Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अर्थसंकल्पामध्ये नावीन्यपूर्णतेचा अभाव

$
0
0

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते, गटर, चोवीस पाणी, प्रत्येक प्रभागात आरोग्य सेवा अशी अनेक आश्वासने निवडणुकीच्या निमित्ताने द्यायची, या पायाभूत सुविधांसह मोठे-मोठ्या प्रकल्पांतून विकासाचा रोडमॅप सादर करायचा. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी होणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये त्याचा अंतर्भावच करायचा नाही. असा जणू शिरस्ताच दहा वर्षांत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घालून दिला आहे. परिणामी चकचकीत रस्ते, मुबलक पाणी, कचरा व आरोग्यसेवा अशा सुविधा कागदावरच राहिल्या आहेत.

रंकाळा, पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, थेट पाइपलाइन आणि नव्याने आलेली अमृत योजना यामुळे महापालिकेचे बजेट १,३८६ कोटीपर्यंत पोहोचले. गेल्या दहा वर्षात महापालिकेचे उत्पन्न तीनशे कोटींच्या पुढे गेलेले नसताना सरकारी योजनांमुळे अर्थसंकल्पातील आकड्यांना फुगवटा येतो. सरकारच्या मेहरबानीवर शहरविकासाची स्वप्ने पाहणारा अर्थसंकल्प म्हणजे 'हा खेळ चाले आकड्यांचा' असाच बनला आहे.

ई-गर्व्हनन्स, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, थेट पाइपलाइन, घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज लाइन हे जुनेच विषय नव्याने मांडण्याची परंपरा यावर्षीही जपली गेली. शाहू क्लॉथ मार्केटमधील व्यापारी संकुल वगळता नावीन्यपूर्णतेच्या अभावच अर्थसंकल्पामध्ये दिसतो. दोन वर्षांपूर्वीपासून कोंबडी बाजारमध्ये होणाऱ्या व्यापारी संकुलाचा प्रस्ताव धूळखात पडलेला असताना या प्रस्तावाची कॉपी म्हणजे शाहू क्लॉथ मार्केटमधील व्यापारी संकुल म्हणावे लागेल.

नगररचना, घरफाळा, परवाना, इस्टेट, पाणीपट्टी व स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून दरवर्षी प्रशासन सुमारे ३०० ते ३२५ कोटींचे महसुली उत्पन्न गृहीत धरते. सभागृह त्यामध्ये शंभर कोटींची वाढ करते. पण यावर्षी प्रशासनानेच ४९४ कोटींच्या महसुली उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे महसुली उत्पन्नामध्ये वाढ करण्याची संधीच सभागृहाला मिळण्याची शक्यता नाही. प्रत्यक्षात ३०० कोटींचा महसूल जमा करताना प्रशासनाची दमछाक होते. अशी वस्तुस्थिती असताना ५०० कोटींच्या जवळपास टार्गेट ठेवल्याने प्रशासनाला मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागेल. तीन ते चार विभाग वगळता महापालिकेच्या अन्य मोठ्या उत्पन्नाचा स्रोत नसताना आणि केवळ अस्थापनावर अडीचशे कोटी खर्च होत असताना शहराचा विकास कसा आणि कोणत्या पद्धतीने होणार असाच प्रश्न 'स्थायी'कडे दिलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीवरुन स्पष्ट होतो.

.....................

चौकट

निवडणुकीच्या तोंडावर न परवडणारी तरतूद

गेल्या काही वर्षात नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या स्वनिधीमध्ये सातत्याने वाढ झाली. २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात स्वनिधीसाठी १०३ कोटींची तरतूद केली होती. त्यापैकी ९० कोटींची अदाबाकी केली असली, तरी अद्याप विकासकामावर खर्ची पडलेली नाही. त्यातच २०१९-२० च्या अर्थसंकल्पात स्वनिधीला २३ कोटी कमी करत ८० कोटींची तरतूद केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान कमी झालेला स्वनिधी नगरसेवकांना परवडणारा असा नाही. त्यामुळे स्थायीकडून महासभेला अर्थसंकल्प सादर होताना यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

...........................

उत्पन्नाचे मुख्य स्रोत

स्थानिक संस्था कर : १६३ कोटी

घरफाळा : ५७ कोटी ४० लाख

मार्केट भाडे : ४५ कोटी ४९ लाख

नगररचना : ४४ कोटी

पाणीपट्टी : ६५ कोटी ५९ लाख

एकूण अपेक्षित उत्पन्न : ४९४ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माणगाव, वरणगेसह २३ गावांना पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वेगवेगळ्या संकल्पना आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामविकास साधणाऱ्या सरपंचांना यशवंत सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तालुकास्तरावरील यशवंत ग्रामपंचायत पुरस्कारात माणगाव, वरणगे, आलाबाद, दानोळी, आदी २३ गावांनी बाजी मारली.

जिल्हा परिषदेने २०१८-१९ साठीचे यशवंत सरपंच पुरस्कार वितरित केले. यामध्ये सरपंच सुहास जोंधळे (हात्तीवडे), साताप्पा कांबळे (वेतवडे), अरुणा देसाई (मेघोली), परशराम चव्हाण (मुरकुटेवाडी), सुनीता हसुरे (हसूरचंपू), अश्विनी पाटील (माणगाव), वंदना मुसळे (आलाबाद), अर्पना पाटील (वरणगे), अभिजित पाटील (गुडाळ), सुजाता शिंदे (दानोळी) आणि सरिता पाटील (शिवारे) यांना गौरविले. तालुकास्तरीय यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार २३ ग्रामपंचायतींना मिळाला. यामध्ये प्रथम क्रमाकांचा पुरस्कार हात्तीवडे, वेतवडे, मेघोली, हसूरचंपू, मुरकुटेवाडी, माणगाव, वरणगे, आलाबाद, गुडाळ, दानोळी, शिवारे यांना मिळाला, तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार तालुकास्तरावर आदमापूर, पेरणोली, लोंघे, शेंद्री, उत्साळी, लाटवडे, हळदवडे, काखे, पंडेवाडी, तमदलगे, नांदगाव या ग्रामपंचायतींना मिळाला.

००००

पं.स. कर्मचाऱ्यांचाही सन्मान

कक्ष अधिकारी विठ्ठल भवारी व कृषी अधिकारी धर्मराज महाले (गडहिंग्लज), वरिष्ठ सहायक कुलदीप पाटील (राधानगरी), कनिष्ठ सहायक मुकेश नांगरे व परिचर सरदार नगारजी (पन्हाळा), चालक केशव स्वामी (गगनबावडा), सांख्यिकी अधिकारी बापू घस्ती (शिरोळ), कनिष्ठ अधिकारी जितेंद्र वसगडेकर व औषध निर्माण अधिकारी रावसाहेब कारदगे (हातकणंगले), श्रीपती मोरे व सर्जेराव साठे (कागल), आरोग्यसेविका सविता भिमटे (भुये), आरोग्य सहायक अमिना तगारे, आरोग्यसेवक संदीप हालंडे (शिरोळ).

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पदभाराला कार्यभाराची जोड द्या’

$
0
0

फोटो : अर्जुन टाकळकर

०००००

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'स्वत:च्या कामावर अढळ श्रद्धा ठेवून कर्तृत्व गाजविणाऱ्या व्यक्तींचा सत्कार हा समाजासाठी प्रेरणादायी असतो. पुरस्कार, सत्कार सोहळे ही साधने आहेत. त्यामुळे पुरस्कारप्राप्त व्यक्तींची समाजाप्रती जबाबदारी वाढली आहे. पदभाराला कार्यभाराची जोड देत काम केल्यास खऱ्या अर्थाने जनकल्याण होईल,' असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.

जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणारा विविध पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण समिती सभापती अंबरीश घाटगे, समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी मानाच्या राजर्षी शाहू पुरस्काराने जिल्हा परिषद सदस्य मनीषा टोणपे (पाचगाव मतदारसंघ), शिवाजी मोरे (सातवे), सतीश पाटील (गिजवणे), राहुल पाटील (परिते), स्वरूपाराणी जाधव (कडगाव), कोमल मिसाळ (वडणगे), जयश्री तेली (सभापती, गडहिंग्लज पं.स.), रचना होलम (सभापती, आजरा पं. स.), अमरसिंह खोत (सदस्य, पं. स. शाहूवाडी) यांना सन्मानित केले. कोल्हापुरी फेटा, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

याप्रसंगी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, पक्षप्रतोद विजय भोजे यांची भाषणे झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र भालेराव यांनी आभार मानले.

०००

ग्रामसेवक भांडणे लावणारा नसावा

ग्रामविकासात ग्रामसेवकाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. मात्र, काही ग्रामसेवकांचा कारभार हा दोन गटात भांडणे लावायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची अशी व्याख्या बनली आहे. त्यांनीही चांगले काम करून विकासात हातभार लावावा, असा टोला गटनेते अरुण इंगवले यांनी लगावाला.

००००

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार : वैभव गुरव (हत्तीवडे), संदीप साठे (मुदाळ), नीळकंठ सांबरेकर (घुलेवाडी), मंजली चौगुले (माद्याळ कसबा नूल), भीमराव गुरव (सांगशी), सागर खोत (मौजे तेलवे), राहिदास चौगले (माजगाव), हेमंत जाधव (कवठेसार), सुनीता बाजीराव पाटील (केर्ले), शीतल रंगराव पाटील (बाचणी), अनिता हिरामणी कांबळे (अर्जुनवाडा) आणि बी. बी. राठोड (माणगाव).

०००००

युवराज पाटील यांना

आदर्श पत्रकार पुरस्कार

जिल्हा परिषदेने यंदापासून आचार्य अत्रे जिल्हा व तालुकास्तरीय पत्रकाराची घोषणा केली. यामध्ये 'महाराष्ट्र टाइम्स'चे कुडित्रे येथील प्रतिनिधी युवराज पाटील यांना करवीर तालुकास्तरावरील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी

$
0
0

सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी

सातारा :

सज्जनगडावर यंदाचा ३३७वा दासनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री समर्थ सेवा मंडळ व रामदास स्वामी संस्थांनी यांनी या महोत्सवात दासबोध पारायण, प्रवचन, कीर्तन, संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. यंदा राज्यातून दासनवमी उत्सव काळात लाखांपेक्षा जास्त संख्येने भाविक गडावर नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी आले होते. समर्थ रामदास स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर, मिरज येथून वेण्णास्वामी, समर्थ शिष्य कल्याण स्वामी यांची पालखी तसेच समर्थांचे जन्मस्थळ असलेल्या जांब, करंडी ग्रामस्थ व अन्य ठिकाणाहून शेकडो समर्थ भक्तांसह पायी दिंड्या सज्जनगडावर आल्या होत्या.

दासनवमी उत्सवानिमित्त पहाटे दोन वाजता काकड आरती झाली. पहाटे चार वाजता समर्थ रामदास स्वामींच्या समाधीस रामदास स्वामींचे वंशज, अधिकारी व अध्यक्ष भूषण स्वामी व समर्थ भक्तांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. त्या नंतर गडावर सांप्रदायिक भिक्षेचा कार्यक्रम झाला. त्या नंतर छबिना काढण्यात आला.

.............

राष्ट्रीय महामार्गावरील

उड्डाण पुलाला भगदाड पडले

सातारा

शेंद्रे येथील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलाचा स्लॅब कमकुवत होऊन त्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे या पुलावरील दोन लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. पुलाच्या खालील स्लॅबचा काही भाग कोसळला आहे. हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या प्रकाराने सहापदरीकरणाचे काम करणाऱ्या रिलायन्सचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर आले आहे. स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सहापदरीकरणाच्या कामाबाबत प्रचंड तक्रारी आहेत. निकृष्ठ कामाबाबत सातत्याने तक्रारी होत आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टींनी माढ्यातून लढावेस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठराव

$
0
0

शेट्टींनी माढ्यातून लढावे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठराव

पंढरपूर

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी, असा एकमुखी ठराव बुधवारी रात्री वेळापुर येथे झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. स्वाभिमानीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर दबाव टाकण्यासाठीच हा ठरवा केल्याची चर्चा आहे.

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली माढा लोकसभा मतसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. गेल्या वेळी सदाभाऊ खोत यांनी या मतदारसंघातून स्वाभिमानीकडून लढताना जवळपास साडेचार लाख मते मिळवली होती. या मतदारसंघात स्वाभिमानीचे चांगले नेटवर्क असल्याने माढा लोकसभा निवडणूक पक्षाकडून लढविण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून होत आहे. यंदा हातकणंगले सोबत शेट्टींनी माढ्यातून ही लढावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह मेळाव्यात दिसून आला. रविकांत तुपकर शरद पवार यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा करीत आहेत. स्वाभिमानीने बुलढाणा व वर्धा या दोन मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे. अजूनही कॉंग्रेस आघाडीकडून कोणतेही सकारात्मक उत्तर येत नसताना माढ्यातून शेट्टींनी लढावे, असा केलेला ठराव शरद पवार आणि कॉंग्रेस आघाडीची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे. दरम्यान, आघाडीने जागा वाटपाची मागणी गाभीर्याने घ्यावी, यासाठी स्वाभिमानीने दबाव टाकण्यासाठीच हा ठराव केल्याची चर्चा ही सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कला-क्रीडा कौशल्यात यशाची गुरुकिल्ली’

$
0
0

'कला-क्रीडा कौशल्यात यशाची गुरुकिल्ली'

कराड :

'पारंपरिक शालेय शिक्षणातून ज्ञान मिळते तर कला व क्रीडा कौशल्यातून यशाची गुरुकिल्ली सापडते. कला-क्रीडा कौशल्ये ही आयुष्याची जोडीदार असतात. शिक्षणा इतकेच कला व क्रीडेला महत्त्व दिले पाहिजे,' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी येथे केले.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ व येथील महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी येथे आयोजित महाविद्यालयीन यशस्वी खेळाडू निर्मितीमधील आव्हाने व धोरण या शारिक शिक्षण व क्रीडा चर्चासत्राचे उद्घाटन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शिंदे म्हणाले, 'समाजात क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन दुय्यम असल्याने ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. अलिकडच्या काळात यामध्ये सकारात्मक बदल दिसू लागले आहेत. या बदलांना सकारात्मक संस्कार व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रगत क्रीडा शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची काळाची गरज आहे.'

......

मलकापुरातील

५७६ घरांना मंजुरी

कराड :

मलकापूर नगरपरिषदेच्या आगाशिवनगर विभागातील आगाशिवनगर डोंगराच्या पायथ्याशी पुनर्वसित केलेल्या झोपडपट्टी वासियांनासाठी मलकापूर नगरपरिषदेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास म्हाडा व गृहनिर्माण विभागाने मंजुरी दिली आहे. मागील शुक्रवारी मंजुरी देऊन पुढील कार्यवाही व निधी उपलब्धतेसाठी नवी दिल्ली येथील केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे, अशी माहिती मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर भास्करराव शिंदे यांनी दिली आहे.

केंद्र सरकारची मंजुरी मिळताच सध्या उपलब्ध असणाऱ्या झोपडपट्टीच्या जागेवर २४ सदनिका असणाऱ्या १५ इमारती बांधण्यात येणार आहेत. कमी खर्चाची एकूण २१६ घरे बांधणेत येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीर्थक्षेत्र, खंडपीठासाठी तरतूद नाही

$
0
0

अंतरिम अर्थसंकल्पातून शहरवासियांची उपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्याचा २०१९-२० चा अंतरिम अर्थसंकल्प बुधवारी विधामंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर झाला. मात्र या अर्थसंकल्पातून शहरवासियांच्या पदरी पुरती निराशा पडली. तीर्थक्षेत्र आराखड्याचा दुसरा टप्पा, खंडपीठ, पंचगंगा प्रदूषण, रंकाळा संवर्धन, शाहू जन्मस्थळासह पायाभूत सुविधांसाठी निधिची तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र विमानतळ विकासाव्यतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये तरतूद नसल्याने शहराचे वर्षानुवर्षांचे प्रश्न जैसे थे राहण्याची शक्यता आहे. सत्तारुढ भाजप- सेना आमदारांनी समाधानकारक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया दिली असली, तरी विरोधी पक्षाने फसवा आणि दिशाभूल अर्थसंकल्प असल्याची टीका केली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थसंकल्पाकडे शहरवासियांच्या नजरा लागल्या होत्या. राजर्षी शाहू महाराजांचे शाहू मिल येथील स्मारक, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण, रंकाळा संवर्धन, प्राधिकरण, खंडपीठ आदी घटकांसाठी तरतूद होण्याची अपेक्षा होती. शहरातील या महत्वाच्या प्रश्नी अर्थसंकल्पामध्ये कोणतीही तरतूद केलेली नाही. सहकारी संस्था आणि कृषी पूरक व्यवसायासाठी ५०० कोटींची तरतूद केलेली असली, तरी यापूर्वी पाठवलेले कृषी पूरक संस्थांचे प्रस्ताव कृषी आयुक्तस्तरावर धूळखात पडले आहेत. गळीत हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचे अश्वासन दिले, पण प्रत्यक्षात अर्थसंकल्पामध्ये त्याबाबत कोणतीही तरतूद दिसत नाही.

राज्यातील चार प्रदुषित नद्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली असली, तरी यामध्ये पंचगंगा नदीचा समावेश नसल्याने शहरवासियांच्या पदरी निराशा पडली आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेचत असलेले तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि शाहू मिल येथील राजर्षी शाहू स्मारकाचा प्रश्न पुढील वर्षातही कायम राहील, असे अर्थसंकल्पातील तरतुदींवरुन स्पष्ट होते. शहर हद्दवाढीचा प्रश्न निकालात काढून प्राधिकरणाची स्थापना केली. पण प्राधिकरणासाठी अर्थसंकल्पामध्ये कोणतीही तरतूद केलेली नाही. मात्र अमरावती, गोंदिया, नाशिक, चंद्रपूर, जळगाव, नांदेड, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विमानतळाप्रमाणे कोल्हापूर विमानतळाचाही विकास करण्यात येणार आहे. शहरवासियांच्या दृष्टीने ही समाधानाची बाब मानली जात आहे. त्याचप्रमाणे कृषीपंप वीज जोडणी आणि सिंचन विहिरींसाठी पुन्हा एकदा तरतूद केल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात समाधान मिळेल.

....................

........................................

.....................................

निराशाजनक अर्थसंकल्प

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलासादायक अर्थसंकल्प असेल, अशी शक्यता होती. तिजोरीत खडखडाट असल्याने अर्थमंत्र्यांना निर्णय घेताना अडचणी आल्या. त्यामुळे संपूर्ण अर्थसंकल्प निराशाजनक असाच आहे. मुळा-मुठा नदीनंतर राज्यातील सर्वात जास्त प्रदुषित नदी म्हणून पंचगंगा नदीचा समावेश होतो. पण पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी सरकारने कोणतीही तरतूद केली नाही. साखर व ‌वस्रोद्योगाचा अर्थसंकल्पात नामोल्लेख केलेला नाही. मोठा गाजावाजा करत शेतकरी कृषी सन्मान कर्ज योजना जाहीर केली. मात्र जाहीर झालेली कर्जमाफी योजना अडखळली असून त्यासाठीही जादाची तरतूद दिसून येत नाही.

राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना

.......................

अर्थसंकल्पातून कोल्हापुरला ठेंगा

मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी सर्व योजना विदर्भाला देण्याचे निश्चित केल्याने यावर्षीही अर्थसंकल्पातून कोल्हापुरला ठेंगा दाखवला आहे. राज्याचा कर्जाचा आकडा भयावह असतानाही विकासाचा समतोल दिसत नाही. गेल्या ‌वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये दाखवलेला विकासकामावरील खर्च ७० टक्क्यांपेक्षा पुढे गेलेला नाही. काही दिवसांपूर्वी विकासकामावरील खर्च ३० टक्के कमी केला. अर्थसंकल्पामध्ये जिल्हा नियोजन मंडळाकडून होणारा खर्चाला पुन्हा मान्यता दिली. मात्र एक महिन्यात ३० टक्के निधी खर्च करणे कठीण बनणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने तर अर्थसंकल्प निराशाजनकच आहे. पश्चिम महाराष्ट्रालाही फारसे काही देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून झालेला नाही.

हसन मुश्रीफ, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

................

फसवा अर्थसंकल्प

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा व जोतिबा मंदिर परिसर विकासाचा अर्थसंकल्पामध्ये उल्लेखही नाही. राज्यातील चार नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली. पण त्यामध्ये पंचगंगा नदीचा समावेश नसणे ही दुर्दैवाची बाब आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात पायाभूत सुविधा देण्यासाठी स्पेशल पॅकेजची तरतूद केलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत रस्त्यांसाठी ८,५०० कोटींची तरतूद केली आहे. पण राज्यमंत्री दीपक केसरकर यांची जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये तफावत दिसून येते. सरकारने आकडेवारी सादर केली असली, तरी प्रत्यक्षात एवढा निधी आहे का? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे हा दिशाभूल करणारा आणि फसवा अर्थसंकल्प आहे.

सतेज पाटील, आमदार, काँग्रेस

.........................

समाधानकारक अर्थसंकल्प

राज्यातील १५१ तालुक्यांतील ५,२०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत ३८५ शहरातील नागरिकांना लाभ देण्यासाठी ६,८९५ कोटींची तरतूद केली आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये रुग्णांना दीड लाख देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठीही अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्याने अर्थसंकल्प समाधानकारक आहे. अंतरिम अर्थसंकल्प असल्याने पुढील अर्थसंकल्पामध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखडा, खंडपीठासाठी तरतूद होईल, अशी अपेक्षा आहे.

राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना

..................

सर्वसमावेश अर्थसंकल्प

शेतकरी, युवक, शिक्षण आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल देणारा असा समाधानकारक अर्थसंकल्प आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांसह १४ गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली आहे. युवकांना कौशल्यावर आधारित रोजगार निर्माण करण्यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी यापूर्वीच दहा कोटींची तरतूद केली असून सीपीआर हॉस्पिटल विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. कृषी पूरक उद्योग, सिंचन विहीर यासारख्या योजनांतून शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात येणार आहे.

अमल महाडिक, आमदार, भाजप

....................

वीजदरात सवलत स्वागतार्ह

शेतकरी, उद्योजक व यंत्रमागधारकांना वीजदर सवलत देण्यासाठी ५,२१० कोटींची तरतूद केली आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. एक सप्टेंबर रोजी वीजदरात वाढ झाल्यानंतर ही दरवाढ एक ते दीड रुपयांनी कमी करण्याची मागणी उद्योजकांना केली होती. त्यानंतर अर्थसंकल्पात हा निर्णय घेतल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र यापैकीची सवलत यंत्रमागधारकांना जास्त जाण्याची शक्यता असल्याने, वीजदर सवलतीचे वर्गीकरण केल्यानंतर औद्योगिक क्षेत्राताला किती निधी मिळतो, यावरच या निर्णयाचे फलित समोर येईल. त्यासाठी प्रतीक्षा कारावी लागेल.

राजू पाटील, अध्यक्ष, स्मॅक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागा आमच्या, उमेदवारही निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागा वर्षानुवर्षे शिवसेना लढवित आहे. आगामी निवडणुकीतही या दोन्ही जागा शिवसेनेकडेच राहतील, त्या बदलण्याचा अथवा कुणासाठी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोल्हापुरातून प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेतून धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित आहे. भाजप व मित्रपक्षांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांनी उद्यापासून प्रचाराला सुरुवात करावी, दोन्ही खासदार निवडून आणा, 'असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिला. दोन्ही जागा शिवसेनाच्या असताना, इतरांना त्या जागेवर बोलण्याचा अधिकारच काय, असा टोलाही त्यांनी चर्चेवेळी लगाविल्याचे समजते.

ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये 'मातोश्री' येथे गुरुवारी जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी व तालुका प्रमुखांची संयुक्त बैठक झाली. तासभर झालेल्या या बैठकीत दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत ठाकरे यांनी दोन्ही जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे उमेदवारीवरुन युतीमध्ये सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. भारतीय जनता पक्षाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतील बैठकीकडे लक्ष लागून होते.

दुपारी दीड वाजता बैठकीला प्रारंभ होताच ठाकरे यांनी भाजपसोबत युती का करावी लागली याचा पदाधिकाऱ्यांसमोर उलगडा केला. त्यानंतर ठाकरे म्हणाले, 'जिल्ह्यातील दोन्ही जागा या शिवसेनेच्या हक्काच्या आहेत. वर्षानुवर्षे शिवसेना या ठिकाणी लढत आहे. यामुळे जागा बदलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जिल्ह्यातून शिवसेनेचे दोन्ही खासदार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी उद्यापासून प्रचाराला लागावे. भाजप सोबत आहे. दोन्ही मतदारसंघातील भाजप नेत्यांसोबत बैठक घेऊ. शिवाय कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात माझ्या सभा होतील. कार्यकर्त्यांनी मनात कसलीही शंका न ठेवता निवडणुकीच्या कामाला लागवे. पक्षाकडून जी मदत लागेल, ती मिळेल.'


पक्षप्रमुखांचा आदेश शिरसावंद्य


आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर,उल्हास पाटील, माजी खासदार निवेदिता माने, कोल्हापूरचे संभाव्य उमेदवार प्रा. संजय मंडलिक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, हातकणंगलेचे संभाव्य उमेदवार धैर्यशील माने, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, प्रा. शिवाजी पाटील, बाजीराव पाटील, करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील यांच्यासह अन्य तालुकाप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ठाकरे यांनी चर्चा केली. बैठकीला खासदार अनिल देसाई, दिपक सावंत, मिलिंद नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाडिक व शेट्टींना टोला

हातकणंगले लोकसभा मतदारसंघही शिवसेना लढवित आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी हे युतीचे मित्र पक्ष होते, म्हणून शिवसेनेने ती जागा सोडली होती. यावर्षी इतरांना जागा सोडण्याचा प्रश्नच नाही. यंदाही शेट्टी संपर्क साधत होते, मात्र आमचा उमेदवार नक्की होता. प्रा. संजय मंडलिक हे कायम शिवसेनेबरोबर आहेत. जागा आमच्या आहेत, उमेदवार निश्चित आहेत. यामुळे कार्यकर्त्यांनी मनात कसलीही शंका न ठेवता कामाला लागावे. गेल्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक, शिवसेनेत येतो येतो म्हणाले, शेवटपर्यंत झुलवत ठेवले. त्यांचा अनुभव चांगला नाही. पक्षाचे उमेदवार असताना दुसऱ्यांच्या नावाचा विचार करण्याचा संबंधच नाही, असा टोलाही ठाकरे यांनी चर्चेत महाडिक व शेट्टी यांना लगाविल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकासकामावर पुरस्कारांची मोहोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर विद्रूपीकरण करायला नको म्हणून डिजिटल बोर्डाला दिलेला फाटा, गावच्या सुरक्षिततेसाठी लोकसहभागातून ठिकठिकाणी बसवलेले २८ सीसीटीव्ही कॅमेरे, रस्त्याच्या दुतर्फा तीन किलोमीटरवर केलेली वृक्षलागवड हे चित्र माणगाव (ता. हातकणंगले) येथे पाहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीने वॉट्सअॅपवर तक्रार निवारण केंद्र स्थापून चोवीस तासांच्या आत त्या प्रश्नांची सोडवणूक सुरू केली आहे. गावच्या या विकासकामांवर यंदा जिल्हा परिषदेच्या पुरस्काराची मोहोर उमटली आहे.

जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या यशवंत सरपंच पुरस्कार, यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार आणि आदर्श ग्रामसेवक अशी पुरस्कारांची हॅट्‌ट्रिक माणगाव आणि हात्तीवडे (ता. आजरा) या गावांनी केली आहे. माणगावला यशवंत ग्रामपंचायत पुरस्कारासह सरपंच अश्विनी पाटील यांना यशवंत सरपंच पुरस्कार मिळाला आहे. शिवाय ग्रामविकास अधिकारी बी. बी. राठोड यांना उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी म्हणून गौरविले.

राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीचे साक्षीदार म्हणून माणगावला ऐतिहासिक महत्त्व आहे. सुमारे १६ हजार लोकवस्तीचे हे गाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावात आवाडे गटाचे वर्चस्व आहे. ग्रामपंचायतीवर सत्ता कायम ठेवताना वेगवेगळ्या योजना, विकासकामांची अंमलबजावणी करून गावाला नवे रूप दिले आहे.

ग्रामविकासाविषयी सांगताना उपसरपंच राजू पाटील म्हणाले, 'फलक आणि पोस्टरबाजीमुळे चौक आणि गावचे विद्रूपीकरण होते. हा प्रकार थांबविण्यासाठी गावाने एकत्र येऊन डिजिटल फलकांना फाटा दिला आहे. अंतर्गत रस्ते चकाचक केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क तयार केला आहे. ओपन जीम, बालोद्यान पार्क तयार केले आहे.'

००००

चोवीस तासांत सोडवणूक

ग्रामपंचायतीने गावातील विविध प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी २५४ लोकांचा ग्रुप तयार केला आहे. प्रत्येक प्रभागातील नागरिकांचा सहभाग आहे. रस्ते दुरुस्ती, विद्युत दिव्यांची सोय, साफसफाई, बागेची देखभाल यासंदर्भात तक्रारी झाल्या की, २४ तासांत ग्रामपंचायतीकडून सोडवणूक होते. शहराचे विद्रूपीकरण होऊ नये म्हणून फलक लावण्यासंदर्भात आचारसंहिता निर्माण केली आहे.

०००००

हात्तीवडेचाही वरचष्मा

आजरा तालुक्यातील हात्तीवडेचे सरंपच सुहास जोंधळे यांना यशवंत सरपंच, तर ग्रामपंचायतीला यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला. ग्रामसेवक वैभव गुरव यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांना यंदाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेरी इनाम रद्द’चा दिलासा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्य सरकारने शेरी जमिनीच्या यादीत असलेल्या सर्व मिळकतींचे इनाम रद्द केले आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी रुपये भरण्याच्या नोटिसींपासून मिळकतधारकांची सुटका होणार आहे. शेरी जमीन बांधकामांसाठी उपलब्ध होणार असल्याने व्यावसायिकांना बुस्ट मिळणार आहे. मात्र मर्जर अॅग्रीमेंटच्या (विलिनीकरण करार) यादीत नसलेल्या शेरी जमिनींना मात्र अनार्जित रक्कम भरावी लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील ११ हजार ५२० एकर जमीन धारकांना लाभ होणार आहे.

देश स्वतंत्र होण्यापूर्वी कोल्हापूर हे स्वतंत्र संस्थान होते. १९३०पासून संस्थांनाने अनेक व्यक्तींना इनामपत्रे म्हणजे इनामी जमिनी दिल्या होत्या. देश स्वतंत्र झाल्यावर इनामे खालसा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. १९४८मध्ये कोल्हापूर संस्थान भारतात विलीन झाले. ही प्रक्रिया होताना मर्जर अॅग्रीमेंट (विलीनीकरण करार) नुसार व्हाइट पेपर तयार करण्यात आला होता. संस्थानातील अनेक मिळकती या महाराजांच्या नावावर झाल्या. या मिळकतीची यादी १९५४ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. त्याला शेरी लँड असे नाव प्रचलित झाले. तर अन्य जमिनी सरकारी शेरी जमिनी म्हणून नोंद करण्यात आली.

महसूल विभागाने सर्व इनाम जमिनी या शेरी जमीन असल्याचा 'सरकारी' अर्थ काढला. या जमिनींचे व्यवहार करताना अनार्जित रक्कम आकारली जाते. महाराजांनी खासगी शेरी लँड काही व्यक्ती, संस्थांना दिल्या. तसेच काही कारणाने या जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. इनामी जमिनींचे स्वरुप बदलल्याने किंवा त्याच्या वापरात बदल करायवयाचा असल्यास महसूल खात्याला अनार्जित रक्कम भरावी लागत होती. इनाम जमिनी खरेदी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनी कोट्यवधी रुपये अनार्जित रक्कम भरली. पण, ही अट शेरी लँडला लागू होत नसतानाही महसूल विभागाने अनार्जित रक्कम भरण्यााठी कायद्याचा बडगा उगारला.

खासगी जमिनीला अनार्जित रक्कम भरण्याची अट नसतानाही महसूल खात्याने शेरी जमिनींचे व्यवहार झालेल्या नागरिकांना २० पट जास्त दंडाच्या रक्कमाच्या नोटिसा काढल्या. मर्जर अॅग्रीमेंटच्या यादीतील असणाऱ्या शेरी जमिनीचे व्यवहार झालेल्यांना नोटिसा पाठविल्या. पण आता राज्य सरकारने शेरी इनाम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने हजारो मिळकतधारकांची सुटका झाली आहे. मिळकतदारांना अनार्जित रक्कम भरण्याची जी अडचण होती, ती दूर झाली आहे. सरकारने आदेश काढल्याने शेरी लँडबाबत असलेली संदिग्धता दूर झाली आहे. छत्रपतींची शेरी जमीन आणि सरकारी शेरी जमीन हे वेगवेगळी असल्याचे स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील शेरी लँड (एकर)

३६०९

करवीर तालुका

३१५२

गडहिंग्लज तालुका

१९६४

हातकणंगले तालुका

१३७५

पन्हाळा तालुका

८३४

शिरोळ तालुका

२७७

राधानगरी तालुका

२०८

भुदरगड तालुका

१११

शाहूवाडी तालुका

११,५२०

एकूण जमीन

००००००

संस्थान विलीन झाला तेव्हा मर्जर अॅग्रीमेंट नुसार व्हाईट पेपर तयार करण्यात आला. त्यानुसार महाराजांना त्यांच्या खासगी वापरणासाठी मिळकती देण्यात आल्या. या मिळकतींना प्रायव्हेट प्रॉपर्टी ऑफ द महाराजसाहेब ऑफ कोल्हापूर शेरी लँड असे म्हणले जाते. या जमिनीवरील शेरी इनाम रद्द केले असून या जमिनीवर अनार्जित रक्कम आकारली जाणार नाही. पण या शेरी लँड व्यतिरक्त अन्य इनाम जमिनीवर प्रशासनाला महसूल गोळा करता येणार आहे.

संजय शिंदे, निवासी उप जिल्हाधिकारी

००००००

शेरी इनाम रद्द निर्णय झाला असला तरी शेरी वर्ग दोन म्हणजेच भोगवटा वर्ग दोनला हा निर्णय लागू होत नाही. मर्जर अॅग्रीमेंट नुसार व्हाईट पेपर तयार करण्यात आला. छत्रपतीच्या कोणत्याही जमिनीला अनार्जित रक्कम अकारली जात नव्हती. पण त्याचा फायदा घेत काहींनी शेरी वर्ग दोन जमीन असून शेरी इनाम भासवून लाभ घेतले आहेत.

दिलीप देसाई, प्रजासत्ताक सामाजिक संस्था

००००

शेरी इनाम रद्द करावे हा निर्णय बरेच वर्षे प्रलंबित होता. शेरी जमीन वापराविना पडून होत्या. त्या वापरात येण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयाने बांधकाम व्यवसायला फायदा होणार आहे. शहर व जिल्ह्यातील शेरी जमीन बांधकाम व्यवसायासाठी उपलब्ध होऊ शकते.

सचिन ओसवाल, क्रीडाई कोल्हापूर संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्याणकर यांचा सत्कार

$
0
0

कोल्हापूर : सद्गुरू नारायणदास महाराज ट्रस्टतर्फे (कोटीतीर्थ) आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते किसन कल्याणकर यांचा सत्कार करण्यात आला. रुकडीकर महाराज ट्रस्टचे विश्वस्त आनंदनाथ महाराज व भानुदास यादव महाराज यांच्या हस्ते सत्कार झाला. याप्रसंगी महापालिकेच्या ब्लड बँकेचे अधीक्षक सुरेंद्र शेलार, बंडा यादव महाराज, बंडा राऊत, बाळासाहेब भोसले, विनायक पाटील, युवराज गायकवाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वूमेन बाइक रॅली...प्रतिक्रिया आरती रेडेकर

$
0
0

स्वत:ची नव्याने ओळख

महिला दिन जवळ आला की वेध लागते, ते 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वूमेन बाइक रॅलीचे. महिला आठवडाभर अगोदरच वेशभूषा काय असावी, यावेळी ग्रुपकडून कोणता सामाजिक संदेश देता येईल, बाइक नीट आहे ना या तयारीत असतात. मला वाटते, बाइक रॅली ही केवळ रॅली नाही तर आतापर्यंत उंबराच्या चौकटीत बंदिस्त असणाऱ्या अनेक स्त्रियांसाठी स्वत:ची ओळख नव्याने करुन देण्याची संधी आहे. आम्ही कोणापेक्षा कमी नाही, कोणतीही जबाबदारी यशस्वीपणे पेलू शकतो याविषयीचा आत्मविश्वास बाइक रॅलीतून मिळतो.

- आरती रेडेकर, शहर सचिव, ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावरकरांनी समाजनिर्मितीचे कार्य केले’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी समाजनिर्मिती व राष्ट्र उभारणीचे कार्य केले. त्यांना अखंड भारत आणि राष्ट्रीयतेचा ध्यास होता. त्यांनी जातीव्यवस्था नष्ट होण्यासाठी संघर्ष केला 'असे प्रतिपादन सावरकर चरित्र अभ्यासक अभय भंडारी (विटा) यांनी केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळामार्फत कार्यक्रम आयोजित केला होता. सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. उद्योजक नितीन वाडीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राम गणेश गडकरी सभागृहात कार्यक्रम झाला.

याप्रसंगी १०० शाळांना पुस्तक वाटप करण्यात आले. तर अरविंद देशपांडे यांनी संस्थेस एक लाख रुपयांची मदत केली. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार, आर. डी. वाबळे यांची भाषणे झाली. अविनाश सडोलीकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती शालन शेठे यांनी संस्थेचा परिचय करुन दिला. एस. के. कुलकर्णी यांनी आभार मानले. याप्रसंगी शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, किशोर घाटगे, अॅड. संगीता तांबे, संजय कुलकर्णी, सुवर्णा पवार, मनिषा वाडीकर, साईप्रसाद बेकनाळकर, राजेंद्र शिंदे, महेश धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

२८०० झाडांचे ऑक्सिजन पार्क

बांधकाम व्यावसायिक अभय भंडारी यांनी विटा जवळ गारडी येथे २००३ मध्ये २००० रोपांची लागवड केली. माळरानावर पाणी व वीजेची सोय नव्हती. सुमारे साडे तीन एकर परिसराच्या माळावर हिरवाई फुलविण्याचा ध्यास घेतला. सुरुवातीला सलाइनच्या बाटल्याद्वारे रोपांना पाणी दिले. रोपांची उत्तमरित्या जोपासना केली. शिवाय पाणी बचतीचे व्यवस्थापनही तयार केले. हा सारा परिसर आता 'ऑक्सिजन पार्क'म्हणून आकाराला आला आहे. यामध्ये २८०० वृक्षांची लागवड केली आहे. ऑक्सिजन पार्क निर्मितीबद्दल संस्थेतर्फे याप्रसंगी भंडारी यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहारांच्या चौकशीचा ६५ पानी अहवाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाच्या चौकशीचा अहवाल प्रशासनातर्फे चौकशी समिती सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला. शिक्षक, संस्थाचालक व मुख्याध्यापक मिळून एकूण ४३ तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी समितीने चौकशी करुन अहवाल बनविला आहे. सोमवारी अहवाल सादर होणार असून शिक्ष्ण विभागाकडे कारवाईची शिफारस होणार आहे.

६५ पानी अहवालात विविध प्रकरणात लोहारांच्या कामकाजाविषयी थेट आक्षेप आहेत. त्यांच्या अनेक कामात अनियमितता आढळली आहे. नियमांना फाटा देऊन पदोन्नती, पदमान्यता दिल्याचे समितीच्या निदर्शनास आले. यापूर्वी चौकशी समितीने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली होती. दरम्यान, चौकशी समितीचे अध्यक्ष व शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, भगवान पाटील आणि समिती सचिव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ यांची गुरुवारी बैठक झाली. बैठकीत आडसूळ यांनी चौकशी अहवाल सदस्यांकडे दिला. सदस्यांकडून या अहवालाची पुन्हा एकदा तपासून होणार आहे. त्यानंतर त्यामध्ये सूचना करुन अहवाल सादर होणार आहे. समितीतील चार सदस्य येत्या दोन दिवसात अहवाल वाचून आणखी काही सूचना करणार आहेत. त्यानंतर कारवाईच्या शिफारसीसह हा अहवाल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सुपूर्द केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाकडे स्वनिधीतून घेण्यात आलेल्या योजनेतून ताडपत्री, कडबाकुट्टी, पाइप, पॉवर विडर अशा साहित्याच्या एकूण २७१३ लाभार्थ्यांच्या निवड यादीला मंजुरी मिळाली. पंचायत समितीस्तरावर यादी पोहचल्या आहेत. या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे, त्यांनी पंचायत समितीच्या कृषि विभागाशी संपर्क साधून तत्काळ साहित्य खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेंतर्गत उपलब्ध साहित्याची खरेदी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर साहित्याला अनुदान मिळणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. खरेदी केलेल्या साहित्याच्या पावत्या अनुदान मागण्यासाठी पंचायत समितीकडे तत्काळ सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रकल्प संचालकपदी माने

$
0
0

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालकपदी सिंधुदर्ग येथील प्रकल्प संचालक ए. एस. माने यांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामविकास विभागातर्फे गुरुवारी नियुक्तीचा आदेश निघाला. कोल्हापुरातील प्रकल्प संचालकपद गेली अनेक महिने रिक्त होते. ग्रामविकास विभागाने राज्यभरातील एकूण १९ अधिकाऱ्यांच्या ठिकठिकाणी बदल्या केल्या आहेत. यामध्ये गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील आटपाडी पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी श्रीमती एम. डी. साळुंखे यांची सातारा जिल्ह्यातील पाटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी बदली झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार नोंदणीसाठी आज, उद्या विशेष मोहिम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारयादीत नाव समावेश करण्याची शेवटची संधी आहे. नाव नोंदण्यासाठी आज, शनिवारी आणि उद्या, रविवारी दोन दिवस मतदान केंद्रावर विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्यास नाव नोंदणी करता येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सखोल पुनरिक्षण मतदारयादी तयार करण्यात आली. ३१ जानेवारीला ही यादी सर्व मतदार केंद्रांवर प्रसिध्द करण्यात आली. यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे आहेत. मात्र अजूनही पात्र मतदार नाव नोंदणीपासून लांब आहेत. त्यांच्यासाठी नाव नोंदणी मोहिम राबवण्यात येत आहे. मोहिमेत नाव, पत्त्यात बदलासाठी अर्ज स्वीकारतील. दावे, हरकतीही नोंदवून घेण्यात येईल.

टोल फ्री क्रमांक

www.nvsp.in या संकेतस्थळावर नविन मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येतो. याशिवाय सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मतदार यादी, नविन नाव नोंदणीसाठी जिल्हास्तरावर १९५० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधण्यासाठी लँडलाईनवरून लावताना थेट १९५० तर मोबाईलवरुन ०२३१-१९५० असा डायल करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या विद्यार्थ्यासह दोघे ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

मालवाहू टेम्पो आणि मोटारीची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दहावीच्या विद्यार्थ्यासह दोघेजण ठार झाले तर १२ जण जखमी झाले. मृतांमध्ये कुमठे (ता. तासगाव) येथील दहावीतील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. कवलापूर-कुमठेफाटा रस्त्यावर सिद्धेश्वर मंगल कार्यालयाजवळ शुक्रवारी दुपारी तीन वाजता हा अपघात झाला.

सुमित सुखदेव गावडे (वय १६, रा. कुमठे) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, टेम्पोचालक बाबू लक्ष्मण पवार (२०, रा. खरसुंडी) हाही ठार झाला आहे. आदित्य काशिनाथ पाटील (१६), वेदांत दादासाहेब गावडे (१६), ऋतुराज आनंदा भंडारी (१६), आकाश संजय पाटील (१६), शुभम रमेश भोसले (१६), मोटारीचा चालक प्रशांत प्रभाकर पाटील (३५, सर्व रा. कुमठे), तसेच मालवाहू टेम्पोतील मारुती शंकर पवार (१९) व लक्ष्मण पवार (४०, खरसुंडी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींतील आणखी एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे.

शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. कुमठे हायस्कूल कुमठे व लोकनेते दिनकरआबा पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र कवलापूर येथील पंडित नेहरू विद्यालयात आहे. परीक्षेला येण्या-जाण्यासाठी या गावातील दहा विद्यार्थ्यांनी गावातीलच प्रशांत पाटील याची मोटार (क्र. एमएच ०४ सीटी-२२२०) ठरवली होती. मोटारीने ते परीक्षेला आले. पेपर सुटल्यानंतर तीन वाजता ते कुमठेला परत जाण्यासाठी मोटारीतून निघाले होते. कवलापूरपासून दीड किलोमीटरवर चालक पाटील याने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता त्यांची मोटार समोरून आलेल्या मालवाहू टेम्पोवर (क्र. एमएच ०४ एफजे-९७४५) आदळली. त्यानंतर बाजूच्या शेतात उलटली.

अपघात पाहून परिसरातील रहिवाश्यांनी धाव घेतली. त्यावेळी मोटारीतील काही विद्यार्थी बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होते. नागरिकांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यानंतर सर्वांना उपचारासाठी हलविले. टेम्पोचालक बाबू पवारला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर सुमितचा उपचारादरम्यान सायंकाळी मृत्यू झाला. पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी घटनास्थळी पाहणी केली.

वाहनांचा चक्काचूर

अपघातग्रस्त मोटारीचा चालक प्रशांत पाटील भरधाव वेगात होता. टेम्पोला त्याने एवढी जोराची धडक दिली की, मोटार तीनवेळा उलटी होत शेतात जाऊन पडली. पुढील बाजूचे टायर फुटले. स्टेअरिंग तसेच पुढील बाजूचा चक्काचूर झाला. टेम्पोच्या पुढील बाजूचाही चक्काचूर झाला. दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. मृत बाबू पवारसोबत टेम्पोमध्ये त्याचे वडील लक्ष्मण व चुलत भाऊ मारुती पवार होते.

सुमित एकुलता

मृत सुमित गावडे आईवडिलांना एकुलता एक होता. त्याच्या वडिलांचा प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. सांगलीतील सिव्हील चौक ते कवलापूर मार्गावर ते व्यवसाय करतात. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांना मोठा धक्का बसला.

नेते, अधिकाऱ्यांची धाव

अपघाताचे वृत्त समजताच खासदार संजय पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, राष्ट्रÑवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील यांनी शासकीय रुग्णालयास भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

पालकांचा आक्रोश

दहावीचा पहिला पेपर देऊन विद्यार्थी घरी जात असताना अपघात झाल्याचे समजताच मुलांच्या पालकांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टर काहीच सांगत नव्हते. त्यामुळे पालकांनी आक्रोश सुरु केला. पोलिसांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुकंपावरील वारसांना नियुक्ती पत्र

$
0
0

कोल्हापूर

महापालिकेच्या मयत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्वानुसार पात्र वारसांना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पदभार स्वीकारताच मनपा सेवेत सामावून घेतले. महापौर सरिता मोरे यांनी या नियुक्तींवर स्वाक्षरी केल्यानंतर आयुक्तांनी त्यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्रे दिली. नियुक्ती पत्रे दिलेल्या वारसांमध्ये सौरभ आवटे, निखिल सुतार, अमित भोसले, रोहीत मगदूम, अक्षय सरनाईक, स्वप्निल कुदळे, शिवप्रसाद पाटील, सौरभ सावंत, शुभम सांगावे, महेश घाटगे व प्रमोद कांबळे आदींचा समावेश आहे. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, अफजल पिरजाद व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाड्याच्या मिळकतीवरील घरफाळा कमी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाणिज्य वापरातील भाडेतत्वावरील इमारतींना असलेला घरफाळा कमी करण्याचा निर्णय शनिवारी (ता.२) होणाऱ्या महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत होण्याची शक्यता आहे. याबाबतची उपसूचना स्थायी समितीने दिली असून त्याची घोषणा सभागृहात होईल. वाणिज्य वापरातील इमारतींना कमी केलेल्या घरफाळ्यांमुळे निर्माण होणारी तूट कोणत्या मार्गाने भरुन काढली जाणार याबाबतची उत्सुकता शहरवासियांना असेल.

गेल्या काही वर्षांपासून शहरातील वाणिज्य वापरातील भाडेतत्वावरील इमारतींना जादाची घरफाळा आकारणी केली जात आहे. महापालिकेकडून होत असलेल्या जादा आकारणीमुळे मोठ्या कंपन्या व अन्य कार्पोरेट कार्यालयांनी पाठ फिरवली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या क्रिडाईने अशा मिळकतींचा घरफाळा आकारणी कमी करण्याची मागणी केली होती. एकूण भाड्याच्या सुमारे ७० टक्के घरफाळा आकारणी होत असल्याने क्रिडाईने याबाबत निवेदन देवून मोर्चाही काढला होता.

त्यानंतर स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी बैठक घेऊन मते जाणून घेतली. प्रशासनाने अर्थसंकल्प स्थायीकडे सादर केल्यानंतर त्याला उपसूचना जोडण्यात आली आहे. त्यानुसार वाणिज्य वापरातील भाड्याच्या इमारतींना असलेला घरफाळा ४० ते ५० टक्के कमी होण्याची शक्यता आहे. याबातची घोषणा शनिवारच्या सभेत होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images