Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हातकणंगले बंदला प्रतिसाद

$
0
0

हातकणंगले बंदला प्रतिसाद

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये भारतीय चाळीस जवान शहीद झाले. त्या शूर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी हातकणंगले तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला अनेक गावातील ग्रामस्थांनी प्रतिसाद देत आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पुकारला.

दरम्यान हुपरी शहरातील शहरवासीयांनी एकत्र येऊन कँडल मार्च आयोजित करुन शहीद जवानांना भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहिली. तसेच प्रत्येकवेळी भ्याड हल्ला करणाऱ्या या पाकिस्तानी अतिरेक्यांना चांगला धडा शिकवण्याची मागणी करण्यात आली. या कँडल मार्चमध्ये शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नगराध्यक्षा जयश्री गाट, जिल्हा परिषद सदस्या स्मिता शेंडूरे, धैर्यशील माने, नानासाहेब गाट, नगरसेवक सूरज बेडगे, अमेय जाधव, लालासाहेब देसाई, संदीप वाईंगडे, सुरेश इंग्रोळे, शिवराज नाईक, राजेश होगाडे, शितल घोरपडे, शिवाजी शिंदे, नेताजी निकम, बाहुबली गाट आदीसह शहरातील सर्वपक्षीय नेते ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातकणंगले, कुंभोज, रुकडी, भादोले या गावातील नागरिकांनी भ्याड हल्लांचा निषेध करुन पाकिस्तान अतिरेक्यांच्या पुतळ्याचे दहन करुन कडकडीत बंद ठेवून शहिदांना आदरांजली वाहिली.

आजरा कडकडीत बंद, निषेध फेरी

म. टा. वृत्तसेवा, आजरा

काश्मिर येथे पुलवामामध्ये गुरुवारी (ता. १४) सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. सोमवारी आजरा शहरात या हल्ल्याचा निषेध म्हणुन सर्व व्यवहार १०० टक्के बंद ठेवण्यात आले. शहरातील मेडिकल व्यावसायिकांनी देखील दुकाने बंद ठेवत निषेध नोंदविला.

शहिदांवरील हल्ल्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. शुक्रवार व शनिवारी कँडल मार्च तसेच निषेध रॅली व निवेदने देऊन नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. शहरात बंद पाळण्यात आला. हा बंद १०० टक्के यशस्वी झाला. सोमवारी ग्रामीण भागात पाळक असतो. त्यामुळे शहरात गर्दी असते. मात्र बंदमुळे आज पूर्णत: शुकशुकाट जाणवत होता. सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध फेरी काढली आणि संभाजी चौकात पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. कार्यकर्त्यांनी शहरातील आजरा महाविद्यालय, आजरा हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, ऊर्दू हायस्कूल, रोझरी हायस्कूल, पं. दीनदयाळ विद्यालय या शाळात जाऊन शाळांना बंद करण्याची व सुटी देण्याची मागणी केली. यामुळे सर्व शाळाही बंद होत्या. एसटी वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली. यामुळे १०० टक्के आजरा शहर बंद होते. या बंदमध्ये सर्वपक्षीय, सर्वधर्मीय कार्यकर्ते तसेच विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंदोलनातील कोतवालांनानोटीस देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या ७५ दिवसांपासून काम बंद करून ठिय्या आंदोलन करीत असलेल्या कोतवालांना कामावर हजर होण्यासंबंधीची नोटीस देण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी सर्व प्रांताधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे तहसीलदारांतर्फे दोन दिवसांत कोतवालांना नोटिसा देण्यात येणार आहे. दरम्यान, न्याय मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्यामुळे नोटीस देऊ नये, अशा मागणीचे निवेदन कोतवाल संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी देसाई यांना देण्यात आले.

सरकारने चतुर्थ श्रेणीत सामावून घ्यावे या मागणीसाठी कोतवाल संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन चालू आहे. गावपातळीवरील महसूल प्रशासनात कोतवाल पद महत्वाचे आहे. त्यांनी काम बंद करून दोन महिन्याहून अधिक काळ ठिय्या आंदोलनास बसल्याने स्थानिक पातळीवरील महसूल प्रशासनावर परिणाम झाला आहे. याची दखल घेऊन सरकारने ५० वर्षाच्या आतील कोतवालांना मूळ पाच हजार मानधनात अडीच हजारांची तर ५० वर्षावरील कोतवालांना पाच हजारऐवजी पंधरा हजार मानधन देण्याचा निर्णय घेतला. मात्र संघटनेने हा निर्णय अमान्य असल्याचे जाहीर करून चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणीची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार केला. मात्र सध्या महसूल प्रशासनात लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात केली जात आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीचे काम व्यापकपणे होत आहे. यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. म्हणून जिल्हाधिकारी देसाई यांनी कोतवालांना त्वरित कामावर हजर व्हावे, अन्यथा कारवाई होऊ शकते, अशी नोटीस देण्याची सूचना प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याची कार्यवाही सुरू झाल्यानंतर कोतवाल संघटना आणि तालुका तहसील प्रशासनात संघर्षची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

माजी आमदार घाटगे यांची भेट

कोतवालांच्या आंदोलनस्थळी कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. त्यांनी मागणी सोडवण्यासंबंधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

कोट

कोतवालांना कामावर हजर होण्यासंबंधीची नोटीस देण्याची सूचना जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकाऱ्यांना दिली आहे. याप्रमाणे ते पुढील कार्यवाही करतील.

- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायकवाड यांचा राजीनामा

$
0
0

कोल्हापूर: हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रांत सरचिटणीस लाला गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक अडचणीमुळे राजीनामा देत असल्याचे पत्रक त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकात असे म्हटले आहे की, ३८ वर्षे संघटना वाढवण्यासाठी काम केले आहे. विधायक काम करताना संघटना मजबूत केली. पण यापुढे वैयक्तिक अडचणीमुळे काम करता येणार नाही. त्यांनी राजीनामा मंजूर करण्याची विनंती पक्षाकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडकडीत बंद

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

काश्मिरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील व्यापारी, किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांनी बंद पाळून शहीद जवानांना श्रद्धाजंली वाहिली. व्यापारी पेठेत जागोजागी निषेधाचे फलक लागले होते. अखिल भारतीय व्यापारी फेडरेशन (कैट) बंदची हाक दिली होती.

कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे जनरल सेक्रेटरी अॅड. प्रवीण खंडेलवाल रविवारी दि महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर्स डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन अधिवेशन सांगता कार्यक्रमास आले होते. यावेळी त्यांनी काश्मिरमधील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी व्यापारी बंद पाळणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर फेडरेशनशी संलग्न असलेल्या स्थानिक संघटनांना बंद पाळण्याचे आवाहन दिल्लीतील कार्यालयातून आले. त्यानुसार सर्व व्यापाऱ्यांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी सकाळपासून महाद्वार रोडवरील कपडे, धान्य, दागिन्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बंदला किरकोळ व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला. फेरीवाल्यांनी व्यवसाय बंद ठेवला. त्यामुळे महाद्वार रोड, पापाची तिकटी, ताराबाई रोडवर शुकशुकाट होता. कपिलतीर्थ मार्केटमध्ये भाजी व फळ विक्रेते वगळता किराणा दुकानदारांनी व्यवहार बंद ठेवले होते. फक्त हॉटेल व औषध विक्रीची दुकाने सुरु होती.

सोन्याची चांदीची मार्केट असलेल्या गुजरीतही सराफ व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन पाठिंबा दिला. गुजरी बंद झाल्याने सुवर्ण कारागिरांनाही सुटी देण्यात आली. महाद्वार रोडला संलग्न असलेल्या जोतिबा रोड, चप्पल लाइन, पानलाइन, पापाची तिकटी, भेंडी गल्ली परिसरातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला.

शिवाजी रोड, हत्तीमहल रोडवरील दुकानाबरोबर महानगरपालिकेजवळील व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते. आज सोमवार असल्याने लक्ष्मीपुरी धान्य बाजारात मोठी उलाढाल होते. तसेच या पेठेत गर्दीही असते. पण धान्य व्यापारी बंद सहभागी झाल्याने लक्ष्मीपुरी परिसरात शुकशुकाट जाणवत होता. धान्य वाहतूक करणारी छोटी वाहनेही बंद होती.

राजारामपुरीतील मुख्य रस्त्यासह अन्य गल्ल्यामध्येही कपडे व्यापाऱ्यांसह अन्य व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. बंदमुळे शुकशुकाट होता. शाहूपुरी, स्टेशन रोड, न्यू शाहूपुरीतील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला.

फेरीवाल्यांचाही पाठिंबा

महाद्वार रोडवरील फेरीवालेही आजच्या बंदमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे परिसरात शुकशुकाट जाणवत होता. महाद्वारावर फक्त वाहनांची वर्दळ असली तरी नेहमीसाठी गर्दी नव्हती. बंदची माहिती नसल्याने ग्रामीण भागातील भाजी व फूल विक्रेते आले होते. चौकाचौकात रिक्षा उभ्या होत्या.

सराफ संघाची शांतता फेरी

गुजरीमध्ये कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने शांतता फेरी काढून शहिदांना आदराजंली वाहिली. फेरीत सराफ संघाचे कुलदीप गायकवाड, माणिक जैन, विजय हावळ, महेंद्र ओसवाल, किरण गांधी यांच्यासह सराफ व्यापारी सहभागी झाले होते. सराफ संघाने अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेधाचा फलक लावला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलकापूरच्या उपनगराध्यक्षपदी मनोहर शिंदे

$
0
0

मलकापूरच्या उपनगराध्यक्षपदी मनोहर शिंदे

कराड :

नवनिर्मित मलकापूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी मनोहर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत नगरसेवकपदी कॉंग्रेसचे आनंदराव सुतार व सागर जाधव यांची वर्णी लागली आहे. मलकापूर निवडणुकीत कॉंग्रेसने एकहाती सत्ता मिळविल्यानंतर सोमवारी विशेष सभा आयोजित केली होती.

या विशेष सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पिठासन प्राधिकारी निलम येडगे यांनी उपनगराध्यक्षपदी मनोहर शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. स्वीकृत सदस्य पदासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी करून उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे यांनी पात्र ठरवलेल्या अर्जांपैकी दोघांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण गटाचे आनंदराव दगडू सुतार व उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाचे सागर हणमंत जाधव यांची वर्णी लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची मदत

$
0
0

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून

शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची मदत

पंढरपूर

'जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले होते. या दोन शहीद जवानांच्या कुटुंबीयाना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात येणार आहे,' अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ४२ भारतीय जवान शहीद झाले होते. या दुःखद घटनेमुळे सर्व देश हळहळतो आहे. या हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील नितीन शिवाजी राठोड आणि संजयसिंह राजपूत हे दोन जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी व महाराष्ट्रातील तमाम विठ्ठलभक्त वारकरी सहभागी असून, या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीमाच्या वतीने प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या योग्य निर्देशानुसार हा निधी मंदिर समितीमार्फत शहीदांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला जाणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतात्म्यांच्या कुटुंबीयांनापंढरपूर मंदिराकडून मदत

$
0
0

पंढरपूर : 'जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले होते. या दोन शहीद जवानांच्या कुटुंबीयाना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात येणार आहे,' अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ४२ भारतीय जवान शहीद झाले होते. या दुःखद घटनेमुळे सर्व देश हळहळतो आहे. या हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील नितीन शिवाजी राठोड आणि संजयसिंह राजपूत हे दोन जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी व महाराष्ट्रातील तमाम विठ्ठलभक्त वारकरी सहभागी असून, या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीमाच्या वतीने प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या योग्य निर्देशानुसार हा निधी मंदिर समितीमार्फत शहीदांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला जाणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सतेज पाटलांची मानसिक स्थिती बिघडलीय’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसे आमदार सतेज पाटील यांची मानसिक स्थिती बिघडत चालली आहे. थेट पाइपलाइन योजनेवरुन त्यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील आरोप म्हणजे काजव्याने सूर्याला लांच्छन देण्यासारखे आहे 'असा प्रतिटोला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी लगावला.

राजेंद्रनगर येथील कार्यक्रमात आमदार पाटील यांनी पालकमंत्र्यामुळे थेट पाइपलाइन योजना रखडल्याचा आरोप केला होता. त्याला जाधव यांनी सोमवारी प्रत्युत्तर दिले. याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'थेट पाइपलाइन योजनेबाबत पालकमंत्र्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. ज्या ठिकाणी अडचणी आहेत, तेथे लक्ष घालून प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य दिले. पण आमदार पाटील यांनी राज्यमंत्री असताना पदाचा गैरवापर करुन प्रथम जॅकवेलऐवजी पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरुवात करायला लावली. योजना आणल्याचे श्रेय लाटण्यासाठी त्यांनी अक्षम्य चुका केल्या आहेत. प्रशासन, कंत्राटदार व सल्लागारांवर दबाव टाकून वेळोवेळी चुकीच्या पद्धतीने कामे सुरू ठेवली. तज्ज्ञांचे म्हणणे, प्रशासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत अव्यवहार्य योजना कोल्हापूरकरांच्या माथी मारली. यामधून त्यांनी नेमके काय साध्य केले हा संशोधनाचा विषय आहे. त्यांनी सत्तेत असताना शहरावर 'टोल धाड' आणली होती आणि नागरिकांच्या भावनांना ठोकर मारुन उद्दामपणे टोल भरल्याचे छायाचित्रही प्रसिद्ध केले होते. आताही त्यांनी योजना शहरवासियांच्या माथ्यावर मारली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Shivjayanti in Delhi: राजधानीत रंगलाय शिवजन्माचा सोहळा

$
0
0

नवी दिल्ली:

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही राजधानी दिल्लीत शिवजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. परदेशी पर्यटक व वेगवेगळ्या देशांच्या दूतावासातील अधिकारी, कर्मचारीही सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

खासदार संभाजीराजे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र सदनात आज सकाळपासूनच सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात झाली असून थोड्याच वेळात शिवजन्मकाळ सोहळा रंगणार आहे. नंतर नवीन महाराष्ट्र सदन ते इंदिरा गांधी कला केंद्रापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन दिल्लीकरांना घडविण्यात येणार आहे. सुमारे ३०० वारकरी, पोवाडे, ध्वज पथक, ढोल ताशा पथक, हलगी पथक, धनगरी ढोल, लेझीम पथक, वासुदेव, गोंधळी अशा अनेक पारंपरिक वाद्यांचा गजर होणार आहे. त्याचबरोबर शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके होणार आहेत. तर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन व खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता मुख्य कार्यक्रम आहे. दरम्यान, १७ फेब्रुवारीला महाराष्ट्र सदन येथे दुपारी तीन वाजता 'शक्ती, शौर्य और संस्कार का महोत्सव शिवजन्म राष्ट्रोत्सव' या विषयावर काव्य मैफल होईल.

महाराष्ट्रातून १५०० कलाकार सहभागी

महाराष्ट्रातून तब्बल १५०० कलाकार दिल्लीच्या महोत्सवात सहभागी झाले आहेत. दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे प्रवासाची मोफत व्यवस्था केली आहे. या विशेष रेल्वेला 'महाराणी ताराराणी एक्सप्रेस' नाव दिले आहे. कलाकारांच्या निवासाची व भोजनाची मोफत सोय केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूर: शिवभक्तानं घरातच उभारली मेघडंबरी

$
0
0

पंढरपूर:

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात साजरी होत आहे. मिरवणुका, वाहनफेऱ्या, रथयात्रा आणि त्यात सहभागी झालेल्या शेकडो शिवप्रेमींनी गावं-शहरांतील चौक फुलून गेले आहेत. शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, दुसरीकडं पंढरपूरमधील शिवभक्तानं आपल्या घरातच रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती उभारली आहे. त्यासाठी त्यानं तब्बल सात लाख रुपये खर्च केले आहेत.

सुभाष शिंदे-नाईक हे शेतकरी कुटुंबातील असून, त्यांनी शिवनेरी बंगल्यात भव्यदिव्य अशी रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती साकारली आहे. या मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघून सगळेच नतमस्तक होतात. बंगल्याच्या मुख्य हॉलमध्ये त्यांनी ही मेघडंबरी उभारलीय. यासाठी लागणारे दगड, लाकूड आणि मूर्तीदेखील निरखून-पारखून आणली आहे. या मेघडंबरीसाठी जवळपास सात लाख रुपये खर्च केले आहेत. शिवभक्त शिंदे-नाईक यांनी उभारलेल्या मेघडंबरीची परिसरात चर्चा होत असून, ती पाहण्यासाठी शिवप्रेमी गर्दी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवजयंतीनिमित्त मिरवणुका, साहसी खेळ

$
0
0

शिवजयंतीनिमित्त मिरवणुका, साहसी खेळ

टीम मटा, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मंगळवारी सोलापूर शहर आणि परिसरातील विविध मंडळांकडून मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली . शिवजयंतीनिमित्त शहरातून एकूण २६ मंडळांनी जल्लोषपूर्ण मिरवणूक काढल्या. पुलवामा हल्ल्यातील जवानांना विविध मंडळांकडून अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक मंडळांचा सामाजिक उपक्रम राबविण्यावर यंदा भर असल्याचे दिसून आले. दरम्यान, शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने सहभाग नोंदवून सर्वधर्म समभावाची पताका फडकवली. रंगभवन येथून मुस्लिम ब्रिगेडने मिरवणूक काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा बटालियनच्या जवानांची शहीद स्मारकास आदरांजली

$
0
0

मराठा बटालियनच्या जवानांची

शहीद स्मारकास आदरांजली

कराड :

सैन्य दालातील मध्य प्रदेशातील सागर येथील लष्करी तळावरील ६, मराठा बटालियनच्या तेरा सायकलस्वार जवानांनी वडगाव हवेली (ता. कराड) येथील मरणोत्तर किर्तीचक्र देऊ गौरविलेले शहीद जवान ह. मेजर शिवाजी बाळू जगताप यांच्या वडगाव हवेली येथील स्मृती स्मारकास भेट देऊन आदरांजली वाहिली. या वेळी वीरपत्नी कुसुम शिवाजी जगताप, सुरज शिवाजी जगताप यांच्यासह कमांडर दिग्विजय जाधव, उपसरपंच राजेंद्र थोरात, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जे. जे. जगताप, ग्रामविकास अधिकारी, गाव कामगार तलाठी यांच्यासह ग्रामस्थ, म. गांधी विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

मध्य प्रदेशातील सागर येथील लष्करी तळावरील ६ मराठा बटालियनचे १३ जवान गेल्या काही दिवसांपासून पुणे येथून सायकल प्रवासाला निघाले असून, ते प्रामुख्याने छ. शिवाजी महाराजांचे गड, किल्ले व शहीद जवानांच्या स्मृती स्मारकांना भेटी देत आहेत. सोमवारी, १८ रोजी सकाळी येथील शहरात त्यांचे आगमन झाले. त्या नंतर दुपारी त्यांनी वडगाव हवेली येथील शहीद जवान शिवाजी बाळू जगताप यांच्या स्मृती स्मारकाला भेट दिली. जगताप २८ जानेवारी १९९४ रोजी जम्मू-काश्मीरमधील सीमेवर अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद झाले होते. त्यांच्या या वीरगतीची भारत सरकारने दखल घेत त्यांना मरणोत्तर किर्तीचक्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. वडगाव हवेली येथे त्यांचे स्मृती स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाला या जवानांनी भेट देऊन आदरांजली वाहिली. सायकल प्रवास करणाऱ्या पथकाचे प्रमुख ले. आदित्यकुमार यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनात देशसेवेसाठी सैन्यदलात सहभागी होण्याचे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्ती पूर्ण मात्र पाणी कमी दाबाने

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कावळा नाका येथील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेली पाइपलाइन दुरुस्तीचे काम मंगळवारी पहाटे पूर्ण झाले. दुरुस्ती पूर्ण झाली असली, तरी पाणीपुरवठा मात्र कमी दाबाने सुरू होता.

कावळा नाका परिसरातील पाइपलाइनचे काम सोमवारी सुरू असल्याने ई वॉर्डामधील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवला होता. परिणामी बंद असलेल्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्याचवेळी दुरुस्तीचे काम त्वरित करण्याचे प्रयत्न सुरू होती. मंगळ‌ारी पहाटे दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला. मात्र सोमवारचा बॅकलॉग असल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. त्यामुळे दुपारपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू होता. सायंकाळच्या सत्रात येणाऱ्या भागाला मात्र पाणीपुरवठा नियमितपणे सुरू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

$
0
0

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोलापुरात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत कार्यरत असलेल्या तसेच मूळगाव सोलापूर असलेल्या ग्रामीण पोलिस दलातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी जिल्ह्याबाहेर बदल्या केल्या आहेत.

अकलुजचे पोलिस निरीक्षक संजय सुर्वे यांची सांगली येथे, माढ्याचे पोलिस निरीक्षक दिलीप लुकडे तसेच वैरागचे पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे या दोघांची पुणे ग्रामीण, कुर्डुवाडीचे पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे, सुरक्षा शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप या दोघांची कोल्हापूर येथे, टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांची सातारा येथे बदली करण्यात आली आहे. वळसंगचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश भावीकट्टी, पंढरपूर शहरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुवा, अक्कलकोट नॉर्थचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुमार घाडगे या तिघांची सातारा येथे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक शिवकुमार जाधव, शंकर पाटील, राजेंद्र कदम व संजय मोतेकर या चौघांची सातारा येथे बदली करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावभाजी अन् खुमासदार गप्पा

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा अवलंब करताना खासदार धनंजय महाडिक यांची मंगळवारी महापालिका चौक परिसरात 'ब्रेकफास्ट पे चर्चा' रंगली. महापालिकेजवळील पातळभाजी-पावभाजीसाठी खासियत असलेल्या एका हॉटेलमधील चरचरीत पातळभाजी-पाववर ताव मारताना खुमासदार गप्पांना ऊत आला. परिसरातील नगरसेवक, माजी नगरसेवक, यंग सीनिअर्स आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीने 'ब्रेकफास्ट पे चर्चा'ची चव आणखीनच वाढली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार महाडिक यांनी संपर्क वाढविला आहे. संपर्कासाठी वेगळ्या माध्यमाचा अवलंब करताना त्यांनी गेल्या आठवड्यात शिवाजीपेठेत 'मिसळ पे चर्चा' केली. शिवसेना-भाजप युती जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदारांनी दुसऱ्याच दिवशी लोकांच्या भेटीगाठी घेत आगामी निवडणुकीसाठी जणू मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याची चर्चा यानिमित्ताने झाली.

दरम्यान, मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी चौकात शिवजयंती सोहळा आयोजित केला होता. जन्मकाळ सोहळा साजरा करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिकांच्या गर्दीने चौक फुलला होता. चौक परिसरातच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून नाष्ट्याची व्यवस्था केली होती. याठिकाणी खासदारांनी समोशाची चव चाखली आणि कार्यकर्त्यांसोबत महापालिकेलगतचे हॉटेल गाठले. तेथील पातळभाजी आणि पावची लज्जत न्यारी. त्या खाद्यपदार्थाचा आस्वाद चाखत नागरिकांसोबत गप्पा सुरू केल्या. ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक किरण शिराळे, शेखर कुसाळे, ईश्वर परमार, किरण नकाते, माजी महापौर बाजीराव चव्हाण, माजी नगरसेवक चंद्रकांत सांगावकर, रमेश पोवार, उदय जगताप, महेश वासुदेव, रियाज सुभेदार, विकी महाडिक, राजू नदाफ यांच्यासह भागातील नागरिक, कार्यकर्ते सहभागी झाले. कार्यकर्त्यांचे खासदारांसोबत फोटोसेशन झाले. सामान्य नागरिकांसोबत चहाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी काही जणांनी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पाठिंबा व्यक्त केला.

०००००

'ब्रेकफास्ट पे चर्चा' निमित्ताने महापालिका परिसरातील ज्येष्ठ नागरिक, नगरसेवक, मित्रांशी सहज संवाद झाला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या चर्चेदरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला. कोल्हापूरकरांच्या पाठबळामुळे गेल्या पाच वर्षांत अनेक प्रश्न संसेदत मांडून सोडवणूक केली. येत्या निवडणुकीतही सर्वांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

खासदार धनंजय महाडिक

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नृसिंहवाडी दत्त देवस्थानच्या अध्यक्षपदी रामकृष्ण पुजारी

$
0
0

२ सिंगल फोटो...

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानच्या अध्यक्षपदी रामकृष्ण विष्णू पुजारी यांची, तर सचिवपदी अमोल अवधूत विभूते यांची बिनविरोध निवड झाली. नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानच्या विश्‍वस्तांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष विकास पुजारी होते. यावेळी अध्यक्षपदी रामकृष्ण पुजारी व सचिवपदी अमोल विभूते यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष विकास पुजारी तसेच विश्‍वस्तांनी नूतन अध्यक्ष व सचिवांचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज कँडल मार्च

$
0
0

कोल्हापूर

पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रग्गेडियन ग्रुपच्यावतीने बुधवारी (ता.२०) बिंदू चौक येथून सायंकाळी सात वाजता कँडल मार्च काढण्यात येणार आहे. कँडल मार्चमध्ये फेथ फाउंडेशन, जे. के. ग्रुप, कोल्हापूर स्पोर्टस् क्लब, हिलिंग टच फिजिओ क्लिनिक, डॉट्स अँड डॉट्स, आरहता, कोरगावकर पेट्रोल पंप, स्मार्ट वर्ल्ड, युवा ग्रुप स्टेप अप, अॅस्टर आधार, इंडो कॉउंट, मनोरमा, कोल्हापूर पब्लिक स्कूल सहभागी होणार आहेत. बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सीपीआर हॉस्पिटल, दसरा चौक मार्गे बिंदू चौकात कँडल मार्च दाखल होईल. कँडल मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हज यात्रेकरुंचे शिबीर

$
0
0

कोल्हापूर

हज फाउंडेशनच्यावतीने हज यात्रेकरुंसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर पार पडले. शिबिरांमध्ये यात्रेदरम्यान करावयास लागणारे धार्मिक विधी व यात्रा काळात आवश्यक खबरदारींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुस्लिम बोर्डिंगमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले. विमान प्रवास, उमरा, हज आणि मदिना-ए-पाक येथील जियारत विधीसाठी लागणारी कागदपत्रे याबाबत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी सिकंदर मणेर, दिलावर मुल्लाणी, नजीर मेस्त्री, मौलाना इरफान कास्मी, हाजी इम्तियाज बारगीर यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा सुरू करा

$
0
0

कोल्हापूर

जागृतीनगर, दौलतनगर येथील कुटुंबांची चुकीच्या पद्धतीने महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाने आकारणी केली आहे. त्यामुळे ५० हजाराच्या थकीत बिलासाठी पाणीपुरवठा तोडल्याबद्दल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना अखिल भारत हिंदूमहासभेच्यावतीने निवेदन देण्यात आले. पंधरा दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी संजय कुलकर्णी, जयवंत निर्मळ, संतोष पवार, बबन हरणे, सुवर्णा पवार, प्रकाश कलकुटकी, मनोहर सोरप आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृहात मुलींचे शोषण

$
0
0

सांगली ः येथील कर्नाळ रस्त्यावरील पसायदान वसतिगृहात चार शालेय मुलींचा गेल्या चार महिन्यांपासून लैंगिक छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने सांगली शहर पोलिसांसमोर आपल्यासह चार मुलींवर गुदरलेला भयंकर प्रसंग कथन केला. पोलिसांनी मुलीची फिर्याद घेऊन संस्थापक, माजी नगरसेवक नंदकुमार ईश्वराप्पा अंगडी (वय ५७, रा. पेठभाग, गवळी गल्ली), मुख्याध्यापक आप्पासाहेब महावीर करांडे (४२, यशवंतनगर), संजय अरुण किणीकर (३६) आणि त्याची पत्नी वर्षाराणी (२८, दोघेही रा. पसायदान वसतिगृह) या चौघांना अटक केली.

कर्नाळ रस्त्यावरील या वसतिगृहात पहिली ते दहावीपर्यंतची शाळा आहे. अंगडी हाच वसतिगृह आणि शाळेचे काम पाहतो. काळजीवाहक म्हणून किणीकर काम पाहते. ती पती संजय आणि एक स्वयंपाकी महिला तेथेच राहतात. मुलींच्या ज्या हॉलमध्ये एकत्र झोपण्याची सोय आहे त्या हॉलच्या दरवाजाची कडी लागत नाही. त्यामुळे मुलींना दरवाजा पुढे करुन जीव मुठीत धरुन झोपावे लागते. याच गोष्टीचा फायदा घेत संजय किणीकर मुलींचा लैंगिक छळ करत होता. त्याचा वसतिगृहातील वावरही आक्षेपार्ह होता. चार महिन्यांपूर्वी रात्री पीडित मुलगी उठली असता तो विचित्र नजरेने पाहत होता. त्यामुळे घाबरुन परत येऊन तिने हॉलमधील मुलींना हा प्रकार सांगितला. इतर कांही मुलींनीही किणीकरच्या वर्तनाबाबत आलेले अनुभव सांगितले.

परिस्थिती बेताची असल्याने वसतिगृहाचा आधार घ्यावा लागलेल्या मुलींपैकी कुणीच किणीकरच्या वर्तनाबाबत वाच्यता केली नव्हती. १८ नोव्हेंबरला रात्री मुली झोपी गेल्या. काही वेळाने किणीकर हॉलमध्ये आला. त्याने पीडित मुलीशी आक्षेपार्ह वर्तन केले. ती घाबरुन बाहेर पळाली. पाठोपाठ येऊन तिला धमकावत त्याने अश्लील चाळे करायला सुरुवात केली. कशीबशी सुटका करुन ती पुन्हा मुलींमध्ये जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी तिने हा प्रसंग इतर मुलींना सांगितला. इतर तीन मुलींनीही किणीकरने अशाच प्रकारचे कृत्य केल्याचे सांगितले. चौघी मुलींनी धाडसाने हा प्रकार मुख्याध्यापक करांडे, अंगडी, वर्षाराणी किणीकरला सांगितला. मात्र किणीकरवर कारवाई करण्याऐवजी मुलींनाच दम देऊन या प्रकाराची वाच्यता करायची नाही, असे त्यांनी बजावले. हा प्रकार कुणाला सांगितला तर नापास करण्याची धमकी दिली. त्यामुळे मुली भेदरुन गेल्या. वर्षाराणी किणीकरनेही मुलींना धमकावले.

काही दिवसांनी पीडितांपैकी एका मुलीचे आईवडील भेटायला आले. त्यावेळी मुलीने हा प्रकार सांगून टाकला. त्या पालकांनी इतर मुलींच्या पालकांना घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. बाकीचे पालकही तातडीने सांगलीत दाखल झाले. त्यांनी तत्काळ सांगली शहर पोलिस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मुलींची फिर्याद घेऊन चौघांना तत्काळ अटक केली.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images