनुष्यबाण लोकांच्या घराघरांत पोहोचवून राज्यात विक्रमी मतांनी संजय मंडलिक यांना विजयी करण्याचा चंग बांधूया.'

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, 'राजकारणाचे विद्यापीठ म्हटल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातून या निवडणूक निकालाने जिल्ह्यात राजकारणाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.'

यावेळी माजी आमदार संजय घाटगे, म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे अध्यक्ष महेश जाधव, संजय पवार, विजय देवणे, राजेखान जमादार, अंबरीश घाटगे यांची भाषणे झाली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार महाडिकांकडे विकासाची दृष्टी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षात अभ्यासपूर्ण मांडणी व प्रश्नांची नियोजनबद्धरित्या सोडवणूक करत जिल्ह्याचा विकास केला. ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यामुळे चंदगड तालुक्यासह सर्व मतदारसंघाला फायदा झाला आहे. विकासकामांच्या बळावर पुन्हा ते लोकसभेच्या निवडणुकीत विजयी होतील' असा विश्वास माजी मंत्री भरमू पाटील यांनी व्यक्त केला. खासदार महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर आणि माजी मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत तुड्ये, हाजगोळी, सरोळी, ढेकोळी आणि ढेकोळेवाडी येथे कोपरा सभा झाल्या.

आमदार कुपेकर म्हणाल्या, 'विकासकामाची दृष्टी आणि इच्छा असलेल्या खासदार महाडिक यांनी सक्षम लोकप्रतिनिधी कसा असतो हे कामकाजातून दाखवून दिले. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांनाच पुन्हा खासदार बनवूया.'

खासदार महाडिकांनी जिल्ह्याच्या विकासकामाला गती देण्यासाठी येत्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला जगन्नाथ हुलजी, सरपंच शिवाजीराव कांबळे, वारकरी संप्रदायाचे विलास पाटील, एम. बी. पाटील, गणपत कनगुटकर, लक्ष्मण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवाजी पेठेत महिला मेळावा

भागीरथी महिला संस्था व साई महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी पेठ येथे महिला मेळावा झाला. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी महिला सक्षमीकरणाला पाठबळ देणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा निवडून द्या. त्यांनी महिला बचत गटांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी प्रयत्न केले आहेत. विकासाच्या मुद्यावर चर्चा झाली पाहिजे असे नमूद केले. याप्रसंगी सुमन वाडेकर, वर्षा वाडेकर, वहिदा मुजावर, माधुरी शिंदे, मीरा मोरे, शितल तिवडे, गीता पाटील यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावली’मध्ये सात दिव्यांग मुले दाखल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सावली केअर सेंटर गेल्या पंधरा वर्षापासून परावलंबित्व आलेल्या रुग्णांच्या सुश्रुषेचे काम अव्याहतपणे करत आहे. यामध्ये आणखी सात दिव्यांग मुले दाखल झाली आहेत. सर्व मुले औरंगाबाद येथील आहेत. औरंगाबाद येथून चार तर पुण्यातील तीन दिव्यांग मुले दाखल होणार त्यासाठीची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

राधानगरी रोड पिराचीवाडी येथे सावली केअर सेंटरमध्ये अनाथ व दिव्यांग मुलांना दाखल करुन घेतले जाते. शीशूगृह व बालगृहापेक्षा 'सावली'ने वेगळ्या प्रकारच्या सुविधा देणाऱ्या शारीरिक व मानसिक अपंगत्व आलेल्या मुलांचा स्विकार केला आहे. अशा मुलांना इतर मुलांपेक्षा जास्त वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते. त्यासाठी सावलीने अशा मुलांसाठी पूर्णवेळ फिजिशिअन, फिजिओथेपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, क्लिनीकल सायकॉलॉजी व प्रशिक्षित केअर टेकर आदी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध केले आहे. त्याचबरोबर अद्ययावत उपकरणांचीही उपलब्धता केली आहे. संस्थेत आतापर्यंत २४ मुले दाखल झाली आहे. सर्व मुले कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद आणि गोवा येथून आली आहे. काही मुले चाईल्ड वेल्फेअर कमिटी व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आली आहेत. यामध्ये आता नव्याने सात मुलांचा समावेश झाला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद व पुणे येथून लवकरच सात मुले दाखल होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महामंडळाच्या अध्यक्षांच्या निषेधाचा प्रकार चुकीचा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात अनधिकृत बैठक घेऊन महामंडळाच्या अध्यक्षांचा निषेध करण्याचा प्रकार चुकीचा आहे. महामंडळाच्या अध्यक्षांचा विनाकारण विरोध व राजीनामा देण्याचा स्टंट करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करत असल्याचे पत्रक अखिल भारतीय मराठी चित्रपट नाट्य व्यावसायिक कृती समितीने प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकावर कृती समितीचे पदाधिकारी व ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, सुरेंद्र पन्हाळकर, अर्जुन नलवडे, बबीता काकडे, छाया सांगावकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, प्रमुख कार्यवाहांचा राजीनामा आणि महामंडळासाठी कोल्हापुरात घ्यावयाची जागा यावरुन जो काही प्रकार घडला तो लाच्छंनास्पद आहे. कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथे जागा घेणे व येथे हायटेक ऑफीस करण्याचे प्रस्ताव असताना येथील संचालकांनी चार महिने कसलेही प्रयत्न केले नाहीत. घाईगडबडीने विशिष्ठ जागेचा आग्रह धरण्याची त्यांची भूमिका अनाकलनीय असल्याचे पत्रकांत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मॅकने महिलांना औद्योगिक प्रशिक्षण द्यावे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

'औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण पन्नास टक्के पर्यंत वाढविण्यासाठी स्मॅक आयटीआयने प्रयत्न करावा. त्यापुढील मुलींना कमिन्स इंडिया आणखी शिष्यवृत्ती साठी मदत करेल' असे प्रतिपादन कमिन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदिप सिन्हा यांनी व्यक्त केले. स्मॅक आयटीआय भवनाच्या पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते. स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष सुरेंद्र जैन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कमिन्स इंडियाचे अधिकारी राजीव बात्रा, सौम्या चतुर्वेदी व स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील प्रमुख उपस्थित होते.

कमिन्सचे इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सिन्हा म्हणाले, 'कमिन्स इंडिया गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी स्वतंत्र इंजिनीअरिंग कॉलेज चालविते. त्याच प्रमाणे स्मॅकने आयटीआयच्या माध्यमातून महिलांना औद्योगिक प्रशिक्षण देण्यात पुढाकार घ्यावा. यामुळे आगोदरच विस्तारलेला कोल्हापूरचा उद्योग महिलांच्या सहभागामुळे देशात उदाहरण ठरेल.'

स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, 'स्मॅक आयटीआयमध्ये मुलींना प्रवेशासाठी प्रोत्साहन देवून त्यांना शैक्षणिक शुल्कात विशेष सवलत दिली आहे. महाराष्ट्रात प्रथम आलो आहे, तसे देशात एक नंबर येण्यासाठी प्रयत्न करू.'

जेष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर, संजय शेटे, सचिन मेनन, सचिन पाटील, दिपक जाधव, निरज झंवर, भरत जाधव, रोहित मोदी, प्रशांत शेळके आदी उपस्थित होते. स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी आभार मानले. शैलेश कासार व स्नेहल धने यांनी सूत्रसंचालन केले.

सात उद्योजकांकडून मदत

स्मॅक आयटीआयच्या उभारणीसाठी एमआयडीसीमधील ७ उद्योगपतींनी प्रत्येकी ११ लाखांची मदत केली. गॅनट फाउंड्री प्रा. लिमिटेड, जैन व्हर्सटाइल इंजिनीयर्स प्रा. लिमिटेडचे जनवाडकर, सरोज आयर्न इंडस्ट्रीजचे जाधव, एस. बी. रिसेलर्स प्रा. लिमिटेडचे शिरगावकर, परफेक्ट पिन्सचे मोदी, उषा एंटरप्राईजचे शेळके, मेनन अँड मेनन प्रा. लिमिटेडचे विजय मेनन या सर्वांनी प्रत्येकी ११ लाखांची मदत केली.

फोटो ओळ

शिरोली येथील स्मॅक आयटीआय भवनची पायाभरणी करताना कमिन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप सिन्हा. यावेळी स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, राजू पाटील, सचिन मेनन, राजीव बात्रा, आशा जैन आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विद्यार्थ्यांनी कॉलेजचे ऋण जपावे’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'विद्यापीठीय शिक्षणातून सक्षम विद्यार्थी घडला पाहिजे. पदवी प्राप्त केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांने सामाजिक बांधिलकी जपून समाजाचे आणि कॉलेजचे ऋण जपावे' असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. एन. डी. पाटील यांनी केले. राजर्षी शाहू कॉलेजतर्फे आयोजित पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. शाहू कॉलेजचे प्राचार्य सी. जे. खिलारे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.

विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांची विशेष उपस्थिती होती. पदवी प्रदान समारंभासाठी २११ स्नातकांनी नोंदणी केली होती. बीएभाग तीनच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत चतुर्थ क्रमांक मिळविलेल्या रुबीना बशिर मुल्ला या विद्यार्थिनीला प्रथम पदवी प्रदान करण्यात आली.

प्राचार्य होनगेकर म्हणाले, 'एक चांगला माणूस व चांगला नागरिक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विद्यापीठाच्या पदवीमुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणा लाभते.'

कॉलेजमधील परीक्षा विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. समाधान जाधव यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य प्रा. आर. पी. देठे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. एम. बी. शेख, माजी प्राचार्य टी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'ज्ञान हीच शक्ती आहे. नव्या जगात प्रवेश करताना ज्ञानाबरोबर व्यक्तिमत्वे घेऊन चला. विद्यार्थ्यांनी नवनवीन आव्हानांचा स्वीकार करावा आणि ती आव्हाने पार पाडण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब करावा' असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी केले. भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलतर्फे आयोजित पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे ते बोलत होते.

भारती विद्यापीठाचे विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. विजय घोरपडे प्राचार्य एच. एन. मोरे, प्राचार्य मंगला पाटील, प्रभारी प्राचार्य उदय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित भारती विद्यापीठ इंजिनीअरिंग कॉलेज ऑफ कोल्हापूर, भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज, लॉ कॉलेज कोल्हापूर आणि कराड येथील ४६१ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकलेल्या ४४ विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. प्रा. व्ही. टी. कोरीशेट्टी व प्रा. पी. एस. माळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ए. आर. कित्तूर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिर्डी, बुलडाण्यासाठी अद्याप आग्रह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

'लोकसभा लढण्यासाठी आणखी तीन उमेदवार आमच्याकडे आहेत. पण, वादात असलेली जागा आम्हाला नको आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, अहमद पटेल, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही तसे कळविले आहे. शिर्डी किंवा बुलडाणा यांपैकी एक दिली तरी घ्यायला तयार आहोत,' असे स्पष्टीकरण स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे दिले.

सांगलीच्या जागेसाठी स्वाभीमानीकडून निवृत्त अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी उमेदवारीला होकार दिला पण नंतर नकार दिला, असेही ते म्हणाले.

काँग्रेसने उद्यापर्यंत फैसला करावा अन्यथा स्वाभीमानी एकट्याने लढण्यास तयार आहोत, असा इशारा देऊन शेट्टी म्हणााले, 'आघाडीतून बाहेर पडलो याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभा करुन भाजपला हद्दपार करण्यासाठी सज्ज असलेल्या मित्रांना अडचणीत आणणार नाही. काहीही करुन महाराष्ट्रातून कमळ हद्दपार करायचे आहे. कालपरवापर्यंत चौकीदार चोर आहे, असे म्हणणारे उद्धव ठाकरे चौकीदाराचा सन्मान करत आहेत, अशांनी सत्तेवर येण्याचा अधिकार गमावला आहे.'

.. .. .. .

मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजू शेट्टी चोरांच्या आळंदीला निघालेत, अशी टीका केली होती. त्यांच्या टिकेला उत्तर देताना शेट्टी म्हणाले, 'विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना एक लाख कोटीच्या जागा काही बिल्डरांच्या घशात घातल्या. त्याचा आर्थिक लाभ म्हणून दहा हजार कोटींपैकी पाच हजार कोटी मुख्यमंत्र्यांना पोहच झाले, असा आरोप केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विखेंना पन्नास कोटींच्या अब्रूनुकसानीची नोटीस धाडली होती. असे असताना विखेंचा मुलगा सुजय यांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली, हे कसे घडले, नेमके काय झाले?, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

-- -- -- ---

नोंदणीकृत पक्षाला मान्यता हवी

शेट्टी म्हणाले, 'स्वाभीमानी पक्ष नोंदणीकृत आहे. पण, मान्यताप्राप्त नसल्याने एक चिन्ह कायम राहण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे दोन खासदार किंवा सहा टक्के मतदान आवश्यक आहे. म्हणून आम्हाला दोन जागा लढवाव्या लागणार आहेत. पक्षाला मान्यता मिळाली तर स्थानिक निवडणुकांमधून कार्यकर्त्यांना न्याय देता येणार आहे.

-- -- -- --- --

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धामोड भागातील जंगलात आग

$
0
0

राधानगरी : धामोड, बुरबाळी (ता. राधानगरी) परिसरात अज्ञात व्यक्तींकडून वणवे लावण्याचे सत्र सुरू आहे. बुरबाळी ते दुर्गमानवड रस्त्यावर वणवे लावल्यामुळे रस्त्याकडेची धामोड भागातील जंगलातील पन्नासहून अधिक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. राधानगरी तालुका डोंगररांगांच्या कुशीत वसला आहे. जंगली परिसर मोठा असल्याने पडसर जागेत उन्हाळ्यात आगी लावण्याचे प्रकार होतात. पण यावर्षी मोठी झाडे पाहून आगी लावण्याचे प्रकार संशयास्पद घडत आहेत. रविवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने दुर्गमानवाड-धामोड रस्त्यावर ऑस्ट्रेलियन बाभळीच्या झाडाशेजारी आग लावली. रात्रभर परिसरात आग सुरू असल्याने मोठी झाडे पेटून रस्त्यावर पडली आहेत. सोमवारी दुपारपर्यंत आग सुरू होती. धामोड परिसरातील नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. लाकूड तस्करांकडून आग लावली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदयात्रेद्वारे शक्तीप्रदर्शन करून सुशीलकुमार शिंदेंचा अर्ज दाखल

$
0
0

पदयात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन करून

सुशीलकुमार शिंदेंचा अर्ज दाखल

राष्ट्रवादीसह लिंगायत समाजातील बडे नेते पदयात्रेत सहभागी

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी सकाळी आपला उमेदवारी अर्ज भरला. पदयात्रेत पत्नी उज्ज्वलाताई शिंदे, कन्या आमदार प्रणिती शिंदे, ज्येष्ठ कन्या स्मृती शिंदे-पहाडिया यांच्यासह आघाडीतील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व लिंगायत समाजातील बडे नेते सहभागी झाले होते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्यासह कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चार हुतात्मे, अहिल्यादेवी होळकर, मनपा आवारातील इंदिरा गांधी यांना अभिवादन केले. त्या नंतर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शिंदे यांचे चार हुतात्मा पुतळा चौकात आगमन झाले. त्या ठिकाणी शिंदे गाडीतून उतरताच त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. त्यानंतर पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, धर्मराज काडादी, राजशेखर शिवदारे, गटनेते चेतन नरोटे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, महिला शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर, माजी महापौर आरिफ शेख, सुशीला आबुटे, नलिनी चंदेले, अलका राठोड, इंदुमती अलगोंडा-पाटील, सुधीर खरटमल, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा, गणेश डोंगरे, बाबा करगुळे, सिद्धाराम चाकोते यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, प्रवक्ते मनोहर सपाटे, माजी महापौर सुभाष पाटणकर, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, जितेंद्र साठे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सुनीता रोटे, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान, प्रा. श्रीनिवास कोंडी, जावेद खैरदी, सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार आदी सहभागी झाले होते.

'मेक आणि फेक'ची निवडणूक

'केवळ वडिलांसाठीच नाही तर काँग्रेस पक्ष आणि देशासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. मेक आणि फेकची ही निवडणूक आहे. आपल्या आयुष्यातील आणि देशाचे अस्तित्व वाचविण्याची ही निवडणूक आहे. देशाला मजबूत करण्यासाठी सर्वांनी काँग्रेसला मतदान केले पाहिजे. लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यातील ही निवडणूक आहे,' असे आमदार प्रणिती शिंदे यांनी या वेळी बोलताना सांगितले.

...

आघाडीचा धर्म पाळणार

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. त्यामुळे सोलापुरात राष्ट्रवादी पक्ष आघाडीचा धर्म पाळणार आहे. सुशीलकुमार शिंदे सोलापूर लोकसभेतून भरघोस मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी व्यक्त केला.

....

देशात लोकशाही गाडून टाकण्याचे भाजपचे काम

देशात आणि राज्यात भाजप सरकारकडून हुकूमशाही आणण्याचे काम सुरू आहे. देशातील लोकशाही गाडून टाकण्याचे काम भाजपकडून होते आहे. अशी हुकूमशाही आम्ही चालू देणार नाही. माझी लढाई २०१९साठी अत्यंत महत्त्वाची आहे. जात आणि धर्माच्या नावावर मते मागणाऱ्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिले पाहिजे. एकीकडे धर्माच्या नावावर मते मागण्यात येत आहेत, तर दुसरीकडे बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम आंबेडकरांचे नातू करीत आहेत. एमआयएम पक्षाबरोबर आंबेडकरांनी आघाडी केली आहे. त्यामुळे सर्वधर्माच्या काँग्रेस पक्षाला निवडून देण्याची गरज आहे. जाती आणि धर्माच्या नावावर सोलापूरकर कधीच मतदान करणार नाहीत. त्यामुळे विजय माझाच होईल, असेही शिंदे म्हणाले.

----

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावपातळीवर एंडोस्कोपी तज्ज्ञ हवेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

'सध्या अन्ननलिका आणि जठराच्या कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचे निदान वेळीच होण्यासाठी गाव आणि तालुका पातळीवर एंडोस्कोपी सेंटरची संख्या वाढविण्याचा सरकारचा व आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हा, तालुका, गावोगावी एंडोस्कोपी तज्ज्ञ तयार व्हावेत,' असे प्रतिपादन असोसिएशन ऑफ सर्जिकल सोसायटी मुंबई चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. रॉयसुनील पाटणकर यांनी केले. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये झालेल्या अन्ननलिका आणि जठराची एंडोस्कोपी या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

डॉ. पाटणकर म्हणाले, 'आजही अनेक ठिकाणी तालुका आणि गावपातळीवर एंडोस्कोपी केली जात नाही. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी द असोसिएशन ऑफ सर्जिकल सोसायटीने पुढाकार घेतला असून खेडेगावात, वाड्या-वस्त्यांत आणि नक्षलग्रस्त भागातही एंडोस्कोपीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे जठर आणि आतड्याच्या कॅन्सरचे लवकर निदान होण्यास मदत होऊन वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे.'

कार्यशाळेंतर्गत अन्ननलिका आणि जठर तपासणी शिबिर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले. यावेळी ३३ गरजू रुग्णांनी मोफत एंडोस्कोपीचा लाभ घेतला. यासाठी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले. डॉ. अनिरुद्ध चाफेकर, डॉ. अभय चौगुले, डॉ. प्रतापसिंह वरुटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शल्यचिकित्सक डॉ. वसंत देशमुख, डॉ. मानसिंग घाटगे, डॉ. मेघराज इंगळे, डॉ. वैशाली गायकवाड आदी उपस्थित होते.

फोटो ओळ.....

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये झालेल्या 'अन्ननलिका आणि जठराची एंडोस्कोपी' या विषयावरील कार्यशाळेत बोलताना डॉ. रॉयसुनील पाटणकर. व्यासपीठावर डावीकडून डॉ. प्रतापसिंह वरुटे, डॉ. अभय चौगुले, डॉ. मानसिंग घाटगे, डॉ. वसंत देशमुख, डॉ. अरुण कणबरकर.

फोटो : राहुल मगदूम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षयरुग्णांची मोफत तपासणी मोहीम

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. कोल्हापुरात दरवर्षी सरासरी दीड हजार क्षयरुग्णांचे निदान होते. गेल्यावर्षी यापैकी ११६७ क्षयरुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, महापालिकेतर्फे क्षय रुग्णांची मोफत तपासणी व औषध उपचार केले जातात. गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

दरम्यान, क्षयरोग जागृती सप्ताहाला नुकतीच सुरुवात झाली. महापालिकेच्या विठ्ठल रामजी चौकात कार्यक्रम झाला. यावेळी अभिनेते हार्दिक जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत फ्लॅशमॉब झाला. 'सामान्य नागरिकांनी सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याशिवाय क्षयरोगाचे उच्चाटन होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी क्षयरोग उच्चाटनास हातभार लावा' असे आवाहन अभिनेते जोशी यांनी केले.

डॉ. पाटील म्हणाले, 'जागतिक आरोग्य संघटनेने २०३० तर भारताने २०२५ पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटनाचा निर्धार केला आहे. ट्युबरक्युलासिस नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. शरीराच्या कोणत्याही भागाला क्षयरोग होऊ शकतो. फुफ्फुसाचा क्षयरोग हा सर्वात जास्त आढळणारा क्षयरोग आहे. क्षयरोगाचे जंतू मुख्यतः हवेतून पसरतात. फुफ्फुसांचा क्षयरोग झालेला रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा क्षयरोगाचे जंतू सूक्ष्म तुषाराद्वारे हवेत पसरतात. ज्यावेळी जवळचा निरोगी मनुष्य श्वास घेतो, तेव्हा ते जंतू श्वासावाटे त्याच्या शरीरात प्रवेश करतात. त्या निरोगी मनुष्याला क्षयजंतूचा संसर्ग होतो. मात्र, संसर्ग झालेल्या सर्वच व्यक्तींना क्षयरोग होत नाही. संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या शरीरात हे जंतू वर्षानुवर्षे सुप्त अवस्थेत राहतात. त्यामुळे या आजारापासून काळजी घेणे हाच उपाय आहे.'

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'महापालिका व क्षयरोग नियंत्रण सोसायटीने क्षयरोग मुक्त कोल्हापूर करण्याचे उद्दिष्ट ठेवून वाटचाल सुरू आहे. यामध्ये खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनी सहभाग नोंदविला आहे. खासगी हॉस्पिटलच्या सहभागाने जनजागृती, प्रभात फेरी, पोस्टर स्पर्धा, पथनाट्य, संवाद सभांचे आयोजन केले आहे.'

पत्रकार परिषदेस वैद्यकिय अधिकारी डॉ. योगिनी कुलकर्णी यांच्यासह वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणेवाडी टोलनाक्यावर पुण्याच्या टोळीचा गोळीबार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

आनेवाडी टोल नाक्यावर रविवारी मध्यरात्री टोल मागितल्याच्या कारणावरून पुणे येथील एका टोळीने गोळीबार केला. टोलनाक्यावरील एका कर्मचाऱ्याला संबंधितांनी दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती आटोक्यात आली. या हल्ल्यात विशाल दिनकर राजे (रा. लिंब) जखमी झाला आहे.

आनेवाडी टोल नाक्याच्या बुथ क्रमांक एकवर रविवारी रात्री एक वाजता स्विफ्ट कार (एम.एच.१२ एन.जे ३०२) ही कार टोल न भरता पळून जात होती. या वेळी या कारला टोल बूथवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अडवून धरली. दरम्यान, या कारच्या पाठीमागून आलेल्या फॉर्च्यूनर गाडीतील पाच ते सहा जण होते, त्यांच्यापैकी रोहिदास उर्फ बापू चोरगे (रा. पुणे) यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने टोल नाका कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला.

संबंधित कर्मचारी जीव वाचवण्याच्या आकांताने पळून जाऊन आडोशाला लपला. त्यातील एक कर्मचारी विशाल दिनकर राजे (रा. लिंब) पळताना पडल्याने संबंधितांनी त्यास दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान व्‍यवस्‍थापक विकास शिंदे यांनी चोरगे यांच्या हातातील पिस्तूल काढून घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी भुईंज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्याम बुवा, पीएसआय दुर्गा नाथ साळी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्यानंतर जखमींना सातारा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. या प्रकरणी तपासासाठी पथक रवाना करण्यात आले. मध्यरात्री घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा प्रशासन हादरले असून, जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख धीरज पाटील, वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित ठीके, स्थानिक गुन्हा शाखेचे सर्व अधिकारी पहाटेपर्यंत टोल नाक्यावर होते. या बाबत भुईंज पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत ‘स्वाभिमानी’ला मिळेना उमेदवार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाआघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संघटनेला हातकणंगले आणि सांगली लोकसभा मतदारसंघ देण्यात आला. हातकणंगले मतदारसंघातून स्वत: खासदार राजू शेट्टी यांची उमेदवारी असली, तरी सांगली मतदारसंघासाठी संघटनेला उमेदवार मिळेना झाला आहे. हे संघटनेचे अपयश आहे की संघटनेच्या नेतृत्वाने खेळलेली जाणीवपूर्व खेळी आहे, याची जोरदार चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.

ऊस आंदोलनाच्या माध्यमातून तयार झालेली संघटना म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे पाहिले जाते. सुरुवातीस कोल्हापूर आणि नतंर पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात संघटनेने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएसोबत असलेल्या खासदार शेट्टी यांनी नंतर नरेंद्र मोदींच्या शेतकरी धोरणांवर कडाडून टीका करत सवतासुभा मांडला. साडेतीन-चार वर्षे टिकेची झोड उठवताना शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या महाआघाडीत सामील झाले. आघाडीत सहभागी होण्यासाठी त्यांनी प्रथम सहा जागांची मागणी केली. नंतर त्यांची दोन जागांवर तडजोड झाली.

खासदार शेट्टी यांनी हातकणंगलेसह वर्धा व बुलढाणा या दोन लोकसभेच्या जागांपैकी एका जागेची मागणी केली. या मतदारसंघातून युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या रुपाने चांगले नेतृत्वही मिळणार होते. पण तडजोडीमध्ये दोन्ही मतदारसंघाऐवजी सांगली मतदारसंघ संघटनेला देण्यात आला. याविरोधात काँग्रेसमध्ये जे पडसाद उमटायचे ते उमटले. पण त्यापेक्षा संघटनेची अवस्था सक्षम उमेदवार नसल्याने केविलवाणी झाली आहे.

संघटनेतून कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासारखे नेतृत्व बाहेर पडल्यामुळे संघटनेला सक्षम कार्यकर्ता नसल्यासारखी स्थिती झाली आहे. त्यामुळेच निवृत्त अधिकारी इंद्रजित देशमुख, गोपीचंद पडळकर यांच्यामागे संघटना पिंगा घालत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. खोत यांच्यासारखे नेतृत्व संघटनेतून बाहेर पडल्यानंतर येथे त्याच तोडीचे नेतृत्व निर्माण करण्याची गरज होती. मात्र, संघटनेत नेतृत्व तयार झाले नाही असे म्हणण्याऐवजी होऊ दिले नाही अशी स्थिती आहे. संघटनेत आपल्यापेक्षा कोण वरचढ नको किंवा भविष्यात अशा नेतृत्वाकडून आव्हान मिळू नये, याच भावनेतून नवे नेतृत्व तयार होऊन दिले नसल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात आहे. मात्र, या स्थितीमुळे आघाडी अंतर्गत मतदारसंघ मिळुनसुद्धा संघटनेला उसन्या उमेदवारांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात संघटनेची निर्माण झालेली स्थिती हे संघटनेचे अपयश म्हणायचे की नेतृत्वाची खेळी याचे उत्तर येणारा काळच देईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

sushilkumar shinde : प्रणिती आणि मला भाजपची ऑफर होतीः सुशीलकुमार शिंदे

$
0
0

प्रतिनिधी, सोलापूर

भाजपकडून मला आणि कन्या प्रणिती शिंदे यांना ऑफर होती, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय. एका वृत्तवाहिनीला शिंदे यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत शिंदे यांनी हा दावा केला. पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे आपण भाजप प्रवेशाची ऑफर धुडकावून लावल्याचं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

भाजपच्या एका बड्या नेत्याची ऑफर होती. भाजपचा संबंधित नेता हा माझ्या तोडीचा होता, असं सांगत शिंदेंनी त्यांचं नाव जाहीर करणं टाळलं. आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर नाकारली, अस शिंदे यांनी स्पष्ट केलं. सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या सोलापुरातून काँग्रेस आमदार आहेत. प्रणिती यांनाही वारंवार भाजपप्रवेशाच्या ऑफर येत असल्याचा दावा सुशीलकुमार शिंदेंनी केलाय.

सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबतही शिंदे यांनी मत व्यक्त केलं. प्रत्येकाला करिअर करायचं असतं. उमेदवारीवरून नाराजी म्हणून तरुण नेते पक्ष बदलत आहेत. वैचारिक भूमिका आहे. पण मुलांना स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र, राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसचे प्रामाणिक नेते आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images