Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अवैध मद्यविक्री अड्ड्यांवर छापे

$
0
0

शाहूवाडी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी पोलिसांनी कापशी, शिंपे येथील अवैध मद्यविक्री अड्ड्यांवर छापे टाकून ३७०० रुपये किमतीचा विनापरवाना देशी मद्यसाठ्यासह दोघांना ताब्यात घेतले. प्रल्हाद अनंत बेंद्रे (वय ५४, रा. कापशी) व महादेव दत्तू पाटील (वय ४१, रा. शिंपे) अशी संशयितांची नावे आहेत. सोमवारी रात्री सात ते आठच्या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी दिली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीमाभागात वाहनांची कसून तपासणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागावर निवडणूक विभागाने करडी नजर ठेवली आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांबरोबर पोलिस चोवीस तास येथून जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत आहेत. होसूर (ता. चंदगड) येथे महाराष्ट्राचा, तर कर्नाटक हद्दीवर बेकिनकरे (ता. बेळगाव) हद्दीत कर्नाटक पोलिसांचा तपासणी नाका आहे. होसूर तपासणी नाक्यावर दोन पोलिस, दोन महसूल विभागाचे अधिकारी, तर एक फोटोग्राफर अशी यंत्रणा कार्यान्वित आहे. येथून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक मोठ्या वाहनांची तपासणी, त्याची नोंद आणि व्हिडिओ शूटिंग घेतले जात आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक पोलिसांची तपासणीदेखील सुरू आहे. शिनोळी, होसूर, नरगट्टे, आदी परिसरात वाहन तपासणी केली जात आहे. प्रत्येक वाहनावर निवडणूक विभागाची करडी नजर आहे. वाहनांची तपासणी होत असल्याने ज्या वाहनांची कागदपत्रे पूर्ण नाहीत, असे चंदगड तालुक्यातील वाहनधारक बेळगावला जाण्याचे टाळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गृह’ निर्माणाला नियमांचा जाच नको

$
0
0

लोगो : मटा जाहीरनामा

कोल्हापूर टाइम्स टीम

नोटबंदी, रेरा, यापाठोपाठ वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी यामुळे गृहनिर्माण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मरगळीचे चित्र आहे. रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, आर्थिक उलाढाल, या क्षेत्रावर आधारित इतर रोजगार निर्मिती या बाबींचा विचार केल्यावर गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी आहेत. सरकारने बांधकाम व्यवसायिकांच्या परवान्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुलभ करावी. किचकट नियमांत बदल करून सुसूत्रता आणावी. ड वर्ग विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करुन सरकारने गृहनिर्माण क्षेत्राला 'बूस्ट' दिल्यास शहराचा विकासाचा मजला उंचावेल अशा अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांनी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मटा जाहीरनामा'उपक्रमात व्यक्त केला.

देशात गुंतवणुकीचे दोन नंबरचे क्षेत्र म्हणून गृहनिर्माण क्षेत्र ओळखले जाते. केंद्र सरकारची 'सर्वांसाठी घर योजना २०२२' योजना खरोखर चांगली आहे. चांगल्या योजना आणि घोषणांना प्रभावी अंमलबजावणीची जोड मिळायला हवी. प्रधानमंत्री आवास योजनेतील अटींमध्ये शिथीलता आणल्यास परवडणाऱ्या घरांचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होईल पायाभूत सुविधांची उपलब्धता, दळणवळणाच्या संधी आणि सरकारी नियमावलींच्या कचाट्यात गृहनिर्माण क्षेत्र अडकणार नाही या पद्धतीने कामकाज केल्यास बांधकामांना चालना मिळू शकेल असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

नियमावलीत हवी लवचिकता

गृह बांधणी क्षेत्रावर विविध व्यवसाय अवलंबून आहेत. मात्र जीएसटी, नोटबंदी, रेरा कायद्यामुळे रिअल इस्टेलला काही प्रमाणात फटका बसला. गेल्या काही वर्षात गुंतवणूक कमी झाली. सध्या हा व्यवसाय संक्रमणाच्या स्थितीत आहे. सरकारने गृह प्रकल्प क्षेत्राला चालना देण्यासाठी नगरविकास खात्याच्या नियमावलीत लवचिकता आणावी. पायाभूत सुविधा, विमानसेवा, स्मार्ट सिटी संकल्पना, स्वच्छ भारत योजना प्रभावीपणे राबविल्या तर शहर विकासाला गती लाभेल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणखी सवलती हव्यात.

- राजीव परीख, अध्यक्ष क्रिडाई महाराष्ट्र

गृह बांधणी क्षेत्राकडे हवे लक्ष

'रेरा' कायद्यामुळे बांधकाम व्यवसायला आर्थिक शिस्त निर्माण झाली. मात्र, रेराच्या कार्यकक्षेत बांधकाम व्यावसायिकांच्यासोबत महापाालिका, महावितरण व सरकारी कार्यालये आणली पाहिजेत. कारण अधिकाऱ्यांच्या चालढकल वृत्तीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांचे मध्यम व लहान शहरातील गृह बांधणी प्रकल्पाकडे लक्ष नाही. कारण मेट्रो सिटीतील बांधकाम व्यवसायात ते भागीदार आहेत. नगररचना कार्यालयाचा कारभार (टीपी)हा सहायक संचालकामार्फत झाला पाहिजे. त्यामध्ये आयुक्त, उपायुक्तांचा हस्तक्षेप नसावा.

- महेश यादव, अध्यक्ष क्रिडाई कोल्हापूर

भौगोलिक रचनेनुसार हवी नियमावली

प्रत्येक शहराची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. त्याचा विचार करुन विकास नियंत्रण नियमावली आवश्यक आहे. कोल्हापुरात तर साठ टक्के मिळकती या स्पेसीफाइड एरियात आहेत. यापूर्वीच्या शहर विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. टीडीआर प्रणाली विचित्र असल्यामुळे विकास आराखड्यात अडथळे निर्माण होत आहेत. सरकारने बांधकाम व्यावसायिकांसाठी नियमावलीत सूसुत्रता आणावी. रोज एक जीआर काढण्याचा अजब प्रकार थांबला पाहिजे.

- विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष क्रिडाई कोल्हापूर

प्रकल्प नोंदणी शुल्कात कपात करा

सरकारने बांधकाम क्षेत्रासाठी विविध योजना आखल्या, पण त्या घोषणांची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. नोटबंदी, जीएसटीचा बांधकाम व्यवसायला फटका बसला. बांधकाम व्यवसायाला शिस्त लावण्यासाठी महारेरा कायदा लागू केला. पण या कायद्यान्वये आकारण्यात येणारी गृहप्रकल्प नोंदणी शुल्क कमी करण्याची आवश्यकता आहे. नोंदणी शुल्क कमी करण्यासाठी क्रिडाईमार्फत पाठपुरावा सुरू आहे. सरकारने दखल घेऊन न्याय द्यावा.

- आदित्य बेडेकर, क्रिडाई यूथ समन्वयक

मोठ्या शहरांशी कनेक्टिव्हिटी हवी

सरकारने जीएसटीत कपात केल्यामुळे बांधकाम क्षेत्राला लाभ होईल. नागरीकरण वाढत असल्याने शहरांत दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात. मोठ्या शहरांशी विमानसेवा सुरू झाल्यास कोल्हापुरात आयटी क्षेत्राच्या विस्ताराला वातावरण निर्माण होईल. वीस हजार चौरस मीटर किंवा मोठ्या गृह प्रकल्पाना केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन विभागाची एनओसी बंधनकारक आहे. यामुळे मोठे गृहप्रकल्प रखडत असून सरकारने नियमात बदल करायची गरज आहे.

- कृष्णा पाटील, बांधकाम व्यावसायिक व संचालक क्रिडाई

विकास नियंत्रण नियमावलीतील जाचक अटी

'ड' वर्ग विकास नियंत्रण नियमावलीतील काही अटी जाचक आहेत. सरकारने अग्रक्रमाने त्यामध्ये सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक शहराच्या भौगोलिक रचनेचा विचार करुन ज्या त्या शहरासाठी नियमावली बनवावी. बांधकाम व्यवसायासाठी ऑनलाइन परवाना प्रक्रिया गरजेची आहे. राज्य सरकारच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्याप्रमाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या अन्य महापालिकेत बदल्या झाल्या पाहिजेत. यामुळे महापालिकेत वर्षानुवर्षे ठिय्या मांडलेल्या अधिकाऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात येईल.

- के. पी. खोत, बांधकाम व्यावसायिक

हद्दवाढ व प्राधिकरणची कुचेष्टा

कोल्हापूच्या विकासाचे महाद्वार ठरणाऱ्या हद्दवाढ आणि प्राधिकरणची कुचेष्टा झाली. सरकारने मोठा गाजावाजा करत प्राधिकरणची घोषणा केली. मात्र कार्यालयाकडे मनुष्यबळाची, निधीची वानवा, नव्या प्रकल्पांचा अभावामुळे प्राधिकरण स्थापूनही विकासाला गती लाभली नाही. नोटबंदी, जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्रात मंदी निर्माण झाली. वास्तविक सरकारने बांधकाम क्षेत्राला पोषक धोरणांची अंमलबजावणीला प्राधान्यक्रम पाहिजे. सरकारने पोषक धोरण आखावे.

- प्रकाश मेडशिंगे, बांधकाम व्यावसायिक

आमचा जाहीरनामा..

- सरकारने गृहनिर्माण क्षेत्राला पोषक धोरणांची अंमलबजावणी करावी

- ड वर्ग विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा कराव्यात

- नगरविकास खात्याकडून रोज नवीन अध्यादेश काढण्याची प्रकिया बंद व्हावी

- बांधकाम विषयक सर्व परवानग्या ऑनलाइन मिळाव्यात

- शहरात पायाभूत सुविधा, दळणवळणाच्या सोयी उपलब्ध कराव्यात

- प्रत्येक शहराच्या भौगोलिक रचनेचा विचार करुन नियमावली बनवावी

- विमानसेवा सुरळीत चालू राहिल्यास आयटी क्षेत्र विस्तारेल

(संकलन : आप्पासाहेब माळी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसरी जागा न मिळाल्यास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी जागावाटपात ठरल्याप्रमाणे दोन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचे काँग्रेसने मान्य केले आहे. त्यामुळे सांगली किंवा शिर्डी यापैकी एका जागेसाठीचा आग्रह आजही कायम आहे. दुसरी जागा न मिळाल्यास आघाडीसोबत राहणार नसल्याचेही खासदार शेट्टी यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मात्र आमच्या भूमिकेमुळे मतविभागणीचा फायदा भाजप-सेनेला होऊ देणार नसल्याचे सांगत कटकटी नकोत, एकदिलाने काम झाले पाहिजे यासाठी आघाडीत अपशकून करणार नसल्याचाही सावध पवित्रा त्यांनी घेतला. खासदार शेट्टी म्हणाले, 'निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा सुटला आहे. स्वाभिमानीने सहा जागांचा प्रस्ताव ठेवला होता. चर्चेअंती दोन जागा आम्हाला देण्यात आल्या आहेत. मात्र, सांगलीच्या जागेवरून वाद उफाळून आला आहे. ही जागा आम्हालाच मिळावी अशी आमची ताठर भूमिका नाही. गोडीगुलाबीने निवडणुकीत उतरले पाहिजे. जागावाटपाच्या चर्चेवेळी काँग्रेसने मला सांगलीची जागा लढवावी असा प्रस्ताव ठेवला होता. आम्ही हीच जागा मिळाली पाहिजे असा आग्रह धरलाच नव्हता, त्यामुळे शिर्डी किंवा सांगली यापैकी एक जागा आम्हाला सोडावी या भूमिकेवर आजही स्वाभिमानी ठाम आहे. स्वाभिमानीने राज्यात पंधरा जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, केवळ दोन जागा पदरात पडल्या आहेत. केवळ भाजप-सेना यांना सत्तेपासून रोखण्यासाठी आघाडीसोबत आम्ही एकदिलाने राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. अजूनही एका जागेचा तिढा सुटलेला नाही. चर्चा सुरू आहे, समाधानकारक मार्ग निघण्याची आशा आहे. कटकटी करून निवडणूक लढविण्यात अर्थ नाही. त्यामुळे संपूर्ण आघाडी एकदिलाने काम करण्यासाठी स्वाभिमानीला उरलेली एक जागा द्यावी.' कोल्हापुरातील युतीच्या सभेत केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, 'माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी स्वतःची प्रामाणिकता तपासून पाहावी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा काटा मारणारेच व्यासपीठावर आरूढ झाले होते. विरोधकांची भली मोठी कुंडली आपल्याकडे आहे, निवडणुकीत त्यांचा पुरेपूर समाचार घेऊ. सहकारी संस्थांच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या पुढाऱ्यांना भाजपचा घरोबा करावा लागला, हे दुर्दैव म्हणावे लागेल. कारवाई वाचविण्यासाठीची ही केविलवाणी धडपड आहे.' ०००० वारणा पाणीप्रश्नावरून राजकारण इचलकरंजीच्या वारणा पाणी योजनेवरून काहीजण आरोपीच्या पिंजऱ्यात मला उभा करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारच्या निधीतूनच ही योजना मंजूर झाली आहे. त्यामुळे त्याच्या पूर्णत्वाचीही जबाबदारी माझीच असेल. लोकसभा निवडणूक नसती तर योजना कधीच पूर्ण झाली असती. पाण्यासाठी कुणी विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. वारणा पाणी राजकारणात गुंतत चालली आहे. त्यामुळे त्यामध्ये मोठी गुंतागुंत झाली आहे. लोकसभेनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी वारणा पाणीयोजना मार्गी लागेल. ००० एफआरपीची लढाई सुरूच एफआरपीप्रश्नी साखर आयुक्तांची कारवाई सुरूच आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावा अशी माझी भूमिका आजही कायम आहे. आमची लढाई संपलेली नाही. निवडणुकीनंतर पुन्हा साखर सम्राटांविरोधात मैदानात उतरणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुई येथे बुडालेल्या दोघा तरुणांचे मृतदेह सापडले

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

रुई (ता. हातकणंगले) येथील पंचगंगा नदीच्या बंधाऱ्यावर रंगपंचमी खेळून अंघोळीसाठी गेल्यानंतर सोमवारी नदीत बेपत्ता झालेल्या प्रथमेश राजू सुभेदार (वय १९) याचा मृतदेह इंगळी हद्दीत, तर शुभम पोपट महाजन (वय २१) याचा मृतदेह रुई हद्दीत सापडला. त्यांचे शवविच्छेदन हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. याबाबतची नोंद हुपरी व हातकणंगले पोलिसांत झाली आहे.

कबनूर येथील पंचगंगा साखर कारखाना परिसरातील अष्टविनायक नगरमधील प्रथमेश सुभेदार व शुभम महाजन सोमवारी मित्रांसोबत रंगपंचमी खेळून झाल्यावर अंघोळीसाठी रुई बंधाऱ्यावर दुपारी दोनच्या सुमारास गेले होते. पंचगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. सर्वजण नदीत पोहत असताना प्रथमेश व शुभम पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक बेपत्ता झाले. यावेळी उपस्थित मित्रांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना बोलवले. ही माहिती हातकणंगले पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थ, उपस्थितांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ते सापडले नाहीत. स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली, पण त्यांनाही यश आले नाही.

दरम्यान, मंगळवारी सकाळी पुन्हा आधार रेस्क्यू फोर्स व ग्रामस्थांच्या वतीने शोधमोहीम राबविली असता अकरा वाजता बंधाऱ्यापासून काही अंतरावरील इंगळी हद्दीत प्रथमेशचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला, तर शुभमचा मृतदेह दुपारी साडेचारच्या सुमारास आधारच्या स्वयंसेवकांनी रुई हद्दीत शोधून काढला. प्रथमेश बारावीत शिकत होता. त्याच्या आई-वडिलांचा हार विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे, तर शुभम महाजन इलेक्ट्रॉनिक इंजिनियरच्या द्वितीय वर्षात शिकत होता. त्याचे वडील यंत्रमाग व्यवसायात जॉबर म्हणून काम करतात. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

प्रथमेशचा मृतदेह इंगळी हद्दीत आढळल्याने पुढील तपास हुपरी पोलिस व शुभमचा मृतदेह रुई हद्दीत आढळल्याने हातकणंगले पोलिस पुढील तपास करीत आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा पाणी योजना मीच पूर्ण करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'वारणा योजनेबाबत कोणीही कितीही राजकारण करू देत, पण इचलकरंजीला मीच शुद्ध पाणी देणार आहे. भाजप-सेना या जातीयवादी पक्षांना जनता कंटाळली असून, ती त्यांना घरी बसवेल. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून आपल्याला किमान पंधरा हजारांचे मताधिक्य मिळेल,' असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

येथील लायन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात मंगळवारी काँग्रेस महाआघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, यावेळी ते बोलत होते.

खासदार शेट्टी म्हणाले, 'केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांना गाजर आणि मुळा यातील फरक समजत नाही. जाती-धर्मात तेढ निर्माण करून दंगली घडवत निवडणुका जिंकणाऱ्या भाजप-सेनेच्या जातीयवादी पक्षाला जनताच घरी बसवेल. भाजप आघाडीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सर्वप्रथम भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात मीच आवाज उठवला. त्यानंतर मी त्यांच्या आघाडीतून बाहेर पडलो. माझ्यावर दलबदलू म्हणून टीका होईल. पण मी नेहमीच कष्टकऱ्यांच्या बाजूला आहे.'

जयवंतराव आवळे म्हणाले, 'देशात लोकशाही आणायची की हुकूमशाही, हे आता कार्यकर्त्यांनी ठरवायचे आहे. देशातील जातीयवादी सरकार घालविण्याची वेळ आली असून त्यासाठी आपण सर्वांनी खासदार राजू शेट्टी यांना पुन्हा एकदा साथ देवूया.'

दरम्यान, मेळाव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर टीका केली. वारणा पाणी योजनेबाबत खासदार शेट्टी यांना नाहक बदनाम करण्यात येत असून, आमदार हाळवणकर यांच्यामुळेच ही योजना रखडल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी ए. बी. पाटील, बजरंग लोणारी, मिश्रीलाल जाजू, डी. बी. पिष्टे, संभाजी नाईक, प्रताप होगाडे, विठ्ठल चोपडे, शशांक बावचकर यांची भाषणे झाली. व्यासपीठावर राहुल आवाडे, भरमा कांबळे, सदा मलाबादे, आदी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

$
0
0

फोटो....

गडहिंग्लज : आईच्या आजारपणाचा खर्च पेलत नाही, सेवा संस्था, पतसंस्थेसह फायनान्स कंपन्यांचे कर्ज फेडणे अशक्य झाल्याने कर्जाला कंटाळून सुनील नानासाहेब बंदी (वय २९) याने चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे शेतातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील हा बाळासाहेब गुरव यांच्या शेतात मजुरी करत होता. दीड महिन्यापूर्वीच त्याच्या आजीचे निधन झाले असून, आईच्या आजारपणात होत असलेल्या खर्चाचा तो विचार करत होता. त्यातच सेवा संस्था, पतसंस्था आणि एका फायनान्स कंपनीचे त्याने कर्ज घेतले होते. हे कर्ज आवाक्याबाहेर गेल्याने तो तणावात होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची फिर्याद महांतेश रावसाहेब बंदी यांनी गडहिंग्लज पोलिसांत दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनंजय महाडिक सोमवारी अर्ज भरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या धामधूम वाढली असताना साऱ्यांच्या नजरा आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याकडे लागल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे गुरुवारी (ता.२८) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. १) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी २८ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. खासदार शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. संघटटनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत शेट्टी हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत आहेत. अर्ज दाखल करताना आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार महाडिक हे सोमवारी आघाडीतल प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकापसह आघाडीतील विविध घटक पक्षांच्या प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज दाखल करतील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थितीत असणार आहे. शिवाय काँग्रेस आघाडीतील जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, आमदारांना आमंत्रित केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केंद्रिय किचन पद्धतीला बचत गटांचा विरोध

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेच्या कालावधीतच सरकारने भांडवलदारांच्या फायद्यासाठी सेंट्रल किचन पद्धत राबविण्याचा आदेश काढला आहे. सरकारचा हा निर्णय महिला बचत गटांवर अन्याय करणारा आहे. गेली पंधरा, सोळा वर्षे पोषण आहार चालविणाऱ्या महिलांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. सरकारने सेंट्रल किचन सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती न दिल्यास हायकोर्टात दाद मागू असा इशारा कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. राज्यातील बचत गटांतील एक लाख ६० हजार महिलांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील म्हणाले, 'राज्य सरकारने १५ मार्च रोजी सेंट्रल किचन चालविण्यासंबंधीचा आदेश काढला आहे. सेंट्रल किचनसाठी नियमावली तयार करुन वार्षिक ४० ते ५५ लाख उलाढाल असणाऱ्या संस्थेची नावे मागविली आहेत. बड्या संस्थांच्या हाती सेंट्रल किचन सोपवून महिला बचत गटांना निराधार करण्याचा हा डाव आहे '

संघटनेचे सचिव अमोल नाईक म्हणाले, 'आचारसंहितेच्या कालावधीत निर्णय घेऊन सरकारने नियमभंग केला आहे. या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. तरीही स्थगिती न मिळाल्यास हायकोर्टात याचिका दाखल करू'

वर्षा कुलकर्णी यांनी सेंट्रल किचनमुळे गरीब महिलांच्या रोजगार हिरावला जाईल. बचत गट, स्वयंपाकी, मदतनीसांवर परिणाम होईल असे सांगितले. शशिकला रायकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सात महिला बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार तयार करतात. सेंट्रल किचनचा निर्णय झाल्यास या महिलांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. राज्य सरकारचे धोरण हे महिला सक्षमीकरणाच्या विरोधातील आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याच्या प्रयत्नाला विरोध करू.'

साधना पाटील यांनी महिला बचत गटांनी शाळेत किचन शेड, भांडी, गॅस व इतर साहित्याची गुंतवणूक केली आहे. सेंट्रल किचन सुरू झाल्यास त्याचे काय होणार हा प्रश्न आ वासून उभा राहील असे सांगितले.

पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष भगवान पाटील, खजानिस प्रा. राजेंद्र गुंडे, पूनम बुकटे, ललिता सावंत, महादेव फुटाणे, तानाजी पाटील, दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी पुलाच्या अखेच्या स्लॅबचे काम सुरू

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाच्या शेवटच्या स्लॅब टाकण्याला मंगळवारी सुरुवात झाली. ४० मीटर लांब आणि १५ मीटर रुंदीचा हा स्लॅब आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पूल बांधणीच्या प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे. गेल्या महिन्यापासून काम गतीने सुरू राहिल्याने मे महिनाअखेरीस नवा पूल वाहतुकीस खुला होईल, अशी माहिती ठेकेदार आसमास कंपनीचे प्रतिनिधी एन. डी. लाड यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले.

शिवाजी पुलाचे काम २०१३मध्ये पहिल्यांदा सुरू झाले. त्यानंतर पुरातत्व विभागाची परवानगी नसल्याने अर्ध्यावरच काम रखडले. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांनी पुढाकार घेऊन पुलाबाबतच्या अन्य अनुषांगीक परवानग्या मिळवून देण्यासाठी मदत केली. जनरेट्यामुळे १५ ऑक्टोबर २०१८ मध्ये पुन्हा काम पूर्ववत सुरू झाले. त्यानंतरही पुन्हा काही अडचणी कामात आल्या. मात्र, सर्वपक्षीय कृती समितीचा या कामासाठीचा दबाव कायम राहिला. त्यामउळेच राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तातडीने पुलाच्या कामासंबंधीची तांत्रिक मंजुरी घेतली.

सध्या पुलाचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. गेल्या महिन्यात पुलाच्या कामावर देखरेख ठेवणारे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांची बदली झाली. त्या ठिकाणी अशोक भोसले रुजू झाले आहेत. त्यांनी काम गतीने होण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यातून पुलाचे काम अंतिम टप्यात आले आहे. सध्या अखेरच्या स्लॅबचे काम केले जात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर फिनिशिंग केले जाईल.

कृती समितीने आणला गारवा

मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता 'गारवा' विधी करण्यात आला. यासाठी शंभरहून अधिक महिला डोक्यावर सजवलेला कलश घेऊन वाद्यांच्या गजरात कामाच्या ठिकाणी पोहोचल्या. तेथे धार्मिक विधी झाल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. जल्लोष करण्यात आला. यावेळी आर. के. पोवार, किसन कल्याणकर, बाबा पार्टे, वैशाली महाडिक, जहिदा मुजावर यांच्यासह महिला, नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रणिती आणि मला भाजपकडून होती ऑफर

$
0
0

सुशीलकुमार शिंदे यांचा खळबळजनक दावा

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

भाजपकडून मला आणि कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपमधून ऑफर होती, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे माजी खासदार आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे भाजप प्रवेशाची ऑफर धुडकावून लावल्याचेही शिंदे म्हणाले.

शिंदे म्हणाले, 'भाजपच्या एका बड्या नेत्याकडून ऑफर होती. भाजपचा संबंधित नेता माझ्या तोडीचा होता. मी पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर फेटाळून लावली. कन्या प्रणिती शिंदे या सोलापुरातून काँग्रेस आमदार आहेत. प्रणिती यांनाही वारंवार भाजप प्रवेशाच्या ऑफर येत आहेत.'

विखेंच्या राजीनाम्याची गरज नाही

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना शिंदे म्हणाले, 'तरुणांना स्वतःचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यामुळे सुजय विखे-पाटील यांनी पक्षांतर करणे गैर नाही. प्रत्येकाला करिअर करायचे असते. तिकीटवरून नाराजी म्हणून तरुण पक्ष बदलत आहेत. वैचारिक भूमिका आहे, पण मुलांना स्वतःचा निर्णय घेण्याचेही स्वातंत्र्य आहे. मात्र, राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसचे प्रामाणिक नेते आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यंकटेश्‍वर महास्वामींकडे फक्त नऊ रुपये संपत्तीजयसिद्धेश्वर महास्वामींकडे साडेसहा कोटींची मालमत्ता

$
0
0

व्यंकटेश्‍वर महास्वामींकडे फक्त नऊ रुपये संपत्ती

जयसिद्धेश्वर महास्वामींकडे साडेसहा कोटींची मालमत्ता

सोलापूर :

केवळ नऊ रुपयांची संपत्ती असलेले चडचण तालुक्‍यातील रहिवासी व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत दिलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी फक्त नऊ रुपये हातात असल्याचा उल्लेख केला आहे. त्याच वेळी त्यांनी ४५ हजार रुपयांचे कर्ज हात उसने घेतल्याचे म्हटले आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ यंदा स्वामींच्या उमेदवारींमुळे चर्चेत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून भाजपच्या वतीने डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी उमेदवारी दाखल केली. त्याच वेळी व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनीही हिंदुस्थान जनता पार्टीतर्फे उमेदवारी दाखल केली. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी संपत्तीचे विवरण दाखल केले असून, फक्त नऊ रुपये हाती असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेले पॅनकार्ड त्यांनी काढले आहे. व्यंकटेश्‍वर महास्वामी ऊर्फ दीपक गंगाराम कटकधोंड, असे त्यांचे नाव आहे.

कर्नाटकातील नागठाण विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीमध्ये त्यांचे नाव आहे. ३१ वर्षीय व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनी धारवाड विद्यापीठातून बीकॉम ची पदवी मिळवली आहे. निवडणूक लढविण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची माहिती त्यांनी घेतली आहे. या महाराजांच्या नावावर कोणत्याही प्रकारची जंगम अथवा स्थावर मालमत्ता नाही, तसेच त्यांच्यावर कुणीही अवलंबून नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. एकीकडे कोट्यधीश महाराज निवडणूक रिंगणात असताना केवळ नऊ रुपये हाती आणि ४५ हजार रुपयांचे कर्ज घेतलेले महास्वामी रिंगणात कितपत टिकाव धरून राहतात, या बाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

डॉ. जयसिद्धेश्‍वरांकडे ६.४६ कोटींची मालमत्ता

भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर यांच्याकडे ६ कोटी ४६ लाख ०७९ रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. १० हजार रुपये किमतीची अॅम्बेसिडर, दोन लाख रुपये किमतीची पूजेला लागणारी चांदीची भांडी यासह इतर मालमत्ता असल्याचा उल्लेख आहे. स्थावर व जंगम मालमत्ता मिळून त्यांच्याकडे ६.४६ कोटींची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच ग्रामपंचायतींवरराष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

$
0
0

पाच ग्रामपंचायतींवर

राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

सातारा

सातारा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सर्व ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा रोवला असून, तालुक्यातील सर्वात मोठ्या लिंब ग्रामपंचायतीवर सातारा पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत यांच्या गटाने बाजी मारली. त्यांच्या अजिंक्य ग्रामविकास पॅनेलने १७ पैकी १४ जागा व सरपंचपद काबीज केले. त्यामुळे विरोधकांचा धुव्वा उडाला. दरम्यान, लिंबसह सर्वच ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याने सातारा तालुक्यात सबकुछ राष्ट्रवादी, असे वातावरण पहायला मिळाले.

सातारा तालुक्यातील लिंब, पानमळेवाडी, टिटवेवाडी, देशमुखनगर, बोपोशी, कातवडी बु. व कासारस्थळ या ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. मात्र, यामध्ये कासारस्थळ ही ग्रामपंचायत निवडणूक एकही अर्ज न आल्याने पुढे ढकलण्यात आली. तर कातवडी बु. ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीने बिनविरोध केली. उर्वरित पाच ग्रामपंचायतीसाठी २४ रोजी मतदान झाले होते. सोमवारी मतमोजणी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात एक जण ठारकराडनजीक अपघातात एक ठार, एक गंभीर

$
0
0

अपघातात एक जण ठार

कराड : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत दुचाकीला अज्ञात वाहनाने मंगळवारी दुपारी जोरदार धडक दिली. या भीषण अपघात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रमेश आनंदराव पाटील (वय ५५) असे अपघातात जागीच ठार झालेल्यांचे नाव आहे. तर विठ्ठल हारी जाधव (वय ६५), असे जखमींचे नाव आहे. दोघेही कापील (ता. कराड) येथील आहेत.

रमेश पाटील व विठ्ठल जाधव दुचाकी वरून (एमएच ११ इ ५४७९) कापीलहून बेलवडे बुद्रुक येथे निघाले होते. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर दुपारच्या सुमारास दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पाटील यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे ते जागीच ठार झाले, तर जाधव गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळवरून पळ काढला. अपघाताची नोंद ग्रामीण पोलिसांत झाली असून, अधिक तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षयरोगास हद्दपार करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशातून पोलिओ आजार नाहीसा झाला. आता क्षयरोगासही हद्दपार करण्याचा संकल्प करूया,' असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रम शाहू स्मारक भवनमध्ये झाला.

डॉ. वारके म्हणाले, 'मी स्वतः डॉक्टर असल्याने क्षय रुग्णास किती त्रास होतो, हे चांगले जाणतो. मात्र, वेळीच उपचार झाल्यास हा आजार कमी होतो. यासाठी व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. क्षयरुग्णांची नोंद खासगी डॉक्टरांनी करणे बंधनकारक आहे. समाजातील सर्व घटकांनी मिळून आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. सरकारी दवाखान्यात या आजार निदानासाठी उच्चदर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. उपचारही मोफत आहे. त्याचा लाभ संबंधितांनी घ्यावा.'

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार म्हणाल्या, '३ ते ४ वर्षांत क्षयरोग निदान, उपचारप्रणालीत बदला झाला आहे. सीपीआर, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, इचलकरंजी आयजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात.' यावेळी उपसंचालक डॉ. पी. पी. धारूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. एम. एस. पाटील, नामदेव सावंत यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मानसी कदम यांनी आभार मानले.

०००००

जागृती रॅली

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते क्षयरोग जनजागृती रॅलीचे उद्घाटन झाले. सीपीआर ते शाहू स्मारक भवनपर्यंत रॅली काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी क्षयरोग केंद्रातील ऑक्सिजन पार्क, रॉबर्ट कॉकच्या कट आउटचे अनावरण झाले. सीपीआरमधील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तोडफोड प्रकरणात आणखी चौघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुटबॉल सामन्यावेळी झालेली दगडफेक आणि हुल्लडबाजीप्रकरणी दिलबहार आणि पाटाकडील तालीम मंडळाच्या आणखी चौघांना मंगळवारी अटक करण्यात आली. शैलेश मनोहर माने (वय ३४), आदित्य सुनील डोंगळे (२१), राधेय सचिन खेडेकर (२२) आणि शुभम सुनील दंडगे (२२, सर्व रा. मंगळवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी अटक केलेल्या अनिकेत अजित सावंत (वय २३ रा. कापडी गल्ली, बी वॉर्ड, दिलबहार तालमीजवळ, रविवार पेठ), स्वप्नील विनायक माने (२५ रा. बी वॉर्ड, जैन गल्ली, रविवार पेठ), आशीष जोतिराम जमदाडे (२८ रा. बी वॉर्ड, रविवार पेठ), इचीबेरी युझुची इमॅन्युअल (टोपण नाव चिमा, २९ रा. सणगर गल्ली, दिलबहार तालीमजवळ, मूळ रा. नायझेरियन) या आठही जणांना कोर्टाने ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

छत्रपती शाहू स्टेडियमवर चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेवेळी दिलबहार आणि पाटाकडील संघांतील अंतिम सामन्यानंतर दोन्हीकडील समर्थकांनी हुल्लडबाजी केली होती. तुफान दगडफेक करत स्टेडियमवरील लाइटच्या वायर, रस्त्याकडेला उभी असलेली वाहने आणि टपऱ्यांची मोडतोड केली होती. या प्रकरणात २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.

अन्य संशयित नीलेश जाधव, धनाजी सूर्यवंशी, शशांक माने, अक्षय फाळके, महेश पाटील, अजय शिराळे, बंटी कावणेकर, धीरज बालगुडे यांचा रात्री उशीरापर्यंत शोध घेण्याचे काम सुरु होते.

.. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यातील दहशत मोडून काढणार युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची ग्वाही

$
0
0

साताऱ्यातील दहशत मोडून काढणार

युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची ग्वाही

सातारा :

'साताऱ्यातील उद्योग, कारखान्यांची दुरवस्था झाली आहे. शिरवळमध्ये मोठे उद्योग आले. पण, आज एमआयडीसीमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे साताऱ्यात उद्योगपती येत नाहीत. आमच्या पक्षाचे उद्योग मंत्री सुभास देसाई यांच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या सहकार्याने सातारा जिल्ह्यातील औद्योगीक क्षेत्रातील आणि टोल नाक्यावरील दहशत मोडून काढून सातारा जिल्हा दहशत मुक्त करणार आहोत,' अशी ग्वाही शिवसेना भाजप युतीचे अधिकृत उमेदवार व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत सांगितले.

साताऱ्यात कोणाची दहशत आहे? कोण टोल नाक्यावर जाऊन दंगा करतात? कोणी बंगल्यावर येऊन राडा केला? कुणावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले,? याची कल्पना जनतेला आहे. मी सांगणे गरजेचे नाही. सातारा ऐतिहासिक जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वीज, शेती पाण्याचा प्रश सुटलेले नाहीत. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक रिगणात उतरलो आहे. साताऱ्यातील टोल नाक्यावर सध्या मोठा झोल सुरू आहे. या झोलमधून साताऱ्याच्या जनतेला टोलमधून मुक्तच करून टाकणार आहे. पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून, ते नाराज नाहीत. ते आमच्या बरोबरच आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

आमदार शंभूराज देसाई म्हणाले, 'युतीचा उमेदवार म्हणून नरेंद्र पाटील यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे. आम्ही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीला एकत्र सामोरे जात आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करून सेनेचा खासदार म्हणून नरेंद्र पाटील यांना निवडून आणले जाणार आहे.' पुरुषोत्तम जाधव म्हणाले, 'उमेदवारीसाठी मी शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांनी मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही. मी पक्षाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना निवडून आणण्यासाठी काम करणार आहे. १९९६ची पुरावृत्ती पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात झालेली पहायला मिळणार आहे.' या वेळी आमदार शंभूराज देसाई, शेखर चरेगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नितीन बानुगडे-पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराच्या मैदानात तरुणांची फौज

$
0
0

म. टा. प्रतिनधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या विरोधात ताकतीने लढताना काँग्रेस व मित्र पक्षाने प्रचारासाठी युवा आघाडीची फौज मैदानात उतरविणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकापसह मित्र पक्षातील युवकांची 'संयुक्त पुरोगामी युवा महाआघाडी'ची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून गुरुवारी (ता. २८) पुणे येथे एक दिवसीय कार्यशाळा भरविली आहे.

यामध्ये लोकसभा निवडणुकीत प्रचारात कोणत्या मुद्यावर भर द्यायचा, सत्ताधारी पक्षांच्या विविध योजना कशा फसव्या आहेत हे लोकांसमोर मांडायचे यासंबंधीची नीती ठरणार आहे. युवा महाआघाडीत विविध पक्षातील तरुण व स्टार प्रचारकांचा समावेश आहे. राज्यभरातील विविध मतदारसंघात त्यांच्या स्वतंत्र प्रचार सभा, रॅलीचे नियोजन आहे. प्रत्येक मतदारसंघातील पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांना सोबतीला घेऊन प्रचारफेऱ्या होणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी, शेकापसह मित्र पक्षाच्या युवक संघटना प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहेत.

दरम्यान गुरुवारी होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यकारणी बैठकीला युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव, राष्ट्रवादी युवक काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस चित्रलेखा पाटील, रविकांत वर्पे, मेहबूब शेख, सूरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती असेल. पुणे येथील एस.एम.जोशी फाउंडेशन सभागृह, गांजवे चौक येथे सकाळी दहा वाजता बैठक सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतींवर बोजा नोंद होणार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मार्चअखेर अधिकाधिक वसुली होण्यासाठी महापालिकेच्या सर्वच ‌विभागात धांदल उडाली आहे. विभागवार बैठकीचा सपाटा लावला जात असताना घरफाळा विभागाने सोमवारी एका दिवसात तब्बल एक कोटी १५ लाख रुपयांचा घरफाळा वसूल केला. अधिकाधिक घरफाळा वसुलीसाठी ३१ मार्चअखेर सवलत योजनाही जाहीर केली आहे. मात्र कालावधीत घरफाळा जमा न केल्यास महापालिकेच्यावतीने थकीत मिळकतींवर बोजा नोंद करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या घरफाळा, पाणीपुरवठा, नगररचना, परवाना व इस्टेट विभागाची वसुली मोहिमेने वेग घेतला आहे. विशेषत: घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी दोन्ही विभागाच्या वारंवार बैठका घेऊन आढावा घेतला जात आहे. दोन्ही विभागानी थकीत रकमेवरील दंडामध्ये ५० टक्के सवलत देणारी 'सवलत योजना' सुरू केली आहे. योजनेची मूदत ३१ मार्चपर्यंत असल्याने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी दोन्ही विभागाने कर वसुली मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घरफाळा विभागाला एक दिवसांत एक कोटी घरफाळा वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार उपायुक्त मंगेश शिंदे, कर निर्धारक दिवाकर कारंडे व अन्य कर्मचाऱ्यांनी वसुलीचे नियोजन करत एका दिवसात तब्बल एक कोटी १५ लाख, ९९ हजाराचा घरफाळा वसूल केला.

उर्वरीत चार दिवसांत वसुली मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. घरफाळा वसुलीसाठी पूर्ण कराची रक्कम जमा केल्यास दंडामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. याबाबतची घोषणा यापूर्वीच महापालिका प्रशासनाने केली आहे. योजनेनुसार मि‌ळकतदारांनी थकीत रक्कम जमा न केल्यास पुढील आर्थिक वर्षामध्ये थकीत रकमेचा बोजा मिळकतींवर चढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तरी मिळकतदारांनी सवलत योजनेचा लाभ घेऊन घरफाळा जमा करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्षद, प्राचीचे यश

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे इयत्ता पाचवीसाठी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जाधववाडी येथील प्रिन्स शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. विद्यार्थी हर्षद सुनील पाटीलने ३०० पैकी २४४ तर प्राची कृष्णात यादवने २४० गुण मिळवले. मुख्याध्यापक प्रतापसिंह निकम, शिक्षक किरण माळी यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images