Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सतेज पाटलांचा विरोध कायम

$
0
0

सतेज पाटील बैठकीला अनुपस्थित

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात यापूर्वी प्रचाराला सुरुवात केली आहे. या दोघांमध्ये पॅचअप करण्यासाठी रविवारी जयंत पाटील कोल्हापुरात होते. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला त्यांनाही आमंत्रित केले होते. मात्र, आमदार पाटील यांनी बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यांचे समर्थक पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनीही मेळाव्याकडे पाठ फिरवली. दरम्यान, जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी 'सतेज पाटील हे सांगली, सातारा येथील पक्षाच्या बैठकीसाठी गेल्याने उपस्थित राहू शकले नाहीत' असा खुलासा बैठकीत केला. तर राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजू लाटकर हेही गैरहजर राहिले.

मेळाव्याआधी नेत्यांची खलबते

दरम्यान, काँग्रेस कमिटीत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याआधी जयंत पाटील, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, खासदार धनंजय महाडिक यांची बंद खोलीत चर्चा झाली. यामध्ये मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी महाडिक यांच्या ताराराणी चौक परिसरातील प्रचार कार्यालयात प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये खलबते झाली.

बोलणारा खासदार संसदेत हवा

'धनंजय महाडिक हे कर्तबगार खासदार आहेत. त्यांना आणि खासदार सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला. त्यांच्यासारखा बोलणारा खासदार संसदेत जाणे अत्यावश्यक आहे. राजकारणात काही गोष्टी वर-खाली होतात. गैरसमज संपवूया. सर्वांना विनंती करण्यासाठी काँग्रेस कमिटीत आलो आहे. दोन्ही आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा म्हणजे प्रचाराची सुरुवात आहे' असे जयंत पाटील यांनी सांगितले. त्यावर हसन मुश्रीफ यांनी आवाडे यांच्याकडे पाहत, 'आम्ही महापालिका आणि जिल्हा परिषदेत एकत्र आहोत' असे सांगितले. त्यावर, 'एकत्र आहात, पण सगळ्यांना घेऊन पुढे चला' अशी टिप्पणी जयंत पाटील यांनी करताच मेळाव्यात हशा पिकला. दरम्यान, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीने शाब्दिक कोट्या रंगल्या. 'मांडव काँग्रेसचा, मुलगा राष्ट्रवादीचा' इथपासून ते 'लग्नात नक्कीच जेवायला घालू' असा संवाद रंगला होता.

बैठकीला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, राहुल आवाडे, सुभाष सातपुते, राजू आवळे, भैय्या माने, रामराजे कुपेकर, बाळासाहेब सरनाइर्क, माजी स्थायी सभापती आदिल फरास, नगरसेवक संदीप कवाळे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, रमेश पोवार, महिला आघाडीच्या चंदा बेलेकर, सुप्रिया साळोखे, संध्या घोटणे, संगीता खाडे, वहिदा मुजावर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अॅड. आंबेडकरांची भाजपला मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर भाजपला मदत करीत आहेत,' असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोंगेंद्र कवाडे यांनी केला. एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रा. कवाडे म्हणाले, 'निवडणुकीच्या तोंडावर अॅड. आंबेडकर यांनी आघाडीची स्थापना केली. त्यास भाजप रसद पुरवत आहेत. त्यांच्या उमेदवारांमुळे भाजपचाच अधिक फायदा होईल. भाजप सरकार पाच वर्षांत एकही आश्वासन पुर्ण करू शकलेले नाही. सर्वच पातळींवर अपयशी ठरले. यामुळे मतदारांनी या निवडणुकीत त्यांना घरी बसवावे. निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. तरीही मतदार सूज्ञपणे चांगल्या उमेदवारांची निवड करतील. मतदार विकत घेण्याचा डाव यशस्वी होणार नाही. लोकशाहीमध्ये सर्वकाही पैशाच्या जोरावर विकत घेता येत नाही. नव्या मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यावरील आवाहनाला बळी पडून युवा मतदारांनी मतदान करू नये. पीपल्स रिपब्लिकन पार्टी अधिकृतपणे काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आहे. याच उमेदवारांच्या पाठीशी राज्यातील सर्व कार्यकर्ते असतील.

आठवलेंचे अपयश

भाजप सरकारमध्ये रामदास आठवले मंत्री आहेत. त्यांनी पाच वर्षात वंचित घटकांचा सर्वांगीण विकास केला नाही. अपेक्षित असे त्यांनी प्रयत्नही केले नाहीत. म्हणून यावेळी वंचित घटक त्यांच्यासोबत नसतील, असेही प्रा. कवाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाडे बारामती, शिरूरचे समन्वयक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

लोकसभा निवडणुकीसाठी बारामती व शिरूर या दोन मतदारसंघांचे समन्वयक म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांची निवड केली आहे. या दोन लोकसभा मतदारसंघांचे समन्वयक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही अशाच पद्धतीने निवड केली जाणार असून, दोन्ही समन्वयक मिळून आघाडीच्या उमेदवारांशी संपर्क साधतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र : विजय जाधव

$
0
0

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र

- विजय जाधव

०००००

सरळ लढती, तिरकस राजकारण!

०००००

ही निवडणूक भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी निर्णायक असेल. सांगली, सोलापूर राखण्याबरोबरच कोल्हापूर, सातारा, हातकणंगले, माढ्यात झुंजावे लागेल. राष्ट्रवादीसमोरसुद्धा हे आक्रमण परतवून लावण्याचे आव्हान आहे. सातारा, कोल्हापूरची जागा राखण्यासाठी पक्षाची कसोटी लागणार आहे. भाजप-सेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात सरळ सामना रंगणार आहे. अपेक्षेप्रमाणे सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का बसला!

०००००

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून दक्षिण महाराष्ट्रात तब्बल त्रेचाळीस दिवसांचा अवधी मिळाल्याने पक्ष, उमेदवारांना ऐनवेळच्या रणनीतीला चांगलाच वेळ मिळाला. निवडणुकीचे मैदान स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने याचा फायदा उठवत, चाचपणी करत अखेर उमेदवार जाहीर केले. अपवाद काँग्रेसचा आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचा. विरोधी काँग्रेस आघाडीपेक्षा खरी परीक्षा होती ती सत्ताधारी भाजप आघाडीचीच. केंद्रीय राजकारणाचे आणि त्यासाठीच्या नियोजनाचा भाग म्हणून सत्ताधारी आघाडीने 'जर-तर'च्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारीही ठेवली. यामुळेच युतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारीही भाजपने घेतली. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी ती स्वीकारली आहे. यापैकी किती नव्या जागा घेणार आणि पक्षाला बळ पुरवणार, यावरच त्यांची राजकीय ताकद दिसून येणार असल्याने ते पहिल्या दिवसापासूनच कामाला लागले आहेत. निवडणूक यंत्रणा कामाला लावण्यात त्यांनी बरेच अंतर पार केले.

शरद पवार यांच्या शब्दाखातर राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक अखेर पक्षातच राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपात येण्याचे निमंत्रणही त्यांनी नाकारले. त्यांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या भाजपला अखेरच्या क्षणी सेनेच्या उमेदवारासाठी प्रचार करण्याची वेळ आली. महाडिक आमचे उमेदवार असतील, असे सूचित करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना महाडिक यांनी अखेर राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतल्याने अडचणीचे झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी दक्ष राहत सर्व शक्यता गृहित धरून नियोजन केले. युतीची घोषणा झाल्याबरोबर लगेचच त्यांनी प्रचाराची सूत्रे हालवायला सुरुवात केली. महाडिक मित्र असले तरी मैत्रीपेक्षा युतीधर्म महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. फार मोठे सैन्य नसतानाही माहीतगार उमेदवार, सेनेचा काही भागावर असलेला प्रभाव आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाचा नेमका राजकीय लाभ उठवत त्यांनी मोर्चेबांधणी केली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही पहिल्या दिवसापासूनच महाडिकांविरोधात काम सुरू केल्याने सेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी तयार राजकीय पार्श्वभूमी मिळाली.

सतेज पाटील गट आक्रमक

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या निर्णयाला सुरुंग लावत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी खासदार महाडिक यांच्याविरोधात बंडाचे निषाण खांद्यावर घेतले. पाडापाडीच्या राजकारणाचा जुना राग मनात धरून त्यांनी यावेळी पक्ष खुंटीला टांगून उघड भूमिका घेतली. पक्षाच्या पातळीवर सुटका करून घेण्यासाठी सातारा, सांगलीची जबाबदारी घेतली असली तरी ते काय करत आहेत, हे लपून राहिलेले नाही. आघाडीच्या कोल्हापूरच्या बैठकीत त्यांची अनुपस्थिती जाणवणारी होती. डॉ. डी. वाय. पाटील यांना राष्ट्रवादीत आणण्याचे राजकारण झाले असले तरी त्यातून फारसे काही साध्य झाल्याचे दिसत नाही. सतेज पाटील यांनी आधीच विरोधाचा पवित्रा घेतल्याने आता पुढे काय, हा प्रश्न उरला नाही. सतेज पाटील यांच्या या नव्या भूमिकेने आघाडीचे नेते मात्र चिंतेत आहेत. त्यांची ही भूमिका सतेज यांना आगामी राजकारणासाठी अडचणीची ठरू शकेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे; पण ते आता कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नसावेत!

अजून बराच मोठा टप्पा असला तरी निवडणुकीचे राजकारण हळूहळू तापू लागले आहे. यात 'गोकुळ'चा मल्टिस्टेटचा विषय चर्चेत आला आहे. खुपिरेच्या सभेत ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांनी या निवडणुकीत धनंजय पडले तर खुपिऱ्याचे राजकारण तर संपेलच; पण महाडिक आणि गोकुळचे राजकारणही संपेल, असा निर्वाणीचा सूर काढत कार्यकर्त्यांना गाफील न राहण्याचा सल्ला दिला आहे. गोकुळच्या मल्टिस्टेट प्रकरणात झालेल्या सभेच्या राजकारणाचीही उजळणी घेतली आहे. त्यावेळी मल्टिस्टेटला विरोध करणाऱ्यांची फळी सांभाळणारे सेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांना विधानसभेला पाडण्याचा विडाही त्यांनी उचलला आहे. यामुळे महाडिकविरोधी राजकारण आणखी टोकदार झाले आहे. यातून महाडिकसमर्थकांना स्थानिक पातळीवर बळ मिळाले असले तरी ही निवडणूक गोकुळची, विधानसभेची की लोकसभेची, असा प्रश्न विचारला जात आहे, तो रास्तच!

मोठा बॉम्ब कुठला?

यापूर्वी राजकीय चमत्काराची भाषा करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मोठा बॉम्ब फोडण्याचे सूतोवाच केले आहे. डॉ सुजय विखे-पाटील, डॉ. भारती पवार, रणजितसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यानंतर राज्यात आणखी कोण गळाला लागले? हे स्पष्ट झाले नसले तरी आता मोठा बॉम्ब कोणता, हे लवकरच स्पष्ट होईल. सांगलीतून भाजपने विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच उमेदवारी दिली. अंतर्गत धुसफूस आणि काँग्रेसमधील बेदिली लक्षात घेता उमेदवार बदलाची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, तो धोका न पत्करता पक्षाने संजय पाटील यांच्यावरच विश्वास दाखविला. ही जागा परत मिळविण्याचे आव्हान चंद्रकांत पाटील यांच्यासमोर असेल.

खासदार महाडिक यांनी मंडलिक हेच विरोधी उमेदवार असणार हे गृहित धरून मोर्चेबांधणी केली असली तरी सतेज पाटील यांचा विरोध, भाजप-सेना युतीचा समोर असणारा उमेदवार यामुळे त्यांच्यासमोरचे आव्हान वाढले आहे. निवडणूक एकतर्फी होणार असे तयार झालेले दोन महिन्यांपूर्वीचे चित्र पालटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी सहभागी झाले आहेत. त्यांचा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगलाच प्रभाव आहे. यामुळे ते प्रचारात किती ताकदीने उतरतात, माजी आमदार महादेवराव महाडिक 'गोकुळ'वरून कोणता पवित्रा घेतात, 'भागिरथी'च्या महिला घरच्या राजकारणात आपल्या मताचा कसा वापर करतात, विकासाच्या स्थानिक प्रश्नांची चर्चा कशी होते, यावरच निवडणुकीचे वातावरण तापणार आहे. आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडेलच, लढती सरळ असल्या तरी राजकारण तिरकस आहे!

\Bविशेष :\B भाजप-शिवसेना महायुतीने कोल्हापुरातून निवडणूक प्रचाराची दणक्यात सुरुवात केली. सभेस झालेल्या गर्दीने महायुतीला बाळसे आले असले तरी ती मतांमध्ये परावर्तित करण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे. सांगलीत काँग्रेसच्या पोकळ बालेकिल्ल्यालाही दिवंगत वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांनी सर्व पदांचे राजीनामे देत हादरा दिला आहे. काँग्रेसच्या विसंवादी आणि पराभूत मानसिकतेच्या राजकारणाचे ते फलित म्हणावे लागेल!

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजू शेट्टी गुरुवारीअर्ज दाखल करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी गुरूवारी (दि.२८) दसरा चौकातून बैलगाडी येत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याची जोरदार तयारी केली जात आहे. शक्तीप्रदर्शनाचे नियोजन केलेले नाही. मात्र मतदारसंघातून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते स्वत:हून मोठ्या संख्येने येतील. साध्या पध्दतीने अर्ज दाखल करणार आहे, असे खासदार शेट्टी यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सांगितले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेट्टी विरूध्द भाजप, शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यात खरी लढत होत आहे. यामुळे दोन्ही उमेदवार मतदारसंघातील गावे पिंजून काढत प्रचार यंत्रणा गतीमान केली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी खासदार शेट्टी उमेदवारी अर्ज दाखल करतील. ते गेल्यावेळेप्रमाणे यावेळी बैलगाडीतून येत उमदेवारी अर्ज दाखल करतील. सकाळी ११ ला उमेदवारी अर्ज भरण्याच्या फेरीला प्रारंभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुल्लडबाजांची दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शाहू स्टेडियमवरील चंद्रकांत चषक फुटबॉलच्या अंतिम सामन्यानंतर रविवारी दिलबहार तालीम मंडळ आणि पाटाकडील तालमी मंडळ फुटबॉल संघांच्या हुल्लडबाज समर्थकांत जोरदार दगडफेक झाली. अर्धा तास सुरू असलेल्या दगडफेकीत २५ हून अधिक वाहनांची मोडतोड झाली. यामध्ये प्रेक्षकांच्या गाड्यांनाही लक्ष्य करण्यात आले. अर्वाच्च्य शिवीगाळ करीत एकमेकांच्या अंगावर धावून जात फलक, कचरा कुंड्या, खुर्च्यांची फेकाफेकी करण्यात आली. यामुळे परिसरात काहीकाळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवला.

या दगडफेकीत खेळाडू कमलेश मराडिया गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम) विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान पीटीएम संघाने आघाडी घेतल्यानंतर दिलबहारसंघांच्या समर्थकांनी मैदानावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. यामुळे काहीकाळ खेळ थांबवावा लागला. त्यानंतर काही वेळाने सामना सुरू झाला व पीटीएमने सामना जिंकला. त्यानंतर दिलबहारच्या समर्थकांनी रेफ्रीने दिलेल्या निर्णयावर आक्षेप घेत गोंधळाला सुरुवात केली. पीटीएम आणि दिलबहारचे समर्थक परस्परांना अश्लील शिव्यांची लाखोली वाहत होते. त्यानंतर केएसएच्या कार्यालयात हुल्लडबाज तरुण घुसून रेफ्री अजिंक्य गुजर यांना जाब विचारू लागले. त्यावेळी त्यांना धक्का-बुक्की करण्यात आली.

कार्यालयातील चहाचे कप, कचराकुंडी फोडण्यात आली. तसेच एका पंचाला आरसा फेकून मारण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर स्टेडियमच्या बाहेर दोन्ही संघाचे समर्थक मोठ्या संख्येने जमले. एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपुरा फौजफाट असल्याने पोलिस बळाला न जुमानता दोन्ही बाजूंनी दगडांचा वर्षाव होऊ लागला. शिवाजी आणि शाहू स्टेडियमसमोर लावलेली दुचाकी, चारचाकी लक्ष्य करण्यात आली. काही दुचाकी खाली पाडून दगड घालण्यात आले. त्यामध्ये वाहनांची मोडतोड झाली. टेंबेरोडवरील वाहतूक विस्कळीत झाली. पावणेआठच्या सुमारास पोलिसांची कुमक दाखल झाली व त्यांनी लाठीमार करत जमाव पांगवला.

एसआरपीएफचा जवान जखमी

हुल्लडबाजांनी केलेल्या दगडफेकीत राज्य राखीव दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले. विकास हिवाळे असे कर्मचाऱ्यांचे नाव आहे. स्टेडियम परिसरातील रावणेश्वर मंदिर ते टेंबे रोडपर्यंत हुल्लडबाजांनी केलेल्या दगडफेकीत सुमारे २५ हून अधिक दुचाकी, चारचाकींची मोडतोड झाली. सुमारे अर्धा तास हा प्रकार सुरू होता. काही वेळानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही दाखल झाल्या. प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा, जुना राजवाडा पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाच हुल्लडबाजांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

सुरुवातील बंदोबस्त कमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासाठी ४०० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात होते. यामुळे सामान्यादरम्यान बंदोबस्तासाठी पोलिसांची संख्या कमी होती. पीटीएम, दिलबहारच्या हुल्लबाज समर्थकांची संख्या अधिक आणि पोलिसांची संख्या कमी असे चित्र होते. एकमेकांविरोधात जमाव आणि मधे पोलिस होते. यामधील काही पोलिसांनाही दगडाचा मार खावा लागला. जवळील एक विद्युतभारित तार तुटल्याने स्टेडियमसमोरील पथदिवेही बंद होते. हुल्लडबाजांनी याचाही गैरफायदा उठवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिलबहार, पीटीएम समर्थकांत धुमश्चक्री

$
0
0

प्रचंड दगडफेक, वाहनांची तोडफोड

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर रविवारी दिलबहार आणि पीटीएम संघांच्या हुल्लडबाज समर्थकांत जोरदार धुमश्चक्री झाली. तुफान दगडफेक करून प्रेक्षक आणि रहिवाशांनी पार्क केलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. स्टेडियमसमोरील व्हीआयपी गेटसमोर लावण्यात आलेली श्रीमंत शाहू छत्रपती यांची गाडीही (एमएच ०९ सीडब्ल्यू ४००० ) यातून सुटली नाही. त्यांच्या गाडीच्या समोरील काचेवर मोठा दगड मारण्यात आला. अर्धा तासाच्या धुमश्चक्रीमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

शाहू स्टेडियमवर तीन आठवड्यापासून फुटबॉलचे साखळी सामने सुरू आहेत. रविवारी स्पर्धेतील अंतिम सामना झाला. दिलबहारवर मात करीत पीटीएमने हा सामना जिंकला. विजेत्या खेळाडूंना सायंकाळी सहाच्या सुमारास बक्षीस वितरण केले जात होते. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे आदी मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरण अंतिम टप्प्यात आले असताना स्टेडियमबाहेरील दिलबहारचे समर्थक सामन्यावेळी रेफ्रीने दिलेल्या निर्णयावर आक्षेप घेत गोंधळ करू लागले. ५० ते ६० हुल्लडबाज समर्थक केएसएच्या कार्यालयात घुसले. त्यांनी विश्रांती कक्षात बसलेले रेफ्री अजिंक्य गुजर यांना धक्काबुक्की केली. हे समजताच स्टेडियमच्या बाहेरील पीटीएमचे समर्थकही एकत्र आले. दोन्हींकडून दगडफेक सुरू झाली. हुल्लडबाजांनी शिवाजी स्टेडियमसमोरील अनेक दुचाकी उलटवल्या. त्यावर मिळेल तो दगड घालण्यात आला. प्रफुल्ल जगताप यांनी पार्क केलेल्या स्कार्पिओच्या सर्व काचा फोडण्यात आल्या. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत हुल्लडबाज समर्थकांना पांगवले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. रात्री उशिरापर्यंत परिसरात पोलिस बंदोबस्त कायम होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

yuti's kolhapur rally: महायुतीची वज्रमूठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशात आणि राज्यात पुन्हा एकदा भगवा फडकविण्याचा निर्धार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीच्या कोल्हापुरातील संयुक्त प्रचार सभेत रविवारी करण्यात आला. बलशाली भारतासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापण्याचा निर्धार करत महायुतीची वज्रमूठ घट्ट करण्यात आली. 'देशाचा कारभार हा ५६ पक्षांच्या भरवशावर चालत नाही तर देश चालविण्यासाठी ५६ इंचाची छाती आवश्यक आहे, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला दिले. तर, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी संपूर्ण आयुष्यभर महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचे काम केले असून त्यांना भाजपमध्ये घेऊ नका, असा सल्ला यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीतर्फे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरात झाला. येथील तपोवन मैदानावर आयोजित जाहीर सभेच्या माध्यमातून महायुतीने प्रचंड शक्तीप्रदर्शन केले. या सभेला राज्यमंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री उपस्थित होते. या सभेला महायुतीचे घटक पक्षांचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची उमेदवारी घोषित केली.

'बारामतीच्या पोपटाच्या अंगावर एकही कपडा उरला नाही'अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले,' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात परिर्वतन सुरू आहे. देश बदलत आहे. हा बदललेला भारत घुसेगाभी और मारेगाभी हे सर्जिकल स्ट्राईक करुन दाखवून दिले आहे. मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, सुर्याकडे पाहून थुंकल्यावर थुंकी आपल्याच अंगावर पडते'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन्यथा भविष्यात अडचणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. स्थानिक राजकारण आणि मतदारसंघातील प्रश्नावरून त्यांचे खासदार धनंजय महाडिक यांच्याशी बिनसले. मात्र व्यक्तीपेक्षा विचार आणि पक्षीय राजकारण महत्त्वाचे आहे. त्यांनी मतदारसंघातील प्रश्नात आणि राजकारणात जास्त अडकून पडू नये. चुका दुरुस्त कराव्यात, आघाडीधर्मानुसार राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरावे, अन्यथा भविष्यात त्यांना अडचणी उद्भवू शकतात' असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतेज पाटील यांना रविवारी दिला.

कोल्हापूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनजंय महाडिक यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची काँग्रेस कमिटीत मेळावा झाला. याप्रसंगी ते म्हणाले 'भाजप आणि शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. त्यांच्या प्रचाराच्या सभा म्हणजे केवळ इव्हेंट असतो. त्यांनी राज्यात सभेचे असे कितीही इव्हेंट करू देत नागरिक त्यांना भीक घालणार नाहीत. कोल्हापुरात दोन्ही काँग्रेस एकसंधपणे काम करणार असल्यामुळे खासदार धनंजय महाडिक हे अडीच लाख मतांनी विजयी होतील.'

सतेज पाटील आणि महाडिक यांच्यातील वितुष्टाबाबत ते म्हणाले, 'सतेज पाटील यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे, त्यांनी स्थानिक राजकारणावरून काही प्रश्न मांडले आहेत. ते आघाडीच्या प्रचारात सामील व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस पक्षाचे नेतेही त्यांना अपेक्षित सूचना करतील. गरज भासली तर पुन्हा त्यांच्याशी स्वतंत्र बोलू, त्यांनी चुका दुरुस्त करुन प्रचारात सामील व्हावे. ते सहभागी झाले नाहीत तर त्यांना सोडून दोन्ही आघाडीचे नेते संयुक्तपणे लोकसभेसाठी प्रचार करतील.'

अडीच लाख लोक कुठून आणणार

तपोवन मैदान येथे युतीच्या प्रचाराच्या सभेसाठी अडीच लाख खुर्च्याची सोय आणि जंगी सभेच्या नियोजनाचा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यांच्या या विधानाची जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली ते म्हणाले, 'खोटे पण रेटून बोलायचे, मोठे आकडे सांगायचे ही भाजपच्या कामकाजाची पद्धत आहे. मुळात जे मैदान अडीच लाख क्षमतेचे नाही त्या सभेला अडीच लाख लोक कुठून आणणार शिवाय कोल्हापुरात भाड्याने अडीच लाख खुर्च्या मिळतात का? लोकांसमोर भपकेबाजपणा करायचा, भुलभुलैय्या निर्माण करण्यात भाजपची मंडळी पटाईत आहेत.'

पाच वर्षांत भाजपचा पाळणा हलला नाही

तिकीट वाटपावरुन राष्ट्रवादीत काही ठिकाणच्या नाराजीकडे लक्ष वेधल्यावर पाटील म्हणाले, 'राष्ट्रवादीने सामान्य कार्यकर्त्यांना तिकिटे दिली, त्याचे स्वागत करायला हवे. भाजपची गेली पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे. मात्र त्यांना जनमानसाचे प्रेम जिंकता आले नाही. भाजपाचा पाच वर्षांत पाळणाच हालला नाही. निवडणुकीत त्यांची सारी भिस्त आयाराम गयारामवर आहे. भाजपवाले दाम, दाम, दंड भेद या नीतीचा वापर व विरोधकांचे विक पॉईंट शोधून त्यांना पक्षात आहेत. बाहेरचे उमेदवार घेऊन ते निवडणूक लढवित आहेत. ज्यावेळी मूल होत नाही, त्यावेळी दत्तक घेण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाहावयास मिळेत. भाजपवाले सध्या तेच करत आहेत. आम्ही ज्यांना नाकारतो त्यांना ते मांडीवर घेऊन बसतात. जनाधार नसलेल्या मंडळींना घेऊन निवडणूक लढवित आहेत, निवडणुकीत नागरिक त्यांना योग्य धडा शिकवतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्टसर्किटने आंबोलीत कार जळून खाक

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ कारला आग लागली. बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत माहिती अशी : चेंबूर (मुंबई) येथून सहा युवक कार (एमएच-०१, सिझेड-०८७३) भाड्याने घेऊन गोवा पर्यटनासाठी आले होते. तेथून ते परत आंबोलीमार्गे मुंबईला जात होते. या दरम्यान येथील मुख्य धबधब्यानजीक कार आली असता गाडीच्या बॉनेटमधून अचानक धूर येऊ लागला. कारचालक प्रफुल्ल रणजित मोहिल (वय ४५) याने प्रसंगावधान राखत कारमधून सर्वांना बाहेर येण्यास सांगितले. त्यानंतर गाडीने बॉनेटच्या बाजूने पेट घेतला. हे दृश्य पाहून काही प्रवाशांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला. तासाभरात कार पूर्णपणे जळून खाक झाली. सचिन शिंदे (रा. चेंबूर) यांच्या मालकीची ही कार असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत सात लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत चालक मोहील यांनी आंबोली पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती दिली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Sharad Pawar: चौकीदारानेच देश खाल्ला; शरद पवारांचा आरोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

'मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी विकास व भ्रष्टाचाराचे रंजित मुद्दे उपस्थित करीत न खाऊंगा न खाने दुंगाचा नारा दिला. मात्र, नोटाबंदी, जीएसटी, फसव्या कर्जमाफीच्या माध्यमातून सरकारने सर्वसामान्य जनता, शेतकरी व छोट्या व्यापाऱ्यांना नेस्तनाबूत केले. त्यामुळे स्वतःला देशाचे चौकीदार म्हणणारेच खरे चोर आहेत. त्यांनीच राफेल हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा केला. देशाच्या चौकीदारानेच देश खाल्ला,' अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला.

दत्त चौकात रविवारी सायंकाळी आयोजित कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससह अन्य पक्षांच्या महाआघाडीच्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ सभेत ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे खासदार पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार श्रीनिवास पाटील, उमेदवार खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार राजू शेट्टी, जोगेंद्र कवाडे यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, 'पुलवामा हल्याचे लष्कर व नौदलाचे श्रेय स्वतः लाटून आपली छपन्न इंचाची छाती असल्याचा ढिंदोरा मोदी देशभर पिटत आहेत. मग, कुलभूषण जाधव दोन वर्षे शत्रू राष्ट्राच्या ताब्यात आहेत. त्यांना सोडवण्यासाठी छपन्न इंचाची छाती का दाखवली नाही. या थापाड्या सरकारला जनता वैतागली असून, हीच जनता आता या सरकारला त्यांची योग्य जागा दाखवेल. त्यासाठी लोकांनी मनाची तयारी केली असून, आता परिवर्तन अटळ असल्याने केंद्रातील सत्तेत घरी बसविण्याचे काम महाआघाडीला आपल्या माध्यमांतून करणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांचे संपूर्ण राज्यातील जनतेच्या मनावर गारुड असून, मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे.'

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'मागच्या निवडणुकीत लोकांना स्वप्न दाखवून सत्तेनंतर त्यांचा विश्वासघात केला. सर्वसामान्य लोक, शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांच्यावर अन्यायी धोरणे लादली. मात्र, आणखी पाच वर्षे जर मोदी सत्तेत राहिले तर देशातील लोकशाही संपुष्टात आणून त्या ठिकाणी हुकूमशाही निर्माण करतील. परंतु, मागच्या निवडणुकीत मतांची विभागणी झाल्याची चूक आम्ही पुन्हा करणार नाही.' उमेदवार उदयनराजे भोसले म्हणाले, 'गत विधानसभा निवडणुकीत मोदींनी विविध आश्वासने देत सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून लोकांची हायटेक फसवणूक केली. परंतु, सत्ता मिळवल्यानंतर मोदी सरकारने लोकांची पिळवणूक करून त्यांच्या स्वप्नांवर महागाईचा नांगर फिरवला. दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याची हमी देणाऱ्या मोदींनी देशात दोन कोटींपेक्षा जास्त लोकांना बेरोजगार केले आहे. त्यामुळे यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असून, या निवडणुकीकडे फक्त कोणालातरी निवडून आणण्यासाठी नव्हे तर एक चळवळ म्हणून पहा आणि देशातच नव्हे तर राज्यातही सत्तापरिवर्तन करा.'

या वेळी विधान परीषद सभापती ना.रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली. सर्व नेत्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समधीस्थळास अभिवादन केले.

चौकीदार निकम्मा है

छत्रपती शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून सत्ता मिळवणाऱ्यांना देशातून हद्दपार करण्याची गरज आहे. त्यामुळे हुकूमशाही मोडून काढण्यासाठीच उदयनराजे भोसले यांची उमेदवारी आहे. आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी मोदींनी चौकीदार मोहीम चालवली. मात्र, जर चौकीदार जागरूक असता तर पुलवामा हल्ला, राफेलची फाइल व देशाला लुटणारे लुटारू परदेशात पळून गेले नसते. त्यामुळे देशाचा चौकीदार निकम्मा आहे, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली.

जातीयवादांनी देशाला नागवं केलं

देश सध्या जातीयवादी, ब्राह्मणी, संघाच्या कचाट्यात सापडला असल्याने त्यातून देशात मुक्त करण्यासाठी महाआघाडी निर्माण करण्यात आली आहे. परंतु, युतीने देशाला भगवे करण्याचा चंग बांधला आहे. मात्र, ज्यांनी पाच वर्षांत देशाला नागावे करून टाकलंय, ते देश भगवा काय करणार, अशी घणाघाती टीका जोगेंद्र कवाडे यांनी केली.

कॉलर उडवलीच

उदयनराजे भोसले यांची शर्टची कॉलर उडविण्याची स्टाईल सर्वश्रुतच आहे. आजच्या कराडच्या आघाडीच्या प्रचार सभेतही उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना कॉलर उडविल्याने सभेत एकच जल्लोष झाला. मात्र त्या नंतर भोसले शरद पवार यांच्या जवळ जाऊन बसले, त्या वेळी दस्तुरखुदद्‌ शरद पवार यांनीच उदयनराजे भोसले यांच्या खांद्यावरील राष्ट्रवादीचा मफलर बाजूला सारत त्यांच्या शर्टची कॉलर आपल्या हाताने उडविल्याने सभेतील उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सभेत पुन्हा एकदा एकच जल्लोष केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्यांसह फळभाज्याही महाग

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

उन्हाचा तडाखा आणि कमी झालेली आवक यामुळे पालेभाज्यांच्या दरात प्रति पेंढी पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात फळभाज्यांचे वाढलेले दर या आठवड्यातही कायम आहेत. गवारीचा दर प्रतिकिलो १०० ते १२० रुपये असा झाला आहे.

मेथीची आवक कमी झाल्याने प्रतिपेंढी १५ ते २० रुपये दर झाला आहे. उन्हामुळे पालेभाज्यांच्या पानांवरही परिणाम झाला आहे. कांदा पातीचा दर प्रति पेंढी १० ते १५ रुपये झाला आहे. अंबाडीची आवक सुरू झाली असून प्रति पेंढी दहा रुपये दर आहे. त्याची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. पोकळा, करडा, पालक आणि शेपू पेंढीचा दर १० रुपयांवर स्थिर आहे. कोथंबिरही महागली असून प्रतिपेंढी २० ते ३० रुपये दराने विक्री सुरू होती. काकडीची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून दर मात्र प्रतिकिलो पाच ते दहा रुपयाने कमी झाला आहे. ४० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने काकडीची विक्री होत आहे. वांग्याचा दर प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांवर स्थिर आहे. कोबी व फ्लॉवर प्रतिगड्डा १५ ते ४० रुपयांना विकला जात आहे. ओली मिरची आणि आल्ल्याच्या दरातही प्रतिकिलो दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली. मिरचीचा दर प्रतिकिलो ६० ते ८० तर आल्याचा दर ८० ते १०० रुपये इतका आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रु.)

वांगी : ४० ते ६०

टोमॅटो : ३० ते ४०

भेंडी : ६० ते ८०

ढबू : ४० ते ५०

गवार : १०० ते १२०

दोडका : ४० ते ६०

कारली : ६०

वरणा : ५० ते ६०

मटार : ६० ते ७०

हिरवी मिरची : ६० ते ८०

फ्लॉवर : २० ते ४०

कोबी : १५ ते २५

०००

बटाटा : २० ते ३०

लसूण : ४०

कांदा : १५ ते ३०

००००

पालेभाजी दर (पेंढी रु.)

मेथी : १५ ते २०

कांदा पात : १० ते १५

कोथिंबीर :२० ते ३०

पालक : १०

शेपू :१०

अंबाडी : १०

०००००

फळांचे दर (प्रतिकिलो रु.)

सफरचंद : ८० ते १४०

डाळिंब : ४० ते ६०

मोसंबी : ३० ते ८०

चिकू : ५० ते ६०

द्राक्षे : ४० ते ६०

केळी : २० ते ६० (डझन)

जवारी केळी : २० ते ७० (डझन)

हापूस आंबा : ८०० ते १००० (डझन)

कलिंगड : १० ते ४० (प्रति नग)

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन जनावरांचा होरपळून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

तांबवे (ता. कराड) येथील गार्डेकर वस्ती परिसरातील शंकर गोविंद पाटील, कृष्णत माने, सुरेखा अशोक पाटील, प्रल्हाद लक्ष्मण पाटील, अमृत पाटील यांच्या जनावरांच्या शेडला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत तीन जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर नऊ जनावरे गंभीर भाजली आहेत. या आगीत दुचाकीसह अन्य साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे.

तांबवे गावाजवळच असलेल्या गार्डेकर वस्ती परिसरातील संबंधित शेतकऱ्यांच्या जनावरांच्या शेडला शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. शिवारात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांना धुराचे लोट दिसल्यानंतर त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने घटनस्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांना आगीची माहिती दिली. मात्र, वाऱ्याचाही जोर अधिक असल्याने आगीने लगेचच रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच गावातील तरुणांनी व ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले. तलाठी धराडे व ग्रामविकास अधिकारी टी. एल. चव्हाण यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणजित नाईक-निंबाळकरांचाआज भाजप प्रवेश?

$
0
0

रणजित नाईक-निंबाळकरांचा

आज भाजप प्रवेश?

सातारा :

माढा लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शनिवारी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोमवारी संध्याकाळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप उमेदवाराबाबत उत्कंठा लागून राहिली असतानाच शनिवारी फलटणमधील रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्या नंतर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात त्यांचा जंगी सत्कारही करण्यात आला होता. लोणंद येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेस बैठकीत निंबाळकर यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसला बळ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र, शनिवारी त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. सोमवारी सायंकाळी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा भाजप प्रवेश होणार आहे. त्यामुळे त्यांना माढा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळणार का? या बाबतच्या चर्चांना आता उधाण आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभम काटकरचे यश

$
0
0

कोल्हापूर : भारतीय औद्योगिक संस्थानतर्फे फेब्रुवारी २०१९मध्ये राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या 'गेट' परीक्षेत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीमधील विद्यार्थी शुभम सुनील काटकर यांनी यश मिळवले आहे. ही परीक्षा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एम. टेक. तसेच एम. फार्म प्रवेशासाठी घेतली जाते. काटकर यांना प्राचार्य एच. एन. मोरे, समन्वयक प्रा. डी. टी. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दर्जेदार समीक्षाग्रंथाला पुरस्कार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ख्यातनाम समीक्षक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. म. सु. पाटील यांचे कुटुंबीय व शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने दर दोन वर्षांनी 'डॉ. म. सु. पाटील पुरस्कार' दिला जाणार आहे. पुरस्कारासाठी पाटील कुटुंबीयांतर्फे पाच लाख रुपये शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आले. या देणगीच्या व्याजातून त्यांच्या नावाने मराठीतील दर्जेदार समीक्षाग्रंथास हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

म. सु. पाटील हे मराठीतील नामवंत समीक्षक असून मनमाड महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केले आहे. त्यांचे आजवर दहाहून अधिक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मराठी समीक्षा लेखन परंपरेत त्यांची समीक्षा मूलभूत स्वरुपाची आहे. त्यांच्या ग्रंथांना साहित्य अकादमीच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यांच्यानावे समीक्षा तसेच वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पाटील कुटुंबीयापैकी कवयित्री नीरजा, शंकर अय्यर, तृप्ती शंकर, अनुराधा मोकल यांच्या उपस्थितीत प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव विलास नांदवडेकर यांच्याकडे निधी दिला. याप्रसंगी साहित्यिक डॉ. राजन गवस, समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, वित्त व लेखाअधिकारी व्ही. टी. पाटील, प्राचार्य धनाजी कणसे, डॉ. व्ही. एन. शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त जागा नको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

'हव्या त्या जागा न देता वादात असलेली सांगलीची जागा घेण्याचा आग्रह केला जात आहे. वाद पूर्ण मिटवणार असाल तर सांगलीची जागा घ्यायला तयार आहे. काँग्रेसने उद्यापर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा स्वाभीमानी एकटी लढायला तयार आहे,' असा अल्टिमेटम खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.

स्वाभीमानीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सोमवारी सांगलीत बैठक झाली. त्यानंतर शेट्टी यांनी पत्रकारांसमोर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, 'आघाडीत सहभागी होण्याची चर्चा सुरु असताना प्राथमिक चर्चेत माढा, धुळे, बुलडाणा आणि जवळचे दोन मतदार संघ म्हणून कोल्हापूर, सांगली अशा सहा जागांची मागणी केली होती. त्यावेळी काँग्रेसच्याच काही नेत्यांनी सांगलीची जागा कशी मागता?, असा सवाल केला होता. नंतर मात्र सांगलीच घ्या म्हणून दबाव सुरु झाला. शेतकऱ्यांना न्याय देणारा नेता म्हणून वसंतदादा पाटील यांच्याबद्दलचा आदर आजही कायम आहे. प्रतिक पाटील हे धाकट्या भावासारखे आहेत. २०१४ मध्ये त्यांचा झालेला पराभव माझ्या जिव्हारी लागला. तेव्हापासून त्यांना मी तुमचा दिल्लीतला प्रतिनिधी आहे. संकोच करु नका, असा शब्द देऊन तो पाळला. असे असताना आमच्यातील संबंध का बिघडवले जात आहेत, हे समजत नाही. त्यातूनही जागा घेऊन प्रतिक पाटील यांनाच उमेदवारी देण्याची तयारी केली. पण, त्यांनी पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले तर विशाल पाटील यांनी आपल्याला खूप विरोधक आहेत आणि विधानसभेत रस असल्याचे सांगितले. तरीही आमच्याकडे आणखी तीन उमेदवार आहेत. काँग्रेसने उद्यापर्यंत फैसला करावा.'

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तरुणांना परदेशातील नोकरीसाठी संधी देणार’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'विधवा सक्षमीकरण अंतर्गत स्वयंरोजगारची संधी उपलब्ध करून देण्याबरोबर सेमी स्कीलमध्ये तरुणांना कुशल करुन त्यांना परदेशात संधी उपलब्ध करुन देणार येईल, असे प्रतिपादन परराष्ट्र खात्यातील निवृत्त सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. भारतीय जन संविधान मंच आणि कोल्हापूर कॉलिंगच्यावतीने 'चांगुलपणाची चळवळ' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल, निवृत्त पोलिस उप अधीक्षक मदन चव्हाण, अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री पूजा जैस्वाल, उद्योजक विरेन शहा, रघुविरसिंग राठोड, अनिल नानिवडेकर उपस्थित होते.

चांगुलपणाची चळवळ देशभर सुरु केली जाणार असून या चळवळीतून चांगल्या संस्थांच्या व व्यक्तींच्या कामांना उत्तेजन देणार आहे असे सांगून ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, 'सामाजिक परिवर्तनाची चळवळ विशिष्ठ ठिकाणी कुंठीत झाली असून शिक्षणाचा गुण विस्तार रखडला आहे. राजकीय विचारांची पातळी खाली गेली आहे. समाजात नकारात्मक, उदासिनता आली असून जुन्या प्रकारची चळवळ न करता चांगुलपणाची चळवळ केली जाणार आहे.'

'सकारात्मक कामााला प्रोत्साहन देत ही चळवळ सुरु करण्यात येणार आहे,' असा विश्वास व्यक्त करत मुळे म्हणाले, 'समाजातील चांगले काम करणारे लोक भितीने मागे जात आहेत. त्यांना प्रोत्साहन देऊन पुन्हा चळवळीत आणले जाईल. समाजातील सलोखा बिघडवण्याचे काम करणाऱ्यांशी सुरुवातील संवाद केला जाईल. पण त्यामध्ये यश आले नाही तर सनदशीर मार्गाने संघर्ष करण्याचे काम अखंडपणे केले. जाईल. प्रत्येक व्यक्तीने नियमित व्यवहाराबरोबर एक चांगले काम करावे यासाठी प्रोत्साहन देण्यावरही भर राहील.'

'कोल्हापुरात विधवा सक्षमीकरणासाठी एक संस्था चांगले काम करत असून या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात विधवासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करुन दिले जाईल,' असे सांगून मुळे म्हणाले, 'युरोप, आफ्रिका, पूर्व अशियात छोटी छोटी काम करणाऱ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. सेमी स्कील असलेल्या तरुणांना कुशल बनवून त्यांना परदेशात नोकरी उपलब्ध करुन दिले जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिलांना विलंब लावल्याने अधिकाऱ्यांना सुनावले

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरात वर्षभरापूर्वी एलईडी बल्बवले. मात्र, वर्षानंतरही ठेकेदाराची बिले दिली नसल्याने मंगळवारी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंदळे व विद्युत विभाग प्रमुख रोहन डावखरे यांना स्थायी समिती सभापती शारगंधर देशमुख यांनी चांगलेच सुनावल्याचे समजते.

शहरातील ५० प्रभागामध्ये एलईडी बल्ब बसवण्यासाठी गडहिंग्लज येथील ठेकेदार कंपनीची निविदा मंजूर झाली आहे. त्यानुसार कंपनीने सुमारे ९० लाख रुपये खर्च करुन सहा प्रभागात एलईडी बल्ब बसवले. मात्र वर्षानंतरही संबंधीत ठेकेदाराचे बिल मंजूर झाले नाही. याची माहिती मिळताच देशमुख यांनी पाटणकर यांच्यासह आंदळे व डावखरे यांना धारेवर धरल्याचे समजते. ठेकेदाराची बिले त्वरीत काढून उर्वरीत कामे करा अशी सूचनाही दिल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयलक्ष्मी हॉल बनला हालचालींचे केंद्र

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:@satishgMt

कोल्हापूर : दिवंगत माजी मंत्री दिग्वीजय खानविलकर यांच्या बंगल्याशेजारील जयलक्ष्मी सांस्कृतिक कार्यालय हे लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भाजप युतीच्या हालचालीचे केंद्र बनले आहे. मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागाळा पार्क परिसरातून शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सूत्रे हलत आहेत.

काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्याची घोषणा शरद पवार यांनी दिवंगत नेते खानविलकर यांच्या बंगल्यात केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झंझावात राज्यात सुरू झाला. पण, पंधरा वर्षाच्या सत्तेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बॅकफूटवर आला. केद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षाकडून प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी अक्षरश: झुंज सुरू आहे. सद्यस्थितीत भाजप-सेना युतीने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार व्यूहरचना केली आहे. प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयासाठी खानविलकर बंगल्याशेजारील जयलक्ष्मी सांस्कृतिक कार्यालयातून लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची व्यूहरचना सुरु आहे. सध्या लोकसभा निवडणुकीत खानविलकर गट अलिप्त असला तरी त्यांच्या बंगल्यानजीकच्या जयलक्ष्मी मंगल कार्यालयात युतीच्या बैठका होत आहेत. राजकारणाचे विविध रंग पाहिलेल्या खानविलकर बंगल्याला याही निवडणुकीतील कोल्हापूरच्या राजकारणाचा वेगळा रंग पहायला मिळत आहे.

मध्यवर्ती ठिकाणामुळे निवड

'शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून जयलक्ष्मी सांस्कृतिक कार्यालयाची निवड भाजप-शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केली आहे,' अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. 'कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी छोटे सभागृह, मोठी सभा घेण्यासाठी लॉन आणि भोजन व नाष्ट्यासाठी सोय असल्याने मंगल कार्यालयाची निवड केली असल्याचे जाधव यांनी सांगितले.

बदलले राजकारण, बदलली व्यूहरचना

शरद पवार यांनी १९९९ मध्ये खानविलकर यांच्या बंगल्यात नवीन पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली. यावेळी काँग्रेसचे तत्कालीन बडे नेते उपस्थित होते. पक्ष स्थापनेनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगले यश मिळवले. त्यानंतर दिग्विजय खानविलकर यांना थेट आरोग्यमंत्री पद मिळाले. २००४ च्या निवडणुकीत खानविलकर यांच्याविरोधात सतेज पाटील रिंगणात उतरले. त्यांना भाजप, शिवसेना, स्वाभिमानीने पाठिंबा दिला. पाटील यांच्या विजयात महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक यांचा वाटा होता. खानविलकरांना पराभूत करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनीही अभाविप आणि भाजपचे संघटन कौशल्य पाटील यांच्यामागे लावले होते. या निवडणूक खानविलकर पराभूत झाले आणि सतेज पाटील यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून खानविलकरांकडे दुर्लक्ष झाले. २००९मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. २०१२ मध्ये त्यांचे निधन झाले. ज्या परिसरात एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकीची व्यूहरचना असायची, तेथे आता भाजप-सेनेकडून नवी व्यूहरचना केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images