Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कूरच्या मतिमंद विद्यालयातील शिष्यवृत्तीत लाखोंचा अपहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

कूर ( ता. भुदरगड) येथील जीवन शिक्षण मतिमंद विद्यालयात संस्थापक व संस्था प्रशासनाने अनागोंदी व मनमानी कारभार करीत मतिमंद विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती रक्कमेचा लाखोंचा अपहार केला आहे. बोगस विद्यार्थीसंख्या दाखवून शासकीय धान्याची लूट, आयकर सवलतीखाली लाखो रुपये मिळवणे आणि मतिमंद विद्यार्थ्यांना स्वत:च्या जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन व्यवसाय व शेतात राबवून घेत आहेत असा आरोप मतिमंद विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. संस्थेचा आर्थिक गैरकारभार व शालेय कामकाजाची खातेनिहाय चौकशी करावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या पालकांनी भुदरगड तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील न्यू महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे कूर येथे २००७ पासून जीवन शिक्षण मतिमंद विद्यालय सुरु आहे. संस्थेला २००९मध्ये पुणे येथील अपंग कल्याण आयुक्तालयाकडून कायम विनाअनुदान तत्वावर मतिमंद शाळा चालविण्यास परवानगी देण्यात आली. पण संस्थेचे संस्थापक शिवाजी पाटील व संचालक मंडळाने संस्थेचा कारभार एकाधिकार व घराणेशाहीने चालविला आहे. संस्थेने शाळेत ४० निवासी व १० अनिवासी विद्यार्थी दाखविले आहेत. प्रत्यक्षात पाच ते सहाच विद्यार्थी शाळेत हजर असतात. मात्र सर्व विद्यार्थ्यांची खोटी हजेरी कागदोपत्री दाखवली जात आहे. विद्यार्थ्यांच्या पालन-पोषणासाठी शाळेला तालुका पुरवठा विभागाकडून दरमहा २०० किलो तांदूळ व ४०० किलो गहू पुरवठा केला जातो. मात्र काही विद्यार्थी सध्या त्यांच्या मूळ गावी अन्य शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांच्याही नावे धान्य व शिष्यवृत्ती उचल केली जात असून शासनाची फसवणूक केली जात आहे. हे धान्य संस्थापकांच्या पोल्ट्रीतील कोंबड्यांना व गोठा प्रकल्पातील गाईंना खाद्य म्हणून वापरले जात आहे. मात्र धान्याचे खोटे विनीयोग रेकॉर्ड बनवून शासकिय धान्याचा मोठ्या प्रमाणात अपहार सुरु आहे.

समाजकल्याण विभागामार्फत प्रत्येक मतिमंद विद्यार्थ्याला वर्षाला १८०० रुपये अपंग शिष्यवृत्ती दिली जात आहे. ही रक्कम विद्यार्थी व पालक यांच्या संयुक्त खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. पण संस्थेने मुख्याध्यापकांच्या नावे बँकेत खाते उघडून सदर शिष्यवृत्ती अनाधिकृतपणे जमा करुन त्याची स्वतः उचल केली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी व पालक यांच्या खोट्या सह्या करत शिष्यवृत्ती वितरणाचे कागदोपत्री रेकॉर्ड रंगविले आहे. याबाबत पालकांकडून शहानिशा व सह्यांचे नमुने तपासणी झाल्यास खरी गोष्ट समोर येईल. तसेच शाळा परिसर स्वच्छ व प्रदूषणमुक्त राखणे आवश्यक असतांनाही संस्थेने शाळा इमारतीध्येच पोल्ट्री व्यवसाय व लागूनच गाईंचा गोठापालन व्यवसाय सुरु केला आहे. मतिमंद विद्यार्थ्यांकडून जनावरांचे मलमूत्र काढणे, चारा आणणे-घालणे, पोल्ट्रीतील कोंबड्यांची व्यवस्था व स्वच्छता राखणे अशी कामे करवून घेतली जात असून या मुलांना नेहमी अस्वच्छ अवस्थेत व वातावरणात ठेवले जात आहे. त्यामुळे बहुतांश पालकांनी आपली मुले आपापल्या घरी नेली आहेत. तेंव्हा संस्थेच्या आर्थिक गैर कारभाराची व शालेय कामकाजाची खातेनिहाय चौकशी करावी व संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर चंद्रकांत कांबळे (बिद्री), चंद्रकांत कांबळे (कूर), बाबासाहेब कांबळे (म्हसवे), अनंत शिंदे (शिंदेवाडी), रंगराव ढेरे (निढोरी), विजय भोसले (आदमापूर), नामदेव पाटील (मुदाळ), सौरभ कुंभार (वाघापूर), सुनीता पावले (कासारवाडा) यांच्यासह १९ पालकांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री, अपंग आयुक्तालय, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

व्यक्तीगत द्वेषातून तक्रार

दरम्यान, याबाबत संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 'मतिमंद विद्यालयाबाबत केलेली तक्रार व्यक्तिगत द्वेषातून केली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम पालकांच्या खात्यावर जमा केल्याने अपहाराचा आरोप चुकीचा आहे,' असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापूर महापालिकेच्याआयुक्तपदी दीपक तावरे

$
0
0

सोलापूर महापालिकेच्या

आयुक्तपदी दीपक तावरे

सोलापूर :

सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी दीपक तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तावरे पुणे येथील पणन विभागाचे संचालक म्हणून काम पाहत होते. तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची जळगाव येथे जिल्हाधिकारी पदावर बदली झाली होती. त्यांनी पदभार सोडल्यानंतर महापालिकेची कामे खोळंबली होती. तात्पुरता पदभार सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे देण्यात आला होता.

दरम्यान, राज्य सरकारने बुधवारी दुपारी राज्यातील अनेक आयएसए अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, त्यात दीपक तावरे यांची सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्चीची आजपासून बारावीची परीक्षा

$
0
0

आर्चीची आजपासून बारावीची परीक्षा

सोलापूर :

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२ वीची परीक्षा गुरुवार, २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सैराट फेम आर्ची उर्फ रिंकू तथा प्रेरणा महादेव राजगुरू ही टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देणार आहे. त्यामुळे आर्चीला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची गर्दी होण्याची तसेच परीक्षा केंद्रावर त्रास आणि उपद्रव होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री गवळी-सातपुते यांनी टेंभूर्णी पोलिस ठाण्यात पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी एका केली आहे.

आर्ची या परीक्षा केंद्रावर बहिःस्थ विद्यार्थिनी म्हणून प्रविष्ट झाली आहे. मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयाचे पेपर रिंकू राजगुरू देणार असल्याचे सांगण्यात आले. रिंकू राजगुरूने दहावीची परीक्षा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेच्या केंद्रातून दिली होती. त्यावेळी ती मराठीत ८३, हिंदी ८७, इंग्रजी ५९, गणित ४८, सायन्स आणि टेक्नॉलॉजी ४२ आणि सोशल सायन्सला ५० गुण, असे एकूण ३२७ गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाचा खून

$
0
0

मुलाचा खून

कराड :

गोसावेवाडी (ता. कराड) येथील तेजस तानाजी बनसोडे (वय ११) या मुलाचा खून करण्यात आल्याचे मंगळवारी संध्याकाळी निष्पन्न झाले. गोसावेवाडीच्या उत्तरेस एक कि. मी. अंतरावरील वापरात नसलेल्या विहिरीत तेजसचा मृतदेह आढळून आल्याने त्याला विहिरीत ढकलून दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी संशयित म्हणून तेजसचा चुलत भाऊ समाधान निवास बनसोडे (वय २८, रा. गोसावेवाडी) यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवशाही’नेमकी कुणाच्या फायद्यासाठी ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिवशाहीच्या फायद्यासाठी एसटी महामंडळाच्या लांब पल्ल्याचा बसेस बंद केल्या. यामुळे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शिवशाही ही बससेवा नेमकी कुणाच्या फायद्यासाठी सुरू केली आहे, हे जाहीर करावे,' असे आव्हान महाराष्ट्र 'इंटक'चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिले.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शिवशाही बससेवेवरुन परिवहनमंत्री रावते यांच्यावर टीकास्त्र सोडले. छाजेड म्हणाले, 'शिवशाहीवरील चालक हे खासगी आहेत. मध्यंतरी एका चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो रिक्षा ड्रायव्हर असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. ज्यांना नीटपणे कार चालविता येत नाही, ते शिवशाही बस चालवित आहेत. यामुळेच शिवशाही बस अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. यापूर्वीच्या काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या कालावधीत राज्यभरातील एसटी डेपोच्या देखभालीसाठी ३२ कोटी रुपयांची तरतूद असायची. मात्र या सरकारच्या कालावधीत या कामासाठी ४०० कोटी रुपयांचा ठेका काढण्यात आला. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीला हे काम सोपवले. सरकारने, ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीला ठेका देण्यामागील गौडबंगाल काय आहे?'

' एसटी कर्मचाऱ्यांना सुविधा नाहीत. बसस्थानक परिसरात स्वच्छतागृहांची देखभाल नीटपणे होत नाही. विश्रांतीगृहांची अवस्था दयनीय झाली आहे. रंग बदलण्याच्या नावाखाली लाल रंगाच्या गाड्या स्क्रॅप करायचा उद्योग सुरू आहे. परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्षपद ही दोन वेगवेगळी पदे आहेत. मात्र रावते यांनी दोन्ही पदे आपल्याकडे ठेवली आहेत. आर्थिक लाभापोटी असा निर्णय घेतला आहे', असा आरोपही छाजेड यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणानगर परिसरात शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, वारणानगर

वारणानगरसह परिसरात मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. अमृतनगर फाटा येथे फ्रेंड्स पॉवर मंडळातर्फे आयोजित महाप्रसादाचा हजारो नागरीक, शिवभक्तांनी लाभ घेतला.

तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्यावतीने उद्यानातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील व प्रभारी कार्यकारी संचालक विजयकुमार कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी उद्यानात वारणा उद्योग समुहातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे दर्शन घेवून अभिवादन केले. अमृतनगर फाटा येथेही फ्रेंड्स पॉवर, वाघाची तालीम या मंडळांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवत शहीद जवानांना कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. बिरदेवनगर ते अमृतनगर फाटा मिरवणूक काढण्यात आली. फ्रेंड्स पॉवर ग्रुपचे अध्यक्ष विश्वास माने, निवास पाटील, अभिजित पाटील, अक्षय मोरे, अर्जुन शिद यांसह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुंभी’ची थकित एफआरपी आठ दिवसांत देण्याची मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

कुंभी-कासारी कारखान्याने चालू हंगामात एफआरपीचे तुकडे करत २३०० रुपये पहिला हप्ता दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण झाली आहे. जर आठ दिवसांत पूर्ण गाळप झालेल्या उसाची संपूर्ण एफआरपी दिली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम पाटील, बाजीराव देवाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला. कुंभी कारखान्याचे चेअरमन आमदार चंद्रदीप नरके यांनी निवेदन स्वीकारले.

विक्रम पाटील म्हणाले, 'शेतकऱ्यांना एकरक्कमी एफआरपी मिळाली नसल्याने पीककर्ज परतावा झालेला नाही. रब्बी पिकांच्या मशागतीतही मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. १४ दिवसांत एफआरपी देण्याचे बंधन असताना प्रशासन चालढकल करत आहे.'

बाजीराव देवाळकर म्हणाले, 'येत्या आठ दिवसांत कारखान्याने थकीत एफआरपी दिली नाही तर ठिय्या आंदोलन करू.'

यावेळी आमदार नरके यांनी लवकरच उर्वरित एफआरपीपैकी शासनाचे अनुदान वगळता ४९२ रुपये शेतकऱ्यांना अदा करू असे आश्वासन दिले. एम. के. नाळे, विक्रम पाटील (तिरपण), दगडू गुरव, नाथा चव्हाण, बळीराम पाटील, रंगराव पाटील, बाबासाहेब पलसकर, उदय पाटील, बळीराम पाटील व स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंटकचे रविवारी राज्यस्तरीय अधिवेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे कामगार चळवळीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांच्या हितासाठी राष्ट्रीय मजदूर काँग्रेसने (इंटक) संघर्षाचा निर्धार केला आहे. आंदोलनाची पुढील दिशा आणि कामगार हिताचे धोरण ठरविण्यासाठी कोल्हापुरात रविवारी (ता. २४ ) 'इंटक'चे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असल्याचे महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष व माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्र इंटकला संलग्न असलेल्या संघटनांचे १५०० हून अधिक प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार डॉ. जी. संजीवा रेड्डी हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी श्रीमती सोनल पटेल यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळीची उपस्थिती असेल. मार्केट यार्ड येथील राजर्षी शाहू सांस्कृतिक सभागृह येथे दुपारी बारा वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होईल. 'इंटक'ही कामगार चळवळीचे नेतृत्व करणारी मोठी संघटना आहे. संघटनेने सातत्याने कामगार हिताला प्राधान्य दिल्याचे छाजेड यांनी सांगितले.

ते म्हणाले, 'भाजप सरकारच्या गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत कामगार चळवळीपुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. केंद्र व राज्य सरकारची धोरणे ही मालकधार्जिणी आहेत. मोदी सरकारने कामगार हिताचे कायदे गुंडाळून ठेवण्याचे काम केले. केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी अधिवेशनात एल्गार पुकारला जाईल. देशभरातील विविध असंघटित कामगार संघटनांना 'इंटक'च्या छताखाली आणून आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल. 'पत्रकार परिषदेला महाराष्ट्र इंटकचे सचिव मुकेश तिगोटे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते

.........

अधिवेशनासाठी इंटकचे पदाधिकारी सक्रिय

राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष हिंदुराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांची समिती कार्यरत आहे. यामध्ये शामराव कुलकर्णी, चंद्रशेखर पुरंदरे, सुभाष ढेरे, शिवानंद अहिरवडे, बंडोपंत वाडकर, आप्पासाहेब साळोखे, सुरेश सुर्यवंशी, राजू पवार, सुवर्णा जाधव, सारिका शिंदे, श्रीमती नगमा शेख, आझाद शेख, उदय भंडारे आदींचा समावेश आहे.

...........................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीप्रश्नावरुन प्रशासन धारेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील पाणीपुरवठ्याच्या बोजवाऱ्यासह काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेला विलंब होण्यास प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सर्वच नगरसेवकांनी केला. तर वादळी चर्चेनंतर अॅस्टर आधार हॉस्पिटलला अतिरिक्त जागा भाड्याने देण्यास सभागृहाने विरोध केला. सभेच्या अध्यक्षा महापौर सरिता मोरे यांनी हॉस्पिटलने अवैधरित्या आरक्षित केलेली जागा ताब्यात घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

सभेत बोलताना सुनील कदम म्हणाले, 'ई वॉर्डात गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आले. दुरुस्ती सुरू आहे, विद्युत पंपात बिघाड, कर्मचारी नाहीत, अशी छापील उत्तरे दिली जातात. टंचाईच्या काळात केवळ एक टँकर असल्याने नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. पाणी उपशाचे महापालिकेचे बिल कायम असताना उपसा केलेले पाणी जाते कोठे? कचरा, ड्रेनेज माथी मारले असताना किमान पाणी तरी द्या.' तर 'पाणीपुरवठा सुरळीत करणार नसाल, तर बिल भरणार नाही', असा इशारा सुरेखा शहा यांनी दिला. 'जलअभियंता कुलकर्णी यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाणी टंचाई निर्माण होत असल्याचा आरोप स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी केला.

प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'यंत्रणेत प्रचंड दोष असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडले आहे. अनेकवेळा प्रशासनाला माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. वाटपातील नियोजनामुळे ई वॉर्डासह उपनगरात पाण्याची गंभीर समस्या बनली आहे.'चर्चेत रुपाराणी निकम, अभिजित चव्हाण, प्रवीण केसरकर, राजसिंह शेळके, मेहजबीन सुभेदार, कविता माने, शोभा कवाळे यांनी सहभाग घेत कुलकर्णी यांना धारेवर धरले.

अॅस्टर आधार हॉस्पिटलला उद्यान विकास व एसटीपी प्लांटसाठी वाढीव जागा देण्याच्या इस्टेट विभागाच्या प्रस्तावर प्रशासनाला नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. रेडिरेकनरच्या दुप्पट दराने १३९.४० चौ. फूट जागा भाड्याने दिली असताना जागेचा वापर पार्किंगसाठी केला जातो. हॉस्पिटल बेकायदेशीर जागेचा वापर करत असून ऑक्सिजन पार्कच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, स्पर्धेशिवाय निविदा काढण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, एखादा नागरिक कोर्टात गेल्यास सभागृह जबाबदार ठरेल,' असे उपमहापौर भूपाल शेटे, शारंगधर देशमुख, सुनील कदम यांनी निदर्शनास आणून दिले. अजित ठाणेकर यांनी उपशहर अभियंता यांनी उद्यानावरील पार्किंग काढण्याचा अभिप्राय दिला असल्याचे निदर्शनास आणून दिले. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी महासभेच्या ठरावानुसार जागा दिली असल्याचे स्पष्ट केले. पण यावर समाधान न झाल्याने शेटे यांनी जागा देताना कायदेशीर प्रक्रिया राबवली का, शास्त्रीनगर येथील हॉस्पिटलला जागा का दिली नाही? आदी प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रशासन निरुत्तर झाले. त्यानंतर महापौर मोरे यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.

.....................................

चौकट

विरोधी नगरसेवक दहा मिनिटे उशीरा

यापूर्वीच्या सभेत नेहमीच भाजप-ताराराणीचे आघाडीचे सदस्य सभेला वेळेवर उपस्थित राहत होते. सभा वेळेत सुरू करण्यासाठी त्यांचा नेहमीच आग्रह असे. गेल्या सभेत महापौरांनी उशीरा येणाऱ्यांना सभागृहात न येण्याचा इशारा दिला होता. पण आजच्या सभेला सत्ताधारी गटाचे नगरसेवक आले असताना विरोधी गटाचे सदस्य वेळेवर आले नव्हते. त्यामुळे सभेला वेळेवर आलेल्या नगरसेविका सभागृहाबाहेर पडल्या. त्यानंतर दहा मिनिटांनी विरोधी गट सभागृहात दाखल झाला.

......................

भोपळेंचे राजीनामाअस्त्र

'ई वॉर्डात पाणीपुरवठ्याची समस्या असताना थेट पाइपलाइन व अमृत योजना रखडली आहे. योजना तातडीने कार्यन्वित करता की राजीनामा देऊ,' असा इशारा नगरसेवक कमलाकर भोवळे यांनी दिला. त्यांच्या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला. त्याचवेळी काहीजण त्यांना राजीनामा द्या, तर अनेकजण राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्वेतपत्रिकेवरुन आरोपांच्या फैरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेवरुन बुधवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडीत आरोपांच्या फैरी झडल्या. योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर राज्य सरकार परवानगीच्या माध्यमातून योजनेला 'खो' घालत असल्याचा आरोप झाला. त्यातच बोलण्यास संधी मिळत नसल्याने विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर पळाली....पळाली अशाही घोषणा देण्यात आल्या. श्वेतपत्रिकाऐवजी माहिती पत्रिका दिल्याने या गोंधळात अधिकच भर पडली. यामुळे काहीकाळ सभागृहात वातावरण तणावपूर्ण बनले. गोंधळातच सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.

सत्यजित कदम म्हणाले, 'थेट पाइपलाइन योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्र्यांकडून चौकशी लावू शकतो. मात्र अशी चौकशी लावल्यास भाजप-ताराराणी आघाडीने योजनेत 'खो' घातला असा आरोप होईल. त्यामुळे योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ' त्यांनी असे म्हणताच गोंधळ सुरू झाला. त्याचवेळी सभाध्यक्षांनी एकावेळी एकानेच बोलण्याचे आदेश दिले. देशमुख यांनी विरोधक बोलत असताना आम्ही बोलणार नाही, पण आम्ही बोलत असताना त्यांनीही शांत बसण्याची मागणी केली. कदम यांनी योजनेतील भ्रष्टाचार आयुक्तांनी शोधावा अशी मागणी केली.

भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी म्हणाले, 'योजनेला राजकीय वळण न लावता योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु. उलट दिशेने कामाला सुरुवात करणारा ठेकेदार योजना रखडण्यास जबाबदार आहे. राज्य सरकारने सहापैकी पाच परवानग्या दिल्या असताना सरकारमुळे योजना रखडली म्हणणे चुकीचे आहे. ठेकेदार व सल्लागार कंपनीने शहरवासियांच्या पैशावर दरोडा टाकला आहे. ठाणेकर यांनी कॉस्ट कटिंगसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली. सुनील कदम यांनी योजनेत भ्रष्टाचार झाला असून त्याच्या मुळाशी जाण्याचा इशारा दिला.

प्रा जयंत पाटील म्हणाले, 'सल्लागार कंपनी दंडेलशाही करत आहे. योजनेच्या मूळ मार्गात ७० टक्के बदल केला आहे. जर ढाचाच बदलला असेल, तर योजना पूर्ण कशी होणार?' त्याचवेळी विरोधकांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे गोंधळ सुरू झाला. गोंधळातच सुनील कदम यांनी चुकीच्या पद्धतीने योजना माथी मारुन विनाकारण पालकमंत्री चंद्रकांत पाटील व सरकारवर आरोप केले जात असल्याचे सांगितले. योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे म्हणताच त्याला देशमुख यांनी आयआरबीला ४७६ कोटी कसे दिले असा मुद्दा मांडला. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. चर्चेदरम्यान गोंधळ घालून योजनेत खोडा घालण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप सभागृहात झाला. विरोधकांनीही सभागृहात बोलण्यास देत नसल्याचा आरोप करत सभात्याग केला. दरम्यान, याचवेळी आयुक्तांच्या बदली झाल्याची माहिती मिळताच सभागृहाने त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.

...

चौकट

दंडात्मक कारवाई योग्य

उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, 'आमदार सतेज पाटील यांच्यामुळे योजना मंजूर झाली. जनतेवर भार पडू नये, यासाठी महापालिकेचा हिस्सा दहा टक्के होता. पण नंतर सरकारने हीच रक्कम २० टक्के केल्याने १६ कोटींचा भार वाढला. अजूनही काही परवानग्या रखडल्या आहेत. फेरनिविदा काढल्यास पुन्हा योजनेला 'खो' बसेल. त्यामुळे आयुक्तांची दंडात्मक कारवाई योग्य असून परिपूर्ण अहवाल द्यावा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आर्ची’च्या परीक्षेसाठी बंदोबस्ताची मागणी

$
0
0

आजपासून बारावीची परीक्षा

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा आज गुरुवार, २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 'सैराट' फेम आर्ची उर्फ रिंकू तथा प्रेरणा महादेव राजगुरू ही टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देणार आहे. आर्चीला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची गर्दी होण्याची तसेच परीक्षा केंद्रावर त्रास आणि उपद्रव होण्याची शक्यता असल्याने कॉलेजच्या प्राचार्या जयश्री गवळी-सातपुते यांनी टेंभूर्णी पोलिस ठाण्यात पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.

रिंकू राजगुरू ही या परीक्षा केंद्रावर बहिःस्थ विद्यार्थिनी म्हणून परीक्षा देणार आहे. मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयाचे पेपर रिंकू राजगुरू देणार असल्याचे सांगण्यात आले. रिंकू राजगुरूने दहावीची परीक्षा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेच्या केंद्रातून दिली होती. त्यावेळी ती मराठीत ८३, हिंदी ८७, इंग्रजी ५९, गणित ४८, सायन्स आणि टेक्नॉलॉजी ४२ आणि सोशल सायन्सला ५० गुण, असे एकूण ३२७ गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कार्यकर्त्यांचा बळी देऊनस्वाभिमानीची आघाडी नाही’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा गडहिंग्लज

'किमान समान कार्यक्रमावर काँग्रेस आघाडीशी जुळवून घेण्याचा विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. आघाडीकडे तीन जागा मागितल्या आहेत. पण कार्यकर्त्यांचा बळी देऊन आघाडी करणार नाही' अशी स्पष्टोक्ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी गडहिंग्लज येथे पत्रकार परिषदेत केली. तालुक्यातील दुंडगे येथे प्राथमिक शाळेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या शेट्टी यांनी गडहिंग्लज येथे पत्रकारांशी संवाद साधला.

खासदार शेट्टी म्हणाले, 'भारतात २१ पक्षांना एकत्र करून भाजपला पराभूत करण्यात स्वाभिमानी संघटनेचा मोठा वाटा आहे. लोकशाही प्रक्रियेत विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचे काम आम्ही केले आहे. संसदीय आयुधं म्हणून स्वाभिमानी संघटना निवडणुकीत उतरते. शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्ती अशा समान कार्यक्रमावर आधारित महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडीत सहभागी होण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. हातकणंगले, वर्धा व बुलढाणा या तीन जागेवर आम्ही दावा केला आहे. अन्यथा स्वतंत्र लढाई ठरलेली आहे.'

खासदार शेट्टी म्हणाले, 'स्वतंत्र निवडणूक लढायची म्हणून गेली दोन वर्षे आमची तयारी सुरू आहे. स्वतंत्र लढलो तर किमान ७ जागा स्वाभिमानीच्या निवडून येतील अशी खात्री आहे. पण, आघाडी करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजपला पराभूत करणे हा आमचा निर्धार आहे.'

चौकीदाराला चोर म्हणणारी

युती लोकांना किती रुचणार?

सेना-भाजप युतीबद्दल बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, 'भाजप-सेनेची युती होणार हे गृहितच होते. पण शिवसेनेवाले चौकीदाराला 'चोर' म्हणत होते. आता त्यांना पंतप्रधान मोदी सज्जन असल्याचा साक्षात्कार कसा झाला? आणि भाजपा सेनेची ही युती लोकांना किती रुचेल? हे आता लोकसभा निवडणुकीत नक्की कळेल' असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत कृष्णा जलवाहिनीला पुन्हा गळती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

शहराची तहान भागविणाऱ्या कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला टाकवडे येथे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्याचा पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. सततच्या गळतीमुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकत आहे. त्यामुळे नादुरुस्त जुनी जलवाहिनी तातडीने बदलावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

मजरेवाडीच्या कृष्णा नळपाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला सतत गळती लागत आहे. त्याचा विपरित परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर हेातो. दोन-तीन दिवसांपूर्वी टाकवडे येथे वितरण नलिकेला मोठी गळती लागली होती. ही गळती काढणेसाठी पाणी उपसा बंद ठेवला होता. युद्धपातळीवर काम करून गळती काढली. त्यानंतर पाणी उपसा सुरू केल्यानंतर पुन्हा टाकवडे येथे गळती लागली आहे. त्यामुळे शहरवासियांना गळतीची डोकेदुखी बनली आहे. शहरातील अनेक प्रभागात गेल्या चार-पाच दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र हिंडावे लागत आहे. त्यामध्ये पुन्हा गळती लागल्याने शहरवासियांचे हाल होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवेकवाद, समतेचे विचारच तारतील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'समाजातील सध्याची अशांतता हे अंधारयुगाचे लक्षण आहे. वैचारिक आंधळेपण आणि बहिरेपणामुळे चळवळी क्षीण होत आहेत. हिंसेची चटक लागल्यासारखा समाज हिंस्त्र बनत आहे. अशा अंधारयुगातही विवेकवाद आणि समतेचे विचार प्रकाशाच्या नव्या वाटा दाखवतील, 'असा आशावाद ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी व्यक्त केला.

कॉ. गोविंद पानसरे संघर्ष समितीतर्फे बुधवारी स्मृति जागर सभेचे आयोजन केले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. शाहू स्मारक भवन येथे ही सभा झाली. त्यामध्ये विवेकवादाचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार करण्यात आला.

पेठे म्हणाले, 'मंबाजी मरतो आणि संत तुकाराम उरतो हा इतिहास आहे. कॉ. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचा खून करुन विचार संपविण्याचा प्रयत्न झाला, पण विवेकावादाचा विचार हा चिरंतन आहे. पुलवामा येथील जवानांवरील हल्ला हा भ्याड होता. त्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. तो हल्ला भ्याड होता, तर चार विचारवंतांवर झालेला हल्ला हा शूर होता का? विचारवंतांचे मारेकरी शत्रू नव्हेत का, सीमेच्या आतील दहशतवादाविरोधात नागरिक रस्त्यावर उतरुन आक्रोश करताना दिसत का नाहीत ? हा प्रश्न मला सतावत आहे.'

'कॉ. पानसरे यांचे व्यक्तिमत्व हे नदीच्या प्रवाहासारखे होते. पानसरेंच्या विचार कार्याची कास पकडून आपणही सतत प्रवाही, वाहते राहू, खळाळते जगू. तोच प्रभावशाली इतिहास म्हणून अंगाखांद्यावर खेळवू. जिंकणाऱ्यांच्या पार्टीत न जाता नेहमी हरणाऱ्यांच्या गटात जाणे तोच खरा न्याय ही त्यांची शिकवण आंदोलनासाठी बळ देणारी ठरली,'असे पेठे यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.

डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, 'अंधारयुग उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला उभा आहे. त्याला आत प्रवेश करु देणार नाही हा निर्धार प्रत्येकाने केला पाहिजे. विवेक ढळला तर सामाजिक स्वास्थ टिकणार नाही. काश्मिरमधील लोकांच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्याची भाषा योग्य नाही. तेथील लोकांशी व्यावहारिक, नैतिक आणि माणुसकीच्या दृष्टीन योग्य असा व्यवहार झाला पाहिजे. यासाठी माणुसकीचे अत्युच्च दर्शन घडविणे गरजेचे आहे.' याप्रसंगी कॉ. मुक्ता दाभोलकर, कॉ. दिलीप पवार यांची भाषणे झाली. कॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. उमेश सुर्यवंशी यांनी आभार मानले.

..........

युती म्हणजे मांडवली

पेठे यांनी कुणाचाही थेट उल्लेख न करता सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केले. ते म्हणाले, 'एकमेकांच्या हातात हात घालून केलेली युती म्हणजे मैत्री नव्हे. सध्य स्थितीत युती म्हणजे मांडवली. इंग्रजीमध्ये त्याला डिलिंग म्हणतात. ही समाजाचा मानसिक, बौद्धिक स्तर खालावत असल्याची उदाहरणे आहेत. मुळात समाजाचा बौद्धिक, मानसिक स्तर असू नये यासाठी राजनिती केली जाते.'

............

पानसरे व्यक्ती नव्हे विचार

प्रसिद्ध गीतकार आणि संवादलेखक जावेद अख्तर पाठदुखीच्या कारणामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या भाषणाची चित्रफित यावेळी दाखवण्यात आली. अख्तर यांनी कॉ. गोविंद पानसरे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. 'पानसरे ही एक व्यक्ती नव्हे, तर विचारधारा होती. साठ दशके हा माणूस समाजासाठी संघर्षशील राहिला. त्यांच्या विचारकार्यातून नवी ऊर्जा लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मृती जागर सभा...

$
0
0

उलगडला चळवळीचा इतिहास

कॉ. गोविंद पानसरे स्मृती जागर सभेत सांगितिक कार्यक्रमातून चळवळीचा इतिहास उलगडला. कॉ. पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यापासून रोहित वेमुल्ला यांच्यापर्यंतचा प्रवास मांडला गेला. रसिया पडळकर, आदित्य खेबूडकर, रोहित पोतनीस, अक्षय पोळके, रणजित कांबळे, कृष्णा भूतकर, मल्हार महेकर यांनी सादरीकरण केले. चळवळीच्या प्रवासावर आधारित नाटिका व कार्यक्रमाला उपस्थितांनी दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाखोंच्या उपस्थितीत काळभैरव यात्रा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

पोलिस आणि तालुका प्रशासनाचे शिस्तबद्ध नियोजन, एसटी महामंडळाने राबवलेली बससेवा यामुळे श्री काळभैरव यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत झाली. 'काळभैरी बाळभैरी... भैरीच्या नावानं चांगभलं' या आरोळीने डोंगर परिसर दणाणून जात होता.

गडहिंग्लजपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले, ग्रामदैवत व सीमाभागातील श्रद्धास्थान असलेल्या काळभैरवाच्या यात्रेसाठी डोंगरावर प्रचंड गर्दी झाली. भाविकांचा अमाप उत्साह ओसंडून वाहत होता. यात्रा काळात शिस्त राहावी म्हणून पोलिस व महसूल प्रशासनाने बड्याचीवाडी गावात व औद्योगिक वसाहत परिसरात पार्किंगची सोय केली होती. गडहिंग्लज आगाराने दर दहा मिनिटांनी बस फेरीचे नियोजन केले होते. काही खाजगी वाहनांचीही सेवा सुरू असल्याने यात्रेकरूंची गैरसोय झाली नाही. काळभैरीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. डोंगरावर रस्त्याच्या दुतर्फा दुकानांची मांडणी, दुकानांसमोर हौशी भाविकांची गर्दी यामुळे वातावरण फुलून गेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्यजित पाटीलची सुवर्णमोहोर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

कुस्तीपट्टूंचे गाव, गुऱ्हाळघरे असलेले गाव, पैलवानांचे गाव, शिष्यवृत्ती परीक्षाधारक विद्यार्थ्यांचे गाव अशी बिरुदे लाभलेल्या अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील संशोधक मंडळींनी गावचे नाव एका नव्या वळणावर आणून ठेवले आहे. येथील सत्यजित पाटील याने आपल्या अभ्यासाच्या जोरावर शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रपती सुवर्णपदक पटकावले असून शिक्षणक्षेत्रात यशाची सुवर्णमोहर उमटवली आहे.

राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागात अर्जुनवाडा हे खेडेगाव. अलिकडे काळम्मावाडी तलावाचे पाणी कालव्यामार्फत उपलब्ध झाल्याने गावात सुबत्ता आली आहे. अन्यथा या गावात घरटी एक पैलवान. याच गावातील हिंदकेसरी दादू चौगले, विनोद चौगले, बबन चौगले यांनी कुस्तीक्षेत्रात गावचे नाव उज्वल केले. अलिकडे गावात गुऱ्हाळघरे अधिक झाली आहेत. गावात शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती मिळवणारे विद्यार्थी संख्येने अधिक आहेत. संशोधक जे. डी. यादव यांनी रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी मिळवणारा जगभर नावलौकिक मिळवणारा प्रयोग यशस्वी केला. त्यापाठोपाठ अर्जुनवाडा येथील युवा संशोधक सत्यजित संजय पाटील याने आपल्या एम. एस्सी. भौतिकशास्त्र शिक्षण पूर्ण करत विद्यापीठाचे राष्ट्रपती सुवर्णपदक पटकावले आहे.

सत्यजित पाटील याने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दूध साखर विद्यानिकेतन बिद्री येथे पूर्ण केले . शालेय वयातच सत्यजितने अभ्यासात चमक दाखवली. त्याचा कल ओळखून वडील प्रा. संजय पाटील यांनी त्याला प्रोत्साहन दिले. त्याने विज्ञान शाखेसाठी कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सत्यजितने विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होऊन बी. एस्सी. पदवी संपादन केली. एम. एस्सी. भौतिकशास्त्राचे शिक्षण घेताना त्याने विद्यापीठातील सर्वोच्च मानाचे राष्ट्रपतीपदक पटकावले. दररोज सहा तास अभ्यास करत, विविध छंद जोपासत आपले करिअर सुरु ठेवले आहे.

सत्यजितचे वडील बिद्री येथील दूध साखर महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख असून आई गृहिणी आहेत. वडिलांच्या मराठीतील संशोधनाप्रमाणे विज्ञानातील संशोधन करण्याचा ध्यास घेऊन त्याने मार्गक्रमण सुरु ठेवले आहे.

सत्यजितची शैक्षणिक गुणवत्ता, भाषा शुद्धता, वर्तणूक, नेतृत्वगुण, संशोधन, आवड या सर्व निकषांची पडताळणी करून त्याला राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. 'सोलर सेल' या विषयावर डॉ. पी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे संशोधन सुरू आहे. भविष्यात 'मटेरियल सायन्स' या विषयात संशोधन करून आपल्या वडिलांप्रमाणे अध्यापन क्षेत्रात करिअर करायचे या ध्येयाने सत्यजितची घोडदौड सुरू आहे.

...

कोट

'सतत कष्ट घेण्याची तयारी असेल आणि भविष्याचे नियोजन असेल तर निश्चितच यश मिळते. भविष्यातील संशोधनाचा फायदा अध्यापन क्षेत्रात व्हावा अशी अपेक्षा आहे.

- सत्यजित पाटील, युवा संशोधक

...

कोट

'मुलांच्या आवडीनुसार त्यांना करिअर करण्याची संधी उपलब्ध करून दिली तर ती निश्चितच यशस्वी होतात. ग्रामीण आणि शहरी असा करिअरमध्ये भेदभाव नाही. फक्त कष्टाची तयारी मुलांनी ठेवली पाहिजे.

- प्रा. संजय पाटील, अर्जुनवाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एजंट चौकशीच्या फेऱ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हातकणंगले तालुक्यातील यळगूड येथील पोस्टात झालेल्या अपहार प्रकरणातील सर्व खातेदारांची रक्कम पुढील आठवड्यापासून वितरीत करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या चौकशीत एकूण ४७ लाख रुपयांच्या अपहाराची नोंद झाली असून अपहारप्रकरणी एक पोस्टमास्तर आणि एका पॅकर (शिक्का मारणारा कर्मचारी) अशा दोघांना निलंबित केले आहे. आणखी एका कर्मचाऱ्याची चौकशी होणार असून त्याच्याही निलंबनाची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरातील पोस्ट कार्यालयातील काही जणांचे त्या प्रकरणाशी लागेबंधे असल्याचे सामोरे येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपहार प्रकरणाची माहिती मागवली आहे. अपहार प्रकरणात काही एजंटाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत एजंटांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान अपहार प्रकरणाबाबत नियुक्त चौकशी समितीने यळगूड येथील २५० खातेदारांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी भरलेली रक्कम आणि पोस्ट ऑफीसमध्ये त्यांच्या खात्यावर जमा न झालेल्या रकमेचा हिशेब मांडून संबंधित रक्कम त्यांना सुपूर्द करण्यासाठी पोस्ट ऑफीस नियोजन करत आहे.

यळगूड पोस्ट ऑफीसमधील अपहार प्रकरणाचे धागेदोरे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरातील पोस्ट ऑफीस कार्यालयापर्यत आढळत आहेत. वास्तविक एजंटानी खातेदारांकडून जमा केलेली रक्कम पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील पोस्ट कार्यालयात भरण्यासंदर्भात स्पष्ट नियमावली आहे. मात्र एजंटानी यळगूड येथील पोस्ट कार्यालयात रक्कम जमा केली. त्यांनी असे का केले? या मागील कारणांचा तपास करण्यात येत आहे. चौकशी समितीला साधारणपणे जुलै २०१८पासून अनेक खातेदारांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याचे आढळले आहे.

यासंदर्भात समितीने चौकशी केल्यावर काही एजंटांनी खातेदारांकडून घेतलेली ठेव रक्कम पोस्टात जमा केल्याचे सांगितले. पोस्टात ठेव जमा करुनही खात्यावर नोंद झाली नाही. याप्रकरणी आणखी काही जणांची चौकशी होणार आहे.

यळगूड पोस्ट ऑफीसमधील अपहार प्रकरणी आतापर्यंत २५० खातेदारांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. खातेदारांची सर्व रक्कम पोस्ट कार्यालयामार्फत दिली जाईल. पुढील आठवड्यापासून संबंधित खातेदारांना त्यांच्या खात्यावर किंवा रोख स्वरुपात रक्कम दिली जाईल.

- आय. डी. पाटील, वरिष्ठ अधीक्षक, कोल्हापूर डाकघर

जिल्हाधिकारी कार्यालयालाही अहवाल

अपहारप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी दबाव वाढत आहे. नागरिकांनी गाव बंद ठेवून उपोषण केले. खासदार राजू शेट्टी, आमदार सुजित मिणचेकर यांनी या प्रकरणात लक्ष घातले. कोल्हापूर डाकघर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक आय. डी. पाटील यांनी खासदार, आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीची माहिती दिली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अल्पबचत योजनेसाठी एजंटांची नियुक्ती होते. या प्रकरणात काही एजंटांचा समावेश असण्याची शक्यता आहे. पोस्ट विभागाकडून या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णा योजनेची जलवाहिनी बदला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

शहरासाठी आवश्यक वारणा योजना पूर्णत्वासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा घेतलेला निर्णय निश्‍चितच स्वागतार्ह आहे. परंतु शहराला भेडसावणाऱ्या पाणी टंचाई रोखण्यासाठी गळतीच्या गर्तेत अडकलेल्या कृष्णा नळपाणी योजनेची मुख्य जलवाहिनी तातडीने बदलण्यासाठीही प्रयत्न व्हावेत, अशी मागणी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी केली आहे.

प्रकाश मोरे म्हणाले, 'वारणा योजना पूर्णत्वास जावून शहराची तहान भागावी अशी भूमिका काँग्रेस पक्षाने प्रारंभापासून घेतली आहे. पण नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे ही रखडली आहे. योजना पूर्ण होण्यास कालावधी लागणार असल्याने सध्या पाणीपुरवठा होत असलेल्या कृष्णा योजनेची जलवाहिनी तातडीने बदलण्याची गरज आहे. सततच्या गळतीमुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. चार दिवसआड पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. भविष्यात शहरालगतचा परिसराचा नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश होऊ शकतो. त्यामुळे शहरासाठी पर्यायी पाणी योजना अत्यंत गरजेची आहे. वारणा योजना मंजूर झाली असली त्याला असलेला काठावरील सर्वच गावांचा विरोध आहे. अन्य बाबींचा विचार करता योजना पूर्ण होण्यास बराच कालावधी लागणार आहे. नगरपरिषदेत काँग्रेस आघाडीची सत्ता असताना कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलासह अन्य कामांसाठी महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेतून २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. तो नगरपरिषदेला प्राप्तही झाला असताना केवळ श्रेय मिळणार नसल्याच्या कारणातून तो निधी शासनाला परत पाठविण्यात आला. दुरुस्तीसाठी मंजूर अनुदानातून ११ किलोमीटर लांबीची अत्यावश्यक जलवाहिनी बदलासह आवश्यक ती कामे करावीत' असे मोरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंटक अधिवेशन..

$
0
0

कोल्हापुरातील अधिवेशन निर्णायक ठरणार

'महाराष्ट्र इंटक'चे करवीरनगरीत पहिल्यांदाच अधिवेशन, शनिवारी राष्ट्रीय पदाधिकारी दाखल होणार

कोल्हापूर टाइम्स टीम

देश आणि राज्यभरातील प्रमुख कामगार संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक), राज्यस्तरीय अधिवेशन यंदा कोल्हापुरात होत आहे. करवीरनगरीत रविवारी (ता. २४) पहिल्यांदाच होत असणाऱ्या अधिवेशनात केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात रणशिंग फुंकले जाणार आहे. या अधिवेशनासाठी संघटनेचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी शनिवारी कोल्हापुरात दाखल होत आहेत.

'महाराष्ट्र इंटक'तर्फे दर तीन वर्षांनी राज्यस्तरीय अधिवेशन होते. कोल्हापुरात यापूर्वी १९९२-९३ मध्ये 'इंटक'तर्फे शिबिर भरविले होते. कोल्हापुरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय अधिवेशन होत असल्याने 'इंटक'शी संलग्नित कामगार संघटनेत उत्साह आहे. येथे 'इंटक'शी संलग्नित कामगार संघटना विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आहेत. एसटी, महावितरण, टेक्सटाइल, रेल्वे, साखर कारखानदारी, महापालिका अशा विविध क्षेत्रात संघटना कार्यरत आहे. शिवाय असंघटित कामगारांना 'इंटक'च्या छताखाली संघटित करण्याचा प्रयत्न आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनात आंदोलनाचा निर्णायक लढा घोषित होईल, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कामगार संघटनाचे राज्यभरातील १५०० हून अधिक प्रतिनधी अधिवेशनात सहभागी होणार आहेत. 'इंटक'चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. जी. संजीवा रेड्डी, पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी सोनम पटेल, 'इंटक'चे राज्याध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे प्रमुख मार्गदर्शन आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रेड्डी हे शनिवारी कोल्हापुरात दाखल होत आहेत. संघटनेशी संलग्नित कामगार प्रतिनिधीसोबतही ते संवाद साधणार आहेत. दरम्यान अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सचिव मुकेश तिगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांची टीम कार्यरत आहे. स्वागताध्यक्ष हिंदुराव पाटील, शामराव कुलकर्णी, चंद्रशेखर पुरंदरे, सुभाष ढेरे, शिवानंद अहिरवडे, बंडोपंत वाडकर, आप्पासाहेब साळोखे आदींचा त्यामध्ये समावेश आहे. त्यांना सुरेश सूर्यवंशी, राजू पवार, सुवर्णा जाधव, सारिका शिंदे, नगामा शेख, उदय भंडारे, आझाद शेख आदींचे सहकार्य लाभत आहे.

'नीम'विरोधात ठरणार आंदोलनाचा अजेंडा

मोदी सरकारने कामगार क्षेत्रामध्ये 'नीम'नावाची नवीन वर्गवारी सुरू केली आहे. या वर्गवारीतून कंत्राटी पद्धतीने भरती केलेले शिकावू कामगार वर्षानुवर्षे शिकावू कामगारच राहणार आहेत. त्यामुळे भांडवलदारांना कमी वेतनात कुशल मनुष्यबळ मिळते. मात्र कामगारांना कोणत्याही सुविधा, हक्क, सुरक्षा नियमानुसार मिळत नाहीत. किमान वेतनही उपलब्ध होत नाही. या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी सर्व श्रमिक संघटना 'इंटक'च्या नेतृत्वाखाली एकत्रित आल्या आहेत.

कोल्हापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात तीन ते चार महत्त्वपूर्ण ठराव होतील. या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातील प्रतिनिधी एकवटणार आहेत. अधिवेशनात कामगार हितासाठी निर्णायक आंदोलनाची दिशा ठरेल.

मुकेश तिगोटे, सचिव, इंटक महाराष्ट्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images