Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा आरोप

$
0
0

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार

कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा आरोप

सोलापूर :

'पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. आम्ही या घटनेचे राजकारण करणार नाही. परंतु, सरकारने पाकिस्तानवर कडक कारवाई करण्यासाठी पाऊल उचलावीत,' अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे रविवारी सकाळी बंजारा समाजाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते. दहशतवादी हल्ला होणार असल्याची कुणकुण लागली असताना ही त्या ठिकाणी काळजी न घेतल्याने ४२ जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता न थांबता पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी धडक कारवाई होणे गरजेचे असल्याचेही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.

भाजपला सरकार चालवणे जमत नाही. सुमारे १४ हजार शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या आहेत. दुष्काळ जाहीर केला मात्र, सरकारने दुष्काळ निधी दिलेला नाही किंवा वीजबिल माफ केले नाही शिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही दिलेली नाही. एकूणच निष्क्रिय ठरलेल्या भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या संवेदना काळात नाहीत. या सरकारला खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही, असेही अशोक चव्हाण म्हणाले. भाजपकडे गाजराची पुंगीसुद्धा वाजवायला पैसे नाहीत, हे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव यांचे वक्तव्य बरोबर असल्याचेही चव्हाण म्हणाले. सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा बिनदिक्कतपाने लढवावी आम्ही पाठीशी राहू अशी. ग्वाही ही चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विठ्ठल मंदिराच्या अभ्यासासाठीइस्रायलचे विद्यार्थी पंढरपुरात

$
0
0

विठ्ठल मंदिराच्या अभ्यासासाठी

इस्रायलचे विद्यार्थी पंढरपुरात

पंढरपूर :

भारतीय संस्कृती, इतिहास, संगीत आणि मंदिरे याचा अभ्यास करण्यासाठी भारतात आलेल्या इस्रायलच्या हिब्रू युनियव्हर्सिटीतील ३० विद्यार्थ्यांनी पंढरपूरला भेट दिली. येथील विठ्ठल मंदिर, वारीची परंपरा याची माहिती घेण्यासाठी हे विद्यार्थी माघी एकादशीला पंढरपुरात आल्याने लाखो भाविकांसमवेत त्यांना यात्रेचा अनुभव मिळाला.

रविवारी सकाळी सर्व विद्यार्थी चंद्रभागेवर येऊन नावेने विष्णुपद मंदिराकडे गेले. चंद्रभागा वाळवंटातील विविध मंदिराची माहिती घेत या विद्यार्थ्यांनी नौकाविहाराचाही आनंद लुटला. विठ्ठलाच्या मूर्तीत प्रचंड ऊर्जा असून, दर्शन घेतल्यावर याची जाणीव झाल्याचे डेनियाला या विद्यार्थिनीने चक्क हिंदीत सांगितले. यातील अनेक विद्यार्थी भारतीय भाषांचाही अभ्यास करीत असून हिंदी, संस्कृत, तेलगू, तामिळ अशा भाषा बोलण्याचा ते प्रयत्न करतात. जेरुसलेम येथील हिब्रू हे संशोधनासाठी प्रसिद्ध विद्यापीठ आहे. भारतीय मंदिरांची स्थापत्य कला आणि संस्कृती हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून, त्यासाठी १२ दिवसांच्या दौऱ्यावर विद्यार्थी आले आहेत. सुरुवातीला अजंठा वेरूळ याचा अभ्यास करून ते पंढरपूरमध्ये पोचले. हिब्रू विद्यापीठाचे प्राध्यापक डेव्हिड शोमन आणि विगल ग्रावर हे दोन मार्गदर्शक या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी येथे आले असून, यातील शोमन हे विद्यार्थ्यांना भारतीय भाषा शिकवतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यानी आश्वासनन पाळल्यास कमळावर बहिष्कार

$
0
0

..तर 'कमळा'वर बहिष्कार

पंढरपूर :

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. आचारसंहितेपूर्वी सकल मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न झाल्यास भाजपवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला.

आंदोलनकाळात १३७९२ जणांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेऊन, मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयाना दहा लाख रुपये व सरकारी नोकरीचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री व सरकारने यातील कोणतेच आश्वासन पूर्ण न केल्याने रविवारी सकल मराठा मोर्चाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सरकारने शब्द पाळल्यास त्यांच्या सोबत जाऊ आणि शब्द न पाळल्यास भाजप आणि कमळावर बहिष्कार घालून त्याना सत्तेत येण्यापासून रोखू, असा इशारा सकल मराठा मोर्चाचे रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तर ‘कमळा’वर बहिष्कार

$
0
0

पंढरपूर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. आचारसंहितेपूर्वी सकल मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न झाल्यास भाजपवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला.

आंदोलनकाळात १३७९२ जणांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेऊन, मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयाना दहा लाख रुपये व सरकारी नोकरीचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री व सरकारने यातील कोणतेच आश्वासन पूर्ण न केल्याने रविवारी सकल मराठा मोर्चाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सरकारने शब्द पाळल्यास त्यांच्या सोबत जाऊ आणि शब्द न पाळल्यास भाजप आणि कमळावर बहिष्कार घालून त्याना सत्तेत येण्यापासून रोखू, असा इशारा सकल मराठा मोर्चाचे रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठल मंदिराकडून शहीदांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत

$
0
0

पंढरपूर:

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील शहीद झालेल्या दोन जवानांच्या कुटुंबीयाना प्रत्येकी १० लाख रूपये मदत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या दुःखद घटनेमुळे सर्व देश हळहळला होता. या हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील नितीन शिवाजी राठोड आणि संजयसिंह राजपूत या दोन वीरपुत्रांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी व महाराष्ट्रातील तमाम विठ्ठलभक्त वारकरी सहभागी असून, या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीमार्फत प्रत्येकी १० लाख रूपये अशी एकूण २० लाख रूपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या योग्य निर्देशानुसार हा निधी मंदिर समितीमार्फत शहिदांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला जाणार असल्याचे डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजापूर घाटात ट्रक उलटून सोलापूरचे सात भाविक ठार

$
0
0

सोलापूर । सूर्यकांत आसबे :

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या सोलापूरच्या भाविकांवर काळाचा घाला आला. तुळजापूर सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर घाटातील वळणावर टॅंकर व कारचा विचित्र अपघात होऊन त्यात चार बालक, दोन महिला व पुरुष असे एकूण सात जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना पुढील उपचारांसाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. रविवारी झालेल्या अपघातातील अपघातग्रस्त वाहनांना आदळून टँकर या कारवर पलटी झाल्याने हा अपघात घडला.

सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घाटशीळ घाटातील वळणावर तुळजापूरकडून सोलापूरकडे जाणारा टँकर क्रमांक एम.एच.१३ आर ६५३७ व सोलापूर कडून येणारी स्विफ्ट कार क्रमांक एम एच १२ वाय ये ३६७२ यावर टँकर पलटी होऊन कारमधील सात जण जागीच ठार झाले.

मृतांची नावे -

वर्षा लिंगराज आडम (१२), रजनी प्रेमकुमार चिलवेरी (३५), शिवकुमार गोविंद पोबत्ती (४०), नर्मदा शिवकुमार पोबत्ती (३५), नेताजी शिवकुमार पोबत्ती (१२), श्रद्धा शिवकुमार पोबत्ती (४), अपूर्वा प्रेमकुमार चिलवेरी (१३)

गंभीर जखमींची नावे -

नागेश जनार्दन क्यातम (३२), मयुरी नागेश क्यातम (२५), कृतिका शिवकुमार पोबत्ती (१५), श्रावणी भालचंद्र गड्डम (८)

काल रविवार दिनांक १७ रोजी कंटेनर आणि टँकर यांचा जो अपघात झाला होता त्याच वाहनाला हा टँकर धडकला व खालून येणाऱ्या कारवर पलटी झाला यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. रविवारी झालेल्या अपघातातील दोन्ही वाहने त्या जागेवरून हटवली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती अशी चर्चा होत होती. घटनास्थळी पोलीस विभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक, अग्निशामक दलाचे वाहन व रुग्णवाहिका तातडीने पोहोचले. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कारवरील टँकर बाजूस काढून आतील सर्व मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. या घटनेमुळे सोलापूर रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली असून उस्मानाबाद बायपास महामार्गावरून वळविण्यात आली आहे.

68053348

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीएसकेंवर कोल्हापूर जिल्हा कोर्टात आरोपपत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे डी. एस. कुलकर्णी यांच्यासह कुटुंबावर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोल्हापूर जिल्हा कोर्टात आरोपपत्र दाखल केले. साडेचार हजार पानांच्या आरोपपत्रात फिर्यादींच्या जबाबांसह डीएसके यांच्या मालमत्ता आणि फसवणुकीबद्दल माहिती देण्यात आली आहे.

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसके ग्रुपने राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. गुंतवलेली रक्कम व त्यावरील परतावा मिळत नसल्याने कोल्हापूरसह पुणे, मुंबई, सांगली, सातारा, आदी ठिकाणी डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमांगी व मुलगा गिरीष या तिघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. दोन हजार ४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात बाजीराव किल्लेदार (रा. कळंबा) यांनी फिर्याद दिली होती. यानुसार राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी २८ जानेवारी २०१८ मध्ये याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला होता.

तपास अधिकारी राजेंद्र शेडे यांनी साडेचार हजार पानांचे आरोपपत्र नुकतेच जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यु. कदम यांच्या कोर्टात दाखल केले. या आरोपपत्रात तक्रारदारांच्या फिर्यादी, जबाब, गुंतवणुकीचे तपशील, संशयितांचे जबाब, डीएसके ग्रुपच्या मालमत्तांची माहिती, जप्त मालमत्ता यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मे २०१८ मध्ये पुणे कोर्टातही डीएसके यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ३५० गुंतवणूकदारांची १९ कोटी ७७ लाख ८० हजार ५१७ रुपयांची रक्कम डीएसके ग्रुपमध्ये अडकली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी डीएसकेंच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. तपास अधिकारी राजेंद्र शेडे यांनी कोल्हापूर, मालेगाव (जि. सांगली) आणि सोलापूर येथील सुमारे १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार मालमत्तेची विक्री करून गुंतवणूकदारांची रक्कम भागवली जाऊ शकते, अशी माहिती तपास अधिकारी शेडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेने चार दिवसांत निर्मण का फिरवला?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा गडहिंग्लज

गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी ग्रामपंचायतीची इमारत आयसीआयसीआय बँकेला भाडेतत्त्वावर देण्यास जिल्हा परिषदेने मान्यता दिली आणि लगेच चार दिवसात आपला हा आदेश फिरवला. जिल्हा परिषदेने केलेला हा प्रकार म्हणजे खेळखंडोबा असून जिल्हा परिषद सदस्यांना ग्रामपंचायतींची मुस्कटदाबी करण्याचा अधिकार नाही. हा दबाव आम्ही सहन करणार नाही असा इशारा पंचायत समितीचे सदस्य विठ्ठल पाटील यांनी दिला. सभापती विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गडहिंग्लज पंचायत समितीच्या मासिक बैठकीत जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

करंबळी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडून तेरा लाखांचे कर्ज घेऊन इमारत बांधली. ग्रामपंचायतीने उत्पन्नाबाबत स्वयंपूर्ण व्हावे या उद्देशाने सरपंचासह सदस्यांनी एकत्र येऊन इमारतीचा एक भाग आयसीआयसीआय बँकेला भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात करार केला आणि जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवला. २५ जानेवारी २०१९ रोजीच्या पत्रान्वये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम ५५ नुसार ग्रामपंचायतीला सभागृह बँकेला देण्यास हरकत नसल्याचे कळवले. मात्र नंतर चार दिवसांत, ३० जानेवारीच्या पत्राने या कार्यवाहीला स्थगिती देण्यात आली. अशा धोरणामुळे ग्रामपंचायतींना अडचणीत आणण्याचे काम जिल्हा परिषद सदस्य करत आहेत काय? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. मात्र हा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत झाल्याने तो वरिष्ठांचा निर्णय आहे असा खुलासा प्रभारी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी केला.

सुरुवातीला पुलवामा मध्ये झालेल्या हल्ल्यात बळी पडलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षा, माझी शाळा समृद्ध शाळा या योजनांविषयी गटशिक्षणाधिकारी रमेश कोरवी यांनी माहिती दिली. एकाच कामावर दोनदा निधी खर्च केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. रस्ता नियमात बसत नसताना कामांच्या उद्घाटनाचे नारळ कसे फुटतात असा सवाल विठ्ठल पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी कार्यस्थळावर जाऊन याची माहिती घ्यावी असे आदेश सभापतींनी दिले. ग्रामपंचायत कर वसुलीबाबत यंत्रणेने सतर्क दाखवावी अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली.

अन् महिला सदस्यात जुंपली

आरोग्य अधिकारी डॉक्टर अथणी यांनी न्यू प्राथमिक आरोग्य केंद्रात कसल्याच तक्रारी नाहीत. तरीही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत अशी माहिती देताच सदस्या बनश्री चौगुले यांनी मागच्या बैठकीत ज्या सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला, त्याने किमान अभ्यास करायला हवा होता किंवा संबंधित खातेप्रमुखांशी चर्चा करायला हवी होती. अशा प्रश्नांमुळे समाजात चुकीचे संदेश जातात असे सुनावले. यावर विरोधी आघाडीच्या जयश्री तेली यांनी सदस्य सभागृहात अभ्यास करण्यासाठीच येतात. तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही असे प्रत्युत्तर दिले. यातून वाद वाढत चालला. चौगुले व श्रिया कोणकेरी हे सदस्य एकाबाजूला तर तेली यांना प्रकाश पाटील व विठ्ठल पाटील यांनी पाठिंबा दिला. सभापतींनी यात हस्तक्षेप केला. बैठकीत उपसभापती विद्याधर गुरबे यांच्यासह सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३०६६ कोटी एफआरपी जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तुकडे पाडून दिलेल्या एफआरपीअंतर्गत कोल्हापूर विभागातील ३६ कारखान्यांनी १५ फेब्रुवारीअखेर ३०६६ कोटी ५३ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. अद्याप ११४६ कोटी ३६ लाख रुपये एफआरपी थकीत आहे. एफआरपी न देणाऱ्या १२ साखर कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई सुरू झाल्यावर कारखान्यांकडून ऊस बिलाचा पहिला हप्ता जमा झाला असून दुसरा हप्ता जमा करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

राज्यात १८४ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून ७५१ लाख टन उसाचे गाळप झाले आहेत. ८२२.४९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कोल्हापूर विभागात ३६ कारखाने सुरू असून १७१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून २०७ लाख टन साखरेचे उत्पन्न झाले आहे. गाळप होऊनही १५ जानेवारीपर्यंत कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जमा केली नव्हती. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरूकेले. शेट्टी यांनी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन केल्यावर साखर आयुक्तांनी कारखान्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश काढले. त्यानंतर कोल्हापूर विभागातील ३६ कारखान्यांना जाग आल्यावर प्रतिटन २३०० रुपयांनी पहिला हप्ता जमा केला.

३० नोव्हेंबरपर्यंत गाळप झालेल्या उसापोटी २५ कारखान्यांनी सुरुवातीला १५ जानेवारीपर्यंत २३०० रुपयांप्रमाणे ५९७ कोटी ५४ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. पण थकीत एफआरपीची रक्कम २०४५ कोटी रुपये होती. पण साखर आयुक्तांनी कोल्हापूर विभागातील १२ कारखान्यांवर साखर जप्तीची नोटीस पाठवल्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत २५ कारखान्यांनी प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे १६०० कोटी रुपये जमा केले. एकीकडे स्वाभिमानी एकरकमी एफआरपीसाठी आग्रही असताना दुसरीकडे कारखाने २३०० रुपयांवर बोळवण करत होते. पण, स्वाभिमानीने जिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यालयांवर हल्लाबोल केल्यानंतर कोल्हापूर विभागातील चार खासगी कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता जमा केला आहे.

खासगी कारखान्यांवर दबाव

खासगी कारखाने सुरवातीला एकरकमी एफआरपी देण्यासाठी अनुकूल होते. पण सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्यावर दबाव टाकल्याने त्यांनी प्रतिटन २३०० रुपये पहिला हप्ता जमा केला. पण गेल्या आठवड्यात खासगी कारखान्यांनी दुसरा हप्ता १५० ते ४५० रुपये जमा केला आहे. सांगलीच्या हुतात्मा किसन अहिर कारखान्याने २४५५ रुपयांप्रमाणे एफआरपी जमा केली आहे. सांगलीच्या वसंतदादा कारखाना खासगी संस्थेकडे चालवण्यास दिला असून त्यांनी २७१७ रुपये एफआरपी देऊन बाजी मारली आहे. सांगली जिल्ह्यातील केन अॅग्रोने २४५० रुपये जमा केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी कारखान्यांकडून लवकरच दुसरा हप्ता जमा होणार आहे.

जीआर निघाल्यावर फरक निघणार

केंद्र सरकारकडून साखर निर्यात अनुदान, बफर स्टॉक आणि ट्रान्स्पोर्टवरील २०० ते २५० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. हे अनुदान वगळून कारखानदारांनी उसाचा दुसरा हप्ता देण्याची घोषणा केली. त्यामुळे ३५० ते ६०० रुपये दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. सरकारने अनुदानाचा अद्याप सरकारी अध्यादेश काढलेला नाही. हा अध्यादेश काढल्यावर कारखाने एकरकमी एफआरपी जमा करणार आहेत.

एफआरपी जमा केलेले टॉप टेन कारखाने (रक्कम कोटीमध्ये)

जवाहर २४३.७६

दत्त दालमिया १६४.००

दत्त शिरोळ १५९.७३

पाटील साखराळे १५३.६३

क्रांती कुंडल १२५.८५

शाहू कागल १२२.९७

हेमरस ११९.६०

सोनहिरा ११३.५३

दूधगंगा १०४.८३

घोरपडे १०३.०१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या डीबीटी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. मात्र राजर्षी शाहू शिक्षण शुल्क योजनेंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील ६८६९ विद्यार्थ्यांची ऑनलाइमधील व्हाऊचर रिडिमेशन प्रक्रिया पूर्ण झाली नाही. आधार नंबर लिकिंगचा अभाव, बदललेले मोबाइल क्रमांकामुळे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. यासंदर्भात शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून तिन्ही जिल्ह्यांतील कॉलेजांना रिडीम प्रक्रिया पूर्ण करण्याविषयी कळविले आहे.

राज्य सरकारने आठ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुबीयांतील पाल्यासाठी शिक्षण शुल्क योजना जाहीर केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या शिष्यवृत्ती योजनांची महाडिबीटी पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने प्रभाव अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. या योजनेंतर्गत कॉलेजनी अजूनही विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली व्हाऊसर्च रिडीम केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालकांनी शिवाजी विद्यापीठ व कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पत्रे संबंधित कॉलेजना पत्रे पाठवली आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या बँक खात्याची आधार संलग्नता आहे की नाही?, बँक खात्याशी व आधार नंबर जोडलेला दूरध्वनी क्रमांक चालू आहे का? याची खात्री संबंधित बँकेत भेट देऊन करावी अशा सूचना केल्या आहेत. संबंधित कॉलेजनी या संदर्भात विद्यार्थ्यांना तत्काळ सूचना करुन, कार्यवाहीचा अहवाल २२ फेब्रुवारी अखेर शिक्षण सहसंचालक कार्यालयाला सादर करावा असे कळविले आहे.

शिक्षण सहसंचालक कार्यालयाने कॉलेज व्यवस्थापनाला स्पष्ट सूचना केल्या आहेत. यामध्ये कॉलेजनी आपल्या स्तरावर रिडीम न केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी त्यांचा प्रोफाइल लॉगीन करुन रीडीम बटण दाबणे आवश्यक आहे. राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एकूण ५६,१९० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये कॉलेजस्तरावर मान्यता प्राप्त अर्जाची संख्या ४३,६५९ इतकी आहे. तर विभागीयस्तरावर मान्यता प्राप्त अर्जाची संख्या ४३,५८० इतकी आहे. कॉलेजस्तरावर २२१ अर्ज तर विभागीयस्तरावर ७९ अर्ज प्रलंबित आहेत. व्हाऊचर रिडिमेशन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे ६८६९ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. यामध्ये कोल्हापुरातील २६८४, सांगलीतील १९१३ आणि सातारा येथील २२७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

४ कोटींची रक्कम

कोल्हापूर विभागात विविध पातळ्यावर शिष्यवृत्ती योजनेविषयी प्रबोधन झाले. यामुळे या योजनेचा लाभ बहुसंख्य विद्यार्थ्यांना झाला. योजनेच्या अंमलबजावणीत कोल्हापूर विभाग, राज्यामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये कोल्हापूर २९,२१,७१४ रुपये, सांगली १८,४४,५१८ आणि सातारा २९,३३,५२५ इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम ७६ लाख ९९ हजार ७५६ इतकी आहे. तिन्ही जिल्ह्यांतील कॉलेजांना मिळालेली रक्कम ४ कोटी ४९ लाख ५१ हजार ८२१ इतकी आहे.

एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही कॉलेजकडून व्हाऊसर्च रिडीम केली नाहीत, त्यांनी तत्काळ कार्यवाही करावी यासाठी शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून पत्रे पाठवली आहेत.

- प्रतिभा दीक्षित, नोडल ऑफीसर कोल्हापूर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टातील अपहारप्रकरणी बेमुदत उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

यळगूड (ता. हातकणंगले) येथील पोस्टात सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या महिलांनी व अनेक ग्रामस्थांनी आर.डी खात्यांसह अन्य ठिकाणी बचत केलेली कोट्यवधी रुपयांच्या रक्कमेत दोन कर्मचाऱ्यांनी संगनमताने अपहार केल्याचे उघडकीस आले असून संबधित दोषींवर कडक कारवाई करावी व सर्व खातेदारांचे पैसे तत्काळ मिळावे या मागणीसाठी माजी उपसरपंच उत्तमराव कागले, ग्रा. पं. सदस्य तुकाराम हणबर, भाजपचे राजेंद्र मांगूरकर, शिवसेनेचे अनिल रोटे, काँग्रेसचे अविनाश पाटील, आनंदा निकम आदींनी पोस्ट कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, उपोषणाला भाजपचे जेष्ठ नेते महावीर गाट, हुपरी नगराध्यक्षा जयश्री गाट, माजी आमदार राजीव आवळे, अमित गाट, यळगूड दूध संस्थेचे कार्यकारी संचालक सुजितसिंह मोहीते यांनी भेट दिली. याबाबत पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठांशी चर्चा केली.

यळगूड येथील पोस्ट कार्यालयात आरडीचे महिला एजंट फातिमा साखरवाले, आकाशी पाटील, कल्पना जोशी यांनी आरडीचे हुपरी परिसरातील पैसे गोळा करुन भरले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे भरल्यानंतर कार्यालयात पोहोचसाठी सही, शिक्का मिळत नसल्याने साशंकता होती. अनेकांच्या खात्यांची पाच वर्षाची मुदत संपल्याने पोस्ट कर्मचारी तुकाराम कांबळे यांनी सर्वांची पासबुके गोळा केली. मात्र काही महिने कोणत्याही खातेदारांचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सब पोस्टर मास्तरांना विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती.

सर्व खातेदार या सर्वसामान्य कुंटुंबातील मोलमजुरी करणारे असल्याने सब पोस्टमास्तर अनील सोनुले, तुकाराम कांबळे यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यासह पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील पोस्ट कर्मचाऱ्यांची कसून चौकशी व्हावी, त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असल्यामुळे सर्व खातेदार व एजंटांना संरक्षण मिळण्याची मागणी करण्यात आली. अपहार प्रकरणातील दोषींवर कारवाई होऊन सर्व खातेदारांचे पैसे तत्काळ मिळावेत या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

यळगूड पोस्ट कार्यालयात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी संबधितांवर कारवाई होण्यासाठी व सर्वसामान्यांचे पैसे तत्काळ मिळण्यासाठी खासदार धनंजय महाडिक, राजू शेट्टी व छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे.

- महावीर गाट, जेष्ठ नेते, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावर्डे दुमाला येथे ‘एक गाव एक शिवजयंती’ उत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला येथे गेल्या २१ वर्षांपासून 'एक गाव एक गणपती'ची परंपरा जोपासली जात आहे. ही परंपरा शिवजयंतीच्या वेळीही जोपासली जावी म्हणून गावातील सर्व तरुण मंडळांच्या युवकांनी एकत्र येत यावर्षी १९ फेब्रुवारी रोजी गावात एकच संयुक्त शिवजयंती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावात 'एक गाव एक शिवजयंती' उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे.

गावामध्ये यापूर्वी दरवर्षी विविध मंडळांकडून लहान-मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होत होती. अलीकडे गावात एकच शिवजयंती साजरी केली जावी अशी इच्छा काही तरुणांकडून व्यक्त केली जात होती. त्यादृष्टीने गावातील तरुणांनी विशेष पुढाकार घेत सर्व तरुण मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन संयुक्त शिवजयंतीची संकल्पना मांडली. या संकल्पनेला सर्व तरुण मंडळांनी पाठिंबा दर्शवित संयुक्त शिवजयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला.

संयुक्त शिवजयंतीनिमित्त सोमवारी (ता. १८ फेब्रुवारी) सायंकाळी ऋषिकेश पाटील यांचे शिवचरित्र विषयावर व्याख्यान पार पाडले. आज, शिवजयंतीदिवशी सकाळी ७:३० वाजता गावात पन्हाळ्याहून शिवज्योत आगमन होणार असून पारंपरिक वाद्यांसह पालखी मिरवणूक सोहळा होणार आहे. यावेळी घरोघरी दारात सडा - रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले जाणार आहे. सायंकाळी प्रा. अवधूत साळोखे कारभारवाडीकर यांचा शिवकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदला इचलकरंजीत प्रतिसाद

$
0
0

बंदला इचलकरंजीत प्रतिसाद

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी अखिल भारतीय व्यापारी फेडरेशन (कैट) च्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला इचलकरंजीत चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील किराणा व्यापार्‍यांसह विविध व्यापार्‍यांनीही बंदमध्ये सहभाग घेतला.

काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय व्यापारी फेडरेशनच्यावतीने सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये इचलकरंजी किरकोळ किराणा असोशिएशनने सहभाग घेतला. हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी किराणा व भुसारी संघटना, स्टेशनरी दुकानदार, इचलकरंजी डिस्ट्रिब्यूशन असोशिएशनसह मुख्य मार्गावरील सर्व कापड दुकानदार महात्मा गांधी पुतळा येथे जमले. याठिकाणी दहशतवादाच्या विरोधात निदर्शने केली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली काढण्यात आली. यावेळी भगतराम छाबडा, महावीर शिरगुप्पे, राजू खटावकर आदींसह व्यापारी सहभागी झाले होते.

कोडोलीत कडकडीत बंद

म. टा. वृत्तसेवा, वारणानगर

पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी कोडोली व्यापारी असोसिएशन व सर्वं पक्षाच्या वतीने पुकारलेला बंदाला उस्फूर्त पाठिंबा मिळाला, कोडोली -वारणानगर परीसरातील सर्व व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवून बंद शांततेत पार पडला.

सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी चौकात कोडोली ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन कापरे, व्यापारी व विविध पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले. छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शाहिद जवानांचा श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी पाकिस्तानच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून पाकिस्तानी ध्वज जाळण्यात आला. या नंतर प्रमुख मार्गावरून शाहिद जवान व भटमते विषयी घोषणा देत रॅली काढण्यात आली. सर्वोदय चौकात रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत पाकिस्तानचा ध्वज जळण्यास पुढाकार घेतला. यावेळी व्यापारी असोसिनचे अध्यक्ष बाबा पाटील, उपाध्यक्ष सुरज शहा, मोती उंबरे, राहुल भोसले, प्रकाश रोकडे, प्रमोद कोरे, रमेश मेनकर, उदय पाटील, अविनाश चारणकर संजय बजागे, मोती उबारे, मोहन पाटील यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृत योजनेस वाढतोय विरोध

$
0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

इचलकरंजी शहराच्या अमृत योजनेला शिरोळ तालुक्यातील दानोळीबरोबरच वारणा काठच्या गावातून कडाडून विरोध झाला. कोथळी ग्रामस्थांनीही सर्व्हेक्षणास विरोध केला. ही योजना झाल्यास जयसिंगपूर, उदगाव, चिंचवाड येथील नागरिकांना सांगलीच्या शेरीनाल्याचे पाणी प्यावे लागणार असल्याने योजनेस विरोध वाढत आहे. यामुळे अमृत योजनेचे भवितव्य अंधारात आहे.

इचलकरंजी शहरासाठी कृष्णा व पंचगंगा नदीवरून पाणी योजना आहे. मात्र पंचगंगा दुषित झाल्याने तसेच कृष्णा योजनेस गळती लागल्याने लोकप्रतिनिधींनी शहरासाठी अमृत योजना मंजूर करून घेतली. शहरात थेट वारणेचे शुद्ध पाणी आणण्यासाठी दानोळी येथून उपसा करण्याचा निर्णय घेतला. अमृत योजनेच्या कामाचा नारळ फोडण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर दानोळी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून यास कडाडून विरोध केला. यामुळे ३१ मे रोजी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे पाणीपुरवठा राज्यमंत्री बबनराव लोणीकर यांच्या दालनात खासदार व आमदारांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी वारणा कृष्णा संगमापासून पुढे पाणीउपसा करण्यासाठी जागा निश्‍चित करण्याचे ठरले होते. लोकभावना लक्षात घेवून दानोळीऐवजी कोथळी येथून अमृत योजनेसाठी पाणी उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर कोथळीच्या हद्दीत या योजनेचा जॅकवेल नको असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी सर्व्हेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले.

वारणेचे पाणी इचलकरंजी शहरात आणणारच असा निश्‍चय केलेल्या नगरसेवकांनी आता पुन्हा हालचाली गतिमान केल्या आहेत. कोथळीला पाणी कमी पडू नये यासाठी अंकली येथे कृष्णा नदीत १३ फूट उंचीचा बंधारा बांधण्याची सूचना खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. यावेळी आधी अंकली येथे बंधारा बांधण्यासाठी निविदा काढा, पंधरा दिवसांत यासाठी निधी मंजूर करा अशी मागणी कोथळी ग्रामस्थांनी केली. तर आधी कोथळी परिसरातील वारणा नदीकाठचा सर्व्हे करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी इचलकरंजीच्या नगरसेवकांनी केली. इचलकरंजी पालिकेचे पदाधिकारी व कोथळी ग्रामस्थात एकमत न झाल्याने ही बैठक निष्फळ ठरली.

हरिपूर येथील संगमाजवळ वारणेचे पाणी कृष्णेत मिसळते, तर पुढे अंकली येथे कृष्णेकाठी पुलाजवळ जयसिंगपूर शहराच्या पाणी योजनेचे जॅकवेल आहे. कृष्णा नदीपात्रात मिसळलेले वारणेचे पाणी जयसिंगपूर शहरास मिळते. सांगली शहरातील सांडपाणीही मोठ्या प्रमाणात कृष्णा पात्रात मिसळते. इचलकरंजी शहराची अमृत योजना झाल्यास वारणेचे पाणी कृष्णापात्रात मिसळणार नाही. परिणामी सांगलीच्या शेरी नाल्याचे दुषित पाणी जयसिंगपूर व उदगाव येथील नागरिकांना प्यावे लागणार आहे. यामुळे इचलकरंजीच्या अमृत योजनेस विरोध वाढू लागला आहे. अंकली येथे बंधाऱ्याचा निर्णय झाल्यास हा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.

वाद 'कृष्णे'चा

शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदी प्रदुषणाचा प्रश्‍न गंभीर आहे. अशातच अमृत योजना झाल्यास मोठ्या प्रमाणात वारणेच्या पाण्याचा उपसा होईल व कृष्णेत सोडण्यात आलेले सांगली शहराचे सांडपाणी जयसिंगपूर, उदगाव, चिंचवाड येथील नागरिकांना प्यावे लागणार आहे. गेल्या दहा वर्षात शिरोळ तालुक्यात ऐन उन्हाळ्यात अनेकदा वारणा, कृष्णेचे पात्र कोरडे पडले. पिके वाळून गेली, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली. यामुळे उदगाव येथून कृष्णेचे पाणी इचलकरंजीला देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेला अडचणींचा डोंगर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभेला स्वतंत्र लढण्याची चार वर्षे तयारी करत असलेल्या भाजपसमोर युतीमुळे अडचणींचा डोंगर उभा राहणार आहे. युतीच्या सूत्रानुसार शिवसेनेला सहा जागा द्याव्या लागणार असून उर्वरित चार जागांच भाजपला मिळण्याची चिन्हे आहेत. नव्या निर्णयाने पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांची मोठी अडचण होणार आहे. महाआघाडीतून बाहेर पडण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय राहणार नसून युतीचा सर्वाधिक फायदा सेनेचा होणार आहे. मात्र, विधानसभेची तयारी करत असलेल्या भाजपचे नेते, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिरोळ भाजपचे अनिल यादव, शिवसेनेचे संग्राम कुपेकर, कागलचे माजी आमदार संजय घाटगे अशा अनेकांची चांगलीच कोंडी झाली आहे.

शिवसेना व भाजपची युती सोमवारी रात्री जाहीर झाली. त्यांचे जागा वाटप झाल्याने विधानसभेला जिल्ह्यात सध्याच्या सहा जागा मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. उर्वरित चारपैकी दोन जागाांवर भाजपचे आमदार आहेत. चंदगड आणि कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून या जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. ही युती व्हावी यासाठी सेनेच्या आमदरांचा आग्रह होता. भाजप तर त्यासाठी अगतिक झाल्याचे चित्र होते. आता युतीची घोषणा झाल्याने विधानसभेच्या हालचालींना वेग येणार आहे.

विनय कोरेंचे काय करणार

विधानसभेच्या जिल्ह्यात दोन जागा देण्याचा शब्द देत जनसुराज्य शक्ती पक्षाला भाजपने महाआघाडीत सामील करून घेतले. पण, हातकणंगले आणि पन्हाळा या जनसुराज्य पक्षाच्या हक्काच्या जागा शिवसेनेकडे असतील. तेथे सेनेचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या जागा ना भाजपला मिळतील ना जनसुराज्यला. त्यामुळे आघाडीत घेतलेल्या विनय कोरेंचे काय करायचे हा मोठा प्रश्न महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर असेल. मैत्रीपूर्ण लढत करायची की आघाडीतून बाहेर पडायचे याबाबत कोरेंना तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे.

कागल, चंदगडमध्ये सेनेची अडचण

युती करताना सहा मतदार संघ सेनेकडेच असतील. उर्वरित कागल, चंदगड, कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी या चार मतदार संघावर भाजप दावा करेल. ते त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मात्र कागलमधून इच्छूक असलेले संजय घाटगे व चंदगडमधून तयारी केलेले संग्राम कुपेकरांची मोठी अडचण होईल. सेना स्वतंत्र लढेल म्हणून हे दोघे चार वर्षे तयारी करत आहेत. त्यांना रिंगणात उतरणे अवघड होणार असले तरी म्हाडा चे अध्यक्ष समरजित घाटगे यांना मात्र सहजपणे उमेदवारी मिळणार आहे. चंदगडमध्ये अनेकजण इच्छूक असले तरी भाजपला उमेदवार निवडण्याचे आव्हान आहे. गोपाळराव पाटील, रमेश रेडेकर, अप्पी पाटील अशी काही नावे सध्या चर्चेत आहेत.

महेश जाधव, अनिल यादवांची कोंडी

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून लढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. युतीमुळे आमदार राजेश क्षीरसागर हेच युतीचे उमेदवार ठरणार असल्याने जाधव यांच्या तयारीवर पाणी फिरणार आहे. युतीचा फायदा मात्र विद्यमान आमदारांना होणार आहे. जाधव यांच्यासारखीच अवस्था शिरोळमधील अनिल यादव यांची होणार आहे. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहून त्यांना तेथे उमेदवारी मिळाली नाही. आता भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून ते या पक्षात आले. पण हा मतदारसंघ सेनेकडे असल्याने त्यांना उल्हास पाटील यांचा प्रचार करावा लागणार आहे. भाजपमधून लढण्यासाठी राधानगरीत राहुल देसाई भाजपवासी झाले. पण तेथेही त्यांना रिंगणात उतरता येणार नाही.

फायदा सेनेलाच

सहा मतदारसंघात सेनेचे आमदार असल्याने हे सर्व मतदारसंघ या पक्षाला मिळतील. तेथे भाजपची ताकद मिळणार असल्याने या सहा ठिकाणी धनुष्यबाणाला मदत होणार आहे. याशिवाय भाजपला कागल व चंदगडमध्ये मदत होईल. कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी मतदारसंघ भाजपकडेच असतील. भाजपने उमेदवारी देतो म्हणून तीन वर्षात अनेकांच्या हातात कमळ दिले आहे. पण त्यांना उमेदवारी देणे अवघड होणार आहे.

पालकमंत्र्यांचे काय?

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर उत्तर मतदारसंघासह राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून लढतील अशा शक्यता वर्तविण्यात येत होत्या. मात्र, आता युती झाल्याने उत्तर मतदारसंघ सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, राधानगरी-भुदरगड मतदारसंघ आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडेच राहिल. दोन्ही मतदारसंघ सेनेकडे असल्याने पालकमंत्री पाटील हे कोठून लढणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यांचा होणार फायदा ?

- राजेश क्षीरसागर

- सुजित मिणचेकर

- प्रकाश आबिटकर

- उल्हास पाटील

- सत्यजित पाटील

- चंद्रदीप नरके

- सुरेश हाळवणकर

- अमल महाडिक

यांची होणार कोंडी

- महेश जाधव

- राहुल देसाई

- संजय घाटगे

- अनिल यादव

- विनय कोरे

- राजू आवळे

- सत्यजित कदम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा उभारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचार कार्याची लोकप्रतिनिधींना सतत प्रेरणा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या परिसरात त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभा करावा, म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, गटनेते अरुण इंगवले यांची भेट घेतली. यशवंतरावांचा नऊ फूट उंचीचा ब्राँझचा पुर्णाकृती पुतळा तयार असून, जिल्हा परिषदेने चबुतरा उभा तयार करुन त्यावर पुतळा उभा करावा अशी मागणी केली.

याप्रसंगी अध्यक्ष महाडिक यांनी, पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. गटनेते इंगवले यांनी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत मान्यता घेऊ. पुतळा उभारणीसाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करावा लागलो. सर्व टप्प्यावर प्रयत्न करुन पुतळा उभारणीला मान्यता मिळवू. याकामी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊ असे सांगितले.

'यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राजची स्थापना करुन सत्तेचे विक्रेंदीकरण केले. ग्रामीण विकासाला चालना दिली. शिवाय नव्या नेतृत्वाला संधी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती मिळावी यासाठी जिप परिसरात पुतळा उभा करावा. प्रतिष्ठानतर्फे पुतळा तयार करुन जिपकडे सुपूर्द करू' असे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजयसिंह पाटील, अशोक पोवार, माणिक मंडलिक, रमेश मोरे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, वसंतराव सांगावकर यांनी चर्चेदरम्यान सांगितले. शिष्टमंडळात बाळासाहेब बुरटे, प्रा. सुजय पाटील, रामभाऊ कोळेकर, निलेश देसाई, रामभाऊ कोळेकर, प्रदीप काटकर, सुमित खानविलकर, विनोद डुणुंग आदींचा समावेश होता.

प्रतिष्ठानची स्थापना १९८६मध्ये

माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली १९८६ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली. त्यावेळी प्रतिष्ठानमये माजी महापौर बळीराम पोवार, माजी नगराध्यक्ष एम. के. जाधव, के. ब. जगदाळे, के. जी. पवार, वसंतराव मोहिते आदींचा समावेश होता. प्रतिष्ठानने पुतळा उभारणीसाठी निधी जमविला होता. त्या निधीच्या माध्यमातून ब्राँझचा पुतळा तयार केला आहे. किरकोळ कामे शिल्लक आहेत. कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठानचे पुनरुज्जीवन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती पक्की, उमेदवारी नक्की

$
0
0

लोकसभेत सेनेला फायदा, राष्ट्रवादीसमोर आव्हान

Gurubal.mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर

भाजप आणि शिवसेनेच्या युतीमुळे लोकसभा निवडणुकीत सेनेला मोठे बळ मिळणार आहे. यामुळे कोल्हापूरात प्रा. संजय मंडलिक यांना ताकद मिळणार असल्याने त्यांचा मार्ग सुकर होत असतानाच राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. हातकणंगले मतदारसंघ देखील सेनेकडेच जाण्याची शक्यता असल्याने तेथेही भाजपची त्यांना मदत मिळणार आहे. यामुळे दोन्ही काँग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटनेसमोर किमान आव्हान उभे करण्यात युतीला यश मिळण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहे. दरम्यान, दोन्ही मतदारसंघ सेनेकडे जाणार असल्याने लोकसभेत जिल्ह्यात 'कमळ' फुलवण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लागणार आहे.

कोल्हापूरातून प्रा. संजय मंडलिक हे युतीचे उमेदवार असणार आहेत. सेनेचे तीन व भाजपचा एक आमदार याबरोबरच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची ताकद त्यांना मिळणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील आमदार सतेज पाटील यांच्यासह काही नाराज नेते आणि कार्यकर्त्यांची छुपी मदतही त्यांना होणार आहे. यामुळे प्रा. मंडलिक यांची ताकद वाढणार असल्याने त्यांचा मार्ग सुकर झाला झाला आहे. याउलट राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार खासदार महाडिक यांची वाट आणखी बिकट होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. आघाडीतील काही नाराज नेते आजही त्यांना स्वीकारण्यास तयार नाहीत. चार वर्षे ज्या भाजपशी सलगी केली, तो पक्ष आता त्यांच्या उघड विरोधात असणार आहे. महाडिक यांना मदत करण्याची मोठी इच्छा असली तरी भाजपवर निश्चितच मर्यादा येणार आहेत. याचा फटका महाडिक यांना बसणार असल्याने त्यांना विजयासाठी आता प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत.

हातकणंगले मतदारसंघावर भाजप दावा सांगण्याची शक्यता आहे. पण शिवसेनेने उमेदवारीचा शब्द देत धैर्यशील माने यांना पक्षात घेतले आहे. त्यामुळे सेना ही जागा सोडणार नाही. भाजपतर्फे लढायला राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तयारी सुरू केली असली तरी खासदार राजू शेट्टी यांच्या तुलनेत त्यांना मर्यादा आहेत. युती झाल्याने शेट्टी आता स्वतंत्र लढण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या सोबतीने ते युतीला टक्कर देतील. दोन्ही मतदारसंघ सेनेला मिळणार असल्याने भाजपला लढण्याऐवजी सेनेला जिंकून आणण्याची भूमिका पार पाडावी लागणार आहे.

चौकट

मंत्री पाटील, महाडिकांची अडचण

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार महाडिक यांची जवळीक वाढली होती. आता मात्र महाडिकांच्या पराभवासाठी मंत्र्यांना उघडपणे प्रचार करावा लागणार आहे. खासदारांचे बंधू अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत. त्यांनाही भावाच्या विरोधात व्यासपीठावर जावे लागेल. महापालिकेत भाजप व ताराराणी आघाडी एकत्र आहे. 'ताराराणी' चे नगरसेवक महाडिकप्रेमी आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत या सर्वांची मोठी अडचण होणार आहे. यातून व्यासपीठावर एक आणि प्रत्यक्षात वेगळी भूमिका हे चित्र दिसण्याची दाट शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रमाणपत्र’ चौकशी अहवाल लटकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावरील स्वाक्षरीचा घोळ आणि दुबार छपाई प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्यास चौकशी समितीला मुहूर्त मिळेना. गतवर्षी दीक्षान्त समारंभात पदवी प्रमाणपत्राचा घोळ झाला होता. वर्षभराचा कालावधी उमटूनही या प्रकरणी अद्याप कोणावरही दोष निश्चिती झाली नाही. स्वाक्षरीच्या घोळामुळे तब्बल २५ हजार प्रमाणपत्रांची नव्याने छपाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून अहवाल तयार झाला आहे. मात्र हा अहवाल सादर करण्यास विलंब का असा सवाल आता उपस्थित होत आहे.

लोगो : शिवाजी विद्यापीठाचा लोगो वापरावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरगाव येथे आज समाधी दर्शन सोहळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

योगीराज बालदास महाराज समाधी मठ शिरगाव (ता. शाहूवाडी) येथे पौर्णिमेनिमित्त मंगळवारी (ता. १९) 'समाधी दर्शन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महाप्रसादाचे वाटपही केले जाणार असल्याची माहिती बालदास महाराज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव पाटील, रंगराव खोपडे यांनी दिली.

गेल्या दहा महिन्यांपासून पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हा समाधी दर्शन सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्ताने होणाऱ्या अन्नदानाचा मान बळवंत कुंभार व जालिंदर बसरे यांना मिळाला आहे. कार्यक्रमाच्या रुपरेषेनुसार सोमवारी सकाळी ८.३० ते १० या वेळेत बालदास महाराज यांच्या मूर्तीसह सामधीस्थळी असणाऱ्या देवदेवतांच्या मूर्तींना अभिषेक, सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत नामसंकीर्तन, आरती व त्यानंतर महाप्रसाद वाटपाने धार्मिक कार्यक्रमाची सांगता होणार आहे. ज्या भाविकांना योगीराज महाराजांच्या सामधीस अभिषेक करून अन्नदान करायचे आहे, अशा लोकांनी सेवा ट्रस्टशी संपर्क साधावा, असे आवाहनही ट्रस्टने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओबीसींचा मुंबईत मोर्चा

$
0
0

कोल्हापूर: ओबीसी, भटके विमुक्तांच्या आरक्षणामध्ये होणारी घुसखोरी थांबवावी यासाठी राज्यातील सर्व ओबीसी भटके विमुक्तांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन २५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील विधीमंडळावर महामोर्चा काढणार आहेत. या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष शिवाजी माळकर यांनी दिली. ओबीसी सेवा संघाची दैवज्ञ बोर्डिंग येथे बैठक झाली. मुंबईतील मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, यासाठी तालुकानिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. बैठकीत दिगंबर लोहार म्हणाले, येत्या चार दिवसांत कागल, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, आजरा, गडहिंग्लज, शिरोळ, हातकणंगले तालुक्यांचा दौरा करण्यात येणार आहे.चर्चेत पी. ए. कुंभार, किसन काटकर, चंद्रकांत कोवळे, अॅड. रणजित गुरव, किशोर लिमकर, सुधारक पेडणेकर, केरबा बागडी आंदीनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images